Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चैत्रात बरसल्या सरी!

0
0

\Bपारा पुन्हा चाळीशी ओलांडण्याची चिन्हे

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, शुक्रवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. शहरालगतच्या तालुक्यांतील शुक्रवारी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या बरलेल्या सरींमुळे शहरात सायंकाळी गारवा होता. पण, या बदलेल्या हवामानानुसार दोन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी ओलांडण्याची शक्यता आहे.

यंदा उन्हाची दाहकता हैराण करून सोडणार, अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. शहरातील ४ एप्रिल रोजी कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यानंतर शहरातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, शुक्रवारी कमाल ३९.९, तर किमान २०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. ४ एप्रिलनंतर तापमानाचा खालावत असलेला पारा सोमवार (८ एप्रिल) पासून पुन्हा वधारायला सुरुवात झाली. शुक्रवारी पारा चाळीशी ज‌वळ पोहोचला असून एप्रिल अखेरीस ४४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात १३ ते १६ एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे इतर भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूर शिंगोटे, दातली, भोकणी आणि पांगरी परिसरात अवकाळी पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. देवपूर आणि फरदापुर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये साठवलेला चारा आणि कांदा यावर आच्छादन घालण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सटाणा आणि मनमाड ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात बदल होत असून पुढील दोन दिवसांत शहरातील तापमान पुन्हा चाळीशी पार जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

\Bपाच दिवसांचे तापमान\B

दिनांक............................ कमाल...................... किमान

१२ एप्रिल........................ ३९.९........................ २०.२

११ एप्रिल........................ ३८.९........................ १९.२

१० एप्रिल........................ ३८.४........................ १८.२

९ एप्रिल.......................... ३६.९........................ १९.८

८ एप्रिल......................... ३८.४........................ १८.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निसाका’ची चाके फिरणार

0
0

भाडेतत्वावर चालविण्यासाठी पाच कंपन्याचा प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निफाड सहकारी कारखान्याची चाके पुन्हा फिरण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी काढलेल्या निविदेला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्हा बँकेने १४० कोटींच्या वसुलीसाठी दहा वर्षांच्या भाडेतत्वावर कारखाना चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेला चांगल्या कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याने कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांकडे बँकेची अनुक्रमे १३८ कोटी व १४० कोटींची थकबाकी झाली आहे. या दोन कारखान्यांच्या थकबाकीची रक्कम 'एनपीए'मध्ये गेल्याने या दोन्ही कारखान्यांची जप्ती करून जप्त मालमत्तेच्या विक्रीसाठी तीन वेळा निविदा काढल्या गेल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेऊन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. या निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र यानंतर पुन्हा एकदा बँकने दहा वर्षांसाठीचा भाडेकरार करण्याच्या निविदा प्रसिद्ध केली आहे. ज्यात, ३५०० मेट्रिक टन प्रती दिन गाळप क्षमता असलेला साखर निर्मीती प्रकल्प, एक मेट्रिक टन प्रती दिन कॅलशियम लॅक्टेट प्लँट यांसह १५ के.एल.पी.डी. डिस्टीलरी प्लांट (कॉपर), ३० के.एल.पी.डी.डिस्टीलरी प्लॉट (स्टील) यांचा समावेश आहे. या निविदेला मुंबर्इमधील मे.टायचे इन्प्रा ली.,मुबई नाशिकमधील में कृषी कल्याणी अग्रो ली, अहमदनगरमधील साईकृपा शुगर अंड इंडस्ट्रीज, पुण्यातील मोहोटादेवी शुगर अँड अग्रो ली आणि पुण्यातील समर्थ शुगर अग्रो प्रोड. प्रा. लि. या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. कारखाना भाडेतत्वावर सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेची आर्थिक घडी बसू शकेल, अशी अपेक्षा आहे. तसेच निफाड तालुक्यातील शेतकरी सभासदांना याचा फायदा होऊ शकणार आहे.

संचालकांकडे लक्ष

पाच कंपन्यांच्या निविदा लवकरच उघडल्या जातील. नंतर त्यासंचालक मंडळासमोर ठेवल्या जाणार आहेत. निफाड तालुक्यातून जिल्हा बँकेत चार संचालक आहे. त्यात दिलीप बनकर, अनिल कदम यांची भूमिका निर्णयाक असणार आहे. त्यामुळे हे चार संचालक काय निर्णय घेतात, याकडे निफाडकरांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६१२ ग्रामपंचायतींमध्ये ‘ओएफसी’

0
0

व्हच्युअल क्लासरूमसाठी पुढाकार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ब्रॉडबॅण्ड नेटवर्कच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यासाठी जिल्ह्यात हायस्पीड इंटरनेटसाठी भारत दूरसंचार कार्यालयामार्फत ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ७ तालुक्यांमधील ६१२ ग्रामपंचायतींध्ये 'ओएफसी' टाकण्यात आली आहे. याच ग्रामपंचायतींमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्येही 'ओएफसी' टाकून व्हच्युअल क्लासरूम सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याबाबत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आढावा घेतला.

राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईनने जोडण्यासाठी 'ओएफसी' टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे सर्व ग्रामपंचायतीची विविध प्रकारची माहिती घेण्याबरोबरच ग्रामपंचायतींच्या कारभारावर नियंत्रण ठेवणेही सोयीचे होणार आहे. जिल्ह्यातील चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, नांदगाव, नाशिक व निफाड तालुक्यातील ६१२ ग्रामपंचायतीपर्यत 'ओएफसी' टाकण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी बीएसएनएलचे उपसंचालक कुलकर्णी तसेच अन्य जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेऊन ग्रामपंचायतींबरोबरच शाळांनाही इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी इंटरनेट जोडणी देण्याविषयी चर्चा केली. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी यास मान्यता दिली असून एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्यात जिल्ह्यातील १०० शाळांना इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी बीएसएनएलच्या इंटरनेट कनेक्शनला येणाऱ्या अडचणींबाबत माहिती देण्यात आली. बैठकीस ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

ग्रामपंचायत करणार खर्च

इंटरनेटसाठीचा वार्षिक खर्च ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास आराखड्यातून करण्यात येणार असून यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्हच्युअल क्लासरूम सुरू होऊन खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार आहे. ग्रामपंचायतीप्रमाणेच, जिल्हा स्तरावरावरील सर्व विभागांनी तसेच पंचायत समिती स्तरावरील विभागांचीही हायस्पीड इंटरनेटसाठी 'ओएफसी' अंतर्गत जोडणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहारिया यांची मालेगावी भेट

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. शुक्रवारी मुख्य निवडणूक निरीक्षक अलखकुमार सहारिया व पोलिस निरीक्षक शेखर कुमार यांनी मालेगावी भेट देऊन प्रशासनाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालेगाव बाह्य, मध्य व बागलाण अशा तिन्ही विधानसभा मतदार संघात भेटी देत प्रशासनास निवडणूक व्यवस्थित पार पडण्याच्या अनुषगाने सूचना दिल्या.

समवेत प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, मालेगाव बाह्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले शशिकांत शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार रमेश वळवी, धर्मेंद्र मुल्हेरकर उपस्थित होते. यावेळी सहारिया व शेखर कुमा यांनी दोन्ही मतदारसंघाची स्ट्राँग रूम या ठिकाणी भेट दिली. सुरक्षिततेच्या आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांना देखील त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल, ए. टी. टी. हायस्कूल यासह आघार बुद्रुक, ढवळी विहीर, दाभाडी येथील मतदान केंद्रे पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककला, प्रदर्शनातून ‘अॅनिमिया’ची जनजागृती

0
0

गोवर्धनच्या आरोग्य उपकेंद्रातला उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या जीवनशैलीमुळे महिला आणि मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत असून आहाराकडे होणारे दुर्लक्ष त्यास कारण ठरत असल्याचे प्रबोधन लोककला अन् पोस्टर प्रदर्शनातून करण्यात आले. लोककलेतील भारूड सादर करत गोवर्धन गावात अॅनिमिया आजाराची जनजागृती करण्यात आली. सोबतच अभ्यासपूर्ण माहिती पोस्टर्सद्वारे विद्यार्थी व गावकऱ्यांसमोर मांडली गेली.

गोवर्धन येथील आरोग्य उपकेंद्रात कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र मुंबई आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्यातर्फे 'ॲनिमियामुक्त भारत' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. अमोल आडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भालेराव, डॉ. किरण बकरे, अर्चना जोशी, प्रशांत केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमांतर्गत रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे, 'अॅनिमिया' यासह अॅनिमियाची शास्त्रोक्त माहिती उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली. उपक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शन, सापशिडीचा खेळ, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून अॅनिमियाची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यात आली. सरला कदम, लीना सावंत, गायत्री खैरनार यांनी अॅनिमियाची कारणे व लक्षणांची माहिती सांगितली.

किशोरवयीन मुलांमुलींनी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. गरोदर महिलांनीही आहाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पोषणयुक्त आहार सेवन करण्यावर भर असावा, असा सल्ला उपक्रमांतर्गत देण्यात आला. त्यामुळे गोवर्धन गावातील रहिवाशांना अॅनिमियाची माहिती झाली. आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यकांनी उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात चौरंगी लढत

0
0

गोडसे, भुजबळ, कोकाटे, पवार यांच्यात रंगणार लढत

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माघारीनंतरचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने नाशिकमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे. एकूण १८ उमेदवार रिंगणात असून, खरा सामना शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, कोकाटे आणि पवार यांच्यातच होणार आहे. युतीला कोकाटेंची बंडखोरी मोडीत काढण्यात अपयश आले असले तरी, छावाच्या करण गायकर यांच्या उमेदवारी माघारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघार घेण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. भाजपकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कोकाटेंनी अखेर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. कोकाटेंची बंडखोरी शमविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातील अन् ते माघार घेतली अशी चर्चा होती. परंतु, तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मेळाव्यातून माघार घेणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट झाले होते. तरीही शिवसेनेकडून त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले गेले. परंतु, यश मिळाले नाही. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवारांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून होते. परंतु, त्यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे. आता कोकाटे, पवार यांच्या एंट्रीमुळे गोडसे, भुजबळ अशी होणारी दुरंगी लढत आता चौरंगी होणार आहे. कोकाटे आणि पवार यांच्यामुळे मतदारसंघातील चुरस आणखीनच वाढली असून, दोघांच्या मतांवरच विजयाचे गणित जुळणार आहे.

...

