Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

म टा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर मंगळवारी सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६ अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.

पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण १४० अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

जायकवाडीपर्यंत पाणी जाणार

मराठवाडा हा अत्यंत अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करुन देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरु करण्यात येतील. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल.

नदीजोडसाठी स्वतंत्र पदनिर्मिती

दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र तीन महामंडळात विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वय व एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करुन हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पांची मिशन मोडवर गतिमान अंमलबजावणी करणे शक्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळक्या बसमध्येच केला प्रवाशांनी प्रवास

$
0
0

धुळ्यातील प्रकार; आगाराचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे बस आगारातून मंगळवारी (दि. ३०) सकाळी निघालेल्या धुळे-नंदुरबार बसमधील सिटची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त करीत बसमध्ये ऐन पावसाळ्यात गळती लागल्याने नाराजीचा सूर आळवला होता. दरम्यान, केवळ बसच्या पुढील सोळा सिट्सवरच प्रवाशांनी बसून प्रवास केल्याचा प्रकार मंगळवारी घडली. परिवहन मंडळाने याबाबत तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी ‘मटा’प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

राज्यातील परिवहन महामंडळात प्रवाशांना चांगल्या व उत्तम सुविधा देण्यात येतात. मात्र, धुळ्यातील बसमध्ये परिस्थिती काहीशी वेगळी आहे. मंगळवारी याचाच प्रत्यय ‘मटा’च्या प्रतिनिधीस आला. त्यांनी स्वत: या बसमध्ये प्रवास करीत प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. धुळे आगारातून मंगळवारी (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नंदुरबारला जाण्यासाठी निघालेली धुळे-दोंडाईचा-नंदुरबार बस क्रमांक (एमएच १४ बीटी २३६६) हीला पावसामुळे गळती लागल्याने अनेक प्रवाशांनी बसमध्ये प्रवास करण्याचे टाळले. याचा प्रत्यक्ष अनुभव ‘मटा’ प्रतिनिधीने घेतला. बसमधील पूर्ण सिट्सपैकी केवळ अगोदरच्या सोळा सिट्सवरच प्रवाशांनी बसणे पसंत केले. आम्हाला परिवहन महामंडळाने चांगल्या सुविधा देणे अपेक्षित असून, त्याकडे धुळे विभागाचे दुर्लक्ष झाल्याचेच यातून दिसत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

सर्वसामान्यांना ग्रामीण भागातून शहरात ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बस लाभदायक ठरते. सध्या पावसाळा सुरू असून, पावसाळ्यापूर्वी गळत्या बसची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. याकडे धुळे विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले असून, बसमधील आसन व्यवस्थादेखील मोडकळीस गेल्याचे चित्र या वेळी दिसून आले. दोन वर्षांपूर्वी धुळे विभागातील तत्कालीन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी पावसाळ्यात प्रवाशांना आवाहन करीत ‘गळकी बस दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा’ ही योजना राबविली होती. त्याचीही आठवण या वेही प्रवाशांना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर अत्याचार; आरोपीस अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील लोणखेडी येथील एका सात वर्षीय शाळकरी बालिकेवर दिनेश रमेश पवार (पाटील) या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि. २९) सायंकाळच्या सुमारास घडली. ती शाळेतून आपल्या शेतातील घराकडे परत जात असताना दुचाकीने सोडून देण्याच्या बहाण्याने तिच्या घरापुढील नाल्याकाठी घेऊन जात हे दुष्कर्म नराधमाने केले. रक्तबंबाळ अवस्थेत चिमुरडी घरी परतल्यावर हा प्रकार निदर्शनास आल्याने बालिकेच्या आई-वडीलांनी ग्रामस्थांसह तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिनेश पवार यास मध्यरात्रीच अटक केली असून, बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणखेडीत सोमवारी सायंकाळी शाळेतून आपल्या घरी जाताना दिनेश पवार याने बालिकेवर लैंगिक अत्याचर केल्याची घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नराधमाला अटक झाली. परंतु, त्याला कठोर शिक्षा करा अन्यथा, आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी संप्तत लोणखेडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ३०) सकाळी तालुका पोलिस ठाण्यात धडक मोर्चा नेत आपला रोष व्यक्त केला. ग्रामस्थांनी रोष व्यक्त करताना सांगितले की, या गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे यावर नियंत्रणासाठी शासकीय, अशासकीय समिती गठीत करून याबाबत माहिती बालिकेच्या कुटुंबीयांना देण्यात यावी. तसेच राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात दखल देऊ नये अन्यथा त्यांना जागा दाखविण्याचा इशारा आदिवासी समाजाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाले पाहिजे, अशीही ग्रामस्थांनी मागणी केली. सोमवारी शाळा सुटल्यानंतर मुले व मुली आपल्या शेतशिवारांमधील घराकडे परतत होते. त्यात पीडीत व तिच्यापेक्षा मोठया बहिणीचाही समावेश होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या नराधमाने बालिका व तिची बहीण दोघांना घरी सोडून देतो असे आमिष दिले. त्यावेळी लहान बहिणीला गाडीवर बसवत दुसरीला खालीच राहू देत दुचाकी पळवून नेली. यानंतर नराधमाने बालिकेच्या घरापुढील नाल्याकाठी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बालिका घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. मुलींनी सांगितलेल्या वर्णनानुसार तसेच शेतातून दुचाकीवर कोण ये-जा करीत होते याची खात्री पटल्यानंतर नराधमाला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शर्वरी लथ यांची चित्रे ‘करंट मास्टर्स’मध्ये

