Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रिक्त पदांची होणार भरती

$
0
0

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; दिल्लीप्रमाणे 'अपना दवाखाना' राबविणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागासह नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील रिक्त पदांच्या भरतीला तत्वत: मान्यता दिली जात आहे. या पदांच्या भरतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ताबडतोब निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि सावर्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले. स्वाईन फ्लू,डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी उपाययोजना करण्यासह सर्वसामान्यांना चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिल्लीतील 'मोहल्ला क्लिनिक'च्या धर्तीवर नाशिकमध्ये 'आपला दवाखाना' योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा शिंदेनी केली आहे.

शिंदे यांनी महापालिकेस भेट देत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक(आरोग्य) डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त राधाकृष्ण गमे व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी नाशिकमधील स्वाईन फ्लू, डेंग्यूचा प्रादूर्भाव आणि महापालिकेने केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती सादर केली. शहरातील स्थिती नियंत्रणात असल्याचा कागदोपत्री दावा यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी महापौर भानसी व आयुक्त गमे यांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्याधिकारी पदासाठी शासनसेवेतील सक्षम अधिकारी उपलब्ध झाल्यास शहरातील रोगराईवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, अशी सूचना मांडली. महापालिकेतील वैद्यकीय, आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी सरकारची मान्यता मिळावी, अशी विनंती गमे यांनी केली.

यावर वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा करून देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारच्या मान्यतेने या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आचारसंहितेनंतर प्रत्यक्ष भरती केली जाईल, अशी माहिती आयुक्त गमे यांनी दिली.

युद्धपातळीवर उपाययोजना

स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी युद्धपातळीवर उपाययोजनांचे निर्देश देतानाच सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसल्यास आणि ताप २४ तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास तातडीने टॅमी फ्लूचे उपचार सुरू करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी महापालिकेसह खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांना दिले. सोबतच पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी. स्वाईन फ्लू-डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम राबवावी. साथरोग नियंत्रणासाठी सरकारकडून महापालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

अधिकारी लगेच देतो!

महापालिकेतील वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्याधिकारी ही महत्त्वाची दोन्ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. महापालिकेकडे सक्षम अधिकारी नसल्याने दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभारीपद देऊन कारभार सुरू आहे. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय विभागाचा बोजवारा उडाला असून सक्षम अधिकारी सरकारने द्यावेत, अशी मागणी यावेळी महापौर, आयुक्तांनी केली. यावर वैद्यकीय अधीक्षक व आरोग्याधिकारी पदावर सरकार प्रतिनियुक्तीने अधिकाऱ्याची नियुक्तीचे आदेश सोमवारपर्यंत जारी केले जातील, असे आश्वासन आरोग्यमंत्री शिंदे यांनी दिले.

शिंदे यांनी केलेल्या सूचना

- अर्धवट बांधकामांवर लक्ष ठेवा

- डेंग्यू, स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करा

- अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरभेटी वाढवाव्यात

- लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवा

- उपायोजनेसाठी टीम सज्ज ठेवा

- स्वाईन फ्लू, डेंग्यू रुग्ण शुन्यावर आणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाऊस परतला

$
0
0

पाऊस परतला...

आठवडाभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने शुक्रवारी सायंकाळनंतर शहरासह नाशिक जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. बागलाण तालुक्यात काही तासांत १०० मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला आहे.

सविस्तर प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात वीज कोसळून ३ ठार, पावसाचे पुनरागमन

$
0
0

धुळे: राज्यातील अनेक भागांमध्ये पुनरागमन करत दिलासा देणाऱ्या मुसळधार पावसाने तिघांचे बळी घेतले आहेत. धुळ्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. धुळे आणि भिवंडी येथे वीज कोसलळ्यामुळे ४ जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडाववर ही वीज कोसळली. यावेळी एका झाडाखाली आसरा घेतलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (१४) याचा जागीच मृत्यू झाला. यात लखन राठोड (६) आणि हितेश राठोड (१०) हे दोघे जखमी झाले. तसेच, यात एक म्हशीचाही मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे दुसरी घटना घडली. या घटनेत दीपाली गिरासे (१५) हिचा वीज कोसळून मृत्यू झाला.

भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी रस्त्यावर असलेल्या झिडके गावाजवळ उंबरपाडा या आदिवासी वस्तीच्या ठिकाणी वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या प्रमिला मंगल वाघे (२०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. यात प्रमिला यांच्या आई अलका वाघे (५२) आणि बहिणीचा मुलगा विजय अजय बोंगे (४) जखमी झाले.

