Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मटा अॅप डाउनलोड करा appmtmobile


डॉ

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नशिकरोड

सार्वजनिक ठिकाणी हवा शुद्ध करणाऱ्या एअर प्युरिफायर मशिनबाबत अनेकांना फारशी माहिती नसल्याचे दिसते. मात्र, अशा मशिनद्वारे हवा शुद्ध करणे आवाक्यात आलेले असून, नाशिकरोड रेल्वे स्थानकात अशी सहा एअर प्युरिफायर मशिन्स बसविली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना लवकरच शुद्ध हवेचे 'गिफ्ट' मिळणार असून, संबंधित कंपनीचे अधिकारी आज, सोमवारी (दि. २७) सकाळी येथे पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे जगात दर वर्षी ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात बालकांची संख्या लक्षणीय आहे. हवा प्रदूषण शंभर टक्के थांबवित येत नसले, तरी गर्दीच्या ठिकाणची प्रदूषित हवा खेचून ती शुद्ध करणे एअर प्युरिफायरद्वारे शक्य झाले आहे. पुण्यातील युवा संशोधक अमोल चाफेकर यांनी हे मशिन तयार केले असून, त्याचे पेटंटही घेतले आहे.

चाफेकर यांनी 'मटा'ला सांगितले, की इंग्लंड, पोलंड, नेपाळ, मालदीव आदी सहा देशांमध्ये त्यांच्या स्ट्राटा एन्व्हायरो कंपनीने एअर प्युरिफर्स बसविले आहेत. भारतात पुणे व गोवा विमानतळ, कोलकाता रेल्वे स्थानक, बेंगळूरू, ठाणे, दिल्ली, मुंबई येथेही ती बसविण्यात आलेली आहेत. ट्रॅफिक सिग्नल, बस-रेल्वे स्थानक, विमानतळ, टोल नाका, मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, सोसायट्या, पेट्रोलपंप आदी गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावणे उपयुक्त ठरत आहे. एका मशिनची किमत मशिनच्या आकारानुसार एक लाख ते पाच लाखापर्यंत आहे.

कंपनीकडून मोफत उपलब्ध

एअर प्युरिफायरची उंची सहा फूट व रुंदी दीड फूट आहे. जेथे ते लावले जाते तेथील साठ चौरस फुटांतील प्रदूषित हवा खेचून ती शुद्ध करते. दर मिनिटाला २००० क्युबिक फूट हवा एक मशिन खेचून घेते. सहा देशांमध्ये लावलेल्या या कंपनीचे एअर प्युरिफायर्स मिळून दर मिनिटाला तीन लाख साठ हजार क्युबिक फूट हवा शुद्ध करीत आहेत. कंपनी हे मशिन्स मोफत उपलब्ध करते, फक्त ज्या भागात ते लावायचे आहे तेथील प्रशासनाने जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्या मशिनवर प्रायोजक / जाहिरातदारांना त्यांची जाहिरात लावता येईल. त्यातून एअर प्युरिफायरची किंमत व देखभाल खर्च भरून निघेल. अनेक कंपन्या आपल्या सामाजिक निधीतून (सीएसआयआर) प्युरिफायरचा खर्च करू शकतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकसाठीही प्रायोजकांनी पुढे यावे, असे आवाहन रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कुंदन महापात्रा यांनी केले आहे.

बसमागेही बसविण्याचे नियोजन

चाफेकर यांनी सांगितले, की शहर वाहतूक बसच्या मागे एअर प्युरिफायर लावण्यात येणार आहेत. बस जेथे जाईल व थांबेल तेथील हवा बसमागील प्युरिफायर शुद्ध करेल. त्याची चाचणी यशस्वी झाली असून, तसा पायलट प्रोजेक्ट तयार झाला आहे. इंग्लंड सरकारपुढे तसा प्रस्ताव मांडला आहे. भारतातील विविध राज्यांतील परिवहन मंडळांनाही प्रस्ताव सादर केला आहे. अन्य वाहनांवरही प्युरिफायर्स बसविण्याचा विचार आहे.

--

इंग्लंडसारख्या प्रगत देशातील सरकार व नागरिक प्रदूषणाबाबत जागरूक आहेत. त्यामुळे त्यांनी एअर प्युरिफायरला मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याबाबत उत्सुकता दर्शविली आहे. सामाजिक संस्था, कंपन्यांनी पुढे येऊन पोल्युशनऐवजी सोल्युशनचा भाग व्हावे.

