Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदारांकडून ऑफर्सची लूट

$
0
0

मतदान केल्यानंतर विविध ठिकाणी सूट, गिफ्टवाटप

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या भन्नाट ऑफर्सला चांगला प्रतिसाद मिळाला. खरेदीच्या एकूण बिलावर मिळणारी काही टक्के सूट, लकी ड्रॉ, हेल्थ चेकअपसह फ्री टूरच्या ऑफर्सची संधी मतदारांनी साधली. सोमवारी मतदानाचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला.

विवाहेइच्छुक मतदारांना 'अनुमप'तर्फे मोफत मेंबरशिप मिळेल, अशी ऑफर देण्यात आली होती. पंधराशे रुपयांची मोफत मेंबरशिप सुमारे ५०० विवाहेइच्छुकांना देण्यात आली. वकीलवाडी येथील साईछत्र पान स्टॉलतर्फे चॉकलेट, पायनॅपल, मघईसह इतर पानांच्या किमतीवर १० टक्के सूट देण्यात आली. दिवसभरात शंभरपेक्षा अधिक मतदारांनी पान खरेदीवर सवलत घेतल्याचे पंकज लहामगे यांनी सांगितले. रामवाडी परिसरातील आदर्शनगर येथील आदर्श हेअर सलूनतर्फे कटिंग करणाऱ्यांना ५० टक्के सूट देण्यात आली. सुमारे ५० मतदारांनी अर्ध्या किमतीत हेअर कटिंग करण्याच्या ऑफरचा लाभ घेतल्याचे प्रभाकर सैंदाणेंनी सांगितले. मतदान केल्यानंतर सेल्फी अपलोड करण्यासह व्यावसायिकांनी दिलेल्या ऑफर्सची लूट करण्याचा मोह मतदारांना अनावर झाल्याचे दिसून आले.

शहरातील विविध भागातील पाच रुग्णालयात क्रस्ना डायग्नोस्टिक्स या संस्थेतर्फे मोफम थायरॉइड तपासणी शिबिर घेण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे दीडशे महिलांची थॉयरॉइड तपासणी करण्यात आली. जोपर्यंत महिलांच्या बोटावर मतदानाची शाई आहे, तोपर्यंत मोफत तपासणी केली जाणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

नाशिकरोड भागातील बाफणा बाजारतर्फे मतदारांसाठी लकी ड्रॉ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉसाठी ७०० पेक्षा अधिक मतदारांनी नोंदणी केली. त्यातील ३१ विजेत्यांना वेगवेगळे गिफ्टस् देण्यात आल्याचे संजय बाफणांनी सांगितले. कॉलेजरोडवरील सी-३ कॅफेतर्फे मतदान केलेल्यांना फ्री कॅड-बी डेझर्ट देण्यात आले. तीसपेक्षा जास्त मतदारांना या डेझर्टची च‌व चाखल्याचे गौरव धाकराव यांनी सांगितले.

...

\B'फ्री टूर' हवीच\B

ब्रिजमोहन टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडतर्फे दुबईची फ्री टूर तसेच एक हजार मतदारांना सरप्राइज गिफ्ट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदारांना https://voteKaphoto.gr8.com या वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसात एक हजारपेक्षा अधिक मतदारांनी या फ्री टूरसाठी नोंदणी केल्याचे ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले. दि. ११ मेपर्यंत मतदारांना या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. तसेच कोकण पर्यटनतर्फे फ्री कोकण टूर भाग्यवंत मतदारांना देण्यात येईल, अशी ऑफर दिली असून, त्यासाठी दोनशेपेक्षा जास्त मतदारांनी सेल्फी पाठवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्येच्या विवाहापूर्वी पित्यावर काळाचा घाला!

$
0
0

निवडणूक ड्युटीवरून परतताना कर्मचाऱ्याचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अवघ्या २० दिवसांवर आपल्या मोठ्या मुलीचे लग्न असतांना निवडणूक कार्याचे कर्तव्य बजावून परतणाऱ्या देवळाली कॅम्प येथील 'मविप्र' संचालित श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक कृष्णा भरत सोनवणे (वय ४६ ) यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काळाने झडप घातली. या घटनेमुळे पंचवटीतील अमृतधाम परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयासह नातेवाइकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी नाशिक तहसील विभागाकडून माहिती मागविण्यात येत असल्याचे समजते.

