Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रस्ता रुंदीकरणाचे अधिकार आयुक्तांना

$
0
0

सहा व साडेसात मीटरवरील इमारतींचा सुटणार प्रश्न

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सहा व साडेसात मीटर रस्त्यांवरील इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी कलम २१० अंतर्गत रस्तारुंदीकरण करून त्या रस्त्यांना नऊ मीटर रुंदीचा दर्जा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या योजनेची मुदत ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. परंतु, स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने या प्रस्तावांना मान्यता देण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अधिकार आयुक्तांना देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. महासभेने मंजुरी दिल्यास छोट्या रस्त्यांवरील क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत होण्याची प्रक्रिया सुरू होऊन बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने सन २०१७ मध्ये जाहीर केलेल्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर हस्तांतरास बंदी घातली होती. नाशिकमध्ये सर्वाधिक प्लॉट सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर असल्याने त्यातच बांधकामातील कपाटांचा प्रश्‍न निर्माण झाल्याने मोठा फटका बसला होता. राज्य सरकारने त्यावर तोडगा काढत कलम २१० अन्वये सहा मीटर रुंदीच्या रस्त्यासन्मुख १.७५ व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यासन्मुख ०.७५ मीटरची पट्टी दोन्ही बाजून महापालिकेकडे वर्ग करून त्या रस्त्याला नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला दिले होते. त्यासाठी प्रक्रिया राबबून अंतिम निर्णय घेण्याची मुदत ३० जून २०१९ ही देण्यात आली होती. या मुदतीत ३८८६ प्रस्ताव दाखल होऊन सात-बारा उताऱ्यावर महापालिककडे रस्त्यासन्मुख जागेची पट्टी वर्ग करण्यात आली. अजूनही ४० टक्के प्रस्ताव पालिकेकडे येणे बाकी आहेत. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने याबाबतचे निर्णय घेण्याचे व जागा संपादित करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. महासभेने मंजुरी दिल्यास आयुक्तांकडून या प्रस्तावांना चालना दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्याच दिवशी तीन हजार अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीची प्रवेश प्रक्रिया मोठ्या घोळानंतर दुसऱ्या भागाकडे मार्गस्थ होताना शून्य फेरीच्या पहिल्याच दिवशी शहरातून तीन हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत २३ हजार जागांसाठी पहिल्या भागात २४ हजार ७९२ अर्ज आले आहेत.

अकरावीच्या प्रवेशाचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला. दीर्घकाळापासून या प्रक्रियेला खोळंबा झाल्याने पहिल्याच दिवशी सकाळी ११ वाजेनंतर विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट दिली. परिणामी अल्पकाळासाठी काही तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. परंतु, पुन्हा लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या अडसरावर मात केली. आता प्रवेशाचा भाग २ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटवर भरण्यात येत आहे. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा भाग एक भरलेला नाही, असे विद्यार्थी देखील प्रवेश प्रक्रियेचा भाग १ भरू शकणार आहेत. प्रवेश अर्जाचा भाग २ हा व्हेरिफाय करण्याची गरज नाही; परंतु विद्यार्थ्यांनी व पालकांनी भाग २ मधील दिलेले पसंतीक्रम दिलेले शुल्क आधी बाबी तपासून घ्याव्यात काही बदल असल्यास जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी भाग-२ भरतेवेळी कनिष्ठ महाविद्यालय अनुदान प्रकार शुल्क प्रवासाचे अंतर उपलब्ध विषय गत वर्षाचे कट ऑफ पॉईंट विचारात घेऊन पसंतीक्रम द्यावा. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा नाही त्याचा समावेश यादीमध्ये करू नये. एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाचे भाग २ मधील नाव त्याच्या प्रचलित नावापेक्षा भिन्न असू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रम भरतेवेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव खात्री करून भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणात्मक निर्णयांना महासभेत फाटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० डच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या सावटाखाली आज, गुरुवारी (दि. २०) महासभा होत आहे. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णयांना फाटा देण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला आहे.

