Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिन्नर तालुक्यात टंचाईचा आढावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

प्रशासकीय यंत्रणेने टंचाई निवारणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन दौऱ्यात शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा मागणी व पाणी पुरविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी दौऱ्यात सहभागी झाले होते. दौऱ्यात त्यांनी टंचाईची परिस्थिती, टॅँकर भरण्याचे स्त्रोत, चारा उपलब्धता यांचा त्यांनी आढावा घेतला. दाखल झालेल्या प्रस्तावांनुसार तीन गावांमध्ये जनावरांसाठी टॅँकरच्या अतिरीक्त खेपा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी पठारे, तहसीलदार कोताडे यांनी दिली. आडवाडी, गुळवंच व खापराळे येथे चारा छावण्यासाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठविण्यात आले असून गोंदे व दोडी बुद्रुक येथील संस्थांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. माळेगाव एमआयडीसीच्या जलशुद्धिकरण केंद्राला भेट देवून टॅँकर भरण्याची पद्धत, जलशुद्धिकरण प्रक्रिया आणि पाण्याचे प्रमाण याची त्यांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छत्रपती सेनेतर्फे पाणी वाटप

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून याचे निवारणार्थ आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने छत्रपती सेनेतर्फे सुरगाणा तालुक्यात रविवारी १० टँकर (६० हजार लिटर) पाण्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील खोकरी, जामुनमाथा, गारमाळा, वैटाकपाडा, या ठिकाणी १० टँकरचे पाणीवाटप करण्यात आले. यावेळी तेथील ग्रामस्थानी छत्रपती सेना नेहेमीच जनतेच्या सेवेत उभी राहत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून पाणी वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी, कोर टीम उपाध्यक्ष राजेश पवार, कोर टीम सदस्य संदीप निगळ आदी उपस्थित राहून सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद रोडलावाहतुकीची कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दाट लग्नतिथीमुळे रविवारी (ता. १२) सायंकाळी औरंगाबाद रोडवर वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली. दाट लग्न तिथी असल्याने शहरातील मंगल कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. लॉन्स रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद रोडवर सायंकाळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंगल कार्यालय व लॉन्स चालकांना वाहन पार्किंगविषयी नोटिसा बजावल्या होत्या. असे असूनही वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रकार घडतच आहेत. औरंगाबाद रोडवर रविवारी तपोवनापासून नांदूर नाक्यापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलिस उपलब्ध नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करीत होते. अनेक जण कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने वादाचे खटके उडत असल्याचे चित्र होते. अखेर उशिराने वाहतूक पोलिस या मार्गावर येऊन वाहतूक सुरळीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रोक्त व्यायाम करा

$
0
0

लोगो - यंग सिनिअर्स

शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम करा

डॉ. योगेश चौधरी यांचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनशैलीत जसा बदल होत आहे तसा बदल आहार सेवनातही होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्यायामाची गरज निर्माण झाली आहे. अनेकदा वजन कमी करण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी कोणतीही माहिती न घेता व्यायाम केला जातो. त्याचा दुष्परिणामही होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करताना शास्त्रोक्त माहिती घ्या. व्यायामातील जाणकार अथवा वैद्यकीय सल्ला घेऊनच व्यायाम करा, असा सल्ला शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. योगेश चौधरी यांनी दिला.

ओझर येथे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक आणि जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वावलंबी जगा' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओझरच्या सरपंच जान्हवी कदम, लोकज्योती संस्थेचे कोषाध्यक्ष जितेंद्र येवले यांसह इतर मान्यवर व्यासपीठावर होते. व्याख्यानात उपस्थिताना मार्गदर्शन करताना डॉ. चौधरी म्हणाले की, भारतात ८० टक्के लोक शाकाहारी आहेत. जे शाकाहार घेतात त्यांच्यामध्ये अनेकदा बी-१२ आणि कॅल्शिअमची कमरतता भासते. त्यामुळे चाळीशीनंतर हाडांच्या समस्या आणि व्याधी वाढू लागतात. मात्र, त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हे योग्य नाही. बी-१२ वाढविणाऱ्या भाज्यांचे सेवन अधिक केले पाहिजे. त्याला जोड म्हणून नियमित व्यायाम गरजेचा आहे. त्यासाठी किमान ४० मिनिटे रोज चालायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. एका तरुण व्यक्तीला दिवसाला १२ चमचे साखरेची गरज असते. पण, सध्या चॉकलेट, केक यांच्या सेवणाचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर सारख शरीरात जाते. त्यामुळे वजन वाढू लागते. त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. त्यामुळे संतुलित आहार आणि योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे. तरुणांनी व्यायाम करताना शरीर पिळदार करण्यापेक्षा निरोगी ठेवण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. व्याख्यानानंतर 'आजी आजोबा आणि गंमती-जमती' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. रसिकांनीही कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी रंगली ‘त्रिवेणी’ मैफल