$
0
0

शर्वरी लथ यांची चित्रे ‘करंट मास्टर्स’मध्ये
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अमेरिकेतील वर्ल्ड वाइल्ड आर्ट बुक्स प्रकाशकांतर्फे नावाजलेल्या पुस्तकांची शृंखला प्रकाशित केली जाते. यातीलच ‘करंट मास्टर्स -४’ या मासिकात नाशिकच्या चित्रकार शर्वरी लथ यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या मासिकात चित्र प्रकाशित होणाऱ्या त्या एकमेव भारतीय कलाकार ठरल्या आहेत.
चित्रकार शर्वरी लथ यांनी अॅक्रेलिक माध्यमात साकारलेल्या कलाकृतींना या मासिकात स्थान मिळाले आहे. जगभरातील निवडक ५० कलाकारांच्या कलाकृती या मासिकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हाँगकाँग, युरोप, बेल्जियमसह अन्य देशांतील निवडक ५० कलावंतांच्या चित्रांचा या मासिकात समावेश करण्यात आला आहे. मॉडर्न आर्ट ही संकल्पना घेऊन काम करणाऱ्या ‘करंट मास्टर्स -४’ मासिकाने शर्वरी लथ यांच्याशी संपर्क करून चित्रे मागवली. सहा महिन्यांच्या या कालावधीत त्यांचे सूचनांचे आदानप्रदान होत होते. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये लथ यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू असतानाच त्या चित्रांनी प्रेरीत होऊन काही चित्रांचा समावेश मासिकात करण्याचे संपादकांनी ठरवले. गेल्या काही महिन्यांपासून योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून ‘करंट मास्टर्स -४’ मध्ये चित्रांचा समावेश करण्यात आला. अमेरिकेमध्ये या आर्ट बुकचे नुकतेच प्रकाशन झाले.
शर्वरी लथ या नाशिकमधील प्रसिद्ध चित्रकार असून, त्यांची चित्रे बॉम्बे हाऊस, टाटा हेड क्वार्टर्स अशा अनेक ठिकाणी संग्रही ठेवण्यात आलेली आहेत.

आपण कोणत्याही माध्यमात काम करीत असलो तरी स्वत:ला प्रगत करीत जाणे महत्त्वाचे असते. आधी नाशिक, नंतर महाराष्ट्र, त्यानंतर भारत आणि आता जागतिक स्तरावर गेल्याचा आनंद आहे. परंतु, त्याबरोबरच जबाबदारीही वाढली आहे. ती निभावण्याची ताकद कलेतूनच मिळते.
- शर्वरी लथ, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतात सुफी संतांची परंपरा समृद्ध

$
0
0

भारतात सुफी संतांची परंपरा समृद्ध
शांतिदूत हजरत सैय्यद जरीफ चिश्ती यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
भारतीय उपखंडात सुफी संतांचा मोठा वारसा आहे. यातून भारत हे बंधुता आणि प्रेमाचे केंद्र बनले. त्यामुळे सुफी परंपरा येथे समृद्ध झाली. इस्लाम धर्माला प्रेम आणि सद्भावना मान्य असून दहशतवाद मान्य नव्हता आणि नसेल, असा संदेश जागतिक शांतिदूत व इस्लामचे हजरत मोहम्मद पैगंबर यांचे ३५ वे वंशज ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांनी दिला.

