Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पार्क केलेली गाडी गोदापात्रात

$
0
0

पंचवटी : कपूरथळा मैदानावर सोमवारी (दि. २२) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पार्क केलेली कार गोदापात्रात गेली. तेथील काही तरुणांनी पाण्यातून ही कार काढली. मात्र, ती पायरीवरून वर काढणे शक्य होत नव्हते. कारचा मालक अर्ध्या तासानंतर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला; पण ते उघडता आले नाही. तिडके कॉलनीतील मनीष हरिचंद्र कांबळे यांनी कार (एमएच १५/एफटी ६०११) कपूरथळा येथील मैदानावर पार्क केली होती. म्हसोबा पटांगणावर पंचवटी पोलिस गस्त घालीत असताना त्यांना ही कार गोदापात्राच्या दिशेने पाण्यात जाताना दिसली. तेथील तरुणांनी ती बाहेर काढली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली. ही कार काढण्यासाठी क्रेन बोलविण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यसैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांना घरपट्टीमाफी

$
0
0

म. टा. प्रतिनीधी, नाशिक

शहरातील स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांच्या नावावर असलेल्या मिळकतींना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचेही यावेळी सूचित करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यसैनिकांचा मोलाचा वाटा आहे, त्याचप्रमाणे देशसंरक्षणात जवानांचाही मोठा वाटा आहे. त्यांचा उचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा मान राखला जावा यासाठी नाशिक महापालिकेने शहरातील स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांच्या नावावर असलेल्या मिळकतींना घरपट्टी लावू नये, असा प्रस्ताव दिनकर पाटील यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता, सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राज्यात औरंगाबाद, ठाणे, मालेगाव व सिन्नर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबतचा ठराव केलेला असून, त्या ठिकाणी घरपट्टी माफ करण्यात आलेली आहे.

बैठकीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. शहरातील पाइपलाइन बदलल्यानंतर जुन्या पाइपचे काय केले जाते? ते पुन्हा वापरले जातात का? असा सवाल नगरसेवक कमलेश बोडके यांनी विचारला. हे पाइप पुन्हा वापरता येत नाहीत, ते भांडारमध्ये जमा केले जातात, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. सभापती उद्धव निमसे यांनी याबाबत सखोल अहवाल पुढच्या सभेत सादर करावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या सभेत एकूण ३६ विषय ठेवण्यात आले होते, त्यापैकी विषय क्रमांक १४ ते २८ हे उद्यान विभागाशी व विषय क्रमांक ३२ हा भूसंपादनाविषयी निगडित असल्याने या कामांना स्थगिती देण्यात आली.

--

दर गुरुवारी होणार बैठक

स्थायी समितीची बैठक याअगोदर केव्हाही घेतली जात होती. त्याला नूतन सभापती उद्धव निमसे यांनी पहिल्याच सभेत छेद दिला असून, यापुढे विषय असो अगर नसो, दर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ही बैठक घेण्यात येईल, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयावाचून कोणतेही काम खोळंबणार नाही, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. या सभेनंतर महामेट्रोची पत्रकार परिषद असल्याने पहिलीच सभा आटोपती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणचे मतदार जागरुक

$
0
0

निवडणूक आयोगाच्या शुद्धिकरण मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी आणि मतदार यादी शुद्धिकरण मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत तब्बल ६ हजार ७६८ मतदारांनी या मोहिमेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे कळवण सारख्या आदिवासीबहुल तालुक्यात सर्वाधिक एक हजार २५३ मतदारांनी यात सहभाग नोंदविला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी आणि रविवारी मतदार नोंदणी आणि मतदार यादी शुद्धिकरणाची मोहीम राबविण्यात आली. यात नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून दुबार तसेच मयत मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीमधील नाव, पत्ता यासारख्या छोट्या मोठ्या त्रुटी दूर करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली. जिल्हाभरात दोन दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेला काही विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात तीन हजार ७३० पुरुष तर तीन हजार ३८ महिला मतदारांनी याचा लाभ घेतला.