ठाण्यात अतिवृष्टीचा, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले असून हवामान विभागाने पालघर, ठाणे जिल्ह्यात आज (रविवार) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच आज (रविवार) दक्षिण कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, जालना, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतही पावसाची शक्यता

पुढील चार दिवस मुंबईतही काही ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, ठाणे, भाईंदर, डोंबिवली आणि नवी मुंबईत चांगला पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी टळली दुबार पेरणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव शहर व तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी व शनिवारी जोरदार हजेरी लावली. दमदार पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी असलेले नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने केलेल्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक सुखावले आहेत. पावसाच्या पुनरागम झाल्याने दिलासा मिळाला असाल तरी काही ठिकाणी नुकसान देखील झाले आहे. शहरातील सोयगाव नववसाहत परिसरातील अनेक कॉलनीमध्ये पाणी साचले असून काही घरांमध्ये देखील पाणी शिरले. दाभाडी गावात देखील नदी लगत असलेल्या शेतात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. तर ७ जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. शहरासह तालुक्यात शनिवारी सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पावसला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने काहीवेळ विश्रांती घेतली. सायंकाळी ५ नंतर मात्र शहरात पावसाचे जोरदार आगमन झाले. रात्री पुन्हा उशिरापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरू होता. शुक्रवारी व शनिवारी शहरात १०० मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांनी पावसाचे स्वागत केले. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गटारींचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यांवर आल्याने रस्ते जलमय झाले आहेत. अनेकठिकाणी मोकळ्या भूखंडावर पाणी साचल्याने रोगराईला आमंत्रण मिळाले आहे. विशेषतः शहरातील सोयगाव नववसाहत परिसरात हर्षवर्धन कॉलनी भागात गल्ल्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांना घरातून पाणी बाहेर काढण्यात रात्र घालवावी लागली.

तर सकाळी देखील साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. शहरातील डीके उद्यानाला देखील या पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी उद्यानात पाणी साचले आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने, गटारी न तयार केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रावरील प्रथम पदस्पर्शाला उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अपोलो ११' हे अमेरिकेचे अंतराळयान चंद्रावर पोहोचले त्याला २० जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त या मोहिमेच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्याबरोबरच 'नासा'च्या २०२४च्या 'बॅक टू द मून टू स्टे' या मिशनवर चर्चा करण्यात आली. गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सीएमसीएस कॉलेजमध्ये रविवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'अपोलो ११' या यानातून २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रिन यांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले होते. या घटनेचा सुवर्णमहोत्सव अमेरिकेतील नॅशनल स्पेस सोसायटी (नासा) आणि इतर अवकाश संशोधन संस्था साजरा करीत आहेत. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील माहिती व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना अंतराळ शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळावी म्हणून 'नासा'च्या नाशिक इंडिया चॅप्टरतर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील कार्यक्रमाचे शहरात सादरीकरण करण्यात आले. यानिमित्ताने डॉ. अॅमी बेरा, डॉ. रॉन जॉन्स, डॉ. पीटर कोक, डॉ. स्टीफन अॅकर्ली, 'नासा'च्या नाशिक इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

शास्त्रोक्त माहितीची उकल

अमेरिकेतील 'नासा'मधून झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नाशिकमधील विद्यार्थ्यांसमोर अंतराळविश्वातील रंजक आणि शास्त्रोक्त माहितीचा उलगडा करण्यात आला. लुनार ऑर्बिट इन्जर्शन, लुनार मोड्यूलची माहिती यावेळी देण्यात आली. 'अपोलो ११' ही मोहीम पार पाडताना आणि पार पडल्यानंतरच्या अनेक रंजक कथा यावेळी व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आणण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्ट वाढले; साध्य घटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्य सरकारने हाती घेतलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नाशिक विभागाच्या पूर्वीच्या उद्दिष्टात आता ८ लाखाने वाढ करण्यात आली असून, आतापर्यंत विभागात ३७.१९ टक्के इतकी वृक्षलागवड झाली आहे. गेल्या आठवड्यात विभागातील काही तालुक्यांत दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने वृक्षलागवडीत जवळपास दहा टक्क्याने वाढ झाली आहे. विभागात अव्वल स्थान कायम राखलेल्या नगर जिल्ह्याने वृक्ष लागवडीत राज्यातही आठव्या स्थानी झेप घेतली आहे. नाशिक जिल्हा दहाव्या क्रमांकावर असून, धुळे तेराव्या, जळगाव १८ व्या आणि नंदुरबार २५ व्या क्रमांकावर आहे.

