Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रामकुंड परिसरात शुक्रवारीही ‘ड्राय डे’

0
0

पंचवटी : नाशिकला रविवारपासून पाणीकपात सुरू झाली आहे. एकच वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असून, गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण वेळ बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ५) पाण्याची चातकासारखी वाट पहाणाऱ्या पंचवटीतील रामकुंड परिसरात पाणी आले नाही. या परिसरातील रहिवाशी आणि व्यावसायिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'योगातून आत्मसंरक्षण साध्य होईल'

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक स्वयंसिद्ध प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या महिला स्वतःचे संरक्षण तर करू शकतीलच तसेच समाजातील दुर्बल महिलांचे व पुरुषांचे देखील स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आधार बनतील. स्वयंसिद्धामधून स्वसंरक्षण तर योगातून आत्मसंरक्षण साध्य होईल, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालय व कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यशाळा व अॅडव्हान्स योग सर्टिफिकेट कोर्सच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रान्समधील स्पर्धेसाठीतन्मय बूबची निवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या 'पॅरिस वर्ल्ड गेम्स'साठी नाशिकरोडच्या तन्मय बूब या विद्यार्थ्याची १२ वर्षांखालील गटातील फुटबॉल संघात निवड झाली आहे. जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी एकूण २८ देशांचा सहभाग आहे. पॅरिसमधील क्विस्ट सिटी युनिव्हर्सिटी स्टेडियम व ज्युएल्स नोएल स्टेडियमवर दोन दिवस ही स्पर्धा होणार आहे. प्रशिक्षक फर्ग्युस सिमन्स व आई अनुराधा बूब यांचे तन्मयला मार्गदर्शन लाभले. देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये सहावीत तो शिक्षण घेत आहे. तन्मयची नवी मुंबई येथे निवड चाचणी झाली. याच स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील गटात बार्न्स स्कूलचे गुणित रेड्डी व लोकजित जाधव यांचीही निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारावर रडारवर

0
0

थकबाकीपोटी २३६२ नळ कनेक्शन खंडित

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टी थकबाकीदारांनाही रडारवर घेतले असून, तब्बल ३३ हजार थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसांनाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर महापालिकेने सहा विभागांत आतापर्यंत २३६२ नळ कनेक्शन तोडले आहेत. या कारवाईला गती देण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. पाणीपट्टीची जवळपास ४३ कोटींची थकबाकी असून, यामध्ये नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील थकबाकीदारांची संख्या सर्वाधिक आहे.

महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावण्याचे सत्र हाती घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करसंकलन विभागाच्या घेतलेल्या आढाव्यात घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली समाधानकारक झाली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आयुक्तांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनाच नोटिसा बजावल्या होत्या.

महापालिकेने पाणीपट्टीच्या ३३ हजार ८७ थकबाकीदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडे ४३ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. हे सर्व पाच हजार ते ५० हजारांपर्यंतचे थकबाकीदार आहेत. नोटीस बजावूनही दुर्लक्ष केलेल्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत सहा विभागांत २,३६२ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ५५६ नळ कनेक्शन नाशिक पश्चिम विभागातील आहेत. त्या खालोखाल पंचवटी ५६६, नाशिक पूर्व ३६५, सातपूर ३३३, नाशिकरोड २३६, सिडको २६५ येथील नळ कनेक्शन तोडले आहेत.

....

विभाग थकबााकीदार थकीत रक्कम

सातपूर ५,७५० ६ कोटी ३१ लाख रु.

पंचवटी ७,४३६ ८ कोटी २० लाख रु.

सिडको ५,९३२ ६ कोटी १८ लाख रु.

नाशिकरोड ५,९७६ ९ कोटी ९३ लाख रु.

नाशिक पश्चिम ९६० २ कोटी ३१ लाख रु.

नाशिक पूर्व ७,५३३ ९ कोटी ८७ लाख रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साने गुरुजी आरोग्यमंदिरात बालकांना सुवर्णप्राशन

0
0

साने गुरुजी आरोग्यमंदिरात

बालकांना सुवर्णप्राशन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसामिती संचलित साने गुरुजी आरोग्य मंदिर येथे पुष्यनक्षत्राचे औचित्य साधून सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील ११२८ बालकांना सुवर्णप्राशन संस्काराचा लाभ मिळाला. साने गुरुजी परिवाराकडून दर महिन्याला असे मोफत सुवर्णप्राशन शिबिर आयोजित करण्यात येत असून, यातून हजारो बालकांना लाभ झाला आहे.

