Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

करार संपल्याने इमारतीपुढे फलक

0
0

करार संपल्याने

इमारतीपुढे फलक

सातपूर : अशोकनगर भागात असलेल्या आदिवासी सेवा समिती संचलित हिरे विद्यालयाला जागा राज्य कर्मचारी वसाहत सोसायटीने भाडेतत्वावर दिली होती. दोन वर्षांपूर्वी संबंधित शाळेला दिलेली इमारत खाली करावी, अशी मागणी सोसायटीतील सदस्यांनी केली. १ जून रोजी शाळेसाठी असलेल्या इमारतीचा करार संपल्याने सोसायटीच्या सदस्यांनी पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी फलक लावले.

दरम्यान, शाळेच्या आवारात संस्थेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांना माहिती असावी म्हणून फलक लावण्यात आला. फलकावर शासनाच्या नियमानुसार सदरील इमारत भाडेतत्वार घेतली असून १९९४ पासून संस्थेच्या ताब्यात आहे. सदरील इमारत भाडेतत्वार संस्थेच्या ताब्यात असल्याने महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कायद्यान्वये मिळकतीचा ताबा घेण्यास कुठलाही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फलक लावण्याच्यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोंदळ, ज्येष्ठ सदस्य प्रकाश तांबट, समाधान देवरे, ज्ञानेश्वर म्हस्के यांसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूचे ट्रॅ्क्टर जप्त

0
0

सटाणा : ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व चोरी करणारे दोन ट्रॅक्टर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जप्त करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, गेल्या आठवड्यात वाळू उपसा करणारे आठ टॅक्ट्रर जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून दहा लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार इंगळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर टक्के निकाल

0
0

निफाड : बारावीच्या मार्च २०१९ मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत के. के वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के व वाणिज्य शाखेचा निकाल ९४.२८ टक्के लागला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या आर. खपली यांनी ही माहिती दिली.

विज्ञान शाखेत हर्षवर्धन देशमुख (७६.३०) याने प्रथम, दीपक ढिकले (६०.६१) याने द्वितीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत प्रगती कांडेकर (७८.१५) प्रथम, सय्यद मिजबा शमशोद्दीनने द्वितीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकती तुम्हीच सांभाळा

0
0

सभागृह नेत्याचा आंदोलनाचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अभ्यासिका, वाचनालये, समाजमंदिर आदी सील केलेल्या मिळकती उघडण्यावरून सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळकतींना लावलेले सील प्रशासनाने आठ दिवसांत न काढल्यास महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेविका वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, रवींद्र धिवरे यांनी दिला आहे. या मिळकतींसाठी रेडीरेकनर दराने भाडे आकारायचे असेल तर महापालिकेनेच या मिळकती चालून दाखवाव्यात, असा इशारादेखील सभागृह नेते पाटील यांनी दिला आहे.

या संदर्भात नगरसेवकांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने मिळकतींना रेडीरेकनर दराच्या अडीच टक्के भाडेआकारणीची अट ठेवली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाडे भरणे सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना परवडणारे नाही. मात्र, न्यायालयीन निर्देशांचे पालनही व्हायला हवे. त्यामुळे या वादावर महापालिकेच्या महासभेत अर्धा टक्का दराने भाडेआकारणीचा ठराव करून तोडगा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे सलग दोन महिने तहकूब झालेली महासभा पुन्हा पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे कारण देत तहकूब झाल्याने अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा आदी मिळकती ना नफा ना नोटा तत्त्वावर चालविणाऱ्या सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. मिळकतींचे सील खुले केले जात नसल्यामुळे या मिळकतींचे वापरकर्ते नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. या संदर्भात सभागृह नेते पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रभाग ९ मधील समाजोपयोगी वापर असलेल्या या मिळकतींचे सील आठ दिवसांत प्रशासनाने न काढल्यास महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फांद्या छाटणीला वेग

