Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. कराड यांना तडीपारीची नोटीस

$
0
0

दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड यांना शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. गंभीर गुन्हे दाखल असतानाही वर्तनात सुधारणा झाली नसल्याने दोन वर्षांसाठी तडीपार का करू नये, असा सवाल या नोटिसेमधून कराड यांना करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईच्या पवित्र्यामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. कराड हे अनेक वर्षांपासून कामगार चळवळीत कार्यरत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये त्यांची कामगार संघटना कार्यरत असून कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कराड यांनी अनेकदा आंदोलनांचे हत्यार उपसले आहे. परंतु, संघटनेचे सभासद नसलेल्या कामगार वर्गावर दबाव टाकून स्वत:च्या आर्थिक फायद्याचे प्रश्न कराड मार्गी लावून घेत असल्याचा आरोप या नोटीसद्वारे करण्यात आला आहे. कामगार वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कंपनीच्या मालकांवर तसेच कामगार उपायुक्तांवर दबाव आणण्याच्या कराड यांच्या कार्यपद्धतीबाबतही नोटिशीमध्ये आक्षेप नोंदविण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमविणे, कंपनीचे व्यवस्थापक, कामगारांना ठार मारण्याचा प्रयत्न, खून, मारहाण, हत्यारांचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, दमदाटी अशा स्वरूपाचे गुन्हे डॉ. कराड यांच्यावर सातपूर, मुंबई नाका, अंबड यांसारख्या पोलिस स्टेशन्समध्ये दाखल आहेत. वर्तनात सुधारणा होण्याऐवजी ते दिवसेंदिवस खुनशी होत असल्याचा ठपकाही पोलिसांनी या नोटिशीद्वारे कराड यांच्यावर ठेवला आहे.

कराड यांच्यापासून जनतेला होणारा त्रास बंद व्हावा आणि त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी तडीपारीची कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कराड यांना नाशिक शहर, जिल्हा, अहमदनगर, ठाणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार का करू नये, असा सवाल सहायक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे यांनी उपस्थित केला आहे. कराड यांना त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी गुरुवारी (दि. १८) सकाळी ११ वाजताची वेळ देण्यात आली आहे. तसेच सोबत येताना १० हजार रुपये किंमतीचा जातमुचलका किंवा तेवढ्याच रकमेचा जामीन द्यावा, असेही नोटिशीत निर्देशित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार चव्हाण ‘नॉट इन्व्हायटेड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्याचे साधे आमंत्रण भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना अद्याप भाजपने दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरणे टाळले व उघड बंडखोरी केली नाही. तरी भाजपने त्यांना आमंत्रण का दिले नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पिंपळगाव येथे २२ एप्रिल रोजी पंतप्रधानांची सभा आहे. त्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. पण, या तयारीत पक्षाच्या विद्यमान खासदारांकडेच दुर्लक्ष केले गेल्याचे समोर आले आहे. पंतप्रधानांच्या या सभेत जाणार का असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर अजून तरी सभेचे आमंत्रणच आपणस मिळाले नसल्याने त्यावर काय बोलू, असे सांगत या विषयावर बोलणे टाळले.

तब्बल तीन वेळा भाजप कडून लोकसभेत विजयी झालेले चव्हाण यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला महागात पडणार आहे. चव्हाण यांची भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आधी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे समाधान न झाल्यामुळे ते प्रचारापासून दूर आहेत. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यानंतर निर्णय घेऊ, असे त्यांनी अगोदरच जाहीर केले. पण, मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनीही अद्याप संपर्क साधला नसल्याचेही ते म्हणाले. चव्हाण नाराज असले तरी त्यांनी अद्याप भाजप सोडलेला नाही. पण, भाजपच्या प्रचारातून त्यांचे फोटो मात्र गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आखाडा, सभांनी गाजणार

$
0
0

स्टार प्रचारकांच्या सभांचा पुढील आठवड्यात धडाका

..

- नांदगाव (२१ एप्रिल) - शरद पवार

- पिंपळगाव बसवंत (२२ एप्रिल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी

- नाशिक (२४ एप्रिल) - उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

- निफाड (२५ एप्रिल) - शरद पवार

- नाशिक (२५ एप्रिल) - धनंजय मुंडे

- नाशिक (२६ एप्रिल) - राज ठाकरे

- दिंडोरी (२६ एप्रिल) - धनंजय मुंडे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला आता अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे. उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटीपेक्षा प्रचारसभा, चौकसभांसह रॅलीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभांची निश्चिती झाल्याने आता दिग्गज नेत्यांच्या तोफाही धडाडणार असल्याने प्रचाराला रंग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनी राजकीय मैदाने गाजणार असून, खऱ्या अर्थाने इलेक्शन फिवर जाणवणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, आता प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, वंचित आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये चौरंगी लढत होत आहे.

दिंडोरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपच्या जे. पी. गावित यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांसाठीचे मतदान आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठीचा आपला मोर्चा चौथ्या टप्प्यात येणाऱ्या नाशिक आणि दिंडोरीतील मतदानाकडे वळवला आहे. त्यासाठी राज्य आणि देश पातळीवरील स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही जागा महायुती आणि आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या असून, त्यासाठी दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरल्याने आता या मतदारसंघामधील राजकीय वातावरण तापणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे थंड झालेले वातावरण आता राजकीय सभांमुळे पुन्हा तापणार असल्याचे चित्र आहे.

...

चौकसभा, रॅलींचा धडाका

या दोन्ही मतदारसंघामध्ये एकीकडे दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभांनी वातावरण तापणार असतानाच आता उमेदवारांनीही वैयक्तिक गाठीभेटींऐवजी प्रचार रॅलींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. चौकसभा, कॉर्नर सभांसह मोटारसायकल रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदना जागविणाऱ्या संस्कृतीची गरज

$
0
0

अनिल अवचट यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतासारख्या महाकाय देशावर इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्ष राज्य केलं. या कालावधीत इंग्रजांनी भारताला शब्दश: लुटून नेलं. विकासाच्या नावाखाली इथं शहरे वसवली. गावांच्या संस्कृतीच्या मुळावर घाव घातला. निसर्गाचा विध्वंस केला. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या आजवरच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांचाच कित्ता गिरविला. आता विकासाचा शहरी फुगवटा दाखविणाऱ्या नाही तर संवेदना जागविणाऱ्या संस्कृतीची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व विचारवंत अनिल अवचट यांनी केले.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी 'आजची बदलती संस्कृती' या विषयावर त्यांनी विचार मांडले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी सोहनलाल भंडारी होते. समवेत राजू धाडीवाल, सुनील बुरड, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, यतीश डुंगरवाल आदी उपस्थित होते.

माणूस गावाकडून शहराकडे स्थलांतरीत झाला. शहरातही माणसा-माणसात विषमतेची दरी निर्माण झाली आहे.आपल्या शेजारच्या घरात कोण राहतो हे माहिती नाही. माणसेच माणसांच्या सुख-दु:खात सहभागी होत नाहीत. माणसांचा संवाद हरवत चालला आहे. संवेदना बोथट होत आहेत. गरजू माणसांसाठी आमचे मन आता द्रवत नाही कारण आम्ही संवेदनाहीन झालो आहोत. गावसंस्कृती होती तेव्हा असं नव्हतं. शहरांमुळे विकासाचं झगमगाटी स्वरूप दाखवलं जातं. पण ते स्वरूप खरं नाही. ती केवळ एकच बाजू आहे, असे मत अवचट यांनी मांडले. कष्टकरी वर्गातील अनेक घटक, देहविक्रय करणाऱ्या महिला, दिव्यांग, व्यसनी माणसं यासारख्या उपेक्षिक घटकांच्या भावविश्वात डोकावण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही की कुणाकडे येवढी संवेदनादेखील नाही, अशी खंतही अवचट यांनी व्यक्त केली. गौतम सुराणा यांनी सूत्रसंचालन केले.

'साधेपणानं जगा'

समाजासाठी फार काही करता नाही आलं तर खेद मानू नका; पण एक मात्र नक्की करता येणं शक्य आहे. तेवढं कराच. ते म्हणजे, 'साधेपणानं जगा. चंगळवादाला दूर ठेवा आणि अंतरास दुसऱ्यासाठी जाणीवेची ज्योत जागती ठेवा,' असा संदेश यावेळी अवचट यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची सायकलदोन दिवसापासून पडून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्मार्ट सिटीच्या शेअर सायकल योजनेतील सायकल दोन दिवसापासून गंजमाळ येथील झनकार हॉटेलजवळ पडलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज जाधव यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाणे तसेच, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही सायकल गोल्फ क्लब सायकल स्टॅण्ड येथील असावी. तेथून उचलून ती गंजमाळला टाकण्यात आल्याचा अंदाज आहे.

