Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोवळी ज्वारी खाल्ली; १७ गायी,४ म्हशींचा मृत्यू

$
0
0

सिन्नर:

कोवळ्या ज्वारीचे ताटे खाल्ल्याने विषबाधा होऊन १७ गायी आणि ४ म्हशी यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे घडली आहे.

कोमलवाडी शिवारात काठेवाडी गवळी लोक जनावरांचा कळप घेऊन फिरत होते. या शिवारात एका शेतकऱ्याने ज्वारी कापून ठेवली होती. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा ताटे फुटले होते. या फिरस्ती गवळी लोकांनी त्यांच्या जनावरांना ज्वारीत चारा खाऊ घालण्यासाठी सोडले. जनावरांनी ज्वारी खाल्ली परंतु, कोवळया ज्वारीमुळे जनावरांच्या तोंडातूव फेस येणे सुरू झाले. या प्रकारामुळे १४ गायी आणि ४ म्हशींचा मृत्यू झाला.

पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनी या सगळ्या जनावरांचे शवविच्छेदन केले. विषबाधा झाल्यामुळेच या जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोंढे मार्ग नामकरणावर आक्षेप

$
0
0

रतन लथ यांनी केली आयुक्तांकडे तक्रार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील कमानीवर थोर पुरुषांऐवजी स्थानिक नगरसेवकांकडून दिल्या जाणाऱ्या नावावर रतन लथ यांनी आक्षेप घेतला असून, त्र्यंबकरोडवरील स्वारवालाबाबा नगर येथील कमानीवर लावलेल्या लोंढे मार्ग या नावाबाबत तक्रार केली आहे. महापालिकेची परवानगी न घेताच थोर पुरुषां‌ऐवजी स्थानिक नगरसेवक आपली नावे कशी लावू शकतात, असा सवाल करीत संबंधितांवर वेळीच लगाम घालण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेची नियमावली असतानाही परस्पर नावे कोणत्या नियमान्वये दिली जातात, असा सवाल त्यांनी आयुक्तांकडे केला आहे.

महापालिकेच्या मिळकतीबाबत रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर लथ यांनी स्थानिक नगरसेवकांकडून रस्त्यांना तसेच, कमानीवर स्वत:ची नावे देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. सातपूर पोलिस स्टेशनलगत असलेल्या स्वारवालाबाबा नगर येथील रस्त्यावरील कमानीवर स्थानिक नगरसेवकाने लोंढे मार्ग असे नामकरण केले आहे. त्याबाबत लथ यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहरातील रस्त्यांना आणि कमानीवर थोर पुरुषांची नावे टाकण्याची प्रथा असताना स्थानिक नगरसेवक वैयक्तिक स्वार्थापोटी अशी नावे कसे टाकू शकतात, असा सवाल केला आहे. महापालिकेच्या मालमत्तांचा गैरवापर करणाऱ्या अशा समाजविघातक लोकांवर थेट खंडणी, गुंडगिरीची गुन्हे दाखल आहेत. तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असून, कोणत्याही नगरसेवकाला स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींची नावे रस्त्यांना देण्याचा अधिकार संविधानाने दिला नसल्याचा दावा केला आहे. थोर पुरुषांच्या जोडीला गुंडाचे नावे दिली, तर समाजात चुकीचा संदेश जाईल असे सांगत कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे रतन लथ आणि नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमंताचे चरित्र अभिमानरहीत

$
0
0

स्वामी अद्वैतानंद यांचा संदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भगवान हनुमंताचे चरित्र अव्दितीय आहे. रामायणामध्ये त्याची भूमिका प्रत्येक क्षणास अतिशय महत्त्वाची आहे. रामचंद्रांचे जीवनकार्य हनुमंतांच्या मदतीने सफल होऊनसुद्धा हनुमंतापाशी यत्किंचीतही अभिमान नाही. याउलट श्रीरामांना स्वामी मानणारे हनुमंत हे पूर्णत: शरणभावात आहेत. भगवंताजवळ घेऊन जाणारा हा शरणभाव आपण साधनेतून आत्मसात करायला हवा, असा संदेश स्वामी अद्वैतानंद यांनी दिला.

चिन्मय मिशनद्वारा आयोजित हनुमान चालीसा प्रवचनमालेचे तिसरे पुष्प स्वामी अद्वैतानंद यांनी गंगापूर रोडवरील शंकराचार्य कुर्तकोटी सभागहात गुंफले. हनुमंताचे चरित्र ज्ञान आणि सद्गुणांनी भरलेले आहे. त्यांनी निष्कामभावनेने भगवंताची सेवा केली. अनेक कठीण कार्य यशस्वीरित्या पार पाडूनही त्यांच्या मनात अभिमान आला नाही. या दिव्य चरित्रामुळे त्यांची कीर्ती तिन्ही लोकांत दुमदुमत आहे, असे अद्वैतानंद यांनी सांगतले.

