Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विमानसेवा वेळापत्रक

0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नवी दिल्ली… - नाशिक

सकाळी ११.०० …- दुपारी १२.५५

नाशिक… - नवी दिल्ली

दुपारी १.२५… - दुपारी ३.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्यांसाठी बालनाट्य शिबीर

0
0

(कल्चर क्लब लोगो, क्यू आर कोड चौकट घ्यावी)

चिमुकल्यांसाठी बालनाट्य शिबिर

'मटा कल्चर क्लब'तर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभिनय आणि नाट्यशास्त्राचे धडे मिळणाऱ्या शिबिरात उद्यापासून बालगोपाळ रमणार आहेत. सुटीत चिमुकल्यांना अभिनयासह नाट्यकलेचे विविध पैलू समजावेत. शास्त्रोक्त मार्गदर्शनातून कलागुणांना वाव मिळावा. या हेतूने 'मटा कल्चर क्लब'तर्फे 'बालनाट्य शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. अभिनयाची आवड असणाऱ्यांना या शिबिरातून नाट्यकलेच्या छटा शिकता येणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्सच्या क्लचर क्लब'तर्फे ३० मे ते १३ जून या कालावधीत 'बालनाट्य शिबिर' घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत गंगापूर रोडवरील एसटी कॉलनीमधील रेषा डे केअर सेंटरमध्ये हे शिबिर होईल. अपूर्वा देशपांडे या शिबिरात चिमुकल्यांना मार्गदर्शन करणार असून नाट्यकलेच्या विविध पैलूंचे धडे देण्यात येणार आहे. चिमुकल्यांना अभियनासह नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिवाचन या सारख्या नाट्यशास्त्राशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ७ ते १५ वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात. शिबिरात सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांना १२०० रुपये तर इतरांसाठी १५०० प्रवेश शुल्क आहे. सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी १ ते ६ या वेळेत ९४२२५१३५६९ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 'महाराष्ट्र टाइम्स', दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर येऊन नोंदणी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदिती पानसे यांना फेलोशिप

0
0

नाशिकमधील एकमेव नृत्यांगना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या कीर्ती कलामंदिराच्या कथक नृत्य संस्थेच्या सहसंचालिका रेखा नाडगौडा यांची कन्या आणि ज्येष्ठ शिष्या अदिती नाडगौडा-पानसे यांना भारत सरकारची ज्युनिअर रीसर्च फेलोशिप जाहीर झाली आहे. अखिल भारतीय स्तरावर कथक नृत्य क्षेत्रात केवळ पाच जणांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यात अदिती यांचा समावेश आहे, तसेच नाशिकमध्ये कथक नृत्यासाठी ही फेलोशिप प्राप्त करणाऱ्या अदिती पहिल्याच कथक नृत्यांगना आहेत.

भारत सरकारकडून भारतीय शास्त्रीय कलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि त्यांचे श्रेष्ठत्व जपण्यासाठी नवनवीन शोधप्रबंध लिहिले जाणे आवश्यक आहे, जेणेकरून शास्त्रीय कलांचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक तत्त्वे सापडतील. त्यासाठी दरवर्षी २५ ते ४० वयोगटासाठी ज्युनिअर फेलोशिप आणि त्यानंतर सीनियर फेलोशिप दिली जाते. या संशोधनात्मक कामासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अर्ज मागविले जातात. शोधनिबंधाचा आराखडा तपासून त्याचे भविष्यकालीन परिणाम समजून घेऊन त्या आधारे या फेलोशिपसाठी निवड केली जाते. अदिती नाडगौडा-पानसे कथक नृत्य विषयामध्ये अलंकार आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. त्यांचे नृत्याचे शिक्षण ज्येष्ठ कथक नृत्यांगना रेखा नाडगौडा आणि पंडित शमा भाटे यांच्याकडे झाले आहे. त्यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित बिरजू महाराज यांसारख्या दिग्गजांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या अदिती यांनी भारत सरकारची फेलोशिप मिळवून कथक नृत्य क्षेत्रात नाशिकचे नाव अधोरेखित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांविरोधात पुन्हा कारवाई

