Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ट्रॅफिक वार्डन बंधनकारक

$
0
0

स्कूल बस समिती बैठकीत सूचनांचा पाऊस

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील स्कूल बस समितीची बैठक पोलिस आयुक्तालयात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने अनेक सूचना पुढे आल्या. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांच्या जनजागृतीनंतर या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शाळा-कॉलेजेस लवकरच सुरू होतील. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिस आयुक्तालयात स्कूल बस समितीच्या बैठक पार पडली. बैठकीला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांच्यासह पोलिस खात्यातील अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी विजय पगार, डॉ. वैशाली झनकर, शंकर गवळी तसेच स्कूल बस ठेकेदार उपस्थित होते.

बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेल्या धोरणाबाबत चर्चा झाली. शाळा भरताना आणि सुटण्यावेळी शाळेने ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करणे बंधनकारक करण्याचा निर्णय यावेळी झाला. शाळा परिसरात आवश्यक त्या वाहतूक चिन्हांचा वापर करणे, बसचालकाची दरवर्षी चरित्र पडताळणी करून त्यांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा पार पडली. दरम्यान, प्रत्येक शाळेसाठी एक पोलिसकाका ही संकल्पना निश्चित करण्याचा निर्णय झाला. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅनवर कारवाई करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. याशिवाय शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यपाकांची महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकत्रित बैठक यापुढे घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटील बंधूंचे गुडघ्याला बाशिंग!

$
0
0

दिनकर पाटलांकडून पत्रकवाटप; दशरथ पाटलांनीही ठोकले शड्डू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप पाच महिने बाकी असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. यात सातपूरमधील पाटील बंधू आघाडीवर असून माजी महापौर दशरथ पाटील आणि भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आपली उमेदवारी अगोदरच घोषित केली आहे. दिनकर पाटील यांना आमदार करा, अशा आशयाचे पत्र नाशिक पश्चिम मतदारसंघात वाटले जात आहे. तर दशरथ पाटील यांनीही स्वत:ची उमेदवारी जाहीर करीत आपल्या महापौरपदाची कारकीर्द जनतेसमोर मांडली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने पुन्हा बाजी मारली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या विधानसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात गोडसे यांना मताधिक्य मिळाल्याने युतीतील प्रत्येकाला आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिवसेना-भाजपचे युती होणार असल्याने विजय निश्चित असल्याचे समजत प्रत्येक जण तयारीला लागला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी औपचारिक घोषणेची वाट न पाहता वैयक्तिक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात नेहमीप्रमाणे पाटील बंधू आघाडीवर आहेत. नाशिकचे बहुचर्चित माजी महापौर दशरथ पाटील आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सभागृहनेते दिनकर पाटील यांनीही लोकसभेसाठी तयारी केली होती. परंतु, यावेळी उमेदवारी न मिळाल्याने आणि पक्षाने निवडणूक न लढण्याचे आदेश दिल्याने दिनकर यांनी उमेदवारी मागे घेतली. तर, दुसरीकडे दशरथ पाटील यांनीही मतदारांचा कौल पाहता निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होती. परंतु, या दोन्ही पाटील बंधूंनी विधानसभा लढण्याची घोषणा त्याच वेळी केली होती. त्यामुळे या दोन्ही पाटील बंधूंनी विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दिनकर पाटील यांनी महापालिकेत केलेल्या कामांच्या जंत्रीचे पत्रक तयार करून वाटण्यास सुरुवात केली आहे. विविध समाज तसेच घटकांचे पाठिंबा असलेले पत्र 'नाशिक पश्चिम'मध्ये वितरीत केले जात आहे. 'दिनकर पाटील यांना आमदार करायचेच' अशा आशयाचे पत्र वाटप केले जात आहेत. तर, दुसरीकडे दशरथ पाटील यांनीही महापौरांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचे पत्रक सोशल मीडियावर फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या दोन भावांमधील आमने सामनेची लढाई रंजक ठरणार असून त्याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

सभागृह नेत्यांची पायाभरणी

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढत पायाभरणी केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रत्येक घरापर्यंत गोडसेंच्या निमित्ताने पोहचून पाटलांनी आपलीच विधानसभा निवडणुकीची पायाभरणी केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांच्या पेक्षाही पाटलांनी यावेळेस जोर लावला होता. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपची उमेदवारी मिळो न मिळो

लढण्याचा पाटील यांनी पवित्रा घेतला होता. या मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आमदार आहेत. त्यामुळे उमेदवारीच घोषणा होण्यापर्यंतही पाटील यांनी वाट बघितलेली नाही. त्यामुळे पाटील यांच्या घाईची पक्ष काय दखल घेतो, याकडे आता लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी क्रीडा प्रबोधिनीत मिळणार चाचणीद्वारे प्रवेश

$
0
0

निवासी क्रीडा प्रबोधिनीत

मिळणार चाचणीद्वारे प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे क्रीडा व युवक सेवा संचलनालयातर्फे राज्यातील खेळाडूंना निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया २०१९-२० या करीता असून, राज्यातील खेळाडूंनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचलनालयातर्फे करण्यात आले आहे.

