Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आफ्रिकेत द्राक्ष शेतीसाठी संधी

$
0
0

डॉ. इटकरांचा सल्ला; अल्प शुल्कात जमीन उपलब्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आफ्रिका देश हा शेतीसाठी सुपीक असून, तेथे द्राक्ष बागासाठी चांगली संधी आहे. तेथील सरकार शेतीसाठी अगदी कमी शुल्कात जमिनीचे करारनामे करून देते. त्यामुळे तेथे जाऊन शेती करायला हवी. पंधराशे लोकांचा ग्रुप एकत्र आला तर ग्रुप शेती करू शकतात, असा सल्ला जागतिक कीर्तीचे सल्लागार डॉ. सचिन इटकर यांनी द्राक्ष उत्पादकांना दिला. त्यासाठी मी सर्व मदत करेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

रावसाहेब थोरात सभागृहात 'आफ्रिका खंडातील द्राक्षशेतीच्या संधी' या विषयावर संवाद साधताना ते शेतकऱ्यांसमोर बोलत होते. वनाधिपती तथा माजी आमदार विनायकदादा पाटील यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. इटकर यांनी भारताने गेल्या २० ते २५ वर्षांत जी प्रगती केली आहे, ती २०० वर्षांत झालेली नाही. आफ्रिकेत १९९५ नंतर भारतात जे बदल झाले ते आता होत असून, या देशात शीख, गुजराथी, सिंधी, दाक्षिणात्य व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. पण, महाराष्ट्रीयन लोक फक्त अमेरिकेत आयटी कंपनीत दिसतात. आफ्रिकेतही ते आहेत पण, नोकरीनिमित्त त्यामुळे येथे मराठी माणसाला शेतीत मोठी संधी आहे, असे मत डॉ. इटकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे येथे जाऊन शेती केली तर त्यातून करिअर घडवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक आणि द्राक्ष हे अतूट नातं ठरलेले आहे. आज द्राक्ष उत्पादक शेतकरी एक संक्रमाणातून जात असून, याच धर्तीवर नव्या संधीच्या माहितीसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. आफ्रिका देशामध्ये अनेकांकडे पाच हजार हेक्टर, दहा हजार हेक्टर शेती आहे. पण, करणारे कोणीच नसल्याने येथे तुम्हाला जावई होण्याची संधी असल्याचेही डॉ. इटकर यांनी सांगितले. महात्मा गांधी २० वर्षे आफ्रिकेत राहिले. त्यामुळे त्यांच्या कामाचा आजही येथे आदर केला जातो. भारतीयांना ते आपले मित्र मानतात. त्यांचे स्वागही ते मनापासून करतात, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुथूट दरोडा प्रकरणीएक जण ताब्यात

$
0
0

नाशिक : मुथूट फायनान्स कार्यालयात पडलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणी शहर पोलिसांनी सुरतमधून एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उंटवाडी रोडवरील म्हसोबा मंदिर पुलाजवळील मधुरा अपार्टमेंटमधील मुथूट फायनान्स कार्यालयात १४ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तब्बल १० दिवसांनंतर संशयित हाती लागला असून, या प्रकरणावर सोमवारी पोलिस अधिक माहिती देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता त्र्यंबकरोडचा कायापालट!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्टरोडच्या कामातील दिरंगाईमुळे या संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नसताना महापालिकेने 'विना अडथळा' या संकल्पनेवर आधारित त्र्यंबकरोडचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीचा गोंधळ लक्षात घेता येथे मूळ रस्ता सोडून फूटपाथ आणि सायकल ट्रॅक एवढेच काम हाती घेण्यात येणार आहे.

त्र्यंबकनाका ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जलतरण तलावापर्यंत म्हणजे ६५० मीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे काम होणार आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, हा रस्ता रूंद असून, येथील मूळ रस्ता 'जैसे थे' ठेवण्यात येणार आहे. फूटपाथपासून साडेसात मीटरपर्यंत या कामाचे दोन टप्पे असतील. एका टप्प्यात सायकल ट्रॅक, तर दुसऱ्या टप्प्यात पादचाऱ्यांसाठी मोठा फूटपाथ तयार करण्यात येणार आहे. याच कामावेळी भूमिगत केबल्सचे कामही होणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकनाका ते पपया नर्सरी हा रस्ता यापूर्वी विकसित करण्यात आला असून, शहरातील इतर रस्त्यांच्या तुलनेत तो रूंद आहे. त्र्यंबकनाका सिग्नल ते सावरकर जलतरण तलाव सिग्नल या पाऊण किलोमीटरच्या भागात ठक्कर बाजार बसस्थानक, सिव्हिल हॉस्पिटल आणि अनंत कान्हेरे मैदान ही महत्त्वाची ठिकाणे येतात. ठक्कर बाजार आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्ह्यातील नागरिकांची सतत ये-जा असते. लांब पल्ल्यांच्या एसटी बसमुळे येथे राज्यातील आणि देशभरातील पर्यटकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे पादचारी मार्ग ठेवण्यात आला आहे. गोल्फ क्लबवर शहरातील हजारो नागरिक व्यायामासाठी दाखल होत असतात. सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास गर्दी असते. त्यामुळे या पाऊण किलोमीटरमध्ये सायकल ट्रॅकचे नियोजन प्रशासनाने केले आहे. शहरामध्ये शंभर ठिकाणी पब्लिक शेअरिंग सायकल योजना कार्यान्वित असून, गोल्फ क्लब येथेही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिक आपल्या परिसरातून सायकल घेऊन गोल्फ क्लब गाठू शकतात. स्मार्टरोडच्या कामावेळी रस्ता खोदून नवीन बांधणे हे काम मोठे जिकिरीचे ठरले. त्यातून शहाणपण शिकलेल्या प्रशासनाने यावेळी रस्ता 'जैसे थे' ठेवण्याचे धोरण आखले आहे. या कामासाठी एकूण साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे.

