Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ टॅम्पोचा संबंध सुरतशी?

$
0
0

मुथूट दरोडा प्रकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट दरोड्यावेळी वापरण्यात आलेला टॅम्पो हा सुरतमधील असून, टेम्पो उपलब्ध करण्याची जबाबदारी फरार आरोपी आकाशसिंग राजपूत याने पार पाडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होते आहे. सुरत आणि नाशिक हे लोकल कनेक्शन सांभाळण्याचे काम आकाशसिंग राजपूत याने केले असून, त्याच्या अटकेनंतर या सर्व बाबी स्पष्ट होतील.

मुथूट दरोड्या प्रकरणी शहर पोलिसांनी जितेंद्रसिंग राजपूत आणि परमेंदर सिंग या दोघा सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे सध्या पोलिस कोठडीत असून, पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत. या गुन्ह्याचा कट बिहार व्हाया सुरत असा शिजला असून, गुन्ह्याचे सूत्रधार कुख्यात आरोपी आहेत. मुथूट दरोड्यात प्रत्यक्ष सहा तर अप्रत्यक्ष किमान सहा ते आठ जणांनी सहभाग घेतल्याचे दिसून येते. अप्रत्यक्ष काम करणाऱ्यापैकी एकाकडे घटनेच्या दिवशी टेम्पोची जबाबदारी देण्यात आली होती. लूट केलेले सोने याच टॅम्पोतून दरोडेखोर घेऊन जाणार होते. मात्र, तसे झाले नाही. कार्यालयात सॅज्यू सॅम्युअलच्या प्रतिकारामुळे दरोडेखोरांना खाली हात परतावे लागले. दुचाकीवर फरार झालेले सर्व आरोपी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाले. तेथून ते पाठीमागून आलेल्या टॅम्पोत बसले आणि फरार झाले. यामुळे पुढे असलेल्या पोलिसांच्या नाकाबंदी ते चकवा देऊ शकले.

फरार आरोपींचा शोध

सुरतमधून टॅम्पो आणण्याचे काम अटक संशयित जितेंद्रसिंग राजपूतचा भाऊ आकाशसिंग राजपूतने केले. सध्या आकाशसिंग फरार असून, त्याच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या या घटनाक्रमाची उकल होणार आहे. शहर पोलिसांचे सात ते आठ पथकांचा परराज्यात मुक्काम असून, फरार आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावी विज्ञानसाठी ‘भोंसला’मध्ये प्रवेश

$
0
0

\Bअकरावी विज्ञानसाठी

'भोंसला'मध्ये प्रवेश

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोंसला मिलिटरी कॉलेजमधील विना अनुदानित तत्वावरील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एनडीए (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) या प्रवेश परिक्षेची तयारी करायची आहे, सैन्यात अधिकारी म्हणून कार्य करायचे आहे, अशांसाठी लागणारे प्राथमिक शिक्षणही यामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून कार्य करण्याची, देशसेवेतच करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते. या तरुणांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्वतंत्र वर्गासाठी पहिल्या बॅचचे प्रवेश पूर्ण झाले असून उर्वरित जागांसाठी २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता भोंसला कॉलेजमधील सेमिनार हॉल येथे पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या प्रवेश प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांची ७० गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांवर लेखी परीक्षा व मुलाखत तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्रातील तणाव दूर होईल मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे तणाव दूर होईल –

$
0
0

'महाराष्ट्रातील तणाव दूर होईल'

मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायदाला उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने मराठा बांधवाना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यात गेल्या काही वर्षापासून वाढत असलेला ताणतणाव दूर होईल आणि अतिशय एकोप्याने मराठा, ओबीसी, दलित आणि आदिवासी समाज आपापल्या आरक्षणाचा फायदा घेतील, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतांना तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत राणे समितीची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी सर्व पक्षांनी सोबत येत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे असा कायदा तत्कालीन सरकारने केला होता. पुढे कोर्टामध्ये हा कायदा काही त्रुटींमुळे रद्द करण्यात आला होता, असे भुजबळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

नवीन सरकारने न्या. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. त्यांनी दुसरा अहवाल सरकारला दिला. त्यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि ओबीसी संघटनांनी हीच मागणी केली, की अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण द्यावे. त्यालाही हायकोर्टात प्रतिवाद झाला. दलित, आदिवासी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ५० टक्क्यांच्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सांगून गायकवाड आयोगाने मराठा समाजासाठी शिक्षणामध्ये १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के सुचविलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. आरक्षणासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला न्याय मिळाला आहे. ओबीसी समाजाला जी भीती वाटत होती ते आरक्षण सुद्धा कमी झालेलं नाही, असेही भुजबळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.

