Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेडिरेकनरप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलणार

$
0
0
रेडिरेकनरचे दर अवास्तव वाढविण्यात आल्याने त्याचा मोठा परिणाम नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर होत असल्यामुळे याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कॅनिबटनमध्येही तो मांडण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.

डांगसौंदाणेच्या स्टेट बँक शाखेत चोरीचा प्रयत्न

$
0
0
डांगसौदाणे येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी शाखेचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. सततच्या या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

गंगापुरात चोरी

$
0
0
गंगापूर परिसरात बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करीत चोरट्याने ३५ हजारांची रोकड चोरून नेली. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. महेश शरदचंद्र कोतकर (३७) यांनी फिर्याद दिली आहे. पाइपलाइन रोडवरील घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने ३५ हजारांची रोकड चोरून नेली.

शालिमारला आगीत ९ लाखाचे नुकसान

$
0
0
शालिमार येथे शनिवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत कॉम्प्लेक्समधील चार दुकानांतील बराचसा माल जळून खाक झाला. या अपघातात ८ ते ९ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तव‌िण्यात आला आहे.

भूसंपादनासाठीच आयुक्तांची नियुक्ती

$
0
0
खासगी संस्थेमार्फत भूसंपादन करण्यासाठी मोठी योजना आखण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त संजय खंदारे यांची नियुक्ती महापालिकेत करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी महासभेत केला.

‘राष्ट्रवादी’ने घेतला काँग्रेसचा धसका

$
0
0
नाशिकच्या खासदारकीसह जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या साथीने सत्ता मिळवूनही 'राष्ट्रवादी काँग्रेस'कडून काँग्रेसला विचारणा होत नसल्याचा आरोप करत 'राष्ट्रवादीने आमच्या अस्तित्त्वाला आव्हान देऊ नये' असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला. काँग्रेसच्या या इशाऱ्याचा धसका घेत राष्ट्रवादीनेही काँग्रेसला बरोबरीचे स्थान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सायनेत टेक्स्टाइल, अक्राळेत आयटी पार्क

$
0
0
मालेगाव तालुक्यातील सायने येथे तर दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक भूसंपादन अंतिम टप्प्यात असल्याने तेथे अनुक्रमे टेक्स्टाइल आणि आयटी पार्क विकसीत करण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपुर्व चंद्र यांनी शनिवारी येथे केली.

...अन्यथा पगार कापणार

$
0
0
१ जूनपासून रस्त्यावर गळकी, पत्रा तुटलेली, काचा फुटलेली एसटी दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, असे आवाहन आपण केले आहे. त्यामुळे अशा बसेस रस्त्यावर येणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा १ जून नंतर अशा बस रस्त्यावर दिसल्या तर मॅकॅनिक्सच्या पगारातून पैसे कापले जातील, असा इशारा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी शनिवारी हॉटेल रॉयल हेर‌िटेजच्या हॉलमध्ये गुणवंत कामगारांचा सत्कार कार्यक्रमात दिला.

उद्योगांना ऑनलाइनचा दिलासा

$
0
0
राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी येत्या आठ महिन्यात सर्व कामकाज ऑनलाइन होणार असल्याची माहिती राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपुर्व चंद्र यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. शनिवारी ते नाशिक दौऱ्यावर होते.

केशरसिंग चढ्ढा यास जन्मठेप

$
0
0
हुंड्यासाठी पत्नीला अतोनात छळून तिला टेरेसवरून निर्दयीपणे ढकलून खून केल्याप्रकरणी केशरसिंग हरजिंदसिंग चढ्ढा याला न्यायालयाने शनिवारी जन्मठेपची शिक्षा सुनावली.

शहरात अवकाळी सरी

$
0
0
हवामानात झालेल्या अचानक बदलांनंतर शनिवारी दुपारी ढगाळ वातावरणात अवकाळी सरींनी नाशिक शहरात हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण १.१ मिलीमीटर असले तरी शहरातील वातावरण बदलले असून आर्द्रता आणि गारठ्याने नाशिककरांना चांगलाच तडाखा दिला आहे.

नव्या नियमाने शेतक-यांना फायदा?

$
0
0
नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला देण्यासह विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना दहापट अधिक टीडीआर राज्य सरकारने द्यावा, अशा आशयाचा ठराव महासभेने शनिवारी संमत केला. त्यामुळे साधुग्रामसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील त्यांना दहापट टीडीआर मिळेल.

‘व‌िवेक’ हरव‌िलेली श‌िक्षण व्यवस्था

$
0
0
पुणे व‌िद्यापीठाच्या वर्धापनद‌िनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर जीवन साधना पुरस्कार देण्यात आला. दाभोलकरांनी अत‌िशय मेहनतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंधश्रध्दा न‌िर्मूलनाची चळवळ रुजव‌िली. या चळवळीचा पाया व‌िवेकवादाचा आहे.

फुलला ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टिव्हल

$
0
0
अप्रत‌िम निसर्गसौंदर्याची शाल लपेटून टुमदार टेकडीवर वसलेल्या विंचूर वायनरी पार्कमध्ये तीन दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या इंडिया ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टिव्हलची शेवटची संध्याकाळ विविध कार्यक्रमांनी उजळून निघाली.

अनोखा बर्ड फेस्ट

$
0
0
तळ्याच्या मधोमध बसलेला पानकावळा, ब्राम्हणी बदक, स्पॉटबील बदक, परीट पक्षी, गप्पीदास म्हणजेच स्टोनचॅट आणि आयबीस या पक्ष्यांच्या दर्शनाने पक्षीमित्रांची रविवारची सकाळ प्रसन्न झाली निमित्त होते बर्ड फेस्टिव्हलचे.

संस्कारभारतीतर्फे नाट्यसंगीत

$
0
0
संस्कारभारतीच्या पश्चिम विभागातर्फे भरतमुनी जयंतीनिमित्त बुधवारी (१९ फेब्रुवारी) शंकराचार्य न्यास संकुल येथे संध्याकाळी ६ वाजता नाट्य संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका विद्या ओक या गाजलेल्या नाट्यपदांचे सादरीकरण करणार आहेत.

प्रेमवीरांची गांधीग‌िरी

$
0
0
अंगावर आलेल्याला श‌िंगावर घेण्याऐवजी थंड रक्ताने त्याला सामोरे जाण्याची हातोटी काहींजवळ असते. प्रत्येक ठ‌िकाणी वाद घालून नसती आफत ओढावून घेण्यापेक्षा वेगळे फंडे वापरण्यावर शक्कलवंतांचा भर असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या द‌िवशीही अनेक प्रेमवीरांच्या गंजलेल्या बुध्दीला अशीच चालना म‌िळत होती.

अतिक्रमणविरोधी मोहीम बासनात

$
0
0
गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने गाजावाजा करत सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम बासनात गुंडळण्यात आली आहे. मुंबईनाका परिसरानंतर शहरात कोठेही अतिक्रमण मोहिमेचे अस्तित्व जाणवले नाही.

जखमी प्राध्यापकाचाही मृत्यू

$
0
0
सटाणा कॉलेजमधील रखवालदाराच्या खुनी हल्यात गंभीर जखमी झाले प्राध्यापक सुनील सागर यांचाही रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

९२ कोटींची विकासकामे

$
0
0
मालेगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत ९२ कोटी रुपयांची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झाली आहेत. याशिवाय विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी येथे दिली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images