0
0

नाशिक : रिक्षाचालकांनी नियमानुसार तीन प्रवाशांचीच वाहतूक करावी, अशी आग्रही भूमिका पोलिसांनी स्वीकारली आहे. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रिक्षा चालकांनी वाहन परवाना, बॅच, परमिट, कागदपत्रे, गणवेश आदी बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुदतबाह्य रिक्षा, शहराचे परमिट नसलेल्या अ‍ॅपेरिक्षा, बेकायदेशीर टॅक्सी चालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रवाशांनी मीटरप्रमाणे प्रवासाची मागणी केली तर रिक्षा चालकांना ती मान्य करावी लागेल. रिक्षा चालकाने त्यास विरोध केला तरी त्याच्यावर कारवाई होऊ शकणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक पोलिस ८ जूनपासून ही कारवाई सुरू करणार आहेत. याबाबतच्या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक, मालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघे ठारअपघातात कोळी यांचा

0
0

सातपूर : नाशिक जिल्हा शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत अनिल कोळी कामानिमित्ताने पुणे येथे जात होते. शासकीय वाहन असलेल्या ४०७ गाडीतून जात असताना संगमनेरजवळ कंटेनरचा कट लागल्याने अपघात घडून अनिल कोळी व जगन्नाथ संधान यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आयटीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. संधान हे नाशिकरोड भागातील रहिवासी आहेत, तर कोळी मूळचे जळगाव येथील आहे. संधान यांच्यावर नाशिकरोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोळी यांना जळगावला नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कोळी यांच्या पत्नीचे गेल्याच वर्षी निधन झालेले आहे. आयटीआय कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्याने सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बाजार समितीतआंबा महोत्सवास प्रारंभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या योजनेअंतर्गत नाशिक बाजार समितीतर्फे आंबा महोत्सवाला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये हा कार्यक्रम झाला. हा आंबा महोत्सव रविवारपर्यंत सुरू राहील.

बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती युवराज कोठुळे, राज्य पणन मंडळाचे जयेश आहेर, तालुका संघाचे संचालक सोमनाथ बेंडकुळे, संजय इंगळे, प्रभाकर माळोदे, मनोज नलावडे, आंबा उत्पादक संघाचे चंद्रकांत मोकळ आदी उपस्थित होते. बबनराव घोलप म्हणाले, की हा महोत्सव ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना फळांचे उत्पादन घेताना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. नवीन तंत्रज्ञानांमुळे शेतकरी सजग झाले आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहेत.

शिवाजी चुंभळे म्हणाले, की बाजार समितीतर्फे प्रथमच आंबा महोत्सव भरविण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून ग्राहकाना थेट आंबा विक्री करण्यात येणार असल्याने या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात भरविण्याचा मानस असल्याचे सांगितले. चंद्रकांत मोकळ यांनी यंदा आंबा उत्पादनात घट आल्याचे नमूद करीत महाराष्ट्राच्या आंब्याला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील येथील आंब्याचे अतिक्रमण वाढल्याचे सांगितले. मात्र, नाशिकला केशर आंब्याच्या उत्पादनाला वाव असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभमच्या उपचारार्थमनसेची आर्थिक मदत

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसाने डोक्यात काठी मारलेल्या देवळालीगावातील शुभम महालेची प्रकृती चिंताजनक आहे. त्याची घरची परिस्थिती हलाकीची आहे. त्याला वडील नसून, आई मोलकरणीची कामे करते. या परिवाराकडे शुभमवर उपचारासाठी पैसे नाहीत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोख अकरा हजार रुपयांची मदत देण्यात आली. हे पैसे त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी संतोष पिल्ले, साहेबराव खर्जुल, सुनील पाटोळ, गोकुळ नागरे, भाऊसाहेब ठाकरे, चंद्रभान ताजनपुरे, अमोल भोसले, चेतन माळवे, संजय हंडोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाच्या मृत्यूनंतर सुनेकडून सासू बेघर!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

