Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वणीत २१ जूनपासून आदिशक्ती पूजा

$
0
0

नाशिक : सहजयोग परिवाराच्या वतीने २१ ते २३ जूनदरम्यान सप्तशृंगगडावर श्री आदिशक्ती पूजा महोत्सव होणार आहे. २१ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वागत व नोंदणी, सकाळी ११ वाजता जागतिक योगदिन कार्यक्रम, दुपारी ३ वाजता सप्‍तशृंगी देवीदर्शन व रात्री ८ वाजता सहज संगीत कार्यक्रम होणार आहे. २२ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ प्रचार-प्रसार, दुपारी ४ ते सायंकाळी ७ विश्‍वशांती हवन, सायंकाळी ७ ते रात्री ८ सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ९ नंतर भजनसंध्या हे कार्यक्रम होतील. २३ जून रोजी सकाळी १० वाजता पालखी सोहळा, सकाळी ११ वाजता आदिशक्ती पूजा व दुपारी ३ वाजता महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईटीसाठी

$
0
0

प्रेस कामगार सोसायटीला

यंदा साडेचार कोटींचा नफा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेस कामगारांच्या सोसायटीच्या सभासदांची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. संस्थेचे अध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सचिव विष्णू जगताप, संचालक भगवान मोरे, साहेबराव गाडेकर, गणेश काळे, संदीप गांगुर्डे, मंगला खर्जूल आदी उपस्थित होते. संस्थेला या आर्थिक वर्षात ४.४१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली.

संस्थेचे एकूण भागभांडवल २३.७ कोटी असून, खेळते भांडवल २२२.२१ कोटी आहेत. संस्थेच्या ठेवी १७६.२१ कोटींच्या आहेत. सभासदांच्या सोयीसाठी कर्जाच्या व्याजाचा दर एक टक्का कमी करून तो दहा टक्के करण्यात आला आहे. कर्जमर्यादा दहा लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आकस्मिक कर्ज वीस हजारांवरून पन्नास हजार करण्यात आले आहे. अल्पमुदतीसाठी मूळ पगार व महागाई असे नवे कर्ज सुरू करण्यात आले. ११३.९१ कोटींची कर्जे सभासदांना आतापर्यंत वितरित करण्यात आली आहेत. एनपीएचे प्रमाण शून्य आहे. कार्यकारी मंडळाच्या खर्चावर नियंत्रण व बचत यामुळे नफा वाढला आहे. दिवंगत सभासदांच्या वारसांना मदत व्हावी, यासाठी सर्व कर्जे गटविमांतर्गत सुरक्षित करण्यात आली आहेत. संस्थेतर्फे गणेशोत्सव, दहावी-बारावी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार आदी उपक्रम राबवले जातात. स्थापनेपासून संस्थेला सतत ऑडिट अ वर्ग मिळाला आहे. जगदीश गोडसे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेस संचालक रमेश जाधव, राजेंद्र चंद्रमोरे, हिरामण आव्हाड, सुनंदा कडाळे, अरुण चव्हाणके, मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, सुनील आहिरे, केरू पाळदे, दिनकर खर्जूल, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, इरफान शेख, रमेश खुळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांमुळे स्मार्टरोडवर परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रोडच्या कामासाठी सीबीएस सिग्नल येथे खोदकाम सुरू झाले असून त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीचा फज्जा उडत आहे. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. या रस्त्यावरच एका बाजूने करण्यात आलेल्या बॅरकेडिंगला रिक्षाचालकांनी स्टँड बनवले आहे. इतकेच नव्हे, तर भर रस्त्यात रिक्षा उभी करून प्रवासी भरले जात असल्याने इतर वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीबीएस हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ येथील रिक्षाचालकांचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतो आहे. सीबीएस सिग्नल स्मार्ट रोडच्या कामासाठी बंद केल्यापासून तेथील बॅरकेडिंगला रिक्षा स्टँड बनविण्यात आले आहे. वाटेल तिथे रिक्षा स्टँड आणि मनाप्रमाणे वाहतूक करण्याचा खेळ रिक्षाचालकांनी चालविला आहे. त्यामु‌ळे प्रवाशांसह इतर वाहनचालक हैराण झाले आहेत. सीबीएसकडून कान्हेरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यातच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे कान्हेरीवाडीत जाणाऱ्यांना रिक्षांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. सीबीएस, मेहेर आणि अशोकस्तंभ या चौकांत बॅरकेडिंगला लागूनच भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहनकोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. टिळकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेळा बस स्थानकाच्या बाहेर बॅरकेडिंग केले असून, त्या ठिकाणी आडव्या पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे किशोर सुधारालयामार्गे मेळा बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसना अडचण होत असल्याचे दिसून येत आहे. रिक्षाचालकांच्या या मनमानीविरोधात प्रवासी अथवा वाहनचालकांनी टोकल्यास खटके उडत आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीवर पोलिसांचा अंकुश नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कारवाई का नाही?