साने गुरुजी यांच्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेचे सामूहिक गायन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रबंधक जयेश शेलार व प्रमुख वैद्यकीय अधिकारी वैद्य प्रांजल आढाव यांनी शिबिर आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार असून, बाळाच्या वयाच्या पहिल्या महिन्यापासून ते १६ वर्षे वयापर्यंतच्या मुलांवर हा संस्कार करण्यात येतो. शिबिरात वैद्य सरस्वती जाधव, निर्मला गायकवाड, प्राजक्ता इंगळे यांच्यासह आरोग्य मंदिराचा सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले. यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या बालकांचा साजरा करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त रमेश शर्मा, बिपीन पारेख, शरद अहिरे, साकेत जगताप, सुहास अहिरे यांनी शिबिरास भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंटवाडी शाळेचा वर्धापनदिन उत्साहात

0
0

उंटवाडी शाळेचा वर्धापनदिन उत्साहात

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेचा ३३वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांची मनोगते आदींनी हा कार्यक्रम रंगला. शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी स्वागतगीताचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर जागृती बागुल या विद्यार्थिनीने 'मी शाळा बोलते' विषयावर मनोगत व्यक्त केले. शाळेविषयी गाणे 'टन टन घंटी बजी स्कुल हमको पुकारे,' गाणे सादर करून यामध्ये शाळेची ओढ व बेटी बचाव संदेश देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीत वाचन व आदर्श यावर भर द्यावा. तसेच पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे', असे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम व संस्था कार्यकारी मंडळ सदस्य वाड, शिरोडे, अकोलकर, माजी मुख्याध्यापिका नीला निमोणकर, बाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घारपुरे, पालक संघ उपाध्यक्ष मनीषा कथोके, या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती चौधरी यांनी केले व आभार विद्या ठाकरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजातशत्रू पुरस्काराचे उद्या वितरण

0
0

अजातशत्रू पुरस्काराचे

उद्या वितरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिवर्त परिवारातर्फे दरवर्षी दिला जाणारा अरुण काळे स्मृती, राज्यस्तरीय 'अजातशत्रू काव्य पुरस्कार'चा वितरण सोहळा, प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (७ जुलै) सावाना औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. कवी सुदाम राठोड यांच्या 'आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते' या काव्यसंग्रहाला यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन विद्यामंदिरात पालक-शिक्षक संघ

0
0

नूतन विद्यामंदिरात पालक-शिक्षक संघ

देवळाली कॅम्प : येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळेच्या सभागृहात मुख्याध्यापिका उषा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे विशेष आयोजन करण्यात आले होते यावेळी पालक-शिक्षक संघ, माता पालक संघ, शालेय व्यवस्थापन समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सचिन झुटे, दीपक कणसे, दौलत करंजकर, संदीप शेळके, उज्वल आडणे, संगीता गोडसे, वसंत सांगळे, बाळासाहेब केदार आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका उषा परदेशी यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल यश, शिष्यवृत्ती स्पर्धेत उत्तुंग भरारी याविषयी मार्गदर्शन करताना गेल्या शैक्षणिक वर्षाच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात सादर केला. पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष शरद करंजकर यांनी मागील वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत नूतन कार्यकारिणीने नवीन शालेय उपयोगी उपक्रम राबवावे असे सांगितले. सूत्रसंचालन सोपान सहाने यांनी आभार रुपाली शहाणे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रचनात्मक विचाराने नवनिर्मितीस चालना

0
0

रचनात्मक विचाराने नवनिर्मितीस चालना

इनोव्हेशन कॅम्पमध्ये संदीप शिंदे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. त्यामळे समस्यांकडे नकारात्मकतेने न बघता त्यातून मार्ग काढत उत्पादन प्रक्रियेत अधिक परिणामकारकता कशी साध्य करता येईल याबाबत विचार केला जावा, असे आवाहन टीसीएसचे हेड ऑफ ऑपरेशन्स अॅण्ड इनोव्हेशन कोच संदीप शिंदे यांनी केले.