\Bएखाद्यावर संकटे चुहूबाजूंनी येतात. पण आयुष्याच्या सायंकाळी सारं काही आलबेल बघण्याच्या दिवसात अशी स्थिती कुणावरही ओढावणे म्हणजे निव्वळ दुर्दैवाचे फासे. एका ७५ वर्षांच्या वृद्धेवर असाच करुण प्रसंग ओढावला आहे. तरुण मुलगा कर्करोगाच्या दुर्धर व्याधीने गमाविल्यानंतर ज्या सुनेवर उरलेल्या आयुष्याची भिस्त ठेवावी, तिनेच राहत्या घराला टाळे ठोकले अन् मयत पतीच्या जर्जर आईला अन्न-वस्त्र अन् निवाऱ्यासाठी घरघर फिरायला लावले. सुनेकडून हे घडलं तर एकवेळ घराघरातील कहाणी म्हणून आपण थोड दुर्लक्षही करू पण, दुसरा डॉक्टर मुलाकडूनही उपेक्षा झाल्याची ही करुण कहाणी आहे हिराबाई श्याम वाघ (वय ७५) यांची. कुटुंब नसल्याने बेघर होणारे अनेक असतात. पण मुलापश्चात त्याच्या कुटुंबाकडून आलेला हा वाईट अनुभव डोळ्यांच्या कडा ओलावतो आहे. \B

बेघर झालेल्या हिराबाई शाम वाघ (वय ७५, रा. मुरली अपार्टमेंट, गोसावीवाडी) या वृद्ध विधवा महिलेवर रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. कधीतरी सून येईल आणि घराचे टाळे उघडेल आणि डोक्यावर पुन्हा एकदा छप्पर मिळेल, या आशेने ती वर्षभरापासून प्रतीक्षा करीत आहे. मुरली अपार्टमेंटमध्येच वास्तव्यास असलेले संतोष श्रीवंत, वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांना ही वृद्ध आजी स्टेशन परिसरात भीक मागताना भेटली. त्यांनी तिला ओळखले आणि विचारपूस केल्यावर धक्कादायक प्रकार समजला. मुलुंड येथील बीएसएनएलमध्ये नोकरीस असलेला त्यांचा मुलगा वाल्मिक वाघ याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यावर दशक्रिया विधीच्या दिवसापासून मुरली अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घराला टाळे लावण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांची स्नुषा सारिका आणि नातू संजय यांच्याशी हिराबाई यांची भेट झालेली नाही. घराला कुलूप असल्याने हिराबाई वर्षभरापासून स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. हिराबाईंच्या मुलाचा दुसरा फ्लॅट जेलरोडला होता. तिथे सुनबाई राहत असल्याचे त्या सांगतात. परंतु, हा फ्लॅट नेमका कोठे आहे याची त्यांना माहिती नाही. त्यांचा दुसरा अविवाहित असलेला मुलगा भरत वाघ डॉक्टर असून, तो दिल्लीला राहतो. त्यानेही आईच्या दशावताराकडे दुर्लक्ष केलं आहे. परकं तर परकं पण, आपलं रक्ताकडून दुर्लक्ष झाल्याने हिराबाई मुलांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत दिवस काढत आहेत.

पैशांचीही चोरी

हिराबाईंना मुलाच्या मृत्यूनंतर अडीच लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी मुलाच्या बॅगमध्ये ठेवलेले होते. ही बॅग त्यांच्यासोबतच होती. दिवाळीच्या वेळी स्टेशनवरून ही बॅग चोरट्यांनी लांबवल्याने त्या निर्धन झाल्या. या बॅगेत मुलाचे घड्याळ आणि सोन्याची एक पोतही होती, असे त्या सांगतात.

सुनेच्या भेटीसाठी तळमळ

सुनेच्या भेटीसाठी वृद्ध हिराबाई तळमळत आहेत. हिराबाईंनी आपली कैफियत नाशिकरोड पोलिसांकडेही मांडली. पोलिसांनी मुरली अपार्टमेंन्टमध्ये त्यांना नेल्यावर घराला कुलुप आढळून आले. पोलिसांनी कुलूप तोडण्यास नकार दिल्याने हिराबाईंची होती नव्हती ती आशा धुळीला मिळाली. रेल्वे स्टेशनवरील पोलिस त्यांना दररोज हाकलून देतात. सुनेला शोधण्यासाठी हिराबाईंनी जेलरोडला जावून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही. पोलिसांनीही केवळ फोनवर संपर्क साधण्यापलीकडे मदत केली नाही.

मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्यापासुन सूनबाई नातवंडांना घेऊन घराला कुलूप लावून निघून गेली. भरत नावाचा लहान मुलगाही दिल्लीला राहतो. पैशांत लोळत होते आता वर्षभरापासून भीक मागून खाते. सून आणि नातवंडांची वाट बघते आहे."