$
0
0

वसंत व्याख्यान - गोदाघाट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भर उन्हात कधी पाऊस भेटीला येतो, तर कधी रानवाटेतून कृष्ण हळूच डोकावतो. प्रेयसीच्या आठवणीने कधी हृदय पिळवटते, तर सरोवराच्या काठावर कधी प्रियकर हसत येतो, कधी मन होते घुंगरू, तर कधी मन होते विठ्ठल, असा भावपूर्ण माहोल तयार झाला होता गोदाघाटावरील 'त्रिवेणी' मैफलमध्ये.

वसंत व्याख्यानमालेत 'त्रिवेणी' या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हे पुष्प निर्मलाताई दातार यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर रविवारी हा कार्यक्रम झाला. मोहन उपासनी यांनी श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या माध्यमातून शब्द-सूर-संवाद हा सीमेपलीकडल्या सर्जनशीलतेचा एक नवा प्रयोग गेले वर्षभर राबवला. एक कवी आणि त्याच्या संगीतबद्ध केलेल्या कवितांचे सादरीकरण अशी ही मैफल होती. या वेळी 'या सरोवराच्या काठी', 'देह झाला स्वर जेव्हा', 'पावसालाही असे हे', 'स्तब्ध थबकली जून पावले', 'परतुनी ये रे कृष्णा', 'पाऊस दणाणला', 'माळले मी चंद्र लाखो', 'अथांगतेवर दूर लाघवी', 'घन विठ्ठल', 'स्वर येई कुठूनसा कानी', 'नर्तनरंग', 'उधाणे न जाणे', 'या सरोवराच्या काठी' ही गाणी सादर करण्यात आली.

कवी सी. एल. कुलकर्णी, किशोर पाठक, मिलिंद गांधी, प्रशांत भरवीरकर, नंदन रहाणे यांच्या रचनांना संगीतकार व प्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी स्वरसाज दिला. या गीतांचे गायन ज्ञानेश्वर कासार, पुष्कराज भागवत, स्वागता पोतनीस, तन्मयी घाडगे यांनी केले. बासरीचा स्वर मोहन उपासनी, तबल्यावर सतीश पेंडसे, ऑक्टोपॅडवर अभिजित शर्मा, सिंथेसायझरवर अनिल धुमाळ यांची साथसंगत होती. ध्वनी पराग जोशी यांचा, तर या कार्यक्रमाचे मनोवेधक निवेदन यशवंत जोशी यांनी केले. प्रारंभी मोहन उपासनी यांनी श्री गणपती व बालाजी भगवान यांची प्रार्थना घेतली. कवीपंचक व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कवीपंचक व गायक वादकांचा सन्मान करण्यात आला.

आजचे व्याख्यान

वक्ता : छोटी गुरू माँ

विषय : खुद को जानो

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना भरघोस मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदा दुष्काळ असल्याने सरकारच्या वतीने प्रभावी उपाययोजना होत नाही, तसेच शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र, यात कुठलेही तथ्य नसून शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जात असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीनंतर ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या आठ तालुक्यांतील ९३० गावांतील ४ लाख ८० हजार ५८९ शेतकऱ्यांना २४९.४७ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ८९३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १४.८० कोटी अदा करण्यात येणार आहेत. त्यापैकी ११ हजार ८८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण ५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख सहा हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपये याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण २१ कोटी ३४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने विविध माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. एकूण २८३ टँकर सुरू आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वांत जास्त ६१ टँकर सुरू असून, दिंडोरी तालुक्यात एक टँकर सुरू आहे. याशिवाय नळपाणी पुरवठा योजनांची ६ कोटी २१ लाख रुपये एवढी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व नळपाणी पुरवठांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळावर योजनांची मलमपट्टी

