Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक-पुणे महामार्गावर टोल दरवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर टोल दरात शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली. वाढीव दरानुसार आकारणी सुरू झाली असून टोल दर वाढविल्याबद्दल वाहनचालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, वाढीव टोल दर नियमानुसार आणि महामार्गाच्या झालेल्या कामावरीलच असल्याची माहिती नाशिक-सिन्नर टोलवेज लिमिटेड कंपनी प्रशासनाने शुक्रवारी दिली.

नाशिक-पुणे महामार्गाचे नाशिक ते सिन्नर दरम्यानचे १७७ ते २०१/३५० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण्याचे काम नाशिक-सिन्नर टोलवेज लिमिटेड कंपनीला बांधा, वापरा व हस्तांतरित करा तत्वावर दिलेले आहे. या प्रकल्पात एकूण २५.३१ किलोमीटरच्या महामार्गाच्या कामाचा सिन्नर बायपासह समावेश आहे. या महामार्गावर कंपनीने १० नोव्हेंबर २०१७ च्या मध्यरात्रीपासून शिंदे टोलनाका येथे टोल आकारणी सुरू केली. त्यानंतर अवघ्या १७ महिन्यांत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी इंडिपेंडंट इंजिनीयर यांनी प्रस्तावित केलेल्या वाढीव टोल आकारणीस राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे वाढीव दराने टोल आकारणीस कंपनी प्रशासनाला हिरवा कंदील मिळाला आहे. टोल प्लाझाच्या २० किलामीटरच्या परिघात वास्तव्य करणाऱ्या वाहनचालकांच्या मासिक पासमध्येही २४५ वरून २६५ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

कामे अपूर्ण असताना दरवाढ?

महामार्गाचे ठिकठिकाणी कामे अपूर्ण असतानाही टोल दरवाढ करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गावात सर्व्हिस रोडचे काम वर्षभरापासून अपूर्ण आहे. रोडवरील धुळीमुळे स्थानिक हैराण झालेले आहेत. भूमिगत गटारींसह पुलांवरील पथदिव्यांचे कामे अपूर्ण आहे. महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे सिन्नर फाटा ते चेहेडी गाव दरम्यानचे काम झालेले नसल्याने महामार्गाचा हा २.३ किलोमीटरचा भाग वगळून टोल आकारणी सुरू आहे.

अशी आहे टोलधाड (कंसातील दर जुने)

वाहनचा प्रकार......एकेरी फेरी शुल्क....२४ तासाच्या आत परतीच्या शुल्क....एकाच महिन्यातील ५० एकेरी फेरी शुल्क

कार/जीप/व्हॅन/एलएमव्ही.......३० (२५).......४५ (४०).......९६० (८७०)

एलसीव्ही/एलजीव्ही/मिनी बस.......४५(४०).......७० (६५).......१,५५० (१,४१०)

बस/ट्रक..............९५(९०).......१४५(१३५).......३,२४५ (२,९५०)

३ ॲक्सल कमर्शियल वाहन.......१०५ (९५).......१६० (१४५).......३,५४० (३,२२०)

४ ते ६ ॲक्सल एचसीएम/इएमइ/एमएव्ही.......१५५ (१४०).......२३० (२१०).......५,०९० (४,६२५)

अवजड वाहन (७ किंवा जास्त ॲक्सल).......१८५ (१७०).......२८० (२५५).......६,२०० (५,६३०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा जाहीरनामा : समीर

$
0
0

धोरणांचा बांधकाम क्षेत्राला फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान सरकारने नाशिकच्या वाट्याला फारसे काही दिले असे म्हणता येणार नाही. सरकारच्या उरफट्या धोरणांमुळे बांधकाम आणि कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे, अशी खंत माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्सच्या 'मटा जाहीरनामा' या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते उपस्थित होते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मंथनातून साकारलेल्या 'मटा जाहीरनामा'चे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