निमा जीआयझेड आयएफसीतर्फे शुक्रवारी अंबड येथे नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे आयोजित 'इनोव्हेशन कॅम्प'मध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमा जीआयझेड आयएफसीचे समन्वयक श्रीकांत बच्छाव, जीआयझेड चे तंत्रज्ञ तसव्वर अली, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा जीआयझेड आयएफसीचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी केले. वरील उपक्रमातील पहिल्या टप्प्यात तीन महाविद्यालयातील ११३ विद्यार्थ्यांच्या गटाने एकूण ३० प्रोजेक्ट्स केले असून त्यापैकी २६ गटांना टाटा टेक्नॉलॉजीतर्फे अधिक सुधारणा करण्यासाठी वित्त सहाय्य केले. पुढील टप्प्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 'स्टुडन्ट इनोव्हेशन प्रोजेक्ट' या उपक्रमाची माहिती जीआयझेडचे तंत्रज्ञ तसव्वर अली यांनी उपस्थितांना दिली. या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून उद्योगातील विविध प्रक्रिया व त्यात येणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक काळातच विकसित होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत उत्पादन व प्रक्रियांमध्ये नवनिर्मितीस चालना मिळावी यासाठी निमा व शैक्षणिक संस्था यांच्याकडून होत असलेल्या एकत्रित प्रयत्नांची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

0
0

विमानसेवा वेळापत्रक

सोमवार ते शनिवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ९.२५ - सकाळी १०.४०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी ११.१० - सकाळी १२.२५

नाशिक - हैदराबाद

दुपारी १२.५० - दुपारी २.२५

हैदराबाद - नाशिक

सकाळी ६.४० - सकाळी ८.५५

नाशिक - अहमदाबाद

सायंकाळी ६.२० - सायंकाळी ७.३५

अहमदाबाद - नाशिक

दुपारी ४.५० - सायंकाळी ६.००

रविवार

हैदराबाद - नाशिक

सकाळी ६.४० - सकाळी ८.५५

नाशिक - हैदराबाद

सकाळी ९.२५ - सकाळी १०.४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा नको

0
0

मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा नको

निता अरोरानी दिल्या पालकांना टीप्स

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काही पालक आपल्या मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम नातेसंबंधावर होतो. आपले आणि मुलांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असे सांगत वेदास अॅकॅडेमीच्या संस्थापक नीता अरोरा यांनी मुलांसोबत कसे वागावे या संदर्भातील अनेक टीप्स दिल्या.

नाशिक सीए शाखेतर्फे ७० वा सीए दिनानिमित्त साजरा करणाऱ्या सप्ताहाच्या कार्यक्रमात त्या 'आनंदी पालकत्व (जॉयफुल पॅरेंटिंग) या विषयावर बोलत होत्या. यावेळी अरोरा म्हणाल्या की, रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा, घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो, रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला, कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल, आपल्या मुलांची गरज समजून घ्या, आपल्या मुलांचे रोल मॉडेल बना, अशा अनेक टिप्स त्यांनी दिल्या.

या सत्रात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले पालक उपस्थित होते. खास करून नोकरी संभाळून मुलांचे पालन कसे करावे. त्यांना वेळ कसा द्यावा मुलांशी मैत्रीचे नाते कसे जपावे या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक सीए शाखेचे सचिव राजेंद्र शेटे, पियुष चांडक, रुची सुराणा हे उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजिल्हा टोळी गजाआड

0
0

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोटारसायकली चोरून त्यांची ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोन्ही संशयित दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचा एक साथीदार लवकरच हाती लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मनोहर रघुनाथ ब्राह्मणे (वय २५, रा. गणोरवाडी, ता. दिंडोरी) आणि राहुल संजय पवार (वय २०, रा. शिंगवे, ता. निफाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वाहन चोरटे त्र्यंबक नाका परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी येवाजी महाले आणि विजय गवांदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्फ क्लब परिसरात सापळा रचण्यात आला. पल्सरवरून आलेल्या दोघांच्या रहाणीमानावरून संशयित वाटल्याने त्यांना हटकण्यात आले. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथून मोटारसायकल चोरल्याची त्यांनी कबुली दिली. नाशिकसह नगर आणि लातूर जिह्यातून चोरलेल्या तब्बल साडेअकरा लाख रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये पल्सर (७), स्प्लेंडर (२), पॅशन प्रो (२), सीडी डिलक्स (२), बजाज सीटी (१), प्लॅटिना (३), डिस्कव्हर (१), ज्युपिटर, डिओ, एव्हीएटर मोपेड (३), यामाहा (१) व होंडा शाइन (१) या वाहनांचा समावेश आहे. पिंपळगाव बसवंत, निफाड, लातूर, मुंबईनाका पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी एक, वणी, दिंडोरी, सिन्नर येथील प्रत्येकी दोन, सायखेडा पोलिस स्टेशनमधील चार, तोफखाना व शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील पाच असे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित चार मोटारसायकली कोठून चोरल्या याचा तपास सुरू आहे. या दोघांचा एक साथीदार अजूनही पोलिसांना मिळू शकलेला नाही. चोरलेले वाहन विकताना मिळेल तेवढी रक्कम टोकन म्हणून चोरटे घेत असत. उर्वरित रक्कम कागदपत्रे आणून दिली की मग घेऊ असे सांगत असत. पोलिस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरणार, उपनिरीक्षक बलराम पालकर, अनिल दिघोळे, आसिफ तांबोळी, शांताराम महाले, दिलीप मोंढे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. ...