$
0
0

३८ गावांसह चार पाड्यांवर टँकरने पाणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दुष्काळ निवारणासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ३८ गावे व चार पाड्यांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय या गावांमध्ये एकूण १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व गावांची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाखांच्या घरात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजनांनी दुष्काळी परिस्थितीवर केवळ मलमपट्टी होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका वगळता उर्वरित शिंदखेडा, साक्री आणि धुळे तिन्ही तालुक्यांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यात धुळे ११, साक्री ०४ तर शिंदखेड्यातील १६ टँकरचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यातील कमी पर्जन्यमान होत असल्यामुळे या तालुक्याला नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. आताही जिल्ह्यातील सर्वाधिक १६ टँकर एकट्या शिंदखेडा तालुक्यात सुरू असून, सर्वाधिक ७१ विहिरींचे अधिग्रहणही याच तालुक्यात करण्यात आले आहे. तर साक्री तालुक्यात सर्वात कमी चार टँकर सुरू आहेत.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ रविवार (दि. १२) अखेर जिल्ह्यातील एका नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन नऊ तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून तसेच १४५ विहिरींचे अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची ३.३६ कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ३ तालुक्यातील ४५१ गावांतील १ लाख ५५ हजार ६२८ इतक्या शेतकऱ्यांना १२२.११ कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २९ हजार २४७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी ६.४४ कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी ६.४० कोटी इतकी रक्कम ७ हजार १८१ शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

‘रोहयो’ची कामे सुरू
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ४६ हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण ९.२० कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ७३३ कामे सुरू असून, त्यावर ४ हजार १०९ मजुरांची उपस्थिती आहे. सर्वात जास्त १ हजार ३७९ मजूर शिंदखेडा तालुक्यात असून, सर्वात कमी ६६४ मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये १३ हजार ८९९ कामे शेल्फवर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार जिल्ह्यात पाणीबाणी

$
0
0

जूनअखेर पुरेल एवढाच पाणीसाठा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आदिवासीबहूल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी हे तालुके असून, सर्व तालुक्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठाही जून महिन्याअखेर पुरेल एवढाच शिल्लक असल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प शिवण, दरा, नागण आणि कोरडी मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. मात्र, अजूनपर्यंत प्रशासनाकडे टँकर व विहीर अधिग्रहणाची मागणी करण्यात आलेली नाही. नवापूर तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत असून, नागण प्रकल्पातून पाणी सोडण्याची आणि नवागाव येथील केटीवेअर नादुरुस्त असल्याने प्रकल्पातून पाणी सोडल्यावर ते थेट गुजरात राज्यात वाहून जाईल. त्यामुळे सर्वप्रथम केटीवेअरची दुरुस्ती आणि मग प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, असे लेखी स्वरुपात पत्रदेखील जिल्हा जलसंपदा विभागाला देण्यात आले होते. यामुळे अखेर शिल्लक पाणीसाठ्यावरदेखील पाणी फिरले असून, नवापूरकरांची तहान ऐन उन्हाळ्यात नेमकी कशी भागणार हा प्रश्न कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समस्या निराकरणाची क्षमताभारतीय संस्कृतीत

$
0
0

'समस्या निराकरणाची

क्षमता भारतीय संस्कृतीत'

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भारतीय संस्कृती व तत्वज्ञान हे विज्ञाननिष्ठ असून मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे, असे प्रतिपादन धर्मशास्त्रचार्य जगदीश महाराज जोशी यांनी केले.

जेलरोड येथे शिवरामनगरमध्ये माऊली प्रतिष्ठानतर्फे श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरू आहे. गीतेचे निरुपण करताना ते बोलत होते. जोशी पुढे म्हणाले की, भारतीय तत्वज्ञान जीवनाला कसे आधारभूत आहे याचे चिंतन भागवत ग्रंथातील पंचम स्कंधातून विशेष रूपाने पहावयास मिळते. आजच्या आधुनिक व धावपळीच्या युगात मानवी जीवनात शांती, समाधान व सुख प्राप्त व्हावी यासाठी संत वाङमय, वेद शास्त्र व पुराणाशिवाय पर्याय नाही. हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली. यावेळी आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रामदास महाराज शेगावकर, शिवरामबाबा म्हसकर आदी मान्यवरांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकांत आढाव, नामदेव आढव, कृष्णा आढाव, आदित्य आढाव, अच्युत हरक, ओमकार आढाव, ओम भुसाळ आदी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पावसाळापूर्व कामांना वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यासाठी नाशिक महापालिकेने नियोजन केले असून, शहरात पाणी तुंबू नये यासाठी पूर्व कामांना सुरुवात केली आहे.

शहरातील पंचवटी भागातील नालेसफाई करण्यात येत असून ढाप्यांच्या झाकणाची सफाई करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्या चेंबरच्या झाकणांची छिद्रे बुजली गेली आहेत. अशी छिद्रे ओपन करण्यात येत आहेत. नाशिकरोड परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, देवळाली गावातील काही भागात कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. त्याच प्रमाणे उत्तमनगर, कमोदरोड, अशोकस्तंभ, मॅरेथॉन चौक, मेरी, म्हसरुळ, सुदर्शन कॉलनी या भागात कामे सुरू आहेत. यंदा गावठाणच्या कामाकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांची सेवा हेच खरे कर्म

$
0
0

(सोशल नेटवर्किंग लोगो-आर्टिस्टकडे दिलेला आहे.)

