Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...तर क्लासेसवर कारवाई; प्रशासनाचा इशारा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यातील खासगी कोचिंग क्लासेसचालकांनी क्लासेसच्या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारली आहे का, अशी विचारणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली आहे. याबाबतचे पत्र क्लासेसचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. क्लासचालकांनी आवश्यक ती दक्षता घेतली नसेल, तर संबंधित क्लासेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

गुजरातमधील सुरत येथे तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस सुरू असताना तेथे अचानक आग लागली. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. त्यामुळे २२ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. सुरतमधील या घटनेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील क्लासेसमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशमन यंत्रणाही यामुळे खडबडून जागी झाली आहे. क्लासेसच्या संघटनेला याबाबत पत्र पाठविण्यात आले असून, त्याची प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, सर्व तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

या बाबी आहेत अनिवार्य

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांसदर्भात म्हणाले, की खासगी क्लासेसचालकांकडे फायर सेफ्टी, फायर एस्टिंग्युशर, फायर बॉलसारखी यंत्रणा असायला हवी. अग्निसुरक्षा यंत्रणेचा परवाना हवा, क्लासेसमध्ये प्लायवूड किंवा पत्रा वापरून पार्टिशन नसावे, विद्यार्थिसंख्या मर्यादित असायला हवी. विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असायला हवेत. आपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे, तर आपत्तीची रंगीत तालीमही व्हायला हवी. अशा प्रकारची व्यवस्था नसलेल्या व कार्यवाही न करणाऱ्या क्लासेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

शहरातील एकूण क्लासेस

२००० ते २५००

संघटनेचे सभासद

७०० ते ७५०

शहरातील एकूण विद्यार्थी

५ ते ६ लाख

क्लासेसमध्ये जाणारे विद्यार्थी

४ ते साडेपाच लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

महासभेवर तहकुबीचे सावट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या दोन महासभांवर पाणी फेरले गेले असतांनाच, आता प्रभाग क्रमांक १०च्या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा आचारसंहिता लागू झाल्याने येत्या २९ तारखेला होणाऱ्या महासभेवरही तहकुबीचे सावट आहे. येत्या महासभेत शहरात वादग्रस्त ठरलेल्या मिळकत प्रश्नासह शालेय पोषण आहार, टीपी स्किम, मोबाइल टॉवरसाठी सर्वेक्षक नियुक्त करणे यासारखे महत्त्वाचे धोरणात्मक विषय आहेत. परंतु, आचारसंहितेत धोरणात्मक विषयांना मंजुरी देता येणार नसल्याने ही महासभा तहकूब करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे मिळकतींचा प्रश्न पुन्हा महिनाभर लांबणीवर पडणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेले तीन महिने महापालिकेचे अनेक धोरणात्मक विषय अडकले आहेत. आदर्श आचारसंहितेत महत्त्वाचे विषय घेता येत नसल्याने गेल्या दोन महासभा या तहकूब झाल्या होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेचे धोरणात्मक विषयम मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रभाग क्रमांक १०च्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता प्रभाग १० पर्यंत मर्यादीत असली तरी, या ठिकाणच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असा कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे मिळकत धोरणाचा विषयही बारगळणार आहे.

महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर होत असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारत येत्या ३ जून रोजी होणाऱ्या सुनावणीप्रसंगी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सैरभैर झालेल्या पालिका प्रशासनाने करार संपलेल्या, बेकायदा ताब्यात असलेल्या समाजमंदिर, अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा आदी मिळकती ताब्यात घेण्याचा धडाका लावला आहे. ३७४ मिळकतींना सील लावण्याची कारवाई प्रशासनाकडून केली गेली. त्यामुळे शहरात आगडोंब उसळला आहे. त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय आचारसंहिता संपताच घेतला जाणार होता. त्यासाठी येत्या २९ मे रोजी महासभा बोलविण्यात आली होती. परंतु, या महासभेत सगळेच मिळकत प्रश्नासह सेंट्रल किचनच्या माध्यमातून शालेय पोषण आहार पुरवठा करण्यासाठी अक्षयपात्र योजना राबविणे, तसेच मोबाइल टॉवरच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे, स्मार्ट परियोजनेच्या ठरावाला मान्यता देणे, असे धोरणात्मक निर्णयाचे प्रस्ताव महासभेच्या पटलावर आहेत. त्यामुळे वाद ओढावून घेण्यापेक्षा महासभा तहकुबीकडे सत्ताधाऱ्यांचा कल आहे. त्यामुळे मिळकतींसह सर्वच धोरणात्मक विषय पुन्हा महिनाभर लांबणीवर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकी प्रवेशासाठी

