Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धरण सुरक्षेसाठी विश्व बँकेची मदत

$
0
0

मटा विशेष

- राज्यातील १६७ धरणांची दुरुस्ती व पुनर्बांधणी होणार

- तब्बल ९४० कोटींचा निधी मंजूर

Gautam.Sancheti@timesgroup.com

@sanchetigMT

नाशिक : कोकणातील तिवरे धरण फुटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील एकूण १६७ धरणांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी विश्व बँकेचे सहकार्य लाभणार आहे. ९४० कोटींच्या निधीतून ही सुरक्षा साधली जाणार आहे. यात ७० टक्के वाटा विश्व बँकेचा, तर ३० टक्के वाटा राज्य सरकारचा आहे. यासाठी चार विभागांच्या धरणसुरक्षा पुनर्लोकन समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात निवृत्त अधिकारी व धरणांची माहिती असलेल्या तज्ज्ञांचा समावेश आहे.

चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे राज्यात धरण सुरक्षिततेचा मुद्दा रडारवर आलेला असतानाच नाशिक येथे बुधवारी मेरी येथे जलसंपदा विभाग व विश्व बँकेच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा सुरू होती. त्यात धरणांच्या सुरक्षिततेसाठी मंजूर झालेल्या ९४० कोटींतून कोणत्या धरणाचे काम अग्रक्रमाने करायचे व त्यासाठी समिती कशी असावी, यावर निर्णय घेण्यात आला. बैठकीतच धरणसुरक्षा पुनर्लोकन समिती तयार करण्यात आली. त्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण व नाशिक अशा चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या आता जुलैअखेर स्थानिक अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन धरणांची पाहणी करणार असून, त्यानंतर ते अहवाल देणार आहेत. त्यानंतर या धरणाच्या कामाला मंजुरी देऊन ते काम केले जाणार आहे. या समितीत धरणाची माहिती असणारे सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ असणार आहे. देशात सर्वाधिक धरणे राज्यात आहेत. त्यामुळे धरण सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. त्यात धरणफुटीच्या घटना भविष्यात होऊ नये, यासाठी हे सकारात्मक पाऊल असून, त्यामुळे धरण सुरक्षित बनणार आहे.

दुरुस्ती व पुनर्बांधणी

धरणाची पुनर्बांधणी व दुरुस्ती असे दोन्ही प्रकार या निधीतून केले जाणार आहे. पाहणी अहवालानंतर त्याबाबत निश्चित आकडे समोर येणार आहे. यात धरणांची संख्या व निधी कमी-जास्त होऊ शकतो, असेही एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक विभागाची धरणे

नाशिकच्या गंगापूर धरणाबरोबरच विभागातील दारणा, भंडारदरा व इतर धरणांचाही यात समावेश आहे. त्यामुळे येथील धरणांची पाहणी केल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. जेथे तात्पुरती दुरुस्ती आवश्यक आहे, ती तातडीने केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट पार्किंगकडे दुर्लक्ष भोवणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पार्किंगच्या वापराबाबत शहर वाहतूक शाखेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यापुढे पार्किंग नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट पोलिसांकडून कारवाई होणार आहे. शहरात रस्त्यांवरील १३, तर ऑफ स्ट्रीट दोन अशा १५ ठिकाणी सुमारे २१०० दुचाकींसाठी, तर ८४५ चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ऑन स्ट्रीट पार्किंगची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेवर जवळपास पाच ते सहा महिन्यांपूर्वी काम सुरू करण्यात आले. सध्या ही सुविधा मोफत असून, १५ जुलैनंतर पे अॅण्ड पार्क तत्त्वावर वाहनचालकांकडून शुल्क आकारणी करण्याचे काम सुरू होऊ शकते. याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट पार्किंग असलेल्या परिसरात नो पार्किंगबाबतचे फलक लावण्याबाबत महापालिकेला कळविले आहे. ते फलक बसविल्यानंतर वाहतूक शाखेमार्फत दंडात्मक अथवा वाहन टो करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात येईल.

--

सुविधा उपलब्ध असलेला परिसर

--

ठिकाण- दुचाकींची संख्या- चारचाकींची संख्या

---

कुलकर्णी गार्डनजवळील साधू वासवानीरोड-२६-०

कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल कार्यालय-४२-२४

ज्योती स्टोअर्स/ऋषिकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका-१७७-६३

प्रमोद महाजन उद्यान प्रवेशद्वार (इंद्रप्रस्थ हॉल)-५४-२९

गंगापूर नाका ते जेहान सर्कल, गंगापूररोड-३६२-२३१

जेहान सर्कल ते गुजराथी हॉस्पिटल, गंगापूररोड-१२०-४५

जेहान सर्कल ते एबीबी सर्कल-५८४-२०३

श्रीगुरुजी रुग्णालय ते पाइपलाइनरोड-५३-२६

त्र्यंबक नाका ते खडकाळीरोड, जीपीओ-५५-३३

थत्तेनगररोड कॉलेजरोड- १२१-४३

श्रद्धा पेट्रोलपंप ते वेस्टसाइड, कॉलेजरोड-१३८-७९

कॅनडा कॉर्नर ते विसे मळा-७१-४५

शालिमार ते नेहरू गार्डन-८६-१९

बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान-२०८-१५६

अण्णाशास्त्री हॉस्पिटल, मेनरोड-१९-७

(सेकंड लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बुकानेंची पुन्हा लॉटरी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदावरून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचलबांगडी केलेल्या डॉ. सुनील बुकाने यांची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुन्हा पुनर्स्थापना केली आहे.

