Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धुळे, नंदुरबारला ‘मतोत्सव’

0
0

धुळ्यात ५८ तर नंदुरबारला ६८ टक्के मतदान

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात १७ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये खान्देशातून धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह दिसून आला. तर दुपारनंतर पुन्हा गर्दीत वाढ झाली. सांयकाळी ६ वाजेपर्यंत धुळे मतदारसंघात ५८ तर नंदुरबार मतदासंघात ६८ टक्के मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत धुळ्यात जैसे थे परिस्थिती तर नंदुरबारला मतदानात चांगला उत्साह दिसून आल्याने खऱ्या अर्थाने ‘मतोत्सव’ साजरा झाल्याचे चित्र होते.

खान्देशातील धुळे व नंदुरबार मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान झाले. या ठिकाणी धुळ्यात २११५ तर नंदुरबारला १९४० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. धुळ्यात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी करीत आव्हान उभे केले आहे. तर नंदुरबार मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार खासदार डॉ. हीना गावित आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. के. सी. पाडवी यांच्यात प्रमुख लढत आहे. याठिकाणी भाजपचे बंडखोर डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मतांमध्ये विभागणी होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा करीत मतदारांचे आभार मानले आहेत. उन्हातही मतदारांनी दाखविलेल्या उत्साहाने लोकशाहीचा विजय झाल्याच्या प्रतिक्रिया मतदारांनी ‘मटा’शी बोलताना दिल्या. दरम्यान, दि. २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारणकुडीला शून्य मतदान

0
0

‘पेसा’मध्ये समावेश न झाल्याने ग्रामस्थांचा बहिष्कार

धुळे : नंदुरबार मतदारसंघाच्या साक्री तालुक्यातील चारणकुडी / तोरणकुडी ग्रामपंचायतीचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे नाराज असलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २९) लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ संपूर्ण गाव गोळा झाला होता. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. मतदान केंद्राकडे एकही ग्रामस्थ फिरकला नाही. यामुळे निवडणूक कर्मचारी मतदारांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे चारणकुडी गावात लावण्यात आलेल्या मतदान केंद्राच्या ईव्हीएम मशीनमध्ये एकही मत नोंदविले गेले नाही. तर दुसरीकडे साक्री तालुक्यातीलच भोरटीपाड्यात मतदानावरील बहिष्कार समजूत काढल्यानंतर मागे घेण्यात आला. भोरटीपाडा येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २९) सकाळी ७ ते १०.३० वाजेदरम्यान साडेतीन तास मतदानावर बहिष्कार टाकला. पेसा क्षेत्रात गावाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. या वेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन समजूत काढल्यावर बहिष्कार मागे घेण्यात आला. यानंतर गावात मतदान शांततेत पार पडले. येत्या काळात गावाचा पेसा क्षेत्रात समावेश न झाल्यास पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार कायम राहिल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथांचा अंगी चंदनाची उटी श्रीक्षेत्र ञ्यंबकेश्वर येथे चैत्रवद्य तथा वरू

0
0

त्र्यंबकेश्वरमध्ये उटीची वारी उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे चैत्रवद्य तथा वरूथीनी एकादशीला उटीची वारी निमित्ताने त्र्यंबक येथे भाविकांची मांदियाळी उसळली होती. वाढत्या उन्हाने जीवाची काहिली होत असताना नाथांचा स्पर्श झालेली चंदनाची शीतल उटी मस्तकी लेवून भाविक कृतार्थ झाले.

सोमवारी दशमी पासूनच भाविक पायी दिंड्यांनी आणि वाहनांनी शहरात दाखल झाले होते. मंदिर आणि परिसरात पेंडाल टाकून भजन कीर्तन सुरू होते. सकाळपासून कुशावर्तावर स्नानासाठी रिघ लागली होती. त्यासोबत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस जाणारे भाविक लक्षणीय होते. मंगळवारी एकादशीच्या दिवशी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दर्शनरांग थांबवून संत निवृत्तिनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली. गत आठवडाभर महिलांनी चंदन उगाळून ही शेकडो लिटर उटी तयार केली होती. या प्रसंगी समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, ह.भ.प. संजय महाराज धोंडगे, पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी, त्र्यंबकदादा गायकवाड, पुंडलिक थेटे, पवन भूतडा, संदीप शिंदे, मधुकर लांडे, रामभाऊ मुळाणे आदी उपस्थित होते.

मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान सभामंडपात नाथांच्या समाधीसमोर कीर्तन सुरू होते. टाळकरी, विणेकरी, पखवाज मृदुंगवादक तसेच शेकडो भाविकांनी धरलेला टाळांचा फेर यामुळे वातावरण भक्तीरसाने न्हाऊन निघाले होते. उटी लावून झल्यावर दर्शन रांग सुरू करण्यात आली. भाविक रात्री बारा वाजेपासून दर्शनासाठी रांगेत उभे होते. रात्री बारा वाजता विधीवत पूजनाने उटी उतरविण्यात आली आणि भाविकांना ती प्रसाद म्हणून देण्यात आली. संसार तापाने शिणलेले भाविक शेकडो मैल पायपीट करून त्र्यंबकेश्वर येथे उटीच्या वारीसाठी आले होते. नाथांचा स्पर्श झालेली चंदानाची उटी मस्तकी लावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅम सोनाइटमध्ये १५ हजारांची वेतनवाढ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅम सोनाइट या बॅग बनविणाऱ्या कंपनीत कामगारांना १५ हजार रुपये वेतनवाढ देण्यात आली आहे. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यात याबाबत नुकताच करार झाला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गोंदे औद्योगिक वसाहतीत सॅम सोनाइट कंपनीत ट्रॅव्हल बॅग बनविल्या जातात. या कंपनीत १४८ कायम कामगार आहेत. कामगारांनी सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे सभासदत्व स्वीकारलेले आहे. कामगार संघटना व कंपनीचे व्यवस्थापन यांच्यामध्ये नुकताच वेतनवाढीचा करार झाला. या करारामध्ये कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये अशी भरघोस व विक्रमी वेतनवाढ देण्यात आली आहे.

हा करार १ जानेवारी २०१८ पासून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अस्तित्वात असणार आहे. या करारामुळे कामगारांना दरमहा पहिल्या वर्षी नऊ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी २२५० रुपये, तिसऱ्या वर्षी २२५० पन्नास रुपये व चौथ्या वर्षी १५०० रुपये पगारवाढ मिळणार आहे. याबरोबरच महागाई निर्देशांकानुसार प्रत्येक पॉईंटला नऊ रुपये याप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे चार वर्षांत साडेचार हजार रुपये वेगळी वाढ मिळेल.

या करारामुळे कामगारांना त्यांच्या एक महिन्याच्या वेतनाच्या ८० टक्के वेतन बोनस म्हणून दरवर्षी मिळणार आहे. यामुळे कामगारांना पहिल्या वर्षी ३४ हजार रुपये बोनस मिळेल. याबरोबरच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख रुपयाचा मेडिकल विमा कंपनीतर्फे काढण्यात येईल. अपघातासाठी तीन लाख रुपयांचा विमा काढण्यात येईल. या करारात कामगारांनी पन्नास टक्के उत्पादकता वाढ देण्याचे मान्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीएसटी’च्या शाखेला ठोकले टाळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या (एनडीएसटी) मालेगाव शाखेने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासदांच्या वार्षिक ठेवींवरील व्याजातून कर्जाचे थकीत हप्ते परस्पर कपात करून घेण्याचे फर्मान काढल्याने संतप्त झालेल्या सभासदांनी मंगळवारी येथील मालेगाव शाखेच्या बाहेर टीडीएफ जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत टाळे लावले.

एनडीएसटी मालेगाव शाखेचे सभासदांना ठेवींवर व्याज देण्यात येते. यंदा मात्र ज्या सभासदांचे कर्जाचे हफ्ते एक दोन हप्ते थकीत झालेत त्यांना व्याजाची रक्कम देण्यात येणार नसल्याचे फर्मान शाखेकडून काढण्यात आल्याने संतप्त सभासदांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी निकम यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. गेल्या चारवर्षात अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासदांच्या बदल्या झाल्यात तसेच सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्याने अनेकांचे पैसे जिल्हा बँकेत अडकून पडले अशा अनेक कारणांमुळे काही सभासदांचे एक दोन हप्ते थकीत झाले आहेत. सभासदांनी तीन तास ठिय्या आंदोलन करून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. अखेर शाखाधिकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला. परंतु सभासदांचे समाधान न झाल्याने त्यांनी शाखेला टाळे ठोकले. अध्यक्ष संजय देवरे हे आंदोलन स्थळी आले व त्यांनी सदर हप्ते वसुलीस तत्काळ स्थगिती दिली व आंदोलन मागे घेण्यात घेण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनात अनिल अहिरे, सुनील पवार, के. डी. चंदन, चंद्रशेखर शेलार, वाय. के. खैरनार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मालेगाव मध्य’त फेरमतदान घ्या

0
0

आमदार असिफ शेख यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक व पोलिस यंत्रणेने सरकारच्या दबावात काम करीत जाणीवपूर्वक मतदान कमी होईल यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मालेगाव मध्यचे काँग्रेस आमदार असिफ शेख यांनी केला. या विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

