Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही पदांची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपत असली तरी, या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान महापौर व उपमहापौरांनी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता ही दोन ते अडीच महिने अगोदर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महापालिकांमधील महापौरांना मुदतवाढ देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. महापालिकेत प्रथमच भाजपला एकहाती बहुमत मिळाले होते. महापौर आणि उपमहापौराची १७ मार्च २०१७ रोजी निवडणूक होऊन या पदांवर अनुक्रमे रंजना भानसी आणि प्रथमेश गिते यांची निवड झाली. या दोघांची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वीच सोडत घेऊन निवडणूक घ्यावी लागणार आहे. मात्र, या दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असण्याची शक्यता आहे.

तर यांना मिळणार संधी

सध्याचे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे नव्या आरक्षणात हे पद खुल्या प्रवर्गासाठी मिळू शकते. तसे झाल्यास विद्यमान सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, विद्यमान भाजप आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, गणेश गिते आदींपैकी एकाला महापौरपदाची संधी मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रह्मा व्हॅलीत आज करिअर फेअर

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व ब्रह्मा व्हॅली पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १८) व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या करिअर फेअरचे उद्घाटन कॉलेजेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास तंत्रशिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे उपसचिव डॉ. आनंद पवार, सहसंचालक डॉ. ज्ञानेश्वर नाठे, शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख एस. डी. पाबळे, तंत्रशिक्षण मंडळाचे सहाय्यक संचालक डी. आर. दंडगव्हाळ आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून 'तंत्रशिक्षणातील संधी' या विषयावर डॉ. अविनाश शिरोडे, एमएस इंजिनीअरिंगचे संचालक के. एस. झाल्टे व अल्फा इंजिनीअरिंगचे घनश्याम तुप्पद आदींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावर आदळून दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगातील दुचाकी झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार झाला. अपघाताची घटना त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेल परिसरात झाली. अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला धडकली. अपघातात दोन जण जखमी झाले असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तुषार भाऊसाहेब शिंदे (वय २०, रा. अशोकनगर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. गोलू ऊर्फ सौरभ उपेंद्र सिंग (रा. श्रमिकनगर, सातपूर) आणि दत्तात्रय कृष्णा गायकवाड (रा. विंचुरे, ता. बागलाण) हे दोघे जखमी झाले. तिघे मित्र रविवारी (दि. १६) मध्यरात्री दुचाकीवरून (एमएच १५, एफवाय ६४७४) त्र्यंबकरोडने प्रवास करीत असताना ही घटना घडली. सातपूरच्या दिशेने जात असताना न्यायाधीश कॉलनी परिसरात भरधाव दुचाकीस अचानक कुत्रा आडवा गेला. कुत्र्याला वाचविताना दुचाकी रस्त्याच्या कडेस असलेल्या झाडावर आदळली. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तुषारचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज अखेरची मुदत

$
0
0

नाशिक : पॉलिटेक्निक विद्याशाखेत प्रवेश घेण्यासाठी आज (दि. १८) अंतिम मुदत आहे. पॉलिटेक्निकसाठी ८४ महाविद्यालयात २८ हजार जागा उपलब्ध आहेत. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी व पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात पूर्ण होईल. मागील वर्षापर्यंत अनिवार्य असलेली गणित (७१ कोड) व विज्ञान (७२ कोड) ही अट यंदाच्या वर्षापासून काढून टाकण्यात आली आहे. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आज (दि. १८) व उद्या पॉलिटेक्निक प्रवेशाबाबत मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याविषयी कृतज्ञता

