Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाट्यातून उलगडला सावरकरांचा जीवनप्रवास

0
0

(फोटो - पंकज चांडोले)

\Bनाट्यातून उलगडला सावरकरांचा जीवनप्रवास

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातृभूमीला दास्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी, स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, क्रांतिकारकांना जन्म देणारे सावरकर, हुतात्म्यांच्या रक्ताचा सूड घेण्याचा निर्धार केलेले तसेच जन्मठेप भोगण्यासाठी गेलेले सावरकर अन् अंदमानच्या सेल्युलर जेलमधून झालेली सुटका, अशा विनायक दामोदर सावरकर ते स्वातंत्र्यवीर सावरकर हा धगधगत्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास नाट्यानुभवातून मांडण्यात आला.

नाशिक शहर निवृत्त बँक कर्मचारी मंचाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त 'मी विनायक दामोदर सावरकर' या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. प. सा. नाट्यगृहात मंगळवारी सायंकाळी हे नाटक पार पडले. सुप्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते योगेश सोमण यांनी हे नाटक सादर केले. सावरकरांचे बालपण, अभिनव भारतची स्थापना, १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम, अंदमानमधील काळ्या पाण्याची शिक्षा, मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून घेतलेली धाडसी उडी अशा सावरकरांच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांना सोमण यांनी रंगमंचावर जिवंत केले. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटाने सोमण यांच्या अभिनयाला दाद दिली. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. नरेंद्र ताटके यांनी प्रास्ताविक केले. अनिल खांडकेकर यांनी योगेश सोमण यांचा परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व शतपैलूः डॉ. गिरीश पिंपळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव उच्चारले की त्यांची काही मोजकी रुपे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. अंदमानाच्या तुरुंगात भयानक छळ सोसणारा देशभक्त, समुद्रात उडी घेऊन सुटकेचा प्रयत्न करणारा साहसी वीर, सुंदर देशभक्तीपर गीते लिहणारा कवी किंवा एक हिंदुत्ववादी नेता अशी ती रुपे असतात. पण त्यांचे व्यक्तिमत्त्व या पलीकडे जाणारे होते. त्यांचे वर्णन शतपैलू या एकाच शब्दात करता येईल, असे प्रतिपादन डॉ. गिरीश पिंपळे यांनी केले.

म्हसरुळ येथील गुलमोहर नगरमध्ये सुरू असलेल्या ओम गुरुदेव हास्य सरिता वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि. २८) रोजी शतपैलू सावरकर या विषयावर ते बोलत होते. पिंपळे यांनी सावरकरांची समाजसुधारक, वक्ते, द्रष्टनेते, भाषाशुद्धीचे प्रसारक, निबंधकार, इतिहासकार, नाटककार, राजकीय नेते अशी विविध रुपे उलडून दाखविली. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी मांडलेले अत्यंत पुरोगामी विचारही पिंपळे यांनी सांगितले. सावरकरांनी स्वतः लिहिलेल्या तसेच त्यांच्याशी संबंधित अशा साहित्यचीही सविस्तर माहिती व्याख्यानातून देण्यात आली. सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती व त्यांचे 'अनादी मी हे गीत' यावेळी ऐकविण्यात आले. सावरकरांच्या एका भाषणाची ध्वनीफितही व्याख्यानात ऐकविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः 'त्या' प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरीत मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाच्या हॉटेलची केलेली तोडफोड तसेच मारहाण प्रकरणी इगतपुरी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात कोणताही आक्षेपार्ह पुरावा सादर न झाल्याने ठाकरे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याची माहिती मनसेचे नेता तथा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांनी दिली.

रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या कारणावरून मनसेने २००८ मध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील मुंबई आग्रा-महामार्गावर असलेल्या एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. याबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची इगतपुरी न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील सहा संशयितांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आलेली असली तरी पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचे नाव इगतपुरी खटल्यात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून १८ डिसेंबर २०१८ ला राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. अॅड. सयाजी नागरे, अॅड. सुशील गायकर, अॅड. शिरोडकर, डी. बी. खातळे यांनी इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांचे वकीलपत्र घेऊन जामीन देण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक मिलन नव्हे, ‘मेरी सुनो’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांना बँकिंगसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे ग्राहक मिलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यापेक्षा बँकेच्या सुविधांच्या माहितीचा वर्षाव करण्यात आला.