पार्किंगचा प्रश्न

त्र्यंबक नाका ते सावरकर जलतलण तलावाच्या दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर जागा या नवीन कामासाठी वापरण्यात येणार आहे. फूटपाथ आणि सायकल ट्रॅकची उंची साहजिकच डांबरी रस्त्यापेक्षा जास्त असेल. यामुळे रिक्षाचालक रस्त्यावर थांबू शकतील. बस स्टॉपची जागाही पुढे सरकणार असून, गोल्फ क्लबवर येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या मूळ रस्त्यांची जागाच कमी होणार असल्याने भविष्यात येथे वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाने आतापासूनच घ्यावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीशी आघाडी निश्चित,वंचितबरोबरही चर्चा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'घटना माहीत असूनही त्या विरोधात निर्णय घेत राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केला आहे.' असा आरोप रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव व त्यानंतर अर्थव्यवस्था व विधानसभा निवडणुकीतील तयारीबाबत संवाद साधला. या पत्रकारपरिषदेत माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष अॅड. शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, डॉ. हेमलता पाटील उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे मते विभागली गेली. त्यामुळे भाजपला आठ जागांचा फायदा झाला. त्यांनी आघाडी केली असती तर त्यांचे पाच-सहा खासदार झाले असते. विधानसभेत ही मते विभागू नये यासाठी आमची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी जिल्हानिहाय बैठका घेतल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीबरोबर आघाडी निश्चित असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. भाजपने यावेळेस २२० आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केल्याच्या प्रश्नावर चव्हाण यांनी या आकड्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. त्याचप्रमाणे सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रंगलेल्या कलगीतुऱ्याबाबतही त्यांनी भाष्य टाळले.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. तेलाची मोठी आयात या देशात आपण करतो व सहा महिन्याचे क्रेडिटही मिळते. पण, आता ते बंद झाल्यामुळे त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल. त्याचप्रमाणे 'ट्रेड वॉर'मुळे नोकऱ्या कमी होतील, असे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीचे उत्पन्न घटल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांनी सोने ३५ हजारांपार

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा वर्षांनंतर सोन्याचे दर ३५ हजारांच्या पुढे गेले आहेत. पाच दिवसात तोळ्यामागे तब्बल हजार रुपयांची वाढ झाली आहे. जुलै महिन्यात लग्नाच्या तारखा असल्याने ग्राहकांना सोने खरेदी करणे आवश्यक असल्याने भाव वाढले असले, तरीही मागणी कायम असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. रविवारी सोन्याचे भाव तोळ्याला ३५ हजार १५० रुपयांवर पोहचले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असून, त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवरदेखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने भाववाढ होत असली तरी मागणीत फरक पडलेला नाही. नजीकच्या काळात लग्नाच्या तारखा असल्याने अनेक ग्राहक भाव वाढूनही सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. आठ दिवसांपूर्वी सोन्याचे भाव ३४ हजार १४० इतके होते, तर रविवारी ३५ हजारांवर पोहचले. अनेक लोक चोख सोने खरेदीस पसंती देत आहेत. लग्नसराईसाठी पाटल्या, बांगड्या यांची मागणी वाढली आहे. सोन्याची भाववाढ होत असली तरी चांदीत मात्र तुरळक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत सोने चढेच राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, मागणीत तसूभरही फरक पडलेला नाही. ग्राहकांचा ओढा सतत वाढतो आहे.

-कन्हैय्या आडगावकर, सराफ व्यावसायिक

१८ जून ३४ हजार १४०

१९ जून ३३ हजार ९८०

२० जून ३४ हजार ७००

२१ जून ३५ हजार १७०

२२ जून ३५ हजार १५०

२३ जून ३५ हजार १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौदी अरेबियात महाराष्ट्र सदन?

