Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पांडव लेणी प्लास्टिकच्या विळख्यात

$
0
0
शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या पांडव लेण‌ी डोंगराभवती शहरीकरण वेगाने सुरू आहे. याचा विचार करून लेणीच्या डोंगराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पर्यटकांकडून टाकल्या जात असलेल्या प्लॅस्ट‌िकच्या कचऱ्याचीही समस्या डोके वर काढू लागली असून यामुळे डोंगरावरील दुर्मिळ वृक्षवेली धोक्यात आली आहे.

बोगस मेलद्वारे उद्योग भूखंड विक्री

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी ५० हजार रुपयांची रक्कम भरण्यात यावी, अशा प्रकारचा इ मेल उद्योजकांमध्ये शनिवारी विशेष चर्चेचा ठरला. याप्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे विचारणा केली असता तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पौर्णिमेला मंगळसूत्र 'सुरक्षित'

$
0
0
वट पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग घराबाहेर पडतो. चेन स्नॅचर्ससाठी वटपोर्णिमेबरोबर भाऊबीज, रक्षाबंधन हे दिवस पर्वणी समजले जातात. मात्र, यावेळेस पोलिसांनी सकाळपासून चोख बंदोबस्त ठेवत स्नॅचर्सला रोखले.

मारहाणीनंतर तेल व्यापाऱ्याची लूट

$
0
0
अडीच कोटी रूपये देणे बाकी असलेल्या एका व्यापाऱ्याने त्याच्या साथीदारासोबत नाशिकरोड येथील तेल व्यापाऱ्यास मारहाण करून त्याच्याच खिशातील रोख रक्कम काढून घेत, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारास अटक करून गुन्ह्याची नोंद केली आहे.

आईच्या डोळ्यात उरलं फक्त पाणी

$
0
0
उत्तराखंडमधील जलप्रयलातून बचावलेले आईबाबा नाशिकमध्ये सुखरूप परतले अन् त्यांना पाहताच मायलेकरांच्या आसवांचा पूर थांबता थांबला नाही.

शाळा सुरू पण, पुस्तके हाती लागेना

$
0
0
शाळा सुरू होऊन आठवड उलटला तरी दुसरीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. या आठवड्यातसुध्दा ही पुस्तके उपलब्ध होणार नसून बालभारतीमध्ये संबंधित पुस्तके दाखल व्हायला पुढचा आठवडा उजाडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘त्या’ विद्यार्थीनीला शाळेने दिला दाखला

$
0
0
फी भरण्यासाठी गेलेल्या पालकांची अडवणूक करणाऱ्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने संबंधित विद्यार्थीनीचा दाखला इ मेलच्या माध्यमातून पाठविल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही शाळेने एका विद्यार्थीचा दाखला दिला असून ही महिनाभरातील दुसरी घटना घडली आहे.

व्हॉट सावित्री?

$
0
0
वटपौर्णिमा हा महाराष्ट्राचा पारंपरिक सण. यादिवशी बायका नटूनथटून पारंपरिक वेश परिधान करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. त्यांचा हा कार्यक्रम अगदी दिवसभर चालतो. हे दृश्य आपल्या येथील माणसाला अजिबात अचंबित करणारे नाही.

नाटक आधी मनोमंचावर दिसावं लागतं

$
0
0
‘कोणत्याही नाटककाराला नाटक आधी मनोमंचावर दिसावं लागतं, त्याशिवाय ते रंगमंचावर येतच नाही. मला नाटक दिसतं, त्याची आरेखनं स्पष्ट होतात मगच ते कागदावर येतं,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार व ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहसंपादक जयंत पवार यांनी केले.

शंभर हातांनी लावली हजार झाडे

$
0
0
वृक्षरोपणाचा ध्यास घेतलेल्या शेखर गायकवाडांनी नाशिक-सिन्नर मार्गावर शंभर जणांनी दोन दिवसात एक हजार झाडे लावण्याचा विक्रम केला आहे.