निकालाचे स्वागत

हायकोर्टाने मराठा समाजाला आरक्षण दिले त्याबद्दल अभिनंदन. परंतु, ते कमी पडत आहे. १२ ऐवजी १६ टक्के आरक्षण हवे होते. तरीही या निकालाचे स्वागत. त्याचा फायदा विद्यार्थी आणि नोकरीच्या उमेदवारांना होईल. ८० टक्के मराठा समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. या निकालाचा फायदा त्यांना होईल.

- चंद्रकांत बनकर,

शहराध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात अटळ

$
0
0

आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरणातील पाणीसाठा दिवसागणिक कमी होत चालला आहे. त्यामुळे जुलैअखेर गंगापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही तोपर्यंत शहरात जेथे दोन वेळ पाणीपुरवठा होतो, तेथे एक वेळ तसेच, आठवड्यातून एकदिवस संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. परंतु, पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय आज, शुक्रवारी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून घेतला जाणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणात जुलैअखेर आरक्षण असले तरी पाऊस लांबल्याने धरणसाठा खालावला आहे. दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असले तरी अळीयुक्त पाण्यामुळे चेहडी पंपिंग स्टेशन येथून पाणीउपसा बंद केला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीउपसा वाढल्याने इंटेकवेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणीसाठा पोहचला आहे. या ठिकाणी चर खोदण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकेत गेल्या आठवड्यात महापौरांसह आयुक्तांनी दिले होते.

प्रशासनाने पाणीकपातीसंदर्भात अहवाल तयार केला आहे. पाण्याचे भविष्यातील नियोजन करण्यासाठी कपातीचा निर्णय घेणे भाग असल्याचे आयुक्त गमे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात एकच वेळ पाणीपुरवठा केला जाणार असून, आठवड्यातून संपूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. कपातीसंदर्भातील आदेशावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून, लोकप्रतिनिधींना माहितीसाठी महापौर भानसी यांच्याकडे निर्णयाची प्रत सादर केली आहे.

...

लोकप्रतिनिधींसोबत आज बैठक

धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असली तरी जुलैअखेर धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असणे गरजेचे आहे. पावसाने ओढ दिल्यास भविष्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे आताच निर्णय अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

..

दारणातून आवर्तन

गंगापूर धरणातून दररोज १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलले जात आहे. परंतु, संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता आठ दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दारणा धरणातून आवर्तन सोडले जाणार असल्याने अळीयुक्त पाणी वाहून जाण्यास मदत होईल. त्यानंतर चेहडी पंपिंग येथून पाणी उपसा केला जाणार आहे. मुकणे धरणातून दररोज १३७ दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे प्रयत्न राहतील. जेणेकरून गंगापूर धरणात अधिकाधिक पाणी वाचविता येणार आहे. दारणा व मुकणे धरणातून आठ दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅली

$
0
0

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅली

समाजकल्याण विभागाच्यावतीने आयोजन

म टा प्रतिनिधी, नाशिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्यावतीने आयोजन समता रॅली काढण्यात आली. सकाळी ८.३० वाजता समतानगर, टाकळी येथून रॅलीला प्रारंभ झाला. माजी महापौर अशोक दिवे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. बोधलेनगर, विजय ममता सर्कलवरून सामाजिक न्याय भवन सभागृहात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत समाजकार्य महाविद्यालय, शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात समाज दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, नगरसेवक प्रशांत दिवे, प्राध्यापक गंगाधर आहिरे, प्राचार्य विलास देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते. शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण व जातीभेद निर्मूलन या सारख्या प्रगतशील विचारांची मुहूर्तमेढ देशात सर्वात प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी केली. सामाजिक समतेचे पहिले पाऊल राजर्षी शाहू महाराज यांनी उचलले. हे विचार आज समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची देखील युवकांनी कास धरली पाहिजे. सोशल मीडिया जपून वापर करणे हे तरुणांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन गीते यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीधर त्रिभूवन यांनी केले. आभार मनिषा गांगुर्डे यांनी मानले.