-हिराबाई वाघ

पीडित महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चर्चेतील बातमी

0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी

यश वाघाचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश या १२ वर्षीय वाघाचा मृत्यू झाला. रॉयल बंगाल टायगर म्हणून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या या वाघाला अत्यंत दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर झाला होता.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नात्यात गुरफटलेल्या आजीबाई बेघर!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एखाद्यावर संकटे चुहूबाजूंनी येतात. पण आयुष्याच्या सायंकाळी सारं काही आलबेल बघण्याच्या दिवसात अशी स्थिती कुणावरही ओढावणे म्हणजे निव्वळ दुर्दैवाचे फासे. एका ७५ वर्षांच्या वृद्धेवर असाच करुण प्रसंग ओढावला आहे. तरुण मुलगा कर्करोगाच्या दुर्धर व्याधीने गमाविल्यानंतर ज्या सुनेवर उरलेल्या आयुष्याची भिस्त ठेवावी, तिनेच राहत्या घराला टाळे ठोकले अन् मयत पतीच्या जर्जर आईला अन्न-वस्त्र अन् निवाऱ्यासाठी घरघर फिरायला लावले. सुनेकडून हे घडलं तर एकवेळ घराघरातील कहाणी म्हणून आपण थोड दुर्लक्षही करू पण, दुसरा डॉक्टर मुलाकडूनही उपेक्षा झाल्याची ही करुण कहाणी आहे हिराबाई श्याम वाघ (वय ७५) यांची. कुटुंब नसल्याने बेघर होणारे अनेक असतात. पण मुलापश्चात त्याच्या कुटुंबाकडून आलेला हा वाईट अनुभव डोळ्यांच्या कडा ओलावतो आहे.

बेघर झालेल्या हिराबाई शाम वाघ (वय ७५, रा. मुरली अपार्टमेंट, गोसावीवाडी) या वृद्ध विधवा महिलेवर रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. कधीतरी सून येईल आणि घराचे टाळे उघडेल आणि डोक्यावर पुन्हा एकदा छप्पर मिळेल, या आशेने ती वर्षभरापासून प्रतीक्षा करीत आहे. मुरली अपार्टमेंटमध्येच वास्तव्यास असलेले संतोष श्रीवंत, वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांना ही वृद्ध आजी स्टेशन परिसरात भीक मागताना भेटली. त्यांनी तिला ओळखले आणि विचारपूस केल्यावर धक्कादायक प्रकार समजला. मुलुंड येथील बीएसएनएलमध्ये नोकरीस असलेला त्यांचा मुलगा वाल्मिक वाघ याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यावर दशक्रिया विधीच्या दिवसापासून मुरली अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घराला टाळे लावण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांची स्नुषा सारिका आणि नातू संजय यांच्याशी हिराबाई यांची भेट झालेली नाही. घराला कुलूप असल्याने हिराबाई वर्षभरापासून स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. हिराबाईंच्या मुलाचा दुसरा फ्लॅट जेलरोडला होता. तिथे सुनबाई राहत असल्याचे त्या सांगतात. परंतु, हा फ्लॅट नेमका कोठे आहे याची त्यांना माहिती नाही. त्यांचा दुसरा अविवाहित असलेला मुलगा भरत वाघ डॉक्टर असून, तो दिल्लीला राहतो. त्यानेही आईच्या दशावताराकडे दुर्लक्ष केलं आहे. परकं तर परकं पण, आपलं रक्ताकडून दुर्लक्ष झाल्याने हिराबाई मुलांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत दिवस काढत आहेत.

पैशांचीही चोरी

हिराबाईंना मुलाच्या मृत्यूनंतर अडीच लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी मुलाच्या बॅगमध्ये ठेवलेले होते. ही बॅग त्यांच्यासोबतच होती. दिवाळीच्या वेळी स्टेशनवरून ही बॅग चोरट्यांनी लांबवल्याने त्या निर्धन झाल्या. या बॅगेत मुलाचे घड्याळ आणि सोन्याची एक पोतही होती, असे त्या सांगतात.

सुनेच्या भेटीसाठी तळमळ

सुनेच्या भेटीसाठी वृद्ध हिराबाई तळमळत आहेत. हिराबाईंनी आपली कैफियत नाशिकरोड पोलिसांकडेही मांडली. पोलिसांनी मुरली अपार्टमेंन्टमध्ये त्यांना नेल्यावर घराला कुलुप आढळून आले. पोलिसांनी कुलूप तोडण्यास नकार दिल्याने हिराबाईंची होती नव्हती ती आशा धुळीला मिळाली. रेल्वे स्टेशनवरील पोलिस त्यांना दररोज हाकलून देतात. सुनेला शोधण्यासाठी हिराबाईंनी जेलरोडला जावून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही. पोलिसांनीही केवळ फोनवर संपर्क साधण्यापलीकडे मदत केली नाही.

मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्यापासुन सूनबाई नातवंडांना घेऊन घराला कुलूप लावून निघून गेली. भरत नावाचा लहान मुलगाही दिल्लीला राहतो. पैशांत लोळत होते आता वर्षभरापासून भीक मागून खाते. सून आणि नातवंडांची वाट बघते आहे."

-हिराबाई वाघ

पीडित महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिसाची आत्महत्या

0
0

नाशिक : ग्रामीण पोलीस दलातून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धात्रकफाटा परिसरात ही घटना घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पंढरीनाथ हरिभाऊ सोनवणे (वय ६० रा.धात्रकफाटा) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले होते. पेठरोडवरील बांबूज हॉटेल समोरील मोकळ्या मैदानावर गुलमोहराच्या झाडाला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. बुधवारी (दि. २९) पहाटे म्हसरूळ पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंगचा कायदा सुधारणार; सरकारकडून समिती स्थापन

0
0

नाशिक :

मुंबईच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने रॅगिंगविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. आजवर केवळ विद्यापीठ अनुदान आयोग आणि समतूल्य संस्थांच्या निर्देशांवर चालविले जाणारे रॅगिंग विरोधाचे कार्य आणखी गतिमान करण्यासाठी विद्यमान कायद्यातील कच्चे दुवे शोधून आता सरकार त्या ठिकाणी दुरुस्ती करणार आहे. त्यादृष्टीने युध्दपातळीवर बैठकांनाही सुरुवात झाली आहे.

मुंबईतील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर रॅगिंगचा विषय राज्यभरात चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या मर्यादा तपासून त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांसोबतच राज्य सरकारनेही चाचपणी सुरू केली आहे. यासाठी शासनाने तातडीने समितीचे गठण केले असून, राज्यातील शैक्षणिक संस्थांना अशा प्रकारांबाबत दक्ष राहाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

आरोग्य विद्यापीठाचीही पावले

मुंबईतील या घटनेची चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. नायर रुग्णालयातील अँटी रॅगिंग समितीही चौकशी करीत आहे. रॅगिंगची घटना संबंधित कॉलेजात घडल्यानंतर याबाबतचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर केला जातो. विद्यापीठातील रॅगिंग प्रतिबंधक समिती या अहवालाची पडताळणी करून संबंधित घटकांची बैठक बोलाविते. बैठकीत सादर होणाऱ्या मुद्द्यांचा कायद्याच्या दृष्टीने विचार करून अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेतला जातो. नायर रुग्णालयातील घटनेसंदर्भात अद्याप प्रक्रिया सुरू असल्याने लवकरच याप्रकरणी विद्यापीठाच्या कारवाईबाबत माहिती दिली जाईल, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांनी दिली. आजवर विद्यापीठ अनुदान आयोग आणि एमसीआय यांच्या निर्देशांनुसार अँटी रॅगिंग कमिटी कार्यरत असते. या कायद्यात आता राज्य शासनानेही आणखी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने सरकारनेही समिती गठीत केली आहे. विद्यमान कायद्यातील त्रुटी किंवा मर्यादा दूर सारून विद्यार्थ्यांना संरक्षण देता येईल, अशा स्वरूपाचा सुधारीत कायदा तयार करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विद्यापीठाकडून रॅगिंग प्रतिबंधासाठी दरवर्षी जागरूकता केली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही याबाबत मोहीम राबविली जाईल. यासोबतच नायर रुग्णालयातील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रॅगिंग प्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील , असेही चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः रोइंगपटू दत्तू भोकनळला अखेर जामीन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपण लग्न केल्याचे आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याने बुधवारी न्यायालयासमोर मान्य केले. न्यायालयाने भोकनळला बुधवारी जामीन मंजूर केला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात भोकनळला अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने त्याला अटी व शर्तीला अधीन राहून १५ हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता रोइंगपटू भोकनळने फसवणूक केल्याची फिर्याद ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी आशा दत्तू भोकनळ (वय २६, मूळ, रा. रेडगाव, ता. चांदवड)यांनी आडगाव पोलिस स्टेशनला दिली होती. तळेगाव रोही येथील दत्तू यांच्याशी रेडगाव येथे २०१५ मध्ये एका कार्यक्रमात ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले. दोघांनी आळंदीत वैदिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची आशा यांची फिर्याद होती. आळंदीतील जय अंबे मंगल कार्यालयात २२ डिसेंबर २०१७ रोजी आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा दावाही आशा यांनी केला होता. भोकनळने सर्वांसमक्ष लग्न करण्याचे मान्य करूनही विवाहस्थळी दाखल न होता दोन वेळा फसवणूक केल्याचे आशा यांनी फिर्यादीत म्हटले होते. भोकनळ यांच्या वकिलांकडून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्यात आला. २५ मे रोजी भोकनळला न्यायालयाने पाच दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. भोकनळ आणि आशा यांच्या वकिलांनी सुरुवातीला जामिनासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणी तडजोड करण्यासाठी काही तासांचा अवधी दिला. अखेर सायंकाळी सहा वाजता न्यायालयाने भोकनळ यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. फिर्यादीवर दबाव टाकू नये, आठवड्यातून एकदा पोलिस स्टेशनला हजेरी लावणे यांसारख्या अटी व शर्तींचे पालन करण्याची हमी त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. भोकनळने फिर्यादी महिलेसमवेत लग्न केल्याचे मान्य केले असून, त्याला जामीन मंजूर झाला आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाची नियमित कार्यवाही होईल, अशी माहिती आशा यांच्या वकील अर्चना शर्मा यांनी दिली. भोकनळच्या वकिलांशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील अध्यक्षपदी

