Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विवाहितेची आत्महत्त्या; पतीला अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माहेरहून २० हजार रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकरोड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षांच्या विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर पती विनोद नुनसे यास अटक पोलिसांनी अटक केली.

नंदा विनोद नुनसे (रा. जलशुद्धिकरण केंद्राजवळ, त्र्यंबकरोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नंदा यांनी गुरुवारी (ता.२५) मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. पहाटे सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असता अशोक बन्सी फुलमाळी (रा. घोटी, इगतपुरी) यांनी सासरच्या व्यक्तींविरूद्ध तक्रार केली. फुलमाळी यांची बहीण नंदा हिला पती व सासरच्यांकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे फुलमाळी यांनी सांगितले. घरखर्चासाठी माहेराहून २० हजार रुपये घेऊन यावेत यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्त्या केल्याची फुलमाळी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती विनोद यास अटक केली. या गुन्ह्यात संशयित सासू देवीबाई रोहिदास नुनसे, नरेश रोहिदास नुनसे, शारदा नरेश नुनसे (सर्व रा. सिब्बल हॉटेलमागे, जलशुदधीकरण केंद्र, त्र्यंबकरोड) यांची देखील नावे असून, गुन्ह्याचा पुढील तपास गंगापूर पोलिस करीत आहेत.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येक मुद्द्यावर सरकार अपयशी

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीत विकासालाच गायब केले आहे. प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी ठरले असून, संरक्षण राज्यमंत्री असलेल्या डॉ. सुभाष भामरेंनी धुळ्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. धुळे शहरात शुक्रवारी (दि. २६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रातील सरकार आणि धुळ्यात डॉ. सुभाष भामरेंचा पराभव निश्चित आहे. तर काँग्रेसचे कुणाल पाटील हे मताधिक्क्याने निवडून येतील, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

माजी मुख्यमंत्री चव्हाण हे शुक्रवारी (दि. २६) धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी दुपारी काँग्रसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गेल्यावेळी २०१४ च्या निवडणूकीत गुजरात मॉडेल, विकास या मुद्द्यांवरच मोदी बोलत होते. मात्र, या वेळी त्यांनी बोलण्याची पद्धत बदलली आहे. युपीए सरकारच्या काळात भ्रष्ट्राचार झाला होता तर कोणतेही प्रकरण तडीस का नेले नाही, इसा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. केवळ सीबीआयचे छापे टाकण्यात आले मात्र, पुढे काहीही कारवाई केली नाही याविषयी मोदी बोलायला तयार नाहीत. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, पुलवामा हल्ला हे मुद्दे आता निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढे केल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पुलवामा प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. भामरेंकडून खोटी माहिती
या वेळी चव्हाण यांनी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरें यांच्यावर आरोप केले. राफेल करारासाठी एप्रिल २०१५ मध्ये मोदी फ्रान्सला गेले हाते. १२६ लढाऊ विमान लागत असताना केवळ ३६ विमाने घेण्यात आली. तसेच जुनी निविदा ५२७ कोटींची होती. मात्र, ही रक्कम वाढवत जावून ती १६७० कोटींवर नेऊन मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. डॉ. भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्री म्हणून संसदेत राफेलची किंमत शस्त्रासह ६३० कोटी सांगितली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मात्र राफेलची किंमत १६७० कोटी सांगत होते. त्यामुळे डॉ. भामरे खोटे बोलत आहेत की, मंत्री पर्रीकर असा प्रश्न चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात विकासगंगा आणणार

$
0
0

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

चार महिन्यांतच धुळे महापालिकेना तब्बल चारशे कोटींचा निधी मिळवून दिला असून, शहराचा कायापालट सुरू झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आता डॉ. सुभाष भामरेंना पुन्हा केंद्रात पाठवून धुळे लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील प्रचार सभेत दिले.

धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (दि. २६) शहरातील पांझरा नदीकिनारी सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनविकासमंत्री जयकुमार रावल, सुरतच्या आमदार संगीता पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, संजय शर्मा, हिरामण गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, अरविंद्र जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले की, भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत असून, ,भाजपची ताकद मोठी आहे. महापालिकेत जनतेने एकहाती सत्ता भाजपाकडे दिली असून, आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ. भामरेंना पुन्हा संधी द्या म्हणजे ते रुग्णांचा इलाज करताना मतदारसंघातील दुष्काळ व बेरोजगारावरदेखील योग्य इलाज करतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘त्या’ बॉक्समध्ये केवळ सामान
केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हे लोकसभा प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी धुळे येथील गोंदूर विमानतळावर विमानाने दाखल झाले होते. मंत्री प्रभू यांचा लोकसभा निवडणूकीच्या प्रचार व सभानिमित्त दोन दिवसांचा मुक्काम असल्याने त्यांच्यासोबत दोन बॅग व एका पांढऱ्या रंगाचा मोठा खोका होता. याच दरम्यान मंत्री प्रभू यांचा सामान ठेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, यात पंधरा कोटी रुपये नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांनीही याबाबत खुलासा करीत सांगितले की, त्या खोक्यात सामान असून, रुपये नाहीत. पोलिसांत तक्रार गेल्यानंतर तपासणीअंतीदेखील यात रुपये सापडले नाहीत, असेही गवळी म्हणाले.

‘डॉ. भामरेंमुळेच नऊ हजार केाटींचा निधी’
धुळे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी खूप चांगले काम केले आहे. खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे रखडलेला मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. त्यांच्यामुळेच ९००० कोटी रुपयांचा निधीची या रेल्वेमार्गासाठी तरतूद करण्यात आली, असा दावा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. २५) सायंकाळी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी प्रभू बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे, नंदुरबारसाठी प्रचार आज थांबणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी सोमवारी (दि. २९) मतदान होणार आहे. त्यासाठी आज (दि. २७) सायंकाळी ५ वाजता मिरवणूक, सभा आणि प्रचाराच्या थोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांचे अनेक दिग्गजांच्या सभा व प्रचार फेऱ्यांना वेग आला असून, शनिवारी सायंकाळनंतर सर्व निवडणुकीचे वातावरण शांत होईल.

धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघापैकी, धुळ्यातून २८ तर नंदुरबारमधून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, अॅड. प्रकाश आंबेडकर, महिला व बालकल्याण मंत्री विजया रहाटकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सभा झाल्या. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही मतदारसंघातील सर्व गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेत आपला प्रचार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी अनोखे मेसेज व्हायरल

$
0
0

नाशिक :

मतदान जनजागृतीसाठी नेटिझन्सनी पुढाकार घेतला असून, मेसेजद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विनोदी मेसेजसह प्रबोधनपर मेसेजच्या पोस्ट त्यासाठी व्हायरल केल्या जात आहे.

सोशल मीडियावर करण्यात येणारे मतदानाचे आवाहन नेटिझन्समध्ये चर्चेचा मुद्दा ठरत आहे. या मेसेजेसमध्ये 'तुम्ही कितीही मोठ्या इंग्रजी शाळेत शिका, मतदान करायला शेवटी मराठी शाळेतच जावं लागतं', 'लग्न झालेल्या माझ्या सर्व मित्रांनो, तुमच्या मताला घरात किंमत नसली तरी देशाला आहे. कृपया मतदान करा', असे काही विनोदी मेसेज व्हायरल केले जात आहेत. प्रबोधनपर मेसेजमधूनही आवाहन केले जात आहे. 'तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस, तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील- स्वामी विवेकानंद. निस्वार्थी पणे मतदान करा, देशाला बलवान करा', असे मेसेज व्हायरल करत मतदानासाठी नेटिझन्सला तयार केले जात आहे. नेटिझन्सनी वापरलेला हा फंडा मतदानाच्या टक्केवारीवर नककी निर्णायक ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
69066251

69066252

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीमुळे राज ठाकरेंचं दुकान बंद: मुख्यमंत्री

$
0
0

नाशिक:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंजिन भाड्याने घेतलं आहे. पण शरद पवार साहेबांना हे माहित नाही की तोंडाच्या वाफेनं इंजिन चालू शकत नाही. तोंडाच्या वाफेनं हे इंजिन चाललं असतं तर ते आतापर्यंत दिल्लीला गेलं असतं. पण हे इंजिन गल्लीतच राहिलं. कारण नोटाबंदीमुळे राज ठाकरेंचं दुकान बंद झालं आहे, म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. राष्ट्रवादीचीही आता अशीच अवस्था होणार आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील सभेत केली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. नाशिकच्या या सभेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा रोख थेट राज ठाकरेंवर होता, शिवाय शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, 'भुजबळांनी भ्रष्टाचार केला, तिजोऱ्या लुटल्या म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर लवकरच खटला सुरू होणार आहे. न्यायदेवताच त्यांच्या पापांचा फैसला करणार.'

बालाकोट मध्ये सैनिकांनी केलेल्या कारवाई बद्दल राज ठाकरे यांची टीका म्हणजे सैनिकांवर संशय घेण्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. देशद्रोह्यांना चाप बसवणारं १२४अ हे कलम रद्द करायची भाषा काँग्रेस करत आहे. देश वाचवण्यासाठी मोदींना बळ द्या असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

'नाशिकला इलेक्ट्रीक बसेस, हायब्रीड मेट्रो अशी विविध प्रकारे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम आणण्यासाठी आम्ही डीपीआर तयार केला आहे. या वेगळ्या पद्धतीच्या वाहतूक व्यवस्थेद्वारे नाशिकला आधुनिक शहर बनवणार,' असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळांना मत द्या, सेना नेत्यांच्या नावे मेसेज

$
0
0

नाशिक

नाशिक लोकसभा मतदार संघातील प्रचार तोफा थंडवल्यानंतर आता निवडणुक जिंकण्यासाठी क्रिमीनल माइंड गेम सुरू झाला आहे. नाशिक मधील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना विजयी करा असे आवाहन शिवसेना भाजप आमदार आणि नेत्यांच्या नेत्यांच्या नावे बल्क मेसेजद्वारे केले जात असल्याने खळबळ उडाली आहे.शिवसेनेने या प्रकरणी गंभीर दखल घेत,शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी या प्रकरणी पोलिसात तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रचार शनिवारी सायंकाळी संपला.नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे,राष्ट्रवादीचे समीर भुजबळ,अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यात चौरंगी लढत आहे.सायंकाळी प्रचार संपल्यानंतर अचानक एका बी डब्लू नाशिक या नावाने नागरिकांना बल्क मॅसेज पाठविण्यात आले.त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या नावाने सुरू झालेत.त्यामुळे एकच खळबळ उडाली.निवडणुक आयोगाची परवानगी न घेताच,परस्पर हे अफवा पसरवणारे मॅसेज पाठविण्यात आले.शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नावाऐवजी राष्ट्रवादी उमेदवारांच्या नावाने मॅसेज पाठवले जात असल्याने खळबळ उडाली आहे.कोणीतरी क्रिमिनल माईड वापरून हे कृत्य करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या वतीने निवडणूक आयोग तसेच पोलिसां कडे तक्रार करण्यात आली आहे.शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे, भाजप आमदार सीमा हिरे.शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी तक्रारी केल्या असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान राष्ट्रवादीकडूनच हा खोडसाळ पणा केला जात असल्याचा संशय शिवसेनेला असून यामुळे दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत गायीचा मुत्यू म्हैस ८० टक्के भाजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्यातील दरसवाडी (हिरापूर) शिवारातील लामखडे वस्तीवरील नागू लामखडे यांच्या शेतात गोठ्याला दुपारी १२ वाजेच्या सुमारास लागल्याने आगीत गायीचा होरपळून मृत्यू झाला तर म्हैस भाजली.

