Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यात ४५ लाख मतदार

$
0
0

नोंदणीनंतर ६९,९९८ जणांची नव्याने भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १ फेब्रवारी ते ३० मार्च दरम्यान झालेल्या मतदार नोंदणीनंतर ६९ हजार ९९८ मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता ४५ लाख १५ हजार ५५४ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात त्यासाठी ४ हजार ४४६ मतदान केंद्र आता असणार आहेत.

नव्या आकडेवारीनुसार, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघात १७ लाख ३३ हजार १२४ मतदार तर नाशिक लोकसभा मतदार संघात १८ लाख ८४ हजार ८४१ मतदारांची एकूण नोंदणी झाली आहे. धुळे लोकसभा मतदार संघातील तीन विधानसभा मतदार संघात हेच मतदान आता ८ लाख ९७ हजार ५८९ इतके राहणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकूण ४४ लाख ४५ हजार ५५६ इतके मतदार होते. पण, नवीन नोंदणीनंतर त्यात वाढ झाली आहे.

असे आहेत विधानसभेचे मतदार

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात मतदान नोंदणीनंतर आता असे मतदान असणार आहे. त्यात नांदगाव (३ लाख १७ हजार २८३), मालेगाव मध्य (२ लाख ८४ हजार ९९९), मालेगाव बाह्य (३ लाख ३६ हजार ८३३), बागलाण (२ लाख ७५ हजार ७५७), कळवण (२ लाख ६८ हजार ६२३), चांदवड (२ लाख ८० हजार १०८), येवला (२ लाख ९६ हजार २४६), सिन्नर (३ लाख ३६८), निफाड (२ लाख ६८ हजार ४१०), दिंडोरी (३ लाख २ हजार ४५४), नाशिक पूर्व (३ लाख ५२ हजार ८६२), नशिक मध्य (३ लाख १५ हजार ९६३), नाशिक पश्चिम (३ लाख ९० हजार ५५१), देवळाली (२ लाख ६४ हजार २९७), इगतपुरी (२ लाख ६० हजार ८००) इतक्या मतदारांचा समावेश आहे.

इतका वाढला मतदार टक्का

मतदारसंघ .... वाढीव मतदार

नाशिक पश्चिम .... १०८३८

येवला .... ७२४७

निफाड .... ७२०९

सिन्नर .... ५९१०

नशिक मध्य .... ४३४२

नाशिक पूर्व .... ४२१५

मालेगाव बाह्य .... ४१९९

देवळाली .... ३७९५

नांदगाव .... ३६९३

कळवण .... ३६९१

मालेगाव मध्य .... ३४८०

चांदवड .... ३३४६

दिंडोरी .... ३१६१

बागलाण .... २६४२

इगतपुरी .... २२३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शतप्रतिशत मतदानासाठी...

$
0
0

\Bअभाविपतर्फे 'नेशन फर्स्ट; वोटिंग मस्ट' मोहीम \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदारांमध्ये मतदान विषयक जागृती व्हावी, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात 'अभाविप'च्या वतीने 'नेशन फर्स्ट; वोटिंग मस्ट' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्यभरात हे अभियान ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत 'नोटा' पर्यायाचा उपयोग न करता शंभर टक्के मतदान करून लोकशाही सशक्त करा, असे आवाहन मतदारांना केले जाणार आहे.

नाशिक परिसरात या अभियानांतर्गत आतापर्यंत २ हजार विद्यार्थ्यांशी संपर्क साधला गेला असल्याची माहिती 'अभाविप'च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकशाहीचे सशक्तीकरण हा उद्देश या अभियानामागे असल्याचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितले. मतदान करताना मतदात्याच्या हाती 'नोटा' पर्यायदेखील उपलब्ध असतो. पण या पर्यायाने एखाद्या चांगल्या उमेदवारामागील पाठबळही मतरूपाने वाया जाते. त्यामुळे 'से नो टू नोटा', असे आवाहन मतदात्यांना करून मतदानाचा अधिकार शंभर टक्के राबविण्याचा संदेश दिला जात आहे.

देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यात यावी, महिला सुरक्षिततेस प्राधान्य मिळावे, लोकशाही बळकट व्हावी, सामाजिक समरसतेस प्राधान्य द्यावे, भ्रष्टाचार संपुष्टात आणावा, संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढीला लागावे, जातीयवादी शक्तींची हद्दपारी व्हावी, लोकशाहीला आव्हान करणाऱ्या माओवादी-नक्षलवाद्यांना रोखण्यात यावे या सर्व प्राधान्याच्या मुद्द्यांसाठी स्थिर सरकार देणे ही लोकशाहीची गरज आहे. ही गरज तुमच्या मतदानातून पूर्ण होईल त्यासाठी मतदान गरजेचे आहे, असे यावेळी 'अभाविप'च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जो देंगे नोट, उनको नहीं देना वोट

$
0
0

निफाड बसस्थानकात पथनाट्य दणाणले

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'छोडो अपने सारे काम, पहले चलो करे मतदान', 'जो देंगे दारू, साडी, नोट उनको कभी नहीं देना वोट', 'मत देना अपना अधिकार, बदले में ना लो उपहार', 'चुल्हा चौका छोड दो, २९ एप्रिल को वोट दो', अशा विविध घोषणा देत निफाड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी निफाड बसस्थानकात मतदार जनजागृती पथनाट्य सादर केले. या मुलींनी सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांना हात घालत परिसर दणाणून सोडला.

मतदार जनजागृती करीत चांगला देश घडवण्यासाठी चांगला नेता निवडून द्या. मतदार हा राजा आहे तो भिकारी नाही. म्हणून कोणीही त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. मतदारानेही राजाप्रमाणे राहून भिकाऱ्यासारखे पैसे घेऊ नका, असे आवाहन या पथनाट्यातून करण्यात आले.

निफाड येथील बसस्थानकात पथनाट्याला प्रारंभ होताच अनेक प्रवासी जमा झाले. ढोलताशाच्या गजराने व विद्यार्थिनींच्या अभिनयाने प्रेक्षकांनी पथनाट्यास मनापासून दाद दिली. पथनाट्याचे नेपथ्य योगीता शिंदे यांनी केले. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका उषा नागपुरे, नेहरे, किल्लेदार, परशराम पुंड, दत्तात्रेय बैरागी, त्र्यंबक निंबेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’तर्फे उद्या रंग अक्षरांचे मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजता 'रंग अक्षरांचे' या मालिकेतील चौथे पुष्प सुपरिचित कवी राजेंद्र सोमवंशी, संतोष वाटपाडे आणि रामचंद्र कुलकर्णी हे गुंफणार आहेत. नाशिकरोड, दत्त मंदिर स्टॉपजवळील ऋतुरंग अॅम्फी थिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

'गमाडी गम्मत' या बालकाव्याचे लेखक सोमवंशी काव्य मैफिलीचे सूत्रधार असणार आहेत. 'ही बाग कुणाची आहे' व 'एखाद्या शब्दासाठी' या वृत्तबद्ध कवितांचे संग्रहांचे लेखक वाटपाडे आणि 'संगम' या मराठी व उर्दू गझल संग्रहाचे लेखक व माजी आदिवासी विकास आयुक्त कुलकर्णी हे यावेळी आपल्या रचना सादर करतील. कार्यक्रम साहित्यिकांना व रसिकांसाठी खुला आहे. तरी अधिकाधिक रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिकरोड शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड आदींनी केले 'आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोइंगचा खटाटोप कशासाठी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात टोइंग कारवाईचा खटाटोप नेमका कशासाठी सुरू आहे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी एखादी घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या सूचना देतात. मात्र, या सूचनांची सातत्याने पायमल्ली होत असून, अत्याधुनिक या नावाखाली सुरू झालेल्या टोइंग व्हॅनचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांची दादागिरी कमी होण्याची चिन्हेच दिसत नसल्याची स्थिती आहे.

महापालिकेने टोइंग व्हॅनच्या पांढऱ्या हत्तीपासून नामानिराळे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे काम शहर वाहतूक शाखेकडे आले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्हींचा वापर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही यंत्रणा स्वीकारण्यास नागरिकदेखील तयार झाले. मात्र, आता रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही यंत्रणा विकसित झाली, की नागरिकांना त्रास देण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोर्टासमोर झालेल्या हाणामारीच्या एका घटनेनंतर वाहतूक शाखेने वाहन उचलण्याबाबत वेगवेगळ्या सूचना केल्या. अर्थात, या सूचनांचा अंतर्भाव ठेकेदाराच्या नियमावलीतही आहे. वाहन उचलण्यापूर्वी त्या वाहनाचा क्रमांक स्पीकरवर जाहीर करावा, या नियमाकडेदेखील सातत्याने आणि जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. टोइंग व्हॅनला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आणि काहींना लावण्यात येणार याबाबत वाहतूक शाखेने नेहमीच गाजावाजा केला. परंतु, ही सिस्टीम नावापुरतीच असल्याची जाणीव टोइंग कर्मचाऱ्यांना आहे. कोणी लक्ष देणार नसल्याने ही दादागिरी वाढत आहे. मुळातच पुरेशी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने टोइंगचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.