-अमोल चाफेकर, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात अभिवाचनातून उलगडले जीवनाचे पैलू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नातेसंबंध, जगण्याची उत्कंठता, माणूस म्हणून जगण्याची नेमकी गरज, काळानुरुप बदलणाऱ्या नात्यांची उपयुक्तता आणि काळाचा ठाव घेणारी कौटुंबिक अस्वस्थता, या सारख्या अनेक भावनांचा अनोखा वेध 'चार सख्य चोवीस' या कथांतून उलगडला. 'ध्यानस्थ' आणि ' कालाय तस्मै नम:' या कथांच्या अभिवाचनातून जीवनातील अपुरेपणासह मनातील घुसमट प्रभावीपणे मांडली गेली. निमित्त होते, 'कथांचे अभिवाचन' कार्यक्रमाचे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिकतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्या 'ध्यानस्थ' कथेने अभिवाचनाला प्रारंभ करण्यात आला. सोनाली लोहार यांनी 'कालाय तस्मै नम:' कथेचे अभिवाचन केले. दोन्ही कथांमधून आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रसिकांसमोर उभे रहात होते. संवादातील तरलता आणि भाषेचा प्रभावी वापर कथांची परिणामकता वाढविणारा ठरला. संपदा जोगळेकर-कुलकर्णी, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, सोनाली लोहार या चार समविचारी मैत्रिणींनी कथांमधून बदलत्या जीवनाचे नेमके भावविश्व रसिकांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. हरी विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री शिंपी यांनी केले. यावेळी रसिक अभिवाचनाचे रसग्रहण करण्यात रमल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानांची झाडाझडती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य पुरविणे आवश्यक असताना ते रिक्षांमधून खुल्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. अनेक दुकानांमधून अशा प्रकारे धान्याची अफरातफर होत असण्याची शक्यता गृहीत धरून इ पॉसद्वारे ५० टक्के व्यवहार असलेल्या दुकानांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे.

रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशिक नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी सुरगाणा, वाडीवऱ्हे येथे मोठा रेशन धान्य घोटाळा उघडकीस आला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये याकरिता बायोमेट्रीक पद्धतीने तसेच पॉस मशिनद्वारे धान्य वितरणाला सुरुवात झाली आहे. परंतु, ऑनलाइन नेटवर्कमधील त्रुटींवर बोट ठेऊन ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरणाचा प्रयत्न रेशन दुकानदारांकडून लपून राहिलेला नाही. यातूनच घोटाळ्यांना चालना मिळत असून, पंचवटी परिसरात रेशनचे धान्य रिक्षामधून खासगी बाजारपेठेत आणले जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. इ पॉसद्वारे ५० टक्के व्यवहार करणाऱ्या सर्वच दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तहसीलदारांसह पुरवठा निरीक्षकांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निसुरक्षेचे वावडे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होत असून, क्लासेसला अग्निसुरक्षेचे वावडे असल्याचे रविवारी अधोरेखित झाले.

क्लास संचालकांच्या बैठकीत अग्निसुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. क्लासच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. त्यामुळेच प्रत्येक क्लाससंचालकांनी एक महिन्याच्या आत अग्निसुरक्षा यंत्रणा बसवावी, असा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला.

सुरतमध्ये कोचिंग क्लासला आग लागून झालेल्या दुर्घटनेत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील क्लासेसमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अग्निशमन यंत्रणा त्यानंतर खडबडून जागी झाली असून, शहरातील क्लासेसचे फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये एक महिन्याच्या आत अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे कारण असे, की सद्यस्थितीत बहुतांश क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नाही. शिवाय क्लासेसमध्ये आगीला बळ मिळेल अशा साहित्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सुरतप्रमाणे शहरात एखादी दुर्घटना घडू नये यासाठी क्लास संचालकांना येत्या महिन्याभरात अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सुरक्षितता मिळावी म्हणून क्लास संचालकांनी खबरदारी घेतली आहे. क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेसह इतर महत्त्वाच्या सुधारणा करण्याच्या सूचना संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.

--

शहरातील एकूण क्लासेस

२००० ते २५००

संघटनेचे सभासद

७०० ते ७५०

शहरातील एकूण विद्यार्थी

५ ते ६ लाख

क्लासेसमध्ये जाणारे विद्यार्थी

४ ते साडेपाच लाख

--

बैठकीतील निर्णय...

- फायर सेफ्टी, फायर एस्टिंग्युशर, फायर बॉल आदी यंत्रणा लावावी

- अग्निसुरक्षा यंत्रणेचा परवाना, अग्निशमन विभागाकडून परवानगी घ्यावी

-क्लासेसमध्ये प्लायवूड किंवा पत्रा वापरून पार्टिशन करू नये

-विद्यार्थीसंख्या मर्यादित ठेवावी

-विद्यार्थी संख्या वाढल्यास वेगळ्या जागेत क्लास घ्यावेत

-विद्यार्थी वर्गात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत

-सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी

-वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा असावी

-मुदतीत फायर सेफ्टीचे ऑडिट करावेच

-अनधिकृत ठिकाणी, टेरेसमध्ये किंवा मिळेल त्या जागेत क्लास घेऊ नये

-पार्किंगसाठी योग्य जागा ठेवावी

-विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतकडे गांभीर्याने लक्ष द्यावे

--

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात क्लासेसच्या संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या क्लासेसमध्ये फायर सेफ्टीची यंत्रणा नव्हती त्यांना महिन्याच्या आत यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले आहे. फायर सेफ्टी उपकरणे खरेदीस मंजुरी देण्यात आली असून, एकाच संस्थेकडून सर्व क्लासेससाठी यंत्रणा बसविण्यात येईल.