बँकेच्या सुविधांचा फायदा कसा होतो, हे कौतुक करण्यातच अधिकारी रमल्याचे दिसून आले. त्यामुळे हा ग्राहक मिलन नव्हे, तर 'मेरी सुनो' असा कार्यक्रम असल्याची चर्चा खातेधारकांमध्ये रंगली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग सेवेबाबत ग्राहकांचे दृष्टिकोन, अनुभव, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी मंगळवारी देशभरातील ५२५ ठिकाणी 'ग्राहक मिलन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिकमध्ये गंगापूररोडवरील विद्याविकास सर्कलजवळील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला. दुपारी ४.३० वाजता कार्यक्रम होईल, असे खातेधारकांना कळविण्यात आले होते. पण, वेळेवर कार्यक्रम ६ वाजता सुरू होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी ७ वाजता कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे खातेधारक जाम वैतागले होते.

कार्यक्रम सुरू झाल्यावरही बँकेचे वरिष्ठ अधिकारी बँकेच्या सुविधांचीच माहिती ग्राहकांना देत होते. डिजिटल बँकिंगसह बँकेच्या नव्या योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येत होती. बराच वेळ बँकेच्या बाजूनेच कार्यक्रम सुरू होता. त्यातच हा कार्यक्रम इंग्रजीत सुरू असल्याने असंख्य ग्राहकांना फारसे समजत नव्हते. बँकेच्या योजनांच्या आणि सेवेच्या कौतुकाचा वर्षाव ग्राहकांवर होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्राहकांना त्यांची मते, सूचना किंवा तक्रारी मांडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

--

ग्राहक नव्हे, स्टाफ!

बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यातच आली नाही. त्यामुळे बोटांवर मोजण्याइतकेच ग्राहक कार्यक्रमात उपस्थित होते. हॉलमध्ये ग्राहकांची संख्या अधिक वाटावी म्हणून बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते. कार्यक्रम सुरू झाला तेव्हा हॉलमध्ये ग्राहक नव्हे, तर स्टाफची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपाचे नाशिकरोड व गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे पाणीपुरवठा करणारी गुरुत्व वाहिनीवरील मेन इनकमिंग व्हॉल्व गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राचे आवारात नादुरुस्त झाला आहे. यामुळे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद झाला असून, हा व्हॉल्व तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा उद्या, ३० मे रोजी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागातील सर्व प्रभाग व नाशिक पूर्वमधील प्र. क्र. १६ व २३ मधील संपूर्ण परिसराचा ३० मे रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच ३१ मे रोजी या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जंक फूड’विरोधात विद्यार्थीप्रबोधन!

0
0

\Bशुभवार्ता

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खाजगी इंग्रजी शाळांमध्ये कॅण्टीनद्वारे जंक फूड विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने त्यांच्यात लठ्ठपणा बळावत आहे. यावर निर्बंध आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक, सुरक्षित व स्वच्छ अन्नपदार्थाविषयी प्रबोधन केले जाणार आहे. जिल्ह्यातील ४ हजार ९०० शाळांमध्ये ही मोहीम येत्या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, मुख्यत: खाजगी इंग्रजी शाळांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली असून, याबाबतचे पत्र शाळा, कॉलेजांमध्ये दिले जात आहे, अशी माहिती विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी दिली.

लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा हे दिवसेंदिवस आव्हान बनत चालले असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ४४ टक्के मधुमेही व २३ टक्के ह्रदयरोगी लठ्ठ असतात. त्यामुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यताही अधिक असते. शाळा, कॉलेजांमध्ये कॅण्टीनमधून चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स असे जंक फूडचे पदार्थ उपलब्ध करुन दिले जात आहेत. हे पदार्थ विद्यार्थी आवडीने खात असले तरी त्यांच्या पोषण गरजा त्यातून भागविल्या जात नाहीत. एका सर्वेक्षणानुसार दिल्लीच्या शाळांमधील मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण २००२मध्ये १६ टक्के होते तर २००६ मध्ये ते २४ टक्क्यांनी वाढले. ही परिस्थिती रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग शाळांना भेटी देणार असून, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सकस आहारच विद्यार्थ्यांना देण्याविषयी प्रबोधन करणार येणार आहे. कुपोषण हटविण्यासाठीदेखील या मोहीमेतून प्रयत्न केला जाणार आहे.