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी २४ जून रोजी सकाळी १० आर्चरी, हॅन्डबॉल, बॉक्सिंग या खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनी अमरावती, नागपूर, अकोला या ठिकाणी चाचणी स्पर्धा होणार आहे. त्याच प्रमाणे अॅथलेटीक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, वेट लिप्टींग, जिम्नॅस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन या खेळांसाठी २४ व २५ जून रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे चाचणी होणार आहे. त्याच प्रमाणे खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी २५ जून रोजी सकाळी १० वाजता आर्चरी, हॅन्डबॉल, बॉक्सिंग या खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनी अमरावती, नागपूर, अकोला या ठिकाणी चाचणी होणार आहे. त्याच प्रमाणे अॅथलेटीक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, वेट लिप्टींग, जिम्नॅस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन या खेळांसाठी २५ व २६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे चाचणी होणार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी हजर रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळेना फंड, पण तपासकार्य अखंड!

$
0
0

रेल्वे पोलिस करताहेत स्वखर्चाने तपास; सात महिन्यांपासून विनाफंड काम

...

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

गैरसोयी, तुटपुंजी साधने, बारा तास ड्युटी अशा परिस्थितीत काम करणाऱ्या नाशिकरोड रेल्वे पोलिसांची नवीन सत्त्वपरीक्षा सुरू आहे. सात महिन्यांपासून तपास फंडच मिळालेला नसल्याने या पोलिसांना स्वतःच्या खर्चाने तपास करावा लागत आहे. कमी पगारात संसार चालवायचा की गुन्ह्यांचा तपास करायचा हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

रेल्वे पोलिसांना तपासासाठी राज्यात-परराज्यात जावे लागते. तपासादरम्यान प्रत्येक पोलिसाला दर दिवसाला भोजन, निवास, वाहतूक आदींसाठी एक हजार रुपये तरी खर्च येतो. यासाठी पोलिसांना निधी मंजूर होतो. त्याला तपास फंड म्हणतात. नाशिक शहरातील पोलिसांना हा वेळेत मिळतो. मात्र, या पोलिस यंत्रणेचाच भाग असलेल्या रेल्वे पोलिसांना सात महिन्यांपासून तपास फंड मिळालेला नाही.

..

...यासाठी हवा फंड

नाशिकरोड हे क्लास वन दर्जाचे रेल्वेस्थानक आहे. प्रवासी हरवणे, ऐवज चोरी, गाडीतून पडून प्रवासी जखमी किंवा मृत्यू होणे, परगावची मुले, प्रेमीयुगल पळून येणे, गाडीत किंवा स्थानकात नैसर्गिक मृत्यू आदी घटना घडतात. त्यांच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांना देशभरात जावे लागते. रेल्वेगाड्यांमध्ये गस्त घालावी लागते. या सर्व गोष्टींसाठी तपास फंड लागतो.

..

प्रशासनाचे दुर्लक्ष

रेल्वे पोलिसांचे मुख्यालय अनेक वर्षे नागपूरला होते. १५ ऑगस्ट २०१८ नागपूरचे विभाजन होऊन औरंगाबाद विभाग स्थापन झाला. औरंगाबाद, नांदेड, नाशिक, इगतपुरी, शेगाव, नंदुरबार, जळगाव, भुसावळ आदी प्रदेश तिकडे जोडले गेले. हा विभाग झाल्यापासून तपासफंड विलंबाने मिळत आहे. पोलिसांना औरंगाबाद अधीक्षक कार्यालयाला बिले पाठवावी लागतात. सहा-सात महिने ती मंजूरच होत नाहीत. तोपर्यंत खर्च पोलिसांना करावा लागतो.

..

सर्वच प्रतिकूल

नाशिकरोड रेल्वे स्थानकात पूर्वी इगतपुरी पोलिस चौकी होती. सन १९८८ साली तिचे रुपांतर पोलिस ठाण्यात झाले. तेव्हापासून हे पोलिस या खुराड्यातच काम करतात. हे पोलिस शेजारील कोर्टाच्या खोलीत बसतात. महिला पोलिसांना चेंजिंग रूम, स्वच्छतागृहही नाही. गुन्हेगारांसाठी मोठी कोठडी नाही. रेल्वे पोलिसांसाठी रेल्वेने क्वार्टस बांधून दिल्या आहेत. मात्र, त्यांची अवस्था वाईट झाल्याने केवळ तीनच रेल्वे पोलिस कर्मचारी तेथे राहतात. पाच खोल्या पडून आहेत.

..

जिद्दीला सलाम

नाशिकरोड स्थानकात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. तपासी अंमलदार संख्या कमी आहे. एका ठाणे अंमलदाराकडे वर्षाला वीस गुन्हेही खूप होतात. मात्र, नाशिकरोड रेल्वे पोलिसाकडे किमान ३० तपास असतात. बारा तास काम, ढासळते आरोग्य, वाढते गुन्हे, अपुरे मनुष्यबळ, अपुरी जागा, स्वच्छतागृहाची वानवा, मोडकळीस आलेली निवासस्थाने अशा समस्यांना तोंड देत हे पोलिस कर्तव्य बजावत आहेत.

..

