Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झिप झॅप झूम - माहित आहे का ?

$
0
0

जगातील सर्वात मोठा साप - अॅनाकोंडा

प्राचार्य डॉ. किशोर पवार

सापाचं नाव काढलं म्हणजे बहुतेक जण घाबरतात. तो दिसला तर मग विचारायलाच नको. भीतीने कित्येकांना घाम फुटतो. खरं तर साप आपले शत्रू नसून मित्रच आहेत. ते पिकांची नासाडी करणाऱ्या किटकांचा व उपद्रवी उंदरांचा फडशा पाडतात. जगात पाच टक्क्यांपेक्षा कमी साप हे विषारी असून ९५ टक्के साप हे बिनविषारी आहेत.

सापाला डिवचल्याशिवाय तो शत्रूवर हल्ला करीत नाही. जगात अनेक जागीचे रंगीबेरंगी, लहान मोठे साप आहेत. अजगराला आपण सर्वात मोठा साप समजतो. परंतु, अॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप असून त्याची लांबी वीस ते तीस फूटापर्यंत असते. दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या या सापाला हिरवा अॅनाकोंडा म्हणतात. त्याचे वजन ५५० पौंड म्हणजे २५० किलोग्रॅम एवढे असते. त्याच्या शरीराचा व्यास एक फूट असतो. हा साप जलचर असून उत्तमपणे पाण्यात पोहतो. मादी अॅनाकोंडा ही नरापेक्षा मोठी असते. हा साप दलदल, तळी व संथ वाहणाऱ्या झऱ्यात आढळतो. अॅमेझॉनच्या वर्षा वनांमध्ये तो आढळतो. जमिनीवर सरपटणे काहीचे त्रासाचे असते. त्याचे डोळे व नाकपुड्या डोक्यावर असतात. त्यामुळे पाण्यात राहून भक्ष्य शोधता येते. त्यांचे भक्ष्य म्हणजे रानडुक्कर, हरणे, कासव, पक्षी, कॅपीबारा, केमन मगर व जग्वार हे आहेत. हा साप बिनविषारी असून भक्ष्याला पकडून आवळून ठार मारतो व नंतर हळूहळू गिळतो. त्याचा विळखा एवढा मजबूत असतो की भक्ष्य गुदमरून मरते. भक्ष्य गिळल्यावर अनेक आठवडे किंवा महिने अन्नाविना राहू शकतो. साप अंडी देतात. परंतु या सापात अंडी शरीरात असतात. दोन ते तीन डझन पिलांना मादी जन्म देते. जन्माच्या वेळी त्यांची लांबी २ फूट असते. ते चटकन पाण्यात पोहतात व भक्ष्य पकडतात. हा साप दहा वर्षांपर्यंत जगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनसंपर्क महासंचालनालयात करा इंटर्नशिप

$
0
0

जनसंपर्क महासंचालनालयात करा इंटर्नशिप

निवडणार १८ उमेदवार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपकरिता अठरा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज नोंदणी सुरु झाली असून इच्छुकांना २० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. इंटर्नशिपसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना केवळ ११ महिन्यांसाठी मानधन तत्वावर काम दिले जाईल, असे महासंचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची इंटर्नशिपकरिता मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी www.maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करावी, असे महासंचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे. निवड झालेल्या आलेल्या उमेदवारांना प्रति महिना सुमारे २२ हजार रुपयांपेक्षा मानधन देण्यात येईल. तसेच अखेरीस प्रमाणपत्र देण्यात येईल. ही इंटर्नशिप संहिता लेखक पदाच्या ९ जागा, सोशल मीडियासाठी संहिता लेखक पदाच्या ३ जागा, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यक पदाच्या प्रत्येकी २ जागांसाठी असेल. यासाठी उमेदवाराकडे स्वत:चा अत्याधुनिक स्वरुपाचा लॅपटॉप असणे आवश्यक असून, पदवी ५० गुणांनी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज नोंदणी करु शकतात. इंटर्नशिपकरिता माहिती व जनसंपर्क पद‌वीधारक आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. व्हिडिओ एडिटर जागांसाठी व्हिडिओ एडिटिंग पदवीधारक आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यक जागांसाठी बी.ई, एम.एससी आयटी, एम. टेक पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच ही इंटर्नशिप शासकीय सेवा नसल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ इंटर्नशिप करणाऱ्यांना मिळणार नाही, असे महासंचालनालयाने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला

$
0
0

गोदा पात्रासह धरणांमधील पाणी पातळीत वाढ

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने मुक्काम ठोकला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने धरणांमधील पाणी पातळी वाढली आहे. मुंबई हवामान विभागाने पुढील तीन तासांत अतिवृष्टिचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने नाशिकमध्ये मुक्काम ठोकला आहे. शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे नाशिककरांची रविवारची सकाळ पावसा समवेतच उगवली. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ६४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये १३५ मिलीमीटर तर इगतपूरीत १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. गंगापूर धरण समूहाचे हे पाणलोट क्षेत्र असून या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदवर्षा!शहरात तब्बल २४ तास पावसाच्या जोरदार

$
0
0

आनंदवर्षा!

