Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिन्नरमध्ये भैरवनाथाचा जयघोष

$
0
0

गंगाजलाच्या कावड्यांची मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्री भैरवनाथची यात्रोत्सवास गुरुवारी (दि. १८) पहाटेपासून प्रारंभ झाला. अलोट गर्दीत रथ व गंगाजलाच्या कावडींची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. कुस्त्यांची दंगल शुक्रवारी (दि. १९) होणार आहे.

पहाटे पाच वाजता महाआरती त्यानंतर सकाळी सहा वाजता भैरवनाथाचे मुख्य पुजारी हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. गंगावेस भागातून भैरवनाथ महाराजांच्या रथाची व कावडधारकांची गावातून मिरवणूकीस ढोल-ताशासह, टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. रथाच्या मागे शेकडो कावडीधारक खांद्यावर विविध आकारात आकर्षकपणे सजविलेल्या कावडी घेऊन अनवानी चालत होते.

घराघरासमोर रथ आल्यानंतर सुवासिनींकडून रथाचे पूजन करीत दर्शन घेतले. रथाच्या जुवावर हजारो नारळ वाढविण्यात आले. तसेच कावडीधारकांचे पूजन करण्यात आले. हा सोहळा बघण्यासाठी सर्व सिन्नरकरांनी लक्षणीय उपस्थितीत त्यानंतर कावडीतून आणलेल्या गंगोदकाने भैरवनाथाच्या मूर्तीला अभिषेक घातला. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. यात्रोत्सवानिमित्त मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुलांसाठी खेळणी व मिठाईची दुकाने थाटण्यात आली आहे.

बैलजोडी जुंपण्यासाठी चढाओढ

रथाच्या मार्गावर महिलांनी सडा-रांगोळ्यांनी रस्ता सजविला. मिरवणुकीसाठी देवस्थानच्या मालकीचा आकर्षक लाकडी रथ असून शहरातील पाचोरे कुटुंबाकडे रथ हाकण्याचा मान होता. रथाला बैलजोडी जुंपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली. कासराभर अंतर रथ पुढे गेला की दुसरी जोडी रथला जुंपण्यात येत होती.

कावडीधारकांकडून प्रबोधन

रथ मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही कावडीधारकांनी समाजप्रबोधन करणारे फलक झळकविले. सिन्नरमधील कावडीधारक राजाभाऊ देवकर यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत 'जय जवान जय किसान' तसेच शेतकरी आत्महत्याबाबतचे लक्ष वेधण्यासाठी 'नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी' असा संदेश दिला. धीरज काळे यांनी पर्यावरण संरक्षणाबरोबर वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. अनेक पर्यावरणपूरक संदेश बालगोपाळांनी यात्रेत सहभागी होऊन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तडीपारीवरून वादंग

$
0
0

डॉ. कराडांचे पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप; आंदोलन छेडण्याचा इशारा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय गुन्हेगारीची ढाल बनवून पालकमंत्री गिरीश महाजन, मूठभर मालक आणि काही पोलिस कामगार चळवळ देशोधडीला लावण्याचा उद्योग करीत असल्याचा गंभीर आरोप भारतीय ट्रेड युनियनचे (सिटू) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला. राज्य सरकारने विनाशर्थ ही नोटीस मागे घेतली नाही, तर सीटू तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कराड यांनी दिला आहे.

पोलिस प्रशासनाने बुधवारी डॉ. कराड यांना विविध गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तडीपार कार्यवाहीबाबत नोटीस बजावली होती. याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉ. कराड यांनी सीटू भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सीटूचे सर्व पदाधिकारी आणि इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड उपस्थित होते. डॉ. कराड यांनी स्पष्ट केले, की सीटूप्रणित कामगार संघटनांचे अस्तित्व हजारो कंपन्यांमध्ये आहे. नाशिकमधील दोनशेहून अधिक कंपन्यांमध्ये कामगार संघटना अस्तित्वात आल्यानंतर कंपन्या व कामगारांचा फायदा झाला. मात्र, अनेकदा कंपनीमालक स्वत:च्या फायद्याचा विचार करतात. तिथे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते. त्यातून गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर ही आमचे धोरण आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजनांना कामगारांचे भले पाहवत नाही. कामगार संघटनांना विरोध करणारे काही मालक, पोलिस आणि महाजन यांनी मिळून तडीपारीचा घाट घातला असल्याचे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले. माझ्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न असे काही गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अशा तीन गुन्ह्यांमधून कोर्टाने मला निर्दोष सोडले. उर्वरित आंदोलनाच्या गुन्ह्यांचे कारण पुढे करून तडीपारीची कार्यवाही सुरू करण्यात आली. सर्वसामान्य कामगार, अन्याय पीडितांसाठी आंदोलन करणे, त्यांना न्याय मिळवून देणे हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाने पालकमंत्री आणि पोलिस सर्वसामान्यांचा आवाज दडपण्यासाठी लोकशाहीची हत्या करीत असल्याचा गंभीर आरोप डॉ. कराड यांनी केला. या जुल्मी कार्यवाहीविरोधात आम्ही कोर्टत दाद मागणार आहोत. पण, सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही तर कामगार रस्त्यावर उतरतील. पुढे त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला.

...

भाजपविरोधात काम केल्याने तडीपारीची घाई

दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही भारतीय जनता पार्टीविरोधात काम करीत आहोत. भाजपाविरोधात काम केले की एसीबी, ईडी आणि पोलिसांचा वापर केला जातो, हे लपून राहिलेले नाही. पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सीटूने सुरू केली आहे, असे ते म्हणाले.

