Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पंधरा हजार मुलींपर्यंत पोहोचले ‘निर्भया’...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरक्षा आणि सुरक्षितता यावर निर्भया पथकाने तब्बल १५ हजार विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आहे. एक महिन्याच्या कालावधीत चार पथकांद्वारे हे काम करण्यात आले आहे.

शहरातील टवाळखोरी, छेडछाड, तसेच विनयभंगासारखे प्रकार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी निर्भया पथक सुरू केले आहे. ८ जून रोजी निर्भया पथकाचे काम सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत निर्भयाच्या चार पथकांनी कारवाई आणि जनजागृती अशी दुहेरी भुमिका वठवली आहे. याबाबत बोलताना निर्भया पथकाच्या समन्वयक एपीआय भावना महाजन यांनी सांगितले, की मागील महिनाभरात पथकातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमधील १५ हजार विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनवर्गांचा सातत्याने आढावा घेतला जातो आणि मार्गदर्शनवर्गांमध्ये सातत्यसुद्धा ठेवण्यात आले आहे. स्वसुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असून, मुलींना त्याबाबत अवगत करण्यात येते, असे महाजन यांनी स्पष्ट केले. मुलींच्या वयोगटानुसार मार्गदर्शन करण्यावर आमचा भर आहे. १२ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श समजावून सांगितला जातो, तसेच असा अनुभव असल्यास पालकांना त्याची कशी कल्पना द्यावी, हेही या लहान मुलींना सांगितले जाते. १४ ते १६ आणि १६ ते १८ या वयोगटांसाठी वेगवेगळे मुद्दे आहेत. विशेषत: १४ ते १६ वयोगटातील मुलींना आमिषांबाबत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत माहिती दिली जाते.

--

...या क्रमांकावर संपर्काचे आवाहन

शाळा आणि कॉलेजेसबरोबर गर्ल्स होस्टेलवरसुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होतात, असे महाजन यांनी स्पष्ट केले. यातील काही कार्यक्रमांना पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांनीदेखील मार्गदर्शन केले आहे. दरम्यान, मार्गदर्शन कार्यक्रमांबरोबर कारवाईसुद्धा सुरू असते. टवाळखोरांबाबत अथवा छेडछाडीच्या घटनांबाबत माहिती द्यायची असल्यास नागरिकांनी १०९१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाजन यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनासाठी आज पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला २०२० च्या साहित्य संमेलनासाठी निमंत्रण पत्र देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज, सोमवारी (दि. १५) सकाळी १० वाजता महामंडळाची उपसमिती नाशिकमध्ये येणार असून, 'सावाना'स भेट देऊन पाहणी करणार आहे.

येत्या २०२० चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार की उस्मानाबादला, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या समितीच्या अहवालानंतर संमेलनाचे स्थळ महामंडळ निश्चित करणार आहे. साधारणत: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. सन २०२० चे साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवावे व त्याचे यजमानपद सार्वजनिक वाचनालयाकडे द्यावे, असा प्रस्ताव सावाना पदाधिकाऱ्यांनी महामंडळाला दिला होता. साहित्य महामंडळाकडे लातूर, उस्मानाबाद, विदर्भ व नाशिक असे चार प्रस्ताव दाखल झाले होते. यासंदर्भात महामंडळाची बैठक होऊन त्यात लातूर व विदर्भाचा प्रस्ताव बाद ठरविण्यात आला. उर्वरित उस्मानाबाद व नाशिकचे प्रस्ताव सध्या स्पर्धेत आहेत. पैकी उस्मानाबादची पाहणी करण्यात आली असून, आज नाशिकची पाहणी करण्यात येणार आहे.

--

समितीत यांचा समावेश

समितीत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोशाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंखे, डॉ. विद्या देवधर, विदर्भ साहित्य संघाचे डॉ. प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे, प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये ही समिती सावाना कार्यकारी मंडळाशी चर्चा करणार असून, निधी संकलन, मनुष्यबळ, निवासव्यवस्था आदी बाबींची माहिती घेणार आहे. साहित्य संमेलनासाठी सार्वजनिक वाचनालयाने शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम, ठक्कर डोम, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व डोंगरे वसतिगृह मैदान अशी चार ठिकाणे निश्चित केली असून, महामंडळाकडून या जागांची पाहणी होईल. संबंधित तिन्ही संस्थांना पत्रे देण्यात आली आहेत, तर नाईक संस्थेची निवडणूक झाल्यानंतर डोंगरे वसतिगृह मैदान उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कार्डची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

एसटी बसच्या सवलतीच्या प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, तसेच नाशिक येथून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी सायंकाळनंतर कमी असलेली बससंख्या आता वाढविण्यात येणार आहे, असे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. त्र्यंबकराजाची रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी रावते रविवारी येथे आले होते. त्या वेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना ही मंदिरात त्यांच्या मुलाच्या हस्ते पूजा करण्यात आली.

रावते यांनी पूजाविधी झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या कार्यालयात विश्वस्त आणि शिवसैनिकांशी चर्चा केली. त्र्यंबकेश्वर येथे स्मार्ट कार्डासाठी जादा पैसे घेतले जातात, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली. त्यांनी स्मार्ट कार्डासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे व माहिती भरण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हे लक्षात घेऊन त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तोपर्यंत बस भाड्यातील सवलतीसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाईल, असे सांगितले. त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात जादा गाड्यांची व्यवस्था करावी, तसेच सायंकाळी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर बस कमी असतात. याबाबत दखल घेऊन सायंकाळी मुक्कामाच्या जास्त गाड्या सोडल्या जातील आणि सकाळी त्या ठराविक वेळेच्या अंतराने सोडल्या जातील.