बांधकाम क्षेत्र हे अतिशय व्यापक आहे. अनेक छोटे उद्योग या क्षेत्रातील उलाढालींवर जगतात. लाखो लोकांना या क्षेत्रामुळे रोजगार उपलब्ध होतो. जाचक कायदे आणि अडचणीचे धोरण यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे ठप्प होऊन मंदीचे वातावरण आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून भरती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षणाचा दर्जाही चिंतेची बाब आहे. सांस्कृतिकदृष्ट्या मोठ्या क्षमतेची मंडळी नाशिकमध्ये असली तरीही त्यांच्या कलेला चांगले व्यासपीठही आतापर्यंत उभारले गेलेले नाही. या क्षेत्रासाठी कलाग्राम हे व्यासपीठ आम्ही उभारले होते; पण नंतरच्या सरकारने त्याचे उद्घाटनही केले नाही. केवळ संकुले उभारून क्रीडा क्षेत्राचा विकास होणार नाही. या संकुलांमध्ये आवश्यक त्या साधनांचा व मनुष्यबळ, देखरेखीचा अभाव चांगल्या दर्जाच्या खेळाडूंसाठी मारक ठरतो आहे. स्थानिक खेळाडूंना केंद्राचे पाठबळ हवे, शिवाय त्यांच्या कामगिरीस बहर येणार नाही, असे मत भुजबळ यांनी मांडले.

पर्यावरणास मारक अशी यंत्रणा असणाऱ्या उद्योगांना माझा विरोध आहे. दळणवणासाठी कनेक्टिव्हिटी गरजेची आहे. आजवर विमानतळाचा प्रकल्प रखडल्याचा फटका नाशिकला बसला आहे. व्यापाराची तर नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने वाट लावली. ज्येष्ठ नागरिकांसाठी अगोदर प्रलंबित आहेत त्या गोष्टी मार्गी लावणे गरजेचे आहे. नाशिकच्या आयटी पार्कलाही चालना मिळायला हवी. वीज बिलाबाबत मराठवाडा-विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असा भेद कसा केला जातो. शहराच्या विकासासासठी दिल्ली-मुंबई कॉरिडॉर गरजेचा आहे. कृषी अवजारांवरील जीएसटी काढायला हवा. फूड पार्कला चालना मिळावी आणि टर्मिनल मार्केट सुरू करावे, असे मुद्दे भुजबळ यांनी मांडले. सत्तेत आल्यास या सर्व मुद्द्यांवर प्राधान्याने काम करू असे आश्वासन त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक मार्गांत आज बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त आज (१४ एप्रिल) जुने नाशिक येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्ग तसेच वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व वाहतूक मिरवणूक होईपर्यंत बंद राहणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मोठा राजवाडा येथील पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ही मिरवणूक वाकडी बारव, चौक मंडई, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, अब्दूल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, सांगली बँक, नेहरू गार्डन, शालिमार, शिवाजी रोड या मार्गे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सांगता होणार आहे. दरम्यान, मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत दिंडोरी नाका, मालेगाव स्टँण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमारकडे व सीबीएसकडे जाणाऱ्या बसेससह सर्व वाहने ही दिंडोरी नाका येथून पेठफाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोक स्तंभ, मेहर सिग्नल, सीबीएस, त्र्यंबकनाका, गडकरी सिग्नलमार्गे नवीन नाशिक तसेच नाशिकरोडकडे रवाना होतील. वाहनचालकांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचपीटी’ला स्मरतेय डॉ. आंबेडकरांची भेट

$
0
0

सन १९३९ मध्ये साधला होता विद्यार्थ्यांशी संवाद

...

saurabh.bendale@timesgroup.com

Tweet : SaurabhbMT

..