या महासभेत केवळ विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा आज सकाळी ११.३० वाजता बोलाविण्यात आली आहे. महापालिका हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तसेच गावठाण भागात समूह विकास योजना अर्थात क्लस्टर डेव्हलपमेंट राबविण्यासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव या महासभेच्या पटलावर आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती, वाहनचालकांचे आऊटसोर्सिंग, दिव्यांग खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती, मानधनावरील उद्यान निरीक्षकांना मुदतवाढ, एमआरआय व सिटी स्कॅन यंत्र खरेदी आणि डास निर्मूलनासाठी तीन वर्षे मुदतीच्या कंत्राटासाठी ३७.६५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावदेखील या महासभेच्या पटलावर आहेत. या प्रस्तावांवर महासभा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही दुरुस्तीसाठी रॅम्पची वाढविणार लांबी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रवाशी वाहतुकीदरम्यान शिवशाही बस नादुरुस्त झालीच तर ती तत्काळ दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय टाळता यावी, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बसेसकरीता देखभाल दुरुस्ती रॅम्पची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ही व्यवस्था करण्यात येणार असून, त्यावर सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सततचे अपघात आणि नादुरुस्तीच्या घटनांमुळे शिवशाही बस नकारात्मक अर्थाने सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. शिवशाही बसेससाठी आगारांमध्ये देखभाल दुरुस्ती रॅम्पची लांबी वाढविण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, नांदगाव, पेठ, कळवण, सिन्नर, मालेगाव आणि मनमाड या आगारांमध्ये ही कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. या माध्यमातून नाशिक-धुळे, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-गुजरात यांसारख्या मार्गांवर शिवशाही बस नादुरुस्त झालीच तर ती संबंधित आगारामध्ये आणून दुरुस्त करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

प्रत्येक आगारामध्ये देखभाल दुरुस्ती रॅम्पची लांबी वाढविण्यासाठी सरासरी खर्च अडीच लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २२ जून ते १७ जुलै या कालावधीत या निविदा सादर करता येणार आहेत. या निविदा १८ जुलैला उघडण्यात येणार आहेत. या कामासाठी आगारानुसार २ लाख ४३ हजारापासून ते २ लाख ५३ हजारापर्यंत खर्च अपेक्षित आहे. तसेच कामाची जबाबदारी सोपविल्यापासून दोन महिन्यांच्या आत ते पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असणार आहे.

अन्य कामेही लागणार मार्गी

जिल्ह्यातील काही आगारांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. सिन्नर आगार व्यवस्थापकांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. याकामी दोन लाख ५१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक विभागातील टायर नुतनीकरण संयंत्र येथील खुल्या जागेत मेटाशिट शेड बनविणे, कळवण आगारात कार्यशाळेजवळ शेड बांधणे, येवला आगारातील जलवाहिनी दुरुस्त, मनमाड आणि पेठ आगारातील कार्यालयाचे छताचे पत्रे बदलणे, सटाणा आगारात तारेचे तर इगतपुरीत कुंपण करणे, पिंपळगाव आगारातील कार्यशाळेत काँक्रिट फ्लोरिंग करणे यासारखी कामेही दिवाळीपूर्वी मार्गी लावण्यात येणार आहेत.

येथे रॅम्पबांधणी

पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, नांदगाव, पेठ, कळवण, सिन्नर, मालेगाव, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’च्या योग वर्गाचा उद्या समारोप

$
0
0

नाशिकरोडसह कामटवाडा येथे कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीचा आठवा वर्धापन दिन आणि जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स', 'भारतीय योग विद्या धाम, नाशिक' आणि 'आरोग्यधाम निसर्गोपचार व योग केंद्र, नाशिकरोड यांच्यावतीने आयोजित मोफत योगासन प्राणायाम वर्गाचा समारोप शुक्रवारी (दि. २१) नाशिकरोड येथील जयभवानी रोडवरील आरोग्यधाम निर्सगोपचार केंद्रात व कामटवाडे येथील माऊली लॉन्स येथे होणार आहे.

योग वर्गामध्ये सहभागी झालेल्या साधकांच्या वतीने योगाची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे. यात सर्वात प्रथम पुरक व्यायाम त्याच बरोबर बैठक स्थितीतील आसने, उभ्या स्थितीतील असने व शयन स्थितीतील आसनांची प्रात्यक्षिके सादर केली जातील. या वर्गात योगा व प्राणायामांचा प्राथमिक अभ्यासक्रम शिकविला जातो आहे. वर्गात 'ओमकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, योगासने, प्राणायामाची पूर्व तयारी' या साधना शिकविल्या जात आहेत. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी साधकांची परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या साधकांस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सिडको, उंटवाडी, कामटवाडे, द्वारकासह नाशिकरोड, जेलरोड, इंदिरानगर, पिंपळगाव बहुला परिसरातील एकूण ५१ केंद्रांवर हे वर्ग सुरू आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने साधकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिकरोड केंद्राचे सुनील जाधव व नाशिक केंद्राचे मनोहर कानडे यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनेही सिटी सेंटर मॉल शेजारी असलेल्या ठक्कर डोम येथे आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रज्ञा पाटील या योगाची प्रात्यक्षिके सादर करणार असून डॉ. मीनाक्षी गवळी या योगाविषयी माहिती सांगणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शहरातील शासकीय अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.