महापालिका आणि म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कार्पोरेशन कंपनीने नाशिकमध्ये शंभर ठिकाणी एक हजार सायकली उपलब्ध केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकरोड, जेलरोडसह शहरातही सायकलींचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. तथापि, या सायकलींचे विनाकारण नुकसान करण्याचे प्रकार वाढत आहेत. पंचशीलनगर येथे सायकलचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर त्या व्यक्तीविरुध्द कंपनीचे व्यवस्थापक सचिन मोरे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे महामार्गावरअपघातात तीन जखमीमटा वृत्तसेवा नाशिकरोडमालट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक

$
0
0

तीन जण जखमी, गुन्हा दाखल

...

नाशिकरोड : सिन्नरच्या दिशेने जाणारा कंटेनर आणि नाशिकरोडच्या दिशेने येणारा मालट्रक यांच्यात नाशिक-पुणे महामार्गावर बुधवारी पहाटे समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मालट्रकमधील दोघे, तर कंटेनरमधील एकजण असे तिघेजण जखमी झाले.

मालट्रकचा चालक मधुकर दौलत कांदे (वय ५२, रा. टाकळी, ता. जि. नाशिक) याने प्रांगावधान राखत खाली उडी मारल्याने त्यांचा जीव बालंबाल बचावला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मालट्रकचालक मधुकर कांदे यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालक सियाराम आत्माराम बिश्नोई (वय २४, रा. न्यू धानी बोर्डिया रोड, सरेलपूर, ता. अदमपुर, जि. हिसार, हरयाणा) याच्याविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. जखमींना उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गड-किल्ल्यांवरील मंदिरांचा ठेवा ‘रामभरोसे’च

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT

...

नाशिक : जिल्ह्यातील एकूण ३६ पैकी निम्म्याहून अधिक किल्ल्यांवर प्राचीन मंदिरे असून, आजमितीला हा सर्वात मोठा पुरातन ठेवा आहे. मात्र यापैकी अनेक मंदिरांची पडझड झालेली असून, त्यांची नोंदच पुरातत्त्व खात्याकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेली गडकिल्ल्यावरील भग्न मंदिरे वाचविण्यासाठी सरकार, पुरातत्व, वन खाते सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. आजही हा पुरातन ठेवा 'रामभरोसे'च आहे.

नाशिक हा गड किल्ल्यांनी संपन्न असा जिल्हा आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी यातील काही किल्ल्यांना भेट दिल्याचा तर काही ठिकाणी विश्रांतीसाठी मुक्काम केल्याचे दाखले आहेत. या किल्ल्यांवर देखणी, सुबक, वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरे आहेत. मात्र किल्लेच संरक्षित नसल्याने त्यावरील मंदिरांनाही वाली राहिलेला नाही. अखत्यारीत असलेल्या मंदिरांची कामे सुरू असल्याचे पुरातत्त्वखात्याचे म्हणणे असून, इतरांची जबाबदारी कशी घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची कारणही हा विभाग देतो आहे. काही मंदिरांना फलक लावून राष्ट्रीय स्मारक म्हणून तेवढे जाहीर करण्यात आले आहे.

..

महाराष्ट्रात २५१ मंदिरे व २८ किल्ल्यांचा विकास आम्ही हाती घेतला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील मंदिरांचा विकास होणार आहे. किल्ल्यांवरील मंदिरे संरक्षितमध्ये येत नाही. त्यासाठी मंत्रालयाची परवानगी लागते.

- डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व विभाग आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य

.....

किल्ल्यांवरील जुन्या मंदिरांची बरीचशी पडझड झाली. समाधी भग्न व मोडकळीस आलेल्या आहेत. दगडी मूर्ती व पडकी मंदिरे खूपच दुर्लक्षित आहेत. पुरातत्व विभागाने या जुन्या मंदिराची नोंदणी सूची करण्याची गरज आहे.

- राम खुर्दळ, संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरला, उष्मा ओसरला!

$
0
0

एकाच दिवसात पारा पाच अशांनी घसरला

..

मंगळवारचे कमाल तापमान : ३८ अंश सेल्सिअस

बुधवारचे कमाल तापमान : ३३ अंश सेल्सिस

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून असलेले अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचे सावट दूर झाले आहे. तसेच, चाळिशीच्या आसपास असलेले तापमान आता थेट ३३ अंशांवर आले आहे. त्यामुळे नाशिककरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

नाशिककरांना गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस आणि उकाडा यासारख्या हवामानाचा अनुभव येत आहे. उकाड्याने नाशिककरांना चांगलाच घाम फोडला आहे. मात्र, बुधवारी या हवामानाने नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी नाशिकचे कमाल तपमान ३३.१ अंश सेल्सिअस, तर किमान तपमान २०.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ३९ आणि ४० अंशांवर गेलेले तपमान आता थेट ३३ ते ३४ अंशांवर आले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच, उकाडाही कमी झाला आहे. आगामी आठवडाभर हे तपमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आठवडाभरही नाशिककरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

...

