Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नासर्डीची नंदिनी या उपक्रमाअंतर्गत नासर्डी (नंदिनी) नदीकिनारी वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. निवृत्त आरोग्याधिकारी औटी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपस्थितांना 'चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा' संदेश देत आपले रुग्णसेवा केंद्रातर्फे चिमणीचे घरटे भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमात निसर्गसेवक युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी, निसर्ग लोकमाध्यम संस्थेचे सोमनाथ मुठाळ, केदारनाथ बहुउद्देशीय संस्थेचे कचरू वैद्य, मुद्राय फाउंडेशनचे नितीन देवरे, सक्षम फाउंडेशनचे सुनील परदेशी, आपले रुग्णसेवा केंद्राचे रोहित पारख, मनपा स्वच्छता निरीक्षक सुभाष इंगळे, दत्तात्रेय जेजूरकर, संग्राम साळवे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रावणात भरणार बेल महोत्सव

$
0
0

- अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते देवराई प्रकल्पाचा प्रारंभ

- देवरायांमध्ये ६० दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची लागवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जैवविविधता व पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे जनक सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत ३४ ठिकाणी देवराई प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत ६० दुर्मिळ प्रजातींचा समावेश असलेल्या ३००३ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, नाशिकमध्येही पर्यावरण रक्षणासाठी झाडांचा उत्सव सुरू करण्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली असून, त्याअंतर्गत येत्या श्रावणात बेल महोत्सव भरवला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली बेलाची तीन हजार झाडे शहरात लावली जाणार आहेत. नाशिकधील देवराईच्या कामाचीही त्यांनी स्तुती केली आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात सहाही विभागांत प्रत्येकी एक अशा प्रकारे सहा देवराई उभारल्या असून, या माध्यमातून ७७६ दुर्मिळ वृक्षांची लागवड केली आहे. दुसऱ्या टप्प्यात ३४ ठिकाणी देवराया साकारल्या जाणार आहेत. यासाठी पुण्यातील सह्याद्री देवराई संस्थेने काही दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या टप्प्यातील ३४ देवराई प्रकल्पांचा शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सामाजिक व पर्यावरण संस्था, वृक्षप्रेमी यांच्या मदतीने या देवराया साकारल्या जाणार आहेत. पर्यावरण दिनानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात मोफत वृक्ष रोपेवाटपाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणासाठी शहरातील लोकप्रतिनिधींना पालिका मुख्यालयात शपथ देण्यात आली. या वेळी महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सयाजी शिंदे यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. वृक्षलागवडीसाठी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगत, शिंदेंनी झाडांच्या उत्सवाची कल्पना महापालिकेसमोर मांडली. आयुक्त गमेंनीही ही संकल्पना मान्य करीत लागलीच बेल महोत्सव भरवणार असल्याची घोषणा केली. शहरे हिरवीगार करण्यासाठी फळ उद्यान, फूल उद्यान अशी विविध उद्याने उभी करण्याची सूचना या वेळी शिंदे यांनी केली.

वैशिष्ट्यपूर्ण उद्याने

वैविध्यपूर्ण वृक्षलागवडीने आता उद्यानांचे वैशिष्ट्य ठरणार आहे. रामसृष्टी उद्यानात राष्ट्रीय एकात्मता उद्यान साकारले जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाणार असून, लवाटेनगर येथे नवगृह उद्यान साकारले जाणार आहे. यात नवग्रहांसाठी असलेल्या वृक्षांची लागवड केली जाईल. हॉटेल साई पॅलेसमागील खुल्या जागेत नक्षत्र उद्यान साकारले जाईल. यात नक्षत्रांप्रमाणे वृक्षांची लागवड केली जाईल. सिंगापूर कॉलनीत फळ उद्यान साकारले जाणार आहे. यात आंबा, चिंच, पेरू, बोर, आवळा आदी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. गंगापूर रोडवरील गोदावरी परिचय उद्यानात फूलपाखरू उद्यान, तर अभियंतानगर येथील देवशिल्पी भगवान विश्वकर्मा उद्यानात औषधी झाडांची लागवड केली जाणार आहे.

१५ हजार रोपांचे वाटप

महापालिकेच्या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार असून, त्यांना मोफत वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. नागरिकही रोपे मिळण्याकरिता अर्ज करू शकतात. अर्जात अर्जदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्त्यासहित किती रोपे हवी आहेत, तसेच या रोपांची लागवड कुठे करण्यात येणार आहे आणि रोपांची देखभाल कोण करणार आहे, या विषयीची माहिती द्यावी लागणार आहे. तसे प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागणार आहे. झाड जगवले नाही तर पुन्हा लावण्याचे प्रतिज्ञापत्र नागरिकांना द्यावे लागणार आहे.