रावतेंचे आरतीतही मराठीप्रेम

रावते यांनी आपले मराठीवरील प्रेम येथेदेखील व्यक्त केले. पूजाविधी संपल्यानंतर आरती झाली तेव्हा गुजरातीतून शंकराची आरती करण्यात आली. तेव्हा त्यांनी रामदास स्वामी यांच्या सर्व देवतांच्या मराठी आरत्या असताना गुजराती भाषेतील आरती कशासाठी, असे म्हणून स्वत: लवथवती विक्राळा ही आरती म्हणून दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न विचारण्याची ताकद प्रत्येकात हवीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

'सद्यस्थितीत विचार करणारी माणसे संपवली जात आहेत. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश ही माणसं का मारली गेली कारण ती विचार करीत होती. सद्यस्थितीत विचारांचे दैवीकरण सुरू असून, त्यातून बाहेर पडून सरकारला प्रश्न विचारण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

धुळे शहरात राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात सुरू असलेल्या दहाव्या कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते. रविवारी (दि. १४) दुसऱ्या दिवशी संमेलनाच्या विचारमंचावर समता शिक्षण संस्थेचे सचिव विलास वाघ, उषा वाघ, कॉम्रेड भालचंद्र कनगो आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले,'आज भारताची अर्थयव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली असली तरी भूकबळींची संख्या अकरा लाखांवर गेली आहे. ही आकडेवारी कुणी सांगत नाही. शासनाचा चेहरा बाहेरून वेगळा आणि आतून वेगळा असून, डॉ. दाभोलकर, डॉ. पानसरे यांना मारल्यानंतर चळवळ संपेल असे वाटत होते. परंतु, त्यानंतर दहा दाभोलकर, पानसरे तयार झाल्याने त्यांच्या विचारांचा लढा तसाच सुरू आहे. तो आणखी तीव्र करण्याची गरज आहे.'

निवडणूक सुधारणांवर चर्चा आवश्यक

भारतात लोकशाही असली तरी सध्या या लोकशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतात झालेल्या निवडणुकांकडे पाहता या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने इलेक्ट्रोल बॉण्डचा वापर केला. तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले, असे मत कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित फॅक्टर, तरीही काँग्रेसचे पारडे जड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकीत धुळे-मालेगाव मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाला असला तरी मालेगाव मध्य हा मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना मिळालेले लाखाचे मतदान या मतदारसंघात काँग्रेसचा जनाधार कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे इतरत्र काँग्रेसची धूळधाण झालेली असली तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मालेगाव मध्यने दिलेला जनाधार आशेचा किरण असून, विद्यमान काँग्रेस आमदार असिफ शेख यांच्यापुढे विरोधकांना आव्हान उभे करणे निश्चितच अवघड असेल.

शहरातील महापालिकेसह महत्त्वाचे सत्ताकेंद्र आमदार शेख व वडील, माजी आमदार तथा महापौर रशीद शेख यांच्याभोवती केंद्रित आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत जनता दल या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षाला हरवून काँग्रेसने विजय संपादन केल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहता, कित्येक वर्षे येथे जनता दलाचे निहाल अहमद यांचा प्रभाव होता. त्यास विद्यमान महापौर शेख रशीद यांनी नंतर सुरुंग लावला आणि कालांतराने काँग्रेसचे वर्चस्व वाढतच गेले. २००४ च्या निवडणुकीत माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्या निमित्ताने येथील राजकारणात धर्मगुरूंचा बोलबाला निर्माण झाला होता. मात्र, या प्रयोगास २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारले. त्यानंतर सलग दोन पंचवार्षिक काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांचे वर्चस्व कायम आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभेत मालेगाव मध्यचे मुस्लिमबहुल मतदार काँग्रेसच्या विजयासाठी निर्णायक ठरतील, असे चित्र होते. मात्र, काँग्रेसच्या विजयाच्या आशेवर वंचित बहुजन आघाडीने पाणी फेरले आणि भाजपचा विजय सुकर झाला. मात्र, काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तब्बल एक लाख २६ हजार २७३ इतकी मते मिळाली होती. काँग्रेसला भरभरून मिळालेल्या या मतांचे श्रेय निश्चितच असिफ शेख यांना जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी काँग्रेसला मिळालेले मताधिक्य काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी कायम असल्याचे चित्र सध्या आहे. शिवसेना-भाजपला तसा या मतदारसंघात जनाधार नाही. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-जनता दल आघाडी, वंचित-एमआयएम आघाडी अशी तिरंगी लढत होऊ शकते.

एमआयएम व वंचितचे आव्हान

काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी सध्या तरी विद्यमान आमदार असिफ शेख यांच्याच नावाचा विचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र नबी अहमद यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली होती. मालेगाव मध्य मतदारसंघात वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वंचितला एमआयएमनेदेखील साथ दिल्याने वंचितचे बळ वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित किंवा एमआयएमकडून उमेदवार दिला गेल्यास तिरंगी लढत होऊ शकते.

मौलाना व जनता दलाची भूमिका निर्णायक

काँग्रेस व जनता दल येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. राज्यात जरी आघाडी असली तरी इथे काँग्रेस राष्ट्रवादीत विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे मौलाना मुफ्तींना काँग्रेस रोखू शकेल का, हा प्रश्न कायम आहे. जनता दलदेखील निवडणूक रिंगणात कायम असणार आहे.

हे आहेत पक्षनिहाय इच्छुक

काँग्रेस : असिफ शेख, रशीद शेख

राष्ट्रवादी : मौलाना मुफ्ती इस्माईल

वंचित आघाडी : नबी अहमद

एमआयएम : डॉ. खालिद परवेज

जनता दल : बुलंद इकबाल, शान-ए-हिंद

विधानसभा मतदान

असिफ शेख (काँग्रेस) : ७५,३२६

मौलाना मुफ्ती (राष्ट्रवादी) : ५१,१७५

लोकसभा मतदान

कुणाल पाटील (काँग्रेस) : १,२६,२७३

डॉ. सुभाष भामरे (भाजप) : ५,३५२

नबी अहमद (वंचित-एमआयएम आघाडी) : ८,४२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संस्कृती वैभव’तर्फे चांडक व्याख्यानमाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संस्कृती वैभव संस्थेच्या वतीने यंदाही दोन दिवसीय स्व. रामनाथशेठ चांडक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २०) संध्याकाळी ६.३० वाजता 'जीवन संजीवनी' हा कार्यक्रम होणार आहे. हृदय अचानक बंद पडल्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, या विषयीची माहिती भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखाध्यक्ष डॉ. सुनीता संकलेचा आणि संघटनेचे पदाधिकारी देणार आहेत.

