Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वॉटर कप स्पर्धेतील संशयितांविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

शिवाजीनगर (ता. चांदवड) डुकरनळी येथील वन जमीन कसणाऱ्या धनंजय बाबाजी गांगुर्डे यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना 'आम्ही कसत असलेल्या वन जमिनीऐवजी तुम्ही दुसरीकडे काम करा', असे सांगितले. मात्र, संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची सोन्याबाई धनंजय गांगुर्डे फिर्याद यांनी दिली. त्याआधारे चांदवड पोलिसात अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डुकरनळी येथील वन विभागाच्या हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ५६० मध्ये धनंजय गांगुर्डे हे पत्नी सोन्याबाई व तीन मुलींसह राहतात. शुक्रवार (दि. ३) सकाळी ७ वाजता धनंजय गांगुर्डे व पत्नी सोन्याबाई हे घराबाहेर असताना कसत असलेल्या वन जमिनीच्या हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ५६० मध्ये रवी मते, भाऊराव चव्हाण, वाल्मीक चव्हाण, बबन चव्हाण, अशोक मते, सोमा चव्हाण, पप्पू चव्हाण, योगेश ढोमसे व इतर १०० ते १२५ महिला पुरुष टिकाव फावडे घेऊन पाण्याच्या चारीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी धनंजय व सोन्याबाई गांगुर्डे यांनी खोदकाम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन 'आम्ही कसत असलेल्या वन खात्याच्या जमिनीवर काम करू नका, तुम्हाला काम करायचे असेल तर ते डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीत जागेवर जा, असे सांगितले. मात्र, खोदकाम करण्यासाठी आलेल्या संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ करीत धनंजय गांगुर्डे यांना चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात सासरे बाबाजी गांगुर्डे, सासू इंदुबाई गांगुर्डे हे मुका मार लागून किरकोळ जखमी झाले.

यावेळी पती धनंजय यास सोडवण्यास सोन्याबाई गेल्या असता मुलगी अपेक्षा जमिनीवर पडली. तिच्या पाठीला दगडाचा मुका मार लागला. यासंदर्भात सोन्याबाई धनंजय गांगुर्डे यांनी पाणी फाउंडेशनचे काम करणाऱ्या नागरिकांविरोधात फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्रीचा वनवास आजही संपलेला नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्त्री प्रतिमा, व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना दोन भूमिका आढळतात. एक तर तिला देवी मानले जाते किंवा दासी तरी मानले जाते. आजही सीतेचा अंश असणाऱ्या स्त्रीवर अन्याय होतो. त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते. स्त्रीयांवर कौमार्य चाचण्यांसारख्या प्रथांतून निष्ठा सिद्ध करण्याची वेळ येते, त्यामुळे आजही स्त्रीचा वनवास संपलेला नाही, असे प्रतिपादन सुवर्णा महाबळ यांनी केले.

डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे वसंत व्याख्यानमालेत महाबळ या 'मी सीता बोलतेय' या विषयावर बोलत होत्या. हरिणाकडे आकृष्ट झाल्याच्या त्या एका मोहाच्या क्षणाने रामायण घडले. शापित जीवनासाठी हा मोह कारणीभूत ठरला. जीवनात मोहाचे अनेक क्षण येतात त्याला वेळीच आवर घालणे गरजेचे असते, हे आपणही ओळखले पाहिजे. आजही समाजात राम आहे आणि रावण आहेत. सितेकडे देवी म्हणून पाहण्यापेक्षा स्त्री म्हणून बघा, असा संदेशही महाबळ यांनी त्यांनी दिला.

चंद्रकांत जामदार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, बाजीराव येवले, आशा चौधरी, अरविंद चौधरी, माधव गोसावी, आनंद संगवी, सुरेंद्र गुजराथी, मार्तंड पिंगळे, डॉ. शरद पाटील, चंद्रकला जोशी आदींसह श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएनजी डेपोसाठी मिळेना जागा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्याच्या मार्गात आता दिवसेंदिवस अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. शहर बससेवेअंतर्गत दोनशे बसेस या सीएनजीवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून सीएनजी युनिट उभे करावे लागणार आहे. या सीएनजी युनिटसाठी लागणाऱ्या जागेवर आता पालिकेने कंपनीची अडीच टक्के रेडीरेकनर दरानुसार भाडेआकारणीची मागणी फेटाळून लावत सहा टक्क्यांनीच भाडे आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजी युनिटसाठी जागा शोधण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर उभे ठाकले आहे.

