Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

... अन् सगळेच पडले बुचकळ्यात!

0
0

पोलिसांना बघताच विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल

....

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण येथे गेल्या आठवडे बाजारात फळ विक्रेत्यांच्या दोन गटात वाद झाला होता. मालेगावच्या फळ विक्रेत्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे बुधवार (दि. ३) च्या बाजारात पोलिस दाखल झाल्याचे बघताच फळ विक्रेत्यांची धांदल उडाली. काही अनूचित प्रकार घडला की काय, अशी शंकेची पालही अनेकांच्या मनांमध्ये चुकचुकली. यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही बुचकळ्यात पडले. मात्र, पोलिसांनी तेथे मॉकड्रील सुरू करताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

कळवणच्या गेल्या आठवडे बाजारात फळ विक्रेत्यांच्या दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. मालेगाव येथील एकाला गाडी लावण्याच्या वादात मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधवारच्या (दि. ३) आठवडे बाजारात त्या घटनेचे पडसाद उमटतील, असा अंदाज काही फळ विक्रेत्यांना होता. त्यातच पोलिस दाखल झाल्याने सारेच अवाक् झाले. पोलिस आपल्यावर कारवाई करतील, या आशेने काही फळ विक्रेत्यांनी काढता पाय घेतला. तसेच, बाजारात काही अनूचित प्रकार तर घडला नाही ना असा विचारही ग्राहकांच्या मनात आला. मात्र, पोलिसांनी मॉकड्रील सुरू केल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

गेल्या आवठडे बाजारात ऐन निवडणूक काळात वाद उफाळून आल्याने परिस्थिती तणावग्रस्त होऊ नये म्हणून कायदा व सुव्यवस्था लक्षात घेत पोलिसांचा ताफा गांधी चौकात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

.....

दंगल नियंत्रणाची प्रात्याक्षिके

कळवण शहरातील आठवडे बाजारानिमित्ताने उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित कळवण उपविभागातील पोलिसांचे मॉकड्रील करण्यात आले. यावेळी दंगलीवर नियंत्रण मिळविण्याचे सर्व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. उपविभागातील कळवण, देवळा, अभोणा, वणी, दिंडोरी, सुरगाणा व बाऱ्हे या पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गांधी चौकात मॉकड्रीलचे प्रदर्शन केले. तसेच, कळवण शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत घरफोडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नातलगांच्या अंत्यविधिसाठी बाहेरगावी गेलेल्या घोटीतील एका वाहनचालकाचे घर चोरट्यांनी फोडले. घरफोडीत सोन्याच्या दागिन्यासह जवळपास साठ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या चोरीप्रकरणाने घोटी शहरात पुन्हा खळबळ उडाली असून घोटी पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा घोटी ग्रामस्थांनी केली आहे.

श्रीरामवाडी येथील सोमनाथ किसन सातपुते हे वाहनचालक आहेत. २ एप्रिल रोजी त्यांच्या जवळच्या नातलगाच्या अंत्यविधिसाठी ते कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सोमनाथ सातपुते यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून ३५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. बुधवारी सातपुते यांच्या घराचे कुलुप तुटलेले दिसल्याने शेजारच्यांनी तत्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेंगळुरू विमानसेवेस १० मेपासून प्रारंभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कडाक्याच्या उन्हाळ्यात नाशिककरांसाठी खुषखबर आहे. येत्या १० मेपासून बेंगळुरू विमानसेवा सुरू होणार असून अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन सेवा आता आठवडाभर मिळणार आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उडान योजनेच्या माध्यमातून नाशिकला विविध विमानसेवा जाहीर झाल्या आहेत. त्यातील केवळ नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांच्या सेवाच अद्याप सुरू झाल्या आहेत. भोपाळ, गोवा, बेंगळुरू, गाझियाबाद या शहरांसाठीच्या सेवा उन्हाळ्यात सुरू होतील, अशी अपेक्षा होती. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात १ एप्रिल ते २६ ऑक्टोबर या काळातील सेवांचा समावेश आहे. इंडिगो कंपनीची नाशिक ते बंगळुरू ही सेवा येत्या १० मे पासून सुरू होणार आहे. ही सेवा आठवडाभर मिळणार आहे. ओझर विमानतळावर सायंकाळी सहा वाजता विमान येईल आणि साडेसहा वाजता ते बेंगळुरूकडे निघेल. या सेवेचा नाशिकला मोठा फायदा होणार आहे.

बेंगळुरू सेवा सुरू व्हावी याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आता प्रत्यक्षात ही सेवा सुरू होत असल्याने दक्षिणेतील आणखी एक महत्त्वाचे शहर नाशिकशी जोडले जाणार आहे. अलायन्स एअरची अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन सेवा सध्या सोमवार ते शनिवार आहेत. या दोन्ही सेवा आता रविवारही मिळणार आहेत. तर, ट्रुजेट कंपनीची अहमदाबाद सेवा सध्या मंगळवार ते शनिवार असे पाच दिवस आहे. ही सेवाही आता आठवडाभर मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळणार आहे.