----

गुणवंतांचा गौरव

यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविलेल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, शासकीय निवासी शाळेत दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी, गटई स्टॉल, अनुसूचित जाती बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेतील अनुक्रमे प्रशांत गावले, ऋतुजा भुजबळ, खुशाल ठाकरे, रूपेश तुपे, जिभाऊ डोंगरे, आकाश डोंगरे, सुभाष डावरे, प्रशिक महिला स्वयं सहाय्यता बचतगट, गौतमी महिला स्वयं सहाय्यता बचतगट, आरती भांगे, महेश लोणके या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशन डिझायनिंग करिअरवर आज मार्गदर्शन

$
0
0

फॅशन डिझायनिंग

करिअरवर आज मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागर मनाचा द सेंटर फॉर एक्सलन्स आणि सॅव्ही स्कूल ऑफ डिझाइन आणि टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने 'फॅशन डिझायनिंग आणि त्यामधील करिअरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 'करिअरच्या अलीकडे व पलीकडे' असे या कार्यक्रमाचे नाव असून इंदिरानगर येथील स्वर्णिमा सभागृह, बापू बंगला येथे आज (२८ जून) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

सॅव्ही स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी च्या संचालिका श्रृती भुतडा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानी या क्षेत्राचा स्वीकार करावा, या क्षेत्रात जाण्याचे टप्पे, यातील संधी, आदी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळू शकणार आहेत. तर समुपदेशक आणि जागर मनाचा संस्थेचे संस्थापक शंतनु गुणे यांचे 'बहुआयामी बुद्धिमत्ता' विषयावर करिअर निवडताना महत्त्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. मुलांना इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास पालकांची जबाबदारी कशी असावी, या विषयावरही गुणे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडे खालसाचे फर्मान

$
0
0

शहरातील धोकादायक वाडे, इमारती खाली करण्यासाठी पालिकेचा निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धोकादायक वाडे आणि इमारतींबाबत पालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेकॉर्डवरील अतिधोकादायक ३९७ वाडे आणि इमारती खाली करण्यासंदर्भात नोटिसा देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस ही धोकादायक वाडे आणि इमारती खाली करण्यासाठी मनपा अधिनियमातील कलम २६८ अंतर्गत पोलिसबळाचा वापर करण्याचा इशारा महापालिकेने नागरिकांना दिला आहे. महापालिकेने जाहीर नोटीस काढत नागरिकांना धोकादायक वाडे आणि इमारती तत्काळ खाली करण्याचे पुन्हा फर्मान काढले आहे. अशा इमारतींमध्ये काही दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे सांगत अंग काढून घेतले आहे.

शहरात सहा विभागांत जवळपास साडेआठशेच्या आसपास जुन्या इमारती व वाडे आहेत. महापालिकेकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी अशा इमारती व वाड्यांना खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. विशेषत: गावठाण परिसरात आणि नदीकाठावर असलेल्या नागरिकांना नोटिसा देऊन जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेतली जाते. शहरात पावसाळ्यात सर्वात जास्त मनुष्यहानी ही शहरातील धोकादायक वाड्यांच्या पडझडीमुळे होते. गेल्या वर्षीही धोकादायक वाडा कोसळल्याने दोघांचा बळी गेला होता. त्यामुळे महापालिकेने यंदा या धोकादायक वाडे आणि इमारतींबाबत कठोर भूमिका स्वीकारली आहे.

शहरातील साडेआठशे धोकादायक वाडे आणि इमापतींपैकी महापालिकेने अतिधोकादायक अशा ३९७ इमारती आणि वाड्यांमध्ये राहणाऱ्यां नागरिकांना पावसाळ्यात स्थलांतरीत होण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, नागरिकांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखवली जात असल्याने पालिका आक्रमक झाली आहे. गुरुवारी महापालिकेने जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांना पुन्हा या अतिधोकादायक इमारती व वाडे खाली केले जात नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २६८ नुसार पोलिसबळाचा वापर करून त्या मोकळ्या करून घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच, या इमारती आणि वाड्यांमध्ये जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

...

धोकादायक वाडे व इमारतींची विभागनिहाय संख्या

पंचवटी : १५०

नाशिक पश्चिम : १०३

नाशिकरोड : ६७

नाशिक पूर्व : ३९

सिडको : २३

सातपूर : १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून पिंपळसला१७ वर्षीय मुलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आई, आजीसोबत जळणासाठी लाकडे आणण्यास गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा पिंपळ‌स येथे वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत आई व आजी बचावल्या. रूपाली भाऊसाहेब भोई (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिच्या मागे वडील, आई, भाऊ, आजी असा परिवार आहे.