उर्दू मीडिया सेंटर येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला. सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मालेगाव मध्ये विधानसभा मतदारसंघात ५०.३० टक्के इतकेच मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा मतदान टक्का घसरला आहे. दरम्यान मतदानाचा घसरलेला टक्काबाबत आमदार शेख यांनी काही आक्षेप या पत्रकार परिषदेत नोंदवले. शेख म्हणाले की, येथील मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यात आला. अनेक जिवंत असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून बाद करण्यात आलीत. मालेगाव हायस्कूल येथे सर्वाधिक ५७ मतदानकेंद्रांचे नियोजन होते. मात्र येथे पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आल्याने वृद्ध, दिव्यांग व आजारी मतदारांना मतदानासाठी जात आले नाही. मतदान केंद्रापासून निर्धारित अंतरावर मंडप टाकण्याची परवानगी घेतलेली असताना देखील पोलिस यंत्रणेने बळाचा वापर करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. बीएलओ कर्मचाऱ्यांकडून वाटप झालेल्या मतदार चिठ्ठीत मतदानकेंद्राचा देण्यात आलेला पत्ता ऐनवेळी बदल्यात आला. सायंकाळी ६ वा. आधी मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांना पोलिसांनी जबरदस्तीने मतदान केंद्रांवरून बाहेर काढले. तसेच काही पोलिस कर्मचारी मतदारांना भाजपला मतदान करा असे सांगत होते असा देखील आरोप असिफ शेख यांनी यावेळी केला.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल मतदानसंघ असल्यानेच जाणीवपूर्वक येथील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी निवडणूक व पोलिस यंत्रणेने सरकारच्या दबावात येऊन काम केले. निवडणूक व पोलिस यंत्रणेची भूमिका मतदान प्रकियेत संशयास्पद असल्याचे दिसून आले. पोलिस यंत्रणेकडून दहशत पसरवण्यात आली. यामुळेच मतदानासाठी येऊन देखील अनेकांना मतदान करता आले नाही. त्यामुळे येथील निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष वातावरणात व्हावी यासाठी फेरमतदान घेण्यात यावी अशी मागणी २ मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्यासह बछड्याचा विहिरीत पडून मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील शहा कारवाडी हद्दीजवळ येथील मादी बिबट्यासह बछडा विहिरीत पडून मृत पावल्याची घटना सोमवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली.

शहा कारवाडी हद्दीत शेतकरी सुरेश सैंदर याची विहिरी आहे. सोमवारी विहिरीतील विद्युत मोटारीचे स्टार्टर बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी सैंदर वहिरीजवळ गेले त्यांना विहिरीत बिबट्यासह बछडा तरंगताना दिसला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकारी वर्गाला दिली. कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पोहचले असता त्यांनी बिबट्यासह बछड्याला बाहेर काढले. साधारण दोन ते तीन दिवसांपासून बिबट्यासह बछडा विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य जाणवत होते. काही शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्यांनी फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. दिवसभर शांत असणारे बिबटे रात्री अन्न-पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. रात्री अंदाज न आल्याने बिबट्या आणि बछडा सैंदर यांच्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मोहदरी येथील वनविभागाच्या उद्यानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार शेख यांच्या भावावर गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील मालेगाव मध्यचे आमदार असिफ शेख यांचे बंधू माजी नगरसेवक हाजी खालिद शेख रशीद यांच्यावर मतदानाकामात अडथळा आणून पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आमदार शेख यांनी खोट्या आरोपाखाली आपल्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या विरोधात पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे सांगितले. सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रीयेदरम्यान उस्मान गनी शाळेतील मतदान केंद्रावर सायंकाळी हा प्रकार झाला.

हाजी खालिद शेख रशीद हे मतदान केंद्रावर सायंकाळी सहाच्या नंतर मतदान वेळ संपल्यानंतरही मतदान करण्यासाठी मतदारांना जाऊ देण्याचा आग्रह करत असल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद झाला. मतदानाचा कालावधीच्या आत मतदानकेंद्रावर १०० मीटरच्या आत असलेल्या मतदारांना आत घेण्यात आले होते. परंतु वेळ संपल्यानंतरही येणाऱ्या मतदारांसाठी मतदान चालू ठेवावे, अशी मागणी खालिद हाजी यांच्याकडून होत होती. त्यामुळे पोलिस आणि त्यांच्या वाद निर्माण होऊन हाजी खालिद यांनी पोलिस कर्मचारी यांना दमबाजी करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यावर अयशा नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आकडेमोड जोरात, उमेदवार निवांत

0
0

प्रचारातील समर्थक नेते नॉटरिचेबल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या एक ते दीड महिन्यापासून प्रचाराच्या धावपळीत मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या बहुतांश उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मतदानानंतर मंगळवारी उसंत घेतली. सकाळचे सत्र आकडेमोडीत, तर उर्वरित दिवस कुटुंबासमवेत घालवला. विविध ठिकाणांहून आलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मतदानाच्या आकडेवारीचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. काही पदाधिकाऱ्यांनी नॉटरिचेबल होऊन विश्रांतीसाठी शहराबाहेर जाण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, एका उमेदवारासह काही समर्थकांनी विश्रांती तसेच, हवापालटसाठी परदेश गाठल्याचीही चर्चा आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात आहे. चौरंगी लढतीमुळे मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात रंगत आली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन शहरी व तीन ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या एक ते दीड महिन्यापासून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीसह अपक्ष कोकाटे आणि वंचितच्या पवन पवार यांनी शक्ती पणाला लावली होती. या चारही उमेदवारांनी तसेच, त्यांच्या समर्थकांनी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला होता.