नाशिक : नशिकच्या शिक्षण क्षेत्रातील चळवळीत अतिशय महत्त्वाचा ठरलेला तो स्वातंत्र्यपूर्व काळ. देश समृद्ध करण्यासाठी धडपडणारे युवक-युवती. त्याच काळात प्राचार्यांच्या निमंत्रणाला मान देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एचपीटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कॉलेजच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदलेल्या या भेटीचे स्मरण आजही कॉलेजला होते आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै १९३९ मध्ये प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या निमंत्रणावरून एचपीटी कॉलेजला भेट दिली होती. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांवर डॉ. बाबासाहेबांनी भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परळीतील शाळेत शिक्षण घेत होते. त्यामुळे संस्थेसोबत डॉ. आंबेडकरांचे घनिष्ट ऋणानुबंध होते. स्वातंत्र्याच्या लढाईत युवकांना संबोधित करण्यासाठी प्राचार्य कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकरांना कॉलेजमध्ये भाषणासाठी निमंत्रित केल्याचे संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहेत.

डॉ. बाबासाहेब भाषणासाठी आल्यानंतर प्राचार्य कुलकर्णी यांनी इंग्रजीतून मोजक्या व नेटक्या शब्दांत त्यांचा परिचय करून दिला होता. डॉ. आंबेडकर बोलायला उभे राहिले अन् त्यांची धीरगंभीर मूर्ती, भव्य कपाळ, चष्म्याआडचे ते तेजस्वी डोळे आणि ओजस्वी, अस्खलित वाणीतून त्यांनी तरुणांना संबोधित केले. या प्रसंगाचे संदर्भ डॉ. भावना भार्गवे यांनी शांताबाई दाणी यांच्या चरित्रावर लिहिलेल्या 'रात्रंदिन आम्हां' आणि धनंजय कीर यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी चरित्र' या पुस्तकात सापडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एचपीटी भेटीला ८० वर्षे पूर्ण झाली असून, त्या आठवणींना कॉलेजच्या प्रांगणात आजही उजाळा दिला जातोय.

...

\B'त्या' क्षणी जीवनाला दिशा\B

एचपीटीतील विद्यार्थी संवादाच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेबांच्या चहा फराळाची व्यवस्था दादासाहेब गायकवाडांच्या घरी करण्यात आली होती. तिथे येण्याचे निमंत्रण दादासाहेबांनी शांताबाई दाणी यांना दिले होते. 'माणिक व्हिला येथे डॉ. बाबासाहेबांनी सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यावेळच्या गप्पा आणि ती सायंकाळी त्या थोर नेत्याच्या सहवासात स्मरणीय गेली. एवढा हा मोठा माणून पण किती विनम्र, किती मनमिळाऊ. साध्या माणसांमध्ये रममाण होणारा तळमळून, मार्गदर्शन करणारा. त्या क्षणापासून माझ्या जीवनाला एक वेगळीच दिक्षा मिळाली', हा प्रसंग 'रात्रंदिन आम्हां' या पुस्तकात आहे.

...

\Bतुमच्या हाती स्वातंत्र्याची धुरा

\B'तुम्हा युवकांच्या हातीच स्वातंत्र्याची धुरा आहे. देश संपन्न आणि समृद्ध होतो तो त्या देशातल्या ज्ञानसंपन्न, तपोवृध्द अशा युवकांमुळेच. या देशात ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही', असे डॉ. आंबेडकर यांनी एचपीटीत युवकांना उद्देशून सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चाळिशीपार!

$
0
0

शनिवारी ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात उन्हाचा पारा वाढत असून, शनिवारी कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यानंतर शनिवारीदेखील ढगाळ वातावरण पहायला मिळाले. ढगाळ वातावरणातही उष्णतेचा चटका बसत असून, राज्यातील बदलत्या हवामानानुसार दोन दिवसांत तापमान चाळिशी ओलांडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता अधिक आहे. ४ एप्रिल रोजी शहरातील तापमान ४० अंशापलिकडे नोंदविले गेले. त्यानंतर शहरातील तापमान सातत्याने कमी-जास्त होत असून, बुधवारपासून तापमानात वाढ होत आहे. शनिवारी कमाल ३९.७, तर किमान २१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानासोबतच किमान तापमानही वाढत असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. किमान तापमान एप्रिल महिन्यात १९ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम आहे. त्यामुळे उष्णतेचा चटका बसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिलअखेरीस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाणार असून, मे महिन्यात ४४ अंशापर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरल्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील कळवण, येवला, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यांतही वातावरण ढगाळ होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १६ एप्रिलपर्यंत मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील तापमानाचा पारा अधिक उंचावणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

..

