Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वृक्ष संवर्धनावर भर द्यायला हवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आज हजारो संस्था व व्यक्ती वृक्षारोपण करीत असतात, मात्र केवळ संवर्धन होत नसल्याने वेळोवेळी रोपण करण्यात आलेली झाडे जगत नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाने एक झाड संवर्धन करण्यावर भर देण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे यांनी केले.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी गोडसे बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, भगीरथ हांडोरे, कृष्णा चव्हाण, विशाल साळुंके, आबा शेवाळे, मनोहर बागूल, चंद्रभान पाटील, संतोष मुळे, मनोहर साळुंके, अनुपशा शाहू, स्वाती कांडेकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनात पोलिसांचाही हातभार लागावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वांजळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात शनिवारपासून दोन दिवस पाणी नाही

$
0
0

नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, तसेच उपवितरण वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून शनिवारी संपूर्ण शहरात शटडाऊन केले जाणार आहे. महापालिकेच्या एका दिवसाच्या शटडाऊनमुळे शनिवारी दिवसभराचा, तर रविवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणीबाणी राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचे जतन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सविस्तर वृत्त... नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीमुळे मनपाची तिजोरी खुळखुळली

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागामागे दोन वर्षापासून लागलेले शुक्लकाष्ठ अखेर काहीसे कमी झाले असून, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच विभागाची ४७ कोटींची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार, गैरव्यवहार अशा विविध आरोपांनी घेरल्या गेलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी वसुलीत दमदार कामगिरी करीत एकूण उद्दिष्टापैकी पहिल्या दोन महिन्यांतच २५ टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठले आहे. विकासशुल्कातून पालिकेला तब्बल १३ कोटी, तर टीडीआर शुल्कातून साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी हा निधी वापरता येणार आहे.

सविस्तर वृत्त.. नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुंघुरमाशीची

$
0
0

 दक्षा रत्नपारखी एका जंगलात एका आजीचे शेत होते. शेतात तिने खूप फळांची झाडे, रानमेवा असं लावलं होतं. रोज ती फळं घेऊन गावातील शाळेबाहेर बसायची आणि सगळ्या मुलांना तो रानमेवा देऊन संध्याकाळी घरी यायची. एकदा काय झाले ती संध्याकाळी दमून भागून आली आणि बघते तर काय तिच्या शेताची कोणीतरी खूप नासधूस करून ठेवली होती. आजीला राग आला आणि ती मोठ्या आवाजात ओरडली कोण आहे रे माझ्या शेतात, कोणी एवढी नासधूस केली? तेव्हा शेतातील प्राणी एका दगडामागे लपला आणि म्हणाला, मी आहे मी आहे संसगडी डोळे माझे काचेचे, शिंग माझे सोन्याचे, एकच खुपशीन तर पोटच फाडीन. म्हातारी आजी घाबरली आणि रडायला लागली. तेवढ्यात तेथून एक हत्ती चालला होता. आजीबाईला रडताना पाहून थांबला आणि विचारलं का रडतेस आजी? मग आजीने सांगितलं माझ्या शेतात एक डेंजर प्राणी शिरलाय तो मला घाबरवतोय म्हणून मी रडतेय, हत्तीदादा म्हणाला, 'रडू नको आजी, मी आलोय ना मी त्याला बाहेर काढतो. मग हत्ती पण जोरात ओरडला कोण आहे रे आजीच्या शेतात बाहेर ये?' परत आवाज आला 'मी आहे, मी आहे संसगडी डोळे माझे काचेचे, शिंग माझे सोन्याचे, एकच खुपशीन तर पोटच फाडीन.' हत्ती पण घाबरला तो ही रडायला लागला. त्या दोघांना रडताना पाहून हळूहळू जंगलातील सगळे प्राणी गोळा झाले सगळ्यांनी प्रयत्न केले. पण त्याच्या आवाजाने सगळेच घाबरले आणि सर्व प्राणी रडायला लागले तेवढ्यात तिथे एक घुंघुरमाशी आली सगळ्यांना रडताना पाहून तिने विचारले, 'का रडताय मग तिला सांगितलं. त्यावर ती म्हणाली मी प्रयत्न करून बघु का?' त्यावर सगळे प्राणी हसायला लागले. आम्ही एवढे बलाढ्य तो आमच ऐकत नाही. तुझं काय ऐकणार. ती म्हणे बघाच आता मजा. ती गुं गुं करत दगडामागे गेली आणि त्या प्राण्याच्या कानाला कडकडून चावली. तो कुई कुई करून ओरडला. परत मधमाशीने त्याला चावायला सुरुवात केली. शेवटी न राहून तो ओरडत बाहेर आला. त्याला बघून सगळे प्राणी ओरडले, 'अरे हा तर लबाड कोल्हा, याने घाबरवलं काय? मारा रे याला' मारत मारत त्याला जंगलाबाहेर काढून दिलं आणि मग सगळ्यांनी मधमाशीच कौतुक केलं. आजीने तिला मध दिलं. सगळ्या प्राण्यांना फळे दिली. मग सगळे प्राणी आणि आजी सुखाने राहू लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने चोरीप्रकरणीमोलकरणीला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