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराचा धामधूम संपली आहे. यामुळे चारही उमेदवारांनी सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी प्राप्त होताच समर्थकांमार्फत प्रत्येक विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेतला. आपल्याला मिळालेली मते, विरोधकांना मिळणाऱ्या मतांची जुळवाजुळव करण्यात वेळ घालवला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करण्यात धन्य मानले. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी दिवसभर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालत विश्रांती घेतली. शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आकडेमोड केली. दुपारी कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. आपल्या निवडक समर्थकांसह त्यांनी श्रमपरिहार केला. अपक्ष माणिकराव कोकाटेंनी सकाळच्या सत्रात आकडेमोडीनंतर आपल्या हिंतचिंतकांचे आभार मानत हितगूज केले. आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनीही चर्चा केली. त्यानंतर विश्रांती घेतली. वंचित आघाडीचे पवन पवार यांनीही कोणत्या मतदारसंघातून किती मते पडतील याचा अंदाज घेतल्यानंतर दिवस विश्रांतीत घालवला.

..

समर्थक परदेशवारीवर

उमेदवारांसोबतच त्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण प्रचार नियोजन करणाऱ्या दोन्ही पक्षातील समर्थक पदाधिकाऱ्यांनाही गेले महिनाभर परिश्रम करावा लागला. उमेदवारांसोबत पायाला भिंगरी बांधून फिरणाऱ्या या समर्थकांपैकी काहींनी मात्र थेट परदेशवारीला जाणेच पसंत केले. प्रचारामुळे आलेला क्षीण घालवण्यासाठी थंड हवेचा शोध घेण्यासाठी काहींनी थेट युरोपीयन देशांना पंसती दिली आहे. काहींना थायलंडला श्रमपरिहारासाठी प्राधान्य दिले आहे. नाशिकमध्ये एकीकडे उमेदवार आकडेमोड आणि कुटुंबासोबत वेळ घालवत असताना समर्थकांच्या परदेशवारीची मात्र जोरात चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावितांनी घेतला आढावाम टा वृत्तसेवा, कळवणदिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत माकपकडून उमेदवारी करणारे आ

0
0

कळवण : दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत माकपकडून उमेदवारी करणारे आमदार जे. पी. गावित यांनी दिवसभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आकडेमोड केली. कोणत्या तालुक्यात आघाडी मिळेल, कुठे कमी पडू यावर बूथनिहाय आढावा घेत सर्वांचे मत जाणून घेण्यातच आमदार गावित यांचा दिवस खर्ची पडला. अलंगुण या त्यांच्या मूळ गावी घरीच ही आढावा बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत माकपच्या माध्यमातून यापुढे इगतपुरी, दिंडोरी, पेठ, चांदवड-देवळा, कळवण-सुरगाणा या चार ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार देण्यावर एकमत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट फूडने भागवली भूक

0
0

फास्ट फूडने भागवली भूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सकाळी सव्वा नऊची वेळ... ऊन मी म्हणायला लागलेले... अशात मतदारांच्या पावत्या काढून देणारे कार्यकर्ते मुख्य रस्त्याकडे सारखे कुणाची तरी वाट पहात असल्यासारखे करीत असतात, तितक्यात एक रिक्षा येते आणि पावाच्या लाद्या, बटाटवड्यांचे कॅरेट उतरवले जाते आणि मग काय विचारता, कार्यकर्ते त्यावर तुटून पडतात. हा खाऊ मागवलेला असतो लोकप्रतिनिधींनी. पार्सल येईल तेव्हा येईल; परंतु सकाळी सकाळी पोटात भर असली म्हणजे कामाला जोर येईल, अशी काळजी करून लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांची ही काळजी घेतली.

पोलिंग बुथजवळचे, मतदार यादीत नाव शोधून देणाऱ्यांचे तसेच ड्युटीला उभ्या असलेल्या पोलिसांचे त्यामुळे फावले. लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सातला सुरुवात झाली. महिना, दीड महिन्यापासून नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सोमवारचा दिवस पर्वणीचाच होता; मात्र सकाळपासून उभ्या असलेल्या या कार्यकर्त्यांना नऊ-साडेनऊ वाजेच्या दरम्यान मात्र भुकेमुळे पोटात कावळे कोकायला लागले. काहीतरी भर पाडायला हवी म्हणून दादा-भाऊंना फोन करून झाले. लगेचच खाण्याची व्यवस्था म्हणून गरमागरम पाववडे, वडापाव, सामोसे, कचोरी, खमंग ढोकळे हजर झाल्याने कार्यकर्ते त्याच्यावर तुटूनच पडले. काही उमेदवारांनी मात्र हुशारी दाखवत घरीच आचारी बोलावून भाजी पुरीचे पॅकेट तयार करून ते वाटण्यास प्राधान्य दिले. बिसलेरी अन् नाश्ता कम जेवण असे कॅरेट रिक्षातून नेत कार्यकर्त्यांच्या पोटपुजेची काळजी घेण्यात लोकप्रतिनिधींनी कोणतीही कसूर ठेवली नाही.

