Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आज जनस्थान फेस्टिवल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जनस्थान' या व्हॉट्स ऍप ग्रुपच्यावतीने साजऱ्या होणाऱ्या 'जनस्थान फेस्टिवल'ची सुरुवात रंगभान या चित्र-शिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनाने होणार आहे. शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते तसेच फ्रावशी अकादमीचे रतन लथ व चित्रकार बाळ नगरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता कुसुमाग्रज स्मारकात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.

शहरातील नामवंत चित्रकारांची चित्रे आणि शिल्पे प्रदर्शनात मांडली जाणार असून, नव्या पिढीला रंगभान यावे, जीवनातील रंगांचे महत्त्व कळावे हा प्रदर्शनामागील हेतू आहे. प्रदर्शनात सहभागी चित्रकार-शिल्पकार प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. प्रदर्शनाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले असून, १७ ते १९ जूनपर्यंत नाशिककर रसिकांसाठी हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. सी. एल. कुलकर्णी, केशव कासार, अनिल माळी, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदन दीक्षित, शीतल सोनवणे, स्नेहल एकबोटे, संदीप लोंढे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, राजा पाटेकर आदींच्या चित्र-शिल्पांचा आनंद यावेळी उपस्थितांना घेता येईल. या प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जनस्थानच्या सर्व सभासदांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निवडणुका बंद’चे काँग्रेसकडून स्वागत

0
0

(राजकारण लोगो)

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर काँग्रेस पक्षाने नव्याने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. युवक काँग्रेस आणि एनएसयूआय यांसारख्या संघटनांच्या निवडणूक पद्धतीमुळे निष्ठावान कार्यकर्ते पक्षापासून दूर गेल्याच्या निष्कर्षापर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी पोहोचले आहेत. ही निवडणूक पद्धती बंद करण्याचा निर्णय गांधी यांनी घेतला असून, नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सहा महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारणाऱ्या या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पदे वाचणार की, कार्यकारिणी बरखास्त होऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न काँग्रेसने पाहिले. परंतु सत्ता मिळविणे दूरच\R, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची संधी देखील मोठ्या मुश्किलीने मिळेल, अशी पक्षाची सध्या स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणे शोधली जात असून, पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सरसावले आहेत. युवक काँग्रेस तसेच एनएसयूआय यांसारख्या संघटनांनी आक्रमक असणे आवश्यक असतानाही तसे चित्र दिसत नसल्याचे निरीक्षण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नोंदविण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेद्वारे या संघटनांचे अध्यक्ष निवडले जात असून, यामुळे निष्ठावान कार्यकर्ते डावलले जाऊन धनदांडग्यांना संधी मिळाल्याच्या निष्कर्षापर्यंत गांधी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आले आहेत. निवडणूक प्रक्रियेमुळे संघटना मजबूत होण्याऐवजी पक्षात अंतर्गत कलह आणि गटबाजी फोफावल्याचे चित्र सर्वदूर पहावयास मिळते आहे. छत्तीसगढसह अन्य काही राज्यांत अशा गटबाजीचाच पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यापुढे संघटनांचे पदाधिकारी निवडण्यासाठी निवडणुका न घेण्याचा निर्णय गांधी यांनी घेतला आहे. या निर्णयाचे नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केले आहे.

-

कोट

वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असा विश्वास आहे. जिल्ह्यातील युवक काँग्रेसला बळकटी देण्यासाठी सर्व तालुक्यातील युवकांना भेटून मोटबांधणी केली जाईल. निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा तिसरा गट तयार करून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू.

दर्शन पाटील, शहर काँग्रेस प्रवक्ता

-

बरखास्तीची शक्यता

नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वीच निवडणुकीच्या माध्यमातून या संघटनांवर पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. या संघटनांनी अद्याप पूर्ण ताकदीनिशी काम करण्यास सुरूवात केलेली नाही. स्वप्नील पाटील हे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष असून, दिनेश चोथवे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ बाकी असला तरी राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे विद्यमान कार्यकारिणी वरिष्ठ पातळीवरून बरखास्त केली जाऊ शकते, अशी शक्यता पक्षातील सूत्रांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ फिडे रेटिंग स्पर्धेत वरुण अजिंक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे), अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने मुंबई येथे १३ ते १६ जून दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या वरुण संजय वाघ याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

