Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचारी जखमी

$
0
0

सिन्नर : सिन्नर येथील कुंदेवाडी शिवारात विहिरीत बिबट्या दबा धरून बसला होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने एक वन कर्मचारी जखमी झाला. कर्मचारी गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, सायंकाळी बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

कुंदेवाडी शिवारात रविवारी सकाळी गाडे यांच्या देवनदीशेजारी द्राक्ष बागेत कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने बिबट्या पळत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. बिबट्यामागे कुत्रे लागल्याने तो बचावासाठी परिसरात फिरू लागला. देवनदीशेजारी जिल्हा परिषदेच्या शाळेच्यामागील विहिरीला पायऱ्या असल्याने तो विहिरीत पळाला. या विहिरीत आठ फूट खाली विद्युत मोटार ठेवण्यासाठी जागा बनवलेली आहे. तेथे बिबट्या दबा धरुन बसल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली.

दुपारी दीड वाजता वनपरीक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यास कर्मचारी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्या झटापटीत वनपाल अनिल साळवे (वय ४५, रा. शिंदे) यांच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या विहिरीत पळाला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता बिबट्या पिंजऱ्यात अलगद आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

दरम्यान, जखमी साळवे यांना सुरूवातीला सिन्नर नगरपालिकेच्या दवाखान्यात आणल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकरोड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बिबट्याला वनविभागाचे कर्मचारी वनविभागाच्या उद्यानात घेऊन गेल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरांच्या वयवाढीचा फक्त ‘मेसेज’

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : डॉक्टरांची कमतरता असल्याने सार्वजनिक आरोग्यसेवेची होणारी हेळसांड लपून राहिलेली नाही. यावर पर्याय म्हणून केंद्र व पाठोपाठ राज्य सरकारने डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, याविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका आणि काही डॉक्टरांकडून होणारा अप्रत्यक्ष विरोध, तसेच अर्थकारणाचे आरोप यामुळे या धोरणाबाबत धरसोड होत असल्याचे प्रत्ययास येत आहे.

यावर्षी ३१ मे रोजी फक्त मेसेजच्या आधारे सेवानिवृत्त डॉक्टरांना पुढील सेवा कायम ठेवण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहेत. राज्यभरात तीनशेहून अधिक, तर नाशिकमध्ये जवळपास १५ ते २० जणांना यामुळे मुदतवाढ मिळाली आहे. सरकारी सेवेतून दरवर्षी ३१ मे रोजी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होतात. आरोग्य विभाग मात्र मागील दोन वर्षांपासून या प्रक्रियेपासून दूर राहत आहे. गतवर्षी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत कार्यरत असताना याबाबतचे स्पष्ट पत्र आरोग्य विभागाने दिले होते. मात्र, हे पत्र विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काढण्यात आल्याचे समोर आल्याने मोठा प्रशासकीय वाद उभा राहिला होता. आरोग्य विभागात आजही या वादाची चर्चा चघळली जाते. या वादाची पार्श्वभूमी असल्याने यंदा नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टर्सना मेसेज धाडण्यात आले असून, त्याआधारे त्यांची सेवा आणखी दोन वर्षे कायम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत बोलताना आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले, की वाद काहीही असो आज आरोग्य खात्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नामपूर, पेठ, सुरगाणा आदी ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. विरोध करणारे ही पोकळी भरून काढणार का, असा सवाल संबंधिताने उपस्थित केला. सेवानिवृत्तीचे वय वाढल्याने पदोन्नती थांबणार नाही. एवढेच, की पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे या डॉक्टरने स्पष्ट केले.

--

काय आहे प्रकरण?

सार्वजनिक आरोग्यसेवेत डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. उच्चशिक्षित डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्यसेवेला प्राधन्य देत नसल्याने रुग्णसेवेत मोठा अडसर येत असल्याची ओरड आरोग्य विभागाकडून नेहमीच होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजमधील प्राध्यपकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाचा आधार आरोग्य विभागाने घेतला. त्यानुसार आरोग्य विभागातील डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे डॉक्टरांची कमी होत जाणारी संख्या काही काळ थोपावून धरणे शक्य होईल, असा युक्तिवाद करण्यात येत आहे.