सीबीएससह इतर चौकांत पोलिसांच्या समोरच बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जातात. शिवाय वाहतुकीचे नियम मोडत प्रवाशांची वाहतूक होत आहे. मात्र, पोलिस विरूद्ध दिशेने येणाऱ्या व हेल्मेट नसणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात मग्न आहेत. सीबीएस सिग्नलवर राँग साइड येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र, नियम धाब्यावर बसवलेल्या रिक्षाचालकांवर मात्र मेहेरबानी दाखवली जाते. कारवाईतील या दुजाभावामुळे इतर वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्ते झाले ब्लॉक

सीबीएस, त्र्यंबकनाका, मेहेर, अशोक स्तंभ परिसरात बेशिस्त रिक्षा वाहतूक आणि अनधिकृत रिक्षा थांबे, यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. मेहेर, सीबीएस, अशोक स्तंभ या चौकातील एक बाजू पूर्णत: रिक्षा चालकांनी ब्लॉक केली आहे. रस्त्यात मध्येच उभ्या राहणाऱ्या या रिक्षांवर मात्र कोणतीही टोइंग कारवाई होत नसल्याने रस्ते ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मार्ट रस्त्यावर सायंकाळी सहानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते आहे.

वाहनांना अडथळा

त्र्यंबक नाका ते मेहेर चौकापर्यंत एकेरी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तरीदेखील रिक्षाचालक विरुद्ध दिशेने रिक्षा हाकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांकडून होणारी दुहेरी वाहतूक इतर वाहनांना अडथळा ठरत आहे. दिवसा हे प्रमाण कमी असले, तरी सायंकाळनंतर आणि रात्री बेसुमारपणे विरुद्ध बाजूने रिक्षा चालविण्यात येत आहेत.

प्रवाशांचा गोंधळ अन् लूट

सीबीएस सिग्नलचे रस्ते बंद झाल्याने अगोदर बाहेरगावाहून येणाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी लूट चालवली आहे. बाहेरगावच्या प्रवाशांकडून आणि उन्हाळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून जास्त भाडे आकारण्यात येत आहे. त्यासाठी रस्ता बंद असल्याचे कारण पुढे केले जात आहे. पोलिसांचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अधांतरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा (डीएमआयसी) दुसरा टप्प्यातील नाशिकचा समावेश तळ्यात मळ्यातच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे डीएमआयसी अधांतरी राहणार असून, भूसंपादनाची बाब अतिशय कळीचा मुद्दा ठरणार आहे.

