Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मोकाट कुत्र्याचा सहा बालकांना चावा

$
0
0

राजीव टाऊनशीपमधील घटना

...

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

खुल्या जागेत उभ्या असलेल्या मोकाट जनावरांनी वृद्ध महिलेवर हल्ला केल्यानंतर आता इंदिरानगर भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच राजीवनगर येथे एका मुलीला जखमी केल्यानंतर या मोकाट कुत्र्यांनी सोमवारी (दि. ८) रात्री सहा बालकांना गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे कोणतीही घटना घडल्यानंतर नागरिकांना तत्परता दाखविणाऱ्या नगरसेवकांनी याबाबत आवाजही उठविला नसून, प्रशासनाने तर या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने बघितले नसल्याचे चित्र आहे. इंदिरानगर भागातील मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

राजीवनगर येथील राजीव टाऊनशिप परिसरात रात्रीच्यावेळी काही मुले खेळत असताना अचाकनपणे आलेल्या एका कुत्र्याने या मुलांवर हल्ला केला. यावेळी साईबाबा मंदिराजवळ असलेल्या साडेतीन वर्षीय लावण्या पाटील या बालिकेच्या उजव्या गालाला या कुत्र्याने चावा घेतला. लावण्याची या कुत्र्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर याच कुत्र्याने साक्षी गुप्ता या बालिकेला चावा घेतला. त्यानंतर याठिकाणी असलेल्या कृणाल निकाळजे, विशाल नाईक आणि स्वराज फसाठे यांनादेखील या कुत्र्याने आपले लक्ष्य करून त्यांना जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच काही युवकांनी काठ्यांच्या सहाय्याने या कुत्र्याला पळवून लावले. या जखमी बालकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर राजीवनगर टाऊनशिप परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मोकाट कुत्रे याठिकाणी कसे आले व यांना पकडण्यात प्रशासनाला यश केव्हा येणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही या परिसरात लगतच एका मोकाट कुत्र्याने एका बालिकेस गंभीर जखमी केले होते.

..

राजीवनगर भागात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.

- राम जाधव

..

अस्वच्छता असल्याने अनेकदा हे मोकाट कुत्रे याठिकाणी येत असावे असा अंदाज आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता हा विषय घेतला पाहिजे. या परिसरातून मोकाट कुत्र्यांना तातडीने अटकाव केला पाहिजे.

- संदीप पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

$
0
0

१६ दुचाकी हस्तगत

म. टा . वृत्तसेवा, सटाणा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यात सापळा रचून दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीचा छडा लावला. सटाणा पोलिसांनी एकाचवेळी समांतर कारवाई करीत ५ लाख ७८ हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकींसह आरोपींना ताब्यात घेतले. नाशिकसह धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि मध्य प्रदेशात असलेल्या या सराईत टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुरुवारी (दि. ४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील सीमावर्ती भागात गस्त सुरू केली. ताहाराबाद ते पिंपळनेर रस्त्यावर संशयित चोरीच्या दुचाकींच्या नंबर प्लेट बदलून विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने ताहाराबाद चौफुली येथे सापळा रचून संशयित वसंत भागवत चोथवा (वय २६, रा. गारमाळ, ता. सुरगाणा) यास एका पल्सर मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह दुचाकी पिंपळगाव शहरातून चोरी केल्याचे कबूल केले. तसेच नाशिक, कळवण, पिंपळगाव, धुळे शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. साथीदार आकाश बाळू गांगुर्डे (वय २२, रा.चिखलआंबे, ता. चांदवड) याचेकडे विक्री करण्यासाठी दिलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने गांगुर्डे यास ताब्यात घेऊन तालुक्यातील पिंपळकोठे व चांदवड तालुक्यातील चिखलआंबे शिवारातून दहा मोटरसायकल हस्तगत केल्या. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे अधिक तपास करताना पथकाने दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथून कैलास बाळू कडाळे (वय २९,रा. राजीव नगर,खेडगाव,ता.दिंडोरी)यास ताब्यात घेतले. चोरीच्या दुचाकी विकत घेणारे खेडगाव येथील गोरख भाऊसाहेब गांगुर्डे, कानिफ जयराम माळी व वैभव उर्फ केदु उल्हास गांगुर्डे यांनाही ताब्यात घेतले. आरोपींपैकी वसंत चोथवा, आकाश गांगुर्डे व कैलास कडाळे हे सराईत गुन्हेगार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचरिकेवर बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