शहर बससेवेअंतर्गत शहरात ४०० बसेस धावणार आहेत. त्यातील २०० बसेस इलेक्ट्रीक, तर २०० बसेस सीएनजीवर चालविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी, सीएनजी बसेससाठी शहरात सीएनजी युनिट उभे करावे लागणार आहे. मक्तेदार केवळ बसेसचा पुरवठा करणार असून, सीएनजी पुरवठ्याची जबाबदारी ही महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडे असणार आहे. त्यामुळे सीएनजी डेपोसाठी संबंधित कंपनीकडून शहरातील जागांची चाचपणी सुरू आहे. कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात जागेचाही शोध सुरू आहे. त्यासाठी आडगाव येथील २००० हजार चौरस फूट जागेची मागणी केली आहे. परंतु, या ठिकाणच्या जागेला महापालिकेने सहा टक्के रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारणी केली आहे. या जागेचे दरमहा भाडे हे पावणेदोन लाख रुपये होणार आहे. कंपनीने अडीच टक्के रेडीरेकनर दर लावण्याची मागणी केली आहे. परंतु, पालिकेने ती फेटाळून लावल्याने दुसऱ्या जागेचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे या सगळ्या वादात बससेवेचे आगमन मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आर्थिक माहितीची गुप्तता पाळावी'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बँकांनी आजच्या काळात जोखीम व्यवस्थापन करणे गरजेचे असून, सायबर गुन्हे रोखण्यासाठी डाटा सुरक्षेबाबत गुप्तता पाळणे, नेटवर्क सिक्युरिटीबरोबरच स्वतंत्र सायबर सिक्युरिटी पॉलिसी तयार करावी, ग्राहक आणि बँक या दोघांनीही आर्थिक माहिती उघड न करण्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन एन. के. जी. एस. बी. बँकेचे माहिती अधिकारी व मुख्य आयटी हेड रवीकिरण मंकीकर यांनी केले. विश्वास को-ऑप बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे जनक क्लाउड एलवूड शॅनन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून सावरकरनगर येथील 'अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिजास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब' येथे 'माहिती व तंत्रज्ञान' दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 'सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क' या विषयावर मार्गदर्शन करताना मंकीकर बोलत होते. 'सॉफ्ट ट्रस्ट सोल्यूशन'चे सहकार्य लाभले. या संस्थेचे मिलिंद बक्षी उपस्थित होते. रवीकिरण मंकीकर यांचे स्वागत जयंत भातंबरेकर यांनी, तर विकास नाईक यांचे स्वागत प्रसाद पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत नाशिकरोडमार्गे नागपूरला विशेष गाड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबई-नागपूर दरम्यान उन्हाळी सुटीनिमित्त मध्य रेल्वेने विशेष साप्ताहीक रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्या नाशिकरोडला थांबणार असल्याने स्थानिक प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

गाडी क्रमांक ०२०२१ गाडी मुंबईहून दर रविवारी ५ मे ते २० जून या कालावधीत धावेल. मुंबईहून ही गाडी सकाळी साडेअकराला निघून दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेतीनला नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७४ गाडी नागपूरहून दर सोमवारी सकाळी ६.५० वाजता निघेल. ६ मे ते १ जुलै कालावधीत ही गाडी धावेल. मुंबईली ती रात्री दीडला पोहोचेल. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव, पुलगाव, वर्धा या स्थानकांवर थांबेल.

मुंबईहून नागपूरला गाडी क्रमांक ०१०७५ ही दर मंगळवारी ७ मे ते २ जुलै या कालावधीत धावेल. रात्री १२.२० वाजता मुंबईहून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचला नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७६ ही नागपूरहून दर मंगळवारी ७ मे ते २ जुलै या कालावधीत धावेल. नागपूरहून दुपारी चारला निघाल्यानंतर ती सकाळी ८.२० वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामनगाव, वर्धा या स्थानकांवर ती थांबेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हरेस्टवरील चढाई कस लावणारी!

$
0
0

श्रीहरी तापकीर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एव्हरेस्टवर चढाई करताना मानसिक आणि शारिरीक क्षमतेचा प्रचंड कस लागतो. उणे साठ तापमान, ऑक्सिजनची टंचाई, प्रतिकूल हवामान, प्रत्येकी पन्नास लाख रुपये खर्च अशा सर्व गोष्टींना तोंड देत मराठी माणसानेही जगातील सर्वात उंच हे शिखर सर केले, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले. निसर्गापुढे नम्र राहिले तरच यश मिळते हे एव्हरेस्ट मोहिम शिकवते, असेही त्यांनी नमूद केले.