योग शिबिराचे आयोजन

नाशिक योग विद्या केंद्राच्या वतीने शुक्रवारी (दि. २१) सकाळी ६ ते ७ यावेळेत हुतात्मा अनंत कान्हेर मैदान येथे एक दिवसीय योग शिबिर होणार आहे. यात योग गुरू कीर्तीकुमार औरंगाबादकर हे मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी, जीतो लेडीज विंग, जैन सोशल ग्रुप अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत. नागरिकांनी पांढरा पोशाख व योगा मॅटसह उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी फाट्याजवळ हिसकावली सोनसाखळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याचा बहाणा करून वृद्धेची पोत हिसकावून नेली. पाथर्डी फाटा परिसरातील विक्रीकर भवनाजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. इंदिरानगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

विक्रीकर भवनच्या मागे रेणुका रो-हाऊस कॉलनी आहे. तेथे कमलादेवी सिंग (वय ६६) घराबाहेर बसल्या होत्या. त्यावेळी हेल्मेट परिधान केलेला एक तरुण दुचाकीवरून आला. त्याने कमलादेवी यांना एक पत्ता विचारला. पत्ता सांगण्यासाठी कमलादेवी चोरट्याजवळ गेल्या. याचाच फायदा घेऊन त्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमलादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चोरट्याचे रेखाचित्र तयार केले आहे.

पेव्हर ब्लॉकने तरुणाला मारहाण

नाशिक : धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. अशोकस्तंभ परिसरात मंगळवारी (दि. १८) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी तेजस विलास भागवत (वय २५, रा. तेली गल्ली, रविवार कारंजा) याने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आदित्य शिंदे याच्यावर मारहाणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस त्याच्या मित्रांसमवेत मध्यरात्री अशोकस्तंभ येथील एका मेडिकलमध्ये आला होता. त्यावेळी आदित्य शिंदे यास धक्का लागला. आदित्यने तेजसला शिवीगाळ केली. याबाबत तेजसने जाब विचारला म्हणून आदित्यने त्याला पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

युवकावर चाकूहल्ला

नाशिक : होलाराम कॉलनी येथे तिघांनी एका युवकावर चाकूने वार केले. हा प्रकार मंगळवारी (दि. १८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. या हल्ल्यात सज्जाद गयासुद्दीन शेख (वय १७, रा. होलाराम कॉलनी) या युवकास दुखापत झाली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा संशयितांवर शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी स्थळ सर्वेक्षण

$
0
0

स्कायलार्क कंपनीवर जबाबदारी, मनपाची परवानगी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महामेट्रोने नाशिकमध्ये मेट्रोसंदर्भातील सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम राईट्स या कंपनीला दिल्यानंतर संबंधित कंपनीने मेट्रोसाठीचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कंपनीच्या वतीने नागरिकांचे मेट्रोबाबतचे मत आजमावण्यासोबतच मेट्रोसाठीचे स्थळ सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. राईट्सने नोएडातील स्कायलार्क डिझायनर अँड इंजिनीअरिंग प्रा. लि. या कंपनीला या कामाची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीला परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये मेट्रो सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर महामेट्रोला ( महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लि.) प्राथमिक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिडको आणि महामेट्रोने प्राथमिक अहवाल तयार करीत शहरात टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी शहरात दोन मार्गांवर ३२ किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर तयार केले जाणार आहेत. या अहवालानंतर महामेट्रोने मेट्रोसाठीचा व्यवहार्यता प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राईट्स या कंपनीला दिले आहेत. राईट्सने मेट्रोसाठीचे स्थळ सर्वेक्षण अहवाल करण्याची जबाबदारी ही नोएडातील स्कायलार्क डिजायनर अँड इंजिनीअरिंग प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून मेट्रोच्या मार्गात येणारे अडथळे, त्यांची उपयुक्तता, एलिव्हेटरमुळे प्रभावित होणारे घटक, मेट्रोसाठी कुठे डेपो उभारता येतील, त्यासाठी किती नागरिकांना स्थलांतरीत करावे लागेल, मार्गावरील मोकळी मैदाने किती आहेत आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राईट्सला सादर केला जाईल. त्यासाठी राईट्स या संस्थेने मदत करण्यासाठीचे पत्र पाठवल्यानंतर महापालिकेने स्कायलार्क कंपनीला स्थळ सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या मार्गातील एक एक अडथळा दूर होत असल्याचे चित्र आहे.

..

