Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबकेश्वरमध्ये जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात गत चार वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, मात्र आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गत वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.

जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ

तालुक्यातील १२४ गावांपैकी ५६ गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यामध्ये जलसंधारणाची १५५४ कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वनतळे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, दगडी बांध, चारी खोदणे असे पाणी अडवण्यासाठी कामे करण्यात आली आहेत. असे असतानादेखील भूजल पातळी खालावलेली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा अल्प म्हणावा इतका कमी झाला आहे, तर लहान बंधारे कधीच कोरडेठाक पडले आहेत.

तालुक्यात झालेली जलयुक्त शिवारची कामे

वर्ष ... गावे....कामांची संख्या

२०१५-१६... १९ ... ८२६

२०१६-१७... ९ ... २३२

२०१७-१८... ५ ... १५०

२०१८-१९....२२... ३४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावी गुरुजींची ‘पवित्र’मुळे परीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिक्षक भरतीसाठीचे बहुप्रतीक्षित पवित्र पोर्टल सुरू झाले असले तरी या पोर्टलचा सर्व्हर डाऊन होण्याबरोबरच या पोर्टलवरील विविध तांत्रिक दोषांमुळे भावी शिक्षकांना नको ती शिक्षकाची नोकरी असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या भावी शिक्षकांच्या तक्रारी आणि अडचणींची गांभीर्याने दखल घेण्याची तसदी न दाखवल्याने या भावी शिक्षकांवरच परीक्षा देण्याची वेळ आली आहे.

पवित्र पोर्टलवर भरलेल्या अर्जातील जन्मतारीख, विषय, पत्ता, माध्यम याविषयीच्या तक्रारी दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल सुरू केलेले आहे. मात्र पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर लॉगिनच होत नसल्याचा अनुभव बहुतांश उमेदवारांना आतापर्यंत आला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या अडचणीवर तोडगा काढावा, या मागणीसाठी विभागातील शेकडो उमेदवारांनी शुक्रवारी (दि. ३१) दिवसभर उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. परंतु, या कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे या उमेदवारांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मकुमारीतर्फे आजपासून शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला कमावती झाली आहे. तिचे मानसिक आरोग्य ढासळत आहे. परंतु, असे धकाधकीचे आयुष्य जगतानाही महिलांनी आनंदी कसे रहावे, तणावमुक्त जीवन कसे जगावे, यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पंचवटी सेंटर व कविता फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ जून २०१९ या कालावधीत ब्रह्माकुमारी शक्तिधाम, सेवाकुंजसमोर, पंचवटी येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नारीशक्ती प्रबळ व्हावी, निरोगी रहावी हा त्या मागचा मुख्य हेतू आहे. यामध्ये सायबर गुन्हेगारी, महिला व त्यांचे आरोग्य, त्यांचा आहार, व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, माईंड ट्रॅफिक क्लासिफिकेशन, तणावमुक्त जीवन व सकारात्मक जीवनशैली, तसेच राजयोग ध्यानसाधना व जीवन जगण्याची कला या सर्व गोष्टींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरास उपस्थित रहाण्याचे आवाहन पंचवटीच्या मुख्य प्रशासिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कर्मचाऱ्याच्या कुटुंबास १५ लाखांची मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक प्रक्रियेचे कर्तव्य बजावून परतताना मृत्यू झालेले मतदान कर्मचारी कृष्णा भरत सोनवणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शुक्रवारी वितरित करण्यात आले. सोनवणे यांच्या पत्नी रेखा यांनी या अनुदानाचा धनादेश स्वीकारला.