घरमालकाचे दागिने चोरल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी मोलकरणीला अटक करून दागिने हस्तगत केले आहेत.

नंदा थोरात यांच्याकडे दगडाबाई प्रभू घायतडक (रा. आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड) ही महिला घरकामासाठी होती. थोरात यांच्या घरातून काही दागिने चोरी गेले असल्याने त्यांनी उपनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक काशिनाथ गोडसे, अनिल शिंदे, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर, अश्विनी पगार यांनी तपास सुरू केला. त्यांनी संशयावरून दगडाबाई यांना ताब्यात घेत चौकशी केली. तिने थोरात यांच्या घरातील २७ ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी दागिने ताब्यात घेतले असून, दगडाबाईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाका कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना थकीत वेतन देण्यास सर्वानीच टाळाटाळ करण्याची भूमिका घेतल्याने कामगारांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाल्याने गुरुवारी संतप्त कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील महिलांनी कारखाना कार्यस्थळावरून विक्री झालेल्या साखरेसह मळीचे ट्रक कारखान्यावरच रोखून धरले. कामगारांनी आंदोलन छेडल्याने कार्यस्थळावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कामगारांनी ट्रक रोखल्याचे कळताच तहसीलदार व पोलिसांना कारखाना कार्यस्थळावर धाव घेत कामगार व धाराशिव साखर कारखान्याच्या अध्यक्षांशी मध्यस्ती केल्याने पुढील अनर्थ टळला. चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वसाका कार्यस्थळावरील गाळप झालेली साखर व मळीच्या विक्रीची प्रक्रिया मागील महिन्यापासून तहसीलदारांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने हेतुपुरस्कार टाळाटाळ केली आहे. याबाबत कामगारांनी याअगोदरही साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी थकीत वेतनाबाबत लेखी विनंती केली होती. मात्र कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज त्यांनी विक्री झालेली साखर व मळी रोखून धरली. सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी कामगारांशी तसेच अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. पाटील यांनी येत्या चार दिवसांत कामगारांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी वसाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, सरचिणीस रवी सावकार, विजय पाटील, कामगारनेते कुबेर जाधव, शांताराम आहेर, त्र्यंबक पवार, रवींद्र सोनवणे हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांना ऑनलाइन गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुगल पे या वॉलेट पेमेंट अॅप्लिकेशनद्वारे सातपूरच्या दोघा जणांना सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा चुना लावला आहे. हा प्रकार घडल्यानंतर सायबर आणि सातपूर पोलिसांनी केलेल्या दोन महिन्यांच्या प्राथमिक तपासानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. मोबाइल नंबर आणि बँक खाते लिंक असलेली दोन ग्राहकांची खाती शोधून भामट्यांनी हा गंडा घातला आहे.

सातपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, महादेवनगर) आणि प्रवीण माधव कुलकर्णी (रा. गुलमोहर विहार कॉलनी, पाइपलाइनरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भंदुरे यांचे गुगल पे अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातपूर एमआयडीसी शाखेशी संलग्न असून, त्याचा खाते नंबर त्यांच्या मोबाइल नंबरला लिंक आहे. ९ एप्रिलच्या दरम्यान भंदुरे यांनी आपल्या मोबाइलवरून एक रिचार्ज केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला. तोही अयशस्वी ठरला. गेलेले पैसे परत अकाउंटमध्ये येतील, याची त्यांनी प्रतीक्षा केली. त्यानंतर एक क्रमांक मिळवीत त्यांनी कस्टमर केअरशी त्यांनी संपर्क साधला. त्यात त्यांना आणखी एक क्रमांक मिळाला. या क्रमांकावरील व्यक्तीशी बोलत असताना त्याने एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार भंदुरे यांनी केले. त्यानंतर तुमचे नेट अथवा फोन बंद करू नका, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे भंदुरे यांना संशय आला. त्यांनी काही वेळातच मोबाइल बंद केला. तोपर्यंत चोरट्यांनी भंदुरे यांच्या खात्यातील ९१ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली होती.