0
0

नाशिक : महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी देवयानी दिनेशसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे महाराणा प्रतापसिंह यांची ४७९ वी जयंती गुरुवार (६ जून) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या उत्सवासाठी समिती नेमण्यात आली आहे. उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी सरला पाटील, भुलावसिंह ठाकूर, सचिवपदी प्रसाद बावरी, खजिनदार नरेंद्र पाटील, जयदीप पवार यांची नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमांगी पाटील निवडणूक निर्णय अधिकारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० 'ड' या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची शिफारस करण्यात आली होती. परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांची नियुक्ती रद्द झाल्याने पाटील यांच्याकडे भार देण्यात आला आहे. यासंदर्भातील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे पत्र नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण यांना प्राप्त झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. आज (दि. ३०) निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरकतींची पडताळणी

0
0

- धार्मिक स्थळे नियमितीकरणासाठी शासनाला स्मरणपत्र

- वाढत्या दबावानंतर मनपा प्रशासनाची कार्यवाही

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ६४७ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत प्राप्त १८४ हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, विश्वस्तांनी सादर केलेल्या पुराव्यांची आता नगररचना विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि लोकप्रतिनिधींचा वाढता दबाव, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या आशंकेमुळे अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनही अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. कॉलनीअंतर्गत मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भातील महापालिकेच्या प्रलंबित प्रस्तावासाठी महापालिकेने राज्य शासनाला स्मरणपत्र पाठवले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करीत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळांबाबातची सुनावणी पूर्ण केली आहे. प्राप्त १८४ हरकतींवर २१ ते २८ मे दरम्यान सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान हरकतदार धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी बाजू मांडताना पालिकेच्या प्रस्तावित कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे. पालिकेने कारवाई सुरू केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही काही धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी महापालिकेला दिला आहे. या सुनावणीदरम्यान हरकतदार धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी धार्मिक स्थळ पुरातन व धार्मिक मान्यता लाभलेले असल्याचे पुरावे सादर केले आहेत. या पुराव्यांची पडताळणी आता नगररचना विभागामार्फत केली जाणार आहे. त्यासंदर्भात पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगररचना सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना दिले आहेत.

....