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश होईल, असे सांगितले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकसभा निवडणुकांचा निकाल प्रतीक्षेत असल्याने विद्यमान भाजप सरकार सत्तेत आले तर राज्यातही भाजप सरकार असेल त्यामुळे डीएमआयसीचा मार्ग मोकळा होईल, असे काही उद्योजकांचे मत आहे. मात्र, दिवाळीच्या आसपास विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून भूसंपादनाचे शिवधनुष्य उचलले जाण्याची शक्यता अत्यल्प आहे. कारण, सिन्नर-इगतपुरी या भागात मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी यापूर्वीच भूसंपादन करण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्यात सिंचन, उद्योग आणि रस्ते या तीन कारणांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा डीएमआयसीसाठी भूसंपादन केल्यास स्थानिकांचा मोठा रोष पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्गालाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही वाद नको म्हणून राज्य सरकारकडून डीएमआयसीचा मुद्दा बाजूला ठेवला जाण्याची चिन्हे आहेत. तर, लोकसभेनंतर दुसऱ्याच पक्षाचे सरकार आले तर त्यांच्याकडून डीएमआयसीबाबत आग्रह राहील की, नाही याबाबतही साशंकताच आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या गराड्यात डीएमआयसीचा मुद्दा बाजूला पडण्याची चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्गालगत केंद्र

समृद्धी महामार्गालगत विविध प्रकारचे औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. नाशिक जिल्ह्यात त्यास विरोध झाला. त्यामुळे त्यासाठी भूसंपादन झालेले नाही. अन्य जिल्ह्यात मात्र असे केंद्र विकसित होणार आहे. काही उद्योजकांच्या मते, समृद्धी महामार्गालगतचे हे केंद्र विकसित करुन तेथेच डीएमआयसी कार्यन्वित करणे प्रभावी ठरेल. तर, काही उद्योजकांच्या मते सध्या सिन्नर येथील इंडिया बुल्स आणि एमआयडीसीचे विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. याच ठिकाणी डीएमआयसी केल्यास उद्योजकांना हक्काची जमीन उपलब्ध होईल. त्यामुळे डीएमआयसीचा तिढा सोडविण्यासाठी ठोस इच्छाशक्ती आणि कणखर नेतृत्वाचीच गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारूंचे लक्ष आता शहरातील वाटसरूंवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक रस्त्यात अडवून लुटण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असून, गेल्या दोन दिवसांत दोघांना चोरट्यांनी लुटले आहे. यावरून आता पादचारी चोरट्यांसाठी सोपे सावज झाल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि. १८) रात्री ८ वाजता चार जणांनी चाकूचा धाक दाखवून महामार्ग बसस्थानक परिसरात १४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. सुनील महेश्वर दास (रा. साहेबा हॉटेल) यांनी ती दाखल केली आहे. मुंबईनाका येथील महामार्ग बसस्टॅँड परिसरात ते उभे असताना चार व्यक्तींनी येऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादी सुनील दास यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दास यांनी प्रतिकार केला, मात्र तो निष्फळ ठरला. या चौघांनी दास यांच्या खिशातील १४ हजार २९९ रुपये झटापटीत काढून घेतले. शिवाय, मोबाइलही हिसकावून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दास यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मारुन टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक वराळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरूम, माती जप्त

$
0
0

मुरूम, माती जप्त

निफाड : लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीत शिवापूर येथील शेळकेवाडी येथील बंधाऱ्यातून २५ लाख २० हजार रुपये किमतीची चोरी केली जाणारी मुरूम व माती पोलिसांनी जप्त केली. शिवापूर शेळकेवाडी येथील बंधाऱ्याजवळ जेसीबी (एमएच १५ डीएल ०३७३), एक ट्रॅकटर आणि आयशर अशा तीन वाहनाद्वारे रायल्टी न भरता मुरूम व माती चोरताना संबंधितांना पोलिसांनी पकडले. ही वाहने जप्त करून योगेश रामदास कळंबे याच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - दिल्लीचे कळाले, गल्लीचे काय

$
0
0

दिल्लीचे कळाले, गल्लीचे काय?

