Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जोडबसचे सादरीकरण पुढे ढकलले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी हायस्पीड टायर बेस जोडबसेसची चाचपणी सुरू झाली असून, त्यासाठी महामेट्रोमार्फत शहरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. महामेट्रोच्या या सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी शनिवारी (ता. २९) कालिदास कलामंदिरात टायर बेस जोडबसच्या सादरीकरणाचे आयोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले होते. मात्र, हे सादरीकरण आता लांबणीवर पडले असून, लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याचे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूरमध्ये वृक्षारोपण

$
0
0

गंगापूर रोड : गंगापूर गावातील देना पाटील विद्यालयात महापालिकेचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शिक्षणाधिकारी महाजन यांनी संस्थेकडून नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॉलेजची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसहाय्य करण्याचे निर्देश

$
0
0

नाशिक : उत्पादित केलेल्या कृषी मालाची साठवणूक व विपणनव्यवस्था शेतकरीच उभे करू शकले तर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे साठवणूक व विपणन व्यवस्था उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांनी आर्थिक सहाय्य देण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना विनाअडथळा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची अचूक माहिती सर्व बँकांनी तयार करावी, अशा सूचना त्यांनी केली. बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांमार्फत देण्यात येणारे अर्थसहाय्य त्यांना आवश्यकतेनुसार कमीत कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने आंदोलनापासून राखले अंतर

$
0
0

- सभागृह नेते पाटील यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

- महापौरासह भाजप पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न सुटावा, महापालिकेने सील केलेल्या मिळकती खुल्या करून त्यांना १० रुपये चौरस फुटाने भाडेआकारणी करावी, सिडकोला डीसीपीआरमधून वगळावे आणि सेंट्रल किचनऐवजी बचतगटांना काम देण्यासाठी भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे महासभेतील ठिय्या आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी पाटील यांनी स्वपक्षाच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यामुळे पाटील भाजपमध्ये एकटेच पडले असून, महापौर रंजना भानसी यांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे पाटील यांच्या आंदोलनाला विविध संघटना आणि विरोधी पक्षांतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळत असताना भाजपने मात्र त्यांच्यापासून अंतर राखल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाचे आदेश रद्द व्हावेत, सिडकोतील घरांना महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतून वगळण्यात यावे, सील केलेल्या मिळकती उघडून त्यांना १० रुपये प्रतिचौरस फूट दराने भाडेआकारणी करावी, शालेय पोषण आहार महिला बचत गटांमार्फतच पुरविण्यात यावा, या मागण्यांसाठी पाटील यांनी मंगळवारी आक्रमक होत आंदोलन केले होते. तब्बल आठ तास चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळाअंती महापौरांनी या चार विषयांवर निर्णय दिला असला तरी त्यावर पाटील यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत हे प्रश्न निकाली निघत नाहीत, तोपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, मनसे नगरसेवक सलीम शेख व नगरसेवक रवींद्र धिवरे सहभागी झाले. मंगळवारी रात्री नऊपासून सुरू झालेले हे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही कायम होते. पाटील यांच्या आंदोलनाला कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, मनसे नगरसेविका ॲड. वैशाली भोसले, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दीपक दातीर, भाजपचे ॲड. श्याम बडोदे, धनंजय माने, माजी उपमहापौर गुरतिम बग्गा यांच्यासह धार्मिक स्थळ बचाव समितीचे पदाधिकारी तथा विश्व हिंदू परिषदेचे विनोद थोरात, बजरंग दलाचे चंदन भास्करे, मठ मंदिर समितीचे संपर्कप्रमुख कैलास देशमुख, नंदू कहार, प्रवीण जाधव, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी यांनी पाठिंबा दर्शविला. उपमहापौर प्रथमेश गिते आणि गटनेते संभाजी मोरुस्कार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे नगरसेवक, तसेच विहिंप, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनांनी सभागृह नेत्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असताना स्वपक्षाच्या महापौर रंजना भानसी यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपमध्ये पाटील एकटेच पडल्याचे चित्र असून, त्यांच्या विरोधात थेट तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महासभेतच पाटील यांनी आंदोलन सुरू केल्याने महासभेला आखाड्याचे स्वरूप आले आहे. पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक सभागृहात दाखल होत आहेत.