डॉ. शिवमुनीजी महाराज यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समाजातील दीनदुबळ्या रुग्णांच्या सेवाहेतूने २० वर्षांपूर्वी हुकूमचंद बागमार यांनी लावलेल्या रुग्णालयरुपी रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. या विकासासाठी आत्मियतेने कार्य करणाऱ्या सर्वच घटकांचे प्रयत्न खरोखरच खूप कौतुकास्पद आहेत. रुग्णांची सेवा हेच खरे कर्म आहे, असे प्रतिपादन आचार्य ध्यानयोगी डॉ. शिवमुनीजी महाराज यांनी काढले. यावेळी मोठ्या दिमाखात उपस्थितांनी महाराजांचे स्वागत केले.

पेठरोडवरील नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रुग्णालयाला रविवारी डॉ. शिवमुनीजी महाराजांसह युवाचार्य पूज्य श्री महेंद्रऋषीजी महाराज, शिरीष मुनीजी, महासती मधुस्मिताजी यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सेक्रेटरी शशिकांत पारख, पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह ललित मोदी, चंद्रकांत पारख, हरीष लोढा, समाजातील मान्यवर, रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स व परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात महाराजांचे स्वागत केले. अध्यक्ष भंडारी यांनी रुग्णालयातील सर्व सुविधांचा महाराजांना परिचय करून दिला. त्यानंतर महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रुग्णालयातील सुसज्ज सुविधा, यंत्रणा, वेगवेगळे विभाग, मोफत उपचार यासंदर्भात अध्यक्ष भंडारी यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. डॉ. शिवमुनीजी महाराज यांच्याबरोबरच महासती मधुस्मिताजी, युवाचार्य श्री महेंद्रऋषीजी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी रवींद्र गोठी, राहूल डेढिया, सुभाष नहार, सुभाष लुनावत, मोहनलाल लोढा, प्रकाश बोरा, गौतम चोरडिया, डॉ. प्रफुल्ल सुराणा आदी उपस्थित होते.

----

मोफत शिक्षणाची संधी

नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णालय परिसरात परिचारिका महाविद्यालय उभारण्यात आले असून, त्यात मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या क्षेत्रात चांगल्या वेतनासह नोकरीच्या मोठ्या संधी असल्याने शहरासह आदिवासी भागांतील मुलींनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भंडारी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परमेश्वराची सेवा हे कर्तव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परमेश्वराचे चिंतन करताना मिळणारी प्रेरणा जीवनाला दिशा देणारी ठरते. जेव्हा व्यक्ती साधना आणि अध्यात्मात गुंतते तेव्हा संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. ही शक्ती परमेश्वराच्या आराधनेतून मिळत असते. परमेश्वर मानवाला जे वरदान देऊ शकतो, ते जगातील कोणतीही शक्ती देऊ शकत नाही. त्यामुळे परमेश्वराची आराधना ही एक प्रकारची सेवा आहे. ही सेवा प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे, असे निरुपण हरिद्वार येथील आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.

'नाशिक सेवा समिती ट्रस्ट'च्या वतीने 'प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याचे पाचवे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. यावेळी हरिद्वार येथील आचार्य हरिकृष्ण महाराज म्हणाले की, आयुष्यभर परमेश्वराला निस्वार्थपणे भोग लावत रहा. जेव्हा परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. तेव्हा कृपाशिर्वाद नक्की मिळेल. परमेश्वराच्या चिंतनात जीवन सार्थकी लावण्याची ताकद आहे. अध्यात्मिक मार्गावर चालताना मानवाने परमेश्वराचे स्मरण कायम करायला हवे. परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी अविरत सेवा आणि साधना करावी लागते. मात्र, अनेकदा साधनेनंतर लागलीच फळाची अपेक्षा केली जाते. त्यामुळे मानव असमाधानी राहतो, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, चातुर्मास हा पवित्र महिना मानला जातो. त्याचे कारण असे की, त्या चार महिन्यांमध्ये केलेली प्रार्थना आणि साधना परमेश्वरापर्यंत पोहोचते. चातुर्मासमध्ये उपवास करुन परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. ब्रह्मांड हे परमेश्वराच्या आशिर्वादाने बनले आहे. त्यामुळे जीवनात परमेश्वराच्या साधनेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. जीवन सार्थ ठरविण्यासाठी नि:स्वार्थपणे भक्तीमार्ग स्वीकारा, असा सल्ला त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्ता गोळीचा मुक्काम धुळ्यात