करण गायकरांचा दिलासा

शिवसेनेला एकीकडे भाजपच्या कोकाटेंचे बंड शमविण्यात अपयश आले असताना, दुसरीकडे मात्र छावाच्या करण गायकरांची बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या मध्यस्थीनंतर करण गायकर यांनी हेमंत गोडसेंच्या उपस्थितीत अर्ज माघारी घेतला. त्यामुळे गोडसेंना काहीसा दिलासा मिळणार आहे.

...

भाकपचा आघाडीला पाठिंबा

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माकपने माघार घेतल्याने महाआघाडीला दिलासा मिळाला असतानाच, आता भाकपनेही महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांत शेतकरी व कामगार विरोधी धोरणे राबवली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, संविधान बदलण्याची भाजपकडून केली जात असलेली तयारी, यामुळे भाकपने भाजपविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेत महाआघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. राज्य सचिव राजू देसले यांच्या सहीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा बलुतेदारांच्या ‘रामलला’चा आज जन्म

0
0

चांदोरी गावाला चारशे वर्षांची अनोखी परंपरा

...

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT

..

नाशिक : श्रीरामजन्माचा उत्सव आजमितीला पारंपरिक जोखडात अडकलेला असताना सर्व जातीधर्मियांचा मिळून एक रामजन्म ही संकल्पना चांदोरी गावाने साडेचारशे वर्षांपासून जपली असून, आज दुपारी १२ वाजता एका अनोख्या पद्धतीने 'रामलला'चा जन्म होणार आहे. सुतारापासून कुंभारापर्यंत बारा बलुतेदार एकत्र येऊन हा श्रीरामजन्म साजरा करीत असल्याने विषमतेच्या जमान्यात त्याचे वेगळे महत्त्व आहे.

सुतारकाम करणाऱ्या बांधवाने केलेली रथाची जोडणी, कुंभार बांधवाने खास श्रीरामजन्म उत्सवासाठी बनवलेला रांजण आणि नाभिक बांधवाकडून सूर्याला आरसा दाखवून होत असलेला श्रीरामजन्म अशी अनोखी परंपरा चारशे वर्षांपासून चांदोरी गावाने जपली आहे. आजही हा उत्सव मोठ्या थाटामाटाने होणार आहे.

यावनी साम्राज्यात विठ्ठलपंत बल्लाळ यांना प्रवासादरम्यान संगमनेर, जोर्वे गावाजवळील प्रवरा नदीपात्रात अर्घ्य देताना रामपंचायतनाची ही मूर्ती हातात आली. त्यांचे मंदिर बांधण्याचा विचार करून त्याकाळचे चंद्रावती (आजचे चांदोरी) या गावी मंदिर बांधले. तेच हे श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून, पूर्णत: दगडी व सागवाणी लाकडात बांधलेले आहे. मठात लाकडी देव्हारा असून, त्यात पितळी पाळण्यात श्रीराम पंचायतन विराजीत आहे. समोरील सभामंडपात काळ्या पाषाणातील दास मारूतीदेखील आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव रामजन्माच्या दिवशी मठाधिपतीच्या रथारूढाने पिंपळपाराला अकरा प्रदक्षिणा घालून सुरू होत असे परंतु, कालांतराने यात बदल होत गेला. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी हे पूर्वीचे बल्लाळ नंतर गोसावी आणि आता मठाधिपती असल्याने मठकरी किंवा मतकरी आहेत.

...

रामजन्माची अनोखी पद्धत

मंदिराच्या सभागृहात रामपंचायतन पूर्वाभिमुख ठेवले जातात. माध्यान्हीच्या समयी नाभिक समाजाचे मानकरी हातात आरसा घेऊन दूरवर उभे राहतात व आरशावर सूर्याचे प्रतिबिंब आले की ती प्रकाशकिरणे श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या मुखकमलावर पडताच श्रीराम जन्म होतो. मुखकमलावर सहस्त्ररश्मी पडताच सहस्त्रावधी भाविकांकडून अबीर-गुलाल-फुलांची उधळण केली जाते. श्रीरामनामाचा जयघोष होतो आणि हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

...

श्रीराम जन्माची ही चारशे वर्षांपासूनची अनोखी परंपरा असून, आम्ही भाग्यवान आहोत की बारा बलुतेदारांचा हा रामजन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभते. या मूर्ती अतिप्राचीन असून, येथे नैमित्तिक उत्सव होत असतात.

- प्रमोद पांडुरंग मठकरी, राम मंदिराचे पुजारी

...

युवापिढीला परंपरांची माहिती नाही अशी कायम ओरड होत असते परंतु, आम्हीही अभ्यास करून आता या परंपरा माहीत करून घेत आहोत. चांदोरीचा हा चारशे वर्षांपासूनचा बारा बलुतेदारांचा श्रीरामजन्मोत्सव पाहण्यासाठी तरुणवर्ग उपस्थित राहणार आहे.

