Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जश्न-ए-उरुसचा बहर

$
0
0

संदल कार्यक्रमाने आज सायंकाळी सांगता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'शहेनशाह नाशिक' म्हणून प्रसिद्ध असलेले हुसेनी बाबा (बडी दर्गाह) यांचा वार्षिक यात्रोत्सव (उरूस) १२ जूनपासून सुरु झाला असून रविवारी (२३ जून) रोजी उरुसची सांगता होणार आहे. यंदा उरुसचे ३९० वे वर्ष असून त्यानिमित्ताने जिल्हाभरातून भाविक हुसेनी बाबा यांच्या दर्शनासाठी येत आहेत. आकर्षक रोषणाईसह विविध अन्न पदार्थांच्या स्टॉल्सने परिसर नटला आहे. यानिमित्ताने 'जश्न-ए-उरूस'चा बहर परिसरात दिसून येत आहे.

उरुसच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजेच, १२ जून रोजी सर्वप्रथम बाबांच्या मजारशरीफवर भद्रकाली पोलिस ठाण्याकडून मिरवणुकीद्वारे आणलेली चादर डफली वादनाच्या निनादात चढविण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा असून पहिली चादर चढविण्याचा मान परिसराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस प्रशासनाला विश्वस्त मंडळाकडून दिला जात आहे. परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. फालुदा, हलवा पराठा, बिर्यानी, खिचडा, आइस्क्रिम, शिक कबाब, कौला, पान या खाद्यपदार्थांना अधिक मागणी आहे. दिवसाकाठी हजारो रुपयांची उलाढाल होत असून जिल्हाभरातून हजारो नागरिक रोज चादर चढविण्यासाठी येत आहेत. उरुसनिमित्ताने सायंकाळी सहा वाजता कुराण पठण करण्यात येणार असून साडेसहा वाजता दुवा पठण केले जात आहे. या उरुसाची रविवारी (दि. २३) सायंकाळी संदलच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे.

कोंडी टाळण्यासाठी रस्ते बंद

बडी दर्गाच्या बाहेर गुलाबपुष्पसह चादर व मिठाई विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. भाविकांची शनिवारी देखील सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. सांगतेच्या दिवशी भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेत चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बडी दर्गाहकडे जाणारे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपली सुख-दुःखे बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींना व युतीला मते दिली, त्या मायबाप शेतकऱ्यांना शिवसेना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नांदगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आम्ही गावागावात मदत केंद्रे उभी केली असून, येत्या आठ-पंधरा दिवसांत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर त्यांची दुकाने बंद करून टाकू. युतीचा राग आळवताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस आणि आमचं आता जमलंय. संघर्ष थांबलाय. कोणाला कशी सत्ता, कोणाचा मुख्यमंत्री, हेदेखील आता ठरलंय. त्यामुळे आमच्या मैत्रीत कोणी आता नाक खुपसू नये, असे सांगतानाच आमचे व तुमचे नाते ओलाव्याचे आहे, आपुलकीचे आहे. ही आपुलकी वाढवा. विधानसभेत भगव्याच्या पाठीशी एकजुटीने उभे राहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. तुमचे प्रश्न व तुम्हाला घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे जाईल. तिथे न्याय मिळाला नाही तर पंतप्रधान मोदींकडे जाईल, असे ठाकरे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मिलिंद नार्वेकर, रवींद्र मिर्लेकर, खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, नगराध्यक्ष राजेश कवडे, पद्मावती धात्रक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

तालुक्यात धरणे आहेत. पण पाणी डोळ्यांना दिसते, पण जळगावला जाते. प्यायला मिळत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नार-पार, दमणगंगामध्ये नांदगावचा समावेश करा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. करंजवण योजनेची ४५ कोटी रुपयांची लोकवर्गणी मनमाड नगरपालिकेला भरायची आहे. पक्षनेते उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करून तेल कंपन्यांना निधी देण्यास सांगावे, अशी मागणी करून सुहास कांदे यांनी पाणी प्रश्नाकडे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले.

