Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

'मूल्य'शिक्षण : डॉ. दीप्ती देशपांडे


‘सीईओं’चा बैठकांचा धडाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे बुधवारी एस. भुवनेश्वरी यांनी हाती घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी दिवसभर विविध आढावा बैठका घेऊन कामकाजास प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी त्यांनी रात्री आठपर्यंत या बैठका घेतल्या. या बैठकांमधून त्यांनी सर्व कामकाज समजून घेतले.

जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांचा पदभार यवतमाळच्या सहायक जिल्हाधिकारी असलेल्या एस. भुवनेश्वरी यांनी स्वाकारला. त्यानंतर त्यांनी कामकाजास प्रारंभ करीत आरोग्य व शिक्षण विभागावर भर देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या २०१५ च्या बॅचच्या 'आयएएस' अधिकारी असून, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांना कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या अडीच वर्षांच्या काळात तीन 'सीईओं'नी कामकाज केले आहे. त्यातील वेगवेगळ्या कारणांनी सर्वांनाच काम करण्यास कमी संधी मिळाली. त्यात डॉ. गिते यांनी दीड वर्षात कामे रुळावर आणली. त्यामुळे एस. भुवनेश्वरी यांना ही कामे पुढे नेऊन पुन्हा प्रशासन गतिमान करण्याची जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांवर भाजपची सरशी

$
0
0

- चारही समित्यांच्या सभापतिपदी भाजपचे सदस्य

- शिवसेनेला दोन समित्यांच्या उपसभापतिपदाचा वाटा

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शहर सुधार, विधी, वैद्यकीय सहाय्य आणि महिला व बालकल्याण या चार समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी गुरुवारी (दि. १८) निवडणूक झाली. या चारही समित्यांवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली असून, दोन समित्यांच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड झाली आहे. भाजपने विषय समित्यांमध्ये शिवसेनेला वाटा दिल्याने पालिकेतील भाजप-सेनेचा दोस्ताना वाढला आहे.

चार विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी १९ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेच्या सुदाम डेमसे व भाजपच्या अनिल ताजनपुरे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या सुदाम डेमसे व भाजपच्या छाया देवांग यांनी अर्ज दाखल केला होता. सभापतिपदी भाजपच्या अनिल ताजनपुरे व उपसभापतिपदी शिवसेनेच्या सुदाम डेमसे यांची निवड झाली.

महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या हेमलता कांडेकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती पदासाठी चुरस होती. शिवसेनेच्या रंजना बोराडे व भाजपच्या डॉ. सीमा ताजणे यांनी या पदासाठी दावा केला होता. यात डॉ. ताजणे या निवडून आल्या आहेत. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खाडे, भाजपच्या डॉ. दीपाली कुलकर्णी, अंबादास पगारे यांनी दावा केला होता. भाजपचे बहुमत असल्याने सभापतिपदी डॉ. दीपाली कुलकर्णी यांची निवड झाली, तर उपसभापतिपदी अंबादास पगारे यांची निवड झाली.

विधी समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेचे चंद्रकांत खाडे व भाजपच्या सुमन सातभाई यांनी अर्ज केला होता. यात सुमन सातभाई विजयी झाल्या. उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खाडे, सूर्यकांत लवटे व भाजपच्या नीलेश ठाकरे यांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या क्षणी नीलेश ठाकरे आणि सूर्यकांत लवटे यांनी माघार घेतल्याने चंद्रकांत खाडे यांचा मार्ग मोकळा झाला.

विषय समित्यांमध्ये भाजपकडे बहुमत असतानाही शिवसेनेने तीन समित्यांच्या सभापतिपदासाठी तर चार समित्यांच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करून सत्तेत वाटा घेण्याची तयारी केली होती. या निवडणुकीसाठी १२ सदस्यांनी सभापती व उपसभापती पदासाठी १९ अर्ज दाखल केले होते.

...

विधी समिती

सभापती : सुमन सातभाई (भाजप)

उपसभापती : चंद्रकांत खाडे (शिवसेना)

----

शहर सुधार समिती

सभापती : अनिल ताजनपुरे (भाजप)

उपसभापती : सुदाम डेमसे (शिवसेना)

---

महिला व बालकल्याण

सभापती : हेमलता कांडेकर (भाजप)

उपसभापती : डॉ सीमा ताजने (भाजप)

------

वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती

सभापती : डॉ. दीपाली कुलकर्णी (भाजप)

उपसभापती : अंबादास पगारे (भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर उलटल्याने तरुण जागीच ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

ठाणगाव-सिन्नर मार्गावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या वळणावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटून एक तरुण ठार तर चौघे किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

किरण नामदेव बिन्नर (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर विकास हरी सहाणे (वय १७), तेजस शंकर सहाणे (वय १८), दीपक गणपत मेंगाळ (वय १८), पियुष मारुती बिन्नर (वय १७, सर्व रा. हिवरे, ता. सिन्नर) अशी जखमींची नावे आहेत. शंकर बाळकृष्ण सहाणे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन बोरखिंड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत रोपे घेण्यासाठी जात असताना ठाणगाव-सिन्नर मार्गावर देवीच्या खिंडीत ही घटना घडली. वळणावर ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने किरण बिन्नर याचा मृत्यू झाला. अन्य चार जण किरकोळ जखमी झाले. सिन्नर येथील खासगी दवाखान्यात उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, ठाणगावचे माजी सरपंच नामदेव शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली. नगरपालिका दवाखान्यात उत्तरीय तपासणीनंतर किरणचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीत भेदभाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि गंगापूर धरणाने तळ गाठल्याने शहरात गेल्या ३० जूनपासून लागू करण्यात आलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, कपात अवघी पाच टक्केच असून, या कपातीतून शहरातील उच्चभ्रू वस्त्यांना वगळण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.