गुन्हे संख्या वाढ

नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत आकस्मात मृत्यूची संख्या वर्षाला ७० ते ७५ असते. वर्षाला सुमारे चारशे गुन्हे नोंदवले जातात. या पोलिसांना रेल्वेगाडीखाली कटलेले मृतदेह रुग्णालयात न्यावे लागतात. या पोलिसांची हद्द इगतपुरीपासून ओढ्यापर्यंत २०० किलोमीटर होती. आता कसबे व खेरवाडी समाविष्ट झाल्याने हद्द २४१ किलोमीटर झाली आहे. एकूण बारा रेल्वे स्थानकांची जबाबदारी आली आहे. या स्थानकात २०१७ सालात चोरीचे ३७५ गुन्हे दाखल झाले, तर २०१८ सालात हा आकडा ४३२ वर गेला आहे. मनुष्यबळ तेवढेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्काडा’त भ्रष्टाचाराचा वास

$
0
0

सीताराम कुंटेंची निविदा प्रक्रियेला स्थगिती

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या २८० कोटींच्या स्काडा प्रणाली (सुपरवायझरी कंट्रोल ॲण्ड डाटा एक्विझिशन सिस्टिम) ची निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे. ठेकेदाराच्या फायद्यासाठी २८० कोटींच्या निविदेचे तीन तुकडे करण्याच्या शुद्धीपत्रकावर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेत कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेंकडे तक्रार दाखल केली होती. आमदार देवयानी फरांदेंनीही लेखी आक्षेप घेतल्यानंतर या निविदाप्रक्रियेला कुंटेंनी स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेने केलेल्या वॉटर ऑडिटमध्ये शहरात होणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठ्यातील ४३ टक्के पाण्याचा हिशेब लागत नसल्याचे समोर आले होते. याच अहवालात ७० टक्के मीटर नादुरुस्त असल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पुण्याच्या धर्तीवर स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणाली शहरात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्काडा प्रणालीवर आधारित अत्याधुनिक वॉटर मीटर बसिण्याचा निर्णय घेत पाणीपुरवठा योजना ऑनलाइन करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने २८० कोटी रुपयांची योजनाही मंजूर केली. या कामांची निविदाही काढण्यात आल्या.

या स्काडा प्रणालींतर्गत दोन लाख मीटर विकत घेऊन ते बसवले जाणार होते. परंतु, स्मार्ट सिटी कंपनीतील अधिकाऱ्यांनी यात लहान ठेकेदारांच्या भल्यासाठी परस्पर शुद्धीपत्र काढले होते. दोन लाखापैकी पहिल्यांदा १७ हजार मीटर बसवणे, ते यशस्वी झाले तर २० हजार पाणी मीटर बसवणे असा बदल करण्यात आला. तसेच हे यशस्वी झाले तर १ लाख ६७ हजार मीटर बसवण्याचा घाट होता. परंतु, एकाचवेळी मीटर बसवल्याशिवाय प्रकल्प कसा यशस्वी होणार याबाबत संचालकांनी आक्षेप घेतला होता. ठेकेदाराच्या भल्यासाठी निविदेतील अनेक महत्त्वाच्या अटी-शर्थी शुद्धीपत्रकाद्वारे बदलल्या गेल्या. या बदलाबाबत आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी संचालक महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शाहू खैरे, गुरुमीत बग्गा यांच्या तक्रारीआधारे कंपनी अध्यक्ष कुंटे यांच्याकडे आक्षेप घेतला. कुंटेंनी त्याची गंभीर दखल घेत स्थगिती दिल्याने हा डा‌व उधळला गेल्याची चर्चा आहे.

...

कंत्राटी अधिकाऱ्याचा प्रताप

स्मार्ट सीटी कंपनीचा वादग्रस्त कारभार हा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. कंपनीच्या कामकाजासाठी कंत्राटीपद्धतीने भरलेल्या अधिकाऱ्यांकडे मात्र मोठ मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विशेषत: निविदा प्रक्रियेशी संबंधित टेबलावरील अधिकाऱ्याच्या हातातच स्मार्ट सिटीचा कारभार एकवटल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या संचालक मंडळात हा वादाचा विषय होणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासंगम सुधारित

$
0
0

बोहाडा-जागरण गोंधळ

'कलासंगम'मध्ये जागर!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दोन दिवसीय कलासंगम महोत्सव यंदा पारंपरिक बोहाडा व जागरण गोंधळ या लोककलेने रंगणार आहे. नाशिककरांना ही पारंपरिक मेजवानी देण्यासाठी आदिवासी भागातून बोहाडा व जागरण गोंधळ घालणारे कलाकार येणार असून, कलासंगम महोत्सव गाजविणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवार ७ व शनिवार ८ जून रोजी कलासंगम महोत्सव होणार आहे. ७ जून रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

दुपारी १२ वाजता लोककलेचे ख्यातनाम अभ्यासक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश खांडगे आणि प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या गप्पांमधून लोककलेचा प्रवास उलगडतील. त्यानंतर नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी गप्पांमधून चित्र-मूर्तीचा प्रवास आणि ख्यातनाम लोककलावंत नंदेश उमप यांच्या गप्पांमधून जांभुळ आख्यानचा प्रवास मांडणार आहेत.

७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बोहाडा रंगणार आहे. बोहाडा हा पारंपरिक उत्सव असून, मुखवट्यांचे नृत्यनाट्य प्रकार त्यात असतो. सुमारे २०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा जगंदबा यात्रा उत्सव 'बोहाडा' म्हणून ओळखला जातो. मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे 'बोहाडा' हा महाराष्ट्र समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जागरण गोंधळचा कार्यक्रम होणार आहे. मान्यवर कलाकार यावेळी खंडोबाची गाणी सादर करणार असून, नाशिककरांनी या महोत्सवाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नवी दिल्ली… - नाशिक

सकाळी ११.०० …- दुपारी १२.५५

नाशिक… - नवी दिल्ली

दुपारी १.२५… - दुपारी ३.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान ईदचा शहरात उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रमजान महिन्यातील तीस उपवास पूर्ण होऊन व इस्लामी महिना शव्वाल-अल-मुर्करम प्रारंभ झाल्याने आज (५ जून) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहरातील ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे.