...

गिरीश महाजनांचा 'इगो' दुखावला

पालकमंत्र्यांच्या एका मित्राच्या कंपनीत युनियन सुरू करण्याबाबत कामगार आग्रही होते. त्यानुसार आम्ही मालकाशी बोलणे सुरू केले. त्याचदरम्यान पालकमंत्र्यांनी फोन करून कामगार युनियनबाबत आस्ते कदम घेण्याची विनंती केली. त्यावर कंपनीने कायदा व नियमांचे पालन करावे, असे मी सांगितले. कामगारांना न्याय मिळवून देण्याची आमची मागणी पालकमंत्र्यांना जिव्हारी लागली आणि पुढे तडीपारीची कार्यवाही सुरू झाली, असा आरोप डॉ. कराड यांनी केला.

...

इंटकची मदत

प्रशासनाने तडीपारीबाबत दिलेली नोटीस हा राजकीय सूड असून, त्यास विरोध दर्शविण्यासाठी इंटकचा डॉ. कराड यांना पाठिंबा असेल, अशी भूमिका अध्यक्ष छाजेड यांनी मांडली. आंदोलनकर्त्यांना सराईत गुन्हेगारांमध्ये ढकलण्याची सरकारचे धोरण निश्चितच चुकीचे असून, त्या विरोधात सर्वच पातळीवर विरोध दर्शविण्यात येईल, असे छाजेड यांनी स्पष्ट केले.

...

तडीपारीसाठी गुन्हेगारी हाच निकष

डॉ. कराड यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की गुन्हेगारी पार्श्वभूमी हाच निकष वापरून तडीपारीची कार्यवाही केली जाते. मात्र, डॉ. कराड याआड राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉ. कराड यांनी घेतलेली पत्रकार परिषद हा पोलिसांवर तसेच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून, त्याची नोंद घेतली असल्याचा इशारा पोलिसांनी दिला.

...

सुनावणी ७ मे रोजी

डॉ. कराड यांना दिलेल्या नोटिसीत आज, १८ एप्रिल रोजी हजर राहून बाजू मांडण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार डॉ. कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहायक पोलिस आयुक्त इश्वर वसावे यांच्या कार्यालयात हजेरी लावली. आपली बाजू मांडण्यासाठी वेळ हवा अशी विनंती पक्षकारांनी केली. त्यानुसार पुढील सुनावणी ७ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

...

पालकमंत्री, काही मालक आणि पोलिस मिळून कामगार चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन प्रशासन कामाला लागले आहे. मात्र, मालकधार्जिणे हे धोरण कामगार गाडल्याशिवाय राहणार नाही.

- डॉ. डी. एल. कराड, राज्य अध्यक्ष, सीटू

....

तडीपारीची कार्यवाही एकाच दिवसात झालेली नाही. गेल्या जून महिन्यातच याबाबत प्रस्ताव आला होता. मध्यंतरी एका हत्येच्या गुन्ह्यात त्यांना कोर्टाने दोषी ठरविले. त्यामुळे नवीन प्रस्तावानुसार काम सुरू झाले. सध्या ही प्रक्रिया सुरूच असून, डॉ. कराड यांनी बाजू मांडल्यानंतरच पुढे निर्णय होत असतो. डॉ. कराड यांच्यावरील कार्यवाही ही गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळेच सुरू झाली आहे. या कार्यवाहीमागे कोणताही राजकीय दबाव नाही.

- अमोल तांबे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तालुक्यात तरुणाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : ठाणगाव (ता. सिन्नर) येथील तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामदास बबन काकड (३०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. रामदास काकड याने बुधवारी (दि. १७) सायंकाळी आपल्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. यानंतर त्यास प्रथम ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

रिक्षा पलटल्याने

तीन जण जखमी

नाशिक : भरधाव ऑटोरिक्षा पलटी झाल्याने तीन जण जखमी झाले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात सीबीएस ते राजीवगांधी भवन या दरम्यान झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. रेखाबाऊ मिलिंद सोनवणे (४५), मीनाबाई भाऊसाहेब सूर्यवंशी (५० रा. दोघी कळवण) आणि मनोज विजय सोनवणे (३०, रा. भारतनगर, मुंबई नाका) अशी जखमींची नावे आहे. दोन्ही प्रवासी महिला गुरुवारी (दि. १८) दुपारी विवाहसोहळ्यानिमित्त विसे मळा भागात जाण्यासाठी रिक्षा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव रिक्षा सीबीएसकडून कॉलेजरोडच्या दिशेने जात असतांना राज्य उत्पानद शुल्क विभागासमोर पलटी झाली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची संपेना दहशत

$
0
0

पिंपळगाव बहुल्यात भरदिवसा मांडले ठाण

...

- बछड्यांसह मादीचा वावर

- भावले मळा लावला पिंजरा

- शेतकऱ्यांमध्ये भीती

...

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पिंपळगाव बहुला येथील भावले मळा परिसरात बिबट्याने ठाण मांडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. भागुजी भावले यांच्या मळ्यात गुरुवारी दिवसभरात अनेकदा बिबट्या दिसला असून, तो उसात दबा धरून बसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. ही बिबट्याची मादी असण्याची शक्यता असून, तिचे बछडेही आसपास असण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाने याठिकाणी पिंजरा लावून शोधकार्य सुरू केले आहे.