नागू लामखडे यांच्या शेतातील गट नंबर १८९ मधील गोठ्यात एक गाय आणि एक म्हैसा बांधण्यात आलेली होती. दुपारी अचानक आग लागल्याने ७० ते ८० हजार किमतीच्या गायीचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर शेजारीच बांधलेल्या एक लाख रुपये किमतीची म्हैस सुमारे ८० टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी शरद लामखडे, सचिन जाधव, अमोल लामखडे, भाऊसाहेब लामखडे, समाधान लामखडे, संदीप कांगुणे, अरुण कांगुणे आदींनी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच तलाठी एस. पी. नेवल यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोटेगावकर, डॉ. राजेश गावरे यांनी घटनास्थळी गायीचे शवविच्छेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्य दुकानांचे ‘शटर डाऊन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर देशी दारू विक्रीमध्ये १३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मद्यपींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. हाच धसका घेत निवडणूक निरीक्षकांनी (सामान्य) याबाबत पोलिसांना कळविले असून, पोलिसांनी ढाबे, हॉटेल्स अनाधिकृत मद्यविक्री याकडे मोर्चा वळविला आहे.

लोकसभा निवडणूक मतदानकाळात दारूबंदी विशेषक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाचा कल असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २७) संध्याकाळी पाच वाजेपासून मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहे. २९ तारखेच्या रात्री १० वाजेपर्यंत ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत. या 'ड्राय डे'चा फटका बसू नये यासाठी मागील दोन दिवसांत मद्यपींनी घाऊक स्वरूपात मद्य खरेदी केले. मागील वर्ष आणि यंदाची तुलना करता मागील दोन दिवसात देशी मद्याच्या विक्रीत तब्बल १३० टक्के वाढ झाली आहे. या अहवालाच्या आधारे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी २७ ते २९ एप्रिल हे तीन दिवस रात्री दहा नंतर देशी, विदेशी मद्यविक्रीसह हॉटेल, ढाबा आणि रेस्टॉरंट बंद ठेवावेत, असा मनाईहुकूम आदेश जारी केला आहे. पुढील दोन दिवस याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पैसे वाटपाकडे लक्ष

मतदानाच्या आदल्यादिवशी तसेच मतदानाच्या दिवशी काही भागात पैसे वाटप होतात. हा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून स्टिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. साध्या वेषातील पोलिसांची नियुक्ती यासाठी करण्यात येणार असून, नागरिकांनी याबाबत तक्रारी करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

--

पोलिस नियंत्रण कक्ष सज्ज

प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदानापूर्वीच्या ४८ तासात मतदारसंघाबाहेरील व्यक्ती मतदार संघात येणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे. शहरात १२ चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.

पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक

०२५३-२३०५२३३/३४ वा १००

व्हॉटसअॅप क्रमांक

८३९०२०९५१८

--

भद्रकाली पोलिस प्रथम

पोलिस ठाण्यांमधील कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक स्पर्धा सुरू केली आहे. त्यात वेगवेगळ्या मुद्यांवर पोलिस ठाण्यांना गुण देण्यात येत आहे. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पहिल्या तीन पोलिस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. आज प्रथमच झालेल्या कार्यक्रमात पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यानंतर, द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या पंचवटी व तृतीय स्थानावरील नाशिकरोड पोलिसांचा गौरव यावेळी करण्यात आला.

पोलिसांना खास गॉगल्स

रस्त्यावर थांबून वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना उन्हाळ्यात डोळ्यांच्या विकारांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर एका संस्थेने पुढाकार घेऊन वाहतूक पोलिसांसाठी खास सन गॉगल्स उपलब्ध करून दिले. या गॉगल्सचे प्रतिनिधीक स्वरूपात आज वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. महंमद इक्बाल,मानवतावादी शायर

$
0
0

(निमित्त लोगो)

डॉ. महंमद इक्बाल,

मानवतावादी शायर

---

???लेखक नाव

---

प्रसिद्ध उर्दू शायक डॉ. महमंद इक्बाल यांचा संदेश सर्वदूर पोहचवण्याच्या उद्देशाने येत्या १ मे रोजी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा दालनात 'नया शिवाला' कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानिमित्ताने...

डॉ. महंमद इक्बाल हे उर्दू भाषेतील एकमेव असे मोठे शायर आहेत, ज्यांच्याबद्दल पुष्कळ गैरसमज आढळतात. सर्वात प्रथम म्हणजे ते फक्त मुसलमानांचे शायर आहेत, दुसरे म्हणजे पाकिस्तान निमिर्तीची कल्पना सर्वप्रथम त्यांनीच मांडली व ते पाकिस्तानचे संस्थापक शायर आहेत. तिसरे हे की ते तर पाकिस्तानचे शायर आहेत, हिंदुस्थानचे नव्हे. खरेतर आमचा शेजारी देश उर्दू हीच आपली भाषा मानतो. परंतु, तिचा जन्म तर भारतातच झाला. इथेच तिचे संवर्धन झाले, ती वाढली, उन्मत झाली. उर्दू भाषेचा इतिहास तर शेकडो वर्षे जुना आहे. पाकिस्तानचा जन्म तर केवळ ७२ वर्षांपूर्वीचा आहे.

