Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बच्चेकंपनीची धम्माल करणारी धाव

$
0
0

गेट सेट गो...

'सिम्पल स्टेप्स मॅरेथॉन' उत्साहात; बच्चेकंपनीची धमाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारच्या सुटीची धमाल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी जिंकण्याची जिद्द, 'गेट सेट गो' म्हणताच जोशात धाव घेणारे चिमुरडे पाहून खुलणारे पालकांचे चेहरे असा माहोल रविवारी गंगापूररोडवर दिसला. बच्चेकंपनीला उन्हाळ्याच्या सुटीत धमाल, मस्तीसह व्यायामाचे महत्त्व पटावे त्यासाठी 'सिम्पल स्टेप्स मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' हे 'सिम्पल स्टेप्स मॅरेथॉन'चे कल्चरल पार्टनर आहेत.

गंगापूर रोडवरील दिव्यदान मैदान येथून या मॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी बच्चेकंपनी सकाळी ६ वाजेपासून मैदानावर जमल्याचे दिसत होते. पाल्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पालकही मोठ्या उत्साहात असल्याचे वातावरण होते. मॅरेथॉनच्या सुरुवातीला बच्चे कंपनीचा उत्साह अधिक वाढावा म्हणून झुम्बा डान्स करीत वॉर्म-अप करण्यात आला. ही मॅरेथॉन १०० मीटर, १.५ किलोमीटर, ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ७ किलोमीटर या गटात घेण्यात आली. दिव्यदान मैदानापासून प्रसाद सर्कल, दत्त चौकमार्गे बापू पूल असा मॅरेथॉनचा मार्ग होता. मॅरेथॉनमध्ये सहभागी रनर्सना 'टाइम चीप' लावण्यात आली होती. सहभागाबद्दल प्रत्येक स्पर्धकाला मेडल देण्यात आले. तसेच स्पर्धकांना कल्चर क्लबतर्फे 'ट्रायल पॅक' देण्यात आले. 'मला जिंकायचं म्हणत' चिमुरड्यांनी उत्साहात मॅरेथॉन पूर्ण केली. मॅरेथॉनच्या वेळी पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांच्यासमवेत सेल्फी घेण्यात पालक आणि पाल्य दंग झाल्याचे दिसून आले.

--

सायकल अन् फुटबॉल स्टन्ट्स

मॅरेथॉननंतर बच्चे कंपनीला सुटी एन्जॉय करता यावी म्हणून सायकल आणि फुटबॉलचे स्टन्ट्स दाखविण्यात आले. चैतन्य देशपांडे या विद्यार्थ्याने फुटबॉलचे विविध स्टन्ट्स करत बच्चे कंपनीचे लक्ष वेधले. सायकलिस्ट विद्यार्थ्यांनी सायकलिंगवर अनोखे स्टन्ट्स करीत सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे मॅरेथॉननंतरही बच्चेकंपनीतील उत्साह अधिक असल्याचे जाणवले.

--

हे आहेत विजेते

१.५ किलोमीटर : मुले - अविनाश पाटील (प्रथम), विश्वजित ठाकूर (द्वितीय), विहान राजपूत (तृतीय)

मुली - आरव जैन (प्रथम), आर्याही देव (द्वितीय), शिव सोमय्या (तृतीय)

३ किलोमीटर : मुले - आदित्य मोरे (प्रथम), प्रणम्य येवले (द्वितीय), निनाद ठोंबरे (तृतीय).

मुली - मैथिली बभाने (प्रथम), ईश्वरी दरोडे (द्वितीय), तन्वी सोनार (तृतीय)

५ किलोमीटर : मुले - दक्ष खर्डे (प्रथम), ऋग्वेद शेंडे (द्वितीय), यश अहिरे (तृतीय).

मुली - स्मिता मोरे (प्रथम), निशी छोरिया (द्वितीय), रशी (तृतीय)

७ किलोमीटर : मुले - शुभम मुळाणे (प्रथम), विजय सोनवणे (द्वितीय), कृष्णा खुले (तृतीय).

मुली - वैष्णवी कातुरे (प्रथम), ऋतुजा माने (द्वितीय), तशी दोरजे (तृतीय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डेड स्टॉक मॅनेजमेंट’ हे राष्ट्रीय संपत्तीचे जतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भंगार म्हणून विकावा लागणारा 'डेड स्टॉक' गरजू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उद्योजक आणि ग्राहक यांत संकेतस्थळाचा सेतू उभारण्यात आला आहे. तो उद्योजक आणि ग्राहक यांना उपयुक्त ठरेलच. त्याचबरोबर राष्ट्रीय संपत्तीचे नुकसानही त्यामुळे टाळता येईल, असा विश्वास निमा, आयमा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