प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटातून सुटका मिळविण्यासाठी ३३ टक्के भूभागावर वनाच्छादन असणे गरजेचे आहे. मात्र, देशात अवघ्या २० टक्के भूभागावार वने आहेत. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने ५० कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत जुलै २०१९ या महिन्यात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. नाशिक विभागाला ५ कोटी ९० लाख १८ हजार ३३१ इतकी वृक्षलागवड करण्याचे सुधारित उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. एक जुलैपासून या मोहिमेस प्रारंभ झाला असून आतापर्यंत नाशिक विभागात २ कोटी १९ लाख ५१ हजार ६८० इतक्या नववृक्षांची लागवड झाली आहे. नगर जिल्ह्याने आतापर्यंत ४६.२७ टक्के वृक्षलागवड करून विभागात पहिले तर राज्यात आठवे स्थान पटकावले आहे.

विभागनिहाय वृक्षलागवड

विभाग - उद्दिष्ट- आतापर्यंतची लागवड

सार्वजनिक बांधकाम - ७ लाख २० हजार २५०- ४८ हजार ९५७

वन विभाग- २ कोटी ४४ लाख ६० हजार - १ कोटी ३० लाख ६ हजार २५७

सामाजिक वनीकरण - १ कोटी - ४९ लाख ७० हजार २३२

वनविकास महामंडळ - २२ लाख ३४ हजार ५३१ - ८ लाख १५ हजार ५४२

कृषी विभाग - २० लाख ४७ हजार ४५० - ४ लाख ८४ हजार ७७२

नगरविकास - ६ लाख ४२ हजार ४५० - ५७ हजार ४८९

महापालिका- २ लाख ५५ हजार ८०० - १ लाख २२ हजार ११२

ग्रामपंचायती - १ कोटी ५९ लाख ३७ हजार ८०० - १६ लाख ८२ हजार ८७५

वस्त्रोद्योग - ६ लाख ४८ हजार ९०० - ३ लाख ५७ हजार ५००

इतर - २० लाख ७१ हजार १५० - ४ लाख ५ हजार ९४८

जिल्हानिहाय वृक्षलागवड

जिल्हा---उद्दिष्ट---लागवड ---टक्केवारी

नगर---१,१७,६३,८५०---५४,४३,२७८---४६.२७

नाशिक---२,००,३०,५८१---८१,६४,८६९---४०.७६

धुळे---६५,७६,१००---२४,६१,७७७---३७.४४

जळगाव---१,१५,०३,१००---३४,२७,६९१ ---२९.८०

नंदुरबार---९१,४४,७००---२४,५४,०६५---२६.८४

एकूण---५,९०,१८,३३१---२,१९,५१,६८०---३७.१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ तासांत ५८४ मिलीमीटर पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारी सकाळी साडे आठपूर्वीच्या २४ तासांत ५८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत ६ हजार ६१९ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यापैकी १३ तालुक्यांमध्ये अद्याप ५० टक्के देखील पाऊस झालेला नाही.

१ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असतो. पावसाळा सुरू होऊन साधारणत: पावणे दोन महिने झाले असले तरी खऱ्या अर्थाने जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने जोर धरला. जिल्ह्यात साधारणत: १५ हजार २०० मिलीमीटर पाऊस पडतो. गतवर्षी १ जून २०१८ ते १९ जुलै २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ७ हजार १९८ मिलीमीटर पाऊस पडला होता. परंतु तुलनेने यंदा पावसाचा जोर कमी आहे. यंदा आतापर्यंत ६ हजार ६१९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी ४७.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

कळवणमध्ये सात टक्केच पाऊस

जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण बरे असले तरी कळवण तालुक्यामध्ये खूपच कमी पाऊस पडला आहे. तालुक्यात अवघा आठ टक्के पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याखालोखाल देवळा तालुक्यातही अवघा १० टक्के एवढाच पाऊस झाला आहे. नांदगावात १२ टक्के तर चांदवडमध्ये १४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोनच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक तालुक्यात ६६ टक्के तर येवला तालुक्यात ५९ टक्के पाऊस झाला आहे.

