Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

थकबाकी भरा, जप्ती टाळा

$
0
0

महापालिकेची वसुलीसाठी आता विशेष मोहीम

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीसाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. शहरात एकूण २८ हजार ४८० थकबाकीदार आहेत. या सर्वांना अंतिम नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. त्यास प्रतिसाद न दिल्यास त्यांच्या मालमत्तांची जप्ती केली जाणार आहे.

महापालिकेचे उत्पन्न घटल्याने त्याची गंभीर दखल मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. त्यामुळेच थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पन्नास हजारांहून अधिक थकबाकी असलेल्यांवर पहिल्या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे. अशा थकबाकीदारांची संख्या ३ हजार ५६४ एवढी आहे. त्यांच्याकडे एकूण ९८ कोटी २२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्वांना प्रथम अंतिम नोटिसा बजावण्यात येतील. त्यांनी रक्कम भरली नाही तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात २१८ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत अवघे १७ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे कर वसुलीला वेग देण्याचे मनपा प्रशासनाने निश्चित केले आहे. मालमत्ता कराच्या वसुलीबाबत महापालिकेमध्ये नुकतीच बैठक झाली. त्यात वसुलीचा आढावा घेण्यात आला. थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वेळेप्रसंगी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने आता तयारी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी महापालिकेने १५० कोटी रुपयांच्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, अवघे ११२ कोटी रुपयेच महापालिकेला मिळाले. आता महापालिकेने करवसुलीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

--

थकबाकी

मूल्य - थकबाकीदार - एकूण

२५ हजार रुपयांपर्यंत - १९,४३६ - २९.६६ कोटी

५० हजार रुपयांपर्यंत- ५,४८० - १८.७१ कोटी

५० हजारांपेक्षा अधिक - ३,५६४ - ९८.२२ कोटी

एकूण - २,८४,८०--१४६.५९

...

विभागनिहाय थकबाकीदार

विभाग - २५ हजारा रु.पर्यंत - ५० हजार रु.पर्यंत - ५० हजार रु.पेक्षा अधिक

सातपूर - २,१४४ -३२२ - १५५

नाशिक पश्चिम - १,०५५ - ४८४ - ५५७

नाशिक पूर्व - ४,३६० - १,८९३ - १,४४०

पंचवटी - ५,७८१ - १,३४४ - ७०६

सिडको - ३,२५० - ५७० - २४०

नाशिकरोड - २,८४६ - ८६७ - ४६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखी आज पंचायत समितीत

$
0
0

नाशिक : संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी मंगळवारी प्रस्थान झाले. आज, बुधवार १९ रोजी नाशिक येथे पालखीचे आगमन होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या निमित्ताने वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्ती असे विधायक उपक्रम राबवत वारीची पाऊलवाट निराळी ठरणार आहे. मंगळवारी पालखी सातपूर येथे आली आणि चहापानानंतर वाढोली मुक्कामी थांबली. बुधवारी नाशिकला येणार आहे. सकाळी ९ वाजता पंचायत समिती येथे वारकरी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार असून त्यानंतर पालखी नामदेव विठ्ठल मंदिरात जाणार आहे. गणेशवाडी येथील नवीन भाजी मंडई येथे बुधवारी मुक्कामी राहणार असून गुरूवारी सकाळी मुक्तीधाम आणि त्यानंतर पळसे येथे पालखी रवाना होणार आहे.