- कार्तिकी पंड्या, इतिहासाची विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातून 'अॅनिमिया'ची जनजागृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बदलत्या जीवनशैलीमुळे महिला आणि मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत असून आहाराकडे होणारे दुर्लक्ष त्यास कारण ठरत असल्याचे प्रबोधन लोककला अन् पोस्टर प्रदर्शनातून करण्यात आले. लोककलेतील भारूड सादर करत गोवर्धन गावात अॅनिमिया आजाराची जनजागृती करण्यात आली. सोबतच अभ्यासपूर्ण माहिती पोस्टर्सद्वारे विद्यार्थी व गावकऱ्यांसमोर मांडली गेली. गोवर्धन येथील आरोग्य उपकेंद्रात कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र मुंबई आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्यातर्फे 'ॲनिमियामुक्त भारत' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. अमोल आडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भालेराव, डॉ. किरण बकरे, अर्चना जोशी,nashikप्रशांत केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमांतर्गत रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे, 'अॅनिमिया' यासह अॅनिमियाची शास्त्रोक्त माहिती उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली. उपक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शन, सापशिडीचा खेळ, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून अॅनिमियाची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यात आली. सरला कदम, लीना सावंत, गायत्री खैरनार यांनी अॅनिमियाची कारणे व लक्षणांची माहिती सांगितली. किशोरवयीन मुलांमुलींनी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. गरोदर महिलांनीही आहाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पोषणयुक्त आहार सेवन करण्यावर भर असावा, असा सल्ला उपक्रमांतर्गत देण्यात आला. त्यामुळे गोवर्धन गावातील रहिवाशांना अॅनिमियाची माहिती झाली. आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यकांनी उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदींच्या शिरपेचात येवल्याचा फेटा

0
0

संजय लोणारी, येवला

देशाच्या विविध प्रदेशांमध्ये राजकीय नेत्यांच्या सभा, सोहळे पार पडले जाताना नेते कंपनीच्या शिरी झळकतात, ते त्या त्या प्रदेशांमधील चालीरीतीनुसार सांस्कृतिक व परंपरांचे दर्शन घडवणारे शाल, फेटे, टोपी अन् अंगवस्त्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी सकाळी नगर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत पैठणीचे शहर असलेल्या येवला शहरातील भरजरी-जरतारी फेट्यास महत्त्वाचा मान मिळाला. येवल्यातील प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी खास पैठणीपासून तयार केलेला हा आगळावेगळा फेटा नगरच्या जाहीर प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात झळकला.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा,शिवसेना,रिपाई व रासप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या शुक्रवारी (दि.१२) नगर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात येवला शहरातील एका फेटा कलाकाराने खास पैठणीचा टच देऊन तयार केलेला भरजरी-जरतारी असा फेटा झळकला. येवल्यातील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी हा फेटा बांधला होता. मोदींचे आगमन झाल्यानंतर खंदारे यांच्या खास शैलीतून साकारला गेलेला हा फेटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरचे पालकमंत्री राम शिंदे व उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मोदी यांना शिरपेचात खोवला. हाच फेटा घालून जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी जनसमुदायास संबोधित केले.

मोदींना भावला येवल्याचा फेटा

फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी आजवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या फेटा बांधण्याच्या शैलीने आपलंस केले आहे. श्रीकांत यांचा फेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भावला आहे. नव्हे तर खंदारे यांचा हा फेटा चौथ्यांदा मोदी यांच्या शिरपेचात बांधला गेला आहे. खंदारे यांचेकडील फेटा या अगोदर शिर्डी येथील एका कार्यक्रमादरम्यान एकदा, तसेच दिल्ली येथे येवल्यातील शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीस जाताना दोनदा बांधला गेला होता. आता खंदारे यांनी खास येवल्यातील रेशमी पैठणीपासून आधुनिक पद्धतीने तयार केलेला फेटा हा शुक्रवारच्या नगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरी झळकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर गुन्ह्यांची वाढली सक्रियता

0
0

दोन घटनांमध्ये पाच लाखांवर डल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल पाच लाख रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला. मागील काही वर्षांपासून नाशिकपासून दूर राहणारे सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असल्याचे समोर येते आहे. फसवणुकीच्या या दोन्ही घटनांप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम कार्ड क्लोनिंग करून भामट्यांनी ग्राहकाच्या खात्यातील तब्बल तीन लाख ७३ हजारांची रोकड परस्पर लांबविण्यात आली. फसवणुकीच्या या घटनेप्रकरणी नीलेश त्र्यंबक सस्ते (रा. कडवेनगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. सस्ते यांचे बँक खाते हॅक करून भामट्यांनी पैसे काढले. एटीएममधून पैसे काढत असतांना अज्ञात हॅकरने सस्ते यांचे एटीएम कार्ड क्लोनिंग करून घेतले. या आधारे आरोपींनी ७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल दरम्यान विविध एटीएममधून सस्ते यांच्या खात्यावरील तब्बल तीन लाख ७३ हजाराची रोकड परस्पर काढून घेतली. या गुन्ह्याचा तपास अधिक तपास निरीक्षक राजेंद्र कुटे करीत आहेत.

दरम्यान, फायनान्स कंपनीच्या कार्डची माहिती मिळवित भामट्याने एकाच्या नावे परस्पर ऑनलाईन व्यवहार करून सव्वा लाखास गंडा घातल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. रवीकिरण गजानन सोनवणे (रा. जुनी तांबट लेन) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. सोनवणे यांच्याकडे बजाज फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड आहे. २९ मार्च रोजी त्यांना फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत चोरट्यांनी संपर्क साधला. या दरम्यान त्यांनी त्यांच्या कार्डची माहिती मिळविली. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध ठिकाणी व्यवहार केला. याकाळात संशयिताने तब्बल एक लाख १३ हजार ४७२ हजार रुपयांची विविध ठिकाणाहून खरेदी केली. या घटनेचा सुद्धा अधिक तपास निरीक्षक कुटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीचा मोबदला परस्पर लाटला