दिल्ली दिलासा नाही

नाशिक ते दिल्ली या सेवेला प्रचंड प्रतिसाद असल्याने ती आठवडाभर व्हावी अशी आग्रही मागणी आहे. मात्र, ही सेवा आठवड्यातील तीनच दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यानंतरच ही सेवा विस्तारण्याची चिन्हे आहेत.

अन्य सेवा लांबणीवर

नाशिकहून गोवा, गाझियाबाद (हिंदण), भोपाळ आणि हैदराबाद या सेवा उन्हाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. विमान सेवांची घोषणा होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी या सेवा सुरू झालेल्या नाहीत. तसेच, या सेवा आता दिवाळीच्या आसापसाच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग निवडणुका लांबणीवर पडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदापाठोपाठ आता सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागवला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडणुकीप्रमाणेच प्रभाग समित्यांबाबत संभ्रमित अभिप्राय मिळण्याची शक्यता असल्याने लोकसभा निवडणुकीनंतरच सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सातपूर, पूर्व, पश्‍चिम, पंचवटी, सिडको व नाशिकरोड प्रभाग समिती सभापतींची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे या प्रभाग समितींच्या सभापतिपदावर नवीन नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नगरसचिव विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात निवडणुकीची परवानगी मागण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक विषयांवर लघु चित्रपटांतून भाष्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सामाजिक विषयांवर भाष्य करणारा लघु चित्रपट महोत्सव गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यासमध्ये बुधवारी पार पडला. गुजराती चित्रपट दिग्दर्शक व निर्माता विक्रम मोदी, अभिनेत्री दीप्ती चंद्रात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले.

प्रत्येकाला समाजकार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी सामाजिक विषयांवर १५ लघु चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले. यामध्ये वोट फॉर इंडिया, जरुरत, व्हीज्युअल कॅन बी डिसेप्टीव्ह, लोकमान्यांचा रुद्रावतार, पिशवी, जास्वंद, यह जो देस हे मेरा, अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी, देवा तुला शोधू कुठे, अस अॅण्ड देम, गंगा मां का दर्द, खेळ मांडला, आयबीडब्ल्यूएम, रंग, मतदान या लघु चित्रपटांचा समावेश होता. या प्रत्येक चित्रपटातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. या महोत्सवास नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेश दरगोडे, कायम निमंत्रित सदस्य प्रफुल्ल संचेती यांची उपस्थिती होती.

\Bफाळके पुरस्काराने होणार गौरव

\Bभारत सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्कार हा दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जातो. दादासाहेब फाळके हे नाशिकचे असल्याने त्यांच्या नावानी नाशिकमध्येही हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. दिग्दर्शन, संगीत, संकलन, लेखन व सिनेमॅटोग्राफी यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचे संकट कायम

0
0

बाधित रुग्णांची संख्या तीन महिन्यांत शंभरवर; पाच जणांचा बळी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदा स्वाइन फ्लू नाशिक शहराची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. हिवाळा संपल्यानंतरही वातावरणातील गारठा कायम असल्याने नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच स्वाइन फ्लू बाधितांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. मंगळवारी चेहडी येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने तीन महिन्यात मृंताचा आकडा पाचवर पोहचला आहे. या आजाराच्या बांधितांची तसेच, बळींची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने वैद्यकीय विभागासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षात स्वाइन फ्लूने शहरात ३०, तर जिल्ह्यात २० जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने स्वाइन फ्लूचा प्रकोप रोखण्यासाठी विशेष प्रबोधन मोहीम राबवली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर काहीसा ओसरला होता. डिसेंबर महिन्यात स्वाइन फ्लूने विश्रांती दिली होती; परंतु जानेवारी २०१९ पासून मात्र स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण होते. जानेवारीत सात जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. फेब्रुवारीत या प्रादूर्भाव वाढून बाधितांचा आकडा ४० वर गेला असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असतानाच मार्च महिन्यात आणखी ४९ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे समोर आले. मार्चमध्ये एका रुग्णाचा बळी गेला आहे. एप्रिलमध्येही स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी चेहडी येथील एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढावल्याचे समोर आले आहे. चेहडी येथील प्रेस कामगार नेते नामदेव ताजनपुरे यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने त्यांचे मंगळवारी (दि. २) रात्री निधन झाले. स्वाइन फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल अद्याप मनपा प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने संशयित स्वाइन फ्लू मृत्यू अशी नोंद पालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे.

....

स्वाइन फ्लूचे विषाणू वातावरणाशी जुळवून घेताना दिसत आहेत. नाशिकच्या वातावरणातील तफावत आणि विषाणूंची वातावरणाशी जुळवून घेण्याची वाढलेली क्षमता येत्या काळात अधिक त्रासदायक ठरू शकते. लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यायला हवीत.