नाशिकरोड व्यापारी बँकेच्या वसंत व्याख्यानमालेत तापकीय यांनी एव्हरेस्ट मोहिमेचे स्वानुभव सांगितले. एव्हरेस्टवर चढाई करण्याचा चंग ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धापासून बांधला होता. अखेर १९५३ साली त्यांना यश आले. एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांनी सर्वप्रथम हे शिखर सर केले. एव्हरेस्ट सर करणारी बचेंद्री पाल ही पहिली भारतीय महिला ठरली. भारताच्या नऊ लष्करी जवानांनीही हा विक्रम केला. संतोष यादवने दोन वेळा हे शिखर सर केले. महाराष्ट्राच्या सुरेंद्र चव्हाणने हे शिखर सर केल्याची माहिती तापकीर यांनी दिली.

एव्हरेस्टवर चढाईचे १८ मार्ग आहेत. एव्हरेस्टसाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. आम्ही आर्थिक बचत करून हे शिखर सर केले. चार तळ ठोकून हे २९ हजार फूट उंचीचे शिखर सर करावे लागते. अनेक गिर्यारोहकांचा एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यू झाला. अनेकांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. हिमालय पर्वत रांग सात हजार किलोमीटर लांब, अडीच हजार किलोमीटर रुंद आहे. जगातील सर्व उंच शिखरे या भागात आहेत. रेनाल्ड मेस्तर यांनी शेर्पा व ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्टसह सर्व चौदा उंच शिखरे सर केली आहेत. एव्हरेस्टवर जाण्यासाठी मे व जून हे सर्वात अनुकूल महिने असल्याने अनेक देशांचे चारशे-पाचशे गिर्यारोहक या काळात येतात. एव्हरेस्टवर जाण्यासाठी पूर्वी नऊ तळ होते. आता चार तळ (कॅम्प) ठोकले जातात. पहिल्या तळावरच उण ४० तापमान असते. जिद्द, सराव, नशिब, मानसिक व शारिरीक क्षमता याच्या आधारेच हे शिखर सर करता येते, असेही तापकीर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्यांवर डिजिटल वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चारा पाण्याअभावी छावण्यांच्या आश्रयाला येणाऱ्या पशुधनाची नोंद आता डिजिटल पद्धतीने घेतली जाणार आहे. छावणीमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक पशुधनाच्या कानामध्ये बार कोड असलेला टॅग लावला जाणार असून, तो दिवसातून एकदा स्कॅन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नाशिकमध्ये अद्याप चारा छावण्या सुरू झाल्या नसल्या तरी त्या सुरू करताना संबंधितांना आता टेक्नोलॉजी वापरासाठी तयार राहावे लागणार आहे.

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून पाण्याबरोबरच जनावरांसाठीच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळाच्या झळा सोसत असून यापैकी सहा तालुक्यांमध्ये पशुधनाला १० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. चारा छावण्या सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून जिल्ह्यात यासाठीची कार्यवाही सुरू आहे. छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्था तसेच व्यक्तींनाही आवाहन करण्यात आले असून पुढील आठवड्यात यापैकी काही छावण्या सुरू होतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. परंतु, छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवणे महत्वाचे असून, यासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय प्रणालीचा वापर अनिवार्य बाब राहील असा शासन आदेश सरकारने नुकतेच काढला आहे. पशुधनाची नोंदणी आणि संख्येची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी अँड्रॉइड मोबाइलवर आधारित प्रणालीचा वापर छावण्यांना अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने तयार केलेली प्रणाली छावणी व्यवस्थापनांना विनाशुल्क उपलब्ध करून देण्यास संमती देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उपलब्ध होणाऱ्या पशुधन संख्येच्या नोंदीद्वारे छावणी चालकांना अनुदान दिले जाणार आहे. छावणीमध्ये दाखल होणाऱ्या पशुधनाची व त्यांच्या मालकांची नोंदणी प्रथम या प्रणालीमध्ये करावी लागणार आहे. दाखल झालेल्या पशुधनाच्या कानामध्ये बार कोड असलेले टॅग लावणे बंधनकारक असून, हा खर्च छावणीचालकांना करावा लागणार आहे. रोज हा बारकोड स्कॅन करावा लागणार असून, यामुळे छावण्यांआड होऊ शकणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

चाऱ्याचे प्रमाण वाढविले

पशुधनाचे दैनंदिन पोषण व्यवस्थित व्हावे व छावण्यांमधील पशुधनाची रोगप्रतिकार शक्ती व उत्पादन क्षमता कायम राहावी म्हणून त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे. म्हणूनच जनावरांना चारा देण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. लहान जनावरांना आता साडेसात किलोऐवजी नऊ किलो तर मोठ्या जनावरांना १५ ऐवजी १८ किलो चारा देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनुष्ठान