वाहन बाजाराची होणार तपासणी

काही दिवसांपूर्वी वाहन चोरीच्या प्रकरणात पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या किरण दैठणकर या संशयिताचा औरंगाबाद रोडवरील नांदुरनाका परिसरात कार मॉल असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे शहरातील वाहन बाजार तपासण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी घेतला आहे. वाहन बाजार चालविणाऱ्यांना त्रास देणे हा आमचा उद्देश नसला तरी चोरीची वाहने अशा वाहन बाजारांत येऊ नयेत हा आमचा उद्देश असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगराएवढ्या अपेक्षांचा होतो नात्यांवर परिणाम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक काही पालक आपल्या मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम नातेसंबंधावर होतो. आपले आणि मुलांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असे सांगत वेदास अॅकॅडमीच्या संस्थापक नीता अरोरा यांनी मुलांसोबत कसे वागावे या संदर्भातील अनेक टीप्स दिल्या. नाशिक सीए शाखेतर्फे ७० वा सीए दिनानिमित्त साजरा करणाऱ्या सप्ताहाच्या कार्यक्रमात त्या 'आनंदी पालकत्व (जॉयफुल पॅरेंटिंग) या विषयावर बोलत होत्या. यावेळी अरोरा म्हणाल्या की, रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा, घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो, रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला, कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल, आपल्या मुलांची गरज समजून घ्या, आपल्या मुलांचे रोल मॉडेल बना, अशा अनेक टिप्स त्यांनी दिल्या. या सत्रात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले पालक उपस्थित होते. खास करून नोकरी संभाळून मुलांचे पालन कसे करावे. त्यांना वेळ कसा द्यावा मुलांशी मैत्रीचे नाते कसे जपावे या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक सीए शाखेचे सचिव राजेंद्र शेटे, पियुष चांडक, रुची सुराणा हे उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारदाराला जाच; पोलिसदादावर ‘वॉच’

0
0

- पोलिसांच्या वागणुकीचा खातरजमा करणार

- पोलिस आयुक्तांना अहवाल मिळणार

- कर्तव्यनिष्ठेला बक्षीस, उर्मटांना शासन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ठाणे अंमलदार तुमच्यावर खेकसले, तुमची अक्कल काढेल किंवा पिटाळून लावेल या भीतीने तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाणे टाळत असाल, तर आता तशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कैफियत मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिस स्टेशन्समधील कर्मचाऱ्यांकडून चक्क चांगली वागणूक मिळणार आहे. नव्हे याची दररोज खातरजमा करण्याची जबाबदारी नियंत्रण शाखेतील एका पोलिस निरीक्षकावर सोपवली आहे. उत्तमपणे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस, तर उर्मट कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला आहे.