-प्रा. जयंत मुळे, अध्यक्ष, जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना

--

विद्यार्थ्यांची सुरक्षा राखण्यासाठी फायर सेफ्टी उपकरणे गरजेची आहेत. त्यांचा वापर करण्यासंदर्भात क्लासेस संचालक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बैठकीत फायर सेफ्टी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंत्रणेची माहिती सर्वांना करवून देण्यात आली आहे.

-प्रा. लोकेश पारख, सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिशादर्शक फलक हवा

0
0

नाशिकरोड : जेलरोड येथील राजराजेश्वरी चौकापुढील भैरवनाथनगर येथील फलक समाजकंटकांनी काढून टाकला आहे. समाजसेवक व गुणवंत कामगार नरेंद्र कलंकार यांच्या निवासस्थानाकडे असे लिहिलेला हा दिशा दर्शविणारा हा फलक होता. तो महापालिकेने लावला होता. परंतु, तो समाजकंटकांनी काढून टाकला आहे. कलंकार यांनी महापालिकेला अर्ज दिला तसेच लोकप्रतिनिधींची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. मात्र, वर्ष होऊनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. हा फलक त्वरित लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध हवेचे ‘गिफ्ट’

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नशिकरोड

सार्वजनिक ठिकाणी हवा शुद्ध करणाऱ्या एअर प्युरिफायर मशिनबाबत अनेकांना फारशी माहिती नसल्याचे दिसते. मात्र, अशा मशिनद्वारे हवा शुद्ध करणे आवाक्यात आलेले असून, नाशिकरोड रेल्वे स्थानकात अशी सहा एअर प्युरिफायर मशिन्स बसविली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना लवकरच शुद्ध हवेचे 'गिफ्ट' मिळणार असून, संबंधित कंपनीचे अधिकारी आज, सोमवारी (दि. २७) सकाळी येथे पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे जगात दर वर्षी ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात बालकांची संख्या लक्षणीय आहे. हवा प्रदूषण शंभर टक्के थांबवित येत नसले, तरी गर्दीच्या ठिकाणची प्रदूषित हवा खेचून ती शुद्ध करणे एअर प्युरिफायरद्वारे शक्य झाले आहे. पुण्यातील युवा संशोधक अमोल चाफेकर यांनी हे मशिन तयार केले असून, त्याचे पेटंटही घेतले आहे.

चाफेकर यांनी 'मटा'ला सांगितले, की इंग्लंड, पोलंड, नेपाळ, मालदीव आदी सहा देशांमध्ये त्यांच्या स्ट्राटा एन्व्हायरो कंपनीने एअर प्युरिफर्स बसविले आहेत. भारतात पुणे व गोवा विमानतळ, कोलकाता रेल्वे स्थानक, बेंगळूरू, ठाणे, दिल्ली, मुंबई येथेही ती बसविण्यात आलेली आहेत. ट्रॅफिक सिग्नल, बस-रेल्वे स्थानक, विमानतळ, टोल नाका, मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, सोसायट्या, पेट्रोलपंप आदी गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावणे उपयुक्त ठरत आहे. एका मशिनची किमत मशिनच्या आकारानुसार एक लाख ते पाच लाखापर्यंत आहे.

कंपनीकडून मोफत उपलब्ध

एअर प्युरिफायरची उंची सहा फूट व रुंदी दीड फूट आहे. जेथे ते लावले जाते तेथील साठ चौरस फुटांतील प्रदूषित हवा खेचून ती शुद्ध करते. दर मिनिटाला २००० क्युबिक फूट हवा एक मशिन खेचून घेते. सहा देशांमध्ये लावलेल्या या कंपनीचे एअर प्युरिफायर्स मिळून दर मिनिटाला तीन लाख साठ हजार क्युबिक फूट हवा शुद्ध करीत आहेत. कंपनी हे मशिन्स मोफत उपलब्ध करते, फक्त ज्या भागात ते लावायचे आहे तेथील प्रशासनाने जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्या मशिनवर प्रायोजक / जाहिरातदारांना त्यांची जाहिरात लावता येईल. त्यातून एअर प्युरिफायरची किंमत व देखभाल खर्च भरून निघेल. अनेक कंपन्या आपल्या सामाजिक निधीतून (सीएसआयआर) प्युरिफायरचा खर्च करू शकतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकसाठीही प्रायोजकांनी पुढे यावे, असे आवाहन रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कुंदन महापात्रा यांनी केले आहे.