$
0
0

अक्षय्य तृतीयेनिमित्त

जपानुष्ठान सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने वार्षिक जपानुष्ठान कार्यक्रमा अंतर्गत शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत भक्त परिवाराची राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे आठवडाभरासाठी महाजपानुष्ठान (संस्कार शिबिर) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्त परिवाराचे ओझर येथे झालेले गुढीपाडवा जपानुष्ठान, अंजनेरी परिसरातील हनुमान जयंती जपानुष्ठान यानंतर आता भक्त परिवाराची राजधानी श्रीक्षेत्र वेरूळ आश्रमात वार्षिक जपानुष्ठान कार्यक्रमांतर्गत अक्षय्य तृतीयेनिमित्त रविवारपर्यंत (१२ मे) स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत महाजपानुष्ठान, रुद्रस्वाहाकार यज्ञ, अखंड नंदादीप, महिला जप, हस्त लिखित नामजप, याबरोबरच रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर ५ वाजता नित्यनियम विधी, प्राणायाम, ध्यान, एकनाथी भागवत वाचन, महाआरती, सत्संग, प्रवचन, दररोज चार वेळा विधी पाठ, आश्रमीय संतांचे मार्गदर्शन यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय्यपुण्य प्रदान करणाऱ्या या धर्मसोहळ्यात भाविकांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकीत जीएसटीसाठी सवलत योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई विक्रीकर कायदा १९५९, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००५ तसेच विक्रीकर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कायद्यांतर्गत प्रलंबित कर, व्याज, दंड तसेच प्रलंबित लेट फीची वसुली व्हावी, यासाठी जीएसटी विभागाने एक पाऊले पुढे टाकले आहे. व्यापाऱ्यांनी प्रलंबित रकमेचा ठरावीक प्रमाणात भरणा केला तर उर्वरित रक्कम सेटेलमेंट कायद्यांतर्गत माफ करून घेण्याची संधी त्यांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे नोंदीत आणि अनोंदीत व्यापाऱ्यांनाही या संधीचा समान लाभ मिळणार आहे.

करवसुलीचा तिढा सुटावा यासाठी सेटलमेंट कायद्यांतर्गत मुभा देण्याकरिता दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधीत राबविला जाणार आहे, तर दुसरा टप्पा जुलै २०१९ पासून राबविण्यात येणार आहे. प्रलंबित थकबाकीपैकी आवश्यक विवादीत कर, व्याज व दंडाची रक्कम भरणा करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला तर व्यापाऱ्यांना जुन्या वसुलीच्या कटकटीतून सुटकारा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे विवादीत कर व दंडासाठी वैधानिक आदेशाविरुद्ध अपिल दाखल केले असले अथवा नसले तरी निर्धारीत रकमेचा भरणा व्यापारी करू शकतील. अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रकरणांत अविवादित व विवादित रकमेत व्याज, दंड काही प्रमाणात भरल्यास २००९-१० व पूर्वीच्या आर्थिक वर्षाची प्रलंबित थकबाकी जादा सवलत कायद्यात समाविष्ट आहे. तसेच, एप्रिल २०१० नंतरच्या कालावधीसाठी तुलनेने कमी सवलत देण्यात आली आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत अविवादीत व विवादीत रकमेचा भरणा करून अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही पहिल्या चरणापेक्षा कमी असल्याने सर्व व्यापाऱ्यांना पहिल्या म्हणजेच ३० जून २०१९ च्या आतच अत्यावश्यक रकमेचा भरणा करून त्वरित ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.

येथे मिळेल योजनेची माहिती

mahagst.gov.in या जीएसटी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर whats new वर या सेटलमेंट कायद्याची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पध्दती सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जीएसटी कार्यालयांत अधिकारी याबाबत माहिती देऊ शकतात. vatamnesty२०१९.@gmail.com या मेलवर नागरिक याबाबत शंकाचे समाधान करून घेऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहेडी बंधारा दुसऱ्यांदा कोरडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या चेहेडी पंपिंग स्टेशन बंधाऱ्यातील पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आल्याने नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यातही हा बंधारा कोरडाठाक पडला होता.