नागरिकांना आवाहन

स्कायलार्क कंपनीकडून लवकरच स्थळ सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर संबंधित कंपनीला स्थळ सर्वेक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन पालिकेने पोलिस, एसटी महामंडळ तसेच नागरिकांना केले आहे. या कंपनीला स्थळ सर्वेक्षणात अडचणी येऊ नयेत, यासाठी महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी सर्व यंत्रणांना पत्र लिहून संबंधित कंपनीला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेवर कारवाई?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती बँकेने अवघे १६७ कोटींचे पीक कर्ज वाटप केल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा रोष असताना आता अधिकाऱ्यांची नाराजी बँकेने ओढवून घेतली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बँकेवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे बँकेचेही धाबे दणाणले आहे. रिझर्व्ह बँकेने अगोदरच बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. केवळ न्यायालयाच्या स्थगितीमुळे ते व्हेंटिलेटरवर आहे. त्यात चौकशीचा फेराही सुरू आहे. अशात पीककर्ज आता कळीचा मुद्दा ठरला आहे.

शेतकरी कर्जमाफीपोटी बँकेला सरकारकडून ६६० कोटी रुपये मिळाले. या पैशांतून बँक पीककर्ज देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, बँकेने आलेले पैसे ठेवीदारांना देण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे प्रमाणही कमी झाले. जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वाधिक कर्ज वाटप करते. पण, बँक आर्थिक अडचणीत आल्यामुळे हे पीककर्ज वाटप गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. राष्ट्रीयीकृत बँकेच्या जाचक अटींमुळे कर्ज मिळत नाही व जिल्हा बँक देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या कर्जवसुलीवर अशीच टीका झाली. त्यामुळे बँकेची यावेळेसही अडचण झाली आहे. त्यात आता या नव्या अडचणी वाढल्या आहे.

प्रशासनाची जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जास्त पीककर्ज वाटप करण्याची अपेक्षा आहे. पण, बँकेने फक्त ३०० कोटीच कर्ज वाटप करण्याचे निश्चित केले आहे. त्यात १६७ कोटींचे कर्ज आतापर्यंत वाटप केले असून उर्वरीत कर्ज वाटप करण्याचे बँके प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात तरुणांवर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील गोरक्षक समितीच्या तीन तरुणांवर मंगळवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास वडजाईरोड परिसरात प्राणघाटक हल्ला केल्याची घटना घडली. यात विकास गोमसाळे, मयूर विभांडिक व शाहरुख बागवान हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. १९) निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील लोकमान्य हॉस्पिटजवळील अपना हॉटेलवर तिघेही तरुण रिक्षा (एमएच १८ एन ७९५६) द्वारा चहा पिण्यासाठी जात होते. या वेळी रशीद चमडेवाला यांनी तेथे येऊन, आपला गोमांसचा व्यवसायावर यांच्यामुळे संक्रात आली आहे. असे सांगत गावठी कट्टा दाखवत जमील व जलील अफजल शेख रशीद आणि इतर साथीदारांसह तिघांवर प्राणघातक हल्ला चढवल्याची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे. या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचा संतप्त झाल्या असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करीत कडक शासन करावे, ही मागणी करण्यात येत आहे.

गुरांचे मास जप्त
रावेर : शहरातील रसलपूर रोडवरील इमामवाडा परिसरात गोपनीय विभागाचे पोलिस राजेंद्र करोडपती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कर्मचाऱ्यांनी साफळा रचत सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे गुरांचे मास व एक लाख रुपये किंमतीची पिकअप महिंद्रा बोलेरो असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात तिन जणां विरूद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित पिकअप (एमएच -०४ ईवाय २५३५) या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात गुरांचे मांस आढळले. पोलिसांनी शेख एजाज शेख अफजल (२८), शेख शरीफ खलील (३७), शेख आरिफ शेख खलील (३९, सर्व रा. इमामवाडा, रावेर) या तिघांना ताब्यात घेतले आहे. गुरांचे मास हे परराज्यात घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालभारती सोशल मीडियावर ट्रोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील शिक्षणात बदल केले असून, संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, असे वाचण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून नेटिझन्सनी बालभारतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून, गणितातील नव्या बदलाच्या मुद्द्यावरून विनोद व्हायरल केले जात आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर हॅशटॅग बालभारती वापरत नेटिझन्स नव्या पद्धतीवरील विनोद व पोस्ट अपलोड करीत आहेत.