0
0

फांद्या छाटणीला वेग

सातपूर : पावसाळा लागण्यापूर्वी दक्षता म्हणून वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. फांद्या छाटण्यासाठी सकाळी ९ वाजेपासूनच वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे दिवसभर सातपूरकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. सातपूर, अंबड एमआयडीसीसह रहिवाशी भागात वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटविण्याचे काम महावितरण करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींचा वाद चिघळला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या मिळकतींचा रेडीरेकनर दरावरून वाद सुरू असतानाच, राज्य सरकारने महापालिकेच्या मिळकतींसंदर्भात नवीन धोरण जाहीर केल्याने वादात आणखीच भर पडली आहे. नव्या धोरणानुसार महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुद्रांक उपजिल्हाधिकाऱ्यांची समिती किंवा रेडीरेकनरच्या आठ टक्के दर यापेक्षा जे अधिक असेल असा दर मिळकतींना आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणावर हरकती व सूचनांसाठी सरकारने तीस दिवस मुदत दिली असून, हरकती व सूचना करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महासभेत अर्धा टक्का दराने मिळकतींना दर आकारण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशानुसार, महापालिकेने शहरात करार संपुष्टात आलेल्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. अभ्यासिका, समाजमंदिरे, वाचनालये, ज्येष्ठ नागरिक संघांच्या मिळकती महापालिकेने सील केल्याने मोठा आगडोंब उसळला आहे. मात्र, नागरिक व नगरसेवकांच्या रोषानंतर प्रशासनाने कारवाई थांबवत रेडीरेकनरच्या अडीच टक्के दराने आकारणी सुरू केली आहे. अडीच टक्के दरदेखील परवडणारा नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांकडून अर्धा टक्का दर आकारण्याची मागणी होत होती. त्यानुसार महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात नागरिकांना दिलासा देण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधाऱ्याना सरकारनेच धक्का दिला आहे. सरकारने राज्यातील सर्व महापालिकांसाठी मिळकतींबाबत असलेल्या अधिनियमात बदल करत नवीन प्रारूप नियम तयार केले आहेत. त्यावर नागरिकांनी हरकती मागवण्यासाठी २७ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे भाजपच्या अर्धा टक्का दराने मिळकती देण्याच्या ठरावाला खीळ बसण्याची शक्यता आहे.

दरासाठी आता समिती

महापालिकेच्या भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या स्थावर मिळकतींचे भाडे यापूर्वी रेडीरेकनर दराने किंवा महापालिकेच्या महासभा, स्थायी समितीकडून ठरवले जात होते. मात्र, आता जिल्हाधिकारी, आयुक्त, मुद्रांक उपजिल्हाधिकाऱ्यांची समिती निश्‍चित करणार आहे. समितीने निश्‍चित केलेले दर किंवा सरकारने ठरवून दिलेल्या रेडीरेकनरच्या आठ टक्के दर यापैकी जे अधिक असेल ते वार्षिक दर लागू होणार आहेत.

