Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पीककर्ज वाटपात प्रशासन अद्याप काठावरच

$
0
0

बँकांकडून ५८२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हाती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप पिकांसाठी जिल्ह्यात ५८२ कोटीचे कर्ज विविध बँकानी आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटप केले. या वाटपाची टक्केवारी ३१.१८ असून त्यात येत्या काही दिवसात वाढ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.

पीक कर्ज वाटपासंबधी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. कर्ज देण्यासाठी बँकेने टार्गेट दिले असले तरी मुख्य बँकेकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पावसाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र पीक पेरण्या सुरू झाल्या असून त्यासाठी कर्ज मिळावे यासाठी सुरुवातीला अडचण येत होती. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर आता कर्जपुरवठा सुरळीत झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेने कर्ज देणे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या पीक कर्जाचे ३१४७ कोटी असले तरी प्रमुख पाच बँकावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांना १ हजार ८६८ कोटी कर्जाचे टार्गेट असून यात बँक ऑफ महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे.

सुमारे ४१४ कोटींचे टार्गेट असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने आतापर्यंत २२८ कोटी रुपये कर्ज दिले असून त्याची टक्केवारी ५५ टक्के आहे. युनियन बँकेने १८२ कोटीपैकी ५७ कोटींचे कर्जवाटप केले असून ही टक्केवारी ३१ टक्के आहे. जिल्हा बँकेने ४८० कोटींपैकी १३४ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी २८.७ इतकी आहे. भारतीय स्टेट बँकेने ३९३ कोटींपैकी ९६.२५ कोटी रुपये वाटप केले. कर्जवाटपात हे प्रमाण २४ टक्क आहे. बँक ऑफ बडोदाने ३९६ कोटीपैकी ६५ कोटींचे वाटप केले. त्यांचा कर्जवाटपात १६.४७ टक्के वाटा आहे. कर्जवाटपात काही दिवसात वाढ होणार आहे.

दर बुधवारी बैठक

कर्ज वाटपासाठी आता दर बुधवारी जबबादारी देण्यात आलेल्या बँकांच्या झोनल मॅनेजर बरोबर बैठक घेतली जाणार आहे. त्यात या कर्जवाटपाचा आढावा घेतला जाईल. बँकेने डेटा कलेक्शन पूर्ण ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

कर्जवाटपाचा लेखाजोखा (कोटी रुपयांमध्ये)

बँक..................टार्गेट.........प्रत्यक्ष वाटप

बँक ऑफ महाराष्ट्रा.........४१४.........२२८

युनियन बँक.........१८२.........५७

जिल्हा बँक.........४८०.........१३४

भारतीय स्टेट बँक.........३९३.........९६.२५

बँक ऑफ बडोदा.........३९६.........६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वासातशे वाडे, इमारती धोकादायक

$
0
0

- महापालिकेने बजावल्या नोटिसा

- तीन दिवसांत घरे खाली करण्याचा अल्टिमेटम

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने धोकादायक घरे खाली करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेनेही आतापर्यंत कोसळलेल्या आठ वाड्यांच्या घटनांनंतर नव्याने धोकादायक घरे, वाडे, इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार नव्याने ७२३ धोकादायक वाडे, घरे व इमारतींना नोटिसा बजावल्या असून, तीन दिवसांत घरे खाली करण्याचे फर्मान काढले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे या तीन शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळल्याने बळींची संख्या ५० च्या वर गेली आहे. नाशिकमध्येही आतापर्यंत जवळपास आठ वाडे कोसळले आहेत. त्यात जीवितहानी झाली नसली, तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. धोकादायक वाडे आणि इमारती कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले असून, अशा इमारती खाली करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने या घटना गंभीरतेने घेत नगररचना विभागाने तातडीने शहरात नव्याने सर्वेक्षण केले आहे.

शहरात धोकादायक वाडे आणि घरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने या घरे, इमारती व वाड्यांचे सर्वेक्षण केले असून, त्यात ७२३ घरे, वाडे, इमारती या धोकादायक आढळून आले आहेत. यात ३० वर्षांपूर्वीच्या इमारती तसेच काझीगढी येथील ११४ घरांचाही समावेश आहे. महापालिकेने या सर्व ७२३ घरे, इमारती, वाड्यांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

...

तिसऱ्यांदा बजावल्या नोटिसा

महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागांत असलेल्या जवळपास ३९७ धोकादायक वाडे, इमारतींना नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतरही संबंधितांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केले. महापालिकेने दुसऱ्यांदा जाहीर नोटीस काढत पोलिस बंदोबस्तात घरे खाली करण्याचा इशारा दिला होता. अनेक वाडे व घरांबाबतचा न्यायालयीन वाद सुरू असल्याने घरे खाली करण्याबाबत कायदेशीर अडचण आहे. तरीही मुंबईतल्या डोंगरीतल्या दुर्घटनेनंतर पुन्हा सतर्क होत तिसऱ्यांदा एकूण ७२३ घरे, इमारती व वाड्यांना नोटिसा काढून तातडीने घरे खाली करून देण्याचे आदेश दिले आहेत.