आयुक्त, तुम्हीच आता खमके व्हा !

$
0
0
‘नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी गोदावरी अजूनही प्रदूष‌ितच आहे. शहरात झालेले प्लास्ट‌िकचे प्रदूषण, शहराच्या सौंदर्याला होर्डींग्जने घातलेले विळखे.

बनावट मेलद्वारे भूखंड विक्रीला

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी ५० हजार रुपयांची रक्कम भरण्यात यावी, अशा प्रकारचा इ मेल उद्योजकांमध्ये शनिवारी विशेष चर्चेचा ठरला.

केमिस्ट दुकानांचे हाफ डे आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनची राज्य सरकारशी सुरु बोलणी फिसकटल्याने आजपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने दुपारी दोन ते रात्री दहा या कालावधीतच सुरु राहणार आहेत.

हजारांवर खड्ड्यांची डागडुजी

$
0
0
मान्सुन पूर्व पावसामुळे तसेच मान्सुनच्या आगमनानंतर एक-दोनदा झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली होती. ही स्थ‌िती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहाही विभागातील तब्बल १ हजार २७२ ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी केली. पाऊस सुरू झाला असला तरी आगामी काही दिवसात डागडुजीची सर्व कामे पूर्ण करणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

ती बंगाली मुलगी कोण?

$
0
0
उत्तमनगर परिसरातील सर्व्हेश्वरनगर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अंबड पोलिसांनी केली. ज्या घरात ती मुलगी होती ती महिला फरार झाली असून मुलीलाही योग्य माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे त्या अल्पवयीन मुलीबद्दल रहस्य कायम असून शहरात चोरीछुपे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर ​शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

दिंड्यांना टोल माफी!: भुजबळ

$
0
0
राज्यभरात ज्या दिंड्या निघतात त्यांना संपूर्ण टोल माफ करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते, याबाबत त्यांनी रविवारी जाहीर घोषणा केली. दिंड्यांसोबत अनेक वाहने असतात, या वाहनांना टोल माफ करण्यासंदर्भात टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांना आदेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

रस्त्यावरील चेंबरची टांगती तलवार

$
0
0
शहरांतर्गत रस्ते हे प्रत्येक शहराच्या पायात सुविधांचा एक भाग असतात. नाशिक शहराचा विचार करता लोकसंख्या आता १६ लाखाहून अधिक आहे. ज्या तुलनेत लोकसंख्येत आणि वाहनांच्या संख्येत वाढ होते आहे. त्या तुलनेत शहरांतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण होताना दिसत नाही.

मनसेबाबत चर्चा थांबवा, नाहीतर...

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येणार की नाही, याविषयीची चर्चा मी थांबवायला सांगितली आहे. एवढं होऊनही या चर्चा थांबणार नसतील, तर संबंधित पक्षाच्या नेत्यांची माझ्याशी जी चर्चा झालेय ती उघड करावी लागेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजपनेत्यांना, त्यांचं नाव न घेता दिला.

पंचक गाव दोन वर्षापासून अंधारात

$
0
0
महापालिकेने शहराच्या काही भागातील जुने पथदिप काढून नवे पथदिप लावण्याचा सापाटा लावला होता. दोन वर्षापूर्वी जेलरोडच्या पंचक परिसरातील जुने पथदिप बंद करण्यात येऊन तेथे नवीन पथदिप बसविण्यात आले; परंतु ते सुरु न केल्याने हा परिसर दोन वर्षापासून अंधारात आहे.

केमिस्टचे आंदोलन सुरु

$
0
0
दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच दुकाने सुरु ठेवण्याच्या आंदोलनाला औषध विक्रेता संघटनेने सोमवारपासून प्रारंभ केला आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील बहुतांश औषध दुकाने बंद होती. माहिती नसल्याने अनेक पेशंटला मोठा त्रास सहन करावा लागला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images