गंगापूरहून भाविक रवाना

सातपूर : संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी पंढरपूर आषाढी यात्रेला गंगापूरहून भाविक रवाना झाले. शहरातील ११ नंबरची दिंडी म्हणून ओळख असलेल्या दिंडीचे श्रीफळ वाढवून भाजयुमोचे अमोल पाटील, राजाराम पाटील यांनी शुभारंभ केला. दरवर्षी शेकडो वारकरी आषाढी एकादशीच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी सहभागी होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्ती थोपविण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पुण्याच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हेल्मेट सक्ती स्थगिती करण्याची मागणी केली आणि पुण्याची हेल्मेट सक्तीला स्थगिती मिळाली. नाशिक शहरातही हेल्मेट सक्ती करू नये. हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिस करीत असलेला जाच थांबवावा, असे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, चोऱ्या, दरोडे, अवैध धंदे, अनैतिक व्यवसाय यांनी उच्छाद मांडला आहे. असे असताना सर्वसामान्य जनतेला हेल्मेटसक्तीच्या नावाखाली त्रास देण्यात येत आहे. नाशिक शहराचा शांत शहर म्हणून नावलौकिक होता. मात्र, सध्या या शहराची कायदा व सुव्यवस्था खूप बिघडली आहे. हेल्मेटसक्तीचा अतिरेक थांबवावा आणि कायदा व सुव्यवस्थेकडे जास्त लक्ष द्यावे, असा पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

दिंडोरी :

तालुक्यातील अवनखेड शेतकरी रामनाथ पोपट जाधव(वसाळ ) (वय 50) यांनी आज पहाटे आपल्या शेतात आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कालच त्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्ज वसूली संदर्भात जप्तीची नोटीस आली होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली अशी परिसरात चर्चा असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या कडाडल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक जास्त असली तरी मागणी वाढलेली असल्यामुळे भाजीपाला तेजीत आहे. कोथिंबीर ५० ते १३६ रुपये प्रति जुडीपर्यंत विकली गेली.

बाजार समितीत बुधवारी (दि. १९) दुपारच्या लिलावासाठी फळभाज्या घेऊन येणाऱ्या वाहनांच्या आवारात लांबवर रांगा लागल्या होत्या. मार्केटच्या प्रवेशद्वारापासून ते दिंडोरी रोडवर वाहने थांबून होती. विदर्भ, मराठवाडा या भागातून मुंबई-गुजरातकडे जाणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे नाशिकच्या भाजीपाल्याला केवळ मुंबई, गुजरातच नव्हे तर दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात आवक जास्त होऊनही भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत.

वांगी, ढोबळी मिरची, गिलके, पिकॅडोर, दोडके, काकडी, भेंडी, गवार यांना चढे दर मिळत आहेत. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ५० ते १३६ रुपये प्रति जुडीपर्यंत विकली गेली. मेथी आणि कांदापात यांचे दरही वाढलेले आहेत. हे दर बाजारातील लिलावाचे असून, किरकोळ भाजीबाजारात या दरांमध्ये आणखी वाढ झालेली असते.

.....

बुधवारी (दि. १९) झालेली आवक व दर

फळभाज्या .........आवक (क्विटंलमध्ये)................दर (प्रति किलो)

टोमॅटो ...................७१५............................. ५ ते २५

वांगी................१३३...................................३७ ते ६०

फ्लॉवर.............१५२....................................५ ते १३

कोबी...............२७७....................................७ ते १७

ढोबळी मिरची.....२३३...................................३३ ते ४३

दुधीभोपळा.........५३८....................................१० ते २०

दोडका..............२५.......................................४१ ते ७५

गिलके...............४९......................................२३ ते २९

काकडी ...........४८४.......................................११ ते २०

भेंडी................४८..........................................२० ते ३७

गवार...............१०.........................................२० ते ४०

..............

पालेभाज्यांची आवक व दर असे

पालेभाजी .................आवक (जुडी)....................दर (प्रति जुडी)

कोथिंबीर ..................६४ हजार ५०० .................. ५० ते १३६

मेथी.........................२ हजार ३०० ......................३१ ते ५०

शेपू.........................१ हजार ४८० ......................११ ते ३१

कांदापात..................१६ हजार ७०० ......................१७ ते ४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता, तपास सुरू आहे...!