देवळालीच्या संसरी येथील चिश्तीया परंपरेतील अनुयायी असलेले सैय्यद उमर शरीफ यांच्या निवासस्थानी ते दोन दिवस मुक्कामी आले आहेत. यावेळी त्यांचे अनुयायी अब्दुल गफ्फार चिश्ती, सैय्यद रियाजुद्दीन, राशीद सैय्यद आदी उपस्थित होते. इस्लामचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जगभरात विखुरलेल्या त्यांच्या अनुयायांमार्फत चिश्ती परंपरा जोपासली जात आहे. त्यांना २०१७ मध्ये लंडन येथे जागतिक दर्जाचा शांतिदूत पुरस्कारही प्रदान करण्यात आला. यापूर्वी सैय्यद जरीफ चिश्ती यांनी मुंबईसह राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

बडी दर्गाहला आज भेट
ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती हे गुरुवार (दि. ३१) नाशिकच्या बडी दर्गाह येथे भेट देतील. दरम्यान, नाशिकमधील मुस्लिम भाविक त्यांची भेट व दर्शन घेण्यासाठी संसरी येथे त्यांच्या मुक्कामस्थळी गोळा होत आहेत.

काय आहे चिश्ती परंपरा?
अफगाणिस्तानात चिश्त शहर असून इराण व तुर्कमिस्तानच्या सीमेवर ते वसले आहे. इस्लामचा प्रचार-प्रसारासाठी तेथेच चिश्ती परंपरा निर्माण झाली. त्या ठिकाणी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्त यांच्यासह अन्य चार संतांच्या समाधी आहेत. तेथील अॅकॅडमीमधून दरवर्षी सुमरे ५०० विद्यार्थी इस्लामचा अभ्यास करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: खड्ड्याने घेतला चिमुरड्याचा बळी

$
0
0

नाशिक :

खड्ड्यात पडून लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत. नाशिकच्या कबीर नगरमध्येही खड्ड्यात पडून चिमुरड्याला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घटडली आहे. आज सकाळी साडे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे कबीर नगरपरिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अक्षय साठे (वय ६) असे या मुलाचे नाव आहे. नाशिकमधील संत कबीर नगर येथील मनपाच्या शाळेत पहिलीच्या वर्गात अक्षय शिकत होता. आज सकाळी सात वाजता तो शाळेत गेला. पण शाळेतील शिक्षकांनी आधार कार्ड आणायला सांगितल्यामुळे साडे नऊच्या सुमारास अक्षय पुन्हा घरी चालला होता. शाळा ते घर या रस्त्यात एका घराचे बांधकाम चालू होते. त्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात अक्षय पडला. या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

बांधकाम सुरू असलेल्या भागात कोणतीही संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे अक्षयला हा खड्डा दिसला नसल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर अक्षय घरी आला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली असता हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या आठ जणांना योजनेचा लाभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दारिद्र्य रेषेखाली जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. पण, हे महामंडळ विविध घोटाळ्यांमुळेच जास्त चर्चिले गेले. महामंडळाच्या विविध योजना असल्या तरी त्यातील अवघ्या दोन ते तीन योजना आज सुरू असून, या आर्थिक वर्षात फक्त आठ जणांना त्याचा लाभ झाला आहे. २०१५ पासून या महामंडळातून लाभार्थींना योजनांचे लाभ मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

मांतग समाज व त्याच्या १२ पोट जातींमधील लोकांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी यासाठी ११ जुलै १९८५ रोजी या महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यासाठी सुरुवातीला २ कोटी ५० हजार रुपये भागभांडवल मंजूर केले. त्यानंतर २००६ मध्ये ७५ कोटी तर २०१३ मध्ये ३०० कोटी रुपयांपर्यंत ते वाढविण्यात आले. या महामंडळाच्या उद्दिष्टांत मांतग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक व उपयुक्त व्यापक व आर्थिक चळवळींना चालना देणे व सहाय्य करणे, तंतूकामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, घायपात निर्माते, आयातक, निर्यातक, खरेदीदार यांचा व्यवसाय चालू ठेवणे, मातंग समाजाच्या फायद्यासाठी असलेल्या संस्था, कंपन्या, व्यक्ती किंवा व्यवसाय यांना भांडवल, कर्ज देणे अशी आहेत.