- डॉ. संदीप पाटील, जनरल फिजीशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्कोडाने पोलिसांची धावपळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या एका स्कोडा कारच्या टिपने शहर आणि ग्रामीण पोलिसांची मंगळवारी दिवसभर धावपळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत त्या संशयित कारचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. मात्र, पोलिसांचा तपास सुरूच होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रे, मोठी रक्कम तसेच अवैध मद्य वाहतूक याकडे लक्ष वेधले आहे. शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी आपआपल्या हद्दीत बॉर्डरवर तसेच अंतर्गत भागात २४ तास नाकाबंदी पाँईटस लावले आहेत. येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. तसेच याबाबत येणाऱ्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून खातरजमा सुद्धा होती. शहर पोलिसांना मंगळवारी सकाळी एका संशयित स्कोडा कारबाबत माहिती मिळाली. या कारमध्ये शस्त्रास्त्रे असल्याची माहिती असल्याने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. तसेच ही माहिती ग्रामीण पोलिसांना सुद्धा देण्यात आली. पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांनी सुद्धा संशयित स्कोड कारचा शोध लावण्याबाबत आवश्यक त्या हलचाली केल्या. पोलिसांच्या काही तासांच्या तपासानंतरही त्या संशयित स्कोड कारचा थांगपत्ता लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया भाजपला नकोसा!

0
0

पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मतदार भेटीचा सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या विजयात आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यात मोलाचा वाटा उचलणारा सोशल मीडिया २०१९ च्या निवडणुकीत भाजपलाच नकोसा झाला आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारण्यांची संख्या वाढू लागल्याने भाजपने सोशल मीडियाऐवजी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीच्या सूचना आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

विरोधी पक्षांनाही सोशल मीडिया हाताळणींचे तंत्र जमल्याने हा मीडिया आता भाजपवरच उलटला असून माध्यमांपेक्षाही तो जनतेत प्रभावीपणाचे काम करत आहे. २०१४ मध्ये दाखवलेल्या स्वप्नांची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिली जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया भाजपसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळेच भाजपने आपल्या समर्थकांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मोबाइल आता प्रत्येकाच्या हातात आला आहे. त्यातही स्मार्ट फोन सगळ्यांच्या हातात आल्याने सोशल मीडिया प्रचारासाठी प्रभावी साधन ठरत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोबाइल, जीमेल, व्हॉट्सअॅप,फेसबुक, ट्वीटर या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला होता. निवडणुकांच्या आधीच माध्यमांसह सोशल मीडियाद्वारे काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्यात भाजपला यश आले होते. सोशल मीडियातून भाजपने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पद्धतशीरपणे प्रचार करत, भाजपने आपल्या भविष्यातील भारताचे स्वप्नही सोशल मीडियावर दाखवले होते.

सोशल मीडियामुळेच सत्ता गेल्याची जाणीव झालेल्या काँग्रेसह विरोधकांनी हा सोशल मीडियाला गेले साडेचार वर्ष आपलेसे करत, तो भाजपवरच पलटवण्याची तयारी केली आहे. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दाखवलेले स्वप्न, १५ लाख रुपयांची घोषणा, भ्रष्टाचार रोखण्यात आलेले अपयश, पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देण्याचे केलेले आव्हान आता सोशल मीडियात भाजपवरच पलटले आहे.

विरोधकांनीही २०१४ मधील स्वप्नांची आठवण सोशल मीडियातून भाजपला करून दिली आहे. विरोधकांसोबतच सर्वसामान्य नागरिकही आता या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत भाजपला प्रश्न विचारत आहेत.

२०१४ मध्ये भाजपने विरोधकांवर शस्र म्हणून वापरलेला सोशल मीडियाचे अस्र भाजपवरच बुमरँग झाल्याने आता भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आता सोशल मीडियाऐवजी प्रत्यक्ष गाठीभेटी देऊन मतदारांचे मतपरिवर्तन करत असल्याचे चित्र आहे.

मतदारांना थेट भिडा

सोशल मीडिया भाजपवरच पलटल्याने जनतेत भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासह संभ्रमित झालेल्या मतदाराला फ्रेश करण्यासाठी मतदाराच्या थेट गाठी भेटी घेऊन त्याचे मतपरिवर्तन करण्याचा सल्ला वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते हे यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोशल मीडियावर भाजपवर झालेल्या हल्ल्याला प्रतिहल्ला देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रभावातून भाजपने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चैत्रोत्सवासाठी जादा बसेस

0
0

सप्तशृंगी गडावर १३ ते २० एप्रिलपर्यंत यात्रा

...

गड ते पायथा : ७० बसेस

जिल्हाभरातून : ५० बसेस

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त एसटीने गडावर जाण्यासाठी ७० बसेसचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध शहरातून ५० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

सप्तशृंगी गडावर १३ एप्रिलपासून चैत्रोत्सव यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एसटीने ही यात्रा संपेपर्यंत बसेसचे नियोजन केले आहे. दि. २० एप्रिल रोजी यात्रा संपणार असली तरी २१ एप्रिलपर्यंत या बसेस असणार आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान एसटीचे ६५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चोवीस तास ही सेवा असणार आहे.

चैत्रोत्सव यात्रेत खान्देशहून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. जिल्हा व परिसरातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. या यात्रेदरम्यान नाशिकहूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी खासगी वाहनांना बंदी केली आहे.

...