आई आणि आजीसमवेत रूपाली गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास लाकडे आणण्यासाठी गेली होती. या वेळी विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक वीज कोसळल्याने पिंपळस- सुकेणे रस्त्यावरील पुलाजवळ रूपालीचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेली आई आणि आजी यांना काहीही इजा न झाल्याने थोडक्यात बचावल्या. रूपाली नुकतीच १२ वी उत्तीर्ण होऊन, तिने निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवकाल अनुभवण्याची पर्वणी

$
0
0

मटातर्फे 'शिवकल्याण राजा'चे रविवारी आयोजन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त कल्चर क्लबतर्फे येत्या ३० जून रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे रात्री ९.३० वाजता 'शिवकल्याण राजा' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ वाणीतून उभा राहणारा जाज्ज्वल्य इतिहास आणि प्रतिभावंत संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची साथ. या दोहोंकडून उभा राहणारा शिवकाल अनुभवणे ही मोठी पर्वणी असणार आहे.

लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज, दस्तुरखुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्फूर्तिदायी निवेदन आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरांत पोहोचलेले 'शिवकल्याण राजा' येत्या रविवारी पुन्हा रसिकांसमोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुवर्णकाळ शिवशाहिरांच्या तेजस्वी वाणीतून ऐकण्याची संधी नाशिककरांना चालून आली आहे.

...

काय ऐकाल 'शिवकल्याण राजा'मध्ये?

चाळीस वर्षांपूर्वी 'शिवकल्याण राजा'ची निर्मिती झाली. 'गुणी बाळ असा, आनंदवनभुवनी, म्यानातून उसळे तलवारीची पात, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा आणि सरणार कधी रण' यासारखी गाणी यात ऐकायला मिळतील. शिवकाल म्हंटले की शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांनी परकियांशी दिलेले लढे, मावळ्यांची साथ, त्यातून उभे राहिलेले स्वराज्य नजरेसमोर येते. या साऱ्या पराक्रमास 'शिवकल्याण राजा' या खास कार्यक्रमामुळे पुन्हा उजाळा मिळणार आहे.

...

कार्यक्रमाच्या मिळवा प्रवेशिका

नव्याने कल्चर क्लब सदस्य व्हा आणि या कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका मिळवा. अधिक माहितीसाठी ९४२२५१३५६९ (मंगळवार ते शनिवार दुपारी १ ते ६) या मोबाइल क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड येथे संपर्क साधावा.

...

चौकट

२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब'चे सदस्य

ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचा प्रश्न पेटला

$
0
0

मालेगाव महासभेत प्रशासन धारेवर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या काही महिन्यांपासून शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता विभाग शहर स्वच्छतेच्या बाबतीत अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत येथील महासभेत सत्ताधारी नगरसेवकांनीच महापौर व प्रशासनाला घरचा आहेर देत धारेवर धरले. येत्या १५ दिवसांत शहर स्वच्छतेबाबत नियोजन करण्याच्या सूचना महापौर रशीद शेख यांनी प्रशासनास दिल्या.

महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महासभा झाली. महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त किशोर बोर्डे, नगरसचिव राजेश धसे, सभापती जयराज बच्छाव आदी उपस्थित होते. महासभेच्या प्रारंभीच काँग्रेस नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी स्वच्छतेचा प्रश्न चर्चेस ठेवला. यामुद्द्यावरून सर्वच सत्ताधारी नगरसेवकांनी महापौर शेख यांच्यापुढे प्रभागांतील तक्रारींचा पाढा वाचला. स्थायी समिती सभापती जयराज बच्छाव, एमआयएम गटनेते डॉ. खालिद परवेज, काँग्रेस गटनेत्या ताहेरा शेख, नगरसेविका दिपाली वारुळे आदींसह सर्वच नगसेवक आक्रमक झाले.

स्वच्छता विभागाकडे वारंवार तक्रारी कराव्या लागतात. कचरा संकलन करणारी वाहने नियमीत येत नाहीत. मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. फवारणी नियमित होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय वितरण असमान आहे, आदी तक्रारी नगरसेवकांनी केल्या. स्वच्छता विभागाचे एकलाख अहमद यांनी स्वच्छता कर्मचारी संख्या, घंटागाडी, जेसीबी याविषयीचे नियोजन प्रभाग अधिकारी यांच्याकडे दिल्याचे सांगितले. अखेर आयुक्त बोर्डे यांनी सभागृहात निवेदन करीत स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाल्याचे मान्य केले. येत्या १५ दिवसांत नालेसफाई करावी, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय समान वितरण करावे अशा सूचना महापौर शेख यांनी प्रशासनास दिल्या.

स्वच्छतेच्या बरोबर पालिकेतील वाडिया व अली अकबर दवाखान्यातील अपुरा औषधसाठा, खाटांची अपूर्णता, डॉक्टर्स उपलब्ध नसणे अशा विविध तक्रारी सत्ताधारी नगरसेवकांनी मांडल्या. नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी शहरातील बालमृत्यूप्रश्नी प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप केला.