मुंढेंनी केलेली बदली रद्द करीत बुकानेंकडे पुन्हा शहराच्या आरोग्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्यमान संचालक डॉ. सचिन हिरे यांना पदावनत करीत त्यांना सहाय्यक आरोग्य अधिकारी केले आहे, तर त्यांच्या जोडीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांना सहाय्यक आरोग्य अधिकारीपदी बढती दिली आहे.

तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावत अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबाहेरचा रस्ता दाखवला होता. मुंढेंनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल केले होते. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत प्रशासकीय पातळीवर सुधारणा घडविल्या होत्या. नवीन पदांची निर्मिती करीत कार्यक्षम कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदे बहाल केली होती. परंतु, मुंढेंच्या बदलीनंतर आलेल्या गमेंनी मात्र याच अधिकाऱ्यांना पुन्हा मुख्यालयात आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुंढे यांनी आरोग्य विभागाचे नामकरण घनकचरा व्यवस्थापन विभाग असे करीत या विभागाचे प्रमुखपद आरोग्याधिकारीऐवजी संचालक असे करण्यात आले होते. मुंढे यांनी डॉ. बुकाने यांची बदली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदावरून थेट नवीन नाशिक विभागातील स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी केली होती. सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांच्याकडे संचालपदाची प्रभारी सूत्रे देण्यात आली होती, तसेच पशुसंवर्धन विभाग स्वतंत्र करीत या विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे डॉ. प्रमोद सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. गमेंनी डॉ. बुकाने यांना पुन्हा मुख्यालयात आणले आहे. गमे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदावर डॉ. बुकाने यांची पुनर्स्थापना केली आहे, तर डॉ. हिरे यांच्याकडे पूर्ववत सहाय्यक आरोग्याधिकारीपद देण्यात आले आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाचा स्वतंत्र कार्यभार बघणाऱ्या डॉ. सोनवणे यांच्याकडेही सहाय्यक आरोग्याधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्गजांचे अर्ज बाद

$
0
0

छाननीत ३७३ अर्ज वैध; लवादाकडे आज दाद मागता येणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वंसतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर गुरुवारी छाननी करण्यात आली. यात अखेरीस ३७३ अर्ज वैध ठरले. तर ४४ अर्ज अवैध ठरले. यामुळे २९ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणार आहेत. अर्जांच्या छाननी प्रक्रियेत संस्था वर्तुळातील दिग्गजांचे अर्ज देखील काही ना काही कारणांमुळे बाद ठरले आहेत. या उमेदवारांना २४ तासांच्या आत लवादाकडे दाद मागता येणार आहे.

अर्ज छाननीनंतर आता संस्थास्तरावर निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अर्ज दाखल करण्याचा प्राथमिक टप्पा पार पडल्याने आता पॅनल निर्मितीसाठी परस्पर विरोधी गटतटांकडून फिल्डींग लावण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही भेटीगाठी आणि बैठकांवर भर दिला आहे. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत २९ जागांसाठी ४३१ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. गजेंद्र सानप, सदस्य ॲड. अशोक कातकाडे, ॲड. संतोष दरगोडे यांच्या उपस्थितीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी दिवसभरात करण्यात आली. यात ४४ अर्ज विविध कारणांनी अवैध ठरले. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये प्रामुख्याने सखाराम कराड यांचा अध्यक्षपदाचा, ॲड. अशोक आव्हाड यांचा सरचिटणीसपदाचा, ॲड. विलास आंधळे यांचा उपाध्यक्षपदाचा आणि विद्यामन संचालक मंडळातील स्वीकृत संचालक विनायक शेळके यांचे अर्ज बाद झाले. अर्जावर उमेदवारांचे नाव चुकीचे असणे, अनुमोदकांचे नाव, पत्ता, अनुक्रमांक न देणे, स्वाक्षरी न करणे, तालुक्याबाहेरील अनुमोदक देणे, विश्वस्त पदाच्या अर्जात कालावधी न टाकणे आदी कारणांनी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.

अर्ज माघारी आजपासून

अर्ज माघारीस शुक्रवारपासून (दि. ५) सुरुवात होणार आहे. माघारीची मुदत सोमवारपर्यंत (दि. ८) आहे. अंतिम यादी मंगळवारी (दि. ९) जाहीर होणार आहे. माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज छाननीनंतरची स्थिती

\Bपद................. प्राप्त अर्ज .............वैध अर्ज ......................अवैध अर्ज\B

अध्यक्ष .............१९ .......................१८................................ १

उपाध्यक्ष............२८....................... २७................................ १

सरचिटणीस....... १७........................ १६................................१

सहचिटणीस........ २४........................२४................................०

विश्वस्त............ ९४........................ ७१.............................. २३

महिला प्रतिनिधी....२१...................... २१.................................०

निफाड ..............३८....................... ३२................................ ६

सिन्नर ..............३९....................... ३३.................................. ६

येवला ..............२० ......................१८................................... २

नांदगाव..............२२...................... २०.................................. २

दिंडोरी............ २१......................... २१...................................०