एकाच ठिकाणी नोकरीला असलेल्या डॉक्टर व परिचारिका यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले; मात्र विवाहाचे आमिष दाखवत डॉक्टरने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित परिचरिकेने दिल्यानंतर डॉक्टर तसेच अन्य तीन जणांवर पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हूणून सेवांर्गत प्रशिक्षणास असलेल्या तरुणीबरोबर त्याच केंद्रात प्रशिक्षणास असलेल्या डॉ. प्रशांत गायकवाड याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि विवाहाचे आमिष दाखवित वेळोवेळी बलात्कार केल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. विवाह तुझ्याशीच करीन असे आश्वासन देऊन डॉक्टरने पीडितेवर वणी गड तसेच साई स्पर्श हॉस्पिटलमध्ये वारंवार बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केली असता संशयित आरोपीच्या कुटुंबीयांनी संबंधित तरुणी आपल्या जातीची नसल्याचे सांगत नकार दिला आणि जातीवाचक बदनामी केली, अशी तक्रार संबंधित पीडितेने पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी डॉ. प्रशांत गायकवाड याच्यासह त्याच्या कुटुंबातील काशिनाथ गायकवाड, वैशाली काशीनाथ गायकवाड (सर्व रा. रौळस पिंपरी) आणि मित्र सुजित साळवे (रा. लोणवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत चौधरी पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र फार्मसी’ देशभरात ७० वे

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयांतर्गत एआयआरएफ समितीने केलेल्या सर्वेक्षणात देशातील अव्वल ७५ कॉलेजांच्या यादीत मविप्र फार्मसी कॉलेजला ७० वे ते राज्यात १७ वे स्थान मिळाले आहे. या यादीत या कॉलेजने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून चौथे तर नाशिक जिल्ह्यातून पहिले स्थान पटकाविले आहे. २०१९ या वर्षासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर हा सर्वे जाहीर करण्यात आला.

महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणारी रोजगाराची संधी, सरकारी योजनांची उपलब्धता, मागासवर्गीय विद्यर्थ्याना दिल्या जाणऱ्या सुविधा यांच्यासह संशोधनासाठी उपलब्ध उपकरणे आदी मुद्द्यांच्या आधारावर पहिल्या ७५ मध्ये मविप्र फार्मसी कॉलेजला स्थान मिळविता आले आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले, उपप्राचार्य डॉ. मिलिंद वाघ, एनआयआरएफचे समन्वयक प्रा. अमोल जगदाळे व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे व सर्व संचालक मंडळाने महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोटेंनी उमेदवारीवर कायम राहावे

$
0
0

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आव्हान; डॉ. भामरेंचा अर्ज दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे
‘हिंमत असेल तर आमदार अनिल गोटे यांनी शेवटपर्यंत उमेदवारीवर कायम राहावे. स्वत:चे डिपॉझिट वाचवून दाखवावे,’ असे आव्हान मंत्री महाजन यांनी आमदार गोटेंना उद्देशून केले. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दावाही महाजानांनी केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. ९) दुपारी दाखल केला. या वेळी डॉ. भामरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री महाजन बोलत होते.

धुळ्यातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. डॉ. भामरे यांच्या पारोळारोडवरील प्रचार कार्यालयापासून मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीची रॅली निघाली. अर्ज दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिजामाता शाळेसमोर सभा घेण्यात आली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

अखेर सुभाष देवरे भाजपमध्ये
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचे सख्खे मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे यांनी मंगळवारी (दि. ९) भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण, देवरे हे दोनवेळा जिल्हा परिषद अध्यक्ष होते. तर सध्या बाजार समितीमध्ये सभापती आहेत. यामुळे त्यांचा धुळे जिल्ह्याशी चांगलाच संपर्क असून, तीसहून ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. यामुळे आता देवेरे यांच्या भाजपप्रवेशाने ‘मामा-भाचा’ या नात्यात फूट पडली असून, पाटील आणि देवरे कुटुंबांत कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. डॉ. सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुभाष देवरेंनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीच्या रॅलीत सहभाग घेतला.

आमदार गोटेंचा अपक्ष अर्ज
भाजपला सोडचिठ्ठी देत शहराचे आमदार अनिल गोटेंनी भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी अपक्ष अर्ज दाखल केला. या वेळी गोटेंनी सांगितले की, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याशी सरळ बदला घेण्यासाठी मी उमेदवारी करीत आहे. विजयी झाल्यानंतर आपण मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासह जिल्ह्यातील व लोकसभा मतदारसंघातील विकास हे एक ध्येय असल्याचे आमदार गोटेंनी सांगितले.


नंदुरबार मतदारसंघात
शेवटच्या दिवशी २४ अर्ज
धुळे : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. ९) सहा उमेदवारांनी एकूण आठ अर्ज सादर केले. शेवटच्या दिवसापर्यंत चौदा उमेदवारांनी एकूण २४ अर्ज सादर केले आहेत. मंगळवारी (दि. ९) आनंदा सुकलाल कोळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी सादर केले. संदीप अभिमन्यू वळवी यांनी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे अर्ज दाखल केला. कृष्णा ठोगा गावीत यांनी भारतीय ट्रायबल पार्टी आणि सुशील सुरेश अंतुर्लीकर यांनी वंचित बहुजन आघाडी पार्टीतर्फे अर्ज सादर केले. ॲड. के. सी. पाडवी यांनी भारतीय काँग्रेस आघाडीतर्फे दोन तर हेमलताबाई कागडा पाडवी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे एक व अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. १२) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत असून, यानंतर प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात किती उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या मोराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या मोराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १०) दुपारी समोर आली. दुष्काळाचे चटके सोसणारे वन्यजीव सैरभैर झाले आहेत. रणरणत्या उन्हात मुखी पाण्याचे चार थेंब पडावे यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांची व्यथा या निमित्ताने दिसून आली आहे.