बालभारतीने दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्या वाचनाचे नवे नियम दिले आहेत. यावरून 'तरुण पिढीने पण इयत्ता दुसरीपासून पुन्हा सुरुवात केली तरच हा बदल आत्मसात होईल हेही खरे. अन्यथा पहिले पाढे पन्नास पाच', 'बरं मग ते आम्ही अडीच, नव्व्याण्णव, चौसष्ट असे शिकलो. आता आम्ही समाजव्यवस्थेतून बाद होणार की, पुन्हा बालवाडीपासून सुरू करायचं?', असे विनोद व्हायरल केले जात आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र विनोद, मिम्स व्हायरल होत असून, बालभारतीच्या नव्या नियमाला नेटिझन्सनी धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. हॅशटॅग बालभारती वापरत फेसबुक व ट्विटरवर बालभारतीच्या अकांउटलादेखील टॅग केले जात आहे. नव्या नियमामुळे मराठी सुधारेल की बिघडेल, असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. इंग्रजीचे अनुकरण करीत मराठीत होणारे बदल अनपेक्षित असल्याचे सांगत अनेक टीकात्मक पोस्टही सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्या आहेत.

... असे आहेत विनोद

- 'पूर्वी बातम्या किंवा मालिका संपली की, पत्ता यायचा. निवेदिका 'मुंबई एक शून्य शून्य चार...' असा पिनकोड सांगायची. आज तसचं काहीतरी वाटतयं...'

- 'ती (चिडून) - अरे जा... तू काय एकटाच भारी आहेस का? मी पाच सहा बघितलेत. तुझ्यासारखे. तो - पाच-सहा? यावर मित्र-अरे तिला छप्पन म्हणायचंय... ती नवीन सिलॅबसवाली आहे'

- '१३ ही संख्या दहा तीन आणि २८ ही वीस आठ, अशी वाचायची म्हणजे लहानपणीच जुगार शिकतील', 'जसे इंग्रजीत ५५ म्हणजे, फिफ्टी फाइव्ह. त्याचप्रमाणे आता मराठीतही पन्नास पाच'

- 'शिक्षक - तुझी जन्मतारीख सांग? विद्यार्थी - वीस चार दहा दोन दहा नऊ ऐंशी आठ... शिक्षक गार...'

- 'राष्ट्रीय प्रश्न - 'तीन तेरा, नऊ अकरा' होणे याला आता कसे उच्चारावे? '

- 'या पुढे मावशीला आईबहीण, मामाला आईभाऊ, आत्याला बाबाबहीण, काकाला बाबाभाऊ, आजीला आईआई किंवा बाबाआई आणि आजोबांना आईबाबा किंवा बाबाबाबा असे म्हणावे'

- आज मी एका उपाहारगृहात गेलोय कॉफी कितीला विचारली. वेटर म्हणाला 'दहापाच ला'. मी 'एक कॉफी द्या' म्हटलं. बिल १०५ रुपयाचे आदळले.

69882687

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेवणाच्या वादावरून माय लेकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

घरात किरकोळ कारणाने वाद झाल्याने आई व मुलाने विषप्राषण करून आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द (ता. नांदगाव) येथे बुधवारी घडली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

जेवणाच्या कारणावरून वाद झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत मालेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शून्य क्रमाकांनी तो नांदगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे राहणारे मधुकर सरोदे यांच्या पत्नी मंदाबाई मधुकर सरोदे (वय ५५) व लहान मुलगा गणेश मधुकर सरोदे (वय ३०) या दोघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जेवणाच्या कारणावरून वाद झाला. या वादामुळे आधी गणेशने विषारी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या आईनेही विष घेतले. दोघांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तत्काळ मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूचे वृत्त जळगाव खुर्द गावात येताच परिसरात शोककळा पसरली. गणेश सरोदे आई, वडील, मोठा भाऊ, भावजयी, बायको व तान्ह्या मुलासह जळगाव खुर्द येथे राहात होता. त्याचा मोठा भाऊ रेल्वेत असून गणेश हा पंचर काढण्याचे काम करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅसेटरुपी जपला संगीताचा खजिना

$
0
0

तुषार लोणकरांनी जपल्या साडेचारशे दुर्मिळ शास्त्रीय संगीताच्या कॅसेट्स

..

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

...

नाशिक : शहरात कुठेही शास्त्रीय संगीताची मैफल असली, तर हमखास दृष्टीस पडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तुषार लोणकर. लोणकर यांना शास्त्रीय संगीत ऐकण्याचीच नाही, तर शास्त्रीय संगीताच्या दुर्मिळ कॅसेट जमवण्याचा देखील छंद आहे. आजमितीला त्याच्या संग्रहात केवळ शास्त्रीय संगीताच्या दुर्मिळ साडेचारशे कॅसेट्स चांगल्या स्थितीत आहेत.

झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्य झालेली टेप रेकॉर्डरची कॅसेट दुर्मिळ बनलेल्या दैवी स्वरांसाठी वर्तमानात संजीवनी ठरत असेल यावर कुणाचा विश्वास सहसा बसणार नाही. पण हे सत्य आहे. शास्त्रीय संगीतप्रेमी तुषार लोणकर यांनी बालगंधर्वांच्या दैवीस्वरांपासून तर पंडित भीमसेन जोशींच्या सुरावटीपर्यंतची संपदा जपली आहे. त्यांचा हा अनोखा छंद अलौकीक सुरावटींना नवा साज देऊन गेला आहे.

तुषार रामचंद्र लोणकर हे मुळचे मुंबई येथील रहिवासी. लोणकर यांच्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती. तुषार यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांना लगेचच पोस्टखात्यात पोस्टमनची नोकरी लागल्याने त्यांनाही वडिलांप्रमाणे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी आपली संगीत ऐकण्याची आवड पुरेपूर जोपासली. तो जमाना कॅसेटचा असल्याने तुषार यांना शास्त्रीय संगीताच्या कॅसेट जमवण्याचा छंद जडला. पोस्टमन म्हणून लोकांकडे जाताना विविध प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकायला मिळायचे. त्यामुळे त्यांचा छंद जास्त बहरत गेला. पगार तुटपुंजा असला तरही त्यातून काही रक्कम बाजूला काढून तुषार यांनी अनेक दुर्मिळ कॅसेट्स जादा रक्कम देऊन खरेदी केल्या. पुढे नाशिकला बदली झाल्यानंतर ही आवड जास्तच बहरत गेली. संगीताबरोबरच नाटकाची आवड असल्याने त्यांनी संगीत मंदारमाला हे नाटक तब्बल ५० वेळा पाहिले. त्यांच्या संग्रहात आजमितीला विणा सहस्त्रबुध्दे, मालिनी राजूरकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, राम मराठे यांच्या बहुतांश दुर्मिळ कॅसेट्स आहेत. त्याचप्रमाणे बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, सुहासिनी मुळगावकर, प्रसाद सावकार याच्या कॅसेट्स त्यांच्या संग्रहात आहेत. तसेच अनेक वादकांच्या व शास्त्रीय गायकांच्या लाइव्ह मैफलींच्या कॅसेट्स त्यांनी गावोगावी फिरवून मिळवल्या आहेत. तसेच, संगीत सौभद्र, मानापमान यासारख्या अनेक नाटकातील पदांच्या कॅसेट त्यांच्याकडे आहेत. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबध्द केलेली गीते, कथाकथन, हार्मोनियम वादनाच्या कॅसेट त्यांच्या संग्रही आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते, सुधीर फडके यांनी गायलेल्या भावगीतांच्या कॅसेट्स त्याच्या संग्रहात आहेत. या कॅसेट दुर्मिळ असल्याने त्यांच्या डीजिटायझेशचा खर्च परवडणारा नसल्याने ते आजही टेपरेकॉर्डवर कॅसेट ऐकतात व आलेल्यांना त्याचा आस्वाद देतात.

…..

शास्त्रीय संगीत ऐकणे हा माझा छंद आहे. घरी अनेक दुर्मिळ कॅसेटचा संग्रह आहे. आता कॅसेट मिळत नाही, मात्र तरीही कुठे दुर्मिळ कॅसेट असल्याची कुणकुण लागली तर मी जास्त पैसे देऊन मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही लोक स्वत:हून आणून देतात. अनेक लोक जुन्या गायकांची पदे शोधण्यासाठी माझ्याकडे येतात.

- तुषार लोणकर, कॅसेट संग्रहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’चा पहिला पेपर सोपा

$
0
0

अन्य दोन पेपरला लागली कसोटी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेला नाशिकमध्ये गुरुवारी सुरुवात झाली. इंदिरानगर परिसरातील परीक्षा केंद्रात परीक्षार्थींसाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही परीक्षा २८ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. गुरूवारी पार पडलेल्या पहिल्या दिवशी विविध विद्याशाखातील विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला. नेटचा पहिला पेपर उर्वरित दुसऱ्या व तिसऱ्या पेपरच्या तुलनेत सोपा असल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थींनी दिली.