$
0
0

दुचाकीस्वारास मारणाऱ्या पोलिसावर कारवाईस विलंब

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

हेल्मेट कारवाईदरम्यान शुभम महाले (रा. देवळालीगाव) या दुचाकीस्वारास डोक्यात काठी मारून जखमी केल्याप्रकरणी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल होऊन तब्बल २० दिवस उलटले. मात्र, यात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही. एरवी कायद्याचा बडगा उगारत सर्वसामान्यांवर दणका देणारे पोलिस आपल्याच विभागातील कर्मचाऱ्याविरोधात कारवाईस विलंब करीत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ओमकार आणि शुभम महाले हे दोघे भाऊ ॲक्टिव्हा दुचाकीवरुन (एमएच १५ एफझेड ०५१६) नाशिकरोडच्या दिशेने २१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेला येत होते. सिन्नर फाटा येथे पोलिसांची नजर चुकवून त्यांनी विरुद्ध बाजूने पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या रवींद्र खोंडे या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओमकारने गाडी थांबवली नाही. खोंडे यांनी हातातील काठी पाठीमागे बसलेल्या शुभमच्या डोक्यात मारल्याचा आरोप फिर्यादी ओमकार याने केला होता. यात घटनेत शुभम गंभीर जखमी झाला. आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी दाखल केल्यावर त्याच्या प्रकृतीचे गांभीर्य उजेडात आले. पोलिसांनी सुरुवातीला अशी घटना घडलीच नसल्याचा दावा केला होता. मात्र, या प्रकरणाची विविध राजकीय पक्षांसह नागरिकांनी दखल घेतल्यानंतर शहर पोलिस आयुक्तांनीही जखमी शुभमसह त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर १ जून रोजी ओमकारने नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिल्यावर रवींद्र खोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन आता २० दिवस झाले आहेत. तरीही पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाचे सोपस्कार पूर्ण केलेले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जखमी शुभमला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला फिजिओथेरपीसाठी दररोज येथील येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे.

हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारास काठी मारल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. चौकशीत जसे निष्पन्न होईल तशी रितसर कारवाई केली जाईल. संबंधित पोलिस त्याची ड्युटी करीत होता. दुचाकीस्वाराला मारण्याचा त्याचा उद्देश नसल्याचे प्रथमदर्शनी तपासात प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधून समजते.

- नीलेश माईनकर,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंग स्थळाची पाहणी

$
0
0

इंदिरानगर : शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी इंदिरानगर पोलिस ठाण्यासह पाथर्डी फाटा येथे झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस ठाण्यात एका फिर्यादीशी चर्चाही केली.

इंदिरानगर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्यात असलेल्या एका युवती फिर्यादीशी त्यांनी चर्चा करून तिच्या अडचणी समजून घेतल्या. त्याचबरोबर पोलिसांकडून मिळणारे सहकार्य आणि अन्य बाबींवर चर्चा करून संपूर्ण पोलिस ठाण्याची पाहणी केली. त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथे घराबाहेर बसलेल्या एका महिलेच्या चेन स्नॅचिंग झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या कार्यालयांत सौरऊर्जेचा प्रकाश

$
0
0

मुख्यालयासह १६ ठिकाणांचा समावेश; वर्षभरात एक कोटीची होणार बचत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह विभागीय कार्यालये, रुग्णालयांच्या १६ इमारतींवर सौरऊर्जेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाभरात पालिकेच्या १६ इमारतींवर सौर प्रकल्पाची उभारणी पूर्ण होणार असून, यातून पालिकेला वीजही उपलब्ध होणार आहे. या सौरऊर्जेमुळे महापालिकेची एक कोटींच्या वीज देयकांची बचत होणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालये, तसेच रुग्णालयांच्या जवळपास १६ इमारतींवर सौर प्रकल्प बसविण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. रेस्को मॉडेलनुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय स्मार्ट कंपनीने घेतल्याने महापालिकेला या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कुठलाही खर्च करावा लागलेला नाही. संगम ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि वारी इंजिनीअरिंग यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी या दोन्ही मक्तेदार कंपन्यांच्या माध्यमातून 'वासंग सोलर वन प्रायव्हेट लिमिटेड' या संयुक्त भागीदारी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या संयुक्त भागीदारी कंपनीमार्फत सौर प्रकल्पाचे संचलन केले जाणार आहे.