चिमुरड्यांची तारांबळ

मतदार यादीतून नावे शोधून देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात भरणा असल्याने त्यांनी घरातील चिल्लीपिल्ली गोळा करून आणलेली होती. तेथेच 'मम्मी...काहीतरी खायला दे ना' म्हणून टाहो फोडणारी ही चिमुरडी उपमा, भाजीपुरी आल्यानंतर मात्र 'खाओ जी भरके' ची भूमिका घेत होती.

उपवासवाल्यांचीही तृप्ती

मतदानाच्या सोमवार असल्याने अनेकांना उपवासाचे पदार्थही मागविण्यात आले होते. राजगिऱ्याचे लाडू, खिचडी, साबुदाणा वडा, वेफर्स यांचीही कुमक मागविण्यात आल्याने व वाटण्यात आल्याने उपवास नसणारे व असणारे त्यावर ताव मारताना दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

0
0

नाशिक : गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथील ३३ के. व्ही. ओव्हरहेड लाइनची महावितरणकडून येत्या शनिवारी (दि. ४) अत्यावश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे या ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून पंपिंग होणार नाही. त्यामुळे शनिवार (दि. ४) संपूर्ण शहरात सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (दि. ५) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिताभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

0
0

संशयितांकडून प्रचार साहित्यांसह २ लाखाचा माल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २९) शहरात मतदान पार पडत असतानाच आचारसंहिताभंगाचेही गुन्हे काही ठिकाणी दाखल झाले आहेत. मतदान केंद्रांच्या आवारात प्रचार करणे, प्रचाराचे साहित्य मतदानाच्या दिवशी जवळ बाळगणे अशा प्रकारांसह कारवाई करण्यात आलेल्या संशयितांकडून रोख रक्कम व साहित्य मिळून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यात एका तरुणाला पोलिसांनी अटकही केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदान शहरात शांततेत पार पडले असले तरीही पोलिसांनी काही ठिकाणी केलेल्या कारवाईत आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळून आले आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील खंडेराव टेकडीनजिक एका गेस्ट हाऊसजवळ एका संशयित कार्यकर्त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. देवळाली कॅम्प पोलिसात दाखल फिर्यादीनुसार भिमा पोपट आहेर (रा. चारणवाडी, शिंगवे बहुला) हा तरुण प्रचार बंद झाल्यानंतरही प्रचाराचे साहित्य व पैशांसह पोलिसांना आढळून आला. निवडणुकीच्या कारणाने तो पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पेट्रोलिंगवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळून राष्ट्रवादी काँग्रेसची मार्गदर्शक पुस्तिका, टाटा इंडिगो कंपनीची गाडी, ३ हजार रुपयांच्या नोटा, कागदावर आढळेला संशयास्पद मजकूर, पक्षाचे प्रचारसाहित्य असा सुमारे २ लाख ५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून आहेर याच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bमखमलाबादलाही तक्रार

\Bमखमलाबाद गावातील छत्रपती शिवाजी विद्यालय परिसरातून सोमवारी पोलिसांनी अनिकेत धुमणे (रा. मखमलाबाद) या तरुणाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. येथील मतदानकेंद्राच्या परिसरात १०० मीटर अंतराच्या आत आखण्यात आलेल्या रेषेच्या आत अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे आणि व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ट्रॅक्टरच्या छापील चिठ्ठ्या बाळगून मतदानास जाणाऱ्या नागरिकांना या चिठ्ठ्यांच्या सहाय्याने प्रचार करताना हा तरुण पोलिसांना दिसला. यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

\Bपखालरोडला गुन्हा \B

पखालरोडवरील सावित्रीबाई फुले विद्यालयातील केंद्रापासून २०० मीटर आवाराच्या आत राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळ्याच्या चिठ्ठ्या जवळ बाळगून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून गुलजार कोकणी, अल्ताफ पठाण आणि नवीद पटेल या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र बाळगल्याने तीन जणांना अटक

0
0

नाशिक : मतदानाच्या दिवशी तीन तरुणांच्या जवळ पोलिसांना शस्त्र आढळून आल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिरावाडी परिसरात ही घटना घडली.