चार हजार १८ नवमतदारांची नोंदणी

मोहिमेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरू शकणाऱ्या चार हजार १८ नवमतदारांना यादीमध्ये नावनोंदणीची संधी मिळाली. यामध्ये दोन हजार १६१ पुरुष तर एक हजार ८५७ महिला नवमतदारांनी नावे नोंदविली. तर या मोहिमेदरम्यान मयत किंवा दुबार या कारणांमुळे ८८५ पुरुष आणि ६६९ महिला अशा एक हजार ५५४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

एक हजार १९६ जणांकडून दुरुस्ती

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदारयादीत अनेक मतदारांच्या नावात, घरच्या पत्त्यामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. तशा तक्रारीही जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला प्राप्त झाल्या. मतदार यादीत मतदाराचे नाव चुकीचे असणे, नावच नसणे, यादी भाग नसणे, घर क्रमांक नसणे, वय चुकीचे असणे यांसारख्या त्रुटी आढळून आल्या. यामुळे नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागला. या मोहिमेच्या निमित्ताने नागरिकांनी अर्ज क्रमांक आठ आणि आठ अ भरून अशा त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. याबाबत एक हजार १९६ मतदारांनी अर्ज भरून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नागरिकांची जागरुकता आणि यंत्रणेने घेतलेले परिश्रम यांमुळे कळवणसारख्या काही तालुक्यांमध्ये या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. मालेगाव बाह्य सारख्या काही विधानसभा मतदार संघांत अल्प प्रतिसाद मिळाला. याबाबतची कारणे शोधून प्रतिसाद वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

- अरुण आनंदकर,

उप जिल्हा निवडणूक अधिकारी

मोहिमेस मिळालेला तालुकानिहाय प्रतिसाद

तालुका सहभागी मतदाारसंख्या

कळवण १२५३

दिंडोरी ७१२

निफाड ६१६

सिन्नर ५९३

बागलाण ५५३

चांदवड ५२०

येवला ४०६

नाशिक पश्चिम ३२९

नांदगाव २९९

नाशिक मध्य २९९

नाशिक पूर्व २८२

देवळाली २७०

मालेगाव बाह्य २३०

मालेगाव मध्य १३१

एकूण ६७६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीसची नवीन नोट नाशिकमध्ये दाखल

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोडच्या नोट प्रेसमध्ये छापलेली वीस रुपयाची नोट बाजारात आली आहे. जेलरोडचे सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांच्याकडे ही नोट आली आहे. या नोटेचा रंग पाचशेच्या नोटेप्रमाणेच हिरवट असून, त्यावर एका बाजूस राष्ट्रपिता महात्मा गांधींचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला औरंगाबादच्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचे चित्र आहे. ही नोट नाशिकरोडच्या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली आहे. या प्रेसमध्ये पन्नास, शंभर व पाचशेच्या नवीन नोटांची छपाई करण्यात आली आहे. वीसची नोट नुकतीच छापण्यात आली असून, ती सामान्यांना उपलब्ध झालेली नाही. स्टेट बँक व अन्य बँकांमध्ये ती उपलब्ध करावी, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनवरील तूरडाळ निकृष्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे धान्य आणि कडधान्याचे दर वाढले असताना रेशन दुकानांवर मिळणारी तूरडाळही निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रेशनवर यंदा जाड, हिरवट तूरडाळ उपलब्ध झाली असून, ५५ रुपये किलोची ही तूरडाळ खरेदी करण्यास ग्राहक नापसंती दर्शवत आहेत. त्यामुळे ही डाळ रेशन दुकानदारांकडे पडून राहत असल्याची कैफियत रेशन दुकानदारही मांडत आहेत.