बसमागेही बसविण्याचे नियोजन

चाफेकर यांनी सांगितले, की शहर वाहतूक बसच्या मागे एअर प्युरिफायर लावण्यात येणार आहेत. बस जेथे जाईल व थांबेल तेथील हवा बसमागील प्युरिफायर शुद्ध करेल. त्याची चाचणी यशस्वी झाली असून, तसा पायलट प्रोजेक्ट तयार झाला आहे. इंग्लंड सरकारपुढे तसा प्रस्ताव मांडला आहे. भारतातील विविध राज्यांतील परिवहन मंडळांनाही प्रस्ताव सादर केला आहे. अन्य वाहनांवरही प्युरिफायर्स बसविण्याचा विचार आहे.

इंग्लंडसारख्या प्रगत देशातील सरकार व नागरिक प्रदूषणाबाबत जागरूक आहेत. त्यामुळे त्यांनी एअर प्युरिफायरला मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याबाबत उत्सुकता दर्शविली आहे. सामाजिक संस्था, कंपन्यांनी पुढे येऊन पोल्युशनऐवजी सोल्युशनचा भाग व्हावे. -अमोल चाफेकर, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ दुचाकीस्वार अखेर सापडला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चेन स्नॅचिंगचा प्रयत्न, तसेच एका विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' दुचाकीस्वाराचा छडा लावण्यात भद्रकाली पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

काठे गल्ली परिसरात काही दिवसांमध्ये या घटना घडल्या होत्या. त्यातील एक घटना शनिवारी (दि. २५ मे) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. माणेकशानगर येथील रवींद्र विद्यालयाजवळ राहणाऱ्या धनश्री गौरव काळे या मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. एलआयसी गेस्ट हाऊसजवळ अॅक्सीस या दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत काळे यांच्या गळ्यातील चेन बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काठे गल्ली परिसरातच राहणाऱ्या २१ वर्षांच्या विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना ३ मे रोजी घडली होती. संबंधित विवाहिता साईकृपा गॅरेजसमोरून एकटी पायी जात असताना हा प्रकार घडला होता. शाळेचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेजवळ पोहोचलेल्या अॅक्सीस या दुचाकीवरील चालकाने या महिलेचा विनयभंग केला होता. या दोन्ही घटनांमुळे काठे गल्ली परिसरात खळबळ उडाली होती. विशेषत: महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले होते.

--

संशयितांकडून गुन्ह्यांची कबुली

दोन्ही महिलांकडून एकाच वर्णनाच्या व्यक्तीची माहिती पोलिस तपासात देण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसुद्धा एकच निघाल्याने भद्रकाली पोलिसांनी आपला मोर्चा काठे गल्ली परिसराकडे वळविला. त्यात सदर संशयित वाहन वापरणाऱ्या व्यक्तीची माहिती समोर आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, निरीक्षक अंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले, हवालदार शेरखान पठाण, चालक फरीद इनामदार, कॉन्स्टेबल समाधान गायकवाड, प्रकाश ढेरिंगे, गणेश निंबाळकर आदींनी शिताफीने या संशयितास ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास लागला असून, महिलांनी भीती बाळगू नये, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटीतील ३९ हरकतींवर सुनावणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडून दाखल ४० पैकी ३९ हरकतींवर अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर सोमवारी सुनावणी झाली. एक हरकतदार सुनावणीस गैरहजर राहिला. आज, मंगळवारी सिडकोतील हरकतींवर सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळे जाहीर करीत त्यांच्यावर हरकती घेण्याचे आवाहन विश्वस्तांना केले होते. या मुदतीत ६४७ पैकी १८४ धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडून पालिकेकडे हरकती दाखल करण्यात आल्या. या हरकतींवर २१ मेपासून अतिरिक्त आयुक्त फडोळ यांच्या समितीसमोर विभागनिहाय सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत नाशिक पूर्व विभागातील ४०, नाशिकरोड १०, नाशिक पश्चिम विभागातील १५, सातपूरमधील ३१ हरकतींवर सुनावणी झाली. सोमवारी पंचवटीतील ४० हरकतींवर सुना‌वणी घेण्यात आली. यावेळी ४० पैकी ३९ हरकतदारांनी उपस्थित राहून बाजू मांडली. एका हरकतदाराने सुनावणीकडे पाठ फिरवली.

...