गेल्या काही दिवसातील तपमान

दिनांक--कमाल--किमान

१७ एप्रिल--३३.१--२०.९

१६ एप्रिल--३४.७--२१.७

१५ एप्रिल--३८--२२.२

१४ एप्रिल--३९.८--२२.४

१३ एप्रिल--३९.७--२१.४

१२ एप्रिल--३९.९--२०.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वोटर स्लिपचे उद्यापासून वाटप

$
0
0

जिल्हा निवडणूक शाखेकडून यंत्रणा कामाला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या तयारीने प्रशासकीय पातळीवर जोर धरला असून शुक्रवारपासून (दि. १९) मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) वाटपाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक शाखेने घरोघरी मतदार चिठ्ठ्या पोहोच करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेला मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराला बजावता यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यंदा कमालीचा आग्रही आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आणि मतदानाचा टक्का वाढावा, याकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखाही सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

मतदारांना वोटर स्लीप घरपोच करण्याच्या कामास शुक्रवारपासून (दि. १९) सुरुवात होणार आहे. यापूर्वीच मतदारांच्या घरापर्यंत स्मार्ट मतदार ओळखपत्र पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. पाठोपाठ आता वोटर स्लिपही घरपोच मिळणार असल्याने मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार याद्या चाळण्याची गरज भासणार नाही. आपले मतदान कोणत्या केंद्रावर आणि कोणत्या खोलीमध्ये होणार हे देखील मतदारांना घरबसल्या माहिती मिळणार आहे. यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत २८ एप्रिलपर्यंत वोटर स्लिप पोहोचेल याची कटाक्षाने दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिले आहेत.

दिव्यांगांसाठी वाहनव्यवस्था

दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी घरापर्यंत वाहन पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा याकरीता सर्वतोपरी प्रयत्न होत असतानाही विदर्भात मात्र ५० ते ५५ टक्केच मतदान झाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आतापासूनच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च तीन कोटींनी वाढणार

$
0
0

रिंगणात तीन अतिरिक्त उमेदवार; जादा बॅलेट युनिटची सेटिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ हून अधिक उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटल्याने निवडणूक यंत्रणेवरील खर्चातही तीन कोटींनी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात १८ म्हणजेच तीन अतिरिक्त उमेदवार असल्याने हा तीन कोटींचा खर्च करणे अनिवार्य ठरणार आहे. निवडणुकीसाठी दोन बॅलेट युनिटची सेटिंग आणि सीलिंग करावी लागणार असल्याने यंत्रणेवरील एकूण खर्चाबरोबरच डोकेदुखी वाढली आहे.

लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिकमधून १८ उमेदवार आपले नशिब आजमावत आहे. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवारांची नावे घेता येतात. १६ वे बटन नोटाचे आहे. परंतु, तीन उमेदवार अधिक असल्याने अतिरिक्त एक बॅलेट युनिट यंत्रणेला वापरावे लागणार आहे. याउलट दिंडोरीत केवळ आठच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने एका बॅलेटवर सर्व उमेदवारांची नावे सामावली आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात मात्र अपक्षांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. बॅलेट मशिन्ससह कर्मचारी, सेटींग करणारे अभियंते, टेबल, मतपत्रिकांची छपाई, मशिन्स तसेच कर्मचाऱ्यांची वाहतूक त्यासाठीची वाहने असा सर्वच खर्च वाढला आहे. या माध्यमातून तब्बल तीन कोटींचा खर्च वाढणार असल्याची शक्यता उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तर आयोगाला त्यातून अधिकाधिक ७५ हजार रुपयेच मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे, पवारांच्या मतांवर भिस्त

