Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सटाण्यात प्राध्यापकांवर हल्ला

$
0
0
सटाण्यात कॉलेजच्या आवारात सुरक्षारक्षक बालबहादूर सिंह याने दोन प्राध्यापकांवर कु-हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात प्रा. सुनील सागर आणि प्रा. प्रफुल्ल ठाकरे यांच्यासह कॉलेजचा शिपाई मगरे जखमी झाला आहे.

विश्वास ठाकूर यांना संचालक पद

$
0
0
नाशिकच्या विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स अॅण्ड क्रेडिट सोसायटीज (नॅफकब) या सहकार क्षेत्रातील देशपातळीवरील संस्थेवर भारत सरकारच्या कृषी व सहकार खात्यातर्फे एकमेव ना‌मनिर्देशित असलेल्या संचालकपदावर निवड झाली आहे.

मोटरसायकलस्वार अपघातात ठार

$
0
0
दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या एका मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. लहवित रोडवर हा अपघात झाला. चंद्रकांत पांडुरंग ढेरींगे असे मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. लहवित येथे राहाणाऱ्या संतोष पांडुरंग ढेरींगे (३७) यांनी फिर्याद दिली आहे.

आडगावात जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0
आडगाव शिवारात विराज हॉटेलच्या मागे चालविल्या जाणाऱ्या जुगार अडड्यावर गुन्हे शाखा युनिट तीनने गुरूवारी छापा टाकला. त्यात २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

‘त्या’ लिपिकाचे अखेर निलंबन

$
0
0
महागड्या मोटारींची टॅक्सी संवर्गात नोंदणी करून परस्पर १८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता.

महापौरांनतर आयुक्तांनाही नवीन कार

$
0
0
महापौरांसाठी १६ लाख रूपयांची कार खरेदी करण्याच्या प्रस्तावास हिरवा कंदील मिळताच प्रशासनाने आयुक्तांनाही तशाच पध्दतीच कार विकत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास स्थायी समितीने तत्काळ मंजुरी दिली असून लवकरच खरेदी प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मे महिन्यात स्पष्ट होणार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू

$
0
0
मार्च मह‌िन्याच्या पह‌िल्या आठवड्यात आयोज‌ित करण्यात आलेल्या मुक्त व‌िद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आण‌ि व‌िद्या परिषदेच्या बैठकीत कुलगुरू न‌िवड प्रक्र‌ियेला चालना म‌िळणार आहे. तरी प्रत्यक्षात कुलगुरूंची निश्चिती होण्यास मे महिना उजाडेल अशी शक्यता आहे.

४ उपोषणकर्त्या कोतवालांची प्रकृती खालावली

$
0
0
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या उपोषणाने उग्र रुप धारण केले असून उपोषणाला बसलेल्या कोतवालांपैकी ६ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहेत तर ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

लाल मिरची झाली अधिक तिखट

$
0
0
नाशिकच्या खवय्यांना चटकदार खाण्यासाठी जेवणात लागणाऱ्या मसाल्यासाठीची लाल मिरची बाजारात दाखल झाली आहे. लाल मिरचीचे २० पेक्षा अधिक प्रकार ग्राहकांना पहायला मिळतात. त्यातच मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरची घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करत आहेत.

पाणीपट्टी-घरपट्टी वाढीची शक्यता

$
0
0
घरपट्टीमध्ये १९९२ पासून तर पाणीपट्टीमध्ये २००९ पासून कोणतीही वाढ करण्यात आली नसून उत्पन्न वाढीचे प्रशासनापुढे आव्हान आहे. आगामी काळातील खर्चांचा विचार करता प्रशासनाने घरपट्टीत १० टक्के तर पाणीपट्टी बिलात २० टक्के वाढ केली असून त्यास स्थायी समितीने मंजुरी देण्याचा आग्रह प्रशासनाने धरला आहे.