चैत्रोत्सवानिमित्त गड ते पायथा या मार्गासाठी ७० बसेस असणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून भाविकांना थेट गडावर जाण्यासाठी ५० जादा बसेस असणार आहेत. चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे एसटी प्रशासनाने अगोदरच नियोजन केले आहे.

- अरुण सिया, जिल्हा वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्टून्स’च्या चिमट्यांमुळे रंगतोय निवडणूक प्रचार!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांची होणारी भाषणे, प्रचार फेऱ्या, मतदारांशी संवाद या सर्वांमध्ये निवडणुकीवर आधारीत 'कार्टून्स' लक्ष वेधून घेत आहेत. एकमेकांविरोधात भूमिका मांडण्यासाठी उमेदवारांनी कार्टून्स म्हणजेच, व्यंग चित्रांची मदत घेतली असून, त्यामुळे प्रचार आणखी रंगू लागला आहे.

सोशल मीडियासह प्रसिद्धी पत्रकांद्वारे निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार नवनवीन शक्कल लढवत असून, व्यंग चित्रांद्वारे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. फेसबूक, इन्स्टाग्रामवरील पेजसह व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे कार्टून्स अपलोड केले जात आहेत. या कार्टून्सद्वारे एकमेकांविरोधातील मुद्दे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवित आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या सोशल मीडियावरील फेसबूक पेजसह प्रसिद्धी पत्रकातून विरोधकांना चिमटे काढण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळे नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी हा फंडा वापरल्याची चर्चा रंगते आहे. एका कार्टूनच्या माध्यमातून अनेक मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसल्याचे त्यातून दिसत आहे. नेहमीच्या बैठका, सभा, चर्चा याला वैतागलेल्या मतदारांनाही या नव्या स्टाइलच्या प्रचार अनुभवण्यात रस निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, विरोधकांवर टीका करण्यासाठी त्यांचे कार्टून्स तयार करण्यात आले आहेत. या कार्टून्समधून मांडलेल्या मुद्द्यांसह ते कार्टून देखील चर्चिले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने वेगळ्या शैलीत कार्टून्सची मांडणी केली असून, मेमेजचाही वापर प्रचारात होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढविण्याची सुरू झालेली स्पर्धा आता कार्टून्सच्या माध्यमातून समोरच्याला टार्गेट करण्यापर्यंत येऊन पोहोचल्याचे जाणवते आहे. त्यामुळे यंदाच्या प्रचारातील नवनव्या कल्पना निर्णायक निकालासाठी कितपत उपयुक्त ठरतील, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे.

व्यंगचित्रात मत बदलण्याची खरी ताकद आहे. राजकारणात व्यंगचित्रांना अगोदरपासून महत्त्व आहे. जे भाषणातून व्यक्त करणे कठीण होते, ते कार्टूनमधून सहजपणे मांडता येते. त्यामुळे उमेदवारांनी वापरलेल्या या नव्या शैलीचा मतदारांच्या मनात पोहोचण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.

- आचार्य रहाळकर, व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणिकराव कोकाटेंच्या मिसळ पार्ट्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांसोबतच अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव कोकाटेंनीही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासह मिसळपार्ट्यांतून मतपेरणी सुरू केली आहे. कोकाटेंनी सिन्नर, इगतपूरीत प्रचार केल्यानंतर बुधवारी नाशिकमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत अपक्ष उमेदवारीवर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले. वंचित आघाडीबाबतचा आपला प्रचार चुकीचा असून, आपण अपक्ष म्हणूनच रिंगणात कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनीही मतदारांच्या भेटी सुरू केल्या आहेत. कोकाटेंच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसतो, यावरही चर्चा रंगू लागली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ या तुल्यबळ उमेदवारांसोबतच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोकाटेच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे हेंमत गोडसेंसमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी त्यांची उमेदवारी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकाटेची एकीकडे युतीकडून मनधरणी सुरू असली तरी, दुसरीकडे कोकाटे उमेदवारीवर ठाम आहेत. कोकाटेंना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी गेल्या दहा दिवसापासून अपक्ष म्हणून प्रचाराला सुरूवात केली आहे. सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक तालुक्यात त्यांनी मतदाराच्या गाठीभेटी घेत, मतदारांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोकाटेंनी आता प्रचाराचा अनोखा फंडा अवलंबला असून, मिसळपार्ट्यांद्वारे ते मतदारांशी तसेच समर्थक पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे मात्र वंचित आघाडीच्या उमेदवारीबाबत त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपण वंचित आघाडीची उमेदवारी घेणार नसल्याचे सांगत, अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ९ तारखेच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोकाटेंच्या या मेळाव्याकडे लक्ष लागून आहे.