संघटनेतर्फे 'जीवन रक्षक व्हा' या अंतर्गत काही प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि शंका समाधानसुद्धा केले जाईल. त्यानंतर ७.३० वाजता नाशिकचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा हे रोबोटिक एन्जिओप्लास्टी हे नवीन तंत्रज्ञान वापरून रोबोद्वारे हृदयाची शस्त्रक्रिया कशी केली जाते, याबद्दल माहिती सांगतील.

रविवारी (दि. २१) माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. गुरुदत्त अमिन हे 'आरोग्यम हृदयसंपदा' या विषयावर बोलणार आहेत, अशी माहिती संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे दोन्ही कार्यक्रम संध्याकाळी ६.३० वाजता कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूर रोड, नाशिक येथे होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजित पुराणिक यांनी संस्थेतर्फे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेची निवडणूक होणार ऑक्टोबरमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या विधानसभा निवडणुका १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होतील, असा अंदाज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळेस विविध कामांसाठी फक्त दोन महिने उरले असून, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने ५० आकडा पार करून दाखवावा, असे आव्हान देत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री आघाडीचा होईल, या वक्तव्यावर पालकमंत्र्यांनी चिमटाही काढला.

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या तारखा सांगितल्या होत्या. त्यावर पत्रकारांनी त्यांना छेडले असता, त्यांनी हा अंदाज मी मागील निवडणुकीच्या तारखांवरून व्यक्त केला. ते काही भविष्य नाही. हा ढोबळ अंदाज आहे. लोकसभेत ज्याप्रमाणे विरोधी पक्षनेत्यासह अनेक दिग्गज भाजपमध्ये आले, तसे आता विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. भाजपशिवाय आता पर्याय नाही. केंद्रात सरकार आहे, राज्यातही पुन्हा आमचेच सरकार येईल. त्यासाठी भविष्याची गरज नाही. आषाढीत पंढरपुरात जाण्यासाठी जसे सर्वांचे डोळे लागतात, तसे आता भाजपकडे राजकीय वारकऱ्यांचे लागले, असे सांगून काही नेते सोडल्यास सर्व भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकांत ‘जोर का झटका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून, शहरातील महत्त्वाची बसस्थानकेही त्यातून सुटलेली नाहीत. सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, तसेच निमाणी ही बसस्थानके खड्ड्यांचे आगारच बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना या स्थानकांत 'जोर का झटका' सहन करावा लागत आहे.

शहरातील प्रमुख बसस्थानकांत मोठ्या प्रमाणावर खड्ढे पडलेले असूनदेखील एसटी प्रशासनाने ते बुजविण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, सर्वच बसस्थानकांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिकेच्या बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. पाऊस उघडल्यानंतर अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे कामही सुरू आहे. मात्र, शहरातील सर्वच बसस्थानकांतील स्थिती अत्यंत भयानक आहे. बसस्थानकात बस शिरल्यानंतर आपण शहरातील बसस्थानकात आहोत, की ग्रामीण भागातील बसस्थानकात आहोत, असा प्रश्न प्रवाशांना पडल्यावाचून राहात नाहीत. या खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरोदर महिला यांना एसटीमधून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.

प्रवासांसह विद्यार्थ्यांनाही मन:स्ताप

निमाणी बसस्थानकाच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा गेल्या अनेक वर्षांपासून असून, पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याची डागडुजी केली जाते, नंतर पुन्हा स्थिती जैसे थे होते. येथे कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. काही वर्षांपूवी निमाणी बसस्थानकाचे नूतनीकरण झालेले असले, तरी येथील खड्ड्यांची समस्या सुटलेली नाही. थोडा पाऊस झाला तरीही या स्थानकात तळे साचते. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

बसचालकांतही धास्ती

जुन्या सीबीएस परिसरातील स्थिती तर अत्यंत भयानक आहे. या परिसरात मेळा बसस्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीअंतर्गत सीबीएस चौकातदेखील काम सुरू आहे. त्यातच बसस्थानकात खड्डे पडल्याने सगळाच परिसर खड्डेमय झाला आहे. या ठिकाणी जाताना बसचालकदेखील धास्तावत आहेत. ठक्कर बाजार परिसरात तुलनेत खड्डे नाहीत. मात्र, स्थानकात गाडी शिरण्याच्या अगोदरच मोठा खड्डा आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरुवातीलाच जोर का झटका बसतो.

निधी नसल्याचे कारण

सर्वांत भयानक परिस्थिती महामार्ग बसस्थानकात आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्यच पसरलेले आहे. गेल्या सिंहस्थात या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या ठिकाणची परिस्थिती वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. मात्र, निधी नसल्याचे वारंवार कारण सांगितले जाते, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर चालकांनी दिली. शहरातील सर्वच बसस्थानकांची स्थिती भयानक आहे. तेथे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

--

महामार्ग बसस्थानकावरून नेहमी ये-जा करावी लागते. इतर वेळी परिस्थिती चांगली असते. पावसाळ्यात मात्र हाडे मोकळी होतात. ही बाब कंट्रोलरला सांगितली, तर ते म्हणतात वरिष्ठांना कळविले आहे!