भाजपची कोंडी

विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना पाटील यांच्या आंदोलनामुळे भाजपची अडचण वाढल्याचे चित्र आहे. पाटील यांचे आंदोलन नागरिकांच्याच प्रश्नावर असताना, त्यांच्यावर कारवाई केल्यास ही कारवाई बूमरँग होण्याची पदाधिकाऱ्यांना भीती आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे भाजपच्या आमदारांनी तातडीने हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे सांगितले जाते. पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही आमदारांनी भेट घेतली असून, पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याचे समजते, तर दुसरीकडे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.

आयुक्तांवर लेटरबॉम्ब

सभागृहात आंदोलनाला बसले असतानाही, पाटील यांनी पुन्हा लेटरबॉम्बच्या माध्यमातून आयुक्तांवर निशाणा साधला आहे. महापालिकेतील अनागोंदी कारभाराचे खापर सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यावर फोडले आहे. आयुक्त गमे यांना निवेदन सादर करीत महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला दोषी धरले आहे. आंदोलनादरम्यान जीविताला धोका निर्माण झाल्यास आयुक्तच जबाबदार असतील, असा इशारादेखील पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे पाटील यांनी एकाचवेळी भाजपसह आयुक्तांचीही कोंडी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा फोटो

योग शिक्षणाची जादा संधी

$
0
0

पदविका, पदव्युत्तर कोर्ससाठी १६० प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील योग विद्या गुरुकुल संचलित योग महाविद्यालयात सुरू असलेल्या एमए (योगशास्त्र) व योग प्रयोग (पदविका) या दोन्ही अभ्यासक्रमांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठाने मान्यता दिली आहे. यंदाच्या वर्षापासून दोन्ही अभ्यासक्रमासाठी १६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याला मंजुरी दिली आहे.

योग विद्या गुरुकुलच्या वतीने २०१३ मध्ये योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. तेव्हापासून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर यांच्याशी हे महाविद्यालय संलग्न आहे. या संस्थेच्या वतीने योग प्रयोग पदविका व योगशास्त्र पदव्युत्तर पदवी असे अभ्यासक्रम चालविले जातात. गेल्या वर्षापासून या अभ्यासक्रमांना सातत्याने प्रवेश मागणी वाढत असून यंदा पदविकेसाठी ६० व पदव्युत्तर पदवीसाठी १०० जागांना मान्यता दिली आहे. त्यामुळे मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थांना आता प्रवेश घेणे शक्य होणार आहे. अभ्यासक्रम सुरू झाले त्या वर्षापासून या महाविद्यालयाने सतत सुवर्ण पदक मिळविले आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी चार पूर्ण वेळ प्राध्यापक, १० योग शिक्षक व १० बाहेरच्या तज्ज्ञ मंडळी कार्यरत असणार आहे. शनिवार आणि रविवार सकाळी ११ ते ५ या वेळेतच या महाविद्यालयाचे वर्ग असणार आहे.

असा असेल अभ्यासक्रम

पदविकेसाठी एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून त्यासाठी १२ उर्त्तीण किंवा १०+२ सरकारमान्य अभ्यासक्रम पूर्णवेळ उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी ५ विषय अभ्यासक्रमात असून प्रत्येक विषयाची १०० गुणांची परीक्षा असेल. योगशास्त्र पदव्युत्तर पदवीसाठी सेमिस्टर पॅटर्न असेल. चार सत्र म्हणजे दोन वर्षे मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. यासाठी बी. ए. योगशास्त्र किंवा कोणत्याही शाखेचा पदविधर, कालिदास विद्यापीठाची योगशास्त्र पदविका, किंवा योग विद्या गुरुकुल संस्थेचा योग शिक्षक वर्ग उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पद्धतीत ४० गुण हे अंतर्गत रहाणार असून ६० गुण हे बाह्य असणार आहेत.

येत्या काळात योगाचा सातत्याने प्रसार होत आहे. योगामध्ये पदवीप्रप्त उमेदवारांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. योगाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.

