Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बँक ग्राहकांना सव्वादोन लाखांना गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँक आणि कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करीत चोरट्यांनी बँकेच्या दोन ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती मिळवत खात्यातील सव्वादोन लाखांची रोकड ऑनलाइन लंपास केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहाजहाँ साबीर अन्सारी (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. अन्सारी यांच्याशी २८ मार्च रोजी चोरट्याने संपर्क साधला होता. या वेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून त्याने अन्सारी यांच्या एटीएम कार्डाची माहिती मिळविली. त्यानंतर टप्याटप्याने अन्सारी यांचे एक लाख १४ हजार ९८७ रुपये वेगवेगळ्या खात्यात परस्पर जमा करीत फसवणूक केली. दुसऱ्या घटनेत भगूर येथील मेनरोड भागात राहणाऱ्या समृद्धी राजेंद्र शहा यांनी तक्रार दिली. ३१ मार्च रोजी शहा यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. एका अ‍ॅपच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्याची माहिती मिळविली. त्यानंतर यूपीआयडी तयार करून शहा यांच्या बँक खात्यातून एक लाख लंपास केले. वरिष्ठ निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंदू धर्मरक्षणाचे कार्य व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'हिंदू धर्माचे संस्कार, विचार, शिकवण आपण विसरत चाललो आहोत. हिंदूंमध्ये जातीचे राजकारण करुन दरी निर्माण केली जात असून, अशा व्यक्तींना आपण एकजुटीचे दर्शन घडविले पाहिजे. हिंदू धर्म टिकविण्यासाठी धर्मरक्षणाचे कार्य केले पाहिजे,' असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे सरसंघचालक डॉ. मधुकर आचार्य यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्म जागरण विभाग व शंकराचार्य न्यास, नाशिक यांच्यातर्फे आयोजित पूजा प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी बारा दिवसीय 'पूजा प्रशिक्षण वर्ग' गंगापूर येथील श्री बालाजी मंदिरात शंकराचार्य न्यासातर्फे आयोजित करण्यात आला होता. या वर्गाचे यंदाचे आठवे वर्ष होते. वर्गात सहभागी झालेल्या ४८ विद्यार्थ्यांना समारोपाप्रसंगी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. आचार्य बोलत होते.

डॉ. आचार्य म्हणाले, 'हिंदू व्यक्तीच हिंदू धर्माला अतिसामान्य अशी वागणूक देत असून उच्चशिक्षित, अतिश्रीमंत व्यक्तींचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. हिंदूत्व मनातून बोथट होत चालल्याचे यावरुन दिसते. हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धर्मजागरणाचं कार्य करण्यात येत आहे. या कार्यात सर्व हिंदूंनी सहभागी झाले पाहिजे.'

यावेळी १००८ महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरु श्री. श्री. वेण्णा भारतीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, आपला धर्म आपण समजून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. धर्माकडे बघण्याची दृष्टी स्वच्छ, निकोप असावी. धर्म हा प्रेमाचा विषय आहे, परंतु हल्ली तो शत्रुत्वाचा विषय बनला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्म जागरण विभागाचे प्रमुख हेमंत हरहरे यांनी केले. यावेळी शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पूजा प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध स्तोत्रांचे पठण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनांना घरचा आहेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांनी दत्तक नाशिककडे दुर्लक्ष करत, भाजपच्या प्रचारासाठी वाहून घेतल्यावरून नाशिककर तरुणांनी महाजनांवर उपरोधिक टिका केली आहे. अमळनेरच्या मारहाण प्रकरणात मुक्का मार लागलेल्या महाजनांवर उपचार करण्यासाठी नाशिककर तरुणांनी महाजन यांना स्पीड पोस्टद्वारे झेंडू बाम, मूव्ह पाठवले आहे. महाजन यांना अधिकचे उपचार हवे असतील तर, त्यांनी मुख्यमंत्र्यानी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये उपचारासाठी यावे, असे आवाहन तरुणांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यानी नाशिक दत्तक घेतल्याचे आवाहन केल्यानंतर नाशिककरांनी भाजपच्या हाती पालिकेची सत्ता सोपवली. परंतु, गेल्या दोन वर्षापासून नाशिकचा विकास होण्याऐवजी नाशिकचे प्रकल्प अन्यत्र पळवले जात आहेत. तर दुसरीकडे नाशिकचे पालकत्व असलेले गिरीश महाजन मात्र संकटमोचकाच्या भूमिकेत वावरत आहेत. नाशिकच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत, महाजन राज्यातील प्रश्नांकडेच अधिक लक्ष देत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला डॅमेज करण्यासह भाजपचे बळ वाढवण्यासाठीच ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नाशिकचा विकास दुर्लक्षित राहिला आहे. महाजनांचे झालेले दुर्लक्ष पाहून नाशिकच्या काही तरुणांनी महाजनांवर आता उपरोधिक टिका केली आहे. अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात गिरीश महाजन यांनाही मुक्का मार लागल्याचा दावा विद्यासागर घुगे, अंजिक्य गिते, शान घुघे, कुणाल भंडारे, कमलेश काळे वेदांत दाभाडे या तरुणांनी केला आहे. त्यामुळे या तरुणांनी एकत्रित येत नाशिककर या झेंड्याखाली गिरीश महाजन यांना या मारहाणीतून बरे होण्यासाठी थेट झेंडू बाम आणि मूव्ह ही औषधे स्पीड पोस्टद्वारे पाठवली आहेत. महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असून, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी ही औषधी आम्ही पाठवत असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे.