-रामचंद्र निकम, त्रस्त प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीजी मेडिकल प्रवेश पुढील वर्षी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ हॉस्पिटलमधील प्रस्तावित पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमासाठी मंजुरीची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत होणार असून, पुढील वर्षापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याबाबत बोलले जात आहे. या अभ्यासक्रमाला केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली असून आता उर्वरित सोपस्कार येत्या आठ दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत. यंदाचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश झाले असल्याने आता पुढील वर्षी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातील, अशी माहिती महाजन यांनी दिली. शालिमार येथील संदर्भ हॉस्पिटलमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च अभ्यासक्रम शहरात येणार असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑर्गन टेम्पल लवकरच

नाशिक शहरात ऑर्गन टेम्पल (अवयव मंदिर) साकारण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर शहरात पाहणी दौराही झाला आहे. अशा प्रकारचे मंदिर प्रथमच भारतात होणार आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी यासंदर्भात एक बैठक झाली. काही परदेशी तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे मंदिर साकारले जाईल. लवकरच त्याचे काम सुरू होईल, असे महाजन यांनी सांगितले.

धोकादायक धरण नाही

तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील धरणांच्या सुरक्षेबाबत बोलले जात आहे. मात्र, राज्यात एकही धोकादायक धरण नाही. धरण सुरक्षा संघटनेकडून त्याची जबाबदारी सांभाळली जात आहे. नजीकच्या काळात एखादे धरण फुटेल अशी कुठलीही भीती नाही. जलसंपदा विभागाचे अधिकारी सुरक्षेबाबत सजग असून धरणांची पाहणी, डागडुजी आदी कामे करीत असल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.

७९१ कोटींचा आराखडा मंजूर

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेचा ७९१ कोटी २४ लाखाचा प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३४६ कोटी, आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३४७ कोटी ६९ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९७ कोटी ५५ लाख रुपयांच्या योजनांचा या प्रारुप आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीच्या वारकऱ्यांना अपघात

$
0
0

१५ जखमी; पिंपळगाव जलाल जवळील घटना

म. टा. वृत्तसेवा, येवला

पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांचा पिकअप अन् समोरून येणारा मालट्रक यांच्यात मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघात पिकअपमधील १५ वारकरी जखमी झाले. अपघातात जखमी झालेले सर्वच वारकरी हे मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथील असून, येवला ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना मालेगाव येथे पाठवण्यात आले.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूर येथे गेलेल्या अन् तेथील दर्शनानंतर आपल्या गावाकडे परतणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथील वारकऱ्यांच्या वाहनास रविवारी (दि. १४) पहाटे मनमाड-नगर राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील अंचलगाव वळणावर अपघात झाला. कोपरगावकडून येवल्याच्या दिशेने वारकऱ्यांना घेऊन जाणारा पिकअप (एमएच ०४, सीपी २४४७) आणि समोरून येणारा मालट्रक (केए २५डी ७८०८) यांच्यात अपघात झाला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात महिंद्रा पिकअपचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. ट्रकच्या पुढील चालक बाजूचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. पिकअप मध्ये एकूण २२ प्रवासी होते. त्यातील ३ वारकऱ्यांना गंभीर, तर १२ वारकरी प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताचे वृत्त समजताच येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर जखमींना तातडीने येवला शहरातील येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाताना त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढे त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती, येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अद्वैत पाटील यांनी दिली.

अपघातात महिंद्रा पिकअप मधील त्र्यंबक ठाकरे, वाल्मीक मोरे व इतर एकास मोठी दुखापत झाली. तर, चरणसिंग जाधव, सोमनाथ कचवे, अनिल कचवे, छबुबाई जाधव, भिका वेणीवाल, नारायण साळुंखे, अशोक जाधव, देवीदास कुंवर, धन्याबाई कुंवर, रमाबाई वेणीवाल, सुनील ललवाणी, शोभा ललवाणी, विठोबा कर्डिल हे १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना

कारने उडवले, १ ठार १ जखमी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव-विंचुर मार्गावर रविवारी पहाटे पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम करणाऱ्या लासलगाव ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भरदाव कारने उडवल्याने कर्मचारी भागवत गरड यांचा मृत्यू झाला. तर सागर गांगुर्डे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला. लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन विंचुरजवळ फुटल्याने शनिवारी रात्रीपासून लासलगाव ग्रामपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी काम करीत होते. हे काम सुरू असताना रविवारी साडे चारच्या दरम्यान विंचुरकडून लासलगावला जाणाऱ्या भरदाव कारने (एमएच १५ सीआर ९६१४) या कर्मचाऱ्यांना उडवले या अपघातात भागवत अण्णा गरड (वय ३३ रा. कॉलेज रोड लासलगाव) यांचा मृत्यू झाला. सागर शंकर गांगुर्डे (वय २३ रा. लासलगाव) गंभीर जखमी झाले. त्यांना लासलगाव इथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कारचालक गिरीश दौलत रायते (वय ३७, रा. टाकळी रोड, खडकमाळेगाव) याला अटक करण्यात आली आहे.

जीर्ण पाईपलाईन ठरली काळ

लासलगाव शहरासह विंचुर व परिसरातील १६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणातून ही पाइपलाइन नेण्यात आली आहे. पाइपलाइन जीर्ण झाल्याने ती अनेक ठिकाणी फुटते, लीक होते. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करून ही दुरुस्तीची वारंवार वेळ येते. रविवारीही लासलगाव ग्रामपालिकेचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत होते. मात्र यावेळी एका कर्मचाऱ्यांला आपला जीव गमवावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानव विकास, दूर अवकाश

$
0
0

संकलन : प्रवीण बिडवे

मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्य सरकार मानव विकास कार्यक्रम राबवित असून, या कार्यक्रमांतर्गत मुलींचे शिक्षण आणि महिलांच्या आरोग्याबाबत चांगले परिणामही दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात मुलींचा शिक्षणाचा टक्का वाढत असून, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. परंतु, हे प्रमाण शून्यावर आणणे अजूनही शक्य होऊ शकलेले नाही. नाशिक विभागातील अहमदनगरमधील एकही तालुका या कार्यक्रमात समाविष्ट नाही. दुर्दैवाने याच जिल्ह्यात बालक आणि माता मृत्यूचे प्रमाण अधिक आढळले आहे. त्यामुळे तालुके विकासाचा इंडेक्स तयार करून मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या अन्य तालुक्यांनाही या कार्यक्रमात समाविष्ट करून घ्यावे लागणार आहे.