पावसाळ्यात भाज्यांबरोबरच कडधान्याचे भावही वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत काही डाळींचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तूरडाळ प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शिधापत्रिका धारकांसाठी सरकारने ५५ रुपये किलो दरात तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या मागणीनुसार, तीन हजार क्विंटल डाळ उपलब्ध झाली. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्यक्रमातील सुमारे सहा लाख शिधापत्रिकाधारकांना या डाळीचे वाटप होते. मात्र, यंदा रेशन दुकानांवर उपलब्ध झालेली ही तूरडाळ जाड आणि हिरवट असून, त्यामध्ये वाटाणे असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे ही डाळ खरेदी करण्यास ग्राहक नकार देत आहेत. परिणामी, अनेक रेशन दुकानदारांकडे ही डाळ पडून आहे. ग्राहक ही डाळ खरेदी करण्यास तयार नसल्याने तिचे काय करावे, असा प्रश्न रेशन दुकानदारांना सतावू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक लागले ‘प्रोफाइल’च्या मागे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्षांतील इच्छुकांनी आता आपले लक्ष प्रोफाइलवर केंद्रित केले आहे. ही प्रोफाइल करण्यामध्ये नवीन उमेदवारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारी देण्यासाठी पहिले अर्ज व नंतर त्यांच्या मुलाखती घेत असल्यामुळे या प्रोफाइल उपयोगी ठरतात. त्यामुळे त्या आकर्षक व सुटसुटीत कशा होतील, यासाठी सर्वांची लगीनघाई सुरू आहे.

या प्रोफाइलमध्ये नाव, पत्ता, फोन नंबरसह राजकीय प्रवास, भूषविलेली पदे व केलेली कामे यासह इतर माहिती समाविष्ट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. काही उमेदवारांची कामांची यादी मोठी असल्यामुळे ही प्रोफाइल पुस्तकाएवढ्या जाडीची झालेली आहे, तर काहींनी संक्षिप्तपणे, पण आवश्यक तेवढी माहिती आपल्या प्रोफाइलमध्ये समाविष्ट केली आहे. सर्वांत महत्त्वाचे फोटो असल्यामुळे काहींनी त्याचा अल्बम स्वतंत्र केला आहे, तर काहींनी हे फोटो प्रोफाइलमध्येच टाकले आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षांना सुटसुटीत माहिती देणारी ही उमेदवारांची माहिती मुलाखती देण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे मुलाखत घेण्याअगोदर प्रोफाइलची मागणी केली जाते. त्यानंतर त्यावरून प्रश्नही विचारले जातात. काही पक्षांनी तर उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणपत्रिका तयार केली आहे. त्यात त्यांच्या पदवीपासून राजकीय कारकीर्द, कामे यासारख्यांसाठी गुण दिले आहे. त्यातून त्या उमेदवारीला पसंती दिले जाते.

आकर्षक प्रोफाइल

मुलाखत घेण्यासाठी येणाऱ्या पक्षांच्या नेत्यांपुढे प्रथम इम्प्रेशन चांगले पडावे, त्यांच्यावर आपली छाप पडावी, यासाठी प्रोफाइलचे महत्त्व आहे. त्यामुळे अनेकांनी ही प्रोफाइल कलरफुल केली आहे. त्यात मोठ्या नेत्यांचे फोटो, पक्षाचे चिन्ह, आपला फोटो यासह ती तयार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नेत्यांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद मेळाव्यात चोरट्यांनी शिवसेना नेत्यांच्या खिशावर डल्ला मारला. चोरट्याने एका पदाधिकाऱ्याच्या खिशातील रोकड हातोहात लंपास करीत चोरट्याने नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिशातूनही हात की सफाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब दातीर यांच्या लक्षात येण्यापूर्वीच चोरट्याने गर्दीतून धूम ठोकली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शनिवारी (ता. २०) दुपारी एक वाजता खुटवडनगर येथील सिद्धी हॉलमध्ये जनआशीर्वाद मेळावा झाला. मेळाव्यात शिवसेनेसह युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या गर्दीची संधी चोरट्यांनी साधली. जिल्हाभरातील शिवसैनिकांसह पदाधिकारी नगरसेवकांनी मेळाव्यास हजेरी लावली. गर्दीतील नेत्यांना लक्ष्य करीत चोरट्याने रामदास शांताराम अहिरे (रा. मुंडेवाडी, पाथर्डी) यांच्या खिशातील २६ हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यापाठोपाठ नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिशात हात घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब दातीर यांच्या लक्षात येताच चोरट्याने गर्दीतून पोबारा केला. अगदी काही वेळेतच हा घटनाक्रम घडला. कार्यक्रमात नाहक गोंधळ नको म्हणून चोरट्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकीच्या धडकेत ७५ वर्षांचा पादचारी ठार झाला. अपघाताची घटना त्र्यंबक रोडवरील महिरावणी शिवारात घडली. अपघातात दुचाकीस्वार बापलेक जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या घटनेप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चहादू शंकर आचारी (वय ७५, रा. मुरंबी, ता. इगतपुरी) असे या अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रामदास राघू देहाडे (३५) आणि प्रज्वल रामदास देहाडे (वय १०, रा. गायकवाड चौक, प्रबुद्धनगर, कार्बन नाका) असे जखमी दुचाकीस्वार पिता-पुत्राचे नाव आहे.