तर अॅडमीट व्हा!

मूव्ह, झेंडू बामनेही बरे वाटत नसेल तर, नाशिकमध्ये मोठे हॉस्पिटल्स आहेत. दत्तक नाशिककर तुम्हाला या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये दाखल करून घेण्यास तयार आहेत. तुमचे नाशिकमध्ये उपचारासाठी स्वागतच आहे, असा टोमणाही या तरुणांनी महाजन यांना लगावला आहे. महाजन यांनी मार झोड आणि तोडफोडीकडे दुर्लक्ष करून नाशिकच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असा उद्देश या तरुणांचा आहे. त्यामुळे महाजन या तरुणांनी पाठलेली औषधी स्विकारता की, कोणत्या पद्धतीने या तरुणांना उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 2

क्राईम फास्ट २

$
0
0

चिमुकल्यावर

कुत्र्यांचा हल्ला

नाशिक : अंगणात खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने दीड वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर भागात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अमोल पाडवी असे जखमी बालकाचे नाव आहे. रस्त्याने जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बालकासा तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वृद्धाची आत्महत्या

नाशिक : गोरेवाडी भागात राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तम किसन चिडे (रा. चिडे मळा, गोरेवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. चिडे यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांच्यावर बिटको रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांकडून मोजणी केंद्रांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असलेल्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह सर्वसाधारण निरीक्षक अभिजित सिंग, राजेशकुमार तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक एन.एस.नपलचायल यांनी भेट देऊन पाहणी केली. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे २३ मे रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने या मतमोजणी केंद्रात मतदान केंद्रातून येणाऱ्या मतपेट्यांची वाहतूक व पार्किंग व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्था, मतमोजणी केंद्रात पुरेशी हवा व प्रकाश व्यवस्था, इंटरनेट सुविधा तसेच मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाबाबत कायदा व सुव्यवस्था याबाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या उपाययोजनांच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाककलेतही होता बाबासाहेबांचा हातखंडा

$
0
0

नाशिककरांनी अनुभवला

…..

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

...

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायेदपंडितच नव्हते, तर ते उत्तम स्वयंपाकीदेखील होते. नाशिकला दादासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी आल्यावर ते स्वत: मासे तयार करायचे. त्यामुळे घरातील मंडळीसह बैठकीसाठी आलेल्यांना चांगली मेजवानी मिळायची. त्याकाळी नाशकातील अनेकांनी बाबासाहेबांच्या हातच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला होता.

बाबासाहेबांना संगीताची तसेच खेळाचीदेखील उत्तम जाण होती. परदेशातील अनेक खेळाडूंनी केलेली कामगिरी त्यांच्या मुखोद्गत होती. तसेच ते मूळ कोकणातील रहिवासी असल्याने त्यांना सी फूड खाण्याची खूप आवड होती. ते उत्तम पध्दतीने माशांचे वेगवेगळे प्रकार स्वत: तयार करीत असत. बाबासाहेब नाशिकला येणार असे कळताच दादासाहेबांच्या पत्नी गीताई (जीजी) या मासे आणून ठेवत असत. बाबासाहेबांच्या नाशिकमधील बैठका या बहुतांश वेळा दादासाहेब गायकवाडांच्या निवासस्थानी असायच्या. यावेळी बाबासाहेबांचे जवळचे कार्यकर्ते या बैठकांना उपस्थित असायचे. बैठका संपल्यानंतर बाबासाहेब स्वत: स्वयंपाक घरात जायचे. कोकणी पध्दतीच्या मसाल्याने माशांना ते फोडणी द्यायचे. त्यांना जीजी मदत करायच्या. कोकणी पध्दतीच्या माशांना लागणारे नारळ, कोकम वगैरे मसाला याची तयारी मात्र जीजी करायच्या, असे कुणाल गायकवाड सांगतात.