पंचवटीतील हिरावाडी परिसरात बाप्पा सिताराम चौकात ही घटना घडली. या प्रकरणी सचिन शशिकांत जोशी (रा. रासबिहारी रोड, पंचवटी), चेतन रवींद्र इंगोले (रा. तारवाला नगर, पंचवटी) आणि रुपेश मुन्नीलाल झा (त्रिमूर्तीनगर, हिरावाडी) या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. मतदानाच्या दिवशी हिरावाडीतील बाप्पा सिताराम चौकात दुपारी १ वाजेच्या सुमारास या तरुणांजवळ पोलिसांना चॉपर आढळून आले. शस्त्रबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदारांना मदत व्हावी यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या हेल्पलाइनला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सोमवारी म्हणजेच मतदानाचे दिवशी या हेल्पलाइन क्रमांकावर सुमारे ६५० नागरिकांनी संपर्क साधून आपल्या तक्रारींचे निरसन करवून घेतले.

मतदार यादीत नाव न सापडणे, यादीमध्ये नाव, पत्ता चुकीचा नोंदविलेला असणे यासारख्या तक्रारी प्रत्येक निवडणुकांच्यावेळी नागरिकांना भेडसावत असतात. अशा तक्रारी कोणाकडे मांडाव्यात, या तक्रारींचे निरसन कोण करेल याची चिंता देखील नागरिकांना सतावत असते. या तक्रारींवर नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळावीत, याकरीता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच १९५० ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली होती. अगदी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी काय करावे या प्रश्नासह विविध शंकांचे निरसन करवून घेण्याकरीता नागरिकांनी १९५० या हेल्पलाइनची मदत घेतली. यामुळे अनेक मतदारांना आपली नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करवून घेण्यासाठी, मतदार यादीमधील आपले नाव, पत्ता, वय यांमध्ये असलेल्या दुरुस्त्या करवून घेणे शक्य झाले.

मतदानाचे दिवशी देखील सकाळी सहा ते रात्री आठ या १४ तासांच्या कालावधीत या हेल्पलाइननवर तब्बल ६४० फोन कॉल्स आले. यामध्ये ३०९ फोन कॉल्स हे मतदार यादीतील नाव शोधून द्यावे अशी मागणी करणारे होते. तर १८० फोन कॉल्सद्वारे मतदार यादीतून नावे गहाळ असण्याची तक्रार करण्यात आली. स्मार्ट मतदार कार्ड मिळावे अशी मागणी ६५ जणांनी केली. तर नाव ट्रान्सफर करावयाचे आहे अशी मागणी २२ मतदारांकडून करण्यात आली. पत्ता बदलासंदर्भात २० जणांनी विचारणा केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यादीमध्ये नाव चुकल्याची तक्रार १५ जणांनी केली असून या चुका दुरुस्त व्हायला हव्यात, अशा अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय फोटो बदल, नाव बदल, मतदार ओळखपत्र हरविल्याबाबत चौकशी करणारे काही कॉल्स या क्रमांकावर आले. नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक शाखेत नेमण्यात आले होते. त्यांनी मतदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

..

कॉल्सचा लेखाजोखा

मतदार यादीत नाव शोधणे ......... ३०९

यादीतून नावे गहाळ .... १८०

स्मार्ट मतदार कार्ड मागणी ......... ६५

नाव ट्रान्सफर करणे ........ २२

पत्ता बदलासंदर्भात ........ २०

यादीत नाव चुकणे ......... १५

अन्य तक्रारी ............. २९

एकूण तक्रारी ....... ६४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाच्या प्रयत्नांना सजग नाशिककरांचा प्रतिसाद

0
0

देशात आणि राज्यात मागील टप्प्यांतील विविध मतदारसंघांतील अत्यल्प मतदानाचा अनुभव पाहता नाशिकमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये याबद्दल आम्ही चिंतेत होतो. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. जागरुक नाशिककरांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. यामुळे झालेले मतदान निश्चितच समाधानकारक आहे.

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढलाय?

- राज्यातील बहुतांश शहरीवस्तीच्या काही मतदारसंघांत अत्यल्प प्रमाणात मतदान वाढले. परंतु, अनेक ठिकाणी घटही झाली. तुलनेने आपल्याकडे झालेली वाढ उत्साहवर्धक आहे. २०१४ मध्ये ९ लाख ३५ हजार ६६ मतदारांनी मतदान केले होते. यंदा ११ लाख १८ हजार ५१६ मतदारांनी मतदान केले आहे. म्हणजेच १ लाख ८३ हजार ५१० अधिक मतदारांनी मतदान केले आहे. ही निश्चितच लक्षणीय वाढ आहे.

यंत्रणा अहोरात्र राबली काय सांगाल?

- निवडणुकीचे कामकाज हे शिवधनुष्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ४५ लाख मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे आव्हानात्मक असते. यासाठी कर्मचारी, अधिकारी कित्येक महिने अहोरात्र काम करीत असतात. निवडणुकीच्या सर्व बाबी कालबद्ध असल्याने त्यामध्ये कालमर्यादा तोडणे शक्यच नसते. त्यासाठी प्रसंगी तहानभूक विसरून सर्वांनी काम केले.