भाजपकडून अर्ज

दरम्यान, कोकाटेंचे समर्थक असलेल्या ज्ञानेश्वर तांबेनी कोकाटेंसाठी घेतलेल्या उमेदवारी अर्जावर भाजप असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना आणि भाजपची युती असताना कोकाटेंच्या समर्थकांनी भाजपसाठी अर्ज नेत असल्याचा उल्लेख केला आहे. कोकाटे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे कोकाटेंच्या या अर्जामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पवारांच्या गाठीभेटी

वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनीही ग्रामीण भागात मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. नाशिकरोड, सातपुर, त्र्यंबकेश्वर परिसरात पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. वंचित आघाडीचे स्थानिक पदाधिकारीही त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पवार यांच्याकडूनही वातावरण निर्मितीसाठी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा नेत्यांना पवारांचा शिवनीतीचा उपदेश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच लक्ष घालायला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या समस्त मराठा नेत्यांना पाचारण करून समीर भुजबळ यांच्या पाठीशी राहण्याचा आदेशच त्यांनी दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समीर भुजबळ, तर शिवसेनेच्यावतीने हेमंत गोडसे रिंगणात आहेत. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही अपक्ष म्हणून उभे राहण्याची तयारी चालविली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे पवन पवार, मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, माकपतर्फे इरफान शेख उमेदवार आहेत. सध्या तरी बहुरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत गोडसे व भुजबळ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होईल हे उघड आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याने त्यांना मराठा समाजाचा असलेला विरोध सर्वश्रुत आहे. त्यांची लढत नेमकी गोडसे या मराठा उमेदवाराशी होत असल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती आहे. यापूर्वी राष्ट्रवादीतीलच मराठा समाजाच्या नेत्यांनी निवडणुकीत भुजबळांना विरोध केला होता. २००९ मध्ये मनसे व शिवसेना यांच्यातील मतविभागणीमुळे समीर भुजबळ यांना निसटता विजय मिळाला होता. २०१४ मध्ये तर मोदी लाटेचाही प्रभाव पडून गोडसेंनी छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. गेल्या वर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली निघालेले विराट मोर्चे व युती सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा सहानुभूतीदार मराठा मतदार पक्षाबरोबरच रहावा यासाठी खुद्द पवारांनीच पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी आघाडीच्या सर्व मराठा नेत्यांना बोलावून समीर भुजबळ यांच्यासाठी रदबदली केली. मराठा एके मराठा करीत बसाल तर इतर समाज आपल्याशी फटकून राहतील. त्याचा फटका इतर मतदारसंघांत बसेल. निवडून येण्यासाठी सर्वच समाजाची गरज लागते, असे वडीलकीच्या नात्याने त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारबरोबर ठेऊन स्वराज्य उभे केले, हे देखील पवारांनी उपस्थित मंडळींना समजावून सांगितले. झाले गेले आता विसरा आणि भुजबळांना साथ द्या, असे आर्जव करतानाच यावेळेस काही दगाफटका कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सूचक दम देण्यासही ते विसरले नाहीत.

मतविभागणीच कळीचा मुद्दा!

या बैठकीस राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस व मनसेचे काही नेतेही उपस्थित होते. विशेष म्हणजे समीर भुजबळ यांच्या उपस्थितीतच ही चर्चा झाल्याने समीर यांच्या जीवात जीव आल्याचे समजते. यावेळेस २००९ प्रमाणे दोन मराठा व एक ओबीसी अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळ कॅम्प खुश असला तरी पवन पवार यांच्यानिमित्ताने दलित मागासवर्गीय मतदारांचीही विभागणी होत असून, कोकाटे व पवार हे कोणाची अधिक मते विभागतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असल्याने पवार यांनी यंदा स्वत:च लक्ष घालायचे ठरविलेले दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावसाठी तीन तर रावेरसाठी पाच अर्ज दाखल

0
0

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी बुधवारी (दि. ३) जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तीन तर रावेरसाठी पाच अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव बाबूराव देवकर यांनी तर मुकेश राजेश कुरील व सतीश भास्करराव पाटील यांनी अपक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. ३) नजमीन शेख रमजान व सुनील संपत जोशी यांनी अपक्ष तर राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीकडून अजित नामदार तडवी, इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून रोशन आरा सादीक अली आणि बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र विठ्ठल कोलते यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

जळगाव लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत नऊ उमेदवारांनी बारा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेजत. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ६३ उमेदवारांनी १५० अर्ज नेले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ३६ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली. आज (दि. ४) दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, नेमके कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जळगाव’चा संभ्रम कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यांनी पक्षाच्या ए. बी. फॉर्मसह नामनिर्देशनपत्र दाखल करून प्रचारालादेखील सुरुवात केली. मात्र, आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना या जागेसाठी तयार रहा, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून आल्याने भाजपच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवारीचा संभ्रम वाढला आहे. पक्षाकडून सूचना आल्याच्या वृत्ताला उन्मेष पाटील यांनीही ‘मटा’शी बोलताना दुजोरा दिला आहे.

भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापल्यापासून भाजपमध्ये मोठा अंतर्गत कलह सुरू आहे. आमदार स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरूनदेखील पक्षात दोन गट पडले आहेत. एकंदरीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी सावधता बाळगली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना बुधवारी (दि. ३) वरिष्ठांकडून तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत भाजपकडून कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सुरुवातीपासून उमेदवारीचे त्रांगडे
खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हापासून या जागेच्या उमेदवारीबाबत त्रांगडे कायम आहे. या जागेसाठी तब्बल बारा जणांची यादीच स्थानिक पातळीवरून वरिष्ठांना पाठवण्यात आली होती. यामधूनच आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले. परंतु, यानंतर ए. टी. पाटील हे प्रचंड नाराज होत त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. दरम्यान, ए. टी. पाटील यांच्या बंडखोरीने पक्षाला मोठा फटका बसण्याचा धोका लक्षात घेता स्मिता वाघ यांचे तिकीट बदलवून आता आमदार उन्मेष पाटील यांना देण्यासाठी दिल्ली येथे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे कळते.