बुधवारी दिलीप नागरे यांच्या शेतात बिबट्याने श्वानाची शिकार केली. यानंतर भावले यांच्या मळ्यात शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा आवाज शेतकऱ्यांच्या कानावर आला. याबाबत स्थानिक पोलिस व वन विभागाला शेतकऱ्यांनी माहिती दिली. बिबट्याच्या धाकाने स्थानिक शेतकऱ्यांनी हातात दांडके घेत ऊसाच्या शेतात पहाणी केली. परंतु, बिबट्या दिसेनासा झाला असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माघारी जाणे पसंत केले.

बहुतांश शेती भाग असलेल्या पिंपळगाव बहुला शिवारात बिबट्याचा शिरकाव नित्याचाच आहे. दोन महिन्यांपूर्वी अशोक संतू भावले यांच्या शेतातील वासराला बिबट्याने ठार केले होते. यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविला होता. दरम्यान, बुधवारी नागरे यांच्या मळ्यात बिबट्याने श्वानावर हल्ला करीत ठार केले. गुरुवारी पुन्हा भावले यांच्या मळ्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मळे परिसरात बिबट्या आल्याने स्थानिक तरुणांनी एकच गर्दी केली. हातात मिळेल ती वस्तू घेत बिबट्याच्या माघावर तरुण धावू लागले होते. परंतु, ऊसाच्या दाट शेतात बिबट्या लपून बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जाधव टीमसह भावले यांच्या मळ्यात दाखल झाले होते. अन्न व पाण्याच्या शोधात पिंपळगाव बहुला शिवारात नेहमीच बिबट्यांचा शिरकाव होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

शेतात काम करणाऱ्या मजुरांनी भरदिवसा बिबट्याचा आवाज ऐकला. वन विभागाने पिंजरा लावला असूनही बिबट्याने बुधवारी श्वानाची शिकार केली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.

- युवराज भावले, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांत ‘कार्टूनवॉर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून, उमेदवारांसह राजकीय पक्ष एकीकडे प्रचार सभा आणि रॅलींवर भर देत असतानाच दुसरीकडे उमेदवारांमध्ये 'कार्टूनवॉर' रंगले आहे.

महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ आणि अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटेंमध्ये सुरू झालेल्या या 'कार्टूनवॉर'ची सध्या मतदारसंघात चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेकडून भुजबळ आणि अॅड. कोकाटे यांच्यासंदर्भातील 'एक पैसे खाणारा, तर दुसरा मते खाणारा' अशा आशयाचे कार्टून सोशल मीडियावर फिरत आहे. दुसरीकडे गोडसे आणि भुजबळांची मिलिजुली असल्याचे सांगत 'एक पैसे खाणारा, तर दुसरा निष्क्रिय' अशा आशयाचे कार्टून कोकाटे समर्थकांकडून व्हायरल केले जात आहे. भुजबळांकडून मात्र 'नाशिकचा विकास पिछाडीवर' अशा आशयाचे कार्टून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, अपक्ष अॅड. कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात चौरंगी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण आता तापायला लागले असून, उमेदवारांनी, तसेच त्यांच्या पक्षाने विरोधी पक्षांचा सामना करण्यासाठी सर्वप्रकारच्या टीम सज्ज ठेवल्या आहेत. एकीकडे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे नेते मैदानावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतानाच सोशल मीडियावरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचार आता शेवटच्या टप्प्याकडे झुकत असतानाच उमेदवारांनी मैदानावर चौकसभा आणि रॅलीला प्राधान्य दिले आहे. पक्षांकडून मोठ्या नेत्यांच्या सभांना प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे उमेदवारांची एक टीम आता सोशल मीडियाच्या प्रचारात गुंतली असून, उमेदवारांच्या कर्तृत्वाचा, तर विरोधी उमेदवारांच्या दोषांचा पाढा वाचला जात आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर या उमेदवारांनी आता कार्टूनवॉर सुरू केले आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्टून काढत तो कसा मते खाण्यासाठी इथपासून ते निष्क्रियतेपर्यंतची री ओढली जात आहे. गोडसे समर्थकांकडून एकाच वेळी समीर भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंमध्ये असलेल्या मिलिजुलीचे कार्टून सोशल मीडियात व्हायरल करण्यात येत आहे. कोकाटेंना मत म्हणजे भुजबळांना मत अशा आशयाचे कार्टून गोडसे समर्थकांकडून फिरवले जात आहेत. दुसरीकडे कोकाटे समर्थकांकडून गोडसे-भुजबळ मिलिभगत असल्याचे सांगत एक पैसे खाणारा, तर दुसरा निष्क्रिय असल्याचे कार्टून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये रंगलेल्या अनोख्या कार्टूनवॉरची मतदारांमध्ये चर्चा आहे.

--

भुजबळांकडून अनोखे पोस्टर्स

गोडसे आणि कोकाटे समर्थकांकडून एकमेकांवर कार्टूनद्वारे चिखलफेक केली जात असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याकडून मात्र वैयक्तिक चिखलफेक टाळत नाशिककरांना काय हवंय आणि गेल्या पाच वर्षांत नाशिक कसे मागे राहिले, याबाबतची पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत. रोजगार, उद्योग, विकास यासह महिला सुरक्षेशी संबंधित पोस्टर्स राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर टाकली जात आहेत. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपात न रंगता भुजबळांनी मतदारांची नेमकी नस ओळखत त्यांना काय हवंय यावरच भर दिल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा मंचतर्फे आज शिबिर

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bसीमेपल्याडचा दहशतवाद, विदेशी शत्रूंचे षडयंत्र, नक्षलवादासारख्या प्रश्नांची आव्हाने या सर्व मुद्द्यांविरोधात प्रबोधन करण्यासाठी साकारलेल्या राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचतर्फे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता पहिले विशेष मार्गदर्शन शिबिर पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटर येथे होणार आहे.