IRRSA या कंपनीने www.clearmystore.com या संकेत स्थळाची निर्मिती केली असून, त्याचे उद्घाटन उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निवेकचे अध्यक्ष राजकुमार जॉली आदी उपस्थित होते. विलास प्रधान आणि अंजली प्रधान यांच्या IRRSA या कंपनीने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. यामुळे उद्योजक आणि ग्राहक अशा दोहोंचे हित जोपासले जाऊन राष्ट्रीय संपत्तीचा योग्य विनियोग होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी मंडलेचा म्हणाले, 'उद्योजकांना भंगारात कवडीमोल भावात डेड स्टॉक विकावा लागतो. यातून एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. परंतु, अशा उत्पादनांची आवश्यकता असलेल्या व्यक्तींपर्यंत तो या माध्यमातून पोहोचू शकला तर हे नुकसान टाळता येईल. यामुळे लाखो रुपयांचे चांगले मटेरियल भंगारात जाण्यापासून वाचेल, असा विश्वास मंडलेचा यांनी व्यक्त केला. उद्योगात काळानुरूप मोठ्या प्रमाणावर डेड स्टॉक शिल्लक राहतो. तो सांभाळणे, साठविणे उद्योजकांसाठीही जिकिरीचे ठरते. यामध्ये पैसा आणि जागाही अडकून पडते. असे उद्योजक आणि उत्पादनांची शोधाशोध करणाऱ्यांसाठी हा मंच उपयुक्त ठरेल, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला. या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी शुल्क नसल्याचे व नागरिकांसाठी ते खुले असल्याचे विलास प्रधान यांनी स्पष्ट केले. अंजली प्रधान यांनी स्वागत केले. श्रुती वैश्विकर यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी धर्माधिकारी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार प्रचारक धडाडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने स्टार प्रचारकांच्या सभांनी लोकसभेचे रण आणखी पेटणार असून, उमेदवारांकडून वातावरणनिर्मितीसाठी शक्तिप्रदर्शनावर जोर दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ नाशिकमध्ये २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित गोल्फ क्लब मैदान गाजवणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची तोफ याच दिवशी गिरणारेत धडाडणार आहे. सोबतच २६ एप्रिल रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या दिग्गज नेत्यांसोबतच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्याही सभांनी निवडणुकीच्या वातावरणात रंग भरणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रचारासाठी अखेरचा आठवडा उरला असल्याने उमेदवारांसह राजकीय पक्षांनी आता प्रचाराची रणनीती बदलली आहे. मतदानाला अवघा आठवडा शिल्लक राहिला असला, तरी वातावरणनिर्मिती होत नसल्याने राजकीय पक्षांकडून आता जाहीर सभांना प्राधान्य दिले आहे. उमेदवारांनीही वैयक्तिक गाठीभेटी न घेता चौकसभा, प्रचार रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण आता हळूहळू तापायला लागले आहे. विशेषत: प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात राजकीय पक्षांनीही शक्तिप्रदर्शनावर जोर दिल्याचे चित्र आहे.

आज, सोमवारी (दि. २२) नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत असून, या सभेने निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापणार आहे. २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. २४ तारखेलाच शरद पवार यांची सायंकाळी सहा वाजता गिरणारे येथे समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे, तर २६ तारखेला राज ठाकरेंची गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची जाहीर सभा सिन्नर येथे होणार आहे. खासदार हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचीही सभा याच दिवशी घेण्याचे नियोजन आहे. यासोबत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा गोडसेंच्या प्रचारासाठी २७ एप्रिल रोजी नाशिक शहरात रोड शो होणार आहे. या दिग्गजांसोबतच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, डॉ. अमोल कोल्हे यांच्याही सभांनी रण पेटणार आहे. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या या सभांच्या धडाक्यामुळे आणि स्टार प्रचारकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. हेविवेट नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींमुळे निवडणुकांचा कलही लक्षात येणार आहे.

--

ठाकरेंची सभा गेमचेंजर?

लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार नसला, तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून नाशिकमध्ये २६ एप्रिल रोजी सभा घेतली जाणार आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभांनी शहराचे वातावरण पलटले होते. या सभांमुळे विधानसभेत मनसेचे तीन आमदार गेले होते, तर महापालिकेत सत्ता आली होती. त्यामुळे ठाकरेंच्या नाशिकमधील सभा गेमचेंजर ठरल्या असून, २६ एप्रिलची सभाही गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात सध्या ठाकरेंच्या सभेची चर्चा सुरू आहे.

--

उद्धव, फडणवीस संभ्रम दूर

दरम्यान, नाशिकमधील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी २४ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी या सभेऐवजी २५ एप्रिल रोजी सभा घेण्याचे नियोजन केले होते. नियोजनात बदल करीत २४ रोजी उद्धव, तर २५ रोजी फडणवीस यांच्या सभा होणार होत्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता, तसेच दोन दिवस गोल्फ क्लब कसे भरायचे, असाही प्रश्न पडला होता. परंतु, आता हा संभ्रम दूर झाला असून, उद्धव आणि फडणवीस २४ तारखेलाच एकत्रित सभा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवारी (दि. २२) पिंपळगाव बसवंत येथे होणार असून, ग्रामीण पोलिस दलासह विविध केंद्रीय व राज्य सुरक्षा विभागांकडून बंदोबस्ताचे नियोजन आखण्यात आले आहे. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सभास्थळापासून एक किलोमीटर दूर ठेवण्यात आली आहे तर, सभास्थळी हॅण्ड बॅग, पर्स, पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