नाशिक............ ३०........................ २८................................... २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आठवडाभरात ही मोहीम हाती घ्यावी, असे आदेश निवडणूक उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले आहेत. मतदार यादीमध्ये आपला अचूक तपशील यावा याकरीता नागरिकांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध मतदार यादी करण्यावर निवडणूक शाखेने भर दिला आहे. या मोहिमेअंतर्गत प्राधान्याने मतदार यादीतील सर्व मयत मतदारांची नावे वगळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व मयत मतदारांची माहिती एकत्रितरित्या संकलित करून मृत्यूचे दाखले प्राप्त करून घ्यावेत, अशा सूचना बीएलओंना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करून दोषरहीत आणि परिपूर्ण मतदार यादी तयार करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागातील काही मतदान केंद्रांवर मतदार यादीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. अशा तक्रारी विधानसभा निवडणूक काळात प्राप्त होणार नाही. यासाठी मतदार यादी शुद्धीकरणाचे काम अत्यंत काटेकोरपणे करा, अशा सूचनाही बीएलओंना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुप्तांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम साईटवरील मजुरांसाठी बांधलेली पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिस शोध घेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक सुजय गुप्ता यांनी जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.

दुर्घटनेची घटना मंगळवारी (दि. २) सकाळी गंगापूररोडवरील ध्रुवनगर येथे घडली होती. यात चौघा कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूररोड पोलिस ठाण्यात श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड हौसिंग इंडियाचे सुजय गुप्ता, आरसीसी कॉन्ट्रॅक्टर भावीन नविनभाई पटेल (वय ३४), लेबर कॉन्ट्रॅक्टर आशिष अनिलकुमार सिंग (वय २६, रा. जगतापनगर, उंटवाडी) आणि प्रोजेक्ट मॅनेजर सचिन सुरेश शेवडे (वय ४४, रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील गुप्ता वगळता इतरांना तात्काळ अटक झाली. गुप्ता यांनी अटकपूर्व जामिनासाठी अॅड. जयदीप वैशंपायन यांच्यावतीने अर्ज दाखल केला. वैशंपायन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाने हा अर्ज दाखल करून घेतला असून, त्यावर येत्या सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणातील ‘ब्लास्ट’बाबत यूटर्न!

$
0
0

(फ्लायर)

- प्रशासनाने महासभेकडे ढकलला चेंडू

- तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर सावध पाऊल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चिपळूणमधील तिवरे धरण फुटीनंतर महापालिका प्रशासनाने गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्यासाठी 'अंडर वॉटर कन्ट्रोल ब्लास्ट' करण्याच्या निर्णयाबाबत यूटर्न घेतला आहे. गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्यासाठी चर खोदण्याबरोबरच खडक फोडण्यासाठी स्फोट घडविण्याचे नियोजन करणाऱ्या प्रशासनाने आता सदरचा निर्णय महासभेकडे सोपविण्यावर सोपवला आहे. स्फोट घडविल्यानंतर धरणाला इजा पोहचल्यास आपल्यावर खापर फुटू नये यासाठी महासभेकडे परवानगीचा चेंडू टोलविण्यात आला आहे. याबाबत आता लोकप्रतिनिधीही सजग झाले आहेत.

यंदा पावसाळा लाबंल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याची पातळी प्रथमच तळाला गेली आहे. दारणा धरणाचा भारही गंगापूरवरच आला असून, 'इन्टेक वेल'च्या न्युनतम पातळीपर्यंत पाणी आल्याने पाणीपुरवठा विभागाला धरणातील मृतसाठा उचलणे भाग पडले. मृतसाठा 'इन्टेक वेल'पर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. सोबतच अधिकच्या कामासाठी दीड कोटीच्या कामाची निविदाही काढली आहे. ज्या भागात चर खोदण्याचे काम सुरू आहे, त्या भागात दोन मीटर उंचीचा खडक असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे कामात येणारा व्यत्यय व पाण्याने गाठलेली न्यूनतम पातळीमुळे चर खोदाईची संधी असल्याने प्रशासनाने मुंबई डॉक यार्डच्या कामासाठी वापरात आणलेले 'अंडर वॉटर कन्ट्रोल ब्लास्ट' करून खडक फोडण्याची चाचपणी सुरू केली होती. जलंसपदा विभागाबरोबरच अन्य विभागांच्या परवानग्यांची तयारी करण्यात आली होती. परंतु, ब्लास्ट करण्याची तयारी सुरू असतानाच मंगळवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. सदर धरण हे मातीचे होते, तर गंगापूर धरणही मातीचे आहे. त्यामुळे स्फोटामुळे धोका निर्माण झाल्यास सदरचा प्रकार अंगलट येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. हा निर्णय धोरणात्मक असल्याचे कारण पुढे करीत पाणीपुरवठा विभागाने महासभेसमोर प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात धरणाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरसेवकांच्या माथी मारण्याचा हा प्रकार जबाबदारीतून अंग झटकणारा असल्याचे बोलले जात आहे. गंगापूर धरणात 'अंडर कन्ट्रोल ब्लास्ट'चा प्रयोग अयशस्वी झाल्यास त्याचे खापर महापालिकेसोबतच जलसंपदा विभागावर फुटण्याची व यातून पालकमंत्र्यांवरच संकट ओढवण्याच्या भीतीने प्रशासनाने अंग काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत महासभा काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग सभापतिपदीसंगमनेरे निश्चित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रभाग सभापतींची निवड आज (ता. ५)केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात सायंकाळी चार ते साडेपाचपर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. भाजपचे जेलरोड येथील प्रभाग अठराचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.