विशेष म्हणजे प्रशासनाने उच्चभ्रू वस्त्यांचा पाणीपुरवठा कायम ठेवत केवळ पंचवटी आणि जुने गावठाणच्या भागात पाणीकपात लागू करून भेदभाव केल्याचा आरोप बग्गा यांनी पुराव्यांनिशी केला. यंदा पावसाळा लांबल्याने आणि गंगापूर धरणातील पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाने ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू केली होती. इंटेकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी भविष्यात अडचण निर्माण होईल म्हणून शहरात ज्या भागात दोनवेळा पाणीपुरवठा होतो, तेथे एकवेळ आणि आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पाणीकपात लागू होताच शहर परिसरात धो-धो पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे गंगापूर धरणातील साठा आठवडाभरातच ५४ टक्क्यांवर गेला. परिणामी सोमवारपासून आठवड्यातून एक दिवस सुरू असलेली पाणीकपात मागे घेण्यात आली. परंतु, ज्या भागांमध्ये दोनवेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. धरण ८० टक्के भरल्यानंतर हा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने घेतला असला, तरी ३० जूनपासून करण्यात आलेल्या पाणीकपातीतून शहरातील उच्चभ्रू वस्त्यांना मात्र वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुने नाशिक, द्वारका व पंचवटी या भागात कामगार, गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचा रहिवास आहे. या पाणीपुरवठ्याची सक्षम यंत्रणा नसल्याने या भागात दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. पुरेसे जलकुंभ नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. प्रशासनाने या भागात एकीकडे एक वेळ कपात करून पाणीबचत केली असताना ज्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये एकच वेळ भरमसाठ पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील पाणीपुरवठा मात्र कायम ठेवला होता. त्यामुळे ही पाणीकपात केवळ द्वारका, पंचवटी, जुने नाशिक भागातच करण्यात आली असून, ही कपात अवघी पाच टक्के असताना त्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरल्याचा आरोप बग्गा यांनी पुराव्यांनिशी केला आहे.

--

आकडेवाडीतून वास्तव उघड

३० जून ते १३ जुलैदरम्यान प्रशासनाने पाच हजार २५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला. नियमित दररोज ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केल्यास या १४ दिवसांत शहराला सहा हजार ४४० दशलक्ष दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा झाला असता. त्यामुळे प्रशासनाने या १४ दिवसांत केवळ एक हजार ८६ दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली आहे. त्यामुळे ही बचत अवघी पाच ते सात टक्के असून, ही बचत ज्या ठिकाणी दोन वेळा पाणीपुरवठा व्हायचा त्या पंचवटी, जुने नाशिक आणि द्वारका या भागातूनत करण्यात आलेली आहे. ज्या भागामध्ये एक वेळ पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणी कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाचा पाणीबचतीचा दावा फोल असून, ही कपात भेदभाव निर्माण करणारी असल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रश्नांना काय उत्तर देते याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् टळली दुर्घटना!

$
0
0

'अंत्योदय'चा डबा रुळावरून घसरला; ड्रायव्हरची दक्षता आली कामी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

मध्य रेल्वेच्या इगतपुरी-कसारा घाटात गुरुवार पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसच्या (डाउन मार्गावरील) डब्याचे चाक रुळावरून घसरले. इंजिन ड्रायव्हरने वेळीच दक्षता घेत गाडी थांबविली आणि जमिनीपासून सुमारे २०० फूट खोल दरीत गाडी कोसळण्यापासून वाचविली. या घटनेमुळे मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आली. तसेच सकाळच्या सुमारास अप आणि डाउन मार्गावरील गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

मुंबईहून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्स्प्रेस (१२५९८) कसारा सोडल्यानंतर घाटातील ब्रिटिशकालीन भीमा २ पुलावर पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास आली. अचानक मोठा आवाज झाल्याने साखर झोपेत असलेले प्रवासी जागे झाले. गाडीचा शेवटून दुसरा डबा रुळावरून घसरत असल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने सतर्कता दाखवित विनाविलंब गाडी थांबविली आणि फार मोठी जीवितहानीसह दुर्घटना टळली. या अपघातामुळे गाडीतील प्रवासी गोंधळले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला बोलवले. त्यांनी युद्ध पातळीवर पुलावरून अपघातग्रस्त गाडी हटविण्याचे काम सुरू केले.

रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप व मिडल मार्गाने वळविल्या. गाडी पुलावरून बाजुला करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. दोन्ही बाजुला खोल दरी असल्याने पुलावर काम करण्यास यंत्रणेला कठीण झाले. दरम्यान, या अपघाताचा कसारा मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. पावसाळ्यात दरवर्षी मध्य रेल्वेच्या गाड्या कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच बंद किंवा उशिराने धावतात. सदर अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाने दिली.

कसारा घाटात माथ्याच्या वळणावर भीमा २ हा ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे. याच पुलावर 'अंत्योदय'चा डबा रुळावरुन घसरल्याचे आवाजावरून तात्काळ ओळखत चाणाक्ष इंजिन ड्रायव्हरने प्रसंगवधन राखून गाडी तात्काळ थांबविली. घाट चढत असल्याने गाडीचा वेग कमी होता. गाडीचा एक जरी डबा पुलाखाली आला असता तरी मोठी जीवितहानी झाली असती. एवढेच नव्हे तर पुलाचेही नुकसान झाले असते. परंतु, निव्वळ दैव बलवत्तर म्हणून अपघात टळला.

नऊ तासांची पराकाष्ठा

रद्द करण्यात आलेली मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस अपघात स्थळापर्यंत नेण्यात आली. अंत्योदय एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना राज्यराणीध्ये बसवून इगतपुरी रेल्वे स्टेशनवर सकाळी ११ वाजता आणण्यात आले. नंतर याच गाडीने (रिलीफ ट्रेन) सर्व १५० ते २०० प्रवाशांना या गाडीने गोरखपूरला रवाना करण्यात आले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास 'अंत्योदय'चे शेवटचे दोन डबे पुलावरच ठेवून अपघातग्रस्त गाडी इगतपुरी स्टेशनवर आणण्यात आली. तब्बल नऊ तासांनंतर 'अंत्योदय'चा घसरलेला डबा हटविण्यात यश आले. त्यास दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इगतपुरी स्टेशन यार्डात आणण्यात आले.

जुन्या आठवणी ताज्या

गाडीतील प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत पहाटेपासून जागीच बसून होते. डब्याबाहेर येण्याचे धाडसही कोणी केले नाही. उंच पुलावर गाडी उभी असल्याने सर्वत्र खोल दरी दिसत होती. यापूर्वी येथून अवघ्या १२ किलोमीटरवर घोटीजवळ चार-पाच वर्षापूर्वी मंगला एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’मध्ये आणखी १२ सुखोईंची निर्मिती

$
0
0

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कारखान्यात आणखी १२ सुखोई (३० एमकेआय) लढाऊ विमानांचे उत्पादन होणार आहे. एचएएलला तशी ऑर्डर देण्यात आली असून, याच कारखान्यात सुखोई विमानांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राचेही आरोहण होणार आहे. तसेच, आगामी काळात आणखी १८ सुखोई विमानांची ऑर्डर एचएएलला मिळण्याची शक्यता आहे.

ओझर एचएएलच्या कारखान्याला मिळालेली २७२ सुखोई (३० एमकेआय) लढाऊ विमानांची ऑर्डर लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर या कारखान्याकडे कुठलेही काम राहणार नाही. त्यामुळे या कारखान्याला काम द्यावे, अशी मागणी केली जात होती. यासंदर्भात संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले आहे की, ओझर एचएएलला १२ सुखोई विमानांच्या निर्मितीची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच, याठिकाणी सुखोई ३० एमकेआय या विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामही केले जात आहे. हे कामही अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच, सुखोई विमानावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे आरोहण करण्याचे काम केले जात आहे. एचएएलकडे कुशल मनुष्यबळ असल्यामुळेच हे काम होत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. सुखोई निर्मिती, त्याची देखभाल दुरुस्ती आणि ब्रह्मोसचे आरोहण अशा तीन स्वरुपाची कामे ओझर एचएएलकडे असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

तेजस नाहीच

सुखोईनंतर ओझर एचएएलकडे तेजस या हलक्या लढाऊ विमाानाच्या निर्मितीचे काम देण्यात येईल, अशा घोषणा वारंवार करण्यात आल्या आहेत. मात्र, ही विमाने एचएएलच्या बंगळुरू येथील कारखान्यात निर्माण होणार आहेत. २४ तेजस विमानांच्या उत्पादनाची ऑर्डर संरक्षण विभागाने बंगळुरू कारखान्याला दिली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली आहे.

आणखी १८ सुखोई

सद्यस्थितीत भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांची कमतरता आहे. रफाल विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. त्यातील पहिले विमान येत्या सप्टेंबरमध्ये हवाई दलाला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही विमाने मिळतील. मात्र, हवाई दलाला सशक्त करण्यासाठी आणखी १८ सुखोई विमानांची उपलब्धता करण्याचा संरक्षण विभागाचा विचार आहे. त्यासाठीच संरक्षण मंत्रालय लवकरच रशिया सरकारसोबत करार करण्याची शक्यता आहे. या करारानंतर ओझर एचएएलमध्ये आणखी १८ सुखोई विमानांची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सहा हजार कुपोषित बालके