-

अंमलबजावणीत नाशिक आठव्या स्थानी

राज्यातील २३ जिल्ह्यांमधील १२५ अतिमागास तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मानव विकास मिशन राबविले जाते. या मिशनच्या अंमलबजावणीच्या क्रमवारीत नाशिक जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी वार्षिक दोन कोटींचा निधी दिला जातो.

-

निवडीच्या निकषांत दुरुस्तीची गरज

मानव विकास निर्देशांक उचांवण्यासाठी राज्य सरकारने २९ जून २००६ रोजी मानव विकास मिशनची स्थापना केली. सन २००१ च्या जनगणनेनुसार तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आणि २००२ च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेऊन मानव विकास निर्देशांक वाढीसाठी तालुक्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण आणि नांदगाव या तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमात समावेश होतो. परंतु, अहमदनगरमधील अनेक तालुक्यांत हे मिशन राबविण्याची गरज आहे. येथील एकही तालुका त्यामध्ये सहभागी नाही हेच आश्चर्यकारक आहे. काळानुरूप निकषांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यात गतवर्षात सर्वाधिक ९४६ बालकांचा मृत्यू झाला आहे.

-

बालमृत्यू धक्कादायक

केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक विभागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. विभागात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या गेल्या वर्षभरात ३ हजार १४३ बालकांचा मृत्यू झाला आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये त्यातल्या त्यात हे प्रमाण काहीसे अधिक आहे. कुपोषण हे बालमृत्यूचे एक कारण असले तरी ते एकमेव कारण नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असूनही जेवढे बालमृत्यू नाही तेवढे दोनच आदिवासी तालुके असलेल्या नगर जिल्ह्यात आहेत. कुपोषणाची तीव्रता नसतानाही हे बालमृत्यू होणे चिंताजनक आहे. टीबी, हृदयातील दोष, न्यूमोनिया यांसारख्या आजारांनी बालकांचा मृत्यू होतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मार्च २०१९ अखेर जिल्हानिहाय बालमृत्यू

जिल्हा बालमृत्यूची संख्या

अहमदनगर ९४६

जळगाव ८३५

नंदुरबार ७०६

नाशिक ४५१

धुळे २०५

-

गर्भवती माता व बालकांसाठी घेतलेली आरोग्य शिबिरे- १२७२

या शिबिरांवर केलेला खर्च - २ कोटी २ लाख

बुडीत मजुरीच्या लाभार्थी बाळंत महिला - २८ हजार २४४

बालभवन विज्ञान केंद्रास भेट देणारे विद्यार्थी - २१ हजार ७५८

मुली शिकल्याने समस्या दूर

ग्रामीण भागात पैशांची चणचण आणि तत्सम अनेक कारणांमुळे बऱ्याचशा मुली केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतात. शिकण्याची इच्छा असूनही त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. प्रत्येक तालुक्यात काही गावांसाठी मिळून किमान एक माध्यमिक शाळा व महाविद्यालय आहे. या शाळा किंवा महाविद्यालयाचे अंतर ३ ते १५ किलोमीटरपर्यंत असते. या मुलींना किमान १२ वीपर्यंत शिक्षण घेता यावे या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजना राबविली जाते. मुलींनी शिक्षण घेतले तर बालविवाहाचा प्रश्नही आपसूकच निकाली निघतो. याशिवाय कुपोषित बालकांचा प्रश्न निकाली निघण्यासही या योजनेमुळे अप्रत्यक्षरित्या हातभारच लागत आहे.

-

मुलींच्या सुरक्षेत वाढ

घरापासून पाच किलोमीटर अंतरात शाळा असणाऱ्या विद्यार्थिनीला मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल देण्याची व्यवस्था केली जाते. सायकल खरेदीसाठी या मुलींच्या बँक खात्यावर सरकारद्वारे साडेतीन हजार रुपये दिले जातात. या पैशांद्वारे त्या हवी तशी सायकल खरेदी करू शकतात. त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडू नये हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. आठवी ते बारावीच्या मुलींना सायकल दिली जाते. विद्यार्थिनी गरजू हवी, एवढा एकच निकष त्यासाठी आहे. लहानग्या भावांना सायकलवर बसवून मुली शाळेत येतात. त्यांचा वेळ वाचतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुली एकत्रितरित्या सायकलवर येत असल्याने त्यांची सुरक्षितताही वाढली आहे.

-

विद्यार्थिनींची सोय, एसटीला उत्पन्न

गावापासून पाच किलोमीटरहून अधिक अंतरावरील शाळेत जाण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विशेष बस सुविधा पुरविली जाते. प्रत्येक तालुक्यात सात याप्रमाणे आठ तालुक्यांमध्ये ५६ बसेस धावतात. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस बस सज्ज असतात. बसमध्ये प्रत्येक मुलीला बसण्यासाठी जागा मिळेल याची खबरदारी घेतली जाते. त्याव्यतीरिक्त जागा शिल्लक असली तरच अन्य प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळतो. या बस प्रवासाचा खर्च राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जिल्हा नियोजन समिती अदा करते.

-

सायकलवाटपाची स्थिती (२०१३-२०१९)

तालुका - लाभार्थी-खर्च (लाखांत)

सुरगाणा २५९३ ७२.०८

त्र्यंबकेश्वर २५२९ ७१.११

पेठ १८६८ ५८.१५

इगतपुरी ३२३५ ९१.३४

कळवण १७४७ ६८.३५

दिंडोरी ३२३५ ३१.४

बागलाण ३०६१ ९४.६८

नांदगाव ३२३२ ९९.८७

एकूण २१,५०० २३५.०१५

-

थेट बँक खात्यावर रक्कम

मानव विकासच्या विविध योजनांतर्गत येणारी आर्थिक मदत लाभार्थींना सुरुवातीच्या काळात धनादेशाद्वारे दिली जात होती. परंतु, हे लाभार्थी निरक्षर किंवा अल्पशिक्षित असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आदिवासी आणि अतिग्रामीण भागामध्ये राहावयास असतात. अनेकांना बँकिंग व्यवहारांची माहिती नसते. प्राप्त धनादेश त्यांच्याकडून चुरगळले जातात. काहीवेळा गहाळही होतात. अनेकदा मुदतीत वटविले जात नाहीत. त्यामुळे लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे लाभार्थींच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था नियोजन विभागाने केली आहे.