या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधने व कृष्णा सोनवणे यांचे बंधू सखाराम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा सोनवणे हे सोमवारी (दि. २९) इगतपुरी मतदार संघातील त्र्यंबकेश्वरच्या नूतन इंग्लिश स्कूलमध्ये पोलिंग अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावून रात्री व्हीव्हीपॅट व अन्य निवडणूक साहित्य जमा करून परतत असतांना त्यांना बसमध्ये उलटी व रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यांनी स्वतःच याबाबत त्यांच्या काही मित्रांसह कुटुंबीयांना तातडीने कळविले. 'मी बसने येत आहे तुम्ही मला सीबीएस येथे घ्यायला या', असा निरोप त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिला. मात्र सीबीएस परिसरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे ते खाली पडले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सोनवणे यांच्या मृतदेहाचे मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे. सोनवणे कुटुंबीयांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मदतीची मागणी

कर्तव्य बजावत असतांना मृत्यू आल्यास राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सीईएल-२०१९ / प्र. क्र. ४७०/१९/३३ या प्रमाणे साहाय्य मिळावे , अशी मागणी प्राचार्य डॉ. विजय मेधने यांच्यासह एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाचा कहर ओसरला, तापमान ३७ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील राजकीय वातावरण थंड होण्यास सुरुवात झाल्यानंतर हवामानात देखील थंडावा येण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात ४२.७ अंशावर असलेले कमाल तापमान ३७.३ अंशापर्यंत घटले आहे. वातावरणातील दोन्ही बदलांमुळे नाशिककरांनी सुस्कारा सोडला आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाने कहर केला होता. त्याला नाशिकही अपवाद नव्हते. नाशिकमध्येही तापमान ४२.७ अंशावर गेले होते. यावेळी निवडणुकीचा माहोल असल्याने अनेकांनी बाहेर पडणे टाळले होते. त्यानंतर वातावरणात काहीसा थंडावा निर्माण झाला. दुपारच्या वेळी कडक ऊन व रात्रीच्या वेळी गारवा असे काहीसे वातावरण सध्या शहरात आहे. या वातावरणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ झाली असून, अनेकांना जुलाब व उलट्या यासारखे आजार झाले आहेत. त्याचप्रमाणे तापाच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाच्या तीव्रतेत सातत्याने वाढ होत असून, स्वयंसेवी संस्थांनी झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवस असलेला उन्हाचा कहर कमी झाल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलचालकावर गुन्हा

$
0
0

नाशिक : लोकसभेसाठी मतदान पार पडत असताना पोलिस आयुक्तांनी शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्व प्रकारचे हॉटेल्स, बार परमिट रूम, देशी-विदेशी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र सोमवारी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल अॅरोमा हे बंद न करता सुरूच ठेवल्याने पोलिसांनी हॉटेलचालक विक्रम निवृत्ती काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव मतटक्क्याने वाढवली धडधड

$
0
0

नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, सिन्नरमध्ये मतांची टक्केवारी वाढली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा मतदानाचा टक्का पाऊण टक्क्याने वाढल्याने तसेच सिन्नर, नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य या तीन मतदारसंघांमध्ये अधिकचे मतदान झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सिन्नरमध्ये गेल्या वेळेपेक्षा तीन टक्के अधिक मतदान झाले असून, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या तीन मतदारसंघामध्ये वाढलेला मतटक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या मतदानाचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे. सन २०१४ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात ५८.८२ टक्के मतदान झाले होते. परंतु, यंदा त्यात वाढ झाली असून, नाशिकमधील मतांचा टक्का हा ५९.४० पर्यंत पोहचला आहे. नाशिकमधील १८ लाख ८२ हजार ८९६ मतदारांपैकी तब्बल ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा ०.५८ टक्के मतदान वाढले आहे. विशेष म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ग्रामीण भागातील तीन मतदारसंघांमध्ये मतटक्क्यात सातत्य राहिले आहे. गेल्या वेळेस सिन्नरमध्ये शिवसेनेला ५० हजारांचे लीड मिळाले होते. परंतु, यंदा अॅड. माणिकराव कोकाटेंच्या उमेदवारीने सिन्नरचे गणित बदलले आहे. स्थानिक उमेदवार असल्याने कोकाटेंना सिन्नरमध्ये लाभ होणार आहे. त्यातच गेल्या वेळेपेक्षा तीन टक्के अधिकचे मतदान झाल्याने कोकाटेंना या वाढीव मतदानाचा फायदा होणार असल्याची चर्चा आहे. नाशिक मध्य मतदारसंघातही तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि दलित मतांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी घड्याळाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. येथील मतांचा टक्का पाहता शिवसेनेची येथे पीछेहाट होण्याची शक्यता आहे. नाशिक पश्मिच मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान होणे अपेक्षित होते. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे २४ नगरसेवक आहेत. परंतु, त्या मानाने मतांचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला लीड असले तरी, मतांची टक्केवारी पाहता महायुतीने येथे फारसा जोर लावला नसल्याचे चित्र आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा १.६८ टक्के अधिक मतदान झाले आहे. या भागातही शिवसेना आणि भाजपची ताकद असली तरी राष्ट्रवादीनेही या मतदारसंघात चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. त्यातच वंचित आघाडीकडूनही या मतदारसंघात मोठे खिंडार पाडले जाणार असल्याने नाशिक पूर्वच्या वाढलेल्या मताच्या फायदा-तोट्याचे गणित जुळवताना उमेदवारांची कसोटी लागत आहे.

शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला असलेल्या दे‌‌वळालीत तर तब्बल गेल्या वेळेपेक्षा तीन टक्क्यांनी मतदान घटले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी येथे धोक्याची घंटा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात राष्ट्रवादीसह अपक्ष कोकाटे आणि वंचितच्या पवारांनी वाटा घेतला असल्याने शिवसेनेचे मताधिक्य यावेळेस घटण्याची शक्यता आहे. इगतपुरी मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा दीड टक्क्यानी मतदान घटले आहे. त्यामुळे इगतपुरीत कोणाला लीड आता याचीच चर्चा सुरू आहे. वाढीव मतदानाचा आपल्यालाच फायदा होईल असा दावा गोडसे, भुजबळ आणि कोकाटेंनी केला असला तरी तिघांनी वाढीव मतटक्क्याचा धसका घेतल्याचीही चर्चा आहे.

..

दिंडोरीत काँटे की टक्कर

नाशिकप्रमाणेच दिंडोरी मतदारसंघातही गेल्या वेळेपेक्षा २.१२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या वेळेस या मतदारसंघात ६३.५२ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र त्यात वाढ होऊन हे मतदान ६५.६४ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. उमेदवारांच्या अदलाबदलीमुळे चर्चेत असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनराज महाले आणि भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्यात काँटे की टक्कर आहे. त्यातच या तिन्ही उमेदवारांचे गृहमतदारसंघ असलेले कळवण आणि दिंडोरी या दोन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झालेले आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नांदगावमध्ये साडेचार टक्क्यांनी वाढ आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघातील वाढीव मतटक्क्यावर जे. पी. गावित यांच्यासह महाले आणि पवार यांनी दावा केला आहे. दिंडोरी मतदारसंघात पाच टक्क्यांची वाढ असून, हा धनराज महाले यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या ठिकाणी साहजिकच महालेंना सर्वाधिक मते मिळण्याचा अंदाज आहे. कळ‌वणमध्ये मात्र गावित, पवार यांच्यासह महालेंसाठी नितीन पवारांनी घेतलेली मेहनत पाहता या ठिकाणी तिघांमध्ये मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. नांदगावचे वाढीव मताधिक्य कोणाच्या पारड्यात यावरून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. छगन भुजबळांचा येवल्यात आणि शिवसेनेच्या अनिल कदमांच्या निफाडमध्ये मतदान वाढण्याची शक्यता होती. परंतु, तसे न झाल्याने महाले, पवार यांच्यात समसमान मतांची पेरणी होण्याची शक्यता आहे. चांदवडमध्ये वाढीव पावणेतीन टक्के मतदानाचा लाभ भारती पवार यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे. पी. गावितांची उमेदवारी आणि वाढीव मतांच्या टक्केवारीमुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.

....

मतदारसंघ सन २०१४ सन २०१९ फरक

सिन्नर ६१.८८ ६४.९७ ३.०९ (वाढ)

नाशिक पूर्व ५३.३८ ५५.०६ १.६८ ( वाढ)

नाशिक मध्य ५२.८७ ५५.९५ ३.०८ (वाढ)

नाशिक पश्चिम ५५.४३ ५५.६१ ०.१८ ( वाढ)

देवळाली ६३.७५ ६०.७२ ३.०३ ( घट)

इगतपुरी ६८.९२ ६७.४१ १.-५१ (घट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन थोडक्यात

$
0
0

शंकराचार्यांचे प्रवचन

नाशिक : जगन्नाथपुरी पीठाधीश्वर परमहंस परिव्राजकाचार्य जगद्गुरू शंकराचार्य निश्चलानंद सरस्वतीजी यांचे आज (१ मे) नाशिकमध्ये आगमन होत आहे. गंगापूररोड, सावरकरनगर येथील तुळजा बंगला येथे ते सकाळी ११ वाजता येणार आहेत. याठिकाणी त्यांच्या प्रवचन आणि पाद्यपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांनी केले आहे.