कूलर विक्रीची जाहिरात भोवली

दुसऱ्या घटनेत ओएलएक्स या अ‍ॅपवर दिलेली जाहिरात बँक ग्राहकाला चांगलीच महागात पडली. कुलकर्णी यांनी आपले मेकॉय कंपनीचे वापरते एअर कूलर विक्रीची जाहिरात ओएलएक्स या अ‍ॅपवर दिली होती. त्यानुसार ७ एप्रिल रोजी ८२६७८२०५६० या क्रमांकावरून मुकेश शर्मा उर्फ हेवेंद्र मुन्नालाल शर्मा (रा. न्यू जनता कॉलनी, आग्रा) नावाच्या ग्राहकाने त्यांच्याशी संपर्क साधला. कूलर घेण्याचा बहाणा करून कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या गुगल पे अकाउंटची माहिती मिळविली. त्यानंतर त्यांच्या अकाउंटवर मोनल सिंग नावाने रिक्वेस्ट पाठवून संबंधितांनी कुलकर्णी यांच्या एसबीआय बँक खात्यातील ५९ हजार २०० रुपयांची रोकड परस्पर ऑनलाइन काढून घेतली. दोन्ही घटनांप्रकरणी जवळपास दोन महिन्यांच्या प्राथमिक तपासानंतर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई चौकट जोड

$
0
0

राज्यात ४७ हजार ३५ प्रवेश

यंदा पहिल्यांदाच आरटीईसाठी राज्यस्तरावरुन लॉटरी काढण्यात आली असून पहिल्या लॉटरीनंतर ४७ हजार ३५ प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यातील ९ हजार १९५ शाळांमधील १ लाख १६ हजार १२४ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू असून पहिल्या लॉटरीत ६७ हजार ७१६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. उर्वरित पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या लॉटरीकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटी तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील ठाकरे स्टेडियमजवळील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ५) सांयकाळी घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विजयनगर कॉलनीच्या पूर्वेला महापालिकेचा स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव आहे. या तलावात दिंडोरीरोडवरील कला नगरातील क्लासिक अपार्टमेंट येथे राहणारा साई संदीप वाणी (वय १३) हा मुलगा सध्या शाळेला सुटी असल्याने या तलावात पोहण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे तो सायंकाळी पोहण्यासाठी आला. त्याने तलावात उडी घेतली. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, तो पाण्यातच गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी येथील कर्मचारी दीपक सुर्वे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पाण्यात उडी टाकली आणि त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी वैभव धूम यांनी सांगितले. तेरा वर्षीय साई वाणीच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे तरणतलावाच्या सुरक्षा आणि दक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला दोन दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरास आता दोन दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरासाठी पाणीपुरवठा करणारे आहिल्या, अंबोली आणि गौतमी बेझे अशा तीन धरणांच्या पाणीपुरवठा योजना असताना देखील जून महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात दोनदिवसाड पाणी पुरवठा होणार आहे. आहिल्या धरण मार्चअखेर कोरडेठाक झाले आहे. अंबोली धरणात आता केवळ गाळ शिल्लक आहे. गौतमी बेझे या धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. मात्र पालिकेला पाहिजे तितके पाणी तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य होत नाही. शहरात पाच मोठे दगडी बांधीव तलाव आहेत. त्या व्यतिरिक्त जागोजाग विहिरी आहेत. मात्र हा अमुल्य ठेवा देखभाली अभावी दुर्लक्षित आहे. एकूणच गोदावरीच्या उगमस्थानी असलेली पाणीटंचाई नियोजनाचा अभाव स्पष्ट करणारी ठरत आहे. एकिकडे पाणीपुरवठा लांबणीवर पडत असल्यामुळे दुसरीकडे खासगी टँकर चालकांनी मात्र या संधीचे सोने करीत व्यवसायाला तेजी आणली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत क्रेन कोसळून एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात झाला. यात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. ६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तालुक्यात सध्या भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. विहिरींनी तळ गाठल्याने घोटभर पाणी मिळेल या आशेने विहिरीचे खोदकाम सुरू आहे. मिरगाव मलढोण रस्तावर ज्ञानदेव डुबे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना ७० फूट खोल असलेल्या विहिरीत सुरुंग लावण्यात आला होता. त्यानंतर कामगारांनी जेवण आटपून कामाला सुरुवात केली. त्यावेळी विहीर मालक विठ्ठल डुबे (३६, रा. मलढोण), विश्वास डुबे, मच्छिंद्र सुंभे (वय ३८) विहिरीत उतरत असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने माडी वेगाने खाली दगडावर आदळली. विश्‍वास डुबे यांना उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र सुंभे व विठ्ठल डुबे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी डुबेरे शिवारात ढोली यांच्या मळ्यात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेन मशिनचा वायररोप तुटल्याने झालेल्या अपघातात एक कामगार ठार झाला होता. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. विठ्ठल डुबे हा विहीर मालक ज्ञानदेव डुबे यांचा मुलगा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पाणीबाणी!