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्याने केलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यात सहा हजार २५२ कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्यामध्ये एक हजार ३२४ तीव्र गंभीर कुपोषित, तत्चार हजार ९२८ मध्यम गंभीर कुपोषित बालकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील तीन लाख ४० हजार ४४७ बालकांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यात आदिवासी भागातील एक लाख ५८ हजार ६५९ बालकांचा समावेश आहे, तर बिगरआदिवासी भागातील एक लाख ८१ हजार ७८८ बालकांचा समावेश आहे. ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, बागलाण हे आदिवासीबहुल आणि मानव विकास निर्देशांक कमी असलेले तालुके आहेत. येथे तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ९३०, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या तीन हजार २५६ आढळून आली. बिगरआदिवासी भागातील तालुक्यांत तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ३९४, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या एक हजार ६७२ असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी नव्याने सर्वेक्षण केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

--

या निकषांवर पडताळणी

० ते ५ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून, त्यामार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर दिला जात आहे. या सर्वेक्षणात सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात प्रवेशित करण्यात आले आहे.

५ जुलैअखेरपर्यंतची स्थिती...

--

सर्वेक्षण केलेली बालके - ३,४०,४४७

वजन घेतलेली बालके - ३,१९,७०८

सर्वसाधारण बालके- २,७७,८७६

मध्यम वजनाची बालके- ३२,२९८

तीव्र कमी वजन- ९,५३४

मध्यम गंभीर कुपोषित- ४,९२८

तीव्र कुपोषित बालके- १,३२४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निमसे बिनविरोध

$
0
0

भाजपने स्थायी समिती राखली; शिवसेनेच्या कल्पना पांडे यांची माघार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपमधील नाराजीनाट्यामुळे चुरशीच्या ठरलेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अखेर गुरुवारी (दि. १८) भाजपचे उद्धव निमसे बिनविरोध विराजमान झाले. भाजपने सलग तिसऱ्या वर्षी स्थायी समितीच्या रुपाने आर्थिक सत्ता आपल्याकडे कायम राखली आहे. भाजपने युतीधर्माची आठवण करून दिल्यानंतर शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी माघार घेतली. यामुळे निमसे यांनी २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्थायी समितीचे सभापती होण्याचा मान मिळवला आहे.

लोकसभा निवडणूक आणि त्या पाठोपाठ झालेल्या प्रभाग क्रमांक १० 'ड'च्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थायी समितीसह विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांपासून रखडली होती. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आणि सदस्य निवडीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समितीवर सत्तारूढ भाजपचे वर्चस्व असले तरी सभापतिपदासाठी समितीतील भाजपच्या नऊपैकी सात सदस्य इच्छुक असल्यामुळे उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच होती. शेवटच्या क्षणी भाजपने उद्धव निमसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपची धाकधूक वाढली होती. त्यामुळे दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपने दक्षता घेतली होती.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर छाननीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर मांढरे यांनी उमेदवारी अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला. निमसे यांनी पांडे यांची भेट घेऊन भाजप-सेना युतीचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. निमसेंच्या विनंतीनंतर पांडेंनीही तत्काळ उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निमसे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केले.

निमसे यांची निवड घोषित होताच महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, महापौर निवासस्थान 'रामायण'समोर ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महापौर रंजना भानसी, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी आदींनी नवनिर्वाचित सभापती निमसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

...

दुसऱ्यांदा सभापतिपदी

उद्धव निमसे यांना दुसऱ्यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. निमसे हे सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात प्रथम स्थायी समितीचे सभापती झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी त्यांना दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी मिळाली. दुसऱ्यांदा स्थायी समितीचे सभापतिपद मिळवणारे ते पाचवे सभापती ठरले आहेत. यापूर्वी उत्तम कांबळे हे १९९२-९३, १९९३-९४ व २०००-२००१ हे तीन वेळा स्थायी समितीचे सभापती होते. विजय पाटील हे १९९५-९६ व १९९६-९७ असे सलग दोन वर्षे सभापती होते. त्यानंतर शाहू खैरे यांनी १९९८-९९ व २००३-०४ असे दोनवेळा सभापतिपद भूषविले.

...

मनसेचे अशोक मुर्तडक अनुपस्थित

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणूकप्रसंगी भाजप, सेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हजेरी लावली असताना, मनसेचे अशोक मुर्तडक अनुपस्थित होते. बंडखोरी होण्याच्या आशंकेने भाजपनेच मुर्तडक यांना गळाला लावत अनुपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी अफवा पसरली होती. मुर्तडक यांनी मात्र नातेवाईक आजारी असल्यामुळे आपण रुग्णालयात होते असे स्पष्टीकरण दिले. तसेही या समितीवर भाजपचे वर्चस्व असल्यामुळे सभापती त्यांचाच होणार, हे स्पष्ट होते. त्यामुळेच आपण निवडणूक सभेला उपस्थित नव्हतो, अशी प्रतिक्रिया मुर्तडक यांनी दिली.

....

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवीन. स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांना बरोबर घेऊन शहर विकासासाठी कटिबध्द राहील. शिवसेनेने युतीधर्म पाळून या निवडणुकीतून माघार घेऊन देशपातळीवर चांगला संदेश दिला आहे.