$
0
0

पित्याविषयी कृतज्ञता

नाशिक : अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतचे विद्यार्थी उत्साहाने त्यामध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वडिलांविषयीची कृतज्ञता व आदरभावना व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आकर्षक शुभेच्छाकार्ड बनविले, दुसरीतील विद्यार्थ्यांनी हाताच्या पंजाच्या आकारात वडिलांनी आमच्यासाठी आतापर्यंत काय केले याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ताम्रपत्राच्या आकारातील शुभेच्छा कार्डवर वडीलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतरही वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बिटको'मध्ये लशीचा तुटवडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये सर्पदंश आणि रेबिज लसीचा तुटवडा असल्याची नागरिकांची तक्रार आहे. लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. बिटकोमध्ये रेबीज, सर्पदंश आणि इतर लसींचा तुटवडा असल्याने डॉक्टर व कर्मचारी रुग्णाला जिल्हा किंवा शालिमारच्या संदर्भ रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. लोकसभा आचारसंहितेमुळे लसीकरण खरेदी झाली नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, बिटकोमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांच्या सेवेवरही परिणाम होत आहे. बिटकोमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकोत लसचा तुटवडा

$
0
0

बिटकोत लसचा तुटवडा

नाशिकरोड : येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये सर्पदंश आणि रेबिज लसीचा तुटवडा असल्याची नागरिकांची तक्रार आहे. बिटकोमध्ये रेबीज, सर्पदंश आणि इतर लसींचा तुटवडा असल्याने डॉक्टर व कर्मचारी रुग्णाला जिल्हा किंवा शालिमारच्या संदर्भ रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. लोकसभा आचारसंहितेमुळे लसीकरण खरेदी झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

जुन्या शालेय वस्तू द्या

नाशिकरोड : जुनी शालेय वस्तू, वह्या-पुस्तके दान करण्याचे आवाहन नाशिकरोड 'मनविसे'ने पालकांना केले आहे. गरीब विद्यार्थ्यांना महागाईमुळे शालेय वस्तू खरेदी करता येत नाही. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मनविसे'ने हा उपक्रम हाती घेतला आहे. पाल्याची जुनी वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य मनविसेकडे दान करावे. त्याचे गरीब विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल, अशी माहिती मनविसेचे अध्यक्ष नितीन धानापुणे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथूटच्या तपासाला परराज्यात दिशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट फायनान्स कार्यालयात ज्या पद्धतीने सशस्त्र दरोडा पडला अगदी त्याच पद्धतीने परराज्यातील काही शहरांमध्ये यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यातील काही गुन्हेगार सध्या जेलमध्ये बंद आहेत, तर काही नुकतेच बाहेर पडले आहेत. या एका क्ल्यूच्या आधारे शहर पोलिसांनी आपला मोर्चा गुजरात, मध्यप्रदेश आणि हैदराबादकडे वळविला आहे. बाहेरून आलेल्या टोळीला नाशिक शहर किंवा जिल्ह्यातून मदत मिळाल्याचा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उंटवाडीरोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयात गत शुक्रवारी (दि. १३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सहा जणांनी दरोडा टाकला होता. अलार्म वाजवून नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सजू सॅम्युअल या युवा आयटी इंजिनीअरची हत्या आणि इतर दोघांना मारहाण करीत दरोडेखोरांनी पलायन केले होते. या घटनेला चार दिवस होऊन गेले आहेत. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. आरोपींचे अस्पष्ट छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत क्राइम ब्रँचच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणाल्या की, याच पद्धतीच्या घटना परराज्यातील काही शहरांमध्ये झाल्याचे समोर येत आहे. हे गुन्हे करणाऱ्या आरोपींपैकी काही सध्या जेलमध्येच असून, काही नुकतेच बाहेर पडले आहेत. हा धागा पकडून आमच्या काही पथकांमार्फत संबंधित शहरांमध्ये तपास करण्यात येत आहे. दरोड्याची घटना घडली त्यावेळी चौघांपैकी दोघे मराठीत बोलत होते. त्यामुळे या टोळीला शहर किंवा शहराच्या जवळपासच्या भागातून मदत मिळाल्याचे दिसते. शहरात त्या अनुषंगाने तपास करण्यात आला असून, आता शोधकार्याची दिशा शहराच्या जवळपासच्या भागाकडे वळविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाहनचोरी महत्त्वाचा धागा