मातुलठाण शिवारातील योगेश रघुनाथ आहेर यांच्या शेतातील विहिरीत मोराचा जीव गेला. योगेश आहेर हे बुधवारी दुपारी विहिरीकडे गेले असता त्यांना तेथे मोर पडलेला दिसून आला. ५५ फूट खोल असलेल्या विहिरीत अवघे ५ ते ६ फूट पाणी होते. मोराच्या मृत्यूची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पिंजऱ्याच्या सहाय्याने मृत मोराला विहिरीबाहेर काढण्यात आले.

दोन मोरांचा सटाण्यात अंत

सटाणा : उन्हाच्या दाहकतेमुळे मुंजवाड येथील बाळासाहेब सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या शेतात दोन मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला. सूर्यवंशी यांच्या शेतात बुधवारी (दि. १०) सकाळी दोन वर्षाचा एक नर व मादी असे दोन मोर पाण्याअभावी मृत पावल्याचे आढळून आले. वनविभागाच्या अधकिाऱ्यांनी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातला जाणारे पाणीमिळवण्यासाठी माझा संघर्ष

$
0
0

माकपचे उमेदवार गावित यांनी मांडली भूमिका

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आपल्या राज्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ या भागांतील नद्यांचे १६ टीएमसी पाणी गुजरातला देऊन त्या ठिकाणी पर्यटनस्थळ आणि औद्योगीकरणासाठी द्यायला मी लाँग मार्चद्वारे विरोध केला. याउलट हे पाणी जर गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात टाकले तर नांदगाव, येवला, देवळा व चांदवड हे तालुके कायमचे दुष्काळमुक्त होतील, म्हणून या पाण्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे, अशी भूमिका दिंडोरी लोकसभेतील माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित यांनी मांडली

निफाड येथील पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. वन जमिनींसाठी १९७८ पासून आम्ही लढलो आणि आदिवासींना हक्काची वनजमीन मिळवून दिली. गेल्या वर्षात वनमजूर, शेतकरी यांच्यासाठी लाँग मार्च काढून मागण्या मंजूर करून घेतल्या. आता आपल्या जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळवण्याला आम्ही खंबीरपणे विरोध करीत आहोत. त्यामुळे दिंडोरी लोकसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, कांदा आणि ऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. महाराष्ट्रातील समुद्राला जाणारे १८०० टीएमसी पाणी उचलले तर संपूर्ण महाराष्ट्र ओलितासाठी येऊ शकतो; पण सत्ताधारी आणि ज्यांना याअगोदर सत्ता दिली, त्यांनी हा प्रश्न भिजत ठेवल्याचा आरोप या वेळी आमदार गावित यांनी केला. गुजरात सरकार समुद्राला ३५ किलोमीटरचा बांध घालून पाणी सौराष्ट्राला नेण्याचा डाव असताना महाराष्ट्र सरकार मात्र शांत आहे, असे ते म्हणाले

माकप हा निवडणुका परीक्षा मानतो आणि त्या पद्धतीने सामोरा जातो. दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार ध्येयनिष्ठ नाहीत. केवळ वर जाण्यासाठी शिडी म्हणून वापर करीत आहेत. त्यांची विश्वासार्हता तपासली पाहिजे. अनेक आमिषे येऊनही मी पक्ष बदलला नाही. माझी राजकीय कारकीर्द अजूनही जनतेसाठी आहे. मी गावात राहतो. बाकीचे उमेदवार शहरात राहतात, हा फरकही गावित यांनी अधोरेखित केला.

भुजबळांनी घातला खोडा

राज्यात माकपने दोन जागा महाआघाडीकडे मगितल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या बैठकीत दिंडोरीची जागा माकपला देण्याची तयारी झाली होती; पण छगन भुजबळ यांनी या प्रस्तावात खोडा घातला. त्यामुळे राज्यात माकप आघाडीत सहभागी झाला नाही. मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्यात आणण्याच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी दोन निवडणुका लढल्या. अजून एक निवडणूक या प्रकल्पाच्या नावावर लढून येवला, नांदगावच्या लोकांची सहानुभूती मिळवून फसवणूक करतील आणि पाच वर्षे काढतील, अशी टीका आमदार गावित यांनी केली. वास्तविक ६३ कोटी रुपये खर्च असणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पावर आतापर्यंत ३२३.५ कोटी रुपये खर्च झाले, तरीही केवळ काँक्रिटीकरणाच्या पलीकडे काम झाले नाही. हे पाणी येवल्यापर्यंत येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हा प्रकल्प ओझरखेड धरणात पाणी टाकण्यासाठी आहे. मात्र, भुजबळ पाणीप्रश्नावर भावनिक दिशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार गावित यांनी केला. त्यापेक्षा १६ टीएमसी गुजरातला पळवणारे पाणी मिळवले तर कायमचा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीदरम्यान स्टीलची चोरी