नाशिकच्या शाही मशिदींसह शहरातील इतर भागात मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. मंगळवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याची सांगता झाली असून, आज ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होईल, असे शहर-ए-खतीब हिसामुद्दिन अशरफी यांनी सांगितले. ईद निमित्ताने शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत बांधवांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडगावला आरोग्य शिबिर

$
0
0

नाशिक : पोलिस कल्याण सप्ताहानिमित्त ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने आडगाव मुख्यालयात आयोजित आरोग्य शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा सुमारे ४५० अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. पोलिस कल्याण योजनेची जागरूकता व्हावी, यासाठी पोलिस कल्याण सप्ताह पाळला. यावेळी सर्वांची आरोग्य, नेत्र आणि दंत तपासणी करण्यात आली.

...

युवक बचावला

नाशिक : स्वा. सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेला २३ वर्षीय युवक आज (दि.४) बालंबाल बचावला. तलावात सूर मारलेल्या तरुणास पाण्याचा अंदाज आला नाही. कर्मचाऱ्यांसह जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. आदेश माने असे युवकाचे नाव असून, ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. आदेशवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

...

संशयिताला कोठडी

नाशिक : युवतीचा विवाह मोडून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अटक केलेल्या शिवाजी केदारे या संशयितास कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रोशनी दिलीप हिरे या युवतीशी प्रेमप्रकरण असल्याचे शिवाजीने रोशनीच्या होणाऱ्या पतीला सांगितले. याचमुळे रोशनीने गत रविवारी आसाराम पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा भारनियमनावर फुली

$
0
0

राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असल्याचा दावा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला पुरेशी वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम न झाल्याने राज्यात कोठेही भारनियमन केले जाणार नाही, असा दावा महावितरण कंपनीनेतर्फे देण्यात आली आहे..

सद्य:स्थितीत महावितरणची उच्चतम विजेची मागणी १९ हजार ते १९ हजार ५०० मेगावॅट दरम्यान आहे. ही मागणी दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून व नवीन व नवीकरणीय स्त्रोतांमधून पूर्ण करण्यात येत आहे. महावितरणकडे झिरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच क्र. ६,७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पामध्ये असलेला वाटा मिळून एकूण १ हजार १४४ मेगावॅट अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच, पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि विजेची मागणी एवढी विजेची उपलब्धता असल्याकारणाने जरी कोयना वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्र. ४ मधून वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमनाची गरज निर्माण झालेली नाही. कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील चौथा टप्पा २९ मे पासून बंद करण्यात आला आहे.

मागणी-पुरवठ्यात ताळमेळ

महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीन व नवीकरणीय स्त्रोत यांच्यासोबत विविध दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. या वीजनिर्मिती स्त्रोंताकडून उपलब्ध होणारी वीज व विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण कंपनी विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ घालत असते. राज्यात विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झिरो शेड्युलमध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्सचेंजवर वीज खरेदी करून विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल व याप्रमाणे मागणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

अघोषित भारनियमन?

भारनियमनमुक्तीचा दावा महावितरण कंपनी करीत असली तरी नाशिकसह काही शहरांमध्ये वारंवार लाइट जाण्याचे प्रकार घडत आहेत. काही भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता दोन तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने हे अघोषित भारनियमन असल्याची शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर पिता-पुत्राची सावकारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रमाणित दरापेक्षा जास्त व्याजदराने पैसे वसूल करीत कर्जदारास डांबून ठेवल्याप्रकरणी निमाचे माजी अध्यक्ष, तसेच लॅण्ड डेव्हलपरसह त्यांच्या मुलाविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश वैश्य आणि त्यांचा मुलगा जितेश (रा. पहिला मजला, नाइस संकुल, सातपूर) अशी संशयित बापलेकाची नावे आहेत. या प्रकरणी ज्योत्स्ना शर्मा (रा. श्रीरंग हाइट्स, विद्याविकास संकुल) यांनी फिर्याद दिली आहे. शर्मा यांच्या तक्रारीनुसार, ओळखीच्या असलेल्या वैश्य पिता-पुत्राकडून २०१४ ते २०१८ या कालावधीत शर्मा दाम्पत्याने कौटुंबिक अडचणींमुळे पैसे घेतले. वेळोवेळी घेतलेल्या ३६ लाख रुपयांच्या मोबदल्यात या पिता-पुत्रांनी शर्मा यांच्याकडील फ्लॅट, जमिनीची कागदपत्रे घेऊन नोटरी नोंदविले. शर्मा यांच्या फिर्यादीनुसार ३६ लाख रुपयांच्या मोबादल्यात त्यांनी ठरलेल्या व्याजदरानुसार जवळपास ५२ लाख रुपये परत केले. मात्र, वैश्य पिता-पुत्रांनी अधिक व्याजदराची मागणी केली. याच कारणास्तव फिर्यादीचे पती पवन शर्मा यांना २९ ऑक्टोबर २०१८ रोजी वैश्य यांच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांची सोडवणूक करण्याकरिता संशयितांनी शर्मा यांच्या नावे असलेल्या हरसूल येथील जमिनीची मूळ कागदपत्रेही ताब्यात घेतली. त्यानंतर वैश्य पिता-पुत्रांनी शर्मा दाम्पत्याकडे आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे ज्योत्स्ना शर्मा यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी सावकारी कायदा, तसेच इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पीएसआय एस. एस. जाधव करीत आहेत.

