Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भागवत कथेची

$
0
0

भागवत कथेची

जेलरोडला समाप्ती

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या टाकळी रोडवरील शिवरामनगरमध्ये माऊली प्रतिष्ठानतर्फे पुंडलिक आढाव यांच्या स्मणार्थ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ झाला. त्र्यंबकेश्वर येथील धर्मशास्त्रचार्य जगदीश महाराज जोशी यांनी भागवत निरूपण केले. रामदास महाराज शेगावकर, शिवरामबाबा म्हसकर, नामदेव आढाव, श्रीकांत आढाव, कृष्णा आढाव, शिवम आढाव, ओंकार आढाव, आदित्य आढाव, अच्युत हरक, ओम भुसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोहर महाराज सायखेडे यांनी काल्याचे कीर्तन केले. जगदीश महाराज जोशी म्हणाले की, भारतीय संस्कृती व तत्वज्ञान हे विज्ञाननिष्ठ असून मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. भारतीय तत्वज्ञान जीवनाला कसे आधारभूत आहे याचे चिंतन भागवत ग्रंथातील पंचम स्कंधातून विशेष रूपाने पाहावयास मिळते. आजच्या आधुनिक व धावपळीच्या युगात मानवी जीवनात शांती, समाधान व सुख प्राप्त व्हावी यासाठी संत वाङमय, वेदशास्त्र व पुराणाशिवाय पर्याय नाही, हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सनदी अधिकारी नियुक्तीची मागणी

$
0
0

बाजारात समिती गैरव्यवहाराबाबत तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंधराशे कोटीची उलाढाल असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांची प्रशासकीय प्रमुख म्हणून नेमणूक करा, असे पत्र शेतकरी बांधवाच्या वतीने रवींद्र अमृतकर यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पाठवले आहे.

नाशिक बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्याचे धोरण सरकारने आखलेल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. बाजार समितीतील गैरव्यवहाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या पत्राची प्रत त्यांनी उच्च न्यायालयाला पाठवली असून सु-मोटो हा अर्ज जनहित याचिका म्हणून दाखल करावा, असे आवाहन केले आहे.

सरकारने गेल्या वर्षी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक दर्जाचे अधिकारी रामेन्द्रकुमार जोशी यांची बाजार समितीचे सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. त्यांनी सचिवपदाचा कार्यभारही स्वीकारला आहे. मात्र, शासननियुक्त अधिकाऱ्याने शासन निर्णयानुसार कामकाज केल्यास संचालक मंडळाला हुकुमशाही करता येणार नाही, बेकायदेशीरपणे कामकाज चालविण्याचे जमणार नसल्याने त्यांना सेवेतून मुक्त करण्याचा घाट घातला जात असल्याबाबत चौकशी करावी अशी मागणी अमृतकर यांनी केली आहे.

बाजार समितीचे संचालक मंडळ जे सरकारने भ्रष्टाचारामुळे बरखास्त केले आहे. केवळ सरकारने कॅव्हेट दाखल न केल्याने तांत्रिक बाबीचा फायदा घेऊन संचालक मंडळाने स्थगिती घेतली आहे. त्यांच्या तालावर सांगेल ते काम करणारे पूर्व सचिव अरुण काळे यांना अद्याप बेकायदेशीरपणे बाजार समितीने सामावून घेतल्याचा उल्लेखही अमृतकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

कर्मचारी भरती अनावश्यक

बाजार समितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यमान कर्मचारी संख्येत काम भागविणे शक्य आहे. गरजेनुसार माथाडी मापारी घेणे आवश्यक आहे. हंगामी, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काम करणे शक्य असताना ज्या संचालक मंडळाला सरकारने बरखास्त केले ते संचालक मोठ्या प्रमाणात अनावश्यक कर्मचारी भरतीचा घाट घालत असल्याचा आरोपही अमृतकर यांनी केला आहे.

अशा आहेत मागण्या

सरकारने संचालक मंडळ बरखास्त केलेले असून धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार संचालकांनी गमावलेला आहे. बरखास्तीबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कलम १२(१) चे प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये, अनेक विषयात कर्तव्यात कसूर केलेल्या बाजार समिती यंत्रणेची चौकशी करावी, तसेच काळे यांना बाजार समितीचे सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करून वेतनावरील खर्च वसूल करावा, कायदेशीर अधिकार नसतानाही त्यांच्या सहीने केलेले आर्थिक व्यवहार रद्द करावे, अशा मागण्या अमृतकर यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची फुल्ल कमाई