0
0

अभियांत्रिकीसाठी मार्गदर्शन

नाशिकरोड : अभियांत्रिकी पदविका (इंजिनीअरींग डिप्लोमा) प्रवेश प्रक्रियेबाबत ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पूर्तता व संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती पालकांसह विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक कॉलेज) २८ मेपासून मार्गदर्शन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी ही माहिती दिली आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अन्य दिवशी कार्यालयीन वेळेत हे मार्गदर्शन करण्यात येईल. पालकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व दहावीच्या निकलाआधी अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन तंत्रनिकेतनने केले आहे.

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर प्युरिफायरसाठी रेल्वेस्थानकात पाहणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारी एअर प्युरिफायर मशिन्स लावण्यात येणार आहेत. त्याबाबत सोमवारी रेल्वेचे अधिकारी आणि हे मशिन तयार करणाऱ्या पुण्याच्या स्ट्राटा एनव्हायरो कंपनीचे संचालक अमोल चाफेकर यांनी स्थानक परिसराची पाहणी केली. या स्थानकात सामाजिक संस्थाच्या मदतीने पहिल्या टप्प्यात सहा एअर प्युरिफायर मशिन्स लावण्यात येणार आहेत.

स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, रेल्वे अभियंता एस. जी. सैय्यद, विजय तिवडे, इलेक्ट्रिक विभागाचे अजय कुमार, आरपीएफचे उपनिरीक्षक डी. पी. झगडे, योगेश सुडके आदी उपस्थित होते.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दर दिवसाला १२ ते १५ हजार प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवेशद्वाराजवळ खासगी वाहनांमुळे हवा प्रदूषित होते. तेथे सहा एअर प्युरिफायर लावण्यासाठी कंपन्या, संस्थांना जागा व मशिन उपलब्ध केले जाईल. त्यांना त्याद्वारे जाहिरात करता येईल. संस्था व कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन कुंदन महापात्रा यांनी केले आहे.

स्ट्राटा कंपनीने इंग्लड, पोलंड, नेपाळ, मालदिव आदी सहा देशांमध्ये एअर प्युरिफायर बसवली असून, भारतात पुणे व गोवा विमानतळ, कोलकाता रेल्वेस्टेशन, बेंगळुरू, ठाणे, दिल्ली, मुंबई येथे ती लावण्यात आली आहेत. ट्रॅफिक सिग्नल, बस-रेल्वेस्थानक, विमानतळ, टोल नाका, मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, सोसायट्या, पेट्रोलपंप आदी गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावण्यात येतात. रेल्वेस्टेशनमध्ये सहा ठिकाणी सामाजिक संघटनांच्या मदतीने ती लावली जाणार आहेत.

...

मशिन्स मोफत उपलब्ध

एक ते पाच लाखांपर्यंत किंमत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान दोन हजार क्युबिक फूट हवा, धूळ एक मशिन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. कंपनी हे मशिन्स मोफत उपलब्ध करते, फक्त ज्या भागात ते लावायचे आहे तेथील प्रशासनाने जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्या मशिनवर प्रायोजक/जाहिरातदारांना त्यांची जाहिरात लावता येईल. सार्वजनिक वाहनांवर देखील असे प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत, असे स्ट्राटा एनव्हायरो कंपनीचे संचालक अमोल चाफेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला दणका

0
0

कामगार न्यायालयाची कारवाईला स्थगिती

...

- २० कर्मचाऱ्यांना दिलासा

- मुंढेंनी केले होते नोकरीवरून कमी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाने अस्वच्छतेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसंदर्भात काढलेल्या एका अध्यादेशाचा आधार घेत महापालिकेच्या २० कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी नाकारत त्यांना कामावरून कमी केले होते. परंतु, या कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेत पालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यामुळे कामगार न्यायालयाने महापालिकेला दणका देत निकाल लागेपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अस्वच्छतेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवानिवृत्तीनंतर पालिकेच्या सेवेत वारसा हक्काने सामावून घेतले जात आहे. मात्र सन २०१६ पूर्वी इतर मागासवर्गीय व खुल्या गटातील २० कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेने सेवेत सामावून घेतले होते. परंतु, सन २०१६ नंतर लाड समितीच्या अहवालानुसार शासनाने फक्त मेघवाळ, मेहतर समाजातील वारसांनाच सेवेत सामावून घेण्याचे आदेश काढले आहेत. त्याचा आधार घेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारसा हक्काने सेवेत दाखल झालेल्या २० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. तसेच स्थगिती देण्याची मागणी केली होती. या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी वाचविण्यात आता काही अंशी यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे

0
0

'निवडणूक लढवा'

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी लगेचच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून शिवसेनेची उपसंघटना असलेल्या युवासेनेने तर आपले प्रमुख अर्थात आदित्य ठाकरे यांनाच विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे तशी जाहीर मागणी केली आहे.

सविस्तर...७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचएएल’प्रश्नी आवाज उठवू

0
0

खासदार गोडसे, डॉ. पवारांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भारतीय वायू सेनेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) कामगारांसाठी पुरेसा 'वर्कलोड' उपलब्ध व्हावा यासाठी एचएएलला नवीन प्रकल्पाचे काम मिळावे, अशी मागणी एचएएल कामगार युनियनतर्फे नाशिक आणि दिंडोरीच्या नवनिर्वाचित खासदारांकडे सोमवारी (दि. २७) करण्यात आली. कारखान्यातील 'वर्कलोड' घटल्याने कामगार चिंतेत असल्याचे खासदारांना सांगण्यात आले. त्यावर या प्रश्नावर वेळप्रसंगी संसदेत आवाज उठवू, असे आश्वासन दोन्ही खासदारांनी कामगारांना दिले.

खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी सोमवारी एचएएल कामगार युनियन कार्यालयास भेट देऊन युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी दोघांचाही युनियनच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते बबन घोलप, आमदार अनिल कदम, संघटनेचे माजी सरचिटणीस रामभाऊ जाधव, नगरसेवक प्रवीण तिदमे, संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ओझरचा एचएएल प्रकल्प हा देशाच्या वायुसेनेचा कणा आहे. परंतु, सध्या या प्रकल्पात नवीन प्रकल्पाअभावी कामकागारांच्या हाताला काम शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे कामगारांपुढे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. २००६ या वर्षीच्या सुखोई विमान निर्मितीच्या प्रकल्पातील विमान निर्मिती पूर्ण झाली असून, आता केवळ या विमानांची देखभाल दुरुस्तीचे काम शिल्लक राहिलेले आहे. हे कामही येत्या मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कामगारांपुढील चिंता वाढली असून, भविष्यात एमएमआरसीए किंवा एफजीएफए सारखा मोठा प्रकल्प एचएएलला मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याची विनंती कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटीचे प्रवक्ते भानुदास शेळके यांनी दोन्ही खासदारांकडे केली. कथित राफेल घोटाळ्या सोबत जोडले गेलेल्या एचएएलच्या नावाविषयी अपप्रचार केला गेला असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्संटर

0
0

देशांतर्गत हवाई प्रवाशांमध्ये घट...८

गुंतवणूकदारांना

आकर्षित सवलती

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक, केमिकल आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसारख्या ठिकाणी विदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सवलतींच्या पॅकेजचा प्रस्ताव ठेवला आहे. मंत्रालयाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचाच एक भाग म्हणजे हे पॅकेज असणार आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) नव्या सरकारसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे.

...८

व्हिएतनामसारख्या देशामध्ये ज्या प्रमाणात आर्थिक सवलती दिल्या जातात, तशा दिल्या गेल्या, तर भारतामध्ये वर्षाला शंभर अब्ज डॉलरची परकीय थेट गुंतवणूक होऊ शकते, असे 'डीपीआयआयटी'च्या आराखड्यात म्हटले आहे. अग्नेय आशियायी देशामद्ये परकीय गुंतवणूकदारांना भरपूर सवलती दिल्या जातात. कार्पोरेट प्राप्तिकराचा कमी दर, चार वर्षांसाठी करसवलत आदी सवलती या देशांमध्ये दिल्या गेल्या आहेत. अधिकृत सूत्राने सांगितले, 'इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन, केमिकल्स, अन्नप्रक्रिया आणि इतर उद्योगांमध्ये अशा सवलती दिल्या गेल्या, तर मोठी परकीय गुंतवणूक होऊ शकते. एखादे क्षेत्र प्राधान्याने घेऊन त्या ठिकाणी मोठ्या गुंतवणूकदारांना सवलती (कस्टमाइज्ड् इन्सेंटिव्ह पॅकेज) दिल्या जातील.' या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला मोठी संधी असून त्यामुळे रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे.