'एनटीए'कडे नियोजन आल्यापासून परीक्षेचे आयोजन आणि निकाल या वेळापत्रकात कमालीची सुधारणा झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी पहिल्यांदाच नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यंदा ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याची दुसरीच वेळ आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीने असणारा तिसऱ्या क्रमांकाचा पेपर हा दुसऱ्यास जोड देण्यात आला असून दुसऱ्या व तिसऱ्या पेपरचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. दुसरा व तिसरा एकत्रित केलेला पेपर हा विषयातील सूक्ष्म संकल्पनांवर अवलंबून आहे. तर पहिल्या भागामध्ये कौशल्य, तार्किक क्षमता, गणित, बुद्धिमत्ता मापन, अध्ययन पद्धती, संशोधन, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश आहे. शहरात पहिल्याच दिवशी पार पडलेल्या या परीक्षेसाठी सुमारे सातशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ३०० गुणांसाठी हा पेपर पार पडत आहे. यात पहिल्या पेपरमध्ये ५० प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रित पेपरमध्ये एकूण १०० प्रश्नांचा समावेश आहे. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात येतात. या परीक्षा पद्धतीत निगेटिव्ह मार्किंग नसल्याने विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा आहे.

सूक्ष्म संकल्पनांचा अभ्यास आणि सरावामुळे यंदा नेट परीक्षा मला तुलनेन सोपी वाटली. मात्र, दुसऱ्या पेपरमध्ये काही प्रश्नांपाशी कसोटी लागली. एकंदर परीक्षा नियोजनही चांगले आहे. पहिला पेपर तुलनेने सोपा होता.

\B- पंकज माडीवाले, परीक्षार्थी \B

दुसऱ्या पेपरसाठी काही ठिकाणी कमी पडलो. आणखी सखोल अभ्यास आणि सराव गरजेचा आहे, असे वाटते.

\B- शुभम गवांदे, परीक्षार्थी

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता छळ प्रकरण;सासरच्यांविरोधात गुन्हा विवाहिता छळप्रकरणीसासरच्यांविरोधात गुन्हाम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

$
0
0

नाशिकरोड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा रोहित माहिरे (३२, रा. दत्तमंदिर चौक, नाशिकरोड) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पती, सासू निर्मला व सासरे भावराव माहिरे (रा. जयभवानी नगर, नाशिक) व नणंद दीपाली कर्डक व राम मधुकर कर्डक यांनी घर घेण्यासाठी अडीच लाखांची मागणी करून मला उपाशीपोटी ठेवले. तसेच, शिवीगाळ करून मारहाण केली. चारित्र्यावर संशय घेऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आपल्याकडे पैसे नसल्याने सासू, सासरे यांनी माझे काढून घेतलेले दागिने मागण्यासाठी गेले असता त्यांनी नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने पोलिस आयुक्तालय सज्ज

$
0
0

जुने पोलिस आयुक्तालय सज्ज

काही सरकारी कार्यालये अजूनही ब्रिटीशकालीन इमारतीतून बाहेर पडू शकलेली नाहीत. जुने पोलिस आयुक्तालयही याच पद्धतीचे! पावसाळ्यात ही इमारत ठिकठिकाणी गळते. पोलिस दादांना 'सेफ' काम करता यावे, यासाठी जुने पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे छत ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वात्सल्य वसतिगृहात महिलांचे प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचे संरक्षण' या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अशोकस्तंभ परिसरातील वात्सल्य महिला शासकिय वसतिगृहात पार पडला. महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील यांनी यावेळी महिला संरक्षण अधिनियम २००५ या विषयी महिती दिली. तसेच महिला व बालविकासतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत महिलांना अवगत करून देण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी प्राधिकरणाच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. अॅड. मंगला बर्वे यांनी कौटुंबिक हिसांचारापासून महिलांचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांवर होणारे शारीरिक, आर्थिक व मानसिक अत्याचाराविरुद्ध दाद मागता येते याविषयी सांगताना त्यांनी त्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया व अन्य माहिती बर्वे यांनी दिली. बालकल्याण समितीच्या सदस्या श्रीवास्तव, वसतिगृह अधीक्षीका प्रियांका पानपाटील, महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या विधी सल्लागार अशोक पवार आदींसह समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, तालुका संरक्षण अधिकारी तसेच वसतिगृहातील महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कारवाईत ४५ हजारांचा दंड

$
0
0

नाशिकरोड : प्रतिबंधित प्लास्टिक वापर तसेच, अस्वच्छता मिळून महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाने गुरुवारी एकूण ४५ हजारांचा दंड वसूल केला. यात प्लास्टिकच्या पाच प्रकरणांत २५ हजार, तर अस्वच्छतेप्रकरणी २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेचे नाशिकरोड विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांच्य मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, ज्ञानेश्वर भोसले, विजय मोरे, स्वच्छता मुकादम जर्नादन घंटे, संजय काळे, रोशन दिवे, किशोर गांगुर्डे, मनोज फाजगे यांनी ही कारवाई केली.