पुढचा आमदार शिवसेनेचाच

नांदगावमधील पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. विधानसभेची नांदगावची जागा शिवसेनेकडेच राहील, यावर त्यांच्यासह खासदार संजय राऊत यांनीही आपल्या भाषणातून शिक्कामोर्तब केले. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच नांदगावमध्ये पाऊस आला. यावेळी संजय राऊत यांनी उद्धवजी जिथे जातात, तिथे पाऊस घेऊन जातात असे म्हणताच टाळ्यांचा गजर झाला. आत्महत्याग्रस्त ३९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कांदे यांच्या वतीने

औषध फवारणी पंप, बियाणे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडुळ जातीचा साप वनविभागाकडे सुपूर्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा. पंचवटी

नांदूर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरून जाणारा मांडूळ जातीचा साप पकडून अगोदर पोलिसांच्या आणि नंतर वन विभागाच्या ताब्यात दिला.

नांदूर शिवाराच्या मळे परिसरातील रस्त्यावर जात असलेल्या मांडूळ जातीचा साप येथील नागरिकांना बघितला. वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून जाणारा हा साप वाहनाखाली चिरडून नये म्हणून त्याला पकडून आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आणला. तेथे वनविभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा साप त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दिलीप निमसे, देव पारसकर, संकेत पाटील, मयूर निमसे यांनी हा मांडूळ साप आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या उपस्थितीत वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्याकडे देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएच्या ज्ञानकुंभात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय 'ज्ञानकुंभ' अधिवेशनाचे समारोप शनिवारी झाला. या दोन दिवसात विविध तज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन करत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. सीए असोसिएशनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी या परिषदेला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.

सीए इन्स्टिट्यूटच्या नाशिक, औरंगाबाद, जळगाव व धुळे येथील शाखा यांच्यातर्फे मनोहर गार्डन येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, औरंगाबाद आणि परिसरातील ४०० पेक्षा अधिक सीए सहभागी झाले. नोटाबंदी संबंधित आयकर कायद्यातील चालू झालेल्या स्क्रुटिनी, असेसमेंट, जीएसटीच्या वार्षिक रिटर्न व ऑडिट, स्थावर मिळकतीवर लागू झालेल्या रेरा, आयकर आणि जीएसटीच्या तरतुदी इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या सत्रात मुंबईचे सीए जयेश कारिया यांनी रेरा नोंदणी व इतर तरतुदींविषयी माहिती दिली. तिसऱ्या सत्रात विक्री व सेवा करावर चर्चासत्र झाले. यात सीए राजीव लुथिया, सीए विक्रम मेहता, सीए प्रणव कपाडिया यांनी विक्री व सेवा कराशी निगडित सीए सदस्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय अध्यक्ष सीए प्रफ्फुल्ल छाजेड यांनी नाशिक भेटी दरम्यान सीए विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सीएच्या अभ्यासक्रम हा जगातील सर्वोकृष्ट अभ्यासक्रम असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सीएच्या परीक्षा व निकाल पारदर्शी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अधिवेशनास पश्चिम विभागाच्या अध्यक्षा प्रीती सावला यांची उपस्थिती होती. अधिवेशनाचे यशस्वी आयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्षल सुराणा, रोहन आंधळे, राजेंद्र शेटे धुळ्याचे अध्यक्ष राजाराम कुलकर्णी, जळगावच्या अध्यक्षा स्मिता बाफना आणि औरंगाबादचे अध्यक्ष रोहन आचलिया यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाविरोधात वीज कामगारांची सभा

$
0
0

खासगीकरणाविरोधात

वीज कामगारांची सभा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरण कंपनीने मालेगाव व मुंब्रा येथे केलेले खासगीकरण रद्द करावे या मागणीसाठी वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे नाशिकरोड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर नुकतीच द्वारसभा झाली.

यावेळी महाराष्ट्र स्टेट वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, सब आर्डिनेट इंजिनीअर असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, म. रा. वी. तांत्रिक कामगार युनियन, इंटक या संघटनांचे व्ही. डी. धनवटे, विशाल निंबाळकर, एल. व्ही. बेलदार, सतीश पाटील, मधुकर जाधव, राजेश नागपुरे, दत्ता चौधरी, बाळासाहेब गोसावी, महेश पाचपांडे, तुषार जाधव, पंडित डोळस, भास्कर लांडगे, सुरेश उगले आदी उपस्थित होते.