याखेरीज दहा मुद्द्यांचा कृती आराखड्याचा (टेन पॉइंट अॅक्शन प्लान) प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. आकर्षक करप्रणाली, कायद्याच्या बाबींमध्ये बदल करून रोजगारनिर्मिती, नैसर्गिक संसाधनांचे योग्य वाटप, छोट्या उद्योगांचे सहकार्य, नवे औद्योगिक धोरणाची घोषणा आदी बाबी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. देशाचे औद्योगिक धोरण ठरविण्यासाठी माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी देशभरामध्ये उद्योजकांशी दीर्घ चर्चा केल्या होत्या. करप्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी विभागाने पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि वीज यांचाही 'जीएसटी'मध्ये समावेश करण्याचे सुचवले आहे.

कामगार कायद्यांमध्ये बदल आ‌वश्यक

कामगार कायद्यामधील जाचक अटी हटविण्याची गरज असल्याचे नमूद करून उद्योगवाढीवर त्याचा परिणाम होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. अर्धवेळ, फ्री-लान्स रोजगारालाही मान्यता देण्याचा प्रस्ताव यामध्ये ठेवण्यात आला आहे. कायद्यामध्ये काही बदल केल्यास त्याचा उद्योगांच्या वाढीला फायदा होईल, असे नमूद केले आहे. नैसर्गिक संसाधनांचे योग्य वाटप होण्याचेही यात म्हटले आहे. 'कोळसा, बॉक्साइटच्या मोठ्या साठ्यांचा वापर योग्य नियोजनाअभावी पूर्ण होत नाही. सरकारी कंपन्यांची उत्खननक्षमता यामध्ये कमी पडते,' असे सूत्राने सांगितले.

कृती आराखड्यात काय?

- किरकोळ बाजारासाठी राष्ट्रीय धोरणाची शिफारस; यामुळे ६.५ कोटी छोट्या व्यापारांना मदत

- राष्ट्रीय औद्योगिक धोरण हवे

- परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सवलतींचे पॅकेज

- पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणावीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कृष्ट पालिका पुरस्कारासाठी प्रयत्न

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या महापालिकांना पुरस्कार देण्याची संकल्पना महाराष्ट्र महापौर परिषदेने मांडल्यानंतर राज्य शासनाने यासंदर्भातील माहिती पालिकांकडून मागवली आहे. नाशिक महापालिकेनेही या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू केले आहे.

राज्यातील महापालिकांमध्येही उत्कृष्ट महापालिका स्पर्धा घेण्याचा ठराव महाराष्ट्र महापौर परिषदेत करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. शहरात झोपडपट्टी किती, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील माहिती पाठवली जाणार आहे. दरम्यान, या माहितीतून मात्र आरोग्य विभागाचीच पोलखोल होणार असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट महापालिकेचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी पालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या स्पर्धसाठी सर्व खातेप्रमुखांकडून माहिती मागवली जात असून, ती सरकारला पाठवली जाणार आहे.

...

आरोग्य विभागाची थापेबाजी

या माहितीत आरोग्य विभागाने सादर केलेल्या माहिती आश्चर्यकारक आहे. शहर कचराकुंडीमुक्त नसल्याचा दावा पालिकेने या माहितीत केला आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण शंभर टक्के होत असल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. घंटागाडीबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत आरोग्य विभागाने शहरात आरोग्य विभाग शंभर टक्के चांगले काम करीत असल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा अॅप डाउनलोड करा appmtmobile