$
0
0

नाशिकरोड : सिन्नर येथील कंपनीतून मुंबई येथे वाहतूक केल्या जाणाऱ्या बांधकामाच्या स्टीलची चोरी करतांना ट्रकचालक आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तींविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ट्रकचालक सोनूसिंग हा घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी धर्मेंद्रकुमार वर्मा (वय २४, रा. गहरौली, उत्तरप्रदेश), वकील मुस्लिम खान (वय ३५) या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मालट्रक (एमएच ४३ बीपी १०३१) स्टीलसह ताब्यात घेतला आहे.

संशयित ट्रकद्वारे सिन्नर येथील कंपनीतून मुंबईच्या दिशेने बांधकामाचे स्टील नेत होते. दरम्यान त्यांनी नाशिक-पुणे महामार्गालगत हरिओम गोकूळ उडपी रेस्टॉरंटजवळ सोमवारी (दि. ८) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ट्रक थांबवून त्यातील स्टील विक्री करण्यासाठी बाहेर काढत होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षक सचिन शेंडकर यांनी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी ट्रकमधून २४० किलो स्टिल चोरून विक्रीसाठी खाली उतरविल्याचे यावेळी उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच जणांवर मोक्का कारवाई

$
0
0

पाच जणांवर

मोक्का कारवाई

इंदिरानगर : शहरातील पाच गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहिती इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली आहे. इंदिरानगर परिसरातील सुपर मार्केटच्या संचालकांचा खून करून रोख रक्कम लंपास करणारा विलास राजू मिरजकर (वय २६, रा. तेलंग वस्ती, पेठरोड), सुनील रामचंद्र पवार (२८, पेठरोड, पंचवटी), चिमा उर्फ सतीश नाना पवार (२३, द्वारकानगर, अकोले, जि. अहमदनगर), किरण उर्फ गोट्या रामदास म्हस्के (२०, गणपती मंदिराजवळ, पंचवटी) आणि नारायण उर्फ आप्पा रामप्रसाद बसनेत (नवनाथनगर, पंचवटी) अशी कारवाई केली जात असलेल्या पाच जणांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाळागाव परिसरात पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर वडाळा गाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या नळ कनेक्शनला तर पाणी येतच नाही, मात्र टँकर मागविले तरी हे नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही राजकीय व्यक्‍तींच्या हस्तक्षेपामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. वडाळा गाव परिसरातील मेहबूबनगर, शादिकनगर या भागात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांनी याबाबत नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली असता, काही दिवसांसाठी पाणीपुरवठा सुरळीत होतो, नंतर मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी करण्यापेक्षा महापालिका कायमस्वरूपी या पाणी समस्येवर उपाय का करीत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या भागात महापालिकेचे टँकर येत असले तरी काही ठराविक भागातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतो. नागरिक पाण्यासाठी वणवण करीत असतानाही केवळ काही राजकीय हितसंबंधामुळे येथील पाण्याचा प्रश्न निर्माण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेवकांकडे तक्रार केल्यावर पाणी सुरळीत येते, मात्र नंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांपुढे आता थेट आयुक्तांनाच भेटण्याचा निर्णय घेतला आहे. या पाणीप्रश्नाबाबत नगरसेवकांनी व अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाय करावा व येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार-चव्हाण भेटीने चर्चेला उधाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार झालेल्या डॉ. भारती पवार यांनी बुधवारी सकाळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. चव्हाण यांना उमेदवारी नाकारून डॉ. पवार यांना भाजपने उमेदवारी दिल्याने चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे पवार यांच्या सदिच्छा भेटीमुळे मतदारसंघात व सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

उमेदवारी न दिल्याने चव्हाण गोटात तीव्र नाराजी आहे. या धर्तीवर ज्येष्ठतेचा आदर करीत भाजपच्या उमेदवार डॉ. पवार यांनी चव्हाण यांच्या घरी त्यांची सपत्निक भेट घेत आशीर्वाद घेतले. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सांगितले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याशिवाय आपण प्रचारासाठी बाहेर पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतानाच डॉ. पवार यांचे स्वागत करायलाही ते विसरले नाहीत. मात्र. डॉ. पवार यांच्या मुत्सद्देगिरीचे दर्शन या निमित्ताने राजकीय पटलावर दिसून आले.