देशाच्या पंतप्रधानाची सभा असल्याने सुरक्षा विभागांनी मागील महिन्याभरापासून तयारी सुरू केली आहे. स्पेशल प्रोटेक्शन गार्डस (एसपीजी) या विभागाचे सर्वच वरिष्ठ अधिकारी मागील दोन ते तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त यासाठी तैनात केला आहे. यासाठी शहर आणि पर जिल्ह्यातील पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सभेसाठी आलेल्या नागरिकांना एकत्रित न बसवता ब्लॉक आखून नियोजन करण्यात आले आहे. सभास्थळी हँडबॅग, पर्स तसेच पाण्याच्या बॉटल बाळगणाऱ्यांना सभास्थळी प्रवेश दिला जाणार नाही.

अशी असणार पार्किंगची सुविधा

पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुलीपासून मार्केटकडे जाणाऱ्या चिंचखेडरोडच्या उजव्या बाजूस सभेसाठी येणारे नागरिक व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पार्किंगची चार सेक्टरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळ परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पेट्रोलिंग व वाहतुकीचे कडक नियोजन करण्यात आले आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी नाशिक व धुळे बाजूकडून येणारे वाहनांनी धन्वंतरी हॉस्पिटल, चिंचखेड चौफुलीमार्गे जोपुळ रस्त्याने सभास्थळी यायचे आहे. कळवण, दिंडोरी बाजूंकडून येणाऱ्या वाहनांनी जउळकेमार्गे सभास्थळी येऊन, मार्केटच्या एक किमी अंतरावर वाहने पार्क करावीत. धुळे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी नाकोडा स्वीटच्या डाव्या बाजूने सरळ वाहने घेऊन जावीत. वणी-दिंडोरीरोडमार्गे येणाऱ्या कार्यकर्त्यांना आपली वाहने एक किमी अंतरावर पार्किंगमध्ये लावून सभास्थळी पोहचावे लागणार आहे.

सभेची वेळ सकाळची असून, नागरिकांनी सभास्थळी वेळेवर पोहचावे. सुरक्षा व वाहतूक यंत्रणेस सहकार्य करून त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझी बंडखोरी जनतेसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

महायुती आणि आघाडीमध्ये आपसांतील वादामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कीड लागली आहे. यातून जिल्ह्याला बाहेर काढून विकासाकडे न्यायचे आहे. उरला प्रश्न पक्षाचा, तर ज्याच्यात धमक आहे तोच बंडखोरी करतो, असे सांगत आपली बंडखोरी जनतेसाठी असल्याचा दावा अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटेंनी केला. विरोधकांकडून आपणास अडकवण्याचा डाव होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सिन्नर येथील नगरपालिकेच्या शेजारी हुतात्मा स्मारकाजवळ शनिवारी झालेल्या जाहीर सभेत कोकाटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे समर्थक व्यासपीठावर उपस्थित होते. कोकाटे यांनी यावेळी भाषणात चौफेर हल्लाबोल केला. शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना लक्ष्य केले. ज्याच्यात धमक आहे, तोच अपक्ष उभा राहतो. आपण अन्यायाविरुद्ध पेटून उठलो तर इतिहास घडू शकतो, असे सांगत नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सिन्नर तालुक्यातील उद्योगनगरीत इंडिया बुल्स कंपनी बंद पडली आहे. नाशिकचा रोजगार आणि उद्योगविकास पूर्णपणे खुंटला असून, गोडसे आकाशाकडे तर भुजबळ पत्रकारांना घेऊन डोंगराच्या बोगद्याकडे जातात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. यांच्या विमानापेक्षा आपण टांगाशर्यतीत चालू, पण शासन दरबारी न्याय मिळवूच, असे ते म्हणाले. शेतकरी, कामगार, शेतीमालाचे भाव, रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासह बंद पडलेले उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले. सीमंतिनी कोकाटे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या कामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

विरोधक वेडेपिसे

विरोधक माझ्याकडची गर्दी पाहून वेडेपिसे झाले आहेत. एका अपक्षाच्या मागे असलेली जनता पाहून मला भुजबळांनी उभे केले, अशी अफवा पसरवली जात आहे. परंतु, अफवा पसरवणाऱ्यांना निकालाच्या दिवशी उत्तर मिळेल. विरोधकांचा मला अडकवण्याचाही डाव होता, परंतु हा डाव जनतेने यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापन विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन

$
0
0

व्यवस्थापन विषयावरील

पुस्तकांचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनघा प्रकाशन संस्थेने ४० व्या वर्धापनदिनानिमित्त 'अनघोत्सव' या कार्यक्रमाचे ठाणे येथे आयोजन केले होते. यात डॉ. महेश केळुस्कर यांच्या चार, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या दोन व नाशिकच्या लेखिका स्वाती पाचपांडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मॅनेज मॅन १ आणि मॅनेज मॅन २ अशी ती दोन पुस्तके आहेत. या कार्यक्रमास वामन केंद्रे, डॉ. विलास खोले, डॉ अनंत देशमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. अनघाचे संपादक अमोल नाले यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत भाषा सभेचा वर्धापनदिन