शेवटच्या व निर्णायक फेरीत त्याने श्रीलंकेच्या जी जुडेडोरीसन याच्याशी डाव बरोबरीत सोडविला. वरुणला १ लाख २० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले व या कामगिरीच्या आधारे त्याने आपल्या गुणांकनात ७५ गुणांची भर घातली. नाशिकचा सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराती नंतर एवढी मोठी रक्कम जिंकणारा पहिलाच बुद्धिबळ खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत एकूण ३९६ खेळाडूंचा सहभाग होता त्यापैकी २७४ खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते. वरुणने १० सामन्यात ८ गुण वसूल केले. त्यात सात सामन्यात विजय, एका सामन्यात पराजय व दोन सामने त्याने बरोबरीत सोडवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रे बाळगणारे चौघे जण गजाआड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चाकू, कुकरीसह घातक हत्यारे बाळगणाऱ्या पुणे येथील चार संशयितांना सीबीएस येथील एका लॉजमधून सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. हॉटेल तपासणी सुरू असताना संशयित पोलिसांच्या हाती लागले होते.

निखील उमाकांत तावरे (२२, रा. शास्त्रीनगर, पुणे), शुभम संदीप उत्तेकर (१८, रा. गांधीनगर, पुणे), अक्षय गणेश लोले (२२, रा. शिवाजीनगर , पुणे) आणि दत्ता नारायण गिरे (२५, रा. टिंगरेनगर, श्रमिकनगर, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मुथूट फायनान्स कार्यालयातील सशस्त्र दरोडोच्या पार्श्वभूमीवर हॉटेल तसेच लॉजेसची सातत्याने तपासणी केली जाते आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून सराईत आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे, गुन्हे शोथ पथकाच्या उपनिरीक्षक योगिता नारखेडे, कर्मचारी तानाजी भोये, मरकड, शेळके यांच्या पथकाने सीबीएस जवळील हॉटेल पदमामध्ये तपासणी करीत असताना रूम नंबर २०९ मध्ये चार युवक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने त्यांची झडती घेतली असता बॅगमध्ये कुकरी, मोठा चाकू तसेच इतर घातक हत्यारे आढळून आली. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांच्यावर शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या संशयित आरोपींचा आणि सशस्त्र लुटीचा संबंध पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाटोरीत आत्महत्त्या

0
0

जेलरोडला सर्पदंशाने

महिलेचा मृत्यू

नाशिक : विषारी सर्पदंश झाल्यामुळे सुमित्रा अशोक जाधव (४४,रा. दसकगाव, जेलरोड) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दसक येथे घडली. जाधव यांना रविवारी (दि. १६) सकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळ विषारी कीटकाने दंश केला. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.

तरुणाची आत्महत्त्या

नाशिक : निफाड तालुक्यातील चाटोरी येथील अजय भाऊसाहेब हांडगे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वडील भाऊसाहेब हांडगे यांनी उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

--

चिमुकल्यांना विषबाधा

नाशिक : जिगर जगदीश भोई (८), विजय अंकुश परदेशी (७, दोघे रा. आळंदी डॅम, ता. दिंडोरी) या चिमुकल्यांनी चुकून एरंडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाली. घराजवळ खेळत असताना दोघांनी शनिवारी (दि. १५) दुपारी चार वाजेच्या सुमारास एरंडाच्या बिया खाल्ल्या होत्या. विषारी बियांमुळे त्रास झाल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बालकांची प्रकृती स्थिर आहे.

उंचावरून पडल्याने मृत्यू

नाशिक : पेटिंगचे काम करीत असताना पहिल्या मजल्यावरून पडून साकीर शेख (२२, रा. दामोदर चौक, पाथर्डी फाटा) या युवा कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विजयनगरमध्ये इमारतीचे रंगकाम करीत असताना ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा (रविवारसाठी)

0
0

बालकथा - (रविवारसाठी) - मुख्य अंकाकरिता

चिंगी आणि मुंग्या

भरत पाटील, नाशिक

एका जंगलाच्या परिसरात छोटोसे सुंदर घर होते. घरात चिंगी नावाची मुलगी राहत होती. चिंगीच्या घरात एका दिवशी खूप मुंग्या येतात. मुंग्या घरात मिळेल तिथून अन्न गोळा करतात. हे अन्न मुंग्या वारुळात घेऊन जात असल्याचे चिंगी पाहत असते. चिंगीचा स्वभाव फार खोडकर असल्याने ती एकटक मुंग्यांच्या रांगेकडे लक्ष देत होती. तेव्हा तिला मुंग्यांची गंमत करावी, असे वाटले.