शाळा व कॉलेजांमध्ये हेल्थ टीम\B

\Bजिल्ह्यातील ४ हजार ९०० शाळा व कॉलेजांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून, शाळा व कॉलेजांमध्ये हेल्थ टीम तयार केल्या जाणार आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदार्थांमध्ये बदल केला जाणार असून, त्याबाबत शाळांना वेळोवेळी अहवाल प्रशासनाला द्यावा लागणार आहे. जे विद्यार्थी घरुन डबा आणतात, त्यातील पदार्थ मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नसल्यास हेल्थ टीमने पालक व विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना पोषक आहारच आणण्यासाठी सांगितले जाणार आहे. या प्रबोधनासाठी सामाजिक संस्थांची मदत विभागाकडून घेण्यात येणार आहे. तसेच शाळा कॅण्टीन, शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटी घेतल्या जाणार आहेत.

\Bशाळा, कॉलेजांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

\B

- चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट देऊ नये. असे अन्नपदार्थ शाळा, कॉलेजपासून किमान ५० मीटरच्या परिघात उपलब्ध व्हावयास नको.\B

- \Bपौष्टिक अन्नपदार्थ उपलब्धतेसाठी कॅन्टीन पॉलिसी विकसित व्हावी.

- शाळा, कॉलेज परिसरात जंक फूडची जाहिरात करण्यास प्रतिबंध असावा.\B

\B- अन्नपदार्थ तयार करण्याची जागा ही नाली, कचराकुंडी, टॉयलेटपासून दूर असावी, अन्नसुरक्षेला बाधा होईल अशाठिकाणी नसावी.

- कॅन्टीनची इमारत पक्क्या बांधकामाची असावी. जेणे करुन नियमित देखभाल करता येईल.

- कच्चे अन्नपदार्थ वापण्यापूर्वी ते तपासून घ्यावे. अशा पदार्थांची खरेदी परवानाधारक व्यापाऱ्यांकडून करावी.

- भांडी व इतर उपकरणे गंजरोधक धातूपासून बनविलेली असावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव तेथे मानसोपचार

0
0

नाशिक : शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच शारीरिक आजारासोबत मानसिक आजारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज निर्माण झाले असून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन गाव तेथे मानसोपचार-राज्यव्यापी मनस्वास्थ जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याला १ जूनपासून सुरुवात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीपी स्कीम’चा मार्ग खडतर

0
0

प्रशासनाचे दोन प्रस्ताव; अभ्यासाला कालावधी न दिल्याने शेतकऱ्यांचा योजनेला नकार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानातील हरित क्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात प्रस्तावित नगररचना परियोजनेच्या (टीपी स्कीम) अडचणीत आणखीनच भर पडली आहे. टीपी स्कीमच्या सर्वेक्षणानंतर मंगळवारी शेतकऱ्यांसमोर कंपनीच्या वतीने सादरीकरण करण्यात येऊन जागा विकासाचे ५०:५० आणि ५५:४५ असे दोन प्रस्ताव सादर करण्यात आले. या प्रस्तावांना विचार करण्यासाठी महिनाभराचा कालावधी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुदत न देताच बैठक आटोपती घेतली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुदत देत नसाल, तर आमचा नकार समजा अशी जाहीर भूमिका घेतल्याने टीपी स्कीम संकटात सापडली आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकर क्षेत्रांत स्मार्ट नगररचना परियोजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी जागामालक शेतकऱ्यांची कशीबशी मनधरणी करून स्मार्ट कंपनीमार्फत जागेचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. जागामालकांना अधिकाधिक मोबदला मिळावा, यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मध्यस्थी करीत दोन प्रस्ताव तयार केले असताना, त्यापूर्वीच महासभेत कंपनीच्या वतीने इरादा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी या टीपी स्कीमच्या प्रस्तावाचे शेतकऱ्यांपुढे महाकवी कालिदास कलामंदिरात सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक व आयुक्त राधाकृष्ण गमे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, नगररचनाकार कांचन बोधले, अहमदाबादच्या शर्ली बालानी, अमित पडजोशी यांच्यासह सुमारे दीडशे शेतकरी उपस्थित होते. स्मार्ट सिटी प्राधिकरणाने शेतकऱ्यांसमोर पूर्वी तीन प्रस्तावांचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार तीनही प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. परंतु त्यातील ६०:४० प्रस्ताव प्राधिकरणानेचं परवडतं नसल्याचे कारण देत नाकारला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ५५-४५ आणि ५०-५० चे दोन प्रस्ताव ठेवले. या दोन्ही प्रस्तावांचे अवलोकन केल्यानंतर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. सुरेश पाटील यांनी पुण्याच्या धर्तीवर प्रकल्प शहरापासून दूर नेण्याची मागणी करताना जागामालकांनी स्वत: जमीन विकसित केल्यास आर्थिक फायदा कसा पदरात पडतो याचा हिशेब स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार समर्थन केले. शेतकऱ्यांना प्रस्तावित नेट जागा मिळण्याची मागणी केली. दावे न्यायप्रविष्ट असल्यास काय, याचे उत्तर देताना सात बारा उताऱ्यावर ज्याचे नाव असेल त्याच्या नावे फायनल प्लॉट मिळतील, मात्र प्रक्रिया थांबणार नसल्याचे सांगण्यात आले. फायलन प्लॉट हातात येणार नाही तोपर्यंत शेती करता येईल. तसेच जमीन बळजबरीने घेतली जाणार नसल्याचे आश्‍वासन यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.