..

महिनाभरात होणार काम पूर्ण

राजीव गांधी भवनावर २०७ किलोवॅट, नाशिकरोड विभागीय कार्यालय ६० किलोवॅट, बिटको रुग्णालय २० किलोवॅट, नवीन नाशिक विभागीय कार्यालय १६ किलोवॅट, नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय १० किलोवॅट, जिजामाता प्रसूतीगृह १३ किलोवॅट, झाकीर हुसेन रुग्णालय १०० किलोवॅट, पंचवटी विभागीय कार्यालय व स्मार्ट सिटी कार्यालयाच्या छतावर ५७ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात येत असून, महिनाभरात त्यांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे महापालिकेची एक कोटीची वीज देयके वाचणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीकॉमचा सुधारित निकाल ३० जूनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्षातील 'बिझनेस रेग्युलेटरी फ्रेम वर्क' (एमलॉ) या पेपरचे पूनर्मूल्यांकन करून ३० जून रोजी सुधारित निकाल जाहीर करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतर्फे घेण्यात आला आहे. शिवाय पीएचडीच्या पूर्वपरीक्षेतही पदव्युत्तर अंतिम वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्यासाठीही सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.

बी.कॉमचा निकाल सदोष असून नाशिकमधून सुमारे ५२ टक्के विद्यार्थी यात उत्तीर्ण झाल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला होता. यासोबतच पेट परीक्षेसंदर्भात पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना विचारात घेण्याचीही मागणी 'अभाविप'ने केली होती. विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांची दखल विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आली आहे. पीएचडीसाठी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पेट या परीक्षेस अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्याची तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनाद्वारे केली होती. या मागणीवरही ३० तारखेपर्यंत निर्णय घेऊन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस पात्र ठरविण्यात येईल व पूर्व परीक्षेच्या अर्जाची मुदत वाढवून देण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे. विद्यापीठाने तात्काळ या दोनही विषयात निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विजय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांमधील हा तिढा सोडविण्यासाठी पाठपुरावा केला.

निकालात सातत्याने होत असलेले घोळ विद्यापिठाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. या प्रकारात विद्यार्थी हिताचा निर्णय व्हावा, यासाठी संघटनेने पाठपुरावा केला. या सर्व प्रयत्नांनायश आले आहे.

- प्रथमेश नाईक , महानगरमंत्री, अभाविप

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान बघता मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत बीकॉम व पीएचडी पूर्वपरीक्षेचा विषय मांडला आहे. त्यावर सकारात्मक निर्णयही झाले आहेत. यापुढे पूनर्मूल्यांकनाची कारवाई लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- विजय सोनवणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगारासाठी ‘निम्मे’ उमेदवार!

$
0
0

१ हजार ११ जागांसाठी फक्त ५०५ जणांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्चशिक्षण असूनही नोकरी मिळत नसल्याची ओरड करणारे विद्यार्थी एकीकडे असताना दुसरीकडे शासनातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत अवघे निम्मे उमेदवार उपस्थित असल्याचे वास्तव बुधवारी दिसून आले.

रोजगार मेळाव्याला उमेदवारांची अल्प हजेरी हे समीकरण नित्याचे झाले असून यंदा १ हजार ११ जागांसाठी अवघे ५०५ उमेदवार उपस्थित होते. यामुळे रिक्त जागेमागे किमान एक उमेदवार, असे चित्रही यावेळी पहायला मिळाले नाही. यावरून उच्च शिक्षितांची रोजगार मेळाव्याकडे फिरलेली पाठ पुनश्च अधोरेखित झाली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे नॅशनल सिनीअर कॉलेज यांच्यातर्फे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा बुधवारी झाला. सारडा सर्कलवरील नॅशनल सिनीअर कॉलेजमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या मेळाव्यात ११ संस्थांतर्गत १ हजार ४४ पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या. दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. थेट मुलाखतीद्वारे मेळाव्यातून २४७ उमेदवारांची पदांवर प्राथमिक निवड झाली. जागांच्या तुलनेत निम्मे उमेदवार आणि उपस्थित उमेदवारांतूनही निम्म्याच उमेदवारांची निवड झाल्याचे दिसून आले.