$
0
0

मालेगाव : दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर हज यात्रेकरूंसाठी राज्य हज कमेटीने केंद्र सरकारकडे मक्का व सौदी अरेबियात महाराष्ट्र सदन व भारत सदन उभारण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली. भारतातून हज यात्रेसाठी येत्या १४ जुलै रोजी भाविक रवाना होणार असून त्या पार्श्वभूमीवर मालेगावातील हज यात्रेच्या तयारीचा आढावा व यात्रेकरुंचे प्रशिक्षण यासाठी सिद्दिकी गुरुवारी मालेगावी आले होते. यावेळी प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर येथील शासकीय विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी हज यात्रेसाठी राज्य हज कमिटीकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा मांडला. देशभरातून २ लाख तर राज्यातून १४ हजार ६८५ भाविक यंदा हज यात्रेला जाणार आहेत. हज यात्रेकरूंचा कोटा वाढवा अशी जुनी मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मुख्तार नग्मी यांच्या प्रयत्नांतून हज यात्रेकरूंच्या कोट्यात वाढ झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले. पुढील वर्षी भारतातून हज यात्रेला जाणा-या भाविकांच्या संख्येत यामुळे वाढ होणार असून भारत सर्वाधिक हज यात्री पाठवणारा प्रथम क्रमांकाचा देश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकांचे सुशोभीकरण बासनात!

$
0
0

मटा सीरिज - योजना विरल्या हवेत

भाग १ - दत्तक चौक

अधिकारी बदलला की त्यांच्या संकल्पनाही बासनात गुंडाळल्या जातात. नाशकातही विविध अधिकाऱ्यांनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. काहींना मूर्तरूप आले असले तरी अनेक घोषणांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकली नाही. याबाबतचा धांडोळा घेणारी मटा मालिका आजपासून...

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकरोडवरील शरणपूर पोलिस चौकीजवळील सिग्नलचा चेहरामोहरा बदलण्याचे काम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर रखडले आहे. अर्धवट तसेच प्रस्तावित कामे गुंडाळण्यात आल्याने तब्बल १७ चौकांचे काम होऊ शकले नाही.

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, लेन कटिंगच्या खुणा यांसह विविध प्रकारचे साइन बोर्ड लावून शहरातील १७ चौकांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी हाती घेतले होते. त्र्यंबकरोडवरील शरणपूर पोलिस चौकी सिग्नल येथील चौकातील काम पूर्ण झाल्यानंतर इतर चौकांचे काम हाती घेण्यात येणार होते. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते तेव्हा त्यावेळी अनेकदा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच दिसत नसल्याचे किंवा इतर साईन बोर्ड नसल्याच्या तक्रारी करतात. यामुळे पोलिस आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिका करते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा अशी कामे वेळेत होत नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चौकांच्या सुशोभिकरणाचे काम पोलिसांनीच हाती घ्यावे, यासाठी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे या कामासाठी लागणारा निधी लोकसहभागातून उपलब्ध करण्याचे नियोजन आखण्यात आले. पोलिस उपायुक्त तसेच सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. चौकाच्या सुशोभिकरणाचे काम धूमधडाक्यात सुरू झाले. सुंदर आणि वाहतूक नियमांबाबत सहजतेने जनजागृती होईल, अशा पद्धतीचे काम येथे सुरू होते. मात्र, ते अंतिम टप्प्यात पोहचण्यापूर्वीच महापालिका आयुक्तांची बदली झाली. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच या कामांना ब्रेक लावला. पोलिस प्रशासनाच्या हेतूकडे मुंढे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आहे त्या स्थितीत हे काम सोडून देण्याशिवाय पोलिस प्रशासनाकडे पर्याय उरला नाही. यानंतर मुंढे यांची बदली झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त सिंगल यांचीही औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली. मात्र, यामुळे सुशोभीकरणाची योजना जवळपास गुंडाळण्यात आली असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूयारी गटार योजनेस तांत्रिक मान्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या भूयारी गटार योजनेच्या कामास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मान्यता दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष कामासही सुरुवात होईल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. याबाबत शनिवारी(दि.२२)आयोजित पत्रकार परिषदेत योजनेच्या कार्यवाहीबाबत दीड वर्षात ही योजना पूर्णत्वास जाईल असा विश्वास व्यक्त मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सटाणा शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुने शहर आणि नवीन वसाहत अशा दोन भागात विभागलेल्या शहरासाठी महत्त्वाकांक्षी भूयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी जुन्या शहरात उघड्यावरील गटारी आहेत तर नवसाहतीत अद्यापही सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण शहरात सांडपाण्याचा प्रश्न अवघड बनला आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी सुरुवातीला सांगितले.शहरात ठिकठिकाणी घाण पाणी साचून विविध साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधारींनी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी सादर केला.या योजनेंतर्गत सुमारे ३८ कोटी रुपये निधीतून एकूण ७६ किलोमीटरचे बंदिस्त गटार काम होणार आहे. या योजनेसाठी नगरपालिकेकडून जवळपास ३ कोटी ८० लाख रुपये लोकवर्गणी जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदसुद्धा झालेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरचे बळ ‘कोराडी’ला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर येथे दोन वर्षांपासून तयार होऊन धूळखात पडलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पाकडे दुर्लक्ष करुन विदर्भातील कोराडी (नागपूर) येथे नव्याने ८ हजार ४०७ कोटी रुपये खर्चाचा १३२० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दत्तक घेतल्याचे जाहीर करूनही नाशिकमध्ये उद्योग वाढीस चालना देणारी प्रत्येक संधी नाशिककरांच्या हातून हिसकावून घेण्याची नेहमीची चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा एकदा खेळली गेल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यावर नाशिककरांच्या अपेक्षांना धुमारे फुटले होते. मात्र, नाशिककरांच्या अपेक्षा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच फोल ठरवल्या आहेत. राज्यात यापुढे नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारावयाचा झाल्यास तो नाशिकलाच उभारला जाईल, असे आश्वासन एकलहरे वीज निर्मिती प्रश्नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिककरांना दिले होते. परंतु, त्यानंतर ६६० मेगावॅटचा नवीन वीज प्रकल्प भुसावळ येथे सुरू करून नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता सिन्नर येथे रतन इंडिया लिमिटेड या कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प दोन वर्षांपासून तयार होऊन धूळखात पडलेला असताना राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे मार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाची समस्या सोडवून सहकार्य करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सिन्नरच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून ३००० कोटी रुपयांचा निधी यापूर्वी देण्यात आलेला होता. सिन्नर प्रकल्पात राज्य शासनानेच मोठी गुंतवणूक केलेली असतानाही या प्रकल्पाला चालना देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरजवळील कोराडी येथे १३२० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी तब्बल ८ हजार ४०७ कोटी रुपयांचा निधी चालु अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या दत्तक नाशिकवर अन्याय चालविला आहे, अशी चर्चा आता झडू लागली आहे.