बैठकीचा समारोप करीत असताना शेतकऱ्यांनी अभ्यास करण्यासाठी महिनाभराची मुदत मागितली. मात्र अधिकाऱ्यांनी त्यावर कुठलेचं भाष्य न करता सभागृहातून काढता पाय घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुदत मिळतं नसेल तर थेट नकार समजावा, अशी थेट भूमिका घेत आव्हान दिले. त्यामुळे स्मार्ट परियोजना आता संकटात सापडली असून, आजच्या महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

...

५५:४५ चा प्रस्ताव

कंपनीने शेतकऱ्यांसमोर सादर केलेल्या दोन प्रस्तावांपैकी ५५-४५ या जागावाटपाच्या सूत्राला प्राधान्य दिले आहे. ५५:४५ प्रस्तावात ५५ टक्के क्षेत्र जमीनमालकास परत मिळते, तर उर्वरित ४५ टक्के क्षेत्र हे रस्ते, सेवासुविधा, आर्थिक मागास घटक, खुली जमीन, प्राधिकरणासाठी भूखंड आदीसाठी वापरता येते. या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात सर्व झोनसाठी २.५ एफएसआय प्रीमियमसह वापरता येतो. आर्थिक मागास घटकासाठी जमीन ठेवणे बंधनकारक नाही, तसेच बेटरमेंट चार्जेस लागू राहणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात मात्र रस्त्यासाठी १८ टक्के, दहा टक्के मोकळे भूखंड, आर्थिक मागास घटकांसाठी पाच टक्के, तर अॅमेनिटी स्पेससाठी १२ टक्के असे जागेचे विभाजन होईल.

...

५०:५० चा प्रस्ताव

या प्रस्तावात जागेचे समसमान वाटप केले जाते. पन्नास टक्के जमीन जागामालकास, तर ५० टक्के हे रस्ते व सेवासुविधा, आर्थिक मागास घटक, खुली जमीन, प्राधिकरणासाठी वापरता येते. या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ देताना सर्व झोनसाठी प्रीमियमसह ३ एफएसआय, आर्थिक मागास घटकासाठी जमीन ठेवणे बंधनकारक नाही. तसेच बेटरमेंट चार्जेस लागू राहणार नाही. दुसऱ्या टप्प्यात जमिनीचे विभाजन करताना रस्त्यासाठी १८ टक्के, मोकळ्या भूखंडासाठी १० टक्के, आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच, तर अॅमेनिटी स्पेससाठी १७ टक्के जागेचेच विभाजन होईल.

...

मानसिकता बदलण्याचा अजब सल्ला

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे नसल्याने यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच खोचक उत्तरे देऊन निरुत्तर करण्याचा प्रयत्न नगररचनाकार कांचन बोधले यांनी केला. बोधले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा प्रतिप्रश्न करीत त्यांची उलट तपासणी करण्यातच धन्यता मानली. शेती करणे बंद केल्यास जगायचे कसे, असा सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आयुष्यभर शेतीच करणार का, असा आश्चर्यकारक सवाल केला. नाशिकच्या लोकांना बुरसटलेली मानसिकता बदलावी लागेल, अन्यथा विकास होणारच नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

...