---

कायदेशीर कारवाई करणार

दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती देताना रमेश वैश्य यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. शर्मा यांनी आमच्यासोबत जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र, आम्हाला अंधारात ठेवून ती जमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली, ही बाब आमच्या निदर्शनास आली. त्यावेळी आम्ही शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वीच शर्मा यांनी आमच्यावर खोटे-नाटे आरोप करून ही फिर्याद दिली. आम्ही आमच्या बाजूने याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे रमेश वैश्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांवर फुली

$
0
0

आरोग्य विभागातील खांदेपालटाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांमधील बदली प्रक्रियेमध्येदेखील अशाप्रकारे असमतोल निर्माण झाल्यास बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

जिल्हा परिषद अंतर्गत २८ मे पासून विविध विभागामधील बदली पात्र कर्मचाऱ्यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, बदली प्रक्रिया केल्यास मोठा असमतोल निर्माण होणार असल्याने पर्यायी बिगर आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होणार असल्याने प्रशासनाने बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागांतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रासाठी १ हजार १४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४७१ पदे भरलेली असून तब्बल ८२० पदे रिक्त आहेत. आदिवासी क्षेत्रात ९७७ पद मंजूर असून ७४९ पदे भरण्यात आलेली आहेत तर २२८ पदे रिक्त आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार, आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के पदभरती बंधनकारक आहे. मात्र, अशा परिस्थितीत बदली प्रक्रिया राबविल्यास आदिवासी भागातील पद भरली जातील तर बिगर आदिवासी भागातील पदे मोठ्या संख्येने रिक्त होणार आहेत. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील महाराष्ट्र कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्यास असाच प्रश्न निर्माण होणार असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई असल्याने या विभागातील बदल्याही थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी या बदल्यांमध्येही असमतोल निर्माण होत असेल तर कुणालाही बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

..

आरोग्य विभागातील संख्याबळ

बिगर आदिवासी क्षेत्र

मंजूर पदे : १ हजार १४६

भरलेली पदे : ४७१

रिक्त पदे : ८२०

आदिवासी क्षेत्र

मंजूर पदे : ९७७

भरलेली पदे : ७४९

रिक्त पदे : २२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

कारच्या धडकेत

दुचाकीस्वार ठार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पाठीमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने राहुल मधुकर गोसावी (वय २६, रा. सिन्नर फाटा) हा तरुण ठार झाला. नाशिकरोड येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री हा अपघात घडला.

विनोद मधुकर गोसावी (रा. सिन्नर फाटा) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद व राहुल हे दोघे सोमवारी (ता.३) रात्री देवळाली गावात वास्तव्यास असलेल्या त्यांच्या बहिणीकडे जेवणासाठी गेलेले होते. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर देवळालीगावाकडून सिन्नर फाट्याच्या दिशेने रात्री १२.५० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५ जीएम ४३५८) जात असताना उड्डाणपुलावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्विप्ट कारने (एमच १५ डीसी ९१६९) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यानंतर दुभाजकावर पडल्याने राहुलच्या डोक्याला मार लागला, तर विनोद दुचाकीसह फरफटत काही अंतर पुढे गेला. या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. विनोद गोसावी यांनी जखमी राहुलला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले. विनोद गोसावी यांनी राहुलच्या मृत्यूस कारणीभूत कारचालकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित भारनियमन

$
0
0

वारंवार विजेचा लपंडाव; नाशिककर हैराण

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शहरात अघोषित भारनियमन होत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. शहराच्या विविध भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच उकाडा अधिक आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड, सातपूर परिसरात सोमवारी (३ जून) सायंकाळी व रात्री तसेच मंगळवारी (४ जून) दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे अघोषित भारनियमन सुरू झाले की काय, अशी शंका नाशिककरांना येत आहे. तांत्रिक समस्या निवारण्यासाठी देखील महाविरणला एवढा अवधी लागत असेल, तर पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यावर शहर अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत नाशिककर व्यक्त करीत आहेत. वीजबिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला, तरी अधिकचे पैसे वसूल केले जातात. मग त्या तुलनेत वीजसेवा का पुरविण्यात येत नाही, असा सवाल वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे.

...

किरकोळ अडचण

शहरातील वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचण आल्याने शहरातील काही भागात दिवसभरात आठ ते दहा वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरण विभागाने दिली. सकाळी तांत्रिक अडचण आल्यानंतर तातडीने दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी पूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला नाही, असे सांगत महावितरणने चुकीवर पांघरून घातले.

..

महावितरणची लाइन सिस्टिम लांबलचक आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण आल्यास दुरुस्तीसाठी बराच अवधी लागतो. मंग‌ळवारीदेखील हेच घडले. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. महावितरणने एक ते दीड किलोमीटर अंतराची लाइन सिस्टिम कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

- विलास देवळे, सचिव, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत

...

मंगळवारी वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. वेळेवर बिले भरूनसुद्धा असा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागाप्रमाणे शहराची अवस्था झाली आहे. यामुळे आपण नक्की शहरात राहतो की ग्रामीण भागात, असा प्रश्न पडतो. या प्रश्नी तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे.

- तुषार नेमाडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटींची ‘स्मार्ट’ मेहेरबानी!

