Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डायरी

0
0

व्याख्यान : आयाम आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे 'केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ विश्लेषण' या विषयावर व्याख्यान.

स्थळ : डॉ. मुंजे ऑडिटोरियम, भोसला कॅम्पस, गंगापूर रोड

वेळ : सायंकाळी ६ वाजता

----

पदग्रहण : रोटरी क्लब ऑफ नाशिक रिव्हरसाईडचा पदग्रहण सोहळा.

स्थळ : हॉटेल करी लिव्ह्ज, गंगापूर रोड

वेळ : सायंकाळी ७ वाजता

-----

मोर्चा : अधिकारी, कर्मचारी संघटनेतर्फे मोर्चा

स्थळ : सार्वजनिक बांधकाम भवन, त्र्यंबकरोड

वेळ : सकाळी ११ वाजता

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महात्मा गांधी विद्यामंदिर फार्मसीला 'एनबीए' मानांकन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटी फार्मसी कॉलेजला सरकारच्या नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिएशनद्वारा तीन वर्षाचे एनबीए मानांकन मिळाले आहे. सन १९९३ साली स्थापन झालेल्या पंचवटी फार्मसी कॉलेजने विविध उपक्रम, सोयीसुविधा, संशोधन, माजी विद्यार्थी यांचा महाविद्यालया विषयीची बांधिलकी आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा व व्यावसायिक शिक्षणातील गुणात्मक दर्जा, अध्यापन याचे दिल्लीच्या समितीने मूल्यांकन करून 'एमबीएचे' मानांकन या महाविद्यालयांना देण्यात आले आहे. यामध्ये या कॉलेजला १००० पैकी ६९० गुण प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी अभिनंदन केले आहे.  मानांकन मिळाल्यामुळे कॉलेजचा नावलौकिक वाढला आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक शिक्षण देण्याबरोबरच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रेरणा मिळाली. आहे. प्राचार्य डॉ. आर. एस भांबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा महासंघातर्फे गुणगौरव सोहळा

0
0

मराठा महासंघातर्फे

गुणगौरव सोहळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव सोहळा' मेनरोड येथील मराठा मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे सुनील बागुल, माजी आमदार नितीन भोसले, विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन भोसले यांनी शिक्षणात अपयशी झालेल्या परंतु आयुष्यात यशस्वी झालेल्या महापुरुषांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. मोबाइल आणि इंटरनेटचा वापर योग्य कारणासाठी करावा. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताघेता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असेही सांगितले. त्यांनी शिक्षण, ज्ञान, व्यवसाय आणि जीवनमान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुनील बागुल यांनी आईवडिलांचा, महिलांचा आदर करावा त्याचप्रमाणे शिक्षणासोबत अथक परिश्रम घ्यावे असेही नमुद केले. याप्रसंगी वत्सला खैरे, हिमगौरी आडके, शशी अहिरे, नीलेश दुसे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा पूजन आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी महासंघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन महासंघाचे प्रवक्ते अविनाश वाळुंजे, अॅड. आनंद बोंबले पाटील यांनी केले. आभार अॅड. सोनल निफाडे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे पॉइंटर

0
0

दृष्टिक्षेपात पाऊस

---

-शहरात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ७०.५ मिलिमीटर पाऊस

-सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या वेळेत २७.२ मिलिमीटर पाऊस

-रात्री साडेआठपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा इशारा

-महापालिकेने ध्वनिक्षेपकाद्वारे रामकुंड परिसरात दिल्या सतर्कतेच्या सूचना

-दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी

-पूरस्थिती नसतानाही तशा अफवांचे पेव

-गोदाघाटावर उभी केलेली कार पाण्याच्या प्रवाहात

-गोदाघाटावर वाहने उभी करू नयेत अशा प्रशासनाकडून सूचना

-काझीगढी येथील ३५ कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविली

-सोमेश्वर धबधब्याकडे नागरिकांची धाव

-रस्त्यांवर ठिकठिकाणी साचले तळे

-नंदिनीसह (नासर्डी) गोदावरीच्या उपनद्या ओसंडल्या

-पिंपळगाव बहुला येथे पुलावरून पाणी गेल्याने त्र्यंबकरोडची वाहतूक विस्कळीत

-पाथर्डी परिसरात घरांमध्ये शिरले पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रांसह डेटाची चोरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील सीएट कंपनीजवळील जे. एम. इंजिनीअरिंग कंपनीत शनिवारी रात्री सुटीची वेळ साधत अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील महत्त्वाच्या कागदपत्रांसह व कॉम्प्युटरमधील डेटा चोरुन नेला. कंपनीने गैरव्यवहार करणाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप कंपनीच्या संचालक सोनिया चंगराणी यांनी केला आहे.

ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज असलेल्या या कंपनीत झालेल्या चोरीत मॅनेजिंग डायरेक्टर, अकाउंट विभाग व मालकांच्या केबिनच्या काचा फोडून ही चोरी करण्यात आली. चोरट्यांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचा डेटाही चोरुन नेला. सुरक्षारक्षक असताना ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमएस प्रोजेक्ट आता राज्यभरात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविलेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्य सरकारने सर्वच जिल्हा परिषदांमध्ये ही प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विषयक कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी सी-डॅक या केंद्र सरकारच्या संस्थेकडून हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. मोजमाप, देयके नोंदविणे ही बांधकामविषयक कामे यामुळे आता सोपी जाणार आहेत.

या प्रणालीसाठी ग्रामविकास विभागाने १ कोटी ८५ लाख रुपयांच्या खर्चास २२ जून २०१८ रोजी मान्यता दिली होती. त्यासाठी सी-डॅकसोबत करारही केला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा या प्रकल्पांच्या कामांची मोजमाप पुस्तिका या सिस्टिमद्वारे संगणकीकृत पद्धतीने राबविली जाणार आहे. बांधकाम विभागाचे मोजमाप बऱ्याच वेळा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यात होणारे गैरप्रकारही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. नाशिक येथे जिल्हा परिषदेमध्ये ही कामे यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे त्याची उपयुक्तता विचारात घेऊन राज्यभर अंमलबजावणीचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

या अॅप्लिकेशनमुळे प्रिंटआउट काढून मोजमाप पुस्तिकेला लावणे शक्य होणार आहे. संगणकीकृत प्रिंट आउट असल्यामुळे यात कोणताही बदल झाल्यास तो दिसणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेला मार्चअखेर या प्रणालीचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने त्यावर काम करण्यात आले. त्यात कोणत्याही अडचणी न आल्याने आता ही सिस्टीम राज्यात बसविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमई, एमटेकसाठी अर्जप्रक्रिया सुरू

0
0

एमई, एमटेकसाठी अर्जप्रक्रिया सुरू

११ जुलैपर्यंत मुदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंगचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची सन २०१९-२०साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रविवारपासून या अभ्यासक्रमासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून ११ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

पदव्युत्तर शिक्षणासाठी इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांकडून एमई, एमटेक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जाते. सरकारी, सरकारी अनुदानित, विद्यापीठ संलग्न संस्था, विद्यापीठ संलग्न विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून याची माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, ८ जुलै ते १२ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे असणार आहे. १४ जुलै रोजी वेबसाइटवरच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार असून १५ व १६ जुलै रोजी तक्रारी असल्यास त्या विद्यार्थ्यांनी कळवायच्या आहेत. १७ जुलै रोजी अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये तर इतरांसाठी ८०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षाविहाराला उधाण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निसर्गाच्या सानिध्यात चिंब भिजण्याची संधी साधत नाशिककरांनी रविवारची सुटी एन्जॉय केली. जलधारांबरोबरच पर्यटकांच्या उत्साहालाही उधाण आले होते. इगतपुरी तालुक्यातील भावली आणि त्र्यंबकेश्वरमधील पहिणेचा परिसर रविवारी (दि. ७) पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

'पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही, या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता' या कवितेच्या ओळी सार्थ ठरविणाऱ्या पावसाने रविवारी (दि. ७) नाशिकमध्ये दमदार हजेरी लावली. दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या तीव्र चटक्यांनी त्रासल्यानंतर पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद निराळाच. पावसाच्या जोरदार सरी आणि रविवारची सुटी असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने नागरिकांनी वर्षाविहारास प्राधान्य दिले.

पावसात चिंब भिजण्यासाठी आणि त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिक त्र्यंबकेश्वर, इगतपुरीकडे मार्गस्थ झाले. त्र्यंबकरोडवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्र्यंबकरोडवर पिपंळगाव बहुल्याच्या पुढेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्र्यंबकेश्वर-घोटी रस्त्यावरील पहिणे परिसरात धबधबे खळाळून वाहू लागल्याने पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरातही पावसाचा जोर कायम असल्याने पर्यटकांनी येथील निसर्गाविष्कार अनुभवण्यासाठी गर्दी केली.

सोमेश्वरकडे धाव

गोदावरी नदी पात्रामधील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी गोदाघाटाकडे धाव घेतली. पाण्याची वाढलेली पातळी पाहण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलावरही नागरिकांनी गर्दी केली. सोमेश्वर येथील धबधब्याचा निसर्गाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी सोमेश्वर परिसरातही गर्दी केली होती. नवशा गणपती, बालाजी मंदिर परिसरही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

भजी अन् कणसावर ताव

पावसाच्या सरी अंगावर झेलत गरमागरम भजीवर ताव मारण्यासही पर्यटकांनी पसंती दिली. वर्षाविहारासाठी घराबाहेर पडणारे पर्यटक गरमागरम खाद्यपदार्थांवर ताव मारण्याचे नियोजन करतात. पहिणे, भावली, त्र्यंबकरोड परिसरात भजी, मक्याचे कणीस, चहाची अनेकांनी दुकाने थाटली. येथील गरमागरम खाद्य पदार्थांवर यथेच्छ ताव मारत पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी रोडवरील हॉटेल व्यावसायिकांनीही यामुळे चांगली कमाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षासंपाला पाठिंबा; सहभाग नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई, ठाणे या महानगरांसह राज्यातील अनेक शहरांमधील रिक्षाचालकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून (दि. ९) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शविला असला तरी मंगळवारी संपामध्ये सहभागी होणार नसल्याचे श्रमिक रिक्षा सेनेच्या वतीने सांगण्यात आले. रिक्षा चालकांच्या शहरातील अन्य संघटनांशी चर्चा करून संपामधील सहभागाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

भाडेवाढ करण्यास परवानगी मिळावी, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्ये संपाची सूचना उशिरा प्राप्त झाल्याने सर्व रिक्षाचालकांपर्यंत संपाचा मेसेज पाठविणे शक्य झाले नसल्याची माहिती श्रमिक रिक्षा सेनेचे भगवान पाठक यांनी सोमवारी दिली. त्यामुळे मंगळवारी रिक्षाचालक संपात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु लवकरच सर्व रिक्षा चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपामध्ये सहभागी व्हावे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतराचे ‘भूत’ मानगुटीवरच!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्यासह बँकेतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भूतबाधेने पुन्हा झपाटले असून, द्वारकेवरील मुख्यालयातील काही विभागांचे रविवारी पुन्हा सीबीएस येथील बँकेच्या जुन्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मुख्यालयाची जागा कब्रस्तानची असून, येथील भुताटकीमुळे बँक आर्थिक डबघाईस आल्याचे सांगत संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, 'मटा'ने ही भुताटकी चव्हाट्यावर आणल्यानंतर ते थांबविण्यात आले होते.

रविवारी अचानकपणे जिल्हा बँकेतील काही विभागांचे पुन्हा जुन्या कार्यालयात स्थलांतर करण्यात आले. नवीन इमारतीमधील तीन विभागांची कागदपत्रे व खुर्च्या हलवण्यात आल्या. त्यानंतर या स्थलांतराचा विषय सर्वत्र चर्चिला गेला. जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली असली तरी त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे त्यांचा जागेचा कवडीचाही संबंध नाही, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी मांत्रिकाला बँकेत बोलावण्यात आले होते. व्दारका येथील इमारत १२ कोटी रुपये खर्च करून बांधली आहे. तेथे सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे केवळ वास्तुदोषाचे कारण पुढे करून स्थलांतर करण्यामुळे बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर सर्वत्र टीका होत आहे.

राज्यात अंधश्रद्धा निर्मूनलाचा कायदा झाल्यानंतरही अशा अंधश्रद्धा पाळल्या जातात ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. आम्ही याअगोदर बँकेला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी.

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून भाजपला 'गुगली'

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्थायी समितीवरील भाजपच्या कोट्यातील एका रिक्त जागेसाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच असताना शिवसेनेने भाजपला पुन्हा युतीधर्माची आठवण करून देत रिक्त जागेवर 'रिपाइं'ला संधी देण्याची मागणी करीत 'गुगली' टाकला आहे. भाजप आता तो कसा टोलवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यात 'रिपाइं' युतीसोबत असल्याने दीक्षा लोंढे यांना स्थायीच्या सदस्यपदाची संधी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांसह भाजपच्या शहराध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे भाजपची पुन्हा कोंडी झाली असून, आधीच पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एका सदस्याची निवड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. स्थायी समितीच्या एका रिक्त जागेसह चार विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी आज, मंगळवारी (दि. ९) विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. प्रभाग '१० ड'मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपचे स्थायी समितीमधील बहुमत धोक्यात आले होते. १२१ सदस्य संख्येनुसार स्थायीमध्ये शिवसेनेचा एक सदस्य वाढणार होता. त्यासाठी शिवसेनेने हायकोर्टापर्यंत धाव घेतली होती. परंतु, भाजपने आस्तेकदम भूमिका घेत प्रभाग १० ची पोटनिवडणूक बिनविरोध करवून घेत संख्याबळ कायम राखले. त्यामुळे शिवसेनेचा स्थायीवरचा दावा फेटाळला गेला आहे. परंतु, तरीही शिवसेनेने या पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने सातपूर प्रभाग समितीचे सभापतिपद पदरात पाडून घेतले. मात्र, स्थायी समितीचे सदस्यपद न मिळाल्याची सल कायम राहिलेल्या शिवसेनेने पुन्हा भाजपसमोर गुगली टाकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज तार पडल्याने चार जनावरे दगावली

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील खर्डा मार्गावर गोठ्यावर विजेची तार पडल्याने तीन म्हशींसह गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली. तार पडल्यानंतर २० ते २५ मिनिटे डीपी ट्रिप न झाल्याने व तारा देवळा-खर्डा रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने हा थरार सुरूच होता. महावितरणच्या या कारभारामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर घटना अशी, की कळवणहून देवळ्यासाठी १९६७ मध्ये वीजवितरण कंपनीकडून सदरच्या तारा टाकल्या आहेत. यातील जीर्ण झालेल्या तारा बदलण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात तारांमध्ये संघर्ष होऊन प्रचंड जाळ झाला होता. अशाच प्रकारे तारांचा पुन्हा संघर्ष झाल्याने सोमवारी देवळा येथील प्रगतिशील शेतकरी परशराम आहेर, जनार्धन आहेर व मनोज आहेर यांच्या शेतातील गोठ्यात वीजप्रवाह उतरला. यात तीन म्हशी आणि एक गाय जागीच ठार झाली. या दुर्घटनेत महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे चार लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप आहेर कुटुंबियांनी केला आहे. सुमारे २५ जणांचे कुटुंब वास्तव्यास असलेल्या आहेर कुटुंबियांचे कुणीही घराबाहेर नसल्याने मोठा अनर्थ टळला. मनोज आहेर हे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले; मात्र वीज तारांच्या संघर्षात प्रचंड आवाज झाल्याने त्यांनी गोठ्यात बाहेर पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. महावितरणकडे याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही तारा न बदल्याने जनावरे दगावल्याची घटना घडली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप मनोज आहेर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीच्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचा रस्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळागाव येथील शाळा क्रमांक ८३ मध्ये इयत्ता नववीचे सुरू करण्यात आलेले वर्ग बंद करण्याची सूचना मनपा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्यानंतर उपस्थित ५५ विद्यार्थ्यांना सोमवारी वर्गाबाहेर काढण्यात आले. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन २१ दिवस उलटून गेल्यावर हा निर्णय घेण्यात आल्याने वर्गातील ८० विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या परिसरातील जमिलभाई मोहंमद हनिफ रंगरेज यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, आज (दि. ९) दुपारी ४ वाजता विद्यार्थी आयुक्तांना भेटण्यास जाणार आहेत.

निवेदनानुसार, १ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात तत्कालीन शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाळा क्रमांक ८३ मध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गात ८० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना बसण्यासाठी बाके, अभ्यासासाठी पुस्तके आणि शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याची परिस्थिती आहे. वडाळा गावातील रहिवासी अत्यंत गरीब परिस्थितीत मजुरी, धुणी-भांडी करुन किंवा भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे अल्पसंख्याक, बहुजन व मागासवर्गीय विद्यार्थी असून, त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- -

नववीच्या वर्गात ८० विद्यार्थी आहेत. अचानक वर्ग बंद करण्याची सूचना विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? प्रत्येकाकडून शिक्षणकर घेतला जातो. मात्र, इमारतीचा निधी कुठे खर्च केला जातो, याची उत्तरे मिळाली पाहिजेत.

\B- जमिलभाई मोहंमद हनिफ रंगरेज, नागरीक

\B- -

यंदा कोणत्याही नवीन वर्गांना परवानगी देण्यात आलेली नाही. नवीन वर्ग सुरू करायचे असल्यास पुरेशा भौतिक सुविधा असणे गरजेचे आहे. या वर्गात त्या सुविधा नसताना परस्पर वर्ग सुरू करण्यात आले आहे. येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजित करण्यात येईल.

\B- देवीदास महाजन, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांना खातेप्रमुखांचे ‘अभय’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भ्रष्टाचार मुक्तीच्या शपथा घेणाऱ्या सरकारमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उच्च सरकारी अधिकारीच आपल्या अधिनस्थ लाचखोर अधिकाऱ्यांमार्फत (एसीबी) होणाऱ्या कारवाईला 'खो' घालत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच राज्यात लाचखोरीची कारवाई झालेले ३०६ प्रकरणे अभियोगपूर्व (खटला) मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकारी व सरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एखाद्या लाचखोरावर कारवाई केल्यानंतर त्याची चौकशी करून खटला दाखल करण्यासाठी 'एसीबी'ला सरकार किंवा त्या अधिकाऱ्यांच्या विभाग प्रमुखांची परवानी घ्यावी लागते. तसेच, 'एसीबी'कडून संबंधित विभाग प्रमुखांकडे किंवा सरकारकडे खटला दाखल करण्यासाठी मंजुरी मागितली जाते. तसेच, विभाग प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला जातो. साधारण ९० दिवसांमध्ये विभाग प्रमुखांनी खटला दाखल करण्यास परवानगी द्यावी, अथवा नाकारावी लागते. नाकारल्यानंतर त्याचे ठोस कारण देखील द्यावे लागते. पण, विभागप्रमुख अशा प्रकरणात लवकर मंजुरी देत नसल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत ९० दिवसांमध्ये पेक्षा जास्त काळात परवानगी न दिलेली १७२ प्रकरणे संबंधित विभागाच्या प्रमुखांकडे मंजुरीसाठी पडून आहेत; तर, ९० दिवसांच्या आतमधील १३४ प्रकरणे पडून आहेत. यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांकडे २२० व सरकारकडे ८७ प्रकरणे पडून असल्याची माहिती 'एसीबी'ने दिली. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे गृहविभाग ५२, महसूल ४९, ग्रामविकास३६, नगरविकास २३, जलसंपदा १८, वनविभागाची ११ प्रकरणे प्रलंबित आहेत.

'चौकशीचे स्वातंत्र्य परत मिळावे'

'ना खाऊंगा न खाने दूंगा' अशी शपथ घेतलेल्या सरकारनेच गेल्या वर्षी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याचे 'एसीबी'चे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. अशा चौकशीसाठी देखील संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांची परवानगी घेतल्याशिवाय 'एसीबी' चौकशी करू शकणार नसल्याची तरतूद करण्यात आली आहे. 'एसीबी'च्या पुणे विभागाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे विविध सरकारी, निमसरकारी खात्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांचा तपास करण्यासाठी जून २०१९ पर्यंत किती प्रकरणात चौकशीची मागणी केली. किती विभाग प्रमुखांनी चौकशीला परवानगी दिली, अशी माहिती सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारली होती. त्या वेळी पुणे 'एसीबी'ने ५३ प्रकरणात संबंधित विभाग प्रमुखांकडे चौकशीची मागणी केली. पण, आजपर्यंत एकाही विभाग प्रमुखाकडून उत्तर दिले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे सरकाराने कायद्यात अशी घातक दुरुस्ती का केली, हा प्रश्न पडला आहे. या तरतुदींचा गैरफायदा घेऊन विभाग प्रमुख आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांची चौकशीच होऊ देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कायद्यातील ही दुरुस्ती तत्काळ रद्द करून 'एसीबी'ला भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे स्वातंत्र्य परत मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावेत, ही मागणी विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व खासदार गिरीश बापट यांना केली आहे.

मनपा आयुक्तांकडूनही परवानगी नाहीच

'पुणे महानगरपालिकेकडे ऑक्टोबर २०१८ ते मे २०१९ दरम्यान 'एसीबी'ने किती प्रकरणात चौकशीची परवानगी मागणारी पत्रे पाठविली व मनपा आयुक्तांनी किती जणांच्या चौकशीला परवानगी दिली, अशी विचारणा माहितीच्या अधिकाराखाली 'एसीबी'कडे केली होती. त्या वेळी 'एसीबी'ने मनपा आयुक्तांकडे १४ प्रकरणात चौकशीची मागणी केली होती. त्यापैकी एकाही प्रकरणात मनपा आयुक्तांनी उत्तर दिले नसल्याचे उत्तर 'एसीबी'ने माहिती अधिकारात दिले आहे,' अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांसाठी नगरसेवक नाखूश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीसह चार विषय समित्यांच्या ३६ सदस्यांच्या निवडीसाठी आज, मंगळवारी (दि. ९) विशेष महासभा होणार आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही आमदारांना आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याची संधी भाजपने दिली आहे. या समित्यांना अधिकार नसल्याने त्यावर जाण्यासाठी नगसवेक मात्र नाखूश असल्याचे चित्र आहे.

पूर्व विधानसभा मंतदारसंघातून आठ, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांतून प्रत्येकी सहा नगरसेवकांना विषय समित्यांवर जाण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, स्थायी समितीतील एका रिक्त जागेसह महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा, विधी आणि आरोग्य व वैद्यकीय अशा चार समित्यांच्या ३६ सदस्यांच्या निवडीसाठी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होत आहे. प्रभाग '१० ड'ची पोटनिवडणूक झाल्याने भाजपने एका जागेसाठी आपल्या सदस्याची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून स्वाती भामरे किंवा संभाजी मोरुस्कर यांची नियुक्ती झाल्यास सभापतिपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याचीच शक्‍यता आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभापतिपदासाठी गणेश गिते यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा असली, तरी पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांत सभापतिपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

--

चार समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्य

या चार समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून, प्रत्येक समितीवर भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेपैकी एका सदस्याची नियुक्ती होईल. सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी दिवसभर महापौरांच्या निवासस्थानी नावे देण्याची लगबग सुरू होती. चार समित्यांवर भाजपच्या एकूण वीस सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यानुसार सर्वाधिक पूर्व म्हणजेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघातील आठ सदस्य निवडले जातील, तर मध्य व पश्‍चिममध्ये प्रत्येकी सहा भाजप सदस्यांची नियुक्ती होईल. दोन सभापती पूर्वकडे, तर प्रत्येकी एक सभापतिपद मध्य व पश्‍चिम मतदारसंघाकडे जाणार असल्याचीही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काझी गढीवासीयांचे पुनर्वसन?

0
0

आ. फरांदे यांचे आयुक्तांना साकडे; कागदपत्र तपासणीनंतर मनपा घेणार निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जुन्या नाशकातील काढी गढीवासीयांना चुचांळे शिवारात घरकुल द्यावे, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली. कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याने काझी गढी रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीसाठी आमंत्रित न केल्याने स्थानिक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली करीत हा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप केला आहे.

जोरदार पावसामुळे काझी गढीतील रहिवाशांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या मदतीने गढीवरील ५९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. मात्र, पुनर्वसनाचा प्रश्न कायम राहिल्याने आ. फरांदे यांच्या नेतृत्वाखालील काझी गढीवासीयांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी महापौर रंजना भानसी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील हेही उपस्थित होते. गढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी फरांदे यांनी केली. ४०-५० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या गढीवासीयांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा अथवा म्हाडाच्या घरकुल योजनेचा लाभ देणे शक्य आहे का, याविषयीही चर्चा झाली. घरकुल योजनेअंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात काझी गढीवरील रहिवाशांनी अर्ज भरले आहेत. मात्र, खासगी मालकीच्या जागेवर घरकुले उभारण्याच्या वर्गवारीतील हे अर्ज असल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचा लाभ मिळू शकेल. परंतु, घरकुलाचे हप्ते कोण भरणार यावरून ही चर्चा फिसकटली. त्यामुळे चुंचाळे घरकुल योजनेचा मुद्दा चर्चेला आला. इथे घरकुले शिल्लक नसली तरी, अद्याप घरे ताब्यात घेतली नाहीत अशा लाभार्थींऐवजी गढीवरील रहिवाशांना घरे देण्याची मागणी आ. फरांदेनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन पर्यायी घरकुलांचे कागदपत्रे तपासून निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. या बैठकीपासून टाळण्यात आल्याने स्थानिक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गढीची मालकी सरकारकडे

काझी गढीच्या मालकी हक्कावरून वेगवेगळे दावे समोर येत आहेत. सरकारने १९१७ मध्ये ९९ वर्षांच्या कराराने बलसारा यांना गढीची जागा शेतीसाठी दिली होती. बलसारा यांनी ती जागा काझी यांना दिली. २०१६ मध्येच कराराची मुदत संपुष्टात आली असल्याने या गढीची मालकी पुन्हा सरकारची झाल्याचा दावा आ. फरांदे यांनी केला. यावर गढीच्या मालकी संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गमे यांनी दिली.

काझी गढीतील रहिवाशांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची गरज आहे. त्यासाठी घरकुल योजनांचा चांगला पर्याय आहे. त्याची तपासणी करून तातडीने निर्णय घ्यावा लागेल. याबाबत कुणीही राजकारण करू नये.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

आयुक्तांसोबतच्या बैठकीला स्थानिक नगरसेवकांनाही बोलवायला हवे होते. त्यांच्यात झालेली बैठक हा निवडणूक स्टंट आहे. भाजपचे आमदार शहरात सध्या चित्रपट कलाकारांप्रमाणे अॅक्टिंग करत आहेत. निवडणुका संपल्या की, या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो.

- शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅग लिफ्टिंगमध्ये आंतरराज्य टोळी

0
0

दोन सराईत जेरबंद; १२ लाखांची रोकड हस्तगत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियोजित पद्धतीने व्यापाऱ्याच्या कारमधील २१ लाखांची रोकड हातोहात लंपास करणाऱ्या गुजरातमधील आंतरराज्यीय सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. गँगमधील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १२ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

शिसेदिया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड (रा. छारानगर) आणि रवी उर्फ रविया इंद्रेकर (रा. कुबेरनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. १२) पोलिस कोठडी सुनावली आहे. चोरीची घटना २८ जून रोजी ही घटना घडली होती. पंचवटीतील व्यापारी सुयोग सुभाष धुत हे चिंचबनकडून रामवाडीकडे आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना बॅग लिफ्टिंग झाली होती. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी कार अडवित दुचाकीस कट का मारला, या कारणातून धुत यांच्याशी वाद घातला. यात धुत यांना गुंतवून ठेवत चोरट्यांच्या अन्य साथिदारांनी कारची काच फोडून २१ लाख ५० हजार रुपये असलेली लेदर बॅग हातोहात लांबविली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा शोध घेत असतांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही महत्त्वाचे दुवे क्राइम ब्रँचच्या हाती लागले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली.

युनिट एकचे पथक पाच दिवस गुजरात राज्यात तळ ठोकून होते. अहमदाबाद नजिक छारानगर परिसरातून शनिवारी मध्यरात्री दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून त्यांच्या वाट्याला आलेले १२ लाख रुपये हस्तगत केले. संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये गुन्हे दाखल आहेत. संशयितांच्या उर्वरीत साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील उपस्थित होते.

सराईत गुन्हेगाराच्या बचावासाठी विरोध

पोलिसांनी अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. छारानगर परिसरातील या गुन्हेगारांची मोठी वस्ती आहे. बेकायदा दारू विक्री व बॅग लिफ्टिंग एवढाच उद्योग येथे सुरू असतो. युवा वर्गापासून वयस्करांपर्यंत सर्वच व्यक्ती अशा गुन्ह्यांमध्ये अडकलेले असतात. क्राइम ब्रँचचे पथक संशयितांना अटक करण्यासाठी मध्यरात्री पोहचली होती. मात्र, तरीही किमान शंभर ते दीडशे महिला व पुरुषांनी विरोध करीत संशयितांना पळून जाण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी सावधनता दाखवित त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.

गुन्ह्यातील काही संशयितांचा शोध सुरू आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुठली होती, वाहनात पैसे आहे, ही टीप त्यांना कशी समजली, स्थानिक पातळीवर काही मदत मिळाली का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या शोधली जात आहेत.

- अमोल तांबे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरींनी ओलांडली सरासरी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी रात्रीनंतर ओसरला. या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात चार जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून, देवळा तालुक्यात गोठ्यावर विजेची तार पडून चार जनावरे दगावली आहेत. याशिवाय २७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिक तालुक्यात जुलै महिन्यातील सरासरीच्या १११ टक्के एवढा विक्रमी पाऊस पहिल्या आठवड्यातच झाला आहे.

रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ७२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये २००, दिंडोरीत ११६, नाशिक तालुक्यात १०२ मिमी पाऊस नोंदविला गेला. सिन्नरमध्ये ७९, इगतपुरीत ६३ तर सुरगाणा तालुक्यात ५६.१ मिमी पाऊस झाला. नांदगाव, देवळा आणि मालेगाव वगळता अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरू होती. परंतु, रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर ओसरला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह अनेक तालुक्यांमध्ये सकाळी सूर्यदर्शन झाले. सोमवारी दिवसभर कधी संततधार तर कधी पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. नदी, नाले भरून वाहात असून, रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यात भाताची रोपे दाबली गेली आहेत.

आठ जनावरे दगावली

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रविवार पावसाचा जोर अधिक होता. यामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात चार जनावरे वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर देवळा तालुक्यातील देवळा-खर्डा रस्त्यावरील एका गोठ्यावर विजेची तार पडून शॉर्ट सर्कीट झाल्याने तीन म्हशी व एका गायीचा मृत्यू झाला. या पावसामुळे एकूण २७ घरांची पडझड झाली असून त्यामुळे संबंधित रहिवाशांचा संसार उघड्यावर आला आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक १७ घरांचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यात सात तर पेठ आणि येवला तालुक्यात प्रत्येकी एका घराची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जायकवाडीत एक टीएमसी पाणी

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येवला तालुक्याला लागून असलेल्या कोपरगाव, वैजापूर येथील बंधाऱ्यांमधील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. १ जून ते ८ जुलै या सव्वा महिन्याच्या कालावधीत नाशिकहून जायकवाडी धरणामध्ये ९४८ दशलक्ष घनफूट म्हणजेच सुमारे एक टीएमसी पाणी गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्भया पथकाकडे आता स्पाय कॅमेरे

0
0

संशयित टवाळखोरांच्या हालचालींर राहणार नजर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

टवाळखोरांना रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकाला आठ स्पाय कॅमेरे उपलपब्ध झाले असून, त्याचा लवकरच वापर सुरू केला जाणार आहे. यापूर्वी निर्भया पथकातील महिला कर्मचारी मोबाइलद्वारे टवाळखोरांचे चित्रण करीत होते. मात्र, त्यात काही अडचणी निर्माण होत होत्या.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने शहरात निर्भया पथकाची स्थापना झाली आहे. तीन किंवा चार पोलिस ठाणे हद्द मिळून एक पथक कार्यरत आहे. या पथकात एक महिला पोलिस अधिकारी व चार महिला पोलिस कर्मचारी तैनात असतात. टवाळखोरांवर लक्ष ठेवणे, छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंद करणे असे एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे पथक काम करते. विशेष म्हणजे पथकाकडून संशयित टवाळखोरांचे चित्रण केले जाते. निर्भया पथकातील सर्वच कर्मचारी साध्या वेषात असतात. यापूर्वी सदर काम करण्यासाठी पथकाला मोबाइल देण्यात आले होते. त्याआधारे महिला कर्मचारी संशयित टवाळखोरांच्या हलचाली टिपत असे. मात्र, मोबाइलवर शुटींग करताना काही अडचणींना त्यांना समोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाने निर्भया पथकासाठी आठ स्पाय कॅमेरे उपलब्ध करून दिले आहे. त्यांचा वापर लवकरच सुरू केला जाईल, असे निर्भया पथकाच्या समन्वयक आणि सहायक पोलिस निरीक्षक भावना महाजन यांनी सांगितले. प्रत्येक पथकाला दोन कॅमेरे मिळणार आहे. या कॅमेऱ्यांचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण पथकातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे. स्पाय कॅमेऱ्यामुळे टवाळखोरांच्या हालचाली सहजतेने आणि अगदी जवळून टिपल्या जातील. या व्हिडीओमुळे पुरावा देखील तयार होतो. एखाद्या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन टवाळखोरांविरूद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतात. निर्भया पथकाद्वारे प्रतिबंद करण्याबरोबर जनजागृतीही केली जाते. हे व्हिडीओ रेकॉर्डींग टवाळखोरांच्या घरच्यांना दाखविण्यासाठी उपयोगी पडतात. समुपदेशन हा महत्त्वाचा भाग असून, त्याचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

महिलांनी तक्रारींसाठी पुढे यावे

निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत भावना महाजन यांनी सांगितले, की 'निर्भया'बाबत होणाऱ्या जनजागृतीमुळे महिलांच्या तक्रारी समोर येत आहे. समोर आलेल्या प्रत्येक तक्रारीवर कार्यवाही सुद्धा केली जाते. बऱ्याच ठिकाणी तर निर्भया पथकाची व्हॅन अथवा कर्मचारी पाहून टवाळखोर पळ काढतात. निर्भया पथकाबरोबर सर्वसामान्य महिला सुद्धा काम करू शकतात. या महिलांना सोबत घेऊन टवाळखोरांवर कारवाई करणे शक्य आहे. त्यामुळे इच्छूक महिलांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातील प्रश्नांपेखा टीव्ही मालिकेतील प्रश्न महत्त्वाचे

0
0

अॅड. रामतीर्थकर यांनी व्यक्त केली चिंता

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

एकत्र कुटुंब पद्धतीचा सर्वत्र लोप होत असल्याने नाती दुभंगत आहेत. घरातल्या प्रश्नांपेक्षा टीव्ही मालिकेतील प्रॉब्लेम अती महत्त्वाचे वाटू लागले असल्याने स्त्रियांनी आता जागरूक होत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. घर, संसार व कुटुंबाला वेळ देत सक्षम पिढी घडवावी, असे प्रतिपादन अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी मनमाड येथे केले.

परशुराम प्रतिष्ठानतर्फे आयोजित गुणगौरव व व्याख्यान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सीतालक्ष्मी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर कुलकर्णी होते. व्यासपीठावर त्यांच्यासह पुरुषोत्तम दिंडोरकर, प्रसाद दिंडोरकर, रोहित कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, हेमंत लाळे आदी उपस्थित होते.

अॅड. रामतीर्थकर यांनी विविध दाखले देत कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याचे सांगितले. घराघरातून मासाहेब जिजाऊ निर्माण व्हाव्यात असे त्यांनी सांगितले. प्रत्येक आईमध्ये शिक्षक दडलेला हवा आणि शिक्षकांमध्येही आई दडलेली असावी, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग कुटुंबव्यवस्था बळकट करण्यासाठी केला आहे का? असा सवाल त्यांनी महिलांना केला महिला सक्षमीकरण मान्य पण ते कुटुंबाला धरून असावे, त्यांना सोडून नव्हे असे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी अध्यक्ष समीर कुलकर्णी यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. रोहित कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे ब्राह्मण समाजातील ५ वी ते १२ वी तसेच महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images