दरोडेखोरांनी वापरलेल्या तीन दुचाकींपैकी एक आडगाव पोलिस ठाणे हद्दीतून २९ मे रोजी चोरी गेली होती. त्यानंतर या वाहनाचा क्रमांक बदलून १३ जून रोजी वापर करण्यात आला. उर्वरित दोन वाहनेसुद्धा चोरीची असावीत, अशी शक्यता आहे. २९ मे ते १२ जून या कालावधीत चोरीच्या दुचाकीच्या गुन्ह्याला चालना मिळणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. वाहनचोरीच्या या गुन्ह्यावर प्रकाश पडला, तर पुढील अनेक बाबींना चालना मिळू शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेहता हायस्कूलमेहता हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक म. टा. वृत्तसेवा, नाशि

$
0
0

मेहता हायस्कूल

नाशिकरोड : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ ज्युनीअर कॉलेजमध्ये शाळा प्रवेश सोहळा प्राचार्या अलका दुनबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उपप्राचार्या कल्पना रकिबे, पर्यवेक्षक दशरथ जारस, ग्रंथपाल सविता अरिंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बँड पथकासह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभावती धिवरे यांचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रभावती धिवरे यांनी सोमवारी (दि. १७) बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बोर्डात जनहिताचे विविध विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. निर्धारित कालावधीनुसार धिवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपचे नगरसेवक भगवान कटारिया हे (दि. २४) जून रोजी होणाऱ्या बोर्डाच्या विशेष सभेत उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. यावेळी नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, कावेरी कासार, मीना करंजकर, कर्नल राहुल मिश्रा यांच्यासह सीईओ अजय कुमार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत आता कंत्राटी फायरमन!

$
0
0

४५ जणांचे होणार आउटसोर्सिंग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधीच अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करणाऱ्या अग्निशमन विभागात सध्या कार्यरत असलेल्या फायरमनच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अग्निशमन विभागातील बहुतांश फायरमनने वयाची ५० वर्षे ओलांडल्याने कामास मर्यादा येत आहेत. त्यामुळे अग्निशमन विभागाने नव्या दमाचे ४५ फायरमन आऊटसोर्सिंगने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची तयारी केली आहे.

महापालिकेत सध्या मनुष्यबळाची कमतरता आह. त्याचा फटका अग्निशमन विभागालाही बसत आहे. या विभागात फायरमनची स्थायी स्वरुपातील १५१ पदे मंजूर आहेत. आतापर्यंत सुमारे ५४ फायरमन निवृत्त झाले आहेत. रिक्त पदांची २००६ पासून भरती झालेली नाही. त्यामुळे इतर फायरमनवर कामाचा अतिरिक्त काम निर्माण होत आहे. लोकसंख्या वाढत असताना, आपत्तीच्या काळात फायरमनची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यातच सध्या कार्यरत असलेले फायरमन्सनीही वयाची पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांचीही कार्यक्षमता कमी झाली आहे. अग्निशमन विभागात तरी नोकरभरतीला परवानगी द्या, अशी मागणी महापालिकेने सरकारकडे केली आहे. परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने तूर्तास ४५ फायरमन हे आऊटसोर्सिंगने भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सहा महिन्यांसाठी हे फायरमन घेतले जाणार आहेत. त्यासाठी ४० लाखांचा खर्च येणार आहे. पुढील महासभेवर हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटा वाजली, शाळा फुलली!

$
0
0

\Bचिमुरड्यांच्या स्वागत समारंभाने गजबजल्या शाळा\B

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्यात मुक्या झालेल्या शाळांच्या भिंतींना सोमवारी पुन्हा बोल फुटले. दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर या शाळांच्या सावलीत बागडणारे चिमुरडे पुन्हा परतल्याने शाळांचे प्रांगण अन् वर्गखोल्या गजबजून गेल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध शैक्षणिक संस्था आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे अनोखे उपक्रम राबविण्यात आले. गुलाबपुष्प, खाऊ देऊन मुलांच्या स्वागतासोबतच कुंकूवाच्या रंगात विद्यार्थ्यांची छोटीशी पावले उमटवून त्या पावलांचा ठसाही शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आला.