- उद्धव निमसे, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार्टर्ड विमानाचे ओझरहून उड्डाण

$
0
0

प्रवासी विमान थेट आयर्लंडला

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Tweet - @BhaveshBMT

नाशिक : ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. गुरुवारी (१८ जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हे विमान ओझरहून थेट आयर्लंडकडे झेपावले. आतापर्यंत कार्गो विमानांचे आंतरराष्ट्रीय उड्डाण या विमानतळावरून झाले आहे. आता प्रवासी विमानाचे उड्डाणही यशस्वी झाले आहे.

अमेरिका आणि आयर्लंड येथील चार फार्मा उद्योजक व्यवसायाच्या निमित्ताने लंडन येथून बंगळुरू येथे आले होते. त्यानंतर ते विशाखापट्टणम येथून ओझरला आले. याच उद्योजकांना घेऊन गल्फ स्ट्रीम कंपनीचे जी ६५० हे चार्टर्ड बिझनेस जेट विमान ओझरहून आयर्लंडला गुरुवारी रात्री रवाना झाले. विशेष म्हणजे, ओझरला आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवेची परवानगी नाही. ओझर ते डुब्लिन (आयर्लंड) या सेवेविषयी एचएएलकडे अर्ज करण्यात आला. त्यास एचएएलने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर इमिग्रेशन आणि अन्य परवानग्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, कस्टम विभागाकडे अत्यल्प कालावधीत अर्ज आल्याने मंजुरी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. सर्व विभागाचे अधिकारी कार्गो सेवेच्या निमित्ताने नाशिकला असल्याने ही मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनाही कळविण्यात आली. ते दिल्लीतच असल्याने त्यांनीही कस्टम विभागात जाऊन परवानगीची विनंती केली. अखेर विभागाने ती मान्य केली. त्यानंतर तातडीने सर्व प्रक्रिया पार पडून हे विमान आयर्लंडकडे झेपावले. इमिग्रेशन, हॅलकॉन, इंटरनॅशनल एव्हिएशन सर्व्हिसेस, एचएएल, कस्टम, पोलिस, सुरक्षा बल आदी विभागांनी सहकार्य केले. दोन पायलट, एक इंजिनिअर, एक टेक्निशिअन, दोन केबीन क्रू आणि तीन प्रवासी अशा एकूण ९ जणांना घेऊन या विमानाने उड्डाण केले. यासेवेसाठी विमानतळावरील पंकज कासलीवाल, राहूल बोराडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरीत कोसळण्यापासूनबचावली ‘अंत्योदय’

$
0
0

घोटी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी-कसारा घाटात गुरुवारी पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसच्या (डाउन मार्गावरील) डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, इंजिन ड्रायव्हरने वेळीच दक्षता घेत गाडी थांबविली आणि जमिनीपासून सुमारे २०० फूट खोल दरीत गाडी कोसळण्यापासून वाचविली. या घटनेमुळे मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आली. तसेच सकाळच्या सुमारास अप आणि डाउन मार्गावरील गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: शेतकऱ्याला कोथिंबिरीचा जॅकपॉट, तीन एकरात १७ लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रोजच्या आहाराची चव वाढविणारी कोथिंबीर गुणकारी मानली जाते. मात्र, ती इतकी ‘गुणकारी’ ठरली आहे, की तिने शेतकऱ्याच्या आयुष्याचेही सोने केले. एरवी एक रुपया ते जास्तीत जास्त ३० रुपये सरासरी भावाने विकल्या जाणाऱ्या कोथिंबिरीला यंदा सोन्याचा भाव आला असून, कोकणगावातील दोन शेतकऱ्यांना यामुळे जॅकपॉटच लागला आहे. फक्त साडेतीन एकरात लावलेल्या या कोथिंबिरीला तब्बल १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. निफाड तालुक्यातील कोकणगावचे हे भाग्यवान शेतकरी आहेत रज्जाक सरदार सय्यद आणि सुरेश शंकर जाधव. कोथिंबिरीच्या या जॅकपॉटची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून, फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

कोकणगाव येथील शेतकरी रज्जाक सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरात एकत्रित कोथिंबीर लावली होती. सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील व्यापारी सोमनाथ सांगळे यांनी या कोथिंबिरीच्या क्षेत्राची पाहणी करीत जागेवरच ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कोथिंबिरीचा पहिला प्लॉट वीस दिवसांपूर्वी दहा लाखांत, तर याच कोथिंबिरीचा राहिलेला खोडवा सात लाख रुपये अशी एकूण सतरा लाख रुपयांना कोथिंबिरींची खरेदी करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षाला सय्यद आणि जाधव यांना कोथिंबिरीने सोन्याचा भाव दिला आहे. या व्यवहाराचा चेक घेतानाचा फोटो आणि माहिती शुक्रवारी दिवसभर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.

दरम्यान, जूनच्या आरंभी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. मात्र, दीड महिना उलटला तरी तालुक्यात चांगला पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे आहे त्या पाण्याचा उपयोग करून सय्यद आणि जाधव यांनी कोथिंबिरीची काळजी घेतली आणि याच कोथिंबिरीने आता त्यांना मालामाल केले आहे. शिवाय कोथिंबीर खुडून मार्केटला घेऊन जाणे, भाव पुकारणे हा सायास व खर्चही वाचला आहे.