सिन्नरपेक्षा कोराडी अव्यवहार्य का?

कोळसा आणि इतर कच्चा माल वाहतुकीचा खर्च वाढून वीज उत्पादनाचा खर्च वाढतो म्हणून सिन्नर ऐवजी ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी कोराडीची निवड करण्यात आली. कोराडी कोळसा क्षेत्राच्या वेशीवर असले तरी प्रत्यक्षात कोराडीला महाराष्ट्रातून नव्हे; तर शेजारच्या छत्तीसगडमधून कोळसा पुरवला जातो. याशिवाय कोणत्याही वीज निर्मिती प्रकल्पाला पाण्याची मोठी गरज भासते. मध्य प्रदेशमध्ये चराई धरण झाल्यापासून महाराष्ट्रातील तोतलाडोह धरण एकदाही निम्मे देखील भरलेले नाही. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या आरक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. प्रस्तावित कोराडी प्रकल्पाला नागपूर मनपाकडूनही पाण्याचा पुरेसा पुरवठा शक्य नाही. याशिवाय, अशा प्रकारचा वीज प्रकल्प उभारण्याच्या ठिकाणापासून ५० किलोमीटर त्रिज्येच्या अंतरावर ३० लाखापर्यंतच्या लोकसंख्येचे शहर असता कामा नये. सिन्नर प्रकल्पासाठी कोळसा वाहतुकीचा खर्च वाढणार असला तरी वीज वहनाचा खर्च आणि वीज गळतीत मोठी बचत होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव शहरात पावसाची हजेरी

$
0
0

मालेगाव : जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मालेगावात पावसाची चिन्हे दिसत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी सायंकाळी शहर परिसरात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास शहर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपच्या सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनाने शहरवासीयांना दिलासा मिळाला. सुट्टीचा दिवस असल्याने बच्चेकंपनीने पावसात भिजण्याची मज्जा घेतली. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शहरासह दाभाडी परिसरात देखील पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलास अटक; खुनाचा संशय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

‘आई गावाला गेली आहे, बहिणीकडे गेली आहे’, अशी उडवाउडवीचे उत्तरे देत आईचा मृतदेह घरात दडवून ठेवणाऱ्या संशयित मुलास येवला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. राजेंद्र कांतीलाल गुजर (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याच्या थोरल्या भावाच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मौजमजेसाठी आईने पैसे न दिल्यामुळे राजेंद्रनेच जन्मदात्री आईला ठार मारले, असा आरोप त्याचा भाऊ संदीप गुजर याने केला आहे.