...

डीडीआयटीचा समारंभ

नाशिक : धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (डीडीआयटी) च्या समारंभाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये सायंकाळी ५.३० वाजता हा समारंभ होणार आहे. त्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनादेश सीलबंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदान सुरळीत पार पडल्यानंतर मंगळवारी जिल्हाभरातून आलेले ईव्हीएम मशिन सुरक्षित स्थळी ठेवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील हे मशिन अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएमची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील सर्व ईव्हीएम उमेदवारांच्या समक्ष स्ट्राँगरूममध्ये ठेवत सील करण्यात आले. मतमोजणी २३ मे रोजी होणार असून ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी १५० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी मतदानाची वेळ असली तरी दुपारी चारनंतर केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली. अनेक नागरिक सायंकाळी सहा वाजताही मतदान केंद्रांवर असल्याने रात्री उशिरापर्यंत काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या-त्या विधानसभा मतदारसंघनिहाय अधिकाऱ्यांकडे मतदान यंत्रे जमा केली. ही सर्व यंत्र अंबड येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात जमा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आले होते. त्यानुसार हे सर्व मशिन घेऊन निवडणूक कर्मचारी अंबड येथील गोदामात दाखल होऊ लागले. येवला मतदारसंघातील ईव्हीएम रात्री दोन वाजता घेऊन अधिकारी-कर्मचारी गोदामात पोहचले. त्यानंतर अर्धा तासाने नाशिक पश्चिमच्या ईव्हीएम पेट्या गोदामात दाखल झाल्या. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाकरीता गोदामात वेगवेगळे स्ट्राँगरूम तयार करण्यात आले आहेत. सर्व ईव्हीएम जमा झाल्यानंतर नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे आणि दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या मार्गदर्शनाने ईव्हीएमच्या पेट्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या.

मतमोजणीच्या दिवशी उघडणार

दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या समक्ष मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन्ही स्ट्राँगरूम सील लावून बंद करण्यात आले. मतमोजणी २३ मे रोजी असून मोजणीच्या एक तास आधी उमेदवारांच्या समक्ष हे स्टाँगरूम उघडण्यात येतील. तोपर्यंत गोदामाभोवती मोठ्या प्रमाणावर पोलिस, सीआरपीएफ व एसआरपीएफच्या जवानांचा पहारा असणार आहे.

अंबड वेअर हाऊस येथील बंदोबस्त

पोलिस कर्मचारी : ३०

सीआरपीएफ जवान : ६०

एसआरपीएफ जवान : ६०

एकूण : १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर्कशास्त्रातून उलगडले जीवनरहस्य

$
0
0

लेखक कृष्णा पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतीनिधी, नाशिक

कॉलेजमध्ये असतांना माझ्या डोक्यावर वीज पडली होती. वीज म्हणजे काय, याचा शोध लावण्यासाठी पुस्तके वाचायला सुरुवात केली, माणसातील विजेचा शोध करू लागलो. त्यामुळे तर्कशास्त्राच्या अभ्यासाकडे वळलो. या अभ्यासातून जीवनाचे रहस्य उलगडत गेले असे प्रतिपादन लेखक कृष्णा पवार यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परीषद नाशिकरोड शाखेच्या वतीने आयोजित 'संवाद सृजनाशी' या कार्यक्रमात ते बोलत होते. तर्कशास्त्राच्या अभ्यासाने मला वेड लावले. पहिल्या पगारातून पुस्तके घेतली आणि तो छंद इतका वाढला की माझी स्वतःची लायब्ररी आहे. एकदा अचानक जुना मित्र योगेश ठोके भेटला आणि त्याच्या लहान मुलाला जेनेटिक डीसऑर्डेर झाल्याचे समजले. वैद्यकशास्त्रात त्यावर इलाज नाही म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार सुरू केला. बायकोने रद्दीतून एक जुने फाटके पुस्तक आणले. जिच्या शोधात मी होतो, ती माहिती त्याच्यात होती म्हणून त्याच्या लेखकाचा शोध सुरु केला. त्यावेळी महाबळेश्वरच्या पाठीमागे डोंगरातील एका गुहेत स्वामीजी भेटले. त्यांच्याकडे आठ दिवस राहिल्यावर जीवनाचे रहस्य उलगडले' असे पवार यांनी सांगितले.