झाडामंध्ये जातीधर्म नाही म्हणून झाडांना आजही महत्त्व आहे. वृक्षलागवडीचे वाढते महत्त्व ही पर्यावरणाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. नाशिक हे उत्तम शहर असून, या ठिकाणी देवराईचे चांगले काम होत आहे. येत्या काळात नाशिक वृक्षलागवडीबाबत राज्यात वेगळा आदर्श उभा करणार आहे.

- सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे वीज केंद्रात पर्यावरणदिन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्य, जस्ट अ मिनिट, निबंध, कविता, घोषवाक्य स्पर्धा, हवा शुद्ध करणाऱ्या झाडांचे प्रदर्शन आदी कार्यक्रम झाले. मुख्य अभियंता उमाकांत निखारे, सुनील इंगळे, प्रभारी उपमुख्य अभियंता राकेश कमटमकर, अधीक्षक अभियंता शशांक चव्हाण, जलप्रक्रिया विभागप्रमुख सुनील पाटील या वेळी उपस्थित होते. हवेचे प्रदूषण या विषयावर प्रवीण मोरे, दीपक पाखरे, नीलेश राऊत, प्रसन्नजित भालेराव, गुलाब पवार, गौरव पुणेकर, शिवानी जाधव, रिया लिंबे या कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. हेमंत बेळेंनी लेखन, चंद्रकांत जाडकर यांनी दिग्दर्शन, तर प्रवीण काळोखे यांनी मार्गदर्शन केले. 'जस्ट अ मिनिट'मध्ये जयश्री वाकलकर, योगेश कापडणीस, तानाजी केरूरे, दुर्गा शिवसेन, तृप्ती नाशिककर, वासंती नाईक यांनी पर्यावरणावर काव्यवाचन केले. उमाकांत निखारे यांच्या हस्ते झाडांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दुर्गा शिवसेन यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती नाशिककर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्डन कौंटीत वृक्षारोपण

$
0
0

पंचवटी : गार्डन कौंटी या सोसायटीत गेल्या चार वर्षांत १२५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले. यात वड, पिंपळ, लिंब, आंबा, उंबर, बेल, गुलमोहोर, रेन ट्री, जांभूळ, बूच, चाफा, ख्रिसमस, सिल्व्हर ओक आदी झाडे बहरली आहेत. या सोसायटीत पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक गैरव्यवहाराची अधिकाऱ्यांकडून चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बँक मित्र गणेश सोनवणे याने परस्पर खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढून घेत गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नाशिक येथून अधिकाऱ्यांचे पथक दाभाडी येथे आले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या दाभाडी शाखेत सुमारे १० हजाराहून अधिक खातेदार असल्याने किती खातेदारांच्या खात्यातून नेमकी किती रक्कम परस्पर काढून घेण्यात आली आहे याविषयीचा सखोल तपास चौकशी समितीकडून केला जात आहे. खातेदारांच्या खात्यांची माहिती संकलित करून तक्रार स्वीकारली जात आहे. चौकशी समितीकडून गैरव्यवहार झालेली रक्कम किती हे निश्चित केले जाईल व त्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी संशयित आरोपी गणेश सोनवणे पोलिसांच्या ताब्यात असून बुधवार सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागण्या मंजुरीसाठी १७ पर्यंत मुदत

$
0
0

तीव्र आंदोलन करण्याचा आशा सेविकांचा निर्धार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात आरोग्यविषयक काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येत निदर्शने केली. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आशा सेविकांच्या शिष्टमंडळाला चार दिवसांत मानधन वाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, राज्य सरकारला १७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून, प्रस्तावावर शिक्कामोर्तब न झाल्यास राज्यव्यापी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे नेते राजू देसले यांनी दिली.

आरोग्यसेवा संरक्षण आणि हक्कांसाठी आघाडी या संघटनेतर्फे आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. यात विशेषत: राज्यातील गावागावांतून आलेल्या आशा व गटप्रवर्तक महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. सध्या राज्यात ६९,००० आशा व ३,५०० गटप्रवर्तक महिला आहेत. राज्यातील आशा सेविकांना नियमित स्वरूपाचे निश्चित मानधन मिळत नाही. आशा व गट प्रवर्तक यांना प्रत्येक महिन्याला निश्चित वेतन व कामावर आधारित सध्याच्या मोबदल्यात किमान तिप्पट वाढ व्हायला हवी. याबाबत सरकारकडून आश्वासन मिळाले आहे. पण, अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक महिलांच्या दरमहा निश्चित वेतन व मानधन वाढीबाबत पावसाळी अधिवेशनाआधी तातडीने कार्यवाही व्हावी, असहे देसले यांनी सांगितले.