$
0
0

संस्कृत भाषा सभेचा वर्धापनदिन

नाशिक : संस्कृत भाषा सभेच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (२३ एप्रिल) संध्याकाळी साडेसहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, प्राचीन ग्रंथ संग्राहक जयंत गायधनी, शिक्षण व सामाजिक कार्यासाठी रुपाली झोडगेकर आणि रुग्णसेवा व सामाजिक कार्यासाठी श्रीमती वर्णा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात रा. ना. दांडेकर संस्कृत नाट्यस्पर्धेतील विजेती एकांकिका 'अहमेव ते वहिदा' सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी


‘पंतप्रधानांच्या सभेतून महिलांना ऊर्जा’

$
0
0

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीने सर्वांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. अवघ्या काही दिवसांत त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने प्रचारातही मुसंडी मारली. मतदार संघातील प्रश्नांची जाण असल्यामुळे त्यांनी नेमके प्रश्न हाती घेतले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याशी गौतम संचेती यांनी साधलेला संवाद...

-

पंतप्रधानांची सभा तुमच्या मतदारसंघात होत आहे...

माझ्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यात महिला आघाडीवर आहेत. ही सभा ऐतिहासिक असेल. त्याची तयारी पूर्ण केली आहे. महिला उमेदवार असल्यामुळे या सभेतून महिलांना मोठी ऊर्जा मिळणार आहे. महिला सबलीकरणासाठी ही सभा महत्त्वाची ठरेल.

-

प्रतिस्पर्धी उमेदवारांचे किती आव्हान आहे?

मला तरी या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे काही आव्हान वाटत नाही. कारण ते कधी रस्त्यावरही दिसले नाहीत. प्रमुख उमेदवार कधी संपूर्ण मतदारसंघात फिरलेच नाहीत. मी गेली सात वर्षे या मतदारसंघात फिरते आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात गावात काय प्रश्न आहेत, ते कसे सोडविता येतील, याचा अभ्यास केला आहे. त्यासाठी संघर्षही केला.

-

प्रचारात कोणता मुद्दा आहे?

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील बहुतांश मतदारसंघांत पाणीप्रश्न हाच मुख्य मुद्दा आहे. पाण्याचा प्रश्न सुटला तर या मतदारसंघांचा विकास होऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नांवर फोकस ठेवला आहे. त्यात मांजरपाडा योजना, नार-पार योजनेबरोबरच प्रलंबित प्रश्न कसे सोडविता येतील, त्यासाठी काम करण्याचे ध्येय ठेवून आम्ही प्रचार करीत आहोत.

-

उद्योग विकासाबाबत आपले मत काय?

मतदारसंघातील बहुतांश भाग हा शेतीव्यवसायाशी संबंधित आहे. कांदा, द्राक्षे, डाळिंब, टोमॅटो याबरोबरच शेतीचे प्रश्नही येथे महत्त्वाचे आहेत. प्रत्येक तालुक्यात प्रक्रिया उद्योग कसा सुरू होईल यावर भर देणार आहे. त्यातून शेतीमालाला भाव तर मिळेलच, शिवाय रोजगारही उपलब्ध होईल. कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग यातूनही अनेक प्रश्न सुटणार आहेत.

-

विकासकामांचा मुद्दा कसा मांडता?

भाजप सरकारने केंद्र व राज्यात जी विकासकामे केली, ती मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करतोच. पण, त्यातील काही योजनांचा लोकांना झालेला फायदा ते स्वत: सांगतात. ठिकठिकाणी रस्त्यांच्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाचा दर्जा उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यातून दळणवळणाला फायदा होणार आहे.

-

मतदारसंघात मोठे उद्योग नाहीत...

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा उद्योग या मतदार संघात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे इतर उद्योग कसे सुरू होतील याकडेही लक्ष आहे. रेल्वेसंबंधी प्रश्न, रोजगार, महिला सबलीकरण हे विषयही महत्त्वाचे आहेत. त्यावरही भर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा धरण होणार गाळमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या दारणा धरणात १०७ वर्षांपासून साचलेला १५ टक्के गाळ उपसा मोहिमेला सुरवात झाली आहे. धरण बांधल्यापासून प्रथमच दहा हजार क्युबिक मीटर गाळ काढण्याचे पाटबंधारे विभागाचे उद्दिष्ट आहे. परिणामी धरणाची १कोटी लीटर जास्त पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.

नांदुरमध्यमेश्वर पाटबंधारे विभाग नाशिक, लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम यांचे संयुक्त विद्यमाने आणि दारणा धरणाच्या परिसरातील नांदगाव बु. तसेच साकुर येथील शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून दारणा धरणातून गाळ उपसा मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम नांदगाव बु. व साकुर गावातील शेतकरी शेतात टाकण्यासाठी श्रमदानातून गाळ उचलणार आहेत. टप्याटप्याने परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी आवाहन करणार असून शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून गाळमुक्त धरण करण्याच्या मोहिमेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन दारणा धरणाचे शाखा अभियंता सुहास पाटील यांनी केले आहे.