सोनवणे हे देवळाली कॅम्प येथील एस. व्ही. के. टी. आर्टस अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदान कर्मचारी म्हणून त्यांना इगतपुरी विधानसभा मतदारसंघात जबाबदारी सोपविण्यात आली होती. मतदान प्रक्रिया २९ एप्रिल रोजी पूर्ण करून घरी परतत असताना ते चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सोनवणे हे निवडणुकीशी संबंधित कामकाजावर असल्याने त्यांना सानूग्रह अनुदान मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. नाशिकचे तहसीलदार तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी शुक्रवारी सोनवणे यांच्या पंचवटीतील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना धनादेश प्रदान केला. सोनवणे यांच्या पत्नी रेखा यांनी हा धनादेश स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयमाच्या सभेत वार्षिक आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. यात 'आयमा'तर्फे घेण्यात येणाऱ्या 'बी टू बी' व आयमा प्रदर्शनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष निखील पांचाल, सुदर्शन डोंगरे, माजी अध्यक्ष सल्लागार समिती चेअरमन धनंजय बेळे, आयपीपी राजेंद्र अहिरे, खजिनदार उन्मेष कुलकणी, सचिव राजेंद्र पानसरे, योगिता आहिरे उपस्थित होते. याप्रसंगी 'आयमा'चे अध्यक्ष तलवार यांनी वर्षभरातील संघटनेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. 'आयमा'च्या उपक्रमांबाबत माहिती सभासदांना सादर केली. या वर्षात 'आयमा'तर्फे घेण्यात येणाऱ्या बी टू बी व 'आयमा' प्रदर्शनाबाबत माहिती दिली. यावेळी संघटनेच्या सभासदांनी त्यांनी वर्षभरातील कामाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’च्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

$
0
0

७ व ८ जून रोजी रंगणार कलासंगम

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स'ने नाशिक आवृत्तीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त वाचकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आणली आहे. आज (दि. १) पासून ही मेजवानी अनुभवता येणार असून, दि. ७ व ८ जून रोजी 'कलासंगम' या कला महोत्सवातून कलांचा आविष्कार नाशिकरांना पहायवयास मिळणार आहे. यासोबतच विविध कार्यशाळांची पर्वणीही वाचकांना साधता येणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे नेहमीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अनुभवता येईल, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही वर्धापन दिनानिमित्त बहुविध कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स, भारतीय योग विद्या धाम, नाशिक आणि आरोग्यधाम निसर्गोपचार व योग केंद्र नाशिकरोडच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १) पासून 'मोफत योगासन प्राणायाम वर्ग' होणार आहेत. शहरातील ५३ केंद्रांवर हे वर्ग होतील. 'मटा कल्चर क्लब'तर्फे लहान मुलांसाठी नाट्यशिबिर आयोजित करण्यात आले असून, ३० मे ते १२ जून या कालावधीत गंगापूररोडवरील रेषा डे केअर सेंटरमध्ये हे शिबिर होत आहे. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉपचे दि. २ जून रोजी आयोजन करण्यात आले असून, मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये हे वर्कशॉप होईल. 'हसत खेळत विज्ञान शिका' ही विज्ञानप्रेमींसाठीची कार्यशाळा ५ जून रोजी कॉलेजरोडवरील धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी येथे होईल. कॉलेजरोडवरील न्यूफॉर्म अॅकॅडमीमध्ये 'मेकअप वर्कशॉप'१५ जून रोजी, तर १६ जून रोजी 'मेक्सिन फूड मेकिंग वर्कशॉप' होणार आहे.

विविध कलांच्या सादरीकरणाने भरलेल्या 'कलासंगम' कला महोत्सवाचे हे तिसरे वर्षे आहे. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ७ व ८ जून रोजी या कला महोत्सवात लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी या कला सादर करण्यासाठी कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. कलेचा प्रचार प्रसार व्हावा, तसेच वाचकांना विविध कलाकृती पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने 'कलासंगम' आयोजित केला आहे. तसेच वाचकांसाठी ८ व ९ जून रोजी 'हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले असून, वाचकांना नाशिकच्या वैभवाची माहिती जाणून घेता येणार आहे. आठव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील आठ ठिकाणी 'हेरिटेज वॉक' होणार आहे. 'मटा'च्या वाचकांसाठी या कार्यक्रमांमधून अनोखी आणि स्मरणीय पर्वणी अनुभवता येणार आहे.

...

कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

'कलासंगम' महोत्सवात शहरातील कलाकारांना कलाविषयक स्टॉल्स लावण्याची संधी 'मटा'ने उपलब्ध करुन दिली आहे. याबरोबरच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ही संधी आहे. स्टॉल लावण्यासाठी व आपली कला सादर करणाऱ्या इच्छुकांनी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड पाणीप्रश्नी आता उपोषण

$
0
0

दोन डॉक्टर्ससह पाच तरुणांचा सहभाग

...

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

'नो पॉलिटिक्स, नो ब्लेम, ओन्ली वॉटर' हे ब्रीद वाक्य घेऊन मनमाडच्या पाणीप्रश्नासाठी राज्य व देशातील हजारो मनमाडकर व हितचिंतकांना ऑनलाइन पिटीशनमध्ये सहभागी करीत मनमाडचा पाणीप्रश्न थेट पंतप्रधान मोदी यांच्या दरबारात नेणाऱ्या मनमाडमधील पाच तरुणांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मनमाडचा पाणीप्रश्न शाश्वत रुपात सोडवावा, करंजवण योजना मार्गी लावून पाणीटंचाईतून मुक्ती द्यावी, या मागण्यांसाठी ३ जूनपासून मनमाडकर पाच तरुण उपोषणाला बसणार आहेत. त्यात शहरातील दोन डॉक्टर्सचा समावेश आहे.

चाळीस वर्षांपासून पाणीप्रश्न प्रलंबित आहे. पाण्याचे राजकारणच अधिक झाले. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मनमाडच्या पाणीप्रश्नासाठी थेट मोदी सरकारकडे ऑनलाइन कैफियत मांडून हजारो मनमाडकरांना या मोहिमेत सामील करणाऱ्या डॉ. सुहास जाधव, डॉ. अमोल गुजराथी, मनोज गांगुर्डे, सतीश न्हायदे व अमित बाकलीवाल या तरुण मित्रांनी मनमाडच्या पाणीप्रश्नासाठी ३ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेत प्रशासनाला इशारा दिला आहे.

शिवाजी चौकात उपोषण सुरू करण्यात येणार आहे. पाणीप्रश्नाचे राजकारण थांबवावे, सोशिक जनतेने पाण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, पाण्याचे गांभीर्य सर्वदूर पोहचून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करण्यात येणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

...

या आहेत मागण्या

- करंजवण योजना मार्गी लावावी

- कायमस्वरूपी मनमाडचा पाणीप्रश्न सुटावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला टंचाईचा आढावा

$
0
0

टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

...

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढतच आहे. ग्रामीण भागातून दररोज टँकरची मागणी वाढत असल्याने तत्काळ टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन टंचाई आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी केले.

त्र्यंबक पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीस जि. प सदस्य रूपांजली माळेकर, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य मोतीराम दिवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मधुकर झोले, विस्तार अधिकारी दगडू राठोड, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस गावनिहाय गटविकास अधिकाऱ्यांकडून टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गाव, गाडे, पाडे यावरून टँकरची मागणी होत असताना सामान्यांना टँकर मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे माळेकर यांनी सांगितले. तसेच, गावात उपलब्ध पाण्याची तपासणी करून स्वच्छ पाणीपुरवठा करून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणीटंचाईचा प्रश्न प्रामुख्याने सोडविण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

...

ग्रामसेवकांना धरले धाऱ्यावर

पाणीटंचाई काळात उकृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान, तर पाणी प्रस्ताव देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांना बैठकीप्रसंगी धाऱ्यावर धरण्यात आले. पेसा तसेच वित्त आयोगाचा निधी ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विचारात घेऊन पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च करण्याची सूचना जिल्हा नियोजन समिती विनायक माळेकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड बचाव कृती समितीचे आवाहन