तळवाडे तलावातून नवी जलवाहिनी

तळवाडे साठवण तलावातून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. अमृत योजनेतील शिल्लक निधी व शासनाकडून अतिरिक्त निधी मिळवून साठवण तलाव ते शहरापर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी सभागृहाला या प्रस्तावाची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मृत्यूप्रकरणीअखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शिरवाडे वाकद येथे बुधवारी शेतात वृद्ध महिलेचा वीजतारांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी शिरवाडे वाकद येथील फकिरा महादू वाघ यांच्या शेतात लिलाबाई नामदेव वाघ (वय ६०) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव गेला. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात करावा, अशी मागणी मृतांचे नातेवाइक, शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली होती. ‌अखेर राजेंद्र नामदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून वीजवितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात वाकद वीजवितरण उपकेंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या नोकरीसाठी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पतीस चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेशी प्रेमसंबध प्रस्थापित करीत एकाने सुमारे नऊ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने पैशांची मागणी केल्यानंतर संशयित आरोपीने अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी दिली. संशयिताचा इरादा स्पष्ट झाल्याने महिलेने सातपूर पोलिस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. योगेश नारायण गांगुर्डे (रा. कामगारनगर, सातपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. परिसरात राहणाऱ्या एका ओळखीच्या महिलेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. आपली एमआयडीसीतील विविध संस्था, कंपन्यांमध्ये ओळख असल्याचे तो महिलेसह तिच्या पतीला भासवत असे. याच आधारे त्याने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. महिलेच्या पतीस चांगल्या नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून संशयिताने महिलेशी प्रेमसंबध प्रस्थापित केले. २०१३ ते जून २०१८ दरम्यान महिलेच्या पतीस नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने पीडितेकडून तब्बल आठ लाख ९० हजार रुपये वेळोवेळी उकळले. सातत्याने पैसे उकळणाऱ्या संशयिताने पाच ते सहा वर्षे उलटूनही महिलेच्या पतीस कुठलीही नोकरी दिली नाही. यामुळे पीडितेने १६ जून रोजी संशयित आरोपीची भेट घेतली. यावेळी संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत पैसे देण्यास नकार दिला. 'तुला काय करायचे कर', असे आव्हान देत आपल्या प्रेमसंबधाची वाच्यता तुझ्या पतीकडे करेल, अशी धमकी संशयित आरोपीने पीडित महिलेला दिली. या प्रकारानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरवासीयांची तारांबळ

$
0
0

नालेसफाईचे पितळ उघडे, जागोजागी तळेसदृश परिस्थिती

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात जागोजागी पावसाच्या पाण्याची तळी साचल्याने महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामाचे पितळ उघडे पडले. शहरात खोदलेले रस्ते आणि त्यात साचलेले पाणी यातून वाहने काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.

शहरात गुरुवारी ६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमी पावसातच शहरातील नाल्यांमधून पाणी रस्त्यावर आल्याने पावसाळ्यापूर्वी महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा खोटा ठरला. इतर वेळी सखल भागात पाणी साचत होते, मात्र नालेसफाई न झाल्याने जागोजागी तळी निर्माण झाली होती. सराफ बाजारातील व्यावसायिकांनी वारंवार निवेदने देऊनही त्या भागात नालेसफाई करण्यात आली नाही. गुरुवारच्या पावसाने अनेकांच्या दुकानात पुन्हा पाणी शिरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शरणपूर रोड पोलिस वसाहतीत तळे साचले होते. महापौरांच्या बंगल्याशेजारील पार्किंगमध्येही तळे निर्माण झाले होते. गोदाकाठावर गटारींच्या पाण्याचे पाट वाहत होते.

शहराच्या अनेक भागांतून चेंबरमधून पाणी रस्त्यावर आले होते. यशवंत महाराज पटांगण, बालाजी कोठ, गाडगे महाराज पूल या ठिकणी नदीपेक्षा गटारातून वाहणारे पाणीच जास्त होते. सध्या शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखालो जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. जी कामे उन्हाळ्यात करायला हवी होती ती कामे पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केली आहेत.

..

शहरात वाहतूक कोंडी

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला स्मार्ट रस्ता व नुकताच नव्याने सुरू झालेला त्र्यंबकरोड मॉडेल रस्ता यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शालिमार परिसरातून स्वा. सावरकर जलतरण तलावापर्यंत पोहचण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागत होता. कॉलेजरोड, कृषिनगर, डिसूझा कॉलनी, तिबेटीयन मार्केटसमोर, टिळकवाडी, तरण तलावासमोर त्र्यंबकरोड, शरणपूर रोड, शालिमार या ठिकाणी पाणी साचले होते.