पाटबंधारे विभागाचे गाळ उपसाचे उद्दिष्ट पूर्ण झाले तर दारणा धरणाची एक कोटी लिटर जास्तीचे पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता आर. शिंदे, पी. कुलकर्णी, शाखा अभियंता एस. बी. पाटील, एस. डी. पवार आदी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

धरणात वर्षानुवर्षे साचलेला गाळ जमिनीची सुपीकता वाढवून पिकाचे दीडपट उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असे सेंद्रीय खत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात टाकावा यामुळे शेतीचा पोत सुधारण्यास मदत मिळेल. धरणही गाळमुक्त होवून धरणाची पाणीसाठा क्षमता वाढेल.

- एस. बी. पाटील, शाखा अभियंता दारणा धरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मयताच्या वारसास चार लाखांची मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

केद्राई धरण परिसरात खडकओझर (ता. चांदवड) शिवारातील वीज पडून ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासनाच्या नैसर्गिक आपत्तीबाधित मदतनिधीतंर्गत तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

खडकओझर येथील जनाबाई सुभाष रजाने (वय ४५) यांचा १४ एप्रिल रोजी सायंकाळी अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. १६) तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मयताच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाच्या नैसर्गिक आपत्तीबाधित मदतनिधी अंतर्गत चार लाख रुपयांचा धनादेश त्यांचे पती सुभाष रजाने, मुलगी दीपाली, मुले गोकुळ व लक्ष्मण यांच्याकडे सुपूर्द केला. वीज पडून ठार झाल्याने घटनेचा पंचनामा करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत मदतीचा धनादेश मयत जनाबाई यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलचे सूर्यकांत भोसले, जीवन सानप, पोलिसपाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रंगणार ‘मटा डिबेट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात मतदान होणार असून, नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांसोबत विशेष 'मटा डिबेट'चे आयोजन करण्यात आले आहे. रामकुंडावरील यशवंत महाराज पटांगणावर सोमवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हा डिबेट होणार आहे. याद्वारे उमेदवारांचे 'व्हिजन' नाशिककरांपुढे स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वत्र सभा, रॅली आणि प्रचाराचा जोर आहे. या टप्प्यातच नाशिक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांचे व्हिजन, त्यांची भूमिका आणि विविध बाबींवरील त्यांचे स्पष्ट मत नाशिककरांना समजणे आवश्यक आहे. त्यासाठीच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने विशेष 'मटा डिबेट'चे आयोजन करण्यात आले आहे. या डिबेटमध्ये विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी खासदार व महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, माजी आमदार व अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार हे सहभागी होणार आहेत. रामकुंडावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सायंकाळी सहा वाजता हा डिबेट होणार आहे. या डिबेटच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाचे विविध प्रश्न, त्यातील अडी-अडचणी, नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षमता, विकासाच्या संधी यावर विशेष भर असणार आहे. उमेदवारांचा आणि त्यांच्या पक्षांचा लोकसभा निवडणुकीचा काय अजेंडा आहे, त्याचबरोबर मतदारांच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, याचा ऊहापोहसुद्धा या डिबेटमध्ये होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'मटा राउंड टेबल'मध्ये निमंत्रित करुन त्यांच्या विविध आशा, अपेक्षा जाणून घेणारी 'मटा जाहीरनामा' ही मोहीम राबविली. त्याच्या पुस्तकाचे प्रकाशनही नुकतेच झाले आहे. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर 'मटा डिबेट'मध्ये विशेष चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये काय झाले, काय होणे आवश्यक होते, पाच वर्षांपूर्वी काय आश्वासने देण्यात आली होती, त्यातील कुठली पूर्ण झाली, कुठली अजूनही कागदावरच आहेत, यावर 'मटा डिबेट'मध्ये प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच, वर्षानुवर्षे नाशिकच्या कुठल्या समस्या प्रलंबितच आहेत, त्यात कुठल्या अडचणी आहेत, त्यासाठी आताचे उमेदवार काय प्रयत्न करणार आहेत, त्यांची भूमिका त्याविषयी काय आहे, हे नाशिककरांना कळून चुकणार आहे. शिवाय आगामी पाच वर्षांसाठी नाशिकच्या विकासाचा रोडमॅप काय आहे आणि तो काय असायला हवा, हेसुद्धा या 'मटा डिबेट'चे विशेष आकर्षण असणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी 'मटा डिबेट'ला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी आज (दि. २२) नंदुरबारला जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे साधारण दुपारी १२ ते १ वाजेच्यादरम्यान नंदुरबार शहरातील सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधन मोदींच्या सभेत ड्रोन, पॅराग्लायडर, बलून आदींचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, त्याचा वापर करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले आहे.
नंदुरबार शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेच्या परिसरात पाच किलोमीटरपर्यंत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, शहरातील वाहतूकीच्या मार्गातदेखील दुपारपर्यंत बदल करण्यात आला आहे. या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री दादा भुसे आदींसह लोकसभा उमेदवार उपस्थित राहतील. या जाहीरसभेसाठी ७० बाय २८ फुटांचे व्यासपीठ उभारले असून, त्यावर २५ जण बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्दी होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच सभा होत असल्याने जिल्ह्यातील पाडा, वाडा, वस्त्यामधून मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होईल, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून सुमारे बाराशे पोलिस अधिकारी व कर्मचारी सभा व परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाची इमारत रखडणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बांधकामासाठी वापरावयाच्या वाळूबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने नाशिकरोड न्यायालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. जूनअखेरची मुदत असलेल्या या इमारतीचे आतापर्यंत सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम होण्यासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत कालावधी लागणार आहे.