मारुती पवन पुत्र आहे. त्याच्यामध्ये वायुचे सर्व गुण आहेत. रामायणात जेथे जेथे एखाद्याचे प्राण संकटात पडलेले दिसतात, तेथे मारुतीने प्राणाचा संचार करून त्या व्यक्तीचा जीव वाचविला आहे. मारुती फार हुशार व राम कार्य करण्यास नेहमी तत्पर असतात. जेथे रामकथा होते तेथे सूक्ष्म रुपात हजर असतात, असेही स्वामी अद्वैतानंद यांनी सांगितले. प्रवचनमाला मंगळवारपर्यंत (दि. ७) सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ग्रंथ तुमच्या दारी'तर्फे मराठी भाषेचे प्रतिनिधीत्व

$
0
0

अबुधाबीतील पुस्तक मेळाव्यात सहभाग म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक अबुधाबी येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा भरतो. यंदा २९ व्या प्रदर्शनात भारताचा सन्माननीय अतिथी देश म्हणून सहभाग होता. यातील भारतीय भाषांतील साहित्य आणि साहित्यविषयक कार्यक्रमात दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यास यांन मराठीचे प्रतिनिधित्व करायची संधी 'ग्रंथ तुमच्या दारी'ला दिली. परदेशात राहूनही आपली भाषा जपण्याचा आणि नवीन पिढीपर्यंत पोचवण्याचा हा ध्यास घेतलेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी'च्या कार्यकर्त्यांनी तासाभरात मराठी साहित्याची झलक दाखवण्याचे शिवधनुष्य पेलले. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रचिती तलाठी यांनी 'ग्रंथ तुमच्या दारी'ची माहिती सांगितली. नम्रता देव व पल्लवी बारटके यांनी गुरू ठाकूर लिखित प्रार्थना सादर केली. दुसऱ्या भागात विशाखा पंडित यांनी मराठीचा गौरव वाढविणाऱ्या वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांची ओळख करून दिली. डॉ. पल्लवी बारटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस वाघमारे, शर्विल खटावकर, वेद गुप्ते, अर्चित शेपुंडे, पावनी बारटके, अनन्या कुमठेकर या बालवाचकांसह डॉ. प्रसाद बारटके, विजया सोनावणे आणि शीतल अंबुरे यांनी उपस्थितांना शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई, बालकवी यांच्या काव्याची झलक दाखवली. कविवर्य बा. भ. बोरकर आणि कोकणीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्र केळेकर यांची माहिती देत रुपाली कीर्तनी आणि प्रशांत कुलकर्णी यांनी कोकणी साहित्यिकांची ओळख करून दिली. पु. ल. देशपांडे आणि गदिमा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त नीलिमा वाडेकर यांनी वंदन केले. देवेंद्र भागवत यांनी 'असा मी असामी'मधील प्रवेश अत्यंत खुमासदारपणे सादर करीत प्रेक्षकांना मनमुराद हसविले. आर्चित अग्निहोत्री यांनी गायलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. समिधा कचरेकर यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या मराठी संपादिका निवेदिता मदाने-वैशंपायन यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग हा पंचमहादेवांचा मिलाफ

$
0
0

चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निसर्गाच्या प्रांतात कोणताही भेदभाव नाही, मॅनेजमेंट कोटा नाही त्यामुळे निसर्गाशी सुसंगत वागायला शिकायला हवे. माणसाने निसर्गातील आपली भूमिका समजून घेतली तर त्याला अनेक गोष्टींचा उलगडा हाईल, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे चंद्रकांत निंबाळकर यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने आयोजित ९८ व्या व्याख्यानमाला सत्रात 'पर्यावरण हाच नारायण' या विषयावर ते बोलत होते. परमेश्वर विश्वरूपाने प्रकट झाला आहे. दिसणारा परमेश्वर म्हणजे निसर्ग आहे, व न दिसणारा निर्गुण ईश्वर म्हणजे पर्यावरण आहे. पर्यावरणाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे. जे अव्यक्त, निराकार आहे, त्याला नमस्कार करण्याची पद्धत आपल्याकडे आहे, त्यामुळे पर्यारवणाला आपण जपले पाहिजे. पर्यावरणाचा तोल ढासाळला तर निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. पर्यावरणपूरक वागणे क्रमप्राप्त आहे. नारायणाला जपा, पर्यावरणाला जपा हे मर्म लक्षात घेतले पाहिजे. न दिसणारे पर्यावरण म्हणजे पृथ्वी, वायू, आप, तेज व आकाश हे आपल्याला नजरेला दिसत नाही त्यामुळे त्याला केवळ नमस्कार न करता निसर्गाचे संकेत लक्षात घेतले पाहिजे, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी मंचावर प्रणव पवार, जयंत जोशी, प्रदीप सराफ, शांताराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चारुलता पवार यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतींना वसंत खैरनार यांनी उजाळा दिला. संगीता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले.

..