नोकरी-व्यवसायाचा प्रश्न गंभीर असताना उमेदवार रोजगार मेळाव्याकडे पाठ फिरवत असल्याचे कायम घडत आहे. शासनानेही याचा गांभीर्याने विचारत करत मेळाव्याचे स्वरुप बदलण्याची गरज असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली. निवड झालेल्या या उमेदवारांना पदांवर लवकरच रुजू होण्यासंदर्भात व प्रशिक्षणासंदर्भात मेळाव्यात सहभागी संस्थांद्वारे कळवण्यात येणार आहे. मेळाव्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिकचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, विभागाचे अधिकारी संदीप गायकवाड, शंकर जाधव, संजिवनी नाईकवाडे, अशोक चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष हाजी नासिर पठाण, करिअर मार्गदर्शक मंगेश भणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या पदांसाठी मेळावा

फिटर, ट्रेनी, कॉम्प्युटर ऑपरेटर, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, स्प्रे पेंटर, सेल्स ट्रेनी, इंजिनीअर, मेकॅनिकल, वेल्डर, सेंटर ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर या पदांसाठी मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात दहावी, बारावी, बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमएससी, बीएससी, इंजिनीअरिंग, डिल्पोम उत्तीर्ण उमेदवार उपस्थित होते.

योजनांची माहिती

मेळाव्यात उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणाऱ्या सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ या अंतर्गत योजनांची माहिती देखील देण्यात आली. यासाठी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. उमेदवारांनी कर्मचाऱ्यांकडून योजनांची माहिती घेत नोंदणी केली.

तरुणांनी उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मोठे यश प्राप्त करण्यासाठी प्रथम मिळेल ती नोकरी स्वीकारणे गरजेचे आहे. कौशल्य आणि अनुभव प्राप्त करुनच करिअर घडते, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

- संपत चाटे, सहाय्यक संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी सोहळ्याचा महिमा तरुणाईच्या भक्तिरसातून