..

तेल किती वापरायचे?

कोणत्या माशांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे या माशांना तेल कमी वापरायचे, त्याचप्रमाणे अमूक एका माशामध्ये तेलाचे प्रमाण नसते त्या माशांना तेल जास्त वापरायचे याचीदेखील माहिती ते जीजींना ते देत असत. वेळ लागला तर चालेल मात्र समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचेच खाऊ घालायचे असा त्यांचा कटाक्ष असायचा. बाबासाहेबांनी मासे केले की, घरातील मंडळी आणि बैठकीला उपस्थित असलेले कार्यकर्ते माशांवर ताव मारत असत.

....

खाऊ घालण्यात आनंद

बाबासाहेबांना बोंबीलची चटणीदेखील आवडत होती. तीदेखील स्वत: तयार करून ते इतरांना खाऊ घालायचे. बाबासाहेब स्वयंपाक करताना नेहमी म्हणायचे मला दुसऱ्याला करून खाऊ घालण्यात आनंद मिळतो. नाशिकला असताना दादासाहेबांचे चिरंजीव चंद्रकांत, प्रकाश आणि प्रभाकर यांच्याशी चांगल्या प्रकारे स्नेह होता. बाबासाहेबांना भारतीय पध्दतीबरोबरच स्वयंपाकाच्या अनेक पध्दती अवगत होत्या, असे कुणाल सांगतात.

…..

बाबासाहेब नाशिकला आमच्या घरी आले की, ते स्वत: मासे करायचे. त्यावेळी माझे वडील लहान होते. त्यांनाही बाबासाहेब मासे खाऊ घालायचे. आमच्या जीजी बाबासाहेबांची वाट पहायच्या. त्यांच्यामुळे माशांचे वेगवेगळे प्रकार घरी शिकायला मिळायचे, असे जीजी नेहमी सांगायच्या.

- कुणाल गायकवाड, दादासाहेब गायकवाड यांचे नातू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमप्रकरणातून खून

$
0
0

मांडवड येथील घटना; संशयित फरार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

प्रेमप्रकरणातून नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तरुणाने मुलीच्या वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृन खून केला. शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी मयत व्यक्तीच्या मुलीने रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत संशयिताने मुलीच्या भावावरही वार केले असून, त्याच्यावर नांदगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला आहे. रविवारी मृताच्या शवविच्छेदन करण्यात आले. संशयिताला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण होते.

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे शनिवारी रात्री ९च्या सुमारास रणजित आहेर यांनी संशयित आरोपी नागेश पवार याच्याशी

'माझ्या मुलीबरोबर का फिरतोस, तुम्ही सोबत होते, मी तुम्हाला पाहिलं आहे', असे म्हणत वाद घातला. त्यानंतर संशयित आरोपी नागेश पवार हा साक्षीदार चंद्रकला आहेर यांना घेऊन रणजित आहेर यांच्याकडे आला. यावेळी आहेर यांनी नागेशला काठीने मारहाण केली. त्याचा राग धरून संशयित नागेशने कुऱ्हाड आणून रणजित आहेर (वय ४५) यांच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात आहेर यांचा जागेवरच मृत्यू झाला. नागेशने आहेर यांचा मुलगा तुषार आहेर (वय १९) यांच्या डाव्या हातावरही कुऱ्हाडीने वार करून त्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तुषारही जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदगाव येथे उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संशयित आरोपी नागेश फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मयत रणजित आहेर यांच्या मुलीने शनिवारी रात्री उशिरा नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नांदगाव पोलिसांनी रात्री २ वाजता नागेश पवार यांच्या विरोधात खुनाचा व तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. बी. चौघुले पुढील तपास करीत आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक आर. रागसुधा, अनिल भवारी यांनी भेट दिली.