शहरात गेल्या आठवड्यात इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांना सुरुवात झाली. मराठी माध्यम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सोमवारी उघडल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी अगोदरपासूनच करण्यात आली होती. शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प, मिठाई, पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षणही करण्यात आले.

पावसाच्या चाहुलीने फुललेल्या धरतीप्रमाणेच चिमुरड्यांची चाहूल लागल्याने शाळांचे प्रांगण उत्साहाने बहरले होते. शाळांच्या प्रवेशद्वारापाशीच विद्यार्थ्यांच्या स्वागताची लगबग दिसून येत होती. चिमुरड्यांचे औक्षणाने होणारे स्वागत, त्यांच्या हाती प्रेमाने देण्यात येणारे गुलाबपुष्प, मुखात भरविली जाणारी मिठाई अशा वातावरणाने विद्यार्थीच नाही, तर त्यांना शाळेत सोडण्यास आलेले पालकही भारावल्याचे चित्र काही ठिकाणी बघण्यास मिळाले. काही शाळांनी पहिल्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सुटीमुळे सुनी-सुनी झालेली शाळांची मैदाने शाळेच्या पहिल्याच दिवसामुळे गजबजून गेली होती. शाळेच्या वर्गखोल्यांमध्येही आकर्षक सजावट करण्यात आली होती. काही पालकांना दीर्घसुटीनंतर आणि काही पालकांसाठी पहिल्यांदाच पाल्यास शाळेत सोडण्याचा क्षण असल्याने अनेकांनी पाल्याला स्वहस्ते शाळेत सोडण्यास प्राधान्य दिले. यामुळे शाळेत पाऊल ठेवताना अनामिकशी हुरहूर पालक अन् पाल्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसून आली. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरागस डोळेही पाणावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलगाडीतून आली विद्यार्थ्यांची स्वारी

$
0
0

'चला शाळेत चला', 'साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा', अशा घोषणा देत बैलगाडीतून विद्यार्थ्यांची स्वारी शाळेत दाखल झाली. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत गावकऱ्यांचे लक्ष वेधणारे ठरले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले गेले. यावेळी सवाद्य विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंश, रेबिज लसचा ‘बिटको’मध्ये तुटवडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये सर्पदंश आणि रेबिज लसीचा तुटवडा असल्याची नागरिकांची तक्रार आहे. लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