$
0
0

मटा विशेष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संत निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याला तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. असे असूनही या सोहळ्याला म्हणावी तशी भव्यता प्राप्त नाही. याउलट आळंदीतील संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा, देहू येथून निघणारा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वारकऱ्यांच्या मांदियाळीने गजबजून जातो, तशी मांदियाळी निवृत्तिनाथांच्या पालखीला लाभत नसल्याची खंत नाशिकमधील तरुण कीर्तनकारांच्या पिढीला जाणवू लागली आहे. त्यामुळेच सव्वाशे वर्षांची परंपरा सांगणारा संत निवृत्तिनाथांचा हा पालखी सोहळाही तेवढाच भव्यदिव्य करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण कीर्तनकारांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने अंमलबजावणीही सुरू झाली असून, पुढील पाच-दहा वर्षांत या सोहळ्यालाही विराट रूप देण्याचा मानस या तरुण कीर्तनकारांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे संत निवृत्तिनाथांचे संजीवन समाधिस्थळ. याच ब्रह्मगिरीच्या कुशीत निवृत्तिनाथांना योगिराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. भागवत धर्माच्या प्रचार- प्रसारासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व असलेल्या संत निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याला तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. अगदी सुरुवातीला खांद्यावरून, त्यानंतर बैलगाडीत चौपाळ्यावर पालखी ठेवली जाऊ लागली. नंतर लाकडी रथ आला अन् अलीकडच्या काळात चांदीच्या रथातून संत निवृत्तिनाथांची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्यामध्ये ३५ ते ४० हजार वारकरी बांधव सहभागी होतात. पालखी सोहळा मार्गक्रमण करतो तसा त्यामध्ये सहभागी होणाऱ्या वैष्णवांची संख्याही वाढत जाते. काळानुरूप पालखी सोहळ्याचे स्वरूप बदलते आहे; परंतु आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराजाइतका हा पालखी सोहळा भव्य झाला नसल्याचे शल्य नाशिकमधील तरुण कीर्तनकारांच्या पिढीला जाणवू लागले आहे. सव्वाशे वर्षांची परंपरा सांगणारा संत निवृत्तिनाथांचा हा पालखी सोहळाही तेवढाच भव्यदिव्य करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण कीर्तनकारांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक तरुण आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. कीर्तनसेवेच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचा वसा जोपासत आहेत. दरवर्षी न चुकता देहू किंवा आळंदी येथून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या कीर्तनकारांच्या या तरुण पिढीने आपण ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो त्या नाशिकमधील संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यालाही तेवढेच भव्य रूप देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवडसह अनेक तालुक्यांमधील तरुण वारकरी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन कीर्तनसेवा बजावत आहेत. हे तरुण स्वत: दिंड्यांच्या माध्यमातून संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होऊ लागले आहेत. नामदेव डोळस, माधव काजळे, नामदेव सगर, ज्ञानेश्वर तुपे, सागर दिंडे, अतुल तांबे, संतोष डोळस हे स्वत: वारकऱ्यांच्या मोठ्या समूहासह निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असून, हा सोहळा वाढविण्यासाठी निरंतर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वारकरी शिक्षण संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही देहू किंवा आळंदीतील पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायचो. या सोहळ्यांमधील गर्दी वाढतेच आहे. वारकरी संप्रदायात निवृत्तिनाथांनाही विशेष महत्त्व असताना तेवढी भव्यता या पालखी सोहळ्याला लाभली नाही, यांची खंत वाटते. त्यामुळे जाणीवपूर्वक हा सोहळा वाढविण्यासाठी त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अधिकाधिक सहभाग वाढवत येत्या पाच-दहा वर्षांत हा सोहळा भव्य करण्याचा आमचा मानस आहे.

- नामदेव डोळस, नांदूर वैद्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंत महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेश बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरात सगळीकडे प्रवेशाची धामधूम सुरू असतानाच पाथर्डी फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालयाने पहिल्या वर्षाचे सर्व वर्ग बंद करून त्यासाठीचे प्रवेश बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थाचालकांनी हा निर्णय यंदा घेतलेल्या या निर्णयात पुढे काही बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडेच प्रवेशाची धावपळ सुरू आहे. यातच पाथर्डी फाटा येथील सावंत महाविद्यालयाने पदवीच्या पहिल्या वर्गाचे प्रवेश बंद केल्याचे जाहीर केले आहे. यात बारावीचे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी तेथेच प्रथम वर्गाला प्रवेश घेण्यासाठी तयार होते मात्र महाविद्यालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांचे वर्ग मात्र सुरू ठेवले असून फक्त पहिल्याच वर्षांचे वर्ग बंद करण्यात आल्या असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. संस्थाचालकांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांची धावपळ झाली आहे.

सावंत महाविद्यालयाकडून यंदाच्या वर्षी पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. दरवर्षी या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. तसेच अनेक वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर हे महाविद्यालय सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या वर्षी विद्यार्थी वाढल्यास वर्ग पुन्हा सुरू होतील किंवा बंदही ठेवण्यात येतील. या वर्गापेक्षा फार्मसी महाविद्यालयाकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे

- अशोक सावंत, संस्थाचालक

पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद केल्याने मोठी अडचण झाली आहे. बारावीला विद्यार्थी येथे होते. त्यामुळे पहिल्या वर्षाचे अॅडमिशन याच महाविद्यालयात घेणार होतो; मात्र अचानकपणे पहिला वर्ग बंद करण्यात आल्याने प्रवेशाचे संकट उभे राहिले आहे. संस्थेने पालकांना विचारात घेणे गरजेचे होते.