रविवारी तणाव

रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यावर प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. आहेर यांच्या मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगत मृतावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नातेवाईकांची मनधरणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयपीएल’वर बेटिंग करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर बेटिंग करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली. सिन्नर-घोटी रोडवरील बेलू शिवारात मातोश्री फार्महाऊसवर बेटिंगचा उद्योग संशयितांनी सुरू केला होता. संशयितांकडून रोकडसह सुमारे पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रेम ताराचंद थावराणी, हरि उर्फ बॉबी प्रेम थावराणी (दोघे रा. सौभाग्य नगर, साईजैन कॉलनी, देवळाली कॅम्प) आणि जय अभय राव (रा. मातृछाया अपार्टमेंट, सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून, ही स्पर्धा रंगात आली आहे. झटपट निकाल हे वैशिष्ट असलेल्या स्पर्धेवर सट्टेबाजांची नजर असतेच. अगदी निकाल ते पुढील बॉलवर काय होणार अशा वेगवेगळ्या शक्यतांवर बेटिंग चालते. नाशिकही त्यास अपवाद नाही. पोलिस त्या अनुषंगाने शोध घेतात. शनिवारी रात्री चालू असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बँगलोर या संघांचा क्रिकेट सामना सुरू असताना ग्रामीण पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाऊ मुंढे, रवी शिलावट, पोलिस हवालदार दिपक आहिरे, शिवाजी जुंदरे, प्रीतम लोखंडे, अमोल घुगे, पोलिस कॉन्स्टेबल संदिप हांडगे, हेमंत गिलबिले, निलेश कातकाडे, सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम, गोकुळ सांगळे यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकला. या ठिकाणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. लॅपटॉप व मोबाइलद्वारे ते सट्टा घेत होते. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे सात मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही, सेट टॉप बॉक्स, तसेच कार असा एकूण असा पाच लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी हरि उर्फ बॉबी थावराणी हा क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात याच कारणांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहराजवळ अथवा शहरापासून दूर भागात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी घर भाडेतत्त्वावर घेऊन हा उद्योग सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभटाची समाधी होणार काळाच्या उदरात गडप

$
0
0

मटा विशेष

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT

चांदोरी गावातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेली चंद्रभट यांची समाधी नदी काँक्रिटीकरणाच्या कामात जमिनीखाली दबली जाण्याची चिन्हे आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा अनमोल ठेवा काही दिवसांत काळाच्या उदरात गडप होणार आहे. येथे गोदावरी चंद्राकार झाल्याने तिचे चंद्रावती असे नामकरण झाले आहे.

चंद्रभट हे चांदोरी गावातील एक सत्पुरूष होते. दौलताबादचे किल्लेदार जनार्दनस्वामी आणि त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराज नाशिक-त्र्यंबकेश्वरी निघालेले असताना वाटेत चंद्रगिरी (पूर्वीची दौलताबादची राजधानी व आताची चांदोरी) या गावात विश्रांतीसाठी एका ब्राह्मणाच्या ओसरीत थांबले असताना त्यांना संस्कृत श्लोकांचे निरूपण ऐकू आले. त्यांनी शोध घेतला असता तेथे चंद्रभट नावाचे सत्पुरूष पोथी वाचत होते. हे निरूपण ऐकून चतु:श्लोकी भागवत लिहिण्याची प्रेरणा जनार्दन स्वामींनी एकनाथांना दिली. याच चांदोरीच्या चंद्रभटांचा उल्लेख पुढे चतु:श्लोकी भागवताच्या ओवी क्रमांक १०१२ ते १०२४ मध्ये संत एकनाथांनी केला आहे. चांदोरीच्या रमणीय वातावरणात चंद्रभट निरूपण करीत असत. पुढे त्यांनी तेथेच समाधी घेतली. आज या दुर्मिळ ठेव्याची अत्यंत दुरवस्था असून नदीचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने ही समाधी काळाच्या उदरात गडप होण्याची चिन्हे आहेत.

चंद्रभटाच्या समाधीप्रसंगी स्वत: संत एकनाथ महाराज चंद्रगिरीला (चांदोरी) उपस्थित असल्याचा दावा डॉ. भीमाशंकर देशपांडे यांनी ह.भ.प. सोनोपंत दांडेकर यांनी सुरू केलेल्या 'प्रसाद' या मासिकाच्या जून २००८ च्या अंकात केलेला आहे. इतक्या मोठ्या सत्पुरुषाची समाधी नदीच्या किनारी काँक्रिटीकरणाखाली जाणार असल्याने अभ्यासक व संशोधकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने या समाधींची काळजी घेतली पाहिजे अशी मागणीही करण्यात येत आहे.

चांद बोधळे व चंद्रभट वेगळे

सुफी संत शेख महंमद यांनी आपल्या 'योगसंग्राम' या ग्रंथात 'ओम नमोजी सदगुरू चांद बोधले, त्यांनी जानोपंता अंगिकारले, जानोबाने एका उपदेशले, दास्यत्वगुणे' अशी संत एकनाथांची गुरूपरंपरा दिली आहे. चांद बोधळे हे शेख महंमदचा पिता राजे महंमद कादरी यांचे शिष्य होते कालांतराने त्यांनी शेख महंमदाला शिष्य म्हणून स्वीकारले. यांची समाधी दौलताबादला आहे. चंद्रगिरी गावात संत एकनाथांना भेटणारे चंद्रभट आणि चांद बोधळे या एकच व्यक्ती असल्याचे प्रसृत करण्यात आले आणि पुढे हा गोंधळ वाढला.