नाशिककरांचे लक्ष नाशिक व दिंडोरीकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर सर्व वृत्त वाहिन्यावर एक्झिट पोलमधून अंदाज व्यक्त करण्यात आले. पण, या निकालात स्थानिक पातळीवर कोण निवडणूक जिंकणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे दिल्लीचे कळाले, गल्लीचे काय? असा प्रश्न सर्वांना पडला. या एक्झिट पोलसाठी सर्वच राजकीय नेत्यांनी सायंकाळपासून आपला वेळ राखीव ठेवत कार्यकर्त्यांबरोबर हे अंदाज बघितले. या पोलमुळे पुन्हा राजकीय चर्चेलाही उधान आले.

पंतप्रधान कोण होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणत्या राज्यात काय स्थिती आहे. याचे सर्व आकडे या पोलमधून दाखवण्यात आले. त्याबाबतही सर्वांमध्ये उत्सुकता होती. त्यानंतर या अंदाजावर काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी निकालात चित्र वेगळे असेल असे सांगत नुकत्यात झालेल्या तीन विधानसभा निकालांचे दाखले दिले. लोकसभा निवडणुकीत सातही टप्प्याचे निकाल झाल्यानंतर एक्झिट पोल दाखविण्याची परवानगी असल्यामुळे सायंकाळी साडेसहा नंतर सर्व न्यूज चॅनेलवरुन त्याचे प्रसारण सुरू झाले व त्यानंतर राजकीय तज्ज्ञासारख्या चर्चाही रंगू लागल्या. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या. पण, आज संपूर्ण मतदान झाल्यानंतर त्याला उधान आले आहे. काही एक्झिट पोलमध्ये राज्याचे निकाल प्रातंनिहाय दिल्यामुळे त्यावरही चर्चा रंगू लागली. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे दिल्यामुळे त्यातून अंदाज व्यक्त केला जावू लागला आहे.

तीन दिवस चालणार चर्चा

एक्झिट पोलची चर्चा आता तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे त्यातून वाद-प्रतिवादही घडताना दिसणार आहे. अंदाज खोटा की, खरा यावरही चर्चा झडताना दिसेल. दुकान, ऑफिस व घराघरांमध्ये या अंदाजामुळे पुन्हा चर्चेचा विषय निवडणुका झाल्याचे चित्र दिसणे सुरू झाले आहे. एक्झिट पोलच्या निकालामुळे काहींचे समाधान झाले असले तरी अनेकांची उत्सुकता ही निकालाची आहे. त्यामुळे निकालात कोण बाजी मारतो यानंतरच बोलू, असे सांगत काही जण चर्चा करणेही टाळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिसीच्या बहाण्याने७८ लाखांची फसवणूक

$
0
0

इंदिरानगर : विविध प्रकारच्या पॉलिसी काढल्याने ११० टक्के व्याज मिळेल असे सांगून इंदिरानगर परिसरातील एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मुकुंद रामचंद्र साठे (रा. श्रीजय नगरसमोर इंदिरानगर) यांना सन २०१२ मध्ये राज्य मित्तल या व्यक्तीचा फोन आला होता. मित्तल यांनी पॉलिसी काढा तुम्हाला ११० टक्के परतावा मिळेल असे सांगितले. त्यानुसार साठे यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर वारांवर विविध कंपनीच्या पॉलिसी घेण्याचे सांगून साठे यांना सुमारे १२ कंपन्यांच्या १२ पॉलिसी देण्यात आल्या. या काढलेल्या पॉलिसींचे पैसे मिळत नसल्याने साठे यांनी या पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यानंतर अजय शर्मा, सुरेश नायर, नक्षीचा मेहरा, राजत दीक्षित, राकेश शर्मा, अजित लोखंडे, अजय ठाकूर, आरती शर्मा, काव्य शर्मा, यासारख्या विविध लोकांचे फोन यांना पैसे देण्याऐवजी विविध नियम सांगण्यास सुरुवात केले. या प्रकारावरून आपली फसवणूक झाली असल्याचा अंदाज साठे यांना आल्याने धन्य आज इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात साठे यांची आठ तर लाखांची फसवणूक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ वाहनातील मालाची रीतसर नोंद