नेहमीच कोथिंबीर करायची आणि भाव नसल्याने नांगरून टाकायची हे गेल्या काही वर्षांत आमच्या नशिबी होते. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले आणि कोथिंबिरीला चांगला भाव मिळाला.

-फिरोज रज्जाक सय्यद, कोकणगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे पुनरागमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ‌विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी शहरात हजेरी लावली. या पावसामुळे दमट व उष्ण हवामानातून नाशिककरांची सुटका झाली. सायंकाळी सहा वाजेनंतर शहरात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, रिमझिम पावसातही शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी (दि. १९) सकाळपासून शहरातील वातावरण दमट व उष्ण होते. दुपारी वातावरणात उष्णता जाणवत होती. अचानक सायंकाळी सहा वाजेपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आणि शहरात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. काही भागात दमदार, तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. नाशिकरोडसह देवळाली भागात विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. देवळाली परिसरात पावसापूर्वी वादळी वारे वाहिल्याचे दिसून आले. तर गंगापूररोड, शरणपूररोड, जेलरोड, सातपूर, सिडको व इंदिरानगर परिसरात रिमझिम पाऊस झाला. गेल्या आठवड्यात शहरात जोरदार पाऊस बरसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तसेच रस्त्यांना खड्डे पडल्याने, नागरिकांची मोठी दैना झाली. त्यानंतर वातावरणात काही प्रमाणात दमटपणा व उष्णता वाढल्याचे जाणवू लागले. यामुळे नागरिकांना पुन्हा पावसाची ओढ लागली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने नाशिककरांनी तारांबळ उडाली. मात्र, वातावरणात पुन्हा गारठा तयार झाल्याने नाशिककरांना सुखावा मिळाला. पावसाच्या हलक्या सरी कोसळत असूनही नाशिकरोड, सिडको, सातपूर यासह बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. शहरातील पथदीपदेखील बंद झाले. रिमझिम पावसातही वीज पुरवठा खंडित झाल्याने, नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली.

निफाडलाही हजेरी

शुक्रवारी निफाड परिसर, करंजगाव, पिंपळगाव आदी भागातही पावसाने हजेरी लावली. पावसात जोर नसला तरी सुरुवात झाल्याचे समाधान होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरगड परिसरात तीन दुचाकी जाळल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरूळच्या बोरगड परिसरातील अवतार पॉईंट येथील भास्कर सोसायटीसमोर मोकळ्या पटांगणात मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या जाळण्यात आल्या. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरगड परिसरातील वाढणे कॉलनीत अवतार पॉईंट येथील भास्कर सोसायटीसमोर पटांगणात रितेश लाटे यांची अॅक्सेस (एमएच १५ जीटी ७४९१), गणेश छगन खैरनार यांची सीडी डीलक्स (एमएच १५ एफपी ८३६१), व रवी लाटे यांची (एमएच १५ सीसी ४९५२) या तीन दुचाकी नेहमीप्रमाणे पार्क केल्या होत्या. या तिन्ही दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. दुचाकी पेटल्याने सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात त्यांनी दुचाकींकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुचाकींचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, म्हसरूळ पोलिस निरीक्षक संजय सांगळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथिंबिरीचा जॅकपॉट;तीन एकरात १७ लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रोजच्या आहाराची चव वाढविणारी कोथिंबीर गुणकारी मानली जाते. मात्र, ती इतकी 'गुणकारी' ठरली आहे, की तिने शेतकऱ्याच्या आयुष्याचेही सोने केले. एरवी एक रुपया ते जास्तीत जास्त ३० रुपये सरासरी भावाने विकल्या जाणाऱ्या कोथिंबिरीने यंदा सोन्याचा भाव खाल्ला असून, कोकणगावातील दोन शेतकऱ्यांना यामुळे जॅकपॉटच लागला आहे. फक्त साडेतीन एकरात लावलेल्या या कोथिंबिरीला तब्बल १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. निफाड तालुक्यातील कोकणगावचे हे भाग्यवान शेतकरी आहेत रज्जाक सरदार सय्यद आणि सुरेश शंकर जाधव. कोथिंबिरीच्या या जॅकपॉटची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून, फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

कोकणगाव येथील शेतकरी रज्जाक सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरात एकत्रित कोथिंबीर लावली होती. सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील व्यापारी सोमनाथ सांगळे यांनी या कोथिंबिरीच्या क्षेत्राची पाहणी करीत जागेवरच ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कोथिंबिरीचा पहिला प्लॉट वीस दिवसांपूर्वी दहा लाखांत, तर याच कोथिंबिरीचा राहिलेला खोडवा सात लाख रुपये अशी एकूण सतरा लाख रुपयांना कोथिंबिरींची खरेदी करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षाला सय्यद आणि जाधव यांना कोथिंबिरीने सोन्याचा भाव दिला आहे. या व्यवहाराचा चेक घेतानाचा फोटो आणि माहिती शुक्रवारी दिवसभर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.