$
0
0

एप्रिल महिनाभरामध्ये तब्बल ८३ लाखांवर डल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल महिन्यात चोरट्यांनी अवघ्या चार ते पाच गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये नागरिकांच्या ८३ लाख ६७ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. यात सोने, रोकड, मोबाइल अशा मुद्देमालाचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांनंतर एप्रिलमध्ये अचानक वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे हा भुर्दंड सर्वसामान्यांना सहन करावा लागला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा गुंतलेली असताना चोरट्यांनी संधी साधली. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असताना चोरट्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकावा देत हात साफ केले. जबरी लूट व जबरी चोरीच्या १५ गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाख ८४ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात व्यावसायिकांना लुटण्याच्या दोन घटनांचा समावेश होता. पैकी एका घटनेतील आरोपींना पोलिसांना वेळीच जेरबंद केले. मात्र, लुटलेली सर्व रकम हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले होते. महिला, वृद्ध नागरिकांच्या हातातील मोबाइल, पर्स खेचून नेण्याच्या घटना याच महिन्यात वाढीस लागल्या. शहरात चोरीच्या २१ घटनांची नोंद या काळात झाली. घरातून दागिने चोरी, कंपनीतून चोरी, सराफी दुकानातून सोन्याच्या बांगड्या, कारमधील टेप, तोतया पोलिस अशा प्रकराच्या घटनांमधून चोरट्यांनी १० लाख ९४ हजार ५०० रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. घरात चार्जिंगला लावलेले, हॉलमध्ये ठेवलेले ८० हजार रुपये किंमतीचे मोबाइल केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. तर, चोरी गेलेल्या मोबाइलची संख्या दहाच्या पुढे आहे. घरफोडीच्या घटनांनी सुद्धा डोके वर काढले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत दिवस व रात्रीच्या १३ घटना घडल्यात. त्यात चोरट्यांनी सोने, चांदी, रोकड आदी मिळून तब्बल ११ लाख ४७ हजार ६५० रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.

सायबर फसवणुकीचा वाढला जोर

एप्रिल महिन्यात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांनी गती पकडली. ओटीपी, कार्ड बदल, ऑनलाइन व्यवहार अशा वेगवेगळ्या पद्धतीने सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या बँक खात्यातील २६ लाख ३६ हजार ५८६ रुपये काढून घेतले. सायबर संबंधित ११ गुन्हे दाखल झाले असून, यातील गुन्ह्यांचा अद्यापपर्यंत तपास लागल्याचे समोर आलेले नाही. यापूर्वी सायबर गुन्हेगारांना दिल्ली, झारखंड आदी ठिकाणाहून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे असे गुन्हे जवळपास बंद झाले होते. मात्र, सायबर चोरटे अचानक सक्रिय झाले असून, नागरिकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

..

चोरट्यांचे कारनामे

घटना...............नोंदविले गेलेले गुन्हे

पर्स चोरी : २१

जबरी चोरी : १५

घरफोडी : १३

मोबाइल चोरी : १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीसत्राची चाहूल

$
0
0

आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा; खातेप्रमुखांकडून याद्या सादर म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेत अनेक वर्षांपासून एकच टेबल आणि एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आचारसंहिता संपताच बदल्यांना सामोरे जावे लागणार आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एकाच ठिकाणी तीन ते पाच वर्षे ठाण मांडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी खातेप्रमुखांकडून मागविली आहे. महापालिकेत रिक्त पदांची संख्या मोठी असतांना, काही विभागामंध्ये मात्र क्षमतेपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सर्वाधिक ओढा 'मलाईदार' मानल्या जाणाऱ्या नगररचना आणि बांधकाम विभागांकडे असतो. अन्य विभागात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. महापालिकेला 'ब' वर्गात पदोन्नती मिळाली असली तरी, सध्याचा आकृतीबंध 'क' वर्गाचाच आहे. 'क' वर्गानुसार ७ हजार ९० पदे मंजूर असतांना महापालिकेत सध्या केवळ ५ हजार २० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत, सरकारने महापालिकेच्या नोकरभरतीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अधिक ताण असताना कामाचे असमान वाटप आहे. हीच विषमता दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेतला आहे. तांत्रिक पदांसाठी आउटसोर्सिंगने भरती प्रक्रिया राबविण्यासह महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच टेबल आणि एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना दणका देण्याची तयारी आयुक्तांनी केली आहे. एकाच टेबलावर तीन वर्षापेक्षा अधिक आणि एका विभागात पाच वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी खातप्रमुखांना आचारसंहिता काळात दिले आहेत. ती यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. २३) जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल. त्यानंतर महापालिकेत विभागनिहाय बदल्या केले

जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात बुद्धवंदना

$
0
0

शहरात बुद्धवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

फाळके स्मारकातील बुद्ध स्मारकात शनिवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भन्ते युनाग धम्मो महास्थवीर, कोल्हापूर येथील भन्ते विमलकीर्ती, औरंगाबाद येथील भन्ते धम्म रक्षी, भन्ते संघराज, भन्ते कमलशील यांच्या नेतृत्वाखाली भिक्खु संघाने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.