विभागीय महसूल आयुक्तालय रस्त्यावर चार एकर जागा नाशिकरोड न्यायालयाच्या इमारतीसाठी मिळाली आहे. या जागेपैकी ३ हजार ८३९.८९ चौरस मीटर जागेवर नाशिकरोड न्यायालयासाठी भव्य वास्तू उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या इमारतीच्या बांधकामास १३ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. संगमनेर येथील मेसर्स आर. एम. कातोरे अँड कंपनीतर्फे या इमारतीचे काम करण्यात येत आहे. जून २०१९ पर्यंत बांधकाम पूर्णत्वाची मुदत होती. मात्र, अद्याप ७० टक्के बांधकाम झाले आहे. उर्वरित तीस टक्के काम प्रशासकीय मुदतीत पूर्ण होणे शक्य नाही. या कामास तीन महिन्यांचा वाढीव कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकरोड न्यायालयाचे कामकाज नवीन इमारतीतून सुरू होण्यास दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी नैसर्गिक किंवा कृत्रिम यापैकी कोणती वाळू वापरायची याबाबत शासनस्तरावरुन वेळेत निर्णय न झाल्याने बांधकामाला उशीर झाल्याची माहिती ठेकेदार कंपनीकडून देण्यात आली.

अशी असेल नवीन इमारत

नाशिकरोड कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज सध्या पालिकेच्या दुर्गा गार्डन येथील इमारतीत सुरू आहे. ही जागा पुरेशी नसल्याने आयुक्तालय मार्गावर नवीन इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. नवीन इमारत दुमजली असून त्यात आठ कोर्ट हॉल, आठ कोर्ट ऑफिस, पुरुष व महिला प्रत्येकी एक कोठडी, दोन लोक अदालत कोर्ट हॉल, एक सीनियर डिव्हिजन ऑफिस, एक क्रिमिनल रेकॉर्ड रूम, एक सहाय्यक अधीक्षक कार्यालय, एक असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ऑफिस, पुरुष व महिला प्रत्येकी एक विटनेस रूम, दोन पुरुष व महिला बार रूम, एक संगणक कक्ष, पुरुष व महिला प्रत्येकी एक टिफिन रूम, आठ अँटि चेंबर, आठ जज चेंबर, एक बिलिफ रूम, एक मुद्देमाल रूम, एक स्वागतकक्ष, एक न्यायाधीश लायब्ररी, एक व्ही. सी. रूम, नागरिकांसाठी प्रतीक्षालय कक्ष दोन, एक कँटिन आणि नागरिक आणि न्यायाधिशांसाठी स्वतंत्र लिफ्ट अशा सुविधा आहेत. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात जागेची अडचण असल्याने या न्यायालयातील काही कामकाज नाशिकरोड येथील नवीन इमारतीतून चालणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी आज (दि. २२) नंदुरबारला जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे साधारण दुपारी १२ ते १ वाजेच्यादरम्यान नंदुरबार शहरातील सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधन मोदींच्या सभेत ड्रोन, पॅराग्लायडर, बलून आदींचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, त्याचा वापर करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले आहे.

नंदुरबार शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेच्या परिसरात पाच किलोमीटरपर्यंत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, शहरातील वाहतूकीच्या मार्गातदेखील दुपारपर्यंत बदल करण्यात आला आहे. या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री दादा भुसे आदींसह लोकसभा उमेदवार उपस्थित राहतील. या जाहीरसभेसाठी ७० बाय २८ फुटांचे व्यासपीठ उभारले असून, त्यावर २५ जण बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दी होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच सभा होत असल्याने जिल्ह्यातील पाडा, वाडा, वस्त्यामधून मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होईल, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून सुमारे बाराशे पोलिस अधिकारी व कर्मचारी सभा व परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी बोललो तर काहींना करंट लागतो; मोदींचा पवारांना टोला

$
0
0

नाशिक:

लोकसभेच्या रणांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेतही मोदींनी पवारांवर तोफ डागली. मी काही बोललो की काही लोकांना करंट लागतो, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.

मोदींनी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांसाठी नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. 'पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर बोललो की काही लोकांना कंरट लागतो आणि मला शिव्या द्यायला सुरुवात करतात, अशी कोपरखळी त्यांनी पवारांचे नाव न घेता मारली.