शिबिरास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व वरिष्ठ नेते इंद्रेशकुमार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय न्यू भारत फाउंडेशनच्या राष्ट्रीय महासचिव रेश्मा सिंह आणि बॉलिवूडचे निर्माते व लेखक अभिनव सिंह हे ही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे राजेंद्रसिंह चव्हाण, भुवाल सिंह आणि प्रल्हाद सिंह रघुवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

'मिशन शक्ती' या मोहिमेंतर्गत 'सबका साथ, सबका विकास' या बोधवाक्यानुसार सामाजिक समरसतेचा संदेश या शिबिरात देण्यात येणार आहे. काही वर्षांपासून देशात जातीभेद, कट्टरता आदी विषय चर्चिले गेले. सामाजिक घडामोडीही मोठ्या प्रमाणावर घडल्या. या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुनील सिंह परदेशी, विपुल सिंह व विरेंद्र सिंह परदेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीची कीर्तिध्वजा...

$
0
0

सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची पावले गडाकडे वळत असून, गुरुवारी सायंकाळी गडावर कीर्तिध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. गडावरील शिखरावर गुरुवारी मध्यरात्री ही कीर्तिध्वजा फडकविण्यात आली. या वेळी 'जय अंबे', सप्तशृंगीमातेच्या जयघोषाने सप्तशृंगगड दणाणला होता.

वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेनिंगसाठी समन्वय अधिकारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अधिकाऱ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून आता त्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील ट्रेनिंग दिले जाणार आहे. हे ट्रेनिंग आता विधानसभानिहाय होणार असून, त्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ट्रेनिंगमध्ये क्लासरूम ट्रेनिंग व ईव्हीएम हँड्स ऑन ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाधिकारी व 'म्हाडा'चे मुख्याधिकारी रमेश मिसाळ यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कळवण येथे हेमांगी पाटील, चांदवड येथे कैलास कडलग, येवला येथे अर्जुन श्रीनिवास, निफाड येथे कुंदन सोनवणे, दिंडोरीत नितीन गवळी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात एमटीडीसीचे नितीन मुंडावरे, नाशिक पूर्व येथे आप्पासाहेब शिंदे, नाशिक मध्यमध्ये गीतांजली बाविस्कर, नाशिक पश्चिम येथे विठ्ठल सोनवणे, देवळालीत अरुण आनंदकर, इगतपुरीत प्रकाश थविल यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

--

अन्य कामेही मार्गी

याअगोदर हे ट्रेनिंग सर्वांना दिल्यानंतर पुन्हा हे ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी कोणताही तांत्रिक गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. या ट्रेनिंगबरोबरच निवडणुकीसाठी असलेली विविध कामेदेखील सध्या वेगाने मार्गी लावली जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाळी पावसानंतर पंचनामे कामास गती

$
0
0

१३२७ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या पावसामुळे ११७७ हेक्टरमध्ये कांदा, भाजपीला, गहू या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच १५० हेक्टरमध्ये द्राक्षे, डाळिंब, लिंबूचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.

नाशिकसह जिल्ह्यात रविवारी (दि. १४) अवकाळी पाऊस झाला. त्याचा फटका भाजीपाला व फळांच्या पिकांनाही बसला. आचारसंहिता लागू असल्याने या नुकसानीचे पंचनामे होईल का, शासनाकडून मदत मिळेल का, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (दि. १७) पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसामुळे मालेगाव, सटाणा, निफाड, नाशिक, सिन्नर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असतांना अवकाळी पावासाने शेतकऱ्यांचे हातात आलेल्या पिकांचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे पाऊल उचलत त्यांना दिलासा दिला आहे.

चारा छावण्यासाठी प्रस्ताव

जिल्ह्यात चारा छावणीसाठी येवला तालुक्यातील दोन प्रस्ताव आलेले आहे. तर मालेगाव येथे विचारणा केली आहे. शासनाच्या निकषांनुसार या छावण्या संस्था किंवा वैयक्तिक चालवण्यासाठी दिले जाते. अगोदर त्यांचे प्रस्ताव मागितले जाते. त्यानंतर त्यांना अनुदान स्वरुपात पैसे दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम विभागाचा कारभार ढेपाळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेपाठोपाठ विभागीय कार्यालयांचाही कारभार ढेपाळल्याचा अनुभव पुन्हा आयुक्त राधाकृष्ण गमेंनी गुरुवारी घेतला. पश्चिम विभागीय कार्यालयात गमेंनी भेट दिली असता, या ठिकाणी पुन्हा अनागोंदीचे दर्शन घडून आले. घरपट्टी-पाणीपट्टीची ढेपाळलेली वसुली, अधिकारी कर्मचाऱ्यांचे गायब होणे आणि कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये समन्वय नसल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. त्यामुळे गमेंनी विभागीय अधिकारी नितीन नेर यांची कानउघाडणी करत, कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयुक्त गमेंनी विभागायी कार्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे कामकाज सुरू केले आहे. विभागीय कार्यालयाकडून नागरिकांशी संबधित कामकाज होत असतांना कर्मचारी अधिकारी मात्र नागरिकांची अडवणूक करत असल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्त गमे यांनी पश्चिम विभागीय कार्यालयाला गुरुवारी भेट देत कामकाजाची माहिती घेतली. विभागीय कार्यालयातील प्रत्येक उपविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडील कामाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी अनागोंदीच समोर आली. घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली खुपच कमी झाल्याचे समोर आले. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. घरपट्टीच्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचे तर पाणीपट्टीच्या थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या.