यासाठी महांडळाने आर्थिक लाभ मिळवण्यास सर्वसाधारण आवश्यक बाबी, अर्जाचा नमुना व सोबत कागदपत्रांची माहिती दिली आहे. पण, योजनांचा लाभ होत नसल्यामुळे गेले काही दिवस या महामंडळाकडे लाभार्थींनी पाठ फिरवली आहे. या महामंडळात आज अनुदान योजना व बीज भांडवल योजना सुरू आहे. या दोन्ही योजनांत २०१८-१९ मध्ये ३६ जणांना लाभ मिळाला. त्यानंतर २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण ३५ अर्ज आले असून, लाभ फक्त आठ जणांना मिळाला आहे. या दोन योजनांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. पण, मुदत कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजना यासारख्या अनेक योजना आज बंद आहे.

घोटाळे व थकीत कर्ज

महामंडळात घोटाळेचे प्रकरण प्रचंड गाजले. त्याचबरोबर लाभार्थींना मिळालेल्या कर्जांची थकीत रक्कम मोठी आहे. त्यामुळे महामंडळाच्या कारभारावर त्याचा परिणाम झाला आहे. कर्जाच्या पुनर्गठणासह विविध योजनांना सरकारने आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास या महामंडळाचा समाजाला लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्याचा धरणसाठा ५० टक्क्यांवर

$
0
0

तीन धरणे ओव्हर फ्लो, चार धरणांची पातळी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील २४ धरणांच्या पाणीसाठ्याच्या टक्केवारीने अर्धशतक गाठले आहे. १ जून ते ३१ जुलै पर्यंतच या धरणांच्या साठ्यात ५० टक्के पाणीसाठा असला तरी त्यात असमानता आहे. चोवीस धरणांपैकी तीन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर चार धरणांची पातळी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, तर सात धरणे हे अर्धी भरली आहेत.

जिल्ह्यात २४ धरणांपैकी सात मोठे प्रकल्प, तर १७ मध्यम प्रकल्प आहेत. यातील एकूण पाणीसाठा हा ६५ हजार ८१४ असून, बुधवारी सकाळपर्यंत हा साठा ३१ हजार ६८५ दशदक्ष घनफूट होता. जिल्ह्यातील आळंदी, भावली, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. गंगापूर, गौतमी गोदावरी, दारणा, कडवा या धरणांची पाणीपातळी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे कश्यपी, पालखेड, वाघाड, मुकणे, भोजापूर, हरणबारी, पुनद ही धरणे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. तिसगाव, नागासाक्या, माणिकपुंज या धरणातील साठा शून्य टक्के आहे, तर काही धरणांची स्थिती ही १० टक्क्यांपेक्षा खाली आहे.

...

धरणसाठ्यात झालेली वाढ (टक्क्यांमध्ये)

धरण पाणीसाठा (३० जुलै) ३१ जुलै (सकाळपर्यंत)

गंगापूर ८४ ८४

कश्यपी ५८ ६२

गौतमी गोदावरी ७२ ७९

आळंदी १०० १००

पालखेड ७० ६८

करंजवण ३४ ४७

वाघाड ५८ ६५

ओझरखेड ०९ १३

पुणेगाव ३६ ४३

तिसगाव ०० ००

दारणा ८७ ८७

भावली १०० १००

मुकणे ४७ ५१

वालदेवी १०० १००

कडवा ८९ ८९

भोजापूर ४८ ६०

चणकापूर ४८ ४९

हरणबारी ४६ ५७

केळझर २२ २८

नागासाक्या ०० ००

गिरणा ०८ ०८

पुनद ५१ ५०

माणिकपुंज ०० ००

एकूण ४५ ४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रवाह मंदावला

$
0
0

जिल्ह्यात ३२ मि.मी. पाऊस

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर येथून ५८ हजार क्युसेकने होणारा विसर्ग बुधवारी ५१ हजार क्युसेकपर्यंत कमी झाला. गंगापूर धरणातील ७ हजार ८३३ क्युसेक वेगाने सोडण्यात आलेले पाणी ३ हजार १६८ क्युसेकपर्यंत घटले. होळकर पुलाखालून मंगळवारी रात्री आठच्या सुमारास १२ हजार ३०० क्युसेकने पाणी वाहत होते. बुधवारी ते ६ हजार २९७ क्युसेकपर्यंत कमी झाले.