--

जागेवर तडजोडीस नकारघंटा

एखाद्या वाहनचालकाने जागेवर तडजोड करण्याची तयारी दर्शविल्यास त्यालाही प्रतिसाद मिळत नाही. वाहन वाहतूक शाखेच्या कार्यालयापर्यंत टो करून नेल्यास त्याचे चार्जेस ठेकेदारला मिळतात. जागेवर दंड झाल्यास फक्त नो पार्किंगची रक्कम मिळते, ही त्यातील खरी मेख आहे. टोइंग व्हॅनवरील कर्मचारी हे कंत्राटी असून, त्यांचे काम फक्त वाहने उचलण्याचे आहे. या प्रक्रियेची सर्वस्वी जबाबदारी त्या वाहनावरील वाहतूक पोलिसाची असते. मात्र, रस्त्यावर वाहतूक पोलिस येतच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि टोइंग कर्मचारी यांच्यातच वाद होताना दिसून येतो.

--

अर्थकारणच महत्त्वाचे

शहरातील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवणे, असे सामाजिक लेबल टोइंग व्हॅनसाठी वापरण्यात आलेले असले, तरी त्यात मोठे अर्थकारण दडलेले आहे. ठेकेदार सुमारे आठ वाहने वापरतो. टोइंगसाठी लागणारे मनुष्यबळही त्याला सांभाळावे लागते. त्यामुळे ज्या ठिकाणाहून कमीत कमी वेळेत आणि श्रमात जादा पैसा मिळेल, तो परिसर टोइंग व्हॅनवरील कर्मचारी टार्गेट करतात. टोइंग व्हॅन सुरू झाल्यापासून कोणत्याही रस्त्यांवरील समस्या दूर झालेल्या नाहीत. परिस्थिती जैसे थे असताना टोइंगचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोक्का आरोपींना आज शिक्षेची सुनावणी

$
0
0

मोक्का आरोपींना

आज शिक्षेची सुनावणी

नाशिक : खंडणी प्रकरणात एकता बिल्डरच्या साईटवर गोळीबार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रवी पुजारीच्या टोळीला मोक्का कोर्टाने दोषी ठरवले आहे. या टोळीच्या गुन्ह्याचा तपास मुंबई क्राईम ब्रँचने केला असून, नाशिक मोक्का कोर्टात ही सुनावणी सुरू होती. सदर टोळीला शुक्रवारी (दि.१२) शिक्षा जाहीर होण्याची शक्यता जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतबाह्य रिक्षांचे ‘मीटर डाउन’

$
0
0

वाहतूक शाखेसह आरटीओची ५० गाड्यांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाहतूक करण्याची मुदत संपल्यानंतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५० ऑटो रिक्षा शहर वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने जप्त केल्या. या रिक्षा स्क्रॅप केल्या जाणार असून, मुदत संपलेल्या रिक्षांची शोध मोहीम आगामी काळात सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरासह जिल्ह्यात धावणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनांचे आयुर्मान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने गत वर्षी निश्चित केले. स्कूल बससाठी १५ वर्षे, तर रिक्षांसाठी २० वर्षे आर्युमान निश्चित करण्यात आले आहे. या नियमाआधारे वाहतूक शाखा आणि आरटीओ यांच्यामार्फत १ एप्रिलपासून २० वर्ष आर्युमान पूर्ण झालेल्या रिक्षांचा शोध सुरू करण्यात आला. शहरात २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. प्रवासीकेंद्रीत असलेल्या रिक्षा व्यवसायात दरवर्षी भर पडत असून, अनेकदा नियमबाह्य प्रकार समोर येतात. शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली. त्यात अनेक गुन्हेगारांनी आपले पुनर्वसन रिक्षाचालक म्हणून करून घेतल्याचे समोर आले होते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही सुद्धा चिंतेची बाब ठरते. प्रवाशी वाहनांना विशिष्ट वयोमर्यादा असते. त्यानंतर त्या वाहनाचा प्रवाशी वाहतुकीसाठी वापर करता येत नाही. रिक्षांसाठी ही आर्युमर्यादा २० वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शहरात हजारो रिक्षा मुदत संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहेत. या रिक्षांचा शोध घेऊन त्या स्क्रॅप करण्यासाठी १ एप्रिलपासून संयुक्त पथकामार्फत कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ५० रिक्षा जप्त करण्यात या पथकाला यश मिळाले. शहरात दोन हजारांच्या आसपास मुदतबाह्य रिक्षा असून, या रिक्षा रस्त्यावरून हटवेपर्यंत ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गत वर्षी आरटीओने अशा प्रकारच्या तेराशे रिक्षा जप्त करून केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेमुळे एलईडीला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वीज बचत होऊन लखलखाट व्हावा म्हणून एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या कामाला अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने मुहूर्त सापडू शकलेला नाही. या कामाचे टेंडर मंजूर झाले असून आचारसंहितेमुळे पुन्हा ब्रेक लागला आहे.