- डॉ. आशा वेरुळकर, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयमध्ये गर्दी

$
0
0

सातपूर : दहावीचा निकाल लागल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ जूनपासून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ३० जून शेवटची तारीख देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरलेलेल्या विद्यार्थ्यांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी ३० जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत झेरॉक्स कॉपी जमा करण्याबाबत आयटीआयकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिकता घटल्याने न्याय विलंबाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही खटल्यावर लवकरात लवकर न्याय करायचा असेल, तर त्यासाठी स्वत:शी प्रामाणिक असणे गरजेचे असते. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. वकिलाला खटला संपवायची घाई नसते, तर न्यायाधीशाला संपविलेल्या खटल्यांची यादी वाढवायची असते. दुसरीकडे पक्षकाराला अपेक्षेप्रमाणेच न्याय हवा असतो. यामधली प्रामाणिकता जाऊन स्वार्थीपणा वाढल्याने न्याय विलंबाने होत असल्याचे सद्य:स्थितीत दिसून येत आहे, असे प्रतिपादन अॅड. जयंत जायभावे यांनी केले.

संवाद नाशिक या संस्थेतर्फे बुधवारी सायंकाळी सहाला गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये 'न्याय मिळण्यास विलंब का होतो?' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 'संवाद'चे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड. काका घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानात अॅड. जायभावे यांनी न्याय मिळण्यास विलंब होण्याबाबतची कारणे उपस्थितांसमोर मांडली.

अॅड. जायभावे म्हणाले, की समाजातल्या प्रत्येक परिस्थितीचे प्रतिबिंब सर्व व्यवस्थांवर दिसते. आजच्या काळात लोकांचा प्रामाणिकतेवर विश्वास राहिला नसून, प्रामाणिक लोकांचीही संख्या घटली आहे. नैतिकदृष्ट्या न्याय मिळण्यास विलंब होण्याचे कारण शोधायचे झाल्यास प्रामाणिकता जाऊन स्वार्थी वृत्ती वाढली असल्याचे कारण योग्य वाटते.

अॅड. जायभावे म्हणाले, की कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेवर राज्यसभेत ९, लोकसभेत ६, तर विधानसभेत अवघे ३ टक्के चर्चा होते. सभांमध्ये बहुतांश वेळ राजकीय मुद्द्यांवर गदारोळ घालण्यात जातो. यानंतर विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होते. मात्र, शेवटच्या काही मिनिटांपुरतेच कायदेनिर्मिती व कायदेविषयक चर्चा होते. सद्य:स्थितीला देशात साडेतीन कोटी दिवाणी खटले प्रलंबित आहेत. न्यायालयात न्याय मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे नागरिकांना जाणवू लागले आहे. यामुळे खटला दाखल करण्याऐवजी पुढारी, पोलिस किंवा इतरांकडून वाद मिटविण्याचे प्रयत्न करण्याची मानसिकता वाढू लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.

माणूस डिस्कनेक्ट

गेल्या काही वर्षांत माणसातला संवाद हरवला आहे. यांत्रिक मानसिकतेशी मानवाने गट्टी केली असून, यामुळे भावना उरलेल्या दिसत नाहीत. माणूस म्हणून व्यक्ती डिस्कनेक्ट होऊ लागल्या असून, मोबाइलपुरतेच संभाषण उरले आहे. ही समस्या देशाच्या सुव्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने घटलेल्या संवादाला विकास म्हणायचे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे मत अॅड. जायभावे यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुका आणि पाठोपाठ लागलेल्या प्रभाग क्र. १० डच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे तीन महिने लांबलेल्या महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. नगरसचिव विभागाच्या प्रस्तावानंतर विभागीय महसूल आयुक्तालयाकडून प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, येत्या ५ व ६ जुलै रोजी सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. सालाबादप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवीन सभापती निवडणुकीचा कार्यक्रम घेतला जात असतो; परंतु यंदा या कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही तोच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० ड या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या. प्रभाग क्र. १० डचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग समित्यांच्या तारखांची घोषणा विभागीय आयुक्त कार्यालयातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांच्याकडून गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता या निवडणुकांच्या सविस्तर कार्यक्रमाची निश्चिती केली जाणार आहे.

युती की आघाडी?

नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिकरोड प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने या तिन्ही प्रभाग समित्यांचे सभापतिपद भाजपकडे राहील. नाशिक पश्चिम प्रभाग समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे व शिवसेना अशा विरोधी पक्षांचा सभापती होता. आता भाजपशी युती असल्याने पश्चिम प्रभागातील शिवसेनेच्या भूमिकेकडे अन्य विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहे. सिडकोत शिवसेनेला बहुमत आहे, तर सातपूर आणि नाशिक पश्चिममध्ये कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास प्रत्येकाच्या वाट्याला एकेक सभापतिपद मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणी युती होते की शिवसेना आघाडीसोबत राहते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्थानकात होणार सुसज्ज विश्रांती कक्ष

$
0
0

नाशिकरोड : रेल्वे स्थानकात लवकरच वातानुकूलित आणि सुसज्ज विश्रांती कक्ष (लक्झरी लाँज) सुरू होणार आहे. प्रतीक्षालयापेक्षा (वेटिंग रूम) हा कक्ष आधुनिक व सर्वांना न्याय देणारा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नाशिकरोड रेल्वेस्थानक हे क्लास वन दर्जाचे आहे. रेल्वेगाडीला विलंब असेल तर तिकीटधारकांच्या श्रेणीनुसार वेटिंग रूम आहेत. उच्च श्रेणीतील तिकीटधारकांसाठी एसी वेटिंग रूम, तर साध्या तिकीटधारकांसाठी साधी वेटिंग रूम आहे. आता प्रवाशांमध्ये भेदभाव न करणारा विश्रांती कक्ष सुरू होणार आहे. त्याचे नियोजन झाले असून मंजुरी बाकी आहे. आतील रचनेसाठी आर्किक्टेचर येऊन पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम

$
0
0

महिलेस अटक

नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित पसार झाला आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी संशयिताच्या आईला अटक केली आहे. संशयित मंगळवारी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातून पसार झाला. अशोक दत्तू पारवे (वय २४) असे त्याचे नाव असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाठविली आहेत. या प्रकरणात अशोकला मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्या आईला अटक केली आहे.

मंगळसूत्र हिसकावले

नाशिक : मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची पोत हिसकावून नेली. गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल ते प्रमोद महाजन उद्यान या दरम्यान ही घटना घडली. शकुंतला सुधाकर जाधव (वय ७०, रा. जुना गंगापूर नाका) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीची फिर्याद दिली आहे. त्या बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पायी जात होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंत चिकित्सेवर मार्गदर्शन

$
0
0

नाशिक : भारतीय दंत परिषद-देवळालीच्या वतीने २३ जून रोजी एकदिवसीय कार्यशाळा झाली. मुख्य दंतचिकित्सक डॉ. महेंद्र पटाईत यांनी आधुनिक डिजिटल दंत तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. दंत चिकित्सकांनी सिबी सिटी कॉन, कॅड-कॅम सिस्टीम इंट्राओरल स्कॅनर या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाविषयी व त्यांचा उपयोग सखोल दंत उपचार कसा देण्यात येईल, याविषयी माहिती दिली. डॉ. सुशील पारख यांनी सर्व दंत चिकित्सकांना कार्यपद्धतीविषयी संबोधित केले. डॉ. मुकुंद मोरे यांनी स्वागत केले. डॉ. जयेश पाटील, डॉ. सायली जमधेडे, डॉ. प्रशांत पारखे व डॉ. प्रीतम अमृतकर यांनी सहकार्य केले. कार्यशाळेस डॉ. राजेंद्र सोपे, डॉ. प्रकाश निकम, डॉ. सुधीर पंडित, डॉ. मीना कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. चेतन चौधरी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसन तडवी प्रथम

$
0
0

…नाशिक : मुंबई शहर अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने मुंबई येथे आयोजित ६९ व्या महाराष्ट्र राज्य सीनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत नाशिकच्या किसन तडवी याने ५ हजार मीटर (पुरुष गट) धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

किसनने ५ हजार मिटरचे अंतर १४ मिनीटे ३३ सेकंदात पूर्ण केले. त्याच्या जोडीला असलेल्या नाशिकच्याच नरेंद्र प्रतापसिंगने हेच अंतर १४ मिनीटे ३६ सेकंदात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तिसरा क्रमांक साताऱ्याच्या कालिदास हिरवे याने पटकावला. त्याने हे अंतर १४ मिनीट ४६ सेकंदात पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी पर्यवेक्षक लाच घेताना अटक

$
0
0

दिंडोरी : दिंडोरी तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या कार्यालयात कृषी पर्यवेक्षक एल. एन. काळे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक एल. एन. काळे यांनी ठिबक सिंचन अनुदानासाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या निमित्ताने एका शेतकऱ्याकडून लाच मागितली होती. दिंडोरी येथील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्या शेतकऱ्याकडून पाचशे रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत दिंडोरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलिस हवालदार सुभाष हांडगे, आर. आर. गीते करित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारका उड्डाणपूल कागदावरच!