स्वाइन फ्लूला अटकाव

0
0

उष्णतेच्या लाटेचा परिणाम, पंधरा दिवसांपासून एकही रुग्ण नाही

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकच्या तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे स्वाइन फ्लूने अखेर नाशिकची पाठ सोडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून न आल्याने महापालिकेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या महिन्यात १ ते १० मे दरम्यान स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळून आले होते. मात्र १० ते २६ मे दरम्यान स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण शहरात आढळून आलेला नाही. तीव्र उन्हाच्या लाटांमुळे का होइना स्वाइन फ्लू गायब झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून स्वाइन फ्लू आणि डेंग्यू नाशिकची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: स्वाइन फ्लूने तर शहरात थैमान घातले असून, गेल्या वर्षापाठोपाठ यंदाही नागरिकांचे बळी घेतले. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत स्वाइन फ्लूने आठ जणांचा बळी घेतला. थंडीच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव अधिक मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु यंदा मात्र बदलत्या वातावरणाचा स्वाइन फ्लूच्या विषाणूंवर फारसा परिणाम होत नसून, कडक उन्हातही या आजाराचे विषाणू तग धरून होते. जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचे जेमतेम ७ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर फेब्रुवारीतील थंड वातावरणात या आजाराचा प्रादूर्भाव वाढून रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली, तर चार जण मृत्युमुखी पडले. मार्चमध्येही स्वाइन फ्लूग्रस्तांचा आकडा वाढता राहिला. या महिन्यात सर्वाधिक ४९ जणांना स्वाइन फ्लू होऊन दोन जण मृत्युमुखी पडले. एप्रिलमध्ये मात्र वाढलेले तापमान या आजाराच्या प्रादूर्भावाला अटकाव निर्माण करेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती, परंतु या महिन्यातही तब्बल ३७ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले. एप्रिलमध्ये स्वाइन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला. परंतु, मे महिन्यातील उष्णतेमुळे स्वाइन फ्लू हद्दपार झाला आहे. १ ते १० मे दरम्यान स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळून आले होते. परंतु, ११ मेपासून शहरात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या पंधरा दिवसांत उन्हाची तीव्रता अचानक वाढली असून, उष्णतेच्या लाटा सुरू आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे स्वाइन फ्लूचे विषाणू मात्र हद्दपार झाले आहेत. त्यामुळे नाशिककरांसह यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

--

महिनानिहाय रुग्णांची संख्या

महिना....रुग्ण... मृत्युमुखी

जानेवारी - ७ ....०

फेब्रुवारी - ४२.... ४

मार्च - ४९ ...२

एप्रिल - ३७...२

मे - १०...०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट-सिंगल

0
0

कामगाराचा मृत्यू

नाशिक : आंबा तोडण्यासाठी पत्र्याच्या शेडवर चढलेल्या कामगाराचा पडून मृत्यू झाला. अनिल विश्वनाथ कपिले (५० रा. बालाजी अपा. कारगील चौक) असे त्याचे नाव आहे. कपिले अंबड औद्योगीक वसाहतीतील प्रगती इंडस्ट्रीज या कारखान्यात कंत्राटी कामगार होते. शनिवारी (दि. २५) कारखाना आवारातील झाडावरील आंबे तोडण्यासाठी ते पत्र्याचे शेडवर चढले असता ही घटना घडली. अचानक पत्रा वाकल्याने ते शेडच्या आतील लोखंडी अँगलवर पडले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना ठेकेदार छत्री हरिचरण सिंग यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

विशेष पॅकेजच्या

नावाखाली फसवणूक

नाशिक : सहलीसाठी विशेष पॅकेज देण्याचे आमिष दाखवून कॉलेजरोड भागातील नामांकित ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाने एकास ५५ हजारास गंडविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुहास मुकुंद कंकरेज (२६, रा. मखमलाबाद नाका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंकरेज कुटुंबियास सहलीनिमित्त बाहेरगावी फिरण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी कॉलेजरोड भागातील आयलांटीस हॉलिडेज या कंपनीशी संपर्क साधला होता. कंपनीच्या सेल्स व्यवस्थापकासह संचालक विशाल रमेश आल्हाट, जमीर सत्तार मनेर, विठ्ठल नारायण टिंगरे आदींनी कंकरेज कुटूंबियास विशेष पॅकेज देण्याचे आमिष दाखवून १ ते २७ मे या कालावधीत टूर निश्चित केली होती. सहलीत सर्व सुविधांचे आमिष दाखविण्यात आल्याने कंकरेज यांनी बुकिंगपोटी ५५ हजार रूपये भरले होते. मात्र वेळ टळूनही कंकरेज यांना सहलीला पाठवले नाही किंवा इतर सुविधाही दिल्या नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कंकरेज यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबाद बिबट्याचा वावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद मातोरी रोडवरील धनंजय विश्वनाथ हेंगडे मळ्यात विष्णू काकड यांच्या घराच्या काही अंतराजवळील पेरूच्या झाडाखाली सोमवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याला ठार केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या परिसरात यापूर्वीही बिबट्याची दहशत होती. रविवारी रात्री बाराच्या सुमारास हेंगडे मळ्यानजीक बिबट्याचे दर्शन घडल्याचे काकड यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वीही या भागात बिबट्याचा वावर होता. त्यावेळी वनविभागाला या भागात बिबट्या असल्याचे कळविले होते. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंजू चव्हाण ठरल्या मानकरी