चव्हाण भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ए. टी. पवार यांच्या जागेवर त्यांना आम्ही मानत असून, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. माझ्या उमेदवारीला त्यांची व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची साथ मिळो. त्यांच्या अनुभवाचा लाभ आपल्याला मिळो व त्यांनी मोठ्या मनाने प्रचारात सहभागी व्हावे, ही भावना आहे. या वेळी कलावती चव्हाण यांचीही भेट घेतल्याची माहिती डॉ. पवार यांचे पती प्रवीण पवार यांनी दिली.

मी पक्ष सोडलेला नाही. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठांशी माझे बोलणे झाल्याशिवाय कोणतेही पाऊल टाकणार नाही. डॉ. भारती पवार यांचे माझ्या घरी आम्ही स्वागतच केले. याआधीही धनराज महाले व जे. पी. गावित या दोन्ही उमेदवारांनी आपली भेट घेतली आहे.

- हरिश्चंद्र चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

प्रा. मोगल यांची अध्यक्षपदी निवड

नाशिक : मराठा विद्या प्रसारक सेवकांची आर्थिक वाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मराठी विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षपदी प्रा. बाळासाहेब मोगल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एस. आर. काकड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. तर उपाध्यक्षपदी प्रा. प्रकाश पवार व मानद चिटणीस पदावर अशोक बाजारे यांची निवड करण्यात आली आहे.

- -

होमिओपॅथी दिन उत्साहात

नाशिक : नाशिक होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने बुधवारी होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला. नाशिकरोड, शिखरेवाडी येथील प्रकाश होमिओस्वास्थ्य सेवा केंद्रात होमिओपॅथीचे संस्थापक सामुएल हानेमान यांची जयंती साजरी केली जाणार आहे. हानेमान यांच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उमेश नगरकर, उपाध्यक्ष डॉ. लियाकत नमोळे, सचिव जयश्री नागरे, उपसचिन डॉ. राहुल डहाळे, खजिनदार डॉ. प्रणव डुल्ला यांसह डॉ. रिता सोनवणे, डॉ. मनीषा मारडा, डॉ. जगदीश वाणी आदी उपस्थित होते.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईसाठी ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

आरटीईसाठी साडेतीन हजार

विद्यार्थ्यांची निवड

पहिली लॉटरी जाहीर; आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेची पहिली लॉटरी काढण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड या लॉटरीतून झाली आहे. या प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० एप्रिलपासून एसएमएस पाठविण्यास सुरुवात झाली असून आजपासून (११ एप्रिल) प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ५ हजार ७६४ जागांसाठी १४ हजार ९९५ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. उपलब्ध जागांच्या तिप्पट अर्ज यावेळी जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले होते. यंदा प्रथमच राज्यस्तरावरून लॉटरी काढण्यात आली असून या लॉटरीत नाशिकमधील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये ७४ पूर्व प्राथमिकचे विद्यार्थी तर ३ हजार ४४३ विद्यार्थी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदपत्रांची पडताळणी करून दिले जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व तालुक्यांमध्ये, शाळांजवळ पडताळणी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या पालकांना निवड झाल्याचा एसएमएस आला नसेल त्यांनी आरटीईच्या http://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अॅप्लिकेशननसार डिटेल्सवर क्लिक करून आपला अर्जक्रमांक लिहून लॉटरी लागली आहे की नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये २३ उमेदवार रिंगणात

$
0
0

छाननीअंती २३ उमेदवारांचे अर्ज वैध; सात अर्ज बाद

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत विविध त्रुटींमुळे बुधवारी सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा अर्ज वैध ठरल्याने शेफाली भुजबळ यांचा पर्यायी भरलेला अर्ज बाद ठरला. याखेरीज मुदतीत अनामत रक्कम न भरणे, अर्जावर स्वाक्षरी न करणे यांसारख्या त्रुटींमुळे अन्य सहा उमेदवारांचे अर्जही बाद ठरविण्यात आले आहेत. २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, माघारीसाठी शुक्रवारी (दि. १२) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीद्वारे खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह एकूण ३० इच्छुकांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात राबविण्यात आली. यावेळी काही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. उमेदवारांनी भरलेले अर्ज पुन्हा पाहण्यासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, एकाही उमेदवाराने अथवा प्रतिनिधीने आक्षेप नोंदविला नाही.

...