नियमातील प्रमुख बदल

- भाडेपट्टा करार नोंदणीकृत करणे बंधनकारक

- आठ टक्के दरापेक्षा कमी भाडे नको

- दहा वर्षांसाठी भाडेपट्ट्याचा करार

- पूर्वीचे भाडे थकलेले असल्याने दोन टक्के व्याज आकारणी

- वैधरीत्या हस्तांतरण झालेल्या मिळकतींचे करारनामे

- भाडेपट्टाधारकाकडे कुठलीही रक्कम थकीत नसावी

- मिळकतीवर मालकी हक्क प्रस्थापित करता येणार नाही

- करारनाम्याची मुदत संपण्यापूर्वी लेखी कळविणे बंधनकारक

- महापालिकेला मालमत्ता ताब्यात घेण्याची मुभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता बदल्यांपूर्वी समुपदेशन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागात बदल्यांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील महसूल विभागातील ९० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. सरकारी नोकरीमध्ये बदली अनिवार्य असली तरी बऱ्याचदा कर्मचाऱ्यांसाठी ती धक्कादायक असते. त्यामुळे यंदा प्रथमच बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाचा प्रयोग जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राबविला. वर्षानुवर्षे साइड ब्रँचला काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना महसूलमधील मुख्य प्रवाहामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे मांढरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता अन्य कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी सकाळी एकाच वेळी ९० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये आठ नायब तहसिलदारांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे वशिलेबाजी अन् तत्सम माध्यमातून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसलेल्या कारकून, अव्वल कारकून, नायब तहसीलदारांना या बदलीप्रक्रियेच्या माध्यमातून झटका देण्यात आला आहे. मांढरे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी शुक्रवारी दुपारी चार ते रात्री दहा या कालावधीत बदल्यांचे काम मार्गी लावले. ५८ कारकून, १७ अव्वल कारकून, सहा मंडल अधिकारी आणि आठ नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ऑनलाइन पद्धतीने या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांची पसंती विचारण्यात आली. अपंग कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड व बिगरअवघड क्षेत्र यासह कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा अनुभव, रिक्त पदे, तसेच बदलीने रिक्त झालेली जागा विचारात घेऊन बदल्यांचे आदेश काढण्यात आले. वशिलेबाजी आणि वरदहस्तामुळे वर्षानुवर्षे मुख्यालयातील विशिष्ट शाखांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन आणि पसंतिक्रम यानुसार या बदल्या करण्यात आल्याने यंदाही मुख्यालयातच राहू पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. समुपदेशन प्रक्रियेवेळी संबंधित कर्मचारी सध्या कुठे कार्यरत आहे, कुठे काम करण्याची इच्छा आहे, त्यामागील कारणे, तेथे बदली मिळणे शक्य आहे किंवा नाही हेदेखील स्पष्ट करण्यात आले.

महिलांना मंडलाधिकारी म्हणून संधी

पात्र महिला कर्मचारी मंडलाधिकारी म्हणून संबंधित भागात जाऊन काम करण्यास तयार असतील तर त्यांनाही ती संधी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी समुपदेशनावेळी स्पष्ट केले. मंडलाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची आता तयारी नसली तरी भविष्यातही कुणी तशी इच्छा प्रदर्शित केल्यास संधी दिली जाईल, अशी माहिती मांढरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाला ठेंगा, बदल्यांना रांगा!

0
0

बदल्या दहा टक्के, ग्रामसेवक झाडून हजर सारे

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्यामुळे ग्रामसेवकपदाला मोठे वलय प्राप्त झाले आहे. यामुळे अवघ्या दहा टक्के बदल्या निश्चित असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामसेवकांनी बदली प्रक्रियेसाठी नाशिकला धाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुष्काळी कामांना ठेंगा दाखवत बदल्यांसाठी ग्रामसेवकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. बदलीसाठी आलेल्या ग्रामसेवकांकडील कोऱ्या चकचकीत चारचाकी गाड्या पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. यामुळे या बदली प्रक्रियेची चांगलीच चर्चा रंगत आहे.

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली. त्यानंतर शनिवारी बदल्यांसाठी पात्र ग्रामसेवकांना समुपदेशनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण, येथे संपूर्ण हॉलच या ग्रामसेवकांनी भरलेला होता. गंगापूर रोडवरील कै. वाघ गुरुजी विद्यालयात ही बदली प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. आदिवासी व बिगर आदिवासी भागातील बदल्यांवरून काही काळ येथे वादही झाला. त्यानंतर सामोपचाराने घेत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढून झळाही तीव्र झालेल्या आहेत. असे असताना जिल्हा परिषदेच्या बदल्यांसाठी पात्र उमेदवारांनी येणे अपेक्षित असताना हॉल भरेल इतके अधिकारी आलेच कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. ग्रामसेवकांच्या बदल्यांबरोबर शनिवारी पशुसंवर्धन व कृषी ‌विभागाच्या बदल्या करण्यात आल्या. पण, येथे अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. सायंकाळी पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षकांच्या १२, सहा पर्यवेक्षकांच्या २, ग्रामसेवकांच्या ७६, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या २१ बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी महिला बालकल्याण, लघुपाटबंधारे विभाग, शिक्षण विभाग अशा ४९ हून अधिक बदल्या करण्यात आल्या. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

...

कारची गर्दी, वाहतूक कोंडी

बदलीसाठी एकीकडे हॉलमध्ये ग्रामसेवकांची गर्दी झालेली असताना, त्यांच्या कारची गर्दी येथे शाळेभोवती दिसत होती. या गर्दीमुळे काही काळ येथे ट्रॅफिक जॅमही झाली. बहुतांश ग्रामसेवक कार घेऊन बदलीसाठी आले होते. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला.

...