वीज महावितरण कंपनीने ठाणे मंडळांतर्गत मुंब्रा, शिळ व कळवा उपविभाग तसेच मालेगाव शहर व ग्रामीण विभागातील सर्व शहर उपविभागातील विद्युत वितरण एक जूनपासून फ्रेंचाईज तत्त्वावर टोरेंट पॉवर लिमिटेड व कोलकता इलेक्टिर कंपनीस हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लेखी करार केला आहे. तसेच सर्वेक्षण सुरू आहे. वीज वितरण फ्रेंचाईज देण्यास कामगार संघटना, वीज ग्राहक, सामाजिक व राजकीय संघटनाचा तीव्र विरोध आहे. कामगारांनी खासगीकरणा विरोधात लाक्षणिक संप केला होता. औरंगाबाद, नागपूर, जळगाव येथे फ्रेंचाईज तत्त्वावर खासगीकरण केले होते. परंतु, महावितरण कंपनीकडे पुन्हा वर्ग करण्याची नामुष्की सरकार व महावितरणवर आली होती. आता पुन्हा खासगीकरणाचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न कामगार नेत्यांनी द्वारसभेत उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड विद्यापीठात वाघ यांची बालकविता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २०१९ च्या अभ्यासक्रमात येथील रहिवाशी व बालसाहित्यिक संजय वाघ यांच्या बालकवितेचा समावेश करण्यात आला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाची नव्याने रचना करण्यात आली. त्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९ पासून बी. ए. मराठीच्या प्रथम वर्षाच्या 'आधुनिक मराठी कविता' या पुस्तकात वाघ यांची कविता समाविष्ट करण्यात आली आहे. वाघ यांच्या बहुचर्चित 'गाव मामाचं हरवलं' या बालकविता संग्रहातून 'झाडबाबा' या कवितेला अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जळगाव येथील तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वाघ यांच्या 'डॉ. श्रीपाल सबनीस प्रणित प्रतिभा संगम' या ग्रंथाचा एम. ए. द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश झालेला आहे. त्यांनी आजवर '२६/११चे अमर हुतात्मे', 'डॉ. श्रीपाल सबनीस प्रणित प्रतिभा संगम', 'गंध माणसांचा' व 'जोकर बनला किंगमेकर' या पुस्तकांचे लेखन केलेले आहे.

संजय वाघ यांना आतापर्यंत सावानाचा लक्ष्मीबाई टिळक राज्यस्तरीय बाल वाङ्मय पुरस्कार, कविवर्य विजयकुमार मिठे वाचनालयाचा स्व. माणिकराव जाधव स्मृती वाङमय पुरस्कार तसेच 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार, जळगाव येथील सूर्योदय साहित्य पुरस्कार, तापी-पूर्णा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार, मुंबई येथील पार्वतीबाई आव्हाड राज्यस्तरीय उत्कृष्ट बाल वाङ्मय यासह विविध पुरस्कार लाभलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूकबधिरांना मिळाला रोजगार

$
0
0

इनरव्हील क्लबच्या मदतीने पराठा विक्रीचा व्यवसाय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मूकबधिर तरुणांसाठी इनरव्हील क्लब ऑफ जेन-नेक्स्टतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे. संस्थेच्या मदतीने हे तरुण आता शहरात पराठा विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

शहरातील प्रत्येक घटकाला रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ जेन-नेस्ट ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने विविध सामाजिक उपक्रमातून तरुणांना रोजगारप्राप्त करून दिला आहे. या अंतर्गत शहरातील मूकबधिर तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, या हेतूने 'पराठा पॉइंट'ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून या तरुणांनी पराठा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना आर्थिक सहाय्य मिळू लागले आहे. यामुळे तरुणांचा आत्मविश्वास वाढला असून स्वावलंबनातून त्यांची आर्थिक अडचणही दूर झाली आहे. रोजगाराच्या प्रवाहात आल्याने या तरुणांच्या चेहऱ्यावरही समाधान जाणवू लागले आहे. त्यांचे समाधानाचे हास्य हीच त्यांच्या यशाची पावती असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी सांगितले.