$
0
0

शनिवारी दिवसभराचा, तर रविवारी सकाळी पाणीपुरवठा बंद

....

- महापालिकेडून शटडाऊन

- वीजपुरवठाही विस्कळीत राहणार

- रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, तसेच उपवितरण वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून येत्या शनिवारी संपूर्ण शहरात शटडाऊन केले जाणार आहे. महापालिकेच्या एका दिवसाच्या शटडाऊनमुळे शनिवारी दिवसभराचा, तर रविवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणीबाणी राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचे जतन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहराला सुमारे दोन हजार किलोमीटर पाइपलाइन व ११४ जलकुंभांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याची मोठी यंत्रणा असल्याने या यंत्रणेत कायम बिघाड होतात. त्यांची दरवर्षी दुरुस्ती करावी लागते. त्याअंतर्गत व्हॉल्व्ह दुरुस्त करणे, पंपिंग स्टेशनवरील दुरुस्ती आदी कामे हाती घेतली जातात. त्यासाठी एका दिवसाचा कालावधी लागतो. पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेने या कामांसाठी येत्या शनिवारी (दि. ८) शटडाऊन घेतला आहे. शहरात पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणी मुख्य वितरण वाहिन्या, तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉल्व्हची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीची कामे शनिवारी दिवसभरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच चाचणीसाठी रविवारी सकळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दीड दिवस शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. रविवारी सायंकाळचा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे. दीड दिवस महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

...

वीजपुरवठाही विस्कळीत

महापालिकेप्रमाणेच वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरात पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती कामे शनिवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे शनिवारचा दिवस नाशिककरांसाठी कसरतीचा ठरणार आहे.

...

या ठिकाणी होणार कामे

नाशिक पश्चिम विभाग

बुधवार पेठ जलकुंभ येथील आठ इंची व्हॉल्व्ह बदलणे व क्रॉस कनेक्शन करणे.

...

नाशिक पूर्व विभाग

कालिका पंपिंगचे ५०० बाय ५०० क्रॉस कनेक्शन करणे, कथडा जलकुंभ येथील ५०० मी. मी. व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे, मुकणे प्रकल्पाचे पाणी कथडा कालिका व भाभानगर जलकुंभास देण्यासाठी पाइपलाइन जोडणी करणे.

चढ्ढा पार्क ते वडाळागाव मुख्य वितरण वाहिनीवरील ४०० मी.मी. व उपवितरण वाहिनीवरील २५०० मी. मी. व्यासाचे व्हॉल्व्ह बदलणे व इतर आवश्यक कामे करणे. आयटी पार्क (नाल्याजवळ) जलकुंभाजवळ १२०० मी. मी. व्यासाची पी. एस. सी पाइपलाइन लिकेज काढणे.

...

पंचवटी विभाग

कोणार्क नगरजवळ जलकुंभाच्या इनलेटचे क्रॉस कनेक्शनची कामे करणे.

...

सातपूर विभाग

मनपाचे बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र यांना पाणीपुरवठा करणारी कच्च्या पाण्याची १२०० मी. मी. व्यासाची पी.एस.सी मुख्य गुरुत्व वाहिनीची दुरुस्ती करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असा सुटणार मनमाडचा पाणीप्रश्न

$
0
0

खानापूरकरांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनमाडचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी भूजल वैद्यानिक सुरेश खानापूरकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांना ७० कोटी रुपये खर्चाची योजना सादर केली. या योजनेत शहरापासून जवळ असलेल्या वंजारवाडी व सटवाई नाल्याजवळ नाला खोदून पाणी अडवणे व जिरवण्याचा उपाय सांगितला आहे.