चिंगी मुंग्यांची रांग मोडून त्यांना मारत होती. यामुळे काही वेळातच सर्व मुंग्या निघून गेल्या. काही मुंग्या जखमी झाल्या, तर काही वारुळात जाऊन बसल्या. चिंगी हे नेहमी करु लागली. यात तिला गंमत वाटायची, पण मुंग्यांचा जीव त्यामुळे जात होता. मुंग्यांना वारुळात नेण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नव्हते. त्यात चिंगीच्या आगाऊपणामुळे मुंग्यांना त्रास सहन करावा लागत होता. या घटनामुळे मुंग्यांना त्रास होत असल्याचे मुंग्यांच्या राजा आणि राणीच्या लक्षात आले. यावरून राज्यात नेमका काय गोंधळ सुरू आहे, याची माहिती काढण्याचे आदेश राजाने गुप्तहेरांना दिली. गुप्तहेरांनी चिंगीच्या वागणुकीची माहिती राज दरबारी दिली. राजाने इतर मुंग्यासोबत जात चिंगीचे वर्तन पाहिले. चिंगी मुद्दाम गंमत म्हणून हे कृत्य करत होती. त्यात बऱ्याच मुंग्यांना दुखापत होत होती. हे पाहून राजाला संताप अनावर झाला. चिंगीला चांगली अद्दल घडवायला हवी, असे राजाने ठरविले.

त्यांनी मुंग्यांची सभा घेतली. सभेत सर्व मुंग्यांना राजाने सूचना केली, 'आता आपण चिंगीला धडा शिकवू. तिच्या गैरवर्तनाची शिक्षा मिळायला हवी.', असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी चिंगी ठरलेल्या वेळी मुंग्यांची वाट पाहत होती. एकही मुंगी दिसत नसल्याने चिंगी हिरमुसली. मुंग्या न आल्याचे पाहत ती जमिनीवरच झोपली. यानंतर सर्व मुंग्या राजाराणीसोबत घरात शिरल्या. ठरल्याप्रमाणे चिंगीला अद्दल घडवायची म्हणून मुंग्यांनी चिंगीला चावा घेण्यास सुरुवात केली. चिंगीला वेदना होऊ लागल्या. ती उठून बसली. इतक्या मुंग्या पाहून ती घाबरली. रडू लागली.

राजाला तिने विनवणी केली. राजाने तिला तिचे गैरवर्तन लक्षात आणून दिले. तिला तिची चूक समजली. तिने सर्व मुंग्यांची माफी मागितली. चिंगीने भाकरीचे तुकडे आणि दाणे मुंग्यांसमोर टाकले. याने मुंग्यांना आनंद झाला. यानंतर राजासह मुंग्यांनीही चिंगीला चावा घेतल्याबाबत खेद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशीपासून चिंगी आणि मुंग्या एकमेकांचे मित्र झाले. चिंगीने त्यांच्यासाठी अन्न पाण्याची सोय घराच्या कोपऱ्यात करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलखांब दिन साजरा

0
0

नाशिक : विश्व जिज्ञासा मंडळ संचलित विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अॅकेडमीतर्फे मलखांब दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरलेला मलखांब व दोरीवरच्या मलखांबावरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. चारही शाखांत मलखांबची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूल हिरावाडी शाखेत एकूण ३० खेळाडूंनी सहभाग घेऊन ४८० साध्या उड्या मारल्या, शिवसत्य क्रीडा मंडळ, गंगापूर रोड शाखेत एकूण ३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन ५१० साध्या उड्या मारल्या. गणेश व्यायामशाळा जेलरोड येथे ३० खेळाडूंनी सहभाग घेऊन ८९२ साध्या उड्या मारल्या. इगल स्पोर्ट्स कलब नाशिकरोड येथे २५ एनआयए व खेळाडूंनी इगल स्पोर्टस क्लब शाखेत २५ खेळाडूंनी २४० उड्या मारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारासाठी अर्ज पाठवा

0
0

पुरस्कारासाठी

अर्ज पाठवा

नाशिक : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-‍शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वीरशैव-लिंगायत समाजासाठी, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घेण्यात येणार आहे. तसेच इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत यासाठी व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात. इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाजक कल्याण, नाशिक या कार्यालयात सीलबंद लिफाफ्यात ३० जूनपर्यंत अर्ज सादर करावयाचा आहे. सदर पुरस्कारासाठी २०१९-२० या वर्षासाठी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राची वाजे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बावीस कोटींच्या रस्ते कामांना तत्त्वतः मंजुरी

0
0

खासदार डॉ. भारती पवारांचे काम सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील २२ कोटींच्या रस्ते कामांना तत्त्वतः मंजुरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. खासदार डॉ. भारती पवार यांनी मतदार संघाचा विकासासाठी संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची सद्यस्थितीची पाहणी करून तसा अहवाल मागवला. त्यानंतर मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यात निधीची मागणी केल्यानंतर त्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले.