आजचे व्याख्यान

वक्ते : नरेश गिते

विषय : आरोग्य शिक्षण आणि त्याचे भारताच्या आर्थिक विकासातील महत्त्व : सद्यस्थिती व भवितव्य

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींवर टाच!

$
0
0

९०३ मिळकतींवर जप्तीची कारवाई पुन्हा सुरू

...

- करारनामा नसलेल्या ४०० मिळकती करणार सील

- पाचशे मिळकतींना रेडीरेकनरचा दराची सक्ती

- संस्थांना नव्याने नोटिसा काढण्याचे काम सुरू

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च न्यायालयाने मिळकतींबाबत कानउघडणी केल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत नाममात्र भाडेतत्त्वावर स्वयंसेवी संस्थांसह लोकप्रतिनिधी व मंडळाच्या ताब्यात असलेल्या मिळकती जप्त करण्याची मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई तीव्र करीत करारनामा नसलेल्या ४०० मिळकती ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. करारनामा असलेल्या मिळकतींनाही रेडीरेकनर दराची सक्ती सुरू केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या ७६९ मिळकतींचा खासगी संस्थांकडून गैरवापर केला जात असल्याची याचिका फ्रवशी अॅकॅडमीचे संचालक रतन लथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने मिळकतींबाबत संपूर्ण माहिती नसल्याने पालिकेची कानउघडणी केली होती. महापालिकेला आपल्या मिळकतीही सांभाळता येत नाहीत का, असा सवाल करीत मिळकतींबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले होते. तसेच, मनपा आयुक्तांना येत्या ३ जून रोजी संपूर्ण माहितीसह हजर राहण्याचे आदेश काढले होते.

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. तसेच, न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासह तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राबविलेल्या धडक सर्वेक्षण मोहिमेत आढळलेल्या ९०३ मिळकतींबाबतची पुढील कारवाई करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले.

डॉ. गेडाम यांनी केलेल्या सर्वेक्षणात मनपाची समाज मंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये, खुल्या जागा अशा जवळपास ९०३ मिळकती आढळून आल्या होत्या. या मिळकती नाममात्र भाडेतत्त्वावर स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था, मंडळे यांना सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात आल्या असताना, त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले होते. काही ठिकाणी पोटभाडेकरूही आढळून आले होते. विशेष म्हणजे या सर्व मिळकती आजी-माजी नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींच्या मंडळांनाच ताब्यात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या काळात या मिळकतींची जप्ती मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, नगरसेवकांच्या दबावामुळे मधल्या काळात ही मोहीम थंडावली. महापालिकेने ९०३ पैकी अवघ्या ६८ मिळकतींनाच सील लावले होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गमेंनीही ही कारवाई जोमाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्तांनीही त्याबाबत तातडीने कारवाई सुरू केली असून, या संस्थांना नव्याने नोटिसा काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या संस्थांवर पुन्हा कारवाईचे सत्र सुरू झाले आहे.

...

चारशे मिळकतींवर कारवाई

या सर्वेक्षणात ९०३ पैकी तब्बल ४०० मिळकतींचा वापर हा विनाकरारनामा सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेने सर्वप्रथम करारनामा नसलेल्या मिळकतीवर लक्ष केंद्रित करीत त्या सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. ज्या संस्थांकडे करारनामा आहे, त्या संस्थांना रेडीरेकनरचा दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या संस्था रेडीरेकनरचा दर देण्यास तयार नसतील त्या मिळकतीही सील केल्या जाणार आहेत. त्यामुळे या संस्थांचालकासह महापालिकेत पुन्हा संघर्ष सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठ, जव्हारजवळ भूकंपाचे धक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.१ एवढी नोंदविली गेली. भायगावजवळ हे धक्के जाणवल्याचे सांगितले जात असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या धक्क्यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पेठ तहसीलदारांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूकंपापासून बचावाबाबत घ्यावयाच्या दक्षतांसंदर्भात जनजागृती केली आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे नाशिकपासून १२० किलोमीटरवर जव्हार बाजूकडेही ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठेगल्लीमध्ये भरदिवसा घरफोडी

$
0
0

नाशिक : काठेगल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. त्यास सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोशनी किशोर कृपलानी (रा. आदित्य अपा. काठेगल्ली) यांनी दिलेल्या भद्रकाली पोलिसात तक्रारीनुसार, कृपलानी कुटुंबीय गुरुवारी (दि. २) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्या. हीच संधी चोरट्यांनी बंद घराचे लॅच लॉक तोडून घरातील कपाटात ठेवलेली तीन हजारांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ९९ हजार ३६ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

खुटवडनगरला चोरी

नाशिक : बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड तसेच चांदीची भाडी असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सिडको परिसरातील खुटवडनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश पोपटराव नेरे (रा. श्रीनाथ संकुल, सुरभी कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नेरे कुटुंबीय २८ एप्रिल रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी किचनच्या सेफ्टी ग्रीलचे गज वाकवून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सहा हजार ५०० रुपयांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

..