दरम्यान, जूनच्या आरंभी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. मात्र, दीड महिना उलटला तरी तालुक्यात चांगला पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे आहे त्या पाण्याचा उपयोग करून सय्यद आणि जाधव यांनी कोथिंबिरीची काळजी घेतली आणि याच कोथिंबिरीने आता त्यांना मालामाल केले आहे. शिवाय कोथिंबीर खुडून मार्केटला घेऊन जाणे, भाव पुकारणे हा सायास व खर्चही वाचला आहे.

नेहमीच कोथिंबीर करायची आणि भाव नसल्याने नांगरून टाकायची हे गेल्या काही वर्षांत आमच्या नशिबी होते. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले आणि कोथिंबिरीला चांगला भाव मिळाला.

- फिरोज रज्जाक सय्यद, कोकणगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० कोटींच्या अखर्चित निधीवरून खडाजंगी

$
0
0

सभा तहकूब, अधिकाऱ्यांना खडसावले, कारवाईचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

योग्य नियोजन न केल्यामुळे ५० कोटी निधी अखर्चित राहणार असून तो शासनजमा होण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आल्याने स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी या मुद्याची दखल घेत निधीचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईचे आदेश दिले.

जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेला मिळतो. पण, या निधीचा वापर करतांना ५० कोटी निधी अखर्चित राहिल्याने स्थायी समितीत याचे पडसाद उमटले. त्यानंतर ही सभाही तहकूब करण्यात आली. याअगोदर या सभेत मुख्यमंत्री सडक योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग व महावितरण कंपनीशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे, यतीन कदम व बाळासाहे क्षीरसागर यांनी हायमास्ट व एलईडीचा प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा केली. कोणतीही गुणवत्ता नसतांना लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व मटेरियलची टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यावर अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना रडावर घेत त्यांची कानउघडणी केली. यावेळी डॉ. कुंभार्डे यांनी एक महिन्यानंतर पत्र मिळाल्याची माहिती दिली त्यावरही अध्यक्षांना अधिकाऱ्यांना खडसावले.

पवारांनी दिली माहिती

सभेत समाज कल्याण समितीच्या सभापती यांनी विधानसभेची आचरसंहिता लागू होण्यापूर्वी ग्रामसभा घेण्याची शिफारस केली. तर ५० कोटी रुपयांचा निधी परत जाणार असल्याची माहिती बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. त्यानंतर या सभेत नियोजनावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सभा ही तहकूब करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडाच्या विकासासाठी २० कोटींचा आराखडा

$
0
0

सीसीटीव्हींसह घनकचरा व्यवस्थापन; सॅनिटरी कॉम्प्लेक्सचा अंतर्भाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वणी येथील सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी २० कोटींच्या आराखड्याला मुख्य सचिवांच्या उच्च स्तरीय समितीने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह गडाच्या पर्यटन विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकणार आहे.

आदि शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. अलिकडच्या काळात सुरू करण्यात आलेल्या फर्निक्युलर ट्रॉलीमुळे भाविकांची गैरसोय टाळणे शक्य होऊ लागले आहे. गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊ शकली नाही. पूर्वी दिलेला आराखडा नामंजूर करण्यात आल्याने नवीन कामांचा समावेश असलेला नवीन आराखडा मंत्रालयात पाठविण्यात आला. गतवर्षी २ जुलैला फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. भाविकांसाठी आवश्यक सुविधांसाठी इको फ्रेंडली पद्धतीने कामे व्हावीत, अशी अपेक्षा नवीन आराखडा निर्मितीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार पुन्हा नवीन आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी मुख्य सचिवांकडे शुक्रवारी ठेवण्यात आला.