$
0
0

अनिल बूब यांचा खुलासा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक बाजार समितीत सेविकापदावर कार्यरत असलेल्या महिलेला धमकी दिल्याप्रकरणी माजी व्यापारी प्रतिनिधीविरोधात संबंधित महिलेने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावर संबंधित व्यापारी अनिल बूब यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितले, की बाजार समितीच्या पेठरोडच्या शरदचंद्र मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १६) माझी बासमती तांदळाच्या वाहनाची ७.२५ वा. ओझर नाका येथे बाजार समितीकडे रीतसर नोंद केली असल्याचे सांगितले.

पेठरोडच्या मार्केटमध्ये साडेअकरा वाजता हे वाहन गेटवर आले. कर्मचाऱ्यांनी बिल्ट्या मागितल्या. वाहनचालकाने त्या दाखविल्या. त्यानंतर वाहनचालकाला थांबावे लागल्यामुळे त्याचा फोन आला. रीतसर नोंदी केल्या असल्यामुळे त्याला दुकानावर वाहन घेऊन जाण्यास सांगितले. त्या वेळी मी दुकानावर नव्हतो. गाडी रिकामी करता येणार नाही; वाहन गेटवर परत घ्या, असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर मी फोनवरून विचारणा केली. म्हणून त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला असल्याचेही बूब यांनी सांगितले.

माझ्या दुकानावर रिकामे करण्यास आलेले वाहन पुन्हा बाहेर घेऊन चला, असे सांगण्यात आले. वाहनाची रीतसर नोंद केलेली असताना ते बाहेर नेल्यास तिचा अपहार होतो की काय, असा संशय मला आला. वाहनात बासमती तांदळाचे ६४० कट्टे होते. हा १३ ते १४ लाखांचा माल होता. त्याच्या पूर्ण रकमेची नोंद आहे. नवीन जीएसटी अॅक्टप्रमाणे ई वे बिल असते. गाडीत ते ई- वे बिल कम्पल्सरी असावे लागते. त्यामुळे ते आमच्याकडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्या बिल्ट्या आमच्याकडे घेऊन ठेवल्याचे बूब यांनी सांगितले.

दरम्यान, बाजार समितीवर ज्या वेळी जप्तीची कारवाई होणार होती, त्या वेळी बूब यांनी समितीला जप्तीपासून वाचविण्यासाठी वीस लाख रुपये भरले होते. ते आजतागायत समितीने त्यांना परत केलेले नाहीत. जो माणूस संस्था वाचविण्यासाठी असे योगदान देतो, त्याला त्रास दिला जात असल्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - शब्द आणि अर्थ

उद्योगवर्धिनीचा २६ ला वर्धापनदिन

$
0
0

उद्योगवर्धिनीचा

रविवारी वर्धापनदिन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेचा रविवारी (२६ मे) २५ वा वर्धापन दिन होत असून त्यानिमित्त अनेक नामवंतांचा विचार आणि उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा नाशिककरांना मिळावी या हेतूने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते १२ दरम्यान शालिमार येथील महात्मा फुले कलादालन येथे 'स्टार्टअप कॉन्क्लेव'चे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील चांडक यांनी दिली.

यावेळी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड हे हाउसकिपिंग तसेच शेतीमाल वृद्धीसाठीच्या विविध उत्पादन व विक्री व्यवसायातील संधीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया हे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे रहस्योद्घाटन करणार आहेत तर सफलता कशी साधावी यावर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील मार्गदर्शन करतील. तसेच स्टार्टअपसाठी पैसा कुठून आणि कसा उपलब्ध होऊ शकेल याबाबत मार्गदर्शन अॅपेटल्स लिमिटेड, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष ईश्वर झा मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तकलेतून बहरल्या वृत्तपत्राच्या बाहुल्या