या प्रसंगी उत्तम तेजाळे यांनी शाल, स्मृती चिन्ह, ग्रंथभेट देऊन पवार यांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यकारणी सदस्य शिवाजी म्हस्के, ऋतुरंगचे सचिव प्रकाश पाटील, वसंत पाटील, योगेश कापडणीस आदी उपस्थित होते. दशरथ लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. सुमन हिरे यांनी स्वागत केले. रेखा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा गणोरे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. सल्लागार विश्वास गायधनी यांनी आभार मानले. अनिल गुरव यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याचा हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

बिबट्याचा हल्ल्यानंतर दुचाकीचालक आश्चर्यरित्या सहीसलामत वाचला. सिन्नर तालुक्यातील कारवाडी (शहा) परिसरात ही खळबळजनक घटना बुधवारी (दि. १) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. झेप घेतलेल्या बिबट्याची नखे लागल्याने प्रवीण सोपान जाधव (वय ३९) हा दुचाकीचालक जखमी झाला.

कारवाडी शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या वाचनालयासमोर सदर घटना घडली. कारवाडी केंद्रात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना वस्तीवरील महिलांना सोडण्यासाठी प्रवीण जाधव हे दुचाकीहून आले होते. महिलांना केंद्रात सोडून परतत असतांना कारवाडी-शहा रस्त्याने वस्तीवर मार्गस्थ झाले. रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या जाधव यांच्या दिशेने झेपावला. त्याने जाधव यांच्या डाव्या हाताला ओरखडले. बिबट्या दुचाकीचा पाठलाग करू लागल्याने जाधव ओरडत जवळच्या वस्तीवर आधारासाठी गेले. वस्तीवरील शेतकरी आल्यानंतर बिबट्या माघारी फिरला. बिबट्याचे नख खोलवर गेल्याने प्रवीण यांना उपचारासाठी देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लागलीच नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

अहोरात्र परिश्रमातून राज्यघटना प्रत्यक्षात

$
0
0

लोगो - वसंत व्याख्यानमाला

'अहोरात्र परिश्रमातून राज्यघटना प्रत्यक्षात'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यघटना ही जरी १९५०साली अंमलात आली असली तरी, त्याच्या जन्मकळा या शेकडो वर्षापूर्वीच सुरू झाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी एक शोध निंबधच लिहून दिला. राज्यघटना तयार करताना समाजातील सामान्य माणसापासून मोठ्या लोकांच्या मनातील कल्पना लिहून मागविण्यात आल्या. या सगळ्याचा सारासार विचार करून अहोरात्र परिश्रम घेऊन राज्यघटना प्रत्यक्षात आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी गुंफले. यावेळी 'भारतीय राज्यघटनेच्या जन्मकळा'या विषयी त्यांनी सखोल विवेचन केले. पुढे ते म्हणाले, राज्यघटनेला राजधर्म हा शब्द पूर्वी प्रचलित होता. राजधर्म या शब्दाचा वापर दोनच वेळा केला गेला. नेहरु, वल्लभभाई पटेल, तसेच अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात राजधर्म हा शब्द वापरला गेला. रामायण, महाभारतातही हा शब्द प्रचलित होता. महाभारतात श्रीकृष्णाने राजधर्म बदलला म्हणजेच आपण आता राज्यघटना बदलली. जवळजवळ दोन आडीच वर्षे राज्यघटना तयार करण्यास लागली. पण आजही राज्यघटनेची सखोल माहिती सर्व सामान्य लोकांना नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जामदार यांनी केले. तर आभार आशा चौधरी यांनी मानले. यावेळी प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, वसंत व्याख्यानमाला प्रमुख डॉ. शरद पाटील, चंद्रकांत गुजराती, सुनंदा देशमुख, गोरे, वीणा कुलकर्णी, बाजीराव येवले, नंदकुमार कोळपकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीनंतर मेळाव्यांची धूम