बुंदेलपुरा भागातील लिलाबाई कांतीलाल गुजर (वय ७०) ही महिला धाकला मुलगा राजू ऊर्फ राजेंद्र कांतीलाल गुजर यांच्याकडे राहत होती. कामधंदा न करणारा राजू सतत आई तसेच बाजूलाच राहणाऱ्या थोरला भाऊ संदीपकडे मौजमजेसाठी पैसे मागत असे. गुरुवारपासून आई न दिसल्याने संदीपने राजेंद्रस विचारणा केली. त्यावर त्याने आई बहिणीकडे, तर कधी जवळच्याच गुजरवाड्यात गेल्याचे सांगितले. संदीपने पत्नी रोहिणीस राजूकडे आईचा शोध घेण्यासाठी पाठवले असता, राजूने खिडकीतूनच ‘आई घरी नाही, ती तिकडे गेली आहे’, असे उत्तर दिले. संशय आल्याने संदीपने शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास राजेंद्रच्या घरात प्रवेश करून शोध घेतला असता अंधाऱ्या खोलीत त्याला आईचा मृतदेह दिसला. चादरीखाली झाकून ठेवलेल्या मृतदेहाशेजारी राजू बसलेला होता. त्यानंतर संदीपने थेट येवला शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी राजूस ताब्यात घेतले. रविवारी येवला ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लिलाबाईंचा मृत्यू ५५ तासांपूर्वी झाला असल्याची माहिती येवला ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी राजून घरात अगरबत्त्या लावलेल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची विक्री करून अत्याचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

वडाळागाव येथील नवविवाहितेचे तिच्या मामीच्या मदतीनेच अपहरण करून लग्नासाठी दीड लाख रुपयांना विक्री करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे राजस्थान येथील तरुणासोबत लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी ती वडाळा येथील आपल्या माहेरी आलेली होती. माहेरी आल्यानंतर ती तिच्या मामाच्या घरी गेली. या वेळी शाहरुख उर्फ चेत्या याच्याशी तिची ओळख झाली. मामीने तिला अजमेरला दर्शनास जाऊ, असे सांगत ही गोष्ट कोणालाही सांगू नको, असेही सांगितले. दुसऱ्या दिवशी चेत्या व त्यासोबत राणी नामक महिलेने पीडितेला खासगी बसने राजस्थानातील जावरा या गावी नेले. तेथे तिला तीन दिवस एका खोलीमध्ये कोंडून चेत्याने जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर दहा जूनला काही लोक आले. त्यांच्याकडून चेत्या व राणी यांनी दीड लाख रुपये घेत त्यातील हेमंत धाकड याच्याशी पीडितेचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. यानंतर आठवडाभर धाकड याने पीडितेवर अत्याचार केले. यानंतर पीडितेने संधी साधून घरच्यांशी संपर्क करीत सदर प्रकार सांगितला. पोलिसांच्या मदतीने पीडितेची सुटका करण्यात आली. चेत्या उर्फ शाहरुख शेख, हेमंत धाकड, राणी शाह व पीडितेच्या मामीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मामीला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये हाडाचा सापळा सापडल्यानं खळबळ

$
0
0

नाशिक:

नाशिकमधील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत मानवी हाडांचे सापळे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. डोक्याची कवटी आणि दोन पायांचे भाग इथं वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. कुणा अज्ञात पुरुषाचा हा मृतदेह असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमधील पेठ रोडवर आरटीओ कार्यालय आहे. या परिसरातील म्हसरूळ पोलीस ठाणे व आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान मोकळी जागा आहे. इथंच मानवी सापळा आढळला आहे. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
69925135


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथूट फायनान्स दरोडा: सू्त्रधार अटकेत

$
0
0

नाशिक

मुथूट फायनान्सच्या कार्यालयात पडलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १० दिवसांच्या आत ही कारवाई केली आहे. या कारवाईत जितेंद्र विजय बहादूर सिंह या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

या दरोड्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ जणांनी तुरुंगातच मुथूट फायनान्स कार्यालयातील या दरोड्याचा कट रचला. पैकी सूत्रधारास अटक झाली असून इतर ५ आरोपी फरार झाले आहेत. सहा आरोपींपैक एक संशयित आरोपी आहे. तो पश्चिम बंगालमधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. या आरोपींपैकी ३ आरोपींची रामपूर येथे, तर इतर ३ आरोपी सुरतमध्ये भेट झाली. या आरोपींनी नाशिकमध्ये ५ ते ६ वेळा रेकी केली. मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोड्यादरम्यान, परमिंदर सिंह याने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, फरार आरोपींना पाताळातून शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईचा मृतदेह ठेवला तीन दिवस घरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

‘आई गावाला गेली आहे, बहिणीकडे गेली आहे’, अशी उडवाउडवीचे उत्तरे देत आईचा मृतदेह घरात दडवून ठेवणाऱ्या संशयित मुलास येवला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. राजेंद्र कांतीलाल गुजर (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याच्या थोरल्या भावाच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मौजमजेसाठी आईने पैसे न दिल्यामुळे राजेंद्रनेच जन्मदात्री आईला ठार मारले, असा आरोप त्याचा भाऊ संदीप गुजर याने केला आहे.