जिल्ह्यात सकाळी साडेआठ ते मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ३२ मि.मी. पाऊस पडला. त्यात नाशिक (३१.४), इगतपुरी (१३४), त्र्यंबकेश्वर (७९), दिंडोरी (२९), पेठ (५५), निफाड (९.७), सिन्नर (२६), चांदवड (११), देवळा (३.४), येवला (९.८), नांदगाव (९), मालेगाव ( १८), बागलाण (६), कळवण (७), सुरगाणा (५२.३) येथे पाऊस होता. जुलै महिन्यात सरासरी पाऊस १५६.३६ मि.मी. झाला आहे. आतापर्यंत सरासरी पाऊस ४८० मि.मी. झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा दिवसात २९० जणांना पीक कर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी खरीप पीक कर्ज वाटपात पाच बँकांकडे लक्ष केंद्रीत केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत २९० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. पाच बँकांनी १५ जुलैपर्यंत ५८२ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले होते, तेच आता ३१ जुलै रोजी ८७१ कोटी ९ लाखांपर्यंत गेले आहे. इतर बँकांचे कर्जवाटप कमी असले तरी एकूण पीक कर्जाचा आकडा १३६४ कोटींपर्यंत गेला आहे.

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप कमी होत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्रमुख पाच बँकांवर लक्ष केंद्रीत करीत त्यांच्यामार्फत कर्जवाटप कसे जास्त होईल, यावर भर दिला. बँकेनेसुद्धा हे कर्ज वाटप करण्यासाठी गावागावत अधिकारी पाठवले. त्यासाठी शिबिरेही घेतली. काही बँकांने स्पेशल टास्क फोर्स तयार केली. त्यामुळे या कर्ज वाटपामध्ये वाढ झाली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत १५३ कोटी ३७ लाखाचे कर्ज दिले आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रने २६२ कोटी २५ लाखाचे कर्ज दिले आहे. बँक ऑफ बडोदाने १६८ कोटी ४३ लाख कर्ज वाटप केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१ कोटी १२ लाख रुपयांचे कर्ज दिले, तर युनियन बँक ऑफ इंडियाने ९५ कोटी ४९ लाख रुपये इतके कर्ज वाटले आहे. इतर बँकांचे कर्ज ४९३ कोटींच्या आसपास वाटप केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. लीड बँकेचे भारत बर्वे यांनी आतापर्यंत सर्व बँकांनी १३६४ कोटी रुपये कर्ज वाटप केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीतील नाव तपासून घ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत आपले नाव आहे का, नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची खात्री करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी ही खात्री करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीसंदर्भात नाशिक जिल्हा निवडणूक शाखेकडून विविध प्रयत्न केले जात असून, त्यासाठी मोहीम घेण्यात आली आहे. या सर्व प्रयत्नांना मतदारांनी आवश्यक सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा निवडणूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या शुद्धीकरण मोहिमांमधून आजपर्यंत जवळपास ४५ हजार मयत व दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. लवकरच हा आकडा ५० हजारांच्या वर जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवन समाधी सोहळा संत नामदेव संजीवन समाधी सोहळा म.टा.वृत्तसे

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड येथे श्री संत नामदेव महाराज यांच्या ६६९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने प्रतिमा पूजन, पालखी मिरवणूक यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच गुणवंत विद्यार्थी सत्कार पार पडला. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सांस्कृतिक विविध विकास सेवा संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दत्तमंदिर रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विजय बकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नाशिक प्रांतिक संस्थेचे अध्यक्ष नामदेव भुसे, योग शिक्षक राजेंद्र नवले उपस्थित होते. नाशिक प्रांतिक संस्थेचे सचिव कैलास निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी सायंकाळी पाच वाजता संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड कोसळून दाम्पत्य जखमी

$
0
0

सिडकोतील सावतानगरमधील घटना

..

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावतानगर येथील एक झाड उन्मळून पडले. या घटनेत दाम्पत्य जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती उद्यान विभागाला समजल्यानंतर त्यांनी हे झाड हटविले.

सिडकोतील सावतानगर भागात मुख्य रस्त्यालगत असलेले झाड दुपारी रस्त्यावर कोसळले. झाडाची फांदी दुचाकीवरून जाणारे राजेंद्र पवार व त्यांच्या पत्नीच्या अंगावर पडल्याने जखमी झाले. जखमी पवार दाम्पत्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर घटनास्थळी दाखल झाले. बडगुजर यांनी उद्यान विभागाला माहिती दिली. यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी दिलीप हंडोरे व कर्मचाऱ्यांनी त्वरित झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी-योगींचा काँग्रेसतर्फे निषेध

$
0
0

सेंगरला माहितीदूत नेमण्याची उपरोधिक मागणी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला अपघाताचा बनाव रचून ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर याला भाजपा सरकारने आता 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहिमेचा दूत नेमावे, अशी उपरोधिक मागणी करत प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे येथील महाराज चौकात दहन करण्यात आले.

उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्याच्या भावाने चार जून २०१७ रोजी बलात्कार केला. इतकेच नव्हे तर भाजप आमदाराने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच गेल्या रविवारी (दि. २८) पीडिता तिच्या कुटुंबीयांसह वकिलासोबत कारमधून जात असताना तिच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये पीडितेची काकी आणि मावशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती गंभीर आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदार सेंगर यांच्यावर कारवाई न करता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप सरकारच्या या कृतीमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेसह तिच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली.

'भाजप से बेटी बचाओ'

महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवून आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार भाजप सरकार ढिम्मपणे बघत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. 'पहले भाजप से बेटी बचाओ, फिर बेटी पढाओ' अशा आशयाचे संदेश असलेले फलक त्यांनी झळकाविले. आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राहुल पाटील, जिल्हा प्रभारी प्रसाद शेळके, जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, सटाणा शहराध्यक्ष किशोर कदम यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरा ऑगस्ट रोजीएलआयसीची मुख्य परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) ८ हजार ५८१ जागांसाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होईल, असे एलआयसीतर्फे सांगण्यात आले आहे. परीक्षेचे हॉल तिकीट आठ दिवस अगोदर वेबसाइटवर उपलब्ध होणार असून तत्पूर्वी पूर्व परीक्षेचा निकाल तपासून घेण्याचे आवाहन एलआयसीने केले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाची भरती करण्यात येत आहे. यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ६ व १३ जुलै रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची यादी जाहीर झाली असून, ११ ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा होईल, असे सांगण्यात आले आहे. दोन्ही परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यानंतर नियुक्ती व प्रतीक्षा यादी संदर्भातील अपडेट देण्यात येतील, असे एलआयसीने सांगितले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्यांना प्रशिक्षणाच्या कालावधीत ३४ हजार ५३ रुपये प्रशिक्षण वेतन देण्यात येईल, असे एलआयसीने जाहीर केले आहे. https://www.licindia.in/Bottom-Links/Careers/Recruitment-of-Apprentice या वेबसाइटद्वारे निकाल व मुख्य परीक्षेचे

अपडेट तपासावेत, असे आवाहन एलआयसीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात बुडून सात वर्षीय बालकाचा करुण मृत्यू

$
0
0

शिक्षिकेने आधार कार्ड आणण्यासाठी पाठवले होते घरी; संत कबीरनगरमधील घटना

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगावर कपाट पडून बारा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरात ताजी असतानाच संत कबीरनगरमधील सात वर्षीय विद्यार्थ्याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. अक्षय पंडित साठे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो महापालिका शाळा क्रमांक १८ आनंदवल्ली येथील विद्यार्थी आहे. ही दुर्घटना बुधवारी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडल्यानंतर संत कबीरनगरवर शोककळा पसरली.

परिसरातील रहिवासी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मानगरजवळ असलेल्या संत कबीरनगर परिसरात महापालिका शाळा क्रमांक १८ आहे. या शाळेत अक्षय साठे हा सात वर्षीय विद्यार्थी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शाळेतील शिक्षिकेने आधार कार्डाची मागणी केल्यामुळे ते आणण्यासाठी अक्षय शाळेतून घरी येत होता. घरी लवकर जाण्यासाठी नेहमीच्या रस्त्याऐवजी अक्षयने जवळचा रस्ता निवडला. याच ठिकाणी एका खासगी घराचे बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने हे खड्डे पूर्ण पाण्याने भरलेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज अक्षयला आला नाही. परिणामी, खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तो पडला. तो पडल्याचे कोणीही पाहिले नसल्याने त्यातच त्याचा करुण मृत्यू झाला.