पावसाची विश्रांती

गेले दोन दिवस जिल्हावासियांना संततधारेने चिंब करणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. शहरात सकाळी साडे आठपर्यंतच्या २४ तासांत १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या कालावधीत शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर ग्रामीण भागातही पावसाचा जोर नव्हता. काही तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

नाशिक ४४९.५

इगतपुरी १५५९

त्र्यंबकेश्वर ९८८

दिंडोरी ३०९

पेठ ९२५.२

निफाड २०४

सिन्नर २६२

चांदवड १७३

देवळा १४२.१

येवला ३१७.२

नांदगाव १०३

मालेगाव २३९

बागलाण २४१

कळवण १०६

सुरगाणा ५८२.३

एकूण ६६१९.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लेखा व कोशागारे’च्या परीक्षांचे निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेखा व कोशागारे विभागाच्या लेखा लिपीक, लेखा परीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखा परीक्षक या गट क संवर्गाच्या 'महापरीक्षा'मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी संचालक, लेखा व कोशागारे, मुंबई यांच्या www.mahakosh.gov.in या संकेतस्थळवरील Employee corner_Recruitment rule या टॅबवर उपलब्ध आहे. सहसंचालक, लेखा व कोशागारे, नाशिक या विभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही ती प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवार त्यांच्या अर्ज नोंदणी क्रमांकाच्या आधारे निकालाची खात्री करू शकतील. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी २२ जुलै ते २९ जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत सहसंचालक, लेखा व कोशागारे या विभागीय कार्यालयात होणार आहे. संबंधित उमेदवारांना यासंदर्भात पत्रे पाठविण्यात आली आहेत. उमेदवारांना २५ जुलैपर्यंत पत्रे न मिळाल्यास त्यांनी सहसंचालक, लेखा व कोशागारे , लेखा कोश भवन, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कागदपत्रे तपासणीसाठी जाहिरातीत नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती, तसेच स्वसाक्षांकित दोन संच सोबत आणणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्याची प्रत, प्रवेशपत्र (हॉलतिकीट) व ओळखत्र (आधार कार्ड, वाहनचालक परवाना, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड (छायाचित्र असलेले), पासपोर्ट आदी) सोबत आणणे आवश्यक आहे, असे सहसंचालक, लेखा व कोशागारे कार्यालय, नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीचा पाणीप्रश्न मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागात ज्या ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, अशा ठिकाणी जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी पावणेआठ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पंचवटीकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. हा एक वेळ केलेला पाणीपुरवठा पुरेसा नसून पाणीवाटपात सुसूत्रता यावी यासाठी जुनाट जलवाहिन्या बदलून नव्या वाहिन्या टाकण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांकडून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा कमी असल्याने महापालिकेने शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात रोज एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. तो लवकरच पूर्ववत होणार असला, तरी ही पाणीटंचाई कृत्रिम असून, योग्य नियोजन नसल्याने पाणीकपात करावी लागत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी महासभेत केला होता.

शहरात जलकुंभांची संख्या योग्य प्रमाणात आहे. मात्र, त्यातून पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जुनाट झाल्याने शेवटच्या घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही. शहराचा वेगाने विस्तार होत असताना जलवाहिन्या मात्र बदलण्यात आलेल्या नाहीत. ही समस्या जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुरुवातीला पंचवटी परिसरातील जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. पंचवटी पूर्व व सिडको या विभागातील सात कोटी ७२ लाख ८ हजार २३५ रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्याची निविदा काढण्यात आली आहे.

येथे बदलणार वाहिन्या

या कामांतर्गत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मध्ये म्हसरूळ शिवारात २० दशलक्ष लिटरचा जलकुंभ बांधण्यात येणार असून, उर्ध्ववाहिनी व मुख्य वितरण वाहिनी टाकण्यासाठी पाच कोटी २७ लाख १७ हजार २९ रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात नव्याने झालेल्या सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. प्रभाग ४ मध्ये पेठरोड मार्केट यार्ड सिग्नल ते समर्थनगर, हमालवाडी, डी. पी.रोडलगत मुख्य वितरण वाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी ७४ लाख ९० हजार १०४ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. याच विभागातील तारवालानगर, तलाठी कॉलनी व लामखेडे मळा या विभागातही जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, तेथे ७४ लाख ५ हजार ११२ रुपयांची कामे होणार आहेत.