आदिवासी भागावर डोळा

आदिवासी भागातून बिगर आदिवासी भागात कोणाला बदली हवी का, असा प्रश्न पात्र ग्रामसेवकांना विचारल्यानंतर अगोदर कोणीच हात वर केले नाही. त्यानंतर काही ग्रामसेवक तयार झाले असले तरी त्याची संख्या अगदी नगण्य होती. आदिवासी भागात येणाऱ्या जास्त निधीमुळे नकार आल्याची चर्चा नंतर रंगली.

...

थेट निधीचा परिणाम

ग्रामपंचायतीला थेट निधी मिळत असल्यामुळे ग्रामसेवकांचे पदही आता चर्चेत आले आहे. अनेक ठिकाणी गैरप्रकारच्या घटनाही पुढे आल्या. काही ग्रामसेवकांनी निलंबितही करण्यात आले. त्यामुळे थेट निधीचा हा परिणाम असल्याचेही बोलले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल टॉवरसाठी उपोषण

0
0

'भाजयुमो'तर्फे टॉवरला परवानगी देण्याची मागणी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागात मोबाइल टॉवरच्या उभारणीस परवानगी मिळत नसल्याने मोबाइल व इंटरनेटला रेंज मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मोबाइल टॉवर उभारणीस परवानगी मिळावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे शहर चिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर शनिवारी (दि.१) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या भागात तातडीने मोबाइल टॉवर्सना परवानगी दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेकडून सातपूर परिसरात मोबाइल टॉवरच्या उभारणीस परवानगी दिली जात नाही. विविध कारणे दाखवून या भागात नवीन मोबाइल टॉवरला परवानगी नाकारली जाते. या भागात जास्त मोबाइल टॉवर नसल्यामुळे मोबाइल व इंटरनेटला रेंज मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असताना दुसरीकडे सातपूर परिसरात मोबाइल आणि इंटरनेटला रेंज मिळत नाही, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. हे असेच सुरू राहिले तर शासनाच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेला धोका उद्भवू शकतो. मोबाइल टॉवर उभारून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या आंदोलनात भाजप नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, नगरसेवक रवींद्र धिवरे तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त गमे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कंपनीतर्फे आज सायकल रॅली

0
0

नाशिक : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, हेक्सी सायकल आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आज (ता. २) सायकल रॅली होणार आहे. रॅलीला गोल्फ क्लब मैदानातून सुरुवात होऊन एसएसके हॉटेलमार्गे माय एफएम रेडिओ येथे समारोप होईल. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सकाळी ६.३० वाजता गोल्फ क्लब मैदानावर रॅलीचा प्रारंभ होईल. रॅलीच्या माध्यमातून 'पाणी वाचवा', 'सायकल चालवा, फिट राहा', आणि 'शहर प्रदूषणमुक्त ठेवा' असे संदेश दिले जाणार आहेत. नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना सवलती देण्याची मागणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थिती आणि शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करावे यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा समितीने केल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची शनिवारी दुपारी भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विविध मागण्यांसाठी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन थांबविण्यात आले. मात्र, आजपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नसल्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्हा बँक अडचणीत असून, पीककर्ज वाटपासाठी बँकेला अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, जिल्ह्यातील विविध कार्यकारी विकास संस्था व सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या नावाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आदिवासी बांधवांना दिला जाणारा त्रास तातडीने थांबवावा, जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन योजनांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या संस्थांचे कर्ज त्वरित माफ करावे, खते व बियाणे कंपन्यांच्या हितासाठीच हवामान खाते मान्सूनचा चुकीचा अंदाज देत असल्याचा आरोप काही हवामानतज्ज्ञांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही राजू देसले, भास्करराव शिंदे, देविदास भोपळे, विजय दराडे यांच्यासह शिष्टमंडळाने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीच्या प्रवेशाची लगबग आता सुरू झाली आहे. शनिवारपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. दहावीच्या निकालापूर्वी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून https://nashik.11thadmission.net या वेबसाइटवर प्रवेशाचा भाग एक भरावा लागणार आहे. दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल.

शहरातील शाळांमध्ये ३० हजार माहिती पुस्तिकांचे वाटपही झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी, पालकांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रीय मदत केंद्र उभारले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशातील आरक्षण तक्त्यात बदल झाला आहे. शहरातील ६० महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. कला शाखेच्या ४८००, विज्ञानच्या ९५२०, वाणिज्यच्या ७७६० तर एमसीव्हीसी संयुक्त शाखेच्या ११४० जागा उपलब्ध आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के जागा व्यवस्थापन कोट्यांतर्गत आहेत. अल्पसंख्याक कोट्यांतर्गत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के जागा आहेत. इन हाऊस कोटा अंतर्गत एकूण क्षमतेच्या दहा टक्के जागा असणार आहेत.