$
0
0

मनमाड : शहरात पाण्यासाठी हाहाःकार उडाला असून, पालखेड विभागाच्या मनमानी व बेजबाबदार प्रशासनाने दोन दिवस उशिरा, अपुऱ्या क्षमतेने कमी प्रमाणात केलेल्या पाणीपुरवठ्यामुळेच १ लाख ३० हजार मनमाडकरांना भीषण पाणीटंचाईच्या आगीत होरपळावे लागत आहे. अभियंता भागवत यांनी पाणीचोरांना पाणी मिळावे म्हणून मुद्दाम मनमाडला पाणी उशिरा दिले, असा आरोप मनमाड बचाव समितीने केला आहे. पालखेड विभागातील या मनमानीला लक्षात घेऊन २ जूननंतर मिळणाऱ्या पाण्याच्या रोटेशनबाबत जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन आणि कौन्सिलने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनेश्वरचा देवस्थानचा दुष्काळात आधार

$
0
0

- पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याचे भांडे वितरण

- मोर, हरिण अशा पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या

- लोनजाई येथील वनसंपदा वाचविण्यासाठी पाणी टँकरचा खर्च

- चारा छावणी सुरू करण्यासाठी पुढाकार

...

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथे श्री शनेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून वन्यजीव, पशू पक्षी यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने पाण्याच्या कुंड्या, पक्ष्यांसाठी धान्य, घरटे, चारा वाटप आदी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

निफाड येथील शनी चौकात या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. श्री शनेश्वर देवस्थानने दुष्काळी परिस्थितीत पाणी व धान्य देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येवला तालुक्यातील राजापूर येथील वन परिक्षेत्रातील हरिण, मोर यांना पाण्याच्या कुंड्या देवस्थानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. तसेच, पशुपक्ष्यांसाठी धान्य व घरटे वाटप, श्री क्षेत्र लोनजाई गड येथील नाना महाराज वडनेरे आश्रम येथे पाण्याच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले. येवला वनविभागाला २० सिमेंट टाक्या, लोनजाई येथील आश्रमाला एक व निफाड येथे एक टाकी, लोनजाई येथील झाडांना पाणी देण्यासाठी एका टँकरचा खर्च देण्याचे ठरविण्यात आले. येवला, लोनजाई व निफाडसाठी घरटे व पाण्याचे भांड्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

यावेळी शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे वि. दा. व्यवहारे यांनी प्रास्ताविकातून श्री शनेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याची माहिती दिली. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी बोकडदरे येथील भारतमाता आश्रमाचे जनेश्वर महाराज, रामप्रभू महाराज, येवला वनपरिक्षेत्र विभागाचे वनपाल संजय भंडारी, नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, नगरसेवक राजाभाऊ शेलार, मुकुंद होळकर, अनिल कुंदे, देवदत्त कापसे, संजय कुंदे, शिवाजी ढेपले, प्रवीण कराड, देवदत्त कापसे, माणिक शास्त्री, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, रमेशभाऊ कापसे, केशरचंद रुणवाळ, सुभाष कर्डिले, रामदास व्यवहारे, आनंद कुलकर्णी, पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, विजय बोरा, राजेंद्र दायमा आदी उपस्थित होते.

...

गोमाता वाचविण्याचे आवाहन

दुष्काळामुळे गोमाता सांभाळण्याची क्षमता नसल्याने त्या नाईलाजाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. विकलेल्या या गायी कत्तलखान्याकडे जात आहेत. त्या वाचविण्यासाठी चारा छावण्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संघटना व समाजसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी जनेश्वर महाराज यांनी केले. बोकडदरे आश्रमात शनेश्वर देवस्थान व आश्रमाच्या वतीने चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड होतेय उद्ध्वस्त

$
0
0

मटा सिरीज- पाणीटंचाईच्या वेदना

भाग एक

...

pravin.bidve@timesgroup.com

tweet : BidvePravinMT

....