यावेळी आमदार सीमा हिरे आणि वंचित आघाडीचे लोकसभेचे उमेदवार पवन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टच्या वतीने भन्ते सुगत आणि भन्ते आर्यनाग यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. या भागात असलेल्या बुद्ध स्मारकासह विविध बाबींच्या जतनासाठी ठोस उपाय योजना सुरू असल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, राकेश दोंदे, राहुल दिवे, संतोष साळवे, दीक्षा लोंढे, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ पाटील, भाऊसाहेब नवले आदींसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी संतोष जोंधळे प्रस्तुत बुद्ध गीतांच्या प्रबोधनपर झालेल्या कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागातील उपासकांनी बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळ कॉलम

$
0
0

पर्यावरणपूरक ई-रिक्षा महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सर्वसामन्यांना रिक्षाप्रवास सुखकर ठरावा, या दृष्टीकोनातून हिरकणी ग्रुपने पुढाकार घेत गरजू महिलांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य यातून केले जात आहे. हिरकणीमुळे स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न त्यांचे पूर्ण होते आहे. रिक्षा प्रवास सुरक्षित कसा राहील, याकडे ग्रुप लक्ष देत असून तसे विशेष प्रशिक्षण सुद्धा मिळाले आहे. रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक आरटीओपरवाने, प्रशिक्षण मोफत देण्यात आले आहे. तसेच महिलांना स्वरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. सौंदर्य स्पर्धेतून प्रोत्साहन हिरकणी ग्रुपतर्फे फॅशन शो, सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मिस हिरकणी व मिसेस हिरकणी असे दोन बक्षिसे यावेळी देण्यात आली. याबरोबरच फॅशन डिझायनरची स्पर्धाही घेण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी पोषाख तयार करण्यात आले होते. हिरकणीच्या रिक्षा महिला चालक यांनीही कार्यक्रमात सहभाग घेत रॅम्प वॉक केला. महिलांमध्ये आत्मविश्वासाची रुजवण करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची ठरली होती. विविध उपक्रमांवर भर हिरकणी ग्रुपची स्थापना होऊन अवघे सहा महिने झाले असले तरी समाजपयोगी, महिला विकासासाठी ग्रुपने उपक्रम राबवून आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. येत्या काळातही विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यावर ग्रुप भर देणार आहे. सद्यस्थितीत २५ पर्यावरणपूरक ई-रिक्षा, पिंक रिक्षा देण्यात आल्या असल्या तरी ही संख्या तीनशेपर्यंत नेण्याचा प्रयत्न मंडळातील सदस्या करत आहेत. यासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यावरही भर दिला जात आहे. मंडळातील सदस्या माधवी रहाळकर, रोहिणी नायडू,सीमा पठाडे, मीनल केंगे, शिल्पा पारनेरकर, सीमा भदाणे, अदिती अग्रवाल, नम्रता अग्रवाल, इंद्रायणी पाटील, रसिका अमोलिक, सायली विभांडिक, प्रभा टाळीकोट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात टळणार!

$
0
0

मुकणेतून तहान भागवणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तसेच, यंदा मान्सून लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने पालक सचिव डॉ. सीताराम कुंटेंनी महापालिकेला काटकसरीने पाणी वापराच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, पालिकेच्या कोट्यातील दीड टीएमसी पाणीसाठा अजून शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास मुकणे धरणातून तहान भागविण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीकपातीची सूचना फेटाळून लावली. दरम्यान, पालक सचिवांच्या सूचनेवरून मराठवाड्यासाठी नाशिककरांवर पाणीकपात लादण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून ४२००, दारणातून ४००, तर मुकणेतून ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. महापालिकेने आतापर्यंत गंगापूर धरणातून ३१४७ दशलक्ष घनफूट, तर दारणा धरणातून २४१ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. त्यामुळे गंगापूर धरणात पालिकेचे १०५२ घनफूट पाणी शिल्लक आहे. दारणात १५८ आणि मुकणेत ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेच्या हिश्याचे जवळपास दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पाणी उचलण्यासाठी पालिकेला मोठा खर्च येतो. त्यामुळे येथील पाणी उचलले जात नाही. परंतु, यंदा पावसाळा लांबल्यास दारणाचे सर्व आरक्षित पाणी उचलून नाशिकरोड भागात पुरविण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच, मुकणे धरणात ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. या धरणातून गरज पडल्यास पाणी उचलण्याचीही तयारी केली आहे. मुकणेतून सिडको, इंदिरानगर, गांधीनगर जलशुध्दीकरणाच्या कार्यक्षेत्रातील उपनगर भागापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गंगापूर धरणातून उर्वरित शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पावसाळा लांबला तरी, पाणीकपात करण्याची गरज नसल्याचा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.

..

मराठवाड्यासाठी कपात?

शहरासाठी जवळपास दीड टीएमसी पाणीसाठी असतानाही प्रशासनाकडून कपातीचे संकेत दिले जात आहे. पालक सचिव कुंटे यांच्या सूचनेमुळे नाशिककरांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. नाशिकमध्ये पाणीकपात करून दारणा आणि गंगापूर धरणाचे पाणी मराठवाड्याला सोडणार तर नाही ना अशी शंका आता अधिकाऱ्यांमध्ये उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईचे गहिरे सावट