स्मार्टपणा बघितला तुमचा..!

यावेळी शेतकऱ्यांनी संपूर्ण जमीन घेऊन समृद्धीप्रमाणे आम्हाला आर्थिक मोबदला द्या, अशी मागणी केली. त्यामुळे अधिकारीच संभ्रमात पडून निरुत्तर झाले. आम्ही पिढ्यानपिढ्या शेती करतो, त्यामुळे आम्हाला भिखारी करू नका, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. बहुतांश शेतकऱ्यांनी यावेळी जमीन देणार नाही असा पवित्रा घेतला. स्मार्ट सिटी होईल असे सांगताच एका शेतकऱ्यांने आम्ही तुमचा स्मार्ट रोड बघितला, काय दिवे लावले तिथे माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही स्मार्ट सिटीचे बोलूच नका असे सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रांतांच्या बैठकीकडे तलाठ्यांची पाठ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' प्रभावीपणे राबविण्याकरिता प्रांताधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलावलेल्या बैठकीकडे बहुतांश तलाठ्यांनी पाठ फिरविली. हा असहकार न रूचल्याने प्रांताधिकाऱ्यांनीही संबंधित तलाठ्यांना नोटीस बजावून बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल खुलासा करा, असा जाब विचारत कारवाईचा इशारा दिला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर पडदा टाकत तलाठ्यांना कामाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकार आग्रही आहे. या योजनेसंदर्भातील नाशिक तालुक्यातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. किती शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले, किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला, किती अपात्र ठरले याची माहिती तलाठ्यांकडून घेऊन ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. नाशिक प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनातच ही बैठक होणार होती. बैठकीबाबतचा संदेश तलाठ्यांना व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला होता. परंतु या संदेशाकडे अनेक तलाठ्यांनी दुर्लक्ष केले. बैठकीबाबतच्या या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने प्रांताधिकाऱ्यांची देखील निराशा झाली. तलाठी आपला आदेश डावलत असल्याचा प्रकार जिव्हारी लागल्याने त्यांनी बैठकीस अनुपस्थित राहिल्याबाबत खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा नोटिशीद्वारे तलाठ्यांना दिला. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची तलाठ्यांनी भेट घेतली. प्रांताधिकाऱ्यांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरील संदेश आमच्या पाहण्यात आला नाही. त्यामुळे त्यास प्रतिसाद देणे शक्य झाले नाही. प्रांताधिकाऱ्यांनी लगेचच कारवाईची धमकी दिल्याबाबत तलाठ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. तसेच कामाला प्राधान्य देण्याचा सल्लाही दिला. सरकारी नोकरी स्वीकारल्यानंतर काम करणार नाही, असे कर्मचाऱ्यांना म्हणता येत नाही. पंतप्रधान किसान योजनेची अंमलबजावणी ही महसूलचीच जबाबदारी असून, कामाच्या जबाबदाऱ्यांबाबत असहकार पुकारण्याची परवानगी नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा अॅप डाउनलोड करा appmtmobile

अतिसार नियंत्रण पंधरवडा शुभारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभ शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पंधरवाड्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, आरोग्य समिती प्रमुख यशवंत ढिकले, शिंदेच्या सरपंच माधुरी तुंगार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना डॉ. डेकाटे यांनी केली. भारतामध्ये अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते. त्यासाठी २०१५ पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या पंधरवाड्यात घरोघरी भेटी देऊन गटसभा घेऊन शून्य ते ५ वयोगटातील बालकांच्या घरी 'ओआरएस'चे पाकीट देणे, अतिसार झालेल्या बालकांना शोधून त्यांना वार एस व झिंक गोळीचा चौदा दिवस उपचार दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षा दिवस साजरा