कल्याणी पराठा पॉइंटची नुकतीच सुरुवात झाली असून यासाठी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. यावेळी क्लबचे सचिव सरोज दशपुते यांनी कल्याणी संस्थेच्या सुनीता मोडक यांचे आभार मानले. डॉ. मीनल पलोड, सोनल विजयवर्गीय, तृप्ती सोनी, शीतल देसाई यांनी या व्यवसायासाठी सहकार्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र


शेतकरी चिडला तर सत्तेची आसने जळून खाक होतील: उद्धव

$
0
0

ताराचंद म्हस्के, शिर्डी

आगामी मुख्यमंत्री आमचाच असेल असा दावा करणाऱ्या भाजपला शिवसेनेने चांगलेच सुनावले. मुख्यमंत्री कोणाचा होणार हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. पण शेतकरी चिडले तर सत्तेची आसने जळून खाक होतील अशा शब्दात त्यांनी सुनावले. यावेळी उद्धव यांनी शेतकऱ्यांची मते आपल्या बाजूने खेचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

शेतकऱ्याशी निगडीत असणारे पीक विमा केंद्र श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या वतीने उघडण्यात आले असून त्याचे उद्घाटन रविवारी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळीसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, संजय घाडी, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, डॉ.महेश क्षीरसागर, विजय काळे, सभापती दीपक पटारे, सेनेतर्फे श्रीरामपूर मधून निवडणूक लढवू पाहणारे खासदार लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन लोखंडे , सचिन बडधे, राजेंद्र देवकर, निखिल पवार, दादासाहेब कोकणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे,संकेत संचेती हे उपस्थित होते. नाशिकहून खास विमानाने उद्धव ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. तेथून ते मोटारीने तडक साई मंदिरात दर्शनास गेले. दर्शन आटोपून ते श्रीरामपूरच्या सभेला रवाना झाले. त्यांच्या समवेत मंत्री एकनाथ शिंदे होते.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्री यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. उद्धव म्हणाले, कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? शेतकऱ्यांनी हात उंचावून सांगावे असे आवाहन करताच शेतकऱ्यांनी नाही असे उत्तर ठासून सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करा. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना याची माहिती द्या, असे ठाकरे म्हणाले.शिवसेनेची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापि करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा सज्जड इशाराही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला दिला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार लोखंडे यांना सलग दुसऱ्यांदा विजयी केल्याने मी येथील मतदारांचा ऋणी आहे. सेनेचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी यांनी जनतेच्या दारापर्यंत जा आणि ज्यांनी सत्ता मिळवून दिली त्यांचे अश्रू पुसायला तत्पर राहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात ४०० टँकर सुरूच

$
0
0

नाशिक : जून महिना सरत आला तरी वरुणराजाने कृपावर्षाव न केल्याने जिल्हावासीयांना टँकरखाली ओंजळ धरावी लागते आहे. जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्याही ४०० झाली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास टँकर्सची मागणी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रशासनही धास्तावले आहे. यंदा डिसेंबरपासूनच नाशिककरांना दुष्काळाच्या दाहकतेचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यात ३०३ गावे आणि ९८५ वाड्या अशा १,२८८ ठिकाणी खासगी ३८० आणि सरकारी २० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

०००००००००००००००

यामध्ये नांदगाव तालुक्यात ३४ गावे आणि ३२७ वाड्या अशा ३६१ ठिकाणी ८३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सिन्नरमध्ये २६ गावे आणि ३१२ वाड्यांना ६८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. येवल्यात ६४ गावे आणि ४९ वाड्यांना ६३ टँकर्सद्वारे तर मालेगावात ४७ गावे आणि १०४ वाड्यांना ५८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. प्रत्येक ग्रामस्थाला गरजेपुरते पाणी मिळावे याकरीता प्रशासनाने टँकरच्या १ हजार ५५ फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात आजमितीस ८६४ फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