$
0
0

वृत्तपत्रापासून बनविल्या बाहुल्या

पाटणकरांचा टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हस्तकलेच्या आधाराने वृत्तपत्राच्या कागदापासून काही सुंदर वस्तू बनविण्याचे तंत्र गेल्या काही वर्षांपासून विकसित झाले असून शहरात अशा वस्तू बनविणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. वेळेचा सदुपयोग करून, टाकाऊपासून टिकाऊ बनलेल्या या वस्तूंना आज मागणी वाढली आहे. वृत्तपत्रांपासून बनवलेल्या बाहुल्या आज अनेकांच्या घराची शान असून घरात आकर्षण ठरत आहे. हस्तकलेतून वस्तू बनविणाऱ्यांमध्ये मीना पाटणकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांनी बनवलेल्या वस्तू आता सोशल मीडियावर हिट ठरत असून कित्येक लाइक्स व कमेंट त्यांना मिळत आहे.

वेदमंदिर परिसरात राहणाऱ्या मीना पाटणकर यांनी बनवलेल्या वस्तू पाहून या वृत्तपत्रांच्या बनवलेल्या आहे, यावर विश्वासच बसत नाही. या बाहुल्या बनवून ठेवता येत नाही कारण धूळीपासून त्यांचा बचाव करावयाचा असतो. त्यामुळे जेव्हा त्यांची मागणी असते तेव्हाच त्या बनवतात. पाटणकर सांगतात की, माझी मुलगी उच्च शिक्षणासाठी बाहेर गेली तेव्हा मला असे वाटले की आपल्याकडे खूप वेळ आहे आणि मग माझी नजर गेली वृत्तपत्रांकडे, यांचे काही बनवायचे असे खूप दिवसापासून माझ्या मनात होते. मी यू-ट्यूबवर सर्च करून पाहिल्यावर कुणीतरी बनवलेला फ्लॉवरपॉट दिसला आणि मला प्रेरणा मिळाली. मी वृत्तपत्राच्या कागदापासून बाहुल्या करू लागले. त्या चांगल्या असल्याच्या प्रतिक्रिया आल्याने मला हुरूप आला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या कामाला जेथे मला नेऊन ठेवायचे होते ते आज हाती आल्यासारखे वाटत आहे.

वृत्तपत्रांचे हे अत्यंत चांगल्या तऱ्हेने रिसायकलिंग आजच्या युगात करणे ही मोठी वाखाणण्यासारखी बाब असून टाकाऊपासून टिकाऊ हा संदेश येणाऱ्या पिढीसाठी पाटणकर देतात.

---

या बाहुल्या बनविण्यासाठी फारसा खर्च नाही. रद्दीपासून बनविण्यात येणाऱ्या या वस्तू घराच्या शोभेसाठी अगदी आकर्षक दिसतात. हस्तकलेपासून बनविण्यात येत असल्याने त्या प्रत्येकावर काम करावे लागते. कलेचे मूल्य ज्यांना आहे, ते या वस्तूंचे कौतुक करतात.

मीना पाटणकर, हस्तकलाकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास चषक नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेकडे

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत चुरशीच्या झालेल्या 'विश्वास चषक २०१९'चे विजेतेपद नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेने पटकाविले. तर उपविजेता म्हणून विश्वास को-ऑप. बँकेने आपली मोहोर उमटवली आहे.

विश्वास चषक क्रिकेट स्पर्धा सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीजच्या मैदानावर ११ व १२ मे १८ व १९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत विश्वास को-ऑप. बँक, नाशिक मर्चन्टस् को-ऑप बँक, इंडस्ट्रीयल अ‍ॅण्ड मर्कन्टाईल बँक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, कळवण मर्चन्टस् को-ऑप. बँक, समर्थ सहकारी बँक व जनकल्याण सहकारी बँक या सहकारी बँकांनी सहभाग घेतला होता.