डॉ. इक्बाल (१८७७-१९३८) निश्चितच भारतातील मुसलमानांना जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. हिंदूंना विरोध करण्यासाठी नाही, तर त्यांच्याशी प्रेमभाव, मित्रता आणि बंधुता वृद्धींगत व्हावी या हेतूने. ते एक मानवतावादी शायर होते. त्यांच्या पाश्चात्य संस्कृतीविरोधात शेकडो कविता होत्या. परंतु, हिंदू विरोधी एकही नव्हती. उलट त्यांनी श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान, गुरू रामतीर्थ यांचे जीवन आणि गुरू नानक यांच्या उपदेशांची प्रशंसाच केली. आपल्या 'राम' नज्ममध्ये त्यांनी प्रभू रामचंद्राचा 'इमाम-ए-हिंदू' असा उल्लेख करून गौरव केला आहे. हे इक्बालच होते ज्यांनी आपल्या 'तराना-ए-हिंदी'मध्ये खालील संदेश दिला आहे.

मजहब नहीं सिखाता, आपसमे बैर रखना

हिंदी है हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा

डॉ. इक्बाल यांनी आपल्या 'आफताब' या नज्ममध्ये गायत्री मंत्राचा अनुवाद केला आहे. त्यांनी आपली कविता 'हिमाला'मध्ये हिमालयाला 'फसिले किश्वरे हिंदोस्ताँ' म्हणजे हिंदुस्तानच्या स्वगार्ची सरहद असे संबोधले आहे. त्यांची आकांक्षा होती की, जगातील प्रत्येक मानवाच्या मनामध्ये अस्मितेची भावना जागृत व्हावी आणि स्वत:च्या बाहुबळावर विश्वास संपादन करणे शिकावे. या व्यतिरिक्त इक्बालने जगभर पसरलेली अशांतता, जुलूम, अत्याचार, अन्याय आणि दारिद्र्य याविरुध्द आवाज उठविला.

उठ्ठो मेरी दुनियाके गरिबोंको जगा दो

काखे उमरा के दरो दिवार हिला दो

(काखे उमरा म्हणजे श्रीमंतांचा महाल) आणि इक्बाल जेव्हा मजूरांच्या समर्थनात उभे राहतात तेव्हा सोशलिझमचे प्रतीक (मागदर्शक) म्हणून प्रकट होतात.

जिस खेतसे देहकाँ को मयस्सर न हो रोजी

उस खेत के हर खूषा-ए-गन्दुम को जलादो

(दहकाँ म्हणजे शेतकरी तर खूषा-ए-गन्दुम म्हणजे गव्हाची फांदी.) हे काव्यवाचन केल्यानंतर कोणी शहाणा माणून इक्बाल यांना मुसलमानांचे कवी म्हणून संबोधणार नाही. त्यांचे आवाहन (निमंत्रण) विश्वव्यापी होते.

इक्बालचा जन्म अविभाजित हिंदुस्तानात ९ नोव्हेंबर १८७७ मध्ये सियालकोट येथे झाला. देहावसन २१ एप्रिल १९३८ ला लाहोर येथे झाले. त्यावेळी सियालकोट आणि लाहोर दोन्ही आपल्याच देशाचे भाग होते. १९३८ पर्यंत स्वातंत्र्यासाठी कोणी विचारही केला नव्हता किंवा कोणता उठावही झाला नव्हता. दुसऱ्या महायुध्दात सहभागी झाल्यानंतर १९४२ साली पहिल्यांदा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. तोपर्यंत तरी पाकिस्तान या शब्दाचा शोध लागला नव्हता. मग प्रश्न असा की १९३८ मध्ये मरण पावलेले अल्लामा इक्बाल पाकिस्तानचे जनक आणि पाकिस्तानी शायर कसे होऊ शकतात? 'नया शिवाला' (शिवालय) ज्याचे स्वप्न इक्बालने स्वातंत्र्याच्या ४० वर्षांपूर्वी पाहिले होते ते स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनीही अद्याप अपूर्णच आहे.

या गैरयत के पर्दे इक बार फिर उठा दे

बिछडोंको फिर मिला दे, नक्शे दुई मिटा दे

सूनी पडी है मुद्दतसे दिल की बस्ती

आ इक नया शिवाला इस देश मे बना दे

अल्लामा इक्बलची हीच खरी आणि निर्भेळ प्रतिमा जाहीर करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने १ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता 'नया शिवाला' या शीर्षकाअंतर्गत एक संगीत आणि नाट्यमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा दालनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय श्रमिक दिना दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचे लेखक व सादरकर्ते डॉ. फय्याज अहमद फैजी आहेत. वकार कादरी आणि कुमारी सेहरिष हे त्यांचे सहकारी असणार आहेत. त्यांनी मुंबईत अनेकवेळा हा कार्यक्रम सादर केला आहे. प्रसाद गोखले, मीना निकम आणि शिल्पा कामत यावेळी अल्लामा इक्बाल यांच्या नज्म आणि गजला सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश खुला असून, कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सचिव मकरंद हिंगणे तसेच कार्यकारिणीमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनी स्थापनेच्या नावाखाली साठ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गारगोटी एक्स्पोर्टची नवीन कंपनी स्थापन करून देतो, त्यात भागीदारी मिळवून देतो असे आमिष दाखवून सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र कारभारी जोंधळे (रा. रामदास स्वामीनगर, आगर टाकळी) यांनी तक्रार दिली. संशयित मनिष वाल्मीक देसले, रोहन वाल्मीक देसले व वाल्मीक देसले हे जोंधळे यांच्या परिचयाचे असून, त्यांचे घरगुती संबंध आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांपासून हे चौघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन संशयित देसले कुटुंबीयांनी जोंधळे यांच्याशी जवळीक वाढवली. घरी येणे-जाणे सुरू ठेवले. एक दिवस त्यांना विश्वासात घेऊन आपण नवीन गारगोटी एक्स्पोर्ट कंपनी स्थापन करू, त्यात तुम्ही भागीदार व्हा, तुम्हाला चांगला लाभ होईल, असे आमिष दाखवले. देसले कुटुंबीयांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर १ मे २०१६ ते २६ एप्रिल २०१९ या दरम्यान जोंधळे व त्यांच्या पत्नीच्या खात्यावरून देसले परिवाराने वेळोवेळी आरटीजीएसद्वारे सुमारे ६० लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. एवढी रक्कम दिल्यानंतरही कंपनी स्थापण्याबाबत काहीही हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे जोंधळे यांनी देसले परिवाराकडे याबाबत विचारणा केली. तसेच ६० लाख रुपये परत देण्याची मागणी केली. तथापि, देसले यांनी रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे जोंधळे यांना आपली फसवणूक झाल्याची तक्रार देसले परिवारातील सदस्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कलम ४२०, ४०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी नदीपात्राच्या स्वच्छतेला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