नाशिकरोडला भाजपचे बारा, तर शिवसेनेचे अकरा नगरसेवक आहेत. युतीचे बहुमत आहे. बाजीराव भागवत आणि गोडसे हे स्वीकृत सदस्य आहेत. भाजप शिवसेनेची राज्यस्तरावर युती झालेली आहे. संगमनेरे यांच्या खेरीज अन्य इच्छुकांनी प्रभाग सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे संगमनेरे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे. सध्या भाजपचे पंडित आवारे हे सभापती आहेत. त्यांचा एक वर्षांचा कालावधी संपला आहे. लोकसभा निवडणूक तसेच सातपूरमधील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रभाग सभापती निवडणूक लांबणीवर पडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्पलाइनचा प्रचार फ्लेक्सद्वारे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारी कामकाजाचा पाठपुरावा करता यावा याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात 'व्हॉटसअॅप ग्रिवन्स रिड्रेसल' ही हेल्पालाइन सुरू केल्यानंतर आता त्याच्या प्रसारावरही जोर देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र पाठवून सर्वसामान्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी फ्लेक्स तयार करून सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचा पाठपुरवा करण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. ९४२१९५४४०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधून नागरिक त्यांच्या कामाचे पुढे नेमके काय झाले, याची माहिती येथे मिळणार आहे. पण, या क्रमांकाची व या योजनेची माहिती सर्वसामान्यांना जिल्ह्यात माहिती व्हावी, यासाठी आता फ्लेक्स लावले जाणार आहे. प्रांत, तहसील, तलाठी, सेतू, आपले सरकार या कार्यालयांच्या दर्शनी भागात ते फ्लेक्स उभारले जाणार आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टँण्ड व रेशन दुकानातही हे फ्लेक्स दिसणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाइनची माहिती सुद्धा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नम्रता कलाविष्कारतर्फे एकांकिका लेखन स्पर्धा

$
0
0

नम्रता कलाविष्कारतर्फे

एकांकिका लेखन स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे नम्रता कलाविष्कार (नाट्य नम्रता) या संस्थेने व त्यांच्या मित्र परिवाराने ठरविले असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्ष आमदार हेमंत टकले तर कार्याध्यक्ष म्हणून अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक उपेंद्र दाते यांची निवड करण्यात आली आहे. अमृत महोत्सवी वर्षात समिती विविध कार्यक्रम सादर करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नम्रता कलाविष्कार व रवींद्र ढवळे अमृत महोत्सव समितीतर्फे नाशिकचे प्रसिद्ध रंगभूषाकार स्व. नारायण देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख पारीतोषिके दिली जाणार आहेत. दिलेल्या विषयांवरच एकांकिका लिहून पाठवायची आहे. स्पर्धेचे नियम व अटी तसेच प्रवेशिकेसाठी ९८९०४६२२८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल्कनीतून पडून बालिकेचा मृत्यू

$
0
0

बाल्कनीतून पडून बालिकेचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खेळता खेळता बाल्कनीतून पडल्याने पंधरा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सलोनी नीतेशकुमार सिंगे (रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर) असे या बालिकेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सलोनी आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत असताना ही घटना घडली. बाल्कनीचे ग्रील अचानक तुटल्याने ती दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली. या घटनेत तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, घटनेचा अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९२८ मालमत्तांवर टाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वारंवार जप्तीच्या नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने अखेर कारवाईचा फास आवळला असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे.

पंचवीस हजारांच्या पुढे मोठे थकबाकीदार असलेल्या शहरातील १०५४ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये प्रतिष्ठित व्यावयायिक, औद्योगिक कंपन्यांचाही समावेश असून, या जप्त मालमत्तांपैकी ९२८ मालमत्तांचा येत्या १८ जुलै रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिली. त्यामुळे या मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी गेल्या वर्षापासून जोरदार मोहीम सुरू केली आहे. जवळपास एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे सुमारे ९० टक्के नागरिकांनी थकबाकी जमा केली असली, तरी काही बड्या थकबाकीदारांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे महापालिकेने अशा बड्या थकबाकीदारांची थेट मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई सुरू केली होती. ३१ मार्च २०१९ पर्यंत थकबाकी असलेल्या शहरातील तब्बल १०५४ थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या १०५४ मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्यासंदर्भात शेवटची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, या १०५४ पैकी १२६ थकबाकीदारांनी थकबाकी जमा केली आहे. त्यामुळे वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी जमा न करणाऱ्या ९२८ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा येत्या १८ तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहात लिलाव काढण्यात येणार आहे. गुरुवारी यातील १७२ थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाची जाहीर नोटीस काढण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व मालमत्तांच्या लिलावाची जाहीर नोटीस काढली जाणार आहे.

--

..तर महापालिकेचे नाव लावणार

महापालिकेने मालमत्ता लिलावात काढल्या, तरी त्या लिलावांना यापूर्वी प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या सातबारावर महापालिकेचे नाव लावण्याचा ठराव तत्कालीन स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या कारकीर्दीत करण्यात आला आहे. त्यामुळे जप्त मालमत्तांच्या लिलावात कोणी बोली लावण्यास आले नाही, तर महापालिकाच थेट नाममात्र एक रुपयाची बोली लावून त्या मालमत्तांवर आपले नाव लावून घेणार आहे. महापालिकेकडून संबंधित मालमत्ताधारकांच्या सातबारावरच महापालिकेचे नाव लागणार असल्याने खरेदी-विक्रीसाठी मालमत्ताधारकाला त्याची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. या धोरणामुळे वसुलीतही वाढ होणार आहे.