....

नागरिकांचा तुटला संपर्क

चोपडा लॉन्सकडून हनुमानवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला होता. या परिसरातील रहिवाशांना कमरेएवढ्या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. हे संकट कमी की काय या भागात झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी नागरिकांनी स्वत: चेंबरवरची घाण काढून पाण्याला वाट करून दिली.

..

वीजप्रवाह खंडित

नेहमीप्रमाणे गुरुवारी पावसाला सुरुवात होताच अशोकस्तंभ परिसरात वीजप्रवाह खंडित झाला. हा वीजप्रवाह सुरळीत होण्यास एक तास लागला.

..

द्वारका परसिरात वाहतूक कोंडी

द्वारका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. द्वारकेपासून वडाळा नाक्यापर्यंत, तर पंचवटीकडे कन्नमवार पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिकरोडकडे जाणारी वाहनेही संथ गतीने पुढे सरकत होती.

....

झाडे उन्मळून पडली

शहरातील त्र्यंबकरोडवर असलेल्या विंचूरकर चौकात मोठे झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. दुसरे झाड चोपडा लॉन्स परिसरात पडले. शहराच्या अनेक भागात छोटी-मोठी झाडे व फांद्या पडल्या. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक कर्जाचे टार्गेट होणार पूर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी कर्ज वाटपावरुन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकचे कान उपटल्यानंतर गुरुवारी जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली. या भेटीत त्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देऊन बँकेला सहकार्य करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे बँकेला दिलेल्या पीक कर्जाचे दिलेले ४३० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकरी ही प्राथमिकता असून, बँकेने इतर वसुलीवर जोर देण्याच्या सूचना बँकेला केल्या.

जिल्हा बँकेला शेतकरी कर्जमाफी पोटी सरकारकडून ६६० कोटी रुपये मिळाले. या पैशातून बँक पीककर्ज देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, बँकेने आलेले पैसे ठेवीदारांना व इतर देणी देण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे पीककर्ज वाटपचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बँकेविरुद्ध थेट कारवाईचा प्रस्ताव सहकार विभागाला पाठवला. त्यामुळे बँकेची अडचण वाढली होती. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून बँकेची स्थिती सांगितली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, आमदार व संचालिका सीमा हिरे, माजी आमदार शिरीष कोतवालसह बँकेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी या बैठकीनंतर सांगितले की, 'बँकेने त्यांची आर्थिक स्थिती सांगितली. त्यावेळेस बँकेची प्राथमिकता शेतकरी असावी. सरकारने दिलेले दुष्काळाबाबत दिलेले निर्देशनानुसार वसुली करावी, त्यात बिनशेती कर्जावर भर द्यावा, अशा सूचना केल्या आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेली बैठक सकारात्मक झाली. त्यात बँकेची स्थिती सांगून वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले. बँकेचे २७४९ कोटी थकीत कर्ज आहे. त्यातून आम्ही १०१ टॉप कर्जदाराचे कर्ज वसुल करणार आहोत. ते १०० कोटीच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे बँकेला दिलेला ४३० कोटीचा पीक कर्जाचे टार्गेटही आम्ही पूर्ण करणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभाडी क्लस्टरच्या कामांना गती द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभेचे अधिवेशन चालू असताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रुरबन नियामक समितीच्या बैठकील हजेरी लावत स्थानिक कामांना प्राधान्य दिले. यावेळी त्यांनी आपल्या मतदार संघातील रुरबन मिशन अतंर्गत असलेल्या दाभाडी क्लस्टरच्या कामांच्या आढावा घेवून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी पीका विमा वाटप साठी बैठक घेतली. या दोन्ही बैठका रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या. या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गितेसह अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील समुहाचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाठी रुरबन मिशन अतंर्गत क्लस्टर योजना आहे. यात दाभाडी परिसरातील आठ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना स्मार्ट करुन येथे शहराप्रमाणे पायाभूत सुविधा देण्याचे काम करणे हा उद्देश या योजनेचा आहे. त्यामुळे येथील कामांना गती देण्यासाठी ही बैठक घेतली. त्यात दाभाडी येथील सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे जिल्हाधिकारी दीड कोटी निधी देतील, असा निर्णय घेण्यात आला. तर येथील क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन जिल्हा क्रीडा समितीकडे देण्यात यावा, असा निर्णय झाला. त्याचप्रमाणे पांढरून या गावातील डंबरीनाल्यावरील सिमेंट बंधाऱ्याचे कार्यारंभ आदेश आठ दिवसात देण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यान, पीक विमा योजनेत नवीन तरतुदी सरकारने केल्या आहेत. त्यामुळे या पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी या योजनेसाठी मोहीम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