शासनाकडे चेंडू टोलवला

उच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे पालिकेला ही कारवाई पूर्ण करावीच लागणार आहे. कॉलनीअंतर्गत महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार निर्धारित मर्यादेपर्यंत कलम ३७ (१) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम असल्यास कारवाईपासून वाचू शकणार आहेत. दोन वर्षापूर्वी महासभेने ठराव करून कायद्यातील कलम ३७(१)च्या कारवाईसाठी शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढता दबाव आणि कायदा व सुव्यवस्थेचा उद्भवणारा प्रश्न विचारात घेता महापालिका प्रशासनाने शासनाच्या नगरविकास विभागाला स्मरणपत्र पाठविले असून, अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भातील महापालिकेच्या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घेण्यासंदर्भात याचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांचे पाण्यावाचून हाल

0
0

वॉटर व्हेंडिंगची तिन्ही मशिन बंद; ठेकेदारावर कारवाईच नाही

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील शुद्ध आरओ पाणी देणारे तिन्ही वॉटर व्हेंडिंग मशिन ठेकेदाराकडून व्यवस्थित सुरू केले जात नसल्याने प्रवाशांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत. उन्हाळा संपत आला तरी तिन्ही मशिन बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारावर कारवाई करावी, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशा मागण्या प्रवाशांनी केल्या आहेत.

नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये हे मशिन आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात मिळते. फंटूस कंपनीने ही मशिन बसविली आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून रोज सोळा हजारांवर नागरिक प्रवास करतात. त्यांच्यासाठी शुद्ध पाणी देणारे तीन वॉटर व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले आहेत. ठेकेदाराकडून ती सुरुवातीपासून नीट चालवली गेली नाहीत. येथे सहा वॉटर व्हेंडिंग मशिनना मान्यता असताना प्रत्यक्षात तीनच मशिन मिळाली. तीही आता बंद आहेत. टवाळखोरांनी मशिनची दुरवस्था केल्याने एका मशिनमध्ये कॉइन टाकून पाणी घेण्याची सुविधाच बंद होती. प्लॅटफॉर्म एकवरील मशिन दुरुस्तीच्या नावाने नेले. ते अनेक दिवसांनी आले. नाशिकरोड स्थानकात प्लॅटफॉर्म एकवर एक, तर दोनवर दोनवर वॉटर व्हेंडिंग मशिन होती. अत्यंत कमी दरात स्वच्छ पाणी देणारी ही मशिन ठेकेदाराला चालविण्यासाठी दिली आहे. मध्यंतरी मशिनची प्रत्येकी चार ते पाच हजारांची वीजबिले होती. ठेकेदाराने ती तीन-चार महिन्यांपासून भरली नव्हती. प्रशासनाने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ठेकेदाराने बिल भरले व मशिन पुन्हा सुरू झाली. गेल्या चार महिन्यांपासून ती पुन्हा बंद आहे. बंद पडलेली मशिन व्हेंडरच्या पथ्यावर पडले असून, वीस रुपयांना पाण्याची बाटली प्रवाशांना विकत घ्यावी लागत आहे. मशिन मात्र स्वस्तात शुद्ध पाणी देतात. तीनशे मिलिलिटर आरओ पाणी स्वतःची बाटली असेल तर एक रुपयाला, तर बाटलीसह पाणी दोन रुपयांना आहे. पाचशे मिलिलिटर पाणी तीन व पाच रुपयांना आहे.

कारवाईच नाही

ही सेवा पुरविण्यात तोटा होत असल्याने ठेकेदाराने मशिन बंद ठेवली आहेत. याबाबत प्रशासनाने भुसावळ मुख्यालयाला पत्र पाठवले आहे; परंतु अद्याप कारवाईच झालेली नाही. वॉटर व्हेंडिंग मशिन चोवीस तास सुरू ठेवण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही. रेल्वेने या मशिनसाठी जी जागा दिली, ती स्थानकाच्या दोन टोकांना आहे. पाणी भरून घेईपर्यंत गाडी सुटते. त्यामुळे प्रवाशांना मशिनचा लाभ होत नाही. अनेक प्रवाशांना अशी सुविधा असल्याची माहितीच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपावा वारसा

0
0

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेल्या नाशिक नगरीतील प्राचीन मंदिरांकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होत आहे. गोदाघाटावरील गाडगे महाराज पुलाजवळील हे छोटेसे मंदिर त्याचेच उदाहरण. या परिसरात कचरा आणि घाणीचे ढीग सदैव पडलेले असतात. मंदिर परिसराची स्वच्छता करून हा वारसा जपण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः इंडिगो बोईंगची नाइट लँडिंग चाचणी यशस्वी

0
0

नाशिक :

ओझर विमानतळावरील नाईट लँडिंगच्या सुविधेची चाचणी घेण्यात आली आहे. इंडिगो कंपनीच्या बोईंग विमानाने दिवसा आणि रात्री उड्डाणे केली आहेत. ती यशस्वी ठरली आहेत. त्यामुळे कंपनीची सेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ओझर विमानतळावरून सध्या अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची विमानसेवा सध्या सुरू आहे. या दोन्ही सेवा दिवसा दिल्या जात आहेत. आता ही सेवा रात्रीही मिळू शकते.