'चिल्लर'वाला अर्ज बाद

शिवाजी वाघ या इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यासाठी १० हजार रुपयांची चिल्लर आणली होती. परंतु, ही नाणी मोजण्यात वेळ गेल्याने आणि मुदतीत अनामत रक्कम भरू न शकल्याने वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. याशिवाय रंगा महादू सोनवणे, शत्रुघ्न तुकाराम झोंबाड यांचाही उमेदवारी अर्ज अनामत रक्कम मुदतीत न भरल्याने बाद ठरविण्यात आला आहे. अनामत रक्कम रोख स्वरूपात किंवा ट्रेझरीमध्ये पैसे भरून स्वीकारली जाते. परंतु, मंगेश मनोहर ढगे या इच्छुकाने अनामत रकमेसाठी धनादेश दिला. त्यामुळे त्यांचा अर्जही बाद ठरविण्यात आला आहे. उमेदवारी अर्जावर स्वाक्षरीच न केल्याने विष्णू रामदास जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. निवडणूक रिंगणातील प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, निवडणूक चुरशीची होणार आहे.

...

उमेदवारी अर्ज कसा भरावा याबाबतचे सूचनापत्र इच्छुकांना अर्जासोबतच देण्यात आले होते. अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्याने सात उमेदवारांचे आठ अर्ज बाद झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनामत रक्कम त्यांना परत मिळेल. २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, माघारीसाठी शुक्रवारी (दि. १२) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे.

- सूरज मांढरे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर, गंगापूर रोडला आज पाणी नाही

$
0
0

नाशिक : सातपूर विभागातील ध्रुवनगर, बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य, नहुष जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीस बुधवारी सकाळी ११ वाजता गळती लागली आहे. त्यामुळे सातपूर व पश्चिम विभागात आज (११ एप्रिल) पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक सातमधील सहदेवनगर, आकाशवाणी परिसर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम, प्रभाग क्रमांक आठमधील आनंदवल्ली, सोमेश्वर लॉन्स, पाटील लॉन्स, गंगापूर गाव, बळवंतनगर, गंगापूर रोड, सावरकरनगर, मते नर्सरी रोड, शारदानगर, सिरीन मेडोज, शंकरनगर, गंगासागर, काळेनगर, सोमेश्वर कॉलनी, संत कबीरनगर, गंगापूर गाव, एचएएल कॉलनी, नरसिंहनगर, आयोध्या कॉलनी, प्रभाग क्रमांक ९ मधील धृवनगर, मोतीवालानगर, गुलमोहरनगर, प्रभाग क्रमांक १२ मधील डिसुझा कॉलनी, महात्मानगर, रामराज्य परिसर या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैचारिक संघर्षाने माकपमध्ये दुभंग

$
0
0

(राजकारण लोगो. माकपचे चित्र)

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्त्व, मूल्य, जातपातविरहीत समाजनिर्मिती आणि शोषित, कष्टकरी वर्गासाठी लढा या पंचसूत्रीवर समाजकारण व राजकारण करणारा व कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करणारा पक्ष म्हणून ख्याती मिळविलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अलीकडे आपल्या या मुद्द्यांपासूनच भरकटला आहे. त्याचे परिणाम संघटनेत स्पष्टपणे उमटू लागल्याने नाशिकमध्ये प्रथमच पक्षात उघड गट पडल्याचे दिसते आहे. नाशिक मतदारसंघात इरफान शेख यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने हा संघर्ष आता ऐरणीवर आला असून, आगामी काळात पक्षात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात माकपतर्फे किसान सभेचे खंदे कार्यकर्ते इरफान शेख उमदेवारी करणार असल्याचे जाहीर झाले. पाठोपाठ त्यांची प्रचार पत्रकेही मतदारांपर्यंत पोहोचली. त्यांनी अर्ज दाखल करण्याची तयारीही सुरू केली. दरम्यान, शेख यांच्या या आगाऊपणाची दखल पक्षाच्या पॉलिटब्युरोने घेतली व स्थानिक पातळीवर चौकशी सुरू केली. यावरून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ चर्चाही झाली. अखेर हा विषय वरिष्ठ नेत्यांकडे गेल्यानंतर शेख यांना थांबण्याचे आदेश दिले गेले. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सीताराम येच्युरी यांच्याशी बोलणी केली होती. हा विषय वरवर पाहाता निवडणुकीशी निगडीत वाटत असला तरी यानिमित्ताने माकपच्या नाशिक जिल्ह्यातील नेत्यांचा वर्चस्वसंघर्ष व अहंकार ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळापासूनच पक्षात सुरू असलेली एकाधिकारशाही व ध्येयधोरणांना दिली जाणारी तिलांजली याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. सुरगाणा पंचायत समितीत पक्षाचे बहुमत असताना उपसभापतिपद शिवसेनेला बहाल केले गेले होते. माकपच्या विचारसरणीत शिवसेना कोठेच बसत नसल्याने हा संग अनेकांना खटकला होता. पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही माकपच्या सदस्यांनी शिवसेनेला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत केली होती. यावरून तेव्हा आमदार जीवा पांडू गावित यांच्यावर टीकाही झाली होती; तथापि हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता, पक्षाशी त्याचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण तेव्हा त्यांनी दिले होते. तेव्हापासून पक्षात सुरू झालेले मतभेदाचे वारे नंतरच्या काळात अधिकच घोंगावू लागले. किसान सभेच्या माध्यमातून काढले जाणारे मोर्चे हा देखील कळीचा मुद्दा ठरला. याचवेळी सिटूचे नेते डॉ. डी. एल कराड यांच्याही एकाधिकारशाहीविषयी पक्षातील काही घटक आवाज उठवू लागले होते. सिटू व किसान सभा या जणू पक्षाच्या स्पर्धात्मक शाखा बनल्या होत्या. गावित यांच्याशी अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी झालेली सलगी देखील पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यात खुपू लागली होती.