सिडकोतील हरकतींवर आज सुनावणी

आज, मंगळवारी सिडको विभागातील ४० हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. सिडकोतील सुनावणी ही २३ मे रोजी ठेवण्यात आली होती. परंतु, निवडणूक लढवत असलेल्या सुधीर देशमुख या उमेदवाराने लोकसभेच्या मतमोजणीचे कारण सांगत हरकत पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार सिडकोतील सुनावणी आज होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

0
0

हरकतीनंतर वाढले १५३४ मतदार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० 'ड'च्या रिक्त जागेसाठी येत्या २३ जून रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकत मान्य केल्यानंतर अंतिम मतदार यादीतील मतदार संख्या १,५३४ ने वाढली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत आता २८ हजार ५५२ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांचे जुलै २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १० 'ड' मधील रिक्त जागेसाठी येत्या २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या कार्यक्रमानुसार १७ मे रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर करीत त्यावर २१ मेपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या मुदतीत बाळा निगळ यांची एकमेव हरकत प्राप्त झाली. मतदार यादीत भाग क्रमांक ९०, ९१, ९२ व ९३ चा समावेश करण्याची सूचना निगळ यांच्या या हरकत अर्जाद्वारे करण्यात आली होती. त्यांच्या अर्जावर तथ्य आढळल्याने मतदार यादी भाग क्रमांक ९०, ९१, ९२ व ९३ मधील तब्बल १,५३४ मतदारांचा समावेश करीत मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार प्रभाग क्रमांक १० मधील तब्बल २८ हजार ५५६ मतदारांना या पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये १५,७४८ पुरुष, तर १२,८०४ स्त्री मतदारांचा समावेश आहे. येत्या ३० मे रोजी या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

...

बिनविरोधसाठी प्रयत्न

भाजपने ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून नागरे यांच्या कुटुंबातील उमेदवारच रिंगणात उतरवला जाणार आहे. त्यामुळे अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये यासाठी इतर पक्षांशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस या पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे.

...

संपर्कप्रमुख घेणार निर्णय

प्रभाग क्र. १३ प्रमाणेच प्रभाग क्र. १० च्या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा, की नाही याबाबतचा शिवसेनेचा निर्णय संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी घेणार आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबतचा एक अहवाल संपर्कप्रमुखांकडे पाठवला आहे.

...

पुरुष मतदार : १५,७४८

महिला मतदार : १२,८०४

एकूण मतदार : २८ हजार ५५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता संपुष्टात!

0
0

महापालिका तीन महिन्यांनंतर गजबजली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी (ता. २६) संपुष्टात आल्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांचे वाहने परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहनांसोबतच लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातील दूरध्वनीही सुरू करण्यात आले आहेत. लोकसभेपाठोपाठ ऑक्टोबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या आचारसंहितेपूर्वी नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी नगरेसवकांची लगबग सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातच निवडणुका झाल्या असल्या तरी देशभरात सात टप्प्यात निवडणुका असल्याने तेवढा काळ आचारसंहिता लागू करण्यात आली होती. दुष्काळी कामांसाठी काही प्रमाणात आचारसंहिता शिथील करण्यात आली होती. आचारसंहिता संपुष्ष्टात आल्याने सोमवारच्या दिवशी महापालिका गजबजली होती. चार महिन्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे पुन्हा दोन महिने आचारसंहितेत जाण्याची शक्‍यता असल्याने त्यादृष्टीने नगरसेवकांनी आताच फायलींचा निपटारा करण्यासाठी पालिकेत गर्दी केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत विकासकामांचा नारळ फोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक वाचलेली बातमी

0
0

नोकरीच्या शोधात होती, खासदार झाली!

इंजिनीअरिंगनंतर नोकरीच्या शोधात असलेल्या चंद्राणी मुर्मू यांना बीजू जनता दलाने लोकसभेचं तिकीट दिलं आणि त्या चक्क निवडूनही आल्या. ओडिशातील २५ वर्षीय चंद्राणी आता लोकसभेतील सर्वात तरुण खासदार असतील.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तू भोकनळचा अटकपूर्व जामीन मंजूर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजुर केला आहे. भोकनळच्या जामीन अर्जावर मात्र निर्णय बाकी असून, बुधवारी (दि. २९) त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने भोकनळविरोधात तक्रार दिली आहे. विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आशा दत्तू भोकनळ असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सध्या नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या आशा भोनकळ यांच्या तक्रारीनुसार दत्तूविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात १६ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ यादरम्यान ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. याचदरम्यान दोघे आडगाव येथील नाशिक पोलिस मुख्यालय आणि पुण्यात एकमेकांना भेटले. यावेळी दत्तूने आशा यांच्याशी विवाह केला. मात्र, या विवाहाची माहिती त्याने नातेवाइकांना दिली नाही. त्यामुळे सर्वांसमक्ष विवाह करण्यासाठी आशा यांनी तगादा सुरू केला. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी विवाह ठरला होता. लग्नाची तयारी सुरू असताना दत्तूने काही तरी कारण सांगून हा विवाह पुढे ढकलला. असाच प्रकार पुन्हा काही दिवसांनीसुद्धा झाला. आपली फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने आशा यांनी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीसह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार फिर्याद दिली. या वृत्ताने नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली. याबाबत दत्तू भोकनळने सर्व आरोप फेटाळून लावत अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. अॅड. जगदीश वैशंपायन, अॅड. चार्वाक कांबळे, अॅड. अजित सोनवणे, अॅड. स्वप्निल रायते यांनी भोकनळची बाजू मांडली. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने सोमवारी भोकनळचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी दत्तूने कोर्टात अर्ज दाखल केला असून, त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या शब्दसुमनातील ‘बागेश्री’ची अखंड गीतांजली