$
0
0

निवडणुकीनंतर

मेळाव्यांची धूम

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर आता वधू-वर मेळाव्यांची धामधूम सुरू होत आहे. शहरात विविध समाजांच्या वतीने विवाहेच्छुकांसाठी पाच मे रोजी वधू-वर मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने विवाहेच्छुकांसाठी मराठा वधू-वर परिचय मेळावा रविवारी (दि. ५) गंगापूर रोड परिसरातील मते नर्सरी येथील सप्तपदी हॉल येथे दुपारी १ वाजता होणार आहे. तर शांतिदूत तथागत बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे बौद्ध वधू-वर परिचय मेळावा रविवार (दि. ५) जेलरोड परिसरातील के. एन. केला इंग्रजी शाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दुपारी १२.३० वाजता सुरू होणार आहे. समाजबांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांच्या हल्ल्यात युवक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोड परिसरातील सोमेश्वर कॉलनीत पाळीव कुत्र्यांनी अजर हसीम खान या युवकावर भरदिवसा हल्ला केला. यात अजर हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमेश्वर कॉलनीतून अजर हा पायी जात होता. त्याचवेळी तेथील पाळीव चार ते पाच कुत्र्यांनी अजरवर हल्ला चढवला. मात्र, त्यावेळी तेथे कुणीही नसल्याने अजरला कुठलीही मदत मिळाली नाही. अजर कुत्र्यांशी प्रतिकार करीत होता. मात्र कुत्र्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्याच्या अंगावर कुत्र्यांनी चावे घेत गंभीर जखमी केले. काही महिन्यांपूर्वीही याच पाळीव कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेने कारवाई करावी, अशी आग्रही मागणी अजरची आई शबीरा खान आणि स्थानिक नागरिक राजू गवळी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात चोरट्यांची चांदी!

$
0
0

वेगवेगळ्या घरफोडींमध्ये सव्वाचार लाखाचा ऐवज लंपास

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या चार ठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी सव्वाचार लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालावर हात साफ केला. उन्हाळी सुटींना सुरुवात होताच चोरट्यांची दिवाळी सुरू झाली असून, पोलिस या गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी मुंबईनाका, अंबड, म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

गोविंदनगर भागात मंगळवारी (दि. ३०) भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. संजय पुरुषोत्तम काठे (रा. ट्रॅकव्हील अपा. वझरेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. काठे कुटुंबीय मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून ७५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरुन पोबारा केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रणीता पवार करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना सरस्वतीनगर भागात घडली. के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजच्या मागे पाठीमागे झाली. या ठिकाणी राहणारे स्वप्निल विश्वनाथ शेवाळे (रा. आशिर्वाद रो हाऊस) आणि त्यांचे कुटुंबीय २७ ते ३० एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली दहा हजारांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे एक लाख २६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. दरम्यान, सुरेखा कैलास वैद्य (रा.शनिचौक, जुने सिडको) यांच्या तक्रारीनुसार घरफोडीचा आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला. २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास वैद्य कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा दरवाजा उघडून कपाटातील सोन्याचांदीचे अलंकार, पाकिटातील २० हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