...

प्रवेशफेऱ्यांचे नियमन

नियमित फेऱ्या सुरू होण्यापूर्वी शून्य फेरीचे आयोजन करण्यात येईल. या फेरीद्वारे द्विलक्षी अभ्यासक्रम (बायफोकल कोर्स) व व्यावसायिक अभ्यासक्रम (एचएसव्हीसी) या विद्याशाखांचे प्रवेश होतील. या फेरीपासून व्यवस्थापन, इन हाऊस, अल्पसंख्याक कोट्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसार सुरू होतील. या फेरीपाठोपाठ तीन नियमित फेऱ्यांचे प्रवेश होतील. यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. याशिवाय विशेष फेरीनंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल. यापूर्वी प्रवेश न मिळू शकलेले, प्रवेश रद्द केलेले असे सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

...

शहरातील जागा

कला शाखा - ४८००

विज्ञान - ९५२०

वाणिज्य- ७७६०

एमसीव्हीसी संयुक्त शाखा- ११४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३१) मध्यरात्री ऑल आउट मोहीम राबवली. या कारवाईत १०८ गुन्हेगारांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, २८ जणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात रात्री दहा वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली. नाकाबंदी, वाहन तपासणी, तडीपारांच्या घराची तपासणी, हॉटेल्सची तपासणी, झोपडपट्टीत चौकशी अशी कामे यावेळी पोलिसांनी हाती घेतली. रात्री १.३० वाजेपर्यंत शहरात पोलिसांची तपासणी मोहीम सुरू होती. म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉर्इंट, मालेगाव स्टॅँड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायण बापूनगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका यासह अनेक ठिकाणी पोलिसांनी आपला फौजफाटा कामाला लावला होता. यावेळी तीन तडीपार गुंड शहरातच आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले चार आरोपीही पोलिसांच्या हाती लागले. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अठ्ठावीस झोपडपट्ट्यांची तपासणी करण्यात आली, तर ९२ टवाळखोरांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कुस्त्यांची दंगल

0
0

पंचवटी : मखमलाबाद येथील जय बजरंग तालिम कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मित्र मंडळाच्या वतीने आज (दि. २) दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत मराठा मंगल कार्यालयाच्या आवारात कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरीचे उपविजेते कोल्हापूर येथील कुस्ती सम्राट अस्लाम काझी यांची प्रमुख उपस्थिती दंगलीचे आकर्षण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअधीक्षक पाटलांसह२५ कर्मचारी निवृत्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील २५ पोलिस अधिकारी व कर्मचारी ३१ मे रोजी निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. निवृत्त झालेल्यांमध्ये उपअधीक्षक पाटील, पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, नियंत्रण कक्षाचे सहाय्यक निरीक्षक मोतीराम वसावे, निफाड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे वाचक शंकर मोकळ, पिंपळगावचे उपनिरीक्षक दीपक आवारे, वडनेरभैरवचे उपनिरीक्षक अरुण पाटील आदींसह २५ पोलिस कर्मचारी आणि एक वरिष्ठ श्रेणी लिपिक यांचा समावेश आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला अधीक्षक डॉ. सिंह यांनी दिला. सहाय्यक निरीक्षक साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. निरीक्षक अनंत तारगे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एसटीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना शहर व तालुक्याच्या ठिकाणी जाणे सहज सोपे झाले आहे. मात्र, आता एसटी महामंडळाकडून दिवसेंदिवस निरनिराळे बदल होऊन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काढले.

महाराष्ट्र राज्याची रक्तवाहिनी लालपरी अर्थात एसटीला आज ७१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त धुळे आगारात एसटीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शनिवारी (दि. १) ते बोलत होते. राज्यात सर्वप्रथम पुणे-अहमदनगर या मार्गावर पहिली एसटी १ जून १९४८ मध्ये धावली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

या वेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, आगारप्रमुख भगवान जगनोर यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक प्रवाशी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना एका महिला अधिकाऱ्याने चांगली शिस्त लावल्याने धुळे विभाग चोख कामगिरी व उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर आहे. विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी सर्वप्रथम एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पुष्पगुच्छ किंवा आतषबाजी टाळण्यात आली.