निसर्गसेवक युवा मंचच्या वतीने सुरू केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन महापालिकने उंटवाडी येथील नदिनी नदीपात्राची सफाई केली. ही सफाई मोहीम पुढील आठ दिवस सुरू राहणार आहे.

नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीची दुरवस्था झाली आहे. या नदीला अक्षरशः नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वारंवार याठिकाणी विविध सामाजिक संस्थांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते. मागील चार दिवसांपासून निसर्गसेवक युवा मंचच्या वतीने महापालिकेकडे या नदीच्या स्वच्छतेसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. या पाठपुराव्याची दखल घेऊन शनिवारी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक पी. डी. पाटील, संजय गांगुर्डे, दत्तात्रय जेजुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उंटवाडी येथील नदीच्या पात्राची स्वच्छता सुरू केली. ही सफाई सुरू असताना या पाण्यात अळ्या दिसून आल्या. ही मोहीम यापुढील आठ दिवस सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची ‘वॉर रूम’ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात वॉर रूम तयार करण्यात आली असून, आज, रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेपासून ती कार्यान्वित केली जाणार आहे.

मतदान प्रक्रियेचे अपडेट्स देण्याची व्यवस्था या वॉर रूममधून केली जाणार असून, निवडणूक प्रक्रियेत काही अडचणी उद्भवल्या तर त्या तात्काळ सोडविण्यासाठी अधिकारी येथे तळ ठोकणार आहेत.

पाहता पाहता नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघांसाठीची मतदानाची प्रक्रिया एक दिवसावर येऊन ठेपली आहे. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. येथे जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग, पोलिस आणि माहिती कार्यालयाचे आदींचे एकूण १५ अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. या वॉर रूममध्ये चार टीव्ही स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील निवडणुकीबाबतचे अपडेट्स येथे विविध वाहिन्यांच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. याशिवाय निवडणूक शाखेच्या यंत्रणेकडूनही सातत्याने माहिती घेऊन त्याचे अपडेट्स दिले जाणार आहेत. या वॉर रूममध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, श्रीनिवास अर्जुन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप चौधरी, तहसीलदार रचना पवार, जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन उपस्थित राहणार आहेत. सोमवारी (दि. २९) सकाळी सहा वाजेपासूनच अधिकारी या वॉर रूममध्ये उपस्थित राहणार आहेत.

--

मतदान यंत्रे आज होणार रवाना

सोमवारी राबविण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी रविवारी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांसारखी यंत्रसामग्री मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ वाजता नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील मतदान केंद्रांवर नियुक्ती असलेले कर्मचारी दादासाहेब गायकवाड सभागृह, त्र्यंबकरोडवरील पीडब्ल्यूडी कार्यालय, सिडकोतील संभाजी स्टेडियम यांसारख्या ठिकाणी येऊन मतदान यंत्रे ताब्यात घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांसाठी शिवसेना नेत्यांचे मेसेजेस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या नावांचा उल्लेख करून महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे बल्क मेसेजेस नागरिकांच्या मोबाइलवर शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. या प्रकाराने नागरिक तर बुचकळ्यात पडलेच; परंतु राजकीय वर्तुळ‌ातही ख‌ळबळ उडाली. काही मनसे नेत्यांच्या नावानेही भुजबळ यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे मेसेजेस पाठविण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी निवडणूक अधिकारी, तसेच पोलिसांकडे धाव घेत रात्री उशिरा तक्रार नोंदवली. या प्रकाराची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही शिवसेना नेत्यांनी केली.

नाशिकमधील तीनही विधानसभा मतदारसंघ, तसेच सिन्नर मतदारसंघात एकाच वेळी शिवसेना, तसेच भाजप नेत्यांच्या नावाने समीर भुजबळ यांना मतदान करण्याचे मेसेजेस नागरिकांना प्राप्त झाले. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या नावाने 'बीडब्लू-नाशिक' या 'सेंडर'कडून मेसेजेस मोबाइलवर पाठविण्यात आले. विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, उदय सांगळे, आमदार सीमा हिरे, राजाभाऊ वाजे यांच्या नावाने हे मेसेजेस पाठविण्यात आले. या प्रकरणी आचारसंहिता कक्षाकडेही तक्रार नोंदविण्यात आली आहे. करंजकर आणि बोरस्ते यांनी रात्री उशिरा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली. अनिल मटाले, राहुल ढिकले या मनसे नेत्यांच्या नावानेही भुजबळांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तिप्रदर्शनाने प्रचाराचा समारोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी भेटीगाठींवर भर दिला. वंचित आघाडीचे पवन पवार यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना-भाजपने मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेने प्रचाराचा समारोप केला, तर राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करण्यात आला. उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले होते.

...