पालिकेच्या नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला चेहेडी पंपिंग स्टेशन येथील दारणा नदीपात्रातील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. तीन पंपांद्वारे दररोज नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला जवळपास ३४ ते ३५ दशलक्षफूट पाणी पुरवले जाते. परंतु, महिभरापासून चेहेडी पंपिंग स्टेशन येथील दोन पंप पुरेशा पाण्याअभावी बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला चेहेडी पंपिंग स्टेशन येथून सध्या दररोज केवळ ११ ते १२ दशलक्षघनफूट पाण्याचा पुरवठा होत आहे. रविवारी या बंधाऱ्यातील पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आला आहे. दोन्हीही स्टेनर्स उघडे पडल्याने तात्पुरती उपाययोजना म्हणून वाढीव पाइप टाकून दूरचे पाणी खेचून आणले जात आहे. दोन दिवसांत दारणा धरणातून पाणी सोडण्यात न आल्यास चेहेडी पंपिंग स्टेशनला टाळे लावण्याची वेळ येणार आहे. येथूनच सिन्नर एमआयडीसी आणि सिन्नर नगरपरिषदेसह नायगाव पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरविले जाते. परंतु, येथील पाणीसाठा संपुष्टात आल्याने या सर्व ठिकाणी पाणीकपात सुरू झाली आहे. सिन्नर एमआयडीसीतील उद्योगांना वारंवार पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने येथील उद्योगांवर परिणाम झाला आहे.

नाशिकरोडमध्ये पाणी टंचाई

चेहेडी पंपिंग स्टेशन बंधारा कोरडा झाल्याने नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरणातील पाणी पुरवले जात आहे. असे असले तरी नाशिकरोडमध्ये गेल्या महिनाभरापासून बहुतेक सर्वच प्रभागांतील उपनगरांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी पुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. खर्जुल मळा, गायकवाड मळा, ओढा रोड, गोरेवाडीच्या आजूबाजूचा परिसर या प्रभाग १९ मधील परिसरात बऱ्याचदा मध्यरात्री पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.

पाणी चोरीही सुरूच

चेहेडी पंपिंग बंधाऱ्यातून दारणाच्या दोन्ही काठांवरील शेतकऱ्यांकडून दिवसाढवळ्या पाण्याचा उपसा सुरू असतो. महावितरण आणि पाटबंधारे प्रशासनाकडून काही शेतकऱ्यांवर यापूर्वी कारवाईही करण्यात आली होती. मात्र, या भरारी पथकांची पाठ फिरताच पाणीउपसा पुन्हा सुरू होतो. अशा उपशामुळेही दारणा नदीपात्रातील बंधाऱ्यातील पाणी लवकर आटू लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूलाच धाक दाखवून चोरी मटा वृत्तसेवा, मालेगाव - शहरातील ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील ताशकंद बाग भागातील एका बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध महिला व तिच्या मुलास पिस्तूलाच धाक दाखवून मारहाण करून लाखोंची चोरी केल्याची घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान जखमी मुलास येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ताशकंद बाग भागात राहणाऱ्या वृद्ध महिला फातिमा शब्बीर हकीम यांच्या बंगल्यात हा प्रकार घडला. रविवारी दुपारच्या वेळी फातिमा व त्यांचा मुलगा अशरफ शब्बीर हकीम घरात असताना चोरट्यांनी बळजबरी घरात घुसून दोघांना पिस्तूलाच धाक दाखवला. यावेळी झालेल्या झटापटीत अशरफ जखमी झाले. चोरट्यांनी पिस्तूलाच धाक दाखवून घरातील लाखोंची रोकड व काही वस्तू चोरीला नेल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक ए. के. पडोळे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोवर चोरटे फरार झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस पंचनामा सुरू होता. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. भर दिवसा असा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आशा चोरट्यांचा मुसक्या अवळव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात

$
0
0

सोग्रस शिवारात

अपघातात एक ठार

चांदवड : सोग्रस (ता. चांदवड) शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकी व कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला जखमी झाला आहे. सोग्रस येथून निवृत्ती चंद्रभान सूर्यवंशी (वय ४२) व अजय भाऊसाहेब पवार हे टीव्हीएस कंपनीची व्हिक्टर मोटारसायकलने (एमएच१५/बी ई १९२) महाराणा पेट्रोलपंपावर मुंबई-आग्रा महामार्गाने आडगाव टप्पा येथे येत असताना महिंद्रा एक्सयूव्ही (एमएच ४६/बीए ०३३९) कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार निवृत्ती सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, तर अजय पवार किरकोळ जखमी झाले. हा अपघात घडला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री दुष्काळ दौऱ्यावर

$
0
0

नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी (ता. ६) दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येणार आहेत. सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांमधील टंचाई परिस्थितीची पाहणी करून ते दुष्काळग्रस्तांशी चर्चा करणार आहेत.