$
0
0

- स्मार्ट रोडच्या खर्चात ३.८९ कोटींची वाढ

- दंडासह २५ जुलैपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीने अशोक स्तंभ ते त्र्यंबकरोड दरम्यानच्या स्मार्ट रोडला तब्बल दोनवेळा मुदतवाढ देऊनही काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना, कंपनीने पुन्हा ठेकेदारावर मेहेरबानी दाखवली आहे. नागरिकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत ठेकेदाराला स्मार्ट रोडच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी तयार केलेल्या सुधारीत प्राकलनात १७ कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट रोडच्या कामात तब्बल ३.८९ कोटी रुपयांची वाढ केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या येत्या ७ जून रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड दरम्यान १.१ किलोमीटर लांबीचा साकारण्यात येणारा स्मार्ट रोड शहराच्या भल्याऐवजी अडचणीचा ठरला आहे. हा रस्ता चांगला असतानाही अधिकाऱ्यांनी अट्टहास करीत तो स्मार्ट करण्याचा चंग बांधला. संबंधित ठेकेदाला १६ एप्रिल २०१८ मध्ये या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. १६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, या मुदतीत केवळ २० टक्केच काम झाल्याने पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. तरीही काम पूर्ण न झाल्याने दुसऱ्यांदा मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत उलटूनही काम पूर्ण झालेले नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. काम मुदतीत पूर्ण न झाल्याने आयुक्तांनी ठेकेदाराला दंड करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदाराने कामाचा वेग वाढवत, एका बाजूचे ७० टक्के काम पूर्ण केले. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे जिल्हाधिकारी, न्यायालयात येणाऱ्या लोकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. या मुदतीतही काम पूर्ण होत नसल्याने ठेकेदाराने पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी कंपनीकडे केली होती. येत्या ७ जून रोजी दुपारी ३ वाजता स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होत असून, या बैठकीत स्मार्ट कंपनीच्या कामाला तिसऱ्यांदा मुदतवाढीच्या प्रस्तावासह सुधारीत प्राकलनाचा प्रस्तावदेखील सादर केला जाणार आहे. सुधारीत प्राकलन हे मूळ प्राकलनाच्या २६.७६ टक्के म्हणजेच ३.८९ कोटी इतका वाढीव आहे. प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावापेक्षा १० टक्क्यांहून अधिक वाढीव खर्च झाल्यास संचालक मंडळाची मंजुरी घेणे बंधनकारक असल्याने हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर सादर केला जात आहे. स्मार्ट रोडच्या कामात परिस्थितीनुसार न टाळता येणारे बदल करण्यात आले. त्यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे संचालक मंडळ ठेकेदारावर पुन्हा मेहेरबानी करते काय याकडे लक्ष लागून आहे.

...

दंडासह मुदतवाढ?

आयुक्तांनी ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु, दोनवेळा मुदतवाढ देऊनही स्मार्ट रोडचे काम अपूर्ण राहिल्याने कंपनीने संबंधित मक्तेदारास नोटीस बजावली होती. ठेकेदाराकडून प्राप्त झालेला खुलासा आणि मुदतीत काम पूर्ण न होण्याची कारणे विचारात घेता, या कामास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देऊन १ एप्रिल ते २५ जुलै २०१९ पर्यंत दंडासहित मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यामुळे एकूण चार महिन्यांचा दंड आणि मुदतवाढ अशी मेहरबानी ठेकेदारावर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छायाचित्राच्या आधारे युवतीचा छळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यात एक गुन्हा विनयभंगाचा, तर दुसरा गुन्हा आर्थिक फसवणुकीचा आहे. या गुन्ह्यांबाबत सायबर पोलिस तपास करीत आहेत.

सोशल मीडियावर छायाचित्र टाकण्याची धमकी देत युवतीचा छळ करणाऱ्या तरुणाविरूद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित युवती व तरुणाचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कारणास्तव हा विवाह झाला नाही. दरम्यान, गेल्या महिन्यात युवकाने पीडितेची काही छायाचित्रे काढून घेतली. या छायाचित्रांवरून त्याने तिला धमकी देण्यास सुरुवात केली. तुझे छायाचित्र सोशल मीडियावर टाकतो, अशी धमकी दिली. एवढेच नव्हे, तर तिचे अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकले. याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन गंडा

दरम्यान, क्रेडिट कार्डची माहिती मिळवित सायबर चोरट्याने एकाच्या बँक खात्यातील तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा डल्ला मारल्याचा दुसरा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. अशोका मार्ग भागात राहणारे मोहमंद वसीम शेख (वय ४०) यांचे अॅक्सिस बँकेत खाते आहे. अज्ञात भामट्यांनी बँकेकडून दिल्या गेलेल्या क्रेडिट कार्डची माहिती इंटरनेट व मोबाइल कॉलच्या माध्यमातून मिळवित पावणेदोन लाखांना गंडा घातला. ही बाब ३० मे रोजी उघडकीस आली. शेख यांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित आवश्यक तपशील भामट्यांनी मिळवित त्यांच्या बँक खात्यातून १५४.०५ अमेरिकन डॉलरचे १६ वेळा व्यवहार करीत शेख यांच्या खात्यातील एक लाख ७९ हजार १८८ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणी चोरट्यांच्या हातात बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्यात ६ मेच्या मध्यरात्री येवला शहरातील नाकोड पैठणी दुकानात पैठणी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. चोरट्यांकडून १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मनमाड-नगर राज्य महामार्गावरील येवला शहरातील नाकोड पैठणी या दुकानातून चोरट्यांनी पैठणींसह जीन्स व टी-शर्ट चोरले होते. घटनेनंतर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत समांतर तपासाची सूत्रे हलवली जात होती. जिल्हा स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे व पोलिस पथकातील सर्वांनीच सीसीटीव्ही' फुटेजची पडताळणी करून तपासाला गती दिली.