माणिकराव कोकाटेंची ट्रॅक्टर रॅली

अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना आणि राष्ट्रावादीच्या उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. कोकाटेंनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र होते. ग्रामीण भागात जाहीरसभा, कॉर्नरसभा घेऊन वातावरण निर्मिती केल्यानंतर कोकाटेंनी शेवटच्या टप्प्यात नाशिक प्रचाराचे केंद्र बनवले. प्रचाराच्या शेवटच्या दि‌वशी कोकाटेंनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहरात दोनशे ट्रॅक्टरची रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. कोकाटेंच्या या रॅलीत शेतकऱ्यांनी स्वत:हून ट्रॅक्टर आणत प्रचार केला. शनिवारी सकाळी कोकाटेंनी नाशिकरोड येथील चेहेडी येथून प्रचाराला सुरुवात केली. नाशिकरोड, जेलरोड, देवळाली, द्वारका, सिडको, सातपूर परिसरात रॅली काढून त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. राजकीय पक्षांपेक्षा ट्रॅक्टर रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शेवटच्या दिवशी कोकाटेंनी चांगलीच वातावरण निर्मिती केली.

..

समीर भुजबळांकडून भेटीगाठींवर भर

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्रपक्षांच्या महाआघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार समीर भुजबळ यांनी मॉर्निंग वॉकमधून नाशिक शहर, नाशिकरोड येथील जॉगिंग ट्रॅकवर जाऊन व्यायामासाठी आलेले युवक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्याशी मुक्त संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैदानावर सरावासाठी आलेल्या बच्चेकंपनीशी संवाद साधत त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी जॉगिंग ट्रॅक येथे येणाऱ्या संघटनांनी भुजबळ यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यानंतर देवळाली, भगूर परिसरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. शेवटच्या दिवशी भुजबळांनी शक्तिप्रदर्शन टाळले.

..

हेमंत गोडसेंची मोटारसायकल रॅली

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली. या सभेनंतर दुपारी सातपूर व सिडको परिसरात प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सातपूर येथील अंबिका स्वीट येथून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रचार रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीच्या समारोपाने प्रचाराची सांगता करण्यात आली. दरम्यान, खा. गोडसे यांनी केलेली विकासकामे ही गौरवास्पद असून, मागील वेळेपेक्षा यावेळी गोडसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या रॅलीमुळे सिडको, सातपूर, औद्योगिक वसाहत आदी परिसर भगवेमय झाल होता.

...

पवन पवारांची रॅली

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकरोड परिसरात प्रचार रॅली काढत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. पायी तसेच बाइक रॅली काढून त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी साद घातली. शुक्रवारी वंचित आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेत त्यांनी आपल्या नाशिकरोडच्या गडात शक्तिप्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांविरुद्ध करणार तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आगे आगे होता है क्या?' असे सांगत नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला दम देऊन दबाव टाकत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

आमचे वकील या वक्तव्याचा अभ्यास करीत असून, त्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार व न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी दादागिरी करू नये, अजून न्याय व्यवस्था जिवंत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याअगोदरच भुजबळांनी मुख्यमंत्र्यांवर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये केलेल्या आरोपाचे खंडण केले. ते म्हणाले, की मुख्यमंत्री हे स्वत:लाच न्यायालय समजतात, केस सुरू होण्याअगोर मुख्यमंत्री आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करीत आहेत, ही अंत्यत गंभीर बाब आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून, या षडयंत्रातून आम्ही निर्दोष बाहेर येऊ. खोटे आरोप करणे व गुन्हा दाखल करणे हासुद्धा अपराध असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना कारस्थान केल्याबद्दल जेलमध्ये जावे लागेल.

मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांच्याकडे आमच्यासारखी भाषणाची शैली नसल्यामुळे ते विनाकारण ओरडून भाषण करतात. महाराष्ट्र सदन प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप ठेवून केवळ माझा आवाज बंद करण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. सरकारचा एक रुपया जरी खर्च केल्याचे सिद्ध केल्यास आम्ही आमची उमेदवारी मागे घेऊ, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करा, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

--

कुंभमेळ्यात एकही पैसा नाही

कुंभमेळ्यात सर्व पैसा आघाडी सरकारने दिला. दीड-दोन महिने बाकी असताना आमचे सरकार गेले. त्यानंतर भाजपचे सरकार आले म्हणून हे श्रेय घेत आहेत. मांजरपाडा योजनाही आघाडी सरकारच्या काळात झाली, आज ती पूर्णत्वाकडे आहे. पण, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत.

--

तीन टप्प्यांत टक्का घसरला

देशात तीन टप्प्यांत युतीचा टक्का घसरल्यामुळे ते आता काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करीत असल्याचे भुजबळांनी सांगितले. या निवडणुकीत त्यांनी कितीही आरोप केले तरी त्यांची डाळ शिजणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत महाफेकू आहे व महाराष्ट्रात छोटा फेकू असल्याचा टोमणाही यावेळी त्यांनी मारला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली, तर खासदार संजय राऊत यांच्या पत्राचा उल्लेखही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात असह्य तडाखा

$
0
0

मालेगाव : मालेगावात शनिवारी तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पारा ४४.६ अंशापर्यंत गेल्याने नागरिकांना प्रचंड उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली असून २९.८ अंश तापमान नोंदवले गेले. उष्णतेची प्रचंड लाट जाणवू लागल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

येवलाही तापले

येवला : येवला परिसरात सकाळपासूनच सूर्याचे चटके बसत असून दुपारनंतर उन्हाच्या तडाख्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तापमानाचा पारा ३५, तर सकाळी साडेअकराच्या सुमारास ४१ अंशावर गेला होता. माध्यान्हीचा तळपता सूर्य अधिकच आग ओकताना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान तालुक्यात तापमानाचा पारा हा ४३ अंशाच्या पार गेला होता. दुपारच्या सुमारास तालुक्यात ४३.२ अंश इतके तापमान नोंदवले गेले. दुपारच्या सुमारास शहर व तालुक्यातील रस्ते निर्मनुष्य होताना रस्त्यारस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट दिसून आला.