चांदोरी गावातील चंद्रावती नदीत अनेक मंदिरे असून येथे इंद्रदेवाचेदेखील मंदिर आहे. २०१६ मध्ये नदी कोरडी पडलेली असताना अनेक मंदिरे वर आली. येथेच चंद्रभट नावाच्या सत्पुरूषाचीही समाधी आहे. परंतु, अलिकडच्या काळात तिची दुरवस्था झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नदीचे काम सुरू असून ती दबली गेली आहे.

-प्रा. विजय कदम, चांदोरी रहिवासी

संत एकनाथांचे आजेगुरू व दौलताबादच्या जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधळे हे आणि चंद्रगिरी येथील चंद्रभट या दोघांमध्ये नेहमी गल्लत केली जाते. हे दोघे एकच आहे असा देखावा अनेक संशोधकांनी निर्माण केला आहे. मात्र, हे दोघे भिन्न असून चंद्रगिरीला चंद्रभटाची तर दौलताबादला चांद बोधळे यांची समाधी आहे.

-प्रमोद वडाळकर, समाधी संशोधक

समाधी हा अनुभूतीचा विषय असून तिची देखभाल करणे हा व्यवस्थेचा भाग आहे. प्रशासनाने समाधीसदृश इतिहासकालिन ऐवजांची काळजी घेतली पाहिजे. चांदोरी येथे चंद्रभट यांच्या समाधीची दुरवस्था असून ती काँक्रिटीकरणाखाली जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच ती वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

-देवेंद्रनाथ पंड्या, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठ तालुक्यातील शाळांना संगणक भेट

$
0
0

पेठ तालुक्यातील शाळांना संगणक भेट

सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा प्रवाह पोहोचविण्याचा वसा सोशल नेटवर्किंग फोरमने घेतला असून पेठ तालुक्यातील काही शाळांना फोरमने संगणक भेट दिली आहे. तेथील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे तसेच प्रगतशील भारताची ओळख व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे फोरमच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीच्यानिमित्त सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे पेठ तालुक्यातील नाचलोंढी भागातील चार शाळांना संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथील संगणक लॅबचे लोकार्पण डॉ. हेमंत कोतवाल यांचे हस्ते करण्यात आले. येत्या काही दिवसात फोरम वीस शाळांना संगणक लॅब तयार करून देणार आहे. नाचलोंढी भागातील ससूने, वाजवड, केळबारी, देविचामाळ या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्येनुसार संगणक देण्यात येणार आहे, अशी माहिती फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली. यावेळी शिरीष कदम, विस्तार अधिकारी राज आहेर, सरपंच केशव बोरसे, मुख्याध्यापक हरिदास वाघेरे यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला विधानसभा मतदारसंघात १०२३ दिव्यांग मतदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार २३ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. अंध, मूकबधीर, कर्णबधीर अन् विकलांग असलेल्या दिव्यांग मतदारांना येत्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानादरम्यान आपला मतदानाचा हक्क अगदी सुलभपणे बजावता यावा यासाठी प्रशासनाने योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यासाठीचे नियोजन केले आहे.

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासह मतदान करून केंद्रातून बाहेर पडेपर्यंत निवडणूक आयोगाने विशेष उपाय योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या महिनाभरात प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे व निवासी नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली 'बीएलओ' व तलाठी यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मतदारसंघातील ३१६ मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांमध्ये एकूण १०२३ दिव्यांग मतदार आहेत. यात सहाय्यकाची आवश्यकता असलेल्या मतदारांची संख्या १५६, वाहतूक सुविधेची आवश्यकता असलेल्या मतदारांची संख्या ९७, तर प्रत्यक्ष मतदान केंद्रात सहाय्यकाची आवश्यकता असलेल्या मतदारांची संख्या ९९ आहे. मतदानाच्या दिवशी या दिव्यांग मतदारांना त्यांच्या गरजेनुसार मदत पुरविण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रावर १४ ते १७ वयोगटातील एनसीसी, एनएसएस व स्काऊट यासारख्या स्वयंसेवकांची नियुक्त करण्यात आली आहे.

