Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वीज वितरणाचा महापालिकेला ‘शॉक’

$
0
0
सिंहस्थाच्या काळात लागणाऱ्या अतिरिक्त विजेची तजवीज करण्यासाठी महापालिकेने वीज वितरण कंपनीला दोन सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने यासाठी किमान दोन कोटी रूपये खर्च केले असून वीज वितरण कंपनीने मात्र जमिनीच्या मोबादल्यात पैसे देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

रेल्वेला सिंहस्थासाठी मिळणार २० फेब्रुवारीला निधी?

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी रेल्वे स्टेशनवर देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीपर्यंत निधी मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात असून हा निधी येताच २८ फेब्रुवारी पासून कामाला सुरुवात होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

महापालिकेला २१८ कोटींचा पहिला हप्ता

$
0
0
देणार...देणार म्हणून वर्षांपासून रोखून ठेवलेला सिंहस्थ निधी अखेर राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या ३०० कोटींपैकी २१८ कोटी रूपये राज्य सरकार देणार असून लवकरच हे पैसे महापालिकेला प्रत्यक्ष उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयटीसाठी स्वस्तात जागा देणार

$
0
0
नाशकात आयटी उद्योगाचा विकास व्हावा, यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या `क्रेडाई`ने पुढाकार घेतला असून शहरात २० रुपये प्रति चौरस फूट या दराने जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा `क्रेडाई`चे राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी केली आहे.

विलास पाटील यांच्या बदलीस तूर्त स्थगिती

$
0
0
पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकारी पदी कार्यरत राहावे, असे आदेश देत राज्य सरकारने विलास पाटील यांना सोमवारी दिलासा दिला आहे. तसेच नाशिकच्या ऐवजी बी. राधाकृष्णन यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एक कोटीसाठी विवाहितेचा छळ

$
0
0
घटस्फोट हवा असेल तर माहेराहून १ कोटी रुपये घेऊन अशी अवास्तव मागणी करून पती छळत असल्याची तक्रार एका विवाहितेने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. हवालदार सपकाळ यांनी ‌दिलेल्या माहितीनुसार, अंबादास काशिनाथ गुठे (३७) असे आरोपी पतीचे नाव आहे.

लाच स्वीकारणाऱ्यास कारावास

$
0
0
माजी सैनिकाला पे फिक्सेशनप्रमाणे पैसे मिळवून देण्यासाठी २०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या सैनिक कल्याण संघटनेच्या अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड आणि १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कॅम्पच्या दोघांचा बुडून मृत्यू

$
0
0
रविवारी फिरण्यासाठी पास्ते (ता.सिन्नर) येथे आलेल्या देवळाली कॅम्प येथील दोन तरुणांचा पाझरतलावात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांचे मृतदेह शोधण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

हॉल तिक‌िटातील चुका दुरुस्त करा

$
0
0
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर झालेल्या चुकांबाबत कॉलेजांनी तातडीने दुरुस्ती करावी अशी सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागामार्फत संबंधित कॉलेजांना देण्यात आली. हॉल तिकिटावरील विषय चुकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे टळणार आहे.

यंदा दिंडोरी जिंकायचीच!

$
0
0
'पक्षासाठी अत्यंत अनुकूल मतदारसंघ असतानाही गेल्यावेळी आपला पराभव झाला. यंदा मात्र कुठल्याही परिस्थितीत दिंडोरीची जागा जिंकायचीच' असे सांगत कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

रास्तारोकोसंदर्भात मनसेची बैठक

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या रास्ता रोकोच्या आवाहनावर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते अॅलर्ट झाले असून, यात नाशिक मनसेचाही समावेश आहे. उद्या(बुधवार) होणाऱ्या या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मनसेतर्फे आज(मंगळवार) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

...तर सिंहस्थ प्रतिबंधित करू

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीला काँक्रिटीकरणाप्रश्नी पाटबंधारे विभागाचे सचिव सुनावणीला उपस्थित न राहिल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा आम्ही प्रतिबंधित करावा का, अशी विचारणाच पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सोमवारी केली.

चुंचाळेतील रस्त्यांना तीन वर्षांपासून काँक्रिटीकरणाची प्रतीक्षा

$
0
0
शहरात असलेला पण महापालिकेकडून सर्वाधिक दुर्लक्षित असलेला भाग म्हणून चुंचाळे शिवाराची ओळख आहे. या ठिकाणी महापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून अंतर्गत रस्ते खोदून ठेवलेले आहेत. पण अद्यापर्यंत त्यांच्या काँक्रिटिकरणाला मुहूर्त मिळालेला नाही.

केळझरमधील पाईप लाइन त्वरित काढा

$
0
0
बागलाण तालुक्यातील केळझर धरणातून जाणाऱ्या खासगी पाईपलाईन त्वरित बंद कराव्यात, या मागणीचे निवेदन बागलाणचे प्रांत संजय बागडे, तहसिलदार अश्विनीकुमार पोतदार व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आरम संघर्ष समितीचे प्रमुख संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.

गौतम छात्रालयात विद्यार्थ्यांचे हाल

$
0
0
देवळाली गावातील गुलाबवाडी भागात असलेल्या गौतम छात्रालयात मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर मुलांचा आहार व आरोग्याकडे संस्थेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.

राज्यातील कोतवालांचे बेमुदत उपोषण

$
0
0
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत चतुर्थ श्रेणीबाबत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

लोककलेच्या संवर्धनासाठी शिक्षण महत्त्वाचा घटक

$
0
0
‘तमाशा या लोककलेला उज्ज्वल परंपरा लाभली असून, या कलाप्रकाराला वेगळी अशी ओळख न मिळाल्याने समाजात या कलाप्रकाराविषयी आजही चुकीचा समज आहे. या लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण हा घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

बालनाट्य स्पर्धा फुलवतेय व्यक्त‌िमत्त्व

$
0
0
बालनाट्य म्हटलं की लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ ही साधी व्याख्या. पण, यातील कलाकार आपली भूमिका निभावताना त्यात हरखून जात आहेत. यातून या चिमुकल्यांच्या भावविश्वाला असंख्य पैलू पाडण्याची आणि व्यक्त‌िमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका पारपाडत असल्याचे दिसत आहे.

संघवी इंज‌िन‌ीअरींग धूम

$
0
0
म्हसरुळ येथील संघवी कॉलेज ऑफ इंज‌िन‌ीअरींगमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या ‘डे’ज् ची सांगता गॅदरींगने झाली. तरुणाईने व‌िव‌िध कलागुणांचा आव‌िष्कार सादर करीत परशुराम सायखेडकर सभागृहात ‘अंतरंग : २०१४’ महोत्सवात गॅदरींगचा आनंद लुटला.

किस्सा 'डॉक्टर'चा

$
0
0
कधी-कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला मनस्ताप करण्याची वेळ येते. कॉलेजरोडजवळील 'सलीम टी स्टॉल'जवळ असाच एक किस्सा झाला. दिवसभराच्या कामातून ब्रेक मिळालेले एक महाशय चहाची तलफ भागविण्यासाठी टी स्टॉलवर पोहोचले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images