$
0
0

कामाला प्राधान्य मिळण्याची गरज

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणारा द्वारका ते नाशिकरोड या उड्डाणपुलाचे तांत्रिक काम संथ गतीने सुरू आहे. केंद्र सरकारकडून अशा कामांना प्राधान्यक्रम देण्यात येत असते. सध्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व प्रक्रियेसाठी नक्की किती वेळ लागेल, हे स्पष्ट नसल्याने या उड्डाणपुलाची निर्मिती कागदावरच आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या वाहनचालकासह प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. मात्र, येथील भौगौलिक परिस्थितीत बदल करणे शक्य नसल्याने द्वारका ते नाशिकरोड या उड्डाणपुलाचा पर्याय पुढे आला. खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामास तांत्रिक मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील सदर कामास उत्सुक असल्याने डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचे काम मागील वर्षी सुरू झाले. सध्या हेच काम प्रगतिपथावर आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सर्व्हे व प्रोजेक्टचे अंतिम रूप तयार करण्यात येते. त्यानंतर प्रिन्सिपल मंजुरी मिळणे आवश्यक असते. ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या निविदा काढून कामास सुरुवात करण्यात येते. या सर्व प्रक्रियेसाठी नक्की किती वेळ लागेल, हे स्पष्ट नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार कामांचा प्राधान्यक्रम ठरवत असते. त्यानुसार बांधकामांची कामे हाती घेण्यात येतात. या प्राधान्यक्रमांमध्ये द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपूल या कामाचा सध्यातरी कोणताही समावेश नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. साधारणत: ५.९ इतकी लांबीचा हा रस्ता असून, त्यासाठी सातशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, कामास जेवढा उशीर होईल, तेवढा हा खर्च वाढू शकतो. दरम्यान, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये हा उड्डाणपूल द्वारकेच्या पुढे म्हणजे सारडा सर्कल येथे उतरतो आहे. द्वारका ते सारडा सर्कल हा परिसर महापालिकेच्या ताब्यात असून, हा रस्ता हायवेकडे वर्ग करावा लागणार आहे. सूत्रांच्या मते मेट्रो रेल्वेचासुद्धा या उड्डाणपुलाच्यावेळी विचार करण्यात येत आहे.

...

एक टप्पा पूर्ण

सध्या तांत्रिक कामांची पूर्तता करण्याचा टप्पा अंतिम टप्प्यात पोहचला आहे. गेल्याच आठवड्यात या प्रकरणी दिल्लीत या विभागाचे प्रमुख अधिकारी असलेल्या अतुल कुमार यांच्याशी चर्चा झाली. प्रशासकीय व प्रिन्सिपल मंजुरी हे या कामाचे प्रमुख टप्पे असून, त्यातील एक पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. दरम्यान, उड्डाणपुलाच्या रचनेत मेट्रोचा समावेश होत असल्याच्या प्रक्रियेबाबत माहिती नसल्याचे गोडसे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात आतषबाजी

$
0
0

मालेगावात आतषबाजी

मालेगाव : मराठा आरक्षणाचा कायदा वैध असल्याचा उच्च न्यायालयाच्या निकालाचे गुरुवारी मालेगावात स्वागत करण्यात आले. शहरातील शिवाजी पुतळा परिसरात सकल मराठा मोर्चा मालेगाव तालुका नियोजन समितीच्या वतीने जल्लोष झाला. मराठा बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करीत, पेढे वाटले. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत विशाल असे मोर्चे काढून आदर्श घालून दिला. न्यायालयाने हे आरक्षण वैध ठरवल्याने मराठा समाजास न्याय मिळाल्याची भावना यावेळी समितीचे सदस्य देवा पाटील यांनी व्यक्त केली. या आंदोलनात सहभागी होऊन योगदान दिल्याबद्दल सकल मराठा समाज बांधवांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पूर्वी’च्या ‘अंतर्नाद’ला गोंदेश्वराचे कोंदण