$
0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: मालेगावमध्ये कुत्ता गोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपेच्या टॅब्लेट्स आता धुळ्यापर्यंत पोहचल्या आहेत. कुत्ता गोळीचे थेट कनेक्शन धुळे शहरात दडल्याचे समोर येत असून, नुकतीच ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने तिथे शोध मोहीमदेखील राबवली. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

मॉलिवूड, जातीय दंगली, पॉवरलूम अशा एका ना अनेक कारणांमुळे चर्चेत येणारे मालेगाव गतवर्षी अल्प्रालोझम (मालेगावसाठी कुत्ता गोळी) या झोपेच्या गोळ्यांमुळे प्रकाशझोतात आले. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करीत दहाहून अधिक संशयितांना अटक करीत सहा हजारांपेक्षा अधिक टॅब्लेट्स जप्त केल्या. विशेष म्हणजे या गोळ्यांचा वापर सराईत गुन्हेगारांकडून होत असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिस आणि एफडीएने गुजरात तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये या प्रकरणी कारवाई केली. गुजरातमधून इब्राहीम अहमद अब्दुल गणी उर्फ धुरी या तस्करास अटक करण्यात आली. इब्राहीमच्या अटकेनंतर इतर तस्करांवर फास आवळला गेला. त्यामुळे मालेगावमधून कुत्ता गोळी हद्दपार झाली. मात्र, काही दिवसांत तस्कर सक्रीय झाले. गत आठवड्यातच प्रशासनाने काही संशयितांना मोठ्या साठ्यासह मालेगावमधून अटक केली. या गुन्ह्याची सूत्रे धुळे येथून हलत असल्याचे आणि त्यामागे दोन संशयित असल्याचे समोर आले. मालेगाव पोलिसांचे एक पथक धुळे येथे पोहचले. मात्र, या पथकाला यश मिळाले नाही. याबाबत बोलताना एफडीएच्या सूत्रांनी सांगितले की, मालेगावपासून धुळे फारतर ४० ते ५० किलोमीटर इतकेच अंतरावर आहे. यापूर्वी मालेगावच्या काही गुन्ह्यांच्या तपासात धुळ्याचा संबंध समोर आला होता. मात्र, गुजरात व्हाया धुळे तस्करांचा प्रवास असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

थेट कारवाई मोहीम

आता सध्यातरी कुत्ता गोळीचा थेट संबंध धुळे जिल्ह्याशी जोडण्याइतपत प्राथमिक निष्कर्ष समोर येत असून, त्यांचा तपास सर्वांगाने होणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या औषधांचा वापर गुन्हेगार व्यक्तींकडून होतो. मालेगावमध्ये औषध मिळत नाही. त्यामुळे जवळच्या धुळे जिल्ह्यात या गोळीची विक्री होत असावी, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहे. हे काम आटोपल्याबरोबर विभागातील पाचही जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्स मालकांमध्ये जनजागृती करणे व नियमबाह्य काम होत असल्यास थेट कारवाई करण्याची मोहीम आखण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला वाढली टंचाईची भीषणता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यात टंचाईची भीषणता वाढली आहे. शासकीय पातळीवर सात टँकर सुरू करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आणि ग्रामपंचायतींच्या स्थानिक पातळीवरील नियाजनाच्या माध्यमातून धावत असलेल्या टँकरची संख्या अधिक आहे. प्रशासनाने यापुढे टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून टंचाईची शक्यता असेल तेथील ग्रामसेवक, तलाठी, पोलिस टील आदी शासनाच्या प्रतिनिधींनी तातडीने तसे कळविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तालुक्यात सात टँकर मंजूर आहेत तथापि प्रत्याक्षात सहा टँकर पाणी पोहचवत आहेत. उर्वरित एक टँकर अद्याप सुरू झालेला नाही. टँकरसाठी जीपीएस यंत्रणा सक्तीची आहे; मात्र मोबाईल रेंजअभावी ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. 'पाणी आहे उशाला तरी कोरड घशाला' याची प्रचिती तालुक्यात ठिकठिकाणी येत आहे. तालुक्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारा महाकाय प्रकल्प वैतरणा धरणाच्या परिसरात ही परिस्थिती अनुभवास येत आहे. देवगाव परिसरात धरणाच्या बाजूस महिला खड्डे खोदून पाणी भरतांना आढळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटच हेल्मेट चोहीकडे!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट, तसेच सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर शहरात सोमवारी जम्बो कारवाई करण्यात आली. मात्र, याची पूर्वकल्पना असलेल्या वाहनचालकांनी हेल्मेट व सीट बेल्ट वापरास प्राधान्य दिले. त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ९० टक्के नागरिक हेल्मेटचा वापर करताना दिसले. सायंकाळी मात्र परिस्थिती जैसे थे झाली होती. सकाळच्या सत्रात पोलिसांनी शेकडो वाहनचालकांवर कारवाई करीत दहा लाखांच्या घरात दंड वसूल केला.