---

थकबाकीदारांची विभागनिहाय संख्या

---

विभाग लिलावधारकांची संख्या

नाशिकरोड ४५२

पंचवटी- २१३

नाशिक पूर्व- १४१

सिडको- ५०

सातपूर- ४९

नाशिक पश्चिम- २३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरीही ‘ध’ चा ‘मा’ होतोच!

$
0
0

व्हॉट्सअॅपवरील अपुऱ्या माहितीने उडतो गोंधळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियमित असते तसेच ते एक मॉकड्रील. त्याबाबतचे स्पष्टीकरण अगोदर दिले. पण, काही जणांनी या मॉकड्रीलला खरी घटना समजून व्हॉट्सअॅप मॅसेजेस पसरविण्यास सुरुवात केली. अगदी ही घटना कशी घडली इथपासून किती कॅश चोरीला गेली, अशा मनोरचित घटनांचा यात समावेश होता. धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे अशाच खोडसाळ मॅसेजमुळे चौघा जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेला वर्ष उलटल्यानंतर नेटिझन्स मॅसेज फॉरवर्ड करण्यातील गांभीर्य कधी समजून घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा पडल्याचे मॉक ड्रिल सायंकाळी झाले. या मॉक ड्रिलबाबत पोलिसांनी काही घटकांना अगाऊ सुचना सुद्धा केल्या होत्या. मात्र, तरीही उथळ नेटिझन्सने आपापल्यापरीने व्हॉट्सअॅपवर मॅसेजेस टाकलेच. त्यात मुथूटप्रमाणे दरोड्याची घटना कशी घडली, किती पकडले इथपासून किती पैसे गेलेत, हेदेखील नमूद करण्यात आले. असे मॅसेज टाकण्यापूर्वी किंवा ते फॉरवर्ड करण्यापूर्वी तथ्य शोधण्यास प्राधन्य देण्यात आले नाही.

याबाबत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले, की सोशल मीडियावर मॅसेज टाकण्यापूर्वी किंवा तो फॉरवर्ड करण्यापूर्वी प्रत्येकाने खात्री करणे आवश्यक असते. दुर्दैवाने तसे होत नाही. पोलिस अथवा मीडियाशी संपर्क साधून अशा घटनांबाबत खात्री केल्यानंतर ते प्रसारित झाल्यास हरकत नाही. विनाकारण प्रसारित होणाऱ्या भडक मॅसेजेसमुळे समाजात काही काळापुरता का होईना तणाव निर्माण होतो. बऱ्याचदा घटनांची मोडतोड सुद्धा करण्यात येते.

आधी साधा पोलिसांशी संपर्क

इंदिरानगर येथील मॉकड्रिलनंतर प्रसारित झालेले मॅसेजेसबाबत कल्पना नाही. पण असे नेहमी घडते. सुशिक्षित नागरिकांनी समाजावर प्रभाव पडणारे मॅसेज टाकताना अथवा ते फॉरवर्ड करताना प्रथम नजिकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून खात्री करणे आवश्यक आहे, असे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुरुपुष्यामृत’ने सोनेखरेदीला लकाकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक.

सोन्याचे भाव वधारलेले असतानाही पुष्य नक्षत्र असा मेळ साधत नाशिककर नागरिकांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. सराफ बाजार व इतर ठिकाणच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. गुरुवारच्या पुष्य नक्षत्रावर कोट्यवधीचे सोने-चांदीची खरेदीचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोन्याचा भाव वाढलेला असतानाही गुरुवारी पुष्य नक्षत्रामुळे सराफ बाजार ग्राहकांनी फुलला. अनेक ग्राहकांनी सराफ बाजारातील पेढ्यावर भावाबाबत बुधवारी चौकशी केली. मात्र, गुरुवारी बाजार उघडल्यानंतर भाव ३४ हजार ४०० वर स्थिरावला. नाशिकमध्ये अनेकांनी लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी केली, तर अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केली. ३४ हजारावर भाव असूनही सराफ बाजारात सोने खरेदीला उधाण आले. सराफ व्यवसायिकांसह टपाल कार्यालये, बँका, ब्रँडेड शोरुम यांच्याकडे चोख सोने उपलब्ध असताना पारंपरिक सोनाराकडे खरेदीसाठी नागरिकांचा कल दिसून आला. गुरुपुष्यांमृताच्या मुहूर्तावर अनेकांनी सोन्याची बिस्किटे, वेढे, सोन्याच्या भरीव मूर्ती तसेच सोन्याची नाणी घेण्याकडे कल दाखवला. सोन्याची नाणी एक ग्रॅमपासून ते पन्नास ग्रॅमपर्यंत उपलब्ध होती. तसेच चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेन्डल, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्या यांची खरेदी जोरात झाली.

ऑफर्सची धम्माल

कमी झालेले भाव व सोने खरेदीचा उत्साह पाहून अनेक विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या स्कीम्स बाजारात आणल्या होत्या. काही सराफांनी विशिष्ट किमतीच्या खरेदीवर कुपन वितरित केले. त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येणार असून ग्राहकांना चारचाकी गाड्यांसह विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच काही विक्रेत्यांनी खरेदी केल्या जाणाऱ्या सोन्याच्या वजनाइतकी चांदी मोफत देण्याची घोषणा केली तर काहींनी मजुरीवर सूट जाहीर केली.