शिरपूर पॅटर्नमुळे प्रसिद्ध असलेले खानारपूर यांनी मनमाड येथे भेट देऊन तेथे पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे असलेल्या पावसाची आकडेवारी, नकाशा व त्यानंतर जमिनीचा पोत याचा अभ्यास करून ही योजना तयार केली आहे. आतापर्यंत त्यांनी ७० गावात २१० बंधारे बांधले असून, त्यांनी मनमाडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना सर्वाधिक उपयोगी ठरण्याचा दावाही केला आहे. मनमाडची लोकसंख्या भविष्यात १ लाख २५ हजार असेल त्यादृष्टीने त्यांनी सर्व आकडेमोड करून त्याचा हिशोबही त्यांनी दिलेल्या योजनेत मांडला आहे. १३५ लिटर माणसी गरज व लोकसंख्या यांचा गुणाकार करून त्यांनी वार्षिक पाणी ६१६० टीसीएम लागणार असल्याचे त्यात म्हंटले आहे. हे दोन्ही नाले खोदून त्यात पाणी अडवले व जिरवले तर त्यातून ६३७५ टीसीएम पाणी मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. या योजनेबरोबरच त्यांनी एक नकाशा सादर केला असून त्याबरोबर माहिती दिली आहे.

असे मांडले गणित

वंजारवाडी व सटवाई नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, सरासरी पाऊस, एकूण क्षेत्रफळ, एका हेक्टरवर पडणारा पाऊस, असे सर्व गणित त्यांनी सरकारी आकडेवारीवर मांडले आहे. त्याबरोबरच या योजनेसाठी लागणारा अंदाजीत खर्चाचाही हिशोब त्यांनी या योजनेबरोबर सादर केला आहे.

मनमाडसाठी अगोदर योजना

मनमाडचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी अगोदरच जलसंपदा विभागाने धरणातून थेट पाईपलाईन योजना तयार केली आहे. त्यासाठी ३०० कोटीच्या आसपास खर्च येणार असून त्यातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात थेट पाणी येणार आहे. त्यासाठी मनमाडकर आग्रही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळातून साधावी तणावमुक्ती

$
0
0

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बहुउद्देशीय कक्षाचे उद्घाटन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खेळांच्या माध्यमातून स्वत:ची शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक उन्नती साधावी. तसेच तणावमुक्त राहून योग्य कर्तव्य बजवावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शरणपूर रोडवरील एक्साईज भवन येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय कक्षाचे उद्घाटन आयुक्त नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व जिल्हा टेबल टेनिसचे सचिव शेखर भंडारी, उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक भुतकर आदी यावेळी उपस्थित होते. कक्षात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि विविध प्रकारचे खेळ तसेच वाचनालय उपलब्ध असल्याने त्याचा लाभ घ्यावा. फावल्या वेळेत खेळाच्या माध्यमातून शारिरीक मानसिक बौद्धिक उन्नती साधून तणावमुक्त रहावे, कर्तव्य पार पाडतांना त्याचा निश्चित फायदा होईल, असे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रंथालयाच्या माध्यमातून कायदे विषयक पुस्तकांचे वाचन करावे तसेच विविध ग्रंथ आणि धार्मिक पुस्तकातून स्व:ताचे ज्ञान अद्यावत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान आयुक्त नांगरे-पाटील यानी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांच्याशी संपर्क साधत बहुउद्देशीय कक्षाची प्रशंसा केली. यावेळी नांगरे-पाटील यांच्या हस्ते गुन्हा अन्वेषणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, सुरेश रावते, जवान दीपक आव्हाड, अमित गांगुर्डे, विठ्ठल हाके, वाहनचालक कैलास कसबे, मुस्तपा तडवी आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या लॉटरीची प्रतीक्षा संपता संपेना

$
0
0

दुसऱ्या लॉटरीची प्रतीक्षा संपता संपेना

आरटीई प्रवेशप्रक्रिया; तारीख अद्याप जाहीर नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरटीई म्हणजेच शिक्षणहक्क प्रक्रियेने यंदा पालकांना चांगलेच जेरीस आणले आहे. पहिली लॉटरी काढून दोन महिने झाले, तरीदेखील दुसऱ्या लॉटरीची तारीख जाहीर न झाल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागालाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर येत असल्याने यंदा ही प्रक्रिया पूर्ण होण्यास नेमका किती अवधी घेणार, प्रक्रिया यशस्वी होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दरवर्षी आरटीई प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेअंतर्गत आरटीईचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यंदा नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी १४ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पहिल्या लॉटरीमध्ये निवड झालेल्या ३ हजार ५१७ जागांपैकी २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या अनेक बालकांच्या अर्जात गुगल मॅपिंग व दिलेले पत्ते यात तफावत आढळल्याने अनेकांचे अर्ज रद्द करण्यात आले होते. दुसऱ्या लॉटरीपूर्वी पालकांना अर्जात बदल करण्याची संधी मिळावी, यासाठी २९ मेपासून ७ जूनपर्यंत अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आज, ७ जून रोजी हा कालावधी संपणार असून आता पुढील प्रक्रिया कधी, हा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याअखेरीसच तीन लॉटरी काढण्यात आल्या होत्या. यंदा मात्र, राज्यस्तरावरून ही प्रक्रिया राबविण्यात येत असून मोठा विलंब प्रक्रियेला झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहारदार ‘कलासंगम’ची आज, उद्या पर्वणी...