महापौरांनी साधली संधी
एसटीच्या वर्धापनदिनी महापौर चंद्रकांत सोनार यांचे कार्यक्रम सुरू असताना आगमन झाले. याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी कार्यक्रमातून काढला पाय घेतला. वर्धापनदिनानिमित्त भाषण करायचे सोडून मला गावगुंड म्हटले जाते. मी गावगुंड आहे का, माझ्याकडून पाहून सर्वांना तसे वाटते का, मी शहराचा जबाबदार प्रथम नागरिक आहे. तरीही मला गुन्हेगार म्हणून संबोधले जात आहे, असे महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमहोदयांची ‘एसटी’द्वारे ‘जळगाव-जामनेर’वारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खान्देशातील प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या 'लालपरी'चा वर्धापनदिन शनिवारी जळगावात उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी आठ वाजता आपल्या शासकीय वाहनाऐवजी एसटी बसने 'जळगाव ते जामनेर' असा प्रवास केला.

बस प्रवास करण्यापूर्वी मंत्री महाजन यांनी जळगाव बस आगारात पाहणी केली. आगाराच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. जळगाव बस आगारात एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते जळगाव-जामनेर बसने जामनेरला जाण्यासाठी निघाले. जलसंपदामंत्री महाजन आपल्यासोबत बसने प्रवास करणार असल्याचे पाहून बसमधील इतर प्रवाशांना सुखद धक्काच बसला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी महाजन यांनी बसचालक व वाहकाचा सत्कार केला.

जामनेरला जाण्यासाठी बसने निघालेल्या मंत्री महाजन यांनी आपल्यासोबत असलेल्या नऊ सहकाऱ्यांचे बसच्या महिला वाहकाकडून तिकीटदेखील काढून घेतले. वाहकासह बसमधील अनेक प्रवाशांनी मंत्री महाजनांसोबत सेल्फी काढून घेतले. त्यांनी वाहकाजवळील आसनावर बसून प्रवास केला. महाजन यांच्यासोबत भाजपचे मनपा गटनेते भगत बालाणी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक सुनील खडके, चेतन चौधरी, अरविंद देशमुख, अंगरक्षक भगवान पाटील आदी होते.

एसटी रक्तवाहिन्यांसारखीच

ग्रामीण भागातील दळणवळणात एसटीचा मोठा वाटा आहे. ज्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात रक्तवाहिन्यांचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील दळणवळणात एसटीचे महत्त्व आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाची सेवा देण्याचे काम एसटी करीत आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे एसटी करीत असलेले काम राष्ट्रविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव स्थानकात हॉलिडे एक्स्प्रेसचे २ डबे घसरले

0
0

नाशिक:

बरेलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे नाशिकमधील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. या दुर्घटनेत कोणतीही हानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त अद्याप नाही. या अपघातामुळं मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

हॉलिडे एक्स्प्रेस ही बरेलीहून मुंबईच्या दिशेने येत होती. नाशिकमधील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक तुटल्यामुळं डबे रुळावरून घसरल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही हानी किंवा प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान, या दुर्घटनेमुळं नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली असून ती कधी पूर्ववत होईल, याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात मान्सूनपूर्व 'रोहिणी'चे मळभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेले वर्षभर भीषण दुष्काळी दाहकतेचे मोठे चटके सोसावे लागलेल्या टंचाईग्रस्त येवला तालुक्यातील गावोगावच्या जनतेसह शेतकऱ्यांचे येत्या ८ जून रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या पावसाळ्यातील महत्वपूर्ण 'मृग' नक्षत्राकडे लक्ष लागले असतानाच, मान्सूनपूर्व वळवाच्या 'रोहिणी' नक्षत्राचे मळभ रविवारी (दि.८) दुपारनंतर तालुक्यात तुरळक स्वरूपात दाटून आले होते.