दागिन्यांपेक्षा चोख सोन्याला मागणी

लोकांनी दागिन्यांऐवजी चोख सोने खरेदीला पसंती दिली. अनेकांनी सोन्याची वेढे व बिस्कीटे घेणे पसंत केले तर इन्व्हेस्टेमेंट म्हणून सोने घेत असलेल्या ग्राहकांनी सोन्याच्या लगडी घेणे पसंत केले. येत्या काळात लग्न समारंभ असलेल्या ग्राहकांनी आणखी भाव कमी होतील या आशेने थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश ग्राहकांनी गुरुपुष्यांमृतचा मुहूर्त साधलाच.

आगामी काळात लग्नसराई असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. इतरवेळी ग्राहक चोख सोने खरेदीला प्राधान्य देतात; मात्र लग्नसराई असल्याने नागरिकांनी चोख सोन्यासह दागिनेही खरेदी केले.

- अक्षय देवळालकर, सोने व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिओफेन्सिंग’मध्ये नाशिक प्रथम

$
0
0

जलस्त्रोतांची पारदर्शक पाहणी

म. टा.प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जलस्रोतांचे जिओफेन्सिंगद्वारे माहिती मिळवणाऱ्या पहिल्या चार जिल्ह्यात नाशिकने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांनीही जिओफेन्सिंगचे काम पूर्ण केले आहे.

राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १ एप्रिल ते २६ जून या कालावधीत खास मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेच्या आधारे राज्य सरकारने आकडेवारी प्रसिद्ध केली असून, त्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. परभणी, ठाणे, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांनी निकृष्ट दर्जाची कामगिरी केल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती करून घेण्यासाठी जिओफेन्सिंगचा आधार घेतला होता. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जलस्त्रोताच्या जागी जाऊन नोंद केली आहे. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या, त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे ठरविण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाण्यापासून होणारे रोग टाळण्यासाठी मदत होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी नरेश गिते म्हणाले, की यासाठी जिल्ह्यातील १ हजार ३८२ गावांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अगोदरही जिल्हा परिषदेने या कामात पहिला क्रमांक पटकावला होता. नाशिक जिल्हा परिषदेने सरासरी जिओफेन्सिंगद्वारे प्रत्येक गावातील जलस्रोताची माहिती मिळवण्यासाठी चार व्यक्तींची नेमणूक केली होती. त्यानुसार नाशिकमधील ७ हजार ३९३ पाणीस्त्रोतांची माहिती मिळवण्यात आली आहे. यामध्ये विहिरी, बोअरवेल, नलिका विहिरी इत्यादींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त शिवार’ची ८१ टक्के कामे पूर्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ या वर्षी नाशिक विभागातील ८१ टक्के म्हणजेच १६ हजार ३२८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित १२ टक्के कामे प्रगतीत असून ६ टक्के म्हणजेच कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत.

मान्सूनने अद्याप जोर न धरल्याने जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्यास संधी मिळाली आहे. पेरणी होण्यापूर्वी अधिकाधिक कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्या, असे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जलयुक्त शिवारची चालू वर्षातील अंमलबजावणी आढावा बैठक माने यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात नुकतीच झाली.

जलयुक्त शिवारमध्ये विभागातील १ हजार १२३ गावांची निवड झाली असून यात २० हजार ७२ कामांचे उद्दिष्ट्य होते. त्यापैकी १९ हजार ८६६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. विभागात ८१ टक्के म्हणजेच १६ हजार ३२८ कामे पूर्ण करण्यात आली. १२ टक्के कामे प्रगतीत असून ६ टक्के म्हणजेच १ हजार २४७ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. आराखड्यातील प्रस्तावित कामांमुळे निवडलेल्या १ हजार १२३ पैकी ४०८ गावे जलपरिपूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. यातून विभागात ५५ हजार ३६१ टीसीएम इतका प्रत्यक्षात पाणीसाठा निर्माण झाला आहे. या कामांवर ५७२.२६ लाख रुपयांच्या आराखडा रक्कमेपैकी अवघा ३६ टक्के निधी २०६.६३ लाख रुपये निधी आतापर्यंत खर्च झाला आहे.

काही कामांना कात्री

आढावा बैठकीत आराखड्यांनुसार अद्याप सुरू न झालेल्या कामांकडे आयुक्तांनी लक्ष वेधले. विविध कारणांनी सुरू न झालेली धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांतील काही कामेही कमी करण्यात आली. आराखड्यांतही सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानाच्या आरखड्यातील रखडलेल्या कामांच्या कारणांचा आढावा घेतला. काही आराखड्यांत सुधारणा करण्याचे सुचविले. पाऊस लांबलेल्या तालुक्यांतील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

- राजाराम माने,

विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रान्समधील स्पर्धेसाठीतन्मय बूबची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या 'पॅरिस वर्ल्ड गेम्स'साठी नाशिकरोडच्या तन्मय बूब या विद्यार्थ्याची १२ वर्षांखालील गटातील फुटबॉल संघात निवड झाली आहे. जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी एकूण २८ देशांचा सहभाग आहे. पॅरिसमधील क्विस्ट सिटी युनिव्हर्सिटी स्टेडियम व ज्युएल्स नोएल स्टेडियमवर दोन दिवस ही स्पर्धा होणार आहे. प्रशिक्षक फर्ग्युस सिमन्स व आई अनुराधा बूब यांचे तन्मयला मार्गदर्शन लाभले. देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये सहावीत तो शिक्षण घेत आहे. याच स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील गटात बार्न्स स्कूलचे गुणित रेड्डी व लोकजित जाधव यांचीही निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमांगीला गाठायचेय न्यूरो सर्जनचे शिखर