यावेळी मोदींनी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा उल्लेख करत भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून तत्कालीन यूपीए सरकारला लक्ष्य केलं. याआधी भारतातही अशा प्रकारचे स्फोट होत होते. पण आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो. '२०१४पूर्वी देशात काय परिस्थिती होती? देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केवळ शोकसभा घेत होते आणि जगभरात पाकिस्तानच्या नावानं गळा काढत होते. आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभरवेळा विचार करतात. दहशतवाद्यांना आता कळलंय की भारतात बॉम्बस्फोट घडवले तर हा मोदी आहे, दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना पाताळातूनही शोधून काढून ठार मारेल,' असंही ते म्हणाले.

'आम्ही नजर खाली किंवा वर करून पाहणार नाही, तर नजरेला नजर भिडवून बोलू, असं तेव्हा सांगितलं होतं. आज प्रत्येक भारतीय नागरिक ताठ मानेनं उभा आहे. जगभरात भारत आणि देशवासियांचा जो जयजयकार सुरू आहे, तो तुमच्या एका मतामुळं होत आहे. भारत सध्याच्या आव्हानांना सामोरे जात आहे ही तुमच्या त्या मताची ताकद आहे,' अशा शब्दांत त्यांनी मतदारांच्या भावनांना हात घातला. देशाची सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमानाची 'चौकीदारी' तुमच्या हातात आहे. निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून चौकीदाराला आणखी बळकट करायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आदिवासींच्या जमिनीला कोणीही धक्का लावू शकत नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून दिलेल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नंदुरबारला जाहीर सभेत दिले. खान्देशात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होते, त्यामुळे ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती कारखाना तयार करण्याचा उद्देश असून, पुन्हा एक वेळा मला संधी द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

नंदुरबार लोकसभेच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर येथून आलेल्या जनतेला संबोधित केले. यावेळी सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, शिवसेनेचे संपर्कनेते बबनराव थोरात, अजय परदेशी, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, सुभाष देवरे यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला भर उन्हातही एक लाखांच्यावर जनसमुदाय उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्या' चहाची चव अजूनही कायमः पंतप्रधान मोदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहर मला नवीन नसून, अनेकवेळा नंदुरबार शहरात येऊन चौधरी यांचा चहा प्यायलो आहे. तसेच आजही त्या चहाची चव मला आठवते. गेल्या काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिलांशी संवाद साधला होता. त्यांना घरकुल मिळाल्याचा आनंद झाला असून, एकदा संधी देऊन आदिवासींसाठी व शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ताकद दिली तर, भविष्यात नंदुरबारमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नंदुरबारला आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक एवढ्या उन्हात माझ्या सभेला उपस्थित राहिलेत. तुमचे माझ्यावर नितांत प्रेम असल्यानेच तुम्ही दिलेला वेळ आणि माझ्यावर केलेले हे उपकार मी कधीच विसरणार नाही. विकासकामे करून तुमच्या या उपकाराची व्याजासकट परतफेड करून देईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली.

सर्व आदिवासींना पेन्शनची योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग सुरू करून धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी औद्योगिक क्रांती घडून येणार असून, लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी आपल्या ऊसाला चांगला भाव देऊन त्यापासून इथेनॉलनिर्मिती करून इंधनाची बचत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करेल. यातून देशाचे करोडो रुपये वाचतील आणि आदिवासींसाठी विविध योजना आणून तुमचा विकास करता येईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला संबोधित केले. काँग्रेसची लबाड टोळी आदिवासींना आरक्षण काढण्याबाबत दिशाभूल करीत आहे. आम्ही आता ४० हजार आदिवासींना वनजमिनी देण्याची तरतूद करणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यात लवकरच वैद्यकीय महाविद्यालयासह इतर सर्व कामांची पूर्तता केली जाणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. गावितांचा आदिवासी बोलीभाषेत संवाद

यावेळी भाजपाच्या नंदुरबार लोकसभा उमेदवार डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत १ लाख ५२ हजार महिलांना वितरित करण्यात आले असून सहा लाख लोकांना याचा फायदा होत आहे. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये आमसूलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या ठिकाणी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सोलर प्रकल्प देण्यात आले आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत दिल्ली दीड लाखांहून अधिक लाभार्थींना घरकुल दिल्याचा दावाही त्यांनी केला. या वेळी गावित यांनी आदिवासी मायबोली भाषेत आलेल्या आदिवासी बांधवांना पाच वर्षांत केलेल्या कामाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी यावेळी माजी खासदार माणिकराव गावितांना विकासकामांवरून थेट आव्हान दिले.