कार्यकर्त्यांची धावपळ
भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. तर आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तयार राहण्याच्या सूचना करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे अमळनेर येथील भाजपाचे सह्योगी आमदार शिरीष चौधरी यांनी मात्र, मलाच उमेदवारी मिळेल असे ठामपणे सांगितल्याने या उमदेवारीचा कौल कोणाला मिळणार, यामुळे कार्यकर्ते गोंधळात आहेत. नेमका प्रचार कोणाचा करावा, हाही प्रश्न त्यांना पडला आहे.

भाजपची राजकीय खेळी?
काही राजकीय जाणकारांच्या मते आमदार उन्मेष पाटील हे डमी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने विद्यमान खासदार ए. टी. पाटील व भाजपचे सह्योगी आमदार शिरीष चौधरी हे नाराज आहेत. त्यांच्याकडून होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यासाठी भाजपनेच उमेदवार बदलत असल्याची राजकीय खेळी केली असल्याचीही शहरात चर्चा होती.

‘सोशल मीडियावर कधी करण पाटील, कधी आमदार उन्मेष पाटील, कधी साधना महाजन यांना उमेदवारी मिळाल्याचे कळते. त्यामुळे पक्षाने मला उमेदवारी दिलेली असून, त्यानुसार माझा प्रचार जोरात सुरू आहे. आतापर्यंत सहा दिवसांत ७८ गावांना भेटी दिल्या आहेत. उमेदवारी बदलाबाबत मला काही माहिती नाही.
- आमदार स्मिता वाघ, भाजप-शिवसेना युती उमेदवार

भाजपतर्फे जळगाव लोकसभेसाठी मुंबईहून दोन नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. यात आमदार उन्मेष पाटील व माझे नाव आहे. रात्रीतून याचा निर्णय होणार असून, मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष अर्ज आज (दि. ४) दाखल करणार आहे.
- शिरीष चौधरी, भाजपचे सह्योगी आमदार

पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचा आदेश मानून आपण तयारीला लागलो असून, लवकरच जळगावच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा होईल.
- उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवानिमित्त मालेगावी ‘स्मरण तीन ताऱ्यांचे’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एकता सांस्कृतिक मंचातर्फे गुढीपाडवानिमित्त मालेगावकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ५ व ६ एप्रिल रोजी 'स्मरण तीन ताऱ्यांचे' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती मंचाचे प्रमुख डॉ. विनोद गोरवाडकर, स्वप्नील कोळपकर यांनी ही माहिती दिली.

शुक्रवारी 'इंद्रायणी काठी' हा पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या, गायलेल्या भावगीत, भक्तिगीत व चित्रपट गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम होईल. शनिवारी 'विकत घेतला शाम' हा ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या भावगीते, भक्तिगीते व चित्रपटगीतांचा कार्यक्रम होइल. या कार्यक्रमात शंकर महाजन, भावपा पोफळे, अमृता कुंभकर्ण, हरिप्रिया धर्माधिकारी, मंदार जोशी, भूषण घोडके, सायली पाटील, नारायण महाजन आदी गायक भावगीते सादर करतील. शहरातील कॅम्प भागातील गोरवाडकर वाडा येथे रात्री ८.३० वा. हे कार्यक्रम होणार असून रसिकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन एकता सांस्कृतिक मंचतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमावास्येचा अर्जांना ‘ब्रेक’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी सिन्नरचे माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याअगोदर या मतदारसंघातून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण पाच उमेदवारांचे अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.

गुरुवारी अमावास्या असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. अॅड. कोकाटे यांनी अमावास्येअगोदरचा मुहूर्त साधत अर्ज भरला, तर इतरांनी अर्जही नेले. या मतदारसंघातून अर्ज नेणाऱ्यांची संख्या गुरुवारी नऊ होती. त्यात इगतपुरी तालुक्यातील नांदगाव येथील बाबूराव पागेरे, पंचवटी येथील सतीश निकम, नाशिकरोड येथील विलासराज गायकवाड, राणेनगर येथील प्रकाश विलास सोमठाणकर, बाजीराव पंढरीनाथ गायकर, सिन्नर येथील रंगनाथ सोनवणे, मनमाड येथील बादशहा रहमान पाररू शहा, नाशिक येथील भीमराव जयराम पांडवे, दीपक रंगनाथ डोके यांनी अर्ज नेले आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार हेमंत गोडसे दि. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर राष्ट्रवादीतर्फे माजी खासदार समीर भुजबळ दि. ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. इतर इच्छुक उमेदवारांनी अद्याप आपल्या उमेदवारी अर्जांबाबतची तारीख जाहीर केलेली नाही.