0
0

नाशिक :

स्वातंत्र्य लढ्यात आपले समर्पण करणारे सावरकर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते, तर एक उत्तम साहित्यिक, संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित, महाकवी होते. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत गीतांतून गेली २६ वर्षे त्यांना अभिवादन करण्याची अनोखी सेवा बागेश्री वाद्यवृंद करीत आहे. स्वा. सावरकर यांची जयंती आणि आत्मसमर्पण दिवस या दोन दिवशी भगूरला त्यांच्या वाड्यामध्ये संगीताची अनोखी मैफल अखंडपणे करणारा असा वाद्यवृंद विरळाच.

सागरा प्राण तळमळला या शीर्षकाने गेल्या २६ वर्षांपासून विनामूल्य संगीत मैफल करण्याची प्रेरणा

'माझी जन्मठेप' आणि 'काळ्यापाण्याची शिक्षा' ही सावरकरांची प्रेरणादायी पुस्तके तसेच अन्य नामवंत लेखकांनी सावरकरांच्या संघर्षमय जीवनावरील संपादित केलेली पुस्तके वाचल्यानंतर संगीतप्रेमी चारुदत्त दीक्षित यांना कल्पना सुचली. ज्येष्ठ भावगीतगायक मोहनराव करंजीकर आणि प्रख्यात व्हायोलिनवादक मधुकर ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मे १९९३ मध्ये प्रथम सावरकरांच्या वाड्यात गाण्यांचा कार्यक्रम करण्यात आला.

पुढे राष्ट्रीय सावरकर समितीचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर मृत्युंजय कापसे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघचालक एकनाथ शेटे, रामदास आंबेकर, विलास कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळे व संस्कार भारतीच्या काही कलाकारांच्या समवेत भगूरमध्ये सावरकरांच्या संगीत कार्यक्रमांना सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत गेला. वर्षातून दोन वेळा म्हणजे २६ फेब्रुवारी, सावरकरांचा आत्मसमर्पण दिवस व २८ मे, सावरकर यांची जयंती अशा प्रसंगी आतापर्यंत जवळपास ३५० कलाकारांनी सावरकरांना अभिवादन केले आहे. सावरकरांची 'जयोस्तुते श्री महन्मंगले', 'ने मजसी ने परत मातृभूमीला' ही लोकप्रिय गाणी सर्वांनाच माहीत आहेत, परंतु सावरकरांनी विविध प्रसंगांत पोवाडे, लावण्या, आरती, अभंग, नाटकातून समाज प्रबोधनपर राष्ट्रप्रेम जागृत करणारे नाट्यपदे, देशभक्तिपर गाणी रचली आहेत. त्यामुळे दीक्षित यांनी सावरकरांच्या स्नेहीजनांशी संपर्क साधून सावरकरांनी लिहिलेली गाणी उपलब्ध करून घेतली व मोहन करंजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सव्वीस वर्षांपासून हा कार्यक्रम अखंड सुरू ठेवला आहे.

'बागेश्री'चा अनोखा विक्रम

बागेश्री वाद्यवृंदांनी आतापर्यंत २६ वर्षे अखंड ही गीतांजली सुरू ठेवली असून, ५१ गीतवंदना झाल्या आहेत. आतापर्यंत ३५० कलाकार व वादकांनी ही सेवा दिली असून, ५०० गाणी सादर केली आहेत. या कार्यक्रमात गीते सादर केलेली अनेक बालकलाकार आता स्वतंत्रपणे सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम करीत आहेत. सावरकरांचे वर्णन स्वातंत्र्यवीर म्हणून सगळीकडे येते, परंतु त्यांनी साहित्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी लिहिलेली संस्कृत, मराठी गाणी प्रेक्षकांसमोर सादर करताना अतिशय आनंद होतो. - चारूदत्त दीक्षित, संस्थापक, बागेश्री वाद्यवृंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीपी’ विरोधावर जागामालक ठाम