आंदोलनानंतर आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटनांची बैठक झाली. राज्यभर १९ जून रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे आशा सेविकांना १० हजार रुपये व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये दरमहा द्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्हा अधिवेशन करून जानेवारीत राज्य अधिवेशन घेण्यात येणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी आयटकच्या १०० वर्ष पूर्तीनिमित्त होणाऱ्या मुंबई महारॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस सुमन पुजारी, विनोद झोडगे, अॅड. सुधीर टोकेकर, मंगला लोखंडे, अमृत महाजन, वैशाली खंदारे आदी उपस्थित होते.

'आयटक'चा पाठिंबा

सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा मोफत करण्याचा निर्णय घेऊन दुष्काळाने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. आरोग्य क्षेत्रातील १६ हजार रिक्तपदे त्वरित भरावीत. परिचारिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी विशेष परिचर्या संचालनालय स्थापन करावे, अशा काही प्रमुख मागण्यांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत संघटनेचे राजू देसले यांनी व्यक्त केले. या आंदोलनाला आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, सचिव दिलीप उटाने यांनी पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टबॉल प्रिमीयर लिग स्पर्धा उद्यापासून

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उदयोन्मुख सॉफ्टबॉल खेळाडूंना प्रकाशझोतात आणण्यासाठी महाराष्ट्र सॉफ्टबॉल प्रिमीयर लिग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे ७ जूनपासून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा के. के. वाघ अभियंत्रिकी महाविद्यालयाच्या हिरवळीवर होणार आहेत. नाशिक जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेच्यावतीने या स्पर्धा पार पडणार असून, ७ ते ९ जूनपर्यंत एकुण ४० सामन्यांचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ६ जून रोजी स्पर्धेत सहभागी सर्व ८ संघ व त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व संघ मालक आपल्या संघांची घोषणा करणार आहेत. या स्पर्धेत एकुण १२८ खेळाडू, १६ प्रशिक्षक, ८ संघ व्यवस्थापक, ८ संघ मालक व २४ राष्ट्रीय व राज्य पंच उपस्थित असणार आहेत.

नाशिकच्या क्रीडा प्रेमींना सॉफ्टबॉल या ऑलिम्पिक खेळातील चुरस पाहण्यासाठी क्रीडांगणावर उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे. महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ गटातील खेळाडूंनी पुढे येऊन खेळाला व खेळाडूंना जास्तीत जास्त वाव मिळावा म्हणूनच हे मोठे पाऊल उचलले आहे. उद्घाटन समारंभ ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून समारोप ९ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक वनराईचा संवर्धन वचनपूर्ती सोहळा

$
0
0

जैव विविधतेसाठी दोन एकरात जंगली झुडपांची लागवड

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कोवळ्या लुसलुशीत झाडांभोवती काढण्यात आलेली रांगोळी, फुलांनी सजविलेला त्यांच्या खोडांच्या भोवतालचा भाग, या रोपांना पाणी देण्यासाठी सुरू असलेली अबालवृद्धांची लगबग, औक्षण करीत केलेली पूजा अशा वातावरणात म्हसरूळ येथील नाशिक वनराईच्या तीन वर्षे संवर्धनाचा वचनपूर्ती सोहळा बुधवारी साजरा करण्यात आला. वनराईत जैवविविधता बहरण्यासाठी दोन एकरच्या जागेत ५०० जंगली झुडपांची लागवड करण्यात आली.

म्हसरूळ येथील नाशिक वनराईच्या संवर्धनाच्या वचनपूर्ती सोहळ्यास अभिनेते सयाजी शिंदे, महापौर रंजना भानसी, वन विभागाचे अरविंद शेळके, शिवाजी फुले, रवींद्र भोगे, नगरसेवक रुची कुंभारकर, दिनकर पाटील, बापूराव सोनवणे, शिवाजी आमले, आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड आदी उपस्थित होते. झाड हे प्रत्येकावर आईच्या मायेसारखे प्रेम करीत असते. पर्यावरणात झाड हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे झाडांच्या लागवडीबरोबर संवर्धनही महत्त्वाचे असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

गीतकार व गायक संजय गिते यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणारे गीत सादर केले. साहित्यिक अरविंद जगताप यांनी पर्यावरणासाठी झाडांचे महत्त्व कसे आहे, याची माहिती दिली. या सोहळ्यास विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला.

म्हसरूळ येथील वन कक्ष क्रमांक १९३ मधील ३५ एकरच्या जागेपैकी १८ एकर जागेत तीन वर्षांपूर्वी सहा हजार वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांच्या संवर्धनाचे काम काळजीने करण्यात आले. ही रोपे तीन वर्षांत बहरू लागल्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात येत होत्या. झाडांच्या रोपांना खत टाकणे, पाणी देण्याच्या कामात अनेक जण रमून गेले होते. अर्णी, अंगिमंत, माळुंगी, दिंडा, फांगळा, ४ प्रकारच्या कोरंट्या, कपवाशी, मेशवाक, मेंदी, गेळा, लोखंडी, गिडेसा, डिकामली, पांढरा कुडा, तांबडा कुडा, निरगुडी, काळी निरगुडी, कत्री निरगुडी, धाईटी, भारगी, वनजाई, हिंगणबेट, पिवळा कांचन, पांढरा कांचन, हटरुण, नेपती, हेंकळ, तरवड, सर्पगंधा, अश्वगंधा, श्वेतचित्रक, रक्तचित्रक या जंगली झुडपांची लागवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाघाटावरील आठ स्थळांचा जाणूया इतिहास