वैचारिक भूकंपाची नांदी

कामगार नेते डी. एल. कराड व शेतकरी नेते जीवा पांडू गावित अशा दोन टोकांवर पक्ष दुभंगतो की काय, अशी अवस्था सध्या असून, इरफान शेख यांच्या निमित्ताने त्याचा स्फोट झाला आहे. पक्षाच्या पोलादी चौकटीत कदाचित हा विषय बाहेर येणार नसला तरी हे सारे प्रकार कर्णोपकर्णी झाले आहे. पक्षात अलीकडे जातीपातीचा व अर्थकारणाचाही विचार होऊ लागल्याची व्यथा काही जुन्या जाणत्या कॉम्रेड्सनी व्यक्त केल्याने हा वैचारिक भूंकप भविष्यात कोणाकोणाला हानी पोहोचतो याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा क्रिकेटतर्फे क्रिकेट टॅलेन्ट सर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही २० एप्रिल ते ५ जून २०१९ या कालावधीत क्रिकेट टॅलेन्ट सर्च कॅम्प- २०१९ चे गोल्फ क्लब मैदान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, सुयोजित क्रिकेट मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅम्पमध्ये १० वर्षापासून पुढील वयाच्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. या कॅम्पमध्ये क्रिकेट खेळाडूची शारीरिक क्षमतेत वाढ होण्याबरोबरच क्रिकेट खेळातील विविध गुण आत्मसात करणे, त्याचा विकास करणे या उद्देशाने खेळाडूंना विविध व्यायामाचे प्रकार, क्रिकेट खेळातील विविध प्रकारांचा प्रत्यक्ष सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात नामवंत ज्येष्ठ खेळाडू, तसेच विविध रणजीपटू, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये महाराष्ट्राच्या विविध वयोगट संघांना मार्गदर्शक म्हणून काम करणारे नाशिकचे मार्गदर्शक या कॅम्प मध्ये प्रशिक्षक म्हणून काम पहाणार आहेत. हा कॅम्प सकाळी ६.३० ते ८.३० वा. व दुपारी ४.३० ते ६.३० यावेळेत आयोजित केला जाणार आहे. या टॅलेन्ट सर्च कॅम्प मध्ये सहभाग नोंदविलेल्या खेळाडूंना विविध वयोगटातील कै. चंद्रशेखर शिंदे चषक, व्ही. पी. बागुल चषक या दोन क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. सदर टॅलेन्ट सर्च कॅम्पचे फॉर्म गोल्फ क्लब मैदान येथील ओसिएशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीमुळे प्रिंटिंग व्यवसायाला बूस्ट

$
0
0

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रिंटिंग प्रेस व्यवसायाला झळाळी मिळाली आहे. अनेक व्यावसायिकांकडे प्रिंटिंगसाठी कामाच्या रांगा लागल्या असून, कामे पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला जात आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रिंटिंग व्यावसायिक सज्ज झाले होते. पत्रके, हॅण्डबिल, जाहीरनामे, टी शर्ट, उपरणे, झेंडे यांचे तात्पुरते डिझाइन करून ठेवण्यात आले होते. ऑर्डर येताच प्रतींची संख्या, प्रकाशकाचे नाव, उमेदवाराचा फोटो टाकून डिझाइन्सचे फायनल झाले की प्रिंटिंगला देणे इतकेच काम बाकी ठेवले होते. नाशिक शहरातील अनेक मोठ्या प्रिंटिंग व्यावसायिकांकडे निवडणुकीची कामे सुरू आहेत. काही उमेदवारांनी गतकाळात कोणती कामे केली हे मतदारांना दाखवण्यासाठी वर्तमानपत्राची कात्रणे जमवून त्याचे पुस्तक तयार केले आहे. काही माजी खासदारांनी आपल्या काळात नाशिकची कशी प्रगती झाली व आता काय होणे गरजेचे आहे, याची स्मरणिका छापली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत टोप्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रिंटिंग व्यावसायिकांनी उमेदवारांची नावे व पक्षाची चिन्हे टोप्यावर छापून दिली होती. त्याचप्रमाणे उपरण्यांचीही मागणी मोठ्या प्रमाणात होती. तसेच भगवे, तिरंगी, निळे झेंडे यानुसार प्रिंटिंगची मागणी वाढली आहे. तसेच, प्रचारपत्रके त्यातील कंटेन्टदेखील तयार आहेत. एखाद्या उमेदवाराला अमूक एक कंटेन्ट आवडला की त्यावर त्या उमेदवाराचा फोटो, नाव टाकून प्रतींची संख्या टाकल्यास एक ते दीड दिवसात काम उमेदवाराच्या घरी पोहचते होत आहे.