बिटकोमध्ये रेबीज, सर्पदंश आणि इतर लसींचा तुटवडा असल्याने डॉक्टर व कर्मचारी रुग्णाला जिल्हा किंवा शालिमारच्या संदर्भ रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. लोकसभा आचारसंहितेमुळे लसीकरण खरेदी झाली नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, बिटकोमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांच्या सेवेवरही परिणाम होत आहे. नाशिकरोड व परिसरातील गावांमधील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी बिटको हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. दोनशे खाटांचे हॉस्पिटल असणाऱ्या बिटकोमध्ये अनेक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना नाईलाजाने खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक आत्महत्येचा महिलांचा इशारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दारू दुकान स्थलांतरीत करा अशी मागणी वारंवार करूनही कुठलीच कार्यवाही होत नसल्याने संतप्त महिलांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जानोरी गावातील एका व्यक्तीचा दारुमुळे सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे गावातील दारू दुकान बंद करावे अन्यथा इतरत्र स्थलांतरीत करावे, या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर महिनाभर हे दुकान बंद करण्यात आले. हे दुकान स्थलांतरीत करण्यासाठी दिंडोरी पोलिसांच्या मध्यस्थीने पाच महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु, तरीही हे दुकान स्थलांतरीत केले गेले नाही. याबाबत पोलिसांना विचारणा करणाऱ्या महिलांना तुमच्यावरच गुन्हे दाखल करू असे धमकावण्यात आले. गाव दारूमुक्त व्हावे यासाठी महिलांनी अभियान राबविण्यास सुरुवात केली असून, दुकानचालक गावातील काही व्यक्तींना हाताशी धरून महिलांना शिवीगाळ करीत आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिस याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने महिलांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी शैला उफाडे, ममता वाघमारे, अलका पवार, सुमन घोरपडे, रेखा मंजुळकर, सिंधूबाई धोंगडे, अलका साबळे, कचाबाई चारोस्कर, अलका चारोस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शेतातील मशागतीचे काम आटोपून घराकडे जाणाऱ्या दोडी येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी चारच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवृत्ती सखाराम आव्हाड हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरीपपूर्व मशागतीचे काम आटोपून घराकडे जात होते. यादरम्यान एक ओहोळ चढून जात असताना अचानक विद्युततारा समोर दिसल्याने ट्रॅक्टर वळविण्याच्या प्रयत्नात जवळच्याच ५० फूट खोल विहिरीत ते ट्रॅक्टरसह पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी निवृत्ती यांना विहिरीबाहेर काढून दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. मुंढे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविले. मात्र रात्री अकरा वाजे सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीकडून ‘ईव्हीएम हटाव’साठी घंटानाद

$
0
0

धुळे, चाळीसगावसह रावेरला मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

वंचित बहुजन आघाडीकडून ‘ईव्हीएम हटाव’साठी सोमवारी (दि. १७) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार अमोल मोरे व सहाययक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांना देण्यात आले. मोर्चात शेकडो महीला कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच ४८ लोकसभा मतदारसंघातील झालेले मतदान व मोजणीत आलेले मतदान यात तफावत असून, निवडणूक प्रक्रिया रद्द करून ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी तालुकाध्यक्ष संभा जाधव म्हणाले की, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ‘ईव्हीएम मशीन हटाव’साठी मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चात वसंत मरसाळे, सोनाली लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नितीन मरसाळे, विशाखा राठोड, मयूर बागूल, मुख्तार कुरेशी, भिमराव जाधव, कांतीलाल राठोड, भाईदास गोलाईत, देविदास मोरे, आप्पासाहेब रावते यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धुळ्यात घंटानाद आंदोलन
धुळे : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात ईव्हीएम प्रक्रियेत अनियमितता असल्यामुळे ईव्हीएम प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भारिप जिल्हाध्यक्ष भैय्या पारेराव, राज चव्हाण, अरविंद निकम, योगेश जगताप, सुरेश मोरे, नाना महाले, दीपक डेंगरे, नितीन म्हसरे, नितीन वाघ, एस. व्ही. सोनवणे, सुनंदा निकम, नामदेव बोरसे, शोएब शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेरला तहसीलदारांना निवेदन
रावेर : शहरातील तहसील कार्यालयासमोर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघातर्फे ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, महेश तायडे, सुरेश अटकाळे, सलीम शहा, राजकुमार इंगळे, राजेंद्र अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजेश रायमळे, सुरेश ठाकणे, मुबारक तडवी, भिकारी तडवी, शेख वसीम, शे. अकबर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णहाल

$
0
0

केवळ आपत्कालीन रुग्णांवर उपचार; सिव्हिलमध्ये गर्दी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात ‘आयएमए’ या संघटनेतर्फे सोमवारी (दि. १७) सकाळी पहाटे सहा वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासाचा बंद पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या या संपामुळे जळगाव जिल्ह्यात रुग्णसेवा विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात रुग्णहाल झाले. खासगी दवाखाने बंद असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढला होता.