सविस्तर वृत्त...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याचे नगरसेवक आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारम.टा.वृत्तसेवा, सटाणा, - सटाणा शहरात तीन आठवड्यांपा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरात तीन आठवड्यांपासून पालिका प्रशासनाने नळांना पाणी पुरवठा केला नसल्याने, शहरात निवडणुकीनंतर पाणीबाणी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त झालेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर शहरवासियांनी सळो की पळो केल्याने आज सोमवार दि. ६ मे रोजी नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. यावेळी केळझर धरणातील अखेरचे आवर्तन सोडण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालणार आहेत.

आगामी आठवड्यात अक्षय तृतीया तसेच रमजान ईद या सणासुदीच्याा काळात शहरात मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, तसेच गेल्या तीन आठवड्यांपासून शहरातील पाणीटंचाईवर मात करता येणे शक्य व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पिण्यासोबतच दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने शहरात पाण्याचे टँकर अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहेत. खासगी पाण्याचे टँकर शहरात पाणी वितरीत करीत असताना पालिका प्रशासनाला मात्र टँकरसाठी पाणी उपलब्ध करता येत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याची भावना शहरवासियांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.

या कारणामुळे आज सोमवार दि. ६ रोजी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, तसेच सर्व पक्षीय नगरसेवक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना भेटून तालुक्यातील केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करणार आहेत. यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइफोलॉजी – किरण भालेराव

$
0
0

लाइफोलॉजी - किरण भालेराव

सोशल मीडिया

आपल्या देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. युवा पिढी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांपासून ते राजकीय, सामाजिक, चित्रपटसृष्टीमधील लोकदेखील व्यक्त होण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा उपयोग प्रचंड प्रमाणात करताना दिसतात.

फार पूर्वी हायफाय, ऑर्कुट, त्यानंतर आलेले फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर येणाऱ्या नेटवर्किंग साईट्स याच माध्यमावर आपल्या भारतातले ८० टक्के लोक सतत अक्टिव्ह असतात. या सोशल मीडियाचा वापर सकारात्मक असावा किंवा असायला हवा. सोशल मीडिया जेव्हा नवीनच सुरू झाला तेव्हा आपल्याला ही सकारात्मकता बघायला मिळाली खरी, आपले विचार, प्रतिक्रिया, टीका, टिप्पणी, फोटो, व्हिडिओज अशा सर्वच गोष्टी आपल्याला व्यक्त करता येतात. म्हणजे हा एकप्रकारे समाजाला मिळालेला प्लॅटफॉर्मच आहे. परंतु याच प्लॅटफॉर्मवर काळजीपूर्वक चालणं फार महत्त्वाचं आहे.

सोशल नेटवर्किंगचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि कोणत्याही नियमांशिवाय होतोय की काय, असे वाटायला लागलंय. इतर माध्यमांमध्ये किंवा ऑनलाइन माध्यमांमध्ये असणारे अंक मासिके, त्यातील लेख जेव्हा प्रकाशित होतात तेव्हा त्यांच्या संपादकीय आणि आयटी विभागात फिल्ट्रेशन असायला हवे. म्हणजे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या फिल्टर होऊन प्रकाशित करण्यात येतील. सोशल नेटवर्किंग फिल्ट्रेशन नसल्यामुळे टीकेची घसरलेली पातळी, अपशब्द वापरून केलेल्या प्रतिक्रिया किंवा नोंदवलेली मतं आपल्याला अनुभवायला मिळतात. जे समाजासाठी घातक आहेत. एखादी घटना चुकीच्या पद्धतीने मांडणारे लोकसुद्धा सूचनेच्या भांडारावर बसल्याप्रमाणे 'सिटिझन जर्नालिझम'चा आव आणून अतिशय चुकीच्या पद्धतीने ते मांडत असतात. अशाच लोकांपैकी तीस टक्के लोक किंवा त्यांचे अकाऊंट फेक (बनावट) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच सोशल नेटवर्किंगवर असेही काही घटक आहेत. जे आपल्याला माहीत नसतात ते कोण आहेत, त्यांची ओळख निश्चित नसते. ते कोणत्या देशातील आहेत हेसुद्धा आपल्याला माहित नसते. परंतु, त्यांच्या प्रतिक्रिया खूप सशक्त असतात. ठाकमत मांडणारे असतात आणि ते आपल्या चमूसह एखाद्या गोष्टींवर तुटून पडतात. सोशल मीडियात जसे फायदे आहेत तसे दुरुपयोग ही होऊ शकतात म्हणून त्यावर काही नियम असायला हवेत. इतर माध्यमांसारखे संपादकीय अधिकार असायला हवे म्हणजे सोशल मीडियाचा वापर योग्यप्रकारे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगावची ओळख धरणांचा तालुका अशी आहे. मात्र, सध्या हाच तालुका पाण्यासाठी आसुसलेला असून, पाणी व चारा टंचाईने ग्रामीण भागातील जनतेचे जगणे अवघड झाले आहे. पाण्यासाठी गाव सोडून परागंदा होण्याची वेळ नांदगावकरांवर आली आहे. अनेक खेडी ओस पडल्याचे दृश्यही विषण्ण करणारे आहे. अशा स्थितीत मतांचा जोगवा मागत आश्वासनांची खैरात करणारे नेते, पुढारी कुठे गायब झाले, असा सवाल करीत तातडीने चारा छावण्या सुरू करा, नांदगावमध्ये पाण्याचे टँकर पाठवा, अशी मागणी नार-पार जलहक्क समितीने केली आहे.