--

कारखान्याच्या गोडावूनमधून चोरी

औद्योगिक वसाहतीतील खिंवसरा इंडस्ट्रीज पीआय या कंपनीच्या गोडावून मधून चोरट्यांनी रेफ्रीजरेटरला लागणारी कॉपर वायरचे बंडल चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील सुभाष खिंवसरा (रा. राका कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंबड औद्योगीक वसाहतीतील खिंवसरा इंडस्ट्रीज या कंपनीचे गोडावून आहे. दोन दिवस सुटी असल्याची संधी साधत चोरट्यांनी गोडावूनच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून गोडावूनमध्ये प्रवेश केला. रेफ्रीजरेटरला लागणारे कॉपर वायरचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे नऊ बंडल घेऊन चोरटे पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवविवाहितेसह युवतीचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घटनेत नवविवाहितेसह अल्पवयीन युवतीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंचवटीतील अल्पवयीन मुलगी मंगळवारी सकाळी आपल्या घरात एकटी असताना संशयित हेमंत नारायण मोरे (रा. रोडे चाळ, क्रांतीनगर) याने घराच्या पाठीमागील दरवाजाने आत प्रवेश केला. मुलीला धमकी देत संशयिताने युवतीचा विनयभंग केला. युवतीने ही बाब घरी परतलेल्या कुटुंबियास सांगितले. त्यानंतर पालकांसह पिडीत युवतीने संशयिताविरूद्ध विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. विनयभंगाची दुसरी घटना एकलहरागेट येथील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी भागात घडली. परिसरातील नवविवाहीता मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास संशयित दीपक बबन चव्हाण यांच्या घरासमोरून पायी जात असताना ही घटना घडली. नवविवाहिता रस्त्याने पायी जात असताना संशयिताने कुणी नसल्याची संधी साधत तिचा हात पकडून विनयभंग केला. यावेळी पीडितेने आरडाओरड केली. त्यामुळे पीडितेची आई मदतीला धावून आली. तर संशयिताचे कुटुंबीय घराबाहेर आले. संशयिताची पत्नी मिना चव्हाण, पमा चव्हाण, आशा चव्हाण, सरूबाई चव्हाण (रा.सिध्दार्थनगर झोपडपट्ट, एकलहरे रोड) आदींनी पिडीतेसह तिच्या आईस मारहाण केली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुकणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्रदिनीच शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यात सर्वत्र बुधवारी महाराष्ट्रदिन साजरा होत असताना तालुक्यातील पाटणे येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मेघश्याम भिकन खैरनार (वय ५८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. खैरनार यांनी बुधवारी सकाळी सात वाजता घरातच गळफास घेतला. खैरनार यांच्या नावे आघार खुर्द शिवारात ०.२७ आर शेतजमीन आहे. मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती व शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने खैरनार यांना शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची चिंता सतावत होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनासह घरफोडी;दहा वषाची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसल्यानंतर एका दाम्पत्याला मारहाण करून जीवे ठार मारले. यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवविल्याप्रकरण्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने एका आरोपीस दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

चाळीसगाव येथे १ मार्च २०१७ रोजी ही घटना घडली होती. आरोपी मनोजसिंग सिकंदरसिंग टाक (वय २९) याने एका साथीदारासह चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर राहणाऱ्या दगडू देवरे व त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने घरातील रोकड लंपास करुन पळ काढला होता. पळून जात असताना टाक व त्याच्या साथीदारास देवरे यांचा मुलगा नितीन याने पाहिले होते. या मारहाणीत देवरे दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीतून सुटका!

$
0
0

धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात तीव्र दुष्काळामुळे पाणीटंचाईच्या झळा वाढत असताना, नाशिककरांची यंदा मात्र पाणीकपातीतून सुटका झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणासह मुकणे धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने यंदा नाशिकककरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. पर्याप्त पाणी उपलब्ध असले तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पाणी चोरांवर तसेच, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे मात्र यंदा गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणात महापालिकेच्या पाण्याचे पुरेसे आरक्षण असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. शहरासाठी गंगापूर धरण समूहातून ४२०० दशलक्ष घनफूट, दारणातून ४००, तर यंदा प्रथमच मुकणेतून ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. १५ ऑक्टोबर ते १ मेपर्यंतच्या गेल्या १९९ दिवसांत उपलब्ध पाणी आरक्षणापैकी गंगापूर धरण समूहातून २९९३.०८ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा वापर झाला. दारणातून २३३ दशलक्ष घनफूट पाणी या कालावधीत उचलण्यात आले. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात नाशिककरांना पिण्यासाठी १२०६.९२ दशलक्ष घनफूट, तर दारणातील १६६.९१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, हे पाणीसुद्धा उचलता येणार आहे. त्यामुळे एकूण १६७३.८३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. हा पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरवावा लागणार आहे.

सध्या नाशिक शहरासाठी दररोज १६ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा धरणांतून केला जात आहे. त्यानुसार पाणीवापर सुरू राहिल्यास धरणांतील शिल्लक पाणी आरक्षण उर्वरित ९१ दिवस सहजपणे पुरू शकणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात केली जाणार नसल्याचे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केल्याने नाशिककरांना दुष्काळात दिलासा मिळाला आहे.

...

पाणीचोर, अपव्यय करणाऱ्यांवर थेट गुन्हे

शहरासाठी पिण्याचे पाणी भरपूर उपलब्ध असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले आहे. अंगणात सडा मारण्यासाठी तसेच, वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. असे प्रकार आढळल्यास थेट दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. नळाला विद्युत मोटारी लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली जाणार असून, तसे करताना आढळल्यास मोटार जप्त करण्याबरोबरच संबंधितांविरोधात गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.

..

शहरात उद्या सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथील ३३ के. व्ही. ओव्हरहेड लाइनची महावितरणकडून शनिवारी (दि. ४) दुरुस्ती केली जाणार आहे. या ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून पंपिंग होणार नाही. त्यामुळे उद्या, शनिवारी संपूर्ण शहरात सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (दि. ५) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालक पदक प्रदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या आणि विशेष कार्य केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलिस आयुक्तालय कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे व्यासपीठावर होते. पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक प्रदान केले.