पोलिस अधिकाऱ्यास धक्काबुक्की

नाशिक : फ्रंट सिट कारवाई दरम्यान अ‍ॅटोरिक्षाचालकाने फौजदारास शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. गंगापूररोडवरील या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षाचालकास अटक देखील केली.

सुमित हरीष गांगुर्डे (रा. गोदावरीनगर, घारपुरेघाट) असे संशयिताचे नाव आहे. शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनचे उपनिरीक्षक जाधव गुरुवारी (दि. २) सकाळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली.

महिलेकडून चाकूहल्ला

नाशिक : घरासमोरील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर दुसऱ्या एका महिलेने चाकू हल्ला केल्याची घटना आनंदवली गावात घडली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षदा धुमाळ (रा. बजरंगनगर, आनंदवली) असे चाकूहल्ला करणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रेखा राकेश हलदारे (रा. हिंगमिरे चाळ, बजरंगनगर) या विवाहितेने तक्रार दिली. हलदारे या शुक्रवारी (दि.३) सकाळी सार्वजनिक नळावर पाणी भरत असतांना शेजारी राहणाऱ्या संशयित धुमाळे हिने मागील भांडणाची कुरापत काढली. तसेच हलदारे यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केला.

तरुणीचा विनयभंग

नाशिक : पत्ता विचारण्याचा बहाणा करून पादचारी तरुणीचा विनयभंग करण्यात आला. द्वारका परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणी गुरूवारी (दि.२)द्वारकेजवळील बनकर चौकातील मामाच्या घरी गेली होती. रात्री ती आपल्या घराकडे पायी निघाली असता युनिव्हर्सल शाळे शेजारील साई कृपा गॅरेज समोर हा प्रकार घडला. मोपेड दुचाकीवर आलेल्या अनोळखी तरुणाने तिला रंगूबाई जुन्नरे शाळेचा पत्ता विचारला. तरुणी बोलत असताना संशयिताने जवळ येऊन विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अँजिओप्लास्टी यंत्रणा ठप्प

$
0
0

- संदर्भ सेवा रुग्णालयातील प्रकार

- ११ दिवसांनंतरही यंत्रणा बंद

- रुग्णांना पुढील तारखा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी यंत्रणा २३ एप्रिलपासून ठप्प पडली आहे. या यंत्रणेचा वापर दररोज किमान १० रुग्णांवर होतो. यंत्रणाच ठप्प असल्याने रुग्णांना पुढील तारखा देण्यात येत असून, बुधवारपर्यंत ही सेवा सुरळीत होईल, असा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात विभागातील पाच जिल्हे आणि परजिल्ह्यातील रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. यात हार्ट तसेच किडनीशी संबंधित रुग्णांची संख्या लक्षणीय असते. मात्र, हॉस्पिटल सुरू झाले त्यावेळी बसविण्यात आलेली महत्त्वाची यंत्रे व इतर साधनसामुग्री आता कालबाह्य ठरत असून, त्यात सातत्याने बिघाड होत आहे. वारंवार यंत्रणा ठप्प झाली की रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते किंवा पुढील तारखा दिल्या जातात. मागील तीन ते चार महिन्यांपासून सर्व सुरळीत असताना २३ एप्रिल रोजी अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी मशिन बंद पडले. प्रशासनाने ही बाब देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला कळवली. मात्र, ११ दिवसांनंतरही बंद पडलेली यंत्रणा सुरू होऊ शकलेली नाही. या यंत्रणेद्वारे दररोज पाच ते सहा अँजिओग्राफी तर तीन ते चार अँजिओप्लास्टी केल्या जातात. मात्र यंत्रणा ठप्प असल्यामुळे आतापर्यंत किमान शंभर रुग्णांना माघारी फिरावे लागले आहे.

...

यंत्रणा सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या बुधवारपर्यंत ही बंद पडलेली यंत्रणा सुरू होण्याची शक्यता आहे. अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीसाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यकतेनुसार पुढील तारखा देण्यात आल्या आहेत.

- व्ही. नामपल्ली, वैद्यकीय अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला पाच मिळकती सील

$
0
0

नाशिकरोड : प्रभाग क्रमांक २२ मधील एकूण पाच मिळकती पालिका प्रशासनाकडून सील करण्यात आल्या. वडनेर येथील एक अभ्यासिका, व्यायामशाळा, समाजमंदिर, विहितगावातील समाजमंदिर आणि हगवणे मळ्यातील एक समाजमंदिर अशा एकूण पाच मिळकती सील करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील दोन मिळकती सील