-

गतवर्षी १५ कोटी खर्च

अतिमागास भागाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षात नऊ योजनांवर १५ कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला. त्यातील ८ वी ते १२वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या ४ हजार २७३ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. त्यावर सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात आला. गाव ते शाळा वाहतूक बसेस सुविधा पुरवण्याची दुसरी योजनाही राबविण्यात आली. विद्यार्थिनींना शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम ५६ बसेस करत आहेत. ५ हजार ८५० मुलींनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर ३ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गर्भवती मातांसाठी दोन योजना असून त्यावर ८ कोटी ७२ लाख खर्च करण्यात आले आहेत.

-

घरी प्रसूतीचे प्रमाण झाले कमी

आशा, आरोग्य सेविकांच्या माध्यमातून गर्भवती मातांचे ट्रॅकिंग केले जाते. त्यांना आरोग्य तपासणीसाठी वाहनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणण्यात येते. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत महिन्याला दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. आदिवासी भागात एका शिबिरावर १८ हजार रुपये तर बिगर आदिवासी भागात १६ हजार रुपये खर्च केला जातो. या शिबिरांमुळे गर्भवती महिलांची वेळच्या वेळी तपासणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे दवाखान्याबद्दलची भीती नाहीशी होऊन घरच्या घरी प्रसूती करण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी झाले आहे.

-

मानव विकास कार्यक्रमात सहभागी तालुके

नाशिक -जळगाव-धुळे-नंदुरबार

सुरगाणा-चाळीसगाव-शिरपूर-अक्क्लकुवा

त्र्यंबकेश्वर- चोपडा-साक्री-अक्राणी

पेठ-जामनेर-धुळे -तळोदा

इगतपुरी-बोदवड-शिंदखेडा-नवापूर

कळवण-मुक्ताईनगर-नंदुरबार

दिंडोरी-अंमळनेर-शहादा

बागलाण-एरंडोल

नांदगाव

-

तज्ज्ञ डॉक्टरांबाबत अनिश्चितता

इगतपुरी तालुक्यात २०११-१२ पेक्षा बालमृत्यूंचे प्रमाण २६ वरुन ११ वर येण्यास, तर माता मृत्यू १५६ वरून ६५ पर्यंत येण्यास मदत झाल्याचा दावा येथील वैद्यकीय सूत्रांनी केला आहे. कळवण तालुक्यात २०१२ मध्ये बालमृत्यूची संख्या ६० होती. यंदा ती ३८ आहे. मातामृत्यूची संख्या २०१२ मध्ये ६ होती. यंदा एकही माता मृत्यू झालेला नाही. २०१२ मध्ये अर्भक मृत्यूची संख्या ५२ होती. यंदा ती २८ पर्यंत खाली आली आहे. तालुक्यात या कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. अशीच स्थिती त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आहे. २०१५ मध्ये ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचा दर ७ होता. २०१६ आणि २०१७ मध्ये तो चारपर्यंत खाली आला. परंतु गतवर्षात तो शून्य झाला. मातामृत्यूचे प्रमाण मात्र १५३ वरून २२६ पर्यंत वाढल्याची धक्कदायक बाब पुढे आली आहे. अपुरे आणि अवेळी येणाऱ्या अनुदानामुळे स्थानिक पातळीवरील यंत्रणेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तालुक्यांमध्ये स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची कमतरता असते. शहरातूनही प्रत्येकवेळी असे तज्ज्ञ उपलब्ध होतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे कामांच्या आणि योजनेच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

-

बुडीत मजुरीचा योग्य विनियोग गरजेचा

बुडीत मजुरीपोटी गर्भवती महिलांच्या बँक खात्यात सरकार ४ हजार रुपये देते. परंतु या पैशांचा विनियोग महिलांना पोषक आहारासाठी होईलच याची शाश्वती नाही. पैशांचा योग्य विनियोग होऊन महिलांच्या आरोग्याला त्याचा लाभ होतो की नाही, की हे पैसे कुटुंबातील अन्य व्यक्ती अन्य कामांसाठीच वापरतात याची शहानिशा करणारी यंत्रणाही असणे गरजेचे आहे. कारण माता बालक मृत्यू रोखण्यासाठी संबंधित महिला आणि बाळास पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे.

-

शिकवणी वर्ग केले बंद

२०१२ च्या दरम्यान प्रारंभी दोन वर्ष दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा नापास झालेल्या रीपिटर विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गात २५ विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी आणि विज्ञान यांचे दररोज नियमीत मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यासाठी प्रत्येक विषयासाठी शिकवणीवर्ग चालक अथवा शाळेतील विषय शिक्षक यांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत होते. तथापि, याची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नाही. विद्यार्थी पुन्हा नापास झाले त्यामुळे हे वर्ग बंद करण्यात आले.

-

कोट

विभागात अहमदनगर जिल्ह्यातील एकही तालुका मानव विकास निर्देशांकात नाही. परंतु, भविष्यात येथील तालुक्यांची निवड होऊ शकते. उर्वरित जिल्ह्यांत २५ तालुक्यांत मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमात आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम आणि गौण वनोपजांचा उपभोग यांसारख्या काही योजना नव्याने समाविष्ट केल्या आहेत.

प्रदीप पोतदार, उपायुक्त नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम हा सरकारच्या अन्य योजनांव्यतिरिक्त राबविण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर अतिरिक्त खर्च केला जात आहे. साधारणत: प्रत्येक तालुक्यात या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. खऱ्या अर्थाने या तालुक्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर उंचवावा हा त्यामागील उद्देश आहे.