0
0

देवळाली कॅम्प : स्वरसम्राज्ञी मधु स्मिताजी महाराज साहेब यांचा सुवर्ण महोत्सवी दीक्षा दिवस साधेपणाने लामरोड येथील ' मातृतीर्थ ' जैन स्थानक येथे साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थितांनी गौतम स्तुती गायन केले. त्यानंतर मधु स्मिता यांनी गायलेल्या ध्वनिफीत, ध्यानधारणा, सामूहिक वंदना, मंगला चरण सादर केले. यावेळी संबोधी महाराज साहेब यांनी गुरुमहिमा वर्णन केला. याप्रसंगी उत्तम साधना, वीणाबाई, कमल प्रभा, रिम प्रीती, अपूर्व साधना उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी

0
0

'लोकसभेत करा नेतृत्व'

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावामुळे काँग्रेसमधील संकट गहिरे झाले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या काँग्रेसशासित राज्यांमधील सरकारे अडचणीत आली असताना राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे अवघा काँग्रेस पक्षच दिशाहीन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्ष अंतर्बाह्य संकटात सापडल्याची संधी साधून तरुण आणि महत्त्वाकांक्षी नेत्यांनी पक्षातील बुजुर्ग नेत्यांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसचे नेतृत्व करावे आणि पक्षाची सूत्रे दुसऱ्या नेत्याकडे सोपवावी, असा पर्याय पुढे येत आहे.

राहुल यांच्या राजीनाम्याच्या हट्टामुळे काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या संकटावर आणखी दोन-तीन दिवस तरी तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास त्यांची जागा कोण घेईल या प्रश्नाने पक्ष ढवळून निघाला आहे. शनिवारी कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनाम्याची तयारी दाखवल्यानंतर आता मागे हटणे राहुल यांना शक्य नसल्याचे त्यांच्या कथित हितचिंतकांचे म्हणणे आहे. महिन्याभरात आपला उत्तराधिकारी शोधा, असे राहुल यांनी त्यांना भेटायला येणाऱ्या नेत्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत कार्यकारिणीची पुन्हा बैठक होत असून, त्यात पक्षनेतृत्वावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

अशोक गेहलोत, कमलनाथ आणि चिदंबरम यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलांवरच लक्ष केंद्रीत केल्याच्या राहुल यांच्या टीकेनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या सचिन पायलट यांना आयतीच संधी मिळाली आहे. या संकटात स्वतःसाठी संधी शोधणारा काँग्रेसमधील तरुण नेत्यांचा एक गट या निमित्ताने सक्रिय झाला असून, त्यात सचिन पायलट आणि काँग्रेस पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला आघाडीवर असल्याचे समजते. सोबत तरुण गोगोई, ज्योतिरादित्य शिंदे, दीपिंदरसिंह हुड्डा, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह हे तरुण नेतेही पक्षातील बुजुर्ग नेत्यांविरुद्ध तलवारी उपसण्यासाठी सिद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. राहुल यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडायचे आणि आपल्यापैकी कोणाचीही अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसची सूत्रे हाती घ्यायची, असे त्यांचे डावपेच असल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे पक्षातील गांधी कुटुंबाचे निष्ठावंत अहमद पटेल, ए. के. अँटनी, कमलनाथ, अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, मनमोहन सिंग, शीला दीक्षित, वीरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खरगे, हरीश रावत, भूपेश बघेल आदी जुन्या नेत्यांना तरुण नेत्यांच्या हालचालींची कल्पना आहे. राहुल यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, अध्यक्षपद सोडण्यावर राहुल ठामच राहिले तर अँटनी यांच्यासारख्या निष्ठावंताकडे अध्यक्षपद सोपविले जावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. सचिन पायलट हेही काँग्रेस अध्यक्षपदाचे दावेदार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये तरुण नेत्यांच्या गटातर्फे सुरू करण्यात आली आहे.

अस्लम शेर खान यांचा प्रस्ताव

काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या निर्नायकी स्थितीवर माजी केंद्रीय मंत्री आणि ऑलिम्पिक हॉकीपटू अस्लम शेर खान यांनी 'हंगामी काँग्रेस अध्यक्ष' म्हणून दोन वर्षांसाठी आपली सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. सन १९७५च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शेवटच्या पाच मिनिटांत मैदानावर उतरून अस्लम शेर खान यांनी गोल लगावून भारताला बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर भारताने अंतिम सामना जिंकून हॉकी विश्वचषक स्पर्धेतील एकमेव यश नोंदविले. राजकारणात संधी मिळाल्यास आपण काँग्रेसला पुन्हा भाजपच्या बरोबरीत आणू शकतो, अशी इच्छा शेर खान यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणपडताळणीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून (दि. २९) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. आवश्यक त्या अर्जांचा नमुना एसएससी व एचएससी मंडळाच्या वेसबाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गुणपडताळणीसाठी वेबसाइटवरील मार्कशीटच्या स्वसाक्षांकित प्रतीसह २९ मे ते ७ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसात पुनर्मूल्यांकन कार्यपध्दतीचा अवलंब करून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणी जखमी