$
0
0

प्रशासनाने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या इमारतीत असलेली श्री छत्रपती क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या नावाने असलेली अभ्यासिका सील केली. त्यानंतर सिंहस्थनगर येथे असलेले मायको फोरमचे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाची इमारतसुद्धा सील करण्यात आली. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्यासह बांधकाम विभागाचे ए. जे. काझी, नाना जगताप, मनपाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'फनी' वादळामु‌ळे वातावरणात गारवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ऐन उन्हाळ्यात शहरातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या खाली आल्याने शहरातील उकाडा कमी होऊन आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णता कमी होत असून 'फनी' वादळाचा हा परिणाम आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आठ दिवसांपूर्वी वातावरणात प्रचंड उष्णता होती. नाशिक शहराच्या तापमानाने चाळिशी पार केली होती. २८ एप्रिल रोजी शहरातील तापमान ४२.८ अंशांपर्यंत पोहचले होते. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उघड्यावर रहाणाऱ्यांना जीवन जगणे मुश्कील झाले होते. जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून विदर्भातील अकोल्याची नोंद झाली होती. जगातील सर्वात १० उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश होता. नाशिकमध्ये दहा वर्षांनंतर ४२.८ तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी होऊ लागले आहे. दुपारी उष्णता, रात्री आणि सकाळी गारवा यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सकाळी व संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी काही दिवस उत्तर महाराष्ट्रातील तापमान असेच राहील. वादळाचा जोर ओसरताच पुन्हा पारा चढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसारे हत्याकांडात पोलिस दाद मागणार

$
0
0

पुराव्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रीम कोर्टाने सातोटे हत्याकांडात तर मुंबई हायकोर्टाने सातपूर येथील संसारे मायलेकांच्या हत्येतील संशयित आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करीत निर्दोष सोडले. एका पाठोपाठ एक गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने पोलिसांच्या तपासावर तसेच सरकारी पक्षाच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही बाजू सावरताना शहर पोलिसांनी संसारे हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व त्यांचा मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई हायकोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली. ज्या परिस्थितीजन्य पुराव्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते, तेच पुरावे बचाव पक्षाने खोडून काढले. त्यामुळे हायकोर्टाने शिंदे याला निर्दोष मुक्त केले. १८ एप्रिल २०१६ रोजी ही घटना घडली होती.

मृत्यू झालेल्या महिलेचे कुटुंब शिंदे याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. आरोपीने तब्बल ५४ वेळा चाकूने वार करीत मायलेकांची निघुर्ण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी संशयित शिंदे यास अटक केली. २६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हा कोर्टाने शिंदेला फाशीची शिक्षा ठोठावली. त्यामुळे हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचले. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी मांडण्यात पोलिस आणि सरकारी पक्ष कमी पडल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने मांडला. त्याच्या पुराव्यादाखल काही निवाडेही बचाव पक्षाने सादर केले. हा निकाल नाशिक पोलिसांसाठी धक्कादायक ठरला. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या सातोटे हत्याकांडातील सर्व संशयित आरोपींची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता करीत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर ताशेरे ओढले. तसेच दुसरेच संशयित आरोपी कोर्टासमोर हजर केल्याने त्या संशयितांना मोठी नुकसान भरपाई देण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले. ही घटना ताजी असताना आता हा निकाल समोर आला. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सरकारी वकील व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पुरावे सादर करण्यात काय चुका झाल्या, यावर चर्चा झाली. त्यानुसार संसारे हत्याकांड प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची वणवण!

$
0
0

जिल्हा बँकेत अडकले ११ कोटी; आयुक्तांशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेटिड सोसायटीच्या ११ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्याचा परतावा घेण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळाने पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून बँकेने सांगितल्याप्रमाणे आणखी काही दिवस परताव्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वरिष्ठांसोबतच चर्चा करूनही संचालक मंडळासह सदस्यांना परताव्यासाठी आणखी काही दिवस वणवण करावी लागणार आहे.

नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटीची ७० वर्षांनंतर २१ जानेवारी २०१९ रोजी निवडणूक झाली. नवनियुक्त संचालक मंडळाने जिल्हा बँकेत ११ कोटींची मुदत ठेवीचा परतावा घेण्यास प्रयत्न सुरू केले आहेत. बँकेच्या नियमानुसार संचालक मंडळाकडे सर्व कागदपत्रे आहेत. मात्र, बँकेकडे फंड नसल्याने मुदत ठेवतील पैसे मिळत नसल्याचा दावा संचालक मंडळाने केला आहे.