---

नाशिक पूर्व, सिडकोलाही दिलासा

सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर, नाईक मळा ते आबा पाटील मळा सर्वे नंबर ७७० पर्यंत ४५० व १५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी ५३ लाख २३६ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधील उत्तरानगर, मकरंद कॉलनी, पंचामृत सोसायटी, गायत्रीनगर, रघुवीर कॉलनी व नंद गार्डन परिसरात ४२ लाख ९५ हजार ७५४ रुपये खर्चून जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामांच्याही निविदा काढण्यात आल्या आहेत. या नव्या जलवाहिन्यांमुळे या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्य, जुगार रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध भागात सुरू असलेली अवैध मद्यविक्री, तसेच जुगार अड्डे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. परिमंडळ दोनमध्ये विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.

परिमंडळ दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगरासह उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाणे प्रमुखांना अवैध मद्यविक्री व जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्यविक्री करणाऱ्या दोन व जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कारवाई केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

इंदिरानगर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामचंद्र पुंडलिक गावित (वय २७, रा. वडाळा), निसार मोहम्मद शाह (५०, वडाळा) आणि कुंदन खंडू जाधव (३७, भारतनगर) अशी या संशयितांची नावे आहे. नाशिकरोड पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्या नाना दामू अहिरे (५२, देवळालीगाव) यास अटक केली. सातपूर पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत संशयित अनिल रामदास चव्हाण (सातपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ८८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यात जुगार खेळणाऱ्या लक्ष्मण शालिक भंगाळे (४८, सातपूर), राजेंद्र अशोक गांगुर्डे (२८, सातपूर), विलास भिला हटक (३८, आनंदवली) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून एक हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या राजेश वसंत पवार (४४, भगूर), सुनील घन:श्याम जाधव (५०, जेलरोड), ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड (६८, भगूर) यांना पकडले. त्यांच्याकडून १ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवांवर नव्हे स्वत:वर विश्वास ठेवा: निवडणूक आयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून ओरड सुरू असली तरी सरकारने मात्र ईव्हीएमद्वारेच निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. ईव्हीएमबाबतचे गैरसमज दूर करतानाच त्याच्या कार्यपिद्धतीबाबत जनजागृतीचे कामही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हाती घेण्यात आले आहे. तुम्ही मतदान केले आणि मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका, असे आवाहन आयोगाने केले आहे.

ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही असा दावा भारत निवडणूक आयोगाने केला असून, ईव्हीएमबाबतच्या जनजागृतीवर भर देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० लाखांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये ६१.३ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासाठी रँडम पद्धतीने ईव्हीएमचे मतदान केंद्रांना वाटप करण्यात आले. कोणते मशिन कोणत्या केंद्रावर जाणार हे कुणालाही माहीत असण्याचे कारण नाही. प्रत्येक मशिनची तपासणी करतानाच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ते मोहोरबंद करण्यात आले. अंतिम उमेदवार यादी निश्चित होईपर्यंत कोणत्या उमेदवाराचे नाव कोणत्या क्रमांकावर येणार हे देखील स्पष्ट होत नसल्याने ईव्हीएमच्या मतांमध्ये फेरफार होणार कसा असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी पाहिली का याबाबत खातरजमा करूनही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत शंका घेण्यास ठोस आधार नसल्याचा दावाही या जनजागृतीच्या माध्यमातून केला जाऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात १७ मतदारांनी व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीवर चुकीचे मुद्रण झाल्याचा दावा केला होता. परंतु, या शंकांचे निरसन केल्याचा दावाही आयोगाने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी २० हजार ६८७ व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्या रॅन्डम पध्दतीने मोजण्यात आल्या. त्यापैकी केवळ आठ व्ही व्ही पॅटच्या एकूण मतांमध्ये असमानता आढळून आल्याचा आयोगाचा दावा आहे. तुम्ही मतदान केले आणि तुम्ही दिलेल्या मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका असे आवाहन आयोगाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचा जोर कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुणियासारख्या आजारांना शहरात पायबंद बसत असताना स्वाइन फ्लूचा जोर मात्र कायम राहिला आहे. आतापर्यंत शहरातील १६० हून अधिक नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया अथवा चिकन गुणिया या आजारांमध्ये वाढ होत असते. प्रभावी आणि वेळेत औषध फवारणी न झाल्यास ठिकठिकाणी साठलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. याचमुळे मागील दोन वर्षात जीवघेण्या डेंग्यूने डोके वर काढले होते. जवळपास अठराशे रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला होता, तर तीन बळीसुद्धा गेले होते. यंदा जून महिन्यापर्यंत अवघ्या १३ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मलेरिया आणि चिकन गुणिया आजारांबाबतदेखील दिलासा मिळालेला दिसतो. किटकजन्य आजारापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी विषाणूजन्य स्वाइन फ्लूला रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. २०१७ मध्ये शहरातील २६४ जणांना या आजाराची लागण झाली होती, तर ३२ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्येही परिस्थिती कायम होती. यावर्षी २४१ नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये १६० जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर १० जणांचा बळी गेला. स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतो. सर्दी पडसे याप्रमाणेच स्वाइन फ्लूची लक्षणे असतात. कामाचा ताण अथवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे नागरिकांना गर्दीत मिसळावे लागते. त्यामुळे हा आजार पसरतो. वैयक्तिक स्वच्छता आणि वेळीच उपचार यामुळे स्वाइन फ्लूला लागलीच आटोक्यात आणण्यात यश मिळते. अनेकदा नागरिक तात्पुरत्या स्वरुपात परस्पर औषधे घेतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता अशी औषधे घेतल्यास त्याचाही दुष्परिणाम होतो, असे संबंधित डॉक्टरांनी स्पष्ट केले.