--

अर्थकारणाचा आरोप

दरम्यान, ही प्रक्रिया वरवर सर्वसामान्यांच्या हिताची ठरणार असल्याचे भासवून त्याआधारे मोठे अर्थकारण राबविले जात असल्याचा आरोप आरोग्य खात्यातील एका मोठ्या गटाकडून होत आहे. कायमस्वरूपी पदांची भरती प्रक्रिया राबविली जात नाही. कंत्राटी पद्धतीने काम करण्यास डॉक्टर्स पुढे येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची संख्या कमी होत असल्याचा आरोप या गटाकडून होत आहे. दुसरीकडे वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा थेट रुग्णसेवेशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यांना पदोन्नती मिळण्यात अडचणी येत असल्याचा दावा या गटाकडून करण्यात येत आहे. यंदा फक्त मेसेज करून डॉक्टरांना पुढील सेवा कायम करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे नियमांचा भंग होत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडींना मिठाईवाटप

$
0
0

नाशिकरोड : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाल्याबद्दल रिपब्लिकन एम्प्लॉइज फाउंडेशनतर्फे नाशिकरोडच्या मालधक्का येथे माथाडी कामगारांना मिठाईवाटप करण्यात आले. या वेळी कार्टिंग एजंट गुलूशेठ आनंद, शिवनारायशेठ सोमाणी, माथाडी कामगारनेते रामबाबा पठारे, अनिल आहिरे, भारत निकम, राजू मोकळ, सुभाष आहिरे, प्रभाकर रोकडे, कैलास भालेराव, रवी जगताप, संदीप गुंजाळ, मधू मोकळ, सागर शार्दूल, राहुल भालेराव, जयराम जाधव, लखन गवळे, सुनील चंद्रमोरे, रवी मोकळ, नीलेश कटारे, दिनेश पुजारी, स्वप्निल साळवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाचा शिडकावा

$
0
0

नाशिक टीम

उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसावे लागत असल्याने नाशिककरांना मान्सूनपूर्व पावसाची ओढ लागली होती. रोहिणी नक्षत्रांनीही पाठफिरविल्याने निराशा हाती येते की काय असे वाटत असतानाच जूनच्या प्रारंभालाच रविवारी मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने जिल्ह्यातील येवला, मनमाड व निफाड भागात पावसाने हजेरी लावल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

येवला तालुक्यातील काही भागात रविवारी दुपारनंतर तुरळक स्वरूपात दाटून आले होते. रविवारी अगदी सकाळपासून वातावरणात वाढलेला प्रचंड उष्मा व दमट वातावरणामुळे पावसाची चाहूल लागली गेली होती.

ढग पुढे पावणेपाच वाजेपर्यंत अधिक गडद होत गेले होते. मात्र, अचानक पाठीमागून आलेल्या काहीशा वाहत्या वाऱ्यांनी हे ढग पुढे पिटाळून लावले. येवला तालुक्याच्या उत्तर-पश्चिम पट्ट्यातील अनकाई, आडगाव रेपाळ, मुरमी, विखरणी, पाटोदा, शिरसगाव-लौकी, सोमठाण देश, आंबेगाव आदी गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हलकासा शिडकावा दिला. या परिसरात कुठे तीन ते पाच मिनिटे, तर कुठे दहा मिनिटे वळवाच्या पावसाच्या सरी पडल्या. यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.

यंदाच्या पावसाळ्यातील महत्त्वपूर्ण सूर्याचा 'मृग' हे नक्षत्र येत्या आठ जूनला 'उंदीर' वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते होणार आहे. मान्सूनपूर्व समजल्या जाणाऱ्या वळवाच्या यंदाच्या 'रोहिणी' नक्षत्रास नुकत्याच संपलेल्या मे महिन्यातील २४ तारखेस सुरुवात झाली होती. त्यानंतर गेल्या दहा दिवसात या रोहिणीचा एक थेंब देखील जमिनीवर पडला नसल्याने रोहिणी नक्षत्राने पाठफिरविल्याचे म्हटले जाऊ लागले होते. यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याने आता महत्वाचे मृग नक्षत्र येत्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

लासलगावमध्ये गडगडाट

निफाडमध्येही काही भागात पावसाने शिडकावा दिल्याने वातावरण काहीसे अल्हाददायक झाले. लासलगावकरांना रविवारी दुपारी अचानक मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उकड्यापासून दिलासा मिळाला. अचानक विजेच्या कडकडाटासह अर्धा तास वरुणराजाने मान्सूनपूर्व कधी रिमझिम तर कधी जोरदार सरींची हजेरी लावल्याने लासलगाव येथे भरलेल्या आठवडे बाजारादरम्यान दुकानदारांची माल झाकण्यासाठी चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सायकलिंगला द्या प्राधान्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायकल चालविणे हा सर्वांसाठी सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. सायकल कधीही व कुठेही चालविता येते आणि या व्यायामासाठी जास्त खर्चही येत नसल्याने, तसेच सायकलच्या वापराने प्रदूषणासही आळा बसत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