कामाचे असमान वाटप

काही कर्मचाऱ्यांकडे भरपूर काम, तर काहींकडे कामच नसल्याचे समोर आले. त्यामुळे कामाच्या असमान वाटपावरून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची हजेरीही यावेळी तपासण्यात आली. विभागीय कार्यालयातील या अनागोंदी प्रकरणी गमेंनी नितीन नेर यांना जाब विचारत, कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरीक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता संजय घुगे तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारेचा स्पर्श; ट्रकमधील एक ठार म टा वृत्तसेवा निफाड गुरुवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

खेडलेझुंगे शिवारातील एक्स्प्रेस कॅनॉलजवळ महावितरणच्या वीज तारेचा ट्रकला स्पर्श होऊन झालेल्या अपघातात एक जणांचा जागीत मृत्यू तर अन्य दोघे जखमी झले. बाळू मल्हारी पाठक (वय ५३, रा. नैताळे) असे वीज धक्क्यात बळी गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तळेवाडी येथील अमोल साबळे यांच्या घरी शेणखत घेऊन ट्रक (एमएच १५ बीजे१) आला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास शेणखत टाकून झाल्यानंतर लासलगाव येथे परतणाऱ्या ट्रकला खेडलेझुंगे फिडर क्रॉसिंगवर वीज तारांचा स्पर्श झाला. ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला चालक आणि इतर दोघांना विजेचा जोरदार शॉक बसला. यात एक जण ठार तर अन्य दोघे जखमी झाले. पप्पू पाठक आणि प्रेमकुमार यादव अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. त्यांच्यावर निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक देवीदास लाड, हवालदार मधुकर उंबरे, नाईक कैलास महाजन पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी धावणार ४८६ बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेच्या कामासाठी जिल्ह्यात तब्बल ४८६ बस लागणार आहेत. जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी हे प्रमुख लोकसभा मतदारसंघ आहेत, तर धुळे लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी बसची व्यवस्था नाशिकच्या विविध डेपोंतून केली जाणार आहे.

या बसची संख्या वारंवार बदलत असल्यामुळे त्याला अद्याप अंतिम स्वरूप दिले गेलेले नाही. पण, त्यासाठी मात्र आराखडा तयार केला आहे. त्यात नाशिक डेपोमधून नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी (४३), मध्य विधानसभा मतदारसंघासाठी (१८), पश्चिम मतदारसंघासाठी (३७), देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी (२९), बस दिल्या जाणार आहेत. त्यानंतर मालेगाव डेपोतून मालेगाव मध्य (२९), मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी (२९), बस देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कळवण डेपोतून (४०), मनमाड (३८), नांदगाव (४४), सिन्नर (४६), येवला (४१), लासलगाव (४१), इगतपुरी (२७), पिंपळगाव बसवंत (२६) बस पुरविल्या जाणार आहेत.

विधानसभानिहाय नियोजन

या सर्व बसेसवर व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम राहणार आहे. त्यामुळे बस कोठे आहे, ती कोठे थांबली, ती कोणत्या मार्गाने गेली, हे निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बघता येणार आहे. या सर्व बसचे नियोजन अगोदर विधानसभानिहाय केले जाणार आहे. त्यानंतर या बस मतमोजणीच्या ठिकाणी जाणार आहेत. दोन दिवसांच्या आसपास या बसचा वेळ या प्रक्रियेत जाणार असल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर जय अंबेचा जयघोष

$
0
0

गडाच्या शिखरावर फडकली कीर्तीध्वजा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी मातेचा चैत्रोत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी गडावर कीर्तीध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गडावरील शिखरावर गुरुवारी मध्यरात्री ही कीर्तिध्वजा फडकविण्यात आली.खान्देशसह नाशिक जिल्ह्यातील भाविकांनी 'जय आंबे', सप्तशृंगी माता की जय, अशा जयघोषाने सप्तशृंग गड दणाणला होता.

गडावर ध्वज मानकरी एकनाथ गवळी व त्यांचा परिवार तसेच न्यायाधीश स्वरा पारखी, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, उषा शिंदे, उन्मेष गायधनी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, पोलिसपाटील शशिकांत बेनके आदींच्या हस्ते ध्वजपूजन करून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव चौबे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, माजी उपसरपंच गिरीधर गवळी, ग्रामपंचयात सदस्य गणेश बर्डे आदी उपस्थित होते.

खान्देशासह देशभरातून आलेले हजारो भाविक, स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजाची वाजत गाजत मिरवणूक देवस्थान ट्रस्ट कार्यालयापासून ते पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर दरेगावच्या एकनाथ गवळी व गवळी परिवारातील सदस्यांनी रात्री बारा वाजता गडाच्या माथ्यावर ध्वज फडकवला.

यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडाच्या शिखरावर कीर्तिध्वजा फडकवण्याची पाचशे वर्षांची परंपरा आहे. यात्रेकरूंसाठी गवळी घराण्याकडून फडकविण्यात येणारा ध्वज कुतुहलाचा विषय ठरतो. बिकट वाट, प्रचंड अंधार नवरात्रीत तर पाऊस या सगळ्या बाबी नजरेसमोर आल्या की भल्याभल्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. मात्र कोणत्याच आपत्तींचा विचार न करता गवळी परिवारातील सदस्य गडावर ध्वजारोहण करतात.