कळवणमधून गारवा गायब

कळवण : डोंगर टेकड्यांनी वेढलेल्या कळवणला ३९ अंश तापमान असून वातावरणात कुठेही गारवा जाणवत नाही. सकाळी ९ वाजेपासून सूर्य आग ओकण्यास सुरुवात करतो तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत वातावरणात 'गर्मी' जाणवते. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत सहसा रस्त्यावर कोणी दिसतच नाही. वाढत्या उकाड्यात काहीसा दिलासा मिळावा म्हणून फॅन, कूलर लोकांकडे आहेत; मात्र त्यांनाही या तप्त वातावरणात थंडावा निर्माण करणे अवघड ठरते. थंड पेयांवर व पाण्याच्या थंड बाटल्यांवर लोकांचा जोर वाढल्याने त्यांचा खप वाढला आहे. कळवण तालुक्यात पाणीटंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईविरोधात महिलांचा हंडा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील जोरण येथे अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून नळांना पाणीपुरवठा होत नसल्याचे निषेधार्थ संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेला.

जोरण ग्रामपंचायतीच्या वतीने केला जाणारा पाणीपुरवठा अनेक दिवसांपासून ढिसाळ नियोजन व विहिरीतील पाणी आटल्याने बंद करण्यात आला आहे. नळांना पाणी आलेच तर हंडाभर देखील पाणी मिळत नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीप्रश्न बिकट बनला आहे. अनेकदा पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत जोरण ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी मूग गिळून गप्प असल्याने संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सरपंच व उपसरपंच यांना घेराव घालून आंदोलन केले.

येत्या दोन दिवसांत पाणीटंचाई सोडविण्यास यशस्वी झाले नाही तर सरंपच व उपसरपंच यांना डांबून ठेवण्यात येईल, असा इशारा महिला संगिता निकम, शंकुतला देसले, छाया सावकार, चित्रा सावकार, सुरेखा सावकार, भारती सावकार, जयवंता बागूल, मंगला सावकार, कडू सावकार, एकनाथ सावकार यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान करा; ऑफर्स मिळवा

$
0
0

\B(चर्चा तर होणारच लोगो)

मतदारराजावर ऑफर्सची बरसात!

- अनेक संस्था, आस्थापने सरसावल्या

- शाई लावलेले बोट दाखवा अन् सवलती मिळवा

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे. नाशिकमधील लहान-मोठे व्यावसायिकही यासाठी प्रयत्न करीत असून, मतदान केलेल्यांसाठी विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

\B'अनुपम'कडून मोफत मेंबरशिप

\Bलोकसभेसाठी नाशिकसह मुंबई, ठाणे येथे २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच विशेषत: लोकशाही प्रक्रियेत प्रथमच सहभागी होणाऱ्या तरुणाईसाठी म्हणजेच मतदारांसाठी अनुपम डॉट कॉम या विवाह संस्था व लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आली आहे. यामधून अनेकांचे लग्न जमणार आहे. जे मतदार मतदान करतील व विवाहेच्छुक असतील त्यांना अनुपमशादीतर्फे १५०० रुपयांची मेंबरशिप मोफत देण्यात येणार आहे. इच्छुकांनी शीतल कॉम्प्लेक्स, अंजली प्लायवूडमागे, नाशिक पुणे रोड, द्वारका येथे संपर्क साधावा.

\Bसाईछत्रकडून पानावर सूट

\Bविड्याच्या पानाचे विविध प्रकार शहरात सुरू झाले आहेत. मघई पानापासून चॉकलेट, पायनॅपल, मलई आदी प्रकारांना ग्राहकांची रोजचीच मागणी असते. या पानांवर मतदान केलेल्या व्यक्तींना दहा टक्के सूट मिळणार आहे. साईछत्र मघई पान सम्राट यांनी ही ऑफर दिली आहे.

\Bकेस कापण्यावर ५० टक्के सूट

\Bरामवाडी, आदर्शनगर येथे असलेल्या आदर्श हेअर सलूनचे प्रभाकर सैंदाणे यांच्याकडूनही ऑफर देण्यात आली आहे. मतदान केलेल्यांना केस कापण्यावर ५० टक्के सूट त्यांनी दिली आहे. सोमवार असला तरी सलून दिवसभर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, केवळ २९ तारखेपर्यंत ही ऑफर मर्यादित राहणार आहे.

\Bथायरॉइडची मोफत तपासणी\B

पुणे येथील क्रस्ना डायग्नोस्टिक्स या संस्थेतर्फे मतदानाचा टक्का व महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या थायरॉइड या आजाराविषयी प्रबोधन करण्यासाठी मतदान केलेल्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण वाढत असून, बऱ्याच वेळा या आजाराची लक्षणे दिसूनसुद्धा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, आजाराला गंभीर स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे क्रस्ना डायग्नोस्टिक्सकडून महिला मतदारांना आरोग्याबाबत सजग रहा, असा सल्ला देण्यात येत आहे. मतदान केलेल्या महिलांना मतदान केल्या दिवसापासून बोटावरची शाई जाईपर्यंत थायरॉईडच्या तपासणीचा लाभ घेता येणार आहे. नाशिकमध्ये बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड, स्वामी समर्थ हॉस्पिटल, अंबड, झाकीर हुसेन हॉस्पिटल द्वारका, इंदिरागांधी हॉस्पिटल, पंचवटी, नामको हॉस्पिटल, पेठरोड या केंद्रांवर ही तपासणी करण्यात येणार आहे.