नाशिक शहरात जागतिक सायकलदिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व हेक्सी सायकल यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचा प्रारंभ रविवारी सकाळी सात वाजता गोल्फ क्लब येथे जिल्हाधिकारी तथा नाशिक स्मार्ट सिटीचे संचालक सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. त्यावेळी ते बोलत होते. या रॅलीस सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रॅलीच्या सुरुवातीला बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहरात शंभर सायकल स्टँड व एक हजार सायकली उपलब्ध केल्यामुळे नाशिक शहरात सायकलचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सायकल चळवळ सर्व शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होत असल्याने शक्य तेथे सर्वांनीच सायकलचा वापर केला पाहिजे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल चालवून या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला नाशिक स्मार्ट सिटीचे पर्यावरण महाव्यवस्थापक सुनील विभांडिक, हेक्सी सायकलचे व्यवस्थापक सचिन मोरे, नाशिक सायकलिस्टचे प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते.

--

पाणीबचत, प्रदूषणमुक्तीचा संदेश

रॅलीत शहरातील युवक-युवती, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या सायकल रॅलीत 'पाणी वाचवा', 'सायकल चालवा फिट राहा आणि शहर प्रदूषणमुक्त ठेवा' असा संदेश देण्यात आला. शहरातील गोल्फ क्लब मैदान-मायको सर्कल-त्र्यंबकरोड-सिटी सेंटर मॉलरोड-मायको सर्कल-चांडक सर्कल-एसएसके हॉटेल या मार्गाने गेलेलेल्या रॅलीस सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एसएसके हॉटेल येथे रॅलीचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, शिंदे उत्कृष्ट खेळाडू

$
0
0

कबड्डीदिनाचे पुरस्कार जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदा उत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार क्रीडा प्रबोधिनीच्या सुनंदा पवार व श्री साई समर्थ क्रीडा मंडळाच्या काजल जठार यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी आडगावातील ब्रह्मा स्पोर्ट्सचा आकाश शिंदे ठरला आहे. शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात कबड्डीदिनी ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कारांचे वितरण होईल. यंदाचा हा सातवा कबड्डीदिन आहे.

६६ व्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी पुरस्कारांची घोषणा केली. या वेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, प्रकाश बोराडे, डॉ. शरद शिंदे आदी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त संस्था, खेळाडू, संघटक

ज्येष्ठ कार्यरत संस्था : कालिकामाता क्रीडा मंडळ, मनमाड

उत्कृष्ट कार्यरत संस्था : शिखरेवाडी क्रीडा मंडळ, नाशिकरोड

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक संस्था : सह्याद्री युवा मंच, सिन्नर

ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार : बाळासाहेब गायधनी, नाशिक, प्रा. भास्कर देवरे, येवला, जगन्नाथ हाडगे, श्रीराम कातकडे, विश्वनाथ राठोड (सर्व मनमाड), अंबादास भालेराव नाशिकरोड

उत्कृष्ट संघटक : हसन हमीद अन्सारी, मालेगाव, गोपाळ म्हस्के, नाशिक, बाळासाहेब रुमणे, लाखलगाव, अशोक शिंदे, दिवाकर ऐळीज (सर्व मनमाड)

उत्कृष्ट प्रशिक्षक : दत्ता गायकवाड, आडगाव

उत्कृष्ट पंच : शकीर शेख

ज्येष्ठ पंच : पीटर फेरो

माजी राष्ट्रीय खेळाडू : सुवर्णा श्रोत्री-शुक्ल, मीनल केदारे-गांगुर्डे (नाशिक), रवी खैरे (मनमाड)

कृतज्ञता पुरस्कार : शीतल सांगळे (अध्यक्षा, जिल्हा परिषद), उदय सांगळे (सिन्नर), गणेश मोराडे, दर्शन भाबड (नाशिक), विजय नाईक, जगन्नाथ धात्रक (मनमाड), डॉ. मंगेश चव्हाण, डॉ. श्रीकांत चौधरी (नाशिक)

ज्येष्ठ माजी खेळाडू : अशोक गायकवाड, भागवत गांगुर्डे (दोन्ही मनमाड), नामदेव करंडे (नाशिक)