चैत्रोत्सवाची आज सांगता

गुरुवारी भाविकांची गर्दी वाढल्यामुळे पहिल्या पायरीपासून तेरा बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी चैत्रोत्सव कालावधीत देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. शुक्रवारी सकाळी प्रधान जिल्हा न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते महापूजा होऊन चैत्रोत्सवाची सांगता होईल, असे देवस्थान ट्रस्ट मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब-ए-बारात शनिवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी शब-ए-बारातचा सण साजरा केला जातो. यंदा शनिवारी २० एप्रिल रोजी हा सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने शहरातील मुस्लिम बांधव बडा कब्रस्तान येथे दुआ व कुराण पठन करतात. तसेच भिक्षुकांना दान देण्याची देखील प्रथा आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी बडा कब्रस्तानला भेट देऊन तयारीचा आढावा घेऊन मौलाना समवेत बैठक घेतली. पोलिस बंदोबस्तात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून चौक्या, तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. शहरात याच सणाच्या दिवशी सन २००६ मध्ये कब्रस्तान परिसरात बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून सतर्कता बाळगली जात आहे. या दिवशी काही मुस्लिम संघटनाकडून शांततापूर्ण मार्गाने बॉम्बस्फोटचा निषेध करण्यासाठी धरणे दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेट’चा नाशिकला मोठा फटका

$
0
0

अन्य विमानसेवाही लांबणीवर; इंडिगो, स्पाईसजेटचा ओढा अन्य शहरांकडे

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली सेवा स्थगित झाल्यानंतर आता हिंदण, बंगळुरू, हैदराबाद, गोवा आणि भोपाळ या सेवाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. जेट एअरवेजकडे असलेले महत्त्वाच्या शहरांना जोडणारे स्लॉटस मिळविण्यासाठी इंडिगो आणि स्पाईसजेट या कंपन्यांना हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या नाशिकच्या सेवा आता दिवाळीच्या आसपास सुरू होण्याची चिन्हे आहेत.

आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजने नाशिक-दिल्ली विमानसेवा येत्या ५ मेपर्यंत स्थगित केली आहे. आर्थिक मदतीचा कुठलाही पर्याय नसल्याने अखेर जेटने देशातील सर्व उड्डाणे थांबवली आहेत. येत्या १० मे रोजी कंपनीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जेटच्या या परिस्थितीचा मोठा परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रावर होत आहे. केवळ दिल्ली सेवा बंद होण्यापुरता जेटचा फटका मर्यादित नसून नजिकच्या काळात सुरू होणाऱ्या नाशिकच्या सेवाही आता अडचणीत सापडल्या आहेत. कारण, जेट एअरवेजकडे मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसह अन्य महत्त्वाच्या विमानतळावरील सकाळ आणि सायंकाळचे स्लॉटस आहेत. देशांतर्गत तसेच परदेशातील शहरांना जोडणारे हे स्लॉटस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे स्लॉटस आपल्याला मिळावेत यासाठी इंडिगो आणि स्पाईसजेट या कंपन्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. हे स्लॉटस त्यांना उपलब्ध झाले तर मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू, दिल्ली-चेन्नई अशा महत्त्वाच्या शहरांबरोबरच दिल्ली-पॅरिस, मुंबई-पॅरिस अशा अन्य परदेशी शहरांना सेवा सुरू करण्याचा या कंपन्यांचा विचार आहे. या सेवेतून अधिक नफा कमाविण्याचा त्यांचा कयास आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम नाशिक विमानसेवेवर होणार आहे. पुढील महिन्यात इंडिगो कंपनीची नाशिक ते बेंगळुरू ही सेवा प्रस्तावित आहे. इंडिगोला जेटचे स्लॉट मिळाले तर त्यांनी मुंबईहून सेवा सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. हीच गत स्पाईसजेटचीही आहे. इंडिगोकडे नाशिक ते हिंदण आणि भोपाळ तर, स्पाईसजेटकडे नाशिक ते गोवा आणि हैदराबाद असे प्रत्येकी दोन मार्ग आहेत. या दोन्ही कंपन्यांनी आता नाशिकऐवजी मुंबई व अन्य महत्त्वाच्या शहरातील सर्वाधिक कमाईच्या स्लॉटसवर लक्ष्य केंद्रित केले आहे. परिणामी, उडान अंतर्गत असलेल्या नाशिकच्या सेवा केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पर्यटनाला दणका

नाशिकच्या अनेक पर्यटकांनी ईशान्येकडील राज्ये तसेच हिमाचल प्रदेशातील उन्हाळी सुटीचे बुकिंग 'जेट'च्या भरवशावर केले होते. रद्द झालेल्या सेवेच्या तिकिटाचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. तर, आता तिकीट काढायचे तर दर खुपच चढे झाले आहेत. तसेच, हॉटेलच्या बुकिंगसाठी काही रक्कमही दिली असल्याने आता पर्यटनाचा बेत रद्द करणेही अनेकांना अशक्य होत आहे. तसेच, ट्रॅव्हल एजंटसनी मोठ्या प्रमाणात बुक केलेल्या तिकिटांचे पैसेही अडकले आहेत.