या घटनेतील गुन्हेगार येवला रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळाही रचला. मात्र संशयितांना त्याची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अमोल शांताराम शिंदे (वय २१), राजू बाळासाहेब गुंजाळ (वय २१ दोघे रा. उंदिरवाडी, ता. येवला) आणि सागर अरुण शिंदे (वय २५, रेल्वेस्टेशन, येवला) व सागर बाळू घोडेराव (२६,रा. आडगाव चोथवा, ता. येवला) अशा चौघांना यांना ताब्यात घेतले. चौघांची चौकशी केली असता त्यांनी कलीम सलीम शेख (रा. येवला) व करण फुलारी (रा. नाशिक) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ४८ पैठणी, १२ घागरे, कटर मशिन, २ ड्रिल मशिन तसेच मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने या चोरट्यांनी येवला व सिन्नर तालुक्यात या पैठण्यांची विक्री केल्याचे समोर आले आहे.

जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्यासह पथकातील रावसाहेब कांबळे, भारत कांदळकर, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, विशाल आव्हाड, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, संदीप लगड, योगेश गुमलाडू यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शोभायात्रा

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शोभायात्रा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज (६ जून) सकाळी ८.३० वाजता सूर्यतेज महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार असून दुपारी ४.३० वाजता भ‌‌व्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराणा प्रताप यांच्या ४७९ व्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

नवीन नाशिक परिसरातील महाराणा प्रताप चौक येथील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ प्रतिमेचे पूजन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब महाले आणि समिती अध्यक्ष देवयानी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नलजवळील नाईस संकुल हॉलमध्ये तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (७ जून) 'पालकत्त्व घडविणारे की बिघडविणारे' या विषयावर, शनिवारी (८ जून) 'संतांची सामाजिक चळवळ व आजचा समाज' या विषयावर, तर रविवारी (९ जून), 'रम्य ते म्हातारपण' या विषयावर व्याख्यान होईल. सर्व व्याख्याने सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत. तसेच सकाळी ९.३० वाजता मोरवाडी येथील महाराणा प्रताप उन्नती मंडळ, १० वाजता त्रिमूर्ती चौक येथील दिव्या अॅडबल, १०.३० वाजता त्रिमूर्ती चौकातील देवी मंदिर, १०.४५ वाजता मुंबई नाका येथील महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, ११ वाजता कातारी-शिककलकर समाज आणि महाराणा प्रताप युवा फाउंडेशन, ११.३० वाजता द्वारका येथील हिंदू एकता आंदोलन पक्ष, दुपारी १२ वाजता पिंपळ चौक येथील महाराणा प्रताप सेवा संघ आणि १ वाजता फुलेनगर परिसरातील महाराणा प्रताप नगर येथील कातीर समाज संघातर्फे आरोग्य शिबिर आणि रक्त तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

झिप झॅप झूम - बालकथा

घुंघुरमाशीची शक्कल

दक्षा रत्नपारखी, नाशिक

एका जंगलात एका म्हाताऱ्या आजीचे शेत होते. शेतात तिने खूप फळांची झाडे, रानमेवा असं लावलं होतं. रोज ती फळं घेऊन गावातील शाळेबाहेर बसायची आणि सगळ्या मुलांना तो रानमेवा देऊन संध्याकाळी घरी यायची. एकदा काय झाले ती संध्याकाळी दमून भागून आली आणि बघते तर काय तिच्या शेताची कोणीतरी खूप नासधूस करून ठेवली होती.

आजीला राग आला आणि ती मोठ्या आवाजात ओरडली कोण आहे रे माझ्या शेतात, कोणी एवढी नासधूस केली? तेव्हा शेतातील प्राणी एका दगडामागे लपला आणि म्हणाला, मी आहे मी आहे संसगडी डोळे माझे काचेचे, शिंग माझे सोन्याचे, एकच खुपशीन तर पोटच फाडीन. म्हातारी आजी घाबरली आणि रडायला लागली. तेवढ्यात तेथून एक हत्ती चालला होता. आजीबाईला रडताना पाहून थांबला आणि विचारलं का रडतेस आजी? मग आजीने सांगितलं माझ्या शेतात एक डेंजर प्राणी शिरलाय तो मला घाबरवतोय म्हणून मी रडतेय, हत्तीदादा म्हणाला, 'रडू नको आजी, मी आलोय ना मी त्याला बाहेर काढतो. मग हत्ती पण जोरात ओरडला कोण आहे रे आजीच्या शेतात बाहेर ये?' परत आवाज आला 'मी आहे, मी आहे संसगडी डोळे माझे काचेचे, शिंग माझे सोन्याचे, एकच खुपशीन तर पोटच फाडीन.'

हत्ती पण घाबरला तो ही रडायला लागला. त्या दोघांना रडताना पाहून हळूहळू जंगलातील सगळे प्राणी गोळा झाले सगळ्यांनी प्रयत्न केले. पण त्याच्या आवाजाने सगळेच घाबरले आणि सर्व प्राणी रडायला लागले तेवढ्यात तिथे एक घुंघुरमाशी आली सगळ्यांना रडताना पाहून तिने विचारले, 'का रडताय मग तिला सांगितलं. त्यावर ती म्हणाली मी प्रयत्न करून बघु का?' त्यावर सगळे प्राणी हसायला लागले. आम्ही एवढे बलाढ्य तो आमच ऐकत नाही. तुझं काय ऐकणार. ती म्हणे बघाच आता मजा. ती गुं गुं करत दगडामागे गेली आणि त्या प्राण्याच्या कानाला कडकडून चावली. तो कुई कुई करून ओरडला. परत मधमाशीने त्याला चावायला सुरुवात केली. शेवटी न राहून तो ओरडत बाहेर आला. त्याला बघून सगळे प्राणी ओरडले, 'अरे हा तर लबाड कोल्हा, याने घाबरवलं काय? मारा रे याला' मारत मारत त्याला जंगलाबाहेर काढून दिलं आणि मग सगळ्यांनी मधमाशीच कौतुक केलं. आजीने तिला मध दिलं. सगळ्या प्राण्यांना फळे दिली. मग सगळे प्राणी आणि आजी सुखाने राहू लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - जाणून घेऊया खगोलविज्ञान