बुंदेलपुरा भागातील लिलाबाई कांतीलाल गुजर (वय ७०) ही महिला धाकला मुलगा राजू ऊर्फ राजेंद्र कांतीलाल गुजर यांच्याकडे राहत होती. कामधंदा न करणारा राजू सतत आई तसेच बाजूलाच राहणाऱ्या थोरला भाऊ संदीपकडे मौजमजेसाठी पैसे मागत असे. गुरुवारपासून आई न दिसल्याने संदीपने राजेंद्रस विचारणा केली. त्यावर त्याने आई बहिणीकडे, तर कधी जवळच्याच गुजरवाड्यात गेल्याचे सांगितले. संदीपने पत्नी रोहिणीस राजूकडे आईचा शोध घेण्यासाठी पाठवले असता, राजूने खिडकीतूनच ‘आई घरी नाही, ती तिकडे गेली आहे’, असे उत्तर दिले.

संशय आल्याने संदीपने शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास राजेंद्रच्या घरात प्रवेश करून शोध घेतला असता अंधाऱ्या खोलीत त्याला आईचा मृतदेह दिसला. चादरीखाली झाकून ठेवलेल्या मृतदेहाशेजारी राजू बसलेला होता. त्यानंतर संदीपने थेट येवला शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी राजूस ताब्यात घेतले. रविवारी येवला ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लिलाबाईंचा मृत्यू ५५ तासांपूर्वी झाला असल्याची माहिती येवला ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी राजून घरात अगरबत्त्या लावलेल्या होत्या.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मुलांनी गळा काढला, की आई एकतर त्यांच्याहाती मोबाइल, गॅझेट देतात नाही तर टिव्हीपुढे आणून बसवतात. स्मार्टफोनवर मुलांचा 'स्क्रिन टाइम' त्यामुळे वाढत आहे. खरे तर ही कौतुकाची गोष्ट नसून पालकांच्या या कृतीमळे मुलांमधील एकाग्रता, संभाषण कौशल्य कमी होत आहे. इतकेच नाही तर त्यांच्यातील निरागसतेची जागा आक्रमकता, उताविळपणा, उत्तेजनाने घेतली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांपुढे वागताना स्वत:च्या सवयींना आवर घातला पाहिजे, असा कळकळीचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी शनिवारी येथे दिला.
विद्यमान परिस्थितीत कौटुंबिक मानसिक आरोग्य या विषयावर डॉक्टरांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या संघटनेतर्फे दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात बालकांचे मानसिक आरोग्य या विषयाची डॉ. शुक्ल यांनी उकल केली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक किरपेकर, डॉ. गौतम शहा, डॉ. एन. जे. सावजी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुलांमधील गॅझेट, मोबाइलचे व्यसन दारूपेक्षा अधिक वाईट आहे, असे सुरुवातीलाच नमूद करीत डॉ. शुक्ल म्हणाले, शहरातील बहुतांश चौकोनी कुटुंबात आज हेच चित्र पहायला मिळते. घरातले मुल मोबाइल, टिव्ही, संगणकाच्या स्क्रिनसमोर तासंतास बसल्याशिवाय जेवतदेखील नाहीत. शाळेत जाण्याआधी मुलेही मोबाइलवर एखादा गेम निष्णातपणे खेळत असेल तर पालक त्याचे कौतुक करतात. लहान मुलांनादेखील हे फोन सहज हाताळता येणे यात मुलांचे नसून मोबाइल बनविणाऱ्या कंपनीचे कौतुक आहे. मुळात 'स्क्रीन टायमिंग'च्या बाबतीत पालकांनी स्वत:पासून सुरुवात करायला हवी. त्यामुळे शाळकरी मुलांच्या हाती दहावीपर्यंत मोबाइलच असता कामा नये.
डॉ. भावे म्हणाले, पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बाबतीत मोबाइल अधिक घातक ठरत आहे. भवतालच्या वास्तववादी जगापेक्षा मुलांना आभासी जग खरे वाटू लागले आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या स्टेट्सवर जर कोणी प्रतिक्रिया दिली नाही तर मुले अस्वस्थ होतात. नको त्या गोष्टी हाताळायला मिळत असल्याने तारुण्यात प्रवेश करण्या आधीच अशी मुले नसलेल्या जगाची कल्पना करतात. प्रत्यक्षात जेव्हा नात्यांमध्ये गुंतल्यानंतर वास्तवाचा सामना करतात अशा वेळी त्यांचा भ्रमनिरास होऊन नैराश्याच्या आहारी जाण्याचा धोका वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूचे पुन्हा संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिनाभरापूर्वी शहरातून हद्दपार झालेला स्वाइन फ्लू पावसाळा सुरू होताच पुन्हा परतण्याची भीती आहे. नैताळे (ता. निफाड) येथील दोन स्वाइन फ्लूचे रुग्ण नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