------

२ लाख ९५ हजार ५७३ मतदार

लोकसभेच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ३१६ मतदान केंद्र आहेत. तर, एकूण २ लाख ९५ हजार ५७३ इतकी मतदारसंख्या आहे. यात १ लाख ५६ हजार २९ पुरुष, १ लाख ३९ हजार ५३८ स्त्री मतदार तसेच एकूण ६ तृतीयपंथी मतदार असा समावेश आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतपत्रिका वाटप आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतपत्रिका वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता वाटपास सुरुवात होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची दुसरी सरमिसळीकरणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे व निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पूर्ण करण्यात आली. सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप करण्यात आले. या व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळावीत असे आवाहन प्रशासनाने केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची दुसरी सरमिसळ प्रक्रिया नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पहिल्या प्रक्रियेच्यावेळी १२५ ट्रेनिंग कर्मचारी नेमण्यात आले होते. दुसऱ्या प्रक्रियेच्या वेळी ११० ट्रेनिंग कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मनुष्यबळाचे वाटप मतदारसंघनिहाय करण्यात येणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या मतदारसंघनिहाय कामकाजाचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती मुंडावरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताडपत्री खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

$
0
0

ताडपत्री खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कळवण : तालुक्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने अवकाळी पावसाचे सावट दिसून येत आहे. त्याची धास्ती घेत शेतकऱ्यांनी शेतातच काढून ठेवलेला कांदा भिजू नये यासाठी ताडपत्री व प्लास्टिकचे कागद खरेदीसाठी बाजारात धाव घेतली आहे. गेल्या पंधरवड्यापासून तालुक्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. शेतकऱ्यांकडून उत्पादन खर्च आणि उपजिविकेसाठी कांदा विक्री करीत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी कळवण शहरासह अभोणा, कनाशी येथील दुकानात ताडपत्री व प्लास्टिक कागद खरेदीसाठी गर्दी केली. प्लस्टिक कागद १४० ते १५० रुपये किलो तर ताडपत्री १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मजुरांची टंचाई कळवण : तालुक्यात ६० टक्के कांदा काढणी झाली असून ४० टक्के कांदा मजुरांअभावी काढणी बाकी आहे. बेमोसमी पावसाचा तडाखा तालुक्यात बसल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी दरामुळे आर्थिक फटका बसला होता. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसाठी ठरला सुपरसंडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आलेल्या पहिल्या रविवारचा उमेदवारांसह राजकीय पक्षांनी पुरेपूर लाभ घेत, शहरातील मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. रविवार आणि त्यात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उमेदवारांना प्रचाराची आयती संधीच उपलब्ध झाल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी गल्लोगल्ली फिरत एकाच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासोबतच स्वत:चे प्रमोशनही करून घेतले. शिवसेना- भाजप महायुतीचे हेमंत गोडसे, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटेंसह वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांनी कडक उन्हातही सुटीच्या दिवशी घरोघर मतदारांच्या गाठीभेठी घेत, त्यांच्याकडून मतांचा जोगवा मागितला.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी १२ तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. माघारीची मुदत संपल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात १८, तर दिंडोरीत ८ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांनी शनिवारपासून प्रचाराला सुरुवात केली असून, रविवारी प्रचाराचा सुपरसंडे मिळाला. रविवारचा दिवस सुटीचा असल्याने बहुतांश नागरिक घरीच असतात. त्यातच रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी मंच उभारण्यात आल्याने प्रचारासाठीचे आयते व्यासपीठच उमेदवारांना मिळाले होते. त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ उमेदवारांनी घेतला. गोडसे, कोकाटे, पवार, भुजबळ यांनी रविवारचा दिवस असल्याने दिवसभर शहरात प्रचारावर जोर दिला. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध मंडळांनी उभे केलेल्या मंचावर जाऊन उमेदवारांना अभिवादन करीत, या वेळी प्रचाराचेही प्रमोशन करून घेतले. कडक उन्हातही चारही उमेदवारांनी ठिकठिकाणी जमलेल्या गर्दीचा लाभ घेण्यासाठी शहरभर फिरस्ती केली. त्यामुळे एकाच वेळी जयंतीचे वातावरण होते, तर दुसरीकडे निवडणूक प्रचाराचा फीलही अनुभवला. कडक उन्हातही या चारही उमेदवारांनी दिवसभर ठिकठिकाणच्या मंडळांना, तसेच सुटीनिमित्त घरी असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. शक्तिप्रदर्शनाचीही संधी या वेळी उमेदवारांनी साधली. आतापर्यंत निवडणुकीचे वातावरण तापले नव्हते. मात्र, रविवार सुटीचा दिवस आणि जयंतीनिमित्त शहरभर विविध मंडळांनी उभारलेल्या मंचामुळे आणि त्यात उमेदवारांनी प्रचारासाठी साधलेल्या संधीमुळे शहरात प्रथमच निवडणुकीची फील जाणवला.