$
0
0

वर्धापन दिनानिमित्त हेरिटेज वॉकचे रविवारी आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी गोदाघाट परिसरातील आठ स्थळांवर 'मटा हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहराला धार्मिक व ऐतिहासिक असा मोठा वारसा लाभला आहे. या वारसा स्थळांचे महत्त्व व इतिहासातील स्थान नेमके कसे आहे, हे या वॉकमधून समजून घेता येणार आहे.

'हेरिटेज वॉक'ला रविवारी सकाळी ८ वाजता सरदार चौकातून काळाराम मंदिराकडे जाताना लागणाऱ्या श्री शृंगेरी शंकराचार्य मठापासून सुरुवात होईल. या मठासमोर सकाळी ७.५० वाजता सर्वांनी एकत्रित जमायचे आहे. वॉकमध्ये आठ स्थळांना भेट दिली जाणार असून, यात श्री शृंगेरी शंकराचार्य मठ, विठ्ठल मंदिर, गोरक्षकांचे जुने मंदिर, बिडकर महाराज मंदिर (राम-लक्ष्मण गुंफा), काळाराम मंदिर, चंद्रमावलेश्वर मंदिर, केशवस्वामी महाराज समाधी (पुणे विद्यार्थिगृह), कपालेश्वर मंदिर (समाप्ती) या स्थळांचा समावेश आहे. वॉकमध्ये इतिहास अभ्यासक देवेंद्र पंड्या मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता वॉकचा कपालेश्वर मंदिरात समारोप होईल.

..

हेरिटेज वॉकमधील वेगळेपण

महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित हा वॉक ५२ वा असून, गेल्या तीन वर्षांपासून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. वारसा स्थळांची फक्त माहितीच नव्हे; तर त्या स्थळाचा इतिहास व आठवणी या वॉकचे वैशिष्ट्य राहिले आहे. या हेरिटेज वॉकमध्ये नाशिकची अध्यात्मिक शक्तिस्थळे, भक्तिस्थळे आणि श्रद्धास्थळांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त पाहिलेल्या या स्थळांचा इतिहास अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.

...

नावनोंदणी आवश्यक

'मटा' हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावरील व्हॉट्सअॅपवर नावनोंदणी करायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर भागातील ग्राहकांना पाइपद्वारे गॅस

$
0
0

मार्च महिनाअखेर काम होणार पूर्ण

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर आणि पाथर्डी भागातील दहा हजार गॅसग्राहकांना नॅचरल गॅसचा (पीएनजी) पाइपलाइनद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे. मार्चअखेर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शहरात घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि वाहनांसाठी ग्रीन इंधन पुरवण्यासाठी गेल (इंडिया) आणि बीपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस रेग्युलेटरी अथॉरिटीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडे हे काम सोपवले आहे.

एमएनजीएलने पुढच्या वर्षी मार्चअखेरीस शहराच्या या दोनही भागात १० हजार घरांना पीएनजी कनेक्शन देण्याचे उदिष्टे ठेवले आहे. नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. रामनारायण यांनी 'मटा'ला सांगितले की, आम्ही याबरोबरच शहरात किमान ४५० ऑटोंना सीएनजी पुरवण्यासाठी या अर्थिक वर्षाअखेर सीएनजीचे १२ आऊटलेट उघडणार आहोत. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात टप्प्याटप्प्याने पाइपलाइनद्वारे गॅस पुरवण्यासाठी घरगुती गॅस आणि वाहनांच्या इंधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याची तयारी सुरू केली आहे. लिक्विफाइड नैसर्गिक गॅस (एलएनजी) साठविण्यासाठी पाथर्डी फाटा येथे नाशिक महापालिकेकडून जमीन उपलब्ध झाल्यानंतर एक सेंटर उभारले जाणार असून, पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा करण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. गुजरातच्या दाहेजकडून एलएनजीला स्टोरेज सुविधा देण्यात येणार आहे. कंपनीने शहरातील भूमिगत पाइप टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या स्मार्ट रोडवर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. पुढच्या टप्प्यात इंदिरानगर आणि पाथर्डी भागात भूमिगत पाइप टाकण्यात येतील. एलपीजी सिलिंडरऐवजी पीएनजी बदलण्यासाठी परिसरातील स्थानिक रहिवाशांशी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगवर्गाला वाढता प्रतिसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय योग विद्याधामच्या वतीने आयोजित मोफत योगासन प्राणायाम वासंतिक वर्गाला नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. या वर्गामध्ये सहभागी होणाऱ्या योगप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यामध्ये नागरिकांच्या शंकांचे निरसनही केले जात आहे. या मोफत वर्गाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीचा आठवा वर्धापन दिन आणि जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र टाइम्स, भारतीय योग विद्या धाम आणि नाशिकरोड येथील आरोग्यधाम निसर्गोपचार व योग केंद्र यांच्यातर्फे १ जूनपासून शहरात विविध भागात तब्बल ५१ ठिकाणी या वर्गांना सुरुवात झाली. २१ जूनपर्यंत दररोज एक तास हे वर्ग सुरू राहणार असून दिवसागणिक त्यास प्रतिसाद वाढत असल्याची माहिती तज्ज्ञ योग मार्गदर्शकांनी दिली. नागरिकांची सोय लक्षात घेऊन ४८ ठिकाणी सकाळी तर तीन ठिकाणी सायंकाळी हे वर्ग घेण्यात येत आहेत. या वर्गात योगा व प्राणायामांचा प्राथमिक अभ्यासक्रम शिकविण्यात येत असून १४ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अनेक योगप्रेमी त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.