कर्मचारी गायब

ओझर विमानतळावर 'जेट'चे सात ते आठ कर्मचारी होते. ते सर्व रजेवर गेले आहेत. काहींनी तर दुसरीकडे नोकरी शोधण्याचे काम सुरू केले आहे. तर, 'जेट'ने बंगळुरूच्या कंपनीला ओझर विमानतळावर ग्राऊंड हँडलिंगचे काम दिले होते. तो ठेकाही आता अडचणीत सापडला आहे. परिणामी, ठेकेदाराचे ३० ते ४० कर्मचारीही आता ओझर विमानतळावरून निघून गेले आहेत. त्यामुळे ४० ते ५० जणांचा विमानतळावरील वावर कमी झाला असून त्यांचा नाशिकमधील मुक्कामही बंद झाला आहे. तसेच, 'जेट'मुळे आठवड्यातील तीन दिवस तब्बल अडीचशे ते तीनशे जणांची वाहतूक विमानतळावर होत होती. त्यातील बहुतांश जण शिर्डी किंवा त्र्यंबकेश्वरला जायचे किंवा यायचे. तेही आता बंद झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांचा शहरात सुकाळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरात वृद्ध व्यक्ती झोपलेली असतांना चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून धाडसी घरफोडी केल्याची घटना नाशिकरोड भागातील आर्टिलरी सेंटररोड परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत चोरट्यांनी एलईडी टीव्हीसह मोबाइल, लॅपटॉप आणि चांदीच्या दागिणे असा सुमारे ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

सुनील रंगनाथ गाडेकर (६०, रा. ओम बंगला, कापालेश्वर सोसा. अनुराधा सिनेमा मागे) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. गाडेकर हे मंगळवारी (दि. १६) रात्री आपल्या घरात झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बैठकरूमच्या खिडकीचे ग्रिल वाकवून ही चोरी केली. चोरट्यांनी एलईडी टीव्ही, दोन मोबाइल, लॅपटॉप व चांदीच्या मूर्ती असा सुमारे ३८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

घरातून मोबाइल लंपास

उघड्या घरात शिरून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरून नेला. ही घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज मनोहर घोटेकर (रा. अक्षय चौक, पवननगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. घोटेकर कुटुंबीय २६ मार्च रोजी सायंकाळी आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची संधी साधून प्रवेश करीत चार्जिंगसाठी लावलेला सुमारे १६ हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला.

घरातून टीव्हीची चोरी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील टीव्ही चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनिता जितेंद्र चव्हाण (रा. उत्तमनगर, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. चव्हाण कुटुंबीय आंध्र प्रदेश येथे गेलेले असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील २० हजार रुपये किमतीचा टीव्ही चोरून नेला.

मालट्रकमधून

साहित्य लंपास

पार्क केलेल्या मालट्रकमधून चोरट्यांनी रोकडसह जॅक, टॉमी आणि व्हिल पान्हा असा मुद्देमाल चोरून नेला. पेठरोड भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामबच्चन बलीहारी यादव (रा. दिंडोरी रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. यादव यांचा आयशर मालट्रक (एमएच ०४ ईबी ४१७९) बुधवारी (दि. १७) शरदचंद्र मार्केट यार्ड परिसरातील एकविरा गॅरेज येथे पार्क केलेला असतांना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी कॅबिनमध्ये शिरून सुमारे सहा हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा मनसेची, धास्ती भाजपला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने सत्ताधारी भाजपची झोप उडाली असतानाच, आता मोदींच्या सभेपाठोपाठ नाशिकमध्ये होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेची भाजपने धास्ती घेतली आहे.

राज्यभर व्हिडीओ क्लिपद्वारे मोदी आणि शाह यांची पुराव्यानिशी पोलखोल करणारे राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या दत्तक नाशिकचाच बुरखा फाडणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून राज ठाकरेंना सभेसाठीचे मुद्दे देण्यात आल्याची चर्चा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कांद्याबाबतचे व्हिडीओ, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत केलेले आरोपांच्या व्हिडीओंची मनसेकडून जुळवणी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या सभेत राज ठाकरे मोदी, शाह यांसोबतच फडणवीसही रडारवर असल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसघांतील निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, प्रचारतोफा धडधडायला लागल्या आहेत. नाशिक आणि दिंडोरीत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर आहे. भाजपने नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची करीत, या दोन्ही जागा जिंकण्यासाठी थेट नरेंद्र मोदींनाच नाशिकच्या मैदानात उतरवले आहे. येत्या २२ तारखेला नरेंद्र मोदींची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपला कांदेफेक, हुल्लडबाजी आणि सापांच्या चिंतेने सतावले आहे. मोदींची सभा यशस्वी करण्याची चिंता सतावत असतानाच, आता २६ एप्रिलला नाशिकमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळे मोदींच्या सभेने कमावलेले ठाकरेंच्या सभेमुळे गमावण्याची भीती भाजपला वाटत आहे. राज ठाकरेंच्या राज्यभरातील सभा यशस्वी ठरत असून मोदी, शाहविरोधातील वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरत आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंकडून स्थानिक मुद्द्यांना हात घातला जात असून, मोदी आणि शाह यांचे व्हिडीओ दाखवून महायुतीच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत. नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीत कांद्याला भाव देण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसंदर्भात केलेल्या वक्तव्यांचा समावेश आहे. शहर विकास नियंत्रण नियमावलीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत आश्वासन देऊनही खाल्लेल्या पलटीचीही आठवण नाशिकला करून दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांकडून मनसेच्या गोटात काय चालू आहे, याची चाचपणी केली जात आहे.