पत्रकार पुरस्कार : अविनाश पाटील, अनिल दीक्षित, सचिन जैन

छायाचित्रकार : सोमनाथ कोकरे, सतीश देवगिरे

२०१८ मधील संघटनेकडून राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले खेळाडू : तेजस ढिकले (सय्यद पिंप्री), ऋतुजा लभडे (आडगाव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा; १६ संघ बाद फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र ब्रिज असोसिएशन आणि पुणे रिजन ब्रिज असोसिएशनतर्फे यशदा कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे येथे सुरू असलेल्या नवव्या तोलानी समर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड गटात पहिल्या १६ संघांनी बाद फेरी गाठली. गोल्ड स्विस लीग, सिल्व्हर स्विस लीग आणि बिगिनर्स लीग अशा तीन गटांत ही स्पर्धा होत आहे. आठव्या फेरीनंतर अरुण जैन (११०.३६ गुण), स्लो स्कॉर्पिअनर्स (११०.५७), आय. डॉक्टर्स (१००.१५), रेड्डी (९९.०६), फॉर्मिंडेबल्स (९८.६५), सी. व्ही. राव (९६.७६), धमपूर शुगर (९३.२२), श्री सिमेंट (९१.९५), पेरिटीज (९१.१०), राम्पागे (९०.३४), समाधान (९०.०४), पोकिमान (८८.०८), एसबीसीब्लू (८४.५०), आयटीएसआरसी (८२.५०), अॅक्वेरियस (८२.१९), व्ही फोर (८०.९६) या संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीच्या नगरसेवकांत बेकीम.टा.वृत्तसेवा नाशिकरोड लोकसभा निवडणुकीच्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना- भाजपने एकत्र चूल मांडली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत अंतर्गत धुसफूस सुरूच होती. ही बाब नाशिकरोड येथील प्रभाग २२ मध्ये क्रीडांगण विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यावरून श्रेयवादाच्या जुंपलेल्या लढाईवरून स्पष्ट झाले. क्रीडांगणाच्या विकासकामाचा निधी केवळ आपल्याच पाठपुराव्यातून मिळाल्याचे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांकडून छातीठोकपणे सांगितले जात असतानाच रविवारी (ता. २) मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा कार्यक्रम आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थित उरकून घेतला.

प्रभाग क्रमांक २२ मधील विहितगाव येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी ३ कोटी ४ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडून प्राप्त झाला होता. हा निधी आपणच मिळवल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांकडून केला गेला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांकडून या कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती. या प्रभागात चारपैकी सत्यभामा गाडेकर, केशव पोरजे आणि सुनीता कोठुळे हे शिवसेनेचे, तर सरोज आहिरे या एकमेव भाजपच्या नगरसेविका आहेत. मात्र शिवसेना नेते बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रविवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला सरोज आहिरे अनुपस्थित राहिल्या. आपल्याला विश्वासात न घेताच हा कार्यक्रम केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या स्थानिक ज्येष्ठ नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन आहिरे यांना विश्वासात घेऊन केले गेले होते, असा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. नगरसेवकांनी आपापसांत सुसंवाद राखून नागरिकांच्या हिताची कामे केली पाहिजेत, असा सल्ला खासदार गोडसे यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना दिला. प्रभाग सभापती पंडित आवारे, स्थानिक नगरसेविका सत्यभामा गाडेकर, केशव पोरजे, सुनीता कोठुळे यांच्यासह प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, उत्तम कोठुळे, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, प्रमोद शिंदे, संजय कोठुळे, विशाल गाडेकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

क्रीडांगण विकासाचा निधी केवळ शिवसेना नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून मिळाला आहे. यात महापालिका अधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभले. मात्र, भाजपच्या स्थानिक प्रभागातील नगरसेविकेला आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने त्यांचे कोणतेही योगदान नसताना मानापानासाठी रुसवेफुगवे सुरू झाले आहेत. 'माझेच खरे आणि बाभळीला बोरे' या उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे असून, वरिष्ठांनाही डावलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

- केशव पोरजे

नगरसेवक आणि विधानसभाप्रमुख, देवळाली

क्रीडांगण विकास निधी माझ्या प्रयत्नांतून मंजूर झालेला आहे. या कामाच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री, आमदार, महापौर यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असतानाच आपल्याला विश्वासात न घेताच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी भूमिपूजन उरकून घेतले. 'आयत्या बिळात नागोबा' अशी ही वृत्ती असून, या कार्यक्रमाचे साधे आमंत्रणही नव्हते.