संचालक मंडळाने सोसायटीच्या सदस्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सोसायटीच्या मुदत ठेवीतून आर्थिक सहकार्याची अपेक्षा संचालक मंडळाला आहे. बँकेकडून परतावा मिळत नसल्याने संचालक मंडळाने शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी बँक प्रशासनासोबत चर्चा केली. त्यावेळी बँकेने आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे, २३ मे नंतर फंड येईल. तेव्हा पहिल्यांदा पोलिस सोसायटीचे थकलेले काम मार्गी लावतो, असे आश्वासन पोलिस आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार, २३ मे नंतर आठ दिवस वाट पाहणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले आहे. त्यानंतरही परतावा मिळाला नाही, तर पुन्हा पोलिस आयुक्तांची भेट घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. वेळ आलीच, तर बँकेविरोधात गुन्हा नोंदविण्याचीही तयारी असल्याचे संचालक मंडळाने सांगितले. त्यामुळे बँकेत होणारी पोलिसांची वणवण नेमकी केव्हा संपणार, याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलिस आयुक्तांशी जिल्हा बँक प्रकरणी चर्चा करण्यात आली. मुदत ठेवीतील पैशांचा परतावा होत नसल्याने सोसायटीची अनेक कामे रखडली आहेत. २३ मे नंतर काही दिवस वाट पाहण्यात येईल. त्यानंतरही बँकेने सहकार्य केले नाही, तर योग्य कार्यवाही करण्याचा निर्णय वरिष्ठांच्या सूचनेनुसार संचालक मंडळ घेईल.

- गणेश पिंगळे, अध्यक्ष,

नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेटिड सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणात बुडून युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात काचुर्ली येथील धरणात १४ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कैलास दशरथ मेंगाळ असे त्याचे नाव आहे. तो आईसोबत धरणावर आला होता.

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या पाठीमागे असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर तळेगाव काचुर्ली शिवारात हे धरण आहे. या धरणाच्या वरच्या बाजूस कैलास हा इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आंबोली पैकी मेंगाळवाडी या वस्तीवरचा आहे. त्याची आजी काचुर्ली धरणाच्या बाजूस राहते. तो शनिवारी आई वडिलांसह आजीकडे आला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमरास तेथे त्याची आई कपडे धूत असताना आईला मदत करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो धरणाच्या पाण्यात पडला. खोली अधिक असल्याने त्याला वाचविण्यात यश आले नाही. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह काढण्यात आला. त्र्यंबक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाईवर जोरात, पण अपघात थांबेनात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेतील पोलिसांची संख्या दुप्पट झाली. परिणामी दंड वसुलीचा जोरदेखील वाढला. कारवाईचा आकडा लाखांच्या घरात पोहचला. कारवाई व दंड वसुलीचे नवनवीन विक्रम होत असताना अपघात मात्र कमी होत नाही. दरवर्षी शेकडो नागरिक बळी जात आहे. कोट्यवधी रुपये शासन दरबारी जमा होऊन नक्की काय साध्य होते आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वाहतूक पोलिसांकडून वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी काही रक्कम वाहतूक पोलिसांना विविध कामे करण्यासाठी देण्यात यावी, असा विषय काही वर्षांपूर्वी समोर आला. राज्य सरकारनेही त्यास अनुकूलता दर्शवली. याचा परिणाम दंडाच्या रकमेवर झाला. शहर वाहतूक शाखेने गत वर्षी रेकॉर्डब्रेक कारवाई करीत पाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदाही ही दंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत. दंड वसुली व कारवाई जोरात सुरू असताना अपघाताना ब्रेक लागणे शक्य झालेले नाही. सन २०१७ मध्ये १७१, तर २०१८ मध्ये २१७ नागरिकांना रस्ते अपघातांमध्ये प्राणास मुकावे लागले. दंडाचा आकडा वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हा विरोधाभास चिंतेचा विषय ठरत आहे. गुडघ्या एवढे स्पीड ब्रेकर्स, पार्किंग सुविधांचा अभाव, हेतूपूर्वक वसुली यामुळे वाहनचालकांना इकडे आड तर तिकडे विहीर असा अनुभव येत आहे. नो पार्किंग, हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष, सीट बेल्ट, राँग साईड अशा प्रमुख कारणांमुळे शहर वाहतूक विभागाच्या दंडाच्या आकड्यात दरवर्षी मोठी वाढ होते आहे. मात्र या समस्यांना उत्तर शोधण्याचे कष्ट महापालिका अथवा वाहतूक पोलिस घेत नाहीत. शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. परंतु, त्यादृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रशासनाने करणे आवश्यक झाले आहे.