$
0
0

नाशिक

गेल्या ४२ वर्षांपासून एका खासदाराला दुसऱ्यांदा संधी न देण्याची पंरपरा असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुन्हा डाव टाकला आहे. सोबतच माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार या दोघांच्या उमेदवारीने मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडवली आहेत. निवडणुकीच्या रिंगणात १८ उमेदवार असले, तरी कोकाटे आणि पवारांच्या एंट्रीने सुरुवातीला दुरंगी असलेली लढत आता चौरंगी झाली आहे. गेल्या वेळच्या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी भुजबळ काका-पुतणे यंदा पूर्ण ताकदीनिशी उतरले असले, तरी शिवसेना आणि भाजपने गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात जोमाने पाय पसरून आपली ताकद निर्माण केली आहे. गोडसे आणि भुजबळांनी आपली शक्ती पणाला लावली असली, तरी कोकाटे आणि पवार यांच्या उमेदवारीमुळे मात्र दोन्ही उमेदवारांना मतविभाजनाचा धोका निर्माण झाला असून, या दोघांपैकी कोण किती मते घेतो, यावरच गोडसे, भुजबळांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक यंदाही जातीपातीची समीकरणे जुळवत पुढे सरकण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघावर आतापर्यंत कोणा एका राजकीय पक्षाचे वर्चस्व राहिलेले नाही. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा या मतदारसंघावर वरचष्मा असला, तरी १९७७ पासून या मतदारसंघाने कधीच एक पक्ष आणि खासदाराला लागोपाठ संसदेत पाठवले नाही. तरीही यंदा गोडसे विद्यमान, तर भुजबळ हे माजी खासदार पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली असून, इतिहास बदलणार का, याकडे मतदारांचेही लक्ष लागून आहे. दहा वर्षांनंतर आजी-माजी खासदार पुन्हा आमनेसामने उभे ठाकले आहेत. सन २००९ मध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन त्याचा फायदा थेट ‘राष्ट्रवादी’चे समीर भुजबळ यांना होऊन ते २२ हजार मतांनी विजयी झाले होती. यंदाच्या निवडणुकीतही वंचित आघाडीमुळे तिरंगी लढत होईल, असे चित्र होते. परंतु, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने मतदारसंघाचे जातीय गणितच बदलले आहे. मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असले, तरी गोडसे आणि कोकाटेंच्या रूपाने दोन मराठा मतदार रिंगणात आल्याने मराठा मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हक्काच्या मुस्लिम आणि दलित मतदारांसाठी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उभा राहिला आहे. त्यामुळे एकीकडे दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन, तर दुसरीकडे मराठा मतांचे होणारे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघावर सध्या शिवसेना-भाजपची पकड आहे. या मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच आमदार महायुतीचे आहेत, तर काँग्रेसकडे एकमेव आदिवासीबहुल असलेला इगतपुरी मतदारसंघ आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचे वर्चस्व आहे. तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या महापालिकेवर तर भाजपचीच सत्ता आहे. विरोधी पक्षात शिवसेना आहे. महापालिकेतील १२२ नगरसेवकांपैकी १०६ नगरसेवकांचे बळ हेमंत गोडसेंच्या पाठीशी उभे राहिले आहे. सिन्नर, भगूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकांवरदेखील युतीची सत्ता आहे. नाशिक हा शिवसेनेचा गड राहिला आहे. सिन्नर आणि देवळाली मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार असून, त्यांची या मतदारसंघांवर पकड आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद फारशी मोठी नसली, तरी भाजपची संघटनात्मक ताकद यंदा एकदिलाने शिवसेनेच्या गोडसेंच्या पाठीशी उभी आहे. शिवसेनेची बूथ लेव्हलवरील ताकद मजबूत नसली, तरी भाजपची ‘एक बूथ टेन यूथ’ची ताकद मतदारसंघात मोठी आहे. गोडसेंचा विजय भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनला असून, शिवसेनेपेक्षा भाजपने मोठी ताकद गोडसेंच्या पाठीशी उभी केल्याचे चित्र सध्या तरी आहे. गोडसेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत असलेले नाराजीनाट्य आता शमले असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध होता. समीरऐवजी छगन भुजबळांनी लोकसभा लढवावी, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ बरेच दिवस चालला. अखेरीस समीर भुजबळ यांच्या नावालाच पसंती देण्यात आली.