- सरोज आहिरे

नगरसेविका, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे दुर्घटना टळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

उत्तर प्रदेशातील बरेलीहून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष हॉलिडे सुविधा एक्स्प्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी नांदगाव जवळ घडली. चाक तुटलेल्या डब्यातील प्रवाशाच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे गार्डला दिली. गार्डने तातडीने रेल्वे इंजिन चालकाशी संपर्क साधून रेल्वे थांबवली. रेल्वेचे चाक तुटल्याचे लक्षात आले नसते तर मोठा अपघात घडला असता. प्रवाशांच्या व रेल्वे गार्डच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळल्याने रेल्वेतील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

रेल्वेचे चाक तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, चाक तुटलेला डबा बाजूला करण्यात आला आहे. या अपघातामुळे रेल्वेला दोन ते तीन तास विलंब झाला. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या उशीरा धावत होत्या. अखेर दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेली-मुंबई सुविधा एक्स्प्रेस नांदगावजवळ आली असताना रेल्वेच्या गार्डच्या आधीच्या डब्याचे चाक तुटल्याने गाडीचा डबा मोठ्या प्रमाणावर हलू लागला. गाडी रुळावरून घसरऱ्याचा धोका होता. डब्याचे चाक तुटल्याने डबा हलू लागल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. एका प्रवाशांने तातडीने गार्डशी संपर्क साधून संभाव्य धोक्याची कल्पना दिली. गार्डनेही तातडीने इंजिन चालकाला घटनेची माहिती दिल्याने रेल्वे थांबविण्यात आली. मात्र, चाक तुटल्याचे वार्ता गाडीत पसरल्याने प्रवाशांत घबराट निर्माण झाली होती. मात्र, अपघात टळल्याने प्रवाशांनी निश्वास सोडला.

दरम्यान, मनमाड येथून रेल्वेचे आपत्कालीन पथक मागविण्यात आले. सदर डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. या प्रकारामुळे या मार्गावरील गाड्या प्रभावित झाल्या. रेल्वे प्रशासनाने गाडीतील प्रवाशांना नांदगाव स्थानकांवर थांबवून प्रवाशांसाठी चहा नाश्त्याची सोय केली. साधारण तासानंतर रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ झाली. उष्णतेमुळे चाक तुटल्याची घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नयी तालीम’ ही परिवर्तनाची प्रक्रिया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्ञानप्राप्ती ही कामातून होऊ शकते; पुस्तकातून नाही, असे साधेसोपे तत्त्वज्ञान गांधीजींनी मांडले. त्याला त्यांनी 'नयी तालीम' असे नाव दिले. १९३७ मध्ये त्यांनी निर्माण केलेली ही नयी तालीम खरे तर त्या वेळच्या परिस्थितीला धरून नव्हती, असे आज म्हणावे लागते. ती आजच्या परिस्थितीला अनुरूप आहे. त्यामुळे या पद्धतीचा वापर करून शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एमकेसीएलचे संस्थापक डॉ. विवेक सावंत यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे नववे पुष्प डॉ. सावंत यांनी गुंफले. 'महात्मा गांधींची नयी तालीम, आजच्या संदर्भात' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. सावाना आवारातील औरंगाबादकर सभागृहात हे व्याख्यान झाले.

डॉ. सावंत म्हणाले, की आपली दोन्ही मुले व बहिणीचे एक मूल यांना पारंपरिक शिक्षण द्यायचे नाही, असे गांधीजींनी ठरवून टाकलेले होते. त्यामुळेच टॉलस्टॉय आश्रमात त्यांना ठेवलेले असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत वेगळा विचार करण्यास सुरुवात केली आणि सामाजिक कामाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होऊ शकते हे त्यांना कळून चुकले. ते त्यांनी तसेच्या तसे अमलात आणले. त्याचा 'नयी तालीम' असे नामकरण करण्यात आले. या पद्धतीमध्ये कमालीची ताकद आहे हे मी स्वत: आजमावून पाहिलेले आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

गांधींजींचा विचार पुढे न्यायचा असल्यास त्यांची 'नयी तालीम' जनमानसात रुजवावी लागेल. त्यासाठी ती समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगतानाच डॉ. सावंत म्हणाले, की या पद्धतीचा अवलंब केल्याने अभ्यास सूत्ररूपाने सांगण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येते.

मुक्त विद्यापीठात मारल्या चकरा

डॉ. विवेक सावंत म्हणाले, की गांधींजींच्या 'नयी तालीम' पद्धतीवर आधारित शिक्षण द्यावे, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरूंकडे अनेक चकरा मारल्या. सतत तीन वर्षांच्या माझ्या परिश्रमानंतर एकदा त्यापैकी एका कुलगुरूला माझे म्हणणे पटले आणि फाइल पुढे सरकली. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कामातून ज्ञानप्राप्ती करून द्यावी हे गांधीजींच्या 'नयी तालीम' पद्धतीवर आधारित सूत्र मी त्यांना सांगत होतो व ते पटण्यासाठी त्यांना इतकी वर्षे जाऊ द्यावी लागली हे आश्चर्यच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाड्याने फोडला घाम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उन्हाच्या तप्त झळांनी नागरिक त्रस्त झाले असतानाच रविवारी उकाड्याने नाशिककरांना शब्दश: घाम फोडला. शहरात कमाल ३८.२ अंश सेल्सिअस, तर किमान २३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. येत्या दोन दिवसांत उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता असून, ३ आणि ४ जूनला नाशिकसह राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