--

आजार- २०१७- - २०१८- - २०१९

लागण-मृत्यू - लागण-मृत्यू - लागण-मृत्यू

स्वाइन फ्लू- २६४-३२ - २४१-२४ - १६०-१०

डेंग्यू- ९४९-० - ८४४-३ - १३-०

मलेरिया- २६-० - २-० - २-०

चिकन गुणिया- १२-० - ५७-० - १-०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - ‘संस्कारम्’ चित्रपट बघण्यासाठी गर्दी

$
0
0

'संस्कारम्'साठी गर्दी

नाशिक : 'सावाना' आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या वतीने 'संस्कारम्' (कानडी) हा गिरीश कर्नाड यांचा अनेक पारितोषिक विजेता चित्रपट रविवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात दाखवण्यात आला. प्रख्यात अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या कतृत्वास अभिवादन करण्यासाठी या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटास इंग्रजीत सबटाईटल्स जोडण्यात आल्यामुळे कानडी न येणाऱ्यांना सुद्धा या चित्रपटाचा आनंद घेता आला. शहरातील कानडी भाषिकांनी हा चित्रपट बघण्यासाठी उपस्थिती होती. सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव अॅड. अभिजित बगदे, सांस्कृतिक कार्यसचिव प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, देवदत्त जोशी आणि कार्यकारी मंडळ व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष विजय जानोरकर, कार्याध्यक्ष गजानन ढवळे उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

लोगो - बालकथा

चतुर माकडाची धाडसी शेपूट

वैभव गिलाणकर, नाशिक

एका जंगलावर मोठे संकट आले होते. कुठूनतरी एक वणवा पेटून पसरत पसरत पूर्ण जंगलाला भस्मसात करण्यासाठी येत होता. वणव्याची झळ सर्व प्राण्यांना लागत होती. ससे, हरणं, हत्ती, वाघ, सिंह घोळक्यांनी-कळपांनी; तर चिमण्या, पोपट, कबुतरांसारखे पक्षी थव्या थव्यांनी दूर निघून जात होते. पण काही प्राणी असे होते जे एवढ्या वेगाने दूर जाऊ शकत नव्हते, त्यात एक साप आणि एक माकडही होतं. ते दोघे एकमेकांचे मित्र होते. साप सरपटत पसरणाऱ्या आगीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण भडभडणाऱ्या ज्वाळा त्याच्याजवळ पोहोचू लागल्या होत्या. माकडही झाडांवरून उड्या मारत चाललं होतं पण त्याला शेपूट नव्हती, त्यामुळे शेपटीने जशा फांद्या पकडाव्या तशा पकडता येत नसल्यामुळे त्याचा वेग मंदावला होता.