देहाडे बापलेक रविवारी (ता. २१) रात्री आपल्या दुचाकीने (एमएच १५/एफई १११६) त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. महिरावणी शिवारातील सोमा फार्म हाउस परिसरात दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. भरधाव दुचाकीने त्र्यंबककडून राजूरच्या दिशेने पायी जाणारे चहादू आचारी यांना धडक दिली. या वेळी दुचाकीवरील देहाडे पिता-पुत्र दुचाकीवरून दूरवर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. आचारींसह जखमी देहडे पिता-पुत्रांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून आचारी यांना मृत घोषित केले. दुचाकीस्वार रामदास देहाडे व प्रज्वलच्या डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत झाली असून, दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षारोपणाला १५ विभागांचा ठेंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या तब्बल १८ विभागांनी पाठ फिरविली आहे. जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या स्मरणपत्रांनाही हे विभाग दाद देत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून, १५ ऑगस्टपर्यंत ७५ टक्के वृक्षारोपण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अवघे ४१ टक्के वृक्षारोपण झाले असून, उर्वरित ३४ टक्के वृक्षारोपण पुढील तीन आठवड्यांत उरकण्याचे आव्हान जिल्हा यंत्रणेला पेलावे लागणार आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र हे हरित राज्य म्हणून ओळखले जावे आणि पर्यावरणाचा समतोल राखणेही शक्य व्हावे, यासाठी वृक्षलागवड आवश्यक आहे. राज्य सरकारने चार वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्याअंतर्गत यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ही मोहीम एक जुलैपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यात २ कोटी ३० हजार ५८१ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र २ कोटी ४ लाख ९७ हजार ४९८ वृक्षलागवडीची तयारी ठेवली आहे. आतापर्यंत ८७ लाख ४३ हजार २२३ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेचा कालावधी एक जुलै ते ३० सप्टेंबर असा असला तरी अद्याप या मोहिमेला गती मिळाली नसल्याचे निरीक्षण वनमंत्री मुनगंटीवार यांनी नोंदविले आहे. त्यामुळेच १५ ऑगस्टपर्यंत ७५ टक्के वृक्षलागवड करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रशासनाने आतापर्यंत ४१ टक्के वृक्षलागवड केली आहे. उर्वरित ३४ टक्के वृक्षलागवड पुढील तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

१५ विभागांची वृक्षलागवडीकडे पाठ

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, इतकेच नव्हे तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवाहन करूनही केंद्र आणि राज्य सरकारच्या काही विभागांनी या मोहिमेकडे पाठ फिरविल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. यामध्ये केंद्रीय रेल्वे, सामाजिक न्याय विभाग, राज्य उत्पादन शुल्क, राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय सुरक्षा विभागासारख्या यंत्रणांचा समावेश आहे.

वृक्षारोपणाकडे पाठ फिरविणारे विभाग

विभाग- उद्दिष्ट- वृक्षारोपण

सामाजिक न्याय विभाग-३०००-००

राज्य उत्पादन शुल्क-३००-००

रेल्वे विभाग- १२५०-००

राष्ट्रीय महामार्ग-५००-००

केंद्रीय सुरक्षा विभाग-५००-००

डेअरी विभाग-२९००-००

व्हीजेएनटी-७००-००

पर्यटन विभाग-१६००-००

वैद्यकीय शिक्षण विभाग-५००-००

अन्न व औषध प्रशासन-५००-००

एसटी महामंडळ-६६५०-००

फिशरी विभाग-२९००-००

जीएसटी विभाग-२९००-००

अन्य केंद्रीय कार्यालये-३७७००-००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमडी-एमएस शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पदव्युत्तर (एमडी- एमएस) शिक्षणाची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाली असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलसह संदर्भ हॉस्पिटलमध्ये हे मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला बूस्ट मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने सोमवारी (ता. २१) एक अध्यादेश काढून संबंधितांना सूचना केल्या आहेत.