हेल्मेटसक्तीच्या कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने जवळपास ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय तीन नाकाबंदी पॉइंट तैनात करण्यात आले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. दरम्यान, या कारवाईची माहिती असलेल्या नागरिकांनी कटकट टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सकाळच्या सत्रात संपूर्ण शहरात हेल्मेटच हेल्मेट दिसून आले. नेहमीप्रमाणे काही ठिकाणी वादविवादाच्या घटनादेखील घडल्यात. मात्र, हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. मुंबई नाका, एबीबी सर्कल, शालिमार, कॉलेजरोड, बिटको पॉइंट अशा वर्दळीच्या ठिकाणी यामुळे वाहतूक कोंडीदेखील झाली होती.

--

सकाळचे हेल्मेट सायंकाळी बेपत्ता

सकाळी सुरू झालेल्या हेल्मेट व सीट बेल्ट कारवाईबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, सोशल मीडियावर होणारा विरोध आणि सकाळची परिस्थिती यात मोठा फरक दिसून आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने हेल्मेटचा वापर केला. पण, ही परिस्थिती दुपारी १ वाजेपर्यंतच होती. पोलिसांची नाकाबंदी संपली आणि डोक्यातील हेल्मेट हॅण्डला आणि पुढे ते वाहनाच्या डिकीत किंवा घरात विसावले. पोलिसांकडून थेट ५०० रुपयांचा दंड होत असल्याने आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर होतो, हे यातून स्पष्ट झाले.

--

हेल्मेट डिकीत, पण कारवाई टळली

सकाळच्या सुमारास अनेक वाहनचालकांनी हेल्मेट हॅण्डलला अथवा डिकीत ठेवल्याने पोलिसांनी अडविले. त्यापैकी काहींवर कारवाईदेखील झाली. मात्र, याच सुमारास एक वायरलेस झाला. त्यात हेल्मेट आहे मात्र त्याचा वापर करीत नसलेल्या वाहनचालकांकडून दंड वसूल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी थेट घरी जाऊन आणलेले हेल्मेट पोलिसदादाच्या हातावर टेकवले. मागील सात दिवसांपासून तयारी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त केसेस करायच्या याबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. मात्र, ऐनवेळी सौम्य कारवाईचा पवित्रा घेण्यात आल्याने पोलिस कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

--

अचानक होणार कारवाई

या आठवड्यात सकाळच्या सुमारास नियमित कारवाई होणार आहे. मात्र, नागरिक ठराविक वेळेत आणि ठिकाणांवर हेल्मेटचा वापर करतात आणि नंतर हेल्मेट काढून ठेवतात, या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून अचानक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

--

कॉलेजरोड सायंकाळी टार्गेट

शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी अचानक रिक्षा तपासणी व हेल्मेटसक्तीची कारवाई केली. कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. गणवेश नसणे, फ्रंट सीट आदी नियमांनुसार रिक्षाचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. याचवेळी दुचाकीचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येक फेरी ४५ मिनिटांची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक शाखेकडून मतमोजणीचे सूक्ष्म नियोजन सुरू असून, पहिली फेरी एक तासाची असेल. नंतरची प्रत्येक फेरी किमान ३५ ते ४५ मिनिटांची असेल असे निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त २४ तासांचा कालावधी गृहीत धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यासाठी आता अवघ्या १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या सर्वाधिक २७ फेऱ्या होणार आहेत, तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात २५ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी टेबलावर एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाचवेळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. ईव्हीएमवरील मतमोजणीची पहिली फेरी सकाळी साडेआठला सुरू होईल. ही फेरी सकाळी साडेनऊपर्यंत चालेल. त्यानंतरची प्रत्येक फेरी किमान ३५ ते ४५ मिनिटांची असेल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या फेरीतील मतमोजणीची आकडेवारी संकलित केली जाईल. सहा विधानसभा मतदारसंघांची संबंधित फेरीची मतगणनेची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्या फेरीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांचा तपशील घोषित करतील. त्यानंतर पुढील फेरीच्या मतमोजणीला सुरुवात केली जाईल असे आनंदकर यांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारची प्रक्रिया दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीवेळी राबविली जाईल. या फेऱ्या अंतिम टप्प्यात पोहोचतील, तोपर्यंत निकालाचा अंदाज स्पष्ट होऊ शकेल. परंतु, फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील पावत्या लकी ड्रॉ पद्धतीने मोजणीसाठी काढण्यात येतील. ही मोजणी पाच तास चालण्याची शक्यता असून त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे हा निकाल रात्री उशिरा जाहीर केला जाऊ शकतो, अशी शक्यता निवडणूक शाखेने व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेनंतर भूखंडवाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव आक्राळे येथील नव्याने झालेल्या एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप आता आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहे. त्यासाठी रितसर जाहिरात काढून हे भूखंड उद्योगांना दिले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील भूखंडवाटप वेगवेगळ्या कारणाने रखडले होते. आता यातील अडथळे दूर झाले आहेत.