निरगुडे व मांडवड क्लस्टरमध्ये

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निरगुडे व नांदगाव तालुक्यातील मांडवड या दोन गावांचे क्लस्टर योजनेत समावेश करण्यात आला. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करुन त्यांना जिल्हा नियामन समितीने मान्यता देऊन राज्य समितीकडे हा प्रस्ताव पाठवला. या क्लस्टरमुळे या दोन्ही गावातील आठ कि.मी. परिसरातील गावे स्मार्ट होणार आहेत. निरगुडे या गावाला दीड कोटी तर मांडवलला साडेसात कोटी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालुका शेतकी संघ सभापतिपदी काकड

$
0
0

पंचवटी : नाशिक तालुका शेतकी संघाच्या सभापती व उपसभापतिपदाचा कार्यकाळ संपल्याने गुरुवारी (दि. २७) नाशिक बाजार समिती इमारतीच्या दिंडोरी रोडवरील संघाच्या केंद्रीय कार्यालयाच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सभापतिपदी प्रल्हाद काकड यांची, तर उपसभापतिपदी प्रकाश कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा निबंधक कार्यालय अधीक्षक महेश कासार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी या निवडीची घोषणा केली. याप्रसंगी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती युवराज कोठुळे, संपत सकाळे, मुरलीधर पाटील, केरू हगवने, निवृत्ती घुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादात राहिली बँक खुली...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँक अथवा वित्तीय संस्थांच्या सुरक्षा प्रणालातील छोट्या चुकीचा फायदा आरोपी घेतात. यापूर्वी झालेल्या घटनांचा बोध घेऊन संबंधितांनी तशा सुधारणा करणे अपेक्षित असते. दुर्दैवाने गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांसाठी थेट जबाबदार असलेले अधिकारी-कर्मचारी तेवढी सजगता दाखवत नाही. अंबड पोलिस ठाणे हद्दीतील माऊली लॉन्सजवळील ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) कर्मचाऱ्यांनी हेच सिद्ध केले. या शाखेतील व्यवस्थापकासह शिपायापर्यंत सर्वांनी निष्काळजीपणा दाखवला अन् चक्क बँक लॉक करायचे विसरून या कर्मचाऱ्यांनी थेट घर गाठले.

शहरातील मुथूट दरोडा प्रकरण अद्याप ताजे आहे. सतत वेगवेगळ्या ठिकाणी बँकांवर दरोडे, एटीएम लुटणे, रोकड पळविली अशा घटना घडता आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बँकांचे अधिकारी व पदाधिकारी, सुरक्षारक्षक यांची बैठक घेऊन सूचनादेखील केल्या. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे कानाडोळा झाल्याचा अनुभव देणारी घटनाच माऊली लॉन्स परिसरातील नागरिकांनी अनुभवली. बुधवारी रात्री आठ ते सव्वाआठ वाजेच्या सुमारास टीजेएसबी बँकेच्या एटीएम सेंटरचा सायरन वाजू लागला. सजग नागरिकांनी लागलीच घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळविली. मुथूट घटनेमुळे सतर्क झालेल्या पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारे यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. एटीएममधील सायरन वाजत होता. मात्र, तेथे चोरीच्या प्रयत्नाच्या खाणाखुणा दिसून आल्या नाहीत. पोलिसांनी बँकेच्या इमारतीची पुढील बाजू तपासली. मात्र, त्यात काही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा बँकेच्या मागील बाजूस वळविला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे तीन दरवाजे असून, ते सताड उघडे होते. आतील लाइट्स बंद होते. त्यामुळे परोपकारे यांनी आपले रिव्हॉल्व्हर काढले. इतर कर्मचाऱ्यांना सूचना देण्याबरोबर ही वार्ता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली.