गेल्या चार पाच वर्षांपासून स्वाइन फ्लू नाशिकची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५० च्यावर जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे स्वाइन फ्लूची मोठी डोकेदु:खी वाढली होती. दरवर्षी उन्हाळा लागला, की स्वाइन फ्लू जात असे. परंतु, यंदा मे महिन्यापर्यंत रुग्ण आढळून आले होते. गेल्या महिन्यात १५ तारखेपासून स्वाइन फ्लू मात्र हद्दपार झाला होता. परंतु, पावसाळा सुरू होताच पुन्हा स्वाइन फ्लूचे आगमन झाले आहे. प्रथम ग्रामीण भागात आगमन केले आहे. अशातच नैताळे येथील दोन रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित असल्यामुळे नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. त्यामुळे शहरातही स्वाइन फ्लू पुन्हा परतण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत कोटींची उड्डाणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांची लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी तब्बल पावणेचार कोटींचा चुराडा केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात दोन कोटी आठ लाख रुपये, तर दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांनी एक कोटी ५६ लाख रुपये खर्च केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सर्वाधिक ६७ लाख, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांनी ५३ लाख ८३ हजार ८५२ रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी करून निवडणूक निरीक्षकांनी याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवारांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले होते. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीत ६७ लाख ९० हजार ७०१ रुपये इतका खर्च केल्याची माहिती दिली आहे. त्याखालोखाल अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी ५९ लाख ८९ हजार ५७१ रुपये तर राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी ५६ लाख ४० हजार ५०० रुपये खर्च केल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी १६ लाख ५४ हजार ४८४ रूपये इतका खर्च झाल्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांनी ५३ लाख ८३ हजार ८५२ खर्च केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी ४७ लाख ४९ हजार ४७८ रुपये खर्च केले आहेत. माकपचे जीवा पांडू गावित यांनी ३१ लाख ३१ हजार ६६२ रुपये तर अपक्ष उमेदवार टी. के. बागूल यांनी १७ लाख ९ हजार ३४० रुपये निवडणुकीत खर्च झाल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे. या दोन्ही मतदार संघांमध्ये मिळून ३ कोटी ६५ लाख २ हजार ८१ रुपये खर्च केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकल्याण राजा जागवणार जाज्ज्वल्य इतिहास

$
0
0

३० जूनला व्हा सुवर्णक्षणांचे साक्षीदार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज, दस्तुरखुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्फूर्तिदायी निवेदन आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरांत पोहोचलेले 'शिवकल्याण राजा'चे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त कल्चर क्लबतर्फे येत्या ३० जून रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

चाळीस वर्षांपूर्वी 'शिवकल्याण राजा'ची निर्मिती झाली. 'गुणी बाळ असा', 'आनंद वनभुवनी', 'म्यानातून उसळे तलवारीची पात', 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' आणि 'सरणार कधी रण' यांसारख्या गाण्यांची आठवण झाली की शिवकाल पुन्हा मनामनांत जागा होतो. शिवकाल म्हटले की शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांनी परकियांशी दिलेले लढे, मावळ्यांची साथ आणि त्यातून उभे राहिलेले स्वराज्य मग आपसूकच नजरेसमोर येते. शिवाजी महाराजांच्या या साऱ्या पराक्रमास 'शिवकल्याण राजा' या खास कार्यक्रमामुळे पुन्हा उजाळा मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ वाणीतून उभा राहणारा जाज्ज्वल्य इतिहास आणि प्रतिभावंत संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची साथ, या दोहोंकडून उभा राहणारा शिवकाल अनुभवणे ही मोठी पर्वणी असेल, हे नक्की!

..

कार्यक्रमाचे मिळवा पासेस

नव्याने कल्चर क्लब मेंबर व्हा आणि या कार्यक्रमाचे दोन पासेस मिळवा. अधिक माहितीसाठी ९४२२५१३५६९ या मोबाइल क्रमांकावर (मंगळवार ते शनिवार दुपारी १ ते ६) किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे संपर्क साधावा.

...

२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब'चे सदस्य

ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तच सोशल मीडियापीडित

$
0
0

सतरा फेसबुक पेजेस केली बंद

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल कॅमेऱ्यातील फ्लॅशमुळे झालेला स्फोट असो, की यूपीएसएसी परीक्षेतील अवघड प्रश्न असे बरेच काही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येते. याबाबतची खात्री पटावी, यासाठी खाली एखाद्या व्यक्तीचे नाव चिकटविण्यास नेटिझन्स विसरत नाही. सध्या अशाच जाचाला शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना समोरे जावे लागत आहे. यास वैतागून नुकतेच त्यांनी त्यांच्या नावे सुरू असलेली १७ फेसबुक पेजेस शोधून सायबर पोलिसांच्या मदतीने ती बंद केली आहेत. .