रात्रीच्या सुमारास सेवा सुरू होण्यासाठी नाईट लँडिंगच्या सुविधेची गरज आहे. काही दिवसांपूर्वी हवाई वाहतूक संचालनालयाच्या पथकाने ओझर विमानतळावर पाहणी केली होती. त्यानंतर विविध उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. या विमानतळाची मालकी हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)कडे आहे. एचएएलने सर्व सुविधांची पूर्तता केली आहे. मात्र, याची चाचणी घेणे आवश्यक असल्याने इंडिगो कंपनीला तशी विनंती करण्यात आली. त्यानुसार इंडिगो कंपनीचे एअरबस प्रकारातील विमान काही दिवसांपूर्वी ओझरला आले. दिवसा आणि रात्री अशा दोन सत्रात लँडिंग व टेकऑफची चाचणी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे नाईट लँडिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीला उन्हाळी सत्रातील स्लॉट उपलब्ध झाला आहे. त्यानुसार गेल्या १० मेपासूनच कंपनीने सेवा सुरू करणे अपेक्षित होते. आता तर त्यांच्या कंपनीच्या एअरबस विमानाने चाचणीही यशस्वी केली आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीची सेवा सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप कंपनीकडूनही सेवा सुरू करण्याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. एचएएलच्या वतीनेही कंपनीकडे विचारणा झाली आहे. त्यास अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे इंडिगो आणि स्पाईसजेट यांच्या सेवा नक्की कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितताच आहे.

स्पाईस जेटच्या सुविधेकडे लक्ष

स्पाईस जेट कंपनीच्या वतीने नाशिकहून गोवा सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेसाठी नाईट लँडिंगची आवश्यकता कंपनीने व्यक्त केली होती. आता त्याची पूर्तता झाल्याने स्पाईसजेट कंपनीची सेवा केव्हा सुरू होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोबोट अँजिओप्लास्टी तंत्रज्ञानात नाशिकची भरारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-पुणे येथेही उपलब्ध नसलेली हृदयरोगावरील अत्याधुनिक उपचारप्रणाली नाशिकमध्ये मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाली आहे. रोबोटच्या साह्याने अँजिओप्लास्टी शक्य झाली असून, ही सुविधा जगभरात अवघ्या दहा देशांमध्ये वापरली जाते. या यादीत आता मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचा समावेश झाला असल्याची माहिती मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. चोपडा यांनी सांगितले, की आधुनिक उपचारपद्धती ही अत्यावश्यकता असून, त्या दृष्टीने आरोग्यसेवा मजबूत होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने गेल्या दहा वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आता अँजिओप्लास्टीसाठी थेट रोबोटच वापरण्यात येणार आहे. हा रोबोट कोरिंडस नामक विदेशी कंपनीचा असून, तो जगातील दहावा, ईस्ट आशिया व युरोप खंडातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिला रोबोट ठरला आहे. ही आधुनिक सुविधा जगभरातील अवघ्या १० शहरांमध्ये उपलब्ध असून, त्यात नाशिकचा समावेश असल्याचे डॉ. चोपडा यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतसुद्धा ही यंत्रणा उपलब्ध नाही. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण डॉ. चोपडा यांनी जर्मनीत घेतले असून, अत्यंत गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीने १०० टक्के यशस्वी होतात. आतापर्यंत आपल्याकडे ५० शस्त्रक्रिया केल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोबोने उघडली नस

एका रुग्णाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत बंद पडलेली नस रोबोटच्या मदतीने उघडण्यात आली. यात ६० एमएम लांबीचा स्टेंट बसविण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोबोटद्ववारे स्टेंट बसविण्याची ही घटना हा एक जागतिक विक्रमच असल्याचे डॉ. मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रोबोटिक प्रणालीत पूर्वी लागणाऱ्या ऑपरेशन खर्चापेक्षा थोडा खर्च वाढणार आहे. मात्र, त्यामध्ये खूप फरक पडणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images