0
0

(तनपुरे सरांच्या सूचनेनुसार मस्ट)

अंजू चव्हाण ठरल्या

मोफत सहलीच्या मानकरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढावा म्हणून व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करण्यात आल्या होत्या. यात ब्रिजमोहन टुरिझमतर्फे 'फ्री दुबई टूर' या ऑफर्सची सोडत जाहीर झाली आहे. पिंपळगाव बसवंत येथील अंजू चव्हाण यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. त्यांना कंपनीतर्फे मोफत दुबई टूर देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल रोजी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या होत्या. ब्रिजमोहन टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मतदान केल्याचा सेल्फी पाठवा. या सेल्फी उपक्रमातून भाग्यवंतांना मोफत दुबई टूर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यासह संदीप भवर, संजय रानवळे, औरंगाबादचे नानासाहेब ढेपले आणि दीपक अहिरे यांची अष्टविनायक यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. ही सोडत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी माजी जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार, संचालक प्रेमचंद चौधरी, ब्रिजमोहन चौधरी, रघुवीर चौधरी, ललिता चौधरी, मनिषा चौधरी, सेजन चौधरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमाला - गोदाघाट.....सावरकर क्रांतिकारकांचे कुलगुरूड

0
0

सावरकर क्रांतिकारकांचे कुलगुरू

डॉ. सिन्नरकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

संत साहित्याचा अभ्यास करणारे, विज्ञाननिष्ठा ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंगी देशातील सर्वच महापुरुषांचे गुण एकत्रित होते. ते क्रांतिकारकांचे कुलगुरू होते, असे प्रतिपादन डॉ. श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांनी केले. ९८ व्या वसंत व्याख्यानमालेत डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यानात 'कीर्तन - सावरकर चरित्र प्रसंग' या विषयावर ते बोलत होते.

यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण येथे झालेल्या व्याख्यानाप्रसंगी डॉ. हेमलता पाटील, विकास गोगटे, विवेक गोगटे, अॅड. भानुदास शौचे, राजश्री शौचे आदी उपस्थित होते. डॉ. सिन्नरकर म्हणाले, की सावरकरांनी आपल्या कलेने भारत मातेला सावरले. शिवाजी महाराजांप्रमाणे ते बुद्धिवान, शूर, वीर होते. सावरकरांचे पुस्तक वाचून भगतसिंगासारखे क्रांतिकारक तयार झाले. या वेळी सिन्नरकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन केले. शरद खैरनार (हार्मोनियम), लक्ष्मीकांत भट व पंकज महाले (तबला) केतकी गोरे (तानपुरा) यांनी संगीत साथ केली. अरुण शेंदूरणीकर यांनी आदरांजली अर्पण केली. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. वैजयंती सिन्नरकर यांनी परिचय करून दिला.

........