दिंडोरीत मतटक्का वाढला, कारण काय?

- शहरी व ग्रामीण भागात मतदारांचा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. शहरी मतदारांची दिनचर्या, त्यांना उपलब्ध सुविधा यावर राजकीय बाबींचा फारसा पगडा नसतो. उलटपक्षी ग्रामीण भागात बहुतांश मुद्दे हे लोकप्रतिनिधींशी संबंधित असल्याने मतदानासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येतो.

दिव्यांग, तृतियपंथी, ज्येष्ठांसह तरुणांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?

- निवडणूक आयोगाने यावर्षी मुळात निवडणूक प्रक्रियेची सुरुवातच 'नो वोटर दू बी लेफ्ट बीहाईंड' अशा टॅग लाईनने केली. कोणताही मतदार निवडणूक प्रक्रियेतून दूर राहणार नाही अशा पद्धतीने सर्व घटकांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याला सर्व घटकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

'वोट फॉर नाशिककर' मोहिमेचा फायदा झाला?

- या मोहिमेचा निश्चितच फायदा झाला. ही मोहीम नाशिककरांनी नाशिककरांसाठी चालवली. त्यामुळे अतिशय कमी काळातही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य झाले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या तंतोतंत पालनास यंदा प्राधान्य राहिले, त्याबद्दल सांगा.

- निवडणूक आयोगाने निर्देश पालनासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या राज्ये व जिल्ह्यांमध्ये जारी केलेल्या चेक लिस्टचा आधार घेतला. त्यामध्ये नमूद कोणतीही बाब आपल्या जिल्ह्यात कार्यवाहीतून सुटणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे तांत्रिक चूक न होता अतिशय पारदर्शी व तणावरहित वातावरणात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.

ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत काय सांगाल?

- सद्यस्थितीत ईव्हीएमसाठीच्या मापदंडानुसार अंबड केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामांमध्ये सुरक्षा कक्ष स्थापित केला आहे. त्याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. एक राजपत्रित अधिकारी कायमस्वरूपी त्याठिकाणी नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त असेल. सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण परिसर व सुरक्षेचीही निगराणी केली जाईल.

अनेक मतदारांची नावे यादीत नव्हती?

- मतदारयादीमधील चुका दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर कायमच असते. लोकांचा रहिवास तसेच अन्य तपशिलांमध्ये वारंवार बदल होत असतात. ते मतदारयादीपर्यंत पोहोचण्यामध्ये नागरिकांनीही दक्षता घेतली पाहिजे. यासाठी आगामी दोन-तीन महिन्यात मोहिमा राबवून यादी अधिकाधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न राहील.

प्रशासन कुठे कमी पडले?

- आपले नाव कोणत्या मतदान केंद्राशी संलग्न आहे हे प्रत्येक मतदाराला त्याच्या मोबाइलद्वारेही समजू शकते. मतदानासाठी सोयीची वेळ कोणती, याबद्दल मतदारांना पूर्वसूचना मिळणे, मतकेंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. या बाबींवर थोडे अधिक काम यापुढे आम्हाला करावे लागेल.

अहोरात्र राबणाऱ्या यंत्रणेला कौतुकाची थाप देणार का?

- निश्चितच! कारण अन्य देशांत मतदान प्रक्रिया कित्येक दिवस सुरू राहतात. परंतु आपल्याकडे मात्र मानवी शारीरिक मर्यादांची तमा न करता ही यंत्रणा विलक्षण कार्यक्षमतेने ही जटील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करते. ती पूर्ण करताना कामाचा ताण यापेक्षा कार्यपूर्ततेचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असते. हा लोकशाहीचा महात्योहार रात्रंदिवस कार्य करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे याबद्दल शंका नाही.

नागरिकांना काय आवाहन कराल?

नागरिकांनी सर्वप्रथम आपल्या मतदार यादीतील नोंदीबाबत अत्यंत जागरुक राहावे. मतदानाच्या दिवशी सकाळी अनेक लोक यादी या विषयाबद्दल जागे होतात, हे योग्य नाही. आपले नाव मतदारयादीत नसेल अथवा तपशील बदलला असेल तर त्याबद्दल संबंधित कार्यालयाशी संपर्क करून तो अद्ययावत करून घ्यावा. मतदार यादीत नाव योग्य प्रकारे आले तर मतदानासाठी आपल्याला कोणीही वंचित करू शकत नाही.

..