...

विभाग धोकादायक घरे, वाडे

पंचवटी १७५

पूर्व २६०

पश्‍चिम १९२

सिडको १९

नाशिकरोड ६०

सातपूर १७

एकूण ७२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजा ढाले यांना आदरांजली

$
0
0

नाशिकरोड : दलित पॅन्थरचे संस्थापक आणि फुले, आंबेडकर चळवळीतील महानायक तसेच जेष्ठ साहित्यिक राजा ढाले यांचे नुकतेच निधन झाले. नाशिकरोड येथील भीमनगर चौफुलीवर पिपिल्स रिपब्लिकन पक्षातर्फे ढाले यांना आदरांजली वाहण्यात आली. पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. साराबाई वेळूंजकर, नवनाथ कातकाडे, युवराज साठे, सचिन हिरे, सुनिता कर्डेक, विजया भोळे, जावेद शेख, बिलाल शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ आईला अटक

$
0
0

पंचवटीतील बालिका हत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडवरील साई पॅरेडाइज इमारतीमध्ये १४ महिन्यांच्या बालिकेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आडगाव पोलिसांनी तिच्या आईला बुधवारी अटक केली. योगिता मुकेश पवार असे तिचे नाव आहे.

योगिताची मुलगी स्वरा हिची गळा आणि हातावर ब्लेड मारून हत्या झाल्याची घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली होती. यानंतर रक्ताने माखलेल्या स्वराला योगिता हिने खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अज्ञात चोरट्याने घरात चोरी करण्यासाठी घरात प्रवेश केला. या झटापटीत त्याने मुलीवर वार केले व आपल्या हातावर देखील जखमा केल्याचे पोलिस तपासात योगिताने सांगितले होते. मात्र, योगिताने स्वतःच्या हातावर जखमा करून घेत चोरीचा बनाव केला आणि ही हत्या अज्ञात चोरट्याने केला असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळी तपास केला असता पोलिसांना चोरीचा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा आढळून आला नाही. तसेच योगिताच्या बोलण्यात सुसूत्रता नसल्याने सुरुवातीपासून तिच्यावर संशयाची सुई होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आडगाव पोलिसांनी तिला अटक केली.

बनाव असल्याचा संशय

योगिताने सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांना हा सर्व बनाव असल्याचा संशय आला. घरात चोरीचा कोणताही प्रयत्न झालेला नसल्याचे दिसले. घरातील सर्व साहित्य जागच्या जागी असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच अपार्टमेंटला अजून लिफ्ट बसविण्यात नाही. लिफ्टसाठी असलेल्या जागेत रक्ताने माखलेले ब्लेड सापडले. ते ब्लेड काढण्यासाठी तेथील लोखंडी जाळी कापून दोराच्या साह्याने एका व्यक्तीला खाली उतरविले.

योगिता मानसिक तणावाखाली

रक्तदाब कमी झाल्याने संशयित योगिता पवार हिला मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. योगिता ही बीफार्म झालेली आहे. तिला पाच वर्षाचा मुलगा व १४ महिन्यांची स्वरा अशी अपत्य होती. कायम आजारी असल्याने मुलगी स्वरा ही योगिताला कायम बिलगून असायची. तिचे रडणे, किरकीर करणे यामुळे योगिता कायम मानसिक तणावाखाली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. योगिता यांनी स्वतःच्या हातावर देखील ब्लेडने वार केले. ते ब्लेड इमारतीच्या लिफ्ट नसलेल्या भागात टाकले. ब्लेडच्या रक्ताचे नमुने पाहता स्वरा व योगिता यांच्या जखमा याच ब्लेडने झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरांचा देवळ्यात सुळसुळाट

$
0
0

एका डॉक्टरवर गुन्हा; इतरांचा पळ

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

देवळा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीद्वारे एका डॉक्टरवर गुन्हा दाखल होणार असून परिसरातील अनेक डॉक्टर फरार झाल्याचे 'एफडीए'ने सांगितले.

देवळा तालुक्यातील देवपूर पाडे येथे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची गोपनीय माहिती 'एफडीए'ला मिळाली. त्यानुसार, 'एफडीए'चे औषध निरीक्षक सी. ए. मोरे आणि एस. एन. काले यांनी प्ररंब क्लिनिकची पाहणी केली. तेथे बॅचलर ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी असलेल्या रवींद्र हरी पाटील यांच्याकडे अॅलोपॅथी औषधांचा मोठा साठा सापडला. याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच, ही औषधे कोठून आणली, त्याची बिले सादर करावीत, असे 'एफडीए'ने सांगतिले. मात्र, त्यांनी ती सादर केली नाहीत. साडेपाच हजार रुपये किंमतीच्या या विविध औषधांची दखल घेत 'एफडीए'ने रवींद्र पाटील यांच्यावरोधात बोगस डॉक्टर धोरणानुसार गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. पाटील यांनी देवळा आणि मालेगाव येथील मेडिकल दुकानांमधून औषधे आणल्याची माहिती 'एफडीए'ला मिळाली आहे. त्यानुसार तेथेही चौकशी केली जात आहे.