0
0

महिलेची सव्वा तीन कोटींची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित केलेल्या अक्राळे शिवारातील जमिनीचा तीन कोटी १७ लाखाहून अधिक रकमेचा मोबदला नातेवाइकांनी परस्पर हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलेच्या भाच्याने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत राहुल तुपलोंढे (रा. गंगापूररोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली. तुपलोंढे यांच्या फिर्यादीनुसार, सदरची जमीन त्यांच्या आत्याची आहे. तर हिराबाई गायकवाड, सोमनाथ गायकवाड (रा. चांदोरी), माया गवळी, अनिता गवळी (रा. खडकजाम), आशा मोरे, देविदास गायकाड, रावसाहेब गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, लंकाबाई दरेकर (रा. आक्राळे), सुनंदा गायकवाड (रा. पिंपळगाव), शकुंतला पवार, ललिता जगताप (रा. सिन्नर), बेबीताई शिंदे (रा. निफाड) योगिता सागर (रा. म्हसरुळ) यांच्यासह प्रकाश गायकवाड, मोहन गायकवाड, किसनाबाई गायकवाड अशी संशयितांची नावे आहे. वरील १७ संशयितांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात तत्कालिन भूसंपादन अधिकारी भीमराव शिंदे यांच्याकडे जमीन मालकीबाबत बोगस कागदपत्र सादर केली. आपणच जमीन मालक असल्याचे भासवून संशयितांनी जमिनीचा मोबदला परस्पर लाटला. या जमिनीच्या मोबदल्यासाठी तक्रारदार राहुल तुपलोंढे यांची आत्या चौकशीसाठी भूसंपादन कार्यालयात गेली. मात्र, त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यातून भूसंपादन मोबदला परस्पर लाटण्याचे उघडकीस आले. हा प्रकार २६ सप्टेंबर २०१४ ते ११ एप्रिल २०१९ दरम्यान घडला. तक्रार उघडकीस येताच आत्याच्या वतीने तुपलोंढे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटेंची बंडखोरी सेनेला पडणार भारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसेंच्या विरोधात अखेर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेसह पालकमंत्री गिरीश महाजन यांना त्यांची मनधरणी करण्यात अपयश आले. कोकाटेंच्या माघारीसाठी शिवसेनेतील नेत्यांनी शेवटची दोन दिवस जळगाव, मुंबईच्याही वाऱ्या केल्या. परंतु, कोकाटे उमेदवारीवर ठाम राहिल्याने अखेरीस महायुतीला नाशिकमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागला आहे.

महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेकडे असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. भाजप-सेनेची युती झाल्याने कोकाटेंना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे कोकाटेंनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेत प्रचारालाही सुरुवात केली. एकूणच कोकाटेंची तयारी पाहिल्यानंतर शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. संजय राऊत यांनी गिरीश महाजन हे सर्जन असल्याने तसेच, कोकाटे भाजपचे असल्याने उपचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, कोकाटेंनी जोरदार मेळावा घेऊन तसेच, शक्तिप्रदर्शन करीत महायुतीच्या गोटातच धडकी भरवली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी कोकाटेंशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी न ऐकल्याने त्यांना एसीबीकडून नोटीस पाठविण्यात आल्याने संतप्त कोकाटेंनी जोमात प्रचार सुरू केला. शेवटच्या दिवशी कोकाटे माघारी घेतील, अशी चर्चा होती. त्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोकाटेंनी सर्व दबाव झुगारून लावत उमेदवारी कायम ठेवल्याने आता महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

...

भाजपची भूमिकेवर संशय?

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी जळगाव गाठत गिरीश महाजन यांना कोकाटेंची उमेदवारी माघे घेण्यासाठी साकडे घातले. परंतु, महाजन यांनी कोकाटे उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचे सांगत शिवसेनेच्या नेत्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवसेनेचे शिष्टमंडळ रिकाम्या हातानेच परतले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही कोकाटेंची बंडखोरी शमविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत.

....

निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय पक्का होता. काही जणांनी मी माघार घेणार अशा वावड्या उठवल्या तसेच, खोटा प्रचारही केला. परंतु, चर्चा आणि वावड्यांना नागरिकांनी बळी पडू नये. मी जनतेसोबत असून, उमेदवारीचा संभ्रम या निमित्ताने आता दूर झाला आहे.

- माणिकराव कोकाटे, अपक्ष उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षात प्रसूती; चौकशीचे आदेश

0
0

नाशिक : सिडको विभागातील अंबड येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेली महिला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रिक्षातच प्रसूत झाली होती. या घटनेची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला आदेश देत तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सिडको विभागातील समर्थ रुग्णालयात गुरुवारी एक महिला प्रसूतीसाठी रिक्षाने दाखल झाली. परंतु, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रिक्षातच बाळाला जन्म देण्याची वेळ तिच्यावर आली. या प्रकारामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा कारभार चर्चेत आला आहे. पंचवटीतील मायको, डॉ. जाकीर हुसैन हॉस्पिटल, बिटकोतील अनागोंदीमुळे रुग्ण अगोदरच त्रस्त आहेत. आता पुन्हा रिक्षातील प्रसूतीच्या घटनेमुळे रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन आयोगाचा वाढता पेच