\B'बाफणा बाजार'कडून लकी ड्रॉ \B

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मॉल मालकदेखील सरसावले असून, अमृतधाम येथील बाफणा बाजार हे त्यापैकी एक आहे. बाफणा बाजारचे संचालक संजय बाफणा यांनी निवडणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे, मतदान करावे म्हणून 'करा व्होट, दाखवा बोट अन् मिळवा ३२ इंची टीव्ही भेट' अशी ऑफर देण्यात आली आहे. सोमवारी, २९ एप्रिल सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत मतदान करून बाफणा बजार येथे प्रत्यक्ष मतदान केल्याचे दाखवून स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून एका भाग्यवानास नामवंत कंपनीचा ३२ इंची टीव्ही लगेच भेट देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीने राज ठाकरेंचे दुकान बंद!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीपूर्वी राज ठाकरेंचे दुकान जोरात सुरू होते. परंतु, नोटाबंदीच्या निर्णयामुळे ठाकरेंचे दुकान बंद झाल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नोटाबंदीमुळे ठाकरेंचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी दुपारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वी लोक सायकल, मोटारसायकल, कार भाड्याने घ्यायचे, आता पवारसाहेबांनी रेल्वेचे इंजिनच भाड्याने घेतले आहे. तोंडाच्या वाफाने इंजिन चालले असते, तर आतापर्यंत ते दिल्लीत गेले असते. पण, हे इंजिन दिल्लीत काय तर आता गल्लीतही उरले नसल्याचा टोला लगावत, महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपचे सरकार होते अन् त्यांनी पैसा पुरवल्याचा विसर त्यांना पडला, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला. नाशिकमध्ये आमची सत्ता आल्यापासून दोन हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस यांनी यावेळी राज ठाकरेंचा समाचार घेत शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मीच ओपनिंग बॅट्समन, मीच माढातून लढणार, अशी वल्गना करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कॅप्टनने पॅड, हेल्मेट घालून पीचवर बॅट ठेवली होती. परंतु, समोर नरेंद्र मोदींचा गुगली पाहताच त्यांनी पॅव्हेलियनमध्ये धाव घेतली, असा टोला पवारांना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था अशी झाली आहे, की त्यांना निवडणुकीत श्रोत्यांबरोबर वक्तेही भाड्याने आणावे लागत आहेत. पूर्वी लोक सायकल, मोटारसायकल, कार भाड्याने घ्यायचे, आता पवारसाहेबांनी चक्क रेल्वेचे इंजिनच भाड्याने घेतले. पण, इंजिन तोंडाच्या वाफेने नव्हे, तर इलेक्ट्रिसिटी अथवा खऱ्या वाफेने चालते हे कदाचित पवारसाहेबांना माहिती नसावे. तोंडाच्या वाफेने इंजिन चालले असते, तर ते दिल्लीपर्यंत गेले असते. पण, तोंडाच्या वाफेने चालणारे इंजिन दिल्ली काय तर गल्लीतही उरले नाही. इंजिनाला मोदींनी पछाडलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार, राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. जेट एअरवेज नोटाबंदीने बंद झाले, जे-जे नुकसान झाले तेही नोटबंदीनेच झाले, असे सांगणाऱ्या राज ठाकरेंचेच दुकान नोटाबंदीने बंद झाले. त्यामुळे त्यांचा जळफळाट झाला असून, ते मोदींविरोधी सूर आळवत आहेत. मात्र, इंजिनाची अवस्था अशी झाली आहे, की विधानसभेतील एकमेव सदस्यही मनसेला सोडून शिवसेनेत गेला. जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्येही मनसेचे आता काही उरले नाही. त्यामुळेच आमचा राष्ट्रीय पक्ष, पण आमची कुठेही शाखा नाही, अशी अवस्था मनसेची झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना डिवचले.

--

मनसेची कामे आमचीच

राज ठाकरेंनी नाशिकच्या जाहीर सभेत जी विकासकामे दाखविली ती राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या निधीतूनच झाली, असा दावाही त्यांनी केला. कुंभमेळ्यासाठी आम्हीच पैसे दिले, असा दावा करीत त्याच पैशातून राज ठाकरेंनी शहराचा विकास केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही काय केले, असा सवाल ठाकरे विचारत आहे. परंतु, आमची सत्ता आल्यापासून नाशिक शहरात दोन हजार कोटींची कामे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर देशातील पहिली एकात्मिक पद्धतीची हायब्रीड मेट्रो सिस्टीम सुरू करण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

--

तिजोऱ्या लुटल्यानेच भुजबळ जेलमध्ये!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना 'नटसम्राट' संबोधत भुजबळांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून नव्हे, तर भ्रष्टाचार केला, काळा पैसा कमावला, जनतेच्या तिजोऱ्या लुटल्या म्हणून जेलमध्ये टाकल्याचा दावा केला. राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत बोलताना भुजबळांना जेलमध्ये टाकले पुढे काय, असा सवाल केला होता, त्याचा संदर्भ देत 'आगे आगे देखो होता है' क्या, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. भुजबळ आता जामिनावर आहेत. पण, त्यांच्यावर खटला चालणार आहे. त्यांची व्यवस्था 'नीट' लावून ठेवली आहे. न्यायदेवता न्याय करेल, त्यांच्या करतुतींमुळेच भुजबळ जेलमध्ये जाणार, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

--

'राहुल गांधींना जोडे मारा!'

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यांना कायर, डरपोक संबोधून त्यांचा अपमान केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना भरसभेत जोडे मारण्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. लोकसभेची निवडणुक राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोही असल्याचे सांगत काही लोकांना कावीळ झाली आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. काहींना सध्या जळी-स्थळी मोदी-शहा दिसतात, त्यांची कावीळ उतरविण्यासाठी येथे मुख्यमंत्री आले आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images