नाशिक : नाशिकसारख्या शहरात पाण्याची मुबलकता असली तरी या जिल्ह्यातील एक शहर असेही आहे जेथे भरपावसाळ्यातही किमान १५ दिवसांनी पाणी येते. अगदी ५८ दिवसांतून एकदाच पाणी मिळण्याचा अनुभवही हे शहर घेत आहे. अन् आताही ३५ दिवसांतून एकदा येथील नळांमधून पाण्याची धार वाहते. हे शहर आहे रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखले जाणारे मनमाड. पाण्याअभावी येथील रहिवाशी मनमाड सोडून अन्य शहरात स्थलांतरीत होऊ लागल्याने या शहराची उद्ध्वस्ततेकडे वाटचाल सुरू झाली आहे. पाण्याचे हे दुर्भिक्ष्य आणखी काही वर्ष कायम राहिले, तर हे शहर अस्तित्वात राहील की नाही ही अस्वस्थता आणि अगतिकता मनमाडवासीय व्यक्त करू लागले आहेत.

पाणी देऊन तहान भागविण्यासारखे पुण्यकर्म नाही, असे म्हणतात. परंतु, घरी आलेल्या पाहुण्याला जेवण करून जा, पण पाणी मागू नको असे मनमाडवासीयांना नाईलाजास्तव सांगावे लागते, यावरून येथील पाणीटंचाईची भीषणता लक्षात येते. भारतीय अन्न महामंडळाचे आशिया खंडातले सर्वात मोठे गोदाम (एफसीआय), मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला इंधन पुरविणारे भारत पेट्रोलियम तसेच रिलायन्सचे स्टोअरेज, कोकण रेल्वेसाठी सुटे भाग बनविणारा कारखाना, रेल्वेचे जंक्शन अशी बहुपेठी ओळख मनमाडची आहे. येथील विविध ठिकाणच्या आस्थापनांवर असलेला कामगार आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने मनमाडमध्ये वास्तव्यास आहे. मनमाडच्या भाळावर कोरलेल्या पाणीटंचाईच्या वेदना या कामगार वर्गाला असह्य होऊ लागल्या आहेत. पाणी नाही म्हणून पाहुण्यांनी पाठ फिरविणे आणि पाणी मिळावे म्हणून मनमाड सोडून बाहेरगावी जाता न येणे या दृष्टचक्रात मनमाडवासी अडकले आहेत.

पाणीटंचाईच्या या झळा असह्य होऊ लागल्याने अलीकडच्या काही वर्षात अनेकांनी शहर सोडून नाशिक शहरात स्थलांतरीत होण्यास प्राधान्य दिले आहे. सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण, नोकरी अथवा उद्योगधंदा यासारख्या कारणांच्या निमित्ताने ३० टक्क्यांहून अधिक रहिवाशांनी मनमाडला अलविदा केले आहे. इतकेच नव्हे तर मनमाडमध्ये नोकरी करणारे, भरघोस वेतन घेणारे नोकरदारही वास्तव्यासाठी नाशिकला प्राधान्य देऊ लागल्याने येथील उद्योग व्यवसायांनाही उतरती कळा लागली आहे. पाण्याचा अभाव, विस्कटलेली आर्थिक घडी आणि स्थलांतरीत होणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे मनमाड हळूहळू रिकामे होऊ लागले असून, या शहराचे असे मृत्युपंथाला लागणे हे भयावह, चिंता वाढविणारे तर आहेच पण पाण्याअभावी काय होऊ शकते याचे ढळढळीत उदाहरण म्हणूनही आहे.

..