रविवारी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रथम विजेता संघ नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेस रुपये अकरा हजार रोख व विश्वास चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच विश्वास को-ऑप. बँकेस रोख रुपये सात हजार व उपविजेता चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच सामनावीर व उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ललीत भोर (नाशिकरोड व्यापारी बँक), तसेच मालिकावीरचा पुरस्कार विश्वास बँकेचे संचालक विक्रम उगले यांना देण्यात आला. उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून महेश खालकर (आय.एम.सी. बँक) यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमधील सहभागी संघातील सर्व खेळाडूंना सहभागपत्र देण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष व नाशिकरोड देवळाली सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, विश्वास को-ऑप. बँकेचे जनसंपर्क संचालक घन:शाम येवला, सुयोजित ग्रुपचे आकाश जैन, विश्वास को-ऑप. बँकेचे संचालक अजित मोडक, कैलास पाटील, नाशिकरोड देवळाली बँकेचे निवृत्ती अरिंगळे, विश्वास को-बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील आदि उपस्थित होते. स्पर्धेचे स्वागत व आभार प्रसाद पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराकडून युवकास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जुन्या भांडणाची कुरापत काढून एका सराईत गुन्हेगाराने युवकास डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री आठ वाजेच्या दरम्यान सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज समोर घडली. या घटनेनंतर जखमी युवकाच्या मदतीस धावून आलेल्या नागरिकांनाही या सराईत गुन्हेगाराने धमकावत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत सुनील थोरात (वय २८) रा अरिंगळे मळा,किसान चौक,एकलहरे रोड हां युवक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिन्नर फाटा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गेल्या वर्षीच्या शिवजयंती उत्सवात सराईत गुन्हेगार अक्षय नाईकवाडे आणि सुनील थोरात यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलिस ठाण्यातही पोहोचला होता. सुनील थोरात शनिवारी रात्री सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज समोर पाणीपुरी खात होता. यावेळी जवळच अक्षय नाइकवाडे हा सराईत गुन्हेगार त्याच्या साथीदारासह उभा होता. सुनील सोबत अक्षयने मागील भांडणाचा राग मनात धरून वाद उकरून काढला आणि रस्त्यावर पडलेला दगड उचलून सुनीलच्या डोक्यात मारला. त्यामुळे सुनील रस्त्यावर पडला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. परंतु अक्षय याने स्थानिक नागरिकांना धमकावल्याने स्थानिक नागरिक माघारी गेले. त्यानंतर जखमी सुनीलला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमी सुनिलच्या जबाबावरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात अक्षय नाईकवाडे यांच्यासह त्याच्या साथीदारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभवार्ता

$
0
0

सेंद्रिय शेतीसाठी 'रोमीफ'चा पुढाकार

नाशिक : सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीला बळ मिळावे म्हणून रेसिड्यू फ्री अँड ऑर्गेनिक मिशन इंडिया फेडरेशनने (रोमीफ) पुढाकार घेतला आहे. राज्यात विषमुक्त शेती व्यवसायाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे या हेतूने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक शेतकरी 'रोमीफ'च्या चळवळीस जोडले असून सेंद्रिय, विषमुक्ती शेतीसाठी व्हॉट्सअॅप करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवा वेळापत्रक

लाईफोलॉजी : किरण भालेराव

राज्यसेवासाठी ९९ पदे वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील विविध पदांमध्ये वाढ करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यानुसार उपजिल्हाधिकारी पदापासून तर नायब तहसीलदार या पदापर्यंत सुमारे ९९ पदे वाढविण्यात आली आहेत.