$
0
0

बहारदार 'कलासंगम'ची आज, उद्या पर्वणी...

--

आज, शुक्रवार (दि. ७) रोजीचे कार्यक्रम...

--

सकाळी १०.३० ते १२.३०

उद्घाटन समारंभ

शिल्पा देशमुख यांचे भरतनाट्यम, गणेशवंदना, उद्घाटक : गणेश चंदनशिवे

प्रमुख पाहुणे : प्रकाश खांडगे, चंद्रमोहन कुलकर्णी, शर्वरी लथ, मकरंद हिंगणे, नंदेश उमप

…...

दुपारी १२.३० ते २.००

लोककलांचा प्रवास उलगडणार प्रकाश खांडगे (समन्वयक शाहीर अमर शेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ) आणि गणेश चंदनशिवे (विभागप्रमुख, लोककला अकादमी, मुंबई), संवाद साधतील स्वानंद बेदरकर

…..

२.०० ते ३.३० चं

द्रमोहन कुलकर्णी (प्रसिद्ध चित्रकार-मूर्तीकार) यांच्याशी संवाद साधतील आनंद ढाकिफळे

…..

३.३० ते ५

नंदेश उमप यांच्याशी जांभूळ आख्यान व लोककलांवर गप्पा संवाद मारतील स्वानंद बेदरकर

…..

सायंकाळी ५

जयेश आपटे दिग्दर्शित रावी फिल्म मोशनच्या 'उपमुखम' या फिल्मचे सादरीकरण

…..

६.३० ते ७.००

बोहाडा सादर करतील चांदोरीचे अनिल पाटील

------------------------------------------------

उद्या, शनिवार (दि. ८) रोजीचे कार्यक्रम...

--

सकाळी ९ ते ११

स्थानिक कलावंतांचे सादरीकरण

११ ते १२ जेम्बे सादरीकरण

चित्रकला डेमोस्ट्रेशन अजिंक्य शिरोडकर

…..

दुपारी १२ ते १

इस्ट अॅण्ड वेस्ट अॅकॅडमी प्रस्तुत नरेंद्र पुली यांच्या विद्यार्थ्यांचे गिटारवादन- वेस्टर्न, क्लासिकल, बॉलिवूड

…..

१ ते २

स्वरालीन व्हायोलिन अॅकॅडमी प्रस्तुत अनिल दैठणकर यांच्या विद्यार्थ्यांचे व्हायोलिनवादन- क्लासिकल, फिल्म, ग्रुपवादन

२ ते ३

पवार तबला अकादमी प्रस्तुत 'जुगलबंदी'चे नितीन पवार व शिष्यांकडून सादरीकरण- तीन ताल, पेशकार, कायदे, पलटे, रेले, बंदिश

…..

३ ते ४

संगीता पेठकर व त्यांच्या शिष्या यांचे भरतनाट्यम

…..

४ ते ६

कीर्ती भवाळकर, आदिती नाडगौडा, सुमुखी अथनी, विद्या देशपांडे यांच्या शिष्या यांचे कथक

…..

४ ते ६

मूर्तिकार डेमोस्ट्रेशन नीलेश ढेरे, यतिन पंडित, संदीप लोंढे, मयूर जाधव

पॉटरी डेमोस्ट्रेशन- मीनल जोगळेकर

वारली डेमोस्ट्रेशन-श्रध्दा कराळे

…..