या वर्गात 'ओमकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, योगासने, प्राणायामाची पूर्व तयारी याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत असून नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात येत आहे. विविध वयोगटातील लोक या शिबिरात सहभागी होत असून तरुणाईचा ओघ वाढत आहे. या वर्गाचे प्रकल्प प्रमुख मनोहर कानडे असून पुरुषोत्तम पुरी, अमरजितसिंग गरेवाल, राजेंद्र फड, संजय जाधव, गांगेय शर्मा, सुनंदा सखदेव यांसह सुनील जाधव हे योग प्रसाराची जबाबदारी पार पाडत आहेत.

आपणही होऊ शकता सहभागी

२१ जूनपर्यंत हा योग वर्ग सुरू राहणार आहे. अजूनही त्यामध्ये नागरिक सहभागी होऊ शकतात. योगवर्गाला येताना साधकाने सोबत ३ बाय ६ फूटची सतरंजी, योगा मॅट आणणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी साधकांची परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या साधकांस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या ठिकाणचे वर्ग सायंकाळी

हरी आकृती येथील वर्ग सायंकाळी ५ ते ६ या वेळेत, तर खुटवटनगर आणि विधातेनगर येथील वर्ग सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होतील. तसेच अनमोल नयतारा, गंगापूर शिवार आणि इंदिरानगर येथील वर्ग सकाळी ७.१५ ते ८.१५ या वेळेत होतील.

योगवर्गाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. प्रत्येक ठिकाणी किमान ५० ते ७० लोक सहभागी होत आहेत. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यांच्या शंकांचे निरसनही केले जात आहे.

- सुनंदा सुखदेव, योग प्रशिक्षक

योगाचे महत्त्व, पद्धती, फायदे सुरुवातीलाच सांगितले जात असल्याने कुणाला फारशा शंका राहात नाहीत. शंका उपस्थित झाल्यास त्याचेही निरसन केले जात असून नागरिकांच्या या वर्गाबाबत चांगल्या प्रतिक्रीया आहेत.

- सुनील जाधव, योग प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी परीक्षेत ग्रॅव्हीटीच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

सीईटी परीक्षेत ग्रॅव्हिटीच्या विद्यार्थ्यांचे यश

- -

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारच्या सीईटी सेलकडून घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ग्रॅव्हिटी अकॅडमीच्या १६ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलच्या वर गुण मिळवले आहेत. यामध्ये सिद्धी बागुल हिने ९९.९३ पर्सेंटाईल मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सिद्धेश पगार ९९.७४, व्यंकटेश कुलकर्णी ९९.७३, राज गोरे ९९.७२, जय सोनवणे ९९.६६, चिन्मयी फलक ९९.६१, इशान गुजराथी ९९.३४, राज सोनवणे ९९.२०, शिवराज काकडे ९९.२९, शुभम भगत ९९.१५, अथर्व पगार ९९.१८, आदित्य चव्हाण ९९.०२ पर्सेंटाइलनी यशस्वी झाले आहेत. योग्य मार्गदर्शन, नियमित अभ्यासक्रम व सराव यांमुळे यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत परप्रांतीय तरुणावर अत्याचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुटुंबातील शुभकार्याच्या पत्रिका वाटण्यासाठी केरळहून नाशिकमध्ये आलेल्या एका तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पंचवटी परिसरात रात्री १२ ते पहाटे चारच्या दरम्यान त्याच्यासोबत काही संशयितांनी अश्लील कृत्य केले. पीडित तरुणाची कैफियत ऐकूनही पोलिसांनी मात्र लुटमारीचा गुन्हा दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