\Bकाळजी घेण्याचे आवाहन\B

हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमान चाळिशी पार जात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. जास्तीत पाणी पिण्यासह तेलकट व मसालेदार पदार्थांचे सेवन टा‌ळावे. तसेच सध्या उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, अशक्तपणा वाटल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

--\B

दहा दिवसांचे तापमान\B

दिनांक............................ कमाल...................... किमान

१३ एप्रिल........................ ३९.७....................... २१.५

१२ एप्रिल........................ ३९.९........................ २०.२

११ एप्रिल........................ ३८.९........................ १९.२

१० एप्रिल........................ ३८.४........................ १८.२

९ एप्रिल.......................... ३६.९........................ १९.८

८ एप्रिल.......................... ३८.४........................ १८.६

७ एप्रिल.......................... ३७.६......................... १९.०

६ एप्रिल.......................... ३७.२......................... २०.६

५ एप्रिल.......................... ३७.१......................... २१.२

४ एप्रिल.......................... ४०.४......................... २१.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधी यांची सिन्नरमध्ये सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केले जात आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिन्नरमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधीच्या सभेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मात्र बळ मिळणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात रंगत आणण्यासाठी भाजपकडून २२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची सभा घेतली जाणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतल्या जाणाऱ्या या सभेमुळे महाआघाडीच्या उमेदवारांची धडधड वाढली आहे. त्यामुळे मोदींच्या या सभेला उत्तर देण्यासाठी नाशिकच्या मैदानावर आता राहुल गांधी यांच्याही सभेचे नियोजन केले जात आहे. नाशिक, दिंडोरी, शिर्डी आणि अहमदनगर या चार लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गांधी यांची एकत्रित जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी या दोन्ही जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सिन्नरची निवड केली जाणार आहे. त्यासाठीची चाचपणी काँग्रेसकडून केली जात आहे. या चार मतदारसंघापैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादीचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येण्यासाठी राहुल गांधी यांची सभा घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीही सकारात्मक असून सिन्नरला राहुल यांची सभा झाली तर या चार जागांवर महाआघाडीला फायदा होऊ शकतो. या सभेसाठी सुरक्षा यंत्रणाही कामाला लागल्या असून काँग्रेसकडूनही या सभेची तयारी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्राला देणार प्राधान्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नाशिकमध्ये शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यादृष्टीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी शिवनई येथे जागा उपलब्ध करून दिली; मात्र अद्याप एक वीटही सद्याच्या सरकारने लावली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये एज्युकेशन हबचा अधिक विकास करण्यासाठी पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम प्रधानन्याने मार्गी लावली जाईल,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात आयोजित 'बोलू भाऊंशी'या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले,'देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही संकटात आहेत. त्यामुळे शेतकरी आणि सीमेवरील शेतकऱ्यांचा मुलगा या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलली जातील. खोडसाळपणा करून नाशिकला मागे टाकून नागपूरला पुढे नेण्याचा सद्याच्या सरकारचा डाव आहे. २००९ ते २०१४ लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळेस नाशिकचा विकास पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे नाशिकच्या विकासासाठी पक्षाने मला संधी दिली होती. त्यामुळे पुणे-मुंबईच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्याची धोरणे आखली आणि ती पूर्णत्वास आणली. पायाभूत सुविधा मिळवून दिल्या; मात्र गेल्या पाच वर्षात विकासाचा हा रथ पूर्णपणे थांबला.'