0
0

मनपाची सहा सदस्यीय समिती; शासनाचीही मंजुरी लागणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शासन निर्देशांनुसार विविध बाबींची पडताळणी करून प्रस्ताव तयार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत विविध मुद्यांची अभ्यास करून आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल महासभेवर ठेवला जाणार असून त्यांनतर मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच पेच अधिक वाढला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याची घोषणा केली आहे. ठाणे, पिंपरी-चिचवड महापालिकेनेही राज्य सरकारकडे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यानंतर नाशिक महापालिकेनेही याबाबत पावले उचलली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेच्या बजेटमध्ये यासाठी तरतूद केली आहे. मात्र, वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे राज्य सरकारने वेतन सुधारणा समितीच्या स्वीकृत केलेल्या अहवालनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांतही सुधारणा करणे व वेतन फरकाची रक्कम देण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याने आयुक्तांनी यासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती आस्थापना खर्च, बांधिल खर्च, उत्पन्नाची आकडेवारी याचा तपशील पाहून अहवाल देणार आहे. त्यामुळे यात बराचसा वेळ जाणार असल्याने सातवा वेतन आयोग लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

अशी आहे समिती

अतिरिक्त आयुक्त (शहर) हरिभाऊ फडोळ हे वेतन आयोग समितीचे अध्यक्ष आहेत. उपायुक्त (प्रशासन) महेश बच्छाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. सुहास शिंदे, उपायुक्त (कर) महेश डोईफोडे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक दीपक वनमाळी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. सचिन हिरे हे या समितीचे सदस्य असून सहाय्यक आयुक्त(प्रशासन) ए. पी. वाघ हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो डीसीआरवर संकट?

0
0

कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आतापर्यंत तब्बल ३० वेळा ठेकेदार कंपनाला नोटिसा देऊनही ऑटो डीसीआरमधील त्रुटी दूर होऊन कारभारात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून याबाबत लोकसभा निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑटो डीसीआरऐवजी राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी तयार केलेल्या युनिफाईड डीसीपीआर अर्थातच सामाईक विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत लागू करण्यात येणारे सॉफ्टवेअर लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

बांधकाम परवानग्यांमध्ये मानवी हस्तक्षेप टाळून परवानग्या ऑनलाईन करण्यासाठी नगररचना विभागात ऑटो डीसीआर प्रणाली लागू करण्यात आली. परंतु, या प्रणालीमुळे बांधकाम क्षेत्राचे प्रश्न सुटण्याऐवजी कोंडीच वाढल्याचा आरोप केला जात आहे. या सॉफ्टवेअर प्रणालीत अनेक त्रुटी असल्याने प्रकरणे रिजेक्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी ऑफलाईन प्रस्तावांना मंजुरीचा प्रघात सुरू झाला. परंत, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, ऑटो डीसीआर प्रणालीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे. आयुक्तांनी यासाठी तीन बैठका झाल्या. तरीही ऑटो डीसीआरबाबत तक्रारी वाढतच असल्याचे चित्र आहे. महापालिकेने संबंधित सॉफ्टेक कंपनीला आतापर्यंत ३० वेळा नोटिसा दिल्या आहेत. पंरतु, तरीही सुधारणा होत नसल्याने हे सॉफ्टवेअरलाच राम राम करण्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी तयार केलेल्या युनिफाईड डीसीपीआर अर्थातच सामाईक विकास नियंत्रण नियमावलीही अंमलात येणार असून त्यासाठी संपूर्ण राज्यासाठी बांधकाम परवानगी ऑनलाईन देणारे नवीन सॉफ्टवेअरही येणार आहे. त्यामुळे या सॉफ्टवेअरचा स्वीकार करण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी वास्तुविशारदाकडून विशेष प्रयत्न सुरू केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परमिटची छपाई नाशिक प्रेसमध्ये

0
0

अमरनाथ यात्रेसाठी यंदापासून परमिट बंधनकारक

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चलनी नोटांसह पासपोर्ट आणि बॉड्सच्या छपाईसाठी नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय देशभर प्रसिद्ध होतेच. आता पवित्र अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरुंच्या परमिट अर्जांची छपाई देखील नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसमध्येच होणार आहे.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे परमिट अर्ज छापण्याचे नियोजन प्रशासन आणि अमरनाथ तीर्थक्षेत्र प्राधिकरणाने केले आहे. चलनी नोटांप्रमाणेच या परमिट अर्जांची छपाई होणार असून त्यात अतिउच्चस्तरीय सिक्युरिटी फिचर्सचे डिझाईन केले जाणार आहे. बाबा अमरनाथ यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता हे परमिटही मिळवावे लागणार आहे.

यापुढे अमरनाथ यात्रेसाठी प्रत्येक भाविकाला परमिट घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच्या अर्जांची छपाई नाशिकरोड येथील आयएसपी प्रेसमध्ये होणार आहे. या परमिट अर्जात उच्चस्तरीय सिक्युरीटी फिचर्स असणार आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रेदरम्यानची सुरक्षा अधिक प्रभावी होणार असून यात्रा काळातील धोक्यांपासुन भाविकांची सुटका होण्यास मोठा हातभारही लागेल. आतापर्यंत चलनी नोटा छापल्या जाणाऱ्या नाशिकरोड येथील प्रेसमध्ये अमरनाथ यात्रा परमिट अर्जांची छपाई होणार असल्याने या प्रेसच्या नावलौकिकातही आणखी भर पडणार आहे. यात्रेदरम्यान प्रत्येक यात्रेकरूला हे परमिट जवळ बाळगावे लागणार आहे. यात्रेदरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांना नियमानुसार वेळेत परमिट काढावे लागणार आहे. येत्या १ जुलै रोजी अमरनाथ यात्रा सुरू होणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी (दि. १५ ऑगस्ट) यात्रेचा समारोप होणार आहे.