शाळेवर कारवाईची मागणी

अक्षयचा आतेभाऊ सूरज चव्हाण अक्षयच्याच शाळेत तिसरीत शिक्षण घेतो. सूरज घरी आल्यावर त्याच्याकडे अक्षयविषयी विचारणा केली असता, त्याचे दप्तर शाळेतच आहे; पण तो दिसला नाही, असे त्याने सांगितले, तेव्हा अक्षयची शोधाशोध सुरू झाली. त्याच वेळी बांधकाम सुरू असलेल्या जागी खड्ड्यात गाळ काढण्यासाठी उतरलेला आतिक शेख या मजुराला खड्ड्यात काही तरी असल्याची जाणीव झाली. ते घाबरले. त्यांनी ही बाब सर्वांना सांगितल्यानंतर शोध घेतला असता त्यात अक्षय पडल्याचे आढळले. अक्षयला बाहेर काढून श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या सर्व प्रकरणात शाळा प्रशासन दोषी असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अक्षयच्या कुटुंबीयांनी केली आहे.

आधार कार्डाने घेतला बळी...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांना पोलिसांचा दणका

$
0
0

आषाढ अमावस्येला शेकडो वाहनांची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढ अमावस्येनिमित्त मद्य आणि मासांहारावर मनसोक्त ताव मारून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या अनेक चालकांवर शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळनंतर कारवाई करीत तळीरामांना ताळ्यावर आणले. यासाठी सायंकाळी सहा वाजेपासून विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.

पोलिसांनी अमावस्येनिमित्त विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले होते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी सायंकाळनंतर नाकाबंदी करण्यात आली. याशिवाय अंडाभुर्जी, चायनीज स्टॉल यांची देखील तपासणी करण्यात येत होती. अमावस्येनंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात मासांहार आणि मद्यपान वर्ज्य मानले जाते. या काळात शक्यतो तामसी आहार नाकारला जातो. मात्र, श्रावण सुरू होणार म्हणून आषाढ अमावस्येला अथवा त्याच्या एक दिवस अगोदरच मद्य व मांसाहारावर मोठ्या प्रमाणावर ताव मारला जातो. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतात. मद्यपी वाहनचालकांकडून अपघात होण्याचा धोका तर असतो; तसेच हाणामाऱ्या, भांडणे सुद्धा होतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन आखले होते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स लावण्यात आले होते. रात्रीच्यावेळी चायनीज स्टॉल्स, अंडाभुर्जी सेंटर आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. काही मद्यपी वाहनचालकांना थेट कोर्टात पाठविण्यात आले आहे. चालू वर्षात तीनशेहून अधिक मद्यपी चालकांवर कारवाई झाली असून, नव्याने मिळालेल्या ५० ब्रेथ अॅनालायझरमुळे तळीरामांना कायद्याच्या कक्षेत आणणे पोलिसांना शक्य झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

manikrao boraste

१४ इमारतींना दणका

$
0
0

नगररचना विभागाकडून सर्वेक्षण; मंजुरीसाठी कागदी पुरावे तयार केल्याचेही समोर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने पाचशे चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाचा भूखंडावर इमारत उभी करतांना पर्जन्य जलसंधारण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली असतांनाही महापालिका हद्दीत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात नाशिकमधील भूजल पातळी डेंजर झोनमध्ये गेल्याने महापालिकेने रेन हार्वेस्टिंगबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. नगररचना विभागाने याबाबत शहरात सर्वेक्षण सुरू केले असून पाचशे चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर इमारत उभी करतांना रेन हार्वेस्टिंग न करणाऱ्या १४ इमारतींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणात नाशिक भूजलपातळीत डेंजर झोनमध्ये असल्याचे समोर आले होते. पावसाळी गटार आणि विंधन विहिरींसह बोर खोदण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीपातळी खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात ५०० चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक भूखंडावरील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचे बंधनकारक केले आहे. विकास योजना नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींनुसार आता इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याचे पुरावे सादर करावे लागतात. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो; परंतु पुरावे मात्र केवळ मंजुरीसाठी तयार केले जात असल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या लक्षात आले आहे.

हजार रुपयांचा दंड

महापालिकेने याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंगची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्यक्ष पाहणीनंतरच दाखला देण्याच्या निर्णय घेत, यापूर्वी मंजूर केलेल्या इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्या ठिकाणी व्यवस्था नसेल त्या इमारतीला प्रति १००चौरस मीटरला एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जनजागृतीवर भर

महापालिकेच्या नगररचना विभागाने प्रातिनिधिक स्वरूपात ४८ इमारतींची तपासणी केली आहे. त्यापैकी १४ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा सुस्थितीत न आढल्याने इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images