शिवसेनेची हायटेक भरारी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत उतरलेल्या शिवसेनेने 'आव्वाज कुणाचा' या आपल्या पारंपरिक स्टाइलला आधुनिकतेची जोड देण्यासाठी कंबर कसली असून, यात वकील, इंजिनीअर सेल स्थापन करण्यासह आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे.

आरोग्य व‌िद्यापीठ लवकरच ISO

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या कामकाजाचे आयएसओ ९००१ : २००८ प्रमाणीकरण व सर्टिफ‌िकेशन ऑड‌िटची प्रक्र‌ीया अंतिम टप्प्यात आली आहे. टी.यु.व्ही.इंड‌िया या कंपनीच्या माध्यमातून हे परीक्षण सुरू आहे. या अगोदरच्या टप्प्यात आयएसओ प्रमाणीकरणासाठी व‌िद्यापीठाचे अंतर्गत परीक्षण यापूर्वीच झाले आहे. आता ऑड‌िट प्रक्र‌ियेतील अंतिम टप्प्यातील कामकाजाला सुरुवात झाली आहे.

१,८७५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

$
0
0
महापालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीला २०१४-१५ चे १ हजार ८७५ कोटी ६९ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. यात घरपट्टीत २० टक्के आणि पाणीपट्टीत १० टक्के करवाढ प्रस्ता​वित आहे. या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

गंगापूररोडचा प्रश्नही ‘ग्रीन ट्रिब्युनल’कडे

$
0
0
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्याच्या रुंदीकरणात ३५० झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याने नाशकातील तीन वृक्षप्रेमींनी अखेर पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली आहे.

पाणी मीटर बदलाच्या नोटिसांची होणार चौकशी

$
0
0
सातपूर भागात पाण्याची बिले उशिराने; परंतु पाणी मीटर बदलण्याच्या नोटिसा मात्र वेळेवर, या मथळ्याखाली `मटा`ने वृत्त प्रसिध्द केले होते. याबाबतचा मुद्दा प्रभाग समिती बैठकीत झाल्यानंतर सभापती विलास शिंदे यांनी पाणी मीटरच्या नोटीस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय अधिकारी शिंगाडे यांना दिले.

एकलहरेच्या प्रकल्पग्रस्तांना दाखल्यांची प्रतीक्षा

$
0
0
एकलहरेच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. दाखले देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

माकप-शिवसेना नगरसेवकांत ‘हमरीतुमरी’

$
0
0
सातपूरमध्ये विकासकामांचे श्रेय घेण्यावरुन मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष व शिवसेना नगरसेवकांत वाद झाला. माकपचे नगरसेवक सचिन भोर व नंदिनी जाधव यांच्यातील हा वाद कार्यकर्त्यांच्या हमरीतुमरीपर्यंत पोचला.

वाडीवऱ्हेतील जमीन वगळणार ?

$
0
0
नाशिकपासून जवळच असलेल्या आणि इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील बागायती जमीन औद्योगिक भूसंपादनातून वगळण्यात येणार असल्याची चिन्हे आहेत. यासंदर्भातील सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले असून येत्या १५ दिवसात त्याचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

मेशीच्या आरोग्य केंद्राला कुलूप

$
0
0
मेशी येथील प्राथमिक आरेग्य केंद्राच्या अनागोंदी कारभारामुळे या केंद्राच्या भिंतीजवळील कचरा पेटविताना आजूबाजूला नव्यानेच लागवड केलेल्या झाडांची राखरांगोळी झाली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी या आरोग्य केंद्राला कुलूप लावले.

‘त्या’ ६३ बांधकामांना स्थगिती

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथे सर्रारासपणे बेकायदा बांधकामे सुरु असल्याची बाब ‘मटा’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर तेथील ६३ बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश निफाड तहसीलदारांनी काढले आहेत. त्यामुळे पिंपळगावातील बांधकाम व्यावसायिकांना जबर झटका बसला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images