--

सोमवारी-मंगळवारी गर्दीची चिन्हे

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत ५० नामनिर्देशनपत्रे नेण्यात आली आहेत. पण, अर्ज भरणाऱ्यांची संख्या अद्यापर्यंत पाचच आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे.

------ दुसरी बातमी----

दिंडोरीत उघडले खाते

--

निवृत्त सनदी अधिकारी टी. के. बागुल यांचा अर्ज दाखल

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज नाशिकचे निवृत्त सनदी अधिकारी टी. के. बागुल यांनी अपक्ष म्हणून दाखल केला आहे. दोन एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या दिवशी पहिला अर्ज दाखल झाला.

या मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी आतापर्यंत ४७ नामनिर्देशनपत्रे उमेदवारांनी नेलेली आहेत. पण, त्यातील एकच अर्ज दाखल झाला आहे. आता ९ एप्रिलपर्यंत यातील किती उमेदवार अर्ज दाखल करतात त्यत्रून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार धनराज महाले व भाजपतर्फे डॉ. भारती पवार, माकपतर्फे जिवा पांडू गावित व वंचित बहुजन विकास आघाडीचे बापू बर्डे हे प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यातील भाजपच्या डॉ. पवार ८ एप्रिल, तर राष्ट्रवादीचे महाले ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. इतर उमेदवारांच्या अद्याप तारखा निश्चित झालेल्या नाहीत. एकाच वेळेस या उमदेवारांनी अर्ज दाखल केले, तर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. गुरुवारी सहा उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज नेले. यात धनराज महाले, हेमराज वाघ, अर्जुन शिवराम वाघने, शिवाजी लुकडू मोरे, सुभाष सोनवणे, पुंडलिक माळी यांचा समावेश आहे.

--

अधिकाऱ्यांना वाटले हायसे

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. गेले दोन दिवस एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे यंत्रणा बसून होती. पण, गुरुवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांनाही हायसे वाटले. त्यातील पहिलाच अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी असलेले बागुल यांचा असल्यामुळे त्याचा आनंदही होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार प्रचारकांची मांदियाळी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (दि. ९)ची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यात देश आणि राज्यातील हेविवेट नेत्यांच्या प्रचार सभांनी राजकीय मैदाने गाजणार आहेत.

दि. १० ते २५ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींच्या सभांनी निवडणुकीचा फीवर चढणार आहे. या दिग्गज नेत्यांच्या सभांचे नियोजन राजकीय पक्षांकडून सुरू आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहे.

जिल्ह्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हेविवेट नेत्यांच्या प्रचार सभांद्वारे मतदारांना आकर्षित केले जाणार आहे. त्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतर्फे नियोजन सुरू आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंसमोर राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचे आव्हान आहे. त्यातच माजी आमदार माणिकराव कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने रंगत वाढली आहे. दिंडोरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपच्या जे. पी. गावितांमध्ये तिरंगी लढत आहे. शिवसेनेने नाशिकची, तर राष्ट्रवादीने नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची केली असल्याने दिग्गज नेत्यांना प्रचारांच्या मैदानात उतरवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पिंपळगाव बसवंत घेण्याचे नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. नाशिक आणि दिंडोरीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त सभेचे नाशिकमध्ये नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा घेण्याचे नियोजन राष्ट्रवादीतर्फे सुरू आहे. शरद पवार यांच्या नाशिक आणि दिंडोरी येथे स्वतंत्र सभा घेतल्या जाणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही दिंडोरी, नाशिकमध्ये स्वतंत्र सभा होणार आहेत. भाजकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही सिन्नरमध्ये प्रचारासाठी आणण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

---

मुख्यमंत्री, ठाकरेंची २४ रोजी सभा

नाशिक आणि दिंडोरीतील शिवसेना आणि भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गोल्फ क्लब मैदानावर एकत्रित सभा होणार आहे. येत्या २४ एप्रिल रोजी सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर ही सभा होणार आहे. दोन्ही नेते एकाच वेळी व्यासपीठावर येऊन गोडसे, पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत. या सभेच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपचे वातावरणनिर्मितीचे प्रयत्न असून, ही सभा भव्य करण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिका निवडणुकीत याच मैदानावरून मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करीत भाजपची सत्ता आणली होती. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कांसाठी लाल सलाम!

0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

'राज्यच नव्हे; तर देशभरात अन्नदाता शेतकरी अनेक प्रश्नांनी हैराण आहे. शेतीचा पाणीप्रश्न, शेतमाल भाव, शेतकऱ्यांच्या रोज होणाऱ्या आत्महत्या तसेच तरुणांना भेडसावणारा रोजगाराचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकच पर्याय आहे अन् तो म्हणजे लाल सलाम.' असे आवाहन चांदवड येथील प्रचाराच्या श्रीगणेशा सभेप्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे उमेदवार कॉ. जे. पी. गावित प्रचाराचा शुभारंभ गुरुवार चांदवड येथील बाजारतळ येथील सभेप्रसंगी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते शांताराम बापू जाधव होते. तर व्यासपीठावर सीपीआयचे राजू देसले, वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीचे के. एन. आहिरे, मनसेचे माजी आ. नितीन भोसले, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, विश्वास देवरे, येवल्याचे सचिन अलगट, किसन गुजर, सीताराम ठोंबरे, अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, धर्मराज शिंदे आदी उपस्थित होते.