नाकासमोर चालणाऱ्यांना पोलिस स्टेशनची भीती वाटते. कोर्टाची पायरी दूरच ते बिचारे पोलिस स्टेशनची पायरीदेखील लवकर चढत नाहीत. परंतु, काहीवेळा परिस्थितीच अशी ओढावते, की त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पाय ठेवावाच लागतो. अशावेळी पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांकडून त्यांना दिलासा मिळावा, अशी माफक अपेक्षा असते. परंतु, बऱ्याचदा घडते उलटेच. तक्रार घेण्यासाठी बसलेल्या ठाणे अंमलदारांकडून त्यांना नीट वागणूक मिळत नाही. तो त्यांच्यावर खेकसतो. अपमानीत करतो. काहीवेळा तक्रार न घेताच पिटाळूनही लावतो. पोलिस कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या अशा प्रकारच्या वागणुकीची जाणीव पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही आहे. म्हणूनच पोलिस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक मिळावी, त्याचे समाधान व्हावे याकरिता त्यांनीच आश्वासक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या नागरिकाचे म्हणणे ठाणे अंमलदाराने व्यवस्थित ऐकून घेतले का, तक्रारीनुसार तत्काळ गुन्हा नोंदवला का, गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन तो दाखल केला, की त्याचे प्रमाण कमी-अधिक केले, गुन्ह्याचे स्वरूप फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे नोंदविले आहे का, घटनास्थळी कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली, तसेच फिर्यादीची प्रत त्यांना तत्काळ मिळाली का, यांसारखे मुख्य मुद्दे ठरवून त्याबाबत ठाणे अंमलदारांकडून किती समाधान केले जाते हे पाहिले जाणार आहे. पोलिस नियंत्रण कक्षामधील एका अधिकाऱ्यावर याबाबतची जबाबदारी सोपवली आहे. हा अधिकारी दररोज सकाळी प्रत्येक तक्रारदाराला फोन करून या पाच मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेईल. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर नागरिकांचे समाधान झाले की नाही हे समजून घेईल. याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांना सादर केला जाईल.

नागरिक, तक्रारदार यांना चांगली वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, तर नागरिकांशी सौजन्याने न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर समज, ताकीद व तत्सम कारवाया करण्यात येतील.

...

चिरीमिरीलाही आळा घालण्याचा प्रयत्न

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडे काही मागणी केली का, याचाही अंदाज पोलिस अधिकाऱ्याकडून घेतला जाणार आहे. या माध्यमातून लाचखोरीसारख्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न नांगरे-पाटील यांनी केला आहे. याशिवाय घटनास्थळावर पाहणीसाठी जाणे हे कर्तव्य असतानाही तसे न करणाऱ्या कामचुकार पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या माध्यमातून वचक निर्माण करण्याचे काम नांगरे-पाटील यांनी केले आहे.

...

पोलिस स्टेशनमध्ये मिळणाऱ्या वागणुकीनुसार नागरिक पोलिसांबद्दलची प्रतिमा तयार करतात. ठाणे अंमलदार व अन्य कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच नियंत्रण कक्षातून तक्रारदारांशी संवाद साधून याचा आढावा घेण्यात येईल. महिनाभरात याचे खूप चांगले परिणाम दिसतील, अशी खात्री आहे.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र कबड्डी संघातज्योती पवारची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू ज्योती पवार हिची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड झाली. बिहारमधील पाटणा येथे ११ ते १४ जुलैदरम्यान ६६ वी वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार असून, वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली ज्योती पहिली आदिवासी कबड्डीपटू ठरली आहे.

सिन्नर येथे ३० ऑक्टोबरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे २० महिला खेळाडूंची महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरात निवड करण्यात आली होती. या शिबिरातून अंतिम बारा खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्योतीची याआधी दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. याचबरोबर तिची पुणे विद्यापीठातर्फे हिमाचल प्रदेशात झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झाली होती. ज्योतीच्या नेतृत्वाखालील संघाने सलग तीन वर्षे कुमारी गटाचे व महिला गटाचे जिल्हा अजिंक्यपद पटकावले आहे. ज्योतीला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक भारती जगताप यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आदिवासी विभागाचे नाशिक प्रकल्पाचे प्रमुख कुमार आशीर्वाद, अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, जयश्री जेजूरकर, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जयंत जाधव, कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, कोशाध्यक्ष प्रकाश बोराडे, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी ज्योतीचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इमारतीचा जिना कोसळला

0
0

सुकेणकर लेनमधील घटना; दोन जखमी

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील सुकेणकर लेन येथील श्रीरामकृपा अपार्टमेंट या सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या इमारतीचा जिना शुक्रवारी (दि. ५) दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळला. या घटनेत सरिता मनोज जैन (वय ४८) व धीरज किसनचंद ललवाणी (वय ३८) हे दोघे जखमी झाले.

या इमारतीत एका बाजूला सहा फ्लॅट आणि दुसऱ्या बाजूला तीन फ्लॅट आहेत. इमारतीला चार जिने असून, सर्वात वरच्या जिन्यावरून सरिता जैन या धुतलेले कपडे गच्चीवर वाळत घालण्यासाठी जात असताना, जिना कोसळला. त्या दोन जिने खाली येऊन पडल्या. स्लॅब व जिन्याचे गज पडल्याने त्यांचा तळपाय कापला गेला असून, त्यावर ५० टाके पडले आहेत.