$
0
0

Pravin.Bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : बीएएमएस, डीएचएमएस डॉक्टरमध्ये फरक काय हे शहाण्या आणि सुशिक्षित व्यक्तीलाही सांगता येईलच याची शाश्वती नसताना दहावी उत्तीर्ण हेमांगी लोहार ही मुलगी न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट यांमधील फरकही सहजपणे सांगते. न्यूरोसर्जन होऊन वैद्यकीय क्षेत्रातील हिमशिखर गाठण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेमुळे नातलगांकडे आश्रयास आलेल्या हेमांगीने दहावीत ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी प्रचंड जिद्द बाळगणाऱ्या या गुणी मुलीला दात्यांकडून भरभक्कम आर्थिक पाठबळ हवे आहे.

कामटवाडे रोडवरील दुर्गानगर परिसरात सायखेडकर हॉस्पिटलमागील सत्यम बी अपार्टमेंटमध्ये हेमांगी राहाते. हे त्यांचे स्वत:चे घर नाही. तिचे मामा सचिन चौहान यांनी येथे भाडे तत्त्वावर घर घेतले आहे. मामाच्या कुटुंबासोबतच हेमांगीचे कुटुंबीयही येथे वास्तव्यास आहेत. लोहार कुटुंब मुळचे जळगाव जिल्ह्यातील रावेरचे. रावेरमध्येच हेमांगीचे वडील मनोज लोहार मार्केटिंगचे काम करीत असत. होलसेलरकडून चॉकलेट्सची पॅकेट्स घेऊन तालुक्यातील छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये ते पोहोचवत असत. यातून पाच-दहा रुपये याप्रमाणे जे कमिशन मिळेल त्यावर कुटुंबाची गुजराण सुरू होती. लोहार यांच्या कुटुंबात पत्नी सुनीता, मुलगा कृणाल आणि हेमांगी असे चौघे आहेत. मुले मोठी होऊ लागली तसा त्यांच्या शिक्षणावरील खर्च वाढू लागला. मार्केटिंगच्या कामातून मूलभूत गरजाही पूर्ण होत नव्हत्या. थोडीफार पुंजी गोळा करून लोहार यांनी रावेरमध्येच छोटेसे किराणा दुकान सुरू केले. परंतु, तेथेही दैव आड आले. उधारीत माल भरला. ग्राहकही उधारीत जिनसा घेऊन जाऊ लागले. उधारी जमा होण्यास विलंब होऊ लागला. पैसे वसूल करण्यासाठी व्यापारी दारात येऊ लागले. त्यामुळे अवघ्या दोन-तीन वर्षांतच लोहार यांना हा व्यवसाय गुंडाळावा लागला. या सर्व घडामोडींत हेमांगीचे दहावीचे वर्ष सुरू झाले होते. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी नाशिकमध्येच छोटी- मोठी नोकरी शोधावी असा निर्णय लोहार यांनी घेतला. नातलग चंद्रकांत कुकावलकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. शालक सचिन चौहान यांच्या समवेत फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था झाली. कुकावलकर यांनी आर्थिक सहकार्य तर केलेच परंतु, मानसिक पाठबळही दिले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रिमूर्ती चौकातील माध्यमिक विद्यालयाने सहकार्याचा हात देत हेमांगीला दहावीच्या वर्गात प्रवेश दिला. तिची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कुटुंबाची आर्थिक विवंचना लक्षात घेऊन एका खासगी शिकवणीत तिला माफक शुल्कात प्रवेशही मिळाला. दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविण्यासाठी हेमांगीने रात्रीचा दिवस केला. रात्री १० ते पहाटे तीन ही अभ्यासाची वेळ तिने चुकू दिली नाही. त्यानंतर पुन्हा शिकवणी, शाळा यामध्येच तिचा दिवस संपून जात असे. दहावीत ९६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिली येत तिने सर्वांचाच विश्वास सार्थ ठरविला.

आईचेही पाठबळ

आर्थिक ओढाताण टाळण्यासाठी हेमांगीच्या आईनेही अंबड औद्योगिक वसाहतीत छोटी नोकरी स्वीकारली. वडीलही द्वारका परिसरात खासगी आस्थापनेत कामावर जातात. दोघांचाही पगार तोकडा. तोही वेळेवर मिळेल याची शाश्वती नाही. हेमांगीच्या भावाने मुंबईत आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. हेमांगीला वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन न्यूरोसर्जन होण्याची तिची प्रबळ महत्त्वाकांक्षा आहे. परंतु, आर्थिक अडचणींमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होईल का याची चिंता तिला अन् कुटुंबीयांनाही सतावते आहे. दानशूरांनी मदत केली तर या गुणी मुलीला तिचे स्वप्न साकारण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट प्रतिक्रिया - विविध संघटना

$
0
0

प्रामाणिक करदात्यांवर अन्याय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अर्थसंकल्पात सर्वसामान्य आणि देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केवळ एका विशिष्ट वर्गाला खूश करण्याचा विचार झाल्याचे मत कामगार क्षेत्रातील जाणकारांनी मांडले.

नोकरदाराची निराशा

अर्थसंकल्पाने नोकरदार वर्गाची घोर निराशा केली आहे. वाढती महागाई व पैशाचे घटते मूल्य लक्षात घेता करदरात सुसूत्रता आणणे आवश्यक होते. केवळ गृहकर्ज व्याजाची सुटीत वाढ केली. पण, त्याचा फायदा सर्वांना होत नाही. सरकारी भागभांडवल खासगी कंपन्यांना विकणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था भांडवलशाहीकडे नेण्यासारखे आहे.