पावसामुळे प्रचारावरही पाणी

सर्वच पक्षांकडून रविवारी सकाळपासूनच गृहसंपर्कावर भर देण्यात आला. दरम्यान, दिवसभर कडक उन्हात प्रचार करणाऱ्या उमेदवारांना मात्र सायंकाळी अवकाळी पावसाचाही फटका बसला. सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे उमेदवारांना बाहेर पडणे मुश्कील झाल्याने प्रचारावर विरजण पडले. पावसामुळे खुल्या पद्धतीने प्रचार करण्याचे टाळत, नागरिकांच्या भेटीगाठीत उमेदवारांनी सायंकाळ घालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात महात्मा फुले जयंती

$
0
0

फुले विद्यामंदिरात फुले जयंती उत्साहात

नाशिक : स्त्री शिक्षणाचे उद्गाते, सामाजिक चळवळीचे जनक, कवी, लेखक, पत्रकार महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील शेवाळे होते. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा पाया १७० वर्षांपूर्वी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी घातला बालविधवा, शेतकरी, शुद्रातिअतिशुद्र, बालविवाह यांचे प्रश्न मांडण्याचे काम महात्मा फुले यांनी आयुष्य भर केले असे संगिता महाजन यांनी सांगितले. यावेळी बालवक्त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश खैरनार यांनी केले तर आभार मोहन माळी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आयपीएल'वर बेटिंग करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,

नाशिक इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर बेटिंग करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली. सिन्नर-घोटी रोडवरील बेलू शिवारात मातोश्री फार्महाऊसवर बेटिंगचा उद्योग संशयितांनी सुरू केला होता. संशयितांकडून रोकडसह सुमारे पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम ताराचंद थावराणी, हरि उर्फ बॉबी प्रेम थावराणी (दोघे रा. सौभाग्य नगर, साईजैन कॉलनी, देवळाली कॅम्प) आणि जय अभय राव (रा. मातृछाया अपार्टमेंट, सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून, ही स्पर्धा रंगात आली आहे. झटपट निकाल हे वैशिष्ट असलेल्या स्पर्धेवर सट्टेबाजांची नजर असतेच. अगदी निकाल ते पुढील बॉलवर काय होणार अशा वेगवेगळ्या शक्यतांवर बेटिंग चालते. नाशिकही त्यास अपवाद नाही. पोलिस त्या अनुषंगाने शोध घेतात. शनिवारी रात्री चालू असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बँगलोर या संघांचा क्रिकेट सामना सुरू असताना ग्रामीण पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाऊ मुंढे, रवी शिलावट, पोलिस हवालदार दिपक आहिरे, शिवाजी जुंदरे, प्रीतम लोखंडे, अमोल घुगे, पोलिस कॉन्स्टेबल संदिप हांडगे, हेमंत गिलबिले, निलेश कातकाडे, सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम, गोकुळ सांगळे यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकला. या ठिकाणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. लॅपटॉप व मोबाइलद्वारे ते सट्टा घेत होते. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे सात मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही, सेट टॉप बॉक्स, तसेच कार असा एकूण असा पाच लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार संशयित आरोपी हरि उर्फ बॉबी थावराणी हा क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात याच कारणांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहराजवळ अथवा शहरापासून दूर भागात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी घर भाडेतत्त्वावर घेऊन हा उद्योग सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहाणेची भिस्त टँकरवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ऊन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईच्या झळाही असह्य झाल्या आहेत. यामुळेच जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांत तब्बल ३४ टँकर्स मंजूर केले आहेत. त्यामुळे आजमितीस जिल्ह्यात २१८ टँकरद्वारे साडेचार लाख लोकांना पाणीपुरवठा केला जातो आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीतही दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. दुष्काळी परिस्थिती हाताळण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पथकही नियुक्त करण्यात आले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी झाल्यास तात्काळ टँकर मंजूर करा, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत. ८ एप्रिल रोजी जिल्ह्यात १८४ टँकर्सद्वारे ६६१ गावांमधील ४ लाख ३ हजार रहिवाशांना पाणी पुरविण्यात येत होते. परंतु, ११ एप्रिलला आणखी ३४ टँकर्स मंजूर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत गावे आणि वाड्या मिळून ८४० ठिकाणी २१८ टँकर्सद्वारे ४ लाख ४९ हजार २७५ रहिवाशांना पाणी पुरविले जाते आहे. यामध्ये सर्वाधिक ५१ टँकर एकट्या नांदगाव तालुक्यात पाणी पुरवठा करीत आहेत. त्या खालोखाल सिन्नर तालुक्यात ५० टँकर २६५ गाव वाड्यांमधील रहिवाशांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. मालेगावातही ३६ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. ऊन्हाची दाहकता वाढू लागल्याने टँकर्सच्या संख्येत आणखी वाढ होणार असून, प्रशासनानेही तशी तयारी ठेवली आहे.