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgrouop.com

Tweet : @bharvirkarPMT

मराठी फिल्म इंडस्ट्रीला नाशिक शहर व जिल्ह्यामधील अनेक निसर्गरम्य स्थळांची चित्रीकरणासाठी नेहमीच भुरळ पडली आहे. नाशिकचा गोल्डन लाइट अन्य कोणत्याही शहरात मिळत नसल्याने नाशिकला नेहमी प्राधान्य दिले जाते. यात आता सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची भर पडली असून, या मंदिरासमोर व भोवताली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूर्वी भावे हिने नुकतेच गाण्याचे चित्रीकरण केले.

गोंदेश्वर मंदिर म्हणजे हेरिटेज असून, मुंबईहून नेहमीच चित्रीकरणासाठी त्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी पूर्वी म्हणाली. नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिरे असून, पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित ही मंदिरे येतात. परंतु, रीतसर परवानगी काढल्यास येथे चित्रीकरणासाठी परवानगी मिळते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीने आता नाशिक शहर व जिल्ह्यातील मंदिरांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अभिनेत्री पूर्वी भावेच्या 'अंतर्नाद' या नवीन डान्स सीरिजमधील पहिले गाणे 'भज गणपती' हे भरतानाट्यम नृत्यशैलीतील असून, त्यासाठी सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची निवड करण्यात आली. हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून, या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे 'भज गणपती' गाण्याला पूर्वी भावेची आई सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका वर्षा भावे यांनी संगीत दिले आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना पूर्वी म्हणते, की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणेश आराधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे सीरिजची सुरुवात 'भज गणपती' या गणेशवंदनेने झाली आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील चित्रीकरणाचा अनुभव व्यक्त करताना पूर्वी सांगते, की वेळेच्या अभावामुळे अनेक शॉट वन टेक चित्रीत झाले. या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रीकरणाचा रिझल्ट चांगला आहे. यू ट्यूबवर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, जेथे हे गाणे चित्रीत केले आहे त्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरामुळे अधिक सर्फिंग होत आहे.

---

आम्ही या गाण्याचे चित्रीकरण मागील महिन्यात केले, तेव्हा या मंदिराच्या परिसरातली जमीन एवढी तापायची, की अनवाणी चालणेही कठीण व्हायचे. ती जमीनही ओबडधोबड होती, त्यामुळे डान्स करणेही कठीण जात होते. पण, आम्हाला खूप कमी वेळेची परवानगी होती. त्यामुळे हे आव्हानही स्वीकारावे लागले.

-पूर्वी भावे, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनद अखेर मार्गीउद्याच्या उद्या सटाणा शहर पुनद पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करा असा

$
0
0

आजपासून इन कॅमेऱ्यात काम; हायकोर्टाचा आदेश

म. टा. वृतसेवा, सटाणा

शहरासाठी महत्त्वाकांक्षी व कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेने मंजूर केलेल्या पुनद पाणी पुरवठा योजनेबाबत हायकोर्टाना दिलासा दिला आहे. या योजनेचे काम मुदतीत काम पूर्ण करावे. पोलिस बंदोबस्त आवश्यक असल्यास पोलिस अधीक्षकांनी तो पुरवावा. सटाणा पालिका प्रशासनाने ही योजना तत्काळ योजना पूर्ण करावी, असा आदेश गुरुवारी हायकोर्टाने दिला. तसेच या योजनेचे पाणी हे पाइपलाइनेच जाईल, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाइपलाइनला विरोध करणारे कळवणकर आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सटाणा शहरासाठी अर्जुनसागर धरणातून पुनद पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी ५१ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. सटाणा नगरपालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारास कार्यादेश दिला आहे. पण कळवण तालुकावासीयांच्या विरोधामुळे योजनेचे काम रखडले होते. पोलिस बंदोबस्तात काम सुरू केल्यानंतर वाढत्या विरोधामुळे काम ठप्प झाले. त्यामुळे सटाणा येथील ॲड. रोशन सोनवणे यांनी योजना पूर्ण होण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी २७ जूनच्या सुनावणीला हजर रहावे असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, देवीदास टेकाडे, सटाणा पालिकेचे नगरपरिषदेच्यावतीने पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, ॲड. रोशन सोनवणे हजर होते. न्यायालयाने उद्या, शुक्रवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात आणि इन कॅमेऱ्यात योजनेचे काम सुरू करण्याचे सांगितले. तसेच १५ जुलैपर्यंत झालेला कामाचा प्रगती अहवाल न्यायालयास सादर करावा, असेही सांगितले.