शेवटी ते दोघे तात्पुरता एका ठिकाणी आडोश्याला थांबले. साप हताश होऊन माकडाला म्हणाला, 'काही खरं दिसत नाही! मला फार वेगाने सरपटता येत नाहीये आणि तुलाही शेपटीविना झाडांवरून नीट पळता येत नाहीये. तुला शेपटी असती तर तू आपल्या दोघांना घेऊन जाऊ शकला असतास.' माकडाला हे ऐकून लगेच एक कल्पना सुचली आणि त्याने ती सापाला सांगितली. प्रथम त्याने सापाला आपल्या कमरेला घट्ट बांधलं पण त्याचं तोंड आणि काही भाग मोकळा ठेवला. आणि मग माकड झाडावर चढून चपळाईने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू लागले, ज्या फांद्या त्याच्या हाताला लागत नव्हत्या त्यावर साप स्वतः झडप घालून वेटोळा घालायचा, थोडक्यात म्हणजे साप माकडाची शेपटीच बनला होता. अशारितीने ते दोघे वेगाने चालले होते, शेवटी उड्या मारत मारत दोघेही जंगलाच्या सीमेवरील नदी किनारच्या झाडावर आले. नदीपलीकडे पोहोचून ते दोघे सुरक्षित होणार होते पण तेथल्या फांदीवरून नदीपलीकडील झाडाच्या फांदीत जास्त अंतर होते. माकडाला ती झेप घेणे अवघड जाणार होते पण, सापाने त्याला सांगितले,'तू उडी मार, आपण नीट पोहोचू.' माकडाने एक जोरदार उडी मारली पण त्याचा हात फांदीला लागला नाही आणि तो कोसळणार इतक्यात सापाने माकडावरचा आपला वेटोळा सोडला आणि झडप घालून एक फांदीला पकडलं आणि तो ओरडला, 'लवकर माझ्या शेपटीला पकड!' माकडाने चपळाईने एखाद्या दोरीला पकडावे तसे सापाला पकडले, त्यामुळे सापाला थोडी इजाही झाली पण, त्याने माकडाला पडण्यापासून वाचवले. मग ते दोघे खाली आले. माकडाने सापाचे आभार मानले, 'मित्रा, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद!'. साप त्याला म्हणाला, 'तू युक्तीने आपल्या दोघांचीही अडचण दूर करून संकटातून मार्ग काढलास, तेव्हा तुझे उपकार मी फेडायलाच हवे.' यानंतते दोघे जण सोबतीने नव्या घराच्या शोधात निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट न्यूज : पट्टा : planet campus

$
0
0

\B'लिपी'विषयक

कार्यशाळा आज \B

नाशिक : 'ब्राह्मी', 'शारदा' आणि 'नेवारी' या लिपींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एचपीटी कॉलेजच्या संस्कृत आणि इतिहास या विभागातर्फे आजपासून सुरू होणारा हा उपक्रम ५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी (दि. २२) सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. मंजिरी भालेराव या उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी असतील. 'नाशिकमधील ऐतिहासिक स्थळे' या विषयावर डॉ. भालेराव मार्गदर्शन करणार आहेत.

\Bआज व्याख्यान \B

नाशिक : छात्रभारती या संघटनेच्या वतीने आज (दि.२२) 'राष्ट्रीय शिक्षण निती २०१९' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात हे व्याख्यान होणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी समाधान बागूल यांनी दिली. व्याख्याते डॉ. शरद जावडेकर हे साडेतीन दशकांपासून शैक्षणिक चळवळीत सहभागी आहेत. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी लढा दिला आहे. नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आरोग्य अधिकारी'साठी २८८ परीक्षार्थींची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उद्योगवर्धिनी कार्यक्रमासाठी समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या भरती अंतर्गत रविवारी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला नाशिक परिमंडळातील १ हजार ५९७ परीक्षार्थी हजर होते, तर २८८ परीक्षार्थींनी दांडी मारली. या परीक्षेचा निकाल बुधवारी (२४ जुलै) सायंकाळी जाहीर होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या नाशिक परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली. राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५ हजार ७१६ जागा भरण्यात येत असून, ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारकांची प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी रविवारी राज्यातील एकूण सात परिमंडळात सामुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. नाशिकमधील बीवायके कॉलेज, एनबीटी लॉ कॉलेज, एचपीटी आरवायके कॉलेज आणि एसएमआरके गर्ल्स कॉलेज या चार केंद्रावर सकाळी ११ ते १ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी नाशिक, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी १ हजार ८८५ परीक्षार्थी पात्र ठरले. यापैकी १ हजार ५९७ परीक्षार्थी परीक्षेस हजर राहिल्याने, हे परीक्षार्थी भरतीच्या रिंगणात उरले आहेत. परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरुप मध्यम काठीण्य पातळीचे होते, असे मत परीक्षार्थींनी व्यक्त केले. या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी www.nrhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाहीर होणार असून, परीक्षार्थींनी निकालाचे अपडेट अधिकृत वेबसाइटद्वारेच जाणून घ्यावे, असे आवाहन राज्य आरोग्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. हरकत घेण्याची संधी प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना या निकालासंदर्भात हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. २६ जुलै सायंकाळी ५ पर्यंत परीक्षार्थींना हरकती नोंदविता येणार असून, यानंतर योग्य हरकती विचारात घेऊन सुधारित निकाल जाहीर होईल. सुधारित निकालदेखील २६ जुलै रोजी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर होणार आहे. वेबसाइटवर यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील रंगतविहीर, फणसपाडा येथे शनिवारी (दि.२०) रात्री छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाख २९ हजार रूपयांचा अवैधरित्या साठवणूक केलेला बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला. यातील संशयित फरार झाला असून, त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीदास सोनिराम चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