नगरसेवक अन् नगरपालिका कर्मचारीही नाशकात

मनमाड नगरपालिकेच्या आस्थापनेवरील अनेक कर्मचाऱ्यांनी वास्तव्यासाठी नाशिकची निवड केली आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध असल्याने आणि हा प्रवास अवघा तासाभराचा असल्याने अनेक कर्मचारी अपडाऊन करण्यास प्राधान्य देतात. विशेष म्हणजे मनमाडमध्ये नोकरी करून ४० हजारांहून अधिक पगार घेणारे हे कर्मचारी दोन रुपयेदेखील मनमाडमधील बाजारपेठेत खर्च करीत नसल्याबाबत येथील व्यावसायिकांत तीव्र नाराजी अन् अस्वस्थता आहे. मनमाडबाहेर राहणारे हे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी कसे उपलब्ध होणार, असा सवालही नागरिक उपस्थित करतात. कर्मचारी अधिकारी सोडाच मनमाडमधील नागरिकांची मते घेऊन नगरपालिकेत वॉर्डाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काही नगरसेवकांनीदेखील नाशिकमध्ये संसार थाटला आहे. नगरपालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधीच मनमाडमध्ये थांबणार नसतील, तर हे शहर बकाल आणि उद्ध्वस्त व्हायला आणखी काय होणे बाकी आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मनमाडमधील हा बहुतांश वर्ग लासलगाव, निफाड, मालेगाव, नाशिकरोड, जेलरोड, सिन्नरफाटा, उपनगर या भागात वास्तव्यास आहे. पूर्वी मनमाडमधून शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नाशिकला येत. ती संख्या तशीच असली तरी आता मनमाडला नोकरी करून राहायला मात्र नाशिकला असल्याने नाशिक-मनमाड असे उलटे अपडाऊन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटल, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घोषणा देत रॅलीद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटल येथून रॅलीला सुरुवात झाली. मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, मानवता क्युरी हॉस्पिटलचे डॉ. राज नगरकर प्रमुख पाहुणे होते. सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी शपथ घेतली. रॅलीत सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. साई केअर नर्सिंग कॉलेज, नाशिक मेडिको नर्सिंग कॉलेज, स्वामिनारायण नर्सिंग कॉलेज, गोखले एज्युकेशन सोसायटी, आयटीआय कॉलेज, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, डॉट्स संस्था, मॅग्मो वेल्फेअर संस्था, एसएमबीटी ट्रस्ट, धामणगाव-घोटी आदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला. चाणक्य कला मंचातर्फे जनजागृतिपर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी डॉ. नगरकर यांनी कॅन्सर व त्यावरील उपचारांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, ओरोफिट डेंटलचे डॉ. किरण मंगरुळे, डॉ. नागेश उपस्थित होते. डॉ. नीलेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभ वार्ताएसटीत स्मार्ट कार्ड योजनेला

$
0
0

शुभ वार्ता एसटीत स्मार्ट कार्ड योजनेला शुभारंभ नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित स्मार्ट कार्डचा शुभारंभ एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त झाला. हे कार्ड नाशिक येथील ठक्कर बसस्थानक व निमाणी बसस्थानकावर आरक्षण कार्यालयात दिले जाणार आहे. तर जिल्ह्यात हे कार्ड मिळवण्यासाठी मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपूरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव बसवंत येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सविस्तर प्लस पान १ चालते बोलते विद्यापीठ : 'म. सु.'...सविस्तर पान २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रुटी नको, मार्ग काढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत कोणत्याही त्रुटी काढू नका. त्या प्रस्तावातील मागणी एकतर पूर्ण करा किंवा तो प्रस्तावच बाद करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

टंचाईचा कोणताही प्रश्न उदभवला, तर तो अधिकाधिक ४८ तासांत निकाली काढावा, अशा सूचनाही करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात टंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी उपस्थित होते. टंचाईच्या अनुषंगाने दाखल प्रस्तावात त्रुटी असल्या, की तेथे टँकर मंजूर केला जात नाही. हा प्रस्ताव पडून राहातो आणि शेतकऱ्यांचे हाल होत राहतात. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशा सूचना मांढरे यांनी केल्या.