- सुनिता डांगे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट सिंगल

$
0
0

जागतिक योग दिनानिमित्त आज योग वर्ग

नाशिक : शहरातील डिसुझा कॉलनीत असलेल्या प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने जागतिक योग दिनाननिमित्त आज दि. २० रोजी सकाळी ६.३० वाजता मंडळाच्या प्रांगणात योगरत्न सुचेता गुजराथी यांचे प्रात्यक्षिकांसह योग व प्राणायाम या विषयावर व्याख्यान होणार आहे. ज्यांना या वर्गात सहभागी व्हायचे आहे अशा व्यक्तींनी सतरंजी किंवा योगा मॅट घेऊन यावे. सहज करता येतील अशी योगासने या वर्गात करुन घेतली जाणार आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येक आसनांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व समजावून सांगितले जाणार

योग प्रात्यक्षिके

नाशिक : भारत सरकार नेहरू युवा केंद्राशी संलग्न शक्ती विकास अॅकॅडमी बहुउद्देशीय संस्थेतर्फे योग दिनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण तरुण हा मानसिक व बौद्धिक दृष्टीने सक्षम व्हावा, या हेतूने या कार्यक्रमात सूर्यनमस्कार, योग, ध्यान-प्राणायाम आदी विषयांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यात संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप, मोनाली चव्हाणके, मनीषा जगताप, सत्यजित महिरे, देविदास गांगुर्डे आदींनी मार्गदर्शन केले.

बौद्ध वधू-वर मेळावा

नाशिक : शांतिदूत तथागत बहुउद्देशीय विकास संस्था संचलित बौद्ध वधू-वर सूचक मंडळ यांच्यावतीने रविवार २३ जून रोजी दुपारी १२.३० ते ५ वाजेपर्यंत जत्रा हॉटेलशेजारील राधाकृष्ण पर्यटन लॉन्स येथे १२७ वा परिचय मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सूचीपुस्तिका वितरीत केल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम वसंतराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून एचएएलचे अधिकारी उत्तमराव सलावदे उपस्थित रहाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे मुंबईत उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड २००५ पूर्वी नियुक्त परंतु त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द केल्याच्या निषेधार्थ शिक्षण संघर्ष समितीतर्फे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची माहिती शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त परंतु त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी पारिभाषित अंशदान पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. या शासन निर्णयाला राज्यभरातील सर्व शिक्षक आमदारांसह सर्व शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांची एकीकृत अशी शिक्षण संघर्ष संघटनेतर्फे संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणासाठी नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करून नवीन पेन्शन योजनेचा शासननिर्णय रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा या सर्व शिक्षक संघटनांने पक्का निर्धार केला आहे. या उपोषणात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, मोहन चकोर, बी. डी. गांगुर्डे, बी. व्ही. पांडे, जी. ए. काटे, सचिन पगार, योगेश पाटील, नीलेश ठाकूर आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंगमध्ये अवाजवी वाढ

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधील पार्किंगचे दर दुप्पट, तिप्पट नव्हे, तर चक्क दहा पटीने वाढविण्याचे निश्चित झाले आहे. तसे टेंडरही निघाले आहे. रेल्वेस्थानकात पूर्वी दुचाकीसाठी चोवीस तासाला वीस रुपये दर होता. तो आता १२० रुपये राहील, तर चार चाकीसाठी २४० रुपये राहील. या दरवाढीची झळ नोकरदारांना बसणार आहे.