-

तालुका टंचाईग्रस्त गावे टँकर्स

बागलाण ५४ ३९

चांदवड ९७ २३

दिंडोरी १ १

देवळा ६४ १९

इगतपुरी ३१ १३

कळवण ० ०

मालेगाव १५१ ५८

नांदगाव ३६१ ८३

नाशिक ० ०

निफाड १ १

पेठ ९ ६

सुरगाणा ३६ १६

सिन्नर ३३८ ६८

त्र्यंबकेश्वर ३२ ८

येवला ११३ ६५

एकूण १२८८ ४००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणूक शांततेत, आज मतमोजणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या प्रभाग ६ क मध्ये रविवारी पोटनिवडणुकीसाठी किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचा सरळ लढत होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही पक्षांनी जोर लावला होता. सायंकाळी ४ पर्यंत २९ टक्के इतके मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी येथील महापालिकेच्या जुन्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. महिला राखीव असलेल्या या जागेवर काँग्रेस व जनता दल अशी सरळ लढत होती. काँग्रेसच्या पहमिदा कीरदौस मो.पारूक व जनता दलाच्या खान शकीला बेगम अमानुतुल्ल्ला या रिंगणात होत्या.

रविवारी सकाळी ७.३० पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. एकूण ३२ मतदान केंद्र यासाठी होते. पोटनिवडणूक असल्याने मतदारांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही. सकाळच्या सत्रात जेमतेम ५ ते ७ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर देखील हेच चित्र कायम राहिल्याने सायंकाळी ४ पर्यंत २९ टक्के पर्यंतच मतदान झाले होते. मतदानकेंद्र २५ आणि ३० वर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाने लगेच यंत्र बदलून दिल्याने संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाणाबरोबर काँग्रेसचे गुफ्तगू

$
0
0

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले असतानाच खासगी हॉस्पिटल्या उद्घाटनासाठी आलेले माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी गुप्तगू करत जिल्ह्याची स्थिती मांडली. यावेळी काहींनी आपल्या तिकिटासाठी लॉबिंगही केले. राष्ट्रवादी काँग्रसेची आघाडी, मतदार संघाचे वाटप, वंचित आघाडी यावरही कार्यकर्त्यांबरोबर चव्हाण यांनी चर्चा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी निश्चित असल्यामुळे विधानसभा मतदार संघात काही ठिकाणी बदल करण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे काँग्रसेच्या गोटात चिंता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी काँग्रसचे संघटन कमकुवत बनल्यामुळे ते सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे विषयही भेटीत चर्चिले गेले असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्यता नोंदणी अभियान

$
0
0

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानासाठी नाशिक महानगर सदस्यता नोंदणी संयोजक म्हणून नाशिक महानगर सरचिटणीस पवन भगूरकर तर सहसंयोजक म्हणून गिरीश पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तर महाराष्ट्र प्रदेशाचे संयोजक म्हणून प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी विधानसभा आणि त्यानंतर होवू घातलेल्या अन्य निवडणुका लक्षात घेऊन महानगरात सदस्य नोंदणी अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येईल, असे पवन भगूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात मुसळधार पाऊस

$
0
0

बळीराजाच्या आशा पल्लवित; कांदा, टोमॅटोचे नुकसान

म .टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या पावसाळ्यातील सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण 'मृग' नक्षत्राने शेतकऱ्यांसह सर्वांचीच घोर निराशा करताना, शनिवारी (दि.२२) प्रवेशकर्ते झालेल्या सूर्याचा 'आर्द्रा' नक्षत्रातील पावसाने येवला शहर व तालुक्यात विविध ठिकाणी रात्री साडेदहा वाजेनंतर पर्जन्य सरींची बरसात केली. हत्ती या वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते झालेल्या सूर्याचा 'आर्द्रा' नक्षत्रातील पावसाने येवला शहर परिसरासह तालुक्यातील अंदरसूल, जळगाव नेऊर, निमगाव मढ, चिचोंडी, रायते, बदापूर, पारेगाव, पुरणगाव, एरंडगाव, जळगाव नेऊर, भिंगारे, साताळी आदी ठिकाणी कुठे एक तास, तर कुठे दीड तास दमदार हजेरी लावली. तर, तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील राजापूर, नगरसूल, अनकाई, सावरगाव, पाटोदा आदी ठिकाणी अगदी तुरळक स्वरूपात पावसाच्या सरी पडल्या.

यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनचे आगमन होण्यास होत चाललेला मोठा उशीर अन् सुरुवातीच्या महत्वपूर्ण मृग नक्षत्राने दिलेला दगा यामुळे चिंतेत सापडलेल्या येवला तालुक्यातील बळीराजाला शनिवारी सुरू झालेल्या 'आर्द्रा' नक्षत्राने पर्जन्यसरींचे दान धीर देऊन गेले आहे. गेले दहा दिवस कोरडेठाक गेलेले असताना शनिवारी तालुक्यातील विविध ठिकाणी दमदार पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आसुसलेल्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शनिवारी रात्री साडेदहा वाजेनंतर विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पावसाने येवला शहर परिसर, तसेच तालुक्यातील अंदरसूल, जळगाव नेऊर, निमगाव मढ, चिचोंडी, साताळी, भिंगारे आदी अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी एक तास, तर काही ठिकाणी दीड तास पावसाच्या सरी बरसल्या. दमदार सरींमुळे निमगाव मढ, चिचोंडी आदी अनेक ठिकाणच्या शेतशिवारात पाणी साचले होते. बरोबरच काही ठिकाणचे छोटे नाले, बंधारे देखील वाहू लागले होते. पावसादरम्यान आकाशातील विजांचा मोठा कडकडाट सर्वांच्या उरात धडकी भरून गेला होता.

५४ मिलिमीटर पाऊस

शनिवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर सारख्या प्रमाणात न झाल्याने खरीप हंगाम पेरणीचा श्रीगणेशा होण्यासाठी अजून एक दोन दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे. तालुक्यातील येवला मंडळात सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अंदरसूल मंडळात ३२ व जळगाव नेऊर १९ मिलीमीटर असा पाऊस झाला आहे. नगरसूल, सावरगाव व पाटोदा या तीन मंडळात प्रत्येकी केवळ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

असे झाले नुकसान

निमगाव मढला कांदाचाळीत शिरले पाणी

पिंपळगाव जलाल गाय पाण्यात बुडून ठार

निमगाव मढला दोन शेळ्या मृत्युमुखी

निमगाव मढ-कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव रस्ता खचला

पिंपळगाव जलाल येथे गाय पाण्यात बुडला

टोमॅटो ड्रीपसह कांदा चाळीचे नुकसान

टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान झाले

जनावरांसाठीचा चारा पावसात भिजला

उन्हाळ कांदा पावसाने भिजला

भुजबळांकडून पाहणी

निमगाव मढ येथे शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत परिसरातील बंधारा देखील फुटला गेल्याने शेतकऱ्यांची घरे व शेतीसह जनावरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी या ठिकाणी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून संबंधितांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याच्या सूचना यावेळी आमदार भुजबळ यांनी प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. आमदार भुजबळ यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी देखील संवाद साधला.

ढगफुटीचा अंदाज?

प्रचंड मेघगर्जना, विजांचा मोठा कडकडाट अन् वादळी वारा या वातावरणात शनिवारी रात्री जणू काही ढगफुटी झाल्यागत येवला तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील निमगाव मढ, पिंपळगाव जलाल आदी भागात आर्द्रा नक्षत्रातील पर्जन्यधारा अगदी धोधो बरसल्या. जवळपास दीड ते दोन तासाच्या या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…संजीवनीवर तात्पुरती बंदी?