यावेळी पुणे विद्यापीठाचे रखडलेले काम, शहर स्वच्छता, औद्योगिक विकास, शेतकरी, पर्यटन, नाशिक पुणे रेल्वे, ट्रेकिंग सेंटर, रोजगार, प्रदूषण, नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न, क्रीडा, घरपट्टी पाणी पट्टी वाढ, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी शिष्यवृत्ती, नाशिक बससेवा, गुन्हेगारी यासारख्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले त्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधून समर्पक उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब्दस्वरांतून उलगडले ‘गीतरामायण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहारदार गायन आविष्कार, रामभक्तीच्या साद घालणाऱ्या रचना, गीतगायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेले रसिक प्रेक्षक, असे वातावरण शनिवारी सायंकाळी नरसिंहनगरात दिसून आले. निमित्त होते 'गीतरामायण'चे. श्रीराम नवमीच्या सायंकाळी शब्दस्वरांचा हा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती ठरली.

नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवास शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रारंभ करण्यात आला. श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त नरसिंहनगर‚, गंगापूर रोड‚ येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, उपक्रमाचे यंदा अठरावे वर्ष आहे. प्रख्यात गायक पुष्कराज भागवत यांच्या गीतरामायण गायनाने व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शनिवारी गुंफण्यात आले.

'गा बाळांनो रामायण, स्वयें श्री राम प्रभू ऐकती, शरयू तीरावरी अयोध्या, राम जन्मला गं सखे, रामाविन राजपदी कोन बसतो, माता न तू वैरिणी' या गीतातून रामायणातील एकेक प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तरळू लागले. निवेदक गणेश जोशी यांचे प्रत्येक गीताच्या सादरीकरणाअगोदरचे प्रसंगानुरूप निवेदन हे या कार्यक्रमाचे आणखी वैशिष्ट्य ठरले. गीतरामायणाच्या स्वरांना तबल्यावर गौरव तांबे, तर तालवाद्यावर अमित भालेराव यांनी सुरेल साथ दिली. दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या कार्यक्रमात गीतरामायणाच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. मंडळाचे अध्यक्ष बापू कोतवाल यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकाऱ्यांकडून मोजणीकेंद्रांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असलेल्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह सर्वसाधारण निरीक्षक अभिजित सिंग, राजेशकुमार तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक एन.एस.नपलचायल यांनी भेट देऊन पाहणी केली.

नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे २३ मे रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने या मतमोजणी केंद्रात मतदान केंद्रातून येणाऱ्या मतपेट्यांची वाहतूक व पार्किंग व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्था, मतमोजणी केंद्रात पुरेशी हवा व प्रकाश व्यवस्था, इंटरनेट सुविधा तसेच मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाबाबत कायदा व सुव्यवस्था याबाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकर, ओवेसींची तोफ एकत्रित धडाडणार