पुनदसाठी फौजफाटा

शुक्रवारी सकाळी १० पुन्हा काम सुरू होणार

२५० कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त

योजनेचे काम पूर्णपणे इन-कॅमेऱ्यात

विरोध करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल होणार

रोजच्या कामाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार

मोरेंचे डोळे पाणावले

सटाणा शहरात यंदा भीषण पाणीटंचाई आहे. शहरात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे पुनद योजना मार्गी लागावी यासाठी सर्वसामान्यांसह नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी देव पाण्यात ठेवले होते. गुरुवारी हाय कोर्टातून याचिकाकर्ते ॲड. रोशन सोनवणे यांनी दूरध्वनीद्वारे मोरे यांना योजनेबाबत कळविले. ही आनंदवार्ता ऐकून सुनील मोरे यांने डोळे पाणावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपत्रित अधिकाऱ्यांचे

नाशिकमध्ये आनंदोत्सव

$
0
0

पेढे वाटत, फटाके फोडून जल्लोष; आंदोलनाला नाशिकमधूनही बळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर उभे राहिलेल्या मराठा आंदोलनाला नाशिकमधून बळ पुरविण्यात आले. आरक्षण देण्यात नाशिकचा सिंहाचा वाटा राहिला. राज्यातील सर्वात मराठा क्रांती मोर्चा नाशिकमधून काढण्यात आला. तर मराठा समाजासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनात येथील आंदोलकांनी सक्रिय सहभाग घेत, शहरात शंभर टक्के बंद पाळला होता. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कोपर्डी हत्याकांडातील पीडितेचला न्याय मिळावा यासह मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने उभी राहिली. या आंदोलनाला नाशिकमधूनही मोठ्या प्रमाणावर बळ मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नाशिकमध्येही मोठा मोर्चा काढण्यात आला. तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी यात शांततेने सहभाग नोंदवित आरक्षणाची मागणी तीव्र केली. विशेष म्हणजे या आंदोलनात खासदार उदयन राजे स्वत: सहभागी झाले होते. माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, माजी अधिकारी चंद्रकात बनकर, माजी आमदार जंयत जाधव, भाजपचे सुनील बागूल, काँग्रेसचे शैलेश कुटे, छावा संघटनेचे करण गायकर, शिवाजी सहाणे, दिनकर पाटील, डॉ. प्रशांत हिरे, नीलिमा पवार यासारख्या मराठा समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी या मोर्चाचे यशस्वी नियोजन केले. आरक्षणावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर राज्यभर बंद पाळण्यात आला. नाशिकमध्येही शंभर टक्के बंद पाळण्यात आला. परंतु, नाशिकमध्ये या बंदला काहिसे हिंसक वळण मिळाले होते. परंतु, ज्येष्ठ नेत्यांनी त्वरित हस्तक्षेप करीत बंदला हिंसक वळण लागू दिले नाही. या आंदोलनात शेकडो युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य सरकारने ते गुन्हे नंतर मागे घेतले. तसेच राज्यव्यापी स्थापन झालेल्या समितीत नाशिकमधील अनेक समाजील नेत्यांना स्थान देण्यात आले. मुंबईत झालेल्या शेवटच्या मोर्चातही नाशिकधील जवळपास ५० हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रयत्नांती उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नाशिकमध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर फटाके फोडून तसेच ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

मानवंदनेसाठी आज बैठक

आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शहीद हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी व आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी चार वाजता वरद लक्ष्मी लॉन्स, औरंगाबाद रोड येथे बैठक होणार आहे. सर्व मराठा समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा नाशिकने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images