कबुलीनंतर सुटकेचा नि:श्वास

बँकेचे दरवाजे उघडे असल्याने पोलिसांनी बँक व्यवस्थापकास पाचारण केले. व्यवस्थापकासह कर्मचारी तेथे आले. हा सर्व फौजफाटा बाहेर उभा राहिला. मधून काहीच हालचाल होत नव्हती. मात्र, आत जर दरोडेखोर असतील आणि त्यांनी हल्ला केला तर काय, हा विचार सर्वांच्या मनात घर करून होता. पोलिसही आपल्या तयारीच होते. शेवटी, बँक लॉक करायचो विसरलो, अशी कबुली व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर एकाने पुढे होऊन लाइट्सचे बटण दाबले. हळूहळू करीत पोलिसांनी बँकेचा ताबा घेतला. सर्व बँकेची कसून तपासणी करण्यात आली. हा घटनाक्रम बराच वेळ सुरू होता. त्यामुळे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत बोलताना पीआय परोपकारे यांनी सांगितले, की बँकेने बुधवारीच अलार्म यंत्रणेचे काम करून घेतले. त्यातील काही तांत्रिक बाबींमुळे एटीएममधील सायरन वाजत होते. यानिमित्ताने आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मात्र, बँकेचा पाठीमागील दरवाजा सताड उघडा असल्याचे दिसले. चोरट्यांना सहज संधी मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण होते, असे परोपकारे यांनी स्पष्ट केले.

अतिशय निष्काळजीपणा दाखविणारी ही घटना आहे. गंभीर घटना घडू नये म्हणून सर्तकता दाखवणे दूर, पण येथे थेट चोरट्यांना आमंत्रण देण्याचा प्रकार घडला. दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास उघडलेले तीन दरवाजे बंद करायचे विसरून सर्व स्टाफ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास थेट निघून गेला. वित्तीय संस्थांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला हवी.

-अमोल तांबे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतजमिनीचा रोखला लिलाव

$
0
0

जिल्हा बँकेवर आगपाखड

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची लिलाव प्रक्रिया शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनानंतर स्थगित करण्यात आली. दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्या जिल्हा बँकेवर यावेळी उपस्थितांनी आगपाखड केली.

निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक येथील पंढरीनाथ फकीरा जगताप आणि सुखदेव फकीरा जगताप यांनी सन २०१४ मध्ये

लासलगाव शाखेतून कर्ज घेतले होते. दोघांनी वेळेवर न फेडल्याने जिल्हा बँकेच्या लासलगाव शाखेच्या वतीने त्यांच्या शेतजमिनीची लिलाव करण्यात येणार होता. पंढरीनाथ जगताप यांच्याकडे १३ लाख तर सुखदेव जगताप यांच्याकडे १९ लाख थकबाकी आहे.

शेतकरी संघटनेला लिलावाची माहिती मिळल्याने शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या लासलगाव शाखेत गुरुवारी दुपारी एक वाजता एक तासाहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. लासलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत लिलाव प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. अखेर लिलाव प्रकिया स्थगित करण्यात आल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान बँकेतून कोणालाही बाहेर बाहेर पडता आले नाही. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या निर्मला जगझाप, साहेबराव मोरे, नाना बच्छाव, सुधाकर मोगल आंदोलनात सहभाग नोंदवला

बँकेची दादागिरी

थकलेल्या कर्जाची रक्कम भरण्यास आम्ही तयार आहोत. थोडा अवधी मिळावा असे बँकेला लेखी कळवले होते. मात्र तरीही बँकेने दादागिरी करत लिलाव प्रक्रिया सुरू केली, अशी प्रतिक्रिया यावेळी थकबाकीदार शेतकऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: सायकलवारीतील मुलाला ट्रकनं चिरडलं

$
0
0

नाशिक:

नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकलवारीत सहभागी झालेल्या १२ वर्षीय सायकलपटूला सिन्नरजवळ एका ट्रकनं चिरडलं. प्रेम सचिन नाफडे असं मृत मुलाचं नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

नाशिकहून निघालेल्या सायकलवारीनं आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. या वारीत जवळपास ८०० जण सायकलपटू सहभागी झाले होते. त्यात लहान मुलंही होती. नाशिकचे जिल्हाधिकारीही या वारीत सहभागी झाले होते. मात्र, या वारीत दुर्दैवी घटना घडली. सिन्नर येथे वारीत सहभागी झालेल्या १२ वर्षीय सचिनला एका ट्रकनं चिरडलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

69986465


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक शहरात रविवारपासून पाणीकपात

$
0
0

नाशिक:

नाशिक शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या निर्णयानुसार शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असून इतर दिवशी दिवसातून एकदाच पाणी दिले जाणार आहे. येत्या रविवारपासून ही पाणीकपात लागू होणार आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठला आहे. मागील आठवड्यातच महापौरांसह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. या अहवालानंतर झालेल्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आठवड्यातील एका दिवशी, गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. इतर दिवशी एकवेळ पाणी मिळणार आहे. तसंच, शहरातील जलतरण तलाव आणि वॉटर पार्कचे पाणी तोडले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images