मतदार : १८,८२,०५१
मतदान केंद्रे : १८६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत गोठ्यांवर हातोडा

$
0
0

रोकडोबावाडीत चार ठिकाणी कारवाई

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील अनधिकृत गोठ्यांवरील अतिक्रमन निर्मूलन मोहीम महापालिका प्रशासनाने गतिमान केली आहे. गुरुवारी (दि.१८) नाशिकरोड विभागात आणखी चार गोठे पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. रोकडोबावाडीत ही धडक कारवाई झाल्याने दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

देवळालीगावातील रोकडोबावाडीतील सुरेश तुळशीराम बिडवे, सिध्दाप्पा औशिकर, मानकू पांडू औशिकर आणि संपत भिकाजी पवार या गोठेधारकांच्या अनधिकृत गोठ्यांचे पत्र्याचे शेड पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने गुरुवारी हटविले. या चारही गोठेधारकांचे पाणी व ड्रेनेजलाइन कनेक्शनही बंद करण्यात आले आहे. अशाच स्वरुपाची कारवाई काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक १९ मधील चेहेडी पंपिंग स्टेशन येथील सहा गोठेधारकांवर करण्यात आली होती. ही कारवाई पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी, मुख्यालय अधीक्षक एम. डी. पगारे, पशुवैद्यकीय अधिकारी पी. एम. सोनवणे, नगरनियोजन विभागाचे अभियंता गरुड आदी अधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाचे सहा पथके व दैनंदिन अतिक्रमण निमूर्लन पोलिस बंदोबस्तात केली.

...

पालिका प्रशासनाचा इशारा

पालिकेच्या सहाही विभागांत मनपाची पूर्वपरवानगी न घेता रहिवासी क्षेत्रांत अनधिकृतपणे गोठे उभारणाऱ्या व्यावसायिकांना मनपाने नोटिसा बजावून तातडीने गोठे शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याबाबत कळविले होते. ज्यांनी अद्याप गोठे स्थलांतरित केलेले नसतील, त्यांच्या गोठ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत संबंधितांचे वीज, ड्रेनेज, पाण्याचे कनेक्शन बंद करून सदर गोठे हटवले जातील. त्याकरिता होणारा मनपाचा संपूर्ण खर्च हा संबंधित गोठेधारकांकडून वसूल करण्यात येईल व प्रसंगी पोलिस विभागात गुन्हेदेखील दाखल करण्यात येतील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगल मॅपिंगने प्रवेशसंधी हुकली

$
0
0

पालक हैराण; अद्याप ५० टक्केही प्रवेश नाहीत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्कानुसार (आरटीई) प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दहा दिवसांपासून सुरू आहे. यात शहरातील ५० टक्के विद्यार्थ्यांचेही प्रवेश झालेले नाहीत. गुगल मॅपिंगचा मोठा अडथळा प्रवेशांमध्ये निर्माण झाला असून या कारणानी अर्ज रद्द केलेल्या पालकांनी पुढे काय करायचे, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. शिक्षण विभागानेही याबाबत कोणतीही सूचना दिली नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकातील बालकांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यभरात ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची या प्रक्रियेसाठी पहिल्या लॉटरीतून निवड झाली असून त्यातील केवळ १६ हजार ३३८ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. नाशिक जिल्ह्यात ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून १ हजार ५३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ही संख्या ५० टक्के इतकीही नाही. यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली असून अर्जात व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असल्याच्या कारणाने प्रवेश नाकारले जात आहेत. मात्र, गुगल मॅपिंगचा प्रवेश प्रक्रियेत इतके मोठे स्थान आहे, हे शिक्षण विभागानी पूर्वीच पालकांना सांगायला हवे होते, असे पालकांचे म्हणणे आहे. या प्रवेशांसाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून रद्द ठरविण्यात आलेल्या पालकांनी पुढे काय करायचे, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

प्रतिसाद शून्य

आरटीईबाबत पालकांच्या शंका वाढत असून त्याचे निरसन करण्यासाठी वारंवार शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

गुगल मॅपिंगचे कारण देऊन प्रवेश रद्द करण्यात आला आहे. गुगल मॅपिंग हे प्रवेश प्रक्रियेत इतके महत्त्वाचे आहे, याची पूर्वकल्पना शिक्षण विभागाने देणे आवश्यक होते. आता पुढे आम्ही काय करायचे, याविषयी कोणतीही स्पष्ट माहितीदेखील देण्यात आलेली नाही.

- राहुल बेलदार, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतवार्ता

$
0
0

महायुतीच्या पवारांसाठी

कदम यांच्या चौकसभा

निफाड : भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी आमदार अनिल कदम यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निफाड तालुक्यातील गावागावांत गेल्यानंतर चौकात, एखाद्या दुकानासमोर किंवा मंदिराच्या सभागृहात सुसंवाद सभा होत आहेत. पाचोरे वणी, आहेरगाव, लोणवाडी, पालखेड, शिरवाडे वणी या गावांमध्ये आमदार अनिल कदम यांनी गुरुवारी मतदारांशी संवाद साधला. देशाचे खंबीर नेतृत्व असणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उच्चशिक्षित डॉक्टर असणाऱ्या भारती पवार यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, सतीश मोरे, सोमनाथ पानगव्हाणे, संजय वाबळे आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरीवर हनुमान जन्मोत्सवाची तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेले हनुमान जन्मस्थान श्रीक्षेत्र अंजनेरी येथे शुक्रवारी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. अंजनेरी पर्वतावर शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळेस मोठ्या उत्साहात आणि रामभक्त हनुमानाच्या जयघोषात हा सोहळा होणार आहे.