येचुरी म्हणाले, 'मोदी सरकारने देशात बरबादी आणली असून, देशाला नेता नकोय, तर नीती हवी आहे. नीतीची लढाई आपण लढत आहोत. देश वाचवायचा असेल तर आपल्याला भाजप सरकार हटवायला हवे.' शास्त्रंज्ञांची कामगिरी स्वता:चीच असल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

'अन्न, पाणी, शेती व रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी तुमचा आवाज दिल्लीत पोहचायला हवा, त्यासाठी तुम्ही सर्वांनी यासाठी तुम्ही कॉ. गावितांना साथ देत निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भाजपाला वाईट दिवसात साथ देणाऱ्या खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्यावर सर्वात मोठा अन्याय असून, भाजपाने त्यांचा उपयोग करून घेत त्यांची उपयोगिता संपल्यावर त्यांना घरात बसण्याची वेळ आणली असून, उमेदवारी कोणाला तर, दारुण पराभव झालेल्या भारती पवारांना दिल्याचा टोलाही कॉ. गावित यांनी लगावला.

यावेळी राजू देसले, के. एन. आहिरे, माजी आ. नितीन भोसले, डॉ. डी. एल. कराड, सचिन अलगट आदींची भाषणे झाली. सभेचे प्रास्ताविक कॉ. हेमंत वाघेरेनी तर सूत्रसंचालन सुनील मालुसरे यांनी केले. सभेसाठी मार्क्सवादीचे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भुजबळांनी मांजरपाड्याच गाजर दाखवलं...

दिंडोरी लोकसभा मतदार संघात पूर्व भागात पाणीप्रश्न गंभीर असून, या पाणीप्रश्नावर भुजबळांनी नेहमी राजकारण करत मांजरपाड्याच पाणी येवलाच्या नागरिकांना मिळवून देत येवला सुजलाम सुफलाम् करू, अशी स्वप्ने दाखवत निवडणुका लढविल्यात अन् जिंकल्यात. मात्र पाणी आलेच नाही आणि भुजबळ आपल्यात असेपर्यंत पाणी काही येणारच नाही, असे म्हणतं भुजबळांनी लोकांना मांजरपाड्याच गाजर दाखविल्याची टीका कॉ. जे. पी. गावित यांनी केली.

राष्ट्रवादीने साथ द्यावी

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता, त्यांनी शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याऐवजी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी अपेक्षा कॉ. सीताराम येचुरी यांनी भाषणातून बोलून दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्दोष मुक्तता

0
0

निर्दोष मुक्तता

नाशिक : देवळाली कॅम्प येथील पारसी आग्यारी मंदिरात २० ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या चोरीच्या घटनेत पुजारी होमियार होमी सिदवा यांची प्रथम न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या घटनेत सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मंदिराच्या विश्वस्ताचा समावेश होता. सिदवा यांच्यातर्फे अॅड. अनिरुद्ध पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १४५ हरकती!

0
0

सुनावणीनंतर उर्वरित धार्मिक स्थळांवर हातोडा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मोकळ्या भूखंडांवरील ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत घोषित केल्यानंतर त्यांच्याबाबत तितक्याच हरकती येणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेने दिलेल्या मुदतीत केवळ १४५ हरकती प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या १४५ हरकतींवर सुनावणी घेतली जाणार असून, त्यात पुरावे सादर करणाऱ्या धार्मिक स्थळांना अभय मिळणार आहे, तर पुरावे नसलेली धार्मिक स्थळे अतिक्रमित ठरवून हटवली जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने शहरातील धार्मिक स्थळांबाबत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर सहा विभागांत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविण्यात आली होती. नव्याने हरकती घेण्याचे आदेश दिल्याने महापालिकेने या धार्मिक स्थळांची यादीच प्रसिद्ध करीत त्यावर हरकती व सूचना सादर करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात धार्मिक स्थळ बचाव कृती समितीच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बैठक घेतली होती. महासभेने मोकळ्या भूखंडांवरील पारित केलेला व शासनाकडे प्रलंबित असलेला ठराव मंजूर करून आणण्यासाठी शहरातील तीनही आमदारांवर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. तसेच, शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच महापालिकेने हरकती घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने ४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. या वेळेत नागरिकांकडून हरकती व पुरावे सादर करणे अपेक्षित होते. परंतु, ४ एप्रिलपर्यंत अवघ्या १४५ हरकती दाखल झाल्या आहेत. ज्या धार्मिक स्थळांबाबतचे पुरावे सादर झाले नाहीत, त्यांच्यावर हातोडा चालविला जाणार आहे.

...

मुदतवाढीची मागणी

या धार्मिक स्थळांबाबत हरकती दाखल करण्यासाठी महापालिकेने ४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाने हरकती दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी रामसिंग बावरी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images