या इमारतीच्या जिन्याचे स्लॅब ठिकठिकाणी निघालेले आहेत. सर्वात वरच्या फ्लॅटच्या जिन्याचे स्लॅब पडून गज उघडे पडले आहेत. या इमारतीचा जिना पडला तेव्हा पाच जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. दुर्घटना घडल्यानंतर सहा कुटुंबातील रहिवाशांना येथून हलविण्यात आले. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतीकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे.

घटनास्थळी नगरसेवक गुरुमीत बग्गा, माजी नगरसेवक उल्हास धनवटे, पंचवटी विभागीय अधिकारी गायकवाड, पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार असल्याचे बग्गा यांनी सांगितले.

दरम्यान, या इमारतीच्या दक्षिणेला असलेल्या कौलारू घरमालकांना धोकादायक घर असल्याची नोटीस दिली आहे. या घराची भिंत मोडकळीस आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्विलिंग आर्ट वर्कशॉप रविवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे रविवारी (दि. ७) क्विलिंग आर्ट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने क्विलिंग आर्टद्वारे श्री विठ्ठल साकारण्याची संधी नाशिककरांसाठी चालून आली आहे. ही कार्यशाळा मिनी मिरॅकल्स, रो-हाऊस नं १४, पारिजातनगर, महात्मानगर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

या वर्कशॉपमध्ये पूजा गवळी मार्गदर्शन करणार आहेत. कल्चर क्लब सभासदांसाठी २०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. कार्यशाळेसाठी येताना कात्री, डिंक आणि ब्लॅक कलरच्या क्विलिंग स्ट्रिप्सची दोन पाकिटे आणावीत. उर्वरित साहित्य आयोजकांकडून मिळणार आहे. या कार्यशाळेत आठ वर्षांपासून ८० वर्षे वयोगटापर्यंत कुणालाही सहभाग घेता येईल. रजिस्ट्रेशनसाठी ९४२२५१३५६९ या मोबाइलवर दुपारी १ ते ६ या वेळेत संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड येथे भेट द्यावी.

..

चौकट :

२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब' चे सदस्य

ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूक चाळवणारे स्टार्टर

0
0

मटा फर्माईश

अस्सल पाच

फणिंद्र मंडलिक

fanindra.mandlik@timesgroup.com

भूक चाळवणारे स्टार्टर

हॉटेलमध्ये गेल्यावर तयार होत असलेल्या पदार्थांच्या सुगंधामुळे भूक अधिकच चाळवते. आपण दिलेली ऑर्डर येईपर्यंत जीव कासावीस होतो. अशावेळी आठवण येते ती स्टार्टरची, मग स्टार्टर पुढ्यात आले की मेन कोर्स कधीही येऊ द्या, त्याची काळजी रहात नाही. नाशिकमध्ये जशी मेनकोर्ससाठी हॉटेल्स प्रसिद्ध आहेत तशीच स्टार्टर्ससाठी देखील प्रसिद्ध आहेत. अनेकदा स्टार्ट मध्ये नॉनव्हेजचे प्रकार जास्त आहेत असे म्हटले जाते, मात्र व्हेजमध्ये त्यापेक्षा जास्त प्रकार आहेत. व्हेज कटोरी चाट, व्हेज कबाब, व्हेजिटेबल गोल्ड कॉईन, व्हेज लॉलीपॉप असे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. त्यापेक्षा जरा हटके प्रकार आपण आज पाहणार आहोत.

…----

जगन्नाथचे 'पनीर शांघाई'

गेल्या अनेक वर्षांपासून व्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे जगन्नाथ हॉटेल. महात्मा गांधीरोडवरच्या महाबळ चौकात असलेल्या हॉटेलमध्ये नेहमीच्या प्रकारांबरोबरच हटके स्टार्टर चाखायला मिळतात. त्यात 'पनीर शांघाई' आणि 'पनीर मखमली' प्रसिद्ध आहेत. 'पनीर शांघाई' या प्रकाराच्या नावावरूनच त्याची ओळख पटते. हा प्रकार चायनीज स्टार्टरशी मिळता जुळता आहे, पण पूर्णत: चायनीज नाही. यात इंग्रजी भाज्यांचा वापर होतो. यासाठी नुडल्सची टोकरी वापरली जाते. पनीर थोडे तेलात लालसर परतून घेत त्यात चिली सॉस, सोया सॉस, व्हेनेगर, का‌ळीमिरी व थोडी साखर असे पदार्थ टाकून त्यात ब्रोकोलिन, रेड, ग्रीन, यलो कॅप्सीकम टाकून परतले जाते त्यात चायनीज मसाला वापरला जातो. यामुळे त्याची टेस्ट अफलातून लागते. हा पदार्थ या हॉटेलचा यूएसपी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