- मोहन देशपांडे,

सरचिटणीस, विमा कर्मचारी संघटना

करदात्यावर अन्याय

अर्थसंकल्पात प्राप्तीकर आकारणीच्या दरात व टप्प्यात सुसंगत बदल केलेला नाही. विशिष्ट वर्गाला खूष करण्यासाठी प्राप्तीकर आकारणीच्या मूलभूत तत्वांशी विसंगत अशा सवलती दिल्या आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्याचा सन्मान नसून त्याच्यावर केलेला अन्याय करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिक कार सवलत, ४५ लाख रुपयाचे घर हे त्याचे उदाहरण आहे.

- अॅड. कांतीलाल तातेड, कामगार नेते

सहकारी बँकांकडे दुर्लक्ष

नेहमीप्रमाणेच सरकारी बँकांना तब्बल ७० हजार कोटींची भांडवली मदत देणार आहेत. मात्र, नागरी सहकारी बँकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या बँकांचे अस्तित्व सरकारला हवे की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुद्रा बँकेतर्फे देण्यात आलेल्या कर्जापैकी किती कर्ज रक्कम एनपीए झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

- विश्वास ठाकूर,

संस्थापक अध्यक्ष, विश्वास बँक

सर्वजण सुखाय

लघुउद्योजक वर्गाला देऊ केलेली २ टक्के व्याजाची सूट दिलासा देणारी आहे. सार्वजनिक व सामाजिक संस्था ना उद्दिष्ट्याकरता पैसे उभारण्यासाठी सोशल स्टॉक एक्सचेंजची नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली आहे. आयकर अधिकारी व करदाता यांचा संपर्क न होता असेसमेंट होणार, श्रीमंत करदात्याचा अधिभार वाढवून देयकरमध्ये वाढ हे निर्णय स्वागतार्ह आहे.

- प्रफुल्ल बरडिया,

सदस्य, सीए रिसर्च कमिटी

योजना नाविण्यपूर्ण

इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला प्रोत्साहन दिल्याने पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे. गृहखरेदीतील सुटीत वाढ केली. तसेच रिटर्न भरतांना आधार कार्डचा वापर, एक लाख शहर डिजिटल व्हिलेज, शेतकऱ्यांना सहा हजाराची मदत, असंघटित कामागारांना पेन्शन यासारख्या योजना चांगल्या आहे.

- अॅड. नितीन ठाकरे,

अध्यक्ष, बार असोशिएशन

विकास वाढणार

रोजगार निर्मिती, श्रमिक सुधारणा आणि अल्पकालीन व दीर्घ मुदतीसाठी कर्जाची उपलब्धता यावर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेला ८ टक्के सीएजीआरच्या सरकारच्या उद्दिष्टात आणण्यास मदत होईल. भारताचा आर्थिक विकास वाढेल. या सर्व उपाय आणि निर्णयांच्या अंमलबजावणीची गरज आहे.

- गणेश कोठावदे,

अध्यक्ष, सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभाग

नवभारताची घोषणा

नवीन भारत घडविण्याच्या घोषणेचा अर्थसंकल्प आहे. यात पायाभूत सुविधांवर भर, पाच कोटींच्या उलाढालीपर्यंत जीएसटी रिटर्न मासिक ऐवजी त्रैमासिक, टॅक्स रिटर्न भरण्याची सुविधा यासारख्या अनेक जमेच्या बाजू आहेत. तर सोन्यावरील अतिरिक्त कर, कार्पोरेट क्षेत्र आयकर दरात वाढ, वार्षिक एक कोटीपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के, पेट्रोल डिझेल महाग यासारख्या गोष्टी मारक आहे.

- दिग्विजय कापडीया, अध्यक्ष, क्लॉथ फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांवर थेट खटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प येथे निर्भया पथकाने दोन दिवसात १८ टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई केली. त्यापैकी आठ जणांवर मुंबई पोलिस कलम ११०, ११२, ११७ अन्वये थेट कोर्टात खटले भरल्याने अश्लिल वर्तन करणाऱ्या लव्ह बर्डचे धाबे दणाणले आहे.

नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या भागासाठी नेमलेल्या निर्भया पथक क्रमांक चारच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक श्रद्धा गंधास यांच्या पथकाने नाशिकरोड येथील बिटको कॉलेज, जलतरण तलाव, आरंभ कॉलेज परिसर तर देवळाली कॅम्पमधील खंडोबाची टेकडी या परिसरात जोरदार कारवाई सुरू केल्याने या भागात फिरणाऱ्या टवाळखोरांसह लव्ह बर्डला दररोज पळता भुई थोडी होत आहे.

निर्भया पथक क्रमांक चारने गेल्या दोन दिवसात नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पमध्ये धडक कारवाई करून आठ टवाळखोरांवर थेट कोर्टात खटले भरले आहेत. शुक्रवारच्या कारवाईत बिटको कॉलेज परिसरात अश्लिल वर्तन करणारे लव्ह बर्डचे दोन जोडपेही निर्भया पथकाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावरही कोर्टात खटला तत्काळ दाखल केल्याने त्यांची पाचावर धारणा बसली. या ठिकाणी सहा टवाळखोर निर्भया पथकाच्या जाळ्यात अडकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images