-हेमंत आहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास

मानव विकास कार्यक्रम ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविला जातो. गर्भवती महिलांसह त्यांच्या शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टर करतात. गर्भवती महिलांना चार हजार रुपये बुडीत मजुरी डीबीटीद्वारे दिली जाते. लाभार्थी महिलांची नावे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. या योजनेमुळे माता मृत्यू, बालमृत्यू रोखणे शक्य होते आहे.

-डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

-

जिल्ह्यात विद्यार्थिनी गळतीचे प्रमाण रोखणे मानव विकास कार्यक्रमामुळे शक्य होते आहे. पूर्वी मुली फारतर आठवीपर्यंत शिकत. आता सकृतदर्शनी त्या किमान दहावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे आमचे निरीक्षण आहे.

- नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद

-

मानव विकास कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समिती

जिल्हाधिकारी - अध्यक्ष

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी : सहअध्यक्ष

संबंधित विभागाचे जिल्हा प्रमुख - सदस्य

जिल्हा परिषदेने नियुक्त केलेले सभापती - सदस्य

अशासकीय सेवाभावी संस्था - सदस्य

अग्रणी बँकेचे अधिकारी - सदस्य

जिल्हा नियोजन अधिकारी - सदस्य सचिव

-

तालुका स्तरावर समिती

गट विकास अधिकारी - अध्यक्ष

तहसीलदार किंवा नायब तहसीलदार - निमंत्रित सदस्य

बालविकास प्रकल्प अधिकारी - सदस्य

गट शिक्षणाधिकारी - सदस्य

तालुका आरोग्य अधिकारी - सदस्य

अशासकीय सेवाभावी संस्था - सदस्य

पंचायत समितीने नियुक्त केलेला सभासद - सदस्य

विस्तार अधिकारी (पंचायत) - सदस्य सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाप्रमुखपदी ठाकरे

$
0
0

नाशिक : भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार संजय राऊत आणि संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ठाकरे यांनी यापूर्वी विद्यार्थी सेना उपमहानगरप्रमुख आणि युवा सेना जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी संघटनेचे आज आंदोलन

$
0
0

नाशिक : शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव थांबवण्यासाठी आणि सक्तीची कर्जवसुली थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोमवारी (१५ जुलै) सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. कांदा अनुदानासंबधीची दिरंगाई शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहे. पीककर्ज न देणाऱ्या सरकारी/सहकारी बँकांवर कारवाई करण्यासाठी उपजिल्हा निबंधक कार्यालयातही ठिय्या आंदोलन करण्याचा संघटनेने निर्धार केला आहे. संघटनेचे राज्यअध्यक्ष हंसराज वडघुले या वेळी उपस्थित राहतील, अशी माहिती युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हा चिंतेने ग्रासले...

$
0
0

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप काही आमदारांची तिकिटे कापणार असल्याच्या चर्चा सध्या झडत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आपले काय होणार, या प्रश्नाने आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप चिंतातूर झालेले नसावेत ना? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील या लोकप्रतिनिधींच्या मुद्रा टिपल्या आहेत सतीश का‌ळे यांनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनिथॉनमध्ये धावले हजारो नाशिककर

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ही क्रीडा नगरी म्हणून विकसीत होत असताना या नगरीला आपलेही काही देणे लागते या उद्देशनाने अॅक्टीव्ह एनर्जीच्या वतीने रविवारी सकाळी ६ वाजता रेनीथॉनचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन व नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली.

३, ५, १० व २१ किलोमीटर अशा चार गटांत ही मॅरेथॉन घेण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पर्धेला हिरवी झंडी दाखवली. ३ किलोमीटरसाठी ६५०, ५ साठी १२५०, १० साठी ७५० तर २१ किलोमीटरसाठी २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना चषक देऊन गौरविण्यात आले. देशात सुरू होणाऱ्या मॅरेथॉनच्या सिझनमधील ही पहिली मॅरेथॉन असल्याने या मॅरेथॉनला विशेष महत्त्व होते. ही मॅरेथॉन पूर्ण केलेल्या खेळाडूना मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