जिल्ह्यात १२ चारा छावण्यांची तजवीज झाली असून, चार छावण्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित आठ छावण्यांपैकी सात छावण्या लवकरच सुरू होतील, असे मांढरे यांनी स्पष्ट केले. चारा छावणी चालविणाऱ्यांकडून पुढील १५ दिवसांचे नियोजन घ्यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत. जनावरांची भूक भागविण्यासाठी संबंधित छावणीचालक कोठून चारा आणणार आहे, किती चारा उपलब्ध करून घेणार आहे, तो चारा पुरेल असे त्याला का वाटते, हे पाहणे आवश्यक आहे. प्रांताधिकाऱ्यांनी या छावणीचालकांची भेट घेऊन छावणीचालकाने चारा पुरविण्याबाबत केलेले नियोजन लेखी घ्यावे, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. छावणीचालकाने चारा नाही म्हणून जनावरांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार घडू नये यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

-

ग्रामदल, तरुणांची घ्या मदत

जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या टँकरद्वारे रहिवाशांची तहान भागविण्याचे काम केले जात आहे. टँकरच्या ७७२ फेऱ्या प्रांताधिकाऱ्यांनी ट्रॅक केल्या आहेत. उर्वरित ३०० फेऱ्या ट्रॅक करण्यात अडचणी येत आहेत. जीपीएस न चालणे, सरकारी टँकर असणे, इंटरनेट कनेक्शन उपलब्ध न होणे यामुळे ट्रॅकिंगला अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जिओ टॅग केलेले फोटो काढावेत. ग्रामदल तयार करून या ग्रामदलातील सदस्यांकडून फोनद्वारे फेऱ्यांची, तसेच कोठे किती पाणी दिले याची माहिती घ्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत. अनेक गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, पोलिसपाटील व तरुणांचे मंडळ तयार करून त्यांच्या मदतीने विहिरींची निगराणी करावी, तसेच पाणी सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडसाठी आजपासून पाण्याचे आवर्तन

$
0
0

शुभ वार्ता

मनमाडसाठी

आजपासून आवर्तन

नाशिक : मनमाडसह येवला, लासलगाव येथील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पालखेड धरण समूहातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. रविवारी (दि. २ जून) हे आवर्तन सोडण्यात येणार असून, वहन महामार्गावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मनमाडसह आसपासच्या परिसरात पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने बसू लागल्या आहेत. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पोलिसपाटलांनीसमन्वय राखावा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसपाटील हा त्या गावचा आणि पोलिसांमधील महत्त्वाचा दुवा आहे. विविध तंटे मिटविणे आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने पोलिसपाटलांनी पोलिस दलाशी समन्वय ठेवून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले.

दिंडोरी येथील पोलिस ठाण्यात तालुक्यातील पोलिसपाटलांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी डॉ. सिंह बोलत होत्या. जिह्यातील अवैध धंद्यांना अंकुश बसावा, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. पोलिसपाटलांनी स्थानिक तंटे समोपचाराने मिटवावेत, आपसातील वादावर नियंत्रण मिळवावे, सार्वजनिक उत्सव एकोप्याने साजरे करून जातीय व धार्मिक सलोखा राखावा, कायदा व सुव्यवस्था, तसेच सामाजिक सुरक्षितता अबाधित ठेवावी, यासाठी पोलिसपाटलांनी स्थानिक तंटामुक्तीचे सहकार्य घ्यावे आणि पोलिस दलाशी नियमित समन्वय ठेवून अचूक कर्तव्य बजवावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. सिंह यांनी केले. या वेळी दिंडोरी परिसर व तालुक्यातील ३५ पोलिसपाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगविद्याधाम शिबिर

$
0
0

नाशिक : योग विद्या धामतर्फे आज (दि. २) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजरोडवरील योग विद्या धाममध्ये सकाळी ७ ते १२ या वेळेत हे शिबिर होईल. या शिबिरासाठी नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत शनिजयंती

$
0
0

नाशिक रोड : देवळाली गावात सोमवारी (दि. ३) शनिजयंती उत्सव साजरा होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराजांचे आज सायंकाळी कीर्तन होईल. सोमवारी शनैश्वर मित्र मंडळ आणि देवळाली गाव पंच कमिटी यांच्यातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. पहाटे साडेपाच वाजता त्र्यंबक बाबा भगत यांच्या हस्ते शनिमूर्ती तेलाचा अभिषेक करण्यात येईल. सकाळी नऊ वाजता शनिमहाराज प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी १२ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लालपरीने प्रवासीहित’