$
0
0

डोपिंग प्रकरणी आरोप निश्चिती

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव वर इंटरनॅशनल अॅथलेटिक्स फेडरेशनने डोपिंगचा आरोप निश्चित केला असून, तिच्यावर पुन्हा तात्पुरती बंदी येण्याची शक्यता आहे. मात्र या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी सांगितले आहे. तसेच, कायदेशीर लढाईद्वारे वकीलामार्फत दोन दिवसांत उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने स्थापन केलेल्या अॅथलेटिक्स इंटीग्रेटी युनिटने संजीवनीवरचे आरोप निश्चित केले आहे. मागील वर्षी एका स्पर्धेमध्ये संजीवनीची अॅन्टी डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. त्यात तिने बंदी असलेले द्रव्य घेतल्याचे आढळले होते. तिच्या शरिरात प्रोबेनेसिड हे द्रव्य आढळले होते. या द्रव्याच्या माध्यमातून युरिक अॅसिड व गुडघेदुखीवर उपचार केले जातात. एखादे द्रव्य घेतले आहे हे समजू नये यासाठीही हे द्रव्य वापरले जाते. याअगोदर अशीच तपासणी करण्यात आली होती. मात्र या द्रव्याची मात्रा कमी आढळली होती. त्यामुळे तिला फेडरेशनने खेळण्यास तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाल्याने वर्ल्ड अॅन्टी डोपिंग एजन्सी (वाडा) तसेच इंटरनॅशनल फेडरेशनकडून पुन्हा तपास करण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून संजीवनीला खेळण्याची परवानगी दिल्याने तिने अनेक स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवले आहे. यानंतर फेडरेशनने आयोजित केलेल्या दहा हजार मीटर शर्यतीत सजीवनीने सुवर्णपदक पटकावले होते. एप्रिलमध्ये दोहा, कतार येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. फेडरेशनच्या वतीने तिला समज देण्यात आली. मात्र हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने संजीवनीचे करियर धोक्यात येण्याची शक्यता क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या आरोपांमुळे तिला पुन्हा एकदा बाजू मांडावी लागणार आहे. संजीवनी सध्या महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत आहे.

…..

संजीवनीच्या शरिरात जे द्रव्य आढळले होते, त्याची मात्रा अत्यंत कमी होती. त्यामुळे वर्ल्ड अॅन्टी डोपिंग एजन्सी व इंटरनॅशनल फेडरेशनकडून तिला खेळण्याची परवानगी दिली होती. हा वाद पुन्हा उकरला जात असून आम्ही त्याला आमच्या वकिलामार्फत उत्तर देणार आहोत. येत्या काही दिवसात सत्य समोर येईल.

- विजेंद्र सिंग, संजीवनीचे प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप महिला आघाडीची शनिवार बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक २९ जूनपासून नाशिकच्या हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्व महिला खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्षा, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्या यांच्यासह ५०० हून अधिक महिला पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी दिली.

प्रदेश कार्यकारिणीच्या नियोजनासाठी वसंतस्मृती कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना माधवी नाईक बोलत होत्या. व्यासपीठावर महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अर्चना डेरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजपा महानगर अध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, खा. डॉ.भारती पवार, महापौर रंजना भानसी, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस संध्या कुलकर्णी, महानगर अध्यक्षा रोहिणी नायडू, जिल्हा ग्रामीण अध्यक्षा मंदा पारख, महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुजाता करजगीकर, भारती बागुल, पुष्पा शर्मा, हिमगौरी आडके, सोनल दगडे आदी होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व असून, त्यात निवडणुक रणनिती ठरण्याची शक्यता आहे. सुजाता करजगीकर, हिमगौरी आडके, स्मिता जोशी, प्रितम आढाव, दिपाली कुलकर्णी, शिल्पा पारनेरकर, अर्चना अहिरे आदींनी प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्यादृष्टीने उपयुक्त सूचना केल्या. बैठकीच्यानिमित्ताने विविध समित्या स्थापन करण्यात येणार असून, त्याला लवकरच अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा बहुमान नाशिकला मिळाल्याने नाशिकच्या महिला कार्यकत्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून, ही बैठक यशस्वी होईल, असा विश्वास संध्या कुलकर्णी व रोहिणी नायडू यांनी व्यक्त केला. बैठकीस नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मुखर्जी यांच्या जागवल्या आठवणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानदिनी भाजपा कार्यालयात बलिदान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. मुखर्जीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती जागवल्या.

भाजपचे मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच तेव्हाचा जनसंघ आणि आताची भारतीय जनता पार्टी उभी असून, त्यांच्यासारख्या नेत्यांच्या विचारांवर आपले काम सुरू आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाने आज देश एकसंघ आहे. बंगालसह काश्मीर वेगळा करण्याचा इंग्रजांचा कट होता. पण, मुखर्जी व पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी सुरुवातीला हिंदू महासभा व नंतर भारतीय जनसंघाच्या माध्यमातून कडाडून विरोध करत 'एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे' असा नारा देत आंदोलन उभे केले, असेही जोशी यांनी सांगितले.