केरळमधील कोटायम येथे राहणारा पीडित तरुण सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. यापूर्वी तो आठ वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास होता. परिचितांना कुटुंबातील शुभकार्याची पत्रिका देण्यासाठी तो नाशिकमध्ये आला होता. मंगळवारी रात्री नऊ वाजता तो पंचवटी परिसरात पोहोचला. येथील एका हॉटेलमध्ये त्याने खोली घेतली. भद्रकाली परिसरात रात्री अकराच्या सुमारास तो जेवणासाठी गेला. त्यानंतर तो फळ बाजारपेठेजवळ आला. पंचवटीतील हॉटेलमध्ये येण्यासाठी त्याने रिक्षाची मदत घेतली. रिक्षाचालकाने त्याला थोडावेळ भद्रकाली परिसरातच फिरविले. नंतर दामोदर चित्रपट गृहाजवळ चार जणांना रिक्षात बसविले. तर दोघेजण मागोमाग दुचाकीने येऊ लागले. रिक्षाचालक आणि रिक्षात बसलेल्या अन्य तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याने रिक्षा थांबवून उतरून देण्याची मागणी केली. परंतु, रिक्षातील एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावून चूपचाप बसून राहण्याबाबत धमकावले. त्यानंतर थोड्याच अंतरावर एकाने रिक्षा चालकाकडे बिअरच्या बॉटल्स आणून दिल्या. त्यानंतर संशयित त्याला निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्याला बिअर पाजली. त्याला मारहाण करून त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले. तरुणाने आपल्याला सोडून देण्याबाबत विनंती केली. परंतु, त्यानंतरही त्याला मारहाण करून पाकीट व मोबाइल हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महागडा मोबाइल संशयितांनी हिसकावून नेल्यानंतर पीडित तरुणाने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. परिसरातील एका मंदिराजवळ एका वृद्धाने त्याला आसरा दिला. सकाळी त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांच्या टोलवाटोलवीचा अनुभव या पीडीत तरुणाला आला. तो सर्वप्रथम आडगाव पोलिस स्टेशनला गेला. तेथे घडला प्रकार कथन केला. त्याचा जबाबही घेण्यात आला. परंतु, हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे. पीडित तरुणाने सांगितलेल्या घटनाक्रमाप्रमाणे पोलिस त्याला सर्व ठिकाणी घेऊन गेले. पंचवटीत हा प्रकार घडल्याने आडगाव पोलिसांनी त्याला पंचवटी पोलिसात फिर्याद देण्यास सांगितले. गुन्ह्याची सुरुवात भद्रकालीतून झाल्याने तेथे फिर्याद देण्याचा सल्ला त्याला देण्यात आला. भद्रकाली पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

फिर्यादीकडे सखोल विचारपूस केली आहे. सामूहिक अत्याचार झाल्याचे त्याने सांगितले नाही. मारहाण व लूटमार झाल्याचे तो सांगत आहे. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

- अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकविता

$
0
0

झाड एक हवे दारी!

विजय भदाणे, नाशिक

कडकडीत पडले उन

रस्ता निघाला भाजून

सभोवती नाही झाडे

थंडावा येणार कोठून?

वाटसरू कोणी थकला

उन्हाने जीव गांजला

वाटेवरी झाड दिसेना

छाया, विसाव्याला मुकला

पक्षांचा मधूर किलबिलाट

पहाटे चिमण्यांचा चिवचिवाट

कलरव पडेना कानी

झाडांची होता काटछाट!

प्रदूषणाचे वाढले प्रमाण

ओझोनचे घटता आवरण

रोखण्या चढते तापमान

निसर्ग संपदेचे हवे संवर्धन

झाडे मित्र परोपकारी

निरामय आरोग्य देणारी

झाडाविना उडेल हाहाकार

झाड एक हवे दारी!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपर्वाइतून पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्याच्या एकेका थेंबासाठी ग्रामीण भागातील रहिवाशांना तळमळावे लागत असताना, शहरात मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे बुधवारी पुन्हा एकदा पाथर्डी फाटा परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेले. जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी महापालिकेला पाणी कपातीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी पाण्याची उधळपट्टी सुरूच असून, महापालिका आयुक्त अशा बेपर्वाईची दखल घेऊन पाण्याचा हिशेब घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. लाखो ग्रामीण रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दररोज शेकडो टँकर्स धावत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात ही परिस्थिती असताना या भीषण दाहकतेशी आपले नातेच नाही असे महापालिका क्षेत्रातील नागरिक वारंवार कृतीमधून दाखवून देत आहेत. शहरात सातत्याने कोठे ना कोठे पाण्याची नासाडी सुरूच असल्याने महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. पाण्याची निलाजरेपणे उधळपट्टी करणाऱ्यांना दणका देत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. असे असतानाही महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. बुधवारी पाथर्डी फाटा परिसरातील पोलिस वसाहतीसमोरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ पाणी रस्त्यावरून वाहत होते. दुपारी तीन ते पावणे चार या दरम्यान हा प्रकार घडला. वासननगर आणि आसपासच्या परिसरात रस्त्यावर पाण्याचे तळे साचले. लाखो लिटर पाणी वाया गेल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

...