तीव्र पाणीटंचाई व चाराटंचाईने ग्रामीण भागातील जनतेला अक्षरशः भरडून काढलेले असताना जिल्हा बँक सक्तीने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना जेरीस आणत असल्याचा प्रकार म्हणजे सूडसत्र असल्याचे या समितीने म्हटले आहे. हा प्रकार त्वरित थांबवा अशी मागणी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर, अशोक परदेशी, भास्कर पवार, मच्छिंद्र वाघ, दिलीप निकम, विशाल वडघुले व नीलेश चव्हाण यांनी केले आहे. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुष्काळी नांदगाव तालुक्याचा दौरा करून तालुका दुष्काळी जाहीर करून चार महिने उलटले तरीही सरकारने पाणी व चाऱ्याबाबत ठोस उपाय न केल्याचे स्पष्ट करीत नाराजी व संताप व्यक्त केला आहे.

डोळ्यांत जीव आणून पाण्याची वाट

समितीने नांदगावच्या ग्रामीण भागात दुष्काळी स्थितीची पाहणी केली असता जामदरी वाड्या वस्त्या, साकोरे, तळवाडे, मूळडोंगरी, चांदोरा, रणखेडा या भागात रखरखत्या उन्हात भांडीकुंडी घेऊन महिला पाण्याच्या टँकरसाठी जीव डोळ्यात आणून वाट पाहात असल्याचे चित्र असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यात पाणी टँकर अधिक प्रमाणात हवे आहेत, मात्र त्यांची संख्या अपुरी असल्याचे पाहणी दौऱ्यात निदर्शनास आल्याचे नार पार जलहक्क समितीने म्हटले आहे. जनावरांना चारा नसल्याने जनावरे जगवायची कशी, या चिंतेने बळीराजाची झोप उडाल्याचे वास्तव तालुक्यात असल्याने त्वरित चारा छावण्या सुरू करण्याची मागणी समितीने केली आहे.

दूषित पाण्याची तक्रार

टँकरमधील पाणी दूषित व पिण्यालायक नसल्याची तक्रार नागरिक करीत असल्याचे जलहक्क समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी स्थिती बिकट असल्याने आर्थिक तंगी असूनही पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी निवृत्ती खालकर यांनी केली आहे. चारा व पाण्याअभावी खेडी ओस पडत चालल्याचे त्यांनी पाहणी दौऱ्यानंतर सांगितले. दरम्यान, नांदगावच्या ग्रामीण भागात पंचायत समिती सदस्य स्वखर्चाने पाण्याचे टँकर पुरवून नागरिकांना दिलासा देत त्यांची तहान भागवत असल्याचे दिसून येत आहे. टँकरचे पाणी भरण्यासाठी साकोरे, तळवाडे, जामदरी, न्याय डोंगरी येथे स्त्री पुरुषांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची लवकर व्यवस्था करा, अन्यथा जनावरे तहसील कार्यालयात बांधू, असा इशारा चांदोरा येथील शेतकरी व पशूमालकांनी प्रशासनाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरड कोसळून नाशिकचा पर्यटक ठार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जम्मू-श्रीनगर महामार्गावर रविवारी पहाटे दरड कोसळल्याने नाशिक शहरातील बॉश कपंनीतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर अन्य पर्यटक जखमी झाले आहेत. महामार्गावरील रामसो पोलिस स्टेशनच्या हद्दीत टेम्पो ट्रॅव्हलरवर ही दरड कोसळली. सुनील विष्णुपंत काठे (वय ४३, रा. सावरकरनगर, अशोकनगर मार्ग) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काठे यांच्या पत्नी मनीषा काठे व मित्र विलास कुंभार जखमी झाले आहेत.