$
0
0

पशुधन बचावासाठी नांदगावात चारा छावणीची गरज

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळी तालुका जाहीर झालेल्या नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील गावांसह इतरत्र चारा व पाणीटंचाईचे सावट गहिरे झाले आहे. दुष्काळाच्या वणव्यात शेतकऱ्यांसह नागरिक होरपळत असल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या कुटुंबाचा घटक मानल्या जाणाऱ्या गाय, म्हशी, बैल, मेंढ्या बकऱ्या, घोडे हे पशुधन वाचवावे कसे, असा प्रश्न बिकट झाला आहे. नांदगाव तालुक्याही तातडीने चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जनावरांची संख्या २०१७ च्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढली आहे. हे सुखद चित्र वाटत असले तरी हे पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान बळीराजापुढे आहे. त्यामुळे तातडीने चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच पाण्याचे टँकर देखील वाढविण्यात यावे, यासाठी घाटमाथ्यावरील गावांच्या वतीने तहसीलदार मनोज देशमुख यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष दुष्काळाच्या दाहकतेकडे वेधण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील ढेकू, रोहिले, जातेगाव, बोलठाण, जवळकी, कुसुमतेल, गोडेगाव, वसंतनगर या गावात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शासकीय निकषानुसार तब्बल १४ हजार ३११ जनावरे असल्याने पाणी व चाऱ्याची सोय करा, पशुधनामागे १०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेस गट प्रमुख राजेंद्र लाठे, नारायण पवार, नूतन कासलीवाल, आयुब शेख यांनी नांदगाव तहसीलदारांकडे केली आहे.

घाटमाथ्यावरील १५ वाड्या वस्त्यांवर पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष असून तेथे तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, टँकर व चारा छावणीचे काही प्रस्ताव मंजूर झाले असून इतर नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहेत. दुष्काळ निधी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी सांगितले. येवल्याचे प्रांत राजेंद्र पाटील यांनीही नांदगावच्या दुष्काळ स्थिती निवारणासाठी दुष्काळ स्थितीचा आढावा घेऊन सूचना केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

..

घाटमाथ्यावरील जनावरांची स्थिती

गायी-म्हशी : ६४८१

शेळ्या-मेंढ्या : ३८८८

कोंबड्या : ३५००

डुकरे : ३७५

घोडे : ३८

गाढव : २९

एकूण : १४३११

..

तालुक्यातील टँकर स्थिती

गावे : २८

वाड्या : ३०२

मंजूर टँकर : ६९

रोज फेऱ्या : १७०

वाढीव मंजूर टँकर : ५७

प्रस्तावित फेऱ्या : १०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन्यजीवांसाठी ‘पाण्याचे पॉट’

$
0
0

वासाळी शिवारात उपक्रम; मोरांची भागतेय तृष्णा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उष्णतेच्या तीव्र झळांचा त्रास वन्यजीवांनाही सहन करावा लागत असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शहराकडे येत असल्याचे दिसत आहे. वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वासाळी शिवारात 'पाण्याचे पॉट' ठेवण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वन ‌विभागाच्या १५० हेक्टर क्षेत्रात हा उपक्रम ठेवण्यात येत असून तेथील मोरांसह इतर वन्यजीवांची तृष्णा भागत आहे.

त्र्यंबक रोडवरील वासाळी, सावरगाव आणि महिरावणी गावालगत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात मोर, ससा, रानपाखरे, तसर यांसह इतर वन्यजीवांचा संचार मोठ्या प्रमाणावर आहे. हे वन्यजीव पिण्याच्या पाण्याच्या शोधात गावातील रानमाळात फिरताना दिसतात. त्यामुळे वन विभागाच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते दगू खेटरे, गणेश निकम, रवींद्र एरंडे यांनी वन विभागाच्या क्षेत्रात पाण्याचे पॉट ठेवले आहेत. या पॉटमध्ये वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पाणी पिण्यासह उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीत वन्यजीव विहार करताना दिसून येत आहे. सध्या पाच पॉट्स ठेवण्यात आले असून येत्या काही दिवसांत पॉटची संख्या वाढविण्यात येणार आहे. संपूर्ण क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे पॉट ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक सचिन अहिरे यांनी दिली.

\Bनियमित स्वच्छता अन् पाणी \B

वन विभागाच्या क्षेत्रात ठेवण्यात आलेल्या 'पॉट'मध्ये नियमितपणे पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. एका पॉटमधील पाणी जास्त दिवस राहत नाही. तसेच साठलेल्या पाण्यात कचरा आणि डासांची अंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राणी, पक्षी यांना विकार होण्याची भीती असते. त्यामुळे पाणी बदलण्याची प्रक्रिया नियमित होते, असे दगू खेटरे आणि सहकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीपीएफ अकाउंट क्रमांकासाठी शिक्षकांचा एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सन २००५ या वर्षापूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक जीपीएफ (जुनी पेन्शन योजना) अकाउंट नंबरपासून वंचित ठेवणाऱ्या नाशिक माध्यमिक वेतन पथक कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या प्रश्नी सोमवारी (दि. २७) दुपारी २ वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे या विषयावर शिक्षक धरणे आंदोलन करणार आहेत. पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत या विषयावर शनिवारी (दि. १८) पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक जिल्हा माध्यमिक वेतन पथकाने जिल्ह्यातील सुमारे पाचशेपेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जीपीएफ खात्याचा अकाउट नंबर मुद्दामहून दिलेला नसल्याची तक्रार शिक्षकांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाकडे केली होती. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासोबत शनिवारी या विषयावर बैठक झाली. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने जीपीएफ खातेनंबर देण्यापासून आजपर्यंत वंचित ठेवल्याचे या शिक्षकांनी शनिवारी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नाशिक विभागातील ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे.