पाटील याच्याकडील ताब्यात घेण्यात आलेल्या औषधे साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवित त्यात काही भेसळ तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंपाउंडरच वैद्यकीय उपचार करीत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. तसेच, ते अॅलोपॅथी औषधे देत असल्याचीही माहिती आहे. या सर्व प्रकारांची शहानिशा करू. याबाबत कुणाकडे माहिती असल्यास ती 'एफडीए'ला द्यावी, असे आवाहन भामरे यांनी केले आहे.

देवळा तालुक्यातील २५ ते ३० बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचा संशय आहे. आम्ही यापुढे बोगस डॉक्टरांवरील कारवाई सुरू ठेवणार आहे.

- डी. एम. भामरे, सह आयुक्त, एफडीए

अचानक केलेल्या तपासणीत बोगस डॉक्टर आढळला. बाकीच्या बोगस डॉक्टरांनी त्यांचे दुकान बंद करून पळ काढला आहे. मात्र, ते आम्हाला सापडतील.

- प्रवीण मुंदडा, सहआयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पीक विम्याची रक्कम त्वरित द्या'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक रब्बी हंगामातील पिके आणि फळपिके यांच्या नुकसानीविषयीचे अर्ज भरुन अनेक दिवस झाले तरी विमा कंपन्यांनी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे. . गेल्या वर्षी नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिके आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील सुमारे ६ हजार रब्बी पीकधारक तसेच ८ हजार ५०० फळ पीकधारक शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता बजाज अलायन्स, जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे. गोडसे यांनी तिन्ही इन्शुरन्स कंपन्यांना इशारापत्र पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना उप अभियंत्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील लघु पाटबंधारे विभागातील उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर, पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताना बुधवारी पकडले.

यातील तक्रारदारांची वडाळी भोई येथे शेतजमीन असून त्यापैकी ६४ गुंठे जमीन पुणेगाव कालवा प्रकल्पात गेली आहे. या जमिनीची भरपाई म्हणून तक्रारदारास सरकारकडून ५१ लाख रुपये मंजूर झाले. या रक्कमेचा चेक देण्यासाठी उप अभियंता शिरवाडकर यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी ६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाला याबाबत माहिती दिली. या तक्रारीवरुन ९ जुलै रोजी पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. लाचलुचपत पथकाने बुधवारी सापळा रचला. सिंचन भवन नाशिक कार्यालयात तक्रारदाराकडून शिरवाडकर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेला बुधवारी सुरुवात झाली. दहावीसाठी विभागात ३८ तर नाशिक जिल्ह्यात १६ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. बारावीसाठी विभागात २९ तर जिल्ह्यात १३ केंद्रांवर परीक्षा होत आहे.

दहावी, बारावीच्या नियमित परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. दहावीसाठी विभागातून ११ हजार ४०७ तर बारावीसाठी ८ हजार ९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत दोन्ही वर्गांचा पहिला पेपर झाला. यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून एकूण १ लाख ९८ हजार ७५० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण तर ४४ हजार ५५७ विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. अनुत्तीर्णांपैकी ११ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी फेरपरीसाठी अर्ज केला आहे.

मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेला विभागातून १ लाख ६० हजार ११६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८४.७७ टक्के इतके होते. बारावीच्या परीक्षेत विभागातून २४ हजार ५६६ विद्यार्थी अनुतीर्ण झाले. यातील ८ हजार ९२ विद्यार्थ्यांनी फेरीपरीक्षेसाठी अर्ज केला आहे.

ऐनवेळी धावपळ

शहरात काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटवर कॅनडा कॉर्नर येथील हिरे विद्यालय केंद्राचे नाव असताना प्रत्यक्षात आसन व्यवस्था मात्र रचना विद्यालय केंद्रात असल्याने ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ झाली. हा अपवाद वगळता इतर केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच वर्षांत चार सीईओ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीर्घकाळ ताब्यात असलेली सत्ता शिवसेनेकडे आल्यानंतर अडीच वर्षात जिल्हा परिषदेत एकही मुख्य कार्यकारी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. या काळात तीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाली. चौथ्यांदा भुवनेश्वरी यांनी पदभार स्वीकारला आहे. कोणत्याच अधिकाऱ्यास पूर्ण कालावधी न मिळाल्यामुळे त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या कामाकाजावर झाला आहे.

शिवसेनेने काँग्रेसबरोबर घरोबा करून जिल्हा परिषदेतील सत्तेची सूत्रे २१ मार्च २०१७ ला हाती घेतली. शीतल सांगळे अध्यक्ष झाल्या. या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर होते. पण, अवघ्या दोन ते तीन महिन्यांत त्यांची बदली झाली व दीपककुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सुरुवातीला चांगले काम केले पण, नंतर त्यांची कारकीर्द वादग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. अवघ्या नऊ महिन्यांत त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर डॉ. नरेश गिते हे आले. त्यांनी सुरुवातीपासून कामाचा झपाटा ठेवला. अवघ्या काही दिवसांत त्यांनी आपल्या कामाची चुणूकही दाखवली. त्यामुळे कामाला वेगही आला. पण, त्यांची नुकतीच भंडारा येथे बढतीवर जिल्हाधिकारीपदी बदली झाली. त्यांची कारकीर्दही अवघ्या दीड वर्षाचीच ठरली.