मोहिमांमध्ये जोरदार वसुली

हेल्मेट व सीट बेल्ट वापर अशा काही कारणांसाठी वाहतूक शाखा महिन्याभरात एक किंवा दोनदा मोहीम हाती घेते. एकाच मोहिमेत आणि काही तासांत सरासरी १५ ते २० लाखांचा दंड वसूल होतो. ही मोहीम थंड बस्त्यात गेली की परिस्थिती पुन्हा जैसे थे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी तालुक्यांत १० दिवसांचाच चारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवडसह एकूण सहा तालुक्यांमध्ये चाऱ्याची आवश्यकता वाढू लागल्याने उपलब्धता दिवसागणिक कमी होते आहे. या तालुक्यांमध्ये १० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असून चारा छावण्या सुरू व्हाव्यात यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही आता असह्य वाटू लागल्या आहेत. पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच चारा टंचाईची समस्या देखील डोके वर काढू शकते शकते असे संकेत आता मिळू लागले आहेत. जिल्ह्यात लहान मोठी २१ लाख ७४ हजार जनावरे आहेत. त्यापैकी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांची संख्याच ९ लाख ३४ हजार असून त्यांना चाऱ्याची आवश्यकता भासत नाही. या व्यतिरिक्त २ लाख २१ हजार ५७९ लहान जनावरे आणि १० लाख १५ हजार ७३२ मोठ्या जनावरांचे उदरभरण चाऱ्यावरच अवलंबून आहे. जिल्ह्यातील जनावरांना प्रतिमाह २ लाख २९ हजार ५३४ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. आजमितीस जिल्ह्यात १५ लाख ६४ हजार ३६२ मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, त्यावरच जनावरांची भूक भागवावी लागणार आहे. यातही इगतपुरी तालुक्यात सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. तर नाशिक तालुक्यात जुलैपर्यंत पुरेल एवढ्या मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. परंतु, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा, चांदवड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये मात्र चाऱ्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होते आहे. या तालुक्यांमध्ये आजमितीस पाच लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असून जनावरांची संख्या आणि चाऱ्याची मागणी पाहता आणखी १० दिवस तो पुरू शकेल. परंतु, त्यानंतर मात्र या तालुक्यांमध्ये चारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.

छावण्यांची प्रतीक्षा

सिन्नर तालुक्यात एका शेतकऱ्याचा चारा छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. तर सिन्नर बाजार समिती, येवला बाजार समिती, नांदगाव बाजार समित्यांनी देखील चारा छावण्या सुरू कराव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या संस्था सकारात्मक प्रतिसाद देऊन चारा छावण्या सुरू करतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसे झाले तर जनावरांना दिलासा मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रंथ तुमच्या दारी’तर्फे मराठी भाषेचे प्रतिनिधीत्व

$
0
0

अबुधाबीतील पुस्तक मेळाव्यात सहभाग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अबुधाबी येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा भरतो. यंदा २९ व्या प्रदर्शनात भारताचा सन्माननीय अतिथी देश म्हणून सहभाग होता. यातील भारतीय भाषांतील साहित्य आणि साहित्यविषयक कार्यक्रमात दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यास यांन मराठीचे प्रतिनिधित्व करायची संधी 'ग्रंथ तुमच्या दारी'ला दिली.

परदेशात राहूनही आपली भाषा जपण्याचा आणि नवीन पिढीपर्यंत पोचवण्याचा हा ध्यास घेतलेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी'च्या कार्यकर्त्यांनी तासाभरात मराठी साहित्याची झलक दाखवण्याचे शिवधनुष्य पेलले. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रचिती तलाठी यांनी 'ग्रंथ तुमच्या दारी'ची माहिती सांगितली. नम्रता देव व पल्लवी बारटके यांनी गुरू ठाकूर लिखित प्रार्थना सादर केली. दुसऱ्या भागात विशाखा पंडित यांनी मराठीचा गौरव वाढविणाऱ्या वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांची ओळख करून दिली. डॉ. पल्लवी बारटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस वाघमारे, शर्विल खटावकर, वेद गुप्ते, अर्चित शेपुंडे, पावनी बारटके, अनन्या कुमठेकर या बालवाचकांसह डॉ. प्रसाद बारटके, विजया सोनावणे आणि शीतल अंबुरे यांनी उपस्थितांना शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई, बालकवी यांच्या काव्याची झलक दाखवली.

कविवर्य बा. भ. बोरकर आणि कोकणीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्र केळेकर यांची माहिती देत रुपाली कीर्तनी आणि प्रशांत कुलकर्णी यांनी कोकणी साहित्यिकांची ओळख करून दिली. पु. ल. देशपांडे आणि गदिमा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त नीलिमा वाडेकर यांनी वंदन केले. देवेंद्र भागवत यांनी 'असा मी असामी'मधील प्रवेश अत्यंत खुमासदारपणे सादर करीत प्रेक्षकांना मनमुराद हसविले. आर्चित अग्निहोत्री यांनी गायलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. समिधा कचरेकर यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या मराठी संपादिका निवेदिता मदाने-वैशंपायन यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील जलसाठ्यात लक्षणीय घट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागातील दुष्काळाची धग टोकाला पोहचली असून, विभागातील ३५३ मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत अवघा १८.४७ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यांतील धरणांत १६.६३ टक्के, तापी खोऱ्यातील धरणात १६.२३ टक्के, नगर जिल्ह्यात ७.६४ टक्के तर जळगाव जिल्ह्यातील तापी खोऱ्यातील धरणांत २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नगर जिल्ह्यापुढे सर्वात मोठे जलसंकट उभे राहिले आहे.