…----

साई चायनीजचे 'ड्राय मंच्युरियन'

स्टार्टरमध्ये असलेला हा कॉमन पदार्थ आहे, मात्र इतर ठिकाणच्या मंच्युरियनपेक्षा साई चायनीज कॉर्नरचे मंच्युरियन जरा हटकेच लागते. गंगापूररोडच्या एसटी कॉलनीजवळ असलेल्या साई चायनीज कॉर्नरमध्ये सकाळ-सायंकाळ युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे हॉटेल केवळ चायनिज पदार्थांसाठीच प्रसिद्ध आहे. मैदा, कॉर्न फ्लॉवरमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा किस टाकून त्यात आलं, लसून, मिरचीची पेस्ट घातली जाते. त्याचे छोटे गोळे बनवून ते मंद आचेवर तळून घेतले जातात. जशी मागणी असेल त्याप्रमाणे हे गोळे परतून दिले जातात. परतण्यासाठी पुन्हा आलं, लसून, कांद्याची पात, चिली सॉस, सोयासॉस, व्हिनेगर व थोडेसे कॉर्नफ्लॉवर टाकून परतले जाते. त्यानंतर ग्राहकांना गरमागरम सर्व्ह केले जाते. पावसाच्या या सिझनमध्ये तर ड्राय मंच्युरियन खवय्यांमध्ये हॉट फेव्हरिट आहे.

…----

व्हेज गुलाटी कबाब

देवळाली कॅम्पच्या लामरोड परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या 'आमची माती आमची माणसं' या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन फुडची चांगली चलती आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे व्हेज कबाबदेखील चाखायला मिळतात. यातील सर्वात चांगला पदार्थ म्हणजे 'व्हेज गुलाटी कबाब' हा होय. हा कबाब बनवण्यासाठी ग्रेड पनीर, ग्रेड चीज, मीठ, पांढरी मिरी पावडर, काळं मीठ, साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट, कॉर्न फ्लॉवर, बेसन, ग्रेड बिट, या सर्वांचे मिश्रण केले जाते त्यानंतर याची टिक्की बनवली जाते. या टिक्कीमध्ये चीज स्टफ केले जाते. त्यानंतर मंद आचेवर फ्राय केले जाते. या बरोबर व्हाईट सॉस अथवा टॉमॅटो सॉस सर्व्ह केला जातो. याची थोडी तिखट गोड आंबट चव बऱ्याच वेळ जिभेवर रेंगाळते.

…----

ब्ल्यू लिफचा 'पनीर ठेचा टिक्का'

गंगारपूर रोडवर नवशा गणपती मंदिराजवळ हॉटेल ब्ल्यू लिफमध्ये मिळणारा 'पनीर ठेचा टिक्का' चांगलाच झणझणीत आहे. पनीरचे पदार्थ म्हटले की ते थोडेसे गोडसर असणार असा अनेकांचा समज असतो. मात्र 'पनीर ठेचा टिक्का' खाल्ल्यानंतर हा समज दूर होतो. थोडा तिखट असलेला पदार्थ लोक आवर्जून घेतात. हा टिक्का बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसून, कोथिंबीर, शेंगदाणे मिक्स करून तेलात परतून घेतले जातात, त्यानंतर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक केले जाते. हे मिश्रण जास्त बारीक होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यानंतर दही, गरम मसाला, धने पावडर, जीरे पावडर, काळं मीठ, चाट मसाला, थोडे लिंबू रस हे सर्व पदार्थ एकत्र केले जातात. पनीरच्या क्युब करून त्यात चीज आणि ठेचा स्टफ करून वर दिलेल्या पेस्टमध्ये मॅरिनेट करुन तळून घेतले जातात. पाच मिनिटे मंद आचेवर तळल्यानंतर हा पदार्थ थोडा तिखट थोडा आंबट फार छान लागतो.