गेली अनेक दिवसांपासून दिडोंरी मतदार संघातील रस्त्यांची झालेली दुर्दशा झाली आहे. त्यासाठी रस्ते सुधारणा, मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पूल बांधकाम, आदी कामांसाठी पावसाळी अधिवेशनात मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. दिंडोरी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून, त्यात ही कामे केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ विस्तारात ‘ठेंगा’च

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकला ठेंगा देत जिल्ह्यातील एकाही आमदाला भाजपने संधी न दिल्यामुळे सर्वस्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेले काही वर्षे मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांपैकी एकाला हे पद मिळेल अशी चर्चा होती. पण, विस्ताराच्या शपथविधीत एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही.

विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. यात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसेचे वर्चस्व होते. तरी भाजपने चार आमदार निवडून दिले. त्यातील तीन आमदार हे नाशिक शहरातील आहे. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही भाजपला पहिल्यांदा मोठे यश मिळाले. तर नाशिक महापालिकेत बहुमताची सत्ता आली. लोकसभेतही भाजपवर विश्वास दाखवत एक जागा दिली. त्यामुळे भाजपला मंत्रीपद मिळेल ही सर्वांची अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली.

भाजपच्या चार पैकी तीन आमदारांना राजकीय वारसा आहे. आमदार डॉ. राहुल आहेर हे माजी मंत्री डॉ. दौलतराव यांचे पुत्र आहे. त्याचप्रमाणे आमदार प्रा. देवयानी फरांदे या विधान परिषदचे माजी सभापती ना. स. फरांदे तर आमदार सीमा हिरे या माजी प्रदेश चिटणीस पोपटराव हिरे यांच्या स्नुषा आहे. या तिघांकडे वारसा असला तरी त्यांनी दिर्घकाळ नगरसेवक व संघटनात्मक पदे व कामातून आपली वेगळी ओळखही तयार केली आहे. आमदार बाळासाहेब सानप यांना राजकीय वारसा नसला तरी त्यांनी आपले वर्चस्व भाजपमध्ये निर्माण केले आहे. १९९७ पासून ते राजकारणात आहे. नगरसेवक, उपमहापौर, महापौर पद त्यांनी भूषवत शहरात मोठे संघटन वाढवले आहे. सध्या त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदही आहे. अशी सर्वांची भक्कम बाजू असताना या चारही जणांना ठेंगा दाखवण्यात आला आहे.

जिल्ह्यात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले असते तर त्यांचा फायदा सर्वांना झाला असता. त्यातून भाजपचे वर्चस्वी आणखी वाढले असते. अवघ्या चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो.

भुसेंचे लक्ष्य मालेगाव

शिवसेनेने आमदार दादा भुसे यांना राज्यमंत्रीपद दिले. त्यांनी आपले लक्ष मालेगाव ठेवल्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्याकडे तसे दुर्लक्षच झाले. त्यातही भुसे यांना अगोदर सहकारचे व नंतर ग्रामविकासाचे पद मिळाले. मात्र, त्यातून जिल्ह्याला अपेक्षित फायदा झाला नाही.