हनुमान जन्मोत्सवाकरिता भाविक गुरुवारी रात्रीपासूनच गडावर मुक्कामी दाखल झाले आहेत. अलीकडील काही वर्षांत चैत्र पौणिर्मेस गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या लाख दीड लाखांपर्यंत पोहाचली आहे. पहाटेच्या सुमारास अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी भाविकांची रिघ लागलेली असते. अंजनेरी येथे नाशिक त्र्यंबक रस्त्यावर हनुमानाची भव्य मूर्ती आहे. येथे देखील जन्मोत्सव साजरा होत असतो. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी महाराज यांच्या आश्रमात बाल हनुमान, अंजनीमाता यांचे मंदिर आहे. तेथे जन्मोत्सव साजरा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडी प्रकरणी तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ दिवसांपूर्वी दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात तीन संशयित आरोपींना अटक करण्यात नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर व त्यांच्या पथकाला यश आले आहे. या तिघांवर सिन्नर व अंबड पोलिस ठाण्यांतही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

राहुल दिलीप धोत्रे (वय १९, रा. मशिदीमागे, सिन्नर), रोशन किसन महात्मे (वय २१, रा. शिवाजीनर, सिन्नर) आणि मोहन सुभाष वाजे (वय १८, रा. डुबेरगाव, ता. सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत. एकलहरे रोडवरील अरिंगळे मळ्यात ४ एप्रिल रोजी झालेल्या घरफोडीचा गुन्हा नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल होता. सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, विशाल पाटील, मुदत्सर पठाण, महेश सावळे, निखिल वाघचौरे आणि सोमनाथ जाधव यांच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी वास्को चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राहुल धोत्रे आणि रोशन महात्मे या दोघांना अटक केली. अधिक तपास केल्यानंतर त्यांचा अन्य साथिदार मोहन वाजे यालाही अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी दीड तोळ्याची पोत आणि ५० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या. यातील एक दुचाकी सायखेडा आणि दुसरी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्यांनी चोरी केली होती. तसेच अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील २० हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्हीही पोलिसांनी जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसानंतर पंचनामे सुरू नाशिक ः

$
0
0

अवकाळी पावसानंतर पंचनामे सुरू

नाशिक ः जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या पावसामुळे ११७७ हेक्टरमध्ये कांदा, भाजपीला, गहू या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच १५० हेक्टरमध्ये द्राक्षे, डाळिंब, लिंबू या पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे. आचारसंहिता लागू असल्याने या नुकसानीचे पंचनामे होतील का, शासनाकडून मदत मिळेल का, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून पंचनामे सुरू केले.

..

जोतिबाची मुख्य यात्रा आज

वारणानगर ः वाडीरत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा चैत्र यात्रेचा आज, शुक्रवारी मुख्य दिवस आहे. भाविक आणि सासनकाठ्यांनी जोतिबा डोंगर फुलून गेला आहे. गुरुवारपासून गुलाल-खोबऱ्याची उधळण, 'चांगभलं'चा अखंड गरज करत यात्रेची सुरुवात झाली. पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर कर्नाटक, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या सासनकाठ्या दाखल्या झाल्या आहेत. मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि दक्षिण दरवाजांतून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षी सासनकाठ्यांची मिरवणूक १२ वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी पहाटे घंटानाद, पाद्यपूजा आणि शासकीय महाभिषेक होणार आहे.

..