कसे असेल परमिट?

चलनी नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरच अमरनाथ यात्रा परमिट अर्ज छापले जाणार आहेत. त्यात अशोकस्तंभ या राष्ट्रीय प्रतिकाचा वॉटरमार्क असेल. त्यावर क्यूआर कोड आणि बारकोड आणि पाठीमागील बाजुस श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र प्राधिकरण असा मजकूर, देवस्थानाचा लोगो असेल. या परमिटवरील मजकूर मॅग्निफायिंग ग्लासखालीच दिसेल. त्यावर फ्लुरोसंट ब्लू शाईत छापलेला लोगोही केवळ अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांतच दिसू शकेल.

असा होणार परमिटचा वापर

अमरनाथ यात्रेत परमिटधारक भाविकालाच बेसकँपवरून पुढे जाण्यास अनुमती मिळेल. याशिवाय डोमेल आणि चंदनवाडी हे प्रवेशद्वार ओलांडतांनाही अंतिम तपासणी होईल. अमरनाथ यात्रेचे बलताल आणि पेहलगाम हे दोन मार्ग आहेत. तेथे यात्रामार्गांसाठी दररोज वेगवेगळ्या रंगांत परमिट वापरले जाणार आहे. परमिट बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याने अमरनाथ यात्रेदरम्यान संशयास्पद व्यक्ती तात्काळ ओळखणे शक्य होईल. त्यामुळे यात्रेकरुंची सुरक्षा आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक प्रशासनाला हातभार लागेल. यात्रेकरुंची संख्या, विषम हवामान किंवा नैसर्गिक आपत्कालिन परिस्थितीत यात्रेवर नियंत्रण मिळविणेही सोपे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीप्रकरणी तिघांना जन्मठेप

0
0

पुजारी टोळीला विशेष मोक्का कोर्टाकडून वेगवेगळ्या कलमांनुसार ५५ लाखांचा दंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुख्यात रवी पुजारी गँगमधील तिघांना नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खंडणी उकळणे आणि दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करणे अशा विविध कलमानुसार दोषी ठरविण्यात आलेल्या या आरोपींना एकत्रित ५५ लाख ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाच्या रक्कमेतून जखमींना २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

संजयसिंग, अरविंद चव्हाण आणि विकाससिंग यांना ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याच टोळीतील सदस्य असलेल्या संदीप शर्मा यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार पाच वर्षे सश्रम कारावास आणि एकत्रित १० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली. मुंबईतील अशोक मोहनानी आणि विवेक मोहनानी या बांधकाम व्यावसायिकांची पाथर्डी फाटा येथे एकता ग्रीन व्हिले ही साईट या सुरू असताना ही घटना घडला होती. मोहनानी यांचा वेगवेगळ्या शहरात व्यवसाय विस्तारत असताना कुख्यात रवी पुजारी गँग खंडणीसाठी मोहनानी यांच्या मागे लागली. त्यांना परदेशातून वेळोवेळी धमक्यांचे फोन कॉल्स सुद्धा आले. आरोपींनी २५ फेब्रुवारी २०११ रोजी खंडणी उकळण्यासाठी दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने पाथर्डी फाटा परिसरातील बांधकाम साईटवर बेछूट गोळीबार केला. त्यात फिर्यादी अशोक मोहनानी, कर्मचारी प्रियंका पलाडकर थोडक्यात बचावले तर देविका कोडिलकर आणि रणजीत आहेर हे अन्य दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या प्राथमिक चौकशीत मोहनानी यांच्या मुंबई अथवा पुण्यातील साईटवर सुद्धा असेच प्रकार झाल्याचे समोर आले. गुन्ह्यातील गांभीर्य आणि टोळीला लगाम घालण्याच्या दृष्टीने तत्कालीन पोलिस महासंचालकांनी या गुन्ह्याचा तपास मुंबईच्या क्राईम ब्रँचकडे सोपविला. तत्कालीन पोलिस अधिकारी हिमांशु राय यांनी या गुन्ह्याचा तपास करीत वरील चौघा आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नाशिक विशेष मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या कोर्टात खटला चालला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर आणि विशेष सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. या खटल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी असे मिळून ४२ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपींचा कबुली जबाब विशेष पोलिस महानिरीक्षक शेरिंग द्रोजे व पोलिस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी नोंदविला. त्यात रवी पुजारी व त्यांच्या टोळीच्या सदस्यांमध्ये झालेले संभाषण, शस्त्र पुरवठा, वित्त पुरवठा याबाबतचे पुरावे कोर्टासमोर मांडण्यात सरकारी पक्षाला यश मिळाले. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध पुढे खटला सुरू ठेवण्याबाबतचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहेत.