पालकमंत्री उपरेच

आतापर्यंत काही अपवाद वगळता पालकमंत्री पद हे जिल्ह्यातील आमदाराकडे राहिले आहे. पण, गेले साडेचार वर्षे हे पद जळगावचे आमदार असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे पूर्णपणे कधीही लक्ष नाशिक जिल्ह्याकडे दिले नाही. त्यात त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते आजही सर्वांना उपरेच वाटतात. त्याचा परिणाम मंत्री पदावरही झाल्याचे बोलले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेत शनिवारी प्रवेशोत्सवानिमित्त 'आनंद मेळा‌वा' घेण्यात आला. शाळेचा पहिला दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरवा, या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास शाळेचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक प्रथमेश कोरगावकर, विशाखा भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अॅड. अंजली पाटील, संस्थेचे सदस्य बाबा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शरद गीते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या अहिरे, आनंदवन विभागाच्या मुख्याध्यापिका पूनम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यात विविध खेळ आणि शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले. वृक्ष पूजन करत मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून झुम्बा डान्स करीत विद्यार्थ्यांना जल्लोष करण्याची संधी देण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार नावीन्यपूर्ण खेळ खेळले गेले. आनंदवन बालमंदिराच्या मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचे औक्षण करत स्वागत करण्यात आले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात नृत्यासह खेळ खेळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५८१९ उमेदवारांनी दिली एमपीएससी पूर्व परीक्षा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी घेतलेल्या गट क सेवा पूर्व परीक्षेला नाशिकमध्ये ५८१९ उमेदवार सामोरे गेले. ११८९ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. राज्य सरकारच्या वित्त, राज्य उत्पादन शुल्क आणि सामान्य प्रशासन विभागातील गट क वर्गातील रिक्त २३४ पदांसाठी रविवारी पूर्व परीक्षा घेण्यात आली. यामध्ये वित्त विभागातील कर सहायक पदाच्या सर्वाधिक १२६ जागा आहेत. सामान्य प्रशासन विभागातील लिपिक टंकलेखक मराठीच्या ६८ आणि इंग्रजीच्या सात जागांसह राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या ३३ जागांसाठी ही परीक्षा प्रक्रीया राबविण्यात आली. सकाळी ११ ते १२ या वेळेत ही परीक्षा

घेण्यात आली. परंतु त्याकरिता उमेदवारांना सकाळी साडे नऊ वाजताच परीक्षास्थळी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शहरातील अनेक केंद्रांवर शांततामय वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७००८ उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी ५८१९ उमेदवार परीक्षेला सामोरे गेले. तर ११८९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी याकरिता केंद्रांवर ४५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  या परीक्षेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान या विषयांशी निगडीत १०० प्रश्न विचारले गेले. हे प्रश्न सोडविण्यासाठी एक तासांचा अवधी देण्यात आला होता. चार प्रश्नांची उत्तरे चुकली तर एक गुण वजा करण्याची पद्धती परीक्षेत अनुसरण्यात आली. पेपर चांगला होता. विज्ञानाचे प्रश्न काहीसे कठीण वाटले. - पूजा बिडवे, परीक्षार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅनेजमेंट, डिफेन्स करिअरची मिळवा माहिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मॅनेजमेंट आणि डिफेन्स क्षेत्रात करिअर करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरची पाऊलवाट समजावी, या हेतूने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'प्लॅनेट कॅम्पस' उपक्रमांतर्गत 'मॅनेजमेंट व संरक्षण क्षेत्रातील करिअर' या विषयावर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले आहे. भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये दोन दिवस हे सेमिनार होणार असून विद्यार्थ्यांना दोन्ही क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती देण्यात येणार आहे. माहितीच्या अभावामुळे कदाचित ऐच्छिक स्वप्नपूर्तीपासून विद्यार्थी दुरावू शकतात. असे होऊ नये म्हणून 'मटा'च्या 'प्लॅनेट कॅम्पस' उपक्रमांतर्गत सोमवारी (१७ जून) 'मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअर संधी' आणि मंगळवारी (१८ जून) 'संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी' या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात करण्यात आला आहे. हे दोन्ही सेमिनार गंगापूररोडवरील भोसला मिलिटरी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होतील. मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअर संधींवर मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड कम्प्युटर सायन्सच्या संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी या मार्गदर्शन करणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर भोसला करिअर अॅकॅडमीचे संचालक विंग कमांडर अनिल सिंघा हे मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये मॅनेजमेंट व संरक्षण क्षेत्रातील करिअरसंदर्भात असलेले समज, गैरसमज, संधी या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येईल. सेमिनारमध्ये विद्यार्थी व पालक या सेमिनारमध्ये विनामूल्य सहभागी होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी जागेतील आधार केंद्रे अडचणीत

0
0

सरकारी कार्यालय आवारात स्थलांतर अनिवार्य

..