दोन वाळू माफिया हद्दपार

औरंगाबाद ः वाळू चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन वाळू माफियांना शहर पोलिसांनी एका वर्षासाठी हद्दपार केले. पोलिस उपायुक्त परिमंडळ एकचे निकेश खाटमोडे पाटील यांनी ही कारवाई केली. वाळूज पोलिस ठाण्यात संशयित गुन्हेगार गोरख त्र्यंबक पाचरणे (वय ३८) आणि बाबासाहेब एकनाथ पाचरणे (वय ३८ दोघे रा. भोयगाव, ता. गंगापूर) यांच्यावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना ३० जानेवारी रोजी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही आरोपींचा हद्दपारीचा प्रस्ताव वाळूज पोलिस ठाण्याच्या वतीने उपायुक्तांना पाठवण्यात आला होता.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिमून’मध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा

$
0
0

फोटो आहे

'हिमून'मध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावरील राजकारण व परराष्ट्रधोरण यांविषयी माहिती मिळावी, यासाठी होरायझन अॅकॅडमीमध्ये होरायझन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणजेच 'हिमून २०१९' या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल, युनायटेड नेशन्स ह्युमन राईटस, द डिसआर्ममेंट इंटरनशनल सिक्युरिटी, २०३० सस्टेनेबल डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स एनव्हार्यमेंट प्रोग्राम या पाच समित्यांची स्थापना या बैठकीत करण्यात आली.

जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्याच्या राष्ट्रसमुहांच्या विशेष बैठकांचे स्वरूप व महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे म्हणून मविप्र संचलित होरायझन अॅकॅडमी येथे प्रायोगिक तत्वावर घेतली गेलेली ही स्पर्धा अतिशय रोमांचकारी व शैक्षणिक मूल्यवर्धन करणारी ठरली. स्पर्धेसाठी नावनोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समूहाला विविध देशांचे नेतृत्व करण्यासाठी नियोजन केले गेले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयानुसार सखोल अभ्यास करून बैठकीत आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. बैठकीच्या अखेरीस सर्व गटांनी स्वतःच्या राष्ट्राचे परराष्ट्रधोरण अधोरेखित केले. परीक्षक म्हणून केटीएचएम महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. रुबी उनियाल व पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. प्राची पिसोळकर यांनी काम पहिले. या बैठकीत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये राष्ट्रप्रतिनिधी देव शिंदे, अश्लेषा शेळके, साक्षी गुप्ता, उत्कर्ष गुंजाळ, सावनी नायर व ओंकार वाघाडकर यांना बक्षीस देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सूर विश्वास'तर्फे शनिवारी आनंद अत्रे यांचे गायन

$
0
0

उद्या आनंद अत्रे यांचे गायन म. टा. प्रतिनिधी, नाशिक नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी 'सूर विश्वास' हा अनोखा उपक्रम विश्वास ग्रुपतर्फे सुरू करण्यात आला आहे. शनिवारी (२० एप्रिल) सकाळी ६.३० वाजता नव्या पिढीतील गायक आनंद अत्रे यांच्या गायनाने तृतीय पुष्प गुंफले जाणार आहे. हर्षद वडजे (हार्मोनियम), रोहित नागरे (तबला) हे साथसंगत करणार आहेत. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत असून त्या अंतर्गतच हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्सना पोलिसांच्या नोटिसा

$
0
0

आंदोलनच्या अर्जावर पोहच नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या पेन्शनर्संना पिंपळगाव पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिला कलम १४९ च्या या नोटीसमुळे पेन्शरर्स अधिकच भडकले असून त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या सभेत ते शांततेच्या मार्गाने 'नोट वोट' भूमिका जाहीर करणार आहे.

पेन्शनर्संवर पोलिसांनी बुधवारी दबावतंत्र अवलंबण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता नोटीसही बजावल्या आहेत. जिल्ह्यात इपीएस ९५ अंतर्गत ४० हजार पेन्शनर असून त्यांनी गुरुवारी आंदोलनाची रितसर परवानगी पिंपळगाव पोलिस ठाण्यात मागितली आहे. पण, त्यांचे पत्र पोलिसांनी स्वीकारले असले तरी त्यांना पोहच दिली नसल्याचे सांगत या पेन्शनर्संनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पोलसांनी बजावलेल्या नोटिसमध्ये काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणांस सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, असे म्हटले आहे.

नोटिसेबाबत पेन्शनर्सच्या संघटनेने सांगितले, की भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इपीएफ ९५ पेन्शनरांना भगतसिंग कोशाहारी रिपोर्टप्रमाणे तीन हजार अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन २३ फेब्रुवारी २०१४ रोजी दिले होते. आम्ही सत्तेत आल्यावर ९० दिवसांच्या आता पेन्शनवाढ करून दिली जाईल, असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन ६३ लाख पेन्शनरांनी मतदान केले आता त्यांनाच नोटीस बजावण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळत

पेन्शनर्सधारक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. येथे त्यांना बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण, तशी कोणतीच बैठक नसल्याने ते दोन ते तीन तास ताटकळत बसले. चुकीच्या माहितीवरून त्यांना बैठक असल्याचे सांगण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images