$
0
0

आंबेडकर, ओवेसींची तोफ एकत्रित धडाडणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनेही कंबर कसली असून, दमदार नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांची एकत्रित सभा घेण्याचा वंचित आघाडीचा प्रयत्न आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा होईल, असे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही यंदा रणशिंग फुंकले आहे. नाशिकमधून माजी नगरसेवक पवन पवार यांना तर दिंडोरी मतदार संघातून बापू बर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही मतदार संघांसाठी उमेदवारी अर्ज भरतेवेळी रॅली काढून वंचित आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. एकूणच वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी सैय्यद पिंप्री येथे प्रचारसभा घेतली. शिवसेना-भाजपनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचे नियोजन केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनेही प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांची एकत्रित सभा घेण्याचे नियोजन केले आहे. प्रकाश आंबेडकर स्वत: सोलापूरातून उमेदवारी करीत असल्याने ते प्रचारात व्यस्त आहेत. १८ एप्रिलला येथे लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची प्रचारसभा नाशिकमध्ये आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीतून वीस लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिक गुंतवणुकीवर भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून बापलेकाने वृद्धाची २० लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ राघो रौंदळ आणि अमित एकनाथ रौंदळ (रा. कॅनडा कॉर्नर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी नंदकिशोर बद्रिनाथ चांडक (वय ६४, रा. कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दिली. रौंदळ यांची सुपर इलेक्ट्रीकल व इंजिनीअर्स नावाची फर्म आहे. या फर्मला के. एम. हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर या कंपनीची मोठी वर्क ऑर्डर मिळाली असून, त्यातून मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची बतावणी करून ही फसवणूक करण्यात आली. संशयितांनी २०१६ मध्ये तक्रारदाची भेट घेतली होती. इंटरनेटवर बनावट वर्कऑर्डर तयार करून संशयितांनी ती तक्रारदारास दाखविली. गुंतवणुकीवर भरघोस मोबदला देऊ, असे सांगत २० लाख रुपये व्यवसायासाठी गुंतविण्यास उद्युक्त केले. चांडक यांनीही सर्व परिस्थिती लक्षात घेता पैसे गुंतवण्यात रस दर्शविला. मात्र पैसे दिल्यानंतर बराच काळ खोटे व्यवहार दाखवून संशयितांनी रकमेचा अपहार केला. मुद्दल किंवा परतावा मिळत नसल्याने चांडक यांनी चौकशी केली. वारंवार पैशांची मागणी करूनही संशयितांनी पैसे परत दिले नाही. शेवटी चांडक यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास निरीक्षक बोरसे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

ऐश्वर्य पाटेकर

कवी

हुसेन बोहरी

डॉक्टर

पवन भगूरकर

सरचिटणीस, भाजप

डॉ. दिलीप बलसेकर

दर्शनिका विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाक् युद्धाची सज्जता

$
0
0

मोदी पिंपळगावी येणार २२ ला; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांची २४ ला सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगर पाठोपाठ आता भाजपने नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांची सभा झाल्यानंतर महायुतीकडून येत्या २२ एप्रिल रोजी मोदींची पिपंळगाव बसवंत येथे सभा घेण्याचे नियोजन केले आहे.

पिंपळगाव बंसवत येथे होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी शिवसेना आणि भाजपने तयारी सुरू केली असून जागेबाबतची चाचपणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी सभेसाठीच्या जागेचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. पिंपळगावनंतर मोदी सभेसाठी नंदुरबारकडे रवाना होणार आहेत. मोदींच्या सभेमुळे भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून अर्ज माघारीनंतरचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभेसाठी चौरंगी तर दिंडोरी लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात लढत आहे. तर दिडोंरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपच्या जे. पी. गावित यांच्यात तिरंगी लढत आहे. शिवसेनेने नाशिकची तर राष्ट्रवादीने नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची केली आहे. दिंडोरीत उमेदवार बदलाने भाजपमध्ये नाराजी आहे. तर नाशिकमध्ये भाजपच्या माजी आमदारानेच बंड केल्याने गोडसेंसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी मोदींनी पिंपळगाव येथे सभा घेतल्याने वातावरण पालटले होते. तसेच विधानसभेतही मोदींच्या सभेमुळे करिश्मा झाला होता. त्यामुळे येत्या २२ तारखेला मोदींची सभा मिळाली असून त्याचे नियोजन सध्या शिवसेना-भाजपकडून केले जात आहे. शिवसेनेचे आमदार अनिल कदम आणि भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडून या सभेचे नियोजन केले जात आहे.