माहिती देणाऱ्यांनाच अधिकाऱ्यांनी सुनावले

पाथर्डी फाटा परिसरात पोलिस वसाहतीच्या समोरील बाजूस ही वीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. वासननगर, सोनवणे मळा, कर्मा रेसिडेन्सी, गुरुगोविंदसिंग कॉलेज व आसपासच्या परिसराला या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. दुपारी तीनच्या सुमारास ही टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामधील पाणी खाली सांडून परिसरात तळे साचले. पाणी वाया जाण्याचा हा प्रकार सुमारे अर्धा ते एक तास सुरू होता. काही सजग नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. परंतु, या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्याऐवजी नागरिकांनाच सुनावण्यात धन्यता मानली.

..

जिल्ह्यातील धरणांमध्ये सात टक्केच पाणी शिल्लक असताना, शहरात सर्रास पाण्याची नासाडी सुरू आहे. बुधवारी दुपारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. येथे मोठे पाण्याचे तळे साचले. पाण्याची अशा प्रकारे होणारी नासाडी पहावत नाही. महापालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

- दर्शन लड्डा, नागरिक

....

आमच्याकडे रात्री पाणी येण्याची निश्चित वेळ नाही. कधी अकराला, कधी एकला तर कधी मध्यरात्री उशिराही पाणी सोडतात. सकाळी कमी दाबाने पाणी सोडले जाते. पाणी सोडण्याबाबत महापालिकेचे निश्चित नियोजन नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. आज तर सुमारे तासभर पाणी वाया गेले आहे.

- ममता खंडागळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरे उद्यानात वृक्षारोपण

$
0
0

पंचवटी : तारवालानगर मित्र मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे बाळासाहेब ठाकरे उद्यानात बुधवारी (ता. ५) पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ५० रोपे लावण्यात आली. वृक्षारोपणानंतर आलेल्या मान्यवरांनी पर्यावरणपूरक फलक हाती घेत नागरिकांना संदेश दिला. त्यात झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, वृक्ष हेच खरे मित्र उगारू नका त्यांच्यावर शस्त्र, धरणीमातेचे ऋण फेडूया, वृक्षारोपण करूया असे संदेश होते. शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक टावरे आणि कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण गरजेच'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विद्यार्थ्यांचा जीवनाशी संबंधित सर्वार्थाने विकास व्हायला हवा. विद्यार्थ्यांची अतिकाळजी घेण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रशिक्षक महत्त्वाचा असतो असे सांगताना त्यांना सचिन तेंडुलकरला आचरेकरांसारखे उत्तम गुरू प्रशिक्षक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासाचा संबंध गुणांबरोबरच जीवनाशी असला पाहिजे, विद्यार्थ्यांचा विकास हा मूळ हेतू असल्याचे प्रमुख पाहुणे समुपदेशक शंतनु गुणे यांनी सांगितले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात ८० टक्के किंवा 'अ' श्रेणी तसेच जिल्हा व राज्यस्तरीय नैपुण्य मिळविलेल्या इयत्ता बालवाडी ते नववीचे १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. समुपदेशक शंतनु गुणे व डॉ. विकास गोगटे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अॅड. भानुदास शौचे होते. डॉ. विकास गोगटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महर्षी याज्ञवल्क्य प्रतिमापूजनाने करण्यात आली. कीर्ती शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले तर महेंद्र गायधनी यांनी आभार मानले. यावेळी अवधुत कुलकर्णी, उदय जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीसीआर’मध्ये द्या धर्मस्थळांना मंजुरी

$
0
0

शहरातील तीनही आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारकडून नव्याने जाहीर करण्यात येत असलेल्या एकत्रित सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत (डीसीआर) खुल्या जागांवर धार्मिक स्थळांना मान्यता देण्याची तरतूद करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेने ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत म्हणून घोषित केले आहेत. यावर केवळ १८२ हरकती आल्या असल्या तरी, या धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडे पुरेसे पुरावे नसल्याने त्यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे. महापालिकेने खुल्या भूखंडावर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्याबाबतचा ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे. परंतु, हा ठराव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांचा गुंता अधिकच वाढला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास एकसारखा व्हावा यासाठी सरकारने मुंबई महापालिका सोडून सर्व महापालिकांच्यासाठी एकत्रित 'डीसीआर' राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी ८ मार्च रोजी अधिसूचना काढण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील आमदार प्रा. फरांदे, आ. सानप व आ. हिरे यांनी एकत्रित सहीचे निवेदन देत मुख्यमंत्र्यांना देत 'डीसीआर' खुल्या जागांवर धार्मिक स्थळांना मान्यता देण्याची तरतूद करण्याची मागणी केली. 'डीसीआर' मुद्दा क्र. १५.३.७ प्रमाणे खुल्या जागांवर स्पोर्टस अॅण्ड रिक्रेशनल अॅक्टिव्हिटी अनुज्ञेय असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या २५ ऑगस्ट २०१८ च्या निकालाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या निकालातील मुद्दा क्र. २८ प्रमाणे प्रथमदर्शनी धार्मिक बांधकामे ही देखील स्थानिकांच्या विरंगुळ्यासाठी बांधल्याचे मत व्यक्त केलेले असल्याचे आ. फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शहरातील अनेक धार्मिक स्थळांमध्ये बाल संस्कार केंद्र व भजन होते. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांचा विरंगुळा होत असतो. त्यामुळे ही धार्मिक स्थळे समाज मंदिरे असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