..

वेतनपथकाचा भोंगळ कारभार

या कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक रकमेचा तपास जीपीएफ खाते नसल्याने लागलेला नाही. एकाच कार्यालयातून एकसारख्या कर्मचाऱ्यांमध्ये काहींना जीपीएफ नंबर दिला, तर काहींना गेल्या १० वर्षांपासून वंचित ठेवले. असा भेदभाव शिक्षण विभागाकडून का करण्यात आला, असा सवाल आमदार तांबे यांनी उपसंचालकांना फोनवरून विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मंगल कर्माचे आचरण करा'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प भगवान गौतम बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी शांतीचा मार्ग सांगितला असून त्यासाठी मंगल कर्मामध्ये नमूद असलेल्या ३८ मार्गाचा अवलंब केल्यास निश्चितच फायदा होईल असे बौद्धाचार्य रवींद्र कटारे यांनी सांगितले. देवळालीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बौद्धविहार येथे सकाळी परिसरातील उपासक उपसिकांनी एकत्र येत त्रिशरण, पंचशील, बौद्ध व भीमवंदना गायली. यावेळी उपस्थित बुद्ध विहार समितीचे चेअरमन विश्वनाथ काळे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना प्रत्येकाने विहारात येताना मानपान घेऊ नये. सर्वांच्या सहकार्यातून धम्माचे मोठे कार्य उभे होणार आहे. यावेळी भाऊसाहेब धिवरे, जयंती अध्यक्ष संतोष कटारे, शहराध्यक्ष सुरेश निकम, शैलेश भालेराव आदींसह महिला वर्ग उपस्थित होता. सांयकाळी पुन्हा सर्व समाजबांधवांनी एकत्र येत शहरातून धम्मरॅली काढत सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव वृद्धिंगत होवो असा संदेश या रॅलीतून दिला. त्यानंतर जुने बसस्थानक परिसरात विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य खिरदान वाटप कार्यक्रम पार पडला. आकर्षक रांगोळी यावेळी विहारात सकाळपासून आर्मी पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक सुरेश म्हैसधुणे यांनी आकर्षक रंगात भगवान गौतम बुद्धांची साकारलेली रांगोळी प्रेक्षणीय ठरली. त्यासाठी तब्बल ३ तास मेहनत घेत ही रांगोळी साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये भरला कॅन्सरतज्ज्ञांचा मेळा

$
0
0

नाशिकमध्ये भरला कॅन्सरतज्ज्ञांचा मेळा

मानवता कॅन्सर सेंटरमध्ये देशभरातील सर्जन कार्यशाळेनिमित्त एकाच व्यासपीठावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सरवरील (कर्करोग) शस्त्रक्रियांवर जगभरात सुरू असलेले संशोधन, शस्त्रक्रियेतील बदल, अद्ययावत उपकरणे कॅन्सरतज्ज्ञांपर्यंत एकाच वेळी पोहोचाव्यात व प्रत्येकाला स्वत:ला अद्ययावत करण्याची संधी मिळावी, या हेतूने एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजिलेल्या कार्यशाळेत देशभरातील ३०० हून अधिक कॅन्सरतज्ज्ञ उपस्थित आहेत. कार्यशाळेतून कॅन्सर तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. नगरकर म्हणाले, कॅन्सर क्षेत्रात सुरू असलेल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील संशोधन व शस्त्रक्रियांना येथे दाखविले जात आहे. यात ७८ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. प्रत्येक कॅन्सरतज्ज्ञ सगळंकाही आत्मसात करू शकत नाही. त्यामुळेच कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांना एकत्र करून त्यांचे अनुभव व ज्ञान शेअरिंग केले जात आहे. प्रत्येकाचा अनुभव व शस्त्रक्रियेच्या पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा व रोबोटिक शस्त्रक्रियांचा कॅन्सर क्षेत्रात किती प्रभावीपणे वापर सुरू आहे याबाबतचा अनुभव देशभरातून आलेले तज्ज्ञ या कार्यशाळेत मांडत आहेत. ५० टक्के कॅन्सर टाळता येऊ शकतात. यासाठी योग्य वेळी निदान महत्त्वाचे असते. तसेच निदान झाल्यावर योग्य पद्धतीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे असते. हा अनुभव तज्ज्ञांना समृद्ध तर करेलच पण, कॅन्सर पेंशटनाही दिलासा देणारा ठरेल.

कॅन्सर क्षेत्रातील आयएएसओ संस्थेचे अध्यक्ष डॉ. धैर्यसाहील सावंत म्हणाले, कॅन्सर पेशंटना दिलासा देण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. हे सगळे प्रयोग व शस्त्रक्रिया कार्यशाळेत व्हिडीओ वर्कशॉपच्या माध्यमातून आलेल्या तज्ज्ञांना दाखविल्या जात आहेत. त्यावर चर्चा व मंथन केल्याने कॅन्सरतज्ज्ञांना अधिक सक्षमपणे काम करता येईल.