काठे यांच्यासह सहा कुटुंबांतील २७ सदस्य २७ एप्रिल रोजी रेल्वेने जम्मू-काश्मीरला रवाना झाले होते. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी ते टेम्पो ट्रॅव्हलरने निघाले असता, रामसो गावाजवळ पावसामुळे दरड कोसळल्याने सुनील काठे यांचा मृत्यू झाला. यात टेम्पोची एक बाजू दगडाखाली दबली गेली. नाशिकमध्ये घटनेची माहिती समजताच अनेकांनी काठे यांच्या घराकडे धाव घेतली. काठे यांच्या मागे आईवडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली व पुतणे, दोन वहिनी असा परिवार आहे. आज सकाळी सातच्या सुमारास विलास कुंभार यांचे भाऊ विजय कुंभार यांना त्यांच्यासमवेत असलेल्या एकाने दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली.

वयाच्या १८ व्या वर्षी सुनील काठे बॉश कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले. सध्या ते सीआरआय विभागात कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. एकत्र कुटुंबात राहत असलेले सुनील घरातील मोठे बंधू होते.

अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी : सुनील काठे यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा, मुलगी पूजा व प्रिया, सहकारी विलास कुंभार, विनोद चौधरी, ज्योती कुंभार, जान्हवी कुंभार, मयुरी कुंभार, गायत्री कुंभार, मनीषा चौधरी, जयेश चौधरी.

दोन ट्रॅव्हलमधून प्रवास

गेल्या महिन्यात २७ एप्रिल रोजी बॉश कंपनीत एकत्रित काम करणाऱ्या सहा मित्रांच्या कुटुंबीयांनी प्रवास सुरू केला. ११ मे रोजी हा प्रवास संपणार होता. जम्मू-काश्मीरमधील अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्यावर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दोन ट्रॅव्हलमधून सहा कुटुंबे प्रवासास निघाले होते. एका ट्रॅव्हलमध्ये काठेंसह १२, तर दुसऱ्या ट्रॅव्हलमध्ये १५ जण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकाला ६५ हजारांचा दंड!

$
0
0

नाशिक : राज्य माहिती आयोगाच्या लेटरहेडचा गैरवापर आणि आयोगाची दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी आयोगाने दाभाडीचे मुख्याध्यापक तुषार चिंधू अहिरे यांना तब्बल ६५ हजार रुपयांचा दंड केला आहे. एखाद्या मुख्याध्यापकाला एवढा मोठा दंड क्वचितच झाला असून, ही रक्कम शिक्षण विभागाकडे सुपूर्द करतानाच यापुढील काळात आयोगाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्यास गंभीर कारवाईचा इशारा आयोगाने दिला आहे.

सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवार पतसंस्थे’चा लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता बिगरशेती थकीत कर्जदार संस्थेच्या जप्त मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. बँकेची सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्ज थकीत असून, यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेने थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेने १ मार्चपासून धडक वसुली मोहीम सुरू केली असून, सातत्याने १० ते १५ वर्षापासून हेतूपुरस्सर कर्ज थकविणाऱ्यांवर वसुलीचा बडगा उगारला आहे. बिगरशेती संस्थांकडील कर्जवसुलीचा आढावाही अलीकडेच घेण्यात आला. थकबाकीदार संस्थांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा निर्माण करण्यात यावा तसेच थकीत कर्जाची वसुलीसाठी कारवाई करावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बिगर शेती सहकारी संस्थाच्या संचालकांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेकडे बँकेचे १ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज असून, व्याजही थकबाकी असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी थकबाकी कर्जाचा भरणा करण्याबाबत कायदेशीर नोटिसा देण्यात आल्या. परंतु, संस्थेने बँकेची थकबाकी भरली नाही. यामुळे संस्थेची मालमत्ता जप्त करून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेकडे मालमत्ता विक्रीसाठी अपसेट प्राइज मंजुरीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यावर लिलावाद्वारे मालमत्ता विक्री करून कर्जवसुलीस परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार संस्थेच्या कसबे वणी येथील इमारतीच्या जाहीर लिलावाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या इमारतीचा जाहीर लिलाव ११ जून २०१९ रोजी दुपारी एक वाजता बँकेच्या दिंडोरीतील विभागीय कार्यालयात ठेवण्यात आला आहे. जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - प्रश्न कोड्यात, उत्तरे गणितात

$
0
0

प्रश्न कोड्यात, उत्तरे गणितात सदराची उत्तरे

- -

१) व्यास

२) बिंदू

३) अंक

४) कर्ण

५) काटकोण, त्रिकोण

६) उत्तर

७) रेखा

८) केंद्र

९) लंब

१०) तेरा

११) एक

१२) सौ (हिंदीत शंभर)

१३) कंस

१४) सूत्र

१५) पाय (गणितातील)

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images