सायंकाळी ६ ते ८

जागरण गोंधळ, राम आणि गणेश वाणी

याचवेळी शिल्पकला, वारली, गोंदण, कशिदा, पॉटरी, फोटोग्राफी, पेंटिंग प्रदर्शन

मिसळ ग्रुपच्या वतीने पेंटिंग सादरीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीवरून राडा

$
0
0

संचालक राजीनाम्याच्या मनस्थितीत, आजची बैठक वादळी ठरणार

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीचे लांबलेल प्रकल्प, अचानक वाढलेल्या किमती, स्काडा प्रकल्पावरून आरोपांचे उठलेले मोहोळ यामुळे लोकनियुक्त संचालकांनी थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. स्काडा प्रकल्पाच्या निविदेतील बदल हे विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून केल्याचा आरोप संचालक अजय बोरस्ते यांनी केला आहे. त्यामुळे या बैठकीत कंपनीचे सीईओ प्रकाश थविल आणि गुजर नावाचे अधिकारीच केंद्रस्थानी राहणार असून, त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिकची निवड झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ५० पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, निवडक दोन ते तीन प्रकल्प सोडले, तर उर्वरित प्रकल्प वादळी ठरले आहेत. स्मार्ट रोडचे काम मुदत उलटूनही अपूर्ण आहे तर प्रोजेक्‍ट गोदा, गावठाण विकास, ग्रीन फिल्ड विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना अद्याप सुरुवातदेखील झाली नसताना मंजूर प्राकलनाच्या कितीतरी पटीने किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे महत्त्वाकांक्षी स्काडा प्रकल्पातही आता भ्रष्टाचाराचा वास येत आहे. त्यामुळे संचालक अजय बोरस्ते, गुरुमीत बग्गा, शाहू खैरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीच्या कामांवरच हल्लाबोल केला. स्काडा प्रकल्पात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचे सांगत ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदेत परस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी बैठकीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पांच्या वाढत्या किमती महापालिकेला परवडणाऱ्या नाही. उलट कंपनीच्या एकंदरीत कामकाजाची स्थिती लक्षात घेता गैरव्यवहाराचा वास येत असल्याचा आरोप करीत सर्वच लोकनियुक्त सदस्य राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे यावेळी बोरस्तेंनी सांगितले. एकतर थविलांची हकालपट्टी करा नाही, तर राजीनामे देतो अशी भूमिका संचालक घेणार असल्याचे समजते.

...

कोटीच्या कोटी उड्डाणे

स्मार्ट सिटी अंतर्गत निविदा प्रक्रियेत असलेल्या अनेक प्रकल्पांच्या किमती या मूळ प्रस्तावापेक्षा कोट्यवधींनी वाढत आहेत. स्मार्ट रोडची किंमत ही १७ कोटींवरून २१ कोटींवर पोहचली आहे. महात्मा फुले कलादालनाचे काम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला असताना कंपनीकडून ठेकेदारावर ५० लाखांची मेहेरबानी केली जात आहे. अहिल्याबाई होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविण्याचे मूळ काम २० कोटी रुपयांचे असताना तांत्रिक दोष दर्शवत आठ कोटी रुपयांची वाढ केली आहे. शासनाच्या महाआयटी कंपनीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ७८.७९ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावामुळे संचालक हैराण झाले आहेत. ग्रीन फिल्ड योजनेसाठी ८९५ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यासाठी एफएसआय विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहर विकायचे का, असा सवाल आता संचालक करीत आहेत.

...

अजय बोरस्तेंचा राजीनामा

स्मार्ट सिटीचा भरकटलेला कारभार पाहता विरोधी पक्षनेते आणि संचालक असलेल्या अजय बोरस्ते यांनी तीन महिन्यांपूर्वीच संचालक मंडळाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. परंतु, मंडळाने अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. स्मार्ट सिटीच्या कारभाराने ते वैतागले असून, वाढत्या किमतीचा आपल्यावर ठपका बसू नये म्हणून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे कळते. दुसरीकडे भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटीलही आक्रमक झाले असून, त्यांनी थविलांना हटवले नाही, तर संचालक मंडळाच्या बैठकीतच उपोषणाचा इशारा दिल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासंगम महोत्सवासाठी कुसुमाग्रज स्मारक सज्ज

$
0
0

- आजपासून दोन दिवस रंगणार सोहळा

- लोककलावंत डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते उद्घाटन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोककला या विषयाला यंदा समर्पित असलेल्या दोनदिवसीय कलासंगम महोत्सवाचे उद्घाटन आज, ७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. प्रसिद्ध लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्याशी चंदनशिवे यांचा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या महोत्सवात प्रसिद्ध चित्रकार व मूर्तिकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे. कुलकर्णी यांच्याशी ज्येष्ठ चित्रकार आनंद ढाकीफळे संवाद साधतील. त्यानंतर ख्यातनाम लोककलावंत नंदेश उमप यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीतून त्यांचे वडील विठ्ठल उमप यांनी अजरामर केलेल्या जांभूळआख्यानाचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. उमप यांच्याशी शब्दमल्हार प्रकाशनाचे संपादक स्वानंद बेदरकर संवाद साधतील.