संकलन : प्रवीण बिडवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्रच्या वतीने क्रीडा प्रशिक्षण वर्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान वयातच मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्यांच्यासाठी पुढे विशेष क्रीडा प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी मविप्र संस्थेतर्फे २ मे ते २ जून या कालावधीत मविप्र संस्थेच्या विविध शाखांच्या मैदानावर क्रीडा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात अॅथलेटिक्स, आर्चरी, बास्केटबॉल, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, रोईंग, कॅनोईंग, कयाकिंग, वेटलिफ्टिंग आदी खेळांचा समावेश आहे. मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालय, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद, क. का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव, सटाणा महाविद्यालय, सायखेडा महाविद्यालय, गिरणारे ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १० ते १७ वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी असणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी त्या त्या खेळातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण वर्ग सकाळी ७.३० ते ९.३० या वेळात घेतले जातील. प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुले असून, प्रशिक्षण वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यातील महाविद्यालयात संपर्क करावा तसेच, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर, चांदवडला आज महाश्रमदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर/चांदवड

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप २०१९ स्पर्धेत सहभागी असलेल्या चांदवड आणि सिन्नर तालुक्यांतील गावांमध्ये आज, १ मे राजी महाश्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे.

सिन्नर तालुक्यातील धोंडबार व वडझिरे या गावात तर चांदवड तालुक्यातील निमोन व भूत्याने येथे हे श्रमदान शिबिर होणार आहे. सिन्नर तालुक्यात पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेते अमिर खान येणार असल्याची शक्यता आहे. त्याबरोबर अन्य कलाकार श्रमदानासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही गावांमध्ये दहा हजार स्वयंसेवकांनी जलमित्र म्हणून नोंद केली आहे. बुधवारी सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ७ यावेळेत महाश्रमदान करण्यात येणार आहे. नाशिकसह लगतच्या जिल्ह्यातील व तालुक्यांतील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरी भागातील जलमित्र, विविध संस्थां व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य यांच्या श्रमांतून गाव पाणीदार बनवण्याचा हा प्रयत्न व्यापक व्हावा यासाठी पाणी फाउंडेशन पुढाकार घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, नांदगाव तालुक्यातील साकोरे आणि दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामुळे जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २९ झाली आहे.

दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त होणारे शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. साकोरे येथील शेतकरी दत्तू एकनाथ बोरसे यांनी परिसरातील लाइनीचा मळा येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या नावे शेती असून, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तलाठ्याने व्यक्त केला आहे. दुसरी घटना दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे घडली. येथील प्रकाश निवृत्ती बस्ते (वय ५२) यांनी २७ एप्रिल रोजी रात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या नावे शिंदवड येथे एक हेक्टर ७६ आर एवढे सामाईक क्षेत्र आहे. याबाबतची माहिती तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तांना रोखण्यात पोलिसांचे श्रम खर्ची

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील क्रिटीकल केंद्रांसह विविध मतदान केंद्रांवर सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. याबद्दल पोलिसांना तमाम नाशिककरांनी धन्यवादच द्यायला हवेत. सुदैवाने कोठेही अनुचित घटना घडली नसली तरी सिडकोत काही मतदान केंद्रांवर सुरक्षेचे नियोजन फसल्याचे चित्र होते. नागरिकांचे बेशिस्त वर्तन रोखण्यातच पोलिसांना आपले श्रम खर्च करावे लागले.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी नेहमीच केले हे वास्तव आहे. गणेशोत्सव, नवरोत्रोत्सव असो कोणताही सण, उत्सव असो अथवा अनुचित घटना प्रत्येक ठिकाणी पोलिस खडा पहारा देतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहाते. लोकसभा निवडणुका हा तर लोकशाहीचा उत्सव. त्यामुळे या निवडणुका शांततामय वातावरण निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. त्यांनी ती सुरळीत पार देखील पाडली. त्यामुळेच निवडणूक काळात शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही कोठे अनुचित प्रकार घडले नाहीत. परंतु, नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील सिडको या दाट लोकवस्तीच्या परिसरात मात्र बंदोबस्तात काहीशी शिथिलता असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या परिसरात वाहन आणण्यास मज्जाव करण्यात आला. १०० मीटरचा परिसर नेमका लक्षात यावा, यासाठी रस्त्यांवर पांढऱ्या पावडरने पट्टेही ओढण्यात आले. परंतु, तरीही बेशिस्त नागरिक मतदान केंद्राच्या आवारापर्यंत वाहने घेऊन येत असल्याचे चित्र उत्तमनगर येथील जनता विद्यालय, लेखानगर परिसरातील ग्रामोदय विद्यालय परिसरात पहावयास मिळाले. या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था न केल्याने वाहने सर्रास मतदान स्थळांच्या आवारात आणली जात होती. या वाहनधारकांना रोखण्यातच पोलिसांची अर्धी शक्ती खर्ची पडल्याचे दिसून आले.

बॅरिकेड्सची उणीव

वाहनचालकांना मज्जाव करण्यासाठी बॅरिकेड्स बसविणे आवश्यक होते, अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये होती. रायगड चौक येथील विद्यानिकेतन विद्यालय हे क्रिटिकल मतदान केंद्र आहे. येथेही नागरिक सर्रास मोबाइल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांना अशा वर्तवणुकीपासून मज्जाव करण्याची तसदीही पोलिस कर्मचारी घेत नसल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images