नाशिकमध्ये गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या वेळी केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला. नाशिकमध्ये एमबीबीएस आणि एमडी- एमएस असे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण प्रस्तावित होते. त्यापैकी एमडी- एमएस अभ्यासक्रम सुरू करण्यास सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. याबाबत बोलताना सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज सुरू झालेले असेल, तसेच प्रवेशप्रक्रियासुद्धा राबविण्यात येणार आहे. सध्या एमडी आणि एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मंजुरी मिळाली असून, एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. एमडी-एमएस अभ्यासक्रम सुरू झाल्याने येथे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर, त्यांना शिक्षण देणारे प्राध्यापक व इतर स्टाफ उपलब्ध होईल. सिव्हिलसह संदर्भसेवा हॉस्पिटलमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले. मेडिकल कॉलेजमुळे ऑपरेशन थिएटर, इतर आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार असल्याकडे डॉ. जगदाळे यांनी लक्ष वेधले.

कमिटीद्वारे संचलन

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजचे काम सुरळीत करण्यासाठी सरकारने या दोन्ही विभागांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यात मनुष्यबळाची उपलब्धता कोणत्या विभागाने करायची इथपासून पायाभूत सुविधा निर्मितीची जबाबदारी कोणत्या विभागाची असेल, हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेजच्या दैनंदिन कामकाजासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू किंवा त्याचे प्रतिनिधी, वैद्यकीय शिक्षण संचालक अथवा त्याचे प्रतिनिधी, आरोग्यसेवा उपसंचालक, सिव्हिल सर्जन, संदर्भसेवा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक यांची एक कमिटी स्थापन करण्यात येणार असून, ही कमिटी मेडिकल कॉलेजबाबत निर्णय घेईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत

$
0
0

मालेगाव : मालेगाव वनपरिक्षेत्रातील सौंदाणे शिवारात सोमवारी अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा (नर) जातीचे हरीण जखमी झाल्याची घटना घडली. उपचारादरम्यान या हरणाचा मृत्यू झाला. पशुधन अधिकारी डॉ. जावेद खाटिक यांनी येथील वनविभागाच्या कार्यालय आवारात मृत हरणाचे शवविच्छेन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिन्यात मालेगाव वनपरिक्षेत्रात हरणाच्या मृत्यूची ही दुसरी घटना असून वनक्षेत्रात अन्न पाण्याचा अभाव असल्याने वन्यजीव मानवी वस्त्यांकडे येत असल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत.

सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सौंदाणे गावानजीक एका पेट्रोलपंपाजवळ महामार्गा ओलांडताना हरणास भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांनंतर दहा वर्षांनी मुलाचाही शॉकने मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दहा वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलांना वाढवत शिकवले, प्रगतीशील शेतकरी बनवले. मात्र, नियतीचा दुर्दैवी फेरा पडला आणि २१ वर्षीय मुलाचाही विजेच्या धक्क्यानेच मृत्यू झाला. नैताळे येथील तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावात बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नैताळे (ता. निफाड) येथील चेतन दादा घायाळ (वय २१) व गणेश खंडू घायाळ या दोघा तरुणांनी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे जागा पोल्ट्री शेड भाड्याने घेऊन त्यात व्यवसाय सुरू केला होता. चेतन व गणेश हे आपल्या पोल्ट्री फार्मवर असताना सायंकाळच्या वेळी पाऊस सुरू झाला. पक्षी भिजू नयेत म्हणून ते एका शेडमधून दुसऱ्या शेडमध्ये हलविण्यासाठी दोघांनी धावपळ सुरू केली. त्यात विजेच्या तारेचा जोडावर चेतन याचा पाय पडला. पावसामुळे सगळीकडे ओल असल्यामुळे त्याला या वायरचा जोरदार शॉक लागला आणि तो जागेवर कोसळला. या घटनेची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी नैताळे येथून वडांगळीला धाव घेतली. चेतनला तात्काळ सिन्नरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांनी मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर चेतनचा मृतदेह सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात रात्री उशीरा शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात नैताळे अमरधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चेतन याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

दहा वर्षांपूर्वी चेतनच्या वडिलांचाही शॉक लागूनच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी योगायोगामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या घटनेमुळे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून दुखवटा पाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलन उस्मानाबादला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घेऊ अशा वल्गना करणारे 'सावाना' चांगलेच तोंडघशी पडले असून, 'घेतोच आता संमेलन' म्हणता म्हणता ते उस्मानाबादला गेल्याने नाशिककरांची निराशा झाली आहे.