-------

कॅन्सर तरुण होतोय…!

कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. आधुनिक उपचार पद्धती व संशोधनांमुळे पेशंटला कॅन्सरमधून बरे होण्यासाठी धीर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कॅन्सर तरुण होत असल्याची धक्कादायक माहिती डॉ. राज नगरकर यांनी दिली. डॉ. नगरकर म्हणाले, 'कॅन्सरबाबत जनजागृती वाढत आहे. कॅन्सर कशामुळे होतो आणि तो होऊ नये म्हणूनही लोक याबद्दल अधिकाधिक माहीत जाणून घेत आहेत. मात्र, तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झाले असतानाही तरुण मंडळी कॅन्सरची गळाभेट घेताना दिसत आहेत. तोंडाचा कॅन्सर झालेल्यांमध्ये सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. पूर्वी कॅन्सर वयाच्या ६० नंतर होताना दिसायचा मात्र आता तो ४० पर्यंत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित्र स्वच्छतेचा धडाका

$
0
0

महावितरणची शहरभरात मोहीम

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मान्सूनपूर्व तयारीच्या कामकाजांतर्गत महावितरणकडून शहरातील रोहित्रांच्या (डीपी) स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे शहरातील रोहित्र झाडी, झुडुपे, वेली आणि कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त झाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. महावितरण कर्मचाऱ्यांसह कुशल कामगार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची फौज जवळपास ८०० रोहित्रांची स्वच्छता करण्यासाठी जुंपली आहे.

शहरात रोहित्रांभोवती वाढलेली वेली, झाडे आणि झुडुपे हटविण्याची मोहीम पावसाळापूर्व कामांमध्ये दरवर्षी राबविण्यात येते. रोहित्र परिसरात अपघात होऊ नये आणि अखंडित वीजपुरवठा यासाठी पावसाळापूर्व कामे केली जातात. या मोहिमेत रोहित्राच्या संरक्षण जाळीतून आतमध्ये टाकलेला कचराही दूर केला जातो. निविदा काढून जाणकार कामगारांच्या मदतीने लाइन स्टाफकडून झाडांच्या फांद्या व वेली हटविल्या जातात. यावर्षी प्रथमच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना शहरातील रोहित्र स्वच्छतेच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. शहरातील ८०० रोहित्रांच्या साफसफाईचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण होत आले आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना केवळ रोहित्र परिसराच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. जिओ कॉर्डिनेटद्वारे या मोहिमेची पडताळणीही करण्यात येत आहे. रोहित्र संचलनासाठीच्या यंत्रणांचे लोखंडी झाकण नसलेल्या ठिकाणी नवीन झाकणे बसविण्यात येत आहेत.

...

रोहित्राजवळ कचरा टाकू नका

महावितरणच्या शहरातील बहुतेक रोहित्रांजवळ कचरा व उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्याचे स्वच्छता मोहिमेत समोर आले आहे. कचरा नष्ट करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आगीमुळे रोहित्र बाधित होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे रोहित्राजवळ कचरा व उरलेले अन्न न टाकण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँक ग्राहक केंद्रात तरुणीस लूटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात तरुणीला लूटण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सविता मुर्तडक या तरुणीने सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने सविता यांना घेरत स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातील चाळीस हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. यावेळी सपना यांनी दहा मिनिटे चोरट्याशी झटापट केली. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. चोरट्याने त्याच्या एका हातात ग्लोव्हज, चेहऱ्यावर रुमाल व टोक्यात टोपी घातली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ दाखल झाले. ग्राहक सेवा केंद्राच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित चोरटा कैद झाला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश पाटील करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेच्या उपनद्यांची आता वर्षभर स्वच्छता

$
0
0

महापालिका करणार दीड कोटी खर्च; आचारसंहिता संपताच कार्यारंभ आदेश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीत होणाऱ्या प्रदूषण आणि अस्वच्छतेला उपनद्यांमधील प्रदूषण आणि अस्वच्छता कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने आता स्वच्छ गोदावरीसाठी नंदिनी, वाघाडी आणि वालदेवी या उपनद्यांच्या स्वच्छतेचे काम वर्षभर करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, खासगी कंत्राटदारांनी वर्षभर स्वच्छता करण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिका यासाठी एक कोटी ४० लाखांचा खर्च करणार असून, सर्वाधिक ६२ लाखांचा खर्च नंदिनी नदीवर केला जाणार आहे. आचारसंहिता संपताच कंत्राटदारांना कामे दिली जाणार आहेत.

गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काही पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर उच्च न्यायालयाने गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासह तिच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गोदावरीत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गोदावरीच्या प्रदूषणाला नाल्यांमधून येणाऱ्या सांडपाण्यासह गोदावरीला येऊन मिळणाऱ्या उपनद्याही कारणीभूत असल्याचा निष्कर्ष महापालिका प्रशासनाने काढला आहे. नंदिनी, वालदेवी आणि वाघाडी या तीन उपनद्या गोदावरीला येऊन मिळतात. या उपनद्यांमधील सांडपाणी, पाणवेली, कचरा, प्लास्टिक कचरा, निर्माल्य थेट गोदावरीत वाहून येते. त्यामुळे गोदावरीच्या अस्वच्छतेत भर पडते. गोदावरीतीली पाणवेली वाढण्यास या तीन उपनद्यांमधील सांडपाणीही कारणीभूत असते. त्यामुळे महापालिकेने या तीन उपनद्यांची वर्षभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. नंदिनी नदी ही पिंपळगाव बहुला ते तपोवनापर्यंत वाहते. वाघाडी नदी पंचवटीत गोदावरीला येऊन मिळते. पाथर्डी फाटा ते चेहेडी पंपिंग स्टेशन असा वालदेवीचा प्रवास आहे. त्यामुळे या भागातील कचरा व सांडपाणी हे या उपनद्यांच्या माध्यमातून गोदावरी आणि दारणात येऊन प्रदूषण येते. त्यामुळे महापालिकेने या तीनही उपनद्यांच्या वर्षभर स्वच्छतेसाठी निविदा काढल्या आहेत. या निविदा उघडण्यात आल्या असून, त्यासाठी तीन कंत्राटदारांचीही निवड केली आहे. परंतु, सध्या आचारसंहिता असल्याने संबंधित एजन्सींना काम देता आलेले नाही. त्यामुळे आचारसंहिता संपताच या एजन्सीजना नदी स्वच्छतेचे कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे या तीन उपनद्यांमधील अस्वच्छता कमी होऊन गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीला काहीसा हात भार लागणार आहे.

...

दीड कोटीचा खर्च

या तीनही उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी वर्षभर महापालिकेकडून वेगेवगळे उपक्रम राबविले जातात. सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जाते. परंतु, ही स्वच्छता वर्षभर होत नसल्याने या उपनद्यांचे प्रदूषण कायम राहते. वर्षभर नदी स्वच्छतेचे काम दिल्यास गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीला फायदा होईल या उद्देशाने पालिकेने या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी एक कोटी ४० लाखांच्या खर्चाची तरतूद केली आहे. या एजन्सींना वर्षभर टप्प्याटप्प्याने या तीन नद्यांची स्वच्छता करावी लागणार आहे.

...

नदी ..... स्वच्छतेवर खर्च

नंदिनी.... ६२ लाख ४६ हजार रुपये

वालदेवी ... ४६ लाख ४८ हजार रुपये

वाघाडी...... ३१ लाख २३ हजार रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डुबेरे येथे एकाचाविहिरीत पडून मृत्यू

$
0
0

सिन्नर : डुबेरे येथील ढोली वस्तीवर विहीर खोदत असताना क्रेनचा रोप तुटल्यामुळे दोन कामगार विहिरीत पडून गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. भारत राम गुळवे (वय ४८, रा. रामनगर, ता. सिन्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. जखमी गोपीनाथ काशिनाथ मोरे (३५, रा. कोशिंबे, दिंडोरी) याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

समृद्धी महामार्गामुळे विस्थापित झालेले ढोली वस्तीवरील रहिवासी ढोली यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. कामगार क्रेनच्या साह्याने विहिरीत उतरत असताना अचानक रोप तुटला. त्यामुळे गोपीनाथ मोरे व भारत गुळवे विहिरीत पडून गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना सिन्नरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी भारत गुळवे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोरे यांच्यावर सिन्नरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्कॉन मध्ये नरसिंह चतुर्दशी उत्साहात साजरी

$
0
0

इस्कॉनमध्ये नरसिंह चतुर्दशी उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर, नाशिक (इस्कॉन) येथे नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव यांचा प्रकट दिन दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला सकाळी ५ वाजता मंगल आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर महामंत्र जप, शृंगार दर्शन आणि भागवत कथेचा उपस्थित भक्तांनी आनंद घेतला. शनिवारी मंदिर प्रांगणात श्री नरसिंह यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. श्री श्री राधा मदन गोपालजींच्या विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली होती. विग्रहांचा नवीन वस्त्रे व विविध प्रकारच्या फुलांचे हार व दागिने वापरून शृंगार करण्यात आला. मंदिरातील सजावटीत आज दक्षिण भारतीय पध्द्तीने केळी व नारळाच्या पानांचा वापर करण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजता नरसिंहदेवांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. नंतर खास वृंदावन वरून आलेले श्रीमान अच्युतलालजी भट महाराज यांच्या सुमधुर वाणीतून सर्व उपस्थित भक्तांनी कथेचा आस्वाद घेतला. कथेनंतर महाआरती करण्यात आली व उपस्थित सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची उपलब्धता, खासगी बसला प्राधान्यता

$
0
0

सुट्यांमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद; वातानुकूलित 'स्लिपर' बसला पसंती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटीत वातानुकूलित खासगी बसच्या स्लिपर कोच बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिकहून विविध ठिकाणी जाण्यासाठी या बस उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे व इतर वाहतुकीपेक्षा या बसला पसंती दिली आहे. अॅडव्हान्स बुकिंगपेक्षा ऐनवेळी बुकिंग करण्याचे प्रमाण या बससाठी जास्त असल्याचेही समोर आले आहे.