महापालिकेला पथदीपांसाठी खर्च होणाऱ्या वीज वापरामुळे कोट्यावधी रुपये महावितरणला अदा करावे लागतात. हा खर्च वाचवा यासाठी शहरात एलईडी दिवे बसवण्याची योजना पुढे आली; मात्र या योजनेच्या टेंडरवरून अनेक वादंग निर्माण झाले. अनेक कारणाने ही योजना सातत्याने लांबणीवर पडत होती. नाशिक महापालिकेच्या निर्णयानंतर अनेक महापालिकांनी ही योजना कार्यान्वित केली तरीही ही योजना सुरू करण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडत नव्हता. या योजनेमुळे शहरातील सर्व भागात ९२ हजार दिवे बसविले जाणार असून २२० कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या कामाचे टेंडर काढण्यात आले. त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ते मंजूर करण्यात आले. त्यामुळे ही योजना लवकर सुरू होईल, असे नागरिकांना वाटले होते. आपल्या दारात 'एलईडी'चे दिवे लागतील या विचाराने नाशिककर आनंदले. मात्र, त्यांची आशा क्षणभंगूर ठरली. याच काळात लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने हे काम बंद करण्यात आले. आचारसंहिता संपणार नाही तोपर्यंत कोणतेही काम होणार नसल्याने नागरिकांना एलईडी दिव्यांची वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, आचारसंहिता संपताच एलईडी दिव्यांचे काम सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

चोरट्यांना आयती संधी

सध्याच्या परिस्थीतीत अस्तित्वात असलेल्या जुन्या दिव्याचे सुटे भाग महापालिकेने खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचे पथदीप बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागात तक्रार केली असता सुटे भाग व दिवे नाही असे कारण सांगून नागरिकांची बोळवण केली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत रस्त्यावर दिवे नसल्याने अनेकदा चोरीच्या घटना घडत आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही सुरू आहेत. मोबाइल चोरीचे प्रकार होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राध्यापक वेतनाविना!

$
0
0

\Bनऊ महिन्यांपासून प्रतीक्षा; \Bशिक्षण बाजारीकरण विरोधी मंच मागणार दाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील सपकाळ नॉलेज हब संचलित कै. गं.ना. सपकाळ इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांचे वेतन हे जुलै २०१८ म्हणजे सलग नऊ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे या प्राध्यापकांची कोंडी फोडण्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने पुढाकार घेतला आहे. याप्रकरणी वस्तुस्थिती निवेदनाच्या स्वरूपात कॉलेजच्या प्राचार्यांच्या लक्षात आणून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रात शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता दाद मागण्यात येणार आहे.

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महाविद्यालयांपैकी सपकाळ इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्रश्न शहरात काही दिवसांपासून चर्चेत आहे. युवासेनेच्या वतीनेही तेथे शैक्षणिक मुद्द्यांवरून आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळीही प्राध्यापकांच्या रखडलेल्या वेतनाचा मुद्दा उचलला गेला होता. आता विनावेतन काम करताना तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असल्याने प्राध्यापक कर्मचारी हवालदिल झाले आहे. जागेवारी २०१९ पासून संस्थेकडे वारंवार अर्ज करण्यात आले. याद्वारे जुलै २०१८ पासून रखडलेले नऊ महिन्यांचे वेतन मागण्यात आले. मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अद्यापही वेतन रखडल्याची प्राध्यापकांची तक्रार आहे.

वेतनाविना रहावे लागत असल्याने या स्थितीच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून चुकीचे पाऊल उचलले गेल्यास या घटनेची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची असेल, असा इशारा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने दिला आहे. प्राध्यापकांची ही समस्या विचारात घेऊन यावर त्वरित तोडगा काढावा; अन्यथा मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कौटुंबिक व्यवस्थापन कोलमडले

इतक्या दीर्घकाळ वेतनाअभावी काम करताना या कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक स्तरावर कोंडमारा होतो आहे. पाल्यांचे शैक्षणिक शुल्क, वैद्यकीय सुविधा, विम्याचे व गृहकर्जाचे हप्ते अशा कारणांमुळे त्यांचे कौटुंबिक व्यवस्थापन साफ कोलमडले आहे. या कर्मचाऱ्यांना सामाजिक स्तरावरही सन्मानाने जगणे कठीण बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार-नगरसेवकांत खडाजंगी

$
0
0

प्रचारावरून वाद; भाजप नेतृत्वापुढे वाढती डोकेदुखी

..