आठ आरोपींचा समावेश

गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा समावेश आहे. त्यातील वरील चौघांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला असून, मुख्य सूत्रधार रवी पुजारी आणि त्याचे दोन साथिदार अद्याप फरार आहे. रवी पुजारी हा दक्षिण आफ्रिकेत दडून बसला असून, त्याच्या अटकेसाठी पोलिस काय प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी थेट नाशिकपर्यंत आली होती. कोर्टाच्या शिक्षेने निश्चितच अशा कृत्यांना आळा बसेल. समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

- अॅड. अजय मिसर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील

मागील सहा ते सात वर्षांपासून या खटल्याची नियमीत सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षाने मांडलेल्या सक्षम बाजुमुळे आरोपींना भारतीय दंड विधानासह मोक्का कलमानुसार सुद्धा दोषी ठरविले.

- डॉ. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी अभियोक्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मज्जा-मस्तीसाठी बच्चेकंपनी मोकळी

0
0

शाळांच्या परीक्षा संपल्या; दोन महिने सुट्टीचा आनंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभ्यास, गृहपाठ, परीक्षा, शाळा, क्लास यात वर्षभर अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका झाली असून उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटायला विद्यार्थीवर्ग मोकळा झाला आहे. शहरातील अनेक शाळांना सुट्ट्या लागल्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहरातील बहुतांश शाळांच्या वार्षिक परीक्षा आता संपल्या असून उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्ट्या अनुभवण्यासाठी विद्यार्थीवर्ग सज्ज झाला आहे. मित्रमैत्रिणींचा निरोप घेत विद्यार्थ्यांनी सुट्यांचे नियोजन आखण्यात आले आहे. कोणी आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाणार तर कोणी उन्हाळी शिबिरांना जाणार आहे. शाळेच्या शेवटच्या दिवशी या सर्व बाबींचे नियोजन आपल्या मित्रांना सांगण्यात विद्यार्थीवर्ग व्यस्त होता. तर काहींना आपला मित्र, मैत्रिण आता आपल्याला दोन महिने भेटणार नाही, या विचाराने वाईट वाटत होते.

१५ जूनपासून सुरू झालेला नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवास दुसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यात संपतो. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत दोन महिन्यांचा काळ विद्यार्थ्यांना मौजमजेसाठी, नवीन काही शिकण्यासाठी मिळत असतो. हा आनंदाचा काळ आता सुरू झाला असल्याने विद्यार्थीवर्ग खुश आहे. काही शाळा मात्र अद्याप सुरू असून १५ ते २० एप्रिलदरम्यान सुट्ट्या लागणार आहेत. तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असल्या तरी ३० एप्रिलपर्यंत त्यांची शाळा सुरू राहणार आहे.

\Bनिकाल १८ दिवसांत

\Bअभ्यास, परीक्षांच्या टेन्शपासून विद्यार्थी मुक्त झाले असले तरी, अवघ्या १८ दिवसात विद्यार्थ्यांच्या हाती निकाल येणार आहेत. कोणाला पेपर सोपे गेले, कोणाला अवघड हे निकालातून समोर येईल. मात्र, तोपर्यंत मज्जा, मस्ती करण्याचा फंडा विद्यार्थी वापरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत तिरंगी लढत

0
0

डॉ. पवार, गावित, महाले यांच्यात तुल्यबळ लढत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माघारीनंतर आठ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत येथे तिरंगी होणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी व माकप या प्रमुख पक्षांनी तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे येथील लढत रंगतदार होणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडी व अपक्ष रिंगणात असले तरी त्यांचे मोठे आव्हान येथे नसल्यामुळे पक्षीय पातळीवरच ही निवडणूक आता लढवली जाणार आहे.

या मतदारसंघात भाजपतर्फे डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीतर्फे धनराज महाले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आमदार जीवा पांडू गावित यांच्यात लढत असणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बापू बर्डे व माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल हे कितपत आव्हान देतात हे अंतिम टप्यात समोर येणार आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार झालेले विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी भाजपने नाकारल्यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. पण, त्यांनी अद्याप प्रचारात सहभाग न घेतल्यामुळे भाजपची चिंता कायम आहे.

चव्हाण यांची उमेदवारी नसल्यामुळे त्याचा थेट फायदा मात्र माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांना होणार आहे. कळवण विधानसभा मतदारसंघात कळवण व सुरगाणा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. चव्हाण व गावित हे सुरगाणा येथील स्थानिक आहे. त्यामुळे सुरगाणा येथे चव्हाण यांची उमेदवारी नसल्यामुळे त्याचा फायदा गावित यांना होणार आहे.

...

चव्हाण समर्थकांची अडचण

विद्यमान खासदार चव्हाण यांचे भाजप समर्थक हे पक्षाबरोबर जातील असा अंदाज आहे. पण, त्यांचे सर्वपक्षीय समर्थक नेमके आता कोणाला मतदान करतील हा प्रश्न आहे. चव्हाण उमेदवार नसल्यामुळे त्यांची अडचण वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये १८,दिंडोरीत आठ रिंगणात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत माघारीनंतर जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील ५ जणांनी माघार घेतल्याने आता १८ जण रिंगणात आहेत. दिंडोरी मतदारसंघात एकूण ९ उमेदवारांचे अर्ज वैध होते. त्यातील एका जणाने माघार घेतल्याने आता तेथे ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर, धुळे मतदारसंघात ३२ उमेदवारांचे अर्ज वैध होते. त्यातील चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणात तब्बल २८ उमेदवार राहिले आहेत. नाशिक आणि धुळे मतदारसंघात १५ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने तेथील प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन बॅलेट युनिट लावावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता या यंत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. जिल्ह्यातील या बहुरंगी लढतींसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

सविस्तर वृत्त... प्लस-१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images