सुरगाणा तालुक्यातील फणसपाडा येथील रंगतविहीर शिवारात अवैधपणे बनावट देशी, विदेशी मद्याचा साठा करण्यात आल्याची माहिती विभागीय राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी फरार झालेला हरीदास सोनिराम चौधरी या संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या ताब्यातील व्हिस्कीच्या ३३६ बाटल्या, व्हिस्कीच्या २८८, देशी दारुच्या दोन हजार ४०० बाटल्या असा एकूण दोन लाख २८ हजार ९६० विनापरवाना बनावट अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फरार झालेल्या चौधरी विरोधात दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकचे निरिक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरिक्षक एस. एस. रावते, जवान दिपक आव्हाड, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, गोकुळ शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष व्यापाऱ्याच्या घरावर ठिय्या 2 कोटी 91 लाख थकवल्याने द्राक्ष व्यापाऱ्याच

$
0
0

२ कोटी ९१ लाख थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

म. टा. वृत्तसेवा, निफाड

द्राक्ष खरेदी करून त्याचा परतावाच न दिल्याने निफाड, दिंडोरी, इगतपुरी, चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ओझर येथील व्यापारी संतोष बबन गवळी यांच्या घरासमोर शनिवारपासून (दि. २०) ठिय्या मांडला आहे. रविवारीही यावर तोडगा न निघाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. ८७ शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यातील ८७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ओझर येथील आदित्य अँग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी (रा. शिवाजी नगर, ओझर), नीलेश बाळासाहेब दवांगे (रा. खेडगाव), पंकज माधव मोहन (रा. ओझर) या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा द्राक्षमाल एक्स्पोर्टला पाठवला आणि शेतकऱ्यांना २ कोटी ९१ लाख रुपयांचे खोटे धनादेश दिले. सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली. ही रक्कम देण्यास या व्यापाऱ्यांनी टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांनी आपले पैसे मिळावे यासाठी ओझर येथील मुख्य व्यापारी संतोष गवळी यांच्या घरासमोर शनिवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत हा ठिय्या शांततेच्या मार्गाने सुरू राहणार असल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.

गुन्हा दाखल

या शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षक आरती सिंग, निफाडचे आमदार अनिल कदम यांना यापूर्वीच निवेदन देण्यात दिले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर याबाबत ओझर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेतकरी संघटनेच्या अर्जुन बोराडे व पदाधिकारी यांनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी शंकर कुशारे, विनोद पाटील, नंदू मते, आनंद गायकवाड, अनिल जाधव, रोहित जाधव, बाळासाहेब गायकवाड, रमेश खैरे, राजाराम परदेशी, रमेश कुयटे, सत्यजित भालेराव, भगवंत धुमाळ, बाळासाहेब राजगुरू, अनिल कोठुळे आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर गन नेमबाजी स्पर्धा २५ जुलैपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटना नाशिक व महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये 'भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र राज्यस्तरीय एअर गन नेमबाजी स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २८ जुलै दरम्यान एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशन सातपूर एमआयडीसी येथे या स्पर्धा होतील.

महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी आतापर्यंत ६६१ नेमबाजांनी नाव नोंदले आहे. नाशिकमधून एकूण ७४ नेमबाज सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना व राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या नियमानुसार या स्पर्धा होतील. २६ गटांत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धतील विजेत्यांना एकूण ७८ पदके दिली जाणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्या उपस्थितीत होईल. नाशिककरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा नेमबाजी संघटनेच्या अध्यक्षा शर्वरी लथ व सचिव मोनाली गोऱ्हे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images