नाशिकला साहित्य संमेलन व्हावे अशी सामान्य नाशिककरांची इच्छा असताना केवळ पुरेशी तयारी नसल्याने सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेला त्याचा फटका बसला आहे. 'सावाना'ने महामंडळाला निमंत्रण देताना एकाही राजकीय नेत्याला सोबत घेतले नाही किंवा कुणाही उद्योगपतीशी त्यांनी चर्चाही केली नाही. 'आम्हाला हे संमेलन नाशिककरांचे करायचे होते' हे त्यांचे म्हणणे खरे असले तरी पैशांचे सोंग आणता येत नाही. एकदा संमेलन मिळाल्यावर पैशांची तजवीज करू, ही भूमिकाही चुकीची ठरल्याने संमेलन हातचे गेले.

२००५ मध्ये, तब्बल १५ वर्षांपूर्वी वसंत पवार हे मविप्र संस्थेचे सरचिटणीस असताना त्यांनी नाशिकला संमेलन घेतले होते. त्यांच्या खमकेपणामुळेच संमेलन तात्काळ उभे राहिले, निधीही त्यांनी संस्थेतून उभा केला. एकहाती संमेलन करून दाखवले. हीच बाब 'सावाना'सारख्या १७६ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या लक्षात येऊ नये हे दुर्दैव.

मराठी साहित्य संमेलन नाशिकला न मिळण्यामागे अनेक कारणे असून, व्यवस्थापनाचा अभाव आणि पैशांची तजवीज हे कळीचे मुद्दे बनले. 'संमेलन आपल्याकडे येऊ तर द्या, मग पैशांची जमवाजमव करू' असे वरातीमागून घोडे नाचवणारे 'सावाना'चे पदाधिकारी आता तरी एकमेकांमधील कलह संपवून एकजुटीने कामाला लागतील का, असा प्रश्न यानिमित्ताने नाशिककरांना पडला आहे.

उस्मानाबादच्या एकीचे फळ

९३ वे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची एकी. संमेलन घ्यावे ही सहा वर्षांपासून त्यांची असलेली अपेक्षा, निमंत्रण जाताच खासदार, आमदार, नगरपरिषद एकत्र आले. त्यांनी आपल्या पातळीवर एक ठरावही तयार केला आणि एकजुटीने सारे कामाला लागले. त्यांची ही तयारी पाहूनच साहित्य महामंडळाने त्यांच्या पारड्यात झुकते माप टाकले.

संत गोरोबा काकांच्या भूमीत ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. अनेक वर्षें मागणी करूनही ते संमेलनापासून वंचित होते. यंदा त्यांना हा मान मिळाला याचा आनंद आहे. संमेलनासाठी 'सावाना'च्या वतीने अधिकाधिक नाशिककर जाणार असून २०२१च्या संमेलनासाठी निमंत्रण देणार आहोत.

- जयप्रकाश जातेगांवकर, कार्याध्यक्ष, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबाने केले विष प्राशन

$
0
0

सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी पाऊल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनामधील सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतातील विहिरीजवळच शिंदखेडा तालुक्यातील प्रकाश धनगर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २२) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, या अगोदरही प्रकाश धनगर यांनी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे.

शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्र. ८३/१/३ मध्ये १.३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली आहे. यानंतर शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही करण्यात आले. मात्र, सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बॅँक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वीही १ एप्रिल रोजी प्रकाश धनगर यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आता पुन्हा सोमवारी (दि. २२) सकाळी आत्महत्येचे पाऊल त्यांनी उचलले.

