Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रदूषण ठरतेय वटवाघुळांसाठी हानिकारक

$
0
0
सर्वत्र दुर्मिळ होत चाललेल्या वटवाघुळांचे सटाणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील जुनाट झाडांवरील वास्तव्य अजून कायम आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि राज्यमार्गाला लागून असलेल्या या परिसरातील प्रदूषण वाढले आहे. यामुळे वटवाघुळांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

जळगावच्या २५ डाळ मिल्सला संजीवनी

$
0
0
काही वर्षांपूर्वी जळगाव शहरात डाळ प्रक्रिया उद्योग बहरला होता. मात्र, डाळींची निर्यात बंद केल्यामुळे यातील ४० डाळ मिल बंद पडल्या होत्या. मात्र, आता सरकारने निर्यातबंदी उठविल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेल्या ४० मिल्सपैकी २५ मिल्स पूर्ववत सुरू होणार आहेत.

उत्तर विभागाकडे नाही टोलवसुलीचे अपडेटस्

$
0
0
जळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी टोल वसुली होत असून, या बाबतची अद्ययावत माहितीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाकडे नसल्यामुळे या खात्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. तथापि, जळगाव विभागाकडे सर्व माहिती उपलब्ध असल्याचे दिसून आले.

रोजगार मेळाव्याचे आयोजन

$
0
0
ज‌िल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आण‌ि औद्योग‌िक प्रश‌िक्षण संस्था, उमराळे यांच्या वतीने मंगळवारी (द‌ि.११) एक द‌िवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

केळझरच्या पाण्यावरून संघर्ष

$
0
0
धरणातून खाजगी मालकीच्या पाईपलाईनला परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याने केळझरचे पाणी पुन्हा एकदा पेटले आहे.

‘भुजबळांना विचारांचा लकवा मारलाय का’

$
0
0
'राज्यात आपली सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आपल्याकडे बघायला तयार नाही. पालकमंत्री छगन भुजबळ मनमानी कारभार करतात, आमच्या जीवावर सत्ता उपभोगत असतानाही काँग्रेसच्या मतदारसंघातील कार्यक्रमात काँग्रेसच्याच पदाधिका-यांना वगळतात' असे आरोप करत 'एरवी वैचारीक गप्पा मारणा-यांच्या विचारांना लकवा मारलाय का' असा टोला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी 'राष्ट्रवादी'सह पालकमंत्री भुजबळ यांना लगावला.

आमच्या अस्तित्वाला आव्हान देऊ नका

$
0
0
'खालचा थर लावल्याशिवाय हंडी फोडता येत नाही, नाशिकमध्ये खालचा थर काँग्रेसचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सतत गृहीत धरून आमच्या अस्तित्वाला धक्का देऊ नका' असे थेट आव्हान देत काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार भाई जगताप यांनी 'राष्ट्रवादी'वर शरसंधान साधले आहे.

पालिकेचा रोगापेक्षा इलाज भयंकर

$
0
0
महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठात होणारा प्रस्तावित करार म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या प्रकारातील असल्याची टीका अपक्ष आघाडीचे गटनेते गुरमीत बग्गा यांनी केली आहे.

मनसेचा 'पुणे पॅटर्न' नाशिकमध्येही

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील संघटनात्मक बळकटी वाढविण्यासाठी 'मनसे'तर्फे(महाराष्ट्र नवनिर्माण सेना) कार्यकारिणी विस्तारावर भर दिला जातो आहे. नाशिक शहरातील मुख्य कार्यकारिणीपाठोपाठ महिला सेनेची कार्यकारिणी 'मनसे'कडून जाहीर करण्यात आली आहे.

काँक्रिट काढा अन् स्लॅबही टाका!

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पात्र काँक्रिटीकरणाद्वारे बंद करण्यात आल्याच्या प्रश्नाने आता वाद-विवादांचे स्वरुप प्राप्त केले असले तरी शिवसेनेच्या युवा सेनेने मात्र अजब मागणी करून त्यांची विद्वत्ता सर्वांसमोर आणली आहे.

तडकाफडकीची पनिशमेंट!

$
0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी विलास पाटील यांची नियुक्ती होऊन अठरा महिन्यांचा कालावधी होत नाही तोच पाटील यांना वेटिंगवर जावे लागणे आणि बी राधाकृष्णन यांना नाशकात धाडण्यात येणे हा काही योगायोग नाही.

घाईघाईत मराठा समाजावर अन्याय?

$
0
0
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात जलद सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला असला तरी अशा प्रकारच्या जलद कारभारातून मराठा समाजावर अन्याय होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, सरकारी अधिकाऱ्यांनीही या सर्वेक्षणाबाबत साशंकता उपस्थित केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

$
0
0
राज्य सरकारने जिल्हाधिकारी विलास पाटील यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली केली असून जालना जिल्हा परिषदेचे सीईओ बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांना कुठलीही नियुक्ती देण्यात आलेली नसून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

घरासाठी गरिबांना नरकयातना

$
0
0
‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे गमतीने म्हटले जाते. मात्र यातील गांभीर्य लग्न करणाऱ्यास आणि घर बांधणाऱ्यास नक्कीच कळते. पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेला मात्र यातील गांभीर्यापेक्षा कोट्यवधी रुपयांच्या निधीत रस असल्याने आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असलेल्या हजारो नागरिकांना छळछावणीत अक्षरशः जीवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

भाड्याच्या गोडावूनमध्ये चालतो कारभार

$
0
0
नविन नाशिक म्हणून नव्याने ओळख झालेल्या सिडकोत पोस्ट ऑफिस सिडकोच्याच गोडाऊनमध्ये भाड्याने चालविले जात आहे. तसेच त्रिमूर्ती चौकातील पोस्ट ऑफिसच्यावर इमारतीला प्रवेशद्वारच नसल्याने मद्यपींचा अड्डा तयार झाला आहे.

तोरणानगरमधील रस्त्याची दुरवस्था

$
0
0
सिडकोतील सर्वात जुना असलेल्या तोरणानगरमधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच वीस वर्षांपूर्वी केलेले रस्ते पूर्णपणे उखडले असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. महापा‌लिकेने या भागाकडे लक्ष देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद विस्मरणात

$
0
0
शहरात छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांपासून विविध व्यक्तींचे वाढदिवस, जयंती उत्साहात साजऱ्या होतात. मात्र ब्रिटीशकाळात डफ व तबल्याच्या तालावर जनमाणसांत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या कवी गोविंद यांचा त्यांच्या १४० व्या जयंतीदिनी नाशिकसह संपूर्ण राज्याला विसर पडला आहे.

‘पुनद’चे निर्बंध उठणार

$
0
0
पुनद धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या कळवण आणि देवळा तालुक्यातील ६८ गावांच्या जमिनींवर लादण्यात आलेले निर्बंध तब्बल १९ वर्षांनी उठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवीन वीजजोडणी ऑनलाइन करणे बंधनकारक

$
0
0
विजेची नवीन जोडणी मिळण्यात ग्राहकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महावितरणने ही जोडणी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने महावितरणने यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची ‌कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नवनवीन संकल्पना पहिल्यांदाच फेस्टिव्हलमध्ये

$
0
0
इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हल १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणार असून देशभरातील वायनरींनी यात सहभाग घेतला आहे. तसेच, केंद्रीय फळ प्रक्रिया मंत्रालयापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळापर्यंत अनेकांनी त्यास पाठिंबा दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images