आजचे व्याख्यान

ब्रम्हकुमार रुपेश

ब्रम्हकुमारी गीतादीदी

(खुश नुबा जिंदगी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभाः आता आमदारकीचे वेध; इच्छुकांचे वाढतेय पीक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाचमध्ये महायुतीच्या हेमंत गोडसेंना मोठे मताधिक्य मिळाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी एकदमच वाढली आहे. आपल्यामुळे लीड मिळून गोडसे निवडून आले हे सांगण्यासाठी सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या स्पर्धाच सुरू झाली आहे. स्थानिक नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे नेत्यांचीही डोकेदु:खी वाढली आहे. विशेष म्हणजे गल्लोगल्ली या इच्छुक आमदारांचे पोस्टर्स, बॅनर्स लागल्याने शहराचेही विद्रुपीकरण झाले आहे. असे असताना महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र हातावर हात धरून बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा दोन लाख ९२ हजार एवढ्या विक्रमी मतांनी विजय झाला. गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर वगळता नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, पंचवटी, देवळालीत मोठे मताधिक्य मिळाले, तर इगतपुरीतही काठावर मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या मताधिक्यावरच विधानसभेचेही आराखडे अवलंबून आहेत. विशेषत: नाशिक शहरांतर्गत असलेल्या चारही विधानसभा मतदारसंघात गोडसेंना अपेक्षेपेक्षा जास्तीची आघाडी मिळाली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अनेक नगरसेवकांसह पदाधिकारीही आमदारकीचे दिवास्वप्न पळायला लागले आहेत. मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा बाजार उठला आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात गोडसेंना लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीत सर्वाधिक इच्छुकांची गर्दी आहे. या विभागातील प्रत्येक नगरसेवक आता आपण आमदार झालोच या अविर्भावात फिरत आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या या नगरसेवकांनी गल्लोगल्ली शुभेच्छांचे पोस्टर्स लावले असल्याने पूर्ण मतदारसंघांचे विद्रुपीकरण झाले आहे. नाशिक मध्य मतदारसंघातही अशीच अवस्था असून, दोन्ही पक्षात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची तसेच पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पालिकेतील शिवसेना, भाजपमधील नगरसेवक आमदारकीसाठी गुडघ्याला आतापासूनच बाशिंग बांधून बसले आहे. त्यामुळे या इच्छुकांमध्ये खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा लागली असून, आपल्या प्रयत्नांमुळे गोडसेंना कसे लीड मिळाले या प्रचार या इच्छुकांनी सुरू केला आहे. इच्छुकांनी स्वत:ला आतापासून आमदार संबोधन्यास सुरुवात केली आहे. समर्थकांनी होर्डिंग्ज, बॅनर्सद्वारे प्रचार करण्यास सुरुवात केल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.

आमदारांना धास्ती

चारही मतदारसंघांसाठी इच्छुकांची वाढत असलेली संख्या पाहता विद्यमान आमदारांनाच आता धास्ती वाटायला लागली. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपकडून आमदारकीसाठी इच्छुकांचा आकडा आठ ते दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे एवढ्या इच्छुकांना शांत कसे करायचे असा प्रश्न पक्षासह आमदारांना पडला आहे. दुसरीकडे प्रबळ इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांची बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे एवढ्या इच्छुकांचे करायचे काय असा प्रश्न पक्षापुढे उभा ठाकला आहे.

- होर्डिंग्ज, बॅनरने शहराचे विद्रुपीकरण

- महापालिकेचे हातावर हात

- पक्षाचीही वाढली डोकेदुखी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया जवानाच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

0
0

देवळाली कॅम्प : स्वत:च्या नावाने लष्कराचे बनावट ओळखपत्र तयार करून नाशिकमध्ये फिरणाऱ्या तोतया जवानाचा सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीअंती पर्दाफाश केला आहे. न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे. नवनाथ रघुनाथ जाधव (वय २१) याचा लॅपटॉप मालेगाव स्टॅण्ड येथील एका मेसचालकाच्या मुलाकडून ताब्यात घेतला आहे. तोतयागिरी करणारा भामटा बनावट ओळखपत्र दाखवून मेसमध्ये भूक भागवत होता, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र चेंबरची निवडणूक जाहीर

0
0

महाराष्ट्र चेंबरची निवडणूक जाहीर

अध्यक्षपदासाठी मंडलेचा, कामत यांच्यात लढत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, सेवा व कृषी क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ओळखली जाते. चेंबरच्या २०१९-२०२० या वर्षाकरिता अध्यक्ष व वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. अध्यक्षपदासाठी संतोष मंडलेचा व अमित कामत या दोघांचे अर्ज आले असल्यामुळे अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. दि. ३, ४ व ५ जून रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत मुंबई, नाशिक तर कोल्हापूर येथे दि. ५ जानेवारी २०१९ रोजी या तीन मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मुंबई येथील मतदान केंद्र हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे कार्यालय, ६ वा मजला, ओरिकन हाऊस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन काला घोडा, फोर्ट, मुंबई व नाशिक येथील मतदान केंद्र हे महाराष्ट्र चेंबरचे नाशिक येथील कार्यालय २०१, सारडा संकुल, एमजीरोड येथे तर कोल्हापूर येथे वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर, बिझनेस हाऊस, १६७७, ई, मेनरोड, राजारामपुरी १० गल्ली, हे मतदान केंद्र राहणार आहेत. सर्व सभासद मतदारांनी मोठ्या संख्येने सकाळी १० ते ६ यावेळेत मतदान करावे असे आवाहन निवडणूक समितीतर्फे करण्यात आले आहे. तशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सागर नागरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images