- ९५ केंद्रांची वाढली चिंता

- स्थलांतर न केल्यास बंद

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधार केंद्रांच्या कामकाजातील अनियमिततेच्या तक्रारी दूर व्हाव्यात, तसेच नागरिकांची गैरसोय टाळता यावी याकरिता सरकारी कार्यालयांच्या आवारात ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, अजूनही काही केंद्रे खासगी जागेतच सुरू आहेत. अशी खासगी जागेतील केंद्रे सरकारी कार्यालयांच्या आवारात स्थलांतरीत न झाल्यास ती बंद करावी लागणार आहेत. त्यामुळे अशा ९५ आधार केंद्रांची चिंता वाढली आहे.

आधार क्रमांक ही प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. त्यामुळे आधार कार्ड मिळविणे आणि ते बाळगणे प्रत्येक भारतीयाला अनिवार्य ठरते आहे. आधारकार्ड मोफत देणे बंधनकारक असतानाही त्यासाठी पैसे उकळण्यात येत असल्याचे प्रकार सुरुवातीला उघडकीस आले. त्यामुळे खासगी व्यक्तींना चालविण्यासाठी दिलेले अनेक आधार केंद्र काळ्या यादीत टाकण्यात आले. खासगी ठिकाणांवरील केंद्रांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले. अखेर युआयडीएच्या निर्देशानुसार सरकारी कार्यालयांच्या आवारात हे सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालयांमध्ये अशी सेंटर्स सुरू करण्यात आली. परंतु, काही सेंटर्स सरकारी कार्यालयांच्या आवारात स्थलांतरीत न झाल्याने या आधार केंद्रांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुरुस्तीसाठी शुल्क निर्धारीत करण्यात आले असले तरी त्याहून अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशी केंद्रे लवकरच सरकारी कार्यालयांच्या आवारात सुरू केली जातील, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसव्हीकेटी कॉलेजच्या विस्तारीकरणाला प्रारंभ

0
0

एसव्हीकेटी कॉलेजच्या

विस्तारीकरणाला प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

बहुजन समाजात शिक्षणाविषयी जागृती वाढली आहे, यामुळे आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यलयाच्या पहिल्या मजल्याचा बांधकाम विस्तारीकरणाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी पहिल्या मजल्यावरील वाढीव वर्गांच्या कामाचे पूजन कांतीलाल तेजुकाया, प्रणवकुमार तेजुकाया, रिद्धी तेजुकाया, अलका सावला, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी चिटणीस डॉ. सुनील ढिकले म्हणाले की, जगाच्या पाठीवर देशाला पुढे न्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याकरिता शैक्षणिक प्रगतीला सर्वांनी हातभार लावणे आवशक आहे. प्राचार्य डॉ. विजय मेधणे म्हणाले की, महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढवत असतांना इमारतीचा विस्तार अन् सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात पंचक्रोशीतील व्यक्तींनी महाविद्यालयाच्या विस्तारासाठी आर्थिक मदत केली त्या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. भास्कर ढोके यांनी केले. आभार उपप्राचार्य दौलत शिंदे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोलमडेल नियोजन,पुरे आता आवर्तन!

0
0

- मनपाचे 'पाटबंधारे'ला आर्जव

- शहरात पाणीबाणीची भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लांबलेल्या पावसामुळे अगोदरच शहरावर पाणीकपातीचे संकट गडद झाले असतानाच, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून पाण्याचा उपसा वाढल्याने पाणी उचलणाऱ्या इंटेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी पोहोचले आहे. आणखी आठ ते दहा दिवसांत पाऊस झाला नाही, तर पाण्याची न्यूनतम पातळी खालावण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेला पाणी उचलणे अशक्य होणार आहे. त्यामुळे शहराचा ८० टक्के पाणीपुरवठा ठप्प होऊन जनक्षोभ उसळण्याची भीती महापालिकेला सतावत आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून आता कुणालाही आवर्तन सोडू नका, अशी विनंती महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती अधिकच गडद झाली आहे.