महायुतीची २४ ला सभा

मोदींच्या या सभेनंतर नाशिक आणि दिंडोरीतील शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गोल्फ क्लब मैदानावर २४ एप्रिल रोजी सांयकाळी एकत्रित सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शिवसेना-भाजपचे वातावरण निर्मितीचे प्रयत्न असून ही सभा भव्य करण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिका निवडणुकीत याच मैदानावरून मुख्यमंत्र्यानी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत भाजपची सत्ता आणली होती. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक तयारीचा निरीक्षकांकडून आढावा

$
0
0

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेले निरीक्षक राजेशकुमार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक यंत्रणेशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी तात्पुरत्या सुरक्षित कक्षास भेट देऊन तेथील सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षेची माहिती घेतली. तसेच मतदारसंघातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांना भेटी देऊन सुविधांची पाहणी करण्यात आली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी गायकवाड सभागृह येथील तात्पुरत्या सुरक्षित कक्षास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी राजेशकुमार यांनी केली. संवेदनशील मतदान केंद्राना भेटी देऊन खबरदारीबाबत सूचना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्स विचारणार पंतप्रधानांना जाब

$
0
0

सभेत 'नो वोट' ची भूमिका जाहीर करणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाच वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल भाजपला मतदान का करावे? असा प्रश्न उपस्थित करत नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनेचे कार्यकर्ते पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधानांच्या जाहीर सभेत अनोखे आंदोलन करणार आहे. यावेळी ते आमची फसवणूक केली म्हणून नो 'कोशाहारी नो वोट' ही भूमिकाही जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन गांधीगिरी मार्गाने केले जाणार असून त्यात टोप्या व फलक घेऊन या प्रश्नांकडे लक्ष वेधणार आहे.

आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी शनिवारी आयटक कामगार केंद्रात फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी इपीएफ ९५ पेन्शनरांना भगतसिंग कोशाहारी रिपोर्टप्रमाणे तीन हजार अधिक महागाई भत्ता, असे आश्वासन २३ फेब्रुवारी २०१४ ला दिले होते. आम्ही सत्तेत आल्यावर ९० दिवसांच्या आता पेन्शनवाढ करुन दिली जाईल, असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन ६३ लाख पेन्शनरांनी मतदान केले. पण, सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पेन्शर्संनी दिल्लीबरोबर जिल्हास्तरावरही आंदोलन केले. पण, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे पेन्शनर्स संतापले असून आता ते थेट मोदींनाच जाब विचारणार आहे.

अडवले तर अडचण!

पंतप्रधानाच्या सभेत कटेकोट बंदोबस्त असतो त्यामुळे पेन्शनर्सला टोप्या व फलक घेऊन आता सोडले जाईल का, हा प्रश्न आहे. पण, त्यांना सोडले नाही तर 'नो वोट'ची भूमिका कायम राहणार असल्याचा पेन्शनर्स मंडळींचा निर्धार आहे. त्यामुळे त्यांचा हा संताप भाजप व शिवसेनेला महागात पडू शकतो, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणीची आत्महत्या

$
0
0

नाशिक : आगासखिंड (ता. सिन्नर) येथील योगिता विलास पवार (वय १९) या तरुणीने शुक्रवारी (ता. १२) दुपारी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तिला कँटोन्मेंट रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भाजलेल्या तरुणाचा मृत्यू

नाशिक : स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारानंतर आठ महिन्यांनी मृत्यू झाला. जखमी तरुणाला गँगरीन झाल्याने ही घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश वामन खांडवे (रा. तेलंगवाडी, लक्ष्मणनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रकाश खांडवे याने आठ महिन्यांपूर्वी अज्ञात कारणातून स्वत:स पेटवून घेतले होते. उपचारानंतर तो बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, काही दिवसांनंतर त्याच्या हाताला गँगरीन झाले. शनिवारी (दि. १३) सकाळी अचानक फिट आल्याने बेशुद्धावस्थेत कुटुंबीयांनी त्यासा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

तरुणाची आत्महत्या

नाशिक : लहवीत (ता. जि. नाशिक) येथील २७ वर्षांच्या पवन दगडू मुठाळ या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पवनने शनिवारी (ता. १३) सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच काका अर्जुन मुठाळ यांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लक्झरी बस व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी सव्वाचारच्या सुमारास सातपूर येथील त्र्यंबक रोडवरील अशोकनगर परिसरातील अमृत गार्डनसमोर घडली. सातपूर पोलिसांनी बसचालकाला अटक केली. मृताच्या नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