महोत्सवात प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, तसेच प्रसिद्ध फोटोग्राफर्सच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जयेश आपटे दिग्दर्शित रावी फिल्म मोशनची 'उपमुखम' ही फिल्म दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर चांदोरीचे अनिल पाटील व त्यांचे सहकारी पारंपरिक बोहाडा सादर करणार आहेत. दुसऱ्या दिवशीही (८ जून) भरगच्च कार्यक्रम होणार असून, त्यात स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, गिटारवादन, व्हॉयोलिनवादन, तबल्याची जुगलबंदी, भरतनाट्यम, कथक, पॉटरी डेमो, जागरण गोंधळ, वारली, गोंदण, कशिदा या कला बहरणार आहेत. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा, छंदोमयी, तसेच स्वगत हॉल आणि संपूर्ण स्मारकात हा महोत्सव दोन दिवस आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण-तरुणींसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

तरुण-तरुणींसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जाती व नवबौद्ध युवक युवतींसाठी सैन्य व भरतीपूर्व प्रशिक्षण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील युवकासाठी सैन्य व पोलिस प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा. यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे. उमेदवार हा नोकरी करीत नसावा, उमेदवाराची उंची पुरुष १६५ सेमी. व महिला १५५ सेंमी. हवी. उमेदवाराची छाती पुरुष ७९ सेमी (फुगवून ८४ सेमी), शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असावा. जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी व बारावी गुणपत्रक, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नावनोंदणी व ओळखपत्र, मुळ दाखले व साक्षांकित प्रती, उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी सक्षम असावा, पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा मजला पुणेरोड, नासर्डी पुलाजवळ नाशिक येथे १० ते १४ जून या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वखर्चाने हजर रहावे, याबाबत येण्या जाण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे प्राची वाजे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्काडा’ची निविदा रद्द

$
0
0

संचालक मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत पाण्याची होणारी गळती रोखण्यासह पाणीपुरवठा विभागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या २८२ कोटींच्या स्काडा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत परस्पर फेरबदल केल्याचा संचालकांच्या आरोपानंतर, तसेच कंपनीच्या अध्यक्षांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याने अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपरती आली आहे. स्काडा प्रकल्पातील परस्पर फेरबदल अंगलट येताच शुक्रवारच्या बैठकीत वाद होऊ नये, यासाठी कंपनीने सदरची निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. आज, शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर नव्याने निविदा काढली जाणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीचा कारभारही भ्रष्टाचाराच्या दिशेने वाटचाल करू लागला असून, स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या २८० कोटींच्या स्काडा प्रणाली (सुपरवायझरी कंट्रोल ॲण्ड डाटा एक्विझिशन सिस्टिम) ची निविदा प्रक्रिया वादात सापडली होती. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेंनी या निविदा प्रक्रियेला दोन दिवसापूर्वीच स्थगिती दिली होती. या स्काडा प्रणाली अंतर्गत दोन लाख मीटर विकत घेऊन ते बसवले जाणार होते. परंतु, स्मार्ट सिटी कंपनीतील अधिकाऱ्यांनी यात विशिष्ट ठेकेदारांच्या भल्यासाठी परस्पर शुद्धीपत्र काढून तीन बदल केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. दोन लाखापैकी पहिल्यांदा १७ हजार मीटर बसवणे, ते यशस्वी झाले तर २० हजार पाणी मीटर बसवणे असा बदल करण्यात आला. तसेच हे यशस्वी झाले तर १ लाख ६७ हजार मीटर बसविण्याचा घाट होता. परंतु, एकाच वेळी मीटर बसवल्याशिवाय प्रकल्प कसा यशस्वी होणार असा सवाल करीत केवळ स्काडा सॉफ्टवेअर बसविण्यासाठीच या निविदेत बदल केल्याचा आरोप बोरस्ते यांच्यासह शाहू खैरे, गुरुमीत बग्गा यांनी केला. त्यामुळे या प्रकल्पाबाबत वाद होऊ नये यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे.

....

या प्रकल्पातील सावळागोंधळ आम्ही अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला होता. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर वाचला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे या प्रकल्पाची वाट लागली असती. परंतु, आमच्या तक्रारींची अध्यक्ष आणि आयुक्तांनी दखत घेत निविदा रद्द केली आहे.

- अजय बोरस्ते, संचालक व विरोधी पक्षनेते

..

या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर संचालकांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. सध्याची निविदा रद्द करण्यात येऊन संचालकांशी चर्चा करून नव्याने निविदा काढण्यात येईल.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images