नाशिक विभागात १९ मोठे, ४० मध्यम आणि २९४ लघु प्रकल्प आहेत. नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांत एकही मोठा प्रकल्प नाही. जळगाव, धुळे आणि नगर या तिन्ही जिल्ह्यांतील सर्व लघु प्रकल्प जवळजवळ कोरडे पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नगरमधील तिन्हीही मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यात कधी नव्हे एवढी घट आल्याने या जिल्ह्यापुढे मोठे जलसंकट उभे राहिले आहे. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. नाशिक जिल्ह्यातीलही बहुतेक लघु प्रकल्प कोरडे पडले असल्याने आता मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यावर भिस्त राहणार आहे.

दरवर्षी पाणीसाठ्यात घट

गेल्या वर्षी जवळपास ३० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. यंदा मात्र अवघा १८.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात १३ मोठ्या प्रकल्पांत १९१.२७ दलघमी (१४.३८ टक्के), ४ मध्यम प्रकल्पांत ४१.९८ दलघमी (२३.४७ टक्के) तर ४० लघु प्रकल्पांत १०.४४ दलघमी (११.५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील तापी खोऱ्यातील तीन मोठ्या प्रकल्पांत १३२.२९ दलघमी (२१.०२ टक्के), पाच मध्यम प्रकल्पांत १३.३० दलघमी (१९.०२ टक्के) तर ३७ लघु प्रकल्पांत ५.३१ दलघमी (८.६५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी खोऱ्यातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील २८ प्रकल्पांत अवघा १५०.६५ दलघमी (२३ टक्के) पाणीसाठा आहे. या खोऱ्यात २०१७ या वर्षी २९.९५ टक्के तर २०१६ मध्ये ३१.९० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नगर जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९.२५ टक्के, ३ मध्यम प्रकल्पांत ५.१८ टक्के, तर ३४ लघु प्रकल्पांत ८.४९ टक्के असा एकूण ४० प्रकल्पांत अवघा ७.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

नाशिक विभागातील धरणांतील पाणीसाठा टक्केवारी

जिल्हा- मोठे प्रकल्प- मध्यम प्रकल्प- लघु प्रकल्प- एकूण टक्केवारी

नाशिक- १६.७६- २२.५६- १०.३८- १६.९७

धुळे- ०- २४.३४- ४.८३- १९.२२

नंदुरबार - ०- ३९.०७- २८.६०- ३०.०९

जळगाव -१६.५६- १०.५९- ४.४६- १४.१२

नगर- ९.२५- ५.१८- ८.४९- ९.०५

एकूण- १७.८८- २२.४८- ९.०४- १८.४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकाराने विश्वासार्हता जपावी

$
0
0

जयप्रकाश प्रधान यांचे प्रतिपादन

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

यशस्वी पत्रकार होण्यासाठी साहस, चिकाटी, बुध्दिमत्ता हे गुण आवश्यक आहेत. त्याचबरोबर विश्वासार्हता, परोपकार, सामाजिक उत्तरदायित्व जपणे हे देखील आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान यांनी केले.

नाशिकरोड देवळाली बँकेच्या ३५ व्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी 'बातमी मागची बातमी' यावर व्याख्यान दिले. 'मसाप'च्या सदस्या कामिनी तनपुरे या अध्यक्षस्थानी होत्या. जयप्रकाश प्रधान पुढे म्हणाले, की समाजात परोपकारी माणसे आजही आहेत, म्हणूनच समाज पुढे जात आहे. चांगली माणसे शोधावी लागतात आणि ती सापडतातही. पापांचे क्षालन करण्यासाठी प्रत्येकाने चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. गरजवंतांना मदत केली पाहिजे. सध्याची वृत्तपत्रे आणि पत्रकारिता यांचे स्वरूप बदलले आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त व्यावसायिक झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाही अधिक वेगवान झाला आहे. माझ्या काळातील पत्रकारिता ही स्वतंत्र, निरपेक्ष, समाजभिमुख होती म्हणून मला तो सुवर्णकाळ वाटतो. बातमीदाराची ड्युटी ही नोकरदारांप्रमाणे आठ तासांची नसते, तर ती चोवीस तासांची असते. कधी, कोठे, कशी बातमी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जातीवंत पत्रकाराने नेहमी सजग राहिले पाहिजे. पैशाने सर्व गोष्टी मिळवता येतात पण मरण टाळता येत नाही, हे सांगताना त्यांनी दहा हजार कोटींच्या शेअर घोटाळ्याचा आरोपी हर्षद मेहताला किती साधे मरण आले ते सांगितले. ध चा मा केल्यावर काय गंभीर आणि विनोदी घटना घडतात हे त्यांनी कथन केले. ज्या बातम्यांबाबत पुरावे नसतात, त्याबाबत वृत्तपत्राच्या अन्य सदरांमध्ये लिहून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाखोंचा भ्रष्टाचार कसा बाहेर काढला, हे त्यांनी सांगितले.

...

आजचे व्याख्यान

रंग अक्षरांचे - संदीप देशपांडे व सहकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images