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आयएमए या संघटनेतर्फे सोमवारी (दि. १७) २४ तासाचा बंद पुकारण्यात आल. त्यामुळे सोमवारी जवळजवळ सर्व खासगी हॉस्पिटल बंद होते. ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थांना संपाची कल्पना नसल्याने ते जळगावात उपचारासाठी आले असता त्यांना विना तपासणीच माघारी परतावे लागले. हॉस्पिटल्स बंद असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची सकाळपासून गर्दी झाली होती.

नातेवाइकांना मनस्ताप
डॉक्टरांचा संप असल्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या तसेच शहरातील रुग्णांचे चांगलेच हाल झालेत. तपासणी व उपचारासाठी अनेक रुग्णांना त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. मात्र, ओपीडी बंद असल्याचे सांगितल्याने रुग्णांना घरी परत न्यावे लागले. तर काही नातेवाइकांनी उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथेही गर्दी असल्याने नातेवाइकांची फिरफिर होत त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

अत्यावश्यक सेवा सुरू
डॉक्टरांचा बंद असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या तसेच आयसीयूमधील रुग्णांवर उपचार सुरू होते. तसेच ज्या महला डिलेवरीसाठी आल्या त्यांच्यावर देखील उपचार करण्यात येत आहेत. लखवा, हृदयविकार अश्या आपत्कालीन रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आयएमने दिली. शहरातील व. वा. वाचनालयाजवळ असलेल्या डॉ. जे. जी. पंडित आय. एम. ए. हॉल येथील कै. डॉ. दावलभक्त सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या वतीने बैठक घेण्यात आली. या वेळी सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी कुठलाही हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असे झाल्यास तत्काळ त्यांना फोन करावा असे आवाहन केले. अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रताप जाधव, डॉ. विलास भोळे, डॉ. अर्जुन भंगाळे डॉ. सुदर्शन नवाल आदींनी झालेल्या घटनेचा निषेध केला.

धुळ्यातही निषेध
धुळे : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानूष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी धुळ्यातही सोमवारी आयएमए संघटनेकडून निषेध नोंदविला गेला. कोलकाता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आयएमए असोसिएशनने आज (दि. १८) भारत बंद पुकारला आहे. या बंदला धुळ्यातील डॉक्टरांचा पूर्ण पाठिंबा देत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. २०१० मध्ये पारित झालेला डॉक्टर संरक्षण कायदा हा प्रभावीरित्या अंमलात आणावा, अशी मागणी धुळ्यातील डॉक्टरांनी केली. तसेच २०१६ मध्ये राज्य सराकरणे वैद्यकीय सुरक्षेबाबत दिलेले आश्‍वासने आजपर्यंत पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक संस्थेची निवडणूक जाहीर

$
0
0

२९ जागांसाठी २० जुलै रोजी मतदान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. २० जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. २९ जागांसाठी १५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असा अंदाज आहे.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांसाठी नव्याने कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रभाकर धात्रक, हेमंत धात्रक, धर्माजी बोडके, अॅड. तानाजी जायभावे, माणिक सोनवणे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ विश्वस्त मंडळाचे सहा सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहचिटणीस या चार पदांसह एकूण २९ पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. नाशिक आणि सिन्नर तालुक्यासाठी प्रत्येकी तीन जागांसाठी, इगतपुरीच्या चार, निफाड व चांदवड तीन, येवला व मालेगाव दोन, नांदगाव, बागलाण, कळवण तालुक्याच्या दोन, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्याच्या तीन जागांसाठी ही निवडणूक होईल. याशिवाय, दोन जागा महिला प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अॅड. गजेंद्र सानप, अॅड. अशोक कातकाडे, अॅड. संतोष दरगोडे यांची निवड करण्यात आली आहे. लवाद म्हणून अॅड. एस. जी सोनवणे यांची नियुक्ती केल्याची माहिती हेमंत धात्रक यांनी दिली. निवडणुकीची सर्व प्रक्रिया संस्थेच्या आवारातच पार पाडण्यात येणार आहे. बॅलेट पेपरद्वारे निवडणूक होणार असून, संस्थेचे ८ हजार ७०० सदस्य मतदान करू शकणार आहेत. मतमोजणी त्याच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या ज्या सदस्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांचे मृत्यूचे दाखले संस्थेच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.