पक्षाच्या जाहीरनाम्याबरोबरच स्थानिक जाहीरनामेदेखील करण्यात आले आहेत. काही उमेदवारांनी चार पानी जाहीरनामे तयार केले आहेत, तर काहींनी आठ पानी जाहीरनामे तयार केले आहेत. एकापेक्षा दोन उमेदवारांनी एकाच प्रिंटिंग व्यावसायिकाकडे काम दिल्याने दोन पक्षांची जबाबदारी एका प्रिंटिंग व्यावसायिकाला पार पाडावी लागते आहे. शेवटच्या टप्प्यात स्लिपा छापल्या जाणार आहेत. त्याचे काम पूर्ण झाले असून, एक ते दोन दिवसात डाटा उेदवाराकडे दिला जाणार आहे. विभागनिहाय त्याचे वाटप होणार आहे.

…..

निवडणूक कामाची जबाबदारी मोठी आहे. वेळेत कामे द्यायची असल्याने दिवसरात्र काम सुरू आहे. पत्रके छापून झाली आहेत. स्लिपांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

- दिनेश पैठणकर प्रिंटिंग व्यावसायिक

…..

पत्रके - १ रुपया १० पैसे ते १ रुपया ७५ पैसे

जाहिरनामे - ८ पानी २.५० रुपये ते ३ रुपये

टीशर्ट - सिंगल कलर २ रुपये

टोपी - सिंगल कलर २ रुपये

उपरणे - सिंगल कलर २ रुपये

स्लीप - सिंगल कलर १० ते १२ पैसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९८३ नळ कनेक्शन दहा दिवसांत खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पाणीपट्टी वसुलीबाबत कडक धोरण स्वीकारले असून, थकबाकीदार ९८३ नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. ही कारवाई १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात चार हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणारे ५० हजारांवर ग्राहक आहेत. त्यांच्याकडून रक्कम वसूल व्हावी याकरिता अनेकदा स्मरणपत्रे पाठविण्यात आली. परंतु. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अशा ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ९८३ नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. ही कारवाई यापुढेही सुरू रहाणार आहे.

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या पाणीपट्टीच्या थकबाकीत सातत्याने वाढ होत असून, थकबाकीचा आकडा ६६ कोटींवर पोहचला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत कडक धोरण स्वीकारले असून, थकबाकी असेल अशा विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे. या थकबाकीतून कुणालाही वगळू नये, असे आदेश आयुक्त गमे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेमध्ये नाशिक नापास

$
0
0

एमएचआरटीच्या रँकिंगमध्ये कॉलेज नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'एज्युकेशन हब' बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या नाशिकला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुणवत्ता यादीने (एमएचआरटी) वास्तवाची जाणीव करून दिली आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पुणे-मुंबईच्या तोडीचे शिक्षण दिले जात असल्याचा दावा नाशिकचे शैक्षणिक वर्तुळ करत असले तरीही अद्याप 'दिल्ली दूर है..!' त्यामुळे येत्या कालावधीत हा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, असाच संदेश नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता यादीमुळे नाशिकला मिळाला आहे.

राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या या गुणवत्ता यादीत मविप्र फार्मसी कॉलेजचा एकमेव अपवाद वगळला तर नाशिक कुठेच आढळत नाही. तर नाशिकला असणाऱ्या तीन विद्यापीठांमधून एकाही विद्यापीठाचा पहिल्या शंभरात समावेश नाही. महाराष्ट्रात एकट्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या दहात कसेबसे स्थान मिळवत राज्याचे नाव राखले. या पुणे विद्यापीठाशी संलग्नित बहुतांश कॉलेज नाशिक जिल्ह्यात आहेत. तर राज्यातील ११ विद्यापीठांनी पहिल्या शंभर विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळविले आहे. इतकेच काय ते समाधान नाशिककरांच्या वाट्याला आहे. या यादीत जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्यातील एकूण ६२ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यातील बहुतांश संस्था या मुंबई व पुण्यातील आहेत.

अध्यापनाचा दर्जा, शैक्षणिक साधने, संशोधन, व्यावसायिक पद्धती आदी निकषांवर आधारित एकूण ६१० संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ७५ फार्मसी संस्थांमध्ये राज्यातील १८ संस्थांचा समावेश आहे. या क्रमवारीत नाशिकचे मविप्र फार्मसी कॉलेज ७० व्या स्थानावर आहे. कॉलेजमध्ये उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, स्कॉलरशीप आदी निकषांवर संस्थेची निवड या यादीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images