0
0

नाशिक : सातपूर भागातील नीलकंठेश्वरनगर भागात थोरात पार्क इमारतीत कपडे वाळत घालताना तरुणीचा पाय घसरून ती खाली पडली. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबधित डिंपल शुक्ला नावाची तरुणी राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर उभी होती. यावेळी तोल गेल्याने ती जमिनीवर पडल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक शहरात लवकरच ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजच्या धकाधकीच्या जीवनात घराबाहेरील पदार्थ खाण्याची वेळ अनेकदा येत असते. पण हे पदार्थ व ते बनविण्याची जागा, पद्धती, भांडे आदी वस्तू स्वच्छ असतील की नाही, या प्रश्नांनी बाहेरील अन्न खाण्याबाबत साशंकता निर्माण होते. आता मात्र, नाशिककरांना स्वच्छ अन्न बाहेरही खाता येणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. शहरात तिबेटीयन, नाशिकरोड व सिडको या तीन ठिकाणी असलेल्या खाऊ गल्ली यासाठी निवडण्यात आल्या असून, अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (नवी दिल्ली) यांनी दिलेल्या नियमावलीत ही ठिकाणी बसल्यास येथे 'क्लीन स्ट्रीट फूड हब' सुरू करण्यात येणार आहे.

शहरात ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे व्यवसाय सुरू आहेत. ग्राहकांची मोठी पसंती या खाद्यपदार्थांना मिळत असते. पण काही वेळा हे पदार्थ अस्वच्छतेमुळे आरोग्यासाठी घातकही ठरतात. 'क्लीन स्ट्रीट फूड हब' सुरू झाल्यास हे प्रश्न मिटण्यास मदत होणार असून, व्यावसायिकांनाही व्यवसायवृद्धीसाठी त्याचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकृत जागी सुरू असलेल्या खाद्यव्यवसायांसाठी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. तसेच महापालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून, अंमलबजावणीची दिशा ठरविली जाणार आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईतील गिरगाव व जुहू चौपाटी येथे हे हब सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे राज्यात सोळा ठिकाणी हे हब सुरू होणार असून नाशिकसह जळगाव, नगर जिल्ह्यांमध्ये ते सुरू करण्यात येणार आहे. हब प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे ऑडिट केले जाणार असून अन्न, सुरक्षा प्राधिकरणाला अहवाल सादर केला जाणार आहे.

सहभाग महत्त्वाचा

'क्लीन स्ट्रीट फूड हब'साठी फूड स्टॉलधारकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असणार आहे. या हबमध्ये अन्नपदार्थ हाताळण्याची दक्षता, कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. याबरोबरच, स्टॉलची दुरुस्ती, रंगरंगोटी करणे अपेक्षित असणार आहे.

नाशिककरांना बाहेर खाताना स्वच्छ अन्न या हबमुळे मिळू शकणार असून, व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी लाभ होऊ शकणार आहे. नाशिकमध्ये अनेक पर्यटक येत असतात. त्यांच्यासमोर स्वच्छ अन्नपदार्थांचा असलेला प्रश्न या हबमुळे सुटू शकणार आहे. - चंद्रशेखर साळुंके, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

- एफडीएकडून प्रक्रिया सुरू

- तिबेटीयन, नाशिकरोड व सिडकोची निवड

- महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशात सावित्रीच्या लेकींची बाजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च २०१९ बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २८) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तिन्ही जिल्ह्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्हा ८६.६१ टक्के निकाल मिळवून आघाडीवर आहे. अनेकांनी मोबाइल नेटवर तर काहींनी सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती.