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाजप-शिवसेनेचे मनोमिनल झाले मात्र भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा दुरावा, हेवेदावे, वर्चस्ववाद चव्हाट्यावर येत आहेत. जळगाव जिह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील वाद शमत नाही तोच नाशिकमध्येही भाजप आमदार व नगरसेवक यांच्यात प्रचारावरून खडाजंगी झाली. यामुळे भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात सुरू असलेली धुसफूस गुरुवारी ऐन प्रचारावेळी चव्हाट्यावर आली. प्रभागात प्रचाराला येऊसुद्धा नगरसेवकांना फोन केला जात नसल्याचा आरोप करून नगरसेवक शहाणे यांनी वादविवाद केला. यावेळी आमदार हिरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या दोघांमध्येच वाद होऊन खडाजंगी झाली. यामुळे एकाच पक्षाच्या आमदार आणि नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र समोर आले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार सुरू केला आहे. गुरुवारी (दि. ११) उत्तमनगर येथे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू होता. यावेळी प्रभाग २९ मधील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी नगरसेवक शहाणे यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी थेट उत्तमनगर येथील बुद्धविहार परिसरात जाऊन भाजपचे पदाधिकारी प्रकाश चकोर यांच्याकडे मला का फोन केला नाही म्हणून विचारणा केली. आमच्या प्रभागात येऊन प्रचार करताना आम्हालाच विश्वासात का घेतले जात नाही असे सुनावले. यावेळी आमदार हिरे यांनी शहाणे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र या चर्चेतून हा वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये खडाजंगी झाली. प्रचारानिमित्‍त दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांसमोरच आमदार आणि नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. अखेरीस काही जणांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

...

माझ्या प्रभागात प्रचार करीत असताना नगरसेवक या नात्याने पदाधिकाऱ्यांनी मला कळवायला हवे होते. मात्र मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याचबरोबर मी या प्रभागाची जबाबदारी असणाऱ्या पदाधिकाऱ्याकडे विचारणा करीत होतो. त्यावेळी आमदारांनी कारण नसताना प्रकरण अंगावर ओढून घेत वादविवाद केला.

- मुकेश शहाणे, नगरसेवक

...

सध्या संपूर्ण मतदारसंघात घरोघर जाऊन प्रचाराचे काम सुरळीत सुरू आहे. मात्र काही विरोधकांनी ही अफवा पसरवली आहे. असा काही प्रकार घडलेलाच नाही. लोकांमधून चुकीचे गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे. अफवा आहे असे काहीही झालेले नाही. प्रचाराबरोबरच इतरही काही बैठकांचे नियोजन सुरू आहे.

- सीमा हिरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादाची धग चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात गुरुवारी (दि. ११) प्रचाराला बोलविले नाही यावरून वादंग झाले. या वादाला पेलिकन पार्कची पार्श्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पेलिकन पार्कच्या नूतनीकरणावरूनही यापूर्वी आमदार हिरे आणि शहाणे यांच्यात दुफळी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वादालही हाच विषय कारणीभू असल्याचे चर्चा आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार उत्तमनगर येथे सुरू असताना माझ्या प्रभागात प्रचार करताना मला बोलाविले नाही यावरून नगरसेवक मुकेश शहाणे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी झालेली शाब्दिक चकमक ही एकेरी भाषेतील असल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पेलिकन पार्कचा विकास करण्यावरून महासभेत आंदोलन केल्यानंतर या कामाला गती मिळाली असल्याचा दावा शहाणेंकडून केला जात आहे, तर पेलिकन पार्कसाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणून हे काम करीत असल्याचा दावा आमदार हिरे करीत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये पेलिकनवरूनच वादंग सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी नगरसेवक शहाणे यांच्या पत्रकार परिषदेवरूनही वाद झाला होता. त्याचबरोबर पेलिकनला नमो उद्यान नाव द्यायचे की सेंट्रल पार्क म्हणायचे यावरूनही याच दोघांत वाद झाला होता. भाजपच्या सिडको मंडलाच्या निवडणुकीदरम्यान बैठकीत नगरसेवक शहाणे आणि आमदार हिरे यांच्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍तीवरून वाद झाला आहे. त्यामुळे यावेळी झालेला वाद हा काही आजचा नसून यापूर्वीपासून दोघांमध्ये असलेली खदखद बाहेर आली आहे.

...