स्पर्धेचा निकाल

५ किलोमीटर

१८ वर्षाखालील पुरुष

प्रथम : अनुज उगले

द्वितीय : सोहम मानकर

१८ वर्षाखालील महिला

प्रथम : प्राची भंडारी

द्वितीय : लाभा बेळे

१८ ते ३० वयोगट पुरुष

प्रथम : राहुल देहाडे

द्वितीय : अभिजीत पवार

१८ ते ३० वयोगट स्त्री

प्रथम : भाग्यश्री शिंदे

द्वितीय : सायली शिंदे

३० ते ४० वयोगट पुरुष

प्रथम : अनिल घायवट

द्वितीय : पराग भिवापुरे

३० ते ४० वयोगट महिला

प्रथम : दिशा पाटील

द्वितीय : श्रद्धा शेटकर

४० वर्ष पुढील पुरुष

प्रथम : प्रकाश बनकर

द्वितीय : शरद ठोंबरे

४० वर्ष पुढील महिला

प्रथम : सुनीता पगार

द्वितीय : सुनीता पंडिता

३५ वर्षाखालील १० किलोमीटर विजेते पुरुष

प्रथम : मयुरेश साळुंके

द्वितीय : उमेश इन्हेळे

३५ वर्षांखालील महिला

प्रथम : सविता काळे

द्वितीय : अनुजा उगले

३५ ते ४० पुरुष

प्रथम : लालसिंग

द्वितीय : विशाल तांबट

३५ ते ४० महिला

प्रथम :पुनम वाणी

द्वितीय : योगिनी दिक्षीत

४५ पुढील पुरुष

प्रथम : सुदाम सांगळे

द्वितीय : रवींद्र कदम

४५ पुढील महिला

प्रथम : सुमेधा पाटील

द्वितीय : अर्चना खैरनार

४५ वर्षांखालील हाफ मॅरेथॉन विजेते पुरुष

प्रथम : हिमांशू ठुसे

द्वितीय : जगदीप नेहरा

४५ वर्षांखालील महिला

प्रथम : निवृत्ता धवड

द्वितीय : रिझवान काकेरी

४५ वर्षांपुढील पुरुष

प्रथम : खंडेराव शेळके

द्वितीय : विनोद पिल्लयी

४५ वर्षांखालील महिला

प्रथम : शितल संघवी

द्वितीय : भावना निकम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी ज्येष्ठ विचारवंत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासह ज्येष्ठ नाट्य समीक्षक जयंत पवार, 'मविप्र'चे माजी संचालक प्रकाश वाजे, अ‍ॅड. अजय निकम यांची निवड करण्यात आली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रतिष्ठानसाठी एकूण १५ विश्वस्तांची तरतूद आहे. विश्वस्त अशोक हांडे यांची मुदत संपल्याने ते निवृत्त होत असून, अन्य तीन जागा रिक्त होत्या. या चार जागा न्या. चपळगावकर, नाटककार जयंत पवार, प्रकाश वाजे, अ‍ॅड. अजय (दत्तप्रसाद) निकम यांच्या नियुक्तीद्वारे भरण्यात आल्या. न्या. चपळगावकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून, ते वैचारिक लेखन करणारे संवेदनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वीही प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसिद्ध मराठी नाटककार, नाट्य समीक्षक व पत्रकार जयंत पवार यांची अनेक नाटके प्रसिद्ध असून, त्यांनी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती समितीतही काम केले आहे. पंधराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून, त्यांना सन २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अ‍ॅड. अजय (दत्तप्रसाद) निकम हे सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. ते श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही सध्या काम पाहत आहेत. सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाजे यांनी मविप्र संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची आज बैठक

$
0
0

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, सोमवारी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहतील. वसंतस्मृती या पक्षाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक होईल. मतदारसंघनिहाय बैठकी घेतल्या जाणार असल्यामुळे इच्छुकांची लगबग सुरू झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भाजपने महिला आघाडीची राज्य स्तरावरील बैठक घेतली. त्यानंतर प्रदेश संघटनमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा ही बैठक पंधरा दिवसांतच होत असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपाध्यक्षपदी चोपडा

$
0
0

नाशिकरोड : नाशिक रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी धनंजय खदगीर, उपाध्यक्षपदी नाशिकरोडचे दिनेश चोपडा यांची निवड झाली. संघटनेची बैठक नाशिक येथे नुकतीच झाली. त्यात ही निवड झाली. प्रदेशाध्यक्ष सचिन भालेकर, सचिव अतुल झळके, कांचन राजपूत, उपाध्यक्ष विजय अमृतकर, खजिनदार नितीन उगले, संघटक दीपक काठे, उमेश सोनजे, अर्चना घुले, शिवाजी कडभाने आदी उपस्थित होते. एफडीए कमिटीचे सदस्य प्रियदर्शनी गोडसे, मच्छिंद्र नाठे, बापू येवले, अल्ताफ शेख, अमित शेटे, शैलेश पाटील यांनी समस्या मांडल्या. दिनेश चोपडा यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब थोरात त्र्यंबकराजा चरणी

$
0
0

त्र्यंबकेश्वर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी लावली. काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी भगवान त्र्यंबकराजास साकडे घातले. आपण केवळ दर्शनासाठीच आलो असल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष राजराम पानगव्हाणे, मनपा नगरसेवक राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड, उमाकांत गवळी, भारत टाकेकर आदी उपस्थित होते. मंदिराचे प्रवेशद्वारी आमदार निर्मला गावित, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, ज्येष्ठ नेते मधुकरराव लांडे, शांताराम मुळाणे, दिनेश पाटील आदींनी स्वागत केले.

'पक्ष बदलणार नाही'

आमदार निर्मला गावित शिवसेनेत जाणार, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. तथापि गावित यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत पक्ष बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या स्वागतासाठी आल्या असता त्यांनी पक्षबदलाच्या चर्चेस पूर्णविराम दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेली कामे, निधीवाटपाने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या शेवटच्या बैठकीत विविध विषयांवर रविवारी चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे न झालेले काम व निफाडमध्ये कामे होऊनही वितरित न झालेल्या निधीच्या प्रश्नांनी लक्ष वेधले. गंगापूर धरणातील गाळाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपापल्या मतदारसंघात कामे व्हावीत, यासाठी सर्वांची लगबगही या बैठकीत दिसून आली.

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वांना खूश करीत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कुठे कार्यवाही, तर काही ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. विनायक मळेकर यांनी काम दोन व बिले चार असे सांगत न झालेल्या रस्त्याच्या कामातील गैरव्यवहार मांडला. या वेळी अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर, त्यांनी चौकशी समिती नेमली असून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे सांगितले. या वेळी निफाडचे आमदार अनिल कदम यांनी २०१७-१८ च्या मूलभूत कामांचे पैसे देण्याचा विषय मांडत त्यात दिरंगाई केल्याचे सांगितले. टेंडरच्या ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रुपयांचे टेंडर भरून काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. खासदार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधले, तर आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूर धरणातील गाळाचा विषय उपस्थित करून आरक्षणात वाढ करण्याची मागणी केली. आमदार जिवा पांडू गावित यांनी कामे होत नसल्याचे अनेक गोष्टी सांगितल्या. आमदार सीमा हिरे, पंकज भुजबळ, नरेंद्र दराडे, हेमंत टकले यांच्यासह आमदारांनी व नियोजन समितीच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

निवेदनांचा पाऊस

जिल्हा नियोजन समितीची शेवटची बैठक असल्यामुळे या वेळी लोकप्रतिनिधींच्या निवेदनाचा पाऊसच पडला. सभा सुरू असतानाच अनेकांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले, तर त्यानंतरही हा ओघ सुरू होता. आचारसंहिता लागण्याअगोदर कामे व्हावीत, यासाठी ही लगबग होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे व्हावीत, यासाठी शॉर्ट टेंडर काढण्याची सूचना करण्यात आली. महापालिकेला हे लागू नसल्याचा मुद्दा या वेळी आमदार फरांदे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images