मुंबईमध्ये झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्यासह सप्तश्रृंग गड येथील स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत २० कोटींच्या कामांना उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही बसविणे, स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आणि वस्तू ठेवण्यासाठीच्या रूम यांचा अंतर्भाव असलेले तीन सॅनिटरी कॉम्प्लेक्स उभारण्याच्या कामास मंजुरी दिली आहे. याखेरीज गड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. हा आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीकडे पाठविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आदित्य संवादा'तून शक्तिप्रदर्शनाची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासह विधानसभेची मतपेरणी करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली जनआशीर्वाद यात्रा नाशिकमध्ये शनिवारी (दि. २०) येणार आहेत. या दरम्यान 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे हे सकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये येणार असून त्र्यंबक राजाच्या दर्शनानंतर ते नाशिककडे प्रयाण करणार आहेत. यावेळी नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सिडकोत खुटवडनगर येथे त्यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिकरोड येथील गिताई लॉन्स येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर सिन्नर येथेही आदित्य हे शिवसैनिकांशी संवाद साधतील. जिथे-जिथे पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी होतील. जन आशीर्वाद यात्रा सोमवारी (दि. २२) नगर जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे तयारी करत आहेत. यात्रा यशस्वी करण्यासाठी शक्तिप्रदर्शनाची तयारी शिवसेनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांतवादाची अस्मिता निर्णायक ठरणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तब्बल वीस वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा ताब्यात घेतलेला चांदवड- देवळा मतदारसंघ राखण्यासाठी यंदा भाजपला जीवाचे रान करावे लागणार आहे. डॉ. दौलतराव आहेर यांचा समृद्ध वारसा चालविणारे आमदार डॉ. राहुल आहेर यांना विरोधकांपेक्षा स्वकियांशीच लढा द्यावा लागणार असताना प्रांतवादाच्या अस्मितेलाही तोंड द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस आघाडी मिळाल्याने भाजपचे हौसले बुलंद झाले आहेत. भाजपप्रमाणेच अंतर्गत संघर्षाने जर्जर झालेले राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष आघाडी करून भाजपला कसा लढा देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चांदवडमधून चार, तर देवळ्यातून एक उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रांतवादातून भाजपचे विजयाचे गणित जुळले होते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेनेची युती अशी लढत जवळपास निश्चित असल्याने चांदवडमधून निवडणुकीच्या रिंगणात कमी उमेदवार राहणार, हे उघड झाले आहे. देवळ्यातून स्वकियांनीच बंडाचा झेंडा उभारल्याने आमदारांच्या गोटात अस्वस्थता आहे. सुरुवातीस चांदवड-दिंडोरी त्यानंतर चांदवड-मालेगाव व सद्य:स्थितीत चांदवड-देवळा अशी वाटचाल करणाऱ्या या विधानसभा मतदारसंघाने मागील ४० वर्षांत भाजपलाच सर्वाधिक चार वेळा विजयी केले होते हे विसरता येत नाही. दिवंगत माजी आमदार ना. का. गायकवाड यांनी १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यानंतर जयचंद कासलीवाल यांच्या रुपाने भाजपने १९८५, १९९० व १९९५ असे सलग तीन वेळा काँग्रेस उमेदवारांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली होती. सन १९९९ व २००४ मध्ये अनुक्रमे काँग्रेसचे शिरीष कोतवाल व राष्ट्रवादीचे उत्तमबाबा भालेराव हे विजयी झाले. २००९ मध्ये ऐनवेळी तिकीट कापल्याने अपक्ष उमेदवारी करीत कोतवाल यांनी राष्ट्रवादीच्या भालेरावांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार कोतवाल यांचे राजकारणातील दोन बाहुबली असलेले डॉ. आत्माराम कुंभार्डे व केदा आहेर हे बाजूला गेले. भाजपने उमेदवारी देवळा तालुक्यात डॉ. राहुल आहेर यांना दिली. चांदवड तालुक्यातून काँग्रेसकडून कोतवाल, राष्ट्रवादीचे भालेराव, शिवसेनेचे नितीन आहेर यांनी उमेदवारी केली. त्यात मैलाचा दगड ठरली ती डॉ. कुंभार्डे यांची उमेदवारी. रिंगणात चार उमेदवार एकाच तालुक्यातून आल्याने मतविभाजनाने कोतवालांचे विजयाचे गणित फिसकटले आणि विजयाची माळ डॉ. आहेर यांच्या गळ्यात पडली. यंदा भाजपमध्ये जशी इच्छुकांची भाऊगर्दी आहे, तद्वतच कोतवाल व सयाजी गायकवाड यांच्यातील संघर्षाची बीजेही कळीची आहेत. राहुल आहेर यांची समंजस प्रतिमा प्रांतवादाला मागे टाकेल, असा एक विचार आहे. त्याचवेळी राहुल आहेर यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर यांच्या महत्त्वाकांक्षेला ते कसे मुरड घालू शकतात आणि डॉ. कुंभार्डे यांचा विरोध कसा मोडून काढतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.

पक्षनिहाय इच्छुक

- भाजप : डॉ. राहुल आहेर , डॉ. आत्माराम कुंभार्डे, केदा आहेर

- काँग्रेस : शिरीष कोतवाल

- राष्ट्रवादी काँग्रेस : उत्तमबाबा भालेराव, सुनील आहेर, सयाजीराव गायकवाड

- शिवसेना : नितीन आहेर, शांताराम ठाकरे

२०१४ विधानसभेत उमेदवार निहाय मते

डॉ. राहुल आहेर (भाजप) : ५४ हजार ९४६

शिरीष कोतवाल (काँग्रेस) ४३ हजार ७८५

डॉ. आत्माराम कुंभार्डे (अपक्ष) २९ हजार ४०९

उत्तम भालेराव (राष्ट्रवादी) २७ हजार २९५

२०१९ लोकसभेतील मतांचा वाटा

भाजप : १ लाख २०,७०६

राष्ट्रवादी : ४० हजार ०८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष महासभेत 'स्मार्ट'ची चिरफाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानानंतर शहरात सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांच्या कामांचा चिठ्ठी उघड करण्यासाठी विशेष महासभा घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमधील अनेक कामांना भ्रष्टाचाराची ग्रहण लागल्याचा संशय व्यक्त करत यामागे कंपनीच्या आडून कारभार हाकणाऱ्या चार डोक्यांना जाब विचारण्याची भूमिका शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली. 'स्मार्ट सिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील हे स्वतःला शहराचे मालक समजत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. महासभेतील सर्वच नगसवेकांनी एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांसदर्भात आरोप केला आहे. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना महासभेत बोलवावे. हे अधिकारी मुजोर झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images