एकीकडे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीने नाशिककरांना हैराण केले असताना यंदाचा उन्हाळाही सर्वांसाठीच तापदायक ठरला. फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. उन्हाची ही तीव्रता मार्चनंतर अधिकच वाढत गेली. कधी नव्हे ते एप्रिलमध्येच यंदा तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. मे महिनाही उन्हाची तीव्रता सोसत सरला, तरी या झळांनी जून महिन्यातही नाशिककरांचा पाठलाग सोडलेला नाही. नाशिककरांची रविवारची सकाळ उजाडली ती उकाड्याचे संकट पुढ्यात ठेवून. सकाळी सातपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. या उकाड्याने नागरिकांना घाम फोडला. सकाळी नऊपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते. रविवारची सुटी असूनही ऊन आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. पुढील आठवडाभरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

--

मान्सूनपूर्व सरींची शक्यता

नाशिकसह राज्याच्या विविध भागात पुढील तीन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी नांदगाव तालुक्यातील मनमाडसह येवला तालुक्यातील उत्तर पश्चिम पट्ट्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. याशिवाय निफाड तालुक्यातील लासलगावसह आसपासच्या गावांमध्येही पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. ३, ४ आणि ५ जूनलाही नाशिकसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावू शकतात, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

--

२६ मेपासून तापमानात झालेले चढ-उतार

-

दिनांक कमाल तापमान किमान तापमान

२६ मे ३७.२ २१.४

२७ मे ३८.१ २३.०

२८ मे ३८.५ २१.७

२९ मे ३८.३ २२.५

३० मे ३७.९ २२.६

३१ मे ३९.१ २१.९

१ जून ३७.३ २३.२

२ जून ३८.२ २३.६

-

आगामी आठवड्यातील संभाव्य तापमान

--

दिनांक कमाल तापमान किमान तापमान

३ जून ३८.० २३.०

४ जून ३८.० २३.०

५ जून ३८.० २४.०

६ जून ३८.० २४.०

७ जून ३९.० २४.०

८ जून ३९.० २४.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक ठेवींवरून खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेसात कोटी रुपयांच्या ठेवी श्रीराम बँकेत अडकल्याच्या प्रश्नावरून आणि वार्षिक अहवालावरून मायको एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटीच्या रविवारी झालेल्या वार्षिक सभेत चांगलीच खडाजंगी झाली.

संचालकांकडून माइकचा ताबा घेण्याचा प्रयत्न सभासदांनी केला, तर सभासदांना व्यासपीठावरून खाली उतरविण्याचा प्रकार झाल्याने सभेत तणाव निर्माण झाला होता. यावेळी अनेकांनी मध्यस्थी करीत सभा पूर्वपदावर नेण्याचा प्रयत्न केला. मायको एम्ल्पॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ४५ वी सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी १० वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली. संस्थेच्या अडकलेल्या ठेवी काढण्यासाठी संचालक मंडळाने सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून, सोसायटीचा पैसा मिळवा यासाठी राजकीय नेत्यांची मदत घेतली जात आहे. मात्र, असे असतानाही मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांना सोसायटीच्या वार्षिक अहवालात योग्य स्थान देण्यात आले नसल्याने सभासदांनी गदारोळ केला.

सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण काकड, मानद सचिव प्रशांत परदेशी यांच्यासह संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी व्यासपीठावर होते. थेट चर्चेला सुरुवात झाल्यानंतर पहिलाच मुद्दा सदस्यांनी खोडून काढला. श्रीराम बँकेत ठेवण्यात आलेल्या साडेसात कोटींच्या मुदत ठेवी परत आणण्यासाठी योग्य प्रकारे कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. हे पैसे परत मिळावेत म्हणून संचालक मंडळाने राजकीय नेत्यांकडे शिफारस केली आहे. मात्र, स्थानिक प्रतिनिधी वगळता इतर नेत्यांना अहवालात स्थान देण्यात आले. त्यामुळे यापुढे सोसायटीला मदत करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळी कदाचित पुढाकार घेणार नाही, हे मुद्दे सदस्यांनी मांडले. यावरून बराच वेळ सभागृहात गदारोळ सुरू होता.

--

मुद्द्यांवर थेट चर्चा करा!