वायु वादळामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे गंगापूर आणि मुकणे धरणाचा शहरासाठी पाण्याचा पुरेसा साठा असला तरी महापालिकेकडून पाणीकपातीचा विचार सुरू आहे. गेल्या वर्षी शहरासाठी गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट, दारणातून ४००, तर मुकणे धरणातून ३०० दशलक्ष घनफूट असे एकूण ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. या तिन्ही धरणांतून महापालिकेने आतापर्यंत ३८७३ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. त्यामुळे या तिन्ही धरणांत महापालिकेच्या वाट्याचे १०७२ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातच चेहेडी पंपिग स्टेशनमधून पाणी उचल बंद केले आहे. त्यामुळे दारणा धरणात आरक्षित केलेले १४८ दशलक्ष घनफूट पाण्यावर 'पाणी' सोडावे लागणार आहे. दारणाचे केवळ २५२ दशलक्ष घनफूट पाणी वापरता आले आहे. त्यामुळे सध्या मुकणे आणि गंगापूर या दोन धरणांतूनच शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यात दारणाची उचल गंगापूरमधून वाढवली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी उचलले गेल्याने धरणाची पातळी झपाट्याने खालावली असून, सध्या इंटेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी पोहोचले आहे. हा इंटेक वेल आठवडाभरात रिकामा होण्याची भीती महापालिकेला सतावत आहे. पावसाळा लांबल्यास इंटेक वेलच्या खाली पाणी जाण्याची भीती असल्याने महापालिकेने गंगापूर धरणातून आता पाणी सोडू नका, अशी विनंती पाटबंधारे विभागाला पत्राद्वारे केली आहे. पाणी सोडल्यास इंटेक वेल मोकळा होऊन पाणीबाणी निर्माण होऊ शकते. असे झाल्यास ८० टक्के पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या विनंतीला आता पाटबंधारे विभाग काय प्रतिसाद देतो, याकडे लक्ष लागून आहे.

एकवेळ पाणीपुरवठा सुरू?

इंटेक वेलच्या खाली पाणी गेल्यास महापालिकेला पाणी उचलणे अवघड आहे. जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चारी खोदण्याचे काम २०१२ मध्ये सुरू केले होते. मात्र, पाऊस झाल्याने हे काम अर्धवट आहे. त्यामुळे मृत साठ्याचा वापर करणे महापालिकेला अवघड बनले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील काही भागांमध्ये सुरू असलेला सध्याचा दोन वेळ पाणीपुरवठा एक वेळ केल्याची चर्चा आहे. त्याची अंमलबजावणी पंचवटी आणि नाशिकरोड या दोन विभागांत करण्यात येत असून, एक वेळ पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख शेतकरी ठरणार लाभार्थी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आता क्षेत्राची अट काढून टाकण्यात आली आहे. कितीही क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. लाभार्थींमध्ये नाव समाविष्ट व्हावे, यासाठी लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषिसेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात या योजनेचे पाच लाखाहून अधिक लाभार्थी असू शकतात, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पूर्वी दोन हेक्टरपर्यंत धारणा क्षेत्राची मर्यादा होती. परंतु, ही मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रती वर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या अपात्रतेच्या निकषात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सर्व शेतकरी कुटुंबांना सरसकट ही योजना लागू झाली आहे. सर्व पात्र कुटुंबांच्या याद्या संकलित करण्याच्या सूचना सरकारने निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेही तयारी केली असून सर्व तहसीलदारांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

योजनेचा अर्ज भरून तो तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहायक यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. अर्जामध्ये खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जासोबत बँक पासबुकची छायांकित प्रत, आधारकार्डची छायांकित प्रत, संयुक्त किंवा सहखातेदार असल्यास संमती घेऊन एका खातेदारामार्फत स्वयघोषणापत्र देणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबांनी निर्देशित केलेल्या कागदपत्रांसह २५ जूनपूर्वी अर्ज भरून द्यावा, असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पुर्वी धारणा क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत होती. ती आता शिथील करण्यात आली आहे. अन्य निकषांत बदल केलेला नाही. पात्र शेतकरी कुटुंबांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज व आवश्यक तपशील तातडीने सादर करावा.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

येथे मिळणार अर्ज

- महा ई सेवा केंद्र

- ग्रामपंचायत कार्यालय

- तलाठी कार्यालय

- तहसील कार्यालय

- पंचायत समिती कार्यालय

- तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ज्वला प्रशिक्षण उपयुक्त ठरणार

0
0

राज्यातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. विजया रहाटकर यांनी दुगाव येथे व्यक्त केला.