या वेळी प्रकाश धनगर हे पत्नी योगिताबाई, मुलगा भूषण व निखिल यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे धावपळ उडाली. पोलिसांकडे कोणतेही वाहन नसल्याने सुमारे तासभर हे कुटुंब रस्त्यावर पडून उलट्या करत होते. त्यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले. घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांचे वाहन तासाभरानंतर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले. तेथील जिल्हा रुग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच सोमवारी सकाळपासून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जितेंद्र जाधव, हवालदार संजय मोरे, बापू बागुल, विजय सोनवणे, महिला पोलिस नाईक सुमन पाडवी व दोंडाईचा पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल प्रमोद चौधरी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, मोहन पाटील, वैंदाणेचे पोलिसपाटील जगदीश पाटील हे सर्व शेतकरी प्रकाश धनगर यांच्या शेतातील विहिरीजवळ ठाण मांडून बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वे विस्कळीत

$
0
0

नाशिक:

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी फलाट क्रमांक ३ वरील रुळाला तडा गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागणार असल्यानं वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळं रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत.

काही दिवसांपूर्वीच कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शनच्या दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळं प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यात आज पुन्हा मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. इगतपुरी स्थानकाजवळ फलाट क्रमांक तीनवरील रुळाला तडा गेल्याचं लक्षात येताच, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळं वाहतूक विलंबानं सुरू आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, रूळ दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी, पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस विलंबानं धावत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागलाणच्या अभियंत्याचा इस्त्रोकडून गौरव

$
0
0

'चांद्रयान २' माहिमेत यशस्वी सहभाग

म. टा. वृत्तसेवा सटाणा

'चांद्रयान २' अवकाशात यशस्वीरित्या झेपावल्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या ऐतिहासिक व अभिमानास्पद घटनेचे शिल्पकार होण्याचा बहुमान बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील अभियंत्यास मिळाला आहे. मनीष भामरे (वय ३२)असे या अभियंत्याचे नाव असून, सध्या ते मुंबई येथील एल. अ‍ॅण्ड टी. कंपनीत मेटेर्लजी अ‍ॅन्ड वेल्डिंग टेक्नोलॉजी विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

'चांद्रयान २'चे बाहेरचे आवरण एल. अ‍ॅन्ड टी. कंपनीच्या पाच जणांच्या नेतृत्वाखालील टीमने तयार केले आहे. या टीममध्ये दीडशे कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. या टीमने 'चांद्रायाने २'चे आवरण तयार करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे इस्त्रोने म्हंटले आहे. या कामाबद्दल विशेष कौतुकाची थाप देत कंपनीला सन्मानपत्राद्वारे कळविले आहे. या सन्मानपत्रात सोमपूर येथील मनीष भामरे यांचा उल्लेख केला आहे. भामरे यांच्यासह विनायक सलीन, कमलेश पोतदार, महेश चव्हाण आणि सुनील सुरी आदींचा समावेश होता. या पाचही टीम सदस्यांना इस्त्रोने सन्मानपत्रात उल्लेख करून गौरव केला आहे.