राजकीय नेत्यांची नाराजी ओढावल्याने ठेवी कशा परत मिळतील, असा सवाल करीत माइक ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही सदस्यांनी केला. त्यामुळे ही सभा गाजली. संचालक मंडळ सदस्यांच्या हिताचा विचार करीत नसल्याची टीका करीत काही सदस्यांनी व्यासपीठावरच धाव घेतली. सभेच्या सुरुवातीपासूनच सदस्यांनी संचालक मंडळावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. अहवालात नमूद मुद्द्यांचे वाचन करून सभेचा वेळ वाया घालवू नका, योग्य मुद्द्यांवर थेट चर्चा करा, अशी मागणी सदस्यांनी केली.

--

माइकची खेचाखेची

संचालक मंडळ त्यांची बाजू मांडत असताना माइक खेचण्याचाही प्रकार घडला. संचालक मंडळाने 'आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही. अहवालात प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नमूद करण्यात आली असून, ठेवी परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ठेवी परत घेऊ,' असे सांगिल्यावर वादावर पडदा पडला. सभेत पुढे मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला. संचालक मंडळाने सदस्यांची समजूत काढून सर्वानुमते निर्णय घेत सभेचा समारोप केला.

--

व्याजदर तूर्त जैसे थे

सोसाटीतून घेतलेल्या कर्जावर ९.२५ टक्के व्याजदर आकारला आहे. हा व्याजदर कमी करण्याची मागणी सदस्यांनी केली. संचालक मंडळाने व्याजदर कमी करणे तूर्तास तरी शक्य नसल्याचे कारण दिले. कर्ज बुडविणाऱ्यांना संचालक मंडळाकडून कोणतीही सूट मिळणार नसून, कर्ज परतावा महत्त्वाचा असल्याचे सांगत सदस्यांची समजूत काढली. सभेत सोसायटीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक व ताळेबंद वाचून मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील जंगलाला आग

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना रविवारी घडली. अॅशलाईनच्या बाजुला असलेल्या परिसरात सदर आग लागली होती. दरम्यान सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आली.

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता समजली. आगीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विस्तीर्ण आवारातील मोठ्या प्रमाणावर झुडपी जंगल राख झाले आहे. नागपूर मार्गावरील वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या राख वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या आसपास ही आग लागली होती. या भागात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांचे देखील वास्तव्य आहे. या भागात काही तलाव असून या भागातील वन्यजीवांना या आगीमुळे धोका निर्माण झाला होता. आगीचे लोट खूप दूरून नजरेस पडत होते. या भागातील आग विझविण्यासाठी महाऔष्णिक वीज केंद्र व चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन बंबाना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या भागातून वीज केंद्रातून निघणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्या असल्याने आग आटोक्यात आणणे अग्निशमन दलाला आव्हान होते. आगीच्या दोन्ही बाजूंनी विविध पथके लावून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी आग आटोक्यात आली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगाव अपघात

अखेर मनमाडसाठी पालखेडहून आवर्तन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनमाडसह येवला, निफाड तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी अखेर रविवारी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. पालखेड धरणातून वहन मार्गाद्वारे ५०० क्युसेक वेगाने हे पाणी मनमाडकडे मार्गस्थ झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या मनमाडकरांना दिलासा मिळणार आहे. पाच जूनपर्यंत पाणी पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मनमाडमधील रहिवाशांना पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. तहान भागविण्यासाठी मृत पाणी साठ्याचा उपसाही सुरू करण्यात आला. मनमाडमधील रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन अखेर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु पुरेसे पाणी मिळत नसल्याने मनमाडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी खासदार डॉ. भारती पवार आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी केली. वहन मार्गावरील पाणी चोरीस जाऊ नये याबाबतची खबरदारी घेऊन रविवारी सायंकाळी सहा वाजता पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. ५०० क्युसेक वेगाने हे आवर्तन सोडण्यात आले असून, हा वेग ८०० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. आवर्तन सोडण्यापूर्वी वहन मार्गावरील डोंगळे स्फोट करून उडविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलासंगम पॉईंटर

$
0
0

(कलासंगम लोगो व आठवा वर्धापन दिन लोगो)

कलासंगम महोत्सव

नाशिककरांच्या कलांचं हक्काचं व्यासपीठ

यंदाही अनुभवता येणार नव्या-जुन्या जाणत्या कलाकांराच्या कलेची सरमिसळ

दिनांक : ७, ८ जून

वेळ : सकाळी १० पासून

स्थळ : कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड

'मटा'च्या नाशिक आवृत्तीच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी-प्लस...४