३७० वे कलम व ३५ (अ) हे कलम रद्द करण्याचे आवाहन त्यावेळच्या सरकारला मुखर्जी यांनी केले होते. मुखर्जी यांनी पारपत्र न घेता सर्वात पहिल्यादा काश्मिरमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी त्यांना अटक झाली आणि तुरुगांत त्यांची हत्या करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.

या अभिवादन कार्यक्रमात स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, कार्यालयीन चिटणीस अरुण शेंदुर्णीकर, पुष्पा शर्मा, भारती बागुल, सुरज राठी, उदय रत्नपारखी, सोनल दगडे, विजय बनछोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे महानगर सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, उत्तम उगले, प्रकाश दीक्षित, नगरसेविका पुष्पा आव्हाड, सुजाता करजगीकरसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शिवम शिंपी यांनी गीत सादर केले, तर आभार प्रदर्शन तुषार देवरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने ३५ हजारांपार

$
0
0

नाशिक : दहा वर्षांनंतर सोन्याचे दर ३५ हजारांच्या पुढे गेले आहेत. पाच दिवसात तोळ्यामागे तब्बल हजार रुपयांची वाढ झाली आहे. जुलै महिन्यात लग्नाच्या तारखा असल्याने ग्राहकांना सोने खरेदी करणे आवश्यक असल्याने भाव वाढले असले, तरीही मागणी कायम असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. रविवारी सोन्याचे भाव तोळ्याला ३५ हजार १५० रुपयांवर पोहचले होते.

सविस्तर वृत्त...नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज वर्धापन दिन

$
0
0

आज वर्धापन दिन

नाशिक : सक्षम संस्थेचा वर्धापन दिन सोमवारी (दि. २४) दुपारी ३ वाजता साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा शंकराचार्य न्यास, जुना गंगापुर नाका, गंगापूररोड येथे साजरा होईल. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एएमटी ग्रुपचे संचालक निशिकांत अहिरे, नगरसेविका स्वाती भामरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग व्यक्तींच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष दिवाकर मुजुमदार, सचिव श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

पुस्तकांचे वितरण

नाशिक : गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु कॉलेजमध्ये प्राचार्य बापूराव खैरनार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत मिळणाऱ्या पुस्तकांचे वाटप केले. १० व १२ वी चा निकाल चांगला लागल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी पर्यवेक्षक टिकमदास बैरागी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी तर आभार ग्रंथपाल संजय पगारे यांनी मानले.

विनित हिरे जिल्ह्यात दुसरा

नाशिक : फेब्रुवारीत झालेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विनित धनंजय हिरे हा विद्यार्थी ८८.८१ टक्के गुण मिळवून सर्वसाधारण गटातून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहेत. गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक डी. एस. हिरे यांचा तो मुलगा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशागत झाली, पेरण्या खोळंबल्या

$
0
0

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात दमदार पावसाच्या प्रतीक्षा आहे. खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृगनक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावली तेव्हा उल्हासित मनाने खरिप हंगामाच्या तयारीस लागलेल्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. सध्याच्या हवामानातील बदलाने बळीराजाचा हिरमोड झाला आहे. मृगनक्षत्र संपण्यास अवघे दोन दिवस राहीले आहे. मात्र अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरणीपूर्व मशागत सुरू झाली आहे. सर्जा-राजाने पुन्हा एकदा बळीराजाच्या हाकेला साद दिली असली तरी पावसाने खो दिल्यामुळे या मशागतीच्या कामात विशेष जोश दिसून येत नाही. बाजारातून बियाण्यांचीही खरेदी झाली आहे. मात्र पावसाचा अंदाज येत नसल्याने पेरण्या थांबलेल्या आहेत. यावर्षी तालुक्यात सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र लागवडी आले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढ होईल, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी वर्तविला आहे. पेरणी हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून, आता केवळ पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस लांबल्याने पिण्याचे पाण्याच्या समस्या निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या अखेरिस तालुक्याच्या ९० टक्के पेक्षा अधिक गावांना पाण्याचे दर्भिक्ष जाणवत आहे. अर्थात या आठवड्याच्या अखेरिस पाऊस सुरू झाल्यास सर्व काही आलबेल होण्याची आशा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images