नागरिकांना गरम पाण्यानेच समाधान

नंदुरबारसह परिसरात तापमानाचा पारा ४० अंश असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा परिसरात सात ते आठ पाण्याचे टँकरने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तापत्या उन्हात आलेल्या नागरिकांना गरम पाणी पिऊन समाधान मानावे लागले. या वेळी लाखाहून अधिक जनसमुदाय असल्याने नियोजन कोलमडले होते. पंतप्रधान मोदी हे नंदुरबार येथे हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता दाखल झालेत आणि तब्बल तासाभरानंतर मार्गस्थ झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणत्या राजाची सद्सद्विवेकबुद्धी कुठे? मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

$
0
0

नाशिक:

महाराष्ट्राचा जाणता राजा शरद पवारांच्या प्रचाराची पातळी घसरली असून, त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सध्या त्यांच्या बरोबर नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शरद पवार निवडणुकांपूर्वी शतक मारायला आले; परंतु मोदींच्या गुगलीने ते थेट बारावे खेळाडू ठरल्याचा हल्लाबोल करीत, फडणवीस यांनी छगन भुजबळांनाही लक्ष्य केले. भुजबळांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख बहुरूपी नेता असा केला. सध्या सर्वत्र बहुरूपी फिरतो आहे. मात्र, हा बहुरूपी काय स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढाईत गेला होता का, असा सवाल त्यांनी केला.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित विजय संकल्प सभेत फडणवीस बोलत होते. देशात महायुतीची लहर सुरू आहे, असे सांगत, या लहरीपुढे विरोधक डगमगल्याचा आरोप केला. जाणते राजे शरद पवार सध्या आमच्यावर बेछूट टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सध्या त्यांच्याबरोबर नसल्याचा टोला फडणवीस यांनी या वेळी लगावला. राष्ट्रवादीची स्थिती सध्या खराब आहे. शरद पवार मोठ्या जोशात निवडणुकांपूर्वी देशात शतक मारायला निघाले होते. मात्र, बदलती हवा बघून आणि मोदींनी टाकलेल्या गुगलीने पवार थेट बारावे खेळाडू ठरल्याचा टोला त्यांनी लगावला. छगन भुजबळ यांचे थेट नाव न घेता, हा बहुरूपी सध्या जोरदार टीका करतोय. भ्रष्टाचार केला म्हणून हे महाशय जेलमध्ये गेले, असा टोला हाणत, मोदींच्या राज्यात भ्रष्टाचाऱ्यांची जागा जेलमध्येच असल्याचा दावा केला. नारपार आणि नदीजोड प्रकल्पासंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत; परंतु, गुजरातला गेलेले पाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे परत आले, असा दावा त्यांनी या वेळी केला.

आठवलेंचा कवितावर्षाव

सभास्थळी आगमन झाल्यानंतर रामदास आठवलेंनी आपल्यातील कवीला जागे करीत सभेचा ताबा घेतला. काँग्रेस आणि राहुल गांधीच्या विरोधातील कविता सादर करून त्यांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. 'नरेंद्र मोदी चौकीदार है, राहुल गांधी भागीदार है, नरेंद्र मोदी विकासपुरुष है, राहुल गांधी भकास पुरूष है', मोदी फकीर, राहुल लकीर', 'लोक म्हणताहेत नको काँग्रेसची खादी, आम्हाला हवेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी' या आठवलेंच्या कवितांनी चांगलीच रंगत आणली. संविधानामुळेच मोदी पंतप्रधान झाल्याचे सांगत, जो संविधानाला विरोध करेल, त्याचा सत्यानाश होईल, असा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी ७२ हजार देऊन गरिबी दूर करण्याचा खोटा दावा केल्याचा आरोप त्यांनी केला. आठवले यांचे भाषण सुरू असतानाच, मोदी सभास्थळी दाखल झाल्याने आठवलेंना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - नाण्यांची ओळख

$
0
0

प्रवासी भारतीय महात्मा गांधी

डॉ. प्रमोद पाठक, नाशिक

- -

महात्मा गांधी अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेत स्थायिक होते. त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी सुचविल्याने ते १९१५ साली भारतात परतले. भारताबाहेर, परदेशात राहणाऱ्या भारतीयांची आत्मियता जाणून घेऊन काही वर्षांपासून अनिवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. सुमारे २१ वर्षे महात्मा गांधी अनिवासी भारतीय होते हे लक्षात घेऊन त्यांच्या भारतात परतण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने १० रुपये दर्शनी किंमतीचे नाणे २०१५ साली काढले. या नाण्याचे विशेष असे की हे नाणे कंकणाकृती वलय असलेले आहे. याच्या मध्यभागी स्टेनलेस स्टीलच्या मध्यभागावर महात्मा गांधींचा तरूण असताना आणि म्हातारपणातील अर्ध पुतळ्यांची छायाचित्रे आहेत. त्याच्या जवळच महात्मा गांधी असे लिहले आहे. नाण्याच्या कडेने पितळी कंकणावर वरच्या भागात 'दक्षिण आफ्रिकासे वापसी' आणि खालच्या भागात 'शताब्दी स्मरणोत्सव' असा मजकूर देवनागरीत आणि इंग्रजीत आहे. दहा रुपयाची नाणी लोकांनी लवकर स्वीकारली नाहीत. त्याचे कारण एक तर ती इतर नाण्यांपेक्षा आकाराने मोठी आणि जड होती. तसेच या नाण्यावरील चित्रात आणि मजकूरात वारंवार बदल करण्यात आले. नेहमी ती नाणी हाताळणाऱ्यांना बरीच वर्षे ती बनावट वाटत होती. या दहा रुपयांच्या नाण्यांत झालेले बदल आणि छायाचित्रे अभ्यासण्यासारखी आहेत.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images