सोना शूज, युवराज राजाराम पगारे, धाडीवाल कलेक्शन, मधुर एजन्सी, शेटे बंधू पानभांडार यांना प्रतिबंधित प्लास्टिक वापराबाबत प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी रेणुका ऑप्टिशियन व टीव्हीएस मोटर्स यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. व्यावसायिक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी राथमन टेलर्सचे मंगल मुनसे यांना दहा हजार रुपये दंड करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठे यांचं 'चांदणभूल' बी.ए.च्या अभ्यासक्रमात

$
0
0

मिठे यांचं 'चांदणभूल' बी.ए.च्या अभ्यासक्रमात म. टा. प्रतिनिधी, नाशिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी अभ्यास मंडळाकडून साहित्यशिल्प हे पाठ्यपुस्तक बी.ए.च्या प्रथम वर्षासाठी नेमण्यात आले आहे. या पुस्तकात व्यंकटेश माडगूळकर, कैलाश सत्यार्थी, भारत सासणे, नरेंद्र लांजेवार, राम शेवडीकर, मोहिब कादरी, केशवकुमार, पु. शि. रेगे, विंदा करंदीकर या मान्यवर साहित्यिकांसह पालखेड बंधारा (दिंडोरी) येथील ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांच्या चांदणभूल या वाचकप्रिय ललितलेख संग्रहातील चांदणभूल या ललितलेखाचा समावेश करण्यात आला आहे. अस्सल ग्रामीण शब्दकळा आणि जागोजागी उपमा, म्हणी, अलंकारिक सौंदर्यपूर्ण भाषाशैली हे विजयकुमार मिठे यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्ये आहे. मिठे यांचे कादवेचा राणा, बुजगावणं, हेळसांड, आभाळओल हे कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, ललितलेख संग्रहासह अठरा ग्रंथ प्रकाशित आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमद्वारे पैसे लाटणारा गजाआड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मदतीच्या बहाण्याने एटीएम केंद्रात येऊन पिनकोडची माहिती घेऊन परस्पर पैसे काढणाऱ्या सराईताला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील जेरबंद केले. यामुळे जिल्ह्यातील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

माधव उर्फ सोनू बापू आहेर (वय २७, रा. कसबे सुकेणे, ता. निफाड, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मनमाड शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील देना बँकेच्या 'एटीएम'मध्ये संजय कारभारी गांगुर्डे (वय ४५, रा. दरेगाव निमोण, ता.चांदवड) हे ४ जून रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने मागे उभ्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो असे बोलून विश्‍वासाने गांगुर्डे यांचे एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड व पिन कोड घेऊन ५००० रुपये काढून दिले. दरम्यान, त्याने गांगुर्डे यांचे एटीएम कार्ड चालाखीने बदलले. त्यानंतर ४ दिवसांनी नाशिकमध्ये ७० हजार रुपयांची सोन्याची चेन खरेदी करून कार्डद्वारे पैसे दिले. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. यापूर्वी शहरात असे प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताचा माग काढला. गणेशवाडी परिसरात सापळा रचून संशयिताला अटक करण्यात आली. त्याने या गुन्ह्यासह इगतपुरीतील काही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, नवनाथ गुरूळे, अशोक पाटील, हवालदार रवींद्र वानखेडे, संदीप हांडगे, जालिंदर खराटे, गिरीश बागूल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आहेर सराईत गुन्हेगार

माधव आहेर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी निफाड, पिंपळगाव, वणी पोलिस ठाणे तसचे नाशिकमधील पंचवटी, सातपूर व उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून जिल्ह्यातील एटीएम कार्ड फसवणुकीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

काळजी घेण्याचे पोलिसांना आवाहन

एटीएममधून पैसे काढतांना सेंटरमध्ये अनोळखी व्यक्ती अथवा कोणीही असल्यास त्यास तेथे थांबण्यास प्रतिबंध करावा. पैसे काढल्यानंतर कॅन्सल व क्लीअरचे बटन दाबून व्यवहार पूर्ण करावा. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ जवळचे पोलिस स्टेशन, बँक शाखा व नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनशी ०२५३-२२००४०८१, स्थानिक गुन्हे शाखा ०२५३-२३०९७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी विभागांतर्फे योगासने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय, खासगी व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून, हा कार्यक्रम आज (२१ जून) सकाळी ७ वाजता ठक्कर डोम येथे होईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

भारत पर्यटन, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठक्कर डेव्हलपर्स, चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यासह इतरही संस्था योग दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सिटी सेंटर मॉल शेजारी असलेल्या ठक्कर डोम येथे आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार असून, प्रज्ञा पाटील या योगाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. तसेच डॉ. मिनाक्षी गवळी या योगासनांची माहिती देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images