गिरणारे रोडवरील गायत्री लॉन्स येथे प्रज्ज्वला उपक्रमाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते. यावेळी योजनेच्या अध्यक्षा दीपाली मोकाशी, आमदार सीमा हिरे, महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त सुरेखा पाटील, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, सरंपच अलका दिवे, पुष्पा जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. रहाटकर म्हणाल्या, की महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. प्रज्ज्वला अभियान हे त्या दिशने टाकलेले मोलाचे पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बचतगटांची महिलांना विकासाची संधी देणारी सक्षम व्यवस्था तयार होणार आहे. महिलांचे अनेक कायद्यांच्या माध्यमातून संरक्षण केले जाते. सरकारच्या विविध योजनांद्वारे सक्षमीकरण केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. रहाटकर यांचे हस्ते बचतगटाच्या महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता डुकरांचा बंदोबस्त

0
0

फिरताना आढळल्यास महापालिका ठार करणार, कायद्यान्वये कारवाईचे आयुक्तांचे आदेश

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात फिरणाऱ्या डुकरांमुळे अस्वच्छता निर्माण होत असल्याचे सांगत महापालिकेने आज, मंगळवारपासून शहरात डुकरांवर बंदी घातली आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय डुकरे पाळता येणार नसल्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले आहेत. शहरात यापुढे डुकरे फिरताना आढळल्यास त्यांना ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेने केलेल्या कारवाईत मृत डुकरांच्या मालकांना कोणतीही भरपाई देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे डुकराच्या मालकांना तातडीने शहरातील डुकरे आता वेशीबाहेर न्यावे लागणार आहेत.

शहरात अस्वच्छता निर्माण झाल्याने रोगराई वाढली आहे. त्यातच स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसारख्या आजारांनी शहराला विळखा घातला आहे. त्यामुळे महपालिकेने गेल्या वर्षापासून शहरातून डुकरे हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या डुकरांमुळे अस्वच्छतेबरोबरच आजारांना निमंत्रण मिळत असल्याने पालिकेने महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई सुरू केली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील अनुसूची 'ड'मधील प्रकरण १४, स्वच्छता विषयक तरतुदीमधील जनावरे पाळणे आणि मारून टाकणे तरतूद क्रमांक २२ (जनावरे पाळण्यास प्रतिबंध) मधील (१) (अ) अन्वये कोणत्याही व्यक्तीने आयुक्ताच्या लेखी परवानगीशिवाय किंवा अशा परवानगीच्या अटींना धरून असेल, त्या व्यतिरिक्त अन्य रितीने शहराच्या कोणत्याही भागामध्ये कोणतेही डुक्कर पाळता कामा नये, असे स्पष्ट केले आहे. त्यातील तरतुदींमधील (३) अन्वये कोणतेही डुक्कर भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल. मारून टाकलेल्या कोणत्याही डुकराबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणताही दावा सांगता येणार नाही. दरम्यान, अधिसूचना सोमवारी जाहीर झाल्यानंतर मालकांनी आपली डुकरे महापालिका हद्दीबाहेर स्थलांतरीत करावीत, अन्यथा पालिका आपल्या पद्धतीने मारण्याची कारवाई करणार आहे. तसेच, नागरिकांना रस्त्यावर डुकरे भटकतांना आढळल्यास महापालिकेकडे एनएमसी ई कनेक्ट या अॅपवर अथवा ०२५३-२५७२०६२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

...

चौकशीचे आदेश

गेल्या वर्षी पशुसंवर्धन विभागाने शहरात डुकरे पकडल्याचा दावा करीत ठेकेदाराला १ लाख १० हजार रुपयांचे देयक अदा केले होते. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर लेखापरीक्षक महेश बच्छाव यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार पतसंस्थेच्या इमारतीचा उद्या लिलाव

0
0

थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवसुलीसाठी वणी येथील शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचा फेर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या पतसंस्थेकडे १ कोटी ६४ लाख ३ हजार २३८ रुपये निव्वळ थकबाकी आहे. तसेच व्याज व अनुवंशिक खर्च याचा आकडाही मोठा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी येथील शाखेतच बुधवारी (दि. १९) दुपारी सव्वा बारा वाजता हा लिलाव केला जाणार आहे.

शरदरावजी पवार पतसंस्थेची ही इमारत कसबे वणी येथे असून येथे ५ हजार ८२० चैरस फुटाचे बांधकाम आहे. दोन हॉल वजा खण, दोन दालने, तळमजला व बँकेच्या पुढे खुली बखळ जागा आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेने आपली कर्ज वसुली मोहीम जोरात सुरू केली असून त्यात आता या पतसंस्थेच्या इमारतीचा लिलाव होणार आहे. बँकेने या वसुलीसाठी सहकार न्यायालयाचा दाखला प्राप्त केला आहे. बँकेने कर्जवसुलीसाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले. तरी पतसंस्थेने धनको बँकेच्या थकीत कर्ज रक्कमेची संपूर्ण परतफेड केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images