…---

करी लिव्हजचा व्हेज नवाबी कबाब

गंगापूर रोडच्या जेहान सर्कलजवळ असलेल्या करी लिव्हजमध्ये मिळणारा 'व्हेज नवाबी कबाब' खरंच अफलातून आहे. यात अनेक प्रकारच्या भाज्या वापरल्या जात असल्याने व तिखटाचे प्रमाण कमी असल्याने लहान मुलांनाही चांगला आवडतो. हा कबाब तयार करण्यासाठी भाज्या बारीक किसून घेतल्या जातात. त्यात सिझनेबल फळांचे बारीक काप टाकून वेलची पावडर, किचन किंग मसाला, नारळ पावडर, आलं, लसून पेस्ट, मीठ धने पावडर, चीज, ड्रायफ्रुट, हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली हे सर्व एका भांड्यात घेऊन मिक्स केले जाते. यात ब्रेडचा चुरा मिक्स करून तो मसाला कबाब सिकला लावून तंदुरमध्ये ७ मिनिटे भाजून घेतला जातो. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह केल्यास त्याची चांगली टेस्ट येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगातून आत्मसंरक्षण साध्य होईल

0
0

योगातून आत्मसंरक्षण साध्य होईल

जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वयंसिद्ध प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या महिला स्वतःचे संरक्षण तर करू शकतीलच तसेच समाजातील दुर्बल महिलांचे व पुरुषांचे देखील स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आधार बनतील. स्वयंसिद्धामधून स्वसंरक्षण तर योगातून आत्मसंरक्षण साध्य होईल, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.

जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालय व कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यशाळा व अॅडव्हान्स योग सर्टिफिकेट कोर्सच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक म्हणाले की, भविष्यात स्वयंसिद्धांनी किमान ५ महिलांना तरी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. स्वयंसिद्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करणे होय. महिलांना सिद्ध करण्यात महिलाच अडथळा आणतात त्या घरातीलच असतात. त्यामुळे कुटुंबातच महिलांना दुय्यम स्थान प्राप्त होते ही परिस्थिती बदलने गरजेचे आहे असे ते म्हणाले. प्रशिक्षणातील ६० महिलांना जिल्हा क्रीडाधिकारी यांनी काळ्या रंगाचे ट्रॅक सूट दिले व या स्वयंसिद्धा म्हणजे ब्लॅक कॅट आहे, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात

0
0

देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी रंगभुमीवर मैलाचा दगड ठरलेल्या भद्रकालीच्या संगीत देवबाभळी नाटकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयात प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात अभ्यास मंडळाने 'देवबाभळी' या साहित्यकृतीची निवड नाटक या साहित्यप्रकाराच्या अभ्यासाअंतर्गत झाली आहे.

देवबाभळी नाटक आता वेगाने ३०० च्या टप्प्याकडे घोडदौड करत आहे. आजवर सर्वाधिक ३९ पुरस्कार मिळालेल्या हे नाटक फोर्ब्सच्या मासिकातही झळकले होते. नसिरुद्दिन शाह, परेश रावल, सतीश आळेकर, जयंत पवार,राजीव नाईक, शफाअत खान श्रीराम लागू, देवकी पंडित, सुमित्रा भावे, अमोल पालेकर यांसारख्या दिग्गजांनी गौरवलेल्या या नाटकाच्या शिरपेचात आणखी एक बहुमान मिळाला आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेने 'कमलाकर सारंग पुरस्कार' देऊन या नाट्यसाहित्यकृतीचा गौरव केला होता.

--

हे खरंच अकल्पनीय आहे. मला जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली की नक्की त्यांना तेच म्हणायचं आहे का जे मी समजतोय. अधिकाधिक खरा आणि आंतरिक अनुभव कसा देता येईल इतकंच मी लिहतांना भान ठेवत होतो. हा एकूणच प्रवास अद्भूत आहे.

- प्राजक्त देशमुख लेखक-दिग्दर्शक, देवबाभळी

----

मी पहिल्यांदा नाटकाचा विषय ऐकला तेव्हापासूनच नाटकाच्या प्रेमात होतो. नंतर वाचल्यावर एका अनामिक ओढीने मी त्यात गुंतत गेलो. सर्वोत्तम नाटकाचं बीज हे लेखनातच असतं. नाटक म्हणून ही कलाकृती जितकी अप्रतिम सादर होते तितकीच साहित्य म्हणून ती दर्जेदार आहे.

- प्रसाद कांबळी निर्माता, भद्रकाली प्रॉडक्शन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images