...

यांना मिळाले पदक

मधुकर सातपुते (सहायक समादेशक, महाराष्ट्र पोलिस अकादमी), स्वाती कुराडे (पोलिस निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता विभाग), राजेंद्र चौधरी (पोलिस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण), संतोष पाटील (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), राजेंद्र चौधरी (पोलिस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण)

..

एएसआय : राजू साळवे, मनोहर वाघ, शिवाजी देशमुख, पोपट कारवार, रमेश देशमाने, संजय सूर्यवंशी

--

नाशिक शहर पोलिस दलातील कर्मचारी : नंदू उगले, चंद्रकांत सदावर्ते, दतात्रेय पाळदे, मधुकर घुगे, माणिक गायकर, सोमनाथ सातपुते, मनोज विसे, रवींद्र बागूल, मोहन कडवे, पोपट माळोदे, संजय जाधव, गणेश भामरे, महेबूब सैय्यद, कैलास कुशारे, अनिल दिघोळे, जितेंद्र परदेशी, प्रफुल माळी, संजय सानप, प्रदीप म्हसदे.

...

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील एएसआय : दीपक सूर्यवंशी, सुनील गायकवाड, अरुण मुंढे.

...

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी : राजाराम दिवटे, सुलतान शेख, प्रकाश चव्हाणके, शिवाजी जुंद्रे, दिलीप घुले, भगीरथ सोनवणे, पांडुरंग पारधी, राजेंद्र जाधव, सुनील कदम.

...

इतर विभागातील एएसआय व कर्मचारी

दहशतवाद विरोधी शाखा : राकेश खेडकर, जाकीर शेख.

एसीबी : अशोक धमांदे, सुभाष हांडगे, दिलीप ढुमणे, नरेंद्र कुलकर्णी, प्रमोद अहिरे.

एमपीए : मंगेश करडेल, अनिल वासेकर, शरद सोनवणे, सुशील कदम, संदीप देवरे, तुषार शेळके.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय : मोहन पडवळ, राकेश बावा, मच्छिंद्र शेलार.

हवालदार सीआयडी : दिलीप मते

...

विशेष सेवा पदक

पोलिस निरीक्षक संजय सांगळे, पोलिस उपनिरीक्षक सुनील बोडके, रुपेश काळे, दानिश मन्सुरी, पोलिसनाईक श्रीधर बाविस्कर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य शिक्षणातूनच विद्यार्थ्यांना विपूल संधी

$
0
0

कुलगुरू वायूनंदन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशंतवराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे नियमित पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कौशल्यांवर आधारित शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशा अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना रोजगार, करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. 'डीआयडीटी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी केले.

कॉलेज रोडवर कल्पतरू ट्रस्ट संचालित धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी (डीआयडीटी)च्या नूतन कॅम्पसच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्पतरू ट्रस्टच्या पदाधिकारी मनीषा बागूल, चंद्रकांत गुंजाळ, शकुंतला वाघ, अजय बोरस्ते, 'डीआयडीटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागूल आदी उपस्थित होते.

वायुनंदन म्हणाले, की इतकी देखणी वास्तू असलेले विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असल्याचे नमूद करतांना विविध सुविधांचा आढावा घेतला. औपचारिक कार्यक्रमानंतर झालेल्या समारंभात 'डीआयडीटी' कॅम्पसच्या नूतन वास्तुला रंगरूप देणाऱ्या इंटेरिअर डिझायनिंगच्या विविध व्यक्‍तींचा सत्कार करण्यात आला. 'डीआयडीटी'मार्फत दरवर्षी फॅशन शो घेतला जातो. यंदाचा फॅशन शो २३ जून रोजी होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित राहाणार असल्याची माहिती अनिल बागूल यांनी दिली.

'डीआयडीटी' महाविद्यालयात इंटेरिअर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शासनमान्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ यांच्याशी सदरचे अभ्यासक्रम संलग्न आहेत. उच्चशिक्षित प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमासंदर्भातील शिक्षण तर तज्ज्ञ व्यावसायिकांकडून प्रात्येक्षिकांवर आधारित प्रशिक्षण दिले जात असल्याचे बागूल यांनी नमूद केले. कार्यक्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्‍त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images