$
0
0

नाशिकरोड : सामान्य प्रवाशांच्या हिताची जपणूक करण्याचे ब्रीद राज्य परिवहन महामंडळाने गेल्या सात दशकांपासून प्रामाणिकपणे निभावलेले आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू असलेल्या महामंडळापुढे आर्थिक चणचण निर्माण होऊनही प्रवाशांच्या हिताला बाधा येऊ दिली नाही. म्हणूनच महामंडळाचे अस्तित्व टिकून असल्याचे गौरवोद्गार व्यापारी बँकेचे संचालक रामदास सदाफुले यांनी शनिवारी येथे काढले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नाशिकरोड बसस्थानकात आयोजित कार्यक्रमप्रसंगी सदाफुले बोलत होते. डॉ. अजित मंगुडकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगिराज गोसावी, लेखाधिकारी संजय जोशी, कुमार पगारे, वाहतूक नियंत्रक सोमनाथ जाधव, अनिल शेळके, सीताराम सोनवणे, गौतम मोरे, पी. डी. महाले यांच्यासह एसटीचे चालक, वाहक उपस्थित होते. पगारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात जुगारी, मद्यपींना चाप

$
0
0

- तीन महिन्यांत ४६३ जुगारी पोलिसांच्या ताब्यात

- ग्रामीण पोलिसांकडून जोरदार कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी हाती घेतलेल्या अवैध धंदेविरोधी मोहिमेत गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७१ लाख ७२ हजारांची बेकायदा दारू हस्तगत करण्यात आली आहे. या काळात पोलिसांनी २०२ गुन्हे दाखल करीत ४६३ जुगारींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून ३८ लाख १६ हजार ४४४ रुपये हस्तगत केले. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे ग्रामीण भागातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी संपूर्ण जिह्यात मिशन ऑल आउट, कोम्बिंग आणि धाडसत्र राबवून ही कारवाई केली आहे. जिल्ह्यास लागून असलेल्या केंद्रशासित प्रदेशातून होणारी मद्याची अवैध वाहतूक रोखण्याबरोबरच अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्याचा आदेश त्यांनी जारी केला होता. त्यानुसार मेअखेर अवैध दारू प्रकरणी ५८१ गुन्हे दाखल करीत पोलिसांनी ४२३ संशयितांना बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातील ७१ लाख ७२ हजार ६५८ रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याच काळात जिह्यातील जुगार अड्डे उद्ध्वस्त करीत पोलिसांनी जुगार कायद्यानुसार २०२ केसेस दाखल करून ४६३ जुगारींना बेड्या ठोकल्या. या कारवाईत ३८ लाख १६ हजार ४४४ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

विशेष पथकाची कामगिरी

स्थानिक पातळीवरील लागेबांधे लक्षात घेऊन अधीक्षक डॉ. सिंह यांनी विशेष पथकाची निर्मिती केली. या पथकाने विविध तालुक्यांत छापे टाकून दारूबंदीच्या नऊ केसेस दाखल करून १५ जणांना अटक केली. या संशयितांच्या ताब्यातून २० लाख १ हजार ९०४ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे, तर दहा जुगाराच्या केसेस दाखल करून ३३ जणांना पोलिसांनी अटक केली. वाळूतस्करांना चाप लावण्यासाठी विशेष पथकाने जिल्ह्यातील नदीनाले फिरून ४३ वाहने जप्त केली आहेत. संबंधितांवर कारवाईच्या दृष्टीने महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाने कारवाई केली, त्या पोलिस अधिकाऱ्याचा अहवाल मागविला गेला आहे. अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या या अधिकाऱ्यांना चौकशीस सामोरे जावे लागत आहे.

७१,७२,००० रुपयांचे अवैध मद्य जप्त

५८१ जणांवर अवैध दारूप्रकरणी गुन्हे

४२३ संशयित ताब्यात

२०२ जुगारींवर गुन्हे दाखल

४६३ जुगारी ताब्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images