रविवारी अगदी सकाळपासून वातावरणात वाढलेला प्रचंड उष्मा व दमट वातावरण यातून सर्वांच्याच अंगावर घामाच्या धारा ओथंबताना वळवाच्या पावसाची चाहूल लागली गेली होती. दुपारी तीन वाजेनंतर येवला शहर परिसरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आकाशात ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यात सर्वदूर काहीशा तुरळक स्वरूपात दाटून आलेले हे रोहिणी नक्षत्राचे ढग पुढे पावणेपाच वाजेपर्यंत अधिक गडद होत गेले होते.मात्र, अचानक पाठीमागून आलेल्या काहीशा वाहत्या वाऱ्यांनी हे ढग पुढे पिटाळून लावले.
येवला तालुक्याच्या उत्तर-पश्चिम पट्ट्यातील अनकाई, आडगाव रेपाळ,मुरमी,विखरणी,पाटोदा,शिरसगाव-लौकी, सोमठाण देश,आंबेगाव आदी गावांमध्ये रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्रातील वळवाच्या पावसाचा किरकोळ स्वरूपात शिडकावा झाला. या परिसरात कुठे तीन ते पाच मिनिटे, तर कुठे दहा मिनिटे वळवाच्या पावसाच्या सरी पडल्या.

यंदाच्या पावसाळ्यातील महत्त्वपूर्ण सूर्याचा 'मृग' हे नक्षत्र येत्या आठ जूनला 'उंदीर' वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते होणार आहे. मान्सूनपूर्व समजल्या जाणाऱ्या वळवाच्या यंदाच्या 'रोहिणी' नक्षत्रास नुकत्याच संपलेल्या मे महिन्यातील २४ तारखेस सुरुवात झाली होती. त्यानंतर गेल्या दहा दिवसात या रोहिणीचा एक थेंब देखील जमिनीवर पडला गेला नव्हता. आता महत्वाचे मृग नक्षत्र येत्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सरतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या रोहिणी नक्षत्रातील 'कळा' ह्या रविवारी दाटून आलेल्या तुरळक स्वरूपातील ढगांमुळे यंदाच्या पावसाळ्याचे वर्दी देऊन गेल्या आहेत.

गेले वर्षभर भीषण दुष्काळी दाहकतेचे मोठे चटके सोसावे लागतानाच यंदाच्या उन्हाळ्यात भीषण टंचाईला सामोरे जावे लागलेल्या येवला तालुक्यातील गावोगावच्या जनतेसह येथील शेतकऱ्यांना यंदा मोठी आस लागली आहे, सुरू होणाऱ्या यंदाच्या पावसाळ्यातील वरुणकृपेची... पावसाळ्यातील महत्त्वाच्या 'मृग' नक्षत्राचा दमदार श्रीगणेशा व्हावा, त्यापुढील प्रत्येक नक्षत्राने देखील भरभरून पावसाचे दान द्यावे, अशी आस बाळगून असलेल्या येवला तालुक्यातील जनतेला उशिरा का होईना रविवारी दाटून आलेल्या मान्सूनपूर्व 'रोहिणी' नक्षत्राने जणू काही पुढील सहा दिवसात प्रवेशकर्ते होणाऱ्या सूर्याच्या मृग नक्षत्राची चाहूल दिली आहे.

येवला तालुक्‍यात रविवारी दुपारनंतर दाटून आलेले ढग तालुक्याच्या उत्तर पश्चिम पट्ट्यातील काही गावांमध्ये वळवाच्या पावसाचा थोडासा शिडकावा करून गेले. सायंकाळी पाचवाजेनंतर हे ढग वाहत्या वाऱ्यासंगे पुढील दिशेला निघून गेले. त्यानंतर तालुक्यात पुन्हा एकवार आकाशी निरभ्र वातावरण दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणे शक्य

0
0

रस्त्यांच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणे शक्य नसल्यास ते वृक्ष मुळासकट काढून शहराबाहेर त्या वृक्षांचे पुनर्रोपण करावे. पर्यावरणाचे हित पाहता सजीव सृष्टीसाठी वृक्षांची गरज असताना निष्पाप नागरिकांचा बळी जाता कामा नये. आपण मुख्यमंत्री या नात्याने सरकारच्या वतीने उच्च न्यायालयास विनंती करून शहरातील जीवघेणे वृक्ष तातडीने हटवावेत. शहरातील जनतेच्या वतीने आपण आमची मागणी उच्च न्यायालयात त्वरित सरकारच्या वतीने मांडावी व नाशिककरांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images