विकासाचा भांडाफोड होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेऊनही नाशिकच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. गेल्या दोन वर्षांत नाशिकचा विकास होण्याऐवजी नाशिकमधील प्रकल्प हे गुजरात आणि नागपूरला पळवले गेले. उद्योग, नाशिकच्या बोटी पळवल्या, वनविभागाचे कार्यालय नागपूरला हलवले, नायपर नागपूरला पळवली, कांद्याचे केंद्र दिल्लीत हलवले. अनेक शासकीय कार्यालये स्थलांतरीत केली. त्यामुळे या सगळ्यांचा भांडाफोड ठाकरेंकडून या जाहीर सभेत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या सभेची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मनसेची कॉपी

महापालिकेत मनसेची सत्ता असताना, राज ठाकरेंनी सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली होती. परंतु, सत्ता जाताच भाजपने यातील काही विकासकामांवर वरवंटा फिरवला आहे. काही कामांची स्मार्ट चोरी केली आहे. चिल्ड्रन पार्क, बोटॅनिकल गार्डन, संगीत कारंजा, महाकवी कालिदास कलामंदिर यांच्यासह अनेक मनसेचे प्रकल्प हे थेट स्मार्ट सिटी योजनेत दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेच्या प्रकल्पांकडून करण्यात आलेल्या कॉपीची जाहीर वाच्यता ठाकरेंकडून केली जाण्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे भाजपसह सेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ परतला मृत्यूदारातून!

$
0
0

इंचभर जाडीची सळई काढल्याने कामगार बचावला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोटात आरपार घुसलेली इंचभर जाडीची सळई आणि मरणांतिक वेदनेने घायाळ झालेला तो हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टरही क्षणभर सुन्न झाले. आता हा काही वाचणार नाही, हेच भाव तिथे उपस्थितांच्या चेहऱ्यावर होते. परंतु, सर्जन सचिन देवरे यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला मरणाच्या दारातून परत आणले.

अंबड येथील कंपनीत काम संपवत असताना १५ एप्रिल रोजी सचिन गौतम या तरुणावर हा प्रसंग ओढावला. अनावधानाने त्याच्या सहकाऱ्याकडून सीएनसी मिशन सुरू झाले आणि बघता बघता एक इंच जाडीची आटे असलेली सळई स्क्रू पिळावा तशी फिरत फरत सचिनच्या पोटात उजवीकडून घुसून डाव्या बाजूने बाहेर पडली. त्याचा आक्रोश ऐकून तिथे सहकारी येईपर्यंत सळई पोटातून आरपार झाली होती. सहकाऱ्यांनी समयसुचकता दाखवत सळई मशिनपासून कापून सिचनला बाजूला केले व तातडीने नजिकच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. असा सळई आरपार घुसलेला पेशंट पाहताच डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. त्यानी प्रथमोपचार देऊन सर्जन डॉ. सचिन देवरे यांना बोलावले. जवळपास तीन तास ही शस्त्रक्रिया चालली. सळईमुळे सात जागेवर मोठे भगदाड आणि छोट्या आतड्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे पडले होते. सळई बाहेर काढल्यानंतर सर्व जखमांवर योग्य ते इलाज डॉक्टरांच्या टीमने केले. अशा विचित्र व जिकिरीच्या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी कौशल्याने सिचनचे प्राण वाचवले. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून लवकरच त्याला घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 'मै जिंदा हूँ मुझे यकीन नहरं होता. मैने भगवान नही देखे, मगर मेरे डॉक्टरमे मुझे भगवान मिल गये', असे भावोद्गार सचिन गौतमने यावेळी काढले. अमोल वाजे, डॉ. नितिन फरगडे, डॉ. नितिन वाडेकर, डॉ. भोजराज गायकवाड, डॉ. सूर्यवंशी, डॉ. भोई, डॉ. राहुल वाघ यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

…………………………………डॅमेज कंट्रोल शस्त्रक्रिया

अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांना डॅमेज कंट्रोल शस्त्रक्रिया म्हणतात, ज्या तातडीच्या असतात. यामध्ये अचूक निर्णयक्षमता तसेच कौशल्य गरजेचे असते. ऋग्णाचा जीव वाचिवणे हे प्राथमिक ध्येय असते. अनेकदा एखादा अवयव काढावाही लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात महिला गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवरील बजाज शोरूमजवळ टाटा एस व टीव्हीएस स्कूटी यांच्यात झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंदूबाई रमेश पगारे (वय ६०, रा. संत कबीरनगर, भोंसला मिलिटरी स्कूलजवळ) या शुक्रवारी (दि. १९) टीव्हीएस स्कूटी (एमएच १५ एजे ४९९२) वरून पंचवटीकडून म्हसरूळकडे जात होत्या. बजाज शोरूम जवळून वैदूवाडीकडे वळण घेत असताना पाठीमागून भरघाव वेगाने दिंडोरीला सावलिया आईस्क्रीमच्या गाड्या नेणाऱ्या टाटा एस (एमएच १५ एफव्ही२५७५) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात इंदूबाई गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विद्यार्थिनीकडून शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग करण्याची घटना एका नामांकित महाविद्यालयात घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून संशयित प्राध्यापक फरार झाला आहे.

मंगेश आंबेकर (वय ३०, रा. ओझर, ता. निफाड) असे संशयिताचे नाव आहे. तो एका नामांकित महाविद्यालयात सिव्हील इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून अश्लिल वर्तन करीत होता. या विद्यार्थिनीने यासंदर्भात तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. तिच्या पालकांनी महाविद्यालयात येऊन आंबेकर यांना महाविद्यालय व्यवस्थापकांसमोर समज दिली होती. आंबेकर या विद्यार्थिनीला दुसऱ्या प्राध्यापक आणि मुलांसोबत बोलू नको असे कायम धमकावत होता. मंगळवारी (दि.१६) आंबेकर याने पीडित विद्यार्थिनीस आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. माझ्याशी का बोलत नाही असे विचारत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. विद्यार्थिनीने आडगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेली हकीकत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांना सांगितली. घटना घडली त्या दिवसापासून संशयित फरार झाला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images