नाशिक येथून या बस राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, लातूर, सांगली, इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणात धावतात. त्याचप्रमाणे राज्याबाहेर गोवा, अहमदाबाद, हैदराबादसह इतर ठिकाणी जाण्यासाठी या बस उपलब्ध आहेत. विविध सुविधा व आरामदायी प्रवास यामुळे या बसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशी प्राथमिकता देतात. अहमदाबाद व मुंबई येथे जाण्यासाठी स्लिपर कोच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हैदराबादसाठी मात्र एकच बस आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे ११, पुणे येथे ७, नागपूर ८, गोवा ३, लातूर ४, सोलापूर ४, सांगली, इचलकरंजी येथे ३ बसेस नाशिकहून रोज सुटतात.

...

एसटीला कमी प्रतिसाद

खासगी बसप्रमाणे एसटीनेसुद्धा अहमदाबाद, कोल्हापूर, इंदूर व नागपूर येथे बस सुरू केल्या आहेत. सुरुवातील या बसचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली होती. पण, नंतर भाडे कमी करण्यात आले. तरीसुद्धा प्रवाशांची प्रथम पसंत ही खासगी बस ठरत आहे.

...

निवडणुकीचा परिणाम

उन्हाळी सुटी व त्यात निवडणुकीचा वातावरण सगळीकडे असल्यामुळे या सिझनमध्ये त्याचा परिमाण झाला असल्याचे ट्रॅव्हल्स एजंट सांगतात. गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद होता. पण, यावेळेस त्याच्यावर काहीसा परिणाम झाला आहे.

...

गेल्या काही वर्षात वातानुकूलित स्लिपर कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुकिंगप्रमाणेच ऐनवेळी तिकीट घेणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. नाशिकहून सगळीकडे या बस धावत असल्यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरत आहे.

- साहेबराव आव्हाड, ट्रॅव्हल्स एजंट

..

वातानुकूलित स्लिपर कोच बसचे सरासरी दर

मुंबई - ४५०

पुणे - ४५० ते ५००

कोल्हापूर - ७००

अहमदाबाद - ९०० ते १०००

नागपूर - १३००

अमरावती - १०००

हैदराबाद - १५००

गोवा -१५००

लातूर - ८००

सोलापूर - ६५०

सांगली - ६५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणा नदीचे पाणी देवळ्यासाठी सोडा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

देवळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गिरणा नदीला पाणी नसल्याने परिसराबरोबरच नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना पूर्णतः ठप्प झाल्या आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. देवळा तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्काळ पाणी सोडणे आवश्यक आहे. नदीला दोन दिवसात पाणी न सोडल्यास राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर पक्षाचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उषा बच्छाव, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निखिल आहेर, तालुकाध्यक्ष सुनील आहेर, कृष्णा अहिरे, राजेश आहेर, सचिन सूर्यवंशी, अनिल पवार, यज्ञेश रौंदळ, सोमनाथ जगताप आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला बुद्धजयंतीचा उत्साह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड विश्वशांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्थांतर्फे शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गौतम बुद्ध प्रतिमा पूजन, खीरदान, भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप यासारखे सामाजिक उपक्रमांचे यानिमित्ताने आयोजन करण्यात आले. पिपल्स रिपब्लिकन पक्ष विश्वशांतीदूत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जेलरोड येथे पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास भिकाभाऊ केदारे, भरत कर्डक, शांताराम भोळे आदी नागरिक उपस्थित होते. बुद्ध विहार महाकर्म बुद्ध विहार ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित ट्रस्टी विलास गांगुर्डे यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमा पूजन झाले. सकाळी नाशिकरोड परिसरातून धम्म रॅली काढण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रा. शरद मोरे,भारतीय बौद्ध महासभेचे चावदास भालेराव, रविकांत भालेराव, माणिकराव साळवे आदी उपस्थित होते. बिटको चौकात खीरदान बिटको चौकात बिटको पॉईंट फ्रेंड सर्कलच्यावतीने भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले.याशिवाय नागरिकांना खीरदान करण्यात आली. बौद्धाचार्य प्रल्हाद उघडे यांनी यावेळी सार्वजनिक बुद्ध वंदना घेतली. या कार्यक्रमाचे

आयोजन बिटको चौकातील सर्व मजूर, कामगारांतर्फे करण्यात आले. रमाई बहुउद्देशीय सभागृह उपनगर येथील रमाई बहुउद्देशीय सभागृहात महिला मंडळ लोकप्रतिनिधी आणि नागरिकांतर्फे तथागत भगवान गौतम बुद्धांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. रमाई बहुउद्देशीय सभागृहात बुद्ध पौर्णिमेचा हा कार्यक्रम झाला. नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे, आशा तडवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बुद्ध पूजा, परित्राण पाठ, कीर्तन कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे आयोजन अनिता कांबळे, सुजाता महिला मंडल, त्रिशरण मित्र मंडळ, सावली बहुद्देशीय संस्थेच्यावतीने करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images