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर यासारख्या सोशल मीडियापासून दूर राहिलेला नागरिक शोधून सापडणार नाही. किंबहुना या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकांच्या विचार क्षमतेवरसुद्धा परिणाम झाल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा भडीमार करण्यात येत असतो. बहुतांशवेळा ही माहिती मोडून तोडून मांडलेली किंवा तर्कावर आधारितच नसते. खोटी माहिती अथवा अतर्क विषय मांडताना अनेकदा कोणातरी व्यक्तीचा खुबीने वापर करण्यात येतो. यात सर्वात वर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे नाव आहे. नांगरे पाटील यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. नांगरे पाटील उत्तम वक्ते असून, यूपीएसएसी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या युवकांना ते मार्गदर्शनसुद्धा करीत असतात. पोलिस आयुक्तांच्या या कामाचा वापर नेटिझन्स खुबीने करतात. त्यांच्या नावाने बनावट मेसेजेस पाठविले जातात. दुसरीकडे त्यांच्या नावाने अनेक फेसबुक पेजेससुद्धा सुरू करण्यात आली आहेत.

...

मीच सोशल मीडियापासून पीडित

नाशिकमध्ये आल्यापासून या विषयाबाबत अनेकदा माझ्याकडे विचारणा करण्यात आली. मी स्वत: सोशल मीडियाचा वापर फारच कमी विशेषत: कार्यालयीन कामासाठीच करतो. फेसबुकवर माझे अकाउंट नसून, त्याबाबतची माहिती ठेवत नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती घेण्याविषयी सायबर पोलिसांना सांगितले. सायबर पोलिसांनी तब्बल १७ पेजेस शोधली. ही पेजेस माझ्या नावाने असल्याने ती सर्व हटवली आहेत. नागरिकांनी कोणत्याही मेसेजेसबाबत खात्री करावी, असे आवाहनदेखील नांगरे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मीच सोशल मीडियाचा पीडित आहे, हे व्यक्त केलेले मत खूप काही सांगून जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांवर सॅम्युअल पडला होता भारी

$
0
0

मुथूट दरोडा प्रकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयटी इंजिनीअर सजू सॅम्युअल एकटाच लढला! दरोडेखोरांनी त्याच्या दिशेने बंदुकीतून पाच ते सहा गोळ्या झाडण्यापूर्वी सॅम्युअलने किमान तीन दरोडेखोरांना आस्मान दाखवले होते. सॅम्युअलने दाखविलेल्या विरोधामुळे एक क्षण दरोडेखोरसुद्धा माघारी फिरण्याच्या विचारापर्यंत पोहोचले होते; पण पाच महिन्यांपासून केलेल्या तयारीवर एका व्यक्तीमुळे पाणी फिरण्याची चिन्हे तयार झाल्याने दरोडेखोरांनी सॅम्युअलची हत्याच केली.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयात १४ जून रोजी सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. कार्यालयात घुसलेले दरोडेखोर साधारणत: चार मिनिटे कार्यालयात होते. या वेळेत त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयात उपस्थित कर्मचारी व ग्राहकांचे मोबाइल जमा केले, तर दुसरीकडे सर्वांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू केली. या वेळी सॅम्युअलच्या दिशेने आलेल्या दोन जणांना सॅम्युअलने अटकाव केला. सॅम्युअलने आक्रमक होत दोघांवर हल्ला चढवला. सॅम्युअलच्या आक्रमकतेपुढे दरोडेखोरांचे चालेना. या वेळी दोन जण व्यवस्थापकाला मारहाण करताना सॅम्युअलने पाहिले. तो लागलीच त्यांच्या दिशेने धावला. व्यवस्थापकाला वाचविताना त्याने दरोडेखोरांना मारहाण केली. याच दरम्यान सॅम्युअलने अलार्म बटणसुद्धा दाबले. यामुळे भांबावलेल्या दरोडेखोरांनी सॅम्युअलवर अगदी जवळून सहा राउंड फायर केले. सॅम्युअल कोसळल्यानंतर दरोडेखोर बाहेर पळाले.

रावेर कनेक्शन?

मुथूट दरोड्याचे धागेदोरे उकलण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. मुथूट दरोड्यानंतर अवघ्या चार दिवसांच्या अंतराने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बँक ऑफ बडोदा (विजया बँक) येथे दरोड्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी आरोपींनी बँक व्यवस्थापकाची बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केली होती. यातील एका आरोपीची देहयष्टी व आक्रमकपणा मुथूट दरोड्यातील आरोपीशी मिळताजुळता होता. त्यामुळे नाशिक पोलिस त्या दृष्टीने तपास करणार आहेत. याबाबत जळगाव पोलिसांना कल्पना देण्यात आली असून, येथील एक पथक लवकरच आरोपीकडे चौकशी करणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images