आता चौथ्या सीईओ

आता नव्याने पुन्हा डॉ. गिते यांच्या जागी यवतमाळ येथील सहायक जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी या सीईओपदाची सूत्रे हाती घेणार आहे. शीतल सांगळे यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असून तो सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यांच्या या काळात चार सीईओंबरोबर त्यांना काम करता आले. कोणताही नवीन अधिकारी आला की त्याला पहिल्यांदा कामकाज समजून घ्यावे लागते. त्यानंतर कामकाजाची पद्धत व जिल्ह्याची माहिती त्यामुळे त्यात बराच वेळ जातो. दोन-तीन महिन्याच्या या कालावधीत कामेही ठप्प होतात. त्यामुळे ही बदली कामावरही परिणाम करते.

कामांवर परिणाम

लोकसभा निवडणुकीमुळे अनेक कामे ठप्प झाली. त्यानंतर कामे सुरळीत झाली असतांना अचानक ही बदली झाली. त्यामुळे कामाच्या घाईत ही बदली कामावर परिणाम करणारी ठरणार आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्याअगोदर कामे मंजूर करण्याचा हा काळ होता. त्यामुळे त्याचे परिणाम निश्चित होणार आहे. वारंवार अधिकाऱ्यांची बदली होत असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये संताप आहे. डॉ. नरेश गिते यांनी कामाची पद्धतीत बराच बदल केला होता. त्यामुळे सदस्यांची कामे काही अंशी रुळावर आली होती. पण, आता पुन्हा बदलामुळे त्यांच्यात संताप आहे.

११ वर्षांनंतर महिला सीईओ

जिल्हा परिषदमध्ये विनिता सिंगल या महिला सीईओ होत्या. त्यानंतर ११ वर्षांनंतर पुन्हा एस. भुवनेश्वरी या महिला सीईओ म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. झेपपीत अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी महिला सदस्य आहेत. त्यामुळे आता त्यात भर पडणार असून कामकाजात महिलाराज दिसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात वीजपुरवठ्यासाठी फिरते केंद्र

$
0
0

महावितरणकडून 'पॉवर ऑन व्हील्स' प्रकल्प राबविण्यास सुरुवात

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असेल, तर अवघ्या तासाभरात तात्पुरता वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने 'पॉवर ऑन व्हील्स' नावाचा मोबाइल इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम या नवीन उपक्रमाचा नाशिक शहर मंडळात नुकताच शुभारंभ केला. या अनोख्या उपक्रमामुळे खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका होण्यास मदत मिळणार आहे.

नैसर्गिक अथवा तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर अशा सोसायटी, कॉलनी, रहिवासी परिसर, शॉपिंग कॉप्लेक्समध्ये अवघ्या तासाभरात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने 'पॉवर ऑन व्हील्स' हा अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे नाशिक शहरात आता इथून पुढे चाकावरील शाळेप्रमाणे वीजपुरवठा करणारे फिरते केंद्र नागरिकांना बघायला मिळणार आहे.

...

...असा होणार वापर

'पॉवर ऑन व्हील्स' सिस्टीममध्ये महावितरणने मोबाइल डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर सेंटर तयार केले आहे. ज्या भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशा ठिकाणी ११ केव्ही मुख्य वीजवाहिनीतून वीज घेऊन ५० किलोवॅट क्षमतेचा वीजपुरवठा केला जाणार आहे. खासकरून ट्रान्सफॉर्मर बदली करण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. अशा ठिकाणचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करून वीजग्राहकांची गैरसोयीतून सुटका करण्यासाठी हा प्रकल्प रामबाण उपाय ठरणार आहे. याशिवाय व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावेळीही या प्रकल्पाचा वापर करता येणार आहे. खासगी ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावरही या प्रकल्पाचा वापर केला जाणार असून, महावितरणला महसूलही प्राप्त होणार आहे.

...

कोणत्याही कारणाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास जास्त वेळ लागणार असल्यास वीज ग्राहकांची गैरसोय होते. या समस्येवर मात करण्यासाठी 'पॉवर ऑन व्हील्स' हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना अवघ्या तासाभरात वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात देता येणे शक्य होणार आहे.

- अनिल थोरात, कार्यकारी अभियंता, महावितरण, नाशिक शहर मंडळ २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनआशीर्वाद यात्रेचा तिन दिवस मुक्काम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासह विधानसभेची मतपेरणी करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १८ जुलैपासून उत्तर महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंची ही जनआशीर्वाद यात्रा नाशिक जिल्ह्यात तीन दिवस असणार असून, त्याची तयारी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी या तयारीसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून असून, यात्रा यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मालेगाव, नाशिक आणि नाशिक ग्रामीण असे तीन टप्पे करण्यात आले आहेत.

लोसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी तर मते न देणाऱ्यांची मने जिंकण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेला १८ जुलै रोजी जळगावमधून सुरुवात होणार आहे. राज्यात ही जनआशीर्वाद यात्रा काढली जाणार असून, पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा मानस या निमित्ताने केला जाणार आहे. यात्रा जिथे-जिथे पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी होतील.

यादरम्यान 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये १९ जुलै ते २१ जुलै असा तीन दिवसांची यात्रा असणार आहे. मालेगावमधून या यात्रेला जिल्ह्यात प्रारंभ होणार असून, २२ तारखेला सदरची यात्रा नगरकडे प्रयाण करणार आहे. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे तयारी करत आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शक्दीप्रदर्शनाची तयारी शिवसेनेकडून केली जात आहे.

असा आहे दौरा...

१८ जुलैला जळगाव येथून ही यात्रा सुरू होईल. त्यानंतर १९ जुलै रोजी धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात यात्रा पोहचेल. २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल. यात्रेच्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, युवासेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नुकसान भरपाई तातडीने द्यावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रब्बी हंगामातील पिके आणि फळपिके यांच्या नुकसानीविषयीचे अर्ज भरुन अनेक दिवस झाले तरी विमा कंपन्यांनी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई वेळेत मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी तातडीने नुकसान भरपाई अदा करावी, अन्यथा कंपनीविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा खासदार गोडसे यांनी दिला आहे.

गेल्या वर्षी नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिके आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील सुमारे ६ हजार रब्बी पीकधारक तसेच ८ हजार ५०० फळ पीकधारक शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता बजाज अलायन्स, जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे. त्या विषयीचे पंचनामे तसेच सर्व कागदपत्रे पीडित शेतकऱ्यांनी बॅँका आणि इन्शुरन्स कंपनीकडे सादर केलेले आहेत. परंतु अनेक दिवस उलटूनही वरील दोन्ही विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेच्या खाईत लोटले गेले असून त्यांच्यापुढे नव्याने पीक लागवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत खासदार गोडसे यांनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीला इशारापत्र पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची खबरदारी सदस्यांना ‘व्हीप’ जारी

$
0
0

- स्थायी सभापती निवडणुकीसाठी दक्षता

- काँग्रेस, राष्ट्रवादी तटस्थ राहणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक होत असून, बहुमत असले तरी निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये याची खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे नाराजांची संख्या लक्षात घेत भाजपने आपल्या सर्व नऊ सदस्यांना 'व्हीप' जारी केला आहे. भाजपच्या गटनेत्यांनी सर्व सदस्यांना व्हॉट्सअॅप तसेच थेट घरी 'व्हीप' पाठवून सभापतिपदासाठी उद्धव निमसेंना मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने उमेदवार दिला असला तरी काँग्रेससह अन्य पक्षांनी मात्र तटस्थतेचा पर्याय निवडला आहे. सत्तेसाठी भांडत असल्याने शिवसेनेवर विश्वास नसल्याचे सांगत काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून निमसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे स्थायीत ९, शिवसेनेचे ४, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमत असले तरी सभापतिपदासाठी सात जण इच्छुक होते. एकालाच उमेदवारी मिळाल्याने नाराजींचा संख्या लक्षात घेता दगा फटका होण्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व नऊ सदस्यांना 'व्हीप' जारी केला आहे. स्थायीचा एक सदस्य बाहेरगावी आहे. त्यांनाही तातडीने नाशिकमध्ये परतण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवसेनेने उमेदवार दिल्याने भाजपकडून दक्षता पाळली जात आहे. शिवसेनेने उमेदवार दिला असला तरी उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने मात्र तटस्थता पाळली आहे. शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत वाटा हवा आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवारी आडून सत्तेची पदे पदरात पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत काँग्रेससह विरोधकांनी तटस्थतेची भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने दोघांपासून अंतर राखले आहे.

...

भाजप व शिवसेनेची मिलीजुली असल्याने आम्ही तटस्थ राहणार आहोत. शिवसेनेने सत्तेत वाटा मिळावा म्हणून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप आमचा शत्रू असला तरी शिवसेनेवरही विश्वास नाही. त्यामुळे आम्ही दोघांपासून अंतर राखले आहे.

- शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकेथॉन स्पर्धेत चांदवड कॉलेजचे यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन इंजिनीअरिंग कॉलेजच्या अॅग्रो यांत्रिकीज या संघाने बनविलेल्या स्मार्ट ओनियन प्लांटरने 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९' या स्पर्धेत हार्डवेअर अॅडिशनमध्ये पहिला क्रमांक पटकावत रोख एक लाख रुपये बक्षीस मिळविले आहे. एचआरडी मंत्रालय, भारतसरकार एआयसीटीई, पर्सिस्टंट सिस्टिम्स यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू येथे ही स्पर्धा घेण्यात आली. याविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे म्हणाले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा, आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल. या स्मार्ट ओनियन प्लांटरद्वारे आपण वाफे तयार करणे, खत पसरविणे, ट्रिप पसरविणे, कांदे लागवड करणे अशी खूप सारे काम करू शकतो. यात विद्यार्थ्यांना सुहास लभडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेमध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून अश्विनी खैरे हिने काम बघितले तसेच देवीदास नवले, वृषभ पोफळी, निखिल सहाणे, बापू जाधव, प्राची खिवंसरा या विद्यार्थ्यांचाही यात महत्त्वाचा वाटा होता. विद्यार्थ्यांना प्रा. व्ही. सी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती व प्रकल्प समन्वयक प्रा. आर. एस. चौधरी यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा खर्चासाठी लगीनघाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीने ७९१ कोटी २४ वार्षिक विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता यातील बहुतांश निधी हा ऑगस्टमध्येच खर्च होणार असल्याची चिन्हे आहेत.

विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर त्यासाठी लगीनघाई सुरू झाली असून, जिल्ह्यातून त्यासाठी प्रस्ताव सादर होत आहे. त्यासाठी प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे.

दरवर्षी जिल्हा वार्षिक विकास आराखडा सादर केला जातो. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या कामांना डिसेंबरअखेर मंजुरी दिली जाते. यातील स्थानिक स्वराज्य संस्था सोडल्यास सर्व खर्च हा मार्चअखेर करायचा असतो. पण, आता या कामांना ऑगस्टमध्ये मंजुरी घेतली जाणार आहे. त्यामुळे मतदारसंघात कामे सुरू करून ती मतदारांना दाखवता येणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर काम आचारसंहिता लागू झाल्यानंतरही करता येत असल्यामुळे ते कारकिर्द पूर्ण होण्याअगोदरच व्हावे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.

असा आहे निधी

वार्षिक आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेअंतर्गत ३४६ कोटी, आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३४७ कोटी ६९ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९७ कोटी ५५ लाख रुपयांच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही सर्व कामे करण्याचा धडाका काही दिवसांतच दिसणार आहे. अनेकांनी त्यासाठी अगोदर आपला प्लान तयार केला आहे, तर काहींची लगीनघाई आता सुरू झाली आहे.

ही कामे होणार

वार्षिक आराखड्यात कृषी व संलग्न सेवा, जनसुविधा, लघुपाटबंधारे, रस्ते विकास, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पर्यटन आणि यात्रा स्थळांचा विकास, सार्वजनिक आरोग्य, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत नगरपालिका, महानगरपालिकांना कामे करता येणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शाळा विशेष दुरुस्ती, नाविन्यपूर्ण योजना व दलितोत्तर वस्ती सुधार योजनेतून कामे करता येणार आहेत. आदिवासी भागातही वेगवेगळी विकास कामे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुबार पेरणीचे संकट

$
0
0

मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड, येवला तालुक्यात अल्प पाऊस

टीम मटा

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही कसमादेसह निफाड, येवला तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

निफाड : तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. ज्या भागात पाऊस झाला त्या भागातील लोकांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. पण गेल्या आठड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीची संकट शेतकऱ्यांसमोर आहे. निफाड तालुक्यात मागील आठवड्यात तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र आता पावसाने पुन्हा पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे.

निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मकाची पेरणी केली आहे. सोयाबीनपेक्षा मका अधिक प्रमाणात पेरलेला आहे. पहिल्या पावसाने जमिनीत थोडी ओल असल्यामुळे पेरलेले बियाणे उगवले आहे. मात्र या कोवळ्या पिकांना पावसाची नितांत गरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

एक एकर क्षेत्र मशागतीसह पेरणीसाठी जवळपास ७ ते ८ हजार रुपये खर्च आलेला असताना पुन्हा दुबार पेरणीचे संकट असल्याने शेतकऱ्यांनी पावसाला साकडे घातले आहे. याऊलट दररोज उन्हाळ्यासारखे कडक उन असल्यामुळे जमितीतून वर आलेले कोवळे पिकही संकटात सापडले आहे.

द्राक्षबागाही संकटात

पावसाने ओढ दिल्याने सध्या द्राक्षबागांना टँकरने पाणी दिले जात आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पाऊस लांबला तर द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इगतपुरीतही पावसाची विश्रांती

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाउसाने दडी मारल्याने तालुक्यातील धरणांमधील वाढत जाणारा जलसाठाही आता स्थिरावला आहे.

इगतपुरी तालुक्याला यंदा प्रथमच टँकरवर तहान भागवावी लागली. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल, अशी सर्व शेतकऱ्यांना आशा होती. सुरुवातील रुसलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली. मात्र हे आठ दिवस वगळता पावसाने पुन्हा दडी मारली आहे. या पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यांत पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून ही आशा पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणसाठ्यातील वाढही थांबली आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश भागातील भात लागवडीची कामेही रखडली आहे.