गतवर्षाप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेच्या निकालात जळगाव जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांत मुलींनीच आपली जास्तीची टक्केवारी कायम राखली आहे. जळगाव जिल्ह्यात मुलांचा ८४.२० टक्के तर मुलींचा ९०.०८ टक्के निकाल लागला आहे. धुळे जिल्ह्यात ८०.७९ टक्के मुलांचा तर मुलींचा ८७.४६ टक्के निकाल लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही मुलीच आघाडीवर असून, मुलांचा ८१.३९ टक्के, तर ८६.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

नाशिक विभागातून ६७,८३३ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ६०,५०० मुली उत्तीर्ण झाल्या. विभागात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.१९ टक्के आहे. तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.५२ इतकी आहे.

विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव
मंगळवारी (दि. २८) बारावीचा निकाल रोजी जाहीर होण्याची तारीख येताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवर्गाचीदेखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरातील, सायबर कॅफेंसह कॉलेजेसच्या परिसरात विद्यार्थ्यांनी निकालासाठी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा करताना दिसले. तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर अनेकांना चांगले मार्क्स मिळाल्याने मिठाई वाटून जल्लोष केला.

१५४ कॉपी बहाद्दर
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची एकूण १५४ गैरमार्ग प्रकरणे शिक्षण विभागाला प्राप्त झाली. उमेदवारांना मंडळ शिक्षा सूचीनुसार शास्ती करण्यात आली आहे. यात नाशिक - १३, धुळे - १०, जळगाव - १२६ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ५ परीक्षार्थींचा समावेश आहे.

शाखनिहाय टक्केवारी
जळगाव जिल्हा
शाखा - टक्केवारी
सायन्स - ९५.०७
आर्ट - ७७.३०
कॉमर्स - ९१.८७
व्होकेशनल - ८१.५२
००
धुळे जिल्हा
शाखा - टक्केवारी
सायन्स - ९३.७४
आर्ट - ७०.९४
कॉमर्स - ८५.७०
व्होकेशनल - ६४.७४
००
नंदुरबार जिल्हा
शाखा - टक्केवारी
सायन्स - ९३.११
आर्ट - ७१.२९
कॉमर्स - ९२.०७
व्होकेशनल - ८१.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बहिरम यांना सेवानिवृत्त लाभ देऊ नये’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सेवेतून मेअखेरीस सेवानिवृत्त होणारे अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर जाहिरात फलक, घरकुल लाभार्थी, अतिक्रमण व फेरीवाला धोरणात अनियमितता केल्याचा आरोप असल्याने चौकशीच्या अधिनस्थ राहून त्यांना सेवानिवृत्तीचे कुठलेही लाभ देऊ नये, अशी मागणी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. स्थायीच्या चौकशीत बहिरम दोषी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

उपायुक्त बहिरम हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. बहिरम यांच्या कार्याकाळात जाहिरात फलकाचे उत्पन्न लपविणे, सोयीस्कररित्या अतिक्रमण हटविणे, घरकुल लाभार्थ्यांच्या योजनेत फेरफार करणे, नियम डावलून फेरीवाला धोरण अवलंबिणे आदी आरोप २०१७ च्या स्थायी समितीच्या एका बैठकीत करण्यात आले होते. त्यांची चौकशीदेखील नेमण्यात आली होती. परंतु, अद्याप हा चौकशी अहवाल समोर आलेला नाही. तत्पूर्वीच बहिरम हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना जो निकष लावला जातो, तोच निकष त्यांना लावावा, त्यांना देय असलेले सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देऊ नये, न्यायप्रविष्ट बाब झाल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील असा इशारा नगरसेवक शहाणे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे येथे पोलिसांकडून कोंबिंग

0
0

नाशिकरोड : एकलहरे सामनगाव परिसरात दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर झोपेतून झागे झालेल्या पोलिसांनी गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू केल्याने या भागातील गुन्हेगारांची चांगलीच दाणादाण उडाली. दोन दिवसापूर्वी जुन्या वादातून दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मंगळवारी नाशिकरोड पोलिसांनी एकलहरे सामनगाव भागातील झोपडपट्टी भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची ठिकाणे उद्ध्वस्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान

0
0

नाशिक ४० तर जळगाव ४५ वर जाणार

जळगाव : यंदाचा उन्हाळा लांबण्याची शक्यता असून, मे महिन्यातील अखेरच्या दिवसांमध्ये अन् जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, आयएमडीने नाशिकचा पारा ४० अंशावर, मालेगाव ४४ अंशावर तर जळगावचा पारा ४५ अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images