नाशिक शहरालगत नव्या उद्योगांना जागा नसल्यामुळे गेल्या काही वर्षांत मोठी गुंतवणूक झाली नाही. 'मेक इन नाशिक'नंतर गुंतवणुकीस वेग आला. पण, जागेचा मुद्दा कळीचा ठरला. त्यामुळे तळेगाव अक्राळे येथील एमआयडीसीत मोठ्या गुंतवणुकीची सर्वांना आशा आहे. नाशिकपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या एमआयडीसीला पाणी पालखेड धरणातून मिळणार आहे. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न फारसा नाही. त्याचप्रमाणे ओझर विमानतळही येथून जवळ असल्यामुळे उद्योगांना त्याचा फायदा होऊ शकतो.

दिंडोरी तालुक्यात लखमापूर येथे अगोदरच एमआयडीसी आहे. त्याचप्रमाणे औषधनिर्मिती व मद्यनिर्मितीचे कारखानेसुद्धा आहेत. त्यामुळे या एमआयडीसीमुळे उद्योगांना चालना मिळण्यासह रोजगारातही वाढ होणार आहे. सुरुवातीला येथे औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक कारखान्यांनी रस दाखवला, तर एका बिस्किट कंपनीनेही येथे पाहणी केली होती. आता येथील भूखंड वाटप सुरू झाल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक कंपन्या पुढे येणार आहेत.

शहरालगत जागेला विलंब

नाशिक येथे सातपूर, अंबड या औद्योगिक वसाहतीलगत जागा मिळावी यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न सुरू आहेत. पण, येथे जागा मिळाली तर त्यावर काम करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे तळेगाव अक्राळे येथे उद्योजकांना चांगली संधी असणार आहे. नाशिकपासून जवळ असल्यामुळे उद्योजकांना शहरात राहून येथील उद्योग हाताळणे सोपे होणार आहे. तळेगाव अक्राळे येथे भूखंड उद्योगांसाठी संधी असली तरी येथील दर मात्र जास्त आहेत. ते कमी करावेत यासाठी उद्योजक संघटनांनी वारंवार मागणी केली. पण, एमआयडीसीने हे दर कमी केले नाहीत.

तळेगाव अक्राळे एमआयडीसीमुळे औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होईल. त्यासाठी एमआयडीसीने लवकर भूखंडवाटप करण्याची गरज आहे. येथे दर जास्त असल्यामुळे ते कमी करणे गरजेचे आहे.

- तुषार चव्हाण, मानद सरचिटणीस, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वस्थ क्षणांच्या कुशीतून पुस्तकाचा जन्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अमेरिकेत वास्तव्यास असताना तिथे फक्त फायद्यासाठी जगणारी अनेक मंडळी दिसून आली. देशावर ओढावलेले संकट ज्याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणतो, ते फक्त दु:ख व्यक्त करण्यापुरतेच असते, असे त्यांना वाटायचे. राष्ट्रीय आपत्ती ही फक्त एक घटना आहे, असे मानणाऱ्यांना भावना कशा नाहीत. हे सतत माझ्या मनाला सलत असायचे. अशा अनेक अस्वस्थ क्षणांच्या कुशीतून 'घातसूत्र' या पुस्तकाचा जन्म झाला', असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले. 'घातसूत्र' या पुस्तकाचा परिचय करुन देताना ते बोलत होते.

सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्र मंडळातर्फे 'घातसूत्र' या पुस्तकावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हे व्याख्यान झाले.अभिनेते, लेखक, व्यवस्थापन व आर्थिक तज्ज्ञ, वक्ते व प्रशिक्षक असलेले दीपक करंजीकर यांच्या 'घातसूत्र' या तब्बल ८६० पानी ग्रंथाचा परिचय करंजीकर यांनी स्वत: करुन दिला. यावेळी सावानाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास औरंगाबादकर, सांस्कृतिक सचिव डॉ. वेदश्री थिगळे, जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह डॉ. धर्माजी बोडके, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, रमेश कडलग, कवी किशोर पाठक व्यासपीठावर होते.