धरणसाठा (टक्क्यांत)

भावली -- ७८.५१

दारणा -- ७१.५५

भाम -- ५७.५७

कडवा -- ५१.२४

मुकणे -- २२.८५

वाकी - ३३

बळीराजाच्या ऊरी धडधड

म. टा. वृत्तसेवा, येवला

उशिराने आलेल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीचा जणूकाही जुगार खेळल्याचेच चित्र सर्वत्र दिसत आहे. गेल्या सात दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाने दिलेली मोठी ओढ लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? या चिंतेतून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडधड होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात महसूल यंत्रणेच्या येवला मुख्य मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असली तरी, तालुक्यातील इतर सर्वच मंडळे आजही अत्यल्प पर्जन्यमानामुळे पिछाडीवर आहेत. मान्सूनचे उशिराचे आगमन, कुठे काहीसा जोर तर कुठे अगदी कमजोर अशा पावसाने केलेल्या भेदभावातही तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात यंदा मका, सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या सात ते आठ दिवसांपासून तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी पुरेशा पावसाअभावी अद्यापही खरीप हंगामातील पेरणीचे शेतीचक्र अडखळून पडले आहे. येत्या पाच-सहा दिवसात पर्जन्यसरी पडल्या तरच ही पिके उभारी घेण्यास मदत होणार आहे. अन्यथा पिके करण्याच्या शक्यता आहे.

मालेगावला दमदार पावसाची प्रतीक्षा

मालेगाव : दुष्काळाने होरपळून निघालेल्या मालेगाव तालुक्याला जुलैचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पहिल्या पावसापासून मालेगाव तालुक्यावर सावत्र भाव दाखविणाऱ्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून दडी मारल्यामुळे नुसतेच निरभ्र आकाश पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात ८ जुलै अखेर निम्मेच पेरण्या झाल्या असून पावसा अभावी पेरण्य खोळंबल्या आहेत. आता तरी पावसाचा दुजाभाव संपून मालेगावात दमदार सरी कोसळतील अशी आस शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाउस न झाल्याने यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. जून महिना सुरु झाला आणि वरुणराजा दमदार बरसेल अशी सर्वांच आस होती. मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाने तुरळक हजेरी लावत सलामी दिली. जून महिन्यात तालुक्यात ५८ मिमी इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आजा दुबार पेरणीचे संकट तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.

धरणेही कारेडीच

पावसाआभावी पेरण्या खोळंबल्या असतांना गिरणा व मोसमनदी पात्रे देखील अद्याप कोरडी आहेत. गिरणा खोऱ्यातील चणकापूर, केळझर, नाग्यासाक्या धरणे अजून कोरडीच असून हरनाबारी, गिरणा धरणात किरकोळ पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गिरणा मोसम खोऱ्यात पावसाआभावी पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चमकोगिरी अंगलट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत रस्ते, चौक, जलकुंभांच्या नामकरणावरून आधीच वाद सुरू असतानाच, शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे नाव एका रस्त्याला देण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर केल्याने शिवसेनेसह पालिकेतही हा विषय चर्चेचा बनला होता. शहरातील रस्ते, चौकांना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचेही नाव दिलेले नसताना, वरिष्ठ नेत्यांना डावलून थेट राऊत यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे स्थानिक नेत्यांची कोंडी झाली. मात्र, संपर्कप्रमुखांकडून कानउघाडणीनंतर गामणे यांनी हा प्रस्ताव मागे घेतला.

शहरातील रस्ते, चौक, जलकुंभ, नवीन इमारतींना कोणाचे नाव द्यायचे असल्यास त्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करावा लागतो. महासभेच्या मान्यतेनंतर सदरच्या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून नामकरण समितीकडून त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जातो. देशासाठी बलिदान देणाऱ्या तसेच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्यांसह नाशिकच्या विकासात मोलाची कामगारी करणाऱ्या नेत्यांची नावे शहरातील विविध रस्ते, चौक, इमारतींना देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे महासभेत सहजासहजी असे विषय मंजूरही केले जातात. पाथर्डी फाटा येथील एका जलशुद्धीकरण केंद्राला नाव देण्यावरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहेत. या केंद्राला दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे अशी भाजपची मागणी आहे, तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी शिवसेनेची मागणी आहे. हा वाद ताजा असतानाच शिवसेनेच्या गामणे यांनी नामकरणाच्या वादात भर घातली आहे. सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमलगतच्या अंबड-सिडको पाथर्डी चौफुलीच्या रस्त्याला लोकनेते खासदार संजय राऊत यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. या प्रस्तावामुळे मात्र शिवसेनेचीच कोंडी झाली. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य या ठाकरे कुटुंबातील नेत्यांची नावे सोडून राऊत यांचे नाव कसे द्यायचे, या पेचात स्थानिक नेते पडले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे होर्डिंग लावल्यामुळे आधीच नेत्यांची कोंडी झाली असताना, गामणे यांनी सलग दुसऱ्या दिवशी नेत्यांना अडचणीत आणले आहे.