..

गुंता सुटण्याची शक्यता

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करत, 'डीसीआर'चे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करून तसेच सदर धार्मिक स्थळात कोणकोणते सामाजिक उपक्रम राबविले जातात यांची खात्री करीत त्या स्थळांना मान्यता देता येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा आ. फरांदे यांनी केला आहे. 'डीसीआर' अंतिम करतांना आमदारांनी उपस्थित मुद्यांचा विचार करून निर्णय घेण्याचे आदेश नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांचा गुंता सुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंत क्लासेसचे यश

$
0
0

नाशिक : राज्य सामाईक परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत यशवंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शुभम संधानशीव याने ९९ पर्सेंटाईल मिळवून प्रथम, तर तुळजा जगदाळे हिने ९३ पर्सेंटाईल गुण मिळविले. क्लासचे आठ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेस पात्र झाले. पूनम गावित या विद्यार्थिनीने ८८ टक्के गुण मिळवून बोर्डाच्या परीक्षेतही क्लासमधून प्रथम क्रमांक पटकाविला. नीट परीक्षेत क्लासचे १७ विद्यार्थी पात्र ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनराईचा संवर्धन वचनपूर्ती सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी कोवळ्या लुसलुशीत झाडांभोवती काढण्यात आलेली रांगोळी, फुलांनी सजविलेला त्यांच्या खोडांच्या भोवतालचा भाग, या रोपांना पाणी देण्यासाठी सुरू असलेली अबालवृद्धांची लगबग, औक्षण करीत केलेली पूजा अशा वातावरणात म्हसरूळ येथील नाशिक वनराईच्या तीन वर्षे संवर्धनाचा वचनपूर्ती सोहळा बुधवारी साजरा करण्यात आला. वनराईत जैवविविधता बहरण्यासाठी दोन एकरच्या जागेत ५०० जंगली झुडपांची लागवड करण्यात आली. म्हसरूळ येथील नाशिक वनराईच्या संवर्धनाच्या वचनपूर्ती सोहळ्यास अभिनेते सयाजी शिंदे, महापौर रंजना भानसी, वन विभागाचे अरविंद शेळके, शिवाजी फुले, रवींद्र भोगे, नगरसेवक रुची कुंभारकर, दिनकर पाटील, बापूराव सोनवणे, शिवाजी आमले, आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड आदी उपस्थित होते. झाड हे प्रत्येकावर आईच्या मायेसारखे प्रेम करीत असते. पर्यावरणात झाड हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे झाडांच्या लागवडीबरोबर संवर्धनही महत्त्वाचे असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. गीतकार व गायक संजय गिते यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणारे गीत सादर केले. साहित्यिक अरविंद जगताप यांनी पर्यावरणासाठी झाडांचे महत्त्व कसे आहे, याची माहिती दिली. म्हसरूळ येथील वन कक्ष क्रमांक १९३ मधील ३५ एकरच्या जागेपैकी १८ एकर जागेत तीन वर्षांपूर्वी सहा हजार वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांच्या संवर्धनाचे काम काळजीने करण्यात आले. ही रोपे तीन वर्षांत बहरू लागल्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात येत होत्या. झाडांच्या रोपांना खत टाकणे, पाणी देण्याच्या कामात अनेक जण रमून गेले होते. अर्णी, अंगिमंत, माळुंगी, दिंडा, फांगळा, ४ प्रकारच्या कोरंट्या, कपवाशी, मेशवाक, मेंदी, गेळा, लोखंडी, गिडेसा, डिकामली, पांढरा कुडा, तांबडा कुडा, निरगुडी, काळी निरगुडी, कत्री निरगुडी, धाईटी, भारगी, वनजाई, हिंगणबेट, पिवळा कांचन, पांढरा कांचन, हटरुण, नेपती, हेंकळ, तरवड, सर्पगंधा, अश्वगंधा, श्वेतचित्रक, रक्तचित्रक या जंगली झुडपांची लागवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images