-----------------संपली---

-लोककलावंत गणेश चंदनशिवे यांची मुलाखत

-लोककलाकार नंदेश उमप यांची मुलाखत

-चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची मुलाखत

याशिवाय जागरण गोंधळ, बोहाडा, नृत्यमैफल आणि इतरही बरंच काही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक क्रिकेट अकॅडमीतर्फे पारितोषिक वितरण सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक क्रिकेट अॅकॅडमीचा पारितोषिक वितरण सोहळा हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी नाशिकमध्ये विविध कोचिंग सेंटरच्या माध्यमातून क्रिकेटपटू घडवणारे शेखर घोष, अतुल शर्मा, संजय मराठे, अतुल गोसावी आणि महेश झवेरी यांना गौरविण्यात आले. एनसीएकडून वेगवेगळ्या वयोगटांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही गौरवण्यात आले. एनसीएच्या वतीने घेण्यात आलेल्या सुनील अविनाश ट्रॉफी, समर ऋषिकेश ट्रॉफी, एनसीए इमर्जिंग ट्रॉफी आणि एनसीए प्रीमियर लीग या स्पर्धांचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. यंदापासून प्रसिद्ध क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. मधुली कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून देण्यात येणारा हा पुरस्कार नाशिकमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू सत्यजित बच्छाव, तर सिन्नरची महिला क्रिकेटपटू माया सोनवणे हिला प्रदान करण्यात आला. बास्केटबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू शुभांगी पाठक हिने सूत्रसंचालन केले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक शेअर झालेली बातमी

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी:

मी गांधीवादी; निधी चौधरींची फेसबुक पोस्ट

'आपण गांधीवादी विचारसरणीच्या असून गांधीजींबाबत आपण केलेले ट्विट हे पूर्णपणे व्यंगात्मक होते आणि या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला', असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल डिप्लोमा करायचाय?

$
0
0

मेडिकल डिप्लोमा करायचाय?

प्रवेश सुरू; विद्यार्थ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकल पदव्युत्तर डिप्लोमा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांसह वैद्यकीय अधिकारी इच्छुक असतात. महाराष्ट्र शासनातर्फे स्थानिक रुग्णायलयात राबिवण्यात येणाऱ्या या कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेकांची कसोटी लागते. या कोर्ससाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे प्रवेश सुरू झाले असून ज्यांना मेडिकल डिप्लोमा कोर्स करायचा आहे, त्यांना १७ जूनपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी 'मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स' राबविण्यात येतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या कोर्स अंतर्गत एकूण १७८ प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी व वैद्यकीय अधिकारी या दोन गटांना प्रत्येकी ८९ जागा राखीव असतील. ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर 'नीट' ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल, तेच विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र असतील. प्रवेशासाठी पदव्युत्तर नीट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार असून उमेदवारांचे समुपदेशन केले जाईल. त्यानंतर यादी जाहीर होईल. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक लाख दहा हजार रुपये प्रवेश शुल्क असेल. प्रवेशावेळी संपूर्ण कोर्सची फी सांगण्यात येईल. अर्ज नोंदणी केल्यावर अर्जासोबत दोन हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट उमेदवारांना भरावा लागणार आहे. अधिक माहिती व अर्ज नोंदणीसाठी इच्छुकांनी www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

--

अशी होईल निवड

१७ जूनपर्यंत अर्ज नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे समुपदेशन आणि मुलाखत होईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोर्स संदर्भातील प्रवेश निश्चितीबाबत कळविण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.

--

पुन्हा पात्र नाही

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कोर्ससाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीतच कोर्स पूर्ण करावा लागेल. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा काही कारणास्तव कोर्स पूर्ण न करू शकल्यास पुढील शैक्षणिक वर्षात या कोर्सासाठी विद्यार्थी पुन्हा पात्र ठरणार नाही, अशी अट प्रवेश नियमावलीत लिहिण्यात आली आहे. सर्व नियमावलींचा अभ्यास करुनच इच्छुकांनी अर्ज नोंदवावे, असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरवायकेची ११ रोजी मेरिट लिस्ट

$
0
0

आरवायकेची

११ जूनला मेरिट लिस्ट

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

विज्ञान व कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये सुरुवात होत असून ६ जूनपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. १० जूनपर्यंत अर्ज नोंदणी सुरु राहणार असून ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे.

एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये एफवाय बीए, बीएसस्सी, बीसीएस, बायोटेक्नॉलॉजी या वर्गांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल. त्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदविण्याचे आवाहन कॉलेजने केले आहे. ११ जून रोजी सायंकाळी मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. ज्याप्रमाणे जागा रिक्त राहतील. त्यानुसार पुढे मेरिट लिस्ट जाहीर होईल, याची नोंद घ्यावी असे कॉलेजने सांगितले. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीसाठी व अधिकमाहितीसाठी www.hptrykcollege.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images