सविस्तर वृत्त... नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेवर सावट आचारसंिहतेचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० डच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या सावटाखाली आज, गुरुवारी (दि. २०) महासभा होत आहे. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णयांना फाटा देण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला आहे. त्यामुळे काही कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. या महासभेत केवळ विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा आज सकाळी ११.३० वाजता बोलाविण्यात आली आहे. महापालिका हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तसेच गावठाण भागात समूह विकास योजना अर्थात क्लस्टर डेव्हलपमेंट राबविण्यासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव या महासभेच्या पटलावर आहेत. याशिवाय, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती, वाहनचालकांचे आऊटसोर्सिंग, दिव्यांग खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती, मानधनावरील उद्यान निरीक्षकांना मुदतवाढ, एमआरआय व सिटी स्कॅन यंत्र खरेदी आणि डास निर्मूलनासाठी तीन वर्षे मुदतीच्या कंत्राटासाठी ३७.६५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावदेखील या महासभेच्या पटलावर आहेत. या प्रस्तावांवर महासभा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथूट प्रकरणातील दरोडेखोर हाती?

$
0
0

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुत्थुट फायनान्सवरील दरोडा, गोळीबार आणि खून प्रकरणात महत्वाचे धागेदोरे शहर पोलिसांच्या हाती लागले असून, दोन जण हाती लागले असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र, गुन्हेगारांभोवती पोलिसांनी फास आवळल्याचे स्पष्ट होत आहे. लवकरच संशयित हाती लागतील, असा विश्वास शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केला.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयात शुक्रवारी (ता. १४) दरोडेखोरांनी सकाळी अकराच्या सुमारास धिंगाणा घातला. सोने लुटण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी गोळ्या झाडल्याने मुरियाईकिरा संजू सॅम्युअल (वय २९, रा. मुंबई, मूळ केरळ) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कार्यालयाचे व्यवस्थापक चंद्रशेखर भास्कर देशपांडे (वय ६४, रा. इंदिरानगर) आणि कैलास जयन (वय २८, रा. मुंबई) हे कर्मचारी दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पोलिसांनाच आव्हान दिले आहे. या घटनेला २१ जून रोजी आठवडा पूर्ण होत असला तरी पोलिस हल्लेखोरांना अद्याप अटक करू शकलेले नाहीत. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली असून, ती विविध राज्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत. या पथकांकडून सुरू असलेल्या तपासाला काही प्रमाणात यश येऊ लागल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या गुन्ह्यात परप्रांतीय टोळी सहभागी असून, दोन संशयितांना गुन्हे शाखेने गुजरातमधून ताब्यात घेतल्याची चर्चा बुधवारी शहरात पसरली होती. ही टोळी आठ जणांची असून, ते उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचेही बोलले जात होते. मात्र, या वृत्तास पोलिस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरोडा पद्धत समान, मात्र आरोपी वेगळे

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुथूट फायनान्सवरील दरोडा प्रकरणातील मोडस ऑपरेंडी सारखीच असल्याचे बोलले जाते. नाशिक येथील गुन्ह्यातील संशयित तरुण असून, रावेर येथील विजया बँकेवरील दरोडा प्रकरणातील संशयित ४५ हून अधिक वयाचे आहेत. तसेच त्यांची भाषा खान्देशी असल्याचा दावा जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मोडस एक असली तरी आरोपी वेगवेगळे असण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुथूट फायनान्स प्रकरणातील संशयितांबाबतचे महत्त्वाचे धागेदोरे आमच्या हाती लागले आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये या घटनेची उकल होईल. संशयित लवकरच आमच्या ताब्यात असतील.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी सोहळा

संगीत दिनानिमित्त उद्या रंगणार ‘सौगात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३ वाजता कालिदास कलामंदिर येथे सौगात या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड व विद्यमान अध्यक्ष फारुक पिरजादे यांनी दिली.

जिल्ह्यात प्रथमच संगीत दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरुपाचा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील संगीत क्षेत्रात वावरणाऱ्या बहुतांश कलाकारांना एकत्रित बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. सौगात या कार्यक्रमाबरोबरच आपल्या कलेने संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळविलेल्या गायक वादकाचा सन्मान आणि गौरव यावेळी करण्यात येणार आहे. उदयोन्मुख अभिनेत्री शीतल आहिरराव व ज्युनिअर अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images