कानउघाडणीनंतर प्रस्ताव मागे

महासभेच्या विषयपत्रिकेवर सदरचा विषय जाहीर झाल्यामुळे गामणे यांची चमकोगिरी शिवसेना नेत्यांना लक्षात आली. त्यामुळे गामणे यांच्या या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या नेत्यांची कोंडी झाल्यानंतर त्यांनीही सारवासारव सुरू केली. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बाळासाहेब दराडे यांची कानउघाडणी केल्याचे समजते. हा प्रस्ताव कोणाला विचारून दाखल केला, अशी विचारणा पक्षाकडून करण्यात आली. त्यानंतर गामणे यांनीही सारवासारव करीत माफीनामा सादर केला. तसेच सदरचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे पत्र दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काईझेन स्पर्धेचा पारितोषिक वितरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये क्षमता व उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी निमा उद्योगांमध्ये वरील बाबतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निमा काईझेन स्पर्धांच्या माध्यमातून प्रयत्न करत असते, असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.

काईझेने स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, महिंद्राचे माजी उपाध्यक्ष हिरामण आहेर, भाग्यश्री शिर्के, स्पर्धेचे परीक्षक विनोद मानवी, श्याम कोठावदे, अमोल कामत उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल यावेळी देण्यात आला.

असा केला गौरव

१० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगांच्या गटातून प्रथम विजेते म्हणून नितेश ऑटो इंजिनीअरिंगचे राकेश दयाल व राजेंद्र महाजन यांना गौरविण्यात आले. द्वितीय विजेते म्हणून एनएसके फॅब अँड वेल्डच्या कमलेश उशिर, सचिन धात्रक, तुषार जाधव यांना गौरविण्यात आले.

१० कोटी ते ५० कोटीचा वेगळा गट

१० कोटी ते ५० कोटींच्या दरम्यान उलाढाल असलेल्या गटातून प्रथम विजेते म्हणून अभिजित टेक्नो प्लास्टचे अमोल वाघमारे, रवींद्र पगार, मीना महिरे, सविता शेवाळे, मीना चौधरी यांना गौरविण्यात आले. द्वितीय विजेते म्हणून प्रीती इंजिनीरिंग वर्क्सचे चिन्नपिलाई सरवनन, सचिन पंडित, ओमप्रकाश यादव, सुखदेव गदादे यांना गौरविण्यात आले. तृतीय विजेते म्हणून लामा नीरज इंजिनीरिंग अतुल मुंदडा, जगदीश चांदवानी, भगवान महाजन यांना गौरविण्यात आले.

३०० कोटी गटातही बक्षीस

५० कोटी ते ३०० कोटी दरम्यान उलाढाल असलेल्या उद्योग गटातून प्रथम विजेते म्हणून गोल्डी प्रिसिजन स्टॅम्पिंग्सचे के. पी. भामरे, एस. टी. बोरसे, मिरेकर, सी. बी. डिक्कर यांना गौरविण्यात आले. द्वितीय विजेते म्हणून श्वेता प्रिंट पॅकचे सुनील देशमुख, राहुल नाईक, रोहन परदेशी, दीपक नाईकवाडे, गोरक्षनाथ जाधव यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयमाची आज ‘बिझनेस मीट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे १८ व १९ जुलै रोजी एक्सप्रेस इन येथे 'नाशिक बिझनेस मीट -२०१९' चे आयोजन करण्यात आले आहे. या मीटमध्ये औरंगाबाद, पुणे, वरोडा, मुंबई, नाशिक येथील ५० मोठ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच यावेळी नामवंत उद्योजक मार्गदर्शनही करणार आहेत. नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, नवीन गुंतवणूक यावी व ब्रॅडिंग व्हावे यासाठी या मीटचे आयोजन केले आहे.

मंदीच्या काळात उद्योजकांना व्यवसायात गती मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष व मीटचे चेअरमन निखिल पांचळ यांनी दिली. या बिझनेस मीटमध्ये शिट मेटल, अॅटोमोबाईल्स कांपोनेन्ट, रबर प्रॉडक्शन, प्लास्टिक पॉलिमर्स, फायबर, अॅडेसिव्ह, इंजिनीअरिंग, मशिन्स मॅन्युफॅक्चरींग यासह अनेक वेगवेगळी उत्पादन करणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. यामध्ये उद्योजकांना 'बिझनेस टू बिझनेस'मध्ये (बीटूबी) सहभाग घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य, शिक्षणावर देणार भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे बुधवारी एस. भुवनेश्वरी यांनी हाती घेताच त्यांनी आरोग्य व शिक्षण विभागावर भर देण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी त्यांनी एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर डॉ. नरेश गिते यांनी राबविलेले प्रकल्प अधिक गतीने चालवणार असल्याचेही सांगितले.

बदलीचे आदेश येताच त्या हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर अध्यक्ष शीतल सांगळे यांची भेट घेतली. नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. नरेश गिते यांनी दीड वर्षात केलेल्या कामांचे कौतुक केले. या काळात पाच राष्ट्रीय व १२ राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाले. त्यांनी सुरू केलेले कुपोषण मुक्ती, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम, निविदा सेल, न्यायालयीन कक्ष सारखे वेगवेगळे उपक्रम यांना गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे काही अडचण असल्यास त्यांच्याकडून फोनद्वारे मार्गदर्शन घेऊ असेही त्यांनी सांगितले. डॉ. गिते यांची पदोन्नतीने भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यवतमाळच्या सहायक जिल्हाधिकारी असलेल्या ए. भुवनेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी होती. त्या २०१५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images