शालेख शिक्षण नाशिकमध्ये

सोमपूर येथील डॉ. नाना भामरे व डॉ. शोभा भामरे यांचा मनीष हे सुपुत्र आहेत. मनीष भामरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिक येथील अभिनव आणि मराठा हायस्कूल येथे पूर्ण झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. सध्या मनिष भामरे मुंबई येथे एल. अ‍ॅण्ड टी. कंपनीत गेल्या चार ते पाच वर्षांपासून कार्यरत आहे. डॉ. नाना व शोभा भामरे हे मध्यंतरी सोमपूर येथे वास्तवास होते. मात्र त्यांच्या दोन्ही मुली परदेशात असल्याने नातवंडाच्या शिक्षणासाठी डॉ. भामरे कुटुंबीय सध्या पुण्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी पुत्राने केली आईची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाने भिंतीवर डोके आदळत जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना सातपूर, राजवाडा येथे मंगळवारी उघडकीस आली. कांताबाई शिवलाल काळे (वय ६९) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांचा लहान मुलगा प्रभाकर काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कांताबाई यांचा मोठ्या मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर शिवलाल काळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. कांताबाई या सातपूर, राजवाडा येथील दादासाहेब सोसायटीमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांना प्रभाकर आणि कमलाकर असे दोन मुलगे आहेत. यातील प्रभाकर हा कांताबाई यांच्या घराशेजारीच राहतो. तर कमलाकर हा नाशिकरोडला वास्तव्यास आहे. कांताबाई यांना भेटण्यासाठी कमलाकर अधूनमधून येत असे. दरम्यान, १५ जुलै रोजी कांतबाई यांना भेटण्यासाठी कमलाकर आला होता. त्याने बुधवारी (दि. १७) कांताबाई यांच्याकडे मद्यपानासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आई आणि मुलामध्ये वाद झाला. यावेळी प्रभाकर याने 'आईला का मारतो' असा कमलाकरला जाब विचारला. याचा राग आल्याने कमलाकरने प्रभाकरलाही मारहाण केली. तसेच दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरत कमलाकरने आईचे डोके भिंतीवर जोरात आदळले. यात कांताबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना प्रभाकर यांच्या पत्नीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बेशुद्ध असलेल्या कांताबाई यांचा सोमवारी (दि. २२) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर सातपूर संशयित कमलाकर याला ताब्यात घेत त्याच्ययावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे, सातपूर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळाची पहाणी केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. एच. चव्हाण करीत आहेत.

मातेला नेहमीचाच त्रास

कांताबाई यांचे दोन्ही मुलगे व्यसनाच्या आहारी गेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आईला या दोन्ही मुलांचा नेहमीच त्रास होता. लहान मुलगा प्रभाकर याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तपासात वेगळे काही मिळते का, याचाही शोध तपास अधिकारी घेणार आहेत. दोघेही भाऊ अनेक वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेल्याचे कांताबाई चिंतेत होत्या, असेही रहिवाशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याचानांदगाव तालुक्यात खून मटा वृत्तस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक माणिकपुंज येथे दाखल झाले असून, पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे पुढील तपास करीत आहेत. रफिक लतीफ असे त्या तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी दुपारी शेतात गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी आठ वाजता माणिकपुंजनजीक टाकळी मार्गावर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. रफिक हा उत्तम शेती करीत होता. तसेच तो स्थानिक क्रिकेट स्पर्धाही गाजवत असे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोबीवर फवारले विषारी औषध

$
0
0

कळवण तालुक्यातील प्रकार, दोन लाखांचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा,कळवण

तालुक्यात गोसराणे येथील विधवा महिला शेतकरीच्या शेतातील उभ्या पिकावर अज्ञात समाजकंटकांनी विषारी औषध फवारणी करून नुकसान केले आहे. ललिता सिकंदर मोरे असे नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या एक एकर क्षेत्रावरील कोबीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मंगळवारी तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी यांनी कृषीक्षेत्रातील अभ्यासकांसह मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कोबीवर तणनाशक फवारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आता या पिकावर विद्राव्य खतांची फवारणी केल्यास नुकसानाची तिव्रता कमी होईल असा सल्ला या तज्ज्ञांनी दिला आहे.

सहा महिन्यापूर्वीच मोरे यांच्या पतीचे अकाली निधन झाले. पतीच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परिस्थितीशी दोन हात करीत त्यांनी शेतात कोबीचे पीक घेतले. या पिकासाठी ५० हजारापर्यंत खर्च झाला आहे. सद्यस्थितीला बाजारभावानुसान अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच शेतातील कोथंबिरीच्या पिकाचेही नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी ललिता मोरे यांनी आभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ, बोरस्तेंना वंदन

$
0
0

वाघ, बोरस्तेंना वंदन

नाशिक : कर्मवीर माधवराव काशीराम बोरस्ते इंग्लिश मीडियम स्कूल, भाऊसाहेबनगर येथे दर वर्षीप्रमाणे सहकार महर्षी माधवराव तथा तात्यासाहेब बोरस्ते, तसेच कर्मवीर काकासाहेब वाघ यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले. बोरस्ते स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांचे जन्मगाव साकोरे (मिग) येथे जाऊन भाऊसाहेबनगर येथे ज्योत प्रज्वलित करून आणली. यावेळी मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, राजेंद्र बोरस्ते, साकोरेचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images