'विरोधकांकडून दिशाभूल'

निवडणूक प्रक्रिया राबविण्यास विद्यमान कार्यकारिणी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप दोन महिन्यांपासून विरोधक करीत आहेत. परंतु, त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला. निवडणुकीच्या ३० दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. मतमोजणी २१ जुलैला होणार असल्याने ३० दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. संस्थेच्या घटनेचाही अभ्यास नसलेल्या विरोधकांनी आरोप केले असले तरी त्यात तथ्य नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्ही. एन. नाईक संस्था

जागा : २९

सदस्य : ८ हजार ७००

मतदान : २० जुलै

मतमोजणी : २१ जुलै

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत गोठ्यांवर पडणार हातोडा

$
0
0

दोन दिवसात पोलिस बंदोबस्तात पूर्व विभागापासून कारवाईला होणार प्रारंभ

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिृत गोठ्यांवरील कारवाईला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनवणे नाशिक पोलिसांसोबत बैठक घेत गोठ्यांवर कारवाईसाठी आवश्यक असलेला पोलिस बंदोबस्त मिळविला आहे. त्यामुळे अतिक्रमण, नगररचना आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी नाशिक पूर्वमधील अनधिकृत गोठ्यांची मंगळवारी पाहणी केली. येत्या दोन दिवसांत ३८ गोठे हटविण्यास सुरुवात होणार आहे.

शहरात अनधिकृत गोठ्यांचे प्रमाण वाढल्याने अस्वच्छतेसह नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यातच अनधिकृत गोठेधारकांकडून गोठ्यांमधील मलजल थेट महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये टाकले जात असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. आजमितीस शहरात जनावरांचे ९६६ गोठे आहेत. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड या भागात सर्वाधिक गोठे आहेत. शहरात गोठे स्थापन करताना सरकारच्या दुग्ध विकास विभाग, तसेच महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. दुग्ध विकास विभागाने २०१७ मध्ये ८१५ गोठ्यांना परवानगी दिली होती. मात्र, महापालिकेच्या पाहणीत ९६६ गोठे आढळून आले. त्यामुळे जवळपास १५१ गोठे विनापरवाना सुरू होते. त्यामुळे दुग्ध विकास विभागाने डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत शहरातील अनधिकृत गोठे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागानेही सर्वेक्षण करीत शहरातील अनधिकृत गोठेधारकांना नोटिसा बजावत गोठे शहराबाहेर स्थलांतरीत करण्याचे सूचित केले होते. वडाळा रोडवरील जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र, शेणामुळे तुंबलेले ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उरतलेल्या हेमंत मडके नावाच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याची घटना फेब्रुवारीत घडली होती. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच अनधिकृत गोठे हटवण्याची कारवाई करण्याचेही फर्मान काढले होते. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन विभागाने एप्रिलमध्ये नाशिकरोड विभागातील १६ अनधिकृत गोठ्यांवर कारवाई केली. परंतु, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही कारवाई थंडावली होती. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करता आली नाही. त्यामुळे महापालिकेने पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोनवणे यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन बंदोबस्त मिळवून घेतला. तसेच, नाशिक पूर्वमधील ३८ गोठ्यांची संयुक्त पाहणीही केली. त्यामुळे दोन दिवसात या ३५ गोठ्यांवर कारवाई सुरू होणार आहे.

..

न्यायालयात धाव

नाशिकरोड विभागात १६, नाशिक पूर्व ३८, पंचवटी विभागात ५५ व नाशिक पश्चिम विभागामध्ये ७ अनधिकृत गोठे आढळून आले. नाशिक पूर्व विभागातील तीन गोठेधारकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेतले, तर आठ जणांनी पालिकेच्या या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images