$
0
0

फोटो आहे

सूर्यमालेचा दादा - गुरु

विनय जोशी, नाशिक

आपल्या सूर्यमालेत अनेक उल्का आहेत. अशनी, लघुग्रह, धुमकेतू आहेत. हे सगळं ग्रहांवर आदळत राहिलं तर ग्रह नष्ट होऊ शकतात. पृथ्वी पण यातून वाचणार नाही. हे सगळं पृथ्वीवर आदळलं तर आपली ही सुंदर पृथ्वी, आपले जीवन एका क्षणात नष्ट होऊन जाईल. पण काळजी करू नका या पृथ्वीताईचं रक्षण करणारा एक दादा सूर्यमालेत आहे. हा पृथ्वीकडे झेपावणाऱ्या अनेक वस्तू स्वतःकडे खेचून घेतो. याच्या प्रचंड पृष्ठभागावर या वस्तू आदळल्याने याला काही फरक पडत नाही. पण आपल्या पृथ्वीचे रक्षण होते हा आहे सूर्यमालेचा दादा - गुरु ग्रह! सूर्यबाबानंतर सूर्यमालेतील सदस्यांना शिस्त लावणारा, त्याचे रक्षण करणारा हा घरातला मोठा दादाच आहे.

गुरु आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात अगडबंब ग्रह. आकार, वस्तुमान, परिवलन, गुरुत्वाकर्षण सगळ्याच बाबतीत गुरू इतर ग्रहांवर दादागिरी गाजवतो. गुरु किती मोठा आहे? त्याच्या व्यासावर ११ पृथ्वी ओळीने मावतील आणि वजन किती जास्त? तराजूच्या एका पारड्यात इतर सगळे ग्रह ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात फक्त गुरूला ठेवलं तरी गुरुचे पारडे खाली जाईल. एवढ्या प्रचंड आकार आणि वजनामुळे याचे गुरुत्वाकर्षण पण जास्त आहे. इतकं की, याने स्वतः आणि मंगळ यांच्या दरम्यान कोणताही ग्रह निर्माण होऊ दिला नाही. इतर ग्रहांनी त्यांच्या कक्षा पण गुरुच्या कक्षेशी जुळवून घेतल्या आहेत. याचे हे भव्यदिव्य स्वरूप पाहून ग्रीकांनी गुरूला देवाधिदेव ज्युपिटरचे नाव दिले असावे.

आपल्या पृथ्वी खडकाळ ग्रह आहे तर गुरु हा वायुरूप ग्रह आहे. याचे वातावरण हायड्रोजनचे बनलेले आहे. तसेच काही प्रमाणात हेलियम आणि इतर मूलद्रव्ये आहेत. गुरु आकाराने जरी अगडबंब असला तरी स्वत:भोवती फिरण्याच्या बाबतीत सर्व ग्रहांपेक्षा तो अत्यंत चपळ आहे. तो स्वतःभोवती फक्त ९ तास ५० मिनिटात एक प्रदक्षिणा घालतो. या प्रचंड गतीमुळे गुरूच्या वातावरणात अनेक चक्रीवादळे तयार होतात. आपल्या पृथ्वीवर वादळे जमिनीवर पोहोचली की, शांत होतात पण गुरुवर जमीनच नसल्याने वादळे खूप काळ टिकतात. असेच एक भले मोठे वादळ गुरुवर ३०० वर्षापासून चालू आहे. हे म्हणजे गुरुचा प्रसिद्ध लाल ठिपका किंवा ग्रेट रेड स्पॉट. पृथ्वीपेक्षा साधारण तिप्पट मोठे हे चक्रीवादळ आपण दुर्बिणीतून आरामात पाहू शकतो.

दुर्बिणीतून आपल्याला गुरूची चार पिल्लेसुद्धा छान दिसतील. हे आहेत गुरुचे चार प्रमुख उपग्रह-कॅलिस्टो, गॅनिमीड, युरोपा आणि आयो. खरंतर गुरूला छोटे मोठे सुमारे ७९ उपग्रह आहेत. यातील हे ४ मोठे उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात. यापैकी गॅनिमीड हा उपग्रह आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह आहे आणि याचा आकार चक्क बुधापेक्षाही मोठा आहे. गुरुसारखे त्याचे हे सगळे उपग्रह सुद्धा भन्नाट आहेत. यांच्यामुळे गुरुवर ग्रहणांची रेलचेल आहे. आयोमुळे दिवसाआड, गॅनिमीडमुळे आठवड्याला एक, युरोपामुळे आठवड्यातून दोनदा आणि कॅलिस्टोमुळे महिन्याला दोन सूर्यग्रहणे घडू शकतात. हे उपग्रह कधी गुरुच्या सावलीत तर कधी एकमेकांच्या सावल्यात झाकले जातात त्यामुळे या उपग्रहांवरून पण खूप ग्रहणे पाहता येतील. आपल्याला दुर्बिणीतून पण यांची ही लपाछपी दिसते. भविष्यात गुरुच्या या उपग्रहांचा उपयोग राहण्यासाठी किंवा अंतराळ प्रवासाठी थांबा म्हणून करता येऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images