वादाला जुनीच किनार

नगरसेवक मुकेश शहाणे हे मनसेत असतानापासून वसंत गिते यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर वसंत गिते यांच्या मार्गदर्शनाखालीच शहाणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार अपूर्व हिरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही शहाणे यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे अपूर्व हिरे यांच्याशी जवळीक असलेल्या शहाणे यांचेही आमदार हिरे यांच्याशी पटले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर भारतीयांतर्फे गोदाकाठी छठपूजा

$
0
0

उत्तर भारतीयांतर्फे

गोदाकाठी छठपूजा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चैत्र शुद्ध षष्ठीचा मुर्हूत साधत उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी (दि. ११) रामकुंड परिसरात छठ पूजा केली. शहर परिसरातून आलेल्या हजारो उत्तर भारतीयांमुळे गोदाकाठाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

वर्षभरात दोन वेळा साजरा करण्यात येणाऱ्या छट पूजेत नदीच्या पात्रात उसाचे तोरण उभे करण्यात आले. सोबत अननस, केळी, शहाळे, चिक्कू, डाळींब, सफरचंद आदी फळांची मांडणी करून पूजा करण्यात आली. भाविकांची रामकुंड परिसरात दुपारपासून गर्दी झाली. मावळत्या सूर्याला अर्घ्य देत दिवे लावण्यात आले होते. कुटुंबाला सुख, समृद्धी, चांगले आरोग्य लाभण्यासाठी कार्तिक आणि चैत्र महिन्यात ही पूजा करण्यात येते. कार्तिक महिन्याच्या षष्ठीच्या तुलनेत चैत्र महिन्यातील पूजेला गर्दी कमी होती. सूर्याची सायंकाळी उपासना करून उत्तर भारतीय बांधव आपापल्या घरी परतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक पोलिस निरीक्षक नाशकात

$
0
0

निवडणूक पोलिस

निरीक्षक नाशकात

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक पोलिस निरीक्षक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सर्वसाधारण निरीक्षक अभिजित सिंग, राजेश कुमार, पोलिस निवडणूक निरीक्षक एन. एस. नपलचल यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या समवेत बैठक घेतली. तसेच, निवडणूक कामकाजाविषयी चर्चा केली. दिंडोरीचे निवडणूक निरीक्षक अभिजित सिंग यांचा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२९७६७०१, नाशिकचे निवडणूक निरीक्षक राजेश कुमार यांचा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२९७६७०२ तर, पोलिस निवडणूक निरीक्षक एन. एस. नपलचल यांचा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२९७६७०९ असे आहेत. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असेल तर थेट त्यांच्याशीही संपर्क करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक वादातून महिलेचा विनयभंग

$
0
0

सरकारवाडा पोलिसांत वर्षभरानंतर गुन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक व्यवहाराच्या वादातून महिलेला धक्काबुक्की तसेच विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींमध्ये व्यावसायिकांचा समावेश असून, मागील वर्षापूर्वीच्या या वादानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश कृष्णाकांत पारेख, आशा जयेश पारेख (दोघे रा. नयनतारा हाईटस, मायको सर्कल) आणि सुरेश वैश्य (रा. मधुसुर बंगला, सावरकरनगर, गंगापूर रोड) अशी संशयितांचे नावे आहेत. कॅनडा कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले. ९ जानेवारी २०१८ रोजी अपघात झाला होता. संशयित हे पतीचे मित्र असल्याने त्यांचे कौटुंबिक संबंध होते. पतीच्या मृत्यूनंतर संशयित आरोपींनी महिलेची भेट घेतले. व्यवसायासाठी तुमच्या पतीने एक कोटी रुपये घेतले होते, असे त्यांनी महिलेला सांगितले. या व्यवहाराचे कागदपत्रे तसेच इतर पुरावे सादर करा, असे महिलेने सांगितले. संशयितांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील सदनिका, जळगाव येथील शेतीबाबतचे नोटरी केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती त्यांना दाखविल्या. मूळ कागदपत्रे सादर करा, असे महिलेने सांगितले असता संशयितांनी त्यांना दमबाजी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संशयितांनी जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत वेळी अवेळी फोन करून, त्यांचा पाठलाग करून त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ५ मे २०१८ रोजी दुपारी अडीच वाजता संशयित जयेश व आशा पारेख फिर्यादी महिलेच्या घराजवळ गेले. त्यांचा रस्ता अडवून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच विनयभंग करून एक कोटी रुपये न दिल्यास ठार मारू अशी धमकी दिली. महिलेने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस आयुक्तांकडे मांडली कैफियत

प्राथमिक चौकशीनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पीडित महिलेने तीन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत संशयितांना अटक करण्यात आलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांचा’ हात लागल्यावरच फिरताय रथाची चाकं!

$
0
0

वालजी परमार यांची तीन दशकापासून सेवा

रामनाथ माळोदे, पंचवटी

वय वर्ष ८७, तरीही तरुणांना लाजवेल अशा उत्साह, शहरात सायकलवरून प्रवास करीत चढ-उताराचे रस्त्यावरून सहज ये-जा करणारे, गॅरेजमध्ये काम करणारे वालजी परमार (मिस्त्री) या वयोवृद्धाचा हात लागल्याशिवाय चैत्र शुद्ध एकादशीला काढण्यात येणाऱ्या नाशिकमधील रथोत्सवासाठीच्या रथांची चाके फिरत नाहीत. श्रीराम रथाला तब्बल ३० वर्षांपासून त्यांच्या हातानेच ग्रिसिंग करण्यात येते. गरुड रथाच्या ग्रिसिंगचेही कामही सात वर्षांपासून त्यांच्याकडेच आहे.

सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवातील रथाची दरवर्षी मिरवणूक काढण्याअगोदर रथ पूर्णपणे सज्ज करण्याची जबाबदारी रास्ते आखाडा तालिम संघ संचलित श्रीराम रथोत्सव समिती करीत असते. रथाच्या डागडुजीबरोबरच रथाच्या चाकांना योग्य पद्धतीने गती मिळावी. धुरीच्या साह्याने रथ वळविणे सुलभ जावे यासाठी ग्रिसिंग करावे लागते. हे काम पूर्वी शेळके मिस्त्री हे करीत होते. त्यांनी हे काम करण्याचे बंद केल्यानंतर पाथरवट लेन येथे राहणारे आणि मालेगाव स्टॅण्ड येथील मनोहर गॅरेजमध्ये काम करणाऱ्या वालजी परमार यांनी स्वीकारले. वयाच्या ८७ व्या वर्षीदेखील ते रथाच्या चाकांना आणि मधल्या रहाडाला ग्रिसिंग करीत आहेत.

वर्षातून एकदा करण्यात येणाऱ्या या कामाला त्यांना पाच दिवस लागतात. प्रभूश्रीरामांची सेवा करण्याच्या भावनेतून ते हे काम करीत असतात. रथाचे प्रत्येक चाक खोलून त्याचे जुने ग्रिसिंग काढून ग्रिसिंग आणि ऑईलिंग करण्याचे काम ते करतात. एका रथाला चार किलो ग्रिसिंग आणि एक लिटर ऑईल लागते, असे परमार यांनी सांगितले.

केवळ कन्येचा आधार!

धनेल पॅलेसच्या पार्किंगच्या जागेतील एक छोट्याशा खोलीत परमार राहतात. पहाटे साडेचारला उठून थंड पाण्याने स्नान करून गायी आणि कुत्री यांना खाऊ घालण्यास ते बाहेर पडतात. त्यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्यांची एकुलती एक कन्या काजल सोळंकी ही हिरावाडीत राहते. त्यांच्यासाठी रोज जेवणाचा डबा आणून देण्याचे काम ती करते. परमार यांच्या छोट्याशा खोलीत आजही विजेचा दिवा नाही. त्यांच्या सुतारकामाचे साहित्य, सायकल आणि भांडी देखील चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देत सकारात्मकवृत्तीने ते जीवन जगत आहेत.

श्रीराम रथाच्या ग्रिसिंगचे काम माझ्यानंतर पुढे सुरूच राहायला हवे, यासाठी रथाच्या ब्रेकमनचे काम करणारे अरुण शेळके यांना हे काम शिकवत आहे. पुढच्या पिढीला या कामाची माहिती होणे गरजेचे आहे.

- वालजी परमार, मिस्त्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिसळ पार्ट्यांना आलाय ऊत!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढू लागला असून उमेदवारांसह त्यांच्या खंद्या समर्थकांकडून प्रचारासाठी अफलातून फंडे आमलात आणले जात आहेत. नाशिकरोडला काही कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून मिसळ पार्ट्या झडू लागल्या आहेत. सामनगावरोडवरील एका मंगल कार्यालयात अशीच एक मिसळ पार्टी झाली. या निमित्ताने झणझणीत मिसळीवर ताव मारण्याची आयतीच संधी चालून आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहालाही भरते आले.

निवडणूक जवळ आली की मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लृप्त्यांचा वापर केला जात आहे. नाशिकरोडमध्ये शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांच्या युतीच्या उमेदवारासह बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराकडून प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक मैदानात उतरले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त सामनगाव रोडवरील मंगल कार्यालयात झालेल्या मिसळ पार्टीत शिवसेना भाजपच्या आजी माजी आमदार-मत्र्यांसह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी झणझणीत मिसळवर ताव मारला. या मिसळ पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा धुराळा उडाला. अशीच एक मिसळ पार्टी गेल्या आठवड्यात चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात कोणताही गाजावाजा न करता पार पडली आहे. येत्या शनिवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता छत्रपती फाउंडेशन, छत्रपती युवा सेना, महाराष्ट्र राज्य दारुबंदी जनआंदोलन आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिखरेवाडी येथेही अशाच एका मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

'एमके' म्हणजे काय रे भाऊ?