पुस्तक परिचय करुन देताना करंजीकर म्हणाले की, जाती आणि विचारातील भेदातून युद्ध होते, असा आपला समज आहे. पण, ही केवळ माध्यमे असून युध्दजन्य परिस्थिती निर्माण करणारी व्यवस्था यामागे असते. स्वार्थासाठी युध्द घडविण्याचाही त्या व्यवस्थांची तयारी असते. त्यामुळे युद्ध हा कधीही अपयशी न ठरणारा व्यवसायिक आराखडा आहे, असे ते म्हणाले.

या पुस्तकाच्या लेखनासाठी ४८१ पुस्तके वाचली. त्यासाठी ७ वर्षांचा कालावधी गेला. या पुस्तकात १९१२ मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजापासून तर अगदी २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ड्रम्प यांची झालेली निवड, या पर्यंतचे अनेक संदर्भ पुस्तकात असल्याचे करंजीकर यांनी सांगितले. व्याख्यानाचे प्रास्ताविक रमेश कडलग यांनी केले. परिचय प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी केला, तर सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावणीला सिन्नरमध्ये मुहूर्त!

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावाला मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दोन चारा छावण्यांना परवानगी दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये तालुक्यात या छावण्या सुरू होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सोमवारी दिली.

पाणीटंचाईबरोबरच चारा उपलब्धतेचा प्रश्नही जिल्ह्यात जटील बनला आहे. जिल्ह्यात सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, नाशिक आणि चांदवड हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. या तालुक्यांमध्ये चाराटंचाईची समस्याही भेडसावत असून चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. चारा छावण्यांसाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार प्रशासनाला सात प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी सिन्नर तालुक्यातील दोन प्रस्तावांना सोमवारी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मान्यता दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथील नंदन वैभव शेतकरी बचत गट आणि गुळवंच येथील ग्राम विकास फाऊंडेशन या दोन संस्थांचे चारा छावणी सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत. छावणी सुरू करण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून दोन दिवसांत सिन्नर तालुक्यामध्ये या छावण्या कार्यरत होतील अशी माहिती खेडकर यांनी दिली.

बळीराजाला दिलासा

चारा छावणीमध्ये २०० ते अगदी ३ हजार जनावरे देखील ठेवता येऊ शकतात. या जनावरांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था तेथे असेल. दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या जनावरांची व्यवस्था या छावण्यांमध्ये घेतली जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळचित्र

दुष्काळी तालुके : सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, नाशिक, चांदवड

चारा छावणी प्रस्ताव : सात

सिन्नरमधील छावण्या : आडवाडी, गुळवंच

क्षमता : २०० ते तीन हजार जनावरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नपत्रिका देतेय सामाजिक संदेश

$
0
0

दीपक महाजन, कळवण

विवाह म्हंटला की लग्नपत्रिका आलीच. भाऊबंद, मित्रपरिवार, नातेवाइक इत्यादींचे नावे टाकून भरगच्च पत्रिका आपण नेहमी बघतो. ग्रामीण भागात तर शेकडो नावांची जंत्री या पत्रिकांमध्ये असते. आजच्या संगणकीय व सोशल मीडियाच्या युगात लग्नपत्रिकांची क्रेज काही कमी झाली नाही. मात्र सर्वात वेगळी व आधुनिक काळाची गरज ओळखून कळवण तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील सदस्यांनी समाजप्रबोधन करण्यासाठी तयार करण्यात आलेली लग्नपत्रिका मात्र सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

कळवण तालुक्यातील खडकी येथील केदा बागुल यांचे ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र व शिरसा (ता. कळवण) येथील काळूराम जगताप यांची सुकन्या अंजली यांचा १५ मे रोजी विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यात लक्षवेधी ठरत आहे ती म्हणजे निमंत्रण पत्रिका. या वैविध्यपूर्ण लग्नपत्रिकेत 'बेटी बचाव बेटी पढाओ' या वाक्याबरोबरच 'मुलगा मुलगी दोघेही समान, दोघेही उंचावतील देशाची मान' या सुभाषिताद्वारे प्रबोधन केले आहे. लग्नपत्रिका निमंत्रण यांचे सर्व सोपस्कार तर या पत्रिकेत आहेतच मात्र 'जल है तो कल है' तसेच 'वृक्ष वाचवा पर्यावरण वाचवा' असा संदेशही देण्यात आला आहे. 'नेत्रदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान' हा मेसेजही अनेकांचे लक्ष वेधत आहे. याशिवाय 'स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छता की ओर' म्हणत स्वच्छता अभियान राबविण्यावर भर दिला आहे. सरतेशेवटी 'जातीपातीचे बंध तोडा भारत जोडा भारत जोडा' अशी संघटीत होण्याचीही हाक देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images