राज्यसेवेची पूर्व परीक्षा फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. आता यानंतरची मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यानंतर मुलाखतीचा टप्पा अंतिम असेल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. एमपीएससी आयोगाने डिसेंबर २०१८ मध्ये काढलेल्या जाहीरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. यानुसार फेब्रुवारीत पूर्व परीक्षा पार पडली. यानंतर मे महिन्याच्या सुरूवातीस या पदसंख्येत भर पडून ३४२ वरून ४२४ पदसंख्या घोषित करण्यात आली. यानंतर आता या पदसंख्येत परत एकदा भर टाकत आयोगाने आता १७ संवर्गांसाठी एकूण ४३१ पदांकरीता ही भरती होत आहे. यात भूमी अभिलेख उपअधिक्षक (गट ब) व संवर्गातील सात पदांचा समावेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन घडविण्यासाठी एकच क्षण पुरेसा

$
0
0

छोटी गुरू माँ यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे, याचा विचार व्हायला हवा. केवळ लग्न करणे, मुले जन्माला घालणे हा एवढाच आपल्या आयुष्याचा उद्देश असू शकत नाही. जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी एकच क्षण पुरेसा असतो, असे प्रतिपादन इगतपुरीतील धामणगाव येथील निर्वाणा नॅचरोपॅथीच्या प्रमुख छोटी गुरू माँ यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प छोटी गुरू मॉं यांनी सोमवारी गुंफले. मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या पुष्पात छोटी गुरू माँ यांनी 'खुद को जानो' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, की परमेश्‍वराने पृथ्वीवर प्रत्येक जीव काहीतरी उद्देश ठेवून पाठविलेला असतो. त्याने आपल्याला गाढव व अन्य प्राण्याऐवजी माणसाचा जन्म दिला हे आपले भाग्यच आहे. अनेक योनींचा प्रवास करून मानव जन्म मिळतो. मात्र, जीवनात परिवर्तनासाठी काही वर्षे, काही तास नव्हे, तर एकच क्षण महत्त्वाचा असतो. एका क्षणात संपूर्ण आयुष्य पालटू शकते. प्रत्येकाला आपल्या जीवनात परिवर्तन आणणे शक्य आहे; मात्र त्यासाठी आळस दूर सारण्याची गरज आहे.

यावेळी अविनाश गोठी उपस्थित होते. श्रीकांत येवलेकर यांनी मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत देवरे यांनी आभार मानले.

आळस झटकणे गरजेचे

रेल्वेत ब्रिटिशांनी मारलेल्या एका लाथेचा परिणाम होऊन मोहनदास करमचंद गांधी यांचे महात्मा गांधींमध्ये रुपांतर झाले. पक्षी उडताना पाहून राईट बंधूंना विमान बनविण्याची कल्पना सुचली. ईश्‍वर प्रत्येकाला परिवर्तनाची संधी देत असतो. आयुष्यात येऊन आपल्याला काही माणसांच्या आयुष्यात उजेड आणता आला, तर या जन्माचे सार्थक होईल. मात्र, त्यासाठी आळस झटकणे गरजेचे आहे.

आजचे व्याख्यान

वक्ते : डॉ. आबा पाटील

विषय : शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला रंगली गीत मैफल

$
0
0

नाशिकरोड : बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाशिकरोड येथील धम्मानायिक महिला मंडळातर्फे बुद्धपहाट कार्यक्रम झाला. जेलरोडच्या राज राजेश्वरी मंगल कार्यालयात पहाटे चारपासून सकाळी सातपर्यंत ध्यानसाधना, विश्वमंगल मैत्री, बुद्धपूजा, परित्राण पाठ घेण्यात आले. त्यानंतर राजेंद्र उबाळे प्रस्तूत मूकनायक वाद्यवृंदातर्फे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला दिपक शिरसाठ यांचे बासरी वादन झाले.

अमृतवाणी ही बुद्धांची, रक्तपात हा नको मानवा घोषणा युद्धाची, ही वाणी ऐकावी बुद्धाची, भीमचरणी गं बुद्ध चरणी गं नमाव वाटतं, पाहा पाहा मंजुळ हा माझ्या भीमरायाचा मळा अशा गीतांनी मैफल रंगली. रवी बराथे, सुनील गांगुर्डे, रमेश अंबोरे, अलका अंबोरे यांनी गीतगायन केले तर दिनेश निकम (ऑर्गन), शाम मेढे (ऑकटो पॅड), राजेंद्र उबाळे (ढोलकी) यांनी संगीतसाथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images