चेहेडी पंपिंग स्टेशन, जेलरोड, शिंदे, पळसे, नाशिकरोड या भागात सिन्नर तालुक्यातील कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्ताने मोठ्या संख्येने स्थायिक झालेली आहेत. या सर्व कुटूंबांकडून 'एम. के.' या नावाचा जोरदार प्रचार सुरू आहे. परंतु, स्थानिकांना मात्र एम. के. म्हणजे काय, याचा सुरुवातीला उलगडा होत नव्हता. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची यात संख्या अधिक आहे. त्यामुळे नाशिकरोडला 'एम. के.' नावाने आपले बस्तान पक्के करण्यास प्रारंभ केल्याचे दावे केले जाऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये रंगणार चौरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून पाच इच्छुकानी माघार घेतल्याने आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नाशिकमधून चौरंगी लढत होणार असून दिंडोरीत केवळ एका उमेदवाराने माघार घेतल्याने ८ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये १६ हुन अधिक उमेदवार रिंगणात असल्याने प्रशासनाला २ ईव्हीएम मशिन ठेवाले लागणार आहेत.

अर्ज माघारीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत माघारिची मुदत होती. अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी नाशिकमधून माघार घेतली. माघार घेणाऱ्यामध्ये अपक्ष उमेदवार आणि जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे आणि छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष उमेदवार करण गायकर, राजु कटाळे, रमेश भाग्यवंत आणि महेश आव्हाड यांनी माघार घेतली. त्यामुळे आता नाशिकमध्ये युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, आघाडीचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. यासह आनखी १४ उमेदवार रिंगणात असल्याने यंत्रणेला २ ईव्हीएम मशिन मतदानावेळी वापरावे लागणार आहे.

दिंडोरीतून एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात आठ उमेदवार शिल्लक आहेत. प्रमुख लढत युतीच्या भारती पवार, आघाडीचे धनराज महाले, माकपचे जे. पी. गावित यांच्यात होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वारबाबानगरात दुचाकींची जाळपोळ

$
0
0

तीन दुचाकींचे नुकसान; कारवाईची मागणी

...

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

स्वारबाबानगर परिसरात दुचाकी जाळण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळे कष्टकरी, कामगार हैराण झाले आहेत. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. काहीतरी जळत असल्याचा वास महिलांना आल्याने त्यांनी आरडाओरड केली. या घटनेत एक दुचाकी जळून खाक झाली, तर दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.

स्वारबाबानगर झोपडपट्टी भागात दुचाकी जाळण्याचे प्रकार नवीन नाहीत. समाजकंटकांकडून दुचाकी लक्ष्य केले जात असताना पोलिस या टवाळखोरांवर कारवाई कधी करणार हाच खरा सवाल आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास स्वारबाबानगरच्या कालिका चौकात घराबाहेर उभ्या केलेल्या एका दुचाकीवर रॉकेल टाकून पेटविण्यात आले असल्याचे तक्रारदार ज्ञानेश्वर वानखेडे यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या दोन दुचाकीना त्याचा फटका बसला. दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीला लागून असलेल्या सोमेश्वर कॉलनीत चारचाकी वाहन जाळण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा नदी वाहत असतानाही पालिका प्रशासनाकडे साठवण तलाव नसल्यामुळे शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने महिनाभर शहरात पाणीच आले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मार्च रोजी चणकापूरचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. २८ मार्चपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यास पालिकेने प्रारंभ केला होता.

पालिका प्रशासनाने ठेंगोडा येथे साठवण तलाव केला नसल्याने गिरणा नदीतील पाणी वाहून गेले. हेच पाणी साठवण तलावात साठविले असते तर एप्रिल महिनाभर शहरवासियांना टंचाई भासली नसती. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने पालिका प्रशासनाने सटाणा शहरवासियांच्या पाणीकपातीचा निर्णय घेत ११ एप्रिलपासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ढगाळ वातावरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सकाळपासून कडक उष्मासह दमट वातावरणाने शुक्रवारी दुपारनंतर येवला शहर अन् तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सदृश्य ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

तालुक्यात पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास तळपत्या सूर्यामुळे तापमानाचा पारा हा चाळीशीपार गेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास असहाय्य करणाऱ्या दमट वातावरणाने तालुकावासीयांना घामाघूम करून सोडले होते. पुढे दुपारी साडेतीननंतर तालुक्याच्या विविध भागात कुठे तुरळक तर कुठे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचे ढग दाटून येताना, तळपता सूर्य ढगाआड दडला गेला. सायंकाळी पाच वाजेनंतर आकाशात ढगांचा काहिसा गडगडाट देखील अवकाळी पावसाची वर्दी देऊन गेल्याचे चित्र समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images