तालुका गावे टँकर लाभार्थी

बागलाण ३९ २८ ५९४९४

चांदवड ३८ १० २८८६५

देवळा २६ ०९ २३०१७

मालेगाव ११२ ३६ ८१११८

नांदगाव २६७ ५१ ९३५१३

सुरगाणा ०६ ०३ २७५६

सिन्नर २६५ ५० ७४८९०

येवला ८७ ३१ ८५६२२

एकूण ८४० २१८ ४४९२७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादावर समुपदेशानाची मात्रा

$
0
0

कौटुंबिक वादावर समुपदेशनाची मात्रा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शब्दाने मने तुटतात. पण मन मोकळे केल्यास ही मने जुळवता येणे शक्य होते. हाच धागा पकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात तिघा समुपदेशकामार्फत कौटुंबिक वादात मार्गदर्शन करण्यात येणार असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई हायकोर्टाच्या न्यायमुर्तींनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन दावापूर्व कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने हे केंद्र सुरू केले. केंद्राचा शुभारंभ मुंबई हायकोर्टाच्या न्यायमुर्ती साधना जाधव, न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे, आणि न्यायमुर्ती बी. एच. डांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कोर्टाचे सर्व न्यायाधिश व न्यायिक अधिकारी हजर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत गरजुंना कायदेविषयक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात कौटुंबिक वादाची प्रकरणे ही सर्वात जास्त असतात. यापूर्वी या केंद्रात तडजोडीची सुविधा उपलब्ध होती. यासाठी वकील, पक्षकार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यात तडजोडीची भुमिका घेऊन प्रकरणे मिटवली जातात. समुपदेशन केंद्रांमध्ये मात्र तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेतली जाणार आहे. हे समुपदेशक आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी २ ते ५ या वेळेत मार्गदर्शन करतील. समुपदेशनादरम्यान कौटुंबिक वादाची कारणे आणि वादातून निर्माण होणारे संभाव्य धोके समजावून सांगण्याबरोबर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात चार धरणे कोरडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांसह मराठवाड्याची देखील तहान भागविणाऱ्या धरणांमधील पाणी तळाकडे जाऊ लागले आहे. दुष्काळाची दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जिल्ह्यात चार धरणे कोरडीठाक पडली असून, आणखी चार धरणांची काही दिवसांत अशीच अवस्था होणार आहे.

राज्यात पाण्याच्या बाबतीत समृध्द असलेला जिल्हा म्हणून नाशिक ओळखले जाते. जिल्ह्यात मोठी आणि मध्यम आकाराची मिळून २४ धरणे आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता असून, या धरणांमध्ये आजमितीस १३ हजार ५९७ दशलक्ष घनफुट म्हणजेच २१ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे हे उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

नाशिक शहरासह तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये सद्यस्थितीत ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पालखेड धरण सूमहामध्ये केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे. गिरणा खोऱ्यात मात्र आजमितीस ४५ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, या उपलब्ध पाण्यावरच जिल्हावासियांची दुष्काळी परिस्थितील भिस्त अवलंबून असणार आहे. गंगापूर धरणात केवळ २७ टक्के पाणी शिल्लक असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चार धरणे कोरडीठाक

पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने यंदा धरणांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध झाला. परंतु रहिवाशांची दैनंदिन पाण्याची गरज भागविणारी धरणे आता तळाकडे जाऊ लागली आहेत. पालखेड धरण समुहामधील पुणेगाव, नांदुरमध्यमेश्वर, गिरणा खोऱ्यातील नागासाक्या आणि माणिकपुंज या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर पोहोचला आहे. तर तिसगाव, कडवा, भावली, भोजापूर या धरणांमधील पाणीसाठाही सात टक्क्यांच्या खाली आला आहे.

धरण उपयुक्त पाणी साठा

गंगापुर २७

काश्यपी ६७

गौतमी गोदावरी २२

आळंदी २०

पालखेड २५

करंजवण १९

वाघाड ११

ओझरखेड ३१

पुणेगाव ००

तिसगाव ०७

दारणा २४

भावली ०६

मुकणे ११

वालदेवी १९

कडवा ०२

नांदूर मध्यमेश्वर ००

भोजापुर ०१

चणकापुर २०

हरणबारी ३०

केळझर २४

नागासाक्या ००

गिरणा १९

पुनद ५७

माणिकपुंज ००

एकूण २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images