0
0

- बाधित ३५० शेतकऱ्यांचा जागा देण्यास नकार

- विरोधाच्या सावटाखाली आज योजनेचे सादरीकरण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानातील हरित क्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात नगररचना परियोजना (टीपी स्कीम) राबविण्यासाठी एकीकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने लगीनघाई सुरू केली असली तरी, या टीपी स्कीमच्या विरोधावर शेतकरी अद्यापही ठाम आहेत. टीपी स्कीमच्या लाभाबाबत आज (दि. २८) दुपारी ४ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात प्रारूप आराखड्याच्या सादरीकरणाची तयारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली असतानाच साडेतीनशे शेतकऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे स्मार्ट परियोजनेसमोरील अडथळे कायम आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकर क्षेत्रावर स्मार्ट नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीम प्रस्तावित आहे. परंतु, संमती न घेताच टीपी स्कीम उभारणीला स्थानिक शेतकऱ्यांचा पहिल्या दिवसापासून विरोध होत आहे. शेतकऱ्यांची संमती न घेताच महासभेवर टीपी स्कीमचा इरादा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी या विरोधात रान उठवले होते. त्यामुळे कंपनी तसेच आयुक्तांनी शेतकऱ्यांची मनधरणी केली होती. अहमदाबाद दौऱ्यानंतर आयुक्तांनी जागामालक शेतकऱ्यांची कशीबशी मनधरणी करून जागेचे सर्वेक्षण स्मार्ट कंपनीमार्फत पूर्ण करून घेतले होते. जागामालकांना अधिकाधिक मोबदला मिळावा, यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मध्यस्थी करीत तीन प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर मांडले. परंतु, हे प्रस्ताव शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेच नव्हते. परंतु, माध्यमांमध्ये सदरचे प्रस्ताव आल्यानंतरही शेतकरी विरोधावर ठाम राहिले. या प्रस्तावातील तरतुदी पाहता, त्या जागामालकांसाठी नुकसानीच्याच असल्याचा दावा करीत हे तीनही प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार सर्वसाधारण जागा विकसित केल्यास १०० टक्के मोबदला मिळतो, तर ५५ टक्के जागेसाठी ४५ लाख रुपये शेतकऱ्यांनी कशासाठी मोजायचे, असा प्रश्न जागामालक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रस्तावित क्षेत्रावरील घरे, विहिरी, बागायती क्षेत्राच्या नुकसानीबाबत कुठलाही बोध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी जागा देण्यास आपला विरोध आहे. तरीही येत्या महासभेवर पुन्हा कंपनीच्या वतीने इरादा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आज, मंगळवारी या प्रस्तावांचे सादरणीकरण ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी या क्षेत्रातील ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत टीपी स्कीमला आपला विरोध असल्याचे पत्र महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांना दिले आहे. दि. १९ जानेवारी २०१९ रोजीचा महासभेचा ठराव क्रमांक २३२ व त्यापूर्वीचा महासभा ठराव क्रमांक ६०६ व ७७६ ही रद्द करण्यात यावा, अशी मागणी जागामालक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे टीपी स्कीमचे भवितव्य पुन्हा अडचणीत सापडले आहे.

...

परस्पर निर्णय घेतात

स्मार्ट सिटी कंपनीने जागेचे सर्वेक्षण केल्यानंतर काय मोबदला मिळेल याची माहिती सर्वप्रथम शेतकऱ्यांना द्यायला हवी होती. परंतु, तसे न करताच परस्पर महासभेवर पुन्हा इरादा प्रस्ताव ठेवला आहे. यापूर्वीही महासभेवर प्रस्ताव ठेवताना जमीनमालकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी वारंवार फसवणूक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रस्तावित क्षेत्रातील अनेक जागांचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत काय निर्णय घेतला जाईल, याची कुठलीही माहिती स्मार्ट अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. कंपनीच्या आजवरचा कारभार पाहता एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या यशस्वीतेबाबत शाश्वती नाही, अशी भीती जागामालक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेस लढणारपोटनिवडणूक बिनविरोध

0
0

राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

पोटनिवडणूक बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असले तरी ही जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पपया नर्सरी येथे पार पडली. यावेळी उमेदवारी कोणीही असला तरी त्यास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणिस नाना महाले यांनी केले. राष्ट्रवादीकडून दत्तू वामन, संदीप पवार, नितीन निगळ, बाळासाहेब जाधव, क्रांती पालवे आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे यांच्या आघाडीची शक्यता गृहीत धरून पोटनिवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारीही काहींनी केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मधुकर मौले, सातपूर विभागाचे अध्यक्ष जीवन रायते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकरांचा पाण्यासाठी टाहो १

0
0

मनमाडकरांचा

पाण्यासाठी टाहो

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

मनमाड शहरातील भीषण पाणीटंचाईने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपल्याने मनमाडकरांच्या तोंडचे पाणी पळाले असून, त्याची दखल घेतली जात नसल्याने सोमवारी मनमाडच्या पाणीप्रश्नांवर पहिल्यांदाच खासदार धावून आल्या, त्यांनी आपला रौद्रावतार दाखवत या प्रश्नांचे गांभीर्य प्रशासनाच्या नजरेत आणून दिले.

वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपल्याने शनिवारपासून नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे मनमाडचे स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी आले होते. पाणीप्रश्नाबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाडकरांना तातडीने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देऊ, तसेच येत्या २ जूनपासून पालखेडमधून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले जाईल, अशी ग्वाही मनमाडमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली.

बैठकीला नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार आल्या व त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना रडारवर घेत त्यांची खरडपट्टी केली. खासदारांच्या या रौद्रवतारानंतर मनमाडहून आलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही हायसे वाटले. पाणीप्रश्न इतका गंभीर झाल्यानंतर त्याची आतापर्यंत प्रशासन दखल घेत नव्हते. पण, आता तसे चालणार नाही. याची चाहुलही डॉ. पवार यांनी दाखवून दिली.

सविस्तर पान ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’कडून साहित्य संमेलसाठी प्रस्ताव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे व्हावे यासाठी औरंगाबाद येथे मराठी साहित्य महामंडळाला सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांची 'सावाना'च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

नाशिकबरोबरच उस्मानाबाद, लातूर व विदर्भाचा प्रस्ताव महामंडळाकडे आला आहे. अजूनही काही प्रस्ताव येणार आहेत. या सर्व प्रस्तावांवर ३० जून रोजी महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या अध्यक्ष ठाले-पाटील यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, संजय करंजकर, डॉ. शंकर बोऱ्हाडे, डॉ. धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, अॅड. अभिजित बगदे, कवी किशोर पाठक, बी. जी. वाघ आदी उपस्थित होते. नाशिक येथे याअगोदर दोन साहित्य संमेलने झाली आहेत. त्यामुळे महामंडळाने प्रस्ताव मान्य केल्यास हे तिसरे संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्याची मोठी परंपरा नाशिकला असल्यामुळे महामंडळ प्रस्ताव मान्य करेल, अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

--

यापूर्वीही यशस्वी आयोजन

मराठी साहित्य महामंडळातर्फे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे या महामंडळाला वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. १९४२ मध्ये नाशिक येथे साहित्य संमेलन झाले. त्यानंतर ६३ वर्षांनी दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्या पुढाकाराने २००५ मध्ये शहरात साहित्य संमेलन झाले. त्यानंतर आता बारा वर्षांनी 'सावाना'ने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या खांबास टाकळीत आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

टाकळीरोडवरील पथदीपास दुपारी अचानक आग लागली. तेथून जाणारे पंचक येथील नागरिक योगेश मुळाणे यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने पावले उचलल्याने दुर्घटना टळली. मात्र, काही झाडे व चारा जळाला. सुदैवाने शेजारील ऊसाच्या पिकाला धोका पोहचला नाही.

टाकळीरोडवरील क्षीरसागर फार्म नजीकच्या जुन्या पथदीपाला अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे. तेथून जाणारे योगेश मुळाणे यांना आग लागल्याचे दिसले. त्यांनी नगरसेवक शरद मोरे, सचिन हांडगे यांना ही माहिती दिली. हांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला कळवले. या दलाचे जवान येईपर्यंत आग भडकली होती. जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. शेजारी ऊसाचे पीक व झाडे होती. काही झाडांना हानी पोहचली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांत पावसाळी जलपुनर्भरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पावसाळी जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हा उत्तम पर्याय आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये 'रोल मॉडेल' म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी दिली.

तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजना, टँकरची मागणी नागरिकांनी करणे योग्यच आहे. परंतु, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच अधिकाधिक पाण्याचे संवर्धन करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. मनमाडमधील किती रहिवाशांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे, असा सवाल जिल्हाधिकारी मांढरे यांनी सोमवारी मनमाडमधील शिष्टमंडळाशी चर्चा करताना उपस्थित केला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या प्रयोगांद्वारे प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. जेथे पाण्याचा घरगुती वापर अधिक असतो तेथे प्रामुख्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हवे. सरकारी कार्यालयांमध्ये पाण्याचा किती वापर होतो हा मुद्दा असला, तरी तेथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे शक्य आहे. यंदा जिल्ह्यातील सरकारी इमारतींच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाईल, अशी ग्वाही मांढरे यांनी दिली. इमारत बांधणीला परवानगी देताना कोणते नियम लावावेत, याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतो. त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आग्रह धरावा, अशी सूचना सर्व नगरपालिकांना दिली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images