राजकुमार पंचम यादव (वय ३५, मूळ रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. अशोकनगर, सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्झरी बस नाशिककडून त्र्यंबककडे भरधाव जात असताना विरुद्ध दिशेने राजकुमार यादव दुचाकीवरून भरधाव जात होता. यादव अमृत गार्डनजवळ आला असता दुचाकीवरील नियंत्रण गमावल्याने दुचाकी व लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातात यादवचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक उत्तर प्रदेशातील असल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार पोलिसाचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पोलिस कर्मचाऱ्याचा शनिवारी मृत्यू झाला. तुलसी आय हॉस्पिटलजवळील पुलाच्या कोपऱ्यावर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. भास्कर चंद्रभान दिघे (वय ५४, रा. गौतमीगंगा अपार्ट., काठे गल्ली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव आहे.

दिघे मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. भरधाव जाणाऱ्या छोटा हत्ती (एमएच १५/बीजे ७६८३) वाहनाने दिघे यांच्या दुचाकीला (एमएच १५/बीटी १३४९) पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे तोल जाऊन दिघे रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला, तर शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या. गंभीर अवस्थेत त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की अपघात झाला त्या वेळी दिघे यांनी हेल्मेट परिधान केलेले होते. मात्र, वाहनाच्या जोरदार धडकेमुळे दिघे यांचे हेल्मेट डोक्यातून निघून दूर जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. सुशांत भास्कर दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये छोटा हत्ती वाहनचालक मारुती शिवाजी घोडे (रा. पंचशीलनगर, विजय ममतासमोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार एस. डी. आहेर तपास करीत आहेत.

हेल्मेटसक्तीचा आदेश

रस्ते अपघातांमध्ये यापूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी हेल्मेट वापराबाबत नव्याने सूचना काढल्या आहेत. या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचा आदेश काढण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय भीम’चा गुंजणार जयघोष

$
0
0

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांचे आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी करण्यासाठी भिमसैनिक सज्ज झाले असून, शहरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळते आहे. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. शहरात आज विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले असून, मिरवणुकीत 'जय भीम'चा जयघोष गुंजणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही हर्षोल्हासात साजरी करण्यासाठी भिमसैनिक सज्ज झाले आहेत. जुन्या नाशकातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून दुपारी जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शहरातील सर्व ठिकाणच्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अनेकांनी घरांवर, वाहनांवर निळी झेंडे फडकावले असून, डॉ. आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीय पंथीय मतदारांचा वाढला टक्का

$
0
0

जिल्ह्यात एकूण ९२ जणांची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यात आणखी काही तृतीय पंथीयांनी मतदार नोंदणी करवून घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तृतीयपंथी मतदारांची संख्या ७७ वरून ९२ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मतदान हा लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेला अधिकार आहे. परंतु, अनेक घटक मतदार नोंदणी करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. तिरस्काराच्या नजरा, संकुचित विचारांमुळे मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि तत्सम कारणांमुळे तृतीयपंथीय बांधवही मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवित असल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेनेही तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी करवून घ्यावी, यासाठीचे आवाहन केले. अशा तृतीय पंथियांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची या मतदार जनजागृती मोहिमेमध्ये मदत घेण्यात आली. त्याचे चांगले परिणाम झाल्याची बाब निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीतून पुढे आली आहे. जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी ७७ तृतीय पंथीय मतदारांची नोंद होती. परंतु, आता या मतदारांची संख्या ९२ पर्यंत पोहोचली आहे.

असे आहेत मतदार

नाशिक पश्चिम ........ ६६

नाशिक मध्य ...... ५

नाशिक पूर्व ....... ४

मालेगाव ..... ४

कळवण ........२

दिंडोरी ........२

नांदगाव ...... १

सिन्नर ........ १

बागलाण ...... १

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images