शहरात तब्बल २४ तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने नाशिककरांना हायसे वाढले. या आनंदसरींचे सर्वांनी स्वागत केले असले तरी जागोजागी पाणी तुंबल्याने अनेकांची दाणादाण उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची जोरदार बॅटिंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवार रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने रविवारी शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते, मोकळी मैदाने आणि घरांमध्येही पाणी साचल्याने सारे शहरच जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने दिलासा दिला. मात्र, रविवारी सकाळी सारे शहरच जलमय झाल्याने शहरवासीयांची तारांबळ उडाली. उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांना पाटाचे स्वरूप आले होते. रविवार कारंजावरून बोहरपट्टीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधीरोड, चांदवडकर गल्ली, जुने नाशिक परिसरातून वाहत असलेल्या पाण्यामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली होती. सायंकाळपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी पोहोचले होते. त्यामुळे आपत्कालीन विभागाने रामसेतूजवळील व्यावसायिकांना आपल्या टपऱ्या काढून घेण्याच्या सूचना केल्या. नदीपात्रालगत असलेल्या रहिवाशांनादेखील इतरत्र हलविण्यात आले. गंगापूररोड परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या वतीने वाहनांद्वारे खबरदारीच्या सूचना देण्यात येत होत्या.

शहरातील बहुतांश सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मागील पावसात सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्याची पुनरावृत्ती यावेळीदेखील झाली. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन चेंबरलगत साचलेली घाण काढल्याने पाणी वाहून गेले. भांडी बाजारातूनही पाणी वाहून गेले. मुंबई नाका भागातील कुटे मागार्वर पुन्हा पाणी साचले होते. या ठिकाणी खोलगट भाग असल्याने काही बंगल्यांमध्ये पाणी शिरले होते. हॉटेल एमराल्ड पार्कसमोर असलेल्या रस्त्यावर चेंबर तुंबल्याने रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने अनेकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. त्याचप्रमाणे शिंगाडा तलावाजवळ असलेल्या प्लास्टिक हाउस परिसरातही पाणी साचले होते. अनेक सोसायट्यांनी वाहनतळामध्ये साचलेले पाणी काढून देण्यासाठी विद्युत मोटारी लावल्या होत्या. नाशिक-पुणे महामार्गावरील बोधलेनगर परिसरात चोहेबाजूंनी पाणी येत असते, रविवारीही त्या ठिकाणी तळेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गाडगे महाराज पुलाखाली बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंग आहे. त्याचप्रमाणे काही स्थानिक लोकदेखील या ठिकाणी वाहने उभी करीत असतात. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे अनेकांची वाहने या ठिकाणी पाण्यात अडकली होती. स्थानिकांनी ती बाहेर काढण्यास मदत केली.

शहरात १३२.७ मिमी पाऊस

शहरात शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत १३२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी साडेआठपर्यंत ७०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत पुन्हा ६२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या तीन तासांत तब्बल ३५ मिलिमीटर पाऊस झाला. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती.

होळकर पुलाखालून वेगाने विसर्ग

गोदावरी नदीपात्रातील पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने सोमेश्वर धबधब्यासह होळकर पुलाच्या दिशेने वेगाने जलप्रवाह वाहत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास या पुलाच्या बंधाऱ्यातून ६,२९७ क्यूसेक गतीने विसर्ग सुरू होता. नांदूरमध्यमेश्वर येथेही सायंकाळी ८,०७० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

उंटवाडी परिसरात कोंडी

उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉल परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना कारावा लागला. रविवारचा दिवस असल्याने सिटी सेंटर मॉलमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, जोरदार पाऊस सुरू असल्याने मॉलच्या पार्किंगमध्ये पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक शहर पोलिसांनी ट्विट करून या ठिकाणी असलेल्या गाड्या काढून घेण्याच्या सूचना केल्या. येथील ग्राहकांनी या गाड्या रस्त्यावर आणून लावल्या, त्यामुळे या मार्गांनी जाणारी वाहने धीम्या गतीने जात होती. मॉल ते एबीबी सर्कल, दुसऱ्या बाजूला चांडक सर्कलपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

चिंचबनात घरांमध्ये पाणी

मालेगाव स्टॅँडकडून रामवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे चिंचबनाच्या टोकावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील लोकांना ते बाहेर काढावे लागत होते.

रिक्षावाल्यांची कमाई

शहरात बसची संख्या अपुरी असल्याने पावसाचा जोर पाहून रिक्षाचालकांनी कमाई करून घेतली. नाशिक-पुणेरोडवर एरवी २५ रुपये सीटप्रमाणे भाडे आकारले जाते. मात्र, रविवारी ३० ते ४० रुपये प्रतिसीट भाडेआकारणी केली जात होती. शालिमारला जाण्यासाठी पर्याय नसल्याने अनेक प्रवाशांना भूर्दंड बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूलमेट

$
0
0

भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये 'कालिदास दिन'

आषाढ महिन्यातील प्रथम दिवस म्हटला की संस्कृत पंडित, थोर, महाकवी कालिदासांची आठवण येते. त्यांची महाकाव्ये, खांडकाव्य या अदभूत रचना स्मरणात राहातात, याच प्रसंगाची आठवण ठेवत भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये 'कालिदास दिन' मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. डॉ. मुंजे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सर्व प्रथम विद्यालयाचे समादेशक विंग कमांडर (निवृत्त) जयेश पै, प्राचार्य एम. एन. लोहकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यातर मंचीय कार्यक्रमास सुरवात झाली. कवि कालिदासांच्या महाकाव्यावर प्रकाश टाकत अमोल परदेशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तद्नंतर गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत सादर केले. त्यानंतर कवि कालिदासांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर कवि कालिदासांच्या जीवन चरित्र प्रदर्शित करणारी चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाची सांगता संस्कृत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल परदेशी यांनी केले.

- - -

न्यू ग्रेस अॅकॅडमीत तणाव नियंत्रणावर कार्यशाळा

न्यू ग्रेस अॅकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एखादी समस्या असल्यास ती लक्षात घेऊन त्यावर लवकरात लवकर कृती करा. ठराविक मर्यादेपर्यंत दबाव हा उपयुक्त असतो. मात्र तो नियंत्रणापलीकडे गेला की, तो हानीकारक ठरतो. दबाव व तणाव यातील फरक म्हणजे नियंत्रण. विलंब झाल्यास बिघाड होण्याची शक्यता असते असे प्रतिपादन सतीश पाटील यांनी यावेळी केले. न्यू ग्रेस अॅकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्य शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राजेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी मुलांच्या बौद्धिक विकास व आत्मविश्वास याबाबत विविध टप्प्यांची माहिती दिली. या कार्यशाळेसाठी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री सुरावकर प्राचार्या परवीन शेख आणि शिक्षक वैभव सोनावणे, आदी उपस्थित होते.

- - -

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालकांसाठी कार्यशाळा

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते दहावीच्या पालकांसाठी ओरिएन्टेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पालकांना त्यांच्या पाल्यांच्या बाबतीत सजगता जपण्याची आणि त्यांच्याशी मोकळा संवाद साधणे याचे महत्व सांगण्यात आले. यात 'पाल्यांनी वेळेवर शाळेत येणे तसेच पालक-शिक्षक संघ मिटिंग किंवा कार्यक्रम इत्यादी बाबत पालकांनी सहभागी होणे' याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. पालकांनी उत्तम श्रोता होऊन त्यांच्या मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे याबाबतची जागरूकता वर्कशॉपमध्ये देण्यात आली. यादरम्यान मुलांच्या विकासासाठी शाळा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे याबाबत सर्व पालकांनी कौतुक करून शाळेचे आभार मानले.

- - -

माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे वृक्षारोपण

आजची परिस्थितीत पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे झाडे लावणे व ते जगवणे ही काळाची गरज बनली आहे. वृक्षाचे हे महत्त्व लक्षात घेता शासनाच्या ३३ कोटी वृक्षा लागवड या मोहिमेत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेने खारीचा वाटा उचलत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, शालेय पदाधिकारी, मैत्रय फाऊंडेशन माजी विद्यार्थी संघ सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्काऊट गाईड विभागाच्यावतीने देखील वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्याध्यापिका सुनंदा जगताप, पर्यवेक्षिका कुंदा जोशी, पर्यवेक्षक कैलास पाटील, शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक धोरणात स्पष्टता यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९मधील अनेक बाबी स्वागतार्ह असल्या, तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार, यात अधिक स्पष्टता असणे आवश्यक आहे. धोरण आणि त्याची अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शक तत्वे असणे आवश्यक असून, त्याचा समन्वय योग्य झाला की धोरण यशस्वी होऊ शकेल, असा सूर भारतीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावरील मुक्तसंवादात निघाला. अशोकस्तंभावरील जु. स. रुंग्टा शाळेच्या सभागृहात या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सतीश नाडगौडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे समन्वयक प्रशांत टोपे, के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य केशव नांदूरकर, गणिततज्ज्ञ गणेश गोटखिंडीकर, मानवधन शैक्षणिक संस्थेचे प्रमुख प्रकाश कोल्हे, प्रा. सुनील कुटे, डॉ. के. के. जाधव, डॉ. भास्कर ढोके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाशिक जिल्हा संयोजर सागर शेलार आदी शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा या मुक्तसंवादात सहभाग होता. शैक्षणिक धोरणासंदर्भात विविध सूचना या मान्यवरांनी यावेळी मांडल्या. या सूचना शिक्षण मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. यावेळी प्रा. सुनील कुटे म्हणाले, कोणतेही धोरण असो त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर ती अयशस्वी ठरते. धोरणात विद्यार्थी-शिक्षकाचे प्रमाण ३०:१ असे आहे. हे १५:१ असे असेल तर गुणवत्तेसाठी अधिक योग्य ठरेल. या धोरणात शिक्षणातील बाजारीकरण बंद केले जाण्यावर प्रकाश टाकला आहे, परंतु, ते कसे, यात अधिक स्पष्टता असावी. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनीही उच्च शिक्षणाविषयी मुद्दे मांडत सांगितले की, भारतात संशोधनासाठी पुरेशी आर्थिक तरतूद व संसाधने नसल्याने विद्यार्थी परदेशात जाऊन संशोधनास प्राधान्य देतात. हे भारतातच उपलब्ध करुन दिल्यास देशातील विद्यार्थी देशातच संशोधन करू शकतील. उदारमतवादी शिक्षणाचा समावेश या धोरणात केले आहे, ही बाब चांगली आहे.

यांबरोबरच, विविध तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन जोशी यांना एज्युकेशन लिडर्स अॅवॉर्ड

$
0
0

सचिन जोशी यांना एज्युकेशन लिडर्स अॅवॉर्ड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ल्ड सीएसआर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय स्तरावरील २५१ शैक्षणिक संस्थांना 'फॅब्युलस ग्लोबल एज्युकेशन लिडर्स अवार्ड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन ओव्हरसीज बँकेचे चेअरमन एम. नरसेंद्रन, इन्स्टिट्यूट ऑॅफ अडव्हान्स रिसर्च गांधीनगर संस्थेचे प्रा. राव भामिदिमरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतासह २३ देशांतून २५१ संस्थांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. इस्पॅलियर स्कूल, हेरिटेज स्कूल आणि एज्युकेशन ऑॅन व्हील्स या संस्था व उपक्रमांच्या माध्यमातून सचिन जोशी यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीरित्या पार पाडले आहे. डॉ. प्राजक्ता जोशी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक यांच्या मेहनतीतूनच हे यश मिळाल्याचेही जोशी यांनी यावेळी सांगितले. रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ भुतान, डायरेक्टर ऑफ फ्युचरलर्न (लंडन), न्यूरोसायंटिस्ट डॉ. मारलिना क्रुगर (साऊथ आफ्रिका), डॉ. थिअन (सिंगापूर), फ्रान्सिस जकॉब अरॉगोन (फिलिपाईन्स), डॉ. जॅको डिकॉन (साऊथ आफ्रिका) यांसह जगभरातील विविध देशांतील प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूरमधील जलसाठा २५ टक्क्यांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे गंगापूर आणि दारणा धरण समूहांमधील जलसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्याचा एकूण पाणीसाठाही ४ हजार २९० दशलक्ष घनफुटांवरून ७ हजार ३६८ घनफुटांवर पोहोचला आहे. म्हणजेच या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा सुमारे तीन टीएमसीने वाढला आहे.

नाशिक महानगरासह निफाड, येवला हे तालुके आणि नगर, तसेच मराठवाड्याला पाणी पुरविणाऱ्या गंगापूर धरण समूहाला पावसाचा किती लाभ होतोय याकडे केवळ नाशिककरांचेच नाही तर संबंध राज्याचे लक्ष लागलेले असते. शनिवारी सायंकाळपासून रविवारी सायंकाळपर्यंत झालेल्या पावसाने गंगापूर धरण समूहामधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत गंगापूर धरणात १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने हा पाणीसाठा १२ टक्क्यांनी वाढून २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. येथील पाणी ७५२ दशलक्ष घनफुटांवरून १ हजार ४१४ दशलक्ष घनफुटांवर गेले आहे. कश्यपी धरणातील पाणीसाठाही तब्बल ११ टक्क्यांनी वाढून १६ टक्क्यांवर पोहोचला आहे. या धरणात शनिवारी १०५ दशलक्ष घनफूट पाणी होते. आज या धरणात ३०४ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाला आहे. हीच परिस्थिती गौतमी धरणाची आहे. आळंदी धरणात शून्य टक्के पाणी होते. परंतु, या धरणातही ४५ दशलक्ष घनफूट म्हणजेच पाच टक्के पाणी आले आहे. दारणा धरण समूहालाही या पावसाचा फायदा झाला आहे. दारणा धरणातील साठा १९ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. भावलीमधील साठा २० टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर, तर मुकणे धरणातील साठा दोन टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून शनिवारी ४ हजार २९० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होते. परंतु, आजमितीस धरणांमधील हा एकूण साठा ७ हजार ३६८ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. म्हणजेच हा पाणीसाठा ३ हजार ७८ दशलक्ष घनफुटांनी अर्थात, तीन टीएमसीने वाढला आहे.

---

धरणनिहाय वाढलेला जलसाठा

--

धरण ६ जुलै (टक्के) ७ जुलै (टक्के)

--

गंगापूर १३ २५

कश्यपी ०५ १६

गौतमी ०५ १६

आळंदी ० ५

मुकणे ०२ ५

भावली २० ५८

दारणा १९ ३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

$
0
0

दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागातील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांनी माणूसकी जपत सामाजिक दातृत्व निभावले आहे. आर्थिक परिस्थितीने बेजार असलेल्या दोन हजार आदिवासी चिमुकल्यांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २५ शाळांमधील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल कदम, संदीप निमसे, सचिन बोधले, अनिल केदार, पल्लवी कोठावदे या तरुण व उच्चशिक्षित आधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ येथील साहित्य वाटप कार्यक्रमास अमृता कदम, मनिषा निमसे, उज्ज्वला बोधले, किर्ती केदार यांच्या हस्ते साहित्य मुलांच्या हाती देण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगाव, मेटघर किल्ला, सापगाव, चिकाडी, ससूणे,वाळीपाडा, पेठ तालुक्यातील गढईपाडा,वाजवड, वडपाडा, केळबारी, कोळूष्टी, देवीचामाळ, पांघुळघर, शेवखंडी, एकदरे, तोंडवळ, घुबडसाका, गांडोळे, भाटविहिरा, आमडोंगरा, हरणगाव तर सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ, सर्कलपाडा, कोटंबी, हनुमंतपाडा, बाफळून आदी दुर्गम व आदिवासी गावातील मुलांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी साहित्य वाटप करण्यात आले.

- -

खेड्या पाड्यातील वंचित मुलांमधूनही भविष्यातील नेते-अधिकारी निर्माण होतील याबाबद काहीही शंका नाही. सामाजिक भान जपणारे अनेक हात एकत्र आल्यास किती मोठे काम उभे राहू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन अधिकार पदावर पोहोचल्यावर इतर मुलांच्या वाट्याला ती परवड येऊ नये याची जाण ठेवणारे असे सदस्य फोरमला लाभले आहेत याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.

- प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम

- - - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिघोळेंसह बारा जणांची माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी रविवारी माघार घेतली. अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. दिघोळे यांच्यासह ११ जणांनी, म्हणजेच एकूण १२ जणांनी रविवारी अर्ज माघारी घेतला असून, अर्ज माघारीसाठी आज, (दि. ८ जुलै) अंतिम मुदत आहे.

संस्थेच्या सन २०१९-२०२४ या पाच वर्षांच्या कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी ४३१ अर्ज प्राप्त झाले होते. अर्ज भरणे व स्वीकृतीनंतर ८ जुलैपर्यंत माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीत तुकाराम दिघोळे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांची पत्नी आशालता दिघोळे\B \Bयांच्यासह संगीता कुटे, कल्पना भाबड यांनी महिला संचालक गटातून माघार घेतली आहे. याबरोबरच, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले संदीप फड यांनी उपाध्यक्ष व नाशिक तालुका संचालक गटातून माघार घेतली. विश्वस्त गटातून शंकर शेळके, सुदाम बोडके यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तसेच तालुका संचालक गटात दिंडोरी येथील सुदाम बोडके, निफाड तालुक्यात शिवाजी सानप, जनार्दन कराड यांनी माघार घेतली आहे. तर नाशिक तालुक्यात\B \Bसंदीप फड, सिन्नरमध्ये पांडुरंग उगले\B \Bयांनी आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे दिवसभरात एकूण १२ जण निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. यात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सहकुटुंब अर्ज दाखल केल्याची चर्चा रंगली होती. दिघोळे यांचे पुत्र अभिजीत दिघोळे यांचा सरचिटणीस, सहचिटणीस पदासाठी अर्ज कायम आहे. तसेच कन्या अंजली दिघोळे यांचा अध्यक्ष, सरचिटणीसपदासाठी दाखल केलेला अर्ज अद्याप कायम असल्याचे सांगण्यात आले. ९ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार असून दुपारी ४ वाजेनंतर चिन्हवाटप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा प्रथमच वापर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाचा वाढत चाललेला जोर लक्षात घेऊन धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या काझी गढी येथील ५९ कुटुंबांना रविवारी सायंकाळपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. घरे सोडण्यास नकार देणाऱ्या काही रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये पोलिस बळाचा वापर करून हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नेमेचि येतो पावसाळा या म्हणीप्रमाणेच दर वर्षी पावसाळ्यात काझी गढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. पावसामुळे गढी खचण्याची शक्यता बळावते. त्यामुळे येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी महापालिका आणि संबंधित यंत्रणांना पार पाडावी लागते. थाटलेला संसार उचलून अन्य ठिकाणी स्थलांतरित होणे या रहिवाशांना नकोसे वाटते. त्यामुळे ते येथून संसार हलविण्यास तयार नसतात. परंतु, पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे रहिवाशांच्या जीवितालाच धोका निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच नोटिसांद्वारे रहिवाशांना घरे सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जाते. रहिवासी या आवाहनाला फारसा सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे यंदाही स्पष्ट झाले. त्यामुळे शनिवारी या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. रहिवासी दाद देत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या विनंतीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी सूरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे आणि परिमंडळ दोनचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली.

सकाळी आठपासूनच कारवाई

रविवारी सकाळी आठ वाजता अग्निशामक विभागामार्फत धोकादायक स्थितीत राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी साडेदहा वाजता पोलिस फोर्स घेऊन धोकादायक घरातील नागरिकांना प्रथम समन्वयाने समजावून सांगत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सूचित करण्यात आले. काही नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पोलिसी बळाचा वापर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबतची कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत ३० ते ३५ कुटुंबांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नोटीस बजावण्यात आलेली काही घरे बंद स्थितीत होती. संबंधित रहिवासी नातेवाइकांकडे किंवा अन्य ठिकाणी राहावयास गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

---

महापालिका व पोलिसांना करण्यात आलेल्या सूचना

---

-स्थलांतरित ठिकाणी तात्काळ किमान नागरी सुविधा द्या

-घटनास्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका तैनात ठेवा

-घटनास्थळी फायर फायटर्स, अग्निशमन बंब, वाहतुकीची साधने उपलब्ध ठेवा

-साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

-वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत

-स्टेजिंग एरिया निश्चित करावा

-वीजपुरवठा खंडित करावा

-नागरिकांच्या वाहतकुीसाठी इंधनासह बस उपलब्ध करून द्याव्यात

-आपत्तिकाळात अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी

-नागरिकांना तात्काळ धोकादायक ठिकाणांवरून हलवावे

-बघ्यांची गर्दी कमी करावी

-वाहतुकीचे नियमन करावे

-आदेशाचे पालन न करणाऱ्या रहिवाशांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५१ अन्वये कारवाई करावी

-जोखमीच्या ठिकाणी सेल्फी काढण्यास मज्जाव करावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डी प्रशिक्षण समितीतजैन, भाबड यांची नियुक्ती

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने नियुक्त केलेल्या प्रशिक्षण समितीवर नाशिकच्या शैलजा जैन व प्रशांत भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक जूनमध्ये अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या असून, त्यात राज्य संघटनेच्या इतिहासात प्रथमच प्रशिक्षण समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील १८ तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रुंग्ठा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड व राष्ट्रीय प्रशिक्षक शैलजा जैन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पंच मंडळ समितीवर आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, तर शिस्तपालन समितीवर राज्य कबड्डी संघटनेचे संयुक्त कार्यवाह मोहन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी खळाळली...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी पहिल्यांदाच खळाळून वाहू लागल्याचे चित्र रविवारी दिसून आले. पुराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली होती.

शनिवारी रात्रभरापासून बरसणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून जोर धरल्यामुळे गोदावरी नदीला मिळणारे नाले दुथडी भरून वाहू लागले होते. या नाल्यांचे पाणी गोदावरी पात्रात येऊन मिसळत असल्याने धरणातून पाणी सोडलेले नसतानाही गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली. शहर परिसरातील नाल्यांबरोबरच ड्रेनेजचेही पाणी गोदापात्रात मिसळत असल्यामुळे घाण व कचरा घेऊन वाहणाऱ्या नदीचे पाणी काळेकुट्ट दिसत होते. सकाळी सात वाजेनंतर पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे रामकुंड परिसरातील विविध विधी अहिल्या पटांगण, कपालेश्वर मंदिराच्या रस्त्यावर आणि वस्त्रांतरगृहाच्या पायऱ्यांवर करावे लागले. रामकुंडाच्या पार्किंगपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने वाहने रामकुंडाच्या रस्त्यांच्या भागात पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे परिसरात कोंडी निर्माण झाली होती. पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात घेऊन गोदाघाटावरील व्यावसायिकांनी आपापल्या टपऱ्या, दुकाने काढून घेतली. पाण्यात वाहून येणारा कचरा गंगा गोदावरी मंदिरासमोरच्या भागात पाण्यावर तरंगत होता. प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या पिशव्या, झाडांच्या फांद्या, गवत, थर्माकोल, पाणवेली यांचा कचरा पाण्यात वाहत होता.

स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा या भागापर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. रामसेतू, गाडगे महाराज पूल, होळकर पूल, टाळकुटेश्वर पूल या पुलांवर, तसेच गोदाकाठावर गोदावरीचे वाढलेले पाणी बघण्यासाठी गर्दी झाली होती. कपिला संगमावर असलेल्या लोखंडी पुलापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. सकाळी जोर धरलेल्या पावसाने सकाळी अकरानंतर काहीशी उसंत घेतली आणि दुपारी तीन वाजता पुन्हा जोर धरल्याने पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोदाकाठाच्या परिसरातील व्यावसायिकांना व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पातळी वाढली कशी?

नाशिक शहरात पाणीकपात सुरू असताना बहुतांश भागांत पाणीटंचाई भासत आहे. गंगापूर धरणाने तळ गाठलेला असताना रविवारी झालेल्या जोराच्या पावसाने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी एकदम वाढली. गटारीच्या पाण्यामुळे गोदाघाट परिसरात दुर्गंधी पसरली. ही पाण्याची पातळी गटारीचा पाण्याच्या, फुटक्या पावसाळी गटारींमुळे वाढली आहे. आजवरचा गोदावरी पुराच्या इतिहास पाहता नदीला गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्ग झाल्यावरच पूर येतो. धरणातून विसर्गाशिवाय पूर येणे गंभीर बाब असून, महापालिकेने वेळीच पावसाळी गटारी आणि भुयारी गटारींची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरावर अखंड जलाभिषेक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरात पूरस्थती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरासह शहरावर वरुणराजाने जणू जलाभिषेकच सुरू केला होता. शहरात सकाळी आठ वाजेच्या सुमारास आणि पुन्हा दुपारी वाजेच्या दरम्यान मेनरोड, तेली गल्ली, लक्ष्मीनारायण चौक, गंगासागर तलावाच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. मेनरोड आणि तेली गल्ली परिसरात घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे रविवार सकाळपर्यंत १३५ मिमी पाऊस पडला, तर दुपारपर्यंत अवघ्या आठ तासांत १६० मिमी पावसाची नोंद झाली. अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले, तर गंगासागर तलाव तुंडुंब भरला आहे. प्लास्टिक कचऱ्याने जागोजागी पाणी तुंबले. त्यामुळेदेखील शहरातील सखल भागांतील जवळपास सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी पहावयास मिळाले. डोंगरावर चर खोदून 'पाणी अडवा, पाणी जिरवा'मध्ये कामगिरी केल्याचा नगरपालिका प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला म्हणून शहरात पूर आला नव्हता. तेव्हा चाऱ्या आणि खड्डे खोदल्याचा परिणाम असल्याचे म्हटले गेले. मात्र, यावर्षी एकाच दिवसात दोन वेळा पूर आल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.

शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने कचरा विलगीकरण करून द्यावे लागते. तशात कधी संप तर अन्य काही कारणांनी घंटागाडी नियमित येत नाही. नागरिक घरात साचलेला कचरा रिंगरोड आदि शहराच्या बाजूस प्लास्टिक गोण्यांमध्ये भरून फेकून देतात. शहराच्या सर्व बाजूस अशा प्रकारे कचरा पडल्याचे वारंवार निदर्शनास आणूनदेखील तो उचलला जात नव्हता. रविवारच्या पावसाने तो धुवून आला आहे. तसेच कचरा डेपो परिसरात नदीपात्रातील पाणी शिरले आणि कचऱ्यासह हे पाणी गोदावरीत आले. हेच पाणी शहरात पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. पावसामुळे शहरात एक भिंत कोसळली, तर हरसूल भागात बैल वाहून गेले. ग्रामीण भागातही काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात तलाव

त्र्यंबकेश्वर मंदिरात पश्चिम दरवाजाने पाणी घुसले आणि संपूर्ण मंदिर प्रांगणात पाणीच पाणी झाले होते. दर्शनबारीत पाण्यात भाविक उभे होते. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर गजानन महाराज संस्थानजवळ असलेल्या पुलावर पाणी आले. तसेच पेट्रोल पंपाच्या समोरदेखील रस्त्यावर पाणी आले. यामुळे नाशिक-त्र्यंबक वाहतूक काही काळ खोळबंली होती.

पर्यटकांचा बहर

पावसाचा जोर असूनही निसर्गप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. ब्रह्मगिरी तसेच पहिणे परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. पहिणे येथे पुलावर पाणी असल्याने घोटी मार्गावरील वाहतूक थांबली होती. पावसाचा मारा होत असतानाही पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू ठेवली होती. त्यामुळे मद्यपींना काहीसा आळा बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखी गोल रिंगण

चर्चेतली बातमी

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी:

जेव्हा विराट घेतो रोहित शर्माची मुलाखत...

क्रिकेट विश्वचषकातील रोहित शर्माच्या शानदार शतकी कामगिरीबद्दल कर्णधार विराट कोहलीने त्याची मुलाखत घेतली. शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराटने रोहितलं बोलतं केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धाम टा

$
0
0

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत फॉइल व सॅबर प्रकारात नाशिक संघाला कांस्यपदक मिळाले. ही स्पर्धा ५ ते ७ जुलैदरम्यान झाली. या वेळी चौदावी मिनी व तिसरी १० वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा झाली. भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते तलवारपूजनाने स्पर्धेला सुरुवात झाली.

तलवारबाजी संघटनेचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष अशोक दुधारे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रकाश कटुळे, तलवारबाजी राज्य संघटनेचे खजिनदार राजकुमार सोमवंशी, विभागीय सचिव प्रमोद डोंगरे, स्पर्धाप्रमुख बालाजी काकडे उपस्थित होते. त्यामध्ये नाशिकच्या खेळाडूंनी फॉइल या प्रकारात वेदान्त महाजन, निशांत रॉय, देवत गार्गे, अभय तिडके यांनी कांस्यपदक मिळवले. नाशिक सॅबर टीममध्ये राम राठी, पार्थ सोनवणे, विरुपक्ष ढगे, अर्णव कुशारे विपुल वसावे, आशिष वसावे, अनिल वसावे, सारंग सूर्यवंशी यांनी कांस्यपदक मिळवले. जय शर्मा, अमोल आहेर, मयूर गुरव, राजू शिंदे, राहुल पडोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची बैठक वादळी होण्याची चिन्हे

$
0
0

१७ जुलैला बैठक; संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा योजनेशी संबंधित २८२ कोटींच्या स्काडा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील फेरबदल, स्मार्ट रोडची वाढलेली किंमत आणि स्थगित झालेली स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १७ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे या बैठकीत स्काडासह सीईओंनी राबवलेली नोकरभरती प्रक्रिया आणि स्मार्ट पार्किंगमधील गोंधळावरून संचालक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठकही वादळी होण्याची शक्यता आहे.

नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची १७ वी बैठक गेल्या महिन्यात ७ जून रोजी बोलविण्यात आली होती. परंतु, २८० कोटींच्या स्काडा प्रणालीच्या निविदा प्रक्रियेत झालेला कथित फेरबदल, स्मार्ट रोडचे ३.८९ कोटींनी वाढलेले प्राकलन, स्मार्ट रोडच्या कामातील दिरंगाई, महात्मा फुले कलादालनाचे काम पूर्ण होऊनही ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या अधिकच्या मोबदल्यावरून संचालकांनी आक्रमक होत कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेंची बैठकीअगोदरच भेट घेत सीईओ प्रकाश थविल यांच्या वादग्रस्त कारभाराचा पाढा वाचला होता. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, कंपनीच्या संचालक तथा महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेस गटनेते शाहू खैरे व माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी कुंटे यांची भेट घेत स्मार्ट कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत थविल आणि तांत्रिक अधिकारी प्रमोद गुर्जर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. थविल यांची बदली करण्याबरोबरच गुर्जर यांना कार्यमुक्त करीत नाही तोपर्यंत बैठकीत सहभाग न घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे वाद नको म्हणून कुंटेंनी सदरची बैठक रद्द केली होती. थविल यांची बदली करण्याचे आश्वासनही संचालकांना दिले होते. परंतु, या बैठकीनंतर कुंटेच पाच आठवड्यांच्या सुटीवर गेले होते. कुंटे आता १२ तारखेला सुटीवरून परतणार आहेत. त्यामुळे गेल्या वेळेस रद्द झालेली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक येत्या १७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे. सीईओ थविल यांची न झालेली बदली, त्यांनी सुरू केलेली नोकरभरती आणि स्मार्ट पार्किंगमध्ये ठेकेदारांच्या घोळामुळे ही बैठक पुन्हा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

...

संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष

थविल यांची बदली झाली नसून, गुर्जरही कामावरच आहेत. उलट स्काडानंतर स्मार्ट पार्किंग योजनेतही गोंधळ समोर आला आहे. त्यामुळे संचालकांची आक्रमकता वाढेल असे वाटत होते. परंतु, अनेक संचालकांनी याबाबत आता मौन बाळगल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या बैठकीत आक्रमकता कायम राहते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धो धो कोसळधार

$
0
0

\B- त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी. दर्शनबारीत भाविक पाण्यात उभे होते.

- गोदावरीसह दारणा, भाम, भावली नद्यांना पूर

- जिल्ह्यात आठ तासांत ५७०.५ मिमी, तर \Bदोन दिवसांत १२४८.९ मिलिमीटर पाऊस\B

- गोदाववरी गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वरच्या पातळीत वाढ

-

\Bम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने रविवारी झोडपले. त्र्यंबकेश्वरमध्ये अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात आठ तासांत ५७०.५ मिलिमीटर एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. शहरातही या नऊ तासांमध्ये ६२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गोदावरीला पूर आला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर, दारणा धरणसमूहामधील पातळीतही लक्षणीय वाढ झाल्याने जिल्हावासीय सुखावले आहेत.

जूनच्या पहिल्या तारखेपासून नाशिककर पावसाच्या ज्या जोरदार सरींची प्रतीक्षा करीत होते त्या सरी अखेर शनिवारी सायंकाळनंतर बरसण्यास सुरुवात झाली. शहरासह काही तालुक्यांमध्ये संततधार, तर काही आदिवासी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सरीवर सरी बरसत होत्या. मात्र, सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रभर आणि सकाळपासून पुन्हा सायंकाळपर्यंत सातत्याने बरसत होता. जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी दुपारी चार या कालावधीत तब्बल १२४८.९ मिलिमीटर एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ६७८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर दिवसभरात पुन्हा ५७०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरणसमूहाचे पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात शनिवारी सकाळपासून रविवारी सायंकाळपर्यंत २९५ मिलिमीटर पाऊस झाला. विशेष म्हणजे सकाळी आठ ते दुपारी चार या आठ तासांत अतिवृष्टी होऊन १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमधील या पूरजन्य स्थितीमुळे गंगापूर धरणसमूहामधील पातळीत लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातही मुसळधार पावसामुळे दारणा धरणसमूहामधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग सायंकाळी सात वाजता ८,०७० क्युसेकने सुरू होता. पावसामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने गोदावरीला पूर आला आहे. वरुणराजाच्या या कृपावर्षावामुळे नाशिककर सुखावले आहेत.

\Bत्र्यंबक, इगतपुरीत पूरस्थिती

त्र्यंबकेश्वर/इगतपुरी : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रविवारी आठ तासांत १६० मिमी, तर इगतपुरी तालुक्यात चोवीस तासांत १७० मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरातील मेनरोड, तेली गल्ली, लक्ष्मीनारायण चौक, गंगासागर तलावाच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. पावसामुळे भिंत कोसळली, तर हरसूल भागात बैल वाहून गेला. ग्रामीण भागातही काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात पश्चिम दरवाजाने पाणी घुसले आणि संपूर्ण मंदिर प्रांगणात पाणीच पाणी झाले होते. दर्शनबारीत पाण्यात भाविक उभे होते. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर गजानन महाराज संस्थानजवळ असलेल्या पुलावर पाणी आले. तसेच पेट्रोल पंपाच्या समोरदेखील रस्त्यावर पाणी आले. इगतपुरी तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे दारणा, भाम, भावली नदीला पूर आला आहे. कसारा घाटापासून ते संपूर्ण तालुक्यात पाऊस बरसत आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दारणा, भाम, भावली या नद्यांना पूर आला आहे.

\Bवृत्त... २, ५, प्लस १, २

तालुका- पाऊस मिमी

नाशिक-९३.७

इगतपुरी-४६

त्र्यंबकेश्वर-१६०

दिंडोरी- ३८

पेठ-१०१

निफाड-२७.८

सिन्नर-५५

चांदवड- ३

देवळा- ०

येवला- ९.०

नांदगाव-०

मालेगाव-०

बागलाण-४

